You are on page 1of 4

जागतिकीकरणाचे टप्पे

जागतिकीकरणाची प्रकिया ही मुख्यत्वे सर्व प्रकारची बंधने दरू करुन विदे शी वस्तू व सेवांच्या आयात
निर्यातीला मुक्ता परवाना दे णे अशी असते. प्रत्येक दे शाने भांडवल, औद्योगिक वस्तू, शेतीमाल, सेवा यांच्या
आयात निर्यातीवर वेगवेगळी बंधने लादलेली असतात. त्यामध्ये घट करणे, अभिप्रेत असते. अर्थात ही
प्रकिया त्या-त्या दे शातील धोरणान्वये , तत्कालीन परिस्थितीनुसार ठरते. अर्थव्यवस्था जागतिकीकरणाकडे
नेत असताना जे बदल करावे लागतात. त्यालाच रचनात्मक समायोजनांचा कार्यक्रम (Structural
Adjustment Programme) असे म्हटले जाते. यामध्ये प्रामख्
ु याने जे बदल अपेक्षित असतात त्यालाच
जागतिकीकरणाचे टप्पे असे म्हणता येईल.

१ आयात करात कपात:

विदे शातून आयात होणाऱ्या मालाची आपल्या दे शातील उद्योगांशी अनिष्ट स्पर्धा होऊ नये . आपल्या
उद्योगांना तोटा होऊ नये. यासाठी विविध वस्तूंचर आयात कर लादलेले असतात. याचा परिणाम म्हणून
दे शा- दे शांमध्ये आयात करांच्या भिंती निर्माण झाल्या व आंतरराष्ट्रीय व्यापारांवर फार मोठ्या मर्यादा
पडल्या. यातून प्रत्युत्तरादाखल आयात करात कपात करुन आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करणे व सर्व
राष्ट्रांना जवळ आणणे हा जागतिकीकरणाचा पहिला टप्पा मानता येईल.

२ इतर संख्यात्मक / नियंत्रणात्मक बंधने घटविणेः

व्यापारांवरील आयात करांच्या व्यतिरिक्त इतर काही संख्यात्मक, भेदात्मक बंधने विविध राष्ट्रांनी लादलेली
होती. यामध्ये कोणत्या दे शातन
ू किती प्रमाणात वस्तू आयात करायच्या याचा हिस्सा (Quota) ठरवन
ू दे णे,
काही राष्ट्रांनी व्दिपक्षीय व्यापार करार करणे, काही वस्तुंच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालणे याचा समावेश
होतो. आयात करांच्यापेक्षाही या बंधनाचे स्वरुप अधिक जाचक होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर
भेदात्मकतेला वाव असल्याने याचा वापर धोरणात्मक हत्यार म्हणन
ू च झालेला दिसतो. जागतिकीकरणाच्या
प्रकियेत प्रथम अशा नियंत्रणाचे रुपांतर पारदर्शी आयात करात करणे व नंतर मात्र घट करणे अभिप्रेत
असते.

३) तंत्रहस्तांतरण मुक्तता:

आंतराष्ट्रीय व्यापारांवरील बंधनाबरोबरच तंत्रहस्तांतरणावर दे खील अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली.
यातन
ू तंत्रज्ञान दे णे व घेणे व यातून कार्यक्षमता अथवा उत्पादकता वाढविणे अडचणीचे झाले. याचा
विकसनशील राष्ट्रांना व त्यातही प्रामुख्याने खाजगी क्षेत्राचा तोटा झाला. प्रगत तंत्रज्ञान वापरुन आपली
स्पर्धात्मकता वाढविणे शक्य झाले नाही. की तंत्रहस्तांतरणावरील बंधने दरू करुन तंत्र अवलंबन, तंत्रविकास
याला पूरक, पोषक असे धोरण स्वीकारणे हा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा आणखी एक भाग ठरतो. यातून
प्रगत तंत्रज्ञानाच्या जलद हस्तांतरणाने सर्वच दे शांना आपल्या साधनसामग्रीचा पर्याप्त व कार्यक्षम वापर
करणे शक्य होईल.

४) उद्योगसंस्थाना मक्
ु त प्रवेश:

आपल्या दे शातील उद्योगांना अधिक वाव मिळावा विदे शातील उद्योगसंस्थांना आपल्या उद्योगात प्रभुत्व
नसावे या विचारातन
ू विदे शी गंत
ु वणक
ु ीचे संयक्
ु त प्रकल्य्प वा तत्सम उद्योगात प्रवेश करण्यावर विदे शी
गुंतवणुकीत त्याचा सहभाग किती असावा, कोणत्या प्रकल्पास गुंतवणुकदारांवरील ही बंधने आली
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विदे शी गुंतवणूकदारांवरील ही बंधने दरू करुन त्यांना दे शांतर्गत गुंतवणूकीस,
उत्पादनास मक्
ु तव्दार दे णे अभिप्रेत आहे . अशा प्रकारच्या प्रगत तंत्रांचा वापर करणाऱ्या उद्योगसंस्थाचे
आगमन झाल्याने दे शांतर्गत उत्पादन संस्थांनादे खील त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करुन वस्तूंची गुणवत्ता सुधारावी लागेल यातून अंतिमतः चांगल्या दर्जाच्या वस्तूंची व सेवेची
उपलब्धता होऊन त्याचांही फायदा होतो. या प्रक्रियेचा भाग म्हणन
ू च बहुराष्ट्रीय कंपन्या व राष्ट्रीय कंपन्या
यात भेद करता दोघांकरता समान धोरण स्वीकारणे हे जागतिकीकरणात अभिप्रेत असते. एका बाजूला
विदे शी कंपन्यावरील बंधने काढत असताना दे शांतर्गत कंपन्यावरील विविध बंधने कमी करणे, उत्पादन
शल्
ु क घटविणे, प्रेरक सवलतीत घट करणे हे ही अभिप्रेत असते.

५) विनिमयदर मुक्तताः

आंतरराष्ट्रीय व्यापारासोबत आंतरराष्ट्रीय दे णी घेणी मिटविण्याच्या पध्दतीवरही बंधने घालण्यात आली.


यामध्ये विदे शी चलनाचा वापर कोणत्या कारणास करावा याचे जसे बंधन घालण्यात आले . तसेच आपल्या
चलनाचे मूल्य इतर दे शांच्या चलनाच्या संदर्भात किती असावे. या विनिमय दराच्या निश्चितीतही हस्तक्षेप
करण्यात आला. यातून वास्तव विनिमय दर (मागणी - परु वठ्यातून व्यक्त होणारा) आणि शासकीय
पातळीवर निश्चित केलेला अधिकृत विनिमयदर यात अंतर पडले . अधिकृत विनिमयदर कमी असलेने
चलनाच्या काळ्याबाजारास व वास्तवापेक्षा अधिक दिसू लागले. के सर्व दोष जागतिकीकरणाच्या प्रकियेत
दरू होतात. कारण यामध्ये विनिमयदर नियंत्रित अधिकृत नसतो. तर तो बाजार निर्धारित असतो चलनाचे
वास्तवमूल्य विनिमयदरात प्रतिबिंबित झालेले असलेने चलनाच्या भविष्यकालीन अवमूल्यनशक्यतेने
होणारे सट्टे बाजीचे प्रमाणही घटते. चलन अशाप्रकारे मर्यादित स्वरुपात चालू खात्यावर परिवर्तनीय करणे हा
एक आपत्कालीन टप्पा असतो. यातन
ू पुढे भांडवली खात्यावरदे खील चलन परिवर्तनीय करणे अभिप्रेत
असते. याचाच अर्थ दीर्घकालीन भांडवली गुंतवणूक करणे व केलेली भांडवल गुंतवणूक काढून घेणे या
दोन्ही बाबी अभिप्रेत असतात. यातन
ू आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवल पुउरणे गतिशील होऊन
व्याजदरावरील तफावत कमी होईल तसेच बचतीचा वापर सर्वात अधिक कार्यक्षम पध्दतीने होऊ लागेल.

६) श्रम गतिशीलतेवरील निर्बंध दरू करणे:

जागतिकीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास तेव्हाच जाऊ शकते. जेव्हा श्रमाच्या आंतरराष्ट्रीय गतीशिलतेवरील सर्व
निर्बंध हे दरू केले जातात जगातील सर्वच राष्ट्रांनी विविध कारणास्तव श्रमाच्या मुक्त स्थलांतरावर बंधने
लादलेली दिसतात. यातील सर्वात महत्वाचे कारण हे राजकीय स्वायत्ततेस यातन
ू बाधा येण्याच्या भीतीचे
आहे . आज पारस्परिकेच्या तत्त्वावर (तुम्ही आमच्या कामगारांना येऊ दिले तर आम्ही तुमच्या कामगारांना
येऊ दे ऊ ) व मख्
ु यत्वे कुशल श्रमिकांच्या बाबतीत काही प्रमाणात श्रमाची गतीशिलता दिसते . यावरही अनेक
प्रकारची बंधने असली तरी अशा प्रकारचे आवश्यक मानवी भांडवल येण्यावरील नियम गरजेनुसार शिथिल
केले जात असे दिसते परं तु अकुशल श्रमिकांना अथवा अतिरिक्त श्रमिकांना विदे शातील श्रमबाजारपेठा
जवळपास बंदच दिसतात. अशा कमगारांना रोजगाराच्या संधी जेथे असतील तेथे जाण्याची मभ
ु ा असणे हे
दे खील जागतिकीकरणाच्या संधी जेथे असतील तेथे जाण्याची मुभा असणे हे दे खील जागतिकीकरणाच्या
प्रक्रियेचा भागच मानाचे लागले . (अर्थात विकसित राष्ट्रे इतर सर्व प्रकारचे जागतिकीकरणाला मात्र विरोधच
करतात) जागतिकीकरणाच्या या वेगवेगळ्या बाजंच
ू ा कसा किती व कधी स्वीकार करावयाचा हे ज्या ज्या
दे शाच्या तत्कालीन परिस्थितीनुरुपच ठरते या सर्व प्रक्रियेला आंतराष्ट्रीय पातळीवर गतिमान करण्याचे
मार्गदर्शन करण्याचे व काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठे वण्याचे कार्यदे खील आंतराष्ट्रीय नाणेनिधी
जागतिक बँक व सहयोगी संस्थांनी केलेले दिसते . यासाठी जागतिकीकरणाच्या प्रकियेत या संस्थांची
भूमिका समजाऊन घेणे गरजेचे ठरते.

नवीन धोरणे (New Policies)

१९९१ मध्ये भारत सरकारने नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारल्या. १९९१ नंतर भारत सरकारने विदे शी
भांडवल आकर्षित करण्यासाठी काही विशेष धोरणात्मक बदल केल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतीय
अर्थव्यवस्थेतील प्रवेश सुलभ झाला आहे . हे धोरणात्मक बदल पुढीलप्रमाणे आहे त.
१. औद्योगिक परवाना पद्धतीत बदल १९९१ च्या औद्योगिक परवाना - धोरणानुसार महत्त्वाचे १८ उद्योग
सोडून इतर सर्व उद्योग परवाना मुक्त करण्यात आले. या धोरणाने जवळजवळ ८५% उद्योगक्षेत्र परवाना
मुक्त केले. म्हणजे सुरुवातीला केवळ १८ उद्योगांसाठीच परवान्याची अट करण्यात येऊन सध्या केवळ
पाच उद्योगांसाठीच परवाना आहे .

२. MRTP कायद्यात बदल MRTP Act १९६९ ने शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांच्या
नवीन गुंतवणुकीवर

अनेक बंधने टाकली होती. मात्र १९९१ च्या औद्योगिक धोरणांतर्गत

शंभर कोटींची ही मर्यादा रद्द करण्यात आली व कंपन्यांच्या विस्ताराला

3. अनुकूल वातावरण तयार करून दे ण्यात आले. तंत्रज्ञान आयातीचे उदार धोरण- १९९१ च्या नवीन आर्थिक
सध
ु ारणा नंतर नवीन तंत्रज्ञान, भांडवली वस्तू इत्यादींच्या संदर्भातील धोरण आणि पद्धतीमध्ये शिथिलता
आणण्यात आली. त्यामुळे तंत्रज्ञानाचा प्रवाह वाढून औद्योगिकरणाला गती प्राप्त झाली.

४. परकीय गुंतवणुकीस मान्यता - नवीन धोरणाच्या माध्यमातून आस्तीत्वातील कंपन्यांना विदे शी भांडवल
गुंतवणूक ५१ टक्या येत वाढविण्यास मान्यता दे ण्यात आली. त्यामुळे परकीय गुंतवणुकीत वाढ होऊन
दे शात गुंतवणुकीत वाढ घडून आली.

५. FERA कायद्यात बदल - नवीन आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेत FERA कायद्यातील तरतुदी रद्द करण्यात
आल्या. त्यामुळे एखाद्या कंपनीतील विदे शी गुंतवणुकीचे प्रमाण जरी ४० टक्केपेक्षा अधिक असले , तरी ती
कंपनी भारतीय कंपनीप्रमाणे कार्यरत राहू शकते.

६. ट्रे डमार्क वापरण्यास संमती विदे शी कंपन्यांना त्यांच्या दे शाचा ट्रे डमार्क म्हणजेच व्यापारी बोधचिन्ह
स्वदे शी बाजारपेठेत वापरण्यास संमती दे ण्यात आली.

You might also like