You are on page 1of 40

अध्ययनाचे संक्रमण Transfer of

learning
या विशेष संस्करणात अर्थात विशेषांकात केवळ आणि केवळ अध्ययनाचे संक्रमण घडताना
अध्ययनार्थ्याच्या ठायी कोणकोणत्या मानसिक प्रक्रिया कशा घडतात त्यांची अद्ययावत माहिती
दे ण्याचा प्रयत्न आहे .

Dr. Urmila Atul Paralikar 2016-17 [Course title]


अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

1|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

कै . तीर्थस्वरूप आईस
सौ माधरु ी हनमु ंत राव साधू
हिस श्रद्धा पर्वू क समर्पित

1945-2007

ऋण निर्देश

2|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

प्रस्तत ू प्रेरित आहे . अशा विशेषांकात


ु विशेष संस्करण इंग्रजी मधल्या मोनोग्राफ या संकल्पनेपासन
केवळ एक छोटा सा विषय अथवा उपविषय घेऊन त्यावर तपशीलवार अभ्यासपूर्ण लेखन केले जात

असते. या ही विशेषांकात अध्ययन संक्रमण या उपविषयास घेऊन लेखन करण्याचा एक अल्पसा

प्रयत्न केलंय.

हा विशेष संस्करण लिहताना माझ्या सर्व कुटुंबाने मला वैचारिक मदत दे ऊन अत्यंत अमूल्य योगदान
दिले. विशेषत: हे लिहिण्यामागे माझ्या कै आईची सौ माधुरी हनुमंत राव साधू हिची प्रेरणा होती,
तिच्या रोजच्या जगण्यातून तिने जगता जगता शिकावे कशे, हे दाखवून दिले. पुस्तकातून अध्ययन हा
विषय शिकताना तिचे रोजचे जगणे डोळ्यांसमोर येत होते आणि संक्रमणाची संकल्पना समजत होती।
अध्ययनाचे संक्रमण कसे होते आणि कसे करायचे हे तिने प्रत्यक्ष उदाहरणातन
ू उत्तम प्रकारे जगन

दाखविले. निरीक्षण या कौशल्याचे धडे तिने दिले. तिच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही.

तसेच कमीअधिक पंचवीस वर्षांच्या मा‍झ्या संपूर्ण करियर मधे मी ज्यांच्या संपर्कात आले असे माझे
ते सर्व विद्यार्थी ज्यांना शिकवताना, मला अध्ययन कसे घडते आणि विद्यार्थी आत्मसात केलेले ज्ञान,
आकलन आणि इतर क्षमता कसे एका परिस्थितीतून अन्य परिस्थितीत कसे संक्रमण करतात , हे
प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाले. त्यांच्यामुळे शिकवायचे कसे कळत गेले. ते माझे खरे गुरु. त्यांच्या
ऋणातच राहलेले बरे .

अधिव्याख्याता म्हणन
ू शासकिय अध्यापक महाविद्यालयांमधील माझे सर्व सहकारी ज्यांच्या सोबत
काम करताना विविध विषयांवर बौद्धिक घडले आणि त्यातून विविध दृष्टिकोन समजले आणि या
विषयाची खोली वाढली, त्यांचे सर्वांचे अनेक आभार ! हे विशेषांक वाचून त्यांत सुधारणा सुचविणाऱ्या
माझ्या परममित्र श्री अतुल केशवराव परळीकरांचे शतशः धन्यवाद.

हे विशेषांक ज्यांनी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण संपादन करून मुद्रित केले असे ते श्री विनय हातोळे ,
प्रोप., अजंता मुद्रक प्राईवेट लिमिटे ड, समर्थनगर, औरं गाबाद, त्यांचे अनेक अनेक आभार.

डॉ उर्मिला अतुल परळीकर

औरं गाबाद (महाराष्ट्र)

2018

पर्वू पीठिका

3|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

अ ध्ययन होणे हे व्यक्तीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे . जो शिकत आहे तोच जगत आहे असे
मानायला हरकत कुणाचीच नसावी. अध्ययन होत गेले म्हणून माणूस गुफावासी अवस्थेतून
नगरवासी झाला. पाषाण युगातून हळू हळू का होईन पण डिजिटल युगात येऊन पोंचला आहे , हे
माणसात निहित असीमित बुद्धिमत्तेचे आणि अध्ययन क्षमतेचे निदर्शक आहे .

अध्ययन क्षमता ही गतिहीन तथा स्थिर नसून गतिशील व संक्रमणक्षम आहे . यांची प्रचिती जनावरांच्या
वर्तनात नेहमीच दिसून येते. मिळालेल्या अनुभवातून ते जे शिकतात, लगेच ते इतर समसमान परिस्थिती मधे
पुनः वापरायचे प्रयत्न करतात. बुद्धीच्या असण्याचे ते लक्षण आहे .

मनष्ु यमात्र सद्ध


ु ा हे च आतापर्यंत करत आले . अनभ
ु वातन
ू प्राप्त धडे, वत्ृ ती, मल्
ू य इत्यादि. तो सद्ध
ु ा जसे
परिस्थितीचे आकलन होईल तसे त्यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत राहिला. करता करता त्याच्या हे
लक्षात आले की शिकलेली प्रत्येक बाब प्रत्येक काळास, प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी जशास तशी किं वा
रूपांतरित वापरताच येईल असे नाही. कधी शक्य होईल, तर तिचे रूप बदलेल, तिची पद्धत बदलेल, तिच्यातील
घटक कमीअधिक प्रमाणात वापरले जातील. पण कुठलाही विषय असा नाही ज्यात संक्रमण घडत नाही.

अध्ययनाचे संक्रमण हा एक अत्यंत रोचक विषय आहे तसेच शिक्षकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे विषय सुद्धा
आहे . अध्ययन होत असताना नेमके संक्रमण कशाचे होते, कशामुळे घडते, वर्गात शिकवत असताना ते
जाणीवपूर्वक कसे घडवून आणायचे, हे शिक्षणाशी निगडीत सर्वच घटकांना माहीत असणे अपरिहार्य आहे जेणे
करून शिकवणार्‍यास अध्यापन न केवळ अर्थपर्ण
ू करता येईल परं तु केवळ संबंधित योग्य घटकांचेच संक्रमण
करून वेळेची व श्रमाची बचत ही करता येईल.

प्रस्तुत विशेषांकात शिकणे-शिकविण्यातील गाभाभूत घटक अध्ययन संक्रमण फक्त याच एकाच विषयास
हाताळले गेले आहे . मात्र त्यास मूलभूत वैचारिक बैठक असावी म्हणून अध्ययन या संकल्पनेची चर्चा करण्यात
आलेली आहे तसेच सोप्या सहज भाषेत वाचकास कळे ल अशी मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे .
तसेच या संस्करणात चित्रांचा वापर विचारांचे आकलन होण्यासाठी करण्यात आलेले आहे . यात वापरण्यात
आलेली सर्व छायाचित्रे फक्त विचारांच्या सुलभ आकलनासाठी इंटरनेट च्या creative commons मधून
घेण्यात आलेली आहे त. आकलनास सुलभता व्हावी म्हणून जास्त करून माहिती तक्त्याच्या आधारे मांडण्याचा
प्रयत्न केला गेलाय.

हे संस्करण प्राथमिक, माध्यमिक उच्च तसेच उच्चतर शिक्षणाच्या सर्व स्तरांना उपयोगी पडणारा असा आहे .
यांचा उपयोग फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांना, पण होईल. शाळे त शिकविणाऱ्या शिक्षकांना आपले
दै नंदिन अध्यापन यास डोळ्यासमोर ठे वून पुनर्रचित करता येईल. याशिवाय हे विशेषांक content-designers,
assessment-designers, remedial-content makers, Instructional Systems Designers या सर्वांना
त्यांच्या कामात अत्यंत उपयुक्त ठरे ल, हे मात्र निश्चित.

हया विशेषांकाचे प्रथम संस्करण वाचकांच्या हाती दे ताना मला निश्चितच आनंद होत आहे वाचकांना हे
विशेषांक नक्कीच आवडेल यांची मला पूर्ण खात्री आहे .

डॉ उर्मिला अतुल परळीकर


औरं गाबाद (2018)

4|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

अनुक्रमणिका
पर्व
ू पीठिका

घटक क्रमांक (१) अध्ययन................................................................................................

१.२ अध्ययनाची वैशिष्ट्ये........................................................................................

१.३ अध्ययनाची क्षेत्र.े ..............................................................................................

घटक क्रमांक (२) अध्ययन संक्रमण..................................................................................

२.१. अध्ययन संक्रमण या संकल्पनेचे अर्थ.................................................................

२.२. अध्ययन संक्रमणाच्या विविध क्षेत्र.े ...................................................19

२.३ अध्ययन संक्रमणाचे प्रकार.............................................................20

२.४ अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ति.....................................................23

२.५ अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्व................................................................

5|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

घटक क्रमांक (१) अध्ययन

अनक्र
ु मणिका
अध्ययन निष्पत्ति
 प्रास्ताविक
 विषय विवेचन
 अध्ययन या संकल्पनेचे अर्थ
 अध्ययनाची वैशिष्ट्ये
 अध्ययनाची विविध क्षेत्रे
 अध्ययनाच्या विविध पद्धती

----------------------------------------------------------------------------------------------------
अध्ययन निष्पत्ति

हा प्रकरण पूर्ण वाचून झाल्यानंतर आपली चिकित्सक दृष्टी विकसित होईल व आपण

खालील गोष्टी करणास सक्षम व्हाल:

 अध्ययन या संकल्पनेचे अर्थ आपल्या शब्दांत सांगू व समजावू शकाल

 सामान्यत: अध्ययनाची विविध क्षेत्रे कोणती असतात त्यांची नावे स्वानुभवातून सांगू शकाल

 विषयनिहाय अध्ययनाची विशिष्ट विविध क्षेत्रे कोणती त्यांची नावे विश्लेषण करून सांगू शकाल

 विविध विषयांच्या अध्ययनाचे विशिष्ट असे विविध मार्ग स्वत: शोधू शकाल, सांगू शकाल

 विविध विषयांच्या अध्ययनाचे विशिष्ट असे विविध मार्ग स्वत: निर्माण करू शकाल.

 विविध विषयांच्या अध्ययनाच्या विशिष्ट कृति निहाय पद्धती स्वत: शोधन


ू काढू शकाल

 अध्ययनावर निरनिराळ्या परिस्थितीत कोणते घटक कसे परिणाम करू शकतील यांची कल्पना करू

शकाल

-------------------------------------------------------------------------------------------------------
प्रास्ताविक

जगणे म्हणजे शिकणे आणि शिकणे म्हणजेच जगणे . असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिकल्याशिवाय

माणसाला कधीही पढ
ु चे पाऊल टाकताच आले नाही. नवीन गोष्टी निर्माण करता आल्याच नाही. शिकला आणि

शिकत राहिला म्हणूनच एवढी मोठी सभ्यता व संस्कृति निर्माण करता आली. प्रत्येक गोष्टीचे विशेषीकरण

करता आले. ज्ञानाची नवनवीन क्षेत्रे प्रस्फुटित होत राहिलीत. पण त्याकरिता श्रम घ्यावे लागले शिकून त्या

बाबींचे उपयोजन करावे लागले. शिकतात तर जनावर सुद्धा. पण उपयोजन करून सभ्यता आणि संस्कृति कुठे

निर्माण करता आली. ईश्वरने दिलेल्या अध्ययन क्षमतेचे मानावे तितके आभार थोडेच ! अध्ययन हे एकमार्गी

नाही एक पद्धतीने होणारे नाही, ते होत असताना विशिष्ट मानसिक बौद्धिक प्रक्रिया मानवी में दत
ू घडतात. या

सर्व बाबींची माहिती आपण मिळवय


ू ा.

6|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

१ अध्ययन या संकल्पनेचे अर्थ

शिकणे म्हणजे काय असते ?

जगण्याच्या अवस्थेत आपल्या आजब


ू ाजच्
ू या परिसराशी आंतरक्रिया करत असताना व्यक्तिच्या वर्तनात

ज़ाणीवपर्व
ू क होणारे अथवा अजाणतेपणे होणारे बदल म्हणजे अध्ययन होय। खालील काही परिभाषा पाहिल्या

तार अध्ययनाच्या संकल्पनेचे आकलन अधिक चांगले होईल।

 हे नरी स्मिथ (Henry Smith): अनुभवांमुळे होणाऱ्या नवीन वर्तनाचे संपादन अथवा जुन्या वर्तनाचे

दृढिकरण अथवा निर्बलीकरण म्हणजे अध्ययन होय.

 स्टीअर्स आणि पोर्टर् (Steers & Porter) यांच्यानुसार अध्ययन म्हणजे अभ्यास, अनुभव अथवा

शिकविला गेल्यामुळे प्राप्त झालेले ज्ञान अथवा क़ौशल्ये .

 क्रो आणि क्रो (Crow & Crow) नुसार ज्ञान, सवयी आणि वत्ृ ती ग्रहण होण्याची प्रक्रिया म्हणजे

अध्ययन.

 व्यक्तिच्या स्वभावात होणारे , व दीर्घ काल टिकणारे असे बदल ज्याचा संबंध व्यक्तीच्या वाढ़ या

प्रक्रियेशी नसतो (रॉबर्ट गने, (Robert Gagne ) यांच्या Conditions of learning या पुस्तकातून)

 ज्ञान प्राप्त करण्याची तसेच तज्ञता/ प्रावीण्य प्राप्त करण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययन होय

 अध्ययन प्रक्रियेत व्यक्तिच्या स्मरणात नवीन माहिती जोडली जाते। यात एखादी नवीन माहितीला

सामोरा जात असताना प्रथम सुयोग्य माहितीकड़े लक्ष परु विले जाते, तत्पश्चात ् त्याचे मानसिकरित्या

संगठन केले जाते आणि शेवटी व्यक्तिस त्या विषयी आधी काय माहिती प्राप्त होती तिच्याशी तिचे

संबंध जोडले जाते (रूथ सी क्लार्क (Ruth C. Clark) आणि रिचर्ड माइअर (Richard Meier)

यांच्या- from eLearning and the science of instruction)

 किं ज़्ली आणि गैरी (Kinjley & Gary) यांच्या मते तर अध्ययन अभिसंधान घडल्यामुळे निर्माण

होणार्‍या सवयी आहे त । इथे व्यक्तीला वांछित वर्तनासाठी पुरस्कृत केले तर एखादे वर्तन दृढ़ होते

आणि शिक्षा दिली तर एखादे वर्तन कमकुवत ही होते.

 ऐम्ब्रोज़ इत्या. (Ambrose et al) (२०१०) म्हणतात शिकणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी अनुभव

प्राप्त झाल्यामुले मिळते आणी भविष्यात जिच्यामुळे अधिक शिकण्याची क्षमता वद्धि
ृ ग ं त होते

अध्ययन ही क्रमाक्रमाने घडणारी गतीशील, प्रगतिकारक, उद्दिष्टाधिष्ठित, प्रेरणेवर आधारलेली तुलनेने कायम

असलेली अशी प्रक्रिया आहे जी शिकणाऱ्याच्या व्यक्तिमत्वात ज्ञानात्मक, भावनात्मक आणि मानस-कारक

बदल घडवून आणते. हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आणि हे विविध पद्धतीनी घडत असते . आपल्या

आजूबाजूला घडणारी खालील मजेशीर उदाहरणे पहिलीत की चोवीस तास सर्वत्र सर्वांच्या बाबतीत शिकण्याची

प्रक्रिया सुरु आहे हे लक्षात येते। क्षेत्र कोणते ही असो, अवस्था कोणत्या ही असो, शिकणे अखण्ड सुरूच असते.

पुढच्या पानांवर तक्त्यात रोजच्या अनुभवांतून अध्ययन कसे घडते यांची रोचक मांडणी केलेली आहे , तसेच

7|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

प्रत्येक घटनेतन
ू व्यक्ति कोणत्या गोष्टी ग्रहण करतो ते ही समजण्यास मदत होईल. या विषयांत प्रथम प्रवेश

करणाऱ्या विद्यार्थ्यास ते खप
ू उपयोगी पडेल. उदा

काय करतो कसे करतो चित्रातून पहा काय शिकले


जाते
१. मल
ु गा सायकल चालवायचे सराव ज्ञान, कौशल्य ,
करतो आणि महिनभरानंतर का अभिवत्ृ ती
होईना एकदाचे सायकल
चालवायचे आत्मसात ् क़रतो

२. सविता ही पुरण पोली बनवण्याचे ज्ञान, कौशल्य ,


सराव करते आणि एकदाची अभिवत्ृ ती
शिकतेच

३. मनोज ज्यामितितील आकृत्या ज्ञान, कौशल्य ,


काढण्याचा सराव करतो, आणि अभिवत्ृ ती
त्यात प्रावीण्य प्राप्त करतो

४. नंदा पाहाते की आजारी आकलन,


आईजवळ बसल्यामळ
ु े त्याच्या अभिवत्ृ ती
भावाला ही आजाराचे संक्रमण
होते, म्हणून टोपी आई आणि
भावाज़वळ जाण्याचे टाळते

५. वैभव आपल्या वडीलांना नेहमी आकलन,


आपल्या बहि‍णीस कमी लेखताना अभिवत्ृ ती
पाहातो आणि तो ही तीस तसेच
कमी लेखण्यांचे शिकतो

This Photo by Unknown Author is

licensed
६. उषा घरी थोरल्या भावास under ज्ञान, कौशल्य,
संगीताचा रियाज करताना पाहात CC BY-NC अभिवत्ृ ती,
आली आहे म्हणन
ू संगीतामधे अभिरुचि
तिची अभिरुची निर्माण झाली

७. घरी शेजारी पाजारी सर्वत्र धार्मिक अभिवत्ृ ती,


वातावरण असल्याने दिवाकर अभिरुचि
सुद्धा धार्मिक होत गेला

८. आपल्या समाजातील धार्मिक अभिवत्ृ ती


कट्टर वाद पाहून क्ष व्यक्ति ही
कट्टर होत गेला। आणि त्यात
असहिष्णत
ु ा वाढल्याचे दिसन

येत गेले

This Photo by
Unknown
Author is
licensed under
CC BY-SA-NC
8|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

९. आपल्या धर्मगुरु च्या प्रवचन आकलन,


ऐकून क्ष व्यक्ति अ समुदायाशी अभिवत्ृ ती
घण
ृ ा करण्याचे शिकला।

This Photo by Unknown Author is licensed under CC BY-NC-ND

१०. लहान मुले आई वडिलाना खोटे अभिवत्ृ ती


बोलताना पाहून खोटे बोलायचे
शिकतात

This Photo by Unknown Author is licensed under CC BY-SA

११. सिनेमा पाहून आलेले तरुण अभिवत्ृ ती,


मंडली सिनेमातल्या नट अभिरुचि
नट्यासारखे केशसांभार करू
लागतात

१२. एका चांगल्या इंग्रजीच्या अभिवत्ृ ती,


सहवासात राहून विद्यार्थी उत्तम अभिरुचि,
इंग्रजी बोलायचे शिकतात कौशल्य

१३. निर्मितीला पियानो वाजवताना अभिवत्ृ ती,


चक
ु ा केल्याबद्दल शिक्षक रागवले अभिरुचि,
तर तिची पियानो वाजवण्याची कौशल्य
ची इच्छा अधिकच तीव्र झाली
आणि दिवसरात्र सराव करून तो
तिने शिकूनच दम घेतला
This Photo by Unknown Author is
१४. आपली आजी ८० वर्षाची झाली licensed under CC BY-SA अभिवत्ृ ती,
तरी नवीन गाणी ऐकून तो ही अभिरुचि
गायची शिकते। तिला शिकताना
पाहून प्रीति ला तिच्या वत्ृ तीचे
कौतकु वाटते आणि तिच्यात ही
तो गुण आपसूक येतो

अशा एक ना अनेक अनभ


ु व आपणास पाहायला मिळतात ज्यात ज्ञान, आकलन, कौशल्य वत्ृ ती मल्
ू ये कशी
शिकली व उचलली जातात याची प्रचिती येते. ता. क. --ही सर्व छायाचित्रे creative commons मधून घेण्यात

आलेली आहे त

१.२ अध्ययनाची वैशिष्ट्ये

9|Page
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

रोज़ घड़णाऱ्या घटनातन


ू आपणास अध्ययनाची बरीचशी वैशिष्ट्ये निष्पन्न होताना दिसतील, खाली रोजच्या

जगण्यातली काही चित्रे उदाहरणास्तव मांडण्यात आलेली आहे त जशी—

ही सर्व छायाचित्रे creative commons मधन


ू घेण्यात आलेली आहे त.

या सर्व छायाचित्रात आपणास अध्ययन अनौपचारिक व चालता बोलता घडत आहे हे सहज समजते. यांशी

अथवा इतर बाबिनशी निगडीत वैशिष्ट्ये पुढे संकलित स्वरूपात दे ण्यात येत आहे त. खालील बाबी आपणास ही

जाणवल्या असतील. फक्त संकलित स्वरूपात येथे मांडत आहे

शिकण्यासाठी अनिवार्य बाब म्हणजे आंतरिक प्रेरणा होय. ती काळ व अवस्था निहाय कमी अधिक प्रमाणात

असू शकते. शिकणे अर्थात अध्ययन हे कधीही थांबत नसते। त्यात कुठलेही खंड नसते, कुठलाही

10 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

lunchbreak नसतो . जो पर्यंत आपण जगत आहोत तो पर्यंत ही प्रक्रिया सरू


ु च असते। लहान सहान अनंत

गोष्टी सतत शिकतच असतो।

शिकवणारा घटक ही व्यक्ति, घटना अथवा परिस्थिती असू शकतात. शिकणारा व्यक्ति हा वयाने लहान अथवा

मोठा ही असू शकतो, हे विशेष लक्षात ठे वण्यासारखे

प्रत्येक व्यक्तीची शिकण्याची शैली भिन्नभिन्न असते. ती शिकणाऱ्यावर, त्यांच्या बुद्धिमत्तेवर , त्यांच्या

विशिष्ट ग्रहण शैलीवर अवलंबून असते. शिवाय एकाच व्यक्ति निरनिराळया गोष्टी शिकतांना निरनिराळ्या

शैली अवलंबू शकतो. कोणतेही दोन व्यक्ति कधीही एकसारखेपणाने शिकत नसतात

शिकणे हे अजाणतेपणात अथवा जाणून बुजून दोन्ही अवस्थांत घडते। आपण औपचारिक अथवा अनौपचारिक

पद्धतीने शिकत असतो। फक्त निद्रिस्त अवस्थेत कोणतेही अध्ययन घडत नाही

अनौपचारिक शिकणे हे स्थल, काळ, वेळ, विषय, वय व अवस्था यावर अजिबात अवलंबून नसते. औपचारिक

शिकणेला मात्र स्थल, काळ, वेळ, विषय, वय, अवस्था आणि बुद्धी यांचे बंधन असते.

व्यक्ति हा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पणे सुद्धा शिकत राहतो. स्वत: च्या अनुभवातून तर शिकतोच पण

इतरांच्या अनुभवातून ही शिकतो.

आपले शिकणे हे आपल्याला असलेली गरज, अथवा गरजेची तीव्रता, आपली महत्वाकांक्षा, आपल्याला प्राप्त

झालेले वातावरण, व सोयी सुविधा, आपली मनस्थिती आपल्याला असलेले पूर्वानुभव आणि पूर्व ज्ञान तसेच

आपल्या सकारात्मक किं वा नकारात्मक वत्ृ तीवर अवलंबून असते.

आपल्या शरीराच्या विविध अंगामार्फ़ त हे अध्ययन होत असते, उदा. हात, डोळे , कान, नाक, पाय, त्वचा इत्या.

आपले शिकणे एकाच वेळा एकाच मार्गातून नव्हे तर एकाच वेळा विविध मार्गातून घड़ते उदा. एखाद्या फळांची

अथवा वस्त्रांची माहिती घेत असताना आपले डोळे , नाक, स्पर्श इत्यादि सर्व क्रियाशील असतात.

शिकत असताना आपण ग्रहण केलेले ज्ञान, आकलन वत्ृ ती, मूल्य हे सापेक्ष स्वरुपाचे असतात. त्यांत काठिण्य

असू ही शकते आणि नसू ही शकत

त्या सर्व बाबी एकत्र ही घडू शकतात. शिकणारा किती संस्कारक्षम आणि चाणाक्ष आहे तसेच शिकवणारी व्यक्ति

अथवा परिस्थिती किती परिणामकारक आहे , हे त्यावर अवलंबून असते. शिकतांना व्यक्ति फक्त एकाच बाब ग्रहण

करतो असे नसते, अनेक बाबी एकावेळा घडत असतात. उदा. ज्ञान ग्रहण करत असताना व्यक्ति दृष्टिकोण, मूल्य,

ु ा ग्रहण करत जातो. जे शिकले जात आहे ते परिवर्तनीय असते. मिळालेल्या अनभ
वत्ृ ती, आणि कौशल्य सद्ध ु वामळ
ु े ते

बदलत जाते. ते आमल


ू ाग्र ही बदलू शकते अथवा त्यांत संकल्पनात्मक अंशत: बदल सद्ध
ु ा होऊ शकतात या काही

प्रातिनिधिक स्वरुपातील बाबी आहे त. अनंत अवस्थांत व्यक्ति हा शिकतच असतो. अध्ययन संक्रमण कसे घडते हे

समजण्यासाठी आता अध्ययनाची क्षेत्रे अभ्यासूया

१.३ अध्ययनाची क्षेत्रे

11 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

तात्विक दृष्ट्‍या बोलायचे झाले तर माणसाच्या व्यक्तिमत्वाची खालील मख्


ु य अंगे आहे त - समायोजन

(adjustment), सामाजिक व सांस्कृतिक (Social & Cultural), बौद्धिक (cognitive), मानसिक (Psychic),

जैविक (Biological), स्वाभाविक(disposition ). खालच्या चित्रात ते स्पष्ट होईल

बौद्धिक क्षेत्र मानसिक


क्षेत्र

सहजप्रवत्ृ ती समायोजन

मानवी
स्वभाव

सामाजिक आणि
जैविक अंग
सांस्कृतिक अंग

सामाजिक सांस्कृतिक क्षेत्र : रीतीभाति ,सौजन्य शील वागणे, परं परा, संस्कार, कर्तव्य, अधिकार,
सहनशीलता, समंजसपणा

मानसशास्त्रीय क्षेत्र :मनोवत्ृ ती, दृष्टिकोण. मते-मतांतरे , नियंत्रण, अभिव्यक्ति, कौशल्य, भावना

मनोवत्ति
ृ : मूल्य, आवड-निवड, पूर्वग्रह. लवचिकता, काठिण्य

बौद्धिक क्षेत्र : ज्ञान, माहिती, तथ्य, वस्तुस्थिती, आकलन , विश्लेषण, नव निर्माण, मूल्यमापन, उपयोजन

माणूस जगत असताना आपल्या परिसरातील ज्याज्या बाबींच्या तो संपर्कात येतो, किं वा ज्या ज्या बाबींशी

मग ती नैसर्गिक असो अथवा मानवनिर्मित, त्यांची आंतरक्रिया घडते, ती ती परिस्थिती, ते ते घटक वर

दिलेल्या चित्रात दाखविलेल्या क्षेत्रात त्यांचे शिक्षण घडवून आणतात. अगदी पाषाण काळापासून हे घडत आले

आणि आज त्यानेच निर्माण केलेले artificial intelligence काळ, यात सुद्धा शिकणे हे अविरत सुरूच आहे .

सर्वच उद्योग, व्यापार, वैद्यकीय व्यवसाय, अभियांत्रिकी, कलाक्षेत्रे, वाणिज्य क्षेत्र, कुटूंब व्यवस्था, शिक्षण

व्यवस्था, नागरीसंस्था, संरक्षण, इत ् सर्व क्षेत्रे अध्ययनाची क्षेत्रे आहे त

या सर्वच क्षत्रात ज्ञान, आकलन, वत्ृ ती, मूल्य, भावना, कौशल्य इत्यादि बाबी मानवी व्यापारनिहाय प्रकट

होतात. या सर्वच क्षेत्राशी निगडीत घटना, मग त्या व्यक्तीत होणार्‍या असो अथवा व्यक्तीकडून घटीत होणार्‍

या असो अथवा त्यावर घडणाऱ्या असो, प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी शिकण्याचीच आहे व असते. आता जरा

आपण उदाहरणे पाहूया. सोबत सोबत तम्


ु हीही कल्पना करत चला.

ु ात शिकतो, सुखात शिकतो, शांततेत शिकतो, गोंधळात शिकतो, बोलताना शिकतो, मूक राहून शिकतो,
व्यक्ति दख

हसून शिकतो, रडून शिकतो, हट्ट करताना शिकतो, हट्ट परु वताना शिकतो, गर्दीत असताना शिकतो, एकटा

असताना शिकतो, कोणी शिकविले म्हणून शिकतो, कधी आपण होऊन शिकतो, बाल्यवस्थेत शिकतो,

म्हातारपणात ही शिकतो. चोवीस तास, सदानकदा शिकतच असतो. तो आजारी असला तरी ती अवस्था ही

त्याला बऱ्याच काही शिकवून जाते. अन्य कोणी आजारी असला तरी तो अपरोक्ष शिकतोच. कधी आपण

12 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

कोणाकडून शिकतो, कधी कोणामळ


ु े शिकतो, कधी कुठे असल्यामळ
ु े शिकतो, कधी कुठे नसण्यामळ
ु े शिकतो, कधी

ु े शिकतो, कधी कोणी प्रेम केल्यामळ


कोणी रागवल्यामळ ु े शिकतो, कधी स्वीकारल्या गेल्यामळ
ु े शिकतो, कधी

नाकारल्या गेल्यामुळे शिकतो , कधी प्रत्यक्ष स्वानुभवातून शिकतो, कधी इतरांच्या अनुभवातून शिकतो. कधी

सुख कारक , आनंददायी अनुभव आल्यामुळे शिकतो, कधी दख


ु दायी, अनुभव आल्यामुळे शिकतो.

पण लक्ष द्या शिकणे म्हणजे एखादी नवीन गोष्ट ग्रहण करणेच फक्त नव्हे तर , अनावश्यक गोष्टींना

तिलांजलि दे णे सुद्धा होय, आहे त्या बाबीत जरासे फेरफार करणे सुद्धा शिकणे होय ! खालील सर्व उदाहरणात हे

लागू पडते.

तुम्ही आनंदात असलात तरी भावना व्यक्त करणे , व विवक्षित वत्ृ ती शिकता, दर्घ
ु टनेत सापडलात तरी काय

करावे आणि काय करू नाही हे शिकता, स्वयंपाकघरात आजीला चकल्या करताना पाहात आलात तरी शिकता,

वर्गात शिक्षक कसं बोलतो, कसे वस्त्र परिधान करतो, हे ही पाहात पाहात शिकता, आपली मित्र मंडळी कशी

बोलते, काय वाचते, काय खाते, कोणत्या बाबीत गुंतवणक


ू करते, हे ही त्यांच्या संगतीत राहून विविध गोष्टींचे

ज्ञान तुम्ही मिळवितात . वडील घरी आले तर त्यांच्या वर्तनातून तुमचे मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास

घडते. तुम्ही मूल्यं ग्रहण करता. कधी कोणाचे अक्षर पाहून शिकता, तर कधी कोणाचे संगीतातील नैपुण्य पाहून

ु रण करता. णाकडून भाषण कला, कोणाकडून शांत राहणे, कोणाकडून कला शिकता, कोणाकडून
तुम्ही अनक

भावना, कोणाकडून ज्ञान, कोणाकडून आकलन क्षमता, कुणाकडून त्यांचे उपयोग, कोणाकडून त्याची वाहन

चालवण्याची शैली, कोणाकडून केशरचना, कुणाकडून तंत्रज्ञान, कुणाकडून त्यांची चालण्याची शैली, कोणाकडून

कामाप्रति समर्पण, कोणाकडून सहृदयीपणा कोणाकडून व्यापारी वत्ृ ती अशा एक ना अनेक बाबी आपण अविरत

शिकत च असतो. आणि हो प्रत्येक वेळेस निरनिराळ्या पद्धतीने शिकता हे विसरू नका !

यापुढे स्वतः कडे लक्ष असू द्या, शोधा स्वत:ला, कसे शिकता ते आणि काय शिकता, (अर्थात काय नावीन

आत्मसात करता , काय सोडून दे ता ) त्यांच्या कडे सुद्धा !

This Photo by
विशेष क्षमता असलेले लोक पण शिकतात !Unknown Author is
licensed under
अभ्यासासाठी प्रश्न : आता खालील प्रश्नांCC
ची BY-NC-ND
उत्तरे दे ण्याचा प्रयत्न करा

आमचे प्रश्न तुमचे उत्तर संक्षेपात

1. शिकणे या क्रियेला तुम्ही आपल्या शब्दांत कसे परिभाषित

कराल ?

13 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

2. शिकल्यावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या क्षेत्रात

बदल घडतो?

3. शास्त्र या विषयांमध्ये कोण कोणत्या गोष्टी शिकण्यासारख्या

आहे त?

4. तम
ु च्या मते शिकण्याच्या प्रक्रियेसाठी शिकणाऱ्या व्यक्ति मधे

कोणत्या बाबी अनिवार्यपणे असल्या पाहिजेत?

5. शिकताना व्यक्ति मधे कोण कोणते बदल घडतात ? यादी

करा

6. अमक
ु एखादा व्यक्ति शिकलेला आहे हे कसे सिद्ध कराल?

उदाहरणातून स्पष्ट करा

7. व्यक्तीच्या कोणत्या वर्तनात(दृश्य आणि अदृश्य) बदल दिसन


येत असतो, उदाहरणातन


ू स्पष्ट करा

8. विशेष क्षमता असणारे दिव्यांजन सुद्धा शिकण्याची क्षमता

राखतात . सिद्ध करा

9. अध्ययनाची कोणतीही दहा वैशिष्ट्ये नमूद करा

10. व्यक्तीभिन्नतेचे अध्ययनावर काय परिणाम पडत असते,

सोदाहरण स्पष्ट करा

11. समजा तम्


ु ही एखादे दे शभक्तिपर अथवा सामाजिक विषयावर

आधारलेले नाटक पाहायला गेलात, ते पाहिल्यावर तुमच्या मधे

कोणते संभाव्य बदल घडू शकतील , त्यांची यादी करा

12. एखादी वत्ृ ती शिकल्याचे सत्य उदाहरण द्या

घटक क्रमांक (२) अध्ययन संक्रमण


---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अनक्र
ु मणिका
अध्ययन निष्पत्ति

14 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

१. प्रास्ताविक
२. विषय विवेचन
२.१. अध्ययन संक्रमण या संकल्पनेचे अर्थ
२.२. अध्ययन संक्रमणाच्या विविध क्षेत्रे
२.३ अध्ययन संक्रमणाचे प्रकार
२.४. अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती
४. घटकाअंतर्गत प्रश्नांची उत्तरे

---------------------------------------------------------------------------------------------------------
अध्ययन निष्पत्ति

हा घटक पूर्ण झाल्यावर आपण या गोष्टी करू शकाल-

1. अध्ययन संक्रमण या संकल्पनेविषयी माहिती स्वत:च्या शब्दांत सांगू शकाल

2. अध्ययन संक्रमणाच्या विविध क्षेत्रांविषयी आपण होऊन माहिती दे ऊ शकाल

3. अध्ययन संक्रमणाचे प्रकार कोणते त्यांचा शोध आपण होऊन करू लागाल

4. अध्ययन संक्रमणाची प्रक्रिया कशी घडते हे आपल्या शब्दांत सांगू शकाल व उदाहरणे ही दे ऊ

शकाल

5. अध्ययन संक्रमणाविषयी विविध उपपत्तिची माहिती ही दे ऊ शकाल

6. अध्ययन संक्रमणाच्या ज्ञानाचा उपयोग आपला विषय शिकवण्यात कल्पकतेने करू शकाल

प्रास्ताविक

२-३ वर्षांच्या लहान मुलास जर आपण कुत्रा दाखवून कुत्र्‍याची संकल्पना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यास

अन्यत्र बकरी जरी दिसली तरी ते मूल त्याला कुत्रे समजेल . हा अध्ययन संक्रमणाचा अत्यंत अपरिष्कृत उदाहरण

होय. आपण फक्त शिकत नाही तर जे काही एका विशिष्ट परिस्थितीत शिकतो त्यांचे उपयोग जमेल तसे

अन्यत्र, सारख्या वाटणाऱ्या / दिसणाऱ्या परिस्थितीत करण्याचा प्रयत्न करतो ही करण्याचा प्रयत्न करतो .

त्यांचे कारण त्याला दोन्हीही परिस्थिती वरवरून समसमान दिसणे, असे वाटणे की नवीन समस्या कदाचित

त्याने सुटेल, किं वा काहीतरी नवीन निष्पन्न होईल. प्रयोग करण्याचा हे तु ही असू शकतो. कारण काहीही असो,

व्यक्ति हे पर्वा
ू नभ ू ज्ञानास वर्तमान किं वा भविष्यात नवीन परिस्थितीत वापरण्याचा प्रयत्न जरूर करतो.
ु वांना पर्व

हीच अध्ययन संक्रमणाची मूलभूत संकल्पना होय. या प्रकरणात आपण हे च सोप्या भाषेत समजून घेऊया.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

15 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

२.१. अध्ययन संक्रमण या संकल्पनेचे अर्थ

अध्ययन करणे अथवा होणे म्हणजे सर्व साधारणपणे सरावांमुळे, प्रशिक्षणामुळे, निरीक्षणामुळे अथवा

अनुकरणामुळे व्यक्तीच्या वर्तनात घडणारे अगदी तात्पुरत्या स्वरुपातील घडणारे बदल होय. या बदलातून तो

कसले तरी ज्ञान, कशाचे तरी आकलन, कशाचे तरी कुठे तरी उपयोजन, विशिष्ट अशी अभिवत्ृ ती, कशाविषयी

विशिष्ट अभिरुची, कशाविषयी तरी एखादे विशिष्ट दृष्टिकोन वगैरे विकसित करतो. नेमके हे ‘कशाबद्दल’

म्हणजे काय असावे? ते समजल्याशिवाय संक्रमण समजणार च नाही. तेव्हा आपण प्रथम ते जाणून घेऊ या .

काही परिभाषा अभ्यासू.

परिभाषा

Transfer is the productive application of prior learning and experiences in novel contexts
(Gass & Selinker, 1983; Gick & Holyoak, 1987; Roediger, 2007)

पर्वा
ू नभ ु व आणि पर्व
ू ज्ञानाचा नवीन संदर्भात हितकारी उपयोग करणे म्हणजे अध्ययनाचे संक्रमण होत, असे गॅस

ं र (१९८३) मधे, गिक्क


आणि सेलिक आणि हॉलयोक (१९८७) मधे आणि रॉएडिगेर (२००७) मधे म्हणते झाले

(अनव
ु ादीत)

Delaware Social Studies Education Project Research Corner describe the process of
Transfer as follows--
Transfer is when learning in one context enhances (or undermines) a related
performance in another context. (Perkins and Salomon, 1992) (“Extending Transfer of
Learning Theory to Transformative Learning ... - JSTOR”)
पेरकिन्स आणि सोलोमान (१९९२) साली असे म्हणाले की जेव्हा एखाद्या संदर्भातील अथवा परिस्थितीतील

ु ऱ्या संदर्भातील अथवा परिस्थितीतील अध्ययनास सहायक / हितकारक अथवा


अध्ययन जेव्हा अन्य दस हानिकारक

/बाधक सिद्ध होते तेव्हा आपण संक्रमण घडले असे म्हणतो (अनुवादीत)

Transfer is the ability to extend what has been learned in one context to new contexts
(Brandsford, Brown, Cocking, 1999) (“Definitions of Transfer - University of
Delaware”)

जुन्या परिस्थितीतून शिकलेल्या बाबीचा नवीन परिस्थितित उपयोग करणे , विस्तार करणेची क्षमता

म्हणजे संक्रमण होय. (ब्राऊन, ब्रॅंडसफोर्ड आणि कोककिङ्ग (१९९९) (अनुवादीत)

16 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

Transfer is the process of using knowledge or skills acquired in one context in a new or

varied context. (Alexander and Murphy, 1992) (“BILATERAL TRANSFER BY UPALI.docx -


Experiment 5: Bilateral Transfer of ...”)

एलेक्जांडर आणि मर्फी (१९९२) नुसार एका विशिष्ट परिस्थितित प्राप्त करण्यात आलेले ज्ञान , किं वा कौशल्य

नवीन वेगळ्या परिस्थितित वापरण्याची प्रक्रिया म्हणजे संक्रमण होय ((अनुवादीत)

Newly acquired knowledge structures need consolidation in order to be transferred, and


noncognitive aspects of learning (social, emotional, and motivational) need particular
consideration in the original learning process.( G. Steiner (2001))

संक्रमण होणे करिता नव्याने प्राप्त केलेले ज्ञान आधी संकलित आणि समायोजित करावे लागते आणि या

प्रक्रियेत सामाजिक, भावनिक, आणि प्रेरणात्मक अबौद्धिक घटक यांचा विशेष आणि प्राधान्याने समावेश असतो

(जी. स्टानेर २००१)

व्यक्तीच्या व्यक्तिमाची तीन मुख्य आंतरिक अंगे- विचार, भावना आणि वर्तन -हे तीन घटक आहे त ज्यात

खालील बाबी निहित असतात आणि या त्या गोष्टी आहे त ज्यांचे कळतनकळत, जाणून, अजाणतेपणाने एका

ु ऱ्या परिस्थितीत संक्रमण होत असते.


परिस्थितीतून दस

शिकलेली एक परिस्थिती संक्रमण अपरिचित परिस्थिती


परिस्थिती

आकलन आकलन

ज्ञान
ज्ञान

मूल्य मूल्य

धन संक्रमण
सामान्यीकरण सामान्यीकरण
ऋण संक्रमण

संक्रमण कसे घडते ते आपण पुढच्या पष्ृ ठावर दिलेल्या तकत्यात पाहूया आणि समजून घेऊया

17 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

संक्रमणांची प्रक्रिया अशी घडते

काय कशांमधून मिळवितो नेमके कोणते

घटक संक्रमित

होतात

ज्ञान ब्रह्माण्ड, अंतरिक्ष आणि मर्त्य जगातील सर्व भौतिक, रासायनिक, जैविक, परामानसिक, तथ्य, माहिती,

मानसिक रचनेच्या वैशिष्ट्यांचे, जीवांचे, परिस्थितीचे, प्रक्रियेचे, स्वभावाचे, अवस्थेचे, रचनेचे, सूचना,

वस्तुस्थिती,
विषयाचे, पथ्ृ वी वर आढळणाऱ्या सर्व वस्तूंचे, गुण धर्मांचे, संरचनेचे, निकषांचे, प्रमाणकांचे,
तत्व, सूत्र
स्थानाचे, आंतरक्रियांचे, वस्तंच्
ू या इतिहासाचे, घटनांचे, संस्कृतींचे, रीती-भातीचे, कलांचे
सामानयीकरण
(संगीताचे, वाद्यांचे, सुरांचे, लाईचे), प्रयोगांचे, नियम व तत्वांचे, रचनेचे, साहित्याचे,
यांच्यातील
पुस्तकांचे, निसर्गाचे, सूत्राचे, चक्राची सत्य माहिती, तथ्य, वस्तुस्थिती
समानता

आकलन व्यक्ति, वस्तु, पदार्थ, घटना प्रक्रिया, परिस्थिती यांच्यातील परस्पर आंतरसंबंधांचे , तथ्य, माहिती,

परस्परावलंबनाचे, गुण वैशिष्ट्यांचे त्यांच्या तशा असण्याच्या कारणांचे, परिणामांचे, मुख्य सूचना,

मुद्यांचे, मध्यवर्ती कल्पनांचे, घटनेतील क्रमांचे, रचनेत दडलेल्या तत्वांचे, गहि


ृ तकांचे, उपायांचे, वस्तुस्थिती,

निर्देशांचे, निकालाचे, भाषांतराचे, आलेखांत दडलेल्या माहितीचे, उदाहरणाचे, सूत्रांचे, दाखल्याचे, यांच्यातील

प्रक्षेपित विचारांचे, आणि विचारात दडलेल्या भावनांचे, मूल्यांचे, कोणाच्या तरी कुठे तरी समानता

कसल्या तरी वागण्याचे, नैसर्गिक नियमांचे नियमितता, घटनेतील पात्रांच्या गुण वैशिष्ट्यांचे,

उपयक्
ु ततेचे अथवा अनप ु ततेचे, प्रक्रियांच्या विशिष्ट पायऱ्यांत व क्रमांत
ु यक् घडणेची कारणे ,

परिस्थितीचे संदर्भ, इत्यादि अनेक बाबींचे अर्थनिर्वचन करणे, त्याची समज येणे.

अभिवत्ृ ती इतर व्यक्तीच्या/आपल्या आप्त-इष्टी यांच्या इतर व्यक्ति, संस्था, वस्तु, प्रक्रिया, रचना बद्दल विचार, वर्तन,

असलेले दृष्टिकोण, आवड, सकारात्मक अथवा नकारात्मक, भावना भावना, कृती

यांच्यातील

समानता

कौशल्य व्यक्तिगत जगण्याची कौशल्ये, विषय निहाय कौशल्ये, प्रक्रिया निहाय कौशल्ये, अंग निहाय विचार +

कौशल्ये, व्यवस्थापन विषयक, नेटवर्किं ग बाबतची कौशल्य, वित्तनियोजन कौशल्य, गणना भावना+ कृती

करण्याची कौशल्य, भाकिते करिता येण्याची कौशल्य, सामाजिक कौशल्य, सादरीकरणाची यांच्यातील

कौशल्य, समस्या-निराकरणाचे कौशल्य, कला विषयक कौशल्य, क्रीडाविषयक कौशल्य, समानता

अभिरुचि कला साहित्य, फॅशन विचार भावना

कृती

18 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

मानवी में द ू एका विवक्षित परिस्थितीत प्राप्त केलेले तथ्य, माहिती, सूचना, वस्तुस्थिती, तत्व, सूत्र, सामानयीकरण

इत्यादि यांच्यातील समानता, यांचा अर्क बाजूला काढतो आणि दस


ु ऱ्या अन्य परिस्थितीत जी की अत्यंत समान

वाटू शकते तिथे जशास तसे तिचे उपयोजन करते आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते.

२.२. अध्ययन संक्रमणाच्या विविध क्षेत्रे

जन्मल्यापासून मरे पर्यंत व्यक्ति हा विविध प्रसंगातून जातो, अनेक गोष्टी शिकतो. असंख्य बाबींचे ज्ञान प्राप्त

करतो, असंख्य संकल्पनांचे आकलन मिळवितो, असंख्य घटनांचे विश्लेषण करतो, विविध वत्ृ ती विकसित

करतो, विविध अभिरुचि संपादित करतो, या सर्वांचेच हस्तांतरण तो एका परिस्थितीतून दस


ु र्‍या परिस्थितीत

करत राहतो. आणि आलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो . चित्रात्मक हीच गोष्ट खाली मांडत

आहे

क्रीडा

कला

सण
वैद्यक
धर्म
राजनीति

वास्तश
ु ास्त्र संगणक
पाकशास्त्र

गणित व्यापार

मनोरं जन

उपरोक्त चित्रात फक्त उदाहरणास्तव काही क्षेत्रे दाखविण्यात आलेली आहे त . या शिवाय ही अनंत क्षेत्रे आहे त .

असो या सर्व क्षेत्रात (अंतर्गत अथवा बहिरगत) निहित तथ्यांचे, माहितीचे, विषयवस्तूंचे, प्रक्रियेचे,

आंतरसंबंधांचे, परस्परांवलबनाचे, कारणाचे, परिणामांचे, निकषांचे, रचनेचे, उपयोगितेचे,, कार्यपद्धतीचे,

19 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

मर्यादांचे, व्याप्तीचे, कौशल्याचे, क्षमतांचे, ज्ञान, आकलन, विश्लेषण, रुचि इत्यादींचे उपयोजन सारख्या

अथवा भिन्न समस्याप्रधान परिस्थितीत करणे म्हणजे संक्रमण होय

२.३ अध्ययन संक्रमणाचे प्रकार

आता आपण संक्रमणाचे किती प्रकार शोधले गेले आहे त, त्यांच्या बद्दल माहिती पाहूया. या माहितीचा उपयोग
तुम्हाला शिकताना खूप होईल किं वा अन्य कोणास शिकवताना पण.

"* Positive transfer - when learning in one context enhances a related performance in
another context." (“Definitions of Transfer - University of Delaware”)

धनात्मक संक्रमण: जेव्हा एका विवक्षित परिस्थितित अथवा प्रसंगात शिकलेल्या बाबी दस
ु र्‍या प्रसंगाच्या जलद
व अचूक शिकण्यास कारणीभूत होतात, तेव्हा त्यास धनात्मक संक्रमण असे म्हणतात

"* Negative Transfer - when learning in one context undermines a related performance
in another context. " (“Definitions of Transfer - University of Delaware”)

ऋणात्मक संक्रमण: जेव्हा एका विवक्षित परिस्थितित अथवा प्रसंगात शिकलेल्या बाबी दस
ु र्‍या प्रसंगाच्या
शिकण्यात बाधक/ हानिकारक सिद्ध होतात, तेव्हा त्यास ऋणात्मक संक्रमण असे म्हणतात

"* Near transfer - transfer between very similar but not identical contexts."
(“Definitions of Transfer - University of Delaware”)

नजीकचे संक्रमण : समान परं तु तंतोतंत जुळणाऱ्या नव्हे अशा परिस्थितीं मधे घडणारे संक्रमण म्हणजे
नजीकचे अथवा निकटचे संक्रमण होय

"* Far transfer - transfer between contexts that, on appearance, seem remote and alien
to one another " (“Definitions of Transfer - University of Delaware”).

दरू चे संक्रमण : ज्या परिस्थिती एकमेकांशी अत्यंत दरू वर आणि अपरिचित आणि साधर्म्य नसणाऱ्या आहे त
अशा परिस्थितींमधे घडणारे संक्रमण म्हणजे

"*Applying learning to situations that are quite dissimilar to the original learning
(“Definitions of Transfer - University of Delaware”).

अध्ययनाचे उपयोजन मूल परिस्थितीशी अजिबातच साम्य नसणाऱ्या परिस्थितीत करणे म्हणजे संक्रमण होय

"* Low road transfer (a.k.a. reflexive transfer) involves the triggering of well practiced

20 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

routines by stimulus conditions like those in the learning context." (“Definitions of


Transfer - University of Delaware”)

निम्न मार्गी संक्रमण: जेव्हा पुष्कळ आधी दृढतेने सरावलेल्या सवयी, फारशा प्रयत्न ना करता नवीन अध्ययन
परिस्थिती मधे उद्दीपीत होतात तेव्हा अशा प्रकारचे संक्रमण घडते

"* High road transfer (a.k.a. mindful transfer) involves deliberate effortful abstraction
and a search for connections.

उच्च मार्गी संक्रमण: जेव्हा व्यक्तीस किमान दोन परिस्थितीचा अमर्त


ू पणे खप
ू खोलवर आणि उच्चस्तरीय
विचार क्षमता वापरुन, त्यांत असणारे परस्पर संबंध अगदी प्रयत्नपूर्वक शोधावे लागतात आणि अध्ययनाचे
हस्तांतरण घडवून आणावे लागते तेव्हा अशा प्रकारचे संक्रमण घडते

"* Forward reaching transfer (a form of "high road" transfer) – one learns something
and abstracts it in preparation for application elsewhere. " (“Definitions of Transfer -
University of Delaware”)

उत्तर मार्गी संक्रमण: (एका प्रकारचे उच्च मार्गी संक्रमणच ) उच्च मार्गी विचार प्रक्रिया एका प्रसंगात वापरुन
झालेले अध्ययन जेव्हा व्यक्ति नवीन प्रसंगात वापरायच्या उद्देशाने वागते तेव्हा अशा प्रकारचे संक्रमण
घडते

"* Backward reaching transfer (a form of "high road" transfer) – one finds oneself in"
a problem situation, abstracts key characteristics from the situation, and reaches
backward into one's experience for matches. " (“Definitions of Transfer - University of

Delaware”)

विरुद्ध/ प्रतिमार्गी संक्रमण: (एका प्रकारचे उच्च मार्गी संक्रमणच ) उच्च मार्गी विचारप्रक्रिया एका प्रसंगात
वापरुन झालेले अध्ययन जेव्हा व्यक्ति जुन्या प्रसंगात वापरायच्या उद्देशाने वागते तेव्हा अशा प्रकारचे संक्रमण
घडते

21 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

This Photo by Unknown Author is


licensed under CC BY-NC-ND
This Photo by Unknown Author is
licensed under CC BY

यनि
ू वर्सिटी ऑफ डेलवेयेर, अमेरिका येथील विद्वानांचे मते शाळे त शिकलेल्या बाबी शाळा बाहे रच्या जगात

विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील संपादणक


ू घडवन
ू आणण्यासाठी, तीन पद्धतीनी संक्रमित होतात. त्यांच्याच शब्दांत

पाहूया-

Lateral transfer occurs when learners are able to solve different but similar problems
of equal complexity as soon as they have learned to solve one of them. Lateral transfer
involves a learning achievement at the same level as the initial learning but in another
context.

पक्षीय संक्रमण: जेव्हा विद्यार्थी एक विशिष्ट प्रकारची समस्या सोडण्याचे शिकतात आणि समान काठिन्य/
क्लिष्टता असणाऱ्या अन्य सारख्या समस्या ही अचूकतेने सोडवितात तेव्हा अशा प्रकारचे संक्रमण घडते

The concept of sequential transfer corresponds with the observation that most content
learned in school is organized into broad disciplines and is taught sequentially.
Sequential transfer happens in one and the same context, i.e. both are organized
horizontally.

क्रमबद्ध संक्रमण: क्रमाक्रमाने संगठीत केलेल्या शालेय विषयातील विषय वस्तू शिकतांना विद्यार्थी चढत्या
क्रमानेच क्रमिकरित्या संक्रमित करत जातो तेव्हा अशा प्रकारचे संक्रमण घडते

Vertical transfer, on the other hand, requires that learning at a lower level must be
transferred to a higher level of cognitive skills. Thus, vertical transfer is the ability to
solve similar and at the same time more complex or elaborated problems with the help
of previously acquired knowledge. (Source: Seel 2012)

क्रमबद्ध संक्रमण: क्रमाक्रमाने संगठीत केलेल्या शालेय विषयातील विषय वस्तू शिकतांना विद्यार्थी चढत्या
क्रमानेच क्रमिकरित्या संक्रमित करत जातो तेव्हा अशा प्रकारचे संक्रमण घडते

22 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

Lateral transfer vertical transfer


हा झाला भाग संक्रमणाच्या प्रकारांचा . आता या पढ
ु च्या प्रकरणात आपण या विषयी तात्विक उपपत्ति पाहूया

२. ४ अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ति

अध्ययन संक्रमण कसे घडते हे स्पष्ट करणे साठी जगात वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञाकडून वेगवेगळ्या

उपपत्ति मांडल्या गेल्या. त्यांत खालील मुख्य होत्या --

२.४.१ मानसिक शिस्त विषयक उपपत्ति (Theory of Formal Mental Discipline )

२.४.२ थोर्नडाईक यांची समान घटक उपपत्ति (E. L. Thorndike’s Theory of Identical

Elements)

२.४.३ विलियम बॅगले यांची आदर्श विषयक उपपत्ति (Bagley’s Theory of Ideals)

२.४.४ सी. जड्ड यांची सामान्यीकरण विषयक उपपत्ति (C. Judd’s Theory of

Generalization)

२.४.५ गेसटाल्ट मानसशास्त्रानुसार स्थानांतरण विषयक उपपत्ति (Gestalt’s theory of

Transposition)

२.४.६ निम्न मार्गी तथा उच्च मार्गी अध्ययन ( सोलोमन आणि पेरकिन्स)

२.४.७ समुचित स्थानांतरण उपपत्ति (Transfer-Appropriate Processing Theory)

Situated learning Theory

प्रस्तुत प्रकरणात आपण या सर्व उपपत्तिची थोडक्यात चर्चा करुत

23 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

२.४.१ मानसिक शिस्त विषयक उपपत्ति (२०वे शतक)

(Theory of Formal Mental Discipline )

https://victor-mochere.com/wp-content/uploads/2019/05/Best-quotes-from-Aristotle.jpg

प्रणेते : एरिस्टॉटल मुख्य विचार: मनाच्या शक्ति, प्रशिक्षण क्षमता

Faculty School of Psychology, ग्रीस ने ही उपपत्ति साधारण २०व्या शतकात अस्तित्वात आणली.

आणि एरिस्टॉटल या ग्रीक विचारकाने दिलेल्या बुद्धीच्या विविध क्षेत्रांवर ही उपपत्ति आधारलेली होती. ही

उपपत्ति शास्त्रीय कमी आणि तात्विक स्वरूपाची अधिक होती. या उपपत्तिनुसार असे मानले जात होते की

मन जे माणसाच्या अस्तित्वाचा केंद्र होता तो अनेक शक्तिनी जसे स्मरण, अवधान, इच्छाशक्ती, तर्क शक्ती,

आणि प्रवत्ृ ती इत्यादि यांनी युक्त आहे , आणि या शक्तिना शारीरिक व स्नायू दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण दे ऊन,

सराव घडवून, अर्थात त्यांना जाणीवपूर्वक आणि औपचारिकपणे शिस्त लावून किं वा विशिष्ट विषयांचा

अभ्यास करून अधिक सशक्त करता येऊ शकते , तसेच त्यांचा वापर अनेक कृती करण्यासाठी तितक्याच

क्षमतेने करू शकला जाऊ शकतो. अर्थात जितके अधिक सराव व प्रशिक्षण, तितकी सशक्त ती क्षमता, आणि

जितके कठीण मानसिक प्रशिक्षण तितका तिचा इतर क्षमतावर परिणाम अधिक, असे मानण्यात येत होते.

त्यानुसार लॅ टिन, ग्रीक, शास्त्र आणि गणिता या विषयांचा वापर अशा प्रशिक्षणासाठी केला जात होता कारण

का तर लॅ टिन शिकल्यामुळे व्यक्तीची विचार करण्याची क्षमता वाढते आणि शस्त्र आणि गणिताचा अभ्यास

केला तर अवधान आणि निरीक्षणाची क्षमता वाढते अशी त्याकाळी विद्वत्तजणांची ठाम समजत
ू होती

24 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

भाषिक प्रशिक्षण त्यामुळेच मनास दे ता येते असे मानले जायचे . तेव्हा मनास कठोर प्रशिक्षण दे ऊन त्याच्या

या क्षमता एका विशिष्ट परिस्थितीत दृढ कराव्यात, अशा प्रकारे एका परिस्थितीत दृढ केलेल्या शक्ति अन्य

परिस्थितीत ही तितक्याच क्षमतेने अभिव्यक्त होत असतात, असे त्याकाळी मानसशास्त्रज्ञास वाटत असे.

उदा. एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती जर प्रबळ असेल तर तीस सर्वत्र तितक्याच क्षमतेने सर्वत्र वापरता येऊ

शकते, असे मानले जायचे. याच कारणांमुळे हुशार विद्यार्थी मंदगती विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गतीने शिकायचे

कारण त्यांच्या मते स्मरणशक्ती हुशार विद्यार्थ्यात प्रबळ असे ,. आणि स्मरणशक्ती ही क्षमता त्या

विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी सहजपणे वापरता येत होती, असे या उपपत्तिच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे होते.

तसेच समजा एखाद्या व्यक्तीची तर्क करण्याची क्षमता एखाद्या विषयांत उत्तम असेल तर त्याला सर्व

विषयात—गणित, भूगोल, भाषा, कला, खेळ-क्रीडा, भौतिकशास्त्र इत्यादि तर्क तितक्याच ताकदीने व अचक
ू तेने

करता यायला हवे , असे त्यांची ठाम समजूत होती.

एवढे च नव्हे तर या दोन्हीही शक्तिना कठोर प्रशिक्षण दे ऊन अधिक दृढ करता येते, असे त्यांचे म्हणणे होते.

अर्थात जितके अधिक सराव व प्रशिक्षण, तितकी सशक्त ती क्षमता, आणि जितके कठीण मानसिक प्रशिक्षण

तितका तिचा इतर क्षमतावर परिणाम अधिक, असे ते मानत होते.

पण असे होताना कधीही दिसून आले नाही. उलट व्यक्ति च्या क्षमता या निरनिराळ्या विषयात निरनिराळ्या

प्रमाणात कार्यरत जसे कुठे कमी, कुठे जास्त, कुठे तीव्र, कुठे सौम्य शक्तीने होताना दिसून आल्या, म्हणून

ही उपपत्ति मात्र आलोचनास पात्र ठरली. थोर्नडाईक आणि विलियम जेम्स यांनी ही उपपत्ति कशी अपरु ी पडते

हे प्रयोगा अंती दाखवून दिले .

उदा. विलियम ने प्रयोग घडवून आणून सिद्ध केले की कविता तोंडपाठ केल्याने इतर विषयांचे पाठांतर

तितक्याच शक्तीने होत नव्हते.

नंतरच्या काळात जरी या उपपत्ती आलोचनास पात्र झाली तरी सध्याच्या काळात मानवी में द ू वर होत

असलेल्या संशोधनातून में दच


ू े वेगवेगळे भाग हे वेगवेगळे कामाशी संबंधित आहे त हे आता सिद्ध झाले आहे

(Mueller, 1975). आणि हे ही संशोधना अंती Rychlak, Nguyen and Schneider (as cited in

Ormrod, 2008)यांनी सिद्ध केले आहे की जे विषय जितक्या तीव्रतेने अध्ययनकर्त्यांस आवंडतात त्याचा

25 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

परिणाम त्यांच्या भविष्यकालीन अन्य विषयांच्या अध्ययनावर होत असतो. याचा सरळ संबंध त्यांनी

अध्ययनकर्त्याच्या त्या विषयाशी असणाऱ्या भावनिक संबंधांशी जोडला आहे , हे लक्षात असू द्यावे.

Image sources: Source: https://en.wikipedia.org/wiki/Mind 1;

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b7/Mental_faculties_Wellcome_L0005899.jpg/382px-ental_faculties_Wellcome_L0005899.jpg

२.४.२ ई. एल. थोर्नडाईक यांची समान घटक उपपत्ति (1898-1910)

(E.L Thorndike’s Identical Elements Theory)

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/66/PSM_V80_D211_Edward_Lee_Thorndike.png/
330px-PSM_V80_D211_Edward_Lee_Thorndike.png

प्रणेते: एडवर्ड ली थोर्नडाईक (अमेरिकन मानस शास्त्रज्ञ) मुख्य विचार: समान घटकाचे संक्रमण

एडवर्ड ली थोर्नडाईक (अमेरिकन मानस शास्त्रज्ञ)( टीचर्स कॉलेज, कोलंबिया यूनिवर्सिटी)(१९००) अध्ययन म्हणजे साहचर्य

असे प्रतिपादित करणारा, यांच्या मते जर दोन घटना, प्रसंग, कृती अथवा परिस्थितीमध्ये एक किं वा एका पेक्षा अधिक

समान घटक असतील तर अशा वेळेस एका घटना, प्रसंग, अथवा परिस्थितीमध्ये शिकलेल्या बाबी सहजपणे दस
ु ऱ्या घटना,

प्रसंग, अथवा परिस्थितीमधे उपयोजित करून, अर्थात त्यांचे संक्रमण करून अथवा होऊन त्या अधिकतम व अधिक

सहजपणे, चटकन शिकल्या जातात. हे समान घटक म्हणजे--

1. आशय 2. पद्धती 3. उद्देश्य 4. अभिवत्ृ ती

संक्रमण हे पदार्थाकडून में द ू कडे होत जाते. अर्थातच यात शिकणाऱ्याचे पूर्वज्ञान महत्वाचे धरले जाते

आणि येथे परिस्थितीतील आशय महत्वाचे नसून प्रक्रिया महत्वाची आहे असे वर्तनवादी मानतात.

आणि जितकी अधिक दोन परिस्थितीतील घटकांची समानता तितके अधिक संक्रमण, उदाहरणास्तव-

26 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

 टाईपिंग शिकल्यास पियानो शिकणे सोपे होते .. .. . . . . . . . . (पद्धतीची आणि

यंत्राची समानता)

 स्कूटर चालविणे येत असेल मोटर साईकल चालविणे सोपे होते

 चित्रकला जमली की शास्त्र विषयातील आकृत्या काढणे सोपे जाते

मात्र थोर्नडाईकला प्रचंड आलोचनेस सामोरे जावे लागले कारण त्याने दिलेले हे सिद्धांत कृत्रिमपणे

प्रयोगशाळे तील नियंत्रित परिस्थितीत, अधिकाधिक सराव घडवून आणून निष्पन्न केले गेले होते आणि

यात व्यक्तीत निहित उद्देश, प्रेरणा व गरजांकडे दर्ल


ु क्ष करणेत आले होते. याशिवाय समानता असलेले

ते नेमके कोणते घटक असावेत किं वा कोणत्या समानता शोधाव्यात याविषयी या उपपत्तित काहीही

भाष्य केले गेले नव्हते. तरीही थोर्नडाईक ने दिलेल्या सरावांच्या सिद्धांतास कोणीही अमान्य केले

नाही व त्यास आजही जगभरात मान्यता आहे

२.४.३ चार्ल्स जड्ड यांची सामान्यीकरणाची उपपत्ति (1915-1918)

(Charles Judd’s Theory of Generalization)

सामान्यीकरण
निष्कर्ष

सामान्य वैशिष्ट्य 1 सामान्य वैशिष्ट्य 2 सामान्य वैशिष्ट्य 3

प्राणी १ प्राणी २ प्राणी ३

Source: https://sites.google.com/site/psicologiadaeducacaofadeup/historia/charles-hubbard-judd

27 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

प्रणेते: चार्ल्स हबर्ड जड्ड मख्


ु य विचार: समान घटक,

सामान्यीकरण, संक्रमण

चार्ल्स जड्ड (अमेरिकन शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ) प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, शिक्षणशास्त्र

विभाग, शिकागो यूनिवर्सिटी, अमेरिका यांच्या मते शिक्षण म्हणजे उच्च बौद्धिक क्षमतांचा विकास

करणे होय, आणि अध्ययनाचे संक्रमण एका विवक्षित परिस्थितीतून अन्य विवक्षित परिस्थितीत

सामान्यीकरण या उच्चस्तरीय बौद्धिक क्रियेच्या माध्यमातून होत असते.. जेव्हा एखाद्या

परिस्थितीत, घटनेतील, कृतीत दडलेले तत्वांचे आकलन होते तेव्हा अन्य परिस्थितीत त्याचे संक्रमण

उत्तमरीत्या होत असते आणि अध्ययन उत्तम सहज व सुलभपणे होताना आढळते . त्यामुळे

अध्ययनाचे संक्रमण म्हणजे वास्तविक तत्वांचे संक्रमण होय असे मानले जाते.

सामान्यीकरण म्हणजे असे एक सामायिक निष्कर्षा/ विधान जे एका समूहातील अधिकतम घटकांना

लागू पडते. उपरोक्त विचार वाचल्यानंतर जड्ड यांची उपपत्ति म्हणजे थोर्नडाईक यांच्या समान घटक

उपपत्ति चे विस्तारीत व विकसित रूप आहे , असे म्हणायला हरकत नाही असे वाटते. सामान्यीकरण

करता येणे हे जगण्यासाठी अत्यंत आवश्यक बौद्धिक क्षमता आहे . उदाहरणास्तव

 एखादी वस्तु आकाराने कितीही लहान अथवा मोठी असो, पाण्याच्या घनते पेक्षा जास्त घनतेची

असल्यास पाण्यात टाकली की ती बुडते मग ती, हे सामान्य तत्व समजले की कोणते पदार्थ

पाण्यात टाकायचे नाहीत व्यक्ति यांचा शोध लावतो

 Phylum porifera या कुटुंबातील सर्व प्राणी सछिद्र असतात हे मूळ सामान्य तत्व कळले की

व्यक्तीस त्याच प्रजातीतील अन्य प्राणी शोधण्यास जड जात नाही

 चिमणी, घार, albatross, मोर, कबुतर इत्या. सर्व पक्ष्यांचे शरीरातील हाडे पोकळ असतात,

म्हणजे उडणाऱ्या सर्व पक्ष्यांचे मग ते लहान असोत अथवा मोठे त्यांची हाडे पोकळ असतात हे

निष्कर्ष काढण्यास हरकत नाही.

 महासमुद्रात तळापाशी आढळणारे मासे हे अनिवार्यपणे महाकायच असतात (अपवाद : अर्धवट

निष्कर्ष)

चार्ल्स जड्डचे हे ही म्हणणे होते की ज्ञान हे दोन स्तरावर आढळते – पोपटपंचीज्ञान, ज्यात सामान्यीकरणाचा
*
अभाव असतो आणि सामान्यीकृत ज्ञान ज्यात अनेकानेक बाबींचे आणि बौद्धिक क्षमतांचे साहचर्य आढळते .

जड्ड या ही मताचे होते की संक्रमण घडणे साठी मानसिक शक्ति जसे प्रेरणा अत्यंत आवश्यक आहे आणि

अध्ययनाच्या इतर सामान्य तत्व यांच्या साहचर्यात ते घडत असते. INDUCTIVE अर्थात उदगामी पद्धतीने

शिकविणे या करिताच महत्वाचे गणले जाते परं तु असे सामान्यीकरण करण्यासाठी उदाहरणे भरपरू आणि

विविध स्वरूपाची असायला हवीत. अपऱ्ु या उदाहरणांच्या आधारे केलेले सामान्यीकरण चक


ु ीचे ठरू शकतात .

उदाहरण:

28 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

 आपल्या शेजारच्या अथवा आपल्या कुटुंबातील स्त्रियांचे वाहन चालविणे अयोग्य असेल तर

जगातील सर्व स्त्रियां वाहन चालवण्यास अक्षम आहे त असे सामान्य निष्कर्ष काढणे बरोबर

ठरणार नाही

 एका सापाने चावा घेतल्यामुळे तुमच्या मित्राचा मत्ृ यू झाला असेल तर सर्वच साप विषारी किं वा

तुमच्या ऐकिवात असलेली सापांविषयीची माहिती अपूर्ण असेल तर सर्वच साप बिनविषारी असे

निष्कर्ष काढणे अयोग्य ठरे ल.

 शाळे त गणित शिकवणारे माझे शिक्षक हे अत्यंत कडक होते. म्हणून शाळे त शिकविणारे गणिताचे

सर्व शिक्षक हे कडक च असतात असे सामान्यीकरण करणे चुकीचेच आहे !

कारण एका परिस्थितीतून दस


ु ऱ्या परिस्थितीत अध्ययन संक्रमण हे या सामान्यीकरणाचे होत असते, त्यामुळे

अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेले सामान्यीकरण स्थल, काळ, प्रसंग, इत्यादि त्यात्यापुरतेच मर्यादित

ठे वण्याची काळजी घ्यावी. आणि तसे नमूद करण्याची दक्षता ही घ्यावी नाही तर झालेले संक्रमण चुकीचे

होईल.

मूळ परिस्थितीत प्राप्त केलेले अनुभव किती उत्तम प्रकारे समजले गेले व संकलित होऊन सामान्यीकृत

झाले यावर संक्रमणाचे परिमाण अवलंबून असते संक्रमणाच्या प्रक्रियेत सर्वात महत्वाची गोष्ट जर काही असेल

तर असंख्य उदाहरणावरून काढण्यात आलेले सामान्य तत्व हे होय.

२.४.४ बॅगले यांची आदर्श विषयक उपपत्ति (1934-1938)

(William Bagley’s Theory of Ideals)

29 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

Source: http://www.proprofs.com/quiz-school/story.php?title=edf1005-quiz
Source: 8http://www.slideshare.net/HinaKaynat/essentialism-68486145

प्रणेते: विलियम बॅगले मुख्य विचार: आदर्श, भावना, मूल्यांचे

संक्रमण

अनिवार्यवाद पंथाचे प्रणेते प्रा. विलियम बॅगले, Teachers University, Columbia University, U.S.A.

यांनी सुचविले की अध्ययनाचे संक्रमण होत असताना आशयाचे फक्त पाठांतर महत्त्वाचे नाही तर पद्धतीचे

सामान्यीकरण होणे आवश्यक आहे सोबत त्याच्या आवश्यकतेची, त्यांच्या गुणांची माहिती भावनात्मकरित्या

प्रस्तुत केली गेली पाहिजे, त्याला प्रेरणा वाटली तरच संक्रमण गतीने होईल. तसेच जेव्हा एखाद्या विषयाचा

अभ्यास करत असताना, शिकविताना संबंधित आदर्शावर आणि त्यांच्या आवश्यकतेवर जोर दिला जातो, तेव्हा

संक्रमणाची शक्यता वाढते. येथे त्यांनी प्रामाणिकता, सत्यता, प्रेम, त्याग, न्यायिकता याबद्दल म्हं टले आहे की

यांचे संक्रमण नकळत होत असते व ते झाल्याशिवाय विद्यार्थ्यात शिस्त, व प्रामाणिकपणा विकसित होणार

नाही, व विषय समग्रतेने शिकला ही जाणार नाही. त्यांचे शब्द उदघत


ृ करायचे झाले तर-

The transfer of this training, however, is quite another matter. There are pupils who can work up
excellent topical recitations from their school text-books, but who are utterly at sea in getting a
grasp on a subject treated in other books. Here again the problem lies in getting the pupil to see
the method apart from its content, it is here that the factor of motivation is of supreme
importance.

(Craftsmanship In Teaching, Project Gutenberg, Ebook, William Bagley, Nov.2, 2005)

२.४.५ स्थानांतरणाविषयी उपपत्ति

(Gestalt’s theory of Transposition)

30 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

प्रणेते: मॅक्स वेरथेईमेर, कोहलेर, काफका लेविन मुख्य विचार: समान घटक, अंतरदृष्टी सामान्यीकरण, संक्रमण

यांचे मुळात म्हणणे असे होते की जग हे संगठीत स्वरूपाची रचना आहे , आणि गेस्टाल्ट या जर्मन शब्दाचा

अर्थच आकार, रचना, संगठन, आकृति असे आहे . म्हणून विश्वातल्या प्रत्येक जड व जैविक घटकांची पूर्णाकृती

म्हणजे त्यांच्या सर्वसुट्या भागांची बेरीज म्हणजे नव्हे , त्यांच्या रचनेची समज येण्यासाठी सर्व भागांचे परस्पर

संबंध आणि त्यांची कार्ये व त्यांचे स्थान, याविषयी अंतरदृष्टी विकसित होणे महत्वाचे आहे .

गे गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा अध्ययन कर्त्यास दोन परिस्थितीतील वस्तुस्थिती, तथ्य आणि

अवबोधातील साम्य लक्षात येऊ लागते तेव्हा संक्रमणांस प्रारं भ होत असतो. यात तथ्य, प्रक्रिया आणि तत्व

यामधील परस्पर संबंधांचे आकलन होणे गह


ृ ीत आहे . इथे नुसतेच विशिष्ट कौशल्य अथवा विशिष्ट तथ्य अथवा

माहिती अथवा त्यांत निहित विशिष्ट तत्वांचे प्रत्येकी स्वतंत्र संज्ञान अपेक्षित नाही तर त्या सर्वांमधील असलेल्या

परस्पर संबंधांचे आकलन होणे व त्यातून जन्मणाऱ्या एक विशिष्ट रचनेस महत्वाचे आहे . हीच रचना/अंतरदृष्टी

एका परिस्थितीतून अन्य परिस्थितीत संक्रमित होत असते. गेस्टाल्ट चे विविध तत्व जसे- समीपतेचे तत्व,

समानतेचे तत्व, सातत्याचे तत्व, पूर्णतेचे तत्व हे सर्व तत्व यात समावलेले आहे त. हे सर्व तत्व रचना/ रचनेचे

आभास निर्माण करतात आणि संक्रमण होणेसाठी त्याचेच अवबोध अध्ययनार्थयास होणे आवश्यक आहे .

त्यांच्याच शब्दांत बोलायचे म्हणजे-

Transfer is dependent upon the whole-part relations between the old and the new
situations. It is not the principle or generalization that is at the basis of transfer, but the
understanding of the relationship between facts, processes and principles. Hence the
need for ‘transposition’. (From an article shared by Shivani Zaveri at PsychologyDiscussion.net)

यात आपण पाहता की त्यांनी विशिष्ट परिस्थिती/ प्रसंग यात दडलेले परस्पर आंतरसंबंध संदर्भासहित

समजण्यास अंतरदृष्टी विकसित करण्यास व त्यामार्गे होणाऱ्या सामान्यीकरणास महत्व दिले आहे .

31 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

२.४.६ निम्न मार्गी आणि उच्च मार्गी संक्रमण उपपत्ति (1992)

Theory of Low and High Road Transfer

उच्च मार्गी संक्रमण

वास्तविक जगातल्या बाबी


शालेय अभ्यासाच्या बाबी

पूर्णपणे भिन्न असणाऱ्या


पूर्णपणे भिन्न असणाऱ्या
बाबींमधील संक्र मण
बाबींमधील संक्र मण

पूर्णपणे समान विषयक


पूर्णपणे समान असणाऱ्या बाबींमधील
शालेय अभ्यासाच्या बाबी असणाऱ्या बाबींमधील संक्रमण
वास्तविक जगातल्या बाबी
संक्रमण

निम्न मार्गी संक्रमण

प्रणेते: गवरिएल सालोमन आणि डेव्हिड परकिन्स मुख्य विचार: सराव, विश्लेषण,

आंतरसंबंधाची ओळख

प्रस्तुत उपपत्ति अत्यंत नवीन व अलीकडच्या काळातली असून ती सालोमन आणि परकिन्स यांनी १९८८ साली

विकसित केली. त्यांच्या मते संक्रमण होताना दोन भिन्न परं तु एकमेकांशी संबंधित अशा प्रक्रिया त्यांत घडत

असतात

यांचे मते एखाद्या विशिष्ट संदर्भात अध्ययन केल्या मुळे अन्य संबंधित अथवा समान संदर्भात होत असलेल्या

अध्ययनास गती मिळते (धन संक्रमण) अथवा बाधा पोंचते (ऋण संक्रमण) तेव्हा संक्रमण झाले असे म्हं टले

जाते.

निम्न मार्गी संक्रमण (Reflexive transfer ) तेव्हा घडते जेव्हा एखादे मूर्तस्वरूपातील ज्ञान अथवा कौशल्य

शिकल्यावर व तासनतास सराव केल्यामुळे व्यक्तीच्या अंगी ती कृती करण्यात अधिकतम यंत्रगत

स्वयंचलितता (त्रुटिहीनता, गतिशीलता, सहजता) निर्माण होते. उदाहरण: वेगवेगल्या प्रकारचे स्पोर्ट्स बुटांचे फीते

सहज बांधता येणे, वेगवेगळ्या प्रकारची तंतुवाद्य वाजविता येणे, वेगवेगळ्या तऱ्हे ची चारचाकी वाहन सहजपणे

चालविता येणे इत्यादि करणे सोपे जाते अर्थात यातील एका प्रकारची कृती अनंत वेळा केलेली असल्याकारणे

तशाच स्वरूपाची परं तु जराशी भिन्न कृती करणे अवघड वाटत नाही कारण असंख्य वेळा एका कृतीचा सराव

केलेला असल्यामुळे तत्सम दस


ु री कृती सोपी वाटते .

32 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

उच्च मार्गी संक्रमण (Mindful Transfer ) उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया असून, हे अमूर्त स्तरावर घडत असते
आणि त्यांत व्यक्तीस एखाद्या परिस्थितीत मुद्दाम अवधान दे ऊन जाणीवपूर्वक बौद्धिक संज्ञान घ्यावे लागते ,

आकलन व विश्लेषण करावे लागते, शिकलेल्या परिस्थितीत आणि समोर तोंड वासून उभ्या समकक्ष पण

अपरिचित परिस्थितीत नेमके काय आंतरसंबंध आहे ते शोधावे लागते

२.४.७ समचि
ु त स्थानांतरण उपपत्ति (1988-99)

Transfer-Appropriate Processing Theory or Situated Learning Theory

प्रणेते: जीन लवे, जॉन ब्राऊन आणि वेनगेर, कोललीनस, दग


ु ुइड मुख्य विचार:

१९८८ व १९९९ मधे जीन लवे, ब्राऊन आणि वेनगेर (Lave, Brown Wenger), Judd जड्ड च्या

सामान्यीकरण उपपत्तीस अनुसरून, यांनी आणखी एक समान विचारांची उपपत्ति पुढे आली ती

म्हणजे समुचित स्थानांतरण उपपत्ति, ज्यांनी असे सुचविले की व्यक्तिस संदर्भ नसलेल्या कृतीतून

अमूर्त तत्वे काढण्यास दे ण्यापेक्षा जर एखादी कृती एकटे करण्याची अथवा समूहात करण्याची, त्यांत

सहभागी होण्याची संधि दिली गेली तर ती करत करत तो निरीक्षण करून त्या कृतींची प्रक्रिया,

त्यातील निकष, त्यातील टप्पे , व प्रक्रिया समजून घेउ शकेल आणि अन्य नवीन परिस्थितीत

तत्सम कृती करताना तो प्राप्त माहितीचे जाणीवपूर्वक संक्रमण करू शकेल. त्यांच्या शब्दांत

म्हणायचे झाले तर - ‘Social interaction and collaboration are essential components

of situated learning ‘

आपल्या घरातील उदाहरण इथे घेऊन समजून घेऊ या

उदा. १ पुरणाच्या पोळ्या लाटताना आणि साटोरी लाटताना किती दाब द्यायला हवा त्यातील

सारखेपणा कळला तर साटोरी करणे सोपे जाते . हे करण्यासाठी त्यास वास्तविक परिस्थितीतच

काम करू दिले पाहिजे

उदा. २ क्रीडा क्षेत्रात टे बल टे निस, बॅडमिंटन, वॉलीबॉल हे मैदानंतच खेळवून शिकले तर खेळ सुरू

करण्याचे नियम, foul होण्याचे नियम चटकन संक्रमित होतात , मात्र मैदानंतच खेळवून या

33 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

बाबी शिकल्या पाहिजे .

उदा. ३ Highspeed कम्प्यट


ु र गेम्स खेळणारी सर्व मल
ु े वास्तविक जीवनात सहजपणे चारचाकी

आणि दच
ु ाकी चालविणे शिकतात कारण आभासी वातावरणात का होईन परं तु स्वतः स्वतंत्रपणे

खेळता खेळता शिकलेले असतात. यापेक्षा अध्ययन संक्रमणाचे उत्तम उदाहरण काय असू शकेल.

उदा. ४ . याशिवाय आपले अंतरिक्षात जाणारे वैज्ञानिक सुद्धा सर्व वैज्ञानिक तत्व व सर्व संभाव्य

क्रियाकलापंचे आभासी वातावरणात प्रशिक्षण घेतात आणि पुढे अंतरिक्षात गेल्यावर त्या तत्वांचा

निकषांचा उपयोग अनपेक्षितपणे येणाऱ्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी करतात.

पण (Lave & Wenger, 1991) यांच्या मते काही बाबी येथे अपरिहार्य आहे त जसे –--शिकणाऱ्यास ती कृती

आहे त्या मूलावस्थेत करण्यास दिली पाहिजे, तो क्रियाशील झाला पाहिजे ते करण्याचे त्याला इच्छा वाटली

पाहिजे , त्यास स्वत: हून निरीक्षण करण्याची संधि परु वली गेली पाहिजे, शिकणाऱ्यास शिकण्याची प्रक्रिया

अगदी सहज सुलभ अनौपचारिक वाटली पाहिजे, त्यांत औपचारिकतेचा कृत्रिमपणा यायला नको, ते करण्यात

तो स्वेच्छे ने आकंठ बुडाला पाहिजे, चुका करत करत छोट्या छोट्या गोष्टी शिकला पाहिजे, मग आपोआप

संपूर्ण कृतीचे आधी अध्ययन घडेल , त्यातील घटकांचे आकलन होईल मग समसमान कृती करताना संक्रमण

घडेल

अशा अनेक मानसशास्त्रीय तत्वे या संक्रमणात निहित आहे त. त्याही लक्षात येणे आवश्यक. व्यगोतसकी

(Vygotsky’s) च्या सामाजिक विकासातन


ू अध्ययन या उपपत्तिशी या उपपत्तीचे जवळचे संबंध आहे , ज्यात

तो Zone Of Proximal Development बद्दल बोलतो ज्यानस


ु ार अध्ययनकर्ता समह
ू ात राहून जाणकार

व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एखादे कार्य स्वतंत्रपणे टप्प्याटप्प्याने करतो आणि कार्यातील सर्व तत्वे आत्मसात

करतो .

34 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

This Photo by Unknown Author is licensed under


CC BY-SA-NC
This Photo by Unknown Author is licensed under CC BY

35 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

पुढे आपण स्वतंत्रपणे अध्ययनाच्या संक्रमणाचे शैक्षणिक महत्व काय आहे ते पाहूया.

२.५ अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्व

वर्गात शिकवताना शिक्षकांनी अध्ययन संक्रमण अधिकाधिक व्हावे म्हणून खालील बाबी स्मरणात
ठे वाव्यात

1. संक्रमण अनेक प्रकारे घडते हे सर्वप्रथम शिक्षकाने लक्षात असू द्यावे. आपल्या अध्यापनाचे नियोजन

करताना कोणत्या दोन प्रकरणात कोणत्या घटकात ऊर्ध्व संक्रमण आहे , कुठे पक्षीय संक्रमण घडू

शकेल, कुठे निम्न मार्गी संक्रमण असेल, कुठे उच्च मार्गी संक्रमण घडवून आणावे लागणार यांचे पूर्व

नियोजन करून ठे वायला हवे.

2. प्रत्येक विषयाच्या शिक्षकाने कोणकोणते विषय सारखे आहे त, यांचा सतत भान ठे वला पाहिजे, त्यांत

परस्पर संक्रमणांच्या बाबी कोण कोणत्या आहे त, हे तपासले पाहिजे आणि त्यांची लिखित मधे

माहिती ठे वली पाहिजे आणि शिकवितांना त्या विद्यार्थ्यांच्या समोर जाणीवपूर्वक आणि नियोजनपूर्वक

ठे वल्या पाहिजेत, तरच अध्ययन अधिकाधिक रोचक, व अर्थपूर्ण होऊ शकेल.

3. मुळात ही प्रक्रिया घडणे साठी विद्यार्थी स्वतः क्रियाशील असला पाहिजे आणि तो त्या समसयेत

मोकळे पणाने गुंतला पाहिजे असे वातावरण तयार करणे शिक्षकांचे काम आहे . त्याला नवीन गोष्ट

शिकण्यासाठी मनातून इच्छा निर्माण झाली पाहिजे, तेव्हा योग्य वातावरणनिर्मिती करणे हे शिक्षकाने

लक्षात ठे वणे गरजेचे.

36 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

4. अध्ययन संक्रमण विषयानतर्गत तसेच विषयबाह्य सद्ध


ु ा होत असतो. उदा: जसे शास्त्रातील तीनही

विषयांत परस्पर अंतर्गत संक्रमण होत असते कारण ते विषय परस्पर परू क आणि परस्परावलंबी

आहे त. तसेच शास्त्रातील सामान्य तत्व, निकष, मूल्ये आणि प्रक्रियांचा संबंध हा गणिताशी तर

निर्विवाद असल्यामुळे तेथे ही सतत त्यांअंतर्गत संक्रमण हे सुरूच असते. भूगोल हे शास्त्रच आहे .

त्यामुळे शुद्ध शास्त्र विषयांत व या उपयोजित शास्त्रात तर शंभर टक्के सामान्य तत्व व निकषांचे

संक्रमण होत च असते. हीच बाब इतर विषयांसाठी लागू.

5. विद्यार्थी प्रत्येक विषय आणि प्रत्येक कृतीस पूर्णतः नवीन आणि स्वतंत्र कृती समजूनच शिकता

कामा नये . नसतं विद्यार्थी केवळ पोपटपंची करत आपल्या उच्च बौद्धिक क्षमता उदा. विश्लेषण,

मूल्यमापन, तुलना व साम्य भेद करणे , सामान्यीकरण करणे, तत्वांचे निरसन इत्यादि क्षमता

वापरणार नाहीत, असे होणे टाळावे

6. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविणे आणि त्यांच्या उच्च बौद्धिक क्षमता सक्रिय करणे साठी

त्यांना विषयातील समानता लक्षात आणून दे णे आवश्यक आहे आणि महत्वाचे म्हणजे सामान्यीकरण

करता येण्याची क्षमता किकसित केली पाहिजे

7. सामान्यीकरण करण्याची क्षमता विकसित करणेसाठी शिक्षकांनी अधिकाधिक उदगामी पद्धतीचा वापार

करावा. विशेषतः विज्ञान, भूगोल, गणित. त्यांत अधिकाधिक संख्येत उदाहरणे पुरवण्याचा प्रयत्न असावा.

कारण आपुऱ्या माहिती आधारे केले गेलेले सामान्यीकरण चुकीचे असू शकते, ही बाब नेहमी लक्षात

असू द्यावी आणि विद्यार्थ्यांना ही लक्षात आणून दिली पाहिजे

8. उदगामी पद्धतीचा वापर करताना शिक्षकाने विद्यार्थ्यांनाच निरीक्षण करण्यास लावले पाहिजे, ते करता

यावे म्हणून प्रश्न कौशल्याचा, कारण मीमांसा करण्याची, अंदाज बांधण्याचा, अनुमान लावण्याच्या

सारख्या कृतींचा वापर केला पाहिजे

9. विद्यार्थ्यात निरीक्षण कौशल्य विकसित करताना त्यांना प्रत्यक्षानुभव द्यायला हवेत, नसता

अधिकाधिक दृश्य साहित्य दाखवून वस्तुस्थिती दर्शक तथ्य, त्यांच्यातील परस्पर संबंध, तर्क , यावर

लक्ष दे ण्यास शिकविले पाहिजे.

10. आणि विद्यार्थ्यांना वास्तविक परिस्थितिचे अनुभव द्यायला हवे तसे शक्य नसल्यास,

Simulation अथवा आभासी वातावरण जेथे जेथे, ज्या ज्या विषयांत तयार करणे शिक्षकाला

शक्य आहे , तसे त्यांनी करावे, तर उपयोजित नवीन परिस्थितीत संक्रमण चटकन होईल आणि

वेळ वाचेल

11. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे एका विषयांत, एक कौशल्य शिकतांना आत्मसात केलेली तत्वे,

सामान्यीकरण, मूल्यं, वत्ृ ती, दृष्टिकोण , ही दस


ु रया विषयातील, अंशत: अथवा पूर्णत; समान नवीन

कौशल्ये शिकण्यावर परिणाम करतात, याचाच अर्थ असा होतो की एखादी कृती शिकत असताना

त्यातील घटक कौशल्याना क्रमाक्रमाने मांडले गेले पाहिजे आणि क्रमा क्रमानेच अथवा टप्प्या

टप्प्यानेच ते शिकवले ही गेले पाहिजेत, जेणे करून उच्चमार्गीय संक्रमण सिद्ध करता येईल

37 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

12. विशेषतः प्रशिक्षणाचे दीर्घ कार्यक्रम तयार करताना या तत्वांचा अवलंब खालील बाबीत

अध्यापकास करता येईल--

 कोणत्याही कृतीचे/ कार्यक्रमाचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम तयार करताना ते प्रक्रियांसम करावे

 प्रक्रिया टप्प्या-टप्प्यात तयार करावी, अनच्


ु छे द निहाय नव्हे

 प्रत्येक टप्प्यातील कृतींचे निकष, तत्व, सत्र


ू स्पष्ट करावेत

 प्रत्येक कृतीत दडलेले मल्


ू य, वत्ृ ती, सामान्य विचार स्पष्ट करावे

 प्रत्येक कृतीत अपेक्षित क्षमता –मूलभूत आणि संकलित/एकात्मिक अथवा प्रगत आणि

क्लिष्ट- (शारीरिक अथवा मानसिक अथवा भावनिक) यादी तयार करावी. ती विद्यार्थ्यांना

कळवावी.

 प्रत्येक कृतीत समाहित क्षमता विद्यार्थ्यास स्पष्ट कराव्यात

 गेस्टाल्ट सिद्धांत डोळ्यासमोर ठे वून, प्रत्येक कृतीतील रचना, दोन कृतीतील संगठन यातील

साम्य भेद त्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टीस आणले पाहिजे.

13. Knowledge of Progress च्या तत्वानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या नैपुण्यतेची पातळी कळत राहिली की

त्यांची ही शिकण्याची प्रेरणा वाढते. ( पहा जड्ड यांची उपपत्ति )

14. एकदा का सर्व तत्वे, सर्व निकष, सर्व टप्पे तयार झाले की मग अधिकाधिक प्रमाणात संक्रमण घडवून

येणे करिता, त्यांच्या साठी त्यांच्या विशिष्ट अध्ययन शैली निहाय निरनिराळ्या प्रशिक्षण प्रकाराचे

नियोजन करता येऊ शकते की ज्यात विद्यार्थी स्वतः साठी सुयोग्य प्रशिक्षण प्रकार निवडू शकतो.

त्याची संक्रमण क्षमता वाढते

15. संक्रमण झाल्याचे अंतिम प्रमाण म्हणजे त्यांची संपादणूक होय. आणि इतके पद्धतशीर सर्व प्रशिक्षण

कार्यक्रम रचित केल्यानंतर त्याचे टप्प्यांनिहाय, क्षमतानिहाय , मूल्यांकन करणे अत्यंत सोपे होऊन

जाते. हा संक्रमण क्रियेच्या उत्तमतेचा सर्वोच्च बिंद ु होय.

अध्ययन संक्रमण शिक्षकांना घडविता आले तर एक बुद्धिमान पीढी निर्माण होईल यात तीळमात्र ही शंका नाही.

शुभास्ते पंथान

संदर्भ साहित्य

1. G. Steiner,(2002), Cognitive Psychology in transfer of Learning, International


Encyclopedia of the Social & Behavioral Sciences , ScienceDirect, ELSEVIER
2. Alice F. Healy, Erica L. Wohldmann (2012), Psychology of Learning and
Motivation, ScienceDirect ELSEVIER
3. Shiva Hajian,(2019), Transfer of Learning and Teaching: A Review of Transfer
Theories Vol 57, pages 227-253s and Effective Instructional Practices, Simon

38 | P a g e
अध्ययनाचे संक्रमण TRANSFER OF LEARNING

Fraser University, IAFOR Journal of Education Volume 7 – Issue 1 – Summer 2019,


Canada
Reference websites

http://detsndt.ac.in/nmeict-files/nmeict-los/edupsycho/ep11/11.4.1/( eContent
development project funded by NMEICT, MHRD)

https://www1.udel.edu/dssep/transfer/Definitions%20of%20Transfer.pdf

(https://www.psychologydiscussion.net/educational-psychology/6-important-theories-of-
transfer-of-learning/1827)

http://covedisa.com.ar/hasty-generalization.html

http://detsndt.ac.in/nmeict-files/nmeict-los/edupsycho/ep11/11.4.1/

https://education.stateuniversity.com/pages/1780/Bagley-William-C-1874-1946.html

https://wandofknowledge.com/transfer-of-learning-types-theories-educational-
implications/

http://varron.expertscolumn.com/article/different-theories-about-transfer-learning

http://psychology.iresearchnet.com/sports-psychology/motor-development/transfer-of-
learning/

psychology.iresearchnet.com/sports-psychology/motor-development/transfer-of-
learning/(**)

http://www.ibe.unesco.org/en/glossary-curriculum-terminology/t/transfer-
learning

https://www.psychologydiscussion.net/learning/learning-theory/transfer-of-training-types-and-theories-child-
psychology/2533

https://www.harshitj183.eu.org/2021/07/theories-of-transfer-of-learning.html

https://educationforproblemsolving.net/design-thinking/tr-ps.htm

इमेज सोर्स http://www.slideshare.net/suehaina1/transfer-of-learning-46886334

https://external-content.duckduckgo.com/iu/?u=https%3A%2F%2Ftse3.mm.bing.net%2Fth%3Fid%3DOIP.qZ4DDS0_vskOZNj1kvbKYwHaFj%26pid

%3DApi&f=1

https://external-content.duckduckgo.com/iu/?u=https%3A%2F%2Ftse3.mm.bing.net%2Fth%3Fid%3DOIP.0WmKPDt2KUGkSrIS-EN4ZQHaEK%26pid

%3DApi&f=1

https://external-content.duckduckgo.com/iu/?u=https%3A%2F%2Ftse2.mm.bing.net%2Fth%3Fid%3DOIP.TKNAl-tVqqjOS570RxID-QHaFj%26pid%3DApi&f=1

धन्यवाद !

39 | P a g e

You might also like