You are on page 1of 5

भावी पिढीची उभारणी विद्यापीठात होते : एक आकलन

प्रा. डॉ. धीरजकुमार सत्यकाल कोतमे

मराठी विभाग प्रमुख,

जयक्रांती कला व वाणिज्य व वरिष्ठ महाविद्यालय, लातूर

मो. नं.9422964770

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगप्रसिद्ध विचारवंत व थोर समाज सुधारक म्हणून सर्वांना परिचित आहेत.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, इतिहास संशोधक, धर्म चिकित्सक, वंचितांच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित

करणारे महामानव म्हणून आपण त्यांना ओळखतो. याबरोबरच त्यांनी केलेल्या प्रचंड अशा सामाजिक कार्याबद्दल

अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा म्हणून त्यांचे नाव कोरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञाननिष्ठेचा वैश्विक

आदर्श ठरले आहेत. याबरोबरच मानवतेचे दीपस्तंभ म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या क्रांतिकारी

तत्त्वज्ञानातून हजारो वर्षापासून वंचित असणाऱ्या वंचितांना दिशा दाखवली. म्हणूनच त्यांना महापुरुष, जगद

विख्यात विचारवंत व थोर समाजसुधारक म्हणून ओळखले जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. 1942 मध्ये
व्हाईसराँय कौन्सिल मध्ये मजूर मंत्री व स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण

योगदान दिलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विधिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी ज्ञान शाखांमधील

विशारद आहेत. त्यांनी अमेरिका व ब्रिटनमधील विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. याबरोबरच ते साक्षेपी मीमांसक

आहेत. सद्सद्द्विवेकवादी जगविख्यात प्रज्ञावंत म्हणून ही त्यांची जगभर प्रसिद्धी आहे. त्यांनी बहुजनांच्या दुःखाला

वाचा फोडण्यासाठी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता व प्रबुद्ध भारत’ ही नियतकालिके सुरू करून

सातत्याने अग्रलेख लिहिले आणि आपल्या लेखणीतून, पत्रकारितेतून बहुजनांच्या दुःखाला वाचा फोडली. डॉ.

बाबासाहेब आंबेडकर हे समताधिष्ठित समाज रचनेचे जनक म्हणून ओळखले जातात. याबरोबरच ते विश्वविख्यात

कायदे पंडित म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात

आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘कास्टस् इन इंडिया’, ‘हू वेअर द शूद्राज’, ‘थॉटस आँन पाकिस्तान’,

‘बुद्ध अँड हिज धम्म’, ‘प्रॉब्लेम ऑफ रुपीज’, ‘रानडे गांधी अँड जीना’, ‘बुद्ध अँड कार्ल मार्क्स’ इत्यादी जवळपास

बावीस ग्रंथांचे लेखन केले आहे. याबरोबरच त्यांच्या साहित्यात ग्रंथ, लेख, भाषणे ,प्रबंध, पत्रे, दै निके इत्यादींचा

समावेश होतो. यावरून आपणास त्यांचे समृद्ध असे लेखन दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात

तार्किकता, रोखठोकपना व विज्ञान निष्ठा प्रामुख्याने दिसून येते. याबरोबरच त्यांच्या लेखनामध्ये सर्वसामान्या विषयी

प्रचंड कळवळा असल्यामुळे ही त्यांच्या लेखनाची बलस्थाने ठरलेली आहेत.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘एलफिन्स्टन कॉलेज’मध्ये विद्यार्थ्यांना उद्दे शन
ू दिनांक 15 डिसेंबर 1952

रोजी भाषण केले होते. त्यामधून त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संबंधी आपले विचार सांगितले आहेत. त्यामधूनच

त्यांचे उच्च शिक्षण विषयक विचार आपल्या लक्षात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले
उच्च शिक्षण विषयक विचार मांडत असताना आपल्या काळातील उच्च शिक्षणाच्या वेळचा अनुभव विद्यार्थ्यांना

सांगितला. त्यावेळची सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती आणि आजच्या काळातील परिस्थिती यामधील बदल ही

त्यांना लक्षात आणून दिला. त्यावेळचा त्यांचा पोशाख, राहणीमान हेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले आणि या बद्दल

त्यांनी कोणालाही दोष दिलेला नाही. त्यावेळचे संस्थाचालक आणि त्यांना शिकवणारे गुरुजन यांनी त्यांना ठीक

वागणूक दिल्याचे त्यांनी सांगितले. या बरोबरच ते विद्यार्थ्यांना आता आजच्या बदललेल्या परिस्थितीची जाणीव

करून दे तात आणि आजच्या शैक्षणिक व सामाजिक पोषक वातावरणाचा उपयोग करून घेण्याचे सुचवतात. आज

खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये सर्व प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध होताना दिसून येतात. त्यांचा

विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि आपल्या सुप्त गुणांचा विकास करून वैचारिक जडण-घडण करावी असे ते

सुचवतात. याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कारभारात लक्ष घालण्याचे आवाहन केलेले आहे. आज
काल विद्यार्थी विद्यापीठाच्या कारभारात लक्ष घालण्याऐवजी राजकारणात लक्ष घालत असलेले आपल्याला

दिसतात. यावर त्यांनी लक्ष वेधन


ू विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, सोयीसुविधा, बौद्धिक विकास, क्रीडा यावर लक्ष

करण्याचे मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थी जीवनामध्ये हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. या कालखंडामध्ये खऱ्या

अर्थानं बौद्धिक विकास मोठ्या प्रमाणात होतो. अशा काळात पोषक ज्ञान मिळाले पाहिजे. चांगला अभ्यासक्रम
शिकता आला पाहिजे आणि त्या माध्यमातून चांगला विद्यार्थी व पुढील जीवनामध्ये आदर्श नागरिक घडण्याचा हा

पाया आहे. हे त्यांनी विद्यार्थ्यांना बिंबवून सांगितले आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष

ठे वण्याचे ते सुचवतात. महाविद्यालयीन पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांचे पदवीची वर्ष बघत-बघत संपून जातात आणि

विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात, परंतु या काळामध्ये त्यांना जागतिक दर्जाचे महान शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ,

महत्त्वाच्या व्यक्ती या सर्वांविषयी भरभरून माहिती असली पाहिजे. त्या माहितीचा अभाव आजच्या विद्यार्थ्यांमध्ये

दिसून येतो, असे ते म्हणतात. या तत्वज्ञानाने नव्या जगाची उभारणी केली किंबहुना आजचा नव मानव आपल्या

प्रत्येक दै नंदिन जीवनात ज्या तत्वज्ञानावर जगत आहे, त्या थोर तत्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवी शिक्षण घेणाऱ्या

विद्यार्थ्यांकडू न होत असल्या विषयी खंत ते व्यक्त करतात. या याबरोबरच आज-काल विद्यापीठामध्ये नको तो

अभ्यासक्रम लावत असलेल्या गोष्टींबद्दल ही त्यांनी आपले लक्ष वेधलेले आहे .लादलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी मुळीच

खपवून घेऊ नये यासाठी त्यांनी दक्ष राहिले पाहिजे हे ते विद्यार्थ्यांना सांगतात. विद्यापीठाने आपल्याला जेम्स आणि

चार्लस यांचे तत्वज्ञान माथी मारल्यास त्यांना विद्यार्थ्यांनी रोखले पाहिजे. याविषयी ते विद्यार्थ्यांना जागरूक करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वैचारिक आणि नैतिक मूल्याकडे वेधले आहे. त्यांनी असे

सांगितले की मानवी जीवनातील ही मूल्य कधीच स्थिर राहत नाहीत. जसजसा काळ बदलतो त्याप्रमाणात वैचारिक

आणि नैतिक मूल्यामध्ये काळानुसार बदल होत असतात. ती नवीन काळाप्रमाणे प्रगत होत जातात, आता हे मूल्य

विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजेत. त्या मूल्यांची दखल घेतली पाहिजे आणि ती आचरणात आणण्यासाठी
स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि या बरोबरच ते सांगतात की ही वैचारिक आणि नैतिक मूल्य हे नवीन तत्त्वज्ञान
विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला समाविष्ट करून सर्वांना ही मूल्य रुजविण्यासाठी लक्ष दिले

पाहिजे. विद्यापीठ प्रशासन हे करतंय का नाही यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. त्यासाठी जागरुक असले

पाहिजे. हे इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांना आग्रहपूर्वक सांगतात. यावरच खऱ्या अर्थाने त्यांच्या पुढील

आयुष्याची दिशा अवलंबून आहे, हे ते सांगतात. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे आजची ही नवीन पिढी बौद्धिक आणि

वैचारिक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्यामते बौद्धिक आणि वैचारिक पातळी या

विद्यार्थ्यांची रोडावत चालली आहे. भूतकाळातील मानवी प्रज्ञावंताशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी

का सर्वांची घसरलेली आहे? याचा विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. याविषयी ते विद्यार्थ्यांना जागरूक

करतात. खऱ्या अर्थाने आजचा विद्यार्थी वर्ग हा तत्त्वज्ञान व वाङ्मय कृतीचा मनपूर्वक अभ्यास करताना दिसून येत

नाही. विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेलेला भरकटलेला आपल्याला दिसून येतो .खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना या

अभ्यासाची खूप गरज आहे .हा अभ्यास न करता विद्यार्थी मात्र आपला अमूल्य आणि महत्त्वाचा वेळ दुसऱ्या गोष्टी

मध्ये घालत असताना आपल्याला दिसतात. आज विद्यार्थ्यांचे लक्ष मग विविध प्रकारचे खेळ खेळन्यावर नसून

खेळांमधल्या चालणाऱ्या राजकारणामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना खेळण्यापेक्षा त्या

खेळातील राजकारणावर चर्चा करण्यात जास्त आवड दिसते. त्यामध्येच रममाण झालेली आपल्याला दिसून येतात.

त्याला एक मोठा अर्थ असतो. आपली प्राचीन गुरुकुल एकांतात ते विद्या शिकवत असत. त्यावेळी

निसर्गाच्या सानिध्यात ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती. याचं कारण म्हणजे त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवीन

दृष्टी द्यायची होती. या दृष्टीने त्यांनी खऱ्या जीवनमूल्यांचा शोध आणि बोध घ्यावा हा विचार होता. परंतु आजच्या
विद्यार्थ्यांकडे जर आपण जर पाहिले तर हे विद्यार्थी या गोष्टींपासून कित्येक पट दूर आलेले आपल्याला दिसून

येतात. आणि अनावश्यक अशा वायफळ राजकारणाच्या फंदात पडले आपल्याला दिसून येतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही आजच्या शिक्षकांविषयी आपले मत येथे व्यक्त केलेले आहेत. पूर्वीच्या

काळी स्वयंप्रेरणेने शिक्षक हे विद्यादान करत होते. पूर्वीच्या शिक्षकांमध्ये असणारी अंत:स्फूर्ती, ज्ञान दे ण्याची हौस

आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा आजच्या शिक्षकांकडे दिसत नसल्याची खंत ते व्यक्त करतात. आज या

पेशाला व्यवसायाचे, नोकरीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे हेही ते सांगतात. यामुळेच या वर्गामध्ये शैथिल्य निर्माण
झाले असावे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्ही ज्ञानामृत पाजण्यासाठी

आणि पिण्यासाठी असमर्थ बनत चाललेले असावेत असे त्यांना वाटते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या
शिक्षण क्षेत्राकडे लक्ष वेधत असताना या विद्यालयांच्या वाढत जाणाऱ्या संख्या आणि त्यामधील घेतल्या जाणाऱ्या

फी विषयी इथं लक्ष वेधले आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाची उभारणी ज्या संस्थांमध्ये,

शाळा-महाविद्यालयांमध्ये होते ते आज कशा पद्धतीने विकसित होत आहेत याकडे लक्ष वेधले आहे. खऱ्या अर्थानं

ज्ञान ही महान शक्ती आहे. विद्यार्थी वर्गाला जर या ज्ञानाची कास धरून आपल्या दे शाचा विकास आणि उद्धार
करून घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात दूर न राहता लक्ष घालून आपल्या हक्कासाठी सतत

झगडले पाहिजे .हा विचार त्यांनी अतिशय प्रभावीपणे आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांसमोर मांडलेला दिसून येतो. या

ज्ञानाचा उपयोग करून जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणता येऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं यासाठी
विद्यार्थ्यांनी ज्या विज्ञानाची कास धरून आपला उद्धार करून घेतला पाहिजे याविषयी ते आग्रही असल्याचे

आपल्याला इथं दिसून येते. आपल्या भाषणामध्ये त्यांनी विद्यापीठाच्या कारभाराविषयी आपले मत व्यक्त केलेले

आहे.विद्यापीठ, विद्यापीठाचे प्रशासन तेथे चालणारी व्यवस्थापन परिषद, सिनेट तिथली काम करण्याची पद्धती,

काम करणाऱ्या व्यक्ती यांच्या असणारा कारभार, तिथला भ्रष्टाचार त्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. खऱ्या

अर्थानं ही ज्ञानाची केंद्रे या अर्थाने ज्ञानापासून दूर जात आहेत. हे त्यांनी दाखवून दिलेले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये
त्यांनी विद्यार्थ्यांना लक्ष घालून हे सर्व व्यवस्थित करण्यासाठी आग्रह पूर्वक जागरूक राहण्याविषयी ते आग्रह

धरतात. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतः विद्यापीठाच्या कारभारात लक्ष घालावे, आपले हित जोपासण्यासाठी स्वतः

हा कारभार पहावा असे विचार इथे मांडतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मानवी मूल्य

स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता. डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा

हाच खरा मूलाधार होता. सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे असे डॉ.बाबासाहेबांनी

एका सभेत म्हटले होते. शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा

आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे असे डॉ. बाबासाहेब म्हणायचे. यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना इतर

गोष्टींमध्ये वेळ न घालता ज्ञानाची कास धरून सर्वच गोष्टींमध्ये जागरुक राहून अभ्यासक्रम, विद्यापीठाचे राजकारण
यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून आपल्या विकासासाठी हक्कासाठी सतत संघर्ष करत राहिले पाहिजे असा विचार

डॉ.बाबासाहेबांनी या भाषणातून मांडलेला आहे.

संदर्भ:

१. डॉ. बाबासाहे ब आंबेडकर लेखन आणि भाषणे, महाराष्ट्र शासन, खंड 18, भाग 3.
२. अक्षरलेणी- संपादक, डॉ. पंढरीनाथ धोंगडे, डॉ. विठ्ठल जंबाले, डॉ. कल्याण गोपनर

३. मराठी कथात्मक साहित्य -डॉ. मधू सावंत, डॉ. विठ्ठल जंबाले, डॉ. म.तंगावार

You might also like