You are on page 1of 2

Janm sootak बच्चे के जन्मका सत

ू क किस
किस पर , जानें।
https://www.youtube.com/watch?v=PmUjnOBSBlg

जयसियाराम। बन्धुओ। अपने परिवार में किसी की मत्ृ यू होने पर सूदक लगता है । और बच्चे का जन्म होने
पर सूतक लगता है ।, जो सूदक से अलग होता है । उसी विषय में यह वीडियो है। दे खें, जानें , और उचित लगे
तो शेयर और सब्स्क्राइब करें / कराएं।। बच्चे

|| मत्ृ यू नंतर आत्म्याचा प्रवास ||


|| लेखांक ६ वा||
अत्ता पर्यंतच्या सर्व लेखात मत
ृ व्यक्तीचे प्रथम दिवसाचे विधि विधान कसे करावे हे सविस्तर सांगीतले.आता
पढु े ...
-----------------------------------------
प्रश्न-कोणत्या मत
ृ व्यक्तीचे शौच म्हणजे सत
ू क कोणी व किती दिवस पाळावे ते सांगा ?
उत्तर -
दन्तजातेs नुजाते च कृतचड
ू े च संस्थिते |
अशुद्धा बांधवाः सर्वे सूतके च यथोच्यते || मनुस्मति
ृ अ.५श्लो.५८ ||
दात आलेले व दात न आलेले, जावळ काढलेले व उपनयन झालेले असे चार प्रकारचे आप्त मत
ृ झाले असता
सर्व सपिंड व समानोदक संबंधिताना अशौच असते.त्याच प्रमाणे बाळाचा जन्म झाला असता या सर्वांना जनन
शौच (सोयर)म्हणजे वद्ध
ृ ी असते.हे जनन शौच फक्त माता पित्यानी पाळावे , आईने दहा दिवस जनन शौच
(सोयर) पाळावे.वडिल स्नानाने शुद्ध होतात.
आता सपिंडी संबंध व समानोदक संबंध किती पिढ्याचा आसतो ते पाहु.
सपिंडी संबंध सात पिढ्या पर्यंत आसतो , सपिंड म्हणजे आमचे वाडवडिल.या संबंधातील कोणी मत
ृ झाले तर
दहा दिवस विटाळ पाळावा.काही समाजात अस्थि गोळा करे पर्यंत तीन दिवस विटाळ पाळतात तर कांही
समाजात अंत्यसंस्काराचा एक दिवसच विटाळ पाळतात.
सातव्या पिढीनंतर सपिंडता समाप्त होते.
समानोदकता म्हणजे जो पर्यंत पाण्याने तर्पण करण्याची पद्धत . मत
ृ ाचा जन्म व नावाचे ज्ञान जोपर्यंत स्मरण
असते तोपर्यत समानोदकता पाळावी.म्हणजे भावकीने दहा दिवस विटाळ पाळावा.
शिष्याने गुरुचा अंत्यसंस्कार केला असेल तर त्याने दहा दिवस अशौच पाळावे.खांदा दे णाऱ्यांनी सुद्धा दहा दिवस
शौच पाळावे.
तीन महिन्या नंतर गर्भपात झाल्यास गर्भाला जितके महिने झाले असतील तितके दिवस आईने अशौच पाळावे.
जावळ न काढलेल्या बाळाचा मत्ृ यू झाला तर त्याच्या संबंधातील व्यक्तींनी अहोरात्र एक दिवस अशौच
पाळावे.मौजी बंधनाच्या आधी मत्ृ यू आल्यास संबंधीतांनी तीन दिवस अशौच पाळावे.
दोन वर्षे पर्ण
ू होण्यापर्वी
ू बालक मत
ृ झाले तर त्याच्या शवाला पष्ु पमालांनी अलंकृत करून पवित्र भम
ू ीत परु ावे
अस्थि गोळा करू नयेत.दात आले असतील व नामकरणविधी झाला असेल तर अग्नी संस्कार करावा.
वाङनिश्चय म्हणजे साखरपुडा झाला आहे पण अजून विवाह झालेला नाही अशी स्त्री मत
ृ झाली तर
पतिकुळातील आप्तानी तीन दिवस अशौच पाळावे.विवाह झाल्यावर मत्ृ यू आल्यास माहे रच्या आप्तांनी तीन
दिवस अशौच पाळावे.
दरू दे शी मत
ृ झालेल्या माणसाच्या निधनाची वार्ता दहा दिवसाच्या आत कळल्यास राहीलेल्या दिवसाचे अशौच
पाळावे ( उदा. आठव्या दिवशी वार्ता कळली तर दोनच दिवस अशौच पाळावे.मात्र दहा दिवसानंतर वार्ता कळली
तर तीन दिवस अशौच पाळावे.एका वर्षानंतर कळल्यास स्नाने शुद्धी होते.
परदे शी मत
ृ झाला असता सचैल स्नान करावे म्हणजे अंगावरील कपड्यासह.
पहिले दहा दिवस संपायच्या आत पुन्हा कुणी गेल्यास पहिल्या दहा दिवसाचाच विटाळ पाळावा.
आपल्या घरात राहणारा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण पण आपला संबंधी नसलेला म त
ृ झाल्यास तीन दिवस
अशौच पाळावे.
मामा ,मामी,शिष्य,गरु
ु ,मेहुणा, मावशी,मावशीचा पती एक दिवसाचे अशौच पाळावे.
सपिंडाबद्दलचे अशौच ब्राह्मणाने दहा दिवस,क्षत्रियांनी बारा दिवस वैशाने पंधरा दिवस व शूद्रांनी तीस दिवस
अशौच पाळावे.
दं ग्यात मरण पावलेले,वीज पडून मेलेले, अपराधा बद्दल मत्ृ यूदंड मिळालेले, गाईचे रक्षण करताना,ब्राह्मणांचे
रक्षण करताना मरण पत्करलेले, जल,अग्नी,व्याघ्र,इत्यादिकांमुळे मत
ृ झालेले तसेच ज्याच्या उत्तरकार्यामुळे
राजशासनात अडथळा येत असेल त्यांचे अशौच नसते.
युद्धामधे क्षात्रधर्मानुसार मरण पावणार्या पुरुषाला तात्काल ज्योतिष्ठोमादि महाज्ञाचे फळ मिळते त्यामुळे
वीरमरण आलेल्याचे सूतक नसते .
अस्थिसंचयाचे विधीविधान उद्या पाहु ****
क्रमशः -
कृपया लेख पुढे पाठवताना नावासगट पाठवावा.
राष्ट्रीय कीर्तनकार
हभप श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पणे ७०३८०३३३६१

You might also like