You are on page 1of 3

पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ?

स्पर्धेनुसार बाजाराच्या विविध प्रकारापैकी पूर्ण स्पर्धा हा अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा बाजार मानला जातो. ज्या बाजारात
एकजिनसी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रे ते असतात अशा बाजारात पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. पूर्ण स्पर्धा ही काल्पनिक संकल्पना आहे .
वास्तवात पूर्ण स्पर्धा आढळून येत नाही पूर्ण स्पर्धेची व्याख्या पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल .
● व्याख्या :-
ज्या बाजारात असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रे ते आढळून येतात त्या बाजाराला पूर्ण स्पर्धेचा बाजार असे म्हणतात.
❝ स्पर्धेचा अभाव असणारी बाजारपेठ म्हणजेच पूर्ण स्पर्धा होय. ❞
❝ ज्या बाजारपेठेत वस्तूची किं मत एकच असते अशा बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धाच्या बाजार होय. ❞
वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की ज्या बाजारात ग्राहकांची संख्या आणि विक्रे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते .
वस्तूची किं मत एकच निश्चित के लेली असते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही या बाजारपेठेत एकमेकांशी स्पर्धा करत नाही . अशी बाजारपेठ
म्हणजेच पूर्ण स्पर्धेचा बाजार किं वा बाजारपेठ होय .● पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा ?
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विविध प्रकारची वैशिष्ट्ये आढळून येतात ती पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल.

1] असंख्य विक्रे ते व असंख्य ग्राहक :-


पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. कारण या बाजारपेठेत ग्राहकांची व विक्रे त्यांची संख्या मोठ्या
प्रमाणात असते. त्यामुळे ग्राहकांचा विक्रे त्यांवर व विक्रे त्यांचा ग्राहकावर कोणताही परिणाम होत नाही .
2] एकजिनशी वस्तू :-
एकजिनशी वस्तू म्हणजे एखादी वस्तू कोणत्याही उत्पादन संस्थेने उत्पादित के ली तरी त्या सर्व उत्पादन संस्थांनी उत्पादित के लेल्या
उत्पादनाची वैशिष्टे सारखी असतात. उदा. वस्तूचा रंग, रूप, आकार, वजन, पॅकिं ग, गुणवत्ता, किं मत इत्यादी सर्व गुण समान असतात. म्हणून
अशा वस्तूंना एकजिनशी वस्तू असे म्हणतात.
3] एकच किं मत
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किं मत एकच असते. किं मतीमध्ये कु ठलाही प्रकारचा बदल होत नाही. स्थानिक बाजारपेठे पासून
तर राष्ट्रीय बाजारपेठ पर्यंत कोणत्याही बाजारात वस्तूची किं मत बदलत नाही. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्ये मानले जाते.
म्हणूनच पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किमतीचा वक्र अक्ष अक्षाला समांतर असतो. वस्तूची मागणी कितीही वाढली किं वा कितीही कमी झाली तरीही त्याचा
परिणाम किमतीवर होत नाही.
4] मुक्त प्रवेश व बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य :-
पूर्ण स्पर्धा असलेल्या बाजारात पेठेत देशातील कोणत्याही उद्योजक संस्थेला नवीन वस्तूचे उत्पादन करण्याचे स्वातंत्र्य असते.
तसेच एखाद्या उत्पादन संस्थेला आपल्या उद्योग बंद करावयाचे वाटले तरीही त्याला ते बंद करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. थोडक्यात ग्राहक असो
किं वा विक्रे ता असो बाजारपेठेत प्रवेश करण्याचे किं वा बाहेर पडण्याचे कोणत्याही प्रकारचे बंधन नसते.
5] बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान :-
पूर्ण स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत ग्राहकांना बाजारपेठेत असलेल्या वस्तू त्यांच्या किमती आणि उत्पादन संस्था इत्यादी
विषयाचे संपूर्ण ज्ञान असते. परिणामी या बाजारपेठेत ग्राहकांची कधीही फसवणूक होत नाही. त्याच प्रमाणे विक्रे त्यांना ग्राहक वर्ग सज्ञान आहे याची
जाणीव असल्यामुळे वस्तूची किं मत एकच आकारणे भाग पडते.
6] वाहतूक खर्चाचा अभाव :-
पूर्ण स्पर्धा असलेल्या बाजारपेठेत वाहतूक खर्चाचा विचार के ला जात नाही. वाहतूक खर्चात अंतरातील भिन्नतेमुळे वस्तूच्या
किं मत आकारणीत भिन्नता निर्माण होते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किं मत संपूर्ण बाजारपेठेत एकच प्रस्थापित होण्यासाठी वाहतूक खर्च गृहित
धरला जात नाही.
7] जाहिरात खर्चाचा अभाव :-
वस्तूची विक्री करण्यासाठी बऱ्याच वेळा उत्पादन संस्था आपल्या वस्तूची जाहिरात करतात. परंतु पूर्ण स्पर्धा असलेल्या
बाजारात वस्तू एकजिनशी असल्याने जाहिरात खर्च करण्याची आवश्यकता नसते. जाहिरात खर्च आणि वाहतूक खर्च यांच्या अभावामुळे पूर्ण स्पर्धा
असलेल्या संपूर्ण बाजारात एकच किं मत प्रस्थापित होते.
8] उत्पादन घटकाची पूर्ण गतीक्षमता :-
वस्तूची निर्मिती करण्यासाठी जे घटक वापरले जातात. (भूमी, श्रम, भांडवल, संयोजक) त्या घटकांना उत्पादनाचे घटक असे
म्हणतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उद्योग संस्था आणि उद्योग याचा समतोल होण्यासाठी तसेच उद्योगसंस्थेला मागणीनुसार पुरवठ्यात बदल करणे
शक्य होण्यासाठी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादनाचे घटक पूर्ण गतीक्षम आहे असे मानले जाते.
● पूर्ण स्पर्धेतील किं मत निश्चिती स्पष्ट करा ?
पूर्ण स्पर्धा म्हणजे ज्या बाजारात एजिनशी वस्तूचे असंख्य ग्राहक व असंख्य विक्रे ते असतात. अशा बाजारास पूर्ण स्पर्धा असे
म्हणतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किं मत निश्चितीसाठी मागणी व पुरवठा हे दोन घटक महत्त्वाचे मानले जातात. कारण किं मत निश्चिती ही मागणी व
पुरवठ्याच्या संतुलनाने किं वा समतोलाने निश्चित होत असते .
❛ ज्या किं मतीला वस्तूची मागणी व वस्तूचा पुरवठा समान होतो की किं मत म्हणजे समतोल किं मत होय. ❜
डॉ. मार्शल यांच्या मते मागणी आणि पुरवठा हे कात्रीच्या दोन पात्याप्रमाणे आहेत. जसे फक्त एका पात्याने कापड कापता येत नाही. त्याचप्रमाणे पूर्ण
स्पर्धेतील किं मत निश्चिती ही फक्त मागणी किं वा फक्त पुरवठा यांच्या आधारावर करता येत नाही. पूर्ण स्पर्धेतील वस्तूची किं मत ही मागणी व
पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किं मत कशी ठरते ते पुढील तक्त्यावरून स्पष्ट करता येईल.

● कोष्टक :-
वरील कोष्टकावरून असे स्पष्ट होते की, वस्तूची किं मत 5 रुपयाने
वाढल्यास मागणी 100 नगाने कमी होते आणि पुरवठ्यात 500 नगापर्यंत
वाढ होते. त्यामुळे विक्रे त्यांमध्ये स्पर्धा लागतात आणि वस्तूची किं मत जास्त
होते. वस्तूची किं मत जेव्हा 3 रुपये होते तेव्हा मागणी 300 नगापर्यंत वाढते.
आणि पुरवठा 300 नगापर्यंत कमी होतो. त्याचप्रमाणे वस्तूची किं मत 1
रुपयापर्यंत कमी झाल्यामुळे मागणीत 500 नगापर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ
होते. आणि पुरवठा 100 नगापर्यंत कमी होतो. त्यामुळे ग्राहकांमध्ये स्पर्धा
लागतात व वस्तूची किं मत परत जास्त होत जाते.
● आकृ ती :-

वरील आकृ तीत अक्ष-अक्षावर मागणी व पुरवठा दर्शविला आहे. अय-अक्षावर किं मत दर्शवली आहे आकृ तीत 'मम' हा मागणी वक्र आहे तर 'पप' हा
पुरवठा वक्र आहे. हे दोन्ही वक्र एकमेकांना 'स' बिंदूत छेदतात. या ठिकाणी वस्तूची बाजार मागणी व बाजार पुरवठा समान होतात व त्या ठिकाणी
वस्तूची समतोल किं मत ठरते व ती या उदाहरणात 3 रुपये आहे.

You might also like