You are on page 1of 113

1

Legal Notice
The aim of www.pustakmarket.com is to available Marathi & Other literature
globally in the domain of education, social and culture.
We are attempting to bring literature to you through various electronic mediums.
However, this literature has been provided by the writer and publisher with
separate unique ID.
If you are not buying the materials through the authorized software of
www.pustakmarket.com it will be considered as legal offence. If there is something
so please delete it immediately because it is traceable as we have saved each
customer's device ID for the sake of security.
If any piracy detected through our software the concerned person shall be
penalized legally.
Thanking you
Pustakmarket.com
Legal Consultant

कायदेशीर सूचना
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृ तिक क्षेत्रात ज्ञानप्रसाराचे कार्य करून मराठी व इतर भाषेतील साहित्याला वैश्विक करणे हे
पुस्तक मार्के ट डॉट कॉमचे ध्येय आहे. यासाठी वेगवेगळ्या इलेक्ट्रोनिक साधनांच्या माध्यमांद्वारेआम्ही आपल्यापर्यंत
वेगवेगळे वाचन साहित्य घेऊन येत आहोत. अर्थातच हे साहित्य प्रत्येक पुस्तकाच्या स्वतंत्र युनिक आयडीसह लेखक आणि
प्रकाशक यांनी पुरवलेले आहे. आपण जर ते लेखन साहित्य pustakmarket.com च्या अधिकृ त software मार्फ त विकत
घेतले नसेल तर तो कायद्याने गुन्हा समजला जाईल. असे असेल तर आपल्या मोबाईल,कॉम्पुटर किं वा इतर साधनांतून ते
तातडीने डिलीट करावे कारण या लेखन साहित्याचे संरक्षण म्हणून आमच्याकडे आमच्या प्रत्येक ग्राहकांचा Device Id
संरक्षित के लेला आहे. तरी आमच्या software मार्फ त बेकायदेशीरपणे वाचनसाहित्य कॉपी करणाऱ्या अथवा ते प्रसारित
करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई के ली जाईल याची नोंद घ्यावी.

धन्यवाद
Pustakmarket.com
कायदे र सल्लागार

$$$$$

2
आंबेडकरवादापुढील नवी
आव्हाने
डॉ. मिलिंद कसबे

$$$$$
 Language : Marathi/ मराठी

3
 Ambedkaravadapudhil Navi Avhane
Dr. Milind Kasbe

 आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने


डॉ. मिलिंद कसबे

 © सौ. वैशाली कसबे


वृंदावन पार्क , आनंदवाडी, नारायणगाव,
ता. जुन्नर, जि. पुणे ४१०५०४
भ्रमणध्वनी: ९८९०७८९०५०

 Publisher
Pustakmarket.com
Powered By
MK INFOEDUTECH PVT. LTD
Vrundavan Park, Anandwadi, Narayangaon
Tal - Junner, Dist – Pune - 410504
7385486832/8830335727
Pustakmarket2020@gmail.com

 E-book DTP & Proofreading


Abasaheb Jagadale

 Edition
E-book Edition
May, 2021

 Pages : 113

 Price : 50 /-

 ISBN: 978-81-952567-4-7

$$$$$

4
आंबेडकरी विचार जगणारे आणि जगविणारे
प्रा. विलास वाघ व उषाताई वाघ
यांना अर्पण...

$$$$$

5
अनुक्रम
 भूमिका ।८

१. आंबेडकरवाद : आकलन आणि प्रबोधन ।९ ते २३


१. आंबेडकरवादाचे विचारसूत्र ।१०
२. आंबेडकरवादाचे तत्त्वज्ञान । ११
३. व्यापक वैचारिक आचरण । १४
४. प्रागतिक आंबेडकरवाद । १९
५. आत्मटीके ची गरज । २१

२. आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने ।२४ ते ५६


१. विचारसरणींचा तिढा | २४
२. संघ आणि हिंदुत्व | २८
३. संघाचे धर्मांध राजकारण | ३४

४. राजकीय हिंसाचाराचे ऑनलाईन ट्रोलिंग | ३६


५. धर्माध सत्ता @ गुजरात फाईल्स । ४१
६. राष्ट्रवाद आणि संघाची चाल । ४३
७. देशीवादाचे भूत | ५१

३. आंबेडकरवादाचे हितशत्रू ।५७ ते ७४


१. उच्चशिक्षित दलित मध्यमवर्ग । ५७
२. महापुरुषांचे भक्त । ६०
३. जात आणि बरंच काही । ६३
४. जागतिकीकरणाचे विलोभनीय रूप । ६७
५. सांस्कृ तिक साम्राज्यवाद । ७२

$$$$$

४. आंबेडकरवादी शिक्षणविचार | ७५ ते १०९

6
१. बाबासाहेबांचे शिक्षण आणि शैक्षणिक कार्य । ७५

२. शैक्षणिक विचार आणि संविधानातील तरतुदी । ७९

३. बाबासाहेबांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान | ८५

४. विद्यार्थी व शिक्षक कसा असावा? । ८६

५. उच्चशिक्षणाबद्दल बाबासाहेबांचे विचार । ९१

६. फु ले-आंबेडकर विरुद्ध गांधींचे शिक्षण विचार । ९६

७. हिंदुत्ववाद्यांची शैक्षणिक कारस्थाने ।१०१

८. विज्ञाननिष्ठ शिक्षणसंस्कृ तीचे सौंदर्य । १०६

 संदर्भ ग्रंथ सूची । ११० ते ११२

$$$$$

भूमिका...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अपहरण होत असणाऱ्या काळात आंबेडकरी
विचारांची चर्चा घडवून आणणे हा या लेखनाचा हेतू आहे. आंबेडकरवाद म्हणजे नेमके काय? या
प्रश्नाच्या खोलात जावून तत्त्वज्ञानाच्या अथवा सिद्धांताच्या पातळीवर मांडणी करण्याची माझी

7
वैचारीक क्षमता नक्कीच नाही. हा त्त्वचिंतकांचा प्रांत आहे. परंतु एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जे
प्रश्न मनात निर्माण झाले त्या प्रश्नांना संशोधकीय स्वरूप देऊन या पुस्तकाची मांडणी के ली आहे. या
मांडणीत काही नवे हाती लागेल असा दावा नक्कीच नाही, परंतू गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या
पुरोगामी चळवळीपुढे जी संकटे उभी आहेत. त्या संकटांची आत्मटिके सह चर्चा घडवून आणण्याचा हा
प्रयत्न आहे.
या पुस्तकाच्या शीर्षकात 'आंबेडकरवाद' ही संज्ञा वापरली आहे त्या संज्ञेचा सैद्धांतिक अर्थ
काहीसा बाजूला ठे वून त्यामागे लक्षणार्थाने वापरला जाणारा आंबेडकरी विचार असा अर्थ घेतला आहे.
संशोधकांसाठी हे फारसे सोयीचे नसले तरी असंख्य कार्यकर्त्यांसाठी ते महत्त्वाचे आहे.
या पुस्तकात काही महत्त्वाचे प्रश्न पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः
जागतिकीकरणाच्या वास्तवात प्रागतिक चळवळींपुढे उभ्या राहिलेल्या आव्हानांना कसे तोंड देता
येईल? सांस्कृ तिक संघर्ष चहुबाजूंनी वाढत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ विचारांना कसे
आचरणात आणता येईल? असे अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न के ला आहे. अर्थात देशीवाद,
सांस्कृ तिक साम्राज्यवाद, जागतिकीकरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मकें द्रित राजकारण,
बाबासाहेबांचा शिक्षणविषयी दृष्टीकोन अशा अनेक प्रश्नांची विस्तृतपणे मांडणी आजपर्यंत ज्या
अनेक लेखक, विचारावंतांनी करून ठे वली आहे त्या मांडणीचा आधार घेऊन हे पुस्तक पुढे जाते. यात
वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेली मते उद्घृत करून कार्यकर्त्यांसाठी काहीएक सूत्र देण्याचा माझा
प्रयत्न आहे. कदाचित यामुळे या पुस्तकात अनेकदा संदर्भाची रेलचेल दिसेल, परंतू तेही आवश्यक
आहेत असे वाटते. या पुस्तकाच्या अनेक मर्यादा स्वीकारून यातील लेखन आजच्या सांस्कृ तिक
संघर्षावर प्रकाश टाके ल अशी आशा वाटते.
या पुस्तकातील संवाद अधिक निर्णायक व्हावा यासाठी समविचारी मित्र, लेखक व
कार्यकर्त्यांनी हा लेखनप्रपंच अधिक दुरूस्त करून व्यापक करावा, ही अपेक्षा. या लेखनासाठी ज्या
ज्या लेखकांचे संदर्भ घेतले आहेत त्या सर्वांचे आणि या पुस्तकाच्या निर्मितीसाठी सहकार्य लाभलेल्या
सर्वांचे मनापासून आभार.
- मिलिंद कसबे
$$$$$


आंबेडकरवाद : आकलन आणि प्रबोधन

8
गेल्या दहा वर्षांत दलित चळवळीची उडालेली शकले, दलित साहित्याचे साचलेपण आणि
दलित राजकारणाचे दुभंगलेपण... या गोष्टींमुळे आंबेडकरवादापुढील आव्हाने अधिक टोकदार बनली
आहेत. दलित चळवळ का भरकटली? दलित साहित्य का गोठले? आणि दलितांचे राजकारण कसे
दुभंगले?... या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची ही निर्णायक वेळ आहे.
आंबेडकरवादी कोण? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होण्याची आणखी
काही तत्कालीन कारणेही आहेत. सध्या भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डॉ.
आंबेडकर पुन्हा पुन्हा प्रातःस्मरणीय वाटू लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी
आणि संघाची विचारसरणी या दोन्ही गोष्टी मूलतः वेगवेगळ्या असताना, त्या एक कशा आहेत हे
सांगण्याचे जे राजकारण पुढे येत आहे हे या प्रश्नामागचे कारण असू शके ल. दुसरे कारण म्हणजे
दलितांच्या सांस्कृ तिक चळवळीने ज्यांच्यावर विश्वास टाकला ते नेते, लेखक आणि विचारवंत
संघाच्या पदरी जाऊन आंबेडकरांना भगवे करू पाहत आहेत. एकू णच काय तर धर्माच्या नावाने
सत्तेवर आलेल्या सरकारकडू न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे जे राजकारण होत आहे, ते
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आंबेडकरवाद, आंबेडकरी साहित्य आणि आंबेडकरी चळवळ अशा स्वरूपाचे लेखन दलित
साहित्यात मोठ्या प्रमाणात झाले आहे. या लेखनाचा विस्तार करावा असे या लेखनाचे स्वरूप नाही;
तर आजच्या नव्या सामाजिक संदर्भात आंबेडकरी आचरणापुढे जी नवी आव्हाने उभी आहेत त्यांचा
वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे लेखन आहे. १९७० ते १९९० या दशकात दलित साहित्य व चळवळीचा
बोलबाला होता. या काळात दया पवार, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे यांसारख्या अनेक
लेखकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे पाहणे आपापल्यापरीने आपल्या कलाकृ तीत
बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा जो प्रयत्न के ला तो महत्त्वाचा आहे. दलित समाजात बाबासाहेब
आंबेडकरांचे विचार ज्या गतीने त्यांनी पोहचवले त्याला तोड नाही. याच काळात दलित राजकारणानेही
गती घेतली होती. दलित चळवळ बाबासाहेबांच्या विचारांचा अंगार होऊन क्रांती करू पहात होती.
नामदेव ढसाळ, अविनाश म्हातेकर, ज. वि. पवार, राजा ढाले, अर्जुन डांगळे, रामदास आठवले, प्रकाश
आंबेडकर यांसारखे नेते राजकीय नेतृत्व करत होती आणि म. भि. चिटणीस,

$$$$$
बाबुराव बागुल, कॉ. शरद पाटील, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. यशवंत मनोहर हे
विचारवंत, लेखक आंबेडकरवादाची सैद्धान्तिक मांडणी करत होते. गेल्या पन्नास वर्षात
आंबेडकरवादाविषयी वेगवेगळ्या बाजूंनी चर्चा झाली; परंतू १९९० नंतर आंबेडकरवादाची जोरदार चर्चा
सुरू झाली. दडपलेल्या समाजाला आंबेडकरवादाची गरज होतीच परंतु आता धर्मांध राजकीय
शक्तीलाही आंबेडकरवादाची गरज वाटू लागली आहे. पण धर्मांध, मुलत्त्वादी राजकीय शक्तींनीही

9
आंबेडकरांच्या विचारांचे गोडवे गावे, ही बाब पुरोगामी विचारप्रवाहांसाठी धोक्याची आहे.
जागतिकीकरणात हा धोका अधिक गंभीर बनत आहे.
नव्वदच्या दशकानंतरचे राजकारण किती धर्मांध बनत गेले, याची अनेक उदाहरणे आपल्या
समोर आहेत. धर्मांध राजकारणाने दलित चळवळ गिळंकृ त के लीच, पण दलित राजकारणाची शकले
पाडू न बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अपहरण करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे, त्याकडे
गांर्भीयाने पाहण्याची ही वेळ आहे. अर्थात, आंबेडकरवादाचे मूळ तत्त्वज्ञान धर्मांध शक्तींना हायजॅक
करता येईल असे नाही. पण हे तत्त्वज्ञान प्रत्येक जण आपापल्या सोयीने आणि आपापल्या हितासाठी
मांडतो आहे. समाज विकासाचा बाबासाहेबांनी लावलेला अन्वयार्थ आपण जर असा सोयीने आणि
तुकड्या-तुकड्यांनी स्वीकारला तर मात्र आपल्या प्रागतिक सांस्कृ तिक पर्यावरणात मोठे अरिष्ट
उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही.

१. आंबेडकरवादाचे विचारसूत्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अन्वयार्थ जागतिकी करणाच्या वादळात कसा
लावायचा, हा आजच्या आंबेडकरी कार्यकर्ता पुढे प्रश्न आहे. एकतर बाबासाहेब हयात असताना
अस्पृश्यता, दारिद्र्य, शिक्षण आणि समाजिक न्याय या प्रश्नांसाठी बाबासाहेबांनी जो क्रांतिकारी लढा
दिला, धर्मचिकित्सेला कें द्र मानून तमाम भारतीयांना राज्यघटनेसारखे सुंदर तत्त्वज्ञान दिले, महात्मा
फु लेंना गुरू मानून मार्क्स, कबीर, शाहूंचे विचार अधिक गतिमान करत बाबासाहेब बुद्धमय झाले.
आंबेडकरवाद अशा वेगवेगळ्या टप्प्यांत समजून घेणे आवश्यक आहे. आज बाबासाहेबांना समजून
घेताना काळाच्या आणि तत्कालीन सांस्कृ तिक पर्यावरणाचा विचार करुन जागतिकीकरणात
बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान समजून घेणे अधिक महत्त्वाचे वाटते.
डॉ. आंबेडकरांचे कार्य दलित समाजासाठी जसे ऊर्जास्थान आहे तसेच ते प्रत्येक भारतीयांसाठी
स्वातंत्र्य आणि समतेचे अधिष्ठान देणारे आहे; पण दुर्दैवाने आपण बाबासाहेबांचे विचार आज
सूत्ररूपाने समजून न घेता सुटे सुटे समजून घेण्यात धन्यता मानत गेलो. आज बाबासाहेबांचे समग्र
विचार समजून घेणे अनेकांना सोयीचे वाटत नाही. म्हणून व्यक्तिगत राजकीय $$$$$
स्वार्थापोटी किं वा जातीची पकड अधिक मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांचा उपयोग के ला जात आहे.
आजपर्यंत कोणत्याच महापुरुषाच्या नावाने जेवढी घोषणाबाजी झाली नाही, तेवढी बाबासाहेबांच्या
नावाने होत आहे. पण भावनेच्या आणि घोषणेच्या पलीकडे जाऊन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि समाज
प्रबोधक अशी बाबासाहेबांची रुपे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आजही साठ वर्षानंतर बाबासाहेबांच्या
नावाचा जयघोष करणे म्हणजे खरा आंबेडकरवाद असे आपण समजत आलो आहोत.

10
दलित चळवळीच्या निकोप विकासासाठी आंबेडकरवाद ही संकल्पना समजून घेणे गरजेचे
आहे, असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ".बाबासाहेब
आंबेडकरांनी 'आंबेडकरवाद' नावाची अशी कोणतीही विचारसरणी सूत्ररूपाने मांडली नव्हती.
आंबेडकरवाद हा शब्दच मुळी बाबासाहेबांच्या निधनोत्तर काळात उच्चारला गेला व दलित पँथरच्या
आणि दलित साहित्याच्या उदयानंतर तो रूढ झाला. त्यामुळे हा वाद आपल्याला बाबासाहेबांच्या
लिखानातून शोधून काढावा लागतो".1

२.आंबेडकरवादाचे तत्त्वज्ञान
आंबेडकरवादा बरोबर मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद, भौतिकवाद, हिंदुत्ववाद,
मूलतत्त्ववाद अशा अनेक संकल्पना आपण वापरत असतो. इंगजीतील ism (इझम) या शब्दाला
पर्यायी शब्द म्हणून 'वाद' शब्द वापरला गेला आहे. परंतु 'इझम' शब्दाचा गर्भित अर्थ तत्त्वज्ञान
किं वा विचारप्रणाली सूचित करणे असा होतो, मग डॉ. आंबेडकरांनी जी विचारप्रणाली मांडली त्याला
आंबेडकरवाद म्हणता येईल का? स्थूलमानाने बाबासाहेबांनी फु ले-शाहू यांच्या विचारातून जी
तत्त्वप्रणाली मांडली, त्याला आंबेडकरवाद म्हणता येईल, अशी एक सर्वसमावेशक भूमिका
आंबेडकरवादाच्या बाबतीत घेतली जाते, ही भूमिका गैर नाही; पण असे असूनही काही मुलभूत प्रश्न
शिल्लक राहतात. तत्त्वज्ञान कशाला म्हणायचे? त्याच्या उगमाची कारणे काय?... या प्रश्नांचा
विचार के ला तर तत्त्वज्ञानाचा अर्थ ज्ञानाचे प्रेम असा होतो. Philosophy या शब्दाचा उगम प्राचीन
ग्रीसमधील Phile आणि Sophia या दोन शब्दांपासून झाला. त्यांचा अनुक्रमे अर्थ प्रेम (Love) आणि
सुज्ञपणा (Wisdom) असा होतो. याचा अर्थ तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानाचे प्रेम. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हे तत्त्वज्ञ होते, या विधानाचा अर्थ असा घेतला पाहिजे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानावर प्रेम
करून अत्यंत सुज्ञपणे प्रत्येक भारतीय माणसाला शहाणे करण्यासाठी काहीएक तत्त्वज्ञान निर्माण
के ले, याला आंबेडकरवाद म्हणता येईल.
अर्थात, विचारसरणी आणि तत्त्वज्ञान यात फरक आहे. तत्त्वज्ञानाचा संबंध ज्ञानाशी असतो;
तो गूढतेचा शोध असतो, तर विचारसरणीचा संबंध कल्पकतेशी असतो. तत्त्वज्ञान स्थिर असते, तर $
$$$$
विचारसरणी परिस्थितीजन्य बदलू शकते. याचा अर्थ असा की तत्त्वज्ञानातून विचारसरणीचा विकास
होतो. पण पुन्हा तत्त्वज्ञान (Philosophy), विचारसरणी (Idiology) आणि वाद (ism) यात फरक
आहे, 'इझम' ही संकल्पना विचारसरणीतून आकाराला येते, तिच्यात मत-मतांतराला आणि आक्षेपाला
वाव असतो. समाजातल्या तत्कालीन परिस्थितीवर इझम प्रभाव करीत असतो. बऱ्याचदा 'वाद' हा
शब्द आपण सुटा व स्वतंत्रपणे वापरत असलो तरी तो दुसऱ्या शब्दाला जोडू नही वापरतो. जसा

11
मानवतावाद, राष्ट्रवाद, समाजवाद, स्त्रीवाद, आंबेडकरवाद इत्यादी. इथे वाद शब्दाचा अर्थ 'एक
विचारसरणी' असा घेतला पाहिजे. खरं म्हणजे तत्त्व किं वा सिद्धान्त असाही वाद शब्दाच्या मागे
गर्भित अर्थ असू शकतो. 'वाद' हा शब्द ज्या शब्दाला जोडू न वापरलेला आहे, त्या शब्दाचा आशय त्या
विचारसरणीच्या कें द्रस्थानी असतो. जसे मानवतावाद ही मनुष्याला कें द्रस्थानी ठे वून काम करणारी
विचारसरणी आहे, स्त्रीवाद, राष्ट्रवाद, समाजवाद या संज्ञांचेही तसेच आहे. त्यामुळे आंबेडकरवाद ही
संज्ञा निश्चितच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला कें द्र मानून विकसित झालेली गोष्ट
आहे.
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका डॉ. दीप्ती गंगावणे यांनी 'वाद' ही संकल्पना उलगडू न
दाखविण्याचा प्रयत्न के ला आहे. त्यांच्या मते अनेक सुट्या सुट्या विचारसरणी वादाच्या भोवती
कार्यरत असतात. त्या उलटसुलट मतप्रवाहांवर उभ्या असतात. इथे वादग्रस्त मतांना वाव असतो. या
अर्थाने आंबेडकरवादाचा विचार के ला तर आंबेडकरवादी व्याख्या प्रत्येक जण आपापल्या
विचारसरणीनुसार करू शके ल. कु णाला बाबासाहेबांचे लेखन आंबेडकरवाद वाटेल, तर कु णाला त्यांनी
दिलेले बुद्धांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद वाटेल, तर कु णी बाबासाहेबांच्या न्याय, स्वातंत्र्य, समता
आणि संघर्षाच्या कार्याला आंबेडकरवाद म्हणू शके ल.
या सैद्धान्तिक पार्श्वभूमीवर आज आंबेडकरवादाचा विचार करत असताना सर्वसामान्य
कार्यकर्त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे- डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान कोणते? दुसरा प्रश्न:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी
सूत्ररूपाने कशी सांगता येईल? आणि तिसरा प्रश्न पडतो तो म्हणजे-आंबेडकरवाद म्हणजे नेमके
काय?... कारण Philosophy, Idiology आणि ism या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असे मानले की
त्यातील सूक्ष्म भेद आणि साम्यस्थळे शोधायला हवीत. या परस्परपूरक संज्ञांचे अर्थ नीटपणे लक्षात
न घेतल्याने आंबेडकरवादा बद्दल बोलताना सर्वसामान्य माणसाचा गोंधळ होताना दिसतो. याबाबत
विचारवंत आणि लेखकांनी या सैद्धान्तिक गोष्टी मांडण्यासाठी जे लेखनकार्य के ले आहे ते सर्वसामान्य
कार्यकर्ता समजून घेत नाही. अशा वेळी डॉ. आंबेडकरांच्या विचारांची थोडी जरी चिकित्सा झाली, तरी
कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वज्ञ $$$$$
आहेत, ते सर्वव्यापी आहेत, ते समग्र क्रांतीचे जनक आहेत, ते प्रकांडपंडित आहेत, ते राज्यघटनेचे
शिल्पकार आहेत, ते दलितांचे कै वारी आहेत... अशा सुट्या सुट्या वचनांना घेऊन भावनिक पणे
आंबेडकरवादाकडे पाहिले जाते; पण बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला अशा शब्द जंजाळात सजवून
आंबेडकरवादाची सैद्धान्तिक मांडणी उभी रहाणार नाही हेही तितके च खरे आहे.
आंबेडकरवाद ही संज्ञा आंबेडकरांच्या निधनानंतर जन्माला आलेली आहे, हे मान्य के ले की
मग आंबेडकरवाद कोणत्या विचारसरणीवर उभा आहे ? आणि ती विचारसरणी कोणत्या

12
तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे?... असे उलट प्रश्न पडल्याशिवाय रहात नाहीत. या प्रश्नांच्या उत्तरार्थ
ज्या गोष्टी हाती लागतील, त्या आंबेडकरी चळवळीला पोषक ठरतील असे वाटते. प्राच्यविद्यापंडित
कॉ. शरद पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, समीक्षक व ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर,
संघटक व साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, अर्जुन डांगळे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, राजा ढाले,
भाई संगारे, अॅड. प्रकाश आंबेडकर, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, ताराचंद्र
खांडेकर अशा अनेक लेखक- विचारवंतांनी आपापल्या परीने आंबेडकरवादाची मांडणी के ली आहे.
तत्त्वज्ञान आणि विचारसरणी यात फरक असला तरी विचारसरणी तत्त्वज्ञानाच्या जवळ
जाऊ शकते. अथवा एखादी विचारसरणी तत्वज्ञानात रूपांतरित होऊ शकते. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांची विचारसरणी एका तत्त्वज्ञानात रूपांतरित झाली; परंतु 'आंबेडकरवाद म्हणजे तत्त्वज्ञान
आहे' असे मात्र म्हणता येणार नाही. कारण एखादा वाद तत्त्वज्ञान बनत नाही. एखाद्या वादाला
तत्त्वज्ञानाच्या कसोटीला उतरवण्याच्या भरपूर मर्यादा येतात. या अर्थाने आंबेडकरवाद तत्वज्ञान
नाही, परंतु आंबेकरवादामागे जी विचारसरणी उभी आहे, ती विचारसरणी धर्मनिरपेक्ष अशा
नास्तिकवादी तत्त्वज्ञानाचा भाग मात्र नक्की आहे. इथे आंबेडकरी कार्यकर्त्यांची मोठी गफलत होताना
दिसते. बहुतांशी कार्यकर्ते श्रद्धेपोटी आंबेडकरांच्या नावाचा जो जयघोष करतात, निळा गुलाल उधळून
निळ्या पहाटेची अपेक्षा करतात, या आचरणाला आंबेडकरवाद म्हणण्याचा जो आततायीपणा
दाखवतात, तो आंबेडकरवाद नाही.
आंबेडकरवादाची पार्श्वभूमी समजून घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्त्वज्ञ होते का? असा
प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर डॉ. आंबेडकर हे जसे एका बाजूला भाष्यकार होते, तसेच ते दुसऱ्या
बाजूला तत्त्वज्ञही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३५ साली येवल्यात के लेली धर्मांतराची घोषणा
हे त्यांचे भाष्य होते. 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' या
बाबासाहेबांच्या भाष्यामागे जातिअंताचे आणि दास्यमुक्तीचे तत्त्वज्ञान होते. चार्वाक, बुद्ध, फु ले
यांच्या विचारसरणीतून त्यांनी ते अर्जित के ले होते. आपण स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानाला व्यवहारात
आणण्यासाठीचे सारे प्रयत्न बाबासाहेबांनी के ले. म्हणून बाबासाहेब एखाद्या धर्मपंडितासारखे भाष्य $
$$$$
करून थांबले नाहीत, तर त्यासाठी ते तत्त्वज्ञ बनून आपली विचारसरणी पेरत राहिले. समाजमनावर
त्या विचारसरणीचा काय उलट-सुलट परिणाम होतो, हे तपासत राहिले. त्यांनी कधी कधी आपलीच
मते खोडू न नव्या मतांचा स्वीकार के ला. स्वतःच्या विचारसरणीला समाज पटलावर घासत ती दुरुस्त
करत राहिले. सर्वच ठिकाणी बाबासाहेबांना यश आले असे नाही. अनेकदा त्यांनी तार्कि कतेच्या
पातळीवर आपल्याच मतांची चिकित्सा के ल्याची ही उदाहरणे दिसतात. याचाच अर्थ ते सतत प्रवाही
होते. नव्या नव्या विचारसरणींबद्दल आस्था बाळगून त्यांचा स्वीकार करणारे विचारवंत होते.

13
बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील तत्त्वज्ञ हा सतत आपल्या भूतकाळातील आणि
वर्तमानातील विचारसरणींशी दोन हात करत होता. तो एका बाजूला हिंदू धर्मग्रंथांचे जसे अध्ययन
करत होता, तसेच दुसऱ्या बाजूला या धर्मग्रंथांतील तत्त्वज्ञानाला बाद करण्यासाठी बुद्ध आणि मार्क्स
यांच्या तत्त्वज्ञानाचे रोपन करून एक नवी प्रागतिक विचारसरणी आणू पहात होता. कॉ. शरद पाटील
यांनी याच अर्थाने त्यांच्या 'मार्क्सवाद व फु ले-आंबेडकरवाद' या पुस्तकात बाबासाहेबांना तत्त्वज्ञ
म्हटले आहे. "जो भाष्याच्या आवरणाखाली तत्त्वज्ञानाचा विकास करतो तो तत्त्वज्ञानी. आंबेडकरांनी
बौद्ध वाद जातिव्यवस्था अंतर्गत भारतीय लोकशाही क्रांतीला लावण्यासाठी त्यांच्या भाष्यावरणाखाली
विकास के ला आहे म्हणून ते तत्त्वज्ञानी."2 कॉ. शरद पाटील यांना आंबेडकरवादाची व्याख्या
मार्क्सशिवाय होऊ शकत नाही असे वाटते. आंबेडकरांच्या विचारांत जो बुद्ध आणि मार्क्सचा समन्वय
झाला तो आंबेडकरवाद आहे, असे शरद पाटील यांना वाटते. याविषयी डॉ. नीळकं ठ शेरे यांनी त्यांच्या
'आंबेडकरवाद' या पुस्तकात शरद पाटलांची भूमिका विषद के ली आहे. शरद पाटील यांच्या मते
"...बाबासाहेबांनी बौद्ध वाद व राज्यसाम्राज्यवाद यांचा जो समन्वय के ला तो 'आंबेडकरवाद' होय.''3
पाटील यांच्या म्हणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि मार्क्सच्या विचारांची जी सांगड
घातली आणि त्यातून जे मानवतावादी, दास्यमुक्तीचे आचरण उभे के ले ते आंबेडकरवादी
विचारसरणीचा गाभा आहे.

३. व्यापक वैचारिक आचरण


डॉ. आंबेडकरांच्या विचारांना सतत तात्त्विक पातळीवर तपासून त्यांची जगभरातल्या
तत्त्ववेत्त्यांशी तुलना करत आंबेडकरवादाची सूत्ररूपाने मांडणी करणारे विचारवंत म्हणून डॉ.
रावसाहेब कसबे यांची ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान स्पष्ट करताना
रावसाहेबांनी आंबेडकरांची तुलना कार्ल मार्क्सशी के ली. ही तुलना पोथीनिष्ठ सामाजवादी आणि
पारंपरिक दलित या दोघांनाही फारशी रुचली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स आणि बुद्ध हे
रावसाहेब कसबे यांच्या आयुष्यभराच्या चिंतनाचे विषय राहिले आहेत.
$$$$$
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना', 'आंबेडकर आणि मार्क्स', 'मानव आणि
धर्मचिंतन', 'भक्ती आणि धम्म' हे त्यांचे याविषयांवरील काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. डॉ. कसबे यांनी
आंबेडकरवादाची स्वतंत्र अशी व्याख्या के ली नसली, तरी आंबेडकरवादाची फलश्रुती काय असावी ?
याविषयी त्यांनी त्यांच्या लेखनातून काहीएक सूचित के ले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू झालेला रावसाहेब कसबे यांचा वैचारिक प्रवास धर्माकडे
गेला, याबद्दल अनेक अभ्यासकांनी शंका घेतल्या. अनेकांनी आक्षेप नोंदविले; पण रावसाहेबांचा हा

14
विचारप्रवाह बाबासाहेबांपासून धर्माकडे जात नसून तो धर्माची चिकित्सा करत करत धम्माकडेच
जातो, हेही लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांचे धर्मांतर आणि बुद्ध धम्माचा स्वीकार ही या देशातली
सर्वांत मोठी क्रांती आहे, असे रावसाहेब कसबे यांनी नोंदवून ठे वले आहे. अर्थात, धर्मांतरानंतरचे दलित
राजकारण फाटाफु टीच्या विळख्यात अडकले, वेगवेगळया गटांमध्ये दुभंगले, दलित चळवळीची
पडझड झाली. याविषयी रावसाहेबांनी वेळोवेळी इशारे दिले आहेत. त्यापैकी एक इशारा म्हणजे- दलित
साहित्य आणि चळवळीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या बुद्ध आणि मार्क्सच्या
समन्वयाकडे दुर्लक्ष के ले. खरे तर हे एकाकी घडले असे नाही. साम्यवादी आणि पोथीनिष्ठ
कम्युनिष्टांनाही बाबासाहेब हवे होते, असे नाही. त्यांनीही वरवर बाबासाहेबांचे नाव घेऊन आतून मात्र
विरोध के ल्याचे चित्र आहे. बाबासाहेबांना जो बुद्ध हवा होता, तो बुद्ध अजूनही आपण स्वीकारला नाही,
अशी खंत रावसाहेबांची आहे. म्हणून त्यांना वाटते, "बाबासाहेब आंबेडकर राज्यशास्त्राचे व्यासंगी
विद्वान होते. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. कार्ल मार्क्सचा साम्यवाद आणि बुद्धाचा बौद्ध धम्म
यांच्या अभ्यासात त्यांनी जीवनाचा बराच काळ घालविलेला होता. म्हणून या दोघांचा तुलनात्मक
अभ्यास करून ते जगातील दुःखाचा परिहार करण्यासाठी बुद्धाचा मार्ग सांगत होते. परंतु त्यांचा बुद्ध
पारंपरिक बुद्ध नव्हता. त्यांचा बुद्ध हा मार्क्सने उरी बाळगलेले ध्येय वास्तवात उतरविणारी क्रांतिकारी
प्रेरणा होता. मार्क्सच्या ध्येयाशी सहमत असलेला परंतु धोरणात वेगळेपणा असणारा बुद्ध
बाबासाहेबांना अभिप्रेत होता.”4 रावसाहेब कसबे यांना अपेक्षित आंबेडकरवाद हा बौद्ध धम्माच्या
विकासप्रक्रियेशी जोडला गेलेला आहे. खरे तर 'वाद' या शब्दातला गर्भित अर्थ 'विचारसरणी' किं वा
'सिद्धान्त' असा होत असेल, तर आंबेडकरवाद कोणत्या विचारसरणीवर उभा आहे, हे वेगळे सांगायला
नको. बुद्धाचे सम्यक तत्त्वज्ञान हे आंबेडकरवादाचे अधिष्ठान आहे. त्याचा प्रसार करण्याचे महत्त्वाचे
काम आंबेडकरवादाचे आहे.
रावसाहेबांनी त्यांच्या चिंतनातून आंबेडकरवादी तत्त्व आणि व्यवहारांचे जे सैद्धान्तिक
विश्लेषण के ले आहे, ते आजच्या घडीला फार उपयोगाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध
धम्माला 'नवयान' असा शब्द स्वतःच वापरला होता. त्यांनी बौद्ध धम्माच्या व्यवहाराची, तत्कालीन $
$$$$
भिक्खूंच्या वर्तनाची आणि एकू णच बौद्ध धर्माची तत्त्वज्ञानाची आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या आधारे
चिकित्सा के ली होती. या चिकित्सेतून बाबासाहेबांचे 'नवयान' साकारलेले होते, असे रावसाहेबांनी
म्हटले आहे. बाबासाहेबांचा बुद्ध हा कार्यकर्ता बुद्ध असल्याने तो पारंपरिक धम्म अनुयायांना पटला
नाही. पण बाबासाहेबांनी नवयान मार्फ त जो सामाजिक बुद्ध मांडला, त्या बुद्धाची आज आवश्यकता
आहे. ज्यांनी बाबासाहेबांचा बुद्ध नीट समजून घेतला नाही, त्यांनी त्यांचे 'नवयान' हे एकीकडू न हिंदू
धर्माच्या आणि दुसरीकडू न मार्क्सवादाच्या विरोधी पोथीबंद प्रतिक्रिया, या अर्थाने स्वीकारले. जगात

15
के वळ रशियन समाजवादाचाच पराभव झाला असे नाही, तर विसाव्या शतकाच्या शेवटी जागतिक
स्तरावर बौद्ध धर्मसुद्धा ऱ्हास पावत आहे, असे सूचित करून रावसाहेब कसबे सांगतात, "आंबेडकरांच्या
बुद्ध आणि मार्क्स यांच्याबद्दलच्या चिंतनातून मार्क्सच्या मूळच्या साम्यवादाला खऱ्या अर्थाने
वास्तवात आणण्यासाठी बुद्धाचा धम्म कसा पूरक ठरू शकतो याचे जसे काही संके त मिळतात, तसेच
जागतिक स्तरावर ऱ्हास पावत असलेल्या पारंपरिक बौद्ध धर्माला आंबेडकरांच्या प्रतिभेतून,
अनुभवातून आणि परिश्रमातून साकार झालेल्या 'नवयाना’ च्या, धम्माच्या आधाराने कसे सावरता
येऊ शके ल, याचीही दृष्टी मिळू शकते.”5
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समाजवादाचे आकर्षण होते हे सर्वमान्य आहेच; १९५६ सालच्या
जागतिक बौद्ध भातृसंघाच्या काठमांडू येथील चौथ्या परिषदेत प्रतिनिधी म्हणून हजर असताना
बाबासाहेबांनी ‘बौद्ध धर्मातील अहिंसा' या विषयाऐवजी देशोदेशींच्या प्रतिनिधींच्या आग्रहामुळे ‘बौद्ध
धम्म व साम्यवाद' या विषयावर भाषण दिले. धर्मांतरानंतरचे हे लगेच दिलेले एक ऐतिहासिक भाषण
होते. या भाषणात डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धम्म हा साम्यवादाला पर्याय असू शकतो, हे तरुण पिढीला
सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त के ली. या संपूर्ण भाषणात बाबासाहेबांनी बुद्ध आणि मार्क्स यांची
अनेक उदाहरणे देऊन तुलना के लेली दिसते. डॉ. आंबेडकरांना समाजवादाचे आकर्षण होते, हे नाकारता
येणार नाही. पण कार्ल मार्क्स यांना अपेक्षित असलेला पोथीनिष्ठ समाजवाद बाबासाहेबांनी नाकारला
होता. या अर्थाने ते पोथीनिष्ठ मार्क्स वाद्यांच्या विरोधी होते; परंतु मार्क्स चे संपूर्ण तत्त्वज्ञान
भारतीय समाजव्यवस्थेत कु चकामी आहे, अशी बाबासाहेबांची भूमिका नव्हती. गेल्या काही वर्षांत
'मार्क्स विरुद्ध आंबेडकर', 'आंबेडकर विरुद्ध गांधी' अशी जी वैचारिक लढाई दाखविली जाते, ती लढाई
त्या त्या काळातील राजकारणाची सोय असू शकते. अशा विरोधाभासी लढाया रंगवण्यात कु णाचेतरी
भले होणार असते. महापुरुषांच्या अशा व्यक्तिगत दोषारोपांच्या लढाया आपल्या सोयीने रंगवून
आजचे प्रश्न सुटणार नाहीत, हेही नीट समजून घेतले पाहिजे.
मराठी साहित्यातील समीक्षक व लेखक डॉ. नीळकं ठ शेरे यांचे 'आंबेडकरवाद' हे पुस्तक
जिज्ञासूंनी पहावयास हवे. या पुस्तकात डॉ. शेरे हे 'आंबेडकरवाद कशाला म्हणायचे?' या निष्कर्षाकडे $
$$$$
आलेले दिसतात. या ग्रंथात त्यांनी आंबेडकरवादाकडे कोणकोणत्या दृष्टीने पाहता येईल, याविषयीची
काही निरीक्षणे मांडली आहेत. शेरे यांच्या मते "डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक,
आर्थिक, सांस्कृ तिक, इतिहासविषयक विचारांतून आंबेडकरवाद सिद्ध होतो."6 डॉ. शेरे यांच्या मताशी
सहमत होऊनही आंबेडकरवादाची व्याख्या पूर्ण होत नाही असे वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे
सामाजिक विचार त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेतून व्यक्त होतात, त्यांच्या लेखनाचा गाभा भारतातील
जातिसंस्था आणि तिचे उच्चाटन आहे हे ही खरे आहे. पण जातिसंस्थेच्या उच्चाटनासाठी

16
बाबासाहेबांनी सुचविलेल्या उपाययोजना आजही समाजात पूर्णत्वाने अमलात येत नाहीत.
आंतरजातीय विवाहाची चळवळ भारतात ज्या गतीने पुढे जायला हवी होती त्या गतीने ती पुढे गेली
नाही, हेही नाकारता येत नाही.
आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक ताराचंद खांडेकर यांनी आंबेडकरवाद
याविषयी आपली भूमिका मांडली आहे. ‘आंबेडकर तत्त्वज्ञान : प्रचीती आणि आविष्कार' या ग्रंथात
खांडेकर यांनी आंबेडकरवादाची सर्वसमावेशक व्याख्या करण्याचा प्रयत्न के ला आहे. परंतु खांडेकरांची
आंबेडकरवाद विषयी भूमिका एकांगी वाटते. समाजवाद, मार्क्सवाद, गांधीवाद यांना विरोध करत
करत ते 'आंबेडकरवाद' विकसित करू पाहतात. त्यामुळे खांडेकरांच्या म्हणण्यात तथ्य असले तरी ते
म्हणणे एकांगी दिसते. मराठी साहित्यात आंबेडकरवादाची मांडणी करणारे असंख्य लेखक आहेत.
सर्वांचीच मते उद्धृत के ली तर तो के वळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यासाठी काहीएक निष्कर्षावर
यायला पाहिजे.
इथे आंबेडकरवादाबद्दल एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे आंबेडकरवाद ही संकल्पना
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपल्या हयातीत निर्माण के लेली नाही. म्हणजेच डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी आपल्या हयातीत जे तत्त्वज्ञान स्वीकारले आणि त्याच्या प्रसारासाठी ज्या
विचारसणीचा प्रसार के ला, त्या तत्त्वज्ञान आणि विचारसरणीला कें द्रस्थानी ठे वून आंबेडकरवादाची
व्याख्या करता येणे शक्य आहे. कारण आंबेडकरवाद ही गोष्ट सतत प्रवाही आहे. सामाजिक, राजकीय
आणि सांस्कृ तिक बदलानुसार आंबेडकरवादी बदलतो आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथसंपदा, त्यांनी
मांडलेले विचार, त्यांचे राजकारण, त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि समग्र सांस्कृ तिक परिवर्तनाचे
विचार, त्यांचे जीवनचरित्र व त्यांनी स्वीकारलेले बुद्ध तत्त्वज्ञान या सगळ्यातून आंबेडकरवादाचे
आजचे चित्र उभे राहते.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोणताही वाद जर एखाद्या विचारसरणीवर उभा असतो, तर
आंबेडकरवादाच्या मुळाशी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे विचारसूत्र आहे. मानवतावाद हा
या विचारसरणीचा गाभा आहे. मग प्रश्न उभा रहातो तो म्हणजे, बुद्धविचार हे तत्त्वज्ञान आणि $$$$$
मानवतावाद ही विचारसरणी जर आंबेडकरवाद का आधार असेल, तर आज जागतिकीकरणाच्या
काळात आंबेडकरवादाचे स्वरूप कसे असायला हवे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानवमुक्तीचे विचार
के वळ दलितांपुरतेच मर्यादित नव्हते. त्यांना भारतीय समाजातील जातिसंस्थेला, शोषणाला आणि
कुं ठीत धर्मपरंपरेला बदलायचे होते. या देशातल्या शूद्रांना आणि स्त्रियांना स्वतःचे हक्क बहाल
करायचे होते. अशावेळी बाबासाहेबांना जातीत बंदिस्त करून त्यांची विचारसरणी के वळ राजकीय
फायद्यासाठी वापरणारे अनुयायी कोणता आंबेडकरवाद उभा करत आहेत?

17
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्माबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत.
हे गैरसमज आजचे नाहीत. बाबासाहेबांनी स्वीकारलेला बुद्ध हा नवा बुद्ध आहे, हे समजून घेण्याची
मानसिकता अजूनही तयार होताना दिसत नाही. "समता, स्वातंत्र्य व बंधुत्व यांच्या प्राप्तीसाठी
आंबेडकरवाद सामाजिक नीतिमत्ता (Social Humanism) स्वीकारतो. ही सामाजिक नीतिमत्ता
म्हणजेच भगवान बुद्धाने सांगितलेला सद्धम्म होय."7 बाबासाहेबांच्या विचारांचे तत्त्वज्ञान बुद्धविचार
आहे ते समजून घेतले पाहिजे. अन्यथा बुद्धाला परंपरेत बसवून त्यांना विष्णूच्या अवतारात
बसवणाऱ्या कर्मठ मानसिकतेसाठी ते अधिक फायद्याचे ठरेल. आजपर्यंत दलितांना बुद्धांचा पूर्ण
स्वीकार करण्यामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या आहेत, त्यामध्ये बुद्धांना अवतार कल्पनेत
बसविल्याने फार मोठी सांस्कृ तिक हानी झाली आहे. त्यामुळे बौद्धेत्तर समाज बुद्ध विचार समजून
घेण्यात मागे राहिला हेही मान्य करावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध हा कार्यकर्ता बुद्ध आहे.
माणूस आहे. तो रोजच्या प्रश्नांशी भिडतो. जगण्याची लढाई जिंकतो. माणसा माणसातील द्वेष,
मत्सर दूर करून त्याला शांतीचे, सदाचाराचे सुंदर तत्त्वज्ञान बहाल करतो, म्हणूनच परंपरेत
अडकलेल्या बुद्धापेक्षा बाबासाहेबांचा बुद्ध वेगळा आहे, तो धार्मिक नसून सामाजिक आहे.
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या धम्माचे विज्ञानवादी, कालसापेक्ष आणि लोकशाहीयुक्त असे
नवे स्वरूप विशद के ले आहे. याअर्थाने बाबासाहेबांना बुद्धप्रणीत साम्यवाद अपेक्षित होता.
बाबासाहेबांच्या आर्थिक व राजकीय विचारांत या बुद्धप्रणीत साम्यवादाचे चित्र उमटलेले दिसते.
बाबासाहेब आंबेडकर मार्क्सला अपेक्षित असणाऱ्या राज्यसमाजवादाची कल्पना नाकारत नाहीत पण
बाबासाहेबांचा राज्यसमाजवाद के वळ पोथीनिष्ट नाही, तो अधिकाधिक लोकशाही प्रणीत आहे. राज्य
समाजवाद कृ तीत आणण्यासाठी तेवढ्याच गतिमान राजकीय पक्षाची, राजकीय धोरणांची आणि
सामाजिक-सांस्कृ तिक अभिसरणाची अपेक्षा बाबासाहेब आंबेडकर करताना दिसतात. त्यासाठी ते
पहिल्यांदा सजग समाजाचे स्वप्न पाहतात. कारण जागृत समाज ही लोकशाहीची पहिली निकड आहे,
असे बाबासाहेबांचे विचार होते. आंबेडकरवादाची मांडणी करताना बाबासाहेबांचे राजकीय विचार आणि
$$$$$
त्यातून त्यांनी संसदीय लोकशाहीच्या पायाभरणीसाठी के लेले प्रयत्न बाजूला ठे वता येणार नाहीत.
भारतीय संविधानाची निर्मिती आणि त्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले अथक परिश्रम आंबेडकरवादाचा
गाभा आहे. 'एक व्यक्ती एक मूल्य' हे बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्वाचे सूत्र असून प्रत्येक
व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी के लेले प्रयत्न म्हणजे संपूर्ण
भारतीयांसाठी नवे प्रागतिक पाऊल होते.
मार्क्सने धर्म अफू ची गोळी म्हटले; परंतु बाबासाहेबांनी धर्माचे अस्तित्व नाकारले नाही.
कारण माणूस के वळ भाकरीवर जगत नसून त्याला मन आहे आणि मनाची भूक भागविण्यासाठी

18
त्याला धर्माची गरज आहे' असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. पण प्रचलित धर्मपरंपरा माणसाच्या मेंदूला
खाऊन टाकते. त्याला विचारशून्य करते, त्याला कर्मकांडाला जोडू न ऐहिक दुनियेत घेऊन जाते, हे
बाबासाहेबांना मान्य नव्हते. बाबासाहेबांना धर्म हवा होता पण तो विवेकावर आधारित, माणसाचे
कल्याण करणारा, विज्ञानाची कास धरणारा आणि बंधुतेची पेरणी करणारा. म्हणून हिंदूधर्माला
नाकारून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार के ला. बाबासाहेबांचे धर्मांतर ही गोष्ट भारतातील अनेक
धर्मांना आणि जातीच्या समूहांना हादरे देणारी होती. बाबासाहेबांचे धर्मांतर ही गोष्ट आंबेडकरवादाची
फलश्रृती आहे.

४. प्रागतिक आंबेडकरवाद
आज आंबेडकरवादाचा सूत्ररूपाने विचार करताना बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी व
त्यामागे उभे असलेले बुद्धांचे मानवतावादी तत्त्वज्ञान जसे विचारात घ्यावे लागेल तसेच
समाजव्यवस्थेतला नवा बदलही लक्षात घ्यावा लागेल. कारण बाबासाहेबांच्या निधनाला जवळ जवळ
बासष्ट वर्षे लोटली आहेत. या बासष्ट वर्षांत भारतीय समाजव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत.
भारतात बुद्धांचे तत्त्वज्ञान ज्या गतीने पोहचणे अपेक्षित होते ते झाले नाही. बाबासाहेबांच्या
निधनानंतर आंबेडकरी राजकारणाची शकले उडाली. नेत्यागणिक पक्ष उदयाला आले. फाटाफू ट झाली.
धर्माची नखे विस्तारली. जात अधिक विखारी झाली. १९९१ नंतर नव्या अर्थव्यवस्थेने जन्म घेतला,
आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण आले. नव्या भांडवलशाहीचा जन्म झाला.
भारतीय माणसाच्या विकासाचे स्वप्न जागतिक बाजारपेठे ला जोडले गेले. याशिवाय अलीकडे
दहशतवादाने जगभर जो धुमाकू ळ घातला आहे, तो पहाता भारताच्या सुरक्षेपुढे अनेक प्रश्न उभे
आहेत. भारताचे सामरिक प्रश्न अधिक टोकदार बनले आहेत. चीन, रशिया आणि पाकिस्तान यांच्या
सीमारेषा अधिक काटेरी बनल्या आहेत. युद्धाची भाषा आणि युद्धनीतीही बदलली आहे. अशा काळात
आंबेडकरवादाचा व्यापक विचार के ला नाही तर सध्याच्या परिस्थितीला भारतीय माणसाला तोंड देता
$$$$$
येणार नाही. या अर्थाने आज भारतीय माणसाला खरी गरज आहे ती नव्या प्रागतिक आंबेडकरवादाची.
म्हणून आज आंबेडकरवादाची मांडणी करायची झाली तर संपूर्ण भारतीयांच्या सम्यक कल्याणासाठी
बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मनिरपेक्ष, बहुसांस्कृ तिक आणि विज्ञाननिष्ठ विचार नव्या संदर्भात
सातत्याने कृ तीत आणून भारतात समाजवादी लोकशाही रुजवण्याचे मानवतावादी प्रयत्न करणे
म्हणजे प्रागतिक आंबेडकरवाद म्हणता येईल.
आंबेडकरी विचारधारा ही विशिष्ट जातींची मालकी नाही हे प्रामाणिकपणे मान्य के ल्याशिवाय
आंबेडकरवादाचा व्यापक विकास होणार नाही. आंबेडकरवादाचा व्यापक विचार करायचा झाल्यास

19
दोन पातळीवर करता येईल. एक म्हणजे दलितांनी स्वीकारलेली आंबेडकरी विचारधारा आणि दुसरी
म्हणजे दलितेतरांनी स्वीकारलेली आंबेडकरी विचारधारा. आजही दलितेतर समाजातील कित्येक
लोकांना बाबासाहेब तेवढेच आदरणीय आहेत जेवढे दलितांना आहेत. परंतु बाबासाहेबांना आपल्या
जातीच्या बाहेर न्यायचे नाही असे एकदा ठरविले की आंबेडकरवादाच्या विकासाचे सारे प्रागतिक मार्ग
बंद होतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा समजून घेऊन या अर्थाने मानवतावादी पावले
टाकणारा दलितेर वर्ग नाही का? प्रागतिक आंबेडकरवादी मानवतावादाचे सांविधानिक पाऊल
टाकाणाऱ्या उच्चवर्णीय पुरोगामी माणसाला बाजूला ठे वून चालणार नाही. के वळ पारंपरिक दूषणे
देऊन आंबेडकरवादाचा विकास होणार नाहीच; परंतु उलट त्यात साचलेपण येईल. म्हणून बौद्धेतर
मागास जाति समूह बरोबरच इतर जातीतील कोणत्याही विवेकी माणसाला सहजपणे आंबेडकरी
विचारधारा स्वीकारून आपल्या जीवनाची सांस्कृ तिक व संविधानिक पावले टाकता यावीत, इतक्या
सरळ आणि सोप्या मार्गाने आंबेडकरी आचरण जायला हवे.
बुद्धाचे तत्त्वज्ञान हे जगातल्या कोणत्याही माणसाला त्याचे जीवन सार्थ, आणि सुंदर करणारे
आहे, हे सहजपणे समजण्याचे विवेकी आचरण म्हणजेच आंबेडकरवाद आहे. माणसाच्या मनात
बंधुतेची पेरणी करून त्याला त्याच्या हक्कासाठी जागृत करणे हे आंबेडकरवादाचे मोठे काम आहे. हे
काम आपण समजतो तेवढे सोपे नाही; कारण सगळीकडू न अंधार वाढत आहे. ज्येष्ठ कवी यशवंत
मनोहर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, "खोट्याच्या, घेणेच्या, अंधश्रद्धांच्या आणि अमानुषतेच्या
अंधारात शिरणे या समाजातील मनांना फार प्रिय वाटते. त्यामुळे या समाजातील लोक मनाच्या
उजेडाच्या दृष्टीने मोठे कं गाल आहेत... आपण बाहेरच्या उजेडाचे अतिरेकी प्रदर्शन मांडतो आणि
आतला उजेड मात्र हद्दपारच करून टाकतो."8 अंधारात चाललेल्या या युद्धात गरिबांची ताकद वाढेल
असा प्रकाश आंबेडकरवाद देऊ शकतो.

$$$$$
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने लढले, अंधाराशी दोन हात करत जिंकले. प्रकाशमान झाले.
खर्या अर्थाने 'अत्तदीप' झाले. 'जो समाज स्वतःच प्रकाशमान झालेला असतो त्याला बाहेरच्या
उजेडाची गरज नसते; परंतु जो समाज 'अत्तदीप' होऊ शकत नाही त्याला बाहेरच्या उजेडाचा
काडीचाही उपयोग होत नसतो.' यशवंत मनोहरांच्या या उक्तीप्रमाणे आज समाजात अशी कित्येक
माणसे आहेत की ते बाहेरच्या दिमाखदार प्रकाशाचा उजेड असूनही आतून मात्र काळोखलेले आहेत.
त्यांचं आतलं जग प्रचंड पोखरलेलं आहे. धर्म, अंधश्रद्धा, द्वेष, मत्सर, भ्रष्टाचार, व्यभिचार या

20
अनिष्ट प्रथांनी त्यांचं आतलं जग उसवलेलं आहे. त्यांना 'अद्याप' होण्याचा सम्यक मार्ग दाखवण्याचं
महत्त्वाचं काम करणं म्हणजे व्यापक आंबेडकरी आचरणाकडे जाणं आहे.

५. आत्मटीके ची गरज
डॉ. रावसाहेब कसबे यांनी १९८९ साली 'आंबेडकरवाद : तत्व आणि व्यवहार' ही पुस्तिका
लिहिली. यात आंबेडकरवादाची चिकित्सक मांडणी करत त्यांनी आजच्या आव्हानांकडे लक्ष वेधले
आहे. या छोटेखानी मांडणीत त्यांनी काही मूलभूत इशारे दिले आहेत. पण यांच्या इशाऱ्यांकडे दलित
चळवळीतील नेत्यांनी आणि कार्यकत्यांनीही सोईने दुर्लक्ष के लेले दिसते. कदाचित बाबासाहेब
आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांची सांगड घालून सामाजिक गतिमानतेचा विचार के ला तर
बाबासाहेब दलितांचे राहणार नाहीत, ते वैश्विक होतील, अशावेळी आपल्याला आपली राजकीय पोळी
भाजता येणार नाही, असेही रावसाहेबांना वाटते. याच मांडणीत महापुरुषांशी आपल्या वैचारिक निष्ठा
कशा असायला हव्यात? याविषयी त्यांनी परखडपणे मते मांडली आहेत. त्यांच्या मते "...महापुरुषांचा
उपयोग आपण त्यांच्याशी खरेच निष्ठे ने वागत असतो म्हणून करीत असतो की, आपल्या सोईसाठी
त्यांना वेठीस धरतो."9
आपल्या देशात विकासाच्या नावाने राजकारण होत नाही तर महापुरुषांच्या नावाने राजकारण
होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फु ले, टिळक, गांधी,
बाबासाहेब आंबेडकर ते अण्णा भाऊ साठे हे सारेच महापुरुष आपण आता मतांसाठी वाटू न घेतले
आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला हे दुःख अधिक आले आहे. बाबासाहेब स्वतः
व्यक्तिपूजेच्या विरोधी होते. महापुरुषांना समजून घेताना काळाचा अवकाश लक्षात घेऊन, त्यांची
समीक्षा करून त्यांच्या विचारांचे स्वागत के ले पाहिजे, असे बाबासाहेबांचे मत होते. याविषयी
बाबासाहेब काय म्हणाले होते हे नलिनी पंडित यांनी नोंदवून ठे वले आहे. बाबासाहेबांच्या मते,
"...व्यक्तिपूजा करताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, कारण आपल्या देशात आज अशी
परिस्थिती निर्माण झालेली आहे की, ज्याप्रमाणे खिसेकापूंपासून सावधान' असे जागोजागी फलक $$
$$$
लावले जातात तसेच महापुरुषांपासून सावधान' असे फलक लावण्याची आवश्यकता निर्माण झाली
आहे."10 व्यक्तिपूजेला प्रखरपणे विरोध करत बाबासाहेबांनी राष्ट्रकार्याला महत्त्व दिले, त्याच
समाजपुरुषाला, त्यांच्या अनुयायांनी श्रद्धेचे ठिकाण करून टाकले. महापुरुष श्रद्धेचा विषय असतात हे
खरे, पण श्रद्धेचे रूपांतर स्वार्थात झाले की महापुरुषांच्या विचारांची वासलात लागते, हेही तितके च खरे
आहे. ज्यांनी अत्यंत तर्क शुद्ध व विवेकबुद्धीने देवाला नाकारले, त्यांनाच आपण देव करायला निघालो
आहोत.

21
आपण महापुरुषांना श्रद्धेचा विषय करून किती खुजे करतो, सतत त्यांची एकमेकांशी चढाओढ
करून काय साधले? बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी लिहिलेली राज्यघटना माहीत नसतानाही
आपण त्यांच्या सुट्या सुट्या वचनांवर नारा देतो आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करून
रस्त्यावर मिरवतो. शेवटी प्रश्न उरतो तो आपल्या अशा श्रद्धाळू वागण्याने बाबासाहेब मोठे होतील की
खुजे होतील? डॉ. रावसाहेब कसबे यांच्या इशाऱ्या प्रमाणे दलितांनी आता अहंकार आणि
अभिनिवेशाला तिलांजली दिली पाहिजे. कारण तत्कालिक संघर्षला मूलभूत संघर्ष मानून जर चळवळी
उभ्या राहिल्या तर संघर्ष हे साधनाऐवजी साध्य बनतात आणि शेवटी संघर्षाची व्याप्ती स्वतःपर्यंतच
येऊन भिडते. कोणत्याही संघटनेला जर चारित्र्य आणि विवेक, व्यापकता आणि दूरदृष्टी, ध्येयाची
स्पष्टता व त्यावरील निष्ठा आणि मानवी कल्याण ही मध्यवर्ती कल्पना नसेल तर अशा संघटना
के वळ सामाजिक तणाव वाढवू शकतात. त्या सामाजिक पूनर्रचना करू शकत नाहीत. बाबासाहेबांचे
नाव घेणाऱ्या संघटनांनी आणि व्यक्तींनी ही काळजी घेतली नाही तर बाबासाहेबांचा देव व्हायला वेळ
लागणार नाही.



संदर्भ

१. कसबे रावसाहेब, आंबेडकरवादः तत्त्व आणि व्यवहार, द्वि. आ, सुगावा प्रकाशन, पुणे, २००४, पृ.
२१.
२. पाटील शरद, मार्क्सवाद व फु ले-आंबेडकरवाद, सुगावा प्रकाशन, पुणे १९९३, पृ.५.
३. शेरे निलकं ठ, आंबेडकरवाद, सुविद्या प्रकाशन, पुणे, २००९, पृ.१४, १५.
४. कसबे रावसाहेब, आंबेडकर आणि मार्क्स, द्वि. आ, सुगावा प्रकाशन, पुणे, २००६, पृ. २८२.
५. कसबे रावसाहेब, उक्त, पृष्ठ. ४१, ४२.
६. शेरे नीलकं ठ, आंबेडकरवाद, सुविद्या प्रकाशन, पुणे, २००९, पृ. १४.
$$$$$
७. खांडेकर ताराचंद्र, आंबेडकर तत्त्वज्ञान: प्रचीती आणि आविष्कार, संके त प्रकाशन, नागपूर, २००९,
पृ.२५.
८. मनोहर यशवंत, मूल्यमंथन, युगसाक्षी प्रकाशन, नागपूर, २००४, पृ. ३०.
९. कसबे रावसाहेब, आंबेडकरवादः तत्त्व आणि व्यवहार, द्वि. आ, सुगावा प्रकाशन, पुणे, २००४, पृ.
१४.
१०. कसबे रावसाहेब, उक्त, पृ.१०.

22
$$$$$

आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने

१. विचारसरणींचा तिढा

23
विचारसरणींचा तिढा कसा सोडवायचा हा आपल्यापुढे प्रश्न असतो. हा तिढा सुटला नाही की
विचारांच्या गडबडी होऊ शकतात. साम्यवाद, मार्क्सवाद, उदारमतवाद, बुद्धीप्रामाण्यवाद, राष्ट्रवाद,
समाजवाद, भांडवलशाही, गांधीवाद, आंबेडकरवाद, हिंदुत्ववाद, मूलतत्ववाद इत्यादी विचारसरणी
ज्या आपल्या सांस्कृ तिक जगण्याचा भाग बनलेल्या आहेत, त्या विचारसरणीमध्ये सर्वसामान्य
माणसाचा नेहमीच गोंधळ होतो. विचारसरणींमध्ये गोंधळ म्हणजे आपल्या सांस्कृ तिक जगण्यात
गोंधळ असे हे समीकरण आहे.
प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ कार्ल मॅनहाईम याने 'आयडिऑलॉजी अॅण्ड युटोपिया' हा ग्रंथ
लिहिला. या ग्रंथात त्याने विचारसरणीबद्दल काही मूलभूत प्रश्न उभे के लेले आहेत. त्याच्या मते,
"आपण विचारसरणींबद्दल बोलताना विचारसरणी निरपेक्ष बोलू शकतो का? कारण सर्वच
विचारसरणींचा उदय हा त्या त्या व्यक्तींच्या सामाजिक संदर्भात झालेला असतो, म्हणून
विचारसरणींकडे पाहण्याची दृष्टीही आपल्याला लाभलेल्या सामाजिक पार्श्वभूमीवर घडत असते."1
आपले सामाजिक पर्यावरण आपल्या विचारसरणी निश्चित करत असतात. हे मॅनहाईमचे म्हणणे
लक्षात घेऊन आपण आजच्या समाजव्यवस्थेकडे पाहिले तर हा तिढा सुटण्यास मदत होते. आपल्या
अवती-भवतीची माणसं वेगवेगळा विचार मनात घेऊन वावरत असतात. कु णी हिंदू म्हणून अभिमान
बाळगणारा असतो, कु णी आंबेडकरवादी असतो तर कु णी डावा विचार घेऊन वावरत असतो. समाजात
अशा असंख्य विचारप्रणाली आहेत आणि त्या डोक्यात घेऊन असंख्य माणसे आपले व्यक्तिगत
आणि सार्वाजनिक आचरण करत असतात. सर्वसामान्य माणसाच्या मनात इथे काही प्रश्न निर्माण
होणे साहजिक आहेत. विचारसरणी कोठू न येतात? माणसे त्या डोक्यात का घेतात? आणि
विचारसरणी डोक्यात घेतल्याने माणसाचे कोणते भले होते?...असे ते प्रश्न आहेत.
विशिष्ट मूल्यांचा आग्रह, विशिष्ट श्रद्धांचा पुरस्कार हा माणसाला नेहमीच हवा हवासा वाटत
आलेला आहे. तो त्याच्या रोजच्या जगण्यात जीवनदृष्टी देतो आणि भोवतालच्या वास्तवाकडे
पाहण्याची व्यापक दृष्टीही देत असतो. या व्यवहारी आणि व्यापक अनुभवाची संवेदना त्याला बळ $$
$$$
देत असते. त्याचे जगणे अर्थपूर्ण करत असते. त्याने स्वीकारलेल्या विशिष्ट मूल्यांमुळे त्याच्या
जगण्याला काहीएक प्रयोजन आहे, असा विश्वास त्याला वाटत असतो. म्हणून तो विचारसरणी
स्वीकारतो. अर्थात, विचारसरणी स्वीकारणारा वर्ग हा काही खालचा वर्ग नसतो. तो शिकलेला, विचार
करणारा विशेषतः उच्चशिक्षित व अभिजात असा वर्ग असतो. मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग आणि
अभिजन अशा स्तरावर या विचारसरणीचे कार्य चालू असते. विचारसरणी माणसाला जगण्याचे
ध्येयस्वप्न देत असते. माणसाला बदल हवे असतात, हे बदल करण्याची क्षमता विचारसरणी
माणसाला देत असते. विचारसरणी नुसतेच दोष दाखविण्याचे काम करत नसते तर त्यावर इलाजही

24
सुचवते. माणसाला आपल्या भोवतालचे समाजवास्तव बदलण्याचा राजकीय कार्यक्रम विचारसरणी
देते, त्याला कृ तिप्रणव बनवते. त्यामुळे एकाच वेळी विचारसरणी माणसाला भौतिक वास्तवाचे भान
देते, त्याची बौद्धिक भूक भागवून त्याच्या कृ तीला ठोस असा कृ तिकार्यक्रम देत असते. माणसाच्या
समूहांना हलवण्याची जबरदस्त ताकद विचारसरणीत असते. मार्क्सवादाची जगाला विचार करायला
लावले, हिंदुत्वाच्या हाके ने भारत हलला, मूलतत्त्ववादी कारवायांनी जगाला हादरवले. समाजवाद,
कम्युनिझम या तत्त्वज्ञानांनी जगभरातल्या कामगार, श्रमिकांना एकत्र के ले. बाबासाहेबांच्या
विचारांनी समस्त दलितांना संघटित करून संघर्षासाठी सज्ज के ले. अशी कितीतरी उदाहरणे सांगता
येतील. परंतु विचारसरणी ही जर माणसाची गरज असेल तर ही ताकद त्याने विवेकशील व
समाताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी वापरायची की धर्मांध, जातीयवादी समाज निर्माण
करण्यासाठी वापरायची?, हा आजचा प्रश्न आहे.
राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. यशवंत सुमंत यांनी आपल्या हयातीत जे काही मूलभूत लेखन
के ले आहे, त्यात त्यांच्या दै. लोकमतमध्ये लिहिलेल्या- विचारसरणीचे आकलन या लेखमालेचा
आवर्जून उल्लेख के ला पाहिजे. या मालिके च्या शेवटच्या भागात डॉ. सुमंत यांनी जागतिकीकरणात
उभे असताना आपण या विचारसरणींकडे कसे पाहिले पाहिजे, याचे इशारे दिले आहेत. वेगवेगळ्या
विचारसरणींच्या अंतर्विरोधांनी भरलेल्या समाज वास्तवाचे नीट आकलन होण्यासाठी आपले
गोंधळलेले विचार व कर्मठता संपली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या विचार विश्वाला
आशय देणाऱ्या विविध विचारसरणींचा नीटसा परिचय करून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. सुमंत
यांनी के ली आहे.
या लेखमालेतील एक दीर्घ उतारा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा... "एक सुजाण
नागरिक म्हणून तसेच शिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, समाजकारण, उद्योग-व्यवसाय या विविध
क्षेत्रांत काम करणाऱ्या माणसांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, शोषणमुक्ती, सामाजिक
न्याय या वारंवार कानावर पडणाऱ्या संज्ञांचे नेमके पण, अर्थ व संदर्भ समजलेच पाहिजेत.
$$$$$
उदारमतवाद, राष्ट्रवाद, समाजवाद, भांडवलशाही, कॉन्झ्व्हेटिझम, आंतरराष्ट्रवाद, गांधीवाद
यासारख्या आधुनिक विचारधारा ची तसेच स्त्रीवाद, पर्यावरणवाद, बहुसांस्कृ तिकवाद यांसारख्या
समकालीन विचारधारांची ओळख असायलाच हवी, तरच आपण काय आहोत व आपला सामाजिक
व्यवहार कसा चालतो, हे कळू शके ल. आपल्या अवतीभवती चाललेल्या विविध सामाजिक
आंदोलनांचा अजेंडा काय आहे, ते कोणत्या वर्गाच्या हितसंबंधांना प्राधान्य देतात, त्यांची वैचारिक
ओळख काय आहे, याची किमान माहिती असणे हे आपल्या सुसंस्कृ तपणाचे लक्षण आहे, असे आपण
मानायला हवे. हे न झाल्यास आपल्याला कर्मठ धर्मवादी मंडळी सामाजिक नैतिकतेचे पाठ देऊ

25
लागतील व जातीवादी शक्ती इतिहास लिहू लागतील. तसे होऊ लागले तर आपल्यातल्या सुप्तरूपात
असलेल्या जात-धर्म वंशाच्या जाणिवा भस्मासुरासारख्या फोफावतील. यातून सुटका हवी असेल तर
सामाजिक स्थित्यंतराचे विवेकनिष्ट आकलन व्हायला हवे. त्यासाठी संकल्पनांच्या व विचारांच्या
विश्वात आपल्याला प्रवेश करावा लागेल तो आपल्या प्रबुद्ध होण्याचा, विवेकनिष्ठ होण्याचा आरंभ
असेल.”2 डॉ. यशवंत सुमंत यांचा हा उतारा देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या सामाजिक
पर्यावरण उभ्या असलेल्या अनेक विचारसरणींकडे आपण अत्यंत आंधळेपणाने पाहत असतो. कधी
एखाद्या विचारसरणीच्या आहारी जाऊन जग पेटवण्याची भाषा आपण करतो तर कधी एखाद्या
विचारसरणीकडे दुर्लक्ष करून आपण मोठी सांस्कृ तिक हानी करत असतो.
कोणतीही विचारसरणी विनाकारण जन्माला येत नसते. आपल्या जन्मातच काही कारणे
घेऊन ती जन्माला येत असते. भारताच्या बाबतीत फु ले-शाहू-आंबेडकरवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद
आणि इस्लाम या विचारसरणी विशेषः महत्त्वाच्या राहिल्या आहेत. मार्क्सवाद, समाजवाद आणि
भांडवलशाही या विचारसरणी जगासाठी क्रांतिदर्शी ठरल्या आहेत. तर काही विचारसरणी वर्ग, धर्म,
जात आणि संपत्ती या घटकांनी प्रभावित राहिल्या आहेत. परंतु अलीकडे राजकारण आणि
भांडवलशाहीने या विचारसरणी आपापल्या फायद्याकडे वळविल्याचे दिसते आहे. म्हणून
जागतिकीकरणात या विचारसरणींचे काय होईल?, असा प्रश्न आपल्या साऱ्यांच्याच मनात आहे.
कॉ. गोविंद पानसरे नेहमी सांगत की, "संघर्षातून नवी वस्तू वा नवा समाज तयार होतो. संघर्ष
ही बदलाची प्रेरक शक्ती असते. संघर्षाखेरीज बदल घडत नाही. प्रत्येक वस्तूत वा समाजात असलेल्या
परस्परविरोधी शक्तींच्या संघर्षातूनच विकास होतो. अनेकदा संघर्ष नको, समन्वय हवा' अशी भूमिका
मांडली जाते. समन्वयातून ऐक्य घडते. पण, संघर्षाशिवाय बदल घडत नाही. संघर्ष हा बदलाचा
आत्मा आहे.''3 दोन माणसांनी एकमेकांची डोकी फोडली म्हणजे बदल घडत नसतो. पण दोन
तत्त्वज्ञानांनी माणसांची डोकी भरली की विचारांचा संघर्ष होतो. हा संघर्ष मात्र जगाला बदलण्याची
ताकद ठे वतो.
$$$$$
विचारसरणीवर स्वार होऊन माणूस संघर्षासाठी उभा असतो; पण हा संघर्ष कशासाठी?
कु णाशी आणि कसा करायचा? हे समजले नाहीतर संघर्ष वांझोटा ठरतो. अशावेळी आपल्या भोवतालचं
राजकारण व्यक्तीला हव्या असलेल्या संघर्षाला राजकीय चेहरा देतं. मग राजकारणाला हवा असा
खोटा संघर्ष आपण स्वीकारतो आणि त्यालाच आपण मूलभूत संघर्ष म्हणतो. खरी गडबड इथे आहे.
उत्तम कांबळे यांनी याविषयी कार्यकर्त्यांना सुंदर दिशा दिलेली आहे. "आपल्यालाही एक सुंदर जीवन
असावं यासाठी बहुतेक माणसं संघर्ष करतात. या संघर्षात त्यांचा खलनायक कोणीही असू शकतो. जसे
की जातपात, विषमता, समाज, देव-धर्म, देश किं वा विश्वच... पण सुंदर जीवन म्हणजे काय हे

26
समजलं नाही तर काही वेळा संघर्ष वांझोटा ठरतो किं वा अकारण तो अखंड काळ चालतो. कशासाठी
संघर्ष, किती संघर्ष याचा विचार शहाणा माणूस अगोदरच करतो. कु त्र्याचे वाकडे शेपूट सरळ
करण्यासाठी वेडा संघर्ष करतो आणि गुरुत्वाकर्षणाची किं वा पृथ्वीची गती पकडण्याचा सिद्धान्त
मांडण्यासाठी शहाणा संघर्ष करतो. प्रत्येक संघर्ष काही शस्त्रांच्या बळावर, बळाच्या जोरावर चालत
नाही, तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती लागते. ती नसेल तर संघर्षात वापरलेली सगळी शस्त्रे निकामी
ठरतात. अगदी अणुबाँब ."4 माणसे संघर्ष करतात या संघर्षातून आपली संस्कृ ती उभी करत सुद्धा...
असतात. हा संघर्ष विधायक असेल तर त्यातून नवनिर्माण होते पण हा संघर्ष विघातक असेल तर
मानवी संस्कृ ती उद्ध्वस्त होते. निसर्ग आणि माणूस यातला संघर्ष अनंत काळापासून चालू आहे, पण
सध्या भारतात धर्मा-धर्मात चाललेला संघर्ष ही मोठी समस्या आहे. "भारतात चार-पाच हजार वर्ष
संघर्ष करून दलितांना मुख्य समाजात यावं लागलं. धर्मा-धर्मातील पंथांचा, उपपंथांचा संघर्ष आणखी
वेगळा... या संघर्षातून कॅ थलिक, प्रोटेस्टंट, शिया सुन्नी, सुफी, महायान-हीनयान आणि हिंदू धर्मात
असंख्य पंथ, जाती, गट-तट जन्माला आले आहेत. यातूनच पृथ्वी एक संघर्षभूमी झाली आहे.”5
संघर्षाबद्दल कॉ. पानसरे त्यांच्या भाषणात खूप रंजक उदाहरणे द्यायचे. संघर्षाचे अत्यंत सोपे
आणि सर्वसामान्य माणसाला कळेल असे विश्लेषण पानसरेंनी के ले आहे. "संघर्ष ही सतत निरंतर
चालू राहणारी गोष्ट आहे. जे संघर्षाला नकार देतात, ते बदलाला नकार देतात. बदलाला कोण नकार
देतं? अर्थातच, ज्यांचं बरं चाललं आहे ते नकार देतात. कारण त्यांना चालू व्यवस्था अशीच टिकावी
असं वाटत असतं.”6 कॉ. पानसरेंच्या म्हणण्यात मोठे तत्त्वज्ञान होते. तत्त्वज्ञान बंदुकीच्या
गोळीपेक्षाही शक्तीमान असतं. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंके श यांना
बंदुकीच्या गोळ्यांनी मारले; परंतु त्यांनी पेरलेले विचार संपले नाहीत. धर्मनिरपेक्ष व विवेकी समाज
उभा करण्यासाठी आपलं आयुष्यच युद्धभूमी करणाऱ्या या लढावू विचारवंतांचे मारेकरी भेटतीलही,
त्यांना शिक्षाही होईल पण त्यांच्या मारेकऱ्यांनी स्वीकारलेल्या विचारसरणींचे काय ?
$$$$$
आपल्या देशात मूलतत्त्ववाद अधिकाधिक विखारी होत चालला आहे... मग तो हिंदू असो वा
मुस्लिम असो. प्रत्येक धर्मात मूलत्त्ववाद वाढतो आहे. मुस्लिम मूलतत्त्ववाद जगाची डोके दुखी
असेल तरी अलिकडे हिंदू मूलतत्त्ववादही भारताची डोके दुखी बनत आहे. भारतातील प्रत्येक धर्म
थोड्या फार फरकाने धार्मिक मुलतत्त्वादाकडे निघाल्याचे चित्र आहे परंतु या साऱ्यांत अलिकडे
'हिंदुत्वाबद्दल' जी चर्चा होत आहे तिचा चिकित्सकपणे विचार करणे आजच्या घडीला महत्त्वाचे वाटते.
संघ आणि त्याचे हिंदुत्व हे आंबेडकरवादापुढील के वळ आजचे आव्हान आहे असे नाही परंतू ते जुनेच
असेल तरी आज सतत नव्या नव्या स्वरुपात पुढे येत आहे.

27
२ संघ आणि हिंदुत्व
'भारतीयता को नागरिकता है । हिंदुत्व राष्ट्रीयता है । अशा विचाराचा नारा देत १९२५ साली
विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डॉ. के शव बळीराम हेडगेवार, श्री. मा. स.
गोळवलकर यांनी संघाची धुरा सांभाळली. गोळवलकर गुरुजींनी वेळोवेळी जी भाषणे के ली व त्यात जे
विचार मांडले, ते एकत्र करून १९६६ सालात ‘बंच ऑफ थॉट्स' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या ग्रंथात
व्यक्त के लेल्या विचारधनाला संघाची मंडळी प्रमाण मानतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रूप उघडे करून संघाच्या विचारधनाची चिकित्सा करण्याचे
महत्त्वाचे काम डॉ. रावसाहेब कसबे यांनी १९७८ साली ‘झोत' या पुस्तकात के ले आहेच. या बहुचर्चित
पुस्तकाचे सहाव्या आवृत्तीला लिहिलेल्या प्रस्तावनेत रावसाहेब कसबे यांनी आज हिंदू-मुस्लिम
मूलतत्त्ववाद भारतीय समाजव्यवस्थेला किती विघातक वळणावर नेऊन उभा करत आहे. हे सूचित
के ले आहे. "हिंदू आणि मुस्लिम मूलतत्त्ववाद्याना आपल्या समाजव्यवस्था कितीही महान वाटत
असल्या तरी त्या आधुनिक जगात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कालबाह्य झालेल्या आहेत, याचे
भान त्यांना येत नाही. कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना 'आत्मपूजे'चा मानसिक रोग जडल्यामुळे,
जागतिक परिस्थिती झपाट्याने त्यांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे या दोघातही न्यूनगंड निर्माण झाला
आहे. भारत आणि पाकिस्तानला त्यांच्या अंतर्गत राज्यकारभारातील प्रत्येक गोष्ट अमेरिके ला
विचारून करावी लागत आहे. अमेरिका आणि तिचे वर्चस्व असलेली जागतिक बँक, त्यांचे
परावलंबित्व वाढत चालले आहे. त्यामुळे ते बेचैन असले तरी आपापला न्यूनगड लपविण्यासाठी ते
हिंदू आणि मुस्लिम निरपराध्यांवर अंदाधुंद गोळीबार करून आपली बहादुरी दाखवीत आहेत. हिंदूनी
मुसलमानाची किं वा मुसलमानांनी हिंदूची बेसावध निरपराध माणसे मारल्याने त्यांचे शौर्य सिद्ध होत
नाही. उलट ते किती भयग्रस्त आहेत हेच स्पष्ट होते. त्याचे शौर्य जागतिकीकरणाला ते कसे सामोरे
जातात यावरून समजणार आहे.”7 संघाच्या ध्येय धोरणांची बांधणी करणाऱ्या गोळवलकर गुरुजींची
$$$$$
भाषणे भाषा सौंदर्याचा उत्तम नमुना होती, त्यामुळे तरुण त्याच्याकडे आकर्षित होत.
गतइतिहासाकडे अभिनिवेशाने आकर्षित झालेल्या तरूणाना त्याच्या विचारातील तर्क निष्ठता
तपासण्याचे भान न आल्याने आपल्या अनेक चळवळींवर त्याचे दुष्परिणाम झाले, हेही रावसाहेबानी
नोंदविले आहे.
गोळवलकर गुरुजींच्या आज्ञेतून संघाची विचारसरणी निश्चित होत गेली त्यांनी सतत
वर्णभेदाचा, जातिभेदाचा स्वीकार के ला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन करत सांस्कृ तिक राष्ट्रवादाची
त्यांनी के लेली मांडणी म्हणजे हिंदू राष्ट्रवादाची पायाभरणीच होती. गोळवलकरांच्या दहा ईश्वरी आज्ञा
म्हणजे समतेच्या तत्वाला आणि विज्ञान दृष्टीला तिलांजली देण्याऱ्या आहेत. ल. स. कारखानीस

28
यांनी त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: कोणाचा कै वारी? कोणाचा वैरी? या पुस्तकात सुरूवातीलाच या
आज्ञा (टेन कमांडमेंटस्) देऊन वाचकाचे काम सोपे के ले आहे त्यातील काही आज्ञा पाहिल्यास राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ लोकशाहीधिष्ठित समाजाला कु ठे घेऊन चालला आहे, याची कल्पना येते. त्या आज्ञा
अशा आहेत.
"१ वंश शुद्ध ठे वण्यासाठी हिटलरचा धडा गिरवा !
२ ईश्वरनिर्मित श्रुती व स्मृती यांचा भाग असलेली वर्णव्यवस्था हा आपल्या धर्माचा पाया आहे.
त्याचे रक्षण झाले पाहिजे.
३ 'समता' नव्हे 'सरकार' आपल्या हिंदू व्यवस्थेचा पाया आहे. जगात समता कोठे ही नाही. येऊ
शकत नाही. आणण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल.
४ वर्ण हे कर्माप्रमाणेच ठरतात, पण कोणते कर्म ? पूर्वजन्माचे कर्म' !
५. समाजाची शक्ती व्हायची असेल तर एकच नेता असावा व त्याच्या आज्ञा पाळाव्यात.
६ खासगी संपत्ती हा पवित्र अधिकार आहे त्याचे रक्षण करा !
७. ज्यांना संपत्ती मिळवता येत नाही ते दरिद्री राहतात आणि लोभाने, स्वार्थाने व असूयेने
संपत्तीधारकाविरुद्ध झगडतात !
८ समाजसत्तावादाचा झगडा स्वार्थावर आधारलेला असतो.
९. स्त्री-पुरुष समानतेच्या बडबडीला हिंदू धर्मात स्थान नाही.
१० कष्टकऱ्यांनी (दलितानी) हे देवाचे काम आहे' असे मानून आपले काम करावे. फळाची अपेक्षा
करू नये.”8
गुरुजींच्या या आज्ञा पाहिल्यास सहज लक्षात येते की आरएसएसची भूमिका धर्मनिरपेक्ष
नाही. खर म्हणजे संघाचे हिंदुत्व ज्या तत्त्वावर उभे आहे ते तत्व माणसाच्या सामाजिक न्यायावर,
त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणणारे आहे. अर्थात, संघाची उभारणी जर मुस्लिमांच्या $
$$$$
विरोधासाठी झाली असेल तर या संघटनेकडू न समतेची अपेक्षा करणेही चुकीचे आहे. या दहा आज्ञावर
नजर टाकली तर आणखी काही धोकादायक बाबी पुढे येतात एकतर चातुर्वर्ण्यांचा पुरस्कार करणारी
माणसे दलितांच्या हक्कांचे रक्षण कसे करू शकतील? ते श्रमिकाच्या बाजूचे कसे असतील? शिवाय ते
स्त्रियांच्या हिताचा विचार कसा करतील? त्याचा ईश्वरनिर्मित साऱ्याच गोष्टींवर विश्वास असेल तर
विज्ञानवादाचे आणि लोकशाहीचे रक्षण कसे होईल? संघाने नेहमीच मुस्लिम, दलित, कम्युनिष्ट
आणि समाजवाद्याच्या विरोधी भूमिका घेतली आहे. खरे तर तेच त्यांचे बळ आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत योगदान आहे. १९२३ साली
हिंदू महासभेची स्थापना झाली १९२४ साली बॅ. सावरकराची तुरुं गातून सुटका झाली, त्यावेळी त्यांनी

29
'हिंदुत्वची मूलतत्त्वे (हिंदुत्व)’ हा ग्रंथ लिहिला अर्थात, हा ग्रंथ सावरकरानी महात्मा गांधी यांनी
खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर लिहिला असे बोलले जाते. याचा अर्थ
भारतातल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रयत्नांना प्रतिवाद करताना प्रत्युत्तर म्हणून सावरकर
हिंदुत्वाची ऐतिहासिक मांडणी करण्याचा प्रयत्न करत होते. या ग्रंथामुळे हिंदू महासभेला बळ मिळाले.
बँरिस्टर सावरकर, डॉ. मुंजे आणि हेडगेवार यांच्या सातत्याने होणाऱ्या विचार विनिमयातून १९२५
साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हिंदू महासभेला तरुणाची गरज भासली, यातून
संघाचा जन्म झाला असावा, असाही एक तर्क आहे. पुढे संघाच्या असख्य शाखा निर्माण झाल्या
खेड्यापाड्यापासून परदेशापर्यंत संघ वाढला. संघाने सतत अनेक जातीधर्माच्या माणसांना एकत्र
करून हिंदुत्वाचे सांस्कृ तिक राजकारण के ले. हिंदुत्व, हिंदुराष्ट्र व मुस्लिमद्वेष हा संघाच्या
राजकारणाचा पाया बनला या पार्श्वभूमीवर संघाने भारतीय जनसंघ, भारतीय जनता पक्ष, भारतीय
मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटना उभारल्या. याशिवाय विश्व हिंदू परिषद,
स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, संस्कृ त भारती, विद्याभारती,
एकल विद्यालय, विवेकानंद कें द्र याशिवाय परदेशातही हिंदू स्वयंसेवक संघ, हिंदू स्टु डंट्स कौंसिल,
सेवा इंटरनॅशनल इत्यादी शाखा संघाने विस्तारल्या आहेत.
भाजप हा संघाचा राजकीय चेहरा आहे. संघ के वळ मुस्लिम विरोधावर उभे असलेले संघटन
आहे, असे मानून संघाचा खरा चेहरा दिसत नाही. राजकारणात गांधी हे मुस्लिमांचे लाड करत होते
असे सांगून हिंदू मुस्लिमांमध्ये मोठी दरी निर्माण करण्याचे काम जसे संघाने के ले तसेच फॅ सिस्ट
प्रवृत्तीने भारताची राजकीय सत्ता हस्तगत करणे हा अजेंडाही संघाचा होता, असेही अभ्यासकांनी
नोंदविले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकीय पक्ष बनला नाही हे खरे असले तरी त्याने आपला चेहरा
सतत राजकीय दबावगटाचा ठे वला आहे. संघाने आपली मुळे आता खोलवर रोवली आहेत. २०१४ च्या
$$$$$
लोकसभेच्या निवडणूकीत संघ आपल्या राजकीय खेळीत यशस्वी झाला, याची कारणमीमांसा करणे
आता क्रमप्राप्त आहे. एकतर जातश्रेष्ठत्व आणि वर्गश्रेष्ठत्व टिकण्यासाठी संघाने जे प्रयत्न के ले ते
या ठिकाणी कामी आले. वर्णश्रेष्ठत्वाची ही भूमीका संघाने सावरकरांच्या विचारातून घेतली हे उघड
आहे. अर्थात, सावरकरांचे हिंदुत्व हे के वळ तर्कावर आधारित होते. ‘हिंदू' या शब्दाच्या उत्पत्तीचे तर्क
त्यांनी ओढू न ताणून जुळविलेले दिसतात. 'हिंदू एक राष्ट्र आहे' हाही सावरकरांचा आवडता सिद्धान्त
होता. "हिंदुस्थानात जन्म पावलेला नि या भूमीत मिसळून गेलेला जो धर्म आहे तोच हिंदू धर्म असू
शके ल"9 सावरकरांनी हिंदुत्वाची के लेली ही व्याख्या आणि संघाने त्यानुसार के लेली कृ ती, या दोन्ही
गोष्टींची संगती लावली तर लक्षात येते की या देशातील ख्रिस्ती, मुस्लिम, ज्यू या धर्माच्या

30
धर्मसंस्थापकांचा जन्म हिंदुस्थानच्या बाहेर असल्याने हिंदुस्थान त्यांची जन्मभूमी आणि पुण्यभूमीही
होत नाही, म्हणून या धर्मांना दूर लोटू न बौद्ध, जैन, शीख इत्यादी धर्मांचा हिंदुधर्माच्या छताखाली
आणण्याचे प्रयत्न सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा भाग होते.
१९२४ सालची परिस्थिती पाहता सावरकरांनी हिंदुत्वावर ग्रंथ लिहून असा विचार करणे ही
त्यावेळची राजकीय गरज होती, असे रावसाहेब कसबे यांनी म्हटले आहे. "हिंदुत्वाची मूलतत्वे हा सारा
ग्रंथच हिंदुत्वापासून अहिंदूंना आणि विशेषतः मुस्लिमांना दूर ढकलण्याच्या उद्देशाने लिहिलेला ग्रंथ
आहे. याचबरोबर भारतातील सर्व वैदिक - अवैदिक धर्म हे "हिंदुधर्माचे' अविभाज्य अंग आहेत आणि
म्हणून ते सर्व हिंदुत्वाच्या कक्षेत येतात, असा उपदेशही या ग्रंथात आहे."10 इथे एक गोष्ट आपल्या
सहज लक्षात येते की, सावरकरांचे विचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्दिष्टे आणि भाजपचे राजकीय
निर्णय या गोष्टी एकाच मार्गावरून चाललेले दिसत आहेत. म्हणून की हा मार्ग विकासाचे,
लोकशाहीच्या रक्षणाचे, धर्मनिरपेक्षतेचे कितीही नारे देत असला तरी तो त्या दृष्टीने कृ ती मात्र करू
शकत नाही. अलिकडे भाजप सरकारने घेतलेले निर्णय, सर संघचालकांची विधाने आणि संघाची मूळ
उद्दिष्टे याची संगती लावणारी काही उदाहरणे पाहिली की ही गोष्ट अधिक स्पष्टपणे लक्षात येते.
१९९२ साली लालकृ ष्ण आडवाणी यांच्या पुढाकाराने 'रथयात्रा' काढण्यात आली, 'मंदिर वही
बनायेंगे’ अशा घोषणांनी जसे जसे राजकारण तापले तसे तसे हिंदु-मुस्लिम संबंधही ताणले. शेवटी ६
डिसेंबर १९९२ साली हिंदुत्ववादी संघटनांनी (कारसेवक) अयोध्येतील बाबरी मशिदीचा विवादित ढाचा
उद्ध्वस्त के ला. या घटनेने संपूर्ण भारतात धार्मिक कलह तयार के ला. सर्वसामान्य माणसाच्या मनात
ज्वालांनी भरलेली धर्मज्योत पेटवली गेली. माणसं एकमेकांच्या विरोधी उभी राहिली. पुढे या धर्मिक
राजकारणाने हिंसक रूप धारण के ले, हेही भारताने अनुभवले.
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. यात २५७ निरपराध माणसे मारली
गेली व ७१३ गंभीर जखमी झाले. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि याकु ब मेमन यांचा यात हात $
$$$$
होता, हेही आपण वाचले. यातील पकडलेल्या याकु बला ३० जुलै २०१५ रोजी फाशी देण्यात आली.
याकु बच्या फाशीचा मीडियात सर्वत्र मोठा गवगवा करण्यात आला. याचे महत्त्वाचे कारण असेही
बोलले गेले की, यातून भाजपला हिंदू-मुस्लिम द्वेष अधिक वाढवायचा होता. त्यानंतर मुंबईतच ६
डिसेंबर २००२, २७ जुलै २००३, ११ जुलै २००६ अशी बॉम्बस्फोटांची मालिका सुरू झाली. मुंबईत २६
नोव्हेंबर २०११ रोजी अतिरेक्यांनी के लेला हल्ला तर संपूर्ण भारताला हादरा देणारा होता. यात १७२
निरपराध माणसांचा बळी गेला आणि पोलीस खात्यातल्या काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आपले
प्राण गमवावे लागले. तसेच २०१० मध्ये पुण्यातील जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रोडवरील
बॉम्बस्फोट हे हिंदू-मुस्लिम द्वेषाचे ताजे उदाहरण आहे. याशिवाय जम्मू- काश्मिर, पंजाब, नवी

31
दिल्ली, उत्तर प्रदेश व देशाच्या विविध भागांत दहशतवादी हल्ले होत आहेत. मुस्लिम दहशतवादाचा
हा काळा इतिहास आहे. गोध्रा हत्याकांड व त्याचे पडसाद, मालेगाव बाँबस्फोट (२००६, २००८) ही
उदाहरणेही आपण अनुभवली आहेतच. देशाला हादरवणारी, सर्वसामान्य माणसांचा जीव घेणारी ही
विध्वंसक कृ त्ये म्हणजे धर्मांधतेचा विखारी चेहरा आहे. या प्रातिनिधिक उदाहरणांवरून आपल्या
लक्षात येईल की, मुस्लिम दहशतवाद हा जशी जगाची चिंता बनला आहे तसा हिंदू मूलतत्त्ववादही
भारताची चिंता बनत आहे. या दोघांनाही आपल्याच धर्माची हुकू मत दाखवायची आहे. जी माणसे या
धर्माच्या धार्मिक दहशतीच्या आड येतात त्यांना संपविण्याचे काम या मूलतत्त्ववाद्यानी के ले आहे. हे
दोन्ही मूलत्त्ववादी आपल्या देशातल्या सार्वभौम लोकशाही, समतेच्या विचाराला,
धर्मनिरक्षपेक्षतेच्या तत्त्वाला, राज्यघटनेतील मानवी मूल्यांना कु ठे घेऊन जातील याचा विचार
प्रागतिक माणसांनी के ला नाही तर या देशातली समतेची चळवळ नामशेष होईल, अशी आजची
सांस्कृ तिक परिस्थिती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये
मुंबईतील विश्व हिंदू परिषदेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या समारंभ प्रसंगी संघाचे जुने उद्दिष्ट
नव्याने पुढे आणले आहे. या भाषणात भागवत म्हणाले, "पुढच्या पाच वर्षांत आपल्याला देशातील सर्व
हिंदू एकत्र आणण्याचे प्रयत्न करायचे आहेत, सर्व हिंदूंच्या पिण्याच्या पाण्याचे, प्रार्थनेचे आणि मृत्यूचे
ठिकाण एकच असेल असे प्रयत्न के ले पाहिजेत” . 'एक भाषा, एक देवता, एक संप्रदाय बनाना होगा'
11

असे सांगत मोहन भागवत यांनी गाझियाबादच्या सभेतही "भारत हे हिंदू राष्ट्र आहे.”12 हे सांगितले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशपातळीवर ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्यांच्यावर नजर
टाकली तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेला अजेंडा कसा अमलात आणत आहे,
याची सहजपणे कल्पना येते.
मोदी सरकारने के लेल्या घोषणा म्हणजे पुन्हा वर्गांतर्गत समाजव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या
$$$$$
आहेत. 'घरवापसी', 'अच्छे दिन', 'मन की बात', योगशिक्षण', 'संस्कृ त भाषेचे पुनरुज्जीवन,
'सावरकरांचे प्रेम', शिक्षणाचे भगवेकरण' या साऱ्या युक्त्या म्हणजे या देशात धर्मव्यवस्था बळकट
करून जातिव्यवस्था घट्ट करणे आहे. भारताला धार्मिक गुलामीत नेण्यासारखे आहे.
आपण एकदा या गुलामीत होतो; पण आता एका नव्या भांडवली गुलामीतही जात आहोत.
नवी भांडवली व्यवस्था आपल्या राजकीय चारित्र्याचे बाहुले करेल, धर्मांध शक्तीशी मैत्री करून
सामान्य माणसाचा श्वास कोंडू न नवा सांस्कृ तिक संघर्ष उभा करेल. या नव्या सांस्कृ तिक संघर्षाची
पाऊलं आपल्याला वेळीच ओळखता आली नाहीत तर पुरोगामी प्रवाहातल्या विचारी माणसांच्या रोज
हत्या होत राहतील. व्यक्तीला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देणं हे समाजाचे ध्येय आहे आणि समाजाची

32
व्यवस्था अबाधित राखणं ही व्यक्तीची जबाबदारी आहे. या दिशेनं जाणं म्हणजे मानवी प्रगतीच्या
दिशेनं जाणं आहे. भारतात आत्मभानाची चर्चा नेहमीच अध्यात्माशी जोडली गेल्याने आपल्या
अभिव्यक्ती स्थळांचे नियंत्रण एका अदृश्य श्रद्धेच्या हातात गेले. याचे परिणाम आज आपण अनुभवतो
आहोत. धर्मव्यवस्था जेव्हा राजकारणाला नियंत्रित करते तेव्हा ती व्यक्तीच्या आत्मभानाऐवजी
त्याच्या पारलौकिक अदृश्य स्वार्थाला महत्त्व देत असते. या इहवादाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याला
मिटवायचे असते. हे महासंकट परतवण्यासाठी प्रागतिक चळवळींना एकत्र येऊन समाजाला
बुद्धिवादाकडे नेणे जरुरीचे आहे त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिकाधिक संविधानजागृती
करणे महत्त्वाचे आहे; परंतु संविधानालाच उलट्या दिशेने नेण्यासाठी जे राजकारण उभे राहत आहे,
त्या स्थितीवादी राजकारणाचे बळी अनेक पुरोगामी लेखक-विचारवंतही पडलेले आहेत. पण अंधाराला
घाबरून प्रकाशाकडे जाता येणार नाही, हेही तितके च खरे आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच 'अत्तदिप'
व्हावे लागेल.
गेल्या काही वर्षांपासून भारताच्या रस्त्या-रस्त्यांवर असहिष्णुता वाढत आहे. राम रहिम,
आसाराम बापू, राधे मां यांच्या रूपाने ही असहिष्णुता आपण अनुभवली. माणसांच्या मेंदूंचे
सपाटीकरण करून त्यांना विवेकशून्य बनवण्याचे अनेक धार्मिक, राजकीय अडे जागोजागि उभे राहत
आहेत. त्या अडड्यांवर प्रहार करण्याचे सांविधानिक हत्यार प्रत्येक माणसाच्या हातात आहे. स्वातंत्र्य,
समता, बंधुता, न्याय आणि मतदानाचा विवेकी हक्क, ही हत्यारे विवेकाने वापरली नाहीत तर
आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा रोज मृत्यू होत राहील.
भारतीय लोकशाहीला उद्ध्वस्त करणारे हात आकाशातून आलेले नाहीत, तेही इथल्याच
मातीत जन्मले आहेत. पण या विघातक हातात आता शस्त्रे आली आहेत. ही शस्त्रे निकामी
करण्यासाठी आपल्या हातात नवी शस्त्रे घेण्याची नक्कीच गरज नाही, के वळ आपण आहोत तेथेच
राहून निर्भयपणे व्यक्त होण्याची गरज आहे. भारतातल्या सामान्य माणसाच्या हातात या $$$$$
धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णू भारताचे सांस्कृ तिक भविष्य उभे आहे. लेखक-कलावंतांसाठी भारतीय
समाजवास्तव अधिकाधिक काटेरी होत आहे. धार्मिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षेने अभिव्यक्तीच्या
मृत्यू ठिकाणांवर अधिराज्य गाजवले की सांस्कृ तिक अभिव्यक्तिचा अटळ आहे. आज जगभर
सांस्कृ तिक साम्राज्यवाद आपले डोके वर काढतो आहे; परंतु भारतात मात्र सांस्कृ तिक
साम्राज्यवादाच्या जोडीला धार्मिक आणि राजकीय उन्मादही वाढला आहे. धर्मांध राजकारणाला हव्या
असलेल्या तथाकथित संस्कृ तिरक्षकांचा हा उन्मादी सांस्कृ तिक दहशतवाद अधिक वाढणार नाही,
यासाठी प्रत्येकाने सजग रहायला हवे.

३. संघाचे धर्मांध राजकारण

33
धार्मिक अभिनिवेश मग तो कोणताही असो, तो उदार असू शकत नाही. या अर्थाने भारतातील
हिंदू आणि मुस्लिमही उदारमतवादी नाहीत. ‘हिंदू' ही संकल्पना अलीकडे बरीच स्फोटक बनली आहे.
हिंदू धर्म, हिंदू आचरण, हिंदू अस्मिता या गोष्टी टोकदार करून हिंदू आणि हिंदुस्थान कसे अद्वैत
आहे, हे पटवण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. हिंदू आणि हिंदुत्वाबद्दल मोठी चर्चा भारतीय स्तरावर
होत आहे. प्रत्येक जण आपापल्या सोयीच्या राजकीय हिंदुत्वाची मांडणी करण्यात मशगूल झालेला
दिसतो आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचित के ल्याप्रमाणे भारतात हिंदू हे एक नाहीत. वैदिक परंपरा
मानणारे हिंदू आणि वेदोक्त परंपरा मानणारे हिंदू यात फरक आहे. "...भारतीय इतिहासातील
अभूतपूर्व घटना दि. २७ जानेवारी १९१९ रोजी साऊथबरो कमिटीपुढे साक्ष देताना आंबेडकरांकडू न
घडली. भारतात के वळ हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन आणि ज्यू एवढे पाचच समुदाय नाहीत; तर
हिंदूंत 'सवर्ण हिंदू' आणि 'अस्पृश्य हिंदू' असे दोन स्वतंत्र, भिन्न समुदाय अस्तित्वात असल्यामुळे
त्यांची संख्या पाचाऐवजी सहा आहे, असे आंबेडकरांनी साऊथबरो कमिटिला सांगितलं."13 डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथबरो कमिशनपुढे दिलेल्या माहितीचा तार्कि कपणे विचार के ला तर आज
भारतीय राजकारणात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा संदर्भ लावता येतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१९ साली साऊथबरो कमिशनला दिलेल्या साक्षीत
म्हटल्याप्रमाणे भारतातील ‘सवर्ण हिंदू' आणि 'अपृश्य हिंदू' असे दोन स्वतंत्र, भिन्न समुदाय
अस्तित्वात असल्यामुळे हिंदुत्वाच्या राजकारणात अनेक गडबडी झाल्या आहेत. हिंदू धर्माबद्दल
बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वपरिचित आहेत. त्यांनी हिंदू धर्माचे कधीही उदात्तीकरण के ले नाही.
उलट त्याची चिकित्सा करत बाबासाहेब धर्मांतराच्या निर्णयावर आले. त्यांनी लाहोरच्या जात-पात
तोडक मंडळाच्या वार्षिक परिषदेसाठी तयार के लेल्या भाषणात (जातिप्रथेचे विध्वंसन या $$$$$
पुस्तकात) हिंदू धर्माबद्दल स्पष्टपणे म्हटले आहे की, "हिंदू समाज हा मिथ् आहे ही गोष्ट पहिली व
अग्रगण्य गोष्ट असल्याचे मानले पाहिजे. हिंदू हे नावच खुद्द परकीय नाव आहे. ते मुसलमानांनी
एतद्देशीयांना त्यांच्यापासून स्वतःला वेगळे दर्शविण्यासाठी दिले होते. मुसलमानी आक्रमणाच्या आधी
कोणत्याही संस्कृ त ग्रंथामध्ये ते दिसून येत नाही. हिंदू कधी सामूहिक नावाची आवश्यकताच भासली
नाही. कारण त्यांनी त्यांचा एक समाज स्थापन के ला आहे, याची त्यांना कल्पनाच नव्हती. वास्तविक
हिंदू समाज अशी गोष्टच अस्तित्वात नाही. तो के वळ जातींचा एक संग्रह आहे. "14 जातिव्यवस्थेच्या
बळकटीसाठी हिंदू धर्मातील अनेक जातींनी काम के ले. विशेषतः ब्राह्मण जातीला इथला समाज
वर्णव्यवस्थेत विभागलेलाच रहावा असे वाटत होते. जातिव्यवस्था मोडली तर देश मोडेल' असे
ब्राह्मणी धर्मरक्षकांचे मत होते. म्हणून जातीव्यवस्था टिकवण्यासाठी इतर जातींना त्यांनी सतत
प्रभावित के ले. कधी धर्माच्या नावाने, कधी देवाच्या नावाने तर कधी कर्मकांडाच्या नावाने इतर

34
जातींनी बंड न करता जातिव्यवस्था टिकवावी, असे एक सांस्कृ तिक जनमत उभे करण्यात इथली
ब्राह्मणी व्यवस्था यशस्वी झाली.
ब्राह्मणांनी स्वतःला सतत श्रेष्ठ मानले हे सर्वश्रुत आहेच. ब्राह्मण कितीही गरीब, अज्ञानी
असला तरी तो सर्वश्रेष्ठ असतो, असे मानणारी एक सांस्कृ तिक दहशत इथल्या कर्मठ बाह्मणांनी उभी
के ली. त्यामुळे हिंदू धर्मातल्याच पण इतर जातींना ब्राह्मणांनी सतत दूर ठे वले. खरे तर एकमेकांत
झुंजत ठे वले असे म्हणायला हरकत नाही. या संदर्भात डॉ. आंबेडकरांचे म्हणणे अधिक महत्त्वाचे
वाटते, "रानटी लोकांना सुसंस्कृ त करणे, या मानवहिताच्या कार्यासाठी हिंदूंनी कोणतेही प्रयत्न के ले
नाहीत. उलट उच्चजातीय हिंदूंनी हिंदू धर्माच्या परिघात असलेल्या खालच्या जातींना उच्च जातींच्या
सांस्कृ तिक पातळीपर्यंत वर येण्यास हेतूपरस्पर अडथळा के ला.”15 यासाठी डॉ. आंबेडकरांनी सोनार
आणि पाठारे प्रभू या दोन जातींची समर्पक उदाहरणे देऊन ब्राह्मणांना असेच वाटते हे पटवून दिले
आहे. जातींचे वर्चस्व अबाधित ठे वण्यासाठी ब्राह्मणांनी धर्माचा विस्तार के ला, धर्माचरणात, रूढी,
परंपरा आणि विधीकार्यात, भारतीय समाजाला सतत गुंतवून ठे वले. त्यांनी आपले ब्राह्मण्य अधिक
बळकट के ले. या ब्राह्मण्याच्या कचाट्यात सर्वच ब्राह्मण अडकले असे नाही. काही नक्कीच अपवाद
आहेत. ज्यांना जातश्रेष्ठत्वाच्या आणि धर्माचरणाच्या जंजाळात अडकायचे नव्हते अशा उच्चवर्णीय
माणसांनी प्रागतिक विचारसरणीचा अवलंब करण्याचा मार्ग स्वीकारला. या प्रागतिक मंडळींनी
आपल्या परंपरेतील ब्राह्मण्याला नाकारले धर्म, जात आणि जातश्रेष्ठत्व डोक्यातून काढू न उलट
कर्मठ ब्राह्मण्याला प्रखर विरोध करत ही माणसं धर्मनिरपेक्ष मानवतावाद रुजवण्यात अग्रेसर झाली.
प्रागतिक प्रवाहांनी या सर्वांचे स्वागत करायला हवे. ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यातील फरक लक्षात
घेऊन विरोधाचे ठिकाण ठरवायला हवे. जातीअंतासाठी सामान्यांना $$$$$
व्यक्तिद्वेषाच्या पलीकडे जावून आध्यात्मिक फॅ सिस्टवृत्तीवर रस्त्यावर नव्हे तर विचारांनी हल्ला
करायला हवा.

४. राजकीय हिंसाचाराचे ऑनलाईन ट्रोलिंग


२०१४ च्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला. भाजपचा झेंडा फडकवत नरेंद्र मोदी पंतप्रधान
झाले. या साऱ्यात विशेष लक्षवेधी ठरले ते मोदींचे मीडिया कॅ म्पेनिंग 'अच्छे दिन आने वाले हैं' असं
म्हणत टिव्हीवर झळकणाऱ्या जाहिराती अनेकांचे लक्ष वेधून घेत होत्या. त्यावेळी जवळ जवळ सर्वच
प्रसारमाध्यमे जणू भाजपने विकत घेतली आहेत, अशी शंका यावी अशी परिस्थिती होती.
वर्तमानपत्रांच्या पानभर जाहिराती, निवडणूक काळात टिव्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर सातत्याने
असणाऱ्या जाहिराती, या साऱ्यात आकाशवाणी आणि इतर प्रसारमाध्यमांचा अत्यंत खुबीने भाजपने
वापर के ला. खरे तर हा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी के ला असे म्हटले पाहिजे. या काळात वर्तमानपत्र,

35
दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमांवर मोदींनी वर्चस्व प्रस्थापित के लेच; परंतु यापेक्षाही अधिक
वर्चस्व त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून प्रवाहित होणाऱ्या माध्यमांवर प्रस्थापित के लेले दिसते. टीटर,
फे सबुक, व्हॉट्सअॅप, ईमेल यासारख्या समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून जनमत तयार
करता येते, हे गेल्या चार वर्षांत मोदींच्या करिष्म्याने दाखवून दिले आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र
मोदींच्या सुपरफास्ट कारकिर्दीत माध्यमांचा वाटा मोठा आहे, हे कु णालाही नाकारता येणार नाही.
मोदींचे फोटो, कपडे, परदेश दौरे, भाषणे, त्यांच्या सामान्य माणसांच्या असामान्य भेटी, त्यांचे धाडसी
निर्णय आणि त्या निर्णयांच्या सकारात्मक बाजू सांगणाऱ्या गोष्टी प्रसार माध्यमांवर मोठ्या खुबीने
पेरल्या गेल्या जनधन योजना, गोहत्याबंदी, नोटबंदी, जीएसटी यांसारखे मोदींनी घेतलेले निर्णय
सगळ्यांसाठीच धक्का देणारे होते. परदेशात आणि देशात साठवलेला काळा पैसा भारतात परत
आणता येईल, असे चित्र नोटबंदीच्या मागे रेखाटले गेले. अर्थात ते कितपत खरे हा मुद्दा वेगळा आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे जे उलट-सुलट परिणाम भारताच्या
जनमानसावर झालेले दिसतात. या काळात माध्यमांच्या बाबतीत लक्षात येतील असे बदल झालेले
दिसतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या अगोदर जी माध्यमे कडव्या धर्मांधतेच्या विरोधी बोलत
होती, ती माध्यमे अचानक धर्मांधतेच्या बाजूची झाली. माध्यमात ज्या ज्या पत्रकारांनी अशा धर्मांध
असहिष्णूतेच्या विरोधी आवाज उठवण्याचा प्रयत्न के लेल्या पत्रकारांना एकतर नोकऱ्या गमवाव्या
लागल्या किं वा धमक्यांना बळी पडावे लागले. वरिष्ठ पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी याविषयी
'आयअॅम अ ट्रोल’ हे बहुचर्चित पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप
आणि आरएसएस हे आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर $$$$$
करून आपली हुकू मत कशी प्रस्थापित करतात, याविषयी पुराव्यानिशी माहिती दिली आहे.
ट्रीटर, फे सबुक, व्हॉटस्अॅप, ब्लॉग यासारख्या प्रसारमाध्यमांचा खुबीने वापर करून
आपल्याला हवे तसे जनमत तयार करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आपल्या पदरी काही विशेष
माणसे बाळगली आहेत. ही माणसे माध्यमांची जाणकार आहेत. ती त्या त्या माध्यमांचा चतुराईने
वापर करून विशिष्ट विचारांचा सातत्याने प्रसार करतात. या विचारांमध्ये आडवे येणाऱ्यांची आई-माई
काढतात. त्यांना ऑनलाईन धमकावतात. हे राजकीय ट्रोलिंग म्हणजे सोयीच्या असत्याचा प्रसार
आणि प्रचार करण्याचे तंत्र आहे, असे ही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
या पुस्तकात चतुर्वेदींनी फार रहस्यमय माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अरविंद
गुप्ता हे भाजपच्या नॅशनल डिजिटल ऑपरेशन सेंटरचे (NDOC) प्रमुख आहेत आणि अंकित लाल हे
दिल्लीत सत्तेवर आलेल्या 'आप' पक्षाचे डिजिटल प्रमुख आहेत. आपल्या पदरी काही खास माणसे
बाळगून ही मंडळी डिजिटल माध्यमांवर आपापली विचारसरणी पेरत असतात. अत्यंत सूत्रबद्ध आणि
शिस्तबद्ध पद्धतीने हे ऑनलाईन ट्रोलिंगचे कामकाज चालू असते. पत्रकार चतुर्वेदी यांना मुलाखत

36
दिलेल्या उद्योजिका साध्वी खोसला यांनी दिलेल्या माहितीवरून स्वाती चतुर्वेदी लिहितात, "२०१४
च्या निवडणुकीत, गुप्तांनी देशातील सर्वांत मोठी सोशल मीडियावरची मोहीम चालवली होती. एकट्या
दिल्लीतच त्यांच्याकडे २०० माणसे होती. काही पगारी, काही स्वयंसेवक. त्यांच्या खाण्याजेवणाचे,
राहण्याचे आणि प्रवासाचे खर्च भाजपकडू न भागवली जात. खोसलांसारख्या काहींनी कसलेच पैसे
घेतले नाहीत. अभ्यासासाठी सबॅटिकल रजा काढावी तशा पद्धतीने ते कामे करीत होते. पगार 'टेकीज्'
(तंत्रज्ञ) पूर्ण वेळ काम करायला अशोक मार्गावरच्या कार्यालयात रोज येत असत आणि ९ ते ५ या
वेळात काम करून जात असत. स्वयंसेवकांची भरती वाढवण्याचा प्रयत्न म्हणून दररोज प्रचाराचेही
काम सुरू होते. गुरुग्राममधील इमारतींमधून भाजपचे सोशल मीडियाचे लोक फिरत. त्यांच्याकडे
सर्वांची माहिती (डाटा) असे. नंतर गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोदा या शहरांमधूनही याच प्रकारे
स्वयंसेवकांची भरती झाली. २००० लोक नेमले होते.
या पगारी नोकरांना किं वा स्वयंसेवकांना रोज प्रसिद्ध पत्रकारांची एक हिटलिस्ट देण्यात येत
असे. त्यांच्यावर सातत्याने हल्ले के ले जात असत. यात एनडीटीव्ही बरखा दत्त, तेव्हा सीएनएन
आयबीएन मध्ये असलेले राजदीप सरदेसाई यांचा समावेश होता. मोदीजींची कोणीही कु ठे ही निंदा
के ली तर गुप्तांचे शोधयंत्र कामाला लागे. कोण बोललं ते कळाल्यावर तरसांच्या कळपासारखा
ट्रोल्सचा कळप त्याच्यावर तुटू न पडत असे.16
स्वाती चतुर्वेदी यांनी सांगितलेल्या अनेक धक्कादायक घटना जाणून घेतल्या की धर्मांध
राजकारण आणि त्याचे पाठीराखे कशा पद्धतीने ऑनलाईन हुकू मत उभी करतात याची कल्पना येते. $
$$$$
हे दोन हजार स्वयंसेवक संघाचे आहेत, काही पगारदार आहेत, काही नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत तर
काही भाजप सरकारचे समर्थक आहेत. संघ, सरकार आणि हिंदुत्वाच्या विरोधी ज्यांनी ज्यांनी आवाज
उठवला त्यांच्याविरोधी या ट्रोल्सनी ज्या पद्धतीने हल्ला के ला तो पहाता हा ऑनलाईन हिंसाचार
कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. या ट्रोल्सला पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात. अगदी वेळ
काढू न ते या ऑनलाईन माध्यमांचा वापर करतात. "पंतप्रधान मोदी अशा प्रकारे शिवीगाळ करणाऱ्या
ट्रीटर हॅन्डल्सना फॉलो करतात. याचा परिणाम झिरपताना दिसू लागला आहे."17 भाजपचा सोशल
मीडिया कक्ष त्यांच्या दिल्लीतील '११, अशोक मार्ग' येथील कार्यालयात आहे. पंतप्रधान मोदींचे आणि
पक्षाचे यश सातत्याने लोकांपुढे वाजतगाजत ठे वणे हे त्यांचे अधिकृ त काम आहे. पण या कक्षाचे प्रमुख
अरविंद गुप्ता व्यक्तिशः ट्रीटरवरच्या ट्रोल्सच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देतात. यात
गुप्तांचा शब्द अंतिम असतो त्याने एकदा व्हॉटस्अॅप मेसेज पाठवला की तो कोणतेही प्रश्न न
विचारता पुढे चालवायचा असे. त्याला आव्हान देण्याचा प्रश्नच नाही, कारण गुप्ताला त्याचा अधिकार
थेट मोदींनीच बहाल के लेला होता, असे सांगून या पुस्तकात स्वाती चतुर्वेदी यांनी मोदींचे टीकाकार

37
अरुण शौरींची मुलाखत घेतली आहे. मोदी या ट्रोल्सला फॉलो करतात याविषयी एका मुलाखतीत शौरी
म्हणतात, "यांना फॉलो करून मोदी स्पष्ट संदेश देत आहेत. मी यांना फॉलो करतो आहे. तुम्ही त्यांना
फॉलो करता आहात याचाच अर्थ तुम्ही त्यांना उत्तेजन देत आहात. यानंतर मी ऐकलं, की त्यांनी
त्यांच्यासाठी स्वागत समारंभही ठे वला होता. पंतप्रधानांच्या अधिकृ त निवासस्थानी या लोकांना
बोलावलं. मग या सगळ्या लोकांनी उत्साहात त्यांचे पंतप्रधानांबरोबरचे फोटो टाकले. मग मी ऐकतोय
की यातल्या एकाला भाजप आयटी कक्षाचा प्रमुख बनवलं गेलं. म्हणजे अगदी सरळ आहे हे सारे
पक्षकार्यच आहे आता. संपूर्ण देशाचा आवाज बंद करण्यासाठी जे अनेक मार्ग सध्या आहेत त्यापैकी हा
एक.”18
अरुण शौरी यांनी सूचित के लेल्या गोष्टीचा प्रत्यय पत्रकार गौरी लंके श यांच्या हत्येनंतर
आला. लंके श यांच्याविषयी बदनामीकारक ट्रीट करणाऱ्या दहियाचे फॉलोअर मोदी आहेत, हेही उघड
दिसले. याविषयी पत्रकार रविश कु मार यांनी उठवलेला आवाज दडपण्यासाठी त्यांनाही धमक्या
आल्याच्या बातम्या आहेत.
सोशल मीडिया ही नवी युद्धभूमी आहे. या युद्धभूमीचा वापर आपल्या सत्तेच्या विस्तारासाठी
कसा करायचा, हे राजकीय लोकांना चांगलेच माहीत आहे, त्यांच्या दृष्टीने सोशल मीडिया हे के वळ वेड
नसून गरज बनली आहे. ते अत्यंत खुबीने या माध्यमांचा वापर करतात. या युद्धभूमीवर राजकीय
लढाई लढणारे सध्याचे सत्ताधीश एकमेव योद्धे आहेत असे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाने आता
ऑनलाईन ट्रोलर पदरी बाळगण्याची सोय के ली आहे. या शर्यतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत पुढे $$$
$$
आहेत, हे मात्र नाकारता येत नाही.
२०१५ च्या बिहारमधील निवडणुकीच्या तोंडावर भाजपने गायींसंबंधी एक जाहिरात दिली
होती. ती सरळ सरळ भडकावू होती. निवडणूक आयोगाने ती जाहिरात रद्द करायला लावली.
काश्मिरमध्ये बुऱ्हाण वाणीच्या हत्येनंतर 'गीतीका' या नावाने ट्रीटरवर जे अकाऊं ट आहे त्यावरून
वाणीच्या अंतयात्रेचे फोटो टाकले होते. यावर फोटोसह लिहिलेला मजकू र असा होता "या
दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत वीस हजार लोक सहभागी झाले. त्यांच्यावर बाँब टाकायला हवा होता
आणि वीस हजार डु करांना कायमची आझादी द्यायला हवी होती.”19 या अकाउं टचे ऐंशी हजार
फॉलोअर्स आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा आहेत. दुसरी घटना म्हणजे चित्रपट अभिनेता
आमिर खानने त्याच्या पत्नीला 'भारतात मुलं वाढवणं असुरक्षित वाटतं, अशा आशयाचे विधान के ले.
त्यानंतर लगेच आमिर खानला सोशल मीडियात शिव्या देण्याची मोहीम चालू झाली. पर्यटन
मंत्रालयाने त्याचे Incredible India या मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडरपद रद्द के ले. शिवाय त्याच्या
विरोधी चाललेल्या या मोहिमेमुळे त्याला स्नॅपडील च्या जाहिरातीचा करार रद्द करावा लागला.

38
गांधी कु टुंबियांबद्दल सतत अपप्रचार पसरवणे, सोनिया गांधी कशा हिंदुद्वेषी आहेत, राहुल
गांधी कसे बाळबोध आहेत, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वद्रा यांचे कसे पटत नाही, मुसलमान हे कसे
वाईट आहेत. ते बीफ खातात म्हणून ते कसे अविचारी आहेत. ई-कॉमर्समधल्या पौराणिक पात्रांना
घेऊन जाहिरात करणाऱ्या मिन्ट्रा कं पनीवर सातत्याने हॅशटॅग सुरू करणे, अभिनेत्री गुल पनाग आम
आदमी पार्टीची सदस्य झाल्यानंतर तिचे अर्धनग्न व विकृ त फोटोशॉप सोशल मीडियात व्हायरल
करणे. यासारख्या अनेक गोष्टी भाजप आणि संघ पुरस्कृ त ट्रोल्स करत असतात. असेही चतुर्वेदी
यांनी मांडले आहे.
१३ जुलै २०१७ च्या लोकसत्ता दैनिकात 'देशद्रोही कोण?' हे संपादकीय वाचले की भाजप
पुरस्कृ त मीडिया प्रकरण अधिक उजेडात येते. अशा अनेक बातम्या किं वा सोशल मीडियावरील पोस्ट
सांगता येतील की ज्या हिंदुत्ववादी शक्तींना बळ देणाऱ्या आहेत. भाजपसाठी जनमत तयार
करणाऱ्या आहेत. आरएसएसची विचारसरणी पुन्हा रुजवणाऱ्या आहेत. ज्यांना संपूर्ण समाजाचे
दैवतीकरण करायचं आहे. माणसांना सत्तेचा धाक दाखवून आपल्याच मुठीत ठे वायचं आहे. समता,
स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, जातिअंत यासारख्या शब्दांची आणि त्या
शब्दांतून ध्वनीत होणाऱ्या अर्थाची हिंदुत्ववादी राजकीय सत्ताधीशांना अॅलर्जी आहे.
लोकसत्तेतील या लेखात म्हटले आहे, "नोबल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या
विषयीच्या माहितीपटात वापरण्यात आलेल्या 'गाय', गुजरात', 'हिंदुत्व', 'हिंदुत्ववादी शक्तींचा
भारतीय दृष्टिकोन' या शब्दांना सेन्सॉर बोर्डाने घेतलेला आक्षेप म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता $
$$$$
पक्षाला अभिप्रेत असलेल्या हिंदुराष्ट्रातील राजवटीची छोटीशी झलकच म्हणावी लागेल. बिचारी गाय
हिंदुत्वाच्या कचाट्यात सापडली असून, कथित गोरक्षकांकडू न सध्या होत असलेला हिंसाचार हा या
राजकारणाचा एक भाग आहे. त्यामुळे सेन यांच्या माहितीपटात गाय आणि तिच्याशी जोडले गेलेले
हिंदुत्ववादी राजकारण यांचा उहापोह असेल, तर तो त्यांना खटकणारच. गुजरात तर हिंदुत्ववाद्यांचे
प्रयोगशाळा समजले जाते. गुजरात दंगलींना मागे सारून तेथील विकासाचे प्रारूप पुढे आणण्यात
मोदींना यश आले असले तरी कोणतीही सुजाण व्यक्ती या दंगलीतील नरसंहार विसरू शकणार नाही.
त्यामुळेच गुजरातच्या दंगलीशी संबंधित उल्लेखही हिंदुत्ववाद्यांना खटकत असतो.”20
सोशल मीडियावर संघाची पकड अधिक आहे हे खरे आहे; पण याची दुसरी बाजूही विचारात
घेतली पाहिजे. महाराष्ट्रात जेव्हा मराठा क्रांती मोर्चे निघत होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे
नाव घेऊन जातीचे संघटन करणाऱ्या अनेक पोस्ट फे सबुक, ट्विटर आणि व्हॉटस्अॅपवर फिरत
होत्या. याशिवाय आंबेडकर जयंतीच्या काळात महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेही अनेक
गडद निळ्या पोस्ट फिरताना नेहमी दिसतात. अर्थात, या पोस्ट फिरवणारे ट्रोलर आहेत असे नाही.

39
पण त्या त्या विचारसरणीच्या भक्तांकडू न असे जातीय संघटनाचे काम के ले जाते. जातींनी
चिरफाळलेल्या भारतात सोशल मीडियावरून फिरणाऱ्या भडकावू माहितीने कितीतरी जणांचे बळी
गेले आहेत, जातीय दंगली झाल्या आहेत, हिंसाचार, अफवा पसरल्या आहेत. अशा वेळी शहाण्या
माणसांनी सोशल मीडियाचा वापर स्वतःच्या आणि समाजाच्या भल्यासाठी के ला नाही तर
ऑनलाईन हिंसाचार वाढू न माणसामाणसांत प्रत्यक्ष लढाया जुंपायला वेळ लागणार नाही. भिमा
कोरेगाव प्रकरणातील हिंसाचारात हा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे.
आता एनडी टिव्हीवरील ही बातमी पहा... पश्चिम बंगाल मधील दंगल हे त्यातील एक ताजे
प्रकरण. या प्रकरणामध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश असून त्यातील काही भाजपचे
प्रतिष्ठित नेते आहेत. त्यातील एकाला पश्चिम बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक
के ली. हा नेता म्हणजे भाजपच्या असनसोल जिल्हा माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख. देशातील
जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचे आयटी सेल असून समाजमाध्यमांतून पक्षप्रचार करणे,
टीकाकारांचा समाचार घेणे हे त्यांचे एक महत्त्वाचे काम असल्याचे सांगण्यात येते. पुढे या
अन्वयार्थात असेही लिहिले आहे की, “हिंदू स्त्रियांवर कसे अत्याचार होत आहेत हे दाखविण्यासाठी
एका भोजपुरी चित्रपटातील दृश्य समाजमाध्यमांतून पसरविण्यापासून गुजरात दंगलीची जुनी चित्रेही
पश्चिम बंगालमधील असल्याचे भासविण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. ज्या मुलाने फे सबुकवर
वादग्रस्त चित्र टाकले होते त्याच्या आई-बापाचे रक्तबंबाळ अवस्थेतील छायाचित्रही अनेकांनी
व्हॉटस्अॅपवरून पसरविले. ते अर्थातच खोटे होते. त्या मुलाची आई त्याच्या लहानपणीच वारली
होती $$$$$
आणि ते छायाचित्र २०१६ सालचे आणि बंगालदेशातील होते. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी तर
कहरच के ला. गुजरात दंगलीतील छायाचित्र पश्चिम बंगालमधील म्हणून पसरविले. त्याचे सत्य
उघडकीस आल्यानंतरही त्यांनी ना ते हटविले ना त्याबद्दल खेद व्यक्त के ला."21
सोशल मीडियाच्या या अतिरेकी प्रचारामुळे भविष्यात नेमके काय होईल? अशी भिती
अनेकांना वाटते आहे. धर्मप्रचाराची जातश्रेष्ठत्वाची आणि राजकीय फायद्यासाठी जनमत तयार
करणारी नागरी युद्धे जर या नव्या आधुनिक माध्यमांवर लढली जात असतील, तर माणसांचे मेंदू
विचारांनी नव्हे तर कु ट कारस्थानांनी भरले जातील.
भाजपचा सोशल मीडिया कक्ष दिवसेंदिवस आधिकाधिक आक्रमक, शिवराळ आणि नार्सिस्ट
बनत चालला आहे. भारत के वळ हिंदुराष्ट्र आहे असे समजून मुस्लिमद्वेष पसरवण्यात ही मंडळी
कमालीची यशस्वी होताना दिसतात. अर्थात, धर्मांध माणसांच्या हातात सत्ता आल्यानंतर ते या
सत्तेला आपला चेहरा देतील हे उघड आहे. त्यांनी तो द्यावा यात गैर नाही पण के वळ धर्मसंसद मोठी
करण्यासाठी राजसंसदेत झपाट्यानं बदल करणे ही गोष्ट सत्तेचा अतिरेकी वापर करण्यासारखा

40
आहे. जे नागरिक आपल्या मताविरोधी आवाज उठवतात, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ही मंडळी
झुंडीने पुढे येताना दिसतात. खाणे, पिणे, धर्म, हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, लेखन, भाषण, कश्मिर
प्रश्न, अयोध्या, गोमांस बंदी, नोटबंदी, जीएसटी अशा अनेक प्रश्नांची जी मंडळी विरोधी बाजू
मांडण्याचा प्रयत्न करतात त्यांना लक्ष करून हल्ले करण्याची, त्यांना त्रास देण्याची दंडेल मोहीम ही
मंडळी उभी करतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेव्हा
येणाऱ्या काळात रस्त्यावरच्या आणि स्क्रीनवरच्या दोन्ही लढाया अधिक आक्रमक आणि विध्वंसक
होणार नाहीत, याचे प्रत्येकाने भान ठे वणे महत्त्वाचे आहे.

५. धर्मांधसत्ता @ गुजरात फाईल्स


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा आतला चेहरा कसा आहे, हे
सांगणारे सनसनाटी व बहुचर्चित पुस्तक पत्रकार राणा अय्यूब यांनी लिहिले आहे. हे पुस्तक
वाचल्यानंतर, गुजरातमध्ये २००२ मध्ये ज्या जातीय दंगली झाल्या, त्या दंगली भडकवण्यामध्ये
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, तत्कालीन गृहराज्य मंत्री अमित शहा, आरएसएस, बजरंग दल ही
सारीच मंडळी कशी जबाबदार आहेत, याचे स्टींग ऑपरेशन पत्रकार राणा अय्यूब यांनी मोठ्या
धाडसाने के ले आहे. मैथिली त्यागी हे नवे नाव घेऊन चित्रपटाच्या निर्मितीसाठी अमेरिके तून
गुजरातमध्ये आलेली एक फिल्मकार अशी नवी ओळख घेऊन राणा अय्यूब गुजरातमध्ये जवळ
जवळ तीन महिने राहिल्या. या काळात गुजरातमधील सर्व मोठ्या पोलीस अधिकारी, मंत्री, $$$$$
राजकारणी, यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन गुजरात दंगल आणि त्यानंतर मुसलमानांच्या झालेल्या क्रू र
हत्या या सर्व गोष्टींचे २०१० मध्ये स्टींग ऑपरेशन या पुस्तकात के ले आहे.
गुजरात भूमी अहिंसेचा वारसा सांगणारी आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेची
क्रांतिकारी पाऊले या भूमीत टाकली होती. याच भूमीत धर्मा धर्मात जे अमानुष कलह झाले, याविषयी
तहलका पत्रिके च्या वरिष्ठ पत्रकार असलेल्या राणा अय्यूब यांनी 'गुजरात फाइल्स या पुस्तकात जी
माहिती दिली आहे, ती आश्चर्यचकित करणारी आहे. गोध्रा हत्याकांडाचे पडसाद संपूर्ण गुजरातमध्ये
आगीसारखे पसरले. २००२ मध्ये गुजरातमध्ये 'गुलबर्ग सोसायटी', 'नरोदा पाटिया हत्याकांड', 'इशरत
जहाँ एनकाउन्टर', आणि 'सोहराबुद्दीन हत्या' या अमानुष घटना घडल्या. त्या घटनांच्यामागे
गुजरातमधील राजकारण कसे सामील होते याचे अनेक पुरावे या पुस्तकात अय्यूब यांनी दिले आहेत.
सोहराबुद्दीन हत्याकांडाला प्रोत्साहन देऊन जातीय दंगली भडकवल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित
शहा यांना काही काळ कै दही झाली होती, अशीही माहिती या पुस्तकात आहे.
गुजरातमध्ये २००२ साली हिंदू-मुस्लिमांमध्ये ज्या दंगली झाल्या त्यांना रोखण्यासाठी ज्या
पोलीस अधिकाऱ्यांनी काम के ले त्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करण्याचे काम

41
तत्कालीन राजकीय नेत्यांनी के ले. ही दंगल थांबवू नये, त्यासाठी हिंदूंना मुसलमानांविरुद्ध जो राग
व्यक्त करायचा आहे त्यांना मोकळीक द्यावी असेच गुजरातमधल्या सत्ताधारी राजकारण्यांना वाटत
होते, असेही अय्यूब यांनी लिहिले आहे. "२००२ के दंगो पर एसआईटी रिपोर्ट का एक प्रमुख बिंदु यह
भी था कि नरेंद्र मोदी सरकार ने उन पुलिस अधिकारियों को किस तरह सताया जिन्होंने २००२ दंगों के
दौरान हिंसा रोकने की कोशिश की, यहाँ तक कि दंगों के खत्म हो जाने के बाद भी उन्हें किसीन किसी
प्रकार तंग किया जाना जारी रहा था।"22 गुजरात मधील तत्कालीन पोलीस अधीक्षक जी. एल. सिंघल,
एटीएस प्रमुख राजन प्रियदर्शी, पोलीस अधीक्षक उषा राडा, अशोक नारायण अशा अनेक बडया
अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन गुजरातमधील धुमस ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न राणा अय्यूब
करताना दिसतात. तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी
यांच्याशीही मुलाखत झाल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.
गुजरातमध्ये विकासाचा झगमगता चेहरा दिसत असला तरी तिथे दलितांना आणि
मुस्लिमांना किती अमानुष वागणूक दिली जाते याचे अनेक पुरावे या पुस्तकात आहेत. आर. एस.
एस., विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप आणि तत्कालीन नेते हे सारेच गुजरातमध्ये दंगे
भडकवण्यासाठी कसे जबाबदार होते, याचे अनेक पुरावे राणा अय्यूब देतात. विश्व हिंदू परिषदेचे
प्रचारक प्रवीण तोगडिया यांचे एक भडकावू भाषण अय्यूब यांनी यूट्यूब डॉट कॉमचा दाखला देऊन
दिले आहे. त्यांनी लिहिले आहे...
$$$$$
"२००२ के गुजरात दंगे और उसके बाद के घटनाक्रम मे प्रवीण तोगडिया ने हिंदुओं को
भडकाया था और विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ता बेलगाम घूम रहे थे । गुजरात में दिए अपने एक
भाषण में तोगडिया ने कहा था-
'गोधरा स्टेशन पर आतंक फै लाया गया क्योंकि यह देश गांधी का अनुसरण करता है । हमने
२८ फरवरी को गांधी को ताले में बंद कर दिया था। (मुसलमानों) अपने आप को सुधार लो नहीं तो हम
गांधी को हमेशा के लिए भूल जाएंगे । जब तक हम गांधी निती का अनुसरण करते रहेंगे, जब तक
हम मुसलमानों के सामने घुटने टेकना जारी रखेंगे तब तक आतंकवाद को खत्म नही किया जा
सकता है । मेरे भाईयों हमे गांधीको खारिज करना होगा । आप रामायण जानते है न, यह वास्तव में
गोधरा घटना के लिए प्रासंगिक है। फालिया सिग्नल पर सुबह ७.४५ बजे एस-६ डिब्बे में लगी आग
हनुमान जी की पुंछ में लगी आग के समान थी।“
23

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हिंदूंचा पालनकर्ता म्हणून जी प्रतिमा झाली आहे त्यामागे
गुजरात दंगलीचा आणि त्यात मा. नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मुसलमान विरोधी
घेतलेल्या भूमिके चा परिणाम आहे असा निष्कर्ष या पुस्तकात काढला आहे. हे पुस्तक वाचून पत्रकार

42
राणा अय्यूब यांच्या शोधपत्रकारितेवर विश्वास ठे वला किं वा नाही ठे वला तरीही सर्वसामान्य
माणसाच्या मनात काही मूलभूत प्रश्न शिल्लक राहतात. पत्रकार रविश कु मार, राजदीप सरदेसाई,
बरखा दत्त, जयदेव डोळे, निखिल वागळे, राणा अय्यूब यांच्यासारख्या अनेक पत्रकार लेखक व
विचारवंतांनी आजच्या धर्मांध राजकारणाला जे प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे दिल्याशिवाय
भारतीय लोकशाहीला 'अच्छे दिन' येणार नाही हेही तितके च खरे आहे.

६. राष्ट्रवाद आणि संघाची चाल


'राष्ट्रवाद' हे आंबेडकरवादापुढील महत्त्वाचे आव्हान आहे. जागतिकीकरणात अस्मितांचा
टोकदारपणा अधिक वाढतो आहे राष्ट्रवाद ही जगाच्या पाठीवर अनेक देशांची डोके दुखी बनत आहे.
खरे तर जगभरातील लोकांच्या अस्मिता टोकदार बनल्या आहेत. धर्म, पंथ, जात, वर्ण, भूप्रदेश, भाषा
यांसारख्या अनेक गोष्टींनी आपल्या राष्ट्रवादाच्या कल्पना अधिक ठळक के ल्या आहेत. 'राष्ट्र
म्हणजे काय?' हे आपल्याला जाणवत असते, पण त्याचे आकलन झालेले नसते. राष्ट्रासंबंधी अनेक
प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेले असतात. राष्ट्राबद्दल प्रेम प्रत्येक माणसाच्या मनात असते.
स्वातंत्र्यदिन किं वा प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी आपल्या मनात राष्ट्राबद्दल अधिक प्रेमाची भावना
तयार होते. वेगवेगळ्या ठिकाणचे ध्वजसंचलन पाहून ही भावना अधिक घट्ट होते. लाल किल्ल्यावरून
होणारे पंतप्रधानांचे भाषण, शिस्तबद्ध परेड, संचलन, कवायती, वंदे मातरचे सूर, तिरंगा झेंडा, $$$$$
युद्धकाळ शहिदांचे स्मरण, देशभक्तीपर गाणी, क्रिके ट मॅच अशा अनेक गोष्टींमुळे आपली
राष्ट्राबद्दलची अस्मिता जागृत होत असते. राष्ट्र ही संकल्पना भौगोलिकदृष्टया दिसणारी असते
तशीच ती कल्पित असते. बऱ्याच वेळा राष्ट्राची एक कल्पना करावी लागते. दररोज शाळेत प्रतिज्ञा
म्हणणाऱ्या लहान मुलाला कधी तरी नक्कीच प्रश्न पडतो की, भारत माझा देश आहे; पण सारे
भारतीय माझे बांधव कसे? कारण यातल्या अनेकांना मी पाहिलेले नाही, त्यांना मी ओळखत नाही
आणि शिवाय ते माझ्या जाती-धर्माचेही नाहीत. म्हणून बंधुत्वाची व्यवहारी बाजू बाजूला ठे वून
बंधुत्वाची एक काल्पनिक कल्पना उभी करावी लागते. या अर्थाने राष्ट्रवाद ही संकल्पना जशी
वास्तवावर उभी आहे, तशीच ती कल्पनेवरही उभी असते.
राष्ट्राच्या कल्पनेत 'लोक' आणि 'राज्य' या संज्ञेला अधिक महत्त्व आहे. समान भाषा, समान
भूमी, समान आर्थिक जीवनपद्धती व एकीची मानसिकता असा ऐतिहासिकदृष्ट्या उत्क्रांत झालेला व
स्थिर सांस्कृ तिक समाज म्हणजे राष्ट्र अशी स्टॅलिनने व्याख्या के ली आहे. स्टॅलिनच्या व्याख्येचे
सोपे भाषांतर कॉ. शरद पाटील यांनी के ले आहे. त्यांच्या मते "भौगोलिकता, भाषिकता, सांस्कृ तिक,
राजकीयता आर्थिकता यांची ‘एकमयता’ निर्माण झाल्यानंतर आधुनिक राष्ट्र तयार होते.”24 अनेक
विद्वांनानी राष्ट्र आणि राष्ट्रवादाच्या व्याख्या के ल्या आहेत. भौतिक निकषांच्या आधारे अस्तित्वात

43
येते असे मानणारा एक गट आहे, तर याउलट राष्ट्रवाद वस्तुनिष्ठ नसून आत्मनिष्ठ आहे असे
मानणारा दुसरा अभ्यासकांचा गटही निर्माण होण्यासाठी वंश, जात, भाषा आणि भूमी यातील
एकात्मता जशी आवश्यक आहे तशी लोकांची इच्छाही महत्त्वाची आहे. राष्ट्रवादात सामूहिक जाणीव
महत्त्वाची आहे असे मानणारेही अभ्यासक आहेत. 'राष्ट्र अगोदर की राष्ट्रवाद ही भावना अगोदर',
यावर अनेक अभ्यासकांत मतभेद आहेत. कु णाला वाटते भूप्रदेश, भाषा, वंश यांच्या एकसंघतेच्या
रूपाने लोक एकत्र येऊन अगोदर राष्ट्राची निर्मिती झाली, मग राष्ट्रवाद ही भावना निर्माण झाली.
याउलट काहींना असे वाटते की आपण वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत, आपला वंश, धर्म, भाषा, संस्कृ ती
सारेच काही इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहे. आपला इतिहास, भूप्रदेश, एकू णच आपले सांस्कृ तिक
आचरण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे यासारख्या टोकदार अस्मितेच्या भावनेतून अगोदर राष्ट्रवाद सामूहिक
आविष्काराचा जन्म झाला आणि त्यानंतर राष्ट्राची निर्मिती झाली असेही काही विचारवंतांनी म्हटले
आहे.
या चर्चेनंतर आपल्यासमोर काही मूलभूत प्रश्न उभे राहतात म्हणजे भारत राष्ट्र आहे का?
असेल तर राष्ट्रनिर्मितीच्या भौतिक निकषांचे काय? भाषा, वंश, संस्कृ ती आणि भूप्रदेश यापैकी
बहुतांशी गोष्टींची एकसंघता नसताना भारत राष्ट्र कसे होईल? भारत जातींनी चिरफाळलेला देश
आहे. अनेक धर्म आणि पंथांनी भारतीय भूमीवर डोके वर काढले आहे. शिवाय विभिन्न भाषा आणि $
$$$$
विभिन्न परस्परविरोधी संस्कृ ती नटलेल्या भारताला राष्ट्र कसे म्हणता येईल? मग भारतीय
राष्ट्रवाद आत्मिक पातळीवर उभा आहे का? देशाबद्दल प्रेम असणं ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची आहे.
पण हे प्रेम के वळ भावनिक संवेदनेच्या पातळीवर उभे कसे चालेल? अशा भावनेतून राष्ट्रीय अस्मिता
जन्म घेते. या अस्मितेचा प्रवास कसा होतो याविषयी डॉ. सुधाकर देशमुख यांनी त्यांच्या 'राष्ट्र आणि
राष्ट्रवाद' या संशोधनात मूलभूत मांडणी के ली आहे. जात, वंश, वर्ण इत्यादी समूहमनाच्या
अस्मितांपैकी राष्ट्र एक अस्मिता आहे. कोणत्याही समुहात राहणारा माणुस त्याची एक वर्गवारी
करत असतो. आपल्याला कोणत्या ना कोणत्या समूहाशी जोडत असतो. मग हा काळ्यांचा समूह, हा
गोऱ्यांचा समूह, हा गुलामांचा समूह, हा श्रीमंतांचा समूह, हा गरिबांचा समूह, हा आदिवासी, भटके व
अस्पृश्यांचा समूह अशा अनेक पद्धतीने समाजातील लोक आपापली वर्गवारी करत असतात. ही
वर्गवारी राष्ट्रासंबंधीच्या सामाजिक अस्मितेच्या सिद्धान्ताचा पाया आहे, असे देशमुख यांना वाटते.
आपण जसे म्हणतो की, मी भारतीय आहे, मी मराठा आहे, मी क्षत्रीय आहे, मी दलित आहे.
समूहाची अशा पद्धतीने के लेली वर्गवारी म्हणजेच आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही राष्ट्रवादी
जाणीव रुजवण्याची पहिली पायरी आहे. यात व्यक्तीला त्याच्या समाजाचे जसे आत्मभान असते,
तसेच तो इतरांपेक्षा वेगळा आहे याचेही भान माझे अस्तित्व, अस्मिता टिकवण्यासाठी मी जे

44
सामूहिक आचरण करतो यातून राष्ट्रवाद या कल्पनेचा जन्म झाला असावा. मी भारतीय आहे, असं
म्हणत असताना भारतीय असण्याच्या अनेक चांगल्या गोष्टी मी सांगत असतो. माझी संस्कृ ती,
माझी भाषा, माझी भूमी या गोष्टींचा प्रचंड अभिमान बाळगत हे श्रेष्ठत्व आपण सांगत असतो. या
श्रेष्ठत्वाबरोबरच हे गुणधर्म दुसऱ्या राष्ट्राकडे कसे नाहीत हेही आपण सांगत असतो. म्हणून राष्ट्रवाद
या संकल्पनेत एका बाजूला अभिमान असला तरी दुसऱ्या बाजूला इतर द्वेष, तुच्छता आणि धिक्कार
असतो. या अर्थाने राष्ट्रवाद हे दुधारी शस्त्र आहे. "या संदर्भात आंबेडकर म्हणतात राष्ट्रीयत्व ही एक
सामाजिक ऐक्यभावना आहे, राष्ट्रातील लोकांना वाटते की आपण सर्व परस्परांचे नातलग आहोत,
राष्ट्रीयत्व ही दुधारी भावना आहे. समान राष्ट्रीयत्व असलेल्यांविषयी ती आपुलकीची भावना निर्माण
करते, तर इतरांविषयी शत्रुत्वाची भावना उत्पन्न करते. राष्ट्रीयत्वाची भावना त्या लोकांना एका
बाजूने एवढी घट्ट बांधून ठे वते की, त्यांच्यातील आर्थिक संघर्ष किं वा सामाजिक विषमता अशा
गोष्टींवरही ती मात करते. दुसऱ्या बाजूने त्यांना इतरांपासून तोडते.”25
राष्ट्रवाद ही सुंदर कल्पना आहे. ती आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करते. ती राष्ट्रीय
अस्मितेची बांधणी करते, ही अस्मिता सातत्याने जागृत करण्याचे काम समाजातील बुद्धिवंत करत
असतात. वाङ्मय, काव्य, इतिहास, स्फू र्तिगीते या साधनांचा उपयोग राष्ट्रीय जाणीव जागृत
करण्यासाठी बुद्धिवंत करत असतात. याशिवाय राष्ट्रीय अस्मितेचे रक्षण करण्याचे काम $$$$$
राज्यसत्तेकडे असते. अर्थात, राजसत्तेला कोणता राष्ट्रवाद पेरायचा आहे, हा प्रश्न राजसत्तेच्या
राजकीय महत्त्वाकांक्षेवर अवलंबून असतो. मग सरकार जर सेक्युलर असेल तर तो मानवतावाद
रुजविण्यासाठी प्रयत्न करील आणि सरकार जर धर्मांध असेल तर ते धार्मिक राष्ट्रवादाचा योजना
करील.
भारताच्या बाबतीत मानवतावादी राष्ट्रवाद रुजवण्यात अनेक समस्या आहेत. विशेषतः जात,
धर्म, भाषा आणि परंपरांमध्ये भिन्नता असलेल्या भारतात हा आदर्श राष्ट्रवाद रुजवण्यात अनेक
अडथळे आहेत. याविषयी डॉ. सुधाकर देशमुख यांनी अभ्यासपूर्ण मांडणी के ली आहे.
"आपल्यासारख्या बहुभाषिक देशाचे प्रश्न अनेक स्वरूपाचे आहेत. एकभाषिक राज्यांची निर्मिती
आपण के ली. हे योग्यच झाले. पण अशा भाषिकांच्या सीमा निसर्गसिद्ध असू शकत नाहीत. त्यातून
सीमावादासारखे तंटे सुरू होतात. आपल्याकडेही राष्ट्रभाषा हिंदी, प्रत्येक प्रांताची राज्यभाषा निराळी,
शिवाय इंग्रजी अशा तीन भाषा मुलांना शिकवाव्या लागतात. शिक्षणाचे माध्यम कोणते असावे
याबद्दलही एकमत झाल्याचे दिसत नाही. मातृभाषेतून शिक्षण हे तत्व वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असले
तरी वरच्या वर्गाचे लोक इंग्रजी माध्यम स्वीकारत आहेत. त्यातून संघर्षाची बीजे पेरली जात आहेत.
मुसलमान लोक उर्दू भाषा वापरतात. त्या भाषेचा उपयोग किं वा विकास किं वा अव्हेर हा इस्लाम
धर्मीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनतो. भाषा हे राजकारणाचे साधन बनते. एकभाषिक राज्यातील

45
भिन्न भाषिकांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले, तर अनेक गोष्टी सोप्या होतील! पण तसे
होताना दिसत नाही. उलट वेगळेपणाची आणि खास हक्काची भाषा वापरली जाते."26
हे झाले भाषेच्या बाबतीत; पण राष्ट्रनिर्मितीत इतिहासलेखनाचा वाटाही फार महत्त्वाचा
असतो. राष्ट्रीयत्व म्हणजे वेगळेपणाची जशी जाणीव असते तशीच ती वेगळेपणा दाखवणाऱ्या
एकत्वाची सुद्धा जाणीव असते. इतिहासलेखनाने गतकालीन वर्तमान, भूत आणि भविष्य या तिन्ही
काळात एकत्वाची जाणीव करून देणे महत्त्वाचे असते. परंतु राष्ट्रीय अस्मितेचा इतिहास लिहिताना
राष्ट्र ज्या समूहाचे आहे त्या समूहाच्या मताप्रमाणे इतिहास लिहिला जातो, त्यामुळे तो इतिहास खरा
असेलच असे म्हणता येणार नाही. म्हणूनच आपल्याकडे नेहरू आणि सावरकरांनी मांडलेल्या
भारताच्या इतिहासाची मांडणी परस्परविरोधी ठरते. राष्ट्रवादी इतिहासकार इतिहासातल्या
महापुरुषांभोवती आपल्या सोयीने मिथके उभे करतात. उदाहरणार्थ- छत्रपती शिवाजी महाराजांभोवती
कल्याणच्या सुभेदाराचे मिथक उभे करून आपल्याला हवा राष्ट्रवादी उभा करता येतो. बाबासाहेबांच्या
मृत्यू भोवती त्यांचा ब्राह्मण पत्नीने के लेला घात, असे मिथक तयार के ले की सोयीचे राजकारण उभे
राहते, हे राष्ट्रवादी इतिहासकारांना चांगलेच ठाऊक असते. तुकाराम, चक्रधर यांच्या मृत्यूच्या

$$$$$
कहाण्याही धर्माचरणाच्या नावाखाली काल्पनिक करून टाकायच्या, कधी पुष्पक विमान तर कधी
उत्तरायन गमन म्हणायचे. अशा मिथकांमुळे सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करायची आणि
त्याच्या मनात राजसत्तेला हवा असलेला राष्ट्रवाद उभा करायचा, हेही राजकारण पुढे येत आहे.
भाषा, इतिहास यानंतर राष्ट्रवादावर प्रभाव करणारी गोष्ट म्हणजे संस्कृ ती. खरे तर संस्कृ ती
या संज्ञेचा अत्यंत सोयीचा अर्थ सध्या वापरला जात आहे. दुसऱ्या समाजावर सत्ता मिळवायची
असेल, त्याला आपल्या हुकु मावर नाचवायचे असेल, तर त्याच्यावर सांस्कृ तिक वर्चस्व मिळवायचे.
मग हे सांस्कृ तिक वर्चस्व कधी धर्माच्या, कधी जातीच्या तर कधी राष्ट्रवादाच्या नावाने मिळवायचे.
नुसत्या शस्त्रांनी सत्ता मिळवण्याऐवजी सांस्कृ तिक वर्चस्वातून सत्तावाद उभा करता येतो, हे
भारतातल्या ब्राह्मणी वर्चस्ववादी विचारसरणीला चांगलेच ठाऊक आहे. म्हणून तर गायीच्या
पोटातील तेहतीस कोटी देव-देवतांचे उदात्तीकरण करून तथाकथित गोरक्षक धूमाकु ळ घालताना
दिसतात. 'इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहेना होगा।' अशा घोषणा संसदेत व रस्त्यावरही
दिल्या जातात. 'भारत हे हिंदु राष्ट्र आहे' असे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. या साऱ्यातून धर्माचे रक्षण
म्हणजे संस्कृ तीचे रक्षण असा एक आक्रमक हिंदुराष्ट्रवाद पून्हा उभा राहत आहे.
संस्कृ ती आणि संघ याचे नाते बघण्यासारखे आहे. हिंदुत्व ही धार्मिक संकल्पना असल्याचा
हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे. हिंदुत्व म्हणजे जीवनपद्धती आहे, असे संघाचे म्हणणे आहे.

46
अनादिकाळापासून चालत आलेली वैदिक परंपरा म्हणजे भारताची संस्कृ ती आहे, असे त्यांना वाटते.
पण के वळ हिंदूंची संस्कृ ती म्हणजे भारतीय संस्कृ ती नाही. भारतात हिंदूंच्या बरोबर बौद्ध, जैन,
ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम या धर्मांचेही लोकही राहतात, हे संघाची मंडळी सोईनं विसरतात. मग
भारत के वळ हिंदुराष्ट्र कसे होईल? किं वा भारतीय संस्कृ ती म्हणजे के वळ हिंदुसंस्कृ ती कशी होईल?
सांस्कृ तिक वर्चस्वाविषयी जगभरातल्या विचारवंतांनी भरपूर लिहून ठे वले आहे. ग्रामचीने तर
तुरुं गात लिहिलेल्या आपल्या ग्रंथात मार्क्सवादाची सैद्धान्तिकता मांडताना सांस्कृ तिक वर्चस्वाची
अत्यंत बारकाईने मांडणी के ली आहे. एखाद्या समाजाला गुलाम करायचे असेल तर पहिल्यांदा
त्याच्या सांस्कृ तिक आचरणाला आत्मसात करून गिळंकृ त करायचे. मग त्या समाजावर सर्वा्थने
सत्ता गाजवता यत, या डावपेचातून संघाची वाटचाल सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि
हेडगेवार हे एकाच विचारसरणीचे होते, असं सांगून समस्त दलितांवर सांस्कृ तिक हुकू मत गाजवता
येईल, अशा समजुतीत संघ वावरतो आहे दलितांना देव-देवतांच्या नादी लावण्याची सुलभ व्यवस्था
संघाकडू न होताना दिसत आहे. एकदा की, माणूस धर्माच्या कचाट्यात सापडला की त्याच्या मनावर
आणि संस्कृ ती बरही अधिराज्य गाजवता येते, हे संघाला चांगलेच माहीत आहे.
ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी 'आरेसेस!' या नावाने लिहिलेल्या पुस्तकात संघाचे $$$$$
संस्कृ तिरक्षक कसे ढोंगी आहेत, याचा खरपूस समाचार घेतला आहे. "परंपरापोषित सरंजामी
मूल्यव्यवस्था आणि वर्णव्यवस्था आपल्या हातून मोडू न पडू नये, याचा खटाटोप संघ करीत राहतो.
कारण, तरच तो सत्तेच्या जवळ राहू शकतो. सांस्कृ तिक मूल्ये कठोरपणे अमलात आणण्याचा
संघाचा प्रयत्न हिंदू संस्कृ ती कायम सत्तेत रहावी यासाठी असतो. म्हणून काँग्रेस असो की स्वतंत्र
पक्ष, मायावती असो की ममता, जोवर हिंदू संस्कृ तीला कोणी धक्का देत नाही, तोवर संघ प्रत्येकाच्या
सत्तेची काळजी घेत राहतो. गावागावात संघ इतकी वर्षे टिकला याचे कारण त्याने डावे पक्ष व
पुरोगामी विचार वगळता सर्व पक्षांशी जुळवून घेतले. जो जो सण उत्सव, पूजाअर्चा यांत सामील होत
जाईल तो तो आपला, हे संघाचे तत्त्व आहे."27 संघाला अपेक्षित असणारी संस्कृ ती कोणती हे आता
परिचित झाले आहे. वैदिक हिंदू धर्माचा प्रसार ही संघाची सांस्कृ तिक चळवळ आहे. त्यामुळे मुस्लिम
आणि इतर धर्मियांचा द्वेष के ल्याशिवाय हिंदू धर्माचे धार्मिक महत्त्व उजाळत नाही हे उघड आहे.
यासाठी सामान्य गरिब हिंदू माणसाला वेठीस घरून त्याच्या मनावर धर्माचरणाचा प्रभाव टाकू न हे
काम पुढे नेण्याचा प्रयत्न संघाची काही मंडळी करताना दिसतात. या कर्मठ धर्माचरणाच्या
कचाट्यात महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर गरीब हिंदू मात्र अलगद सापडले आहेत. या ब्राह्मणेतर शेतकरी
हिंदू जातींच्या लक्षात यायला हवे की, न दिसणाऱ्या देवाच्या मागे लागल्याने आपले भलं होत नाही.
उलट देवाच्या नावाने दुकान मांडणाऱ्या पुरोहितांचं मात्र अधिक भलं होतं. हिंदू शेतकरी जातीमध्ये
ज्या परंपरा, रुढी पाळल्या जातात त्याही ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारलेल्या विधी आणि परंपरा आहेत.

47
त्यामुळे ना धर्माचरण, ना धर्मनिरपेक्ष आचरण अशा द्वंद्वात्मक अवस्थेत हिंदू धर्मातील खालच्या
जातींची उतरंड वावरते आहे. एकीकडे हिंदू असल्याचा गर्व आणि दुसरीकडे शिक्षणाच्या अभावामुळे
प्रचंड दारिद्र्यात वावरणारा गरीब हिंदू समाज, असा विरोधाभास दिसतो आहे.
संस्कृ तीची अत्यंत ढोबळ व सोयीची कल्पना हिंदुत्ववादी राजकारण करत आहे. संस्कृ ती
म्हणजे के वळ रुढी, परंपरा आणि व्रतवैकल्य नव्हे. संस्कृ ती म्हणजे समाजाचा सर्वांगीण व्यवहार
होय. समाजातल्या कला, साहित्य याबरोबरच धर्मकारण, राजकारण, अर्थकारण, पर्यावरण
ज्ञानविज्ञान या साऱ्यांचाच एकत्रित परिणाम म्हणजे सांस्कृ तिक आचरण असते. त्यामुळे सध्या
संस्कृ तीच्या नावाखाली धर्मांधतेचा जो मुजोरपणा चालला आहे, तो म्हणजे संस्कृ ती नव्हे.
गोमांसबंदी, गोवंशहत्याबंदी, वंदे मातरमची सक्ती, योगदिन, गीतापठण या साऱ्या गोष्टी सांस्कृ तिक
वर्चस्वाच्याच भाग आहेत. संस्कृ तीच्या नावाखाली हा नवा दहशतवाद उभा राहत आहे. हा दहशतवाद
के वळ हिंदू धर्मातच आहे असेही नाही. याला कोणताही धर्म अपवाद नाही. सम्यक समाज उभा
राहण्यासाठी हा उन्मादी सांस्कृ तिक वर्चस्ववाद नक्कीच मोठा अडथळा ठरतो आहे.
आरेसेसची राष्ट्रवादाची कल्पना किती मतलबी आहे याची अनेक उदाहरणे देता येतील; परंतु
$$$$$
यात तिरंग्याचे उदाहरण नक्कीच महत्त्वाचे आहे. हिंदुत्ववादी आरेसेसला भारतीय स्वातंत्र्याचा
अभिमान कसा खोटा आहे हे त्यांच्या स्वतंत्र राष्ट्रध्वजाच्या प्रेमावरून दिसते. १९२५ पासून म्हणजे
आरेसेसच्या स्थापनेपासून त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाबद्दल तिरस्काराची जाहीर भूमिका घेतली
आहे. २६ जानेवारी १९३० ला स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करताना तिरंगा फडकवण्याचा निर्णय
घेण्यात आला. तिरंग्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली त्याचवेळी हेगडेवारांनी संघाच्या प्रत्येक शाखेवर
भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश काढले. आजही तिरंग्याला अशुभ समजून भगव्या झेंड्याला
परमेश्वराचे मूर्तिमंत प्रतीक मानले जाते. "दिल्लीत स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावर
तिरंगा फडकवण्याची तयारी सुरू होती त्यावेळी 'ऑर्गनायझर' या आरएसएसच्या इंग्लिश मुखपत्राने
आपल्या १४ ऑगस्ट १९४७ च्या अंकात या निवडीवर तुच्छतादर्शक शब्दांत टीका के ली होती. त्यांनी
म्हटले होते, ‘ज्यांना के वळ चुकू न नशिबाचा हात मिळाल्यामुळे सत्ता मिळाली आहे ते आमच्या
हातात कदाचित तिरंगा देतीलही; परंतु त्याला हिंदूकडू न कधीच आदर आणि मान्यता मिळणार नाही.
मुळात तिरंगा हा शब्दच दुष्ट आहे, तीन हा आकडा अशुभ आहे आणि तीन रंग असलेल्या ध्वजामुळे
मानसिकदृष्ट्या अत्यंत अनिष्ट परिणाम होतील. हा ध्वज देशासाठी घातक
आहे..”28
शमसुल इस्लाम यांनी लिहिलेल्या 'आर. एस. एस. चा राष्ट्र विघातक प्रवास' या छोटेखानी
पुस्तिके त राष्ट्रध्वजाबद्दल संघाचे सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजींनी १४ जुलै १९४६ रोजी

48
नागपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त के लेल्या भाषणातील त्यांचे तिरंग्याबद्दलचे मत मांडले आहे.
गोळवलकर गुरुजी म्हणतात, “भगवा ध्वजच भारतीय संस्कृ तीचे, आपल्या महान हिंदू संस्कृ तीचे
परिपूर्ण प्रतिनिधित्व करतो. तो परमेश्वराचे मूर्तिमंत प्रतीक आहे. अखेरीस संपूर्ण राष्ट्र या भगव्या
झेंड्यासमोर नतमस्तक होईल, असे आम्हाला ठामपणे वाटते."29 राष्ट्रध्वजाबद्दल एवढा तिरस्कार
संघाच्या विचारसरणीत असेल तर संघाची भारताबद्दल काय भूमिका असेल, याविषयी अधिकीचे
सांगण्यात अर्थ उरत नाही.
संघाने आणि संघपरिवारातील प्रत्येक शाखेने आपला स्वतःचा स्वतंत्र राष्ट्रवाद जोपासला
आहे. त्यांनी देशाला भारत हे नाव वापरायलाही नेहमीच खळखळ घातली आहे. भारत या शब्दाला
नेहमीच 'हिंदुस्थान' असा पर्यायी शब्द वापरून आपली राष्ट्रवादाची सांस्कृ तिक पकड अधिक घट्ट
करण्याचा प्रयत्न के ला आहे. वैदिक परंपरा रुजवू पाहणाऱ्या उच्चवर्णीय हिंदूंचा राष्ट्रवाद अलीकडे
अधिक आक्रमक आणि हिंसकही झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादाच्या आपापल्या
सोयीने व्याख्या करून राष्ट्रवादी भावना सतत ज्वलंत ठे वण्यात धर्मांध शक्तींनी धन्यता मानली
आहे.
$$$$$
राष्ट्रवादाचा विकास कसा होतो आणि आज ही भावना कोणत्या थराला गेली आहे. याची
समर्पक मांडणी डॉ. रावसाहेब कसबे यांनीही के ली आहे. त्यांनी राष्ट्रवादासाठी आवश्यक बाबी
कोणत्या असतात हे सांगितले आहे. त्यांच्या मते राष्ट्रवादाची पहिली आवश्यकता म्हणजे त्या
राष्ट्राच्या भौगोलिक सीमा निश्चित करून त्याला इतर प्रदेशांपासून तोडणे. दुसरी आवश्यकता
म्हणजे संस्कृ ती आणि इतिहासलेखनाचा आधार घेऊन त्या भूप्रदेशातील जनसमूहांना एकात्म करणे.
राष्ट्रवादासाठी तिसरी गरज म्हणजे आपला समुदाय सतत संघटित ठे वण्यासाठी त्या राष्ट्रातील
लोकांच्या मनात दुसऱ्या समुदायाबद्दल सतत द्वेशाची भावना प्रसूत करणे आणि राष्ट्रवाद अधिक
प्रबळ करण्यासाठी आणखी महत्त्वाची गरज डॉ. कसबे सांगतात, "आपल्या विरोधी राष्ट्रसमूहांबद्दल
के वळ द्वेषभावनेने आपले पृथक् अस्तित्व टिकवता येत नसेल, के वळ द्वेषभावना यासाठी उपयुक्त
ठरत नसेल तर या द्वेषभावनेला सुडाचा आधार द्यावा लागतो. इतिहासाची पुन्हा मांडणी करावी
लागते आणि हा सुडाचा प्रवास सुरू होतो. तो दोन्ही बाजूंनी सुरू असल्यामुळे तो चिरंतन होतो. आपली
पृथगात्मता चिरंतन ठे वण्यासाठी ही सुडाची शिकवण जाणीवपूर्वक द्यावी लागते आणि प्रचाराच्या
माध्यमातून ती सतत जागृत ठे वावी लागते. या गोष्टी प्रादेशिक राष्ट्रवादाच्या अंतर्गत असलेल्या
राष्ट्रसमूहांच्या संदर्भातील आहेत. परंतु राष्ट्रवादाची पाचवी आणि शेवटची आवश्यकता असते ती
प्रादेशिक सुरक्षततेची. ही प्रादेशिक सुरक्षितता टिकवली नाही तर जगाच्या भूप्रदेशापासून त्या राष्ट्रीय
प्रदेशाला तोडू न त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठे वता येणे कठीण असते. म्हणून प्रादेशिक राष्ट्रवाद

49
आपल्या शेजारी राष्ट्राबद्दल, त्याच्या सामर्थ्याबद्दल, त्याच्या मनात आपल्यासंबंधी असलेल्या
द्वेषाबद्दल आणि त्याच्या मनात आपल्याबद्दल असलेल्या सूडभावनेबद्दल जनतेला सतत भयग्रस्त
मनःस्थितीत ठे वीत असतो."30
राष्ट्रवादी जाणीव हे दुहेरी शास्त्र आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सूचित के ले होते, याचा
प्रत्यय अलीकडच्या काही वर्षांत ठळकपणे येऊ लागला आहे. ही जाणीव उदात्त असली तरी धर्मांध
राजकारणाने तिचा फायदा आपल्या विस्तारासाठी के ला हे उघड आहे. सत्तेच्या दोऱ्या हातात ठे वून
आपल्या विरोधी आवाज करणाऱ्यांना देशद्रोही म्हणणे अगदी सोपे जाते. न पटणाऱ्या व्यक्ती वा
विचारसरणीवर देशद्रोहाचा शिक्का मारला की काम सोपे होते. अशा वेळी प्रागतिक माणसांची
मुस्कटदाबी होणार हे उघड आहे. धर्म आणि राजकारण यांची मिलिभगत राष्ट्रवादी जाणिवेला
आपल्या सोयीने वापरेल हे उघड आहे. त्यामुळे आज देशात पसरत चाललेली कडवी राष्ट्रवादी भावना
आंबेडकरवादापुढचे आव्हान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा धर्मनिरपेक्षता व
बंधुतेची अपेक्षा करणारा राष्ट्रवाद पून्हा उभा करणे हे महत्त्वाचे काम पुरोगामी चळवळीला करावे
लागणार आहे.
$$$$$
६. देशीवादाचे भूत
देशीवाद हे प्रागतिक चळवळीपुढील आणखी एक आव्हान आहे. भारतात देशीवादाची चर्चा
अलीकडे सुरू झाली, पण देशीवादी जाणीव मात्र कित्येक वर्षांपासून भारतीय समाजमनात आहे.
मराठी साहित्यात देशीवादाची चर्चा कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी के ली. त्यांच्या 'टीकास्वयंवर'
या समीक्षाग्रंथात त्यांनी देशीवादाची मांडणी के ली आहे. नेमाडे यांनी देशीपणाला पवित्र मानून
संस्कृ तीला विविध संबंधाचे जाळे मानले. त्यांच्या मते "हिंदुस्थानला आपला देश मानून निर्माण
झालेल्या उदारमतवादी मुसलमानवर्ग आणि महानुभव वारकरी अशा ब्राह्मण्यविरोधी संप्रदायांनी
देशभर उभारलेल्या आत्मशुद्धीवर देशीवादी चळवळींनी हिंदुस्थानातील समाजाचा पाया पुन्हा नव्याने
घालून सर्वनाश चुकवला."31
अमेरिके तील मानववंशशास्त्राचे एक देशी अभ्यासक राल्फ लिंटन यांनी १९४३ साली
‘नेटिवीस्टीक मुव्हमेंट' हा शोधनिबंध लिहिला. या शोधनिबंधाला जगभरातल्या देशीवादी चळवळींनी
उचलून धरले. या निबंधात लिंटन यांनी देशीवादाची एक सुबोध व्याख्या के ली आहे. "एखाद्या
समाजाच्या सदस्यांनी त्यांच्या संस्कृ तीतील निवडक गोष्टींचे पुनरुज्जीवन करून त्यांना चिरस्थायी
करण्याचा कोणताही जाणीवपूर्वक संघटित प्रयत्न म्हणजे देशीय चळवळ होय."32 राल्फ लिंटन यांनी
दोन संस्कृ त्या एकमेकांवर प्रभाव गाजवण्यासाठी मूळ संस्कृ तीतील ज्या गोष्टींची निवड हेतूपूर्वक
करतात, त्याला चार प्रकारात विभागले आहे. पहिला प्रकार म्हणजे पुनरुज्जीवनवादी देशीवाद. या

50
प्रकारात समाजात मृतप्राय गोष्टींना उजाळा दिला जातो. जसे संस्कृ त भाषा भारतात मृतप्राय होत
असताना तिचे पुनरुज्जीवन करण्याचा भाजप सरकारकडू न प्रयत्न के ला जात आहे. देशीवादाचा
दुसरा प्रकार म्हणजे प्रचलित देशीवाद, यात मूळ देशी समजणारी माणसे दुसऱ्या संस्कृ तीच्या
संपर्कात आल्यानंतर आपल्या मूळ संस्कृ तीतील निवडक गोष्टींचे जाणिवपूर्वक पुनरुज्जीवन
करतात. याचे उदाहरण म्हणजे हिंदू मुलतत्त्ववादी संस्कृ त भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी जो
प्रयत्न करतात त्याला प्रचलित देशीवाद म्हणता येईल. जादूमय देशीवाद हासुद्धा लिंटनने देशीवादाचा
तिसरा प्रकार मानला आहे. यात समाजाचे रक्षण करणारा, त्याला नियंत्रित करणारा कु णीतरी प्रेषित
आहे असे माणायचे, तो साक्षातकारी आहे यावर विश्वास ठे वायचा आणि समाजातील इतरांनाही तसे
पटवून द्यायचे. समाजाला गतकाळाच्या वैभवशाली गोष्टींचे सतत स्मरण करून द्यायचे. स्वतः
प्रेषिताच्या भूमिके त जाऊन पूर्वजांसारखे वागा, असा लोकांना उपदेश करून समाजाच्या सांस्कृ तिक
पर्यावरणात बदल करून त्याचा फायदा उठवायचा असा प्रकार म्हणजे जादूमय देशीवाद आहे.
आपल्याकडे वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाने जे भावनिक आवाहने करून राजकारण के ले जाते,
याला जादूमय देशीवाद म्हणता येईल.
$$$$$
लिंटन यांनी त्यांच्या मांडणीत देशीवादाचा बुद्धिवादी देशीवादाची आणि बुद्धिवादी
पुनरुज्जीवनवादी देशीवाद अशी विभागणी के ली आहे. या मांडणीत प्रचलित बुद्धिवादी देशी चळवळ
महत्त्वाची आहे. या चळवळीला सामाजिक ऐक्य अपेक्षित आहे. तिचा उद्देश समाजात धर्मनिरपेक्षता
आणि विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवायचा आहे. ही चळवळसुद्धा प्रतीकांचा उपयोग करते. परंतु या
चळवळीला समाजात माणसांच्या सामाजिक न्यायाच्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटतात. यासाठी
ही चळवळ आंदोलन करते. सभा, संमेलने घेऊन संघर्ष करते. या अर्थाने फु ले-शाहू-आंबेडकरी
चळवळीला आणि महाराष्ट्रातल्या समविचारी प्रागतिक चळवळींना प्रचलित बुद्धिवादी देशी चळवळ
म्हणता येईल. परंतु या चळवळीच्या अगदी विरुद्ध काम करणारी देशी चळवळ म्हणजे बुद्धिवादी
पुनरुज्जीवनवादी देशी चळवळ आहे. लिंटनला अपेक्षित असलेले बुद्धिवादी पुनरुज्जीवनवादी
समाजात मूलतत्त्ववाद रुजवतात. अलीकडे महाराष्ट्रात सावरकरांच्या विचारांचे पुनरुज्जीवन करून
त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार कसे धर्मबळकटीसाठी आवश्यक आहेत हे सांगितले जाणे, याशिवाय
गोमाता, गीतापठण, योगसंस्कार आणि संस्कृ ती भाषेचे पुनरुज्जीवन या साऱ्या गोष्टी बुद्धिवादी
पुनरुज्जीवनवादी देशीवाद करतो आहे. या बुद्धिवादी पुनरुज्जीवनवादी देशीवादाला काय अपेक्षित
आहे, तर आपल्या गतेतिहासातील पारंपरिक दृष्टिकोन त्यांना बळकट करायचा आहे. जात आणि
धर्म अधिक बळकट करायचे आहेत. सामंती व्यवस्था पुन्हा आणायची आहे. आपली धर्माध मते
दुसऱ्यावर लादून सत्ता मिळवायची आहे. थोडक्यात काय तर, भारताला हिंदुराष्ट्र बनवायचे आहे.

51
मराठी साहित्यात ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे यांनी देशीवादाची मांडणी के ली आहे. नेमाडे
यांची देशीवादी मांडणी ही हिंदुत्ववादी विचार प्रवाहित करणारी आहे. 'जातिव्यवस्था मोडली की देश
मोडेल' असे नेमाडे यांना वाटते. त्यामुळे डॉ. रावसाहेब कसबे यांना नेमाडेंचा देशीवाद हा डावपेचावर
उभा असल्यामुळेच तो कृ त्रिमपणे विशिष्ट हेतू मनात ठे वून निर्माण के ला गेलेला आहे, असे वाटते.
नेमाडेंची देशीवादी मांडणी हिंदुत्ववादाला, जातिव्यवस्थेला आणि गावगाड्यातील सामंती
मानसिकतेला अधिक बळकटी देणारी आहे. त्यामुळे प्रागतिक विचारविश्वाशी नेमाडेंचा विचार
नेहमीच द्रोह करताना दिसतो. नेमाडेंची देशीवादी मांडणी खोडू न काढण्यासाठी डॉ. रावसाहेब कसबे
यांनी ‘देशीवाद : समाज आणि साहित्य' हा स्वतंत्र लिहिला आहे. या ग्रंथात देशीवादाची मूलगामी
चिकित्सा करून नेमाडे यांचं देशीवाद प्रागतिकतेच्या किती विरोधी आहे याविषयी सखोल मांडणी
के ली आहे. ‘देशीवाद : समाज आणि साहित्य' या ग्रंथात रावसाहेब कसबे यशवंत सुमन यांच्या
‘महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार' या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा दाखला देत, डॉ. नेमाडे यांचे
देशीवादी विचार धर्मव्यवस्था बळक करणारे कसे आहेत हे सांगतात. त्यांनी पुण्यातील एका भाषणात
नेमाडे यांनी के लेल्या जातीचा अंत म्हणजे ‘देशाचा अंत' या विधानाचा परामर्श घेतला आहे. कसबे $$
$$$
लिहितात "डॉ. नेमाडे यांनी उच्चारलेल्या या सुभाषितवजा महावाक्याचा उगम १८५२ साली
जातिव्यवस्थेचे अतिशय कडवटपणे समर्थन करण्याच्या गंगाधरशास्त्री फडके यांच्या 'हिंदुधर्मतत्त्व'
या पुस्तकापर्यंत जाऊन पोहचतो. या पुस्तकात फडके यांनी घेतलेली भूमिका आणि नेमाडे यांनी
घेतलेली भूमिका सारखीच आहे. 'जातिभेद हे ईश्वरी संके तानुसार निर्माण झाले असून ते पाळण्यात
कोणताच वाईटपणा नाही. जातिभेद मोडले तर त्यात समाजाचे अहितच आहे. खालच्या जातीतील
लोकांनी शिक्षण घेतले, उच्च व्यवसाय, प्रतिष्ठा स्वीकारली तर हलकीसलकी कामे कोण करणार?
असा प्रश्न गंगाधरशास्त्री उभा करून म्हणतात, 'म्हणून जातिभेद असणे इष्टच आहे; किं बहुना
जातिभेदामुळेच हिंदू धर्म टिकू न राहिला' आणि इथेच ते सुभाषित अवतरतं, 'जर जातिभेद नष्ट झाला
तर हिंदू धर्म बुडेल' नेमाडे यांना 'भारत' हे नाव खूप स्वस्त वाटतं म्हणून ते भारताला 'हिंदुस्थान'
असा किमती शब्द वापरतात. त्यांचा देश हिंदुस्थान आहे. नेमाडेंनी गंगाधरशास्त्रींच्या सुभाषिताचे
आधुनिक मराठी भाषेत परिवर्तन करून 'जातीचा अंत म्हणजे या देशाचा अंत' असे सुभाषित रचले.
फरक फक्त शब्दांचा आहे. अर्थाचा मुळीच नाही. गंगाधरशास्त्रींच्या मते, 'हिंदू धर्म बुडेल, असे होते,
तर नेमाडे यांच्या मते हिंदुस्थानचा अंत होईल."33 डॉ. रावसाहेब कसबे यांनी नेमाडे यांच्या
मूलतत्त्ववादी देशीवादाची सप्रमाण चिकित्सा त्यांच्या या ग्रंथात के ली आहे. डॉ. नागनाथ
कोत्तापल्ले, भाई वैद्य यांनी आपापल्या परीने कसबे यांच्या मांडणीच्या आधारे देशीवादाची
चिकित्सा के ली आहे. देशीवादाच्या या चर्चेत प्रश्न नेमाडे-कसबे या वादाचा नाहीच. मुळात प्रश्न आहे

52
तो प्रतिगामी आणि पुरोगामी विचाररसरणीचा. भारतात देशीवादी परंपरेने धर्माचा आधार घेऊन
समाजमनावर नेहमीच पकड मिळविल्याचे दिसते. वेद, भगवतगीता आणि मनुस्मृती या धर्मग्रंथांनी
जी बंधने समाजातल्या शोषितांवर लाधली, ती बंधने देशीवादी विचारसरणीच्या मुळाशी आहेत.
शेती आणि गावगाडा हे देशीवादाचे ठिकाण आहे. गावगाड्यात जातीव्यवस्था भक्कम
करणाऱ्या अनेक परंपरा जिवंत आहेत. गावचा पाटील, त्यांच सरंजामी मानसिकतेतून बांधावर
फिरणं, गावातल्या रूढी, परंपरा आणि सण उत्सव सतत जातीच्या उतरंडीवर अंकु श ठे वतात. गाव वर
वर पुढारलेला दिसत असला तरी आतून मात्र चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा गुलाम असतो. गावाचे प्रगत होणे
हेसुद्धा वरच्या जातीत विभागलेले असते. आर्थिक फायदे घेण्याची क्षमता खालच्या जातीत निर्माण
के ली नाही तर गाव जातिग्रस्त आणि शोषणाचे कें द्र बनेल, यात शंका नाही. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी या सर्व गोष्टींचा विचार के ला होता. त्यांनी भारताचे पहिले ऊर्जामंत्री असताना शेती
विकासाचे जे मॉडेल सुचविले होते त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 'खेडी सोडा अन् शहराकडे
जा' असा बाबासाहेबांचा सांगोवा होता. यामागे शेतीवर अवलंबून असणाऱ्या माणसांची संख्या कमी
करून दरडोई उत्पन्न वाढेल असे बाबासाहेबांचे मत होते. शेतीची तुकड्या तुकड्यात विभागणी ही $$
$$$
गोष्टही शेती विकासात महत्त्वाची आहे. वीजमंत्री असताना त्यांनी दामोदर, हिराकुं ड आणि सोन
नदीवर बांधलेली धरणे आणि भारतात उभे के लेले वीजनिर्मिती कें द्र या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी
मोठ्या प्रयत्नाने उभ्या के ल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे के वळ दलितांचेच कै वारी नव्हते, तर
ते शेतकऱ्यांचेही कै वारी होते, हे सोयीने विसरण्यात अर्थ नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशीवादी नव्हते. ते सतत नव्या आधुनिक विचारसरणीला कवेत
घेऊन संपूर्ण भारतीय समाजाला प्रागतिक करण्याचे स्वप्न पहाणारे प्रयत्नशील विचारवंत होते.
त्यांना समाजातील जात नष्ट करून नवा माणूस उभा करायचा होता. पण बाबासाहेब आंबेडकरांचे हे
स्वप्न हाणून पाडण्याचे काम सातत्याने देशीवादी चळवळीने के ले. आपल्या कर्मठ परंपरा,
रितीरिवाज आणि जुन्या ऐतिहासिक वैभवाची भुरळ पाडू न समाजाला स्थितीशील बनविण्याचे काम
देशीवादी जाणीव करते आहे. म्हणून आंबेडकरवादापुढील महत्त्वाचे आव्हान म्हणून देशीवादाकडे
पाहिले पाहिजे.



53
$$$$$
संदर्भ

१. सुमंत यशवंत, विचारसरणीचे आकलन, (लेखमाला) दै. लोकमत. ३ मार्च २०११.


२. सुमंत यशवंत, उक्त.
३. पानसरे गोविंद, मार्क्सवादाची तोंडओळख, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापुर २०१०, पृ.२३.
४. कांबळे उत्तम (लेख), संपा. किशोर पाठक, संवादः दिवाळी विशेषांक, ऑक्टो २०१५.
५. कांबळे उत्तम, उक्त.
६. पानसरे गोविंद, उपरोक्त, पृ.२४.
७. कसबे रावसाहेब, झोत, सुगावा प्रकाशन, पुणे, सहावी आवृत्ती, २००२, पृ. २०,२१.
८. कारखानीस ल. स., राष्ट्रीय स्वयंसेवक संघः कोणाचा कै वारी? कोणाचा वैरी?, लोकवाङ्मय गृह,
मुंबई, दुसरी आवृत्ती, २००७, पृ.१.
९. कसबे रावसाहेब, हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद, सुगावा प्रकाशन, पुणे,
१९९४, पृ.१७४.
१०. कसबे रावसाहेब, उक्त , पृ.१७६.
११. https://www.ndtv.com/india-news/in-rss-chief-mohan bhagwat's-speech-two-
controversies-and-a-hint-of-pollstrategy-649895.

54
१२. The Hindu-ecopy.9/2/2015
१३. कसबे रावसाहेब, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, पाचवी आवृत्ती सुगावा प्रकाशन,
पुणे, पाचवी आवृत्ती, २०१४, पृ.६१.
१४. आंबेडकर बाबासाहेब, जातिप्रथेचे विध्वंसन, सुगावा प्रकाशन, तृतीय आवृत्ती पुणे, २०१४,
पृ.३४.
१५. आंबेडकर बाबासाहेब, उक्त. पृ.३८
१६. चतुर्वेदी स्वाती, मराठी अनुवाद : कर्णिक मुग्धा, आय अॅम ए ट्रोल, मड पब्लिके शन, नाशिक,
२०१७, पृ.५६,५७.
१७. चतुर्वेदी स्वाती, उक्त, पृ. ३९.
१८. चतुर्वेदी स्वाती, उक्त, पृ.४५.
१९. चतुर्वेदी स्वाती, उक्त, पृ. ४४.
२०. दै. महाराष्ट्र टाईम्स, अग्रलेख: विचारांवरच सेन्सॉर, १४ जुलै २०१७, पृ. १४.

$$$$$
२१. दै. लोकसत्ता, अग्रलेख : देशद्रोही कोण?, पुणे आवृत्ती, १३ जुलै २०१७, पृ. ७.
२२. अय्यूब राणा, हिंदी अनुवाद, कै सर राणा व इतर, गुजरात फाइल्स, गुलमोहर किताब, २०१७,
पृ.१०५.
२३. अय्यूब राणा, उक्त, पृ. ९०.
२४. पाटील शरद, शिवाजीच्या स्वराज्याचे शत्रू कोण?, खंड २, भाग २, मावळाई प्रकाशन, शिरूर,
१९९२, पृ. ३६.
२५. देशमुख सुधाकर, राष्ट्र आणि राष्ट्रवाद, पद्मगंधा प्रकाशन, २००९, पुणे, पृ.९५.
२६. देशमुख सुधाकर, उक्त, पृ. १५३.
२७. डोळे जयदेव, आरेसेस, लोकवाड्मय गृह, मुंबई, २०१७, पृ. ३६.
२८. इस्लाम शमसुल, अनुवाद डॉ. मीना शेटे-संभू, आर.एस.एस.चा राष्ट्रविघातक प्रवास, सुगावा
प्रकाशन, पुणे, २०१६, पृ. ६१.
२९. इस्लाम शमसूल, उक्त, पृ.६२
३०. कसबे रावसाहेब, पूर्वोक्त, पृ.२९२
३१. नेमाडे भालचंद्र, टीकास्वयंवर, साके त प्रकाशन, औरंगाबाद, १९९०, पृ.८९.
३२. कसबे रावसाहेब, देशीवाद : समाज आणि साहित्य, लोकवाङ्मय गृह, मुबई, २०१६, प्र.२१७,
(Ralph Linton Nativistic Movements. American. Anthropologists, New series, Vol.
45, P. 230

55
३३. कसबे रावसाहेब, उक्त, पृ.११५



$$$$$


आंबेडकरवादाचे हितशत्रू

१. उच्चशिक्षित दलित मध्यमवर्ग


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभराच्या चिंतनात संपूर्ण भारतीय समाजाच्या
सामाजिक न्यायाचा विचार के ला. डॉ. आंबेडकर हे दलित, उपेक्षित आणि स्त्रियांचे कै वारी होते, हे जसे
खरे आहे तसेच ते भारतातल्या सर्व जातींच्या हीताचा विचार करणारे विचारवंत होते, हेही लक्षात
घ्यायला हवे.
महाड संग्रामाच्या वेळी ब्राह्मणेतर नेते बाबासाहेबांना म्हणत होते. 'ब्राह्मणांना
तुमच्याबरोबर घेऊ नका.' त्यावेळी बाबासाहेबांनी ब्राह्मण नेत्यांना दिलेले उत्तर परिचित आहे.
बाबासाहेब म्हणाले, "मी 'ब्राह्मण जाती च्या विरोधी नाही, मी 'ब्राह्मण्या'च्या विरुद्ध आहे. हे
ब्राह्मण्य फक्त ब्राह्मणातच असते असे नाही, त्याला जातीय मर्यादा नसतात.”1 समाजात प्रत्येक
जातीने आपले संघटन करून राजकीय फायदा घेण्यासाठी पावले उचलली तर फार मोठ्या सांस्कृ तिक
संघर्षाला आपल्याला तोंड द्यावे लागेल, असे बाबासाहेब वेगवेगळ्या भाषणांतून सांगत होतेच; परंतु

56
याविषयी त्यांनी सैद्धान्तिक भूमिकाही स्पष्ट के ली आहे. १२ फे ब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे
झालेल्या दलित मजूर परिषदेच्या अधिवेशनात बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "माझ्या मते या
देशातील कामगारांना दोन प्रमुख शत्रूंना तोंड द्यायचे आहे, ते दोन शत्रू म्हणजे ब्राह्मण्यवाद व
भांडवलशाही हे आहेत. ब्राह्मण्यवाद हा शब्द मी ब्राह्मण या जातीची सत्ता, हक्क व हितसंबंध या
अर्थाने वापरलेला नाही. ब्राह्मण्यवाद म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्त्वांना विरोध होय.
या अर्थाने विचार करता ब्राह्मण जरी त्याचे जनक असले तरी आता तो त्यांच्यापुरता मर्यादित
राहिलेला नाही. हा ब्राह्मणवाद सर्वत्र व्यापलेला आहे, सर्व वर्गाच्या आचार-विचारांचे नियंत्रण
करणारा आहे, हे एक वादातीत वास्तव आहे. हा ब्राह्मण्यवाद इतका सर्वव्यापी झालेला आहे की,
त्याचा परिणाम आर्थिक संधीवरही गेलेला आहे."2 बाबासाहेबांच्या या भूमिके तून दलित जनतेने काय
घ्यायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 'दलितांनी सतत ब्राह्मणद्वेषी भूमिका घेतल्यामुळे आपले मोठे
नुकसान झाले आहे' या आशयाचे विधान डॉ. रावसाहेब कसबे यांनी जून २०१५ मध्ये कॉ. पानसरे
पुरस्काराच्या समारंभप्रसंगी पुण्यात के ले. यावेळी दलितांमधली अनेक मंडळी रावसाहेबांबद्दल कडवट
$$$$$
प्रतिक्रिया नोंदवून मोकळी झाली. मार्क्सवाद स्वीकारणे म्हणजे आंबेडकरांशी द्रोह करणे आहे, अशी
टोकाची भूमिकाही दलित चळवळीत घेतली गेली आहे. कार्ल मार्क्स वर्गाचा विचार करत होते आणि
बाबासाहेब आंबेडकर जातीचा विचार करत होते. पण दोघांनाही समाजातल्या शोषितांच्या हक्काची
लढाई लढायची होती. मार्ग कोणतेही असो. पण हे दोघेही समतेसाठीच लढत होते. हे समतेसाठी
लढणे महत्त्वाचे आहे. मार्क्सवादी, कम्युनिष्ट आणि समाजवादी यांच्या अजेंडयावर जातनिर्मूलनाचा
कृ तिकार्यक्रम नाही म्हणून दलित चळवळीतील विचारवंत, लेखक डाव्यांपासून दूर रहाणे पसंत
करतात; पण भारतीय समाजक्रांतीत के वळ जातीचा मुद्दा संपला म्हणजे क्रांती होईल असेही नाही.
आज जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर नव्या व्यापक आंबेडकरी जीवनशैलीची गरज आहे.
ही नवी लढाई जुन्या आयुधांनी लढता येणार नाही,. म्हणून आंबेडकरी विचारांचा परीघ अधिक
व्यापक करणे महत्त्वाचे आहे. दलित उच्चशिक्षित वर्गाला संघटित करून परिवर्तनाची लढाई अधिक
व्यापक करण्याचा प्रयत्न काही माणसे अत्यंत जाणीवपूर्वक करताना दिसतात. याकामात लेखक,
विचारवंत, डॉक्टर, इंजिनियर, शासकीय अधिकारी आणि काही शिक्षक व प्राध्यापकही सक्रिय
दिसतात. पण आजही शिक्षण क्षेत्रात असंख्य दलित शिक्षक, प्राध्यापक असे आहेत की ज्यांना
समाज परिवर्तनाचे, चळवळीचे, विचारसरणींचे आणि नव्या प्रश्नांचे काही देणे-घेणे दिसत नाही.
अर्थात, आंबेडकर जयंती, छोटे-मोठे समारंभ, भीमपहाट, बौद्ध वधू-वर मेळावे, बुद्ध जयंती, वर्षावास
यासारख्या उपक्रमात सहभागी होऊन समाजपरिवर्तनाला हातभार लावण्याचे व्यक्तिगत समाधान ही
मंडळी शोधत असतात. या गोष्टींत जरूर सहभागी झाले पाहिजे. त्या समाजाच्या सांस्कृ तिक

57
एकोप्यासाठी आवश्यक असतात, परंतु महापुरुषांच्या के वळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या
करणे म्हणजे समाज परिवर्तनासाठीचा पुरेसा मार्ग नाही. यापलीकडेही जाऊन आंबेडकरी
चर्चाविश्वाला अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जे कणी या प्रागतिक चर्चाविश्वाला
अधिक सैद्धान्तिक विचार देऊ इच्छितात त्यांच्यासोबत ही मंडळी विचारांची पातळी भिडवण्याचा
प्रयत्न करत नाहीत. राज्यशास्त्राचे अभ्यासक, विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांनी 'महाराष्ट्रातील दलित
चळवळ एका नव्या विश्लेषणाची गरज’ या लेखात याविषयी परखड मत नोंदविले आहे. त्यांच्या मते
"दलित उच्चभ्रू लोक भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी निर्माण के लेल्या कल्याणकारी व सुधारणावादी
संस्कृ ती गिळंकृ त झाले आहेत. त्यांनी या संस्कृ तीच्या दृष्टचक्राबाहेर येणाचा कधीही प्रयत्न के ला
नाही. दलितांमधील अगदी वरचे अधिकारीसुद्धा या जुलमी व्यवस्थेविरुद्ध जाऊन दलितांचे प्रश्न
सोडवू शकत नाहीत, कारण त्यांना ते शक्य नसते. ज्या भांडवलशाही व्यवस्थेने त्यांना नियुक्त
के लेले असते, अशा व्यवस्थेच्या विरोधात जाऊन ते दलितांची बाजू मांडू शकत नाहीत. उलट
व्यवस्था पिळवणूक करणारी आहे, अशा व्यवस्थेचे ते भक्त बनतात.”3 गोपाळ गुरूं चे हे निरीक्षण $$
$$$
महत्त्वाचे आहे. या निरीक्षणात अजून थोडी भर घालावी वाटते. गेल्या काही वर्षांतले दलित
प्राध्यापकांचे वाचन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार परिघाबाहेर जात नसेल, तर तो दलितांचा
सांस्कृ तिक विकास कसा म्हणायचा? के वळ फु ले-शाहू-आंबेडकरी विचारांची पुस्तके आपल्या घरात
ठे वली अथवा ती जवळ बाळगली तर आपण पुरोगामी ठरतो अशीही समजूत काही शिक्षकांची होत
आहे. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके विकत घेणे वेगळे आणि बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे हे
वेगळे आहे. व्यक्तिगत पातळीवर फार थोडी माणसे या विचारसूत्राला जोडू न राहू शकतात; पण
दलितांमधील अनेक जण आपल्या स्वार्थासाठी धर्मांध शक्तींशी मैत्री करुन सामंती व्यवस्थेशी सूत
जुळवतात. आधुनिक युगात रममान होऊन तेही दलितांचे सांस्कृ तिक पर्यावरण डॅमेज करण्यात
हातभार लावतात असेही आजचे चित्र आहे.
एकीकडे दलित राजकारणाची उडालेली शकले आपण पहात आहोत. दुसरीकडे म्हणजे बौद्ध
धम्माची चळवळही थांबली आहे, तिसरीकडे दलितांचे कै वारी, राज्यघटनेचे शिल्पकार यापलीकडे
बाबासाहेबांच्या विचारांची व्याप्ती आपण समजून घ्यायला तयार नाही आणि महत्त्वाचे म्हण इतर
समविचारी, धर्मनिरपेक्ष विचारसरणीशी आपण जुळवून घेत नाही. अशा गोंधळी आंबेडकरवादी
अवस्थेत आपण वावरतो आहोत. हा गोंधळी आंबेडकरवाद कु णी उभा के ला? त्याचे वाहक कोण
आहेत? हे सार आता दलितांमधल्या उच्चशिक्षित माणसांनी शोधायला हवे. यासाठी जेष्ठ अभ्यास
आणि सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठातील आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. गोपाळ गुरू याचे इशारे
लक्षात घ्यावे लागतील. प्रा. विलास वाघ यांच्या अमृतमहोत्सवी गौरवग्रंथात गुरूं नी लिहिलेल्या एका

58
लेखात त्यांनी दलितांमध्ये नैतिक जजमेंटची क्षमता विकसित होण्यासाठी प्रयत्न के ले पाहिजेत, असे
सुचविले आहे. पुरोगामी प्राध्यापकांनी हा लेख आवर्जून वाचायला हवा. या लेखात “जेथे वैचारिक
चळवळ थंडावते व राजकीय चळवळ विस्कटली जाते अशा समाजात एक प्रचंड पोकळी निर्माण
होते."4 असे भाकित गुरूं नी के ले आहे.
आंबेडकरी समाजात अशी पोकळी का निर्माण झाली याची वैचारिक कारणमिमांसा विचारवंत
करतीलच, परंतु सर्वसामान्य शिकलेल्या दलित मध्यमवर्गाने आपले स्वतःचे असेही काही प्रागतिक
कृ तिकार्यक्रम हाती घेतले पाहिजेत. "दलित समाज शिकला, श्रीमंत झाला, उच्चमध्यमवर्गीय
सुखवस्तू झाला, तो आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार झाला, इंटरनेटचा पुरेपूर वापर करू लागला, लॅपटॉप,
आयफोन, महागड्या गाड्या सारे काही त्याच्याकडे आले. पण त्याच्याकडे आलेला पैसा हा
दलितांमध्ये नैतिक जजमेंटची क्षमता निर्माण करू शकला नाही."5 हे गुरूचे म्हणणे खरे आहे. कारण
दलितांमध्ये टॅलेंट व चिकित्सक विचार करणारा वर्ग वाढीस लागावा यासाठी त्याच्या पैशाचा उपयोग
होताना दिसत नाही. यूजीसी, विद्यापीठे आणि इतर संशोधन संस्थांकडू न संशोधनासाठी दलित $$$
$$
प्राध्यापकांना मिळालेला पैसा त्यांनी विचार प्रवाहांचा अधिक चिकित्सक अभ्यास करण्यासाठी
वापरायचा की मनोरंजनात्मक अभ्यास करण्यासाठी वापरायचा? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
काही दलित प्राध्यापक एकत्र आले की व्हॉटस्अॅपवर ग्रुप तयार होतो. सुरूवातीला या ग्रुपवर
चांगला संवाद होतो, पण हा संवाद नंतर बिघडतो. या ग्रुपवर पुढे हवामानाच्या, अपघाताच्या आणि
वाहतूक कोंडीच्या बातम्या फिरू लागतात. दलितांच्या अस्तित्वाचे प्रश्न, दलित अत्याचार, दलित
विद्यार्थ्यांचे प्रश्न किं वा शासनाचे दलितविरोधी धोरण यांसारख्या बातम्या समाज माध्यमांतून जरूर
एकमेकांकडे पोहचविल्या पाहिजेत. परंतु जे काम दलितांच्या सामाजिक संघटनांचे किं वा दलितांच्या
राजकीय पक्षांचे आहे ते काम दलित विद्यार्थी आणि शिक्षक करू लागले तर या पोष्टमनच्या कामात
दलितांची बरीच शक्ती खर्च होईल. यात समाजाची वैचारिक बांधणी मात्र तशीच राहून जाईल. फु ले-
शाहू-आंबेडकरी विचारांचे पायाभूत तत्त्वे वैश्विक आहे. जो विचार न्याय, समता, स्वातंत्र्य आणि
बंधुता या वैश्विक मूल्यांवर उभा आहे. ज्याचे उद्दिष्ट सर्व जातिधर्माची उन्नती आहे. तो विचार एका
जातीच्या कुं पणाच्या सिमित न करता ही विचार परंपरा अधिक व्यापक जातविरहित, धर्मनिरपेक्ष
कशी होईल यासाठी प्रयत्न के ले पाहिजेत, असे झाले तरच आपण उद्याचे खरे आंबेडकरवादी ठरू.
आपल्या समाजव्यवस्थेत महापुरुषांकडे सतत जातीच्या भिंगातून कसे पाहिले गेले,
याविषयी डॉ. गुरू यांनी तळमळीने लिहिले आहे, ते लिहितात, "जोतीराव फु ले व बाबासाहेब
आंबेडकरांनी आपल्या विचारांना आकार व दिशा देण्यासाठी ज्या विचारांशी जोडू न घेतले त्या
वैचारिक परंपराही वैश्विक होत्या. आंबेडकरांनी बुद्ध हा जातीने क्षत्रिय असूनसुद्धा बुद्धाच्या वैचारिक

59
परंपरेशी जोडू न घेतले. आंबेडकरांनी सबंध विश्वासाठी प्रस्तुत ठरणारा बुद्धाचा विचार
स्वीकारल्यानंतरही त्यांच्या विचारांचे वैश्विक परिणाम नाकारणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय
करण्यासारखे आहे."6 महापुरुषांना जातीच्या कुं पणाबाहेर काढणे व त्यांच्या विचारांचे क्रिटिकल
जजमेंट उभे करून आपले सैद्धान्तिक असे सांस्कृ तिक पर्यावरण उभे करणे म्हणजे व्यापक होणे आहे.

२. महापुरुषांचे भक्त
दलित समाजात विशेषतः बौद्ध धम्मातील स्त्रियांचे देवभोळेपण अलीकडे कमालीचे वाढत
आहे. शहरात राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या दलित स्त्रियांत हे प्रमाण वाढते आहे. बाबासाहेब
आंबेडकरांचे विचार, बुद्धांची शिकवण हे उच्चशिक्षित दलित स्त्रीला माहीत आहे. ती ते आपल्या
आचरणातही आणते. पण बाबासाहेबांसह गणपती, बाबासाहेबांसह खंडोबा, बाबासाहेबांसह मरिआई,
बुद्धासह बालाजी, बुद्धासह वैष्णवदेवी, बुद्धासह उपवास आणि बुद्धासह आरती हे जे आचरण
उच्चशिक्षित दलित स्त्री करते, ते मात्र घातक आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी दलित कु टुंबे अशा $$$$$
धार्मिक गोधळांचेही शिकार आहेत. या गोष्टीचा विचार करता असे दिसते की, दलित उच्चशिक्षित
स्त्रियांसाठी कोणते आंबेडकरी सांस्कृ तिक पर्यावरण उभे राहिले? के वळ बुद्धविहार, समाजमंदिरे
आणि जयंत्या हे सांस्कृ तिक पर्यावरण आहे का? शिक्षित महिला घरातून कामाला निघाली की तिला
वळणावळणावर मंदिरे भेटतात. कामाच्या ठिकाणीही तिला आंबेडकरी आचरण करता येत नाही. तिचे
स्वतःचे व हक्काचे असे कोणतेच प्रागतिक सांस्कृ तिक पर्यावरण तयार होऊ शकले नाही.
आजूबाजूलाही हळदी-कुं कू , बारसे आणि लग्नात सहभागी होता होता तिचे नकळतपणे हिंदूकरण होत
असते. आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, बुद्ध जयंती अशा प्रसंगीच तिच्या तोंडातून पंचशील
पडते, पण रोजच्या व्यवहारात मात्र तिला आरती, शनिमहात्म्य, स्तोत्र आणि भजने ऐकावी लागतात.
हा दोष दलित स्त्रियांचा की पुरोगामी सांस्कृ तिक आचरणाच्या आकसलेपणाचा?
शहरात राहणाऱ्या उच्चशिक्षित दलित स्त्रियांचे प्रश्न तर यापेक्षाही वेगळे आहेत. रोजच्या
धकाधकीत त्यांना बाबासाहेब भेटतात ते के वळ घरातल्या भिंतीवरील फोटोत किं वा कॉम्प्युटर व
मोबाईलमधल्या स्क्रीन सेवरवर. बुद्धांची आणि त्यांची भेट होते ती आप्तेष्ठांच्या मंगल परिणयात
किं वा जलदान विधीत. दलित चळवळीच्या सांस्कृ तिक अजेंडयावर दलित स्त्रियांच्या मानसिकतेचा
सांस्कृ तिक मेळ घालण्याचा कृ तिकार्यक्रम दिसत नाही. त्यामुळे दलित स्त्रियांच्या अभिव्यक्तीची
ठिकाणे दलित चळवळ वाढवू शकली नाही. दलित राजकारणातही दलित स्त्रिया अग्रभागी नाहीत.
जागतिकीकरणाने तर सुशिक्षित दलित मुला-मुलींचे आंबेडकरी पर्यावरण कधीच उद्ध्वस्त करून
टाकले आहे. शिक्षणात, समाजात आणि सांस्कृ तिक पर्यावरणातही (विशेषतः राजकारणात)
आश्वासक असे आंबेडकरी पर्यावरण दलित स्त्रिला दिसत नसल्याने दलित स्त्रीच्या मनात गोंधळी

60
आंबेडकरवाद तयार होणे हे क्रमप्राप्त आहे म्हणून विवेकी स्त्री-पुरुषांना उत्तम पर्यावरण उपलब्ध
करून दिले नाही तर सांस्कृ तिक पर्यावरणाचा प्रागतिक परीघ वाढणार नाही. आंबेडकरी माणसाच्या
मनातून देव हद्दपार झाल्याशिवाय माणसांची प्रतिष्ठा वाढणार नाही. पण असंख्य आंबेडकरी कु टुंबे
अद्यापही धार्मिक मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत.
खरा आंबेडकरी माणूस समाज सांधायला निघालेला असतो. तो पायाला चाके लावून फिरला
नाही तर आंबेडकरी समाज गतिमान होणार नाही. त्याने विद्येच्या कक्षा विस्तारल्या नाहीत तर
त्याचा समाज मतिमंद होईल. तो संघर्षाच्या रस्त्यावर उतरला नाही तर त्याचा समाज प्रकाशमान
होणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गोष्टी के ल्या. विद्येवर स्वार झाले, विज्ञान आणि
विवेक काळजात घेऊन धर्मनिरपेक्ष समाज घडविण्यासाठी समाजभर फिरले, दलितांच्या हक्कांसाठी
त्यांनी सारे आयुष्य एक युद्धभूमी करून समाजाला प्रकाशमान के ले. म्हणून प्रत्येक दलित माणसाने
स्वतःला संघर्षासाठी सज्ज के ले नाही तर बाबासाहेबांना हवा असलेला समता व स्वातंत्र्यावर $$$$$
आधारित सुंदर भारत निर्माण होणार नाही.
महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिन साजरा करणारा
जनसमुदाय मोठा आहे. गेली कित्येक मुंबईतील चैत्यभूमी हा ओसंडणारा महासागर पहात आली
आहे. मजुरापासून मालकापर्यंत, श्रीमंतापासून गरिबापर्यंत आणि कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत
बाबासाहेब आंबेडकर असे भीमसागराला जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या गावागावांत,
शहराशहरांत, गल्लीत, वस्तीत आणि वाडीतही जयंतीच्या रूपाने बाबासाहेब पोहचले आहेत. १९७०
च्या दशकात दलित पँथर, बौद्ध महासभा, आरपीआय आणि इतर दलित संघटनांच्या उमेदीच्या
काळात बाबासाहेबांची जयंती अधिक जोशात होत होती. पुढे पुढे दलित राजकारणाच्या तत्वशुन्य
आचरणाने बाबासाहेबांच्या जयंतीचा इव्हेंट के ला. शिवजयंतीचेही तसेच झाले. महत्त्वाकांक्षी
राजकारण्यांनी महापुरुषांच्या जयंत्या धुलवड के ली. कॉ. अण्णा भाऊ साठें च्या जयंतीचेही चित्र वेगळे
नाही. अण्णा भाऊं चा वारसदार त्यांना मातंगांच्या राजकीय चळवळीच्या बाहेर जाऊ देत नाही आणि
बाबासाहेबांचा वारसदार अण्णा भाऊं ना जेवढे स्वीकारायला पाहिजे तेवढे स्वीकारत नाही. महात्मा
फु ले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी हे महापुरुष के वळ जयंतीपुरतेच आठवतील अशी आजची
सांस्कृ तिक शोकांतिका आहे.
आज या महापुरुषांना आपण राजकीय सोयीने वापरायला लागलो तर समस्त दलित जनतेचे
सांस्कृ तिक अध:पतन झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या दहा वर्षांत तर 'संयुक्त जयंती' असा
प्रचारकी फं डाही चालू झालेला आहे. महापुरुषांची जयंती संयुक्त करावी हा खूप सुंदर आणि विवेकी
विचार आहे; पण महापुरुषांच्या बरोबरीने कार्यकर्तेही व त्यांचे विचार संयुक्त नकोत का? अलीकडे
मेळाव्यांची पत्रके , बॅनर आणि लग्नपत्रिके वरही महापुरुषांचे फोटो छापण्याची चढाओढ वाढत आहे.

61
लग्नपत्रिके वर महात्मा फु ले, बाबासाहेब आणि अण्णा भाऊं चा फोटो छापणारा कार्यकर्ता जेव्हा
ब्राह्मणाकडू न पूजा करतो, गोंधळ घालतो तेव्हा महापुरुषांचा मेळ के वळ कागदावरच राहता, तो
आचरणात मात्र येत नाही. म्हणून दलित संघटनांनी आपले मित्र कोण आणि शत्रू कोण, याचा
गांभीर्याने विचार के ला नाही तर मोठा बुद्धिभेद होण्याची शक्यता आहे. आपला शत्रू एक आहे म्हणून
एकत्र यायचे की आपली उद्दिष्टे समान आहेत म्हणून एकत्र यायचे? हे आता नीट ठरवायला हवे.
दलित समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या सर्व प्रागतिक संघटना एक व्हायला हव्यात; पण त्या
के वळ राजकीय अजेंड्यावर एक होत असतील, तर ते सांस्कृ तिक परिवर्तनासाठी धोक्याचे आहे आणि
या धोक्याचे कें द्र जातीव्यवस्थेत आहे हे विसरता कामा नये.

$$$$$
३. जात आणि बरचं काही
जागतिकीकरणात जात संपेल असे अनेक विचारवंतांना वाटते. प्रथमदर्शनी हे खरेही वाटायला
लागते, पण प्रत्यक्षात मात्र जात संपल्याचे चित्र दिसत नाही. जागतिकीकरणात जातीय अस्मिता
धुसर झाल्या आहेत असेही चित्र रंगविले जाते. काही प्रमाणात वरवर तसे दिसतेही. उदा. पूर्वी
अस्पृश्यांना (दलितांना) मंदिरप्रवेश नव्हता, आता दलित माणसे कोणत्याही मंदिरात जाऊ शकतात.
विधिकार्यात उच्चजाती आणि शूद्रजाती यातील दरी कमी झाल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी जात
पाळली जात नाही, शासकीय कामकाजात जात पाळणे ही शिक्षा बनते. शैक्षणिक ठिकाणी जातिभेद
वर्ज्य मानला आहे. जातीय अस्मिता कशा धुसर बनल्या आहेत, हे सांगणारी ही काही उदाहरणे आहेत.
या उदाहरणांवरून जात संपेल असा भास निर्माण होण्याची शक्यता आहे. पण प्रत्यक्षात जात मात्र
संपलेली नाही. प्रत्यक्षात जात संपली असती तर निवडणुकीच्या काळात जातीय अस्मिता टोकदार
बनून उमेदवारांपासून मतदारांपर्यंत प्रत्येकाला आपापली जात का आठवते?
गेल्या पन्नास वर्षांत संसदीय राजकारणाने आपल्या जातीय अस्मिता टोकदार के ल्या आहेत.
याशिवाय धार्मिक राजकारण करता येत नाही. शिवाय जाती-जातीत महापुरुषांची नावे घेतली की
मतांची गोळाबेरीज करता येते, हे इथल्या राजकीय व्यवस्थेला चांगलेच माहित आहे. एकीकडे
बाबासाहेब आंबेडकर जाति निर्मूलनाचा कृ तिकार्यक्रम देतात, तर दुसरीकडे भारत हे हिंदुराष्ट्र आहे
अशी गर्जना के ली जाते. एकीकडे बाबासाहेब राज्यघटनेत दलित, आदिवासी व ओबीसींसाठी
आरक्षणाची तरतूद करतात, तर दुसरीकडे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न के ला जातो. एकीकडे
विज्ञानवादी विचार रुजवला जातो तर दुसरीकडे योगविद्या शिकू न अध्यात्म रुजविले जाते. भारतीय
समाजजीवनात हा सतत विरोधाभास राहिला आहे. भारतीय समाजव्यवस्थेत अनेक बदल झाले; पण

62
जातिव्यवस्था मात्र अजून तशीच आहे. भारतीय जातिव्यवस्थेचा विचार करून तिचा उद्गम आणि
तिची विध्वंसकता शोधण्याचे महत्त्वपूर्ण काम बाबासाहेब आंबेडकरांनी के ले. भारतीय
समाजव्यवस्थेला लागलेली कीड म्हणजे जातीयता आहे, असे सांगून जातिनिर्मूलन करण्यासाठी
ठोस असा कृ तिकार्यक्रम बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांनी जाती नष्ट करण्यासाठी जे जे विचार
मांडले ते सर्वपरिचित आहेत. गेल्या पन्नास वर्षात अनेक लेखक, विचारवंतांनी त्यांची सूत्ररूपाने
मांडणी के ली आहे. इथे प्रश्न बाबासाहेबांचे जातिनिर्मूलनविषयीचे विचार सांगण्याचा नाही, तर ते
विचार कृ तीत आणण्याचा आहे.
भारतीय जातीचे तंत्र, उगम आणि विकास सांगणारा निबंध बाबासाहेबांनी १९१६ साली
लिहिला आणि त्यानंतर १९३६ साली. Annihilation of Caste हे बहुचर्चित भाषण लिहून त्यांनी
जातीसंस्थेचा अंत कसा करायचा, याविषयी कृ तिकार्यक्रम दिला. जातिप्रथेचे विध्वंसन करण्यासाठी $
$$$$
के वळ स्नेहभोजने उपयोगाची नाहीत, तर त्यासाठी आंतरजातीय विवाहांचे पाऊल उचलावे लागेल असे
बाबासाहेबांनी गांधींना सांगितले, हाही इतिहास आपल्याला माहीत आहे. जातिप्रथेने बाबासाहेबांना जे
चटके दिले. ज्या वेदना दिल्या आणि पावलोपावली अपमानित करणारी वागणूक दिली, हे सारेच संपले
पाहिजे. भारतीय दलित यातून मुक्त झाला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी जे प्रयत्न के ले त्याला तोड
नाही. परंतु बाबासाहेबांनंतर जातिनिर्मूलनाच्या कार्याला जी दिशा मिळायला हवी होती, ती मिळाली
नाही. भारतातल्या मार्क्सवादी, समाजवादी आणि कम्युनिस्टांनीही बाबासाहेबांच्या
जातिनिर्मूलनाच्या विचारांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. भारतातल्या डाव्या चळवळी मार्क्सच्या
वचनांचे दाखले देत जातीकडे दुर्लक्ष करत राहिल्या. पाया बदलला की इमला आपोआप बदलेल या
स्वप्नात ते वावरले. परंतु भारतातील वर्गीय लढाई जातीशिवाय लढता येणार नाही, हे वास्तव
स्वीकारायला डाव्यांनी खूप उशीर के ला, हेही नाकारून चालणार नाही. बाबासाहेबांनी याचे विश्लेषण
करून ठे वले होते. मार्क्सवाद हा बाबासाहेबांच्या चिंतनाचा विषय होताच; परंतु भारतीय परिस्थितीत
ते वर्गसंघर्षाची लढाई जातीच्या विध्वंसनासह पाहत होते. "वर्गीय समाजाची निर्मिती ही जर खरोखरच
जागतिक प्रक्रिया होती, तर मग भारतासारख्या देशातच जाती का निर्माण झाल्या? आणि इतर देशांत
त्या का निर्माण झाल्या नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आंबेडकर असे देतात की, भारतात वर्ग बंदिस्त
झाले आणि अन्य देशांत ते झाले नाहीत. जात आणि वर्ग हे एकमेकांचे शेजारी असून 'जात' हा एक
बंदिस्त वर्ग आहे. 'ए कास्ट इज अन एनक्लोज्ड क्लास' या ठिकाणी दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची
नोंद करून ठे वली पाहिजे की आंबेडकरांनी जातिसंस्थेच्या चर्चेत 'वर्गाला' महत्त्वाचे स्थान दिले आणि
जातीचा जन्मदाता वर्ग मानला.”7 समाजवादी चळवळीने जातिप्रश्नावर ठोस अजेंडा ठरवला आहे,
असे दिसत नाही. राम मनोहर लोहिया यांनी बाबासाहेबांच्या म्हणण्यातला अर्थ कृ तीत आणण्यासाठी

63
जो विचार के ला, त्याकडेही कम्युनिष्ट व समाजवादी चळवळीने फारसे लक्ष दिले नाही. आणि दलित
चळवळीच्या बाबतीत तर बोलायलाच नको. त्यांनी ना समाजवाद्यांकडे आस्थेने पाहिले, ना
कम्युनिस्टांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्यामुळे भारतीय समाजजीवनात परिवर्तनाची आस
असणाऱ्या तिन्ही क्रांतिकारी चळवळी एकमेकांपासून दूर होत गेल्या.
आज मात्र जागतिकीकरणाच्या वातावरणात समविचारी प्रागतिक संघटनांनी एकत्र येऊन
जातिनिर्मूलनाचा, वर्गलढ्याचा आणि मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेचा नवा लढा उभा करणे ही काळाची
गरज आहे. दलितांच्या सांस्कृ तिक उत्थापनेसाठी आजपर्यंत अनेक लेखक, विचारवंतांनी मोठी
वैचारिक शिदोरी आपल्याला दिली आहे. ही शिदोरी उघडू न आजच्या घडीला सामाजिक परिवर्तनाची
लढाई नव्या आणि निर्णायक मार्गावर कशी नेता येईल? याचाही विचार कार्यकर्त्यांना करायला हवा.
कॉ. पानसरे त्यांच्या भाषणात कार्यकर्त्यांना नेहमी सांगत, 'आपण जिथे आहोत तिथून $$$$
$
आपल्या शत्रूवर सुटा सुटा हल्ला के ला पाहिजे. मूलतत्त्ववाद ही जर आपला शत्रू असेल, तर सर्व
प्रागतिक चळवळींनी आणि त्यातील कार्यकर्त्यांनी इथल्या इहवादी परंपरांवर, धर्मांध राजकारणावर
हल्ले के ले पाहिजेत आपला शत्रू जर एक आहे तर अशा हल्ल्यांमध्ये तो संपल्याशिवाय राहणार नाही.'
महाराष्ट्रातील प्रागतिक चळवळी एकत्र याव्यात हे पानसरेंचे स्वप्न होते. धर्मांधता मुळे पसरलेली
अंधश्रद्धा नष्ट व्हावी हे दाभोळकरांचे प्रयत्न होते, धर्मनिरपेक्ष, सहिष्णू आणि विवेकी समाज उभा
रहावा, असे कलबुर्गीचे विचार होते. तसेच माणसाच्या जगण्यात सत्य आणि निर्भीडता यावी असे
पत्रकार गौरी लंके श यांना वाटत होते; पण या विचारी माणसांना आपण गमवून बसलो, कारण आपण
एक झालो नाहीत. आता आपण अशा निर्णायक वळणावर उभे आहोत की समतेचा लढा अधिक तीव्र
करण्यासाठी पुन्हा असा संघर्षने भरेलेला काळ येणार नाही. डॉ. रावसाहेब कसबे यांनी त्यांच्या
अलिकडच्या काही भाषणांत याविषयी सुतोवाच के ले आहेत, यांचे म्हणणे समजून घेऊन या
सांस्कृ तिक लढाई विचारसूत्रात कसे बांधायचे आणि पुरोगामी संघटनांनी हा लढा कसा जिंकायचा याचे
वैचारिक सूत्र आता शोधावे लागेल.
राजकारण्यांनी पुरोगामी चळवळींची वाट लावली हे खरे आहे. पण आता के वळ राजकारण्यांना
दोष देऊन चालणार नाही. मतांच्या राजकारणासाठी कोणी कोणत्या राजकीय पक्षात जावे, कु ठू न
निवडणूक लढवावी, खासदार, आमदारकी कशी मिळवावी हे प्रश्न तत्कालीन राजकीय परिस्थितीची
अपत्ये बनली आहेत. या गोष्टीला फार महत्त्व देण्याचे काही कारण नाही. कारण राजकारण हे
आपल्या सांस्कृ तिक परिवर्तनाचे के वळ साधन आहे. आपण राजकीय सत्तेलाच समग्र परीवर्तन जर
मानत बसलो तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

64
राजकीय महत्त्वाकांक्षेने समतेच्या स्वप्नांचा चुराडा के ला आहे. जातीय वीण घट्ट करून
धर्मांध मस्ती राजकारणाने वाढवली आहे; पण राजकीय परीवर्तन म्हणजे सामाजिक परिवर्तन, अशी
समजूत आपण का करावी? राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या माणसांनी जातीवादी शक्तींशी मैत्री
करावी, मतांची गरज म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जावे, हा ज्याचा त्याचा राजकीय दृष्टिकोन आहे.
तो दृष्टिकोन सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचे अपत्य असू शकतो; परंतु दलित पुढाऱ्यांनी
धर्मांध शक्तीशी मैत्री के ली म्हणून उठसूट त्यांचा निषेध करण्यापेक्षा आपले आचरण मतपेटीतून
व्यक्त करता येते हेही लक्षात ठे वले पाहिजे. दलित पुढाऱ्यांची धर्मांध राजकारणाशी मैत्री ही गोष्ट
निषेधाची आहेच, पण निषेधालाही एक विचारसूत्राची गरज हवी आहे. हे विचारसूत्र म्हणजे आंबेडकरी
आचरण आहे. आपण कु णाचे शत्रू आहोत आणि कु णाचे मित्र आहोत, हे आता ठरविण्याची निर्णायक
वेळ आली आहे. सभा, संमेलनात भाषणबाजी करून आणि राजकीय सभेत घोषणा देऊन सम्यक
परिवर्तनाचा लढा उभा राहिल यावर आता कु णाचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य $$
$$$
माणसाने आता हे निश्चित करायला हवे की, समाजाचे सांस्कृ तिक परिवर्तन, समाजाची समतेची,
न्यायाची आणि मानवतेची लढाई ही राजकारणापलीकडची गोष्ट आहे.
आपल्या साऱ्याच लढ्यांना विकलांग करण्याचे काम राजकारण करत आहे. राजकारणाने
जात बळकट के ली, धर्मनिष्ठा प्रखर के ल्या, महापुरुषांना वेठीस धरले, भ्रष्टाचाराचे लोन माजवले...
इतके सारे अनर्थ राजकारणाने के ले, त्यामुळे राजकीय चळवळ आता सामाजिक परिवर्तन करेल ही
आशा धुळीस मिळाली आहे. शिवाय दलितांच्या चळवळीही एकमेकांपासून दुरावल्याचे चित्र आहे.
समविचारी विचारप्रवाहांत वैचारिक दरी आहे. या गोष्टींचा विचार करून सर्वसामान्य माणसाला
निर्णायक अजेंडा देण्यासाठी आपापसांतील मतभेद बाजूला ठे वून आता एक होण्याचा हा काळ आहे.
या अनुषंगाने 'साम्राज्यवाद विरोध आणि जातिविनाश' या ग्रंथात आनंद तेलतुंबडे यांनी दलित
चळवळींची चिकित्सा करून जो कृ तीकार्यक्रम सुचविला आहे त्याचे स्वागत के ले पाहिजे. त्यांच्यामते,
"डाव्या चळवळीने सुरुवातीच्या काळात जातिलढ्याविषयी जी अनास्था दाखविली त्यामुळे दलित
चळवळ डाव्या चळवळीपासून दूर लोटली गेली. त्यात एक प्रकारची वैचारिकता होती; पण
आंबेडकरोत्तर काळात वैचारिकतेची जागा प्रतीक-पूजेने घेतली आणि शासक वर्गाने या गोष्टीला
प्रोत्साहित करून तिचा अनेक मार्गांनी भरपूर फायदा घेतला. या प्रतीकात्मक परिणामाने संधीसाधूंचे
खूप फावले, त्यांनी दलित चळवळीला क्रांतिकारी चळवळीपासून अधिकाधिक दूर नेले. आज
परिस्थिती अशी आहे की दलित चळवळ कोणाशीही, अक्षरशः बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या
शत्रुद्वयाशी-ब्राह्मणशाही व भांडवलशाहीशी सुद्धा मैत्री करण्यास कचरत नाही"8 यावरुन एक गोष्ट
स्पष्ट होते ती म्हणजे डाव्यांशी वैचारिक सूत जुळवल्याशिवाय दलित चळचळीला आंबेडकरी आचरण

65
निश्चित करता येणार नाही आणि समाजवादी, कम्युनिष्ट व समविचारी संघटनांनाही बाबासाहेब
आचरणात आणल्याशिवाय संपूर्ण क्रांतीचा वर्गलढा उभा करता येणार नाही.
जागतिकीकरणात उभ्या राहिलेल्या धर्मांध राजकारणाला, सांस्कृ तिक साम्राज्यवाद आणि
भांडवलशाही व्यवस्थेला हे परिवर्तनाचे प्रवाह एक व्हावे असे वाटत नाही त्यांच्यात फू ट पाडण्याचा
सतत प्रयत्न करतील. जाती-जातीत भांडणे लावून, धर्माधर्मात युद्ध लावून भांडवली राजकीय
व्यवस्था ही लढाई सतत जिंकत राहील. म्हणून यापुढे लोकशाही समाजवादी व्यवस्थेचे स्वप्न
पहायचे असेल तर पुरोगामी प्रवाहांना एक झाल्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
एकत्र येण्याचे पहिले पाऊल कु णी टाकायला हवे? अर्थातच आंबेडकरी संघटनांनी, आंबेडकरी
नेत्यांनी आणि आंबेडकरी लेखक - विचारवंतांनी याची पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. या
निळ्या पावलातूनच उद्याची निळी पहाट उगवणार आहे. हे करण्यासाठी जातीचे निर्मूलन करायला
निघायचे, की जाती घट्ट करायला निघायचे हे एकदाचे निश्चित करायला हवे. महाराष्ट्रातील मातंग $
$$$$
चळवळ के वळ जयंत्यांपुरतीच का स्थिरावली? चर्मकार आणि इतर हिंदू दलित जातींचे संघटन
के वळ आरक्षणापुरतेच का विसावले? इतर सवर्ण जातींना के वळ राजकारणा पुरतेच बाबासाहेब का
आठवतात? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आज गरज वाटत आहे. जातीजातीतली ही दरी
अजूनही संपत नाही. ती संपली नाही तर; जात सुप्रिमो होत राहील, धर्म मोठे होतील आणि
राजकारणाच्या माध्यमातून ही दुनिया माणसांच्या समतेच्या स्वप्नांना गिळंकृ त करून टाकील.
कर्मकांडांत अडकलेल्या समाजाला सम्यक दृष्टी देणे, राज्यघटनेतील मानवी मूल्यांना
घराघरात पोहचविणे, म्हणजे आंबेडकरी आचरण आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन धर्मांध शक्तींशी
मुकाबला करणे, लोकशाहीवर विश्वास ठे वणे, जातीच्या अहंकाराला तिलांजली देऊन मानवतावाद
आचरणात आणणे म्हणजे आंबेडकरी आचरण आहे. समविचारी माणसे व विचारसरणींशी मैत्रभाव
निर्माण करणे, मतभेद बाजूला ठे वून वाढत्या मूलत्त्ववादाविरुद्ध संघटित होऊन संघर्ष करणे म्हणजे
आंबेडकरी आचरण आहे. परंतू आज जागतिकीकरणात आंबेडकरी आचरणापूढे मोठी आव्हाने उभी
आहेत, त्या आव्हानांचा गांभीर्याने विचार के ला पाहिजे.

४. जागतिकीकरणाचे विलोभनीयरूप
१९९१ नंतर भारतात जागतिकीकरणाची जी चर्चा होऊ लागली, ती चर्चा २०१५ नंतर अधिक
जटिल बनत गेली आहे. जागतिकीकरण म्हणजे मुक्त व्यापार आहे. पैशांची देवघेव आहे.
आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणं आहे. जीवनातली सर्व सुखं विकत घेणं आहे, जागतिकीकरणाबद्दल अशी
समजूत मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय माणसाची करण्यात आली आहे. जागतिकीकरण ही
जगाच्या दृष्टीने आर्थिक घडामोड असली तरी ती के वळ आर्थिक गोष्ट नाही, तर ती आपल्या समग्र

66
सांस्कृ तिक पर्यावरणाला गिळंकृ त करणारी गोष्ट आहे, परंतू आज उच्चमध्यमवर्गीय माणूस हे
समजून घ्यायला तयार होत नाही. ही गोष्ट दोन कारणाने समजून घ्यायला हा वर्ग तयार होत नाही,
त्यातले पहिले कारण म्हणजे जागतिकीकरणाचा वाहक हाच पगारदार वर्ग आहे, दुसरे कारण म्हणजे
जागतिकीकरणाचे होणारे फायदे त्याला हवे आहेत. म्हणून मध्यमवर्गीय समाज जागतिकीकरणाचा
फायदा घेताना दिसतो आहे.
जागतिकीकरणाच्या संदर्भात दोन प्रवाह दिसतात. एक फायदा घेणारा आणि दुसरा विरोध
करणारा. जागतिकीकरणाचा फायदा घेणारा वर्ग हा भांडवलशाहीचा पुरस्कर्ता वर्ग आहे आणि विरोध
करणारा वर्ग हा नाडला गेलेला वर्ग आहे. भारतातील डाव्या चळवळीने जागतिकीकरणाला विरोध
के लेला आहे. मार्क्सवादी, कम्युनिष्ट आणि समाजवाद्यांनी जागतिकीकरणाला विरोध करण्याची
कारणमीमांसा उघड आहे, ती म्हणजे ही नवी भांडवलशाही श्रमिकांच्या शोषणावर उभी आहे असे
त्यांचे मत आहे. भारतातल्या दलित चळवळीने मात्र याबाबत आपली भूमिका स्पष्ट के लेली दिसत $
$$$$
नाही. काही दलित लेखक, विचारवंत जागतिकीकरणाचे समर्थन करतात, तर काही डाव्यांबरोबर
विरोध करताना दिसतात. पुरोगामी विचारप्रणाली स्वीकारून जागतिकीकरणाचे समर्थन करता येणार
नाही, हे खरे असले तरी जागतिकीकरणाला विरोध करून जागतिकीकरण थांबणार आहे असेही नाही.
जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की, संपूर्ण मानवजातीला विकासाचे मायावी रूप दाखवून
ती त्याच्या जगण्यावर स्वार झालेली आहे. त्यामुळे जागतिकीकरणाला जनावरासारखे हुसकावून
लावता येणार नाही. जगाने एका नव्या अवस्थेत प्रवेश के ला ती अवस्था म्हणजे जागतिकीकरण
आहे, असे डॉ. रावसाहेब कसबे यांना वाटते. "इ.स.१९९१ सालच्या सुरुवातीलाच पूर्व युरोपातील
अल्बेनिया, युगोस्लविया इत्यादी देशांतील कम्युनिस्ट सरकार कोसळली. १९९१ साली बोरिस
येल्त्सीन सत्तेवर आले. ज्या साम्यवादी जागतिकीकरणाचे नेतृत्व सोव्हिएत संघ करीत होता,
त्याचेच विघटन झाल्यामुळे ते जागतिकीकरण पोरके बनले. त्याचा आवाज क्षीण होत गेला आणि
त्याचवेळी अमेरिके च्या नेतृत्वाखाली भांडवली जागतिकीकरणाला अभूतपूर्व असे बळ प्राप्त झाले.
त्याचवेळी जगाने एका नव्या अवस्थेत प्रवेश के ला ती अवस्था म्हणजे आजचे जागतिकीकरण होय."9
भारताच्या बाबतीत २४ जुलै १९९१ रोजी डॉ. मनमोहन सिंग यांनी नव्या आर्थिक दिशेने जाणारा
अर्थसंकल्प जेव्हा भारतीय संसदेला सादर के ला, तेव्हाच भारताची अर्थव्यवस्था जागतिक बाजाराशी
जोडली गेली. अमेरिके ने उभ्या के लेल्या वित्तीय भांडवलाच्या मर्जीप्रमाणे चालण्याचा निर्णय
त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्थेने घेतला. खरं म्हणजे हे अर्थकारण होतं असे प्रथमदर्शनी दिसले,
परंतु ते जगावर सत्ता गाजवणारे राजकारण होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

67
जगभर वेगवेगळ्या देशांवर जागतिकीकरणाचे उलट-सुलट परिणाम झाले. काही मंडळी
जागतिकीकरणाच्या बाजूने लिहू लागली तर काही जागतिकीकरणाचे अनिष्ट परिणाम सांगू लागली.
कोलंबियाचे अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती यांनी जागतिकीकरणाचे समर्थन करणारा Indefence
of Globalization हा ग्रंथ लिहिला, तर जागतिक अर्थव्यवस्था आपल्याच हातात ठे वणाऱ्या
अमेरिके त सामान्य माणसाचे जीवन किती भयानक आहे हे सांगणारा Globalization or
Recolonisation हा ग्रंथ नीरज जैन यांनी लिहिला. हिंदीत अभयकु मार दुबे यांचे 'भारत का
भूमंडलीकरण', मराठीत भानू काळे यांचे 'बदलता भारत’, उत्तम कांबळे यांचे 'जागतिकिकरणाची
अरिष्टे जागतिकीकरणात सांस्कृ तिक संघर्ष’, इत्यादी पुस्तके आहेत. ती कार्यकर्त्यांनी आवर्जून
वाचायला हवीत.
जागतिकीकरणात माणसाचे काय होईल? त्याच्या धर्माचे काय होईल? जातीचे काय होईल?
विचारसरणींचे काय होईल? महापुरुषांचे काय होईल? त्यांच्या जयंत्या- उत्सवांचे काय होईल?
शिक्षणाचे, उद्योग व्यापाराचे आणि कला व साहित्याचे काय होईल? असे असंख्य प्रश्न आपल्याला $
$$$$
पडू लागले आहेत. भारतीय माणसाच्या सांस्कृ तिक गतीचे दोर आता अमेरिके च्या हातात आहेत.
सॅम्युअल हंटिंग्टन यांनी म्हटल्याप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये बसून दावोस कल्चर जगावर राज्य करत
आहे. म्हणून यापूढे जागतिक भांडवली व्यवस्थेला जसा धर्म पाहिजे तसा धर्माचा चेहरा होईल.
भांडवली व्यवस्थेला हवे तसे शिक्षण, कला आणि साहित्य तयार होईल. "जागतिकीकरण,
खासगीकरण आणि उदारीकरण सादर करण्यामध्ये आणि ते रुजवण्यामध्ये अर्थातच अमेरिके चा
वाटा महत्त्वाचा आहे. रशियातील साम्यवादी राजवट कोसळल्यानं एका अर्थी जगातील एक
महाशक्तीही संपून गेली. भांडवलवादी अमेरिके चा मार्ग मोकळा झाला. सर्व वित्तीय संस्थांना हाताशी
धरून त्यांना प्रोत्साहन देऊन जगाच्या संभाव्य वाटचालीचा भांडवलशाही पूरक असा एक नवा
सिद्धान्त मांडला गेला. आग्रहानं तो इतरांच्या गळी उतरवून राबवला गेला. खरंतर तो राबवावा किं वा
राबवू नये असा पर्यायच उरला नव्हता.”10
आधुनिकीकरण, खासगीकरण आणि भांडवलशाही ही जागतिकीकरणाची विकसित झालेली
रूपं आहेत. ही रूपं विलोभनीय आहेत. माणसाला मोहात पाडणारी आहेत. त्याला जाळ्यात पकडणारी
आहेत. गेल्या पन्नास वर्षात अमेरिका या रूपाचा म्होरक्या आहे. सर्व मानवी मूल्ये गुंडाळून संपूर्ण
जगात आपली सत्ता आणि संपत्ती वाढवीत नेण्यासाठी अमेरिके ने जे युद्धखोर आणि लालची वर्तन
के ले आहे, ते वर्तन म्हणजे आजची स्पर्धा आहे. खरं म्हणजे सगळी अमेरिकन माणसं याला
जबाबदार आहेत असे नाही. तर अमेरिके तील सत्ताधारी वर्ग आणि अमेरिके च्या बाजूने उभा राहिलेला
इतर देशातील सत्ताधारी वर्ग यांच्या एकजुटीने जो मुजोर वर्ग तयार झाला आहे, त्या वर्गाची

68
सत्तालालसा आजच्या जागतिक दुष्परिणामांना जबाबदार आहे. सधन देशांतील बहुराष्ट्रीय
कं पन्यांनी नफ्याची न शमणारी भूक ही जागतिकीकरणामागील मुख्य प्रेरणा आहे. या संदर्भात
ज्येष्ठ विचारवंत भा. ल. भोळे यांचे एक निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते,
"जागतिकीकरणाची प्रक्रिया ज्या भागात सुरू आहे ते जग सत्तेच्या व लाभांच्या दृष्टीने तसेच
आर्थिक, राजकीय व सामाजिक दर्जा व क्षमता या सर्वच बाबी मुळात विषम व उतरंडवजा
असल्यामुळे जागतिकीकरणाचा अर्थ, आशय आणि त्याचे विविध देशांवर संभवणारे परिणामही त्या
उतरंडीतील त्याच्या स्थानानुसार असणार हे उघडच आहे. जागतिकीकरणाचे लाभ स्वतःच्या पदरात
ओढू न घेण्याच्या स्पर्धेत निर्णायक महत्त्वाची ठरणारी ही राजकीय सत्तेमधील विषमता
जागतिकीकरणातून उठवण्याऐवजी अधिकच वाढते आहे."11 डॉ. भोळे यांच्या या मताचा अन्वयार्थ
भारताच्या संदर्भात लावला तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. भारतात हा सत्ताधारी राजकीय
मुजोर वर्ग, अमेरिके च्या जाळ्यातून सुटणे शक्य नाही. हा वर्ग नवभांडवलशाहीचा वाहक आहे.
आपल्या देशात खनिज तेलांचे, जीवनावश्यक वस्तूंचे दर ठरविण्याचे अधिकार आता आपल्या हातात
$$$$$
राहिलेले नाहीत. आपले सारेच आर्थिक दोर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक
व्यापार संघटना यांच्या हातात गेले आहेत. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, जागतिकीकरणाचा
सर्वांत मोठा लाभार्थी आहे तो इथला भांडवलदार, राजकीय सत्ताधीश आणि उच्चभ्रू श्रीमंतवर्ग. कार्ल
मार्क्सने संपूर्ण आयुष्यभर ज्यावर चिंतन के ले त्या मालक-मजूर संघर्षाचा, श्रमिकांच्या वाट्याचा,
कामगारांच्या सत्तेचा प्रश्न जागतिकीकरणाने पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
‘द क्रिटिक ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी' या ग्रंथाच्या प्रास्ताविकात कार्ल मार्क्सने ऐतिहासिक
भौतिकवादाचे सूत्र मांडले आहे. मार्क्सचे हे सूत्र सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, समाजरचना दोन
घटकांवर उभी असते. पहिला घटक पाया आहे, तर दुसरा घटक इमला आहे. धर्म, कला, संस्कृ ती
याला मार्क्सने इमला मानले आहे. मार्क्सच्या मते इमारतीचा इमला हा पायावर उभा असतो, तसे
समाजाचे सांस्कृ तिक अधिष्ठान आर्थिक पायावर उभे असते. समाजातले आर्थिक बदल हे धर्म,
संस्कृ ती व कलेच्या क्षेत्रात बदल घडवून आणत असतात. मार्क्सच्या या (Base and
superstructure) सिद्धान्ताचा जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर विचार के ला तर आपल्या मनातील
अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात.
अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड के न्स यांनी भांडवलशाहीची के लेली व्याख्या विचार करायला लावते. ते
म्हणतात, "दुष्टातली दुष्ट माणसं वाईटातल्या वाईट गोष्टी करून प्रत्येकाचं जास्तीत जास्त भलं
करतील अशा विलक्षण श्रद्धेला म्हणायचं भांडवलशाही"12 भांडवलशाहीचा दुष्परिणाम आपण
अनुभवत आहोतच. पण जागतिकीकरणाच्या समर्थकांनी एकदा का जागतिकीकरण स्थिरावले की,

69
सर्वांना शुद्ध हवा, पाणी, मिळेल, आरोग्य सुविधा लाभतील, दळणवळण जलद होईल, पर्यावरण
चांगले राहील, माणसे सुखी आणि संपन्न होतील. धर्म, जात, पंथ यातला वैरभाव संपेल, सारेच काही
समृद्ध होईल अशा हाकाट्या पिटल्या. पण भारताच्या बाबतीत मात्र अजून असे काही झालेले दिसत
नाही. उलट जागतिकीकरणाने माणसा-माणसांत विभाजन के ले. मॉलमध्ये जाणारा, पिझ्झा-बर्गर
खाणारा, परदेश वाऱ्या करणारा, कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा... असे नवनवे वर्ग तयार के ले. पण
आधुनिकतेचे स्वप्न दाखवणाऱ्या भांडवलशाहीने गरिबांची, भिकाऱ्यांची, वेश्या आणि मजुरांची संख्या
मात्र कमी के ली नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होताना दिसत आहेत. आपण
नव्या ग्लोबल युगात उभे असूनही धर्म, जात, धार्मिक वाद, वांशिक वाद संपले नाहीत. उलट
जागतिकीकरणात एक नवा सांस्कृ तिक साम्राज्यवाद उभा रहात आहे.
जागतिकीकरणाचे मायावी रूप किती भयानक आहे हे सांगणारा उत्तम कांबळे यांचा एक दीर्घ
उतारा विचार करायला लावणारा आहे. ते म्हणतात "वाढत्या भांडवलशाहीचे रूप ओळखणे अवघड
आहे. दहा-दहा भांडवलदार एकत्र येऊन एक मोठा भांडवलदार बनत आहे. पावलापावलांवर परिणाम $
$$$$
दाखविणारी, पण अदृश्य स्वरूपात वावरणारी अशी भांडवलशाही निर्माण होत आहे की काय, असे
वाटायला लागते. कापसाला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल
नेमके कु णाला जबाबदार धरायचे? कांद्यांचे भाव कोसळल्याबद्दल कु णाकडे दाद मागायची?... प्रश्न
निर्माण होत आहेत. श्रीमंत भरमसाट श्रीमंत होणे आणि गरीब कोसळत राहणे यामुळे सामाजिक
न्यायाचा प्रश्न टोकदार होणार आहे. वर्गीय विषमता, जातीय विषमता, धर्माचे टकराव यामुळे
सामाजिक न्याय क्षीण होतो आहे. मानवाच्या इतिहासात धर्माला कधी नव्हे एवढी तीक्ष्ण नखे फु टत
आहेत. त्यांचे दात धारदार होत आहेत. त्यांचा पंजा मोठा होत आहे. तो अधिक आक्रमक होत आहे.
धार्मिक गरज असलेल्या माणसाला तो आक्रमक बनवत आहे आणि त्याची शक्ती गुजरात दंगल
करण्यासाठी, अयोध्येत मशीद पाडण्यासाठी, कोणा फादरची हत्या करण्यासाठी, अमेरिके च्या
टॉवरवर हल्ला करण्यासाठी, अफगानमधील बुद्धाचा पुतळा फोडण्यासाठी वापरतो आहे. सामाजिक
न्यायाचा विचार करण्याऐवजी बहुतेक धर्म माणसाला वेगवेगळ्या प्रकारे मतिमंद बनवण्याचा विचार
करत आहे."13 जागतिकीकरणाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. उलट माणसांना चंगळवादी
दुनियेचे मायावी रूप दाखवून त्यांचे खिसे रिकामे करण्याचे काम भांडवलशाही करत आहे.
प्रसारमाध्यमे, माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग हे सारे जागतिकीकरणाचे वाहक आहेत. भांडवलशाही
दुनियेला अपेक्षित जनमत तयार करण्याचे काम ते करतात.
जागतिकीकरणाने दलितांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, श्रमिक आणि असंघटित कामगारांचे प्रश्न
अधिक जटिल के ले आहेत. भारताच्या बाबतीत भांडवली दुनियेने उभा के लेला हा नवा जागतिक

70
साम्राज्यवाद आता भारताच्या अंगात भिनू लागला आहे. या साम्राज्यवादाला निमंत्रण देणारे
राजकारणी भांडवली दुनियेचे गुलाम बनले आहेत. त्यामुळे त्यांनाही देशातील धार्मिक
मूलतत्त्ववादाचा, दलितांच्या प्रश्नांचे, श्रमिकांच्या लढ्यांचे आणि स्त्रियांच्या हक्कांचे काही देणे-घेणे
आहे असे वाटत नाही. राजकारणी जे प्रश्न जनतेसमोर आणत आहेत ते के वळ मतांची भीक
मागण्यासाठी. त्यांनाही धार्मिक तेढ हवी आहे. त्यांनाही माणसे जातीजातीत विभागलेली हवी आहेत.
गेल्या काही वर्षांत भारतातली मंदिरे श्रीमंत होताहेत आणि माणसे मात्र गरीब होताहेत. एकू णच काय
तर जागतिकीकरणाने उभा के लेला हा नवा सांस्कृ तिक संघर्ष समतेच्या लढाईतला मोठा शत्रू बनला
आहे.
आज जागतिकीकरणाचे स्वरूप समजून घेऊन त्यात आपला वाटा मागायची लढाई उभी
करणे महत्त्वाचे आहे. यात जागतिकीकरणाने माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या चांगल्या
गोष्टी आणल्या आहेत त्या नाकारण्याचे काही कारण नाही. संगणकाच्या रूपानं मानवी जीवनात जी
क्रांती झाली तिला तोड नाही. मोबाईलच्या येण्याने माणसाच्या जगण्यात जी गतिमानता आली तीही
$$$$$
महत्त्वाची आहे. वैद्यकीय क्षेत्रात आलेले नवे नवे तंत्रज्ञान माणसाच्या आरोग्याला वरदान आहेत.
उद्योग -व्यापारात आलेले प्रगत तंत्रज्ञान, शेती क्षेत्रात झालेली आधुनिक क्रांती या साऱ्या गोष्टींचे
स्वागत करायला हवे. त्यामुळे ऊठसूट जागतिकीकरणाला विरोध करून चालणार नाही. अशा वेळी हा
प्रश्न के वळ भांडवलशाहीच्या विरोधाचा राहत नाही तर भांडवलशाहीने आणलेले तंत्रज्ञान माणसाच्या
कल्याणासाठी वापरण्याचा आहे. त्याचा वापर आपण डोके ठिकाणावर ठे वून के ला नाही तर ते आपले
डोके फोडल्याशिवाय राहणार नाही.
जागतिकीकरणाला प्रवाहीत करणाऱ्या माध्यमांच्या अविवेकी वापरामुळे अनेकांचे जीवन कसे
उद्ध्वस्त होते याविषयी सातत्याने वर्तमानपत्रांत बातम्या येऊ लागल्या आहेत. इंटरनेट,
व्हॉटस्अॅप, फे सबुक, ट्विटर या समाज माध्यमांतून समाजात अनेक विघातक कृ ती होताना दिसत
आहेत. व्हॉटस्अॅप वरील मेसेजमुळे पती-पत्नीत घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. फे सबुक आणि
इतर संवाद माध्यमांवरील चॅटिंगमुळे आपले सांस्कृ तिक आचरण धोक्यात येत आहे. या गोष्टींचा
अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे. बहुजन समाजातील मुला-मुलींनी या नव्या
आयुधांचा वापर आपल्या सांस्कृ तिक विकासासाठी व ज्ञानप्राप्तीसाठी के ला नाही, तर ही नवी साधने
आपल्या विनाशाची कारणे बनतील. आपल्या सामाजिक विकासासाठी, राष्ट्रविकासासाठी या
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे त्या तंत्रज्ञानावर स्वार होणे, विज्ञानवादी दृष्टिकोन घेऊन नवा
बुद्धिवाद विकसित करणे म्हणजे सम्यक प्रागतिक आचरण आहे.

५. सांस्कृ तिक साम्राज्यवाद

71
जागतिकीकरण आपल्या प्रभावक्षेत्राखाली येणाऱ्या संस्कृ तीचे सपाटीकरण करण्याचा प्रयत्न
करते यातून 'सांस्कृ तिक साम्राज्यवाद' ही संकल्पना जन्माला आली. १९९१ मध्ये हर्बर्ट शिलर यांनी
बहुराष्ट्रीय कं पन्या या विकसनशील देशांवर कसे प्रभुत्व गाजवतात, हे स्पष्ट करण्यासाठी ही
संकल्पना वापरली. "साम्राज्यवादी वर्गाच्या हितसंबंधाशी शोषित लोकांची मूल्ये आणि अस्मिता
बांधण्यासाठी सत्ताधारी वर्गांनी सर्वसामान्य वर्गाच्या सांस्कृ तिक जीवनावर बसवलेली पकड आणि
त्यांच्या संस्कृ तीत के लेला पद्धतशीर शिरकाव, अशी जेम्स पेत्रास यांनी सांस्कृ तिक साम्राज्यवादाची
व्याख्या के ली आहे. संपत्तीचा संचय आणि तिचे वाटप या कार्यासोबतच काही सांस्कृ तिक आणि
आध्यात्मिक कार्य राजसत्ता पार पाडत असतात. समाजातील उच्चभूंच्या हितसंबंधाचे संवर्धन
होण्यासाठी राजसत्ता नवीन सांस्कृ तिक घटिते जन्माला घालतात. या प्रकारे भौतिक आणि
सांस्कृ तिक वास्तव परस्परांना साहाय्य करत राहतात.”14 हा सांस्कृ तिक साम्राज्यवाद आता जगभर
आपले उग्र रूप धारण करतो आहे. फ्रान्समधील शार्ली हेब्दोच्या वृत्तसंपादकावर झालेला हल्ला,
दिल्लीत वेन्डी डोनिजर यांचे पुस्तक मागे घ्यावे म्हणून पेंग्वीन प्रकाशन संस्थेच्या विरोधात $$$$$
निघालेला हिंदू संघटनांचा मोर्चा, तामिळनाडू त पेरूमल मुरूगन या लेखकाची झालेली विटंबना, कांचा
इलैया यांच्या लेखनावर घेतलेले आक्षेप, मोहन भागवत यांना संपूर्ण भारत हिंदुराष्ट्र असल्याचा
झालेला साक्षात्कार, छत्तीसगड मधील धर्म संसदेत शंकराचार्य स्वरूपानंद यांनी साईबाबा देव नाही
असे सांगून त्यांच्या मुर्ती हटवण्याचे के लेले विधान, योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंत्री होणे,
शिक्षणात आणू घातलेले धर्मप्रेम, गीतेचे वाढते महत्त्व, योगविद्या घराघरात पोहचविण्याचा
राजकीय प्रयत्न... या गोष्टी भांडवलशाही आणि राजकारणाला हवा असलेला सांस्कृ तिक
साम्राज्यवाद उभा करत आहेत. हाच सांस्कृ तिक साम्राज्यवाद उद्या भारतातील प्रागतिक चळवळींना
आणि प्रागतिक विचारांना गिळंकृ त के ल्याशिवाय राहणार नाही, हेही वास्तव आपल्याला समजून
घेतले पाहिजे.



72
$$$$$
संदर्भ

१. कसबे रावसाहेब, आंबेडकर आणि मार्क्स, सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती, २००६, पृ. १०४.
२. कसबे रावसाहेब, आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार, सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती,
२००४, पृ.५४.
३. गुरू गोपाळ, वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा, हरिती पब्लिके शन, वाकड, पुणे, २००५, पृ.
२४१.
४. गुरू गोपाळ, उक्त, पृ. ६९.
५. गुरू गोपाळ, उक्त, पृ. ७२.
६. गुरु गोपाळ, उक्त, पृ.७२.
७. कसबे रावसाहेब, शिक्षक संघटक (मासिक), संपा. प्रकाश मा. पवार, नोव्हें डिसें. २०१३, पृ. ४२.
८. तेलतुंबडे आनंद, साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश, सुगावा प्रकाशन. पुणे, २००७, पृ. २३८,
२३९.
९. कसबे रावसाहेब, जागतिकीकरण : स्वरूप आणि भवितव्य, सुमेध प्रकाशन, पुणे, २०१०, पृ.२०.
१०. कांबळे उत्तम, जागतिकीकरणातील सांस्कृ तिक संघर्ष, सुगावा प्रकाशन, पुणे, २०१३, पृ. १४.
११. कांबळे उत्तम (संपा.), जागतिकीकरणाची अरिष्टये, कॉ. गोविंद पानसरे अमृत महोत्सव
समिती, कोल्हापूर, २०१०, पृ. ३.
१२. कांबळे उत्तम, उक्त, पृ. १११.

73
१३. कांबळे उत्तम (संपा.), झोत सामाजिक न्यायावर, डॉ. रावसाहेब कसबे गौरव समिती, संगमनेर,
२००५, पृ.७.
१४. कांबळे उत्तम, पूर्वोक्त, पृ. १३२.

$$$$$

आंबेडकरवादी शिक्षणविचार

भारतीय संविधानाचे निर्माते, दलितांचे उद्धारक, कायदेतज्ज्ञ, समाजशास्त्र, इतिहास


मीमांसक अशा बहुआयामी कार्यक्षेत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना प्रेरणा देणारे
आहे. बाबासाहेबांच्या या कार्यकर्तृत्वात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षण हे
बाबासाहेबांच्या विचारसरणीचे महत्त्वाचे सूत्र होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण विचार
समजून घेऊन आजच्या शैक्षणिक वास्तवाला सामोरे जाणे महत्त्वाचे वाटते. आज जागतिकीकरणात
शिक्षणाचा चेहरा बदलला आहे. शिक्षणाचे होणारे अध्यात्मिकरण हेही आजचे आव्हान आहे, हे
समजून घेणे हा या प्रकरणाचा हेतू आहे. आंबेडकरवादी शिक्षणविचार कशाची अपेक्षा करतो हेही या
प्रकरणात मांडण्याचा प्रयत्न आहे.

1. बाबासाहेबांचे शिक्षण आणि शैक्षणिक कार्य


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची प्रेरणा त्यांचे वडील रामजी यांच्याकडू न मिळाली.
त्यांचे वडील सैन्यात होते आणि त्यावेळी इंग्रज सरकारने आपल्या सैन्यातील सैनिकांना शिक्षण
सक्तीचे के ले. इंग्रजांनी सैनिकांसाठी रात्रीच्या शाळा व त्यांच्या मुलांसाठी दिवसाच्या शाळा काढल्या
होत्या. रामजी कष्टाळू, जिज्ञासू आणि आदर्शवादी होते. ते सैनिकांच्या रात्रीच्या शाळेत शिकले, पुढे

74
शिक्षक झाले आणि चौदा वर्षे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम के ले. शिक्षणाविषयी त्यांच्या मनात
सखोल आस्था होती. ते कबीरपंथीय होते; त्यामुळे त्यांचे दोहे, भजने आणि अभंग यांचे दांडगे
पाठांतर होते. आपल्या मुलाने खूप शिकावे आणि चारित्र्यसंपन्न बनावे असे बाबासाहेबांच्या वडिलांना
वाटत होते. बाबासाहेबांनी संस्कृ त आणि इंग्रजी या भाषा शिकाव्यात म्हणून त्यांनी जे प्रयत्न के ले ते
फार महत्त्वाचे आहेत. परंतु अस्पृश्यता मुळे बाबासाहेबांनी संस्कृ त भाषा शिकता आली नाही. त्यांनी
पर्शियन भाषा शिकली. आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून ते कु टुंबासह मुंबईत रहायला
आले. मुंबईत मराठा आणि एल्फिन्स्टन हायस्कू लमध्ये त्यांचे शालेय शिक्षण सुरू झाले. दारिद्र्य,
चाळीतली खोली आणि अस्पृश्यता अशा संकटांना तोंड देत बाबासाहेब शिकले. याच काळात विल्सन
हायस्कू लचे मुख्याध्यापक कृ ष्णाजी अर्जुन के ळूसकर यांची भेट झाली आणि त्यांनी दिलेले ‘बुद्धचरित्र'
वाचून बाबासाहेबांच्या जीवनाची सारी विचारसूत्रे अधिक प्रकाशमान झाली. मॅट्रिकनंतर $$$$$
त्यांनी उच्चशिक्षणासाठी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बाबासाहेबांचा आत्मविश्वास
वाढला. प्रो. इराणी आणि प्रो. म्यूल्लर यांच्या सहवासाने आणि मार्गदर्शनाने बाबासाहेबांच्या जीवनात
चैतन्य आले.
१९१२ साली बाबासाहेब आंबेडकर बी.ए. झाले आणि त्यानंतर १९१३ साली त्यांनी अर्थशास्त्र
विषयात एम.ए. पदवीसाठी अमेरिके तील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. याकामी त्यांना बडोदा
संस्थानचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती देऊन महत्त्वाचे सहकार्य के ले. कोलंबिया
विद्यापीठ बाबासाहेबांच्या जीवनातील ऊर्जाकें द्र ठरले. इथेच डॉ. सेलिग्मन आणि प्रोफे सर जॉन ड्युई
यांच्यासारख्या विद्वान शिक्षकांचा सहवास लाभल्याने बाबासाहेबांच्या बुद्धीला पैलू पडले. त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाला इथे आकार मिळाला.
शिक्षणाचे महत्त्व काय असते? संशोधनाचे उद्दिष्ट काय असते? शिक्षणातून समाज बदलता
येतो. अशा साऱ्याच प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठात मिळाली. या काळात
बाबासाहेबांनी लिहिलेला Cast in India : Their Mechanism, Genesis and Development
(१९१६) हा शोधनिबंध सर्वश्रुत आहे. १९१५ साली ते एम.ए. झाले आणि १९१६ साली त्यांना 'The
National Dividend of India -A Historical and Analytical study’ या प्रबंधाबद्दल
कोलंबिया विद्यापीठाची पीएच.डी. ही सर्वोत्तम पदवी मिळाली. पुढे बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र
विषयात प्रावीण्य मिळविण्यासाठी इंग्लंडला गेले. इथेही त्यांना महाराज सयाजीराव गायकवाड आणि
राजश्री शाहू महाराज यांनी आर्थिक मदत के ली. येथील लंडन स्कू ल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड
पोलिटकल सायन्स' मध्ये प्रवेश मिळवून बाबासाहेबांनी एम.एस्सी. व डी.एस्सी. या पदव्या संपादन
के ल्या. ‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India' (१९२१) हा
त्यांचा एम.एस्सी. चा प्रबंध होता तर 'Problem of the Rupee’ (१९२२) हा त्यांचा डी.एस्सी

75
पदवीसाठी प्रबंधविषय होता. आपल्या समाजाची सुधारणा व्हावी या आंतरिक तळमळीने आणि
प्रचंड आत्मविश्वासाने बाबासाहेबांनी ज्ञान क्षेत्रात अतुलनीय काम के ले. आयुष्यभर विद्यार्थी बनून ते
प्रकांडपंडित बनले.
बाबासाहेब आंबेडकर पीएच.डी. पदवीसाठी इंग्लंडला गेले; परंतु जवळचे पैसे संपल्याने त्यांना
काही काळ परत भारतात यावे लागले. या काळात बाबासाहेबांनी मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमध्ये
अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम के ले. प्राध्यापक कसा असावा?, त्याची ज्ञानलालसा आणि
अध्यापनक्षमता किती उच्च कोटीची असावी? या प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून
दाखवून दिली. दांडगा अभ्यास, दांडगी स्मरणशक्ती आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व या गुणांमुळे
बाबासाहेब प्रचंड विद्यार्थिप्रिय बनले.
$$$$$
अर्थशास्त्रासारखा अवघड विषय ते इतका सोपा करून शिकवत की; त्यांचा तास विद्यार्थी
चुकवत नसत. अगदी आजूबाजूच्या महाविद्यालयातील विद्यार्थीही त्यांच्या तासाला येऊन बसत.
आपले व्याख्यान चांगले व्हावे म्हणून त्यांनी ते तेरा वेळा लिहून काढल्याचाही उल्लेख त्यांच्या
चरित्रात आहेत. ज्ञानाबद्दल प्रचंड आस्था आणि ज्ञानातून समाज बदलेल हा आत्मविश्वास
बाबासाहेबांना होता म्हणूनच ते एवढे मोठे शैक्षणिक कार्य करू शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
उभ्या के लेल्या शिक्षणसंस्था आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात आणि देशभर उभ्या
राहिलेल्या शिक्षणसंस्था, अशा रीतीने बाबासाहेबांच्या शिक्षण कार्याचा विचार करता येतो.
१९५१ साली बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना के ली.
मराठवाड्यातील औरंगाबाद हा प्रदेश शैक्षणिकदृष्ट्या मागास होता. अशा प्रदेशात महाविद्यालय उभे
करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिली. तत्कालीन
राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते या महाविद्यालयाची कोनशिला बसवली. या प्रसंगी झालेल्या
समारंभात बाबासाहेबांनी आपला शैक्षणिक दृष्टिकोन जाहीर के ला. या वेळी के लेल्या भाषणात
बाबासाहेब म्हणाले, "मी हिंदू समाजातील सर्वांत खालच्या स्तरातून आलेलो असल्यामुळे मला
शिक्षणाचे मूल्य काय असते हे चांगलेच माहीत आहे. खालच्या स्तरातील लोकांच्या उन्नतीची
समस्या आर्थिक आहे असे समजणे ही सर्वांत मोठी चूक आहे. या स्तरातील लोकांच्या उन्नतीची
समस्या सोडविणे म्हणजे त्यांचे भरणपोषण करून व कपडालत्ता देऊन त्यांना या देशाच्या प्राचीन
आदर्शाप्रमाणे उच्च वर्गाचे सेवक बनविणे नव्हे. खरे तर निम्न स्तरातील लोकांचा न्यूनगंड दूर करणे
हा तो उपाय होय. त्यांची समस्या अशी आहे की, ज्यामुळे त्यांचा विकास खुंटला गेला आणि त्यांना
इतरांचे गुलाम बनवले गेले. त्यांना या स्तरीय समाजरचनेच्या व्यवस्थेने अत्यंत निर्घृणपणे लुबाडले,
याची त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यांचे जगणे हे त्यांच्या स्वतःसाठी आणि त्यांच्या

76
राष्ट्रासाठी आहे, याची त्यांना अर्थपूर्ण समज करून देणे आवश्यक आहे. उच्चशिक्षणाच्या
प्रसाराशिवाय हा हेतू कधीही सफल होऊ शकत नाही. हाच आपल्या सामाजिक दुखण्यावरील उत्तम
उपचार आहे, असे माझे ठाम मत आहे."1
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय हा बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारांचा कृ ती
आराखडा असला तरी त्याची सुरुवात बाबासाहेबांनी १९४५ साली मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना
करून के ली होती. १९४५ साली त्यांनी 'पीपल्स एज्युके शन सोसायटीची' स्थापना के ली आणि या
संस्थेच्या मार्फ त त्यांनी ‘सिद्धार्थ' महाविद्यालय सुरू के ले. मुंबईतील 'सिद्धार्थ’ आणि
औरंगाबादमधील 'मिलिंद' या महाविद्यालयांनी दलित समाजामध्ये नवी शैक्षणिक क्रांती के ली.
कित्येक पिढ्या शिक्षणापासून वंचित असलेला समाज शिकू लागला. या समाजातील शिकलेल्या $$$
$$
तरुणांमध्ये नवे आत्मभान आले. तो समाज संघटित झाला आणि अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी तयार
झाला. शिक्षण आणि समाज याची सांगड बाबासाहेबांनी किती विचारांती घातली, याचे उत्तर आज
पहायला मिळते. मुलींच्या शिक्षणाबद्दल बाबासाहेब आग्रही होते. के वळ दलितांच्या मुलींनीच नव्हे तर
सर्व जाती-धर्मातील मुलींना उत्तम शिक्षण कसे मिळेल यासाठी बाबासाहेब प्रयत्नशील होते. विशेषतः
स्त्रीशिक्षणाबद्दल ते अधिक आग्रही होते.
बाबासाहेबांनी सुरू के लेल्या शिक्षणसंस्थांचा मोठा विस्तार झाला. त्यांच्या शाखा महाराष्ट्रभर
पसरल्या. बाबासाहेबांनी उभ्या के लेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये के वळ दलित समाजातील मुलांनीच
शिक्षण घेतले असे नव्हे तर सर्व समाजातल्या मुला-मुलींसाठी त्या संस्था ऊर्जा कें द्र बनल्या. एकीकडे
या संस्था जशा शिक्षणाचे कार्य करत होत्या, तसेच दुसरीकडे त्या समाज घडविणाऱ्या प्रयोगशाळाही
बनल्या. शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे, हा बाबासाहेबांचा यामागे हेतू होता.
बाबासाहेबांच्या एकू णच व्यक्तिमत्त्वामध्ये शिक्षणाचे महत्त्व अग्रभागी होते. प्रखर बुद्धिमत्ता आणि
ज्ञानलालसा असलेला विद्यार्थी, ऊर्जावंत शिक्षक आणि ध्येयनिष्ठ संस्थाचालक अशी बाबासाहेब
आंबेडकरांची शिक्षण रूपं होती, बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यामागे महात्मा जोतीराव फु ले
यांची प्रेरणा होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. महात्मा फु ल्यांना अपेक्षित असणाऱ्या शैक्षणिक
विचाराला बाबासाहेबांनी आधुनिक अर्थ प्राप्त करून दिला, हे बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचे मर्म
आहे.
बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य के वळ एवढ्यावरच थांबले नाही तर बाबासाहेबांच्या
विचारांची प्रेरणा घेऊन देशभर शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या. यांतून लाखो विद्यार्थी शिकू न समाज
प्रेरक बनले. नागपूरचे किसन फागोजी बनसोडे, पुण्याचे विठ्ठल रामजी शिंदे, एल. एन. हरदास, डी.
एम. शिर्के , खानदेशातील पी. एल. लळिंगकर, एन. के . तिरपुडे, नाशिकचे बी. के . तथा दादासाहेब

77
गायकवाड, पी. जे. रोहम, शांताबाई दाणी, नगरचे दादासाहेब रूपवते, पुण्याचे विलास वाघ आणि
उषाताई वाघ, अशा कितीतरी आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्राच्या विविध भागांत बाबासाहेबांच्या
प्रेरणेने शिक्षण संस्था सुरू करून मोठी शैक्षणिक चळवळ उभी के ली आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेरही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करणाऱ्या शिक्षण
संस्था कार्यरत आहेत. त्यात आंध्र प्रदेशात दीनापूर येथे 'दलित मुक्त विद्यापीठ' आहे. कर्नाटकातील
माजी मुख्य अभियंता एल. शिवलिंगय्या यांनी बंगलोर येथे दलितांचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय
सुरू के ले आहे. याशिवाय 'महू' या आंबेडकरांच्या जन्मगावी मध्यप्रदेशातील निवृत्त शासकीय
कर्मचारी डॉ. एम. एल. शहारे यांनी 'डॉ. आंबेडकर राष्ट्रीय संस्था' उभी के ली आहे. म्हैसूर मध्ये एस.
एम. सिद्द्या यांनीही ‘सिद्धार्थ एज्युके शन सोसायटी' ची स्थापना करून दलितांच्या शैक्षणिक $$$$$
प्रगतीसाठी मोठे काम के ले आहे.
बाबासाहेबांच्या प्रेरणेने भारतातल्या अनेक ठिकाणी शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, शाळा-
महाविद्यालये सुरू झाली. वसतिगृहे उभी राहिली. या संस्थांची संख्या सांगायची झाली तर मोठी
यादी होऊ शकते. याविषयी सविस्तर माहिती एलिनॉर झेलिएट यांनी त्यांच्या 'डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व
व दलितांचा शिक्षणातील पुढाकार' या संशोधनात्मक पुस्तिके त के ला आहे. जिज्ञासूंनी ही पुस्तिका
पहावी. इथे प्रातिनिधिक स्वरूपात काही संस्थांची नावे पाहिली तरी बाबासाहेबांच्या विचारजागृतीने
के वढे मोठे शैक्षणिक कार्य भारतात उभे राहिले हे लक्षात येते. याशिवाय के वळ भारतातच नव्हे तर
न्यूयार्क , अमेरिका आणि कॉलिफोर्निया, तिबेट या देशांतही बाबासाहेबांच्या कार्यप्रेरणेतून शैक्षणिक
कार्य सुरू आहे.

२. शैक्षणिक विचार आणि संविधानातील तरतुदी


‘शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा.' हे समस्त दलित बांधवांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी
उच्चारलेले महावाक्य बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचाराचे सूत्र आहे. या घोषवाक्यात बाबासाहेबांचा
शिक्षणविषयक सिद्धान्त दडलेला आहे, असे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांनी म्हटले आहे.
"शिक्षणातल्या या संघर्षसिद्धान्ताची बाबासाहेबांनी तरफदारी के ली आहे. विषमताग्रस्त समाज
बदलण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. 'शिका,. संघर्ष करा व संघटित व्हा.' हे खरेतर तीन महाशब्द
आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचे जीवन अमूलाग्रपणे बदलायचे ठरविले होते. या
शब्दांमध्ये सखोलता व प्रखरता आहे."2 डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. आंबेडकरांच्या या घोषणेचा संबंध
फ्रें च राज्यक्रांतीने जगाला दिलेल्या 'स्वातंत्र्य, समता व बंधुता' या तीन महाशब्दांशी जोडतात.
शिक्षणाने समाजात समता येईल, स्वातंत्र्याची जाणीव होईल आणि विशेष म्हणजे बंधुता पेरली
जाईल हे बाबासाहेबांचे विचारसूत्र होते. बाबासाहेबांनी उच्चारलेल्या या तीन क्रांतिकारी शब्दांत

78
जगाला बदलवण्याची ताकत आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे सामाजिक तत्त्वज्ञान आणि त्यांचे
शैक्षणिक तत्त्वज्ञान एकमेकांपासून वेगळे करता येत नाही.
बुद्ध, कबीर आणि महात्मा फु ले यांना गुरुस्थानी मानून बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धाराचे जे
कार्य के ले, त्या कार्यात शिक्षणाला सतत अग्रक्रम दिला. दलित, पीडित समाज शिकल्याशिवाय
त्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता बहाल होणार नाही, हा बाबासाहेबांचा विचार होता. म्हणून
त्यांनी दलित समाजाच्या शिक्षणाच्या उद्धारासाठी काहीएक सूत्र मांडले.
१९१९ साली साऊथबरो कमिशनसमोर साक्ष देताना बाबासाहेबांनी जे निवेदन सादर के ले, त्या
निवेदनात 'दलितांसाठी शिक्षणाची उपलब्धता ही एक प्रमुख मागणी होती. शिक्षण हे के वळ वरिष्ठ $
$$$$
वर्गीयांपुरतेच मर्यादित राहता ते दलित-उपेक्षित वर्गालाही मिळायला हवे, असे या मागणीचे स्वरूप
होते. त्यांनतर १९२८ साली भारतात आलेल्या सायमन कमिशनसमोर मागण्या सादर करताना,
सक्तीचा प्राथमिक शिक्षण कायदा, दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, मागास विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्त्या आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दलिताना आरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या
बाबासाहेबांनी के ल्या होत्या. पुढे भारतीय संविधानाचा मसुदा तयार करून बाबासाहेबांनी घटना
समितीला सादर के ला, त्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा उल्लेख त्यांनी के ला आहे.
बाबासाहेबांच्या १९४७ साली लिहिलेल्या ‘स्टेटस् अॅन्ड मायनॉरिटीज' या ग्रंथात या गोष्टींचा
सविस्तर उल्लेख आलेला आहे. पुढे बाबासाहेब जेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी
भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जाती व जमातींसाठी शैक्षणिक, राजकीय आणि शासकीय सेवा या
क्षेत्रांमध्ये आरक्षणाची तरतूद करून घेतली. समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या उन्नतीची अशी
तरतूद जगातल्या कोणत्याही राज्यघटनेत नाही. भारतीय संविधानातील या तरतुदींमुळे भारतातील
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना शिक्षणाची दारे उघडी झाली.
शिक्षणातूनच भारतात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही उभी राहील, अशी अपेक्षा
बाबासाहेबांची होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद करून दलितांच्या
शैक्षणिक आणि सांस्कृ तिक उन्नतीचा जो पाया रचला त्याला तोड नाही. आरक्षणाच्या तरतुदीतून
बाबासाहेबांना सामाजिक समता अपेक्षित होती. जाती-जातीतील भेदभाव दूर करून माणूस म्हणून
एका समान पातळीवर लोकांना आणण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिले होते. आरक्षणाच्या
तरतुदीमुळे दलितांना शिक्षणात नोकरीत आणि राजकारणातही संधी मिळाल्या. गेल्या पन्नास वर्षांत
दलितांची जी उन्नती झाली ती बाबासाहेबांनी संविधानात दलितांना दिलेल्या मानवी हक्कांमुळेच.

79
आरक्षणातून बाबासाहेबांना भेदभाव संपवायचा होता. परंतु अद्याप ना भेदभाव संपला ना आरक्षण
संपले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात ज्या शैक्षणिक तरतुदी के ल्या आहेत, त्या
तरतुदी बारकाईने पाहिल्या तर काही महत्त्वाच्या बाबी समोर येतात. भारतीय संविधानातील डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी के लेल्या काही महत्त्वाच्या तरतुदी खालील प्रमाणे आहेत.
1) राज्य सर्व बालकांसाठी, त्यांच्या वयाची सहा वर्षे पूर्ण होईपर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्था
देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्याकरिता प्रयत्न करील. (भारताचे संविधान, अनुच्छे द
४५)

$$$$$
२) राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी, राज्यास विधिद्वारा निर्धारित करता येईल
अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतद करील. (भारताचे संविधान, मूलभूत हक्क-भाग
३, अनुच्छे द २१)

३) पूर्णतः राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण
दिले जाणार नाही. (भारताचे संविधान, मूलभूत हक्क भाग ३, अनुच्छे द -२८)
४) राज्याने मान्यता दिलेल्या किं वा राज्याच्या पैशातून साहाय्य मिळत असणाऱ्या कोणत्याही
शैक्षणिक संस्थेत जे काही धार्मिक शिक्षण दिले जाईल, त्यात भाग घेण्यास अथवा अशा
संस्थेत किं वा तिच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत, जी काही धार्मिक उपासना
चालविली जाईल, तिला उपस्थित राहण्यास, अशा संस्थेत जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने,
किं वा अशी व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने, आपली संमती दिली असल्याखेरीज
अशा व्यक्तीस तसे करणे आवश्यक के ले जाणार नाही. (भारताचे संविधान, अनुच्छे द-२८/३)
५) भारताच्या राज्यक्षेत्रात किं वा त्यांच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक
गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृ ती असेल, त्याला ती जतन करण्याचा
हक्क असेल. (भारताचे संविधान, अनुच्छे द - २९/१)
६) राज्याकडू न चालविल्या जाणाऱ्या किं वा राज्य निधीतून साहाय्य मिळत असलेल्या
कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास के वळ धर्म, वंश, जात, भाषा या किं वा
यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. (भारताचे संविधान, अनुच्छे द २९/२)
७) धर्म किं वा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या
शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. (भारताचे संविधान,
अनुच्छे द -३०)

80
८) राज्यघटनेतील भाग सतरा, प्रकरण १ व प्रकरण २ मध्ये संघराज्य व प्रादेशिक भाषेच्या
वापराबद्दल काही मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. यात संघराज्याची भाषा हिंदी असावी
असे नमूद के ले आहे. इंग्रजी भाषेचा वापर आवश्यक असला तरी हिंदी भाषेच्या विकासासाठी
बाबासाहेबांनी विशेष आग्रह धरलेला दिसतो. मातृभाषेच्या विकासाबद्दल बाबासाहेबांच्या
मनात विशेष आस्था होती.
भारतीय संविधानातील वरील नमूद के लेल्या तरतुदींचा बारकाईने विचार के ल्यास डॉ.
बाबासाहेबांनी योजलेल्या शैक्षणिक विचारसूत्राची सांगड सांस्कृ तिक व सामाजिक विकासाशी जोडता
येते. परंतु गेल्या सत्तर वर्षांत भारतीय शिक्षण व्यवस्थेने राज्यघटनेत सूचित के लेल्या किती तरतुदी
अमलात आणल्या? आणि किती तरतुदींची पायमल्ली के ली? हा प्रश्न आहे?
$$$$$
सहा ते चौदा वर्षे वयातील सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण असेल असे सूचित
करून भारतीय संविधानाने ही जबाबदारी राज्यांवर टाकली, परंतु या गोष्टीची अमलबजावणी
बहुतांशी राज्यांनी लवकर के लेली दिसत नाही. शिक्षणाच्या बाबतीत पहिली उदासीनता इथेच दिसते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शिक्षणसंस्था निधर्मी असाव्यात असा आग्रह भारतीय
संविधानात आहे. परंतु अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये निधर्मी वातावरण नसत. तिसरी गोष्ट म्हणजे
आरक्षणाबद्दल विशेष तरतूद राज्यघटनेत असूनही आरक्षणाचे नियम धाब्यावर बसविण्याचे प्रकार
शैक्षणिक संस्थांमध्ये होत नाही असे धाडसाने म्हणता येणार नाही. भारतातल्या कोणत्याही
नागरिकाला स्वतःची भाषा, लिपी व संस्कृ ती जतन करण्याचा अधिकार आहे, असे सूचित करून हिंदी
भाषेच्या विकासाबरोबर राज्यघटनेत मातृभाषेच्या शिक्षणातील वापराचे महत्त्वही विशद के लेले
आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषा धोरण काहीसे विवाद्य राहिले हे नक्कीच; परंतु बाबासाहेबांची
तळमळ भारताला राष्ट्राचा दर्जा देण्याची होती. जोपर्यंत भारत एका भाषेने, एका संस्कृ ती बांधला
जात नाही तोपर्यंत आपला देश राष्ट्र बनणार नाही, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. हा धोका
टाळण्यासाठी बाबासाहेबांनी एक उपाय सांगितला होता... तो म्हणजे, "कोणतीही प्रादेशिक भाषा त्या
राज्याची दप्तरी भाषा होऊ नये. त्यासाठी कोणतेही राज्य हा प्रयोग करणार नाही, याची राज्यघटनेत
तरतूद करून ठे वणे आवश्यक आहे. सर्व प्रांतांची भाषा एकच आणि ती म्हणजे हिंदी असावी आणि
त्या भाषेची अंमलबजावणी होईपर्यंत इंग्रजी चालू ठे वावी."3 डॉ. विजय खरे यांनी त्यांच्या 'डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा' ग्रंथात बाबासाहेबांचे भाषाविषयी विचार मांडले आहेत.
बाबासाहेबांच्या या मतावर अनेकांनी आक्षेप घेतले हे खरे आहे. परंतु आज बाबासाहेबांनी
सुचविल्याप्रमाणे भारतात ना हिंदी भाषेचा प्रसार झाला, ना प्रादेशिक भाषांचा विकास झाला. सारे
काही इंग्रजी भाषेने गिळंकृ त के ले आहे. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी भाषेचे विरोधक नव्हते. उलट

81
इंग्रजी भाषेचा पुरस्कार करून आधुनिक विचार आत्मसात के ले पाहिजेत अशी त्यांची विचारधारा
होती. परंतु मातृभाषा आणि राष्ट्रभाषा अवगत न करता इंग्रजीचा पुरस्कार म्हणजे सांस्कृ तिक
आत्महत्या ठरू शके ल, असे बाबासाहेबांना कदाचित सूचित करायचे होते. अभिव्यक्तीचे दरवाजे
स्वभाषेतून उघडले की परभाषेच्या मदतीने आधुनिक ज्ञानाचे महाद्वार उघडेल, अशीही आशा
बाबासाहेबांना वाटत असावी; पण झाले मात्र उलटे.
मराठी माध्यमांच्या शाळांची वाताहात होत असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या
वाढवून शासनाला आर्थिक विकास साधायचा की सामाजिक विकास? भारतातील प्रत्येक नागरिकाने
हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला नाही तर भारतीयांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करुन पुढे एक
संस्कृ ती उभी राहणार नाही. बाबासाहेबांच्या या इशाऱ्याकडे कमालीचे दुर्लक्ष करून अनेक राज्ये $$$$
$
एकमेकांत भांडत बसली, भाषिक, प्रादेशिक आणि वांशिक वाद निर्माण झाले. 'एक भाषा एक राज्य'
या तत्त्वाला बाबासाहेबांचा विरोध होता हे स्पष्ट करताना डॉ. विजय खरे नोंदवतात की, "आज
भारताला स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षे झालीत तरी सर्व भारतीयांमध्ये भारतीयपण आलेले नाही. प्रांतीय
व भाषीय वादामुळे कितीतरी वेळा बळाचा वापर करावा लागलेला आहे. आजही दक्षिण भारतात हिंदी
फार कमी प्रमाणात बोलली जाते. महाराष्ट्रातही मध्यंतरी भाषेच्या आणि प्रांताच्या नावाने संघर्ष
निर्माण झालेला होता. परिणामी अंतर्गत सुरक्षेला व विकासाच्या प्रक्रियेला त्यामुळे मोठा धक्का
बसलेला आहे, हे आपण अनुभवलेले आहे. ६२ वर्षांचा इतिहास पाहता भाषिक वादांमुळे विविध संघर्ष
झाले आहे. परिणामी राष्ट्रीय सुरक्षेपुढे आव्हानेही निर्माण झालेली आहेत. के वळ हिंदी चित्रपटांद्वारे
बहुसंख्य भारतीयांपर्यंत हिंदी भाषा पोहचली आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय भाषेविषयीची
आत्मीयता असूनही तिचा वापर सर्व भारतीयांमध्ये नसल्याकारणाने विविध समस्या अंतर्गत
सुरक्षेपुढे निर्माण झाल्या आहेत."4 डॉ. खरे यांनी भाषेचा संबंध अंतर्गत सुरक्षेशी जोडला आहे. हे
विवेचन लक्षात घेतले तर असे दिसते की, डॉ. आंबेडकरांनी हिंदी भाषेचा आग्रह भारताच्या
एकतेसाठी, अखंडतेसाठी धरला होता. उलट बाबासाहेबांच्या भाषिक धोरणावर आक्षेप घेत हिंदी
भाषेचा विकास झाला नाहीच पण भारतातल्या प्रत्येक राज्याने आपापल्या मातृभाषेकडेही पुरेसे लक्ष
दिलेले दिसत नाही. इंग्रजी भाषा जगाच्या व्यवहाराची भाषा आहे हे खरे आहे परंतु ती भारतीयांच्या
समग्र सांस्कृ तिक विकासाची भाषा नाही हेही कधीतरी मान्य करून ठोस पावले टाकण्याशिवाय आज
गत्यंतर दिसत नाही. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा असते. ज्ञानाचे सर्व स्रोत मातृभाषेतून
मिळतात. त्यामुळे मातृभाषेकडे दुर्लक्ष करून आपण आपली फार मोठी सांस्कृ तिक व सामाजिक हानी
करून घेत आहोत. आजही महाराष्ट्राच्या शाळा-महाविद्यालयात मातृभाषेच्या विकासाचे दीर्घकालीन

82
कृ तिकार्यक्रम सातत्याने राबविले जातात, असे म्हणता येत नाही. उलट अनेक शाळा-
महाविद्यालयात मराठी आणि हिंदी भाषा विभाग अडगळीला बसवलेले दिसतात.
महात्मा फु ले म्हणाले होते की, सरकारकडे आई-वडिलांसारखी दृष्टी असावी लागते. पण
सरकारकडे ही दृष्टी नाही. पदरमोड करून बहुजनसमाजाच्या शिक्षणाची जबाबदारी शासनानं घ्यावी
असा फु ल्यांचा आग्रह होता. पण अलीकडे खासगीकरणाच्या रेट्यात सरकार नावाची संस्था क्षीण होत
आहे. शिक्षणातून निवृत्त होण्याचे वेध सरकारला लागले आहेत. त्यामुळे के जी ते पिजीपर्यंत सारे
शिक्षण खासगी संस्थांतर्फे सुरू आहे उद्योगपती आता शिक्षणाचे अहवाल तयार करत आहेत. यंत्र व
मार्के टच्या जोरावर जग चालवू पाहणाऱ्यांची नवी ग्लोबल शासनसंस्था जन्माला आली आहे.
१९७० पासून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना अनेक खासगी संस्था उभ्या राहिल्या.
१९९१ नंतर या खासगी संस्थांना अधिक बळ मिळाले. आणि आता जागतिकीकरणात याच $$$$$
सरकारमान्य खासगी आणि अभिमत संस्था शिक्षण क्षेत्रात सर्वेसर्वा बनल्या आहेत. अशा वेळी
सरकारी शाळांची दुरावस्था, सुविधांचा आणि प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव अशा गर्तेत सरकारी शिक्षण
अडकले आहे. समाजातला गरीब वर्ग जो सरकारी शाळेकडे जातो, त्याला मिळणारे शिक्षण आणि
खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जाणाऱ्या श्रीमंतवर्गाला मिळणारे शिक्षण यात प्रचंड तफावत
दिसत आहे. महाराष्ट्राचे उदाहरण द्यायचे झाल्यास शिक्षणावर महाराष्ट्र शासनाचे दरवर्षी किमान
४८ ते ५० हजार कोटी रुपये खर्च होतात. हा पैसा नेमका कु णासाठी वापरला जातो हे शोधणे अवघड
आहे. महाराष्ट्रात शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे हे वेगळे सांगायला नको. भारतातल्या इतर
राज्यातही बहुतांशी अशीच अवस्था आहे. शैक्षणिक बजेटमधला सर्वांत जास्त खर्च उच्चशिक्षणावर
होतो. पण आज उच्चशिक्षणात दलित-उपेक्षित मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांना मिळणाऱ्या
नोकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे, अशीही निरीक्षणे पुढे येत आहेत.
यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज'
या संस्थेने २०१३ पर्यंत के लेल्या पाहणीत काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांच्या
निरिक्षणात "भारतदेखील असा देश आहे की ज्याने उपेक्षित गटांच्या सबलीकरणासाठी (उदा.
अनुसूचित जाती व जमाती) आरक्षणाचे धोरण राबविले आहे. परंतु इतर देशांतील उपाययोजना आणि
भारतातील उपाययोजना यांच्यामध्ये फरक असा आहे की भारत सरकारने सबलीकरणाच्या
उपाययोजना के वळ सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवहारापुरत्या योजिल्या आहेत. वास्तविक
पाहता भारतातील खासगी क्षेत्र खूप मोठे आहे आणि ९०% अनुसूचित जाती व जमातींच्या गटांतील
लोकसंख्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करते. या संदर्भात एक महत्त्वाचे वास्तव असे आहे की खासगी
क्षेत्रातील अनुसूचित जाती व जमातीतील काम करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण
उपलब्ध नाही. आणखी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, भारत सरकारने स्वीकारलेल्या

83
जागतिकीकरणाच्या धोरणामुळे सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्र दिवसेंदिवस संकु चित होत जात
आहे. त्यामुळे जो काही थोडाबहुत अवकाश अनुसुचित जाती-जमातींच्या समाजगटांना मिळाला होता
तोदेखील कमी होत आहे.”5 डॉ. सुखदेव थोरात यांचे हे निरीक्षण पाहिले तर असे लक्षात येते की डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी कायदे करून समाजात सामाजिक समता प्रस्थपित करण्याचा
जो प्रयत्न के ला, तो प्रयत्न भांडवलशाही, आधुनिकीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाने
पूर्णपणे उद्ध्वस्त के ला आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षणाची मागणी करून हा लढा
व्यापक के ल्याशिवाय समाजातल्या खालच्या वर्गाला दुसरा पर्याय दिसत नाही.

$$$$$
३. बाबासाहेबांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान त्यांच्या सामाजिक विचारांपासून वेगळे
काढता येत नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य, समता आणि
बंधुतेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. याविषयी दि. ३ ऑक्टोबर १९५४ रोजी आकाशवाणी दिल्ली
कें द्रावरून के लेल्या भाषणात डॉ. आंबेडकर म्हणतात, "स्वातंत्र्य, समता आणि समभाव. हे फ्रें च
राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये.
तसे मी के लेले नाही, असे मी निक्षून सांगतो माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात
आहे. माझे गुरू भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतून हे तत्त्वज्ञान मी स्वीकृ त के ले आहे."6 डॉ.
आंबेडकरांच्या विचारात स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्याचा वापर स्वैरचारात होऊ नये
म्हणून ते समतेला स्वातंत्र्यापेक्षा वरचे स्थान देतात; परंतु अमर्याद समताही स्वातंत्र्याच्या आड येऊ
शकते म्हणून त्यांनी बंधुभावाला सर्वोच्च स्थान दिलेले दिसते. कायद्याचा धाक दाखवून स्वातंत्र्य व
समतेचा विचार अमलात आणता येईल; परंतू त्याला बाबासाहेब बंधुतेची जोड देतात. बंधुता म्हणजे
सहभाग, एकमेकांबद्दल प्रेमभाव. हा प्रेमभाव नसेल तर स्वातंत्र्य आणि समतेच्या कल्पनेला अर्थ
राहणार नाही, असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. बंधुता हे धर्माचे दुसरे नाव आहे असेही बाबासाहेब
म्हणाले, परंतु बाबासाहेबांना भारतात प्रचलित असलेल्या कर्मठ धर्माचे आचरण म्हणजे बंधुता
अपेक्षित नव्हती. माणसा-माणसात प्रेम निर्माण करणारा, त्याला सदाचार आणि शांतीचे तत्त्वज्ञान
देणारा धर्म समाजात बंधुता पेरू शकतो अशी बाबासाहेबांची धारणा होती. या अर्थाने बाबासाहेबांना
अपेक्षित असणारे धम्माचरण भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीत मिळते. म्हणून बाबासाहेबांचा बुद्ध
धम्माचा स्वीकार म्हणजे के वळ हिंदू धर्मातील जाचक प्रथांना नकार असे समजण्यात अर्थ नाही. बुद्ध
धम्म हा संपूर्ण मानवजातीला बंधुतेची शिकवण देतो. या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे

84
जीवनविषयक तत्त्वज्ञान भगवान बुद्धांच्या विचारांवर उभे आहे. बाबासाहेबांच्या जीवन विषयक
तत्वज्ञान त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान सामावलेले आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात राजकीय ध्येयवादाला महत्त्व
देताना दिसतात. हा ध्येयवाद भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीतून येईल असा विश्वास त्यांना
वाटत होता. राज्यघटनेच्या मूल्यांतून प्रक्षेपित झालेल्या लोकशाही युक्त राजकीय ध्येयवाद आणि
धर्मांच्या आचरणातून येणारा सामाजिक ध्येयवाद या दोन्हींचे नेहमीच संघर्ष झालेले आहेत. न्याय,
स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे रोपण करणारा राजकीय ध्येयवाद नेहमीच सनातनी धर्मांध वृत्तीने
नाकारला आहे. धर्माचे, जातींचे पुंजके उभे करून माणसाला बंधुतेकडे जाऊ द्यायचे नाही असेच या
वृत्तीने ठरविले आहे. समाजातील ही विसंगती दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण $$$$$
भारतीयांच्या हातात संविधान देऊन एक सुंदर आचारसंहिता दिली आहे. शिक्षणाने या लोकशाही
युक्त सुंदर आचारसंहिता वर अधिक विश्वास वाढावा हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता. शिक्षणाने
माणसाला जखडू न ठे वलेल्या जाती धर्मांच्या बंधनांना झुंजारण्याचे बळ मिळावे. उद्याचा सुंदर
समाज निर्माण करण्यासाठी त्याच्या मनात बंधुता काठोकाठ भरावी आणि यातूनच भारत राष्ट्र
म्हणून अभिमानाने उभे रहावे. असे बाबासाहेबांना अपेक्षित होते. बाबासाहेबांचे गुरू महात्मा फु ले
यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व विनाशाचे कारण अविद्या आहे. या मूलमंत्राला सैद्धान्तिक रूप देऊन
बाबासाहेबांनी भारतीय संविधानात समाजातल्या मागासवर्गाला शिक्षणाचे आणि आरक्षणाचे
अधिकार बहाल के ले आहेत.

४. विद्यार्थी व शिक्षक कसा असावा?


ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न आणि विचारसंपन्न विद्यार्थी असावा? हे डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी के वळ सांगितले नाही तर ते त्यांनी आपल्या कृ तीतून दाखवून दिले. विद्यार्थी कसा
असावा, त्याने शिक्षण घेताना काय करावे? याविषयी बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांनी
दिलेली चार भाषणे अधिक महत्त्वाची आहेत. ११ सप्टेंबर १९३८ रोजी पुणे येथे झालेले 'अस्पृश्य
विद्यार्थी संमेलन', त्यानंतर १० डिसेंबर १९३८ रोजी याच स्वरूपाचे मुंबई येथे झालेले 'अस्पृश्य
विद्यार्थी संमेलन', तसेच १२ फे ब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झालेली 'मुंबई इलाखा अस्पृश्य युवक
परिषद' आणि २ जानेवारी १९४५ रोजी कलकत्ता येथे 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टस स्टु डन्ट्स
फे डरेशनच्या' वतीने घेतलेल्या जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भाषणे के ली या
भाषणांमध्ये बाबासाहेबांनी मांडलेले शैक्षणिक विचार समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहेत.

85
आपण शिकायचे का? असा सवाल करत बाबासाहेब विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांच्या भाषणात
सांगतात, "नुसत्या बी. ए. होण्यामुळे तुम्हास नोकरी मिळणार नाही. पुढारलेल्या जातींच्या लोकांशी
स्पर्धा करून तेथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचे चीज होणार नाही... "म्हणून तुम्ही
जे शिक्षण घेता ते असे घ्या की त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत. अडाणी
आईबापाच्या पोटी जन्म घेऊन जर बी. ए. झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका. आपल्या
कर्तव्याची जाणीव ठे वून झटू न अभ्यास करा."7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनात
आत्मविश्वासाला नेहमीच महत्त्व देत होते. माणसाने आत्मविश्वास गमावता कामा नये.
आत्मविश्वासाला परिश्रमाची जोड मिळाली की माणूस कितीही मोठे काम करू शकतो. त्यामुळे
विद्यार्थी जीवनात आत्मविश्वास आणि अभ्यास करण्याची वृत्तीने यामुळे विद्यार्थी जग जिंकू

$$$$$
शके ल असे बाबासाहेबांना वाटत होते. के वळ आपण मिळविलेल्या पदवीला ज्ञान समजू नये. एखादी
पदवी म्हणजे ज्ञान मिळविण्याची के वळ साधनसामुग्री आहे. एखादी पदवी मिळवून नोकरी प्राप्त
करणे आणि के वळ आपल्या कु टुंबाचे पालनपोषण करणे, असा शिक्षणाचा मतलबी अर्थ विद्यार्थ्यांनी
घेऊ नये. शिक्षण घेणं म्हणजे शहाणं होऊन विचार करणं आहे. समाजाचा आणि शिक्षणाचा अत्यंत
जिव्हाळ्याचा संबंध आहे असे बाबासाहेब नेहमी सांगत. के वळ आपलीच नव्हे तर आपल्या संपूर्ण
समाजाची उन्नती करणे हा शिक्षणाचा मूळ हेतू प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठे वायला पाहिजे. कष्ट
करा, आळस झटकू न टाका आणि आपले शील जपा, हा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. (११/९/१९३८ :
पुणे, अस्पृश्य विद्यार्थी संमेलन भाषण) चारित्र्याशिवाय विद्या उपयोगाची नाही. विद्या हे शस्त्र आहे.
चारित्र्य गमवलेली माणसं आपल्या हुशारीच्या जोरावर, विद्येचा दुरुपयोग करून समाजाचा घात
करू शकतात. म्हणून शिक्षणाचा उपयोग जसे आपले पोट भरण्यासाठी के ला पाहिजे, तसाच तो
समाजाच्या जागृतीसाठीही के ला पाहिजे, असे बाबासाहेब सतत सांगत होते.
शिक्षणाने समाज सुधारेल असा आत्मविश्वास बाबासाहेबांना होता. म्हणून बाबासाहेबांच्या
शैक्षणिक विचारात समाजाला सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे. समाजात ऐक्याची सर्वांत मोठी गरज
आहे. त्यासाठी विद्यार्थिवर्गाने कार्यरत असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण घेणारा विद्यार्थी सामाजिक
जाणिवेने संघटित झाला पाहिजे. समाजातल्या प्रश्नांबद्दल त्याने आस्था दाखविली पाहिजे, ते प्रश्न
सोडविण्यासाठी वेळप्रसंगी तो रस्त्यावरही आला पाहिजे. थोडक्यात, विद्यार्थी संघटित होऊन
संघर्षालाही सज्ज झाला पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते. आपला हेतू उदात्त ठे वा,
सत्याचा मार्ग सोडू नका. समाजात सर्वत्र असत्य पसरलेले दिसत असले तरी सर्वांत शेवटी सत्याचाच
विजय होत असतो. त्यामुळे सत्यावर पूर्णपणे विश्वास ठे वा. असत्त्याच्या मागे लागून आपले वर्तन
दुटप्पी ठे वू नका. आपले वर्तन दुटप्पी आहे असे जगाच्या लक्षात आले तर आपल्यावर कु णीही

86
विश्वास ठे वणार नाही. असे सूचित करत बाबासाहेब शिक्षणातून होणाऱ्या बाह्यबदलांपेक्षा आंतरिक
परिवर्तनाला अधिक महत्त्व देताना दिसतात.
शिकलेल्या माणसांबद्दल बाबासाहेबांना भीती वाटत होती. या भीतीची कारणे काय आहेत
याविषयी बाबासाहेबांचे उद्गार फार महत्त्वाचे आहेत. "आपल्यापैकी दरेकाने सुविद्य व्हावे अशी
माझी फार इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर आज विद्येची मला मोठी भीती वाटते... शिक्षण हे शस्त्र
आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्वजण त्यास घाबरून जाल. परंतु
विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू
शके ल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम, परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे
बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्र पशूपेक्षाही क्रू र व $$
$$$
भीतिप्रद समजण्यात यावा... तसेच आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या
उद्धारार्थ न करिता जर शिकू न आपली नोकरी भली आहे, आपली बायकामुले भली, या भावनेने आजचे
शिकलेले तरुण वागणार असले तरी त्यांचा समाजाला काय उपयोग?"8 म्हणून तरुणांनी त्यांच्यावर
पडलेली सामाजिक जबाबदारी ओळखून आज वागले पाहिजे.
विद्यार्थिदशेत असताना विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये असे बाबासाहेबांनी लिहून
ठे वले आहे. शिक्षण घेताना विद्यार्थी राजकारणात पडला की अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो आणि यातून
त्याची ना शैक्षणिक प्रगती होते ना, समाजाची प्रगती होते म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष करून
विद्यार्थ्यांनी राजकारणात पडणे गैर आहे, असे बाबासाहेबांना वाटत होते. पण राजकारण हे आपल्या
विकासाची गुरुकिल्ली आहे असेही बाबासाहेबांनी नमूद के ले आहे. शिक्षण घेतल्यानंतर मात्र आपली
राजकीय विचारदृष्टी निश्चित करून योग्य तो हस्तक्षेप करून चांगल्या माणसांना निवडू न देण्याचे
कर्तव्य प्रत्येक शिक्षित माणसाने के ले पाहिजे असेही बाबासाहेबांनी अधोरेखित के ले आहे.
समाजातल्या मागास लोकांना राजकीय सत्तेची किती गरज असते, याविषयी ४ ऑक्टोबर
१९४५ रोजी पुणे येथे 'आगामी निवडणुका' या विषयावर झालेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर
म्हणतात, "राजकीय सत्तेशिवाय आपणास काही करता येणार नाही. म्हणून आपण राजकीय
सत्तेसाठी झगडले पाहिजे. (Politics should be the life-blood of the scheduled castes)
आपला जो नाश झाला आहे, आपण आज हजारो वर्षे खितपत पडलो आहोत त्याचे कारण आपणास
राजकीय सत्ता नव्हती. ही सत्ता आपण मिळविली पाहिजे. राजकीय सत्ता ही एक अजब शक्ती
आहे. तिचा उपयोग आपण आपल्या शत्रूवर के ला पाहिजे” विद्यार्थिदशेत विद्यार्थ्यांना के वळ
9

ज्ञानाजन्नाकडे लक्ष कें द्रित करायला हवे; परंतु विद्यार्थिदशेनंतर मात्र आपण सामाजिक भान
जपायला पाहिजे, असे बाबासाहेबांना सूचित करायचे होते. शिकलेल्या प्रत्येक माणसाला त्याची

87
स्वतःची एक स्वतंत्र वैचारिक भूमिका असावी. त्यातून त्याची स्वतःची राजकीय भूमिका निर्माण
व्हावी. राजकारणाच्या दोऱ्या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत, असेही बाबासाहेबांनी सूचित
के ले आहे.
१९२३ ते १९३७ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अध्यापनाशी संबंध होता. या काळात
मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमध्ये ते प्रोफे सर होते. नंतर येथील लॉ कॉलेजचेही ते प्रिन्सिपल होते.
'आदर्श शिक्षक कसा असावा' हे बाबासाहेबांनी के वळ सांगितले असे नाही तर ते त्यांनी आपल्या
कृ तीतून दाखवून दिले. वर्गात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पूर्वतयारीची किती आवश्यकता असते हे
बाबासाहेब त्यांच्या भाषणातून नेहमी सांगत. २० जून १९४६ रोजी मुंबईतील सिद्धार्थ
महाविद्यालयाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी के लेल्या भाषणात प्राध्यापकाची भूमिका $
$$$$
काय असावी?, याविषयी त्यांनी के लेले भाष्य फार महत्त्वाचे आहे. "राजकारणी पुरुषाला प्रचारकार्य
करणे अत्यंत आवश्यक असते. पण त्याच्या उलट प्राध्यापकाला कधीच प्रचारकार्य करता येत
नाही.”10 थोडक्यात, शिक्षकाने राजकारणात पडू नये किं वा कोणत्याही एकांगी विचाराचा प्रचारक असू
नये असे बाबासाहेबांनी सूचित के ले आहे.
याच भाषणात शिक्षकाचा धर्म कोणता असावा या विषयी बाबासाहेबांनी पुढे म्हटले आहे की,
सत्य आणि सत्ता या परस्पराविरोधी गोष्टी आहेत. सत्य पूर्णतः पूर्ण नसते ते कालपरत्वे बदलत
असते. म्हणून शिक्षकाने पुन्हा पुन्हा सत्याच्या शोधात रममाण झाले पाहिजे. सत्य शोधून काढणे
हाच खरा धर्म आहे, असे मानले पाहिजे. हे सांगताना बाबासाहेबांनी गौतम बुद्धाच्या अखेरच्या
संवादाचा दाखला दिला. बुद्धांचे शिष्य आनंद यांनी बुद्धांना विनंती के ली की आमच्या अनेक शंका
बाकी आहेत. आम्हाला अद्याप परिपूर्ण ज्ञान मिळाले नाही. त्यामुळे बुद्धांनी इतक्या लवकर निर्वाण
घेऊ नये. यावर बुद्धांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे. ते म्हणाले "तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठे वा व
त्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचे प्रश्न तुम्हालाच आपोआप सोडवता येतील, म्हणजे के वळ एखादी
गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहिजे, असे तुम्ही बिलकू ल मानू नका. ती गोष्ट
तुमच्या विचारशक्तीला, तुमच्या तर्क शक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना. नाही तर तुम्ही
ती खुशाल टाकू न द्या. हीच माझी शिकवण आहे."11
बाबासाहेबांनी ही कथा सांगून प्राध्यापकांना उद्देशून जे सांगितले ते शिक्षकाचे आचरण
असायला हवे. ते पुढे म्हणाले, “गौतम बुद्धाच्या या म्हणण्याचा काय अर्थ आहे बरे? त्याचा अर्थ असा
आहे की प्रत्येक मनुष्याला विचारस्वातंत्र्य आहे पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन
करण्यात के ला पाहिजे. आणि सत्य म्हणजे तरी काय बरे? सत्य हेच आहे की मनुष्याच्या
पंचज्ञानेंद्रियांना व पंचकर्मेंद्रियांना ते सत्य पटले पाहिजे. म्हणजे ते सत्य पाहता आले पाहिजे. ऐकता

88
आले पाहिजे, त्याचा स्वाद घेता आला पाहिजे व त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला साक्ष पटविता
आली पाहिजे"12 थोडक्यात, शिक्षकाने काहीही झाले तरी सत्यापासून दूर जाऊ नये. बाबासाहेबांचे हे
म्हणणे एका नैतिक अधिकारावर उभे आहे. परंतु आज मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. शिक्षण
क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी किं वा वरच्या पदावरील बढती मिळवण्यासाठी वा आर्थिक
फायद्यासाठी किं वा वरिष्ठांचे म्हणणे धादांत खोटे असले तरी त्याला खरे म्हणून वावरणारी खोटारडी
शिक्षकमंडळी नक्कीच कमी नाहीत.
दुसऱ्या एका सेंट झेवियर कॉलेजमधील भाषणात बाबासाहेबांनी प्राध्यापकांना उद्देशून जे
उद्गार काढले ते तर प्रत्येक प्राध्यापकाने काळजात कोरून ठे वण्यासारखे आहेत. बाबासाहेब म्हणाले,
"माझे तर असे मत आहे की प्रोफे सरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके $$
$$$
वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळी सवडच मिळता कामा नये. ते काम संपूर्णपणे
त्यांच्या पत्नीवरच सोपविण्यात आले पाहिजे. प्रोफे सर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या
जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाच वाढवीत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये
संशोधनही आलेच. या तीन गोष्टींखेरीज प्रोफे सरांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये"13 पुन्हा
एकदा बाबासाहेबांचे विचार आणि आजचे शैक्षणिक वास्तव यामध्ये प्रचंड मोठी फारकत झालेली
दिसेल. बिल्डर प्राध्यापक, आयुर्वेदिक औषधे विकणारे प्राध्यापक, रियल इस्टेटमधील दलाल
प्राध्यापक, व्यापारी प्राध्यापक, राजकीय प्राध्यापक अशा अनेक उपाध्या प्राध्यापकांनी नको ती कामे
करुन मिळविल्या आहेत. के वळ नैमित्तिक तास घेणे, पगार घेऊन के वळ घर-संसार मोठा करण्यात
यात सुखाने रममान झालेले प्राध्यापकही अधिक आहेत. शिवाय शाळा-महाविद्यालयात अध्ययन
आणि अध्यापनाकडे दुर्लक्ष करून खोट्या प्रतिष्ठे च्या पदांवर रममान होऊन मुजोरी सामंती थाट
मिरवणारे शिक्षक पावलोपावली भेटतात. शाळा-महाविद्यालयातील प्रचारकी कामे करून अनेक
चांगल्या शिक्षकांनी आपल्या विवेकाला आणि सार्वजनिक सत्याला गुंडाळून ठे वलेले दिसते.
संस्थाचालकांच्या दृष्टीने आदर्श असणारे शिक्षक आपल्या उच्चतम शैक्षणिक पदव्या घेण्यात मागे
राहिले आहेत, असेही निरीक्षण पुढे येत आहे.
शिक्षक असणं ही गोष्ट प्रतिष्ठे ची नक्कीच आहे; परंतु के वळ प्रतिष्ठे च्या अतिरेकी प्रेमात
अडकल्याने अनेक शिक्षकांच्या आचरणातून ज्ञानलालसा हद्दपार झाली आहे, असेही बोलले जाते.
त्यामुळे सामाजिक जाणिवेचा, समाज परीवर्तनाचा आणि बांधिलकीचा अत्यंत वरवरचा देखावा
शिक्षक करतात, अशीही समाजात कु जबूज ऐकायला मिळते. शिक्षकाच्या पदरी ही नामुश्की येण्याची
कारणे अनेक आहेत, यासाठी के वळ तेच जबाबदार आहेत असे म्हणणे अन्यायाचे होईल. सातत्याने
बदलणारे शासकीय नियम, त्यांच्यावर टाकलेल्या शालाबाह्य सक्तीच्या कामांच्या जबाबदाऱ्या,

89
अभ्यासमंडळांचे राजकारण, अभ्यासक्रमातील फोलपणा, शिक्षणात सत्तेचा हस्तक्षेप, शिक्षकाच्या
कामाच्या यांत्रिक मोजपट्टया, परीक्षा पद्धती आणि परीक्षांचे बदलते स्वरूप, या साऱ्याच गोष्टींनी
शिक्षकातला विचारी माणूस डिलीट करून त्याला मशिन करण्यात कमालीचा विजय मिळविलेला
दिसतो.
खासगी आणि भांडवली दुनियेच्या हस्तक्षेपाने शिक्षण क्षेत्राचा उद्योग के ला आहे.
शिक्षणातील अनेक गोष्टींचा इव्हेन्ट करून त्यातील मूळ उद्देशाला गायब करून के वळ गल्ला
भरण्याचे काम के ल्याचे निदर्शनात येत आहे. पण असे असूनही या क्षेत्रात के वळ अंधार आहे असे
म्हणण्याचे कारण नाही. बाबासाहेबांना अपेक्षित असणारे शिक्षक आजही दिसतात. अर्थात त्यांची
संख्या तुलनेने कमी आहे, पण ते आहेत. के वळ वाचन-लेखन आणि विचारप्रक्रियेला जोडलेले शिक्षक
$$$$$
आहेत. ज्ञानार्जनासाठी स्वतःला मिळणाऱ्या अनेक प्रतिष्ठे च्या पदांना, आर्थिक लाभांना नाकारणारे
शिक्षक आहेत. नको ते उद्योग न करता आपल्या घरी स्वतंत्र ग्रंथालय करून नित्यनियमाने
संशोधनात गुंतलेले शिक्षक आहेत. आपल्या विद्वत्तेने विद्यार्थ्यांच्या मनात आदरयुक्त भीती
निर्माण करणारे शिक्षक आहेत. या समाजभानी शिक्षक-प्राध्यापकांच्या सकारात्मक हस्तक्षेपातून
शिक्षण क्षेत्रात गायब झालेला आदर्शवाद पुन्हा उभा राहील अशी आशा करायला हरकत नाही.

५. उच्चशिक्षणाबद्दल बाबासाहेबांचे विचार


मुंबई विद्यापीठ सुधार समितीने देशातील ३२१ विद्वानांना ५४ प्रश्न विचारले. या
अहवालातील काही निवडक प्रश्नांची लेखी उत्तरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. या प्रश्नांचा
सारांश बघता बाबासाहेबांना उच्च-शिक्षणाबद्दल काय म्हणायचे होते हे लक्षात येते. विद्यापीठ
शिक्षणाचे ध्येय काय असावे? या प्रश्नाला बाबासाहेबांनी दिलेले उत्तर असे आहे की, "विद्यापीठात
दिले जाणारे शिक्षण समाजाभिमुख असावे, ते विज्ञाननिष्ठ आणि पक्षपातविरहित असावे.
कोणत्याही विशिष्ट समाजघटकाच्या हितसापेक्ष नसावे. शिक्षणाचा उद्देश वस्तुस्थितीपूरक माहिती
पुरविणे किं वा काही सिद्धान्त शिकविणे हा नसावा तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होईल,
त्यांच्या मानसिक, बौद्धिक क्षमतांची वाढ होईल, प्रस्थापित अधिकारी विद्वानांच्या विचारांचे
टीकात्मक परीक्षण करण्यास ते समर्थ होतील असे असावे”14 याच प्रश्नावलीत बाबासाहेबांना दुसरा
प्रश्न विचारला होता की, विद्यापीठ शिक्षणाच्या अपयशाची जबाबदारी कोणाची? यावर बाबासाहेब
लिहितात, विद्यापीठ शिक्षणाच्या या अपयशाकरिता काही प्रमाणात शिक्षण पद्धती व शिक्षकांची
प्रवृत्ती जबाबदार आहे, तसेच विद्यापीठात प्रवेश घेणारे विद्यार्थी व त्यांच्या प्रवृत्तीही याकरिता
उत्तरदायी आहे. त्याचबरोबर विद्यापीठात प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा व

90
स्थितीही याकरिता उत्तरदायी आहे. तरीही माझ्या मते या अपयशाचे मूळ शिक्षण व व्यवस्थापन
यंत्रणेतच आहे.”15 विद्यापीठ म्हणजे के वळ विद्वानांचा समूह राहू नये, हे बाबासाहेबांचे म्हणणे
उच्चशिक्षणाबद्दल असले तरी त्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून सुरू व्हावी हे गृहीत आहेच.
शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व या गोष्टीला बाबासाहेब अधिक महत्त्व देताना दिसतात.
पदव्युत्तर शिक्षणाबद्दल बाबासाहेबांचा खूप सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यांनी स्वतः इंग्लंड
आणि अमेरिके त जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीनंतरच्या
शिक्षणासाठी परदेशात जावे, त्यासाठी त्यांना आवश्यक त्या शिष्यवृत्त्या दिल्या जाव्यात असे
बाबासाहेबांचे विचार होते. 'पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात विभाजन नसावे, असे विभाजन के ले तर
शिक्षण आणि संशोधन यात विभाजन होईल; कारण एखाद्या पदवीचा अभ्यास म्हणजे शिक्षण आहे
$$$$$
तर पदव्युत्तर अभ्यास म्हणजे संशोधन आहे.' १९११ साली स्थापन करण्यात आलेल्या लंडन शिक्षण
आयोगाचा दाखला देत बाबासाहेबांनी हे मत मांडले आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण वेगळे
के ल्याने बाबासाहेब म्हणतात की 'संशोधनाला शिक्षणापासून वेगळे के ले जाते तेव्हा संशोधन कार्याची
अपरिमित हानी होते.' पुढे विद्यापीठ सुधारणा समितीच्या काही प्रश्नांना उत्तर देताना बाबासाहेबांनी
महाविद्यालयाचे, विद्यापीठ कार्य, विद्यापीठातील अधिकार मंडळे, प्राध्यापकांचे व्यक्तिमत्त्व,
त्यांची कर्तव्ये, संस्थाचालकांची भूमिका अशा महत्त्वाच्या विषयांवर आपली मते मांडली आहेत.
यातील निवडक मते सारांशरूपाने अशी आहेत.
१) विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने प्रथितयश प्राध्यापकांनी पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शिकविणे
आवश्यक आहे.
२) प्राध्यापकांपेक्षा कोणतीही उच्चश्रेणी विद्यापीठ शिक्षकांकरिता असू नये, अन्यथा विद्यापीठ
शिक्षणाचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे.
३) पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणात फारकत नसावा. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवीपूर्व
विद्यार्थ्यांपासून वेगळे काढल्याने त्यांचे अतोनात नुकसान होते. यासाठी बाबासाहेबांनी लंडन
विद्यापीठाचा दाखला देऊन स्पष्ट के ले की, "लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन
आलेले अनेक भारतीय आपल्या विषयात प्रावीण्य मिळविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या
या अपयशाचे प्रमुख कारण म्हणजे प्रगत संशोधन कार्यासाठी आवश्यक असलेले त्यांचे
पदव्युत्तर शिक्षण हे अत्यंत असमाधानकारक आणि अपुरे आहे. म्हणून चांगल्या पदव्युत्तर
संशोधन शिक्षणासाठी अधिक चांगले व प्रगत आणि दर्जेदार पदवीचे शिक्षण असावे तसेच
विद्यार्थ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना परीक्षेशिवाय त्या विद्यार्थ्याने के लेले शोधकार्यही

91
विचारात घ्यावे. स्थानकोत्तर पदवीसाठी प्रबंध लेखन व मौखिक परीक्षा घेतली जावी," असेही
बाबासाहेब सूचित करतात.
४) महाविद्यालयांची व्यवस्थापन मंडळे शिक्षकांची नियुक्ती करताना आपणास सर्वोत्कृ ष्ट
व्यक्तीची निवड करायची आहे, या भावनेतूनच शिक्षकाची निवड करतील असे नाही.
५) शिक्षकांच्या नियुक्ती, बढती, वेतनश्रेणी आणि सेवाज्येष्ठता या गोष्टी व्यवस्थापन मंडळे,
शासकीय शिक्षण सेवा विभाग आणि शिक्षण क्षेत्रातील निरीक्षण अधिकारी यांच्या हातात
सोपविल्याने शासनाच्या इतर विभागांच्या प्रमाणेच शिक्षण क्षेत्रात सेवाज्येष्ठतेचे तत्त्व इतके
खोलवर रुजले आहे. ते एवढे पवित्र मानले जाते की, वरच्या श्रेणीच्या सर्व जागा सेवा
जेष्ठतेच्या अधारावरच भरल्या जातात विद्यापीठ क्षेत्रात या प्रणालीचा सर्वांत मोठा दोष
म्हणजे व्यक्तींना त्यांच्या विद्वत्तेच्या आधारावर नव्हे तर सेवाजेष्ठतेच्या आधारावर $$$$$
पुरस्कृ त के ले जाते.
६) विद्यापीठ शिक्षणाचा दर्जा सांभाळणे आणि तो उन्नत करणे यासाठी प्रथम उपाय म्हणजे जे
विद्यार्थी शिक्षणासाठी अपात्र आहेत त्यांना या प्रक्रियेतून कठोरपणे वगळणे हा आहे.
७) विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक यांचा दर्जा उं चावण्याचे कोणतेही प्रयत्न न करताच शिक्षणाचा
दर्जा उन्नत होईल असे मानले आहे. विद्यापीठाला शिक्षणभिमुख विद्यापीठ म्हणून
यशस्वीपणे कार्य करायचे असेल तर विद्यापीठात विद्यादानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे
त्यांना अध्ययन, अध्यापन आणि परीक्षा या दोन्ही क्षेत्रांत असीमित अधिकार दिले जावेत.
८) शिक्षकांच्या माध्यमातून के वळ अध्ययन-अध्यापनाचे कार्य करूनच विद्यापीठ शिक्षणभिमुख
विद्यापीठ होणार नाही, विद्यापीठाच्या कार्यावर विद्वान शिक्षकांचे नियंत्रण आवश्यक आहे.
शिक्षणभिमुख विद्यापीठ म्हणजे शिक्षकांचे विद्यापीठ होय.
९) शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठात तीन अधिकार मंडळे असावेत. विद्याशाखेला महत्त्वाचे
मानून विविध विषयांच्या एकत्रित संयोगातून विद्याशाखचे शैक्षणिक विकासाचे कार्य करावे.
सिनेटचे महत्त्वाचे कार्य म्हणजे विद्यापीठ व समाज यात संपर्क प्रस्थापित करून विविध
समाज घटकांच्या शिक्षणविषयक गरजांची जाणीव विद्यापीठाला करून द्यावी आणि विद्वत
सभेने अंशतः कार्यकारी मंडळ म्हणून कार्य करावे.
१०) शिक्षकांची नियुक्ती के ल्यानंतर संस्थाचालकांनी त्यांना संबंधित संस्थेचे सदस्य म्हणून
नियुक्त करावे. यातून शिक्षकाच्या मनात आपुलकीची भावना तयार होईल; अन्यथा शासकीय
महाविद्यालयाचे व शाळांप्रमाणे सातत्याने बदली होणाऱ्या शिक्षकांचे मालक शासन बनते,
अशा वेळी त्यांना शासनाबद्दल आस्था वाटेल, संस्थेबद्दल आस्था वाटणार नाही, हे स्पष्ट
करताना बाबासाहेब उदाहरण देतात की, "डेक्कन एज्युके शन सोसायटीसारख्या खाजगी संस्था

92
द्वारा चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयातील सर्वच शिक्षक संस्थेचे सभासद असतात. अशा
संस्थांतील शिक्षकात मात्र सामंजस्य सद्भाव आढळतो व मतभेद व गैरसमज पसरवणारे
प्रवृत्ती अभावानेच आढळतात. परंतु खाजगी संस्थांद्वारा संचलित महाविद्यालयांचे भविष्य
किती उज्ज्वल आहे हे मला सांगता येणार नाही," असेही बाबासाहेबांनी नोंदविले आहे.
११) विद्यापीठाच्या शिक्षणविषयक कार्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण असू नये. शिक्षण
व्यवहारावर विद्याशाखेचे पूर्ण नियंत्रण असावे, पण विद्यापीठाच्या विधान आणि
व्यवस्थापन कार्यावर शासनाचे सिनेटमार्फ त अंशतः नियंत्रण असावे.
१२) स्थानिक भाषा ही विद्यापीठ शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाचे माध्यम व्हावे असे माझे
स्पष्ट मत आहे; पण संपर्क भाषा म्हणून सामान्य जनता कोणती भाषा स्वीकारू इच्छिते याचा
$$$$$
निर्णय जनतेनेच घेतला पाहिजे.
१३) मागासवर्गीय समाजात आणि विशेषकरून दलित वर्गात विद्यापीठ शिक्षणाचा प्रचार-प्रसार
करण्यासाठी विद्यापीठाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
१४) सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा याशिवाय कोणतेही शिक्षण किं वा महाविद्यालय व
विद्यापीठ पूर्ण होऊ शकते आणि उत्कृ ष्ट प्रकारे कार्य करू शकते, यावर माझा मुळीच विश्वास
नाही.
(जिज्ञासूंनी दलितांचे शिक्षण, हे प्रा. देविदास घोडेस्वार यांनी संपादित के लेले पुस्तक पहावे. वरील मते सदर
ग्रंथातून निवडक स्वरूपात घेतली आहेत.)

बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ साठ वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही शिक्षण व्यवस्थेला
तेवढ्याच प्रभावीपणे लागू पडणारे आहेत. विशेषतः आजच्या शिक्षणव्यवस्थेत जे कमालीचे बदल
झाले आहेत, अशा पार्श्वभूमीवर तर या मतांची अधिक गरज भासते आहे. शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत
जे वेगवेगळे आयोग आले त्यांचा निष्कर्ष जाणकारांसमोर आहेच. शिक्षणात आवश्यक असणाऱ्या
नियमांची कायदेशीर सुरुवात बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या रुपाने करून. संविधानाच्या
चौथ्या भागात सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व मुलांना व मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे
व मोफत करावे अशी सूचना के ली.
स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षणाचा आढावा घ्यायचा झाल्यास १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर मौलाना
अबुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वामध्ये कें द्रिय शिक्षण मंत्रालयाची स्थापना झाली. यानंतर १९४८
मध्ये डॉ. राधाकृ ष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची निर्मिती करून शिक्षण
प्रणाली व्यवस्थित करण्याचे काम करण्यात आले. १९५२ मध्ये लक्ष्मीस्वामी मुदलीयार यांच्या
अध्यक्षेतेखाली प्राथमिक शिक्षण आयोगाची निर्मिती झाली. त्यानंतर १९६४ साली दौलत सिंह कोठारी

93
यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग नेमला गेला. १९६८ मध्ये या आयोगाचा अहवाल
प्रकाशित झाला.
यात राष्ट्राच्या विकासासाठी वचनबद्ध, चारित्र्यवान आणि कार्यक्षम युवक-युवती तयार
करण्याचे ध्येय ठे वण्यात आले. हा आयोग 'कोठारी आयोग' म्हणून सर्वाधिक चर्चेत राहिला. शिक्षण
क्षेत्राला नवा आकार व नवी दिशा देण्याचे काम या आयोगाने के ले. या वेळी कोठारी हे युनिव्हर्सिटी
ग्रॅन्ट कमिशनचे अध्यक्ष होते. पुढे उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात यूजीसीने मोठी भूमिका पार पाडली. २४
जुलै १९६८ मध्ये भारताने प्रथमच राष्ट्रीय शिक्षण योजना जाहीर के ली. ही योजना कोठारी आयोगावर
आधारित होती. यात प्राथमिक स्तरावर सर्व मुलांना मातृभाषेत शिक्षण दयावे, तसेच शिक्षणात
१०+२+३ या स्तरांचा विकास आणि शिक्षणात संपर्क भाषा म्हणून हिंदी भाषेचा प्रसार, आणि $$$$$
शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा विकास करावा असे निर्देश देण्यात
आले. त्यानंतरच्या मधल्या काळात शिक्षणाच्या संदर्भात अनेक समित्यांनी आपले कार्य के ले. परंतु
विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हा
मुलभूत अधिकार बनवून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारकडू न 'सर्व शिक्षा
अभियान' हा प्रमुख कार्यक्रम राबविण्यात आला. या योजनेची सुरुवात २००४ मध्ये झाली. २०१०
पर्यंत हा उपक्रम परिणामकारक चालला. परंतु पुढे ही योजना अंमलबजावणीच्या अनेक अडथळ्यांत
अडकली.
राज्यघटनेपासून ते विविध समित्यांतील सूचनांचे पालन करण्याचे अधिकार देशातील सर्वच
राज्यांनी पाळले असे नाही. दक्षिणेतील तामिळनाडू आणि काही राज्यांनी शिक्षणात गावांचा सहभाग
घेऊन चांगला प्रतिसाद दिल्याचेही दिसते. महाराष्ट्राने मात्र शिक्षण क्षेत्रात अनेक नव्या आणि
अनावश्यक नियमांची भर घालून बराच गोंधळ उडविल्याचेही जाणकारांत बोलले जाते. खिचडी वाटप,
पहिलीपासून इंग्रजी, २००९ साली अंमलात आलेला 'शिक्षण हक्क कायदा' या साऱ्या योजना
धोरणात्मक दृष्टीने परिणामकारक आहेत; परंतु त्यांच्या अंमलबजावणीत सारी गडबड आहे. या
योजनांचा शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवरही अतिरेकी ताण पडतो असेही काही शिक्षणतज्ज्ञ आणि
शिक्षक सांगतात. यासाठी जिज्ञासूंनी शिक्षणाचा नव्या परिप्रेक्षात विचार करणारे हेरंब कु लकर्णी यांची
प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित, शाळा आहे . शिक्षण नाही, परीक्षेला पर्याय काय?, आमच्या शिक्षणाचं
काय? ही पुस्तके पहावीत. याशिवाय डॉ. दिलीप चव्हाण यांनी लिहिलेली ‘बहु जनांचे शिक्षण' या
विषयावर लिहिलेले पुस्तक अधिक सैद्धांतिकपणे प्रागतिक शिक्षणाचा अर्थ समजून देणारे आहे.
१९९१ नंतरच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणांचा परिणाम शिक्षणावर झाला हे खरे आहे.
खासगीकरण आणि आधुनिकीकरणचा मोठा शिरकाव शिक्षण क्षेत्रात झाला. याचा सर्वच बाबतीत
उलटा परिणाम झाला असे नाही, तर काही चांगल्या गोष्टींबरोबर काही अनिष्टप्रथाही शिक्षणात

94
शिरल्या. विशेष म्हणजे शिक्षणाचा व्यवसाय झाला, व्यापारी प्रवृत्तीने शिक्षणाकडे पाहिले जाऊ
लागले. शिक्षकांच्या नेमणुकांतला निःपक्षपातीपणा गायब होऊन त्यांच्या नियुक्त्यांचे चढे भाव ठरू
लागले. जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण होऊ लागले. शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ पदे आपल्या
जातीच्या व धर्माच्या पलीकडे जाणार नाहीत याची दक्षता संस्थाचालक घेऊ लागले. खासगीकरणाच्या
रेट्यामुळे आरक्षणाच्या मूळ संकल्पनेला तडा गेला. भेदभाव वाढला. शिक्षक संघटनांना संपविण्याचा
शासकीय कट वाढत गेला. कं त्राटी शिक्षक, शिक्षक सेवक, विनाअनुदानित शिक्षक, अनुदानित
शिक्षक, हंगामी शिक्षक असे नवे नवे स्तर तयार झाले. त्यामुळे शिक्षकांच्या सेवेवर आणि निष्ठे वर
अनिष्ट परिणाम झाले. शिक्षण प्रक्रियेतील माणूस आणि त्याची संवेदना $$$$$
गायब होऊन मशिनचा बडेजाव वाढला.
महाविद्यालये आणि विद्यापीठ यांच्या बाबातीत तर नॅक मूल्यांकन आणि ISO चे प्रस्थ
अधिक वाढले. याचा दुष्परिणाम म्हणजे प्राध्यापकांचे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेतून लक्ष कमी
होऊन इतर तांत्रिक कामात सर्व शक्ती खर्ची होऊ लागली. शिक्षण क्षेत्रात शिक्षणाशी आणि अध्ययन
अध्यापनाशी संबंध असणाऱ्या वरिष्ठांचा बडेजाव वाढला. ते शिक्षकांना वेठबिगार समजू लागले.
त्यांची सामंती हुकु मशाही वाढली. शिक्षणक्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढला. आता तर नव्या विद्यापीठ
कायद्याने महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका आणल्याने हा हस्तक्षेप अधिक वाढणार आहे.
विद्यापीठ मंडळांची एकाधिकारशाहीही वाढणार, अशी भीतीही जाणकारांना वाटत आहे. अर्थात, हे
शिक्षण क्षेत्रातील काही चांगल्या व्यक्तीचा आणि संस्थांचा अपवाद वगळता जाणकारांचे निरीक्षण
आहे. पण सध्याचे वास्तव दुर्दैवाने असे दिसते की अपवादांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे
आणि शिक्षणातील भ्रष्टाचाराची, अनर्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अर्थात शिक्षक, विद्यार्थी,
महाविद्यालयीन संस्था, विद्यापीठे , शासन, पालक हे सारेच घटक अनास्थेला जबाबदार आहेत.
अशावेळी फु ले- शाहू आणि आंबेडकरांची शैक्षणिक विचारधारा अधिक समजून घेऊन प्रत्येकाने
शिक्षणात मानवतावादी, विज्ञाननिष्ठ आणि सहिष्णू पाऊले टाकण्याची खरी गरज आहे.

६. फु ले-आंबेडकर विरुद्ध गांधींचे शिक्षण विचार


महात्मा फु ले हे भारतातील शिक्षणक्रांतीचे आद्य जनक आहेत. १८४८ मध्ये शूद्रातिशूद्रांसाठी
मुलींची पहिली शाळा काढू न महात्मा फु ले व सावित्रीबाई फु ले यांनी या शिक्षणक्रांतीची सुरुवात के ली.
फु ल्यांच्या अगोदर महाराष्ट्रात शाळा नव्हत्या असे नाही. १८२० साली 'बॉम्बे नेटिव्ह एज्युके शन
सोसायटी’ ने काही शाळा सुरू के ल्या होत्या. १८२५ सालात तत्कालीन सरकारनेही काही प्रमुख
जिल्ह्यात शाळा काढल्या होत्या. १८३३ च्या सुमारास पुण्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या २-३ शाळा चालू
होत्या. १८३३ मध्येच इंग्रजांच्या मदतीने पुण्यात एक मुलींची शाळा सुरू करण्याचा प्रयत्नही

95
झाल्याच्या नोंदी आहेत. पण हे सारे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. विशेषतः सनातन मंडळींनी
मुलींच्या शाळेला कडाडू न विरोध के ला. पुढे लपून छपून चाललेली ही शाळाही बंद करावी लागली. परंतु
महात्मा फु ल्यांचे तसे नव्हते.
फु ल्यांनी स्त्रीशिक्षणाचे जे पाऊल टाकले ते इथल्या सनातनी, कर्मठ धर्म परंपरेला
नाकारण्यासाठी मुलींची शाळा सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश स्पष्ट आणि निर्भीड होता. हा

$$$$$
निर्भीडपणा फु ल्यांच्या मनात आला कु ठू न? तर थॉमस स्पेनचे विचार जोतीरावांच्या विचारांना
प्रभावित करणारे ठरले. व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मनुष्याचे हक्क व
कर्तव्य हे थॉमस स्पेन यांच्या विचारांचे सार आहे. स्पेन यांचे विचार वाचल्यानंतर वेद, उपनिषदे
आणि इतर धर्मग्रंथ अपौरुषेय नाहीत. ते मानवानेच निर्माण के ले आहेत. जातिभेद व अस्पृश्यता या
गोष्टी मानवतेच्या विरोधी आहेत. स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, पुनर्विवाह या गोष्टी आवश्यक आहेत अशी
जोतीराव फु ल्यांना खात्री पटली. या विचारांचा प्रसार करून खेडोपाड्यात राहणाऱ्या काबाडकष्ट
करणाऱ्या बहुजन समाजाला या दैन्यातून बाहेर काढण्याचा ध्यास फु ल्यांनी घेतला. शिक्षण हे समाज
बदलण्याचे प्रभावी साधन आहे. या हेतूने शिक्षणातून बहुजन समाजाला उन्नतीची नवी प्रेरणा
मिळेल, असे महात्मा फु ले यांना वाटत होते.
महात्मा फु ल्यांचे शिक्षण विचार समजून घेण्यासाठी त्यांचे 'गुलामगिरी' आणि 'शेतकऱ्यांचा
आसूड' हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. याशिवाय त्यांनी शिक्षणाविषयी प्रत्यक्ष मते व्यक्त के ली आहेत. ती
त्यांनी १८८२ मध्ये हंटर आयोगाला सादर के लेल्या निवदेनात आहेत. या निवेदनात महात्मा फु ले
यांनी जी मते मांडली आहेत. त्याचा अन्वयार्थ प्रा. तानाजी ठोंबरे यांनी त्यांच्या ‘महात्मा फु ले यांचे
शैक्षणिक कार्य' या पुस्तिके त मांडले आहे. खासगी आणि सरकारी शाळांमधील विसंगतीबद्दल महात्मा
फु ले त्यांच्या निवेदनात म्हणतात, "कोणत्याही पातळीवरची शिक्षण व्यवस्था खासगी यंत्रणेकडे
सोपविणे इष्ट होणार नाही. यापुढे बहुतकाळापर्यंत धंदेशिक्षण असो वा कारभारविषयक शिक्षण असो,
सर्व पातळीवरच्या शिक्षणयंत्रणा सरकारी नियंत्रणाखालीच राहणे योग्य ठरेल. शिक्षण राष्ट्र
उभारणीचे, एकात्मकतेचे व स्वावलंबनाचे साधन आहे, याची पूर्ण जाणीव जोतीरावांना होती. म्हणून
ते या निवेदनात पुढे म्हणतात 'शाळा कॉलेजांवरील सरकारी नियंत्रण काढू न घेतल्यामुळे त्याचे
पर्यावसान शिक्षणाची वाढ खुंटण्यामध्ये होईल.”16 या निवेदनातील काही गोष्टींचा सारांश काढल्यास
महात्मा फु ले यांचा शैक्षणिक दृष्टिकोन काय होता, याची स्पष्टपणे कल्पना येते. हंटर शिक्षण
आयोगासमोर साक्ष देताना फु लेंनी काही मूलभुत उपाय सुचविले होते. प्राथमिक शाळेत जाणाऱ्या १४

96
वर्षांपर्यंत मुला-मुलींना शिक्षण मोफत व सक्तीचे असावे. प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रशिक्षित
असावेत. समाजातील दलित, उपेक्षितांसाठी शिक्षणात विशेष तरतुदी असाव्यात. स्त्रियांच्या
शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करावेत. खासगी शिक्षण नसावे. सरकारी शिक्षणाचा दर्जा सुधारावा. व
सर्वांना सरकारी शिक्षण द्यावे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण
दयावे. शिक्षक नेमताना बहुजनसमाजातील मुलांना आवश्यक ते शैक्षणिक प्रशिक्षण देऊन त्यांची
शिक्षक म्हणून नेमणूक करावी.
महात्मा फु ले इंग्रजी भाषेत शिकले, त्यांनी बहुतांशी लेखन इंग्रजी भाषेतून के ले; परंतु असे $$
$$$
असूनही मातृभाषेतून शिक्षण देण्यामागे त्यांचा स्वतंत्र एक दृष्टिकोन होता. इंग्रजांनी प्रमाण
मानलेल्या इंग्रजी भाषेचे महत्त्व फु ल्यांनी नाकारले नाही; परंतु बहुजन समाजातील मुलांना के वळ
इंग्रजी भाषेतून शिक्षण दिल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सामाजिक जाणिवांचा विकास होणार
नाही, असे फु ल्यांना वाटत होते. इंग्रजी आणि मराठी या भाषा बऱ्याच मुसलमान मुलांना अवगत
नसल्यामुळे ही मुले शाळांपासून दूर राहतात याचाही विचार करावा, असेही मत महात्मा फु ल्यांना हंटर
आयोगापुढे व्यक्त के ले आहे.
महात्मा फु ले यांनी के लेले शैक्षणिक कार्य सर्वपरिचित आहेच. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील
सामाजिक समतेच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांचा शैक्षणिक विचार समजून घेतला
पाहिजे. शिक्षणातून समाज बदलेल ही क्रांतिदर्शी अपेक्षा महात्मा फु ल्यांना होती. त्यांनी सतत बहुजन
समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेतला होता. बहुजन, दलित, उपेक्षित आणि स्त्रियांची उन्नती ही
पैसाअडका देऊन होणार नाही तर त्यांची उन्नती त्यांना आत्मसन्मान देऊन होईल आणि हा
आत्मसन्मान के वळ शिक्षणातून मिळतो, असा ठाम विश्वास महात्मा फु लेंना होता. म्हणूनच त्यांनी
म्हटले आहे की, विद्येच्या अभावाने सारे अनर्थ बहुजनांच्या माथी आले. महात्मा फु ले यांना शेतीला
जोडलेल्या वर्गाला अधिक शहाणे करायचे होते. मराठा, माळी, धनगर, कु णबी, दलित, भटके या
साऱ्याच जाती महात्मा फु लेंच्या शिक्षण विकासाच्या अजेंड्यावर होत्या. विशेषतः या जातीतील स्त्रिया
शिकल्या की तो समाज अधिक शहाणा होईल, अशी त्यांची धारणा होती.
शेतकरी जातींना शहाणे करण्यामागे महात्मा फु लेंचे दोन दृष्टिकोन होते. त्यातला पहिला
दृष्टिकोन म्हणजे तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेकडू न या जाती नाडल्या जात होत्या. देवाचे, धर्माचे,
अंधश्रद्धांचा फै लाव करून इथला उच्चवर्णीय समाज शेतकरी जातींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन
धर्माच्या नावाने जी लूटमार करत होता, ती लूटमार महात्मा फु ले यांना थांबवायची होती. दुसरा
दृष्टिकोन म्हणजे हा समाज विज्ञानवादी होईल, आधुनिक होईल, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची

97
ताकत त्याच्यात येईल. थोडक्यात, बहुजन समाज समाजभानी होईल, अशी महात्मा फु लेंची अपेक्षा
होती.
आज शिक्षण प्रक्रियेकडे पाहताना सर्वसामान्य माणसाच्या मनात काहीएक प्रश्न पडतात. त्या
प्रश्नांचाही ऊहापोह झाला पाहिजे. महात्मा फु ल्यांनी शेतकरी जातींना शिक्षणाकडे वळवले. बहुजन
समाजातील मुले शिकली. आज दीडशे वर्षे लोटली. गेल्या पन्नास वर्षांत अनेक बहुजन समाजातील
मुले शिक्षक झाली. शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या पदावर गेली. पण शिक्षणाचा दर्जा सुधारला का?
समाजातून अंधश्रद्धा हद्दपार झाली का? देव-धर्म आणि त्यांच्या नावाने होणारे कर्मकांड संपले का?
जातिअंताची चळवळ वाढली का? भ्रष्टाचार संपला का? सर्वसामान्य माणसाच्या मनात $$$$$
उभ्या राहिलेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी बहुजन
समाजातील शिक्षकांनी शोधून महात्मा फु ल्यांच्या विचारांना कृ तीत आणण्याची ही वेळ आहे. महात्मा
फु ले जे सांगत होते त्याला सांविधानीक अर्थ देण्याचे महत्त्वाचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी करून
ठे वले आहेच. शिक्षणाचा संविधानाला अपेक्षित असणारा सामाजिक अर्थ जोपर्यंत बहुजन शिक्षक
आणि विद्यार्थ्यांच्या कृ तीतून दिसणार नाही, तोपर्यंत सामाजिक परिवर्तन होणार नाही, हेही तितके च
खरे आहे.
महात्मा फु ले यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा चालवणारी एक मोठी परंपरा महाराष्ट्राला
लाभली आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो के शव कर्वे, राजश्री शाहू महाराज संत गाडगेबाबा,
कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा या प्रागतिक शिक्षण सुधारकांचा वारसा
महाराष्ट्राला मिळाला आहे. यातल्या प्रत्येक समाज सुधारकाने स्वतःचा एक स्वतंत्र दृष्टिकोन घेऊन
बहुजनांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शैक्षणिक कार्य के ले आहे. परंतु, या प्रागतिक शैक्षणिक
वारस्याच्या पाऊलखुणा आजच्या आधुनिक शिक्षणातून पुसल्या जात आहेत असे दिसते.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक आचरणातून फु ले-शाहू-आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाच्या
पाऊलखुणा पुसट होताहेत, याला अनेक कारणे आहेत. गेल्या काही वर्षांत धर्माधिष्ठित राजकारणाचे
ज्या वेगाने महत्त्व वाढत आहे, ते पहाता शिक्षण बहुजनांच्या सामाजिक उन्नतीसाठी राहील असे
वाटत नाही. संस्कृ त भाषेचे पुनरुज्जीवन, योगविद्या, गीतापठण, इत्यादी गोष्टींचा चोरपावलाने
शिक्षणक्षेत्रात शिरकाव होत आहे. अभ्यासक्रमात मराठ्यांच्या इतिहासाची व छत्रपती शिवाजी
महाराजांविषयी होणारी बदनामी या गोष्टीही शिक्षणाच्या ब्राह्मणीकरणाचा कावा असू शकतो.
शिक्षणाचे आद्यप्रणेते कु णाला म्हणायचे... महात्मा फु लेंना की महात्मा गांधींना? शिक्षक दिन
कु णाच्या जन्मदिनी साजरा करायचा? सावित्रीबाई फु ले की सर्वपल्ली राधाकृ ष्णन?...असे ते अनेक
प्रश्न आहेत.

98
महात्मा गांधी हे संपूर्ण भारतीयांच्या मनात अहिंसेचे रोपण करणारे राष्ट्रपिता होते. त्यांच्या
जनजागृतीच्या कार्याचा, स्वातंत्र्यासाठी के लेल्या चळवळींचा आणि त्यांनी के लेल्या राजकीय कार्याचा
प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमान आहे. हा अभिमान कायम ठे वून गांधींच्या शैक्षणिक विचारांची
चिकित्सा करणे तेवढेच आवश्यक आहे, असे वाटते. गांधी आणि आंबेडकर यांच्या सामाजिक,
राजकीय विचारांमध्ये जसा विरोधाभास होता, तसाच तो त्यांच्या शैक्षणिक विचारांतही दिसतो आहे.
महात्मा फु ले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार माणसाच्या
सर्वांगीण उन्नतीसाठी असले तरी त्यांच्या विचारांत बऱ्याच ठिकाणी मतभेदांची ठिकाणं आहेत.
महात्मा गांधी मूलोद्योग शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. श्रमसंस्कृ तीला प्रतिष्ठा देणारे होते. $$$$
$
माणसाच्या आत्मिक उन्नतीला महत्त्व देणारे होते. गांधींचे विचार दूरगामी बदल करणारे होते हे खरे
आहे; परंतू ते माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीलाही उन्नत करणारे होते. गांधीच्या शैक्षणिक
विचारातील आध्यात्मिक विचारधारेमुळे ते इथल्या धार्मिक माणसांना मानवणारे होते. त्यामुळे
गांधीप्रणीत शिक्षणाचे मॉडेल उभे करण्यात भारतातल्या सर्वच उच्चवर्णीयांनी पुढाकार घेतला.
महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर परंतु उच्चवर्णीय शेतकरी जातींनी महात्मा फु ल्यांना विसरून गांधीप्रणीत
मॉडेल स्वीकारण्यात अधिक धन्यता मानलेली दिसते.
शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ डॉ. राधाकृ ष्णन गांधींच्या विचारांचे महत्त्व सांगताना
लिहितात, "देशाच्या इतिहासात अत्यंत आणीबाणीच्या वेळी सुदैवाने आपल्याला गांधीजींच्या
विचारांचा लाभ झाला. त्यामुळे आपण अपेक्षित असलेल्या नवीन भारताची निर्मिती करू शकू .
गांधीजींच्या विचारात काही त्रुटी असतील; परंतु समग्रवृत्तीने विचार के ल्यानंतर ही शिक्षणपद्धती
विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाला उपयुक्त आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यांची
मूलोद्योगी शिक्षण योजना शिक्षण संस्थेला मिळालेली एक मौलिक देणगी आहे."17 डॉ. राधाकृ ष्णन
यांनी स्वतःही भारताच्या शिक्षण विकासात मोठे योगदान दिले आहे. ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री
होते. डॉ. राधाकृ ष्णन यांची विचारधारा सर्वश्रुत आहे. ते आध्यात्मिक प्रकृ तीचे तत्त्वज्ञ होते. गांधींना
अपेक्षित असणाऱ्या आत्मोन्नतीच्या मार्गांचा राधाकृ ष्णन यांनी प्रसार करणे ही गोष्ट त्यांनी
स्वीकारलेल्या विचारधारेचा भाग होती. पण इथे प्रश्न तसाच राहतो तो म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेत
गांधींच्या मॉडेलचा विचार करत करत त्यातून फु ले-आंबेडकरी विचार शिक्षण प्रणाली डिलीट होत
गेली.
गांधीजींच्या शैक्षणिक विचारांत असे काय होते की ते सर्वांनी स्वीकारले? महात्मा गांधींच्या
शिक्षणप्रणालीतल्या काही ठळक गोष्टी पाहिल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. एकतर
गांधींनी मेकॉलेच्या शिक्षणप्रणालीची समीक्षा के ली होती. मॅकॉलेची शिक्षणव्यवस्था निरुपयोगी व

99
सदोष आहे. ती के वळ प्रशासनाला उपयोगी पडणारे कारकू न तयार करू शकते असे गांधींचे म्हणणे
होते. याविषयी 'हिंद स्वराज्य' मध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'मेकॉलेने ज्या शिक्षणाचा पाया घातला
तो खरे म्हणजे गुलामगिरीचा पाया होता. या शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःचा समाज आणि
संस्कृ तीपासून तुटत आहेत.' महात्मा गांधींनी शिक्षणाचा व्यापक अर्थ सांगितलेला आहे, असे
गांधीवादी शिक्षणतज्ञांना वाटते. "गांधींच्या मते साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे. साक्षरता ही
शिक्षणाची सुरुवातदेखील नाही. साक्षरता शिक्षणाचे साधन आहे, ते साध्य नाही. शिक्षण म्हणजे
विद्यार्थ्यांचे शरीर, मन आणि आत्मा यात जे सर्वोत्कृ ष्ट आहे, त्याचा विकास करणे होय. महात्मा
गांधींना शिक्षणातून विद्यार्थ्यांचा के वळ बौद्धिक विकास करणे अभिप्रेत होते.”18 गांधीजींच्या शिक्षण
$$$$$
विषयक विचारांचा सारांश पाहिल्यास लक्षात येते की, गांधींचा इंग्रजी भाषेतील शिक्षणाला सक्त
विरोध होता. सर्व शिक्षण हे मातृभाषेतून द्यावे असा त्यांचा आग्रह होता. इंग्रजीतून शिकणे हे
गुलामीचे लक्षण आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा शारीरिक श्रम शिक्षणावर भर होता.
शेतीशिक्षणाबद्दल ते अनुकू ल होते. याशिवाय उच्चशिक्षण ही सुशिक्षितांना मिळालेली मोठी संधी आहे
म्हणून त्यांनी समाजाचे ऋण मानले पाहिजे व स्वतःच्या ज्ञानाचा समाजाला व राष्ट्राला अधिकाधिक
उपयोग करून दिला पाहिजे, असे गांधीजींचे मत होते.
महात्मा गांधींचे शैक्षणिक विचार उदात्त, व्यापक आणि मूलगामी होते यात शंका
घेण्यासारखे काहीही नाही; परंतु ते विचार समाजातल्या उच्चवर्णीयांसाठी अधिक सोयीचे होते, हेही
नाकारता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या शैक्षणिक विचारांत
मतभेदांना बरीच जागा दिसते. एकीकडे फु ले आणि आंबेडकर दोघांनीही इंग्रजी भाषेचा द्वेष के ला
नाही. मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह त्यांनीही के ला; परंतु यामागे इंग्रजी भाषा अवगत के ल्याने
समाज अधिक विज्ञानवादी होईल, असे त्यांना वाटत होते. गांधी मात्र इंग्रजी भाषेतील शिक्षणाला
गुलामीचे शिक्षण म्हणतात. दुसरी मतभेदाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आत्मा, परमात्मा,
दैवी कल्पना नाकारून माणसाच्या नैसर्गिक उन्नतीची भाषा करतात, तर गांधी मात्र आत्म्याच्या
उन्नतीसाठी शिक्षणाचा आधार घेतात. या मतभेदांचा विचार करता महात्मा फु ल्यांनी कठोरपणे टिका
के लेल्या ब्राह्मणी शिक्षणाच्या प्रसारासाठी गांधींच्या शिक्षणाचे मॉडेल अधिक सोयीचे ठरते आहे. हा
व्यवहारी दृष्टिकोन आजही पहायला मिळतो. महात्मा फु ले ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंतच्या
प्रागतिक सुधारकांनी सूचित के लेली शैक्षणिक धोरणे स्वीकारली की जातश्रेष्ठत्व, दैववाद, देशीपरंपरा
अंधश्रद्धा, धर्म या साऱ्याच गोष्टींना मूठमाती द्यावी लागेल. ही तयारी इथल्या ब्राह्मणी आणि
उच्चवर्गीय ब्राह्मणेतर वर्गाची नसल्यामुळे आणि विशेषतः बहुतांश शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात
असल्यामुळे त्यांनी फु ले-आंबेडकरी शिक्षण मॉडेल न स्वीकारता सोयीने आणि चतुराईने गांधीवादी

100
शिक्षण मॉडेल स्वीकारण्यात धन्यता मानलेली दिसते. पण आजच्या ग्लोबल काळात आंबेडकरी
शिक्षण विचाराशिवाय दुसरा आधुनिक पर्याय आजच्या शिक्षणासमोर दिसत नाही. आज ना उद्या या
शिक्षणविचाराचा स्वीकार के ल्याशिवाय कु णालाही पर्याय राहणार नाही.

७. हिंदुत्ववाद्यांची शैक्षणिक कारस्थाने


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांना कृ तीत कसे आणता येणार नाही, यासाठी
हिंदुत्ववादी राजकीय शक्तींनी सतत कारस्थाने के ली आहेत. या कारस्थानाचा एक भाग म्हणजे लॉर्ड
मेकॉले यांच्या शैक्षणिक सूचनांवर सतत आघात करून मेकॉले यांच्या शैक्षणिक सुधारणावादी $$$$$
विचारांचा विपर्यास करून मांडण्याचा प्रयत्न के ला गेला. मेकॉले आधुनिक विचारसरणीचे पुरस्कर्ते
होते. त्यांना भारतीय जनतेला के वळ कारकू न बनवायचे होते असे नव्हे, तर इंग्रजी भाषेच्या
साहाय्याने भारतात विज्ञानाचा प्रसार होईल असे मेकॉलेला सुचवायचे होते. परंतु हिंदुत्ववाद्यांनी मात्र
मेकॉलेला खलनायक म्हणून पेश करण्यात धन्यता मानली. बाबासाहेबांचे विचार आधुनिक होते.
त्यांनीही मातृभाषा आणि राष्ट्रभाषेबरोबर इंग्रजी भाषेला महत्त्व दिले होते, परदेशी शिक्षणाचे महत्त्व
बाबासाहेब आंबेडकर नेहमीच सांगत होते. महात्मा फु ले आणि त्यानंतरच्या साऱ्याच प्रागतिक
सुधारकांनी आधुनिक विचारांची जोपासना करण्यासाठी धर्माधिष्ठित शिक्षण पद्धतीला नाकारले होते.
हिंदुत्ववाद्यांनी मात्र या साऱ्याच प्रागतिक परंपरेला विरोध के लेला दिसतो. याचे उत्तम विश्लेषण डॉ.
जनार्दन वाटवे आणि डॉ. विजय आजगावकर यांनी लिहिलेल्या 'मेकॉले: काल आणि आज' या
पुस्तकात के ला आहे. जिज्ञासूंना ते आवर्जून पाहावे. या ग्रंथात हिंदुत्ववाद्यांनी मेकॉलेबद्दल कसे
गैरसमज पसरवले त्याची उदाहरणे दिली आहेत. या ग्रंथाचा विमर्श ‘देशीवाद : समाज आणि
साहित्य' या ग्रंथात डॉ. रावसाहेब कसबे यांनीही घेतला आहे.
मेकॉलेबद्दल हिंदुत्ववाद्यांनी अनेक गैरसमज पसरविले, यातील प्रमुख गैरसमज म्हणजे
मेकॉलेने इंग्रजी भाषा भारतात आणून के वळ कारकू न निर्माण के ले. दुसरा आक्षेप म्हणजे मेकॉलेला
भारतीयांना गुलाम बनवायचे होते शिक्षणातून गुलामी लादण्याचा मेकॉलेचा प्रयत्न होता आणि
तिसरा आक्षेप म्हणजे मेकॉलेला भारतातील धर्म, रूढी, परंपरा नष्ट करून भारतीय संस्कृ ती
संपवायची होती. तो ख्रिश्चन धर्माचा पुरस्कर्ता होता. मेकॉलेवरील हे काही प्रमुख आक्षेप लक्षात घेतले
की, हे आक्षेप कु णी नोंदविले आहेत, याविषयी विचार के ला पाहिजे.
‘मेकॉले: काल आणि आज' या पुस्तकात डॉ. जनार्दन वाटवे आणि डॉ. विजय आजगावकर
यांनी लॉर्ड मेकॉले यांच्याविषयी पसरवलेल्या अनेक गैरसमजांचा सविस्तर आढावा घेतला आहे.
मेकॉलेवर घेतले गेलेले चुकीचे आक्षेप त्याच्या शैक्षणिक सूचनांचा के लेला विपर्यास हिंदुत्ववाद्यांनी

101
कसा के ला या गोष्टी या पुस्तकात उदाहरणांसह मांडल्या आहेत. जिज्ञासूंनी हे पुस्तक वाचल्याशिवाय
मेकॉलेबद्दलचे गैरसमज दूर होणार नाहीत.
लॉर्ड मेकॉले फे ब्रुवारी १८३४ ते जून १८३८ या काळात भारतात राहिले. भारतात फिरून त्यांनी
भारतीय समाजव्यवस्था समजून घेतली. या चार वर्षांच्या काळात मेकॉलेने त्यांचा सुप्रसिद्ध शिक्षण
खलिता लिहिला. ज्याला 'मिनिट ऑन एज्युके शन' असे म्हणतात. मेकॉलेने यात ३६ सूचना के ल्या
आहेत. मेकॉलेने आपला हा अहवाल २ फे ब्रुवारी १८३५ रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांना सादर
के ला. या अहवालाखाली लॉर्ड बेंटिंग यांनी टिपणात व्यक्त के लेल्या भावनांशी मी संपूर्णपणे सहमत
आहे' असे लिहून सही के ली. भारतात राहून पुढे मेकॉले यांनी 'इंडियन पिनल कोडचे एकट्याने लेखन
$$$$$
के ले ते १८३७ साली प्रसिद्ध झाले आणि १८६० साली त्याचे कायद्यात रूपांतर झाले, हा इतिहास
आपणास परिचित आहे. मेकॉलेवरील प्रचलित आक्षेप दूर करण्यासाठी ‘मेकॉले : काल आणि आज'
या पुस्तकात मेकॉलेचा ३६ मुद्द्यांचे टिपण भाषांतरित करून प्रसिद्ध के ले आहे. यातील तीन मुद्द्यांचा
उदाहरणादाखल विचार करू. यावरुन मेकॉलेचे नेमके विचार काय होते हे समजून न घेता त्यांच्या
काही उताऱ्यांचा हिंदुत्त्ववादी कसा विपर्यास करतात, हे लक्षात येईल.
आपल्या टिपणात मेकॉले लिहितात...
मुद्दा ११ - "महाकाव्ये आणि तत्सम साहित्य यात पौरात्य देशांनी भरारी खूप मारली आहे.
तरीही संस्कृ त, अरबी साहित्य व युरोपीय भाषातील साहित्य या दोन्हींचाही ज्यांनी अभ्यास के ला
आहे. त्यातील एकानीही मला संस्कृ त, अरबी भाषांतील साहित्य युरोपीय भाषातील साहित्यापेक्षा
वरचढ आहेत, असे सांगितले नाही; पण आपण कल्पनाशक्तीवर आधारलेले साहित्य बाजूला ठे वून
आपण ज्यात प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या सत्य घटना, त्यांचे कार्यकारणभाव व इतर मूलभूत तत्त्वे
यांचा ऊहापोह के लेला आहे. अशा ग्रंथांचा विचार करतो, तेव्हा पौर्वात्य ग्रंथांपेक्षा युरोपीय ग्रंथाचे
श्रेष्ठत्व डोळ्यांत भरते. संस्कृ त भाषेत लिहिलेल्या इतिहासाविषयक ग्रंथांतील लिखाणाचा आपण
आढावा घेतला तर सहज लक्षात येते की, त्याची प्रत इंग्लंडमधील प्राथमिक शाळातील इतिहासाच्या
पुस्तकातील लिखाणापेक्षाही कितीतरी कमी दर्जाची आहे. जे इतिहासाच्या बाबतीत आहे तसेच इतर
भौतिक व तत्त्वज्ञानाच्या संदर्भात आहे.”
19

मुद्दा ३१- "असे सांगितले जाते की, हिंदुस्थानातील १ कोटी लोकांचे धर्मग्रंथ संस्कृ त आणि
अरबी भाषेत लिहिलेले आहेत आणि आपल्या प्रजेला उत्तेजन देण्यासाठी या ग्रंथांच्या छापील प्रती
उपलब्ध करणे आपले कर्तव्य आहे. कं पनी सरकारने धर्माच्या बाबतीत अपक्ष राहिले पाहिजे हे खरे
आहे. पण ज्या धर्मग्रंथात सर्व महत्त्वाच्या संदर्भात उघड उघड चुका आहेत, असे ग्रंथ मुद्रित करणे,

102
जनतेमध्ये निःशुल्क वाटणे... कारण ते धर्माशी निगडित आहेत ही कृ ती ना तर्क शास्त्राशी सुसंगत
आहे, ना नीतिमत्तेशी.
आपण खात्री करून घेतली आहे की, संस्कृ त व अरबी भाषेतील ग्रंथांमध्ये काहीही व्यावहारिक
उपयोगाची माहिती नाही. उलट यामध्ये अनेक अंधश्रद्धेवर आधारित विधाने आहेत. घोडचुका
असलेले इतिहासाचे ग्रंथ, हास्यास्पद अंतरीक्षशास्त्र, चुकीच्या आरोग्यविषयक कल्पना आहेत. असे
ग्रंथ आपण विद्यार्थ्यांस शिकवावे काय, कारण ते ग्रंथ त्यांच्या धर्माशी निगडित आहेत. जे लोक
येथील समाजात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करू इच्छितात त्यांना आपण कधीच उत्तेजन दिले नाही व
कधीही देणारही नाही हे आपले वचन आहे. पण त्याच वेळेस आपण येथील तरुण विद्यार्थ्यास आपण
गाढवास स्पर्श के ल्यावर कशी शुद्धी करावी किं वा बोकड मारल्यावर प्रायश्चित्त घेण्यासाठी वेदातील
$$$$$
कोणत्या मंत्राचा किती वेळा उच्चार करावा हे शिकणे हे अपक्षपणात बसत नाही.”20
मुद्या ८ - "एका बाबतीत सर्व पक्षांचे एकमत होईल की, राज्याच्या या भागात ज्या भाषा
बोलल्या जातात, त्यातील एकाही भाषेत साहित्य, काव्य किं वा वैज्ञानिक लेख उपलब्ध नाहीत, तसेच
शब्दसंग्रहाच्या बाबतीत त्या पुरेशा समृद्ध नाहीत व त्यामुळे इतर समृद्ध भाषेतील ज्ञान या भाषांत
आणताही येणार नाही. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तींना शक्य आहे त्या व्यक्तींनी उच्च शिक्षण
आपल्या भाषा सोडू न ज्या भाषेत उच्च शिक्षण उपलब्ध आहे त्या भाषेतून त्यांनी शिक्षण घेणे हा
एकच पर्याय आहे.”21
मेकॉले यांनी आपल्या 'मिनिट ऑन एज्यूके शन' मध्ये इंग्रजी भाषेचा पुरस्कार करून
आधुनिक ज्ञान-विज्ञान भारतीयांनी आत्मसात करावे असा जो आग्रह धरला तो के वळ भारतीयांना
कारकू न बनवायचे म्हणून तर नव्हे. मातृभाषा आणि राष्ट्रभाषेतून शिक्षणाबद्दल मेकॉलेनी दुराग्रह
व्यक्त के लेला दिसत नाही. परंतु ज्या व्यक्तींना शक्य आहे त्या व्यक्तींनी उच्च शिक्षण उपलब्ध
असणाऱ्या आधुनिक भाषेतून घ्यावे, असे मेकॉलेंनी सूचविले आहे. संस्कृ त आणि अरबी भाषेतून
मिळणारे पारंपरिक ज्ञान आधुनिक काळात टिकणारे नाही, असे मेकॉलेंनी सुचविल्यामुळे
संस्कृ तप्रेमी हिंदुत्ववादी दुखावले गेले, हे कु णाच्याही लक्षात येईल.
"मेकॉले विषयी उच्चवर्णीयांच्या विशेषतः ब्राह्मण वर्गात तिरस्कार होता, तितक्याच
प्रमाणात तो जी. जे. बेंटिंगविषयीही होता. त्यामुळे दोघांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे ही त्यांची
सवय होती. बेंटिंगविषयी तिरस्काराचे मुख्य कारण म्हणजे त्याने हिंदू समाजात त्या वेळी प्रचलित
असलेल्या सतीप्रथेवर बंदी घातली व कडक अंमलबजावणी के ली”22
मेकॉलेने संस्कृ त आणि अरबी भाषेच्या उणिवा समोर ठे वल्याने कडवे हिंदू आणि मुल्ला
मौलवी हे त्यांच्या विरोधी असणार, हे साहजिकच आहे; परंतु मेकॉलेच्या या म्हणण्याकडे के वळ

103
भावनिकपणे पाहिले गेले, त्यातील गर्भित आधुनिक अर्थ अत्यंत जाणीवपूर्वक काही लोकांनी समजून
घेतला नाही. इंग्रजी भाषेमुळे महाराष्ट्रातील बहुजन समाजाला मोठे बळ मिळाले. ती भाषा अवगत
के ल्याने महाराष्ट्रात अनेक नेते, विचारवंत, लेखक, समाजसुधारक आणि आपल्या सामाजिक
चळवळी आधिक गतिमान झाल्या, हे कसे नाकारता येईल?
डॉ. रावसाहेब कसबे याविषयी लिहितात. "हिंदू राष्ट्रवादी आणि देशीवादी मंडळी काहीही
म्हणोत, परंतु इंग्रजी भाषेने, तिच्या अध्ययनाने निदान महाराष्ट्रात तरी म. फु ले एका सत्यशोधक
समाजासारख्या प्रागतिक विचारांच्या समाजाची स्थापना करू शकले. इंग्रजी भाषेला चिपळूणकरांनी
'वाघिणीचे दूध' मानले आणि तिच्या सेवनाने त्यांचा समाज सत्ताधारी बनला. ब्राह्मणेतर
चळवळीतील भास्करराव जाधव यांच्यासारखे नेते मुंबई प्रांताच्या मंत्रिमंडळात गेले ते इंग्रजीमुळेच $
$$$$
आणि त्यांनी रामायणावर नवा प्रकाश टाकला तोही इंग्रजीच्या अध्ययनानेच. त्यांचे विचार आणि
त्यांनी के लेली धर्मचिकित्सा इंग्रजीच्या ज्ञानामुळेच शक्य झाली, असे त्यांनी स्वतःच्या
आत्मनिवेदनात लिहून ठे वले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख हे विदर्भातील कु णबी नेते आणि डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजीच्या ज्ञानामुळेच कें द्रीय मंत्रिमंडळात होते आणि आंबेडकर भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार बनले तेही इंग्रजीच्या ज्ञानामुळेच.”23
इंग्रजी भाषेच्या स्वीकारामुळे जे काही सकारात्मक बदल झाले ते लपून राहिलेले नाहीत.
सर्वांत महत्त्वाचा फायदा झाला तो म्हणजे आधुनिक ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान बहुजन
माणसाच्या दारात आले. बहुजन समाज शिकला, धर्माने जखडू न ठे वलेल्या बंधनातून मुक्त
होण्यासाठी प्रयत्न करू लागला. शिकू न नोकरदार झाला. प्रशासनात मोठी पदे मिळवू लागला. विशेष
म्हणजे कायदा आणि सामाजिक न्यायासाठी तो जागरूक झाला. ही जागरूकता समाजात के वळ
उच्चवर्णीयांपर्यंत मर्यादित होती. इंग्रजी ज्ञानाच्या आकलनाने समाजातील मागास दलित आणि
उपेक्षित माणूस आपल्या हक्कासाठी जागा झाला. जगभरातल्या ज्ञान, विज्ञान साहित्याच्या
आकलनाने त्याच्या विचारकक्षा विस्तारल्या. तो विवेकी आणि धर्मनिरपेक्ष होण्यास मदत झाली.
मेकॉलेचे सर्वांत मोठे महत्त्व इथे दिसते. त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी एकोणीसाव्या
शतकातील शिक्षण संस्कृ त आणि अरबी भाषांच्या तुरुं गातून मुक्त के ले.
मेकॉलेचे शिक्षणाविषयी मते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहेत. भारतात त्यांचा
विरोध करणारी मोठी फळी तयार झाली. ही विरोधाची फळी भारतीय समाजव्यवस्थेत उच्चस्थानी
होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मेकॉलेच्या मतांना नेहमीच विरोध के ला असे दिसते. भाजप आणि
संघ परिवारातील अनेकांनी मेकॉलेच्या तोंडी घुसडलेले चुकीचे दाखले देत दिशाभूल के ली, असेही
पुरावे डॉ. जनार्दन वाटवे यांनी त्यांच्या पुस्तकात दिले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा दाखला

104
म्हणजे दि. २ फे ब्रुवारी १९३५ रोजी लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये के लेल्या भाषणाचा दाखला
हिंदुत्ववाद्यांकडू न सतत दिला गेला आहे. डॉ. वाटवे यांचे संशोधन असे सांगते की, २ फे ब्रु. १९३५
रोजी लॉर्ड मेकॉले इंग्लंडमध्ये नसून भारतातच होते. मग त्यांच्या तोंडी जो चुकीचा उतारा देण्यात
येतो, तो आला कु ठू न ? या उताऱ्यातून संघाला काय साधायचे आहे. तो उतारा असा आहे जो
'आंदोलन -शाश्वत विकासासाठी' या नियतकालिकाच्या २००६ च्या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित
के ला आहे. या विपर्यस्त आशयाचा मजकू र संघाची मंडळी नेहमी सांगतात, तो विपर्यस्त उतारा असा
आहे.
राष्ट्र गुलाम कशामुळे होते या शीर्षकाखाली हा उतारा आंदोलनमध्ये दिला आहे तो असा. "मी
भारतात खूप फिरलो; उभा - आडवा भारत पालथा घातला. हा देश समृद्ध आहे आणि लोक सक्षम $$$
$$
योग्यतेचे आहेत. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृ तिक परंपरा हा या देशाचा कणा आहे.
आपल्याला हा देश जिंकावयाचा असेल तर तोच मोडावयाला हवा... त्यासाठी त्यांची प्राचीन
शिक्षणपद्धती बदलावी लागेल. (मेकॉलेने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दि. २/२/१८३५ रोजी के लेल्या भाषणाचा
अंश)"24
मेकॉले यांच्या या विपर्यास के लेल्या उताऱ्याचा दाखला संघ, भाजप आणि अनेक हिंदुत्ववादी
प्रचारक सतत देत असतात यामागे त्यांचा कोणता हेतू आहे, हे स्पष्टच आहे.

८. विज्ञाननिष्ठ शिक्षणसंस्कृ तीचे सौंदर्य


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांनी भारताचे जे आर्थिक शोषण के ले त्याबद्दल कडक टीका
के ली आहे. पण कोलंबिया विद्यापीठात असताना त्यांनी एम. ए. च्या पदविके साठी लिहिलेल्या
शोधप्रबंधिके त इंग्रजांनी भारतात इतर क्षेत्रात जे योगदान दिले, त्याबद्दल आपण इंग्रजांचे ऋणी
राहायला पाहिजे; असे म्हटले आहे. कायदा, न्याय, पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख, विद्यापीठ,
प्रशासकीय संस्थांची उभारणी यासारखी इंग्रजांनी उभी के लेली कामे पाहता इंग्रजांमुळे आपल्या देशात
पाश्चात्त्य भौतिक शिक्षणाची सुरुवात झाली आणि या शिक्षणाने भारतात एका क्रांतीला प्रारंभ झाला,
असे बाबासाहेबांना वाटत होते.
बाबासाहेबांच्या या भूमिके चे स्वागत करत डॉ. यशवंत मनोहर बाबासाहेबांच्या
शिक्षणसंस्कृ तीचे सौंदर्यविधान करताना म्हणतात, "ही शिक्षण संस्कृ ती इहवादी आहे. त्यामुळे या
शिक्षण संस्कृ तीचा परलोकाचा खोटेपणा कोणत्याही अर्थाने मान्य नाही. ही संस्कृ ती स्थितीवादी
मूल्यांचे शिक्षण नाकारते. विज्ञानाला अमान्य असलेल्या सर्व अंधश्रद्धा, स्वर्ग, नरक अशा सर्व
भाकडकथांचे शिक्षण देऊ नये, असे ही शिक्षणसंस्कृ ती मानते. इतिहासाचे विकृ तीकरण विद्यार्थ्यांवर

105
लादू नये. विषमता, द्वेष आणि असहिष्णुता शिकविणारे ग्रंथ वा साहित्य विद्यार्थ्यांना शिकवू नयेत.
सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणणारे विद्यार्थी शिक्षणाने घडवावे, असे या संस्कृ तीला
वाटते. शिक्षणाने विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवावा. विद्यार्थ्यांची मने वैज्ञानिक याप्रमाणे
प्रयोगशील, तर्क कु शल आणि काटेकोर स्वभावाची व्हावी, यासाठी शिक्षणाने विशेष काळजी घ्यावी...
शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या मनात जाती निर्माण करू नयेत. धर्म निर्माण करू नयेत, शिक्षणाने
मरणोत्तर मोक्षाचे खोटे गणित शिकवू नये. शिक्षणाने भक्त, भाग्यवादी ईश्वरावलंबी, दैवावलंबी
आणि मूलतत्त्ववादी माणसे निर्माण करू नयेत.”25 (सारांश)
डॉ. यशवंत मनोहर यांचे हे प्रभावी विश्लेषण वाचल्यानंतर महात्मा फु ले, लॉर्ड मेकॉले आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणती शिक्षणसंस्कृ ती अपेक्षित होती, याची स्पष्ट कल्पना येते. $$$$$
विद्येची महती सांगणारे कृ तिशील महापुरुष महात्मा फु ले यांना गुरू मानून आधुनिक ज्ञानाचा प्रसार
करण्याऱ्या बाबासाहेबांच्या विचारांतून एक इहवादी शिक्षण संस्कृ ती उभी राहिली. ही शिक्षण संस्कृ ती
अधिकाधिक मोठी करण्यासाठी आज विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन प्रयत्न के ले पाहिजेत.
कारण, शिक्षणाने विद्यार्थ्यांना खोटेपणा, भोळसटपणा आणि अन्याय सहन करण्याचा वेडेपणा
शिकवू नये, असे आंबेडकरी शिक्षण संस्कृ तीला वाटते. जे तर्काला आणि वैज्ञानिक दृष्टीला पटत नाही
ते नाकारण्याची ताकद त्यांच्यात निर्माण करून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय,
धर्मनिरपेक्षता शिकविणारे आणि व्यापक विश्वभान देणारे शिक्षण आता विद्यार्थ्यांना दिले पाहिजे,
असेही इहवादी शिक्षण संस्कृ ती मानते.
शिक्षण हा शिक्षणयंत्रणेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याने विषमतावादी व दैववादी
होऊ नये. त्याने विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक मूल्यांची जोपासना करावी. समाजप्रबोधनाच्या
कामासाठी त्याने पुढे यावे. कारण शिक्षकाने के वळ विद्यार्थ्यांनाच घडवून चालणार नाही, तर त्याने
आदर्श समाज उभा राहील याची काळजी घेऊन त्याने आपले ज्ञान आणि जाण अद्ययावत
ठे वण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. त्याने के वळ पगारापोटीचेच काम न करता सतत नवी नवी
प्रागतिक स्वप्ने पहावीत. त्याने अध्ययन आणि अध्यापनाशिवाय दुसऱ्या कोणत्याही जबाबदाऱ्या
अंगावर घेऊ नयेत. ज्ञानाच्या क्षेत्रात त्याने स्वतःला इतके गुंतवून घ्यावे की, या कामातून त्याचे
स्वतःचे एक आदर्श आणि इतरांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व उभे करावे. आंबेडकरी शिक्षण
संस्कृ तीला हे सारे अपेक्षित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण संस्कृ ती ही समाजाला क्रांतीप्रवण आणि सत्यनिष्ठ
करणारी कार्यशाळाच आहे. ही कार्यशाळा समाजातल्या प्रत्येक माणसाला खुली आहे. त्यामुळे शिक्षण
क्षेत्रातल्या विद्यार्थ्याने आणि शिक्षकाने मोठ्या अभिमानाने या कार्यशाळेत आपले नाव दाखल
करायला हवे. ज्यांना जाती, धर्म टिकवून सामंती वर्चस्वाचे राजकारण करायचे आहे ती माणसे या

106
कार्यशाळेत येणार नाहीत हे उघड आहे. त्यामुळे ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्यांना उठवण्यात
वेळ वाया घालवू नये; कारण धर्माच्या आणि जातश्रेष्ठत्वाच्या मतलबी मानसिकतेतून उगवलेली
प्रतिष्ठा ही एक दिवस अंधाराच्याच गावात जाते, परंतु ज्ञानाच्या आणि सत्याच्या जोरावर
मिळविलेली प्रतिष्ठा नेहमीच प्रकाशाच्या गावाला जात असते. आंबेडकरांचा शिक्षण विचार माणसाला
प्रकाशमान करतो. त्याला स्वयंप्रकाशित करतो. म्हणून आज शिक्षण क्षेत्रात अनेक संकटे उभी असली
तरी त्यावर मात करून एक नवा विश्वास निर्माण करण्याची ऊर्जा आंबेडकरांच्या शिक्षण विचारात
आहे. या प्रागतिक आणि विज्ञाननिष्ठ शिक्षण विचाराला कोणत्या जातीत, धर्मात अथवा पंथात बसवू
नये. स्वतःला आणि समाजाला आदर्श बनविण्यासाठी स्वतः विचारी प्रागतिक माणूस बनून यात $$$
$$
पाऊले महत्त्वाचे आहे. हीच पावले उद्याच्या आधुनिक भारताचे निर्माते ठरणार आहेत.



संदर्भ

१. झेलिएट एलिनॉर, डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व व दलितांचा शिक्षणातील पुढाकार, सुगावा प्रकाशन,
पुणे, १९८६, पृ. ४.
२. वाघमारे जनार्दन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारक शैक्षणिक विचार आणि कार्य,
सुगावा प्रकाशन, पुणे, २०१५ पृ. १२.
३. खरे विजय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, सुगावा प्रकाशन, पुणे, २०१०,
पृ.५२.
४. खरे विजय, उक्त,पृ.५४.
५. थोरात सुखदेव, खाजगी क्षेत्रातील आरक्षण : चर्चेतील प्रश्न, गरज आणि अपेक्षा, सुगावा
प्रकाशन, पुणे, २०१०, पृ. ३७.
६. आंबेडकर भीमराव रामजी, अनुवाद व संपादन : घोडेस्वार देवीदास, दलितांचे शिक्षण, क्षितिज
पब्लिके शन, नागपूर, चौथी आवृत्ती, २०१४. पृ.२३१.
७. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. १४३.
८. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. १५५, १५६.
९. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. १७१.
१०. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. १८२.
११. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. १८४.

107
१२. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. १८४.
१३. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. १८७.
१४. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. ३३.
१५. घोडेस्वार देवीदास, उक्त, पृ. ३४.
१६. ठोंबरे तानाजी, महात्मा फु ले यांचे शैक्षणिक कार्य, लोकवाङ्मय गृह, नववी आवृत्ती, २०१६,
मुंबई, पृ. ३८, ३९.
१७. कुं भार नागोराव, महात्मा गांधीजींचे सामाजिक तत्त्वज्ञान, अरुणा प्रकाशन, लातूर, २०१२, पृ.
५८.
$$$$$
१८. कुं भार नागोराव, उक्त, पृ. ६२.
१९. वाटवे जर्नादन/आजगावकर विजय, मेकॉले : काल आणि आज, दुसरी आवृत्ती, २०१५, पृ.७६.
२०. वाटवे जनार्दन, उक्त, प्. ८०.
२१. वाटवे जनार्दन, उक्त, पृ. ७५.
२२. वाटवे जनार्दन, उक्त, पृ. ९१.
२३. कसबे रावसाहेब, देशीवाद : समाज आणि साहित्य, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१६,प्र. ३५३.
२४. वाटवे जनार्दन, पूर्वोक्त, पृ.१.
२५. मनोहर यशवंत, नवसंस्कृ तीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब नॉलेज मिशन
प्रकाशन, औरंगाबाद, २०१६, पृ. ११२.



108
$$$$$
संदर्भ ग्रंथ सूची

१. अय्यूब राणा, हिंदी अनुवाद : कै सर राणा, राहुल कु मार व इतर, गुजरात फाइल्स, गुलमोहर
किताब, दिल्ली, २०१७.
२. आंबेडकर भीमराव रामजी, (अनु.) घोडेस्वार देवीदास, दलितांचे शिक्षण, चतुर्थावृत्ती, क्षितिज
पब्लिके शन, नागपूर, २००४.
३. आंबेडकर बाबासाहेब, भारताचे संविधान, सातवी आवृत्ती, कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद,
२०१५.
४. आंबेडकर बाबासाहेब, जातिप्रथेचे विध्वंसन, तृतीय आवृत्ती, सुगावा प्रकाशन, पुणे, २०१४.
५. इस्लाम शमसुल, (अनु.) डॉ. मीना शेट-संभू, आर. एस. एस. चा राष्ट्रविघातक प्रवास, सुगावा
प्रकाशन, पुणे, २०१६.
६. कसबे रावसाहेब, आंबेडकर आणि मार्क्स, व्दितीय आवृत्ती, सुगावा प्रकाशन, पुणे, २००६.
७. कसबे रावसाहेब, आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार, व्दितीय आवृत्ती, सुगावा प्रकाशन,
पुणे २००४.
८. कसबे रावसाहेब, जागतिकीकरण: स्वरूप आणि भवितव्य, सुमेध प्रकाशन, पुणे, २०१०.
९. कसबे रावसाहेब, झोत, सहावी आवृत्ती, सुगावा प्रकाशन, पुणे २००२.
१०. कसबे रावसाहेब, हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद, सुगावा प्रकाशन, पुणे,
१९९४.
११. कसबे रावसाहेब, डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, पाचवी आवृत्ती, सुगावा प्रकाशन,
पुणे २०१४.
१२. कसबे रावसाहेब, देशीवादः समाज आणि साहित्य, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१६.

109
१३. कांबळे उत्तम (संपा.), झोत...सामाजिक न्यायावर : डॉ. रावसाहेब कसबे, गौरवसमिती,
संगमनेर, २००५.
१४. कांबळे उत्तम, (संपा.), जागतिकीकरणाची अरिष्टे: काँ. गोविंद पानसरे अमृत महोत्सव
समिती, कोल्हापूर, २०१०.
१५. कांबळे उत्तम, जागतिकीकरणातील सांस्कृ तिक संघर्ष, सुगावा प्रकाशन, पुणे, २०१३.

$$$$$
१६. कारखानीस ल. स., राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कोणाचा कै वारी? कोणाचा वैरी?, व्दितीय
आवृत्ती, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २००७.
१७. कुं भार नागोराव, महात्मा गांधीजींचे सामाजिक तत्त्वज्ञान, अरुणा प्रकाशन, लातूर, २०१२.
१८. खरे विजय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, सुगावा प्रकाशन, पुणे, २०१०.
१९. खांडेकर ताराचंद्र, आंबेडकर तत्त्वज्ञान प्रचिती आणि आविष्कार, संके त प्रकाशन, नागपुर,
२००९.
२०. गुरू गोपाळ, वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा, हरिती पब्लिके शन, वाकड, पुणे, २००५.
२१. चतुर्वेदी स्वाती, मराठी अनुवाद, मुग्धा कर्णिक, आय अॅम एट्रोल, मधुश्री पब्लिके शन,
नाशिक, २०१७.
२२. झेलिएट एलिनॉर, डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व व दलितांच्या शिक्षणातील पुढाकार, सुगावा
प्रकाशन, पुणे.
२३. ठोंबरे तानाजी, महात्मा फु ले यांचे शैक्षणिक कार्य, नववी आवृत्ती, लोकवाङ्मय गृह, मुंबई,
२०१६.
२४. डोळे जयदेव, आरेसेस, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१७.
२५. तेलतुंबडे आनंद, साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश, सुगावा प्रकाशन, पुणे, २००७.
२६. थोरात सुखदेव, आरक्षण धोरणाबाबत गैरसमज: कसे व का?, सुगावा प्रकाशन, पुणे २०१६.
२७. थोरात सुखदेव, शहरातील कामगारांबाबत भेदभाव, सुगावा प्रकाशन, पुणे २०१२.
२८. थोरात सुखदेव, खाजगी क्षेत्रातील आरक्षण:चर्चेतील प्रश्न, गरज आणि अपेक्षा, सुगावा
प्रकाशन, पुणे, २०१०.
२९. देशमुख सुधाकर, राष्ट्र आणि राष्ट्रवाद, पद्मगंधा प्रकाशन, २००९, पुणे.
३०. नेमाडे भालचंद्र, टीकास्वयंवर, साके त प्रकाशन, औरंगाबाद, १९९०.
३१. पाटील शरद, शिवाजीच्या स्वराज्याचे शत्रू कोण?, खंड.२, भाग.२, मावळाई प्रकाशन, शिरूर,
१९९२.

110
३२. पाटील शरद, मार्क्सवाद व फु ले-आंबेडकरवाद, सुगावा प्रकाशन, पुणे १९९३.
३३. पानसरे गोविंद, मार्क्सवादाची तोंडओळख, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, २०१०.
३४. मनोहर यशवंत, मूल्यमंथन, युगसाक्षी प्रकाशन, नागपूर, २००४.
३५. मनोहर यशवंत, नवसंस्कृ तीचे जनक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नॉलेज मिशन प्रकाशन, औरगांबाद, २०१६.

$$$$$
३६. वाघमारे जनार्दन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारक शैक्षणिक विचार आणि कार्य,
सुगावा प्रकाशन, २०१५.
३७. वाटवे जनार्दन व आजगावकर विजय, मेकॉले : काल आणि आज, जनार्दन वाटवे, व्दितीय
आवृत्ती, पुणे, २०१५.
३८. शेरे निळकं ठ, आंबेडकरवाद, सुविधा प्रकाशन, पुणे, २००९.



इतर संदर्भ

१. पवार प्रकाश, (संपा), शिक्षक संघटक (मासिक), नोव्हें.-डिसें २०१३.


२. पाठक किशोर, (संपा.), संवाद, दिवाळी विशेषांक, ऑक्टो. २०१५
३. सुमंत पानसरे, लेखमाला, दै. लोकमत. ३ मार्च २०११



111
$$$$$

112
113

You might also like