You are on page 1of 19

गेनबा सोपानराव मोझे अध्यापक

महाविद्यालय,वडमुखवाडी,पुणे
 बी. एड .प्रथम वर्ष : २०२१-२२
 पेपर १०४ - अध्ययनासाठी मूल्यांकन आणि मूल्यमापन
 विद्यार्थ्यांचे नाव - देशमुख अश्विनी विशाल
 मार्गदर्शक - प्रा. तडस.एम.जी
परीक्षा पध्दतीतील सध
ु ारणा
प्रचलित परीक्षा पध्दतीमधून विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञान किती प्रमाणात
आहे एवढेच तपासले जाते. संपूर्ण परीक्षा ही के वळ पुस्तकावर आधारलेली
आढळते. परीक्षेतून तर्क , अनुमान, कौशल्य, उपयोजन, संश्लेषण,
अभिरुचि, रसग्रहण ही उद्दिष्टे विद्यार्थ्यांमध्ये किती प्रमाणात विकसित
आहे याचा अंदाज येऊ शकत नाही. आत्मविश्वास, कष्टाळूपणा,
सामाजिकता, सहकार्य भावना विविध कला कौशल्य या पैलूंचे परीक्षण
परीक्षेमधून होत नाही त्यामुळे परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा होणे महत्वाचे आहे.
 सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन
O अर्थ
O सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनाची गरज
1) परीक्षा पद्धतीमध्ये सुधारित बदल.
2) विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास.
3) शैक्षणिक मूल्यमापनातील त्रुटी.
4) शिक्षणाची गुणवत्ता.
O सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण मूल्यमापनाचे फायदे
1) विद्यार्थी सहभाग वाढतो.
2) विद्यार्थी कार्यक्षमता वाढते.
3) शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया वाढते.
4) विकासात्मक दृष्टीकोन.
O सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनाच्या मर्यादा
1) शैक्षणिक साधनांची कमतरता.
2) शैक्षणिक साधंनांचा अपुरा वापर.
3) सातत्याचा अभाव.
4) अद्ययावत नोंदीचा अभाव.
5) वस्तुनिष्ठ मूल्यमापणाचा अभाव.
अर्थ
विद्यार्थ्यांचे वर्षातून एकदाच मूल्यमापन करण्याऐवजी वर्षभर ठराविक अंतराने मूल्यमापन के ले जाते.
विद्यार्थ्याची वर्गातील वर्तणूक, अभ्यासतील लक्ष, उत्तरे देण्याची तत्परता, उपक्रमातील सहभाग यामार्गाने विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून प्रगति अभ्यासता
येते.
अभ्यासतील कच्चे दुवे किं वा मागासलेपण शोधता येते.
मूल्यमापनावरून विद्यार्थी मागे का पडला? या दृष्टीने त्याच्या प्रगतीसाठी विशिष्ट उपचारात्मक योजना आखता येतात.
यामुळे सातत्यपूर्ण मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
 सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनाची गरज
1) परीक्षा पद्धतीमध्ये सुधारित बदल-
मूल्यमापन पद्धतीमध्ये के वळ परीक्षेच्या माध्यमातून मूल्यमापन के ले
जाते. म्हणजेच बोधात्मक विकासावर भर देण्यात येतो, म्हणून हे
मूल्यमापन एकांगी स्वरूपाचे असते. परीक्षा पद्धतीतील उणिवा दूर
करण्यासाठी १९५६ मध्ये मूल्यमापनात सुधारित बदल करून ही पद्धत
अस्तित्वात आणली.
2) विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांचा विकास-
मूल्यामापनात विद्यार्थ्याने परीक्षेत मिळवलेल्या गुणांना जास्त महत्व
असते. सर्वांगीण विकासासाठी परीक्षेचे महत्व कमी करून सुप्त गुणांचा
विकास करण्यासाठी या मूल्यमापनाची आवश्यकता असते.
3) शैक्षणिक मूल्यमापनातील त्रुटी दूर करण्यासाठी-
मूल्यमापन करतांना परीक्षापद्धत किं वा प्रचलित परीक्षा पद्धत वापरली
जाते.याद्वारे के लेल्या मूल्यमापनातील त्रुटि दूर करण्यासाठी याची गरज भासते.
या मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सुधारित विकासात्मक बदल होतो.
4) शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी-
शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्याचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये योग्य व अचूक
बदल घडवून आणणे असतो.शालेय शिक्षण पद्धतीमध्ये सुधारीत बदल
घडविणे,शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे,विद्यार्थांचा सर्वांगीण विकास साध्य होणे हे
या मूल्यमापनाचे उद्दिष्ट आहे.
 सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण मूल्यमापनाचे फायदे

1) विद्यार्थी सहभाग वाढतो:
सर्वकष मूल्यमापनामुळे विद्यार्थी शालेय परीक्षेबरोबरच अभ्यासपूरक व सहशालेय उपक्रमांमध्ये सहभागी होतो व आपले
प्राविण्य निश्चित करतो. विद्यार्थी आवडीनुसार शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे आपापसातील संबंध वाढतात आणि
विद्यार्थी सहभाग वाढतो.

2) विद्यार्थी कार्यक्षमता वाढते:


विद्यार्थी शालेय उपक्रमात सहभागी होऊन कृ ती करतो. त्यामुळे त्याच्या आवडी निवडी, अभिरुचि, कल या क्रियांद्वारे लक्षात
येतो. विद्यार्थ्याच्या तर्क क्षमतेत, निर्णयक्षमतेत व कार्यक्षमतेत वाढ होते.
3) शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया वाढते-
शिक्षक वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन, प्रेरणा व
प्रोत्साहन देतात, संवाद साधतात. त्यामुळे शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया वाढते व
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाते.
4) विकासात्मक दृष्टीकोन-
शिक्षणाकडे के वळ पास होणे या दृष्टिकोणातून पहिले जाते. समाजाचा,
शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा दृष्टीकोण बदलण्याच्या हेतूने हे मूल्यमापन उपयोगी
ठरते व परीक्षा पद्धती दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडू न येतो. यामुळे शालेय
अभ्यासक्रमाची सर्व उद्दिष्टे साध्य होतील व परीक्षापद्धतीवरील ताण कमी होईल.
 सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापनाच्या मर्यादा
1)शैक्षणिक साधनांची कमतरता-
अध्ययन अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर के ल्याने ही प्रक्रिया आनंददायी
बनते. काही प्रमाणात अजूनही खडू , फळा वापरला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वकष
विकासात अडचणी निर्माण होतात.
2) शैक्षणिक साधंनांचा अपुरा वापर-
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व सातत्यपूर्ण विकासासाठी विविध साधनांचा वापर होतो, परंतु
याची शिक्षकांना माहिती नसल्याने ते त्याचा वापर करणे टाळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे
मूल्यमापन होत नाही.
3) सातत्याचा अभाव-
नियोजनाप्रमाणे शालेय प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सातत्यपूर्ण
सर्वकष मूल्यमापन करणे अवघड जाते.
4) अद्ययावत नोंदीचा अभाव-
सर्वकष मूल्यमापनामध्ये वेळीवेळी के लेल्या नोंदी वेळीच न ठेवल्याने अंदाजे नोंदी नोंदविल्या जातात. त्यामुळे
सर्वकष मूल्यमापन करणे अवघड जाते.
5) वस्तुनिष्ठ मूल्यमापनाचा अभाव-
प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत शिक्षकांच्या मनात काही चांगले तर काही वाईट पूर्वग्रह निर्माण झालेले असतात.
त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण व श्रेणी दिली जाते. यामुळे हे मूल्यमापन वस्तुनिष्ठ न होता व्यक्तिनिष्ठ होते.
अशाप्रकारे मूल्यमापन प्रक्रियेतील मर्यादा दूर करून विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापनावर लक्ष के न्द्रित के ल्यास विद्यार्थी व
शिक्षण प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होईल.
 निवड आधारित क्रे डिट सिस्टिम
O अर्थ
O निवड आधारित क्रे डिट सिस्टिमचे स्वरूप
O निवड आधारित क्रे डिट सिस्टिमचे महत्व
1) परीक्षा पद्धतीतील दोष दूर के ले जातात.
2) श्रेणी पद्धतीचा वापर.
3) परीक्षांव्यतिरिक्त कार्यक्रम.
4) वर्षाच्या शेवटी प्रमाणपत्र.
अर्थ:
क्रे डिट सिस्टिम म्हणजे अशी पद्धती ज्यात इतर शैक्षणिक कार्यक्रमांत प्राप्त के लेल्या प्रावीण्याची नोंद ठेवून प्रमाणपत्र
देण्यात येते.हि संख्यात्मक पद्धती आहे.याचाच अर्थ यात दर्जात्मक कार्यक्षमता निश्चित के ली जाते .
निवड आधारित क्रे डिट सिस्टिमचे स्वरूप:
या पद्धतीत विद्यार्थ्यांना नियमित परीक्षांव्यतिरिक्त काही प्रकल्प,
उपक्रम वर्षभर सोपवून त्यानुसार श्रेणी दिल्या जातात. राबविले जाणारे हे
पूरक कार्यक्रम असतात,यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास
मदत होते.या श्रेणी फायनल गुणपत्रिके त दिल्या जातात .
निवड आधारित क्रे डिट सिस्टिमचे महत्त्व
1) परीक्षा पद्धतीतील दोष दूर के ले जातात-
परीक्षा पद्धतीतील दोष दूर हा शिक्षण मंडळ आणि विद्यापीठ
अनुदान मंडळाद्वारे के लेला सुधारित प्रयत्न होय.या प्रणालीद्वारे
विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन के ले जाते.वस्तुनिष्ठ प्रश्नांवर
अधिक भर देऊन पर्यायी प्रश्नांमध्ये घट करून प्रश्नपेढीचे विकसन के ले
गेले.

2) श्रेणी पद्धतीचा वापर-


अंतर्गत मूल्यमापनामध्ये जास्तीतजास्त संख्यात्मक मूल्यमापन के ले
जाते तर क्रे डिट सिस्टिमद्वारे संख्यात्मक मूल्यमापनाबरोबर श्रेणी
पद्धतीचाही वापर के ला जातो. यामुळे विकासात्मक बदल होतो.
3) परिक्षांव्यतिरिक्त इतर कार्यक्रम-
क्रे डिट सिस्टिममध्ये या कार्यक्रमांवरून गुणदान श्रेणी पद्धत वापरली
जाते. हे कार्यक्रम सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात.
4) वर्षाच्या शेवटी प्रमाणपत्र-
वर्षभर जे काही शैक्षणीक कार्यक्रम आखले जातात त्यावरून
विद्यार्थ्यांचे संख्यात्मक व गुणात्मक मूल्यमापन के ले जाते व वर्षाच्या
शेवटी प्रमाणपत्रात विकासात्मक गुणदान दिले जाते.यावरून त्याची
प्रगती कळते .
अशा प्रकारे वार्षिक मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा
सर्वांगीण विकास साध्य करण्याचा प्रयत्न के ला जातो. यात निवडक
आधारित क्रे डिट सिस्टिमचा वापर के ला जातो .
पुस्तक समोर ठेवून परीक्षा
 अर्थ
 प्रकार

1) मर्यादित.
2) अमर्यादित /अनिर्बंध.
 फायदे व शैक्षणिक उपयुक्तता

1) तयारीस कमी वेळ लागतो.


2) कमी दबाव.
3) कमी पाठांतर व स्मरण.
4) सर्जनात्मक विचारांना वाव.
अर्थ
या परीक्षेमध्ये मुलांना त्यांची ज्या विषयावर परीक्षा घेण्यात येणार असते.
त्या विषयाची पुस्तके परीक्षा हॉलमध्ये सोबत घेऊन पाहून उत्तरे लिहिण्यास
परवानगी दिली जाते.

प्रकार: पुस्तक समोर ठेवून परीक्षा देण्याचे दोन प्रकार पडतात.


1) मर्यादित- या प्रकारात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षक सांगतील तीच पुस्तके किं वा
नोट्स आणून त्या आधारावर उत्तरे लिहिण्यास परवानगी दिली जाते. या परीक्षेत लॉग
टेबल,डिक्शनरी ,विषयाची पुस्तक वापरण्यास विद्यार्थ्यांना परवानगी दिली जाते. मात्र पूर्व
परवानगी न घेता कोणतेही साहित्य
वापरण्यास परवानगी नसते. साहित्य प्रश्नपत्रिके बरोबरच दिले जाते.
2) अमर्यादित / अनिर्बंध- या प्रकारात विद्यार्थ्यांना इच्छेप्रमाणे कोणतेही साहित्य वापरता
येते.विद्यार्थी कोणतेही पुस्तके ,हस्तलिखिते किं वा नोट्स वापरू शकतात.अशा परीक्षांमध्ये
विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व कौशल्य तपासणे हा उद्देश असतो .
फायदे व शैक्षणिक उपयुक्तता

1) तयारीस कमी वेळ लागतो-


या प्रकारात विद्यार्थ्यांना फार वेळ अभ्यास करण्याची गरज नसते.अभ्यासक्रमानुसार
पुस्तके ,नोट्स व इतर साहित्य यांची तयारी करावी लागते. इतर परीक्षांसाठी खूप
तयारी,जास्त वेळ द्यावा लागतो. मात्र अशा परीक्षांमुळे वेळेची बचत होते.
2) कमी दबाव-
पारंपरिक परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांवर दबाव येतो.कारण
परीक्षेत कोणते प्रश्न विचारतील याचा अंदाज नसतो. विषयाचा आवाका मोठा असतो. तयारी
करताना सतत दडपण असते. मात्र पुस्तक समोर ठेवून उत्तर लिहायचे असल्यास विद्यार्थी
दडपणापासून मुक्त असतात.
3) कमी पाठांतर व स्मरण-
पारंपरिक परीक्षा पद्धतीत विद्यार्थाना खूप पाठांतर करावे लागते. के लेला
अभ्यास स्मरणात ठेवावा लागतो . सगळ्याच विद्यार्थ्यांना ते शक्य होत नाही.
त्यामुळे विद्यार्थी दडपणाखाली अभ्यास करून परीक्षा देतात. मात्र पुस्तक समोर
असल्यास वाचलेले स्मरणात ठेवण्याची गरज नसते.
4) सर्जनात्मक विचारांना वाव-
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विशिष्ट पद्धतीने तयार के ले जात नाही.विद्यार्थी ऐनवेळी
पुस्तक समोर ठेवून प्रश्नावर उत्तर लिहिण्यासाठी स्वतः विचार करतो. त्यामुळे विद्यार्थी
अनेक बाजूंनी विचार करतो. साहजिकच विचारशक्तीला चालना व सर्जनात्मक विचारांना
वाव मिळतो. अशाप्रकारे पुस्तक समोर ठेवून उत्तर लिहिल्यामुळे विद्यार्थावरील दडपण
कमी होते. मुक्तपणे विचार करू शकतात. अचूक उत्तरांची शक्यता वाढते .

You might also like