You are on page 1of 2

फ् रॅ क्चरवरचे धनगराचे आयु र्वे दिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे  on 5 November, 2011 - 05:14

फ् रॅ क्चरवरचे धनगराचे आयु र्वेदिक औषध :


यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गु ढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला
अ‍ॅक्सिडें ट झाला आणि पाय मोडला.   डाव्या पायातील पटे ला ( गु ढग्याची वाटी) ,
टिबिया, फिब्यु ला, ( ले ग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले .
त्यानं तर ऑपरे शन झाले . प्ले ट, मोळे , तारा.. काय काय बसवले . मग हळू हळू वॉकर, काठी
घे ऊन आणि आता तसे च चालायला लागलो.
गे ल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गे लो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो.
स्टँ डवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लं गडत जात होतो. अचानक एक
माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लं गडताय का? पाय फ् रॅ क्चर झाला आहे का? मी
होय म्हणताच त्याने सां गितले त्यां च्या भावाला फृएक्चर झाले होते , तें व्हा एका धनगराने एक
औषध लावायला सां गितले होते . तु मचा नं बर द्या आम्ही तु म्हाला त्याची माहिती सां ग.ू
दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सां गितली. ती
खालीलप्रमाणे ..
साहित्य :
२ नारळाचे पाणी
११ गु लाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वे लदोडा घे ऊन सोलून बिया घे णे.
२ चमचे हळद.
२ मु ठी तु ळशीचा पाला
सव्वा किलो खोबरे ल ते ल
प्रथम मिक्सरमधून वे लदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गु लाबाच्या
पाकळ्या, तु ळशीचा पाला चु रुन घालून पु न्हा बारीक करावे . त्यात २ नारळाचे पाणी घालून
पु न्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घे णे.
नं तर ते लामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे . आणि १५ मिनिटे उकळू द्यावे . मिश्रण
ढवळत रहावे आणि मोठ्या पाते ल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते .
नं तर गार करुन फडक्याने गाळू न घ्यावे .
आयु र्वे दिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.
१. जं गल पपिता ते ल ५० मिली
२. रत्नज्योत ते ल ५० मिली
३. वातचिं तामणी रस ५ ग्रॅम
४. योगें द्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पं चरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सु वर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम
( शे वटची दोन औषधे प्रचं ड महाग आहे त. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता
!   )
मिश्रण बाटली हलवून ढवळावे . एक दिवस तसे च ठे वावे . त्यानं तर दररोज रात्री फ् रॅ क्चर
झाले ल्या हाताला/ पायाला चोळू न लावून मु रवावे . यामु ळे ...

हाड जुळायला मदत होते .


स्नायुच
ं ी पु ष्टी होते .
दुखावले ल्या शिरा पु न्हा कार्यक्षम होतात.
औषध तीन महिने वापरावे .
हे औषध फक्त इजे मुळे झाले ल्या (अपघाती) फ् रॅ क्चरला वापरावे . फृएक्चर अन्य कारणाने ,
उदा कॅन्सर, टीबी वगै रे असे ल किंवा त्वचे वर ओली जखम असे ल तर हे औषध वापरू नये .
औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे . पिऊ नये . 
( गु गलवर सर्च करणार्‍याला ही लिं क मिळावी, म्हणून औषधांची नावे इं गर् जीत दे त आहे ..
Jungle Papita Oil, Ratnajot oil, Ratnajyot Oil, Vat chintamani Ras, Yogendra
ras, kumar kalyan Ras, Pancharatna Anmol Ras, Suvarna Bhasma, Swarna
Bhasma, Heerak Bhasma, Vajra Bhasma. Ayurvedic medicine for fracture, for
external use only)

You might also like