You are on page 1of 59

प्रस्तावना

8 नोव्हें बर 2016 ला भारत सरकारने चलनातील 85% नोटा परत घेण्याचा निर्णय
घेतला. एका रात्रीत 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातली. या निर्णयाला आज
5 वर्षं पूर्ण झाली आहे त.

काळा पैसा परत आणणं आणि बेहिशेबी संपत्तीच्या विरोधात हे पाऊल


असल्याचं तेव्हा सरकारने स्पष्टीकरण दिलं होतं.

या निर्णयामळ
ु े भारताची अर्थव्यवस्था कॅशलेस होण्यास मदत होईल, असंही
सांगण्यात आलं होतं. या निर्णयाचा संमिश्र परिणाम झाला.

या निर्णयामुळे काळा पैसा बाहे र आला की नाही हे फारसं स्पष्ट झालेलं नाही.
मात्र या निर्णयामुळे कर संकलनाला मदत झाल्याची शक्यता आहे .

मोदी सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’चा किती महिलांना खरोखरं च लाभ झालाय?

बीबीसी रिअॅलिटी चेक : चीनकडून सतत 'हे ' खोटे दावे कशासाठी?

डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली हे ही खरं आहे . मात्र चलनातल्या…

नोटबंदी म्हणजे चलनात असणाऱ्या नोटा ठराविक कालावधी नंतर चलन बाह्य
ठरवणे. त्या कालावधी नंतर चलन म्हणन
ू वापरता येत नाही.

८ नोव्हें बर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताचे पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी
भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केला कि रात्री १२ नंतर ५०० व
हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील. ३० डिसेंबर २०१६ पर्यंतच बँक
खात्यात हे चलन भरता येईल.[१]

पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
दिला होता. त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारीही चकित झाले होते. पंतप्रधानांनी
रात्री आठ वाजता सरकारी टिव्ही चॅनेलवरून एक भाषण केलं आणि त्याच रात्री
बारा वाजल्यापासन
ू 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातन
ू बाद करत
असल्याची घोषणा केली. त्या भाषणात त्यांनी 50 दिवसांची मुदत मागितली होती.
ते म्हणाले होते, "बंधू आणि भगिनींनो, मी दे शाला फक्त 50 दिवस मागितले
आहे त. 50 दिवस. 30 डिसेंबरपर्यंत मला संधी द्या,माझ्या बंध,ू भगिनींनो. 30
डिसेंबरनंतर काही कमतरता राहिली, माझी काही चक
ू निघाली, माझा हे तू चक
ु ीचा
वाटला, तर तुम्ही म्हणाल त्या चौकात मी उभा राहील. दे श जी शिक्षा करे ल ती
भोगायला मी तयार आहे ."

नोटाबंदी नंतर आता 'नाणेबंदी'

चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या केंद्रातील नरें द्र मोदी सरकारने आर्थिक
सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदी सारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. आता
या निर्णयापाठोपाठ मोदी सरकार आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं असून
नोटाबंदी नंतर नाणेबंदी करण्यात आली असल्याचं सत्र
ू ांनी सांगितलं.

भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि है दराबाद या चार ठिकाणच्या


टांकसाळमध्ये नाण्याचं उत्पादन केलं जातं. मात्र या चारही टांकसाळमध्ये
मंगळवारपासून नाण्यांचं उत्पादन करणं बंद करण्यात आलं आहे . नोटाबंदीनंतर
मोठ्याप्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. नाण्यांचं उत्पादन
मोठ्याप्रमाणावर करण्यात आलं होतं. त्यामळ
ु े आरबीआयच्या स्टोरमध्ये नाण्यांचा
भरमसाठ अतिरिक्त साठा झाला आहे . त्यामळ
ु े च आरबीआयने पुढील आदे श
मिळे पर्यंत नाणी पाडण्याचं काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी
सांगितलं.

मोदी सरकारने ८ नोव्हें बर २०१६ रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारने ५०० आणि हजाराच्या नोटा बेकायदे शीर असल्याचं जाहीर केलं होतं.
भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने
सांगितलं होतं. या नोटा बंद केल्यानंतर सरकारने नव्या ५०० आणि दोन हजार
रुपयांच्या नोटा बाजारात चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता नाणेबंदी केली
जात असल्याचं मानलं जात आहे .

नोटबंदीनंतरचं वर्ष... (श्रीराम पवार)

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या पकडीतून मुक्तीचं स्वप्न गेल्या वर्षी आठ


नोव्हें बरला पंतप्रधानांनी दाखवलं होतं. वर्षानंतर ‘काळा पैसा संपला,’ असं
सांगण्याचं धाडस सरकारही करणार नाही. अशा उपायांनी तो संपतही नाही. सारा
काळा पैसा रोखीत साठवून ठे वला जातो, हे गहृ ीतकच चुकीचं आहे , हे
नोटाबंदीनंतर लगेचच अनेकांनी निदर्शनासही आणलं होतं. नोटाबंदीचा फटका
दहशतवाद्यांना बसेल, हाही असाच प्रचारी तर्क होता, हे आता वर्षानंतर स्पष्ट
झालं आहे . दहशतवाद आणि त्याविरोधातली लढाई हा गंत
ु ागंत
ु ीचा मामला आहे .
मुळात नोटाबंदीनं त्यात काही निर्णायक बदल होईल, हे ही गह
ृ ीतक चक
ु ीचंच होतं.
नोटाबंदीसाठी सांगण्यात आलेली उद्दिष्टं चांगलीच होती. मात्र, भ्रष्टाचार, काळा
पैसा, बोगस चलन आणि दहशतवाद या विरोधातली लढाई म्हणून गाजावाजा
झालेल्या या नोटाबंदीनं यातलं नेमकं काय साध्य झालं, असा प्रश्‍न वर्षपर्ती
ू नंतर
तयार झाला आहे .

कें द्रातल्या सरकारची इतिहास घडवण्याची हौस उघड आहे आणि सरकारच्या
समर्थकांची कोणतीही सरकारी कृती ऐतिहासिक ठरवण्याची धांदलही आता
दे शाच्या अंगवळणी पडली आहे . याआधी दे शात काही घडलं नाही; किंबहुना सारं
बिघडलच, असं सांगत आता सारं काही ऐतिहासिक म्हणावं असं घडतं आहे , हे
वेळोवेळी सांगितलं जातं. प्रतिमा हाच राजकारणाचा मुख्य आधार बनवला की हे
घडणं स्वाभाविकही. या सरकारनं केलेल्या नोटाबंदीच्या निर्णायचंही समर्थन
असंच उच्चरवात केलं गेलं. त्यानंतर वर्ष संपताना समर्थक वर्गाचा आणि
अर्थातच राज्यकर्त्यांचा तोच उत्साह कायम आहे . दस
ु रीकडं काळ्या पैशावरचा
सर्जिकल स्ट्राईक म्हणून वर्णन केल्या गेलेल्या या निर्णयावर सुरवातीला
चाचपडणारे विरोधक वर्ष पूर्ण होताना मात्र ‘आर्थिकदृष्ट्या सर्वात बेपर्वाईचा
आणि दे शाला खड्ड्यात घालणारा हा निर्णय आहे ’ असा सरू आळवताहे त.
नोटाबंदीची वर्षपूर्ती सरकारनं ‘काळा पैसा विरोधी दिन’ म्हणून साजरी करणं
आणि विरोधकांनी तो ‘काळा दिन’ ठरवणं ही टोकाची इव्हें टबाजीही प्रचलित
राजकीय चालीशी सुसंगतच आहे . या अपेक्षित राजकारणापलीकडं खरं च
नोटाबंदीसोबत सांगितलेली उद्दिष्टं प्रत्यक्षात आली का याचा आढावा वर्षांनंतर,
म्हणजे आता, घ्यायला हवा. पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा
नाट्यमयरीत्या करताना ‘नोटाबंदी हा काळ्या पैशाविरुद्धचा एल्गार आहे ,’ असं
ध्वनित केलं होतं. हजार आणि पाचशेच्या नोटा रात्रीतून ‘महज कागज के टुकडे’
ठरवताना, आता दे शातला काळा पैसा बाहे र येईलच आणि काळा पैसा
बाळगणाऱ्यांना मोठाच दणका बसेल, असं वातावरण तयार झालं होतं. या
वातावरणाचा प्रभाव इतका होता की किमान सरु वातीचे काही दिवस नोटाबंदीच्या
विरोधात बोलणं तर सोडाच; अंमलबजावणीतल्या त्रट
ु ी दाखवणं हे सुद्धा भ्रष्टांचा
साथीदार ठरवण्याला निमंत्रण दे ण्यासारखं बनलं होतं. दे शातलं ८६ टक्के चलन
एका फटक्‍यात अर्थव्यवस्थेतून काढून घेण्याचे फटके अनिवार्य होते. ते प्रामुख्यानं
ज्यांचा सारा व्यवहारच रोखीत चालतो, त्यांना बसणार हे ही उघड होतं. मात्र,
चांगल्या भविष्यासाठी थोडी कळ सोसण्याचं तत्त्वज्ञान खपवण्यात सरकाराला
तेव्हा यश आलं होतं. आपलेच पैसे काढण्यासाठी तिष्ठत बसावं लागणं हे
लोकांनी दे शाच्या भल्यासाठी स्वीकारलं. रांगेतला त्रास, रोख पैशांअभावी रखडलेली
अनेक कामं, समारं भ, काही मत्ृ यू या सगळ्यापेक्षा काळ्या पैशावर प्रहार होतो
आहे आणि तो करण्याचं धाडस पंतप्रधान दाखवताहे त याचं कौतुक होतं.
नोटाबंदीचं यशापयश कशावर ठरवावं, यावरूनच मळ
ु ात तज्ज्ञांत मतभेद आहे त.
राजकीय नेत्यांत तर ते असणारच, म्हणूनच मोदी किंवा केंद्रीय अर्थमंत्री अरुण
जेटलींसह सारं मंत्रिमंडळ नोटाबंदीच्या यशाचे नगारे वाजवत असताना डॉ.
मनमोहनसिंग ‘ही संघटित लूट होती आणि ‘चांगली कल्पना, वाईट
अंमलबजावणी’ असंही नोटाबंदीचं स्वरूप नाही, तर मळ
ु ात ही कल्पनाच
अर्थव्यवस्थेसाठी घातक होती,’ असं सांगत आहे त. हाच सूर राहुल गांधींपासून
काँग्रेसचे नेते लावतात. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना ठे वलेल्या उद्दिष्टांतलं
काय साध्य झालं, हे खरं तर तपासायला हवं. काळा पैसा हद्दपार करणं हे
नोटाबंदीसाठी सांगितलेलं मूळ कारण, जोडीला बोगस चलन - जे मोठ्या नोटांतच
असल्यानं ते - अर्थव्यवस्थेतून बाहे र पडेल आणि दहशतवाद्यांचे स्रोत आटतील, हे
आणखी एक उद्दिष्ट होतं. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या पकडीतून मुक्तीचं
स्वप्न गेल्या वर्षी आठ नोव्हें बरला पंतप्रधानांनी दाखवलं होतं. वर्षानंतर ‘काळा
पैसा संपला’ असं सांगण्याचं धाडस सरकारही करणार नाही. अशा उपायांनी तो
संपतही नाही. सारा काळा पैसा रोखीत साठवून ठे वला जातो हे गहृ ीतकच चक
ु ीचं
आहे , हे नोटाबंदीनंतर लगेचच अनेकांनी निदर्शनासही आणलं होतं. काळा पैसा
प्रामख्
ु यानं रिअल इस्टे ट, सोनं, जडजवाहिर यांपासन
ू अनेक क्षेत्रांत गंत
ु वला जातो.
रोकड संपवून त्यावर फारसा परिणाम होत नाही. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात
गैरमार्गानं जमवलेला पैसा बॅंकांत येणारच नाही आणि तेवढं काळं धन तोंड काळं
करे ल, असाही एक समज होता. दोन लाख कोटी ते पाच लाख कोटींपर्यंतचे आकडे
यासाठी सांगितले जात असत. सरकारच्या वतीनं तत्कालीन ॲटर्नी जनरलनी
‘तीन लाख कोटींच्या नोटा बॅंकेत परत येणार नाहीत,’ असं सांगितलं होतं.
नोटाबंदीच्या निमित्तानं श्रीमंतांना धक्का दिल्याचं दाखवत ‘गरीब विरुद्ध श्रीमंत’
अशी कृतक् ‌लढाई उभी करण्याचाही प्रयत्न झाला. श्रीमंतांना काळा पैसा गंगार्पण
करायला लागत असल्याचं खद्द
ु पंतप्रधान सांगत होते. प्रत्यक्षात रिझर्व्ह बॅंकेच्याच
अहवालानं, जेवढा पैसा रिझर्व्ह बॅंकेनं चलनात आणला, त्यातला जवळपास ९९
टक्के पुन्हा बॅंकेत परतल्याचं स्पष्ट झाल्यानं या दाव्यातली हवाच निघून गेली
आहे . या परत आलेल्या पैशात सहकारी बॅंकांमध्ये जमा झालेल्या आणि नेपाळ,
भत
ू ानमधन
ू येणाऱ्या पैशाचा समावेश नाही. म्हणजे जवळपास चलनात होत्या
तितक्‍या सर्व हजार-पाचशेच्या नोटा पुन्हा बॅंकेत भरती झाल्या. आता बॅंकेत
आलेल्या पैशांची छाननी होईल आणि त्यातून करचक
ु वेगिरी सापडेल, असं नवं
समर्थन सुरू झालं आहे . यात किती तथ्य आहे , ते यथावकाश समोर येईलच.
नोटाबंदीचा फटका दहशतवाद्यांना बसेल, हाही असाच प्रचारी तर्क होता, हे आता
वर्षानंतर स्पष्ट झालं आहे . दहशतवाद्यांना किंवा नक्षलवाद्यांना मिळणारा पैसा
बोगस चलनातला असतो आणि नोटाबंदीनं बोगस चलनच हद्दपार होईल आणि
दहशतवादी कारवायांवर परिणाम होईल, असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात
दहशतवादी कारवायांत फरक पडलेला नाही. भारतीय लष्करानं काश्‍मिरात
दहशतवाद्यांना टिपण्याची मोहीम अधिक आक्रमकपणे हाती घेतली हे खरं आहे .
मात्र, दहशतवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. दक्षिण आशियातल्या
दहशतवादी कारवायांवर लक्ष ठे वणाऱ्या एका संस्थेच्या आकडेवारीनस
ु ार, २०१६
मध्ये दहशतवादाशी संबंधित मत्ृ यच
ूं ी संख्या ३८२ होती. २०१७ मध्ये ऑक्‍
टोबरअखेर ती ३१५ आहे . दहशतवाद आणि त्याविरोधातली लढाई हा गुंतागुंतीचा
मामला आहे . मुळात नोटाबंदीनं त्यात काही निर्णायक बदल होईल, हे गहृ ीतकच
चक
ु ीचं होतं. नोटाबंदीनं तात्परु त्या स्वरूपात बोगस चलनाच्या धंद्याला चाप
लागला हे खरं आहे . मात्र, नव्या नोटांसारख्या बनावट नोटा काही काळातच समोर
येऊ लागल्या. नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये परत आलेल्या नोटांमध्ये बोगस नोटांचं
प्रमाण तीन सहस्रांश टक्के इतकं अत्यल्प होतं, असं रिझर्व्ह बॅंकेचीच आकडेवारी
सांगते. सरकारनं नोटाबंदीसाठी सांगितलेली सारी उद्दिष्टं चांगलीच होती. मात्र,
त्यासाठी नोटाबंदीचीच गरज होती काय, असा प्रश्‍न वर्षानंतर उभा राहिला आहे .
नोटाबंदीची घोषणा करताना कॅशलेस व्यवहारांचा उल्लेख नव्हता. मात्र, नंतर जणू
याचसाठी सारा अट्टहास असल्यासारखा गाजावाजा सुरू झाला. छोटे व्यापारीही
कसे इलेक्‍ट्रॉनिक व्यवहार करत आहे त आणि कोणती आडगावं कॅशलेस झाली,
याच्या कहाण्या जोरात होत्या. बाजारात चलनच नव्हतं, तेव्हा क्रेडिट कार्ड किंवा
अन्य इलेक्‍ट्रॉनिक पर्याय लोकांनी वापरले. काही काळ डिजिटल व्यवहारांचा
आलेख एकदम वर गेला. मात्र, जसजशी बाजारातली रोकड वाढली, तसतसा पुन्हा
रोखीतल्या व्यवहारांकडं कल वाढला. डिजिटल व्यवहारांकडं जाण्यात गैर काहीच
नाही; पण त्यासाठी नोटाबंदीसारखं पाऊलच गरजेचं होतं काय? शिवाय, या
निर्णयाचे असंघटित क्षेत्रावर विपरीत परिणाम झाले, हे तर आता स्पष्ट झालंच
आहे . शेतमालाचे दर कोसळण्यासारखे काही परिणाम किमान काही काळ दिसून
आले आहे त. रिझर्व्ह बॅंकेच्या पढ
ु ाकारानं झालेल्या अभ्यासात हे उघड झालं आहे .
भ्रष्टाचार, काळा पैसा, बोगस चलन आणि दहशतवाद याविरोधातली लढाई म्हणून
गाजावाजा झालेल्या नोटाबंदीनं यातलं नेमकं काय साध्य झालं, असा प्रश्न मात्र
वर्षपर्ती
ू च्या वेळी तयार झाला आहे . आता नोटाबंदीचं यश अनौपचारिक
अर्थव्यवस्थेकडून औपचारिक अर्थव्यवस्थेकडं जाण्यात असल्याचं सरकारकडून
सांगितलं जाऊ लागलं आहे . त्यासाठी करविवरणपत्रं भरणाऱ्यांची वाढलेली संख्या
दाखला म्हणून दिली जाते. ३४ टक्‍क्य
‍ ांनी ही संख्या वाढली आहे . जवळपास तीन
लाख बोगस कंपन्या समोर आल्या आहे त, हे केवळ नोटाबंदीनंच शक्‍य झाल्याचा
केंद्रीय अर्थमंत्र्यांचा दावा आहे . म्युच्यअ
ु ल फंडातली गुतंवणक
ू १५५ टक्‍क्‍यांनी
वाढली, विमाक्षेत्रातली उलाढाल वाढली, सरकारी येणी मोठ्या प्रमाणात वसूल
झाली. या बाबी मान्य केल्या तरी मागच्या वर्षात अर्थव्यवस्था घसरणीला
लागली, हे वास्तव नजरे आड करायचं कारण नाही. विकासदरातली घसरण हे
त्याचं निदर्शकच होय. यामळ
ु ं च नोटाबंदीचं वर्ष साजरं करताना अर्थमंत्री हे
व्यवस्था अधिक स्वच्छ पारदर्शक झाली यावर भर दे तात. मात्र, विकासाचं काय
झालं, यावर ते मौन पाळताना दिसतात. नोटाबंदीच्या निर्णयाचे आर्थिक परिणाम
तपासले जाणं आणि त्यावरचा वादविवाद हे स्वाभाविक आहे . मात्र, हा निर्णय
केवळ अर्थकारणावर परिणाम करणार नव्हता. किंबहुना तो घेताना त्यापलीकडं
राजकीय परिणामांचा विचार निश्‍चितच केला गेला असावा. आपली प्रत्येक कृती
लोकभावनांना चच
ु कारणारी ठे वण्याचा प्रयत्न पंतप्रधान सतत करत आले आहे त.
हा निर्णय घोषित करतानाही त्यांनी लोकांच्या मनात असलेल्या काळ्या
पैशाविषयीच्या आणि भ्रष्टाचाराविषयीच्या संतापाला आवाहन करण्याची खेळी
केली होती. काँग्रेसचा कार्यकाळ घोटाळ्यांच्या आरोपांनी बदनाम झाल्याच्या पारश
् ्‍
वभूमीवर मोदी सरकार काळा पैसा साठवणाऱ्यांना धडा शिकवत आहे , असा संदेश
दे णं हा या निर्णयाचा राजकीय भाग होता. अशा जवळपास प्रत्येकाच्या जगण्यावर
परिणाम करणाऱ्या निर्णयाकडं लोक कसं पाहतात, याचं निदर्शक म्हणून
निवडणक
ु ांच्या निकालांकडं पाहता येतं. या आघाडीवर नोटाबंदीनंतर झालेल्या
बहुतेक निवडणक
ु ांमध्ये भाजपनं यश मिळवलं आहे . उत्तर प्रदे शातलं दणदणीत
यश नोटबंदी लोकांनी मान्य केल्याचं मानलं गेलं. मात्र त्याच वेळी झालेल्या
पंजाबच्या निवडणुकीत अकाली-भाजप युतीचा दणदणीत पराभवही झाला होता.
निवडणक
ु ांत होणारं मतदान हे एकाच मुद्द्यावरचं सार्वमत अशा स्वरूपात
होण्याची शक्‍यता कमी असते. नोटाबंदी हा एक घटक निवडणक
ु ीत परिणाम
घडवून आणणारा असू शकतो. मात्र, अन्य अनेक घटक मतदानावर परिणाम करत
असतात. अशा मोठ्या निर्णयाचे आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाचे परिणाम
मतदाराचा मूड तयार होण्यात होतच असतात. नोटाबंदीचा निर्णय हा काळ्या
पैशावरचा निर्णायक आघात असल्याचं सर्वसामान्यांना पटवण्यात मोदींना निदान
मागच्या वर्षात यश आलं आहे . आर्थिक आघाडीवर काही चांगले परिणाम लक्षात
घेतले, तरी यासाठी केवळ नोटाबंदी हा एकच उतारा होता काय, असा प्रश्‍न
पडण्यासारखी स्थिती आहे . सरकारच्या मते, हा निर्णय काळ्या पैशाच्या
विरोधातल्या लढाईसाठी होता. काळा पैसा हा दे शाच्या अर्थव्यवस्थेला लागलेला
आजार आहे च. मात्र, चमकदार घोषणा आणि तशा प्रकारच्या निर्णयांनी लगेच तो
दरू होणार नाही. मुद्दा परदे शातून काळा पैसा परत आणण्याचा असो की दे शातलं
काळं धन खणण्याचा असो, त्यात सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. सत्तेतल्या
साडेतीन वर्षांच्या अनभ
ु वानं तरी हे भान यायला हवं. पंतप्रधानांना आणि सरकार
पक्षाला यात राजकीय डाव खेळण्यात यश आलंही असेल. मात्र, दीर्घ काळ
अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांचा विचार निदान यापुढं अशा प्रकारची पावलं
उचलताना करायला हवा. वर्षाच्या वाटचालीत इतकं लक्षात आलं असेल तरी
स्वागतार्हच.

नोटाबंदी आणि ई-पेमेंट

नोटाबंदी इंटरे स्टिंग आकडेवारी :- १

डेबिट कार्डचा एटीएममधन


ू पैसे काढण्यासाठी किती वापर होतो ?
नोटाबंदीच्या आधी म्हणजे

ऑगस्ट महिन्यात ७५ कोटी ६७ लाख वेळा दे शातील जनतेने एटीएममधून पैसे


काढले, त्याचा आकडा होता २ लाख १९ हजार कोटी रुपये .

सप्टें बर महिन्यात ७४ कोटी २२ लाख वेळा एटीएममध्ये डेबिट कार्डाचा वापर


केला गेला , काढले गेले २ लाख २२ हजार कोटी रुपये ,

ऑक्टोबर महिन्यात ८० कोटी वेळा दे शातील जनतेने एटीएममधन


ू पैसे काढले,
त्याचा आकडा होता २ लाख ४२ हजार कोटी रुपये .

आरबीआयची गेले दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर दे शभरात वर्षाला अंदाजे


२५ लाख कोटी रुपये एटीएममधून काढले जातात, म्हणजे महिन्यात आपली
जनता सरासरी २ लाख कोटी रुपये एटीएममधन
ू काढते,याचा अर्थ आपल्या २
लाख २० हजार एटीएम्समध्ये महिन्याला २ लाख कोटी रुपये असले तरी दे शाची
गरज भागते..

नोटाबंदीनंतर च्या पहिल्या महिन्यात म्हणजे १० नोव्हें बर ते १० डिसेंबर या


काळात ४ लाख ६१ हजार कोटींच्या नव्या नोटा चलनात दिल्या असं
आरबीआयने १५ दिवसांपर्वी
ू (१३ डिसेंबरला) सांगितलं होतं, यातल्या फक्त २ लाख
कोटी रुपयांच्या नोटा एटीएममध्ये भरायची तजवीज केली असती तरी दे शातले
सर्व एटीएम चालू राहिले असते, लोकांची कमी गैरसोय झाली असती, पण तेवढी
व्यवस्थाही नीट करता आली नाही, त्यामळ
ु े रांगा लांबल्या… ब्रँचमध्ये तल
ु नेनं
जास्त पैसा ठे वावा लागणार होताच पण एटीएम रिकॅलिबरे शन नसणं हे एक
महत्वाचं कारण सांगितलं जातं. आत्तापर्यंत सर्व एटीएम रिकॅलिबरे ट करण्याचं
कामंही झालं असेल आणि नोटा छपाईही वाढली असेल…
त्यामुळे नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात तरी मागणी पुरवठ्याचं गणित
जळ
ु े ल, चलन वेदना कमी होतील, दे शाची महिन्याची गरज असणारे २ लाख कोटी
रुपये एटीएममध्ये जमा होतील, आणि किमान एटीएमबाहे रील रांगा तरी कमी
होतील अशी आशा करायला हरकत नाही.

नोटाबंदीनंतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमचा वापर घटला?

महत्वाच्या १० पेमेंट सिस्टमचा (RTGS, NEFT, Cheque, IMPS, NACH, UPI, USSD,
POS, PPI, mobile banking) विचार केला तर

नोटाबंदीनंतरच्या गेल्या ४९ दिवसात दे शातील जनतेनं इलेक्ट्रॉनिक पेमेंट


सिस्टमचा वापर कसा केला?

आरबीआयच्या आकडेवारीनुसार

८ नोव्हें बर नंतर म्हणजे नोटाबंदीनंतरच्या पहिल्या महिन्यात ७४ कोटी ३८ लाख


ट्रान्झॅक्शन झाले त्यातून जवळपास साडे ९५ लाख कोटी रुपयांची उलाढाल
झाली.

डिसेंबर महिन्याच्या २६ तारखेपर्यत एकूण ८२ कोटी ट्रान्झॅक्शन झाले ज्यातून


८० लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली.
हे आकडे पाहून तुम्ही दे श कॅशलेसकडे वाटचाल करतोय, कार्ड, Apps, ऑनलाईन
कारभार शिकलाय, डिजीटल बनतोय वगैरे निष्कर्ष काढणार असाल तर

थोडं थांबा…

एक नजर नोटाबंदी निर्णयाच्या तीन महिने आधीपर्यंत दे शात इलेक्ट्रॉनिक पेमेंट


सिस्टमचा कसा वापर करत होती जनता यावर टाकुयात…

आरबीआयच्याच आकडेवारीनस
ु ार

ऑगस्ट महिन्यात जवळपास ७८ कोटी ट्रान्झॅक्शन्स झाले (७७८.४७ दशलक्ष),


त्यातून ११६ लाख कोटी रुपयांची (१,१५,७६७.२४ बिलियन) उलाढाल झाली.

सप्टें बरमध्ये जवळपास ७७ कोटी ३६ लाख ट्रान्झॅक्शन्स झाले (७७३.५९ दशलक्ष),


त्यातून १२९ लाख कोटी रुपयांची (१,२८,५६०.४५ बिलियन) उलाढाल झाली.

ऑक्टोबरमध्ये जवळपास ८७ कोटी ट्रान्झॅक्शन्स झाले (८७०.०३ दशलक्ष), त्यातून


११६ लाख कोटी रुपयांची (१.१५,८५१.३५ बिलियन) उलाढाल झाली.

e-paymets

इ-पेमेंट :- नोटाबंदीच्या आधी आणि नंतर

याचा सरळ अर्थ म्हणजे नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसात इलेक्ट्रॉनिक पेमेंट


सिस्टमचा वापर तुलनेनं कमी झालाय…
टक्केवारीतच बोलायचं झालं तर

अगदी आधीच्या महिन्याशी तल


ु ना केली तरी ऑक्टोबरच्या तल
ु नेत नोव्हें बरमध्ये
ट्रान्झॅक्शन्स १३ कोटींनी (१५ टक्क्यांनी) घटले, पैशांचा हिशेब केला तर
ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हें बर मध्ये २० लाख कोटी रुपयांनी उलाढाल कमी
झाली.

डिसेंबर महिन्यात २६ तारखेपर्यंत तरी ऑक्टोबरच्या तल


ु नेत ट्रान्झॅक्शन्समध्ये
सव्वा पाच कोटींची घट आहे .

थोडक्यात नोटाबंदीनंतर पहिल्या महिन्यात ई-पेमेंटचा वापर १५ टक्क्यांनी


घटलाय तर दस
ु ऱ्या महिन्याच्या २६ दिवसातही इ-पेमेंट वापरात किमान ६
टक्क्यांची घट आहे च.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे नोव्हें बरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ई-


पेमेंटच्या वापरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याचं आरबीआयची आकडेवारी सांगतेय .

कदाचित नोटाबंदीच्या धक्क्यातन


ू दे श हळुहळू सावरत असावा…

नोटाबंदीच्या काळात एटीएमबाहे रच्या रांगांची जास्त नकारात्मक चर्चा होऊ


लागली तेव्हा अचानक कॅशलेस लेसकॅश कॅशलेस असे शब्द कानावर आदळू
लागले, पण आरबीआयच्याच आकड्यांकडे पाहिलं तर लक्षात येईल की, दे श
NEFT, RTGS, IMPS,POS सारख्या ई-पेमेंट सवि
ु धा आधीपासन
ू वापरत होताच,
फक्त नोटाबंदीनंतर त्यात UPI आणि USSD या पर्यायांची भर पडलीय.
UPI (Unified Payments Interface) हे पेटीएम, मोबिक्विकसारखं पण सरकारच्या
NPCI (National Payments Corporation of India) ने विकसित केलेलं App आहे ,
जवळपास ५१ बँका याच्याशी जोडलेल्या आहे त. ऑनलाईन बँकिंगसाठी आपण
आधीपासून वापरत असलेल्या ‘थर्ड पार्टी ट्रान्स्फर’ या पर्यायाचं थोडं अपग्रेडड
े रुप
म्हणजे यूपीआय.

८ नोव्हें बरनंतर यप
ू ीआयमधे ३ लाख व्यवहार झाले ज्यातन
ू ९० कोटी रुपयांची
उलाढाल झाली. डिसेंबरमध्ये ट्रान्झॅक्शनची संख्या थेट पाचपटीने वाढून १५
लाखांवर पोहोचली तर उलाढाल सहापटीने वाढून पोहोचली ५१० कोटींवर म्हणजे
टक्केवारीचा विचार करता ही ४६६ टक्क्यांची वाढ आहे .

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशी फार मोठी जनता ग्रामीण भागात आहे , त्यांना
साध्या फोनवरुन मोबाईल बँकिंगचा, ई-पेमेंटचा वापर करता यावा यासाठी USSD
(Unstructured Supplementary Service Data) ही सेवा सुरु करण्यात आली,
नोव्हें बर मध्ये त्यात सात हजार ट्रान्झॅक्शन्स झाले होते, ज्यातून ७३ लाख
रुपयांची उलाढाल झाली. डिसेंबर महिन्यात यात मोठी वाढ झाली, ट्रान्झॅक्शन्स
पोहोचले साडेसहा लाखांवर तर उलाढाल झालीय तब्बल ७ कोटी १७ लाख रुपये ,
नोव्हें बरच्या तुलनेत ही उलाढाल जवळपास ९०० टक्क्यांनी वाढलीय.

UPI आणि USSD वर सरकार भर दे ईल असे संकेत आहे त, UPI सध्या स्मार्ट
फोनवर वापरता येतं पण ते फिचर फोन म्हणजे साध्या फोनवर सद्ध
ु ा
सर्वसामान्यांना सहज वापरता यावं असे बदल केले जातायत, या दोन पर्यायांचा
वापर येत्या काळात वाढावा असे सरकारचे प्रयत्न सुरु आहे त.
थोडक्यात ८ नोव्हें बरच्या आधीही दे श ई-पेमेंटचे पर्याय मुक्त हस्तानं वापरत
होता, त्यात दोन नव्या पर्यायाची भर हीच नोटाबंदीची दे ण.

नोटाबंदीने काय कमावलं आणि काय गमावलं?

- नोटाबंदी म्हणजे काय

नोटाबंदी म्हणजे कोणत्याही दे शात सरकारने उच्च मूल्याच्या नोटा वापरण्यावर


बंदी घालणे. नोटाबंदीनंतर त्या चलनाद्वारे कोणताही व्यवहार करता येत नाही. 8
नोव्हें बर 2016 च्या त्या रात्रीपासून दे शभरात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा
कागदाच्या तक
ु ड्यासारख्या झाल्या. आज (8 नोव्हें बर 2021) नोटबंदीच्या
निर्णयाला तब्बल पाच वर्षे पुर्ण झाली. या पाच वर्षात किती बदल झाले,
नोटबंदीमळ
ु े दे शभरात काय परिस्थिती निर्माण झाली होती. नोटबंदीचा परिणाम
काय झाला, नोटबंदी यशस्वी ठरली की अपयशी ठरली, हे आज आपण जाणून
घेणार आहोत

- नोटाबंदीचा निर्णय का घेतला गेला?

दे शात नोटाबंदी आणण्यासाठी मोदी सरकारने अनेक कारणे दिली. पहिला म्हणजे
काळा पैसा संपवणे. याशिवाय चलनात असलेल्या बनावट नोटा नष्ट करणे,
कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना दे णे, दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांना
आळा घालणे यासारखी अनेक कारणे सांगण्यात आली.
- नोटाबंदीचा परिणाम काय झाला

नोटबंदीमळ
ु े दे शातील काळा पैसा संपेल आणि रोख व्यवहार कमी होतील, असे
सांगण्यात आले होते. मात्र नोटाबंदीनंतर पुढचे अनेक महिने दे शात गोंधळाचे
वातावरण होते. जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी
दे शभरातील लोक बँकांंमध्ये लांबच लांब रांगेत उभे होते. मात्र तरीही रांगेत उभे
राहूनही लोकांना पैसे मिळत नव्हते.

- नोटाबंदीमुळे दे शाला रांगेत उभे केले-

नोटाबंदीमुळे दे शात निर्माण झालेली परिस्थिती अजन


ू ही लोक विसरलेले नाहीत.
जन्
ु या नोटा बदलण्याची परवानगी आणि निश्चित मर्यादा, यामळ
ु े बँका आणि
एटीएमबाहे र लांबच लांब रांगा लागल्या. कुणाच्या घरी लग्न होतं, तर कुणाला
उपचारासाठी पैशांची गरज होती. नोटा बदलण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे
राहूनही अनेकांना जीव गमवावा लागला.

- लघु उद्योगांवर सर्वाधिक फटका बसला


नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपुर्वी बहुतांशी
उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये
रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तट
ु वडा निर्माण झाल्याने अनेकांचे
उद्योग ठ्प्प झाले.

- नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम

नोटाबंदीचे फायदे आणि तोटे यावर केलेल्या सर्वेक्षणात अनेक लोक नोटबंदी हे
दे शातील आर्थिक मंदीचे प्रमुख कारण मानतात. एका अहवालानुसार, नोटाबंदीनंतर
जीडीपीला मोठा फटका बसला होता. नोटाबंदीच्या घोषणेनंतर पहिल्या तिमाहीत
जीडीपी वाढीचा दर 6.1 टक्क्यांवर आला होता.

नोटाबंदीमुळे रोख रकमेची कमतरता होती. 4 नोव्हें बर 2016 रोजी दे शात चलनी
नोटांचे चलन 17.97 लाख कोटी रुपये होते. नोटाबंदीनंतर 25 नोव्हें बर 2016 रोजी
ते 9.11 लाख कोटी रुपयांवर आले. नोव्हें बर 2016 मध्ये 500 आणि
1,000 रुपयांच्या नोटा चलनातन
ू बाद केल्यानंतर, लोकांकडे असलेले चलन, जे 4
नोव्हें बर 2016 रोजी 17.97 लाख कोटी रुपये होते, ते जानेवारी 2017 मध्ये 7.8
लाख कोटी रुपयांवर घसरले.

- 107 अब्ज रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत


माहितीच्या अधिकारांतर्गत असेही सांगण्यात आले की, 8 नोव्हें बर 2016 रोजी
नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा आरबीआयच्या पडताळणीनुसार एकूण 15,417.93
अब्ज रुपयांच्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. नोटाबंदीनंतर,
यातील 15,310.73 अब्ज नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या. केवळ 107 अब्ज
रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत.

- डिजिटल व्यवहारात मोठी तेजी

नोटाबंदीच्या पाच वर्षानंतर रोखीचा कल नक्कीच वाढला आहे , पण या काळात


डिजिटल व्यवहारही झपाट्याने वाढले आहे त. अधिकृत आकडेवारीनुसार,
डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारख्या
माध्यमांद्वारे डिजिटल पेमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे . नॅशनल पेमेंट्स
कॉर्पोरे शन ऑफ इंडिया (NPCI) चे UPI हे दे शातील पेमेंटचे प्रमुख माध्यम म्हणून
वेगाने उदयास येत आहे .

- भारतात आतापर्यंत 3 वेळा नोटाबंदी झाली

2016 पूर्वीही भारतात दोन वेळा नोटाबंदी झाली होती. भारतात 1938 मध्ये
पहिल्यांदा 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या, पण
जानेवारी 1946 मध्ये ब्रिटिश सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि अचानक
या नोटा बंद केल्या. 1978 मध्ये दस
ु ऱ्यांदा नोटाबंदी झाली. त्यावेळच्या मोरारजी
दे साई सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केला होता. त्यादरम्यान 1000, 5000
आणि 10,000 रुपयांच्या नोटाही बंद करण्यात आल्या होत्या.
तर, 8 नोव्हें बर 2016 रोजी भारतात तिसऱ्यांदा नोटाबंदी झाली. पंतप्रधान नरें द्र
मोदी यांनी याच काळात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती.
आजपासन
ू 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चालणार नाहीत, अशी घोषणा
पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी केली होती.

अर्थतज्ञ अनिल बोकील यांच्या मते, नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाला आहे .
नोटाबंदीमळ
ु े व्यवहारात चलनी नोटांचे प्रमाण कमी होऊन परदर्शकता वाढली
आहे . यापूर्वी रोख चलनामळ
ु े व्यवहार ट्रॅ क करणे अवघड होते. आता व्हाइट मनी
व्यवहारांमध्ये आल्याने आज बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्जे उपलब्ध
आहे त. चलनी नोटा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा स्रोत होता, मात्र आता
डिजिटायझेशनद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या रकमेच्या
नोटांचे चलन कमी झाल्याने फेक करन्सी, दहशतवाद आणि नक्षलवादासह,
दे शभरातील एकूणच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे
बोकील यांचे म्हणणे आहे .

नोटाबंदी हा मोठा 'मौद्रिक झटका' - माजी मख्


ु य आर्थिक सल्लागार सब्र
ु ह्मण्यम

'ऑफ काऊन्सिल : द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकोनॉमी' पुस्तक प्रकाशन


सोहळा

नवी दिल्ली : नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा 'मौद्रिक झटका' होता,


असं पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागर अरविंद सब्र
ु ह्मण्यम यांनी म्हटलंय.
सुब्रह्मण्यम यांच्या 'ऑफ काऊन्सिल : द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकोनॉमी'
या गुरुवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केलाय. नोटाबंदी
झाल्यानंतर सुब्रह्मण्यम यांनी जी प्रतिक्रिया दिली होती, त्याच्या बरोबर उलट
मत त्यांनी या पुस्तकात मांडलंय. त्यावेळी आपण नोटाबंदीचं समर्थन केलं
असलं, तरी अभ्यासाअंती नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा
धक्काच असल्याच्या निष्कर्षाप्रती आल्याचं सब्र
ु ह्मण्यम यांनी म्हटलंय.

नोटबंदी म्हणजे कठोर पाऊल आणि मौद्रिक झटका असल्याचं सुब्रह्मण्यम यांनी
म्हटलंय. ज्यामुळे अर्थव्यवस्था कोसळली आणि पुढचे सात तिनमाहीपर्यंत
कोसळत राहीली... जी आत्ता ६.८ टक्क्यांवर येऊन ठे पलीय... नोटबंदीपूर्वी
अर्थव्यवस्थेचा दर ८

टक्क्यांवर पोहचला होता.

यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनीही गुरुवारी मोदी सरकारवर निशाणा
साधलाय. काँग्रेसनं ट्विटरवर म्हटलंय, 'माजी सीईएनं शेवटी नोटबंदीमळ
ु े झालेल्या
पडझडीवर आपल्या वास्तविक भावनांना उघड केल्याच... सरकारमध्ये राहून
सर्वोच्च नेत्यावर टीका शक्य नव्हती, हे तर स्पष्टच होतं'.

तर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या म्हणण्यानुसार,
'पंतप्रधान नरें द्र मोदी यांच्याद्वारे २०१६ मध्ये ८ नोव्हें बर रोजी जाहीर करण्यात
आलेल्या नोटबंदीवर 'अपारदर्शता' निर्माण टीकून राहिलीय... सुब्रह्मण्यम यांची ही
जबाबदारी आहे की त्यांनी दे शाला सांगावं, हे सर्व कसं झालं

पालथ्या घड्यावर पाणी; नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेतील रोकड पुन्हा वाढली

नोटबंदीच्या या प्रमख
ु उद्दिष्टालाच सरु
ु ं ग लागल्याचे चित्र दिसत आहे .

नवी दिल्ली: मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय अपेक्षइ


े तका प्रभावी ठरला
नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे . रिझर्व्ह बँकेच्या ताज्या
अहवालातून ही बाब समोर आली आहे . रोख रक्कमेत होणाऱ्या व्यवहारांमुळे
काळ्या पैशांचा निर्मितीला चालना मिळत होती. त्यामुळे मोदी सरकारने
नोटबंदीच्या माध्यमातून रोख रक्कमेच्या व्यवहारांवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न
केला होता. नोटबंदीनंतर बहुतांश पैसा बँकिंग व्यवस्थेत परतला होता. यानंतर
सरकारने आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारांची कास धरली
होती. मात्र, नक
ु त्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार नोटबंदीच्या या प्रमुख
उद्दिष्टालाच सुरुंग लागल्याचे चित्र दिसत आहे .

नोटाबंदीपर्वी
ू म्हणजे ४ नोव्हें बर २०१६ च्या आकडेवारीनस
ु ार अर्थव्यवस्थेत १७.९७
लाख कोटी रुपयांची रोकड होती. नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेतील रोकडीचे प्रमाण
कमीही झाले होते. मात्र, १५ मार्च २०१९ च्या आकडेवारीनुसार रोकडीचे प्रमाण
१९.१४ टक्क्यांनी वाढून २१.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे समोर आले
आहे . त्यामळ
ु े विरोधकांकडून मोदी सरकारला पन्
ु हा लक्ष्य केले जाण्याची शक्यता
आहे .

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, दे शात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले असले


तरी गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेतील रोकडीचे प्रमाण तीन लाख कोटींनी वाढले.
नोटाबंदीनंतर रोकडीचे प्रमाण ९ लाख कोटींपर्यंत खाली आले होते. यानंतर केंद्र
सरकार आणि रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न
केला. परं तु, दोन वर्षानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे .

बँकिंग व्यवस्थेतील जाणकारांच्या अंदाजानस


ु ार, निवडणक
ु ांपर्वी
ू अर्थव्यवस्थेतील
रोकडीचे प्रमाण वाढते. याशिवाय, मान्सूनचा हं गाम सरल्यानंतर पिकांच्या
कापणीवेळीही रोख रक्कमेच्या व्यवहारांमध्ये वाढ होते. तसेच सणांच्या काळातही
सोने आणि वाहन खरे दीच्या निमित्ताने रोखीच्या व्यवहारांना चालना मिळते,
असे साधारण निरीक्षण आहे . या सगळ्यामळ
ु े अर्थव्यवस्थेतील राखीव निधीचे
प्रमाण वाढते. परिणामी आता रोकडीचे प्रमाण पुन्हा नोटाबंदीपूर्वी इतके झाल्याने
राखीव निधीचेही प्रमाण त्याच प्रमाणात वाढे ल, असा अंदाज आहे .

पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी ८ नोव्हें बर २०१६ रोजी अनपेक्षितपणे नोटबंदीचा
निर्णय जाहीर केला होता. त्यामळ
ु े चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा
रद्द झाल्या होत्या. यानंतरच्या काळात दे शात मोठी आर्थिक चणचण निर्माण
झाली होती. त्यामळ
ु े विरोधकांनी मोदी सरकारला मोठ्याप्रमाणावर लक्ष्य केले
होते.

नोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती

नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहे त, याची गणना अजूनही सुरूच
असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

मुंबई : नोटाबंदीला पंधरा महिने उलटले तरी 500 आणि 1000 च्या नेमक्या किती
नोटा बँकेत परत आल्या आहे त, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह
बँकेनं म्हटलंय.

गणना वेगानं करण्यासाठी यंत्र आयात

माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत गणना वेगानं करण्यासाठी


रिझर्व्ह बँकेनं 59 अत्याधनि
ु क यंत्र आयात केली आहे त. सध्या या यंत्रांच्या
माध्यमातून प्रत्येक बँकेनं रिझर्व्ह बँकेत जमा केलेल्या नोटांचा हिशोब सुरू आहे .

परत आलेल्या नोटांची किंमत 15.28 लाख कोटी

सध्या हे काम कुठे सुरू आहे , आणि होण्यास आणखी किती अवधी लागेल याचा
तपशील मात्र दे ण्यात आलेला नाही. एप्रिल 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेनं जारी
केलेल्या वार्षिक अहवाला, परत आलेल्या नोटांची किंमत 15.28 लाख कोटी रुपये
असल्याचं सांगण्यात आलं.

16 हजार 50 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत

8 नोव्हें बर 2016 च्या मध्यरात्री नोटाबंदी झाली. त्यावेळी चलनात असलेल्या


पाचशे आणि हजाराच्या नोटांची किंमत 15.44 लाख रुपये होती. त्यामुळे जवळ
जवळ 99 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या असन
ू फक्त 16 हजार 50 कोटी
रुपयांच्या नोटा बँकेत परत आलेल्या नसल्याचं पढ
ु े आलंय.

नोटाबंदीनंतर ५३ दिवसांत २ हजारांच्या बनावट नोटा

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडील अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरें द्र मोदी
यांनी ८ नोव्हें बर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली.

मंब
ु ई : राष्ट्रीय गन्
ु हे नोंदणी विभागाकडील अधिकृत माहितीनस
ु ार, पंतप्रधान नरें द्र
मोदी यांनी ८ नोव्हें बर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली, यानंतर अवघ्या ५३
दिवसात, २ हजार रूपयांच्या बनावट नोटा बाजारात दाखल झाल्या.

नवी नोट ८ नोव्हें बर नंतरच चलनात दाखल

एनसीआरबीने ३० नोव्हें बर रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे , त्यानुसार , २


हजार रुपयांच्या २ हजार २७२ बनावट नोटा गेल्या वर्षी जप्त करण्यात आल्या
होत्या. तसेच २ हजार रुपयांची आणि ५०० रुपयांची नवी नोट ८ नोव्हें बर नंतरच
चलनात दाखल झाली होती.

५३ दिवसांत २ हजारांच्या बनावट नोटा चलनात


यानंतर ८ नोव्हें बरनंतर ३१ डिसेंबर या काळात, म्हणजेच ५३ दिवसांतच पोलिस
आणि इतर सरकारी संस्थांना या बनावट आढळून आल्या. याच काळात संपूर्ण
दे शातील लोक नव्या २ हजार रुपयांच्या नोटे च्या प्रतिक्षेत होते.

पाहा कोणत्या राज्यात किती बनावट नोटा आढळल्या

गज
ु रातमध्ये १३०० ( २ हजार रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा गज
ु रातमध्ये)

पंजाब ५४८

कर्नाटक २५४

तेलंगणा ११४

महाराष्ट्र २७

मध्य प्रदे श ८

राजस्थान ६

आंध्र प्रदे श, अरुणाचल प्रदे श, हरयाणा ३

तर जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये प्रत्येकी २ बनावट नोटा

मणिपूर आणि ओडिशामध्ये २ हजार रुपयांची प्रत्येकी १ नोट आढळली


विशेष म्हणजे काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी, टे रर फंडिंग रोखण्यासाठी
तसेच बनावट चलनाचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी हा नोटाबंदीचा निर्णय
घेतल्याचे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. मात्र, तब्बल २ लाख ८१ हजार ८३९
इतक्या विविध किंमतीच्या बनावट चलनी नोटा दे शातील विविध भागातून
आढळून आल्या होत्या.

दे शात नोटाबंदी आणण्यासाठी मोदी सरकारने अनेक कारणे दिली. पहिला म्हणजे
काळा पैसा संपवणे. याशिवाय चलनात असलेल्या बनावट नोटा नष्ट करणे,
कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना दे णे, दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांना
आळा घालणे यासारखी अनेक कारणे सांगण्यात आली.

- डिजिटल व्यवहारात मोठी तेजी

नोटाबंदीच्या पाच वर्षानंतर रोखीचा कल नक्कीच वाढला आहे , पण या काळात


डिजिटल व्यवहारही झपाट्याने वाढले आहे त. अधिकृत आकडेवारीनुसार,
डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारख्या
माध्यमांद्वारे डिजिटल पेमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे . नॅशनल पेमेंट्स
कॉर्पोरे शन ऑफ इंडिया (NPCI) चे UPI हे दे शातील पेमेंटचे प्रमुख माध्यम म्हणून
वेगाने उदयास येत आहे .
- भारतात आतापर्यंत 3 वेळा नोटाबंदी झाली

2016 पूर्वीही भारतात दोन वेळा नोटाबंदी झाली होती. भारतात 1938 मध्ये
पहिल्यांदा 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या, पण
जानेवारी 1946 मध्ये ब्रिटिश सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि अचानक
या नोटा बंद केल्या. 1978 मध्ये दस
ु ऱ्यांदा नोटाबंदी झाली. त्यावेळच्या मोरारजी
दे साई सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केला होता. त्यादरम्यान 1000, 5000
आणि 10,000 रुपयांच्या नोटाही बंद करण्यात आल्या होत्या.

तर, 8 नोव्हें बर 2016 रोजी भारतात तिसऱ्यांदा नोटाबंदी झाली. पंतप्रधान नरें द्र
मोदी यांनी याच काळात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती.
आजपासन
ू 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चालणार नाहीत, अशी घोषणा
पंतप्रधान नरें द्र मोदी यांनी केली होती.

अर्थतज्ञ अनिल बोकील यांच्या मते, नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाला आहे .
नोटाबंदीमुळे व्यवहारात चलनी नोटांचे प्रमाण कमी होऊन परदर्शकता वाढली
आहे . यापर्वी
ू रोख चलनामळ
ु े व्यवहार ट्रॅ क करणे अवघड होते. आता व्हाइट मनी
व्यवहारांमध्ये आल्याने आज बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्जे उपलब्ध
आहे त. चलनी नोटा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा स्रोत होता, मात्र आता
डिजिटायझेशनद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या रकमेच्या
नोटांचे चलन कमी झाल्याने फेक करन्सी, दहशतवाद आणि नक्षलवादासह,
दे शभरातील एकूणच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे
बोकील यांचे म्हणणे आहे .
समजा, एखाद्या रूग्णाला त्याच्या डॉक्टरने सांगितले की, ‘तुझ्या पोटातील
व्याधीवर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी तुला
भल
ू द्यावी लागेल, काही काळ जखमा सहन कराव्या लागतील’, तर उद्याच्या
व्याधीमुक्तीसाठी कोणताही रूग्ण यास मान्यता दे ईल. सर्व काही आनंदाने सहन
करे ल.

पण जर उद्या ही सर्व शस्त्रक्रिया झाल्यावर त्या रूग्णाला हे ‘रहस्य’ समजले,


की डॉक्टरने या सर्व शस्त्रांचा शरीरावर पर्ण
ू वापर करून, पोट उघडूनदे खील
व्याधीमुक्तीची वैद्यकीय “शस्त्रक्रिया” केलीच नाही. इतकेच नव्हे , तर त्याची
मुळात व्याधीची तपासणीही आणि तयारीही धड केलेली नव्हती, (इच्छा होती की
नव्हती या बद्दल संशयाचा फायदा दिला तरी) अशा वेळी त्या रुग्णाची जी संतप्त
अवस्था होईल, तीच अवस्था आज भारतीय जनतेची नोटाबंदीनंतरच्या काळात
झालेली आहे . वंचना आणि फसवणूक झाल्याचा संताप सर्वत्र दिसतो आहे . कारण
काळ्या उत्पन्नाच्या व्याधीचे काय करायचे ही चिंता कायम आहे च. पण वर या
अनावश्यक आर्थिक सामाजिक जखमांचा, वेदनांचा, तात्कालिक अपंगत्वाचा त्रास
त्यांच्या पदरात आला आहे . त्यामळ
ु े , या सर्व प्रश्नांसमवेत, आता या डॉक्टरचेच
काय करायचे? या प्रश्नाला जाणते लोक हात घालत आहे त. त्यासाठी येत्या काही
काळात मतपेटीतून निर्णायक अशी कृती करायची आहे . असो.

८ नोव्हें बर २०१६ रोजी पंतप्रधान मोदी यांनी ५०० आणि १०००च्या नोटाबंदीचा
निर्णय जाहीर करताना या निर्णयामागे ४ उद्दिष्टे असल्याचे जाहीर केले होते.

खोट्या नोटांवर परिणामकारक कारवाई करणे, भ्रष्टाचार रोखणे, दहशतवादी


कारवायांना होणार्‍या पैशाची रसद बंद करणे, काळ्या पैशावर परिणामकारक
कारवाई करणे.

या पैकी प्रत्येकाबाबत काय काय उपाय योजना करण्यात आल्या आणि त्याचे
कोणते परिणाम दिसत आहे त. त्याची चर्चा आपण करू.

खोट्या नोटांवर परिणामकारक कारवाई ?


दे शात बनावट नोटा करणाऱ्यांना किंवा बाहे रून आणणाऱ्यांना मोठ्या रक्कमांच्या
नोटा हा अर्थातच एक आकर्षणाचा मुद्दा ठरतो. १००रूपयांची बनावट नोट
बाजारात आणण्यापेक्षा ५०० किंवा १०००ची बनावट नोट तयार करून ती चलनात

ु े बनावट नोटा या ५०० किंवा


आणणे केंव्हाही काही पट फायद्याचे आहे . त्यामळ
१०००च्या सर्वाधिक होत्या यात शंकाच नाही. या बनावट नोटा सामान्य
व्यवहारात जनतेच्या हातात त्यांच्या नकळत फिरत असल्याने ही समस्य़ा
अधिकच गंभीर बनली होती. कारण कोणत्याही सामान्य माणसाला अचानक
त्याने दिलेली नोट बनावट असल्याचे बँकेचा रोखपाल सांगत असे. आणि त्यावेळी
ती तत्क्षणीच नोट फाडणे किंवा पोलिस केसला सामोरे जाणे असे दोन पर्याय
त्याच्यासमोर ठे वले जात होते. बनावट नोटांचा स्रोत जरी सीमेपलिकडे किंवा
कोठे ही असला तरी बनावट नोटा आणि खऱ्या नोटा एकमेकांमध्ये मिसळून
गेलेल्या होत्या. ही गंभीर समस्या हाताळण्यासाठी प्रचलित चलनातील या सर्व
नोटा बाजारातून काढून घेण्याचा उपाय करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने
सांगण्यात आले.

दे शातील एकूण चलनात असलेल्या नोटांच्या ८६% चलन ५०० आणि १०००च्या
नोटांच्या रूपात होते. त्यापैकी ९९% म्हणजेच जवळपास सर्वच चलन रिझर्व्ह
बँकेक़डे परत आले. साहजिकच त्यामध्ये खोट्या नोटादे खील असणारच. म्हणजेच
रिझर्व्ह बँकेकडे परत आलेल्या ५०० – १०००च्या नोटांमध्ये बनावट नोटांचे
लक्षणीय प्रमाण असणे अपरिहार्य होते.

पण प्रत्यक्षात आकडेवारी काय सांगते? रिझर्व्ह बँकेचा २०१६-१७चा वार्षिक


अहवाल बनावट नोटांची खालील आकडेवारी दर्शवितो.

पकडलेल्या बनावट नोटांची आकडेवारी

वर्ष पकडलेल्या बनावट नोटांची संख्या


२००४-०५ ५.९४ लाख

२००५-०६ ६.३२ लाख

२००६-०७ ७.६२ लाख

या आकडेवारीवरून असे दिसते की, लोकांच्या हातातील जवळपास सर्व ५००-१०००


च्या नोटा (म्हणजेच ८६% एकूण चलनमूल्य) परत येऊन आणि त्याच्या
तपासणीसाठी सर्व यंत्रणा कामास लावूनदे खील पकडलेल्या बनावट नोटांचे प्रमाण
फक्त २०टक्क्यांनी वाढले आहे . आणि त्यातदे खील २०००च्या नव्या नोटांचा
समावेश आहे च. इतकेच नव्हे , तर गेल्या काही काळात २०००च्या बनावट नोटा
बाजारात सापडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे , अशा बातम्या सतत येत
आहे त.

याचा निष्कर्ष काय निघतो ?


सरकारने बनावट नोटांची अतिभयंकर म्हणून सांगितलेली समस्या मुळात तशी
नव्हतीच. तरीही पंतप्रधानांनी पुरेशा माहितीअभावीच (कोणत्या तरी अनाकलनीय
राजकीय उद्दिष्टासाठी) त्यांच्या भाषणात खोटे निवेदन केले. किंवा

बँकांनी / रिझर्व्ह बँकेने परत आलेल्या नोटांची तपासणीच नीट केलेली नाही.
किंवा बनावट नोटा तपासण्याची मागच्या सरकारने बसविलेली किंवा या
सरकारने नोटाबंदीपर्वी
ू आणि नंतर तशीच चालू ठे वलेली यंत्रणाच चक
ु ीची आहे .
इतकेच नव्हे तर, बनावट नोटांची समस्या इतकी मोठी असण्याचा दावा करणारे
मोदी सरकार जाणीवपूर्वक आजपर्यंत त्या नोटा तपासणी यंत्रणेमध्ये काहीही
बदल करत नाही.

जर ५०० आणि १०००च्या नोटा या मोठ्या रक्कमेच्या असल्याने त्यात


बनावटीकरण करणे आकर्षक ठऱत असेल, किंवा भ्रष्टाचाराचा किंवा काळा पैसा
लपविण्यासाठी सोयीचे ठरत असेल, तर त्याच न्यायाने, २०००ची नोट या सर्व
आर्थिक गुन्ह्यांना उत्तेजन दे ण्यासाठी इतिहासात प्रथमच बाजारात आणली, असे
का म्हणायचे नाही ?

यावरून बनावट नोटांच्या समस्येपेक्षा नरें द्र मोदी सरकारचाच खोटे पणा पर्ण
ू पणे
उघडा पडला आहे . आणि तीच खऱी समस्या आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला
आहे .

भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखणे

भ्रष्टाचाराची निर्मिती आणि व्यवहार हा खरे तर अतिशय मोठा असा विषय


आहे . त्याची व्याप्ती नोटाबंदीच्या कित्येक पट मोठी आहे . तरीदे खील तो नोटांच्या
बंदीपुरता मर्यादित करणे, हा मोदींनी केलेल्या एका राजकीय निवडीचा भाग आहे .
कारण भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काँग्रेसच्या विरोधात लोकपाल विधेयकाला
भाजपाने स्वतःच्या दरु
ु स्त्यांसहित एकमख
ु ाने पाठिंबा दिलेला होता. मात्र त्याच्या
अंमलबजावणीबाबत ते मूग गिळून गप्प आहे त. त्यासाठी संसदे त विरोधी
पक्षनेताच नाही, कारण कोणत्याही एका विरोधी पक्षाचे १०% संसद सभासदच
नाहीत. हे अत्यंत तांत्रिक कारण ते सांगत आहे त. त्यांना त्यासाठी अत्यंत
किरकोळ स्वरूपाची एक सध
ु ारणा लोकपाल कायद्यात करावी लागेल आणि
त्यास सर्व विरोधी पक्ष एकमताने पाठिंबाच दे तील. पण या मूलभूत मुद्याला
आजपर्यंत त्यांनी स्पर्शही केलेला नाही. त्यामळ
ु े भ्रष्टाचाराशी संघर्ष हा मुद्दा केवळ
प्रचाराचा आहे , यात शंकाच नाही. पण तरीही हा मुद्दा प्रस्तुत नोटाबंदीच्या
कक्षेच्या बाहे रचा असल्याने तो तर्ता
ू स बाजस
ू ठे ऊ.

सोशल मिडीयावरून साभार

सोशल मिडीयावरून साभार

सामान्य स्वरूपाचा भ्रष्टाचार प्राथमिक पातळीला रोखीच्या स्वरूपात होतो, हे खरे .


पण तो पैसा त्यानंतर मुख्यतः नोटांमध्येच साठविला जातो, हा अत्यंत शाळकरी
स्वरूपाचा भ्रम आहे . समजा तसे असलेच तरी २०००ची नोट बाजारात आणणे
ह्यामुळे भ्रष्टाचार सरकारने अधिक सोपा केला आहे , असे म्हणावे लागेल. उच्च

ु ऱ्यांच्या नावाने किंवा


पातळीवरचा भ्रष्टाचाराचा पैसा बेनामी पद्धतीने म्हणजे दस
बनावट नावांनी राजरोस बँका, जमिनी, विश्वस्त संस्था, सोने कंपन्यांमध्ये
गुंतविला जातो. त्यापैकी काही हवाला मार्गाने दे शाबाहे र पाठविला जातो. त्याबाबत
सरकारने गेल्या एक वर्षात केलेली कारवाई नगण्य़ किंवा दे खावा म्हणावी इतकी
किरकोळ आहे . उलट नोटाबंदीतन
ू या घटकांना एका बाजन
ू े सावध केले. ते त्यांचा
जो काही साठविलेला भ्रष्टाचाराचा किंवा काळा पैसा असेल, तो कोणत्या मार्गाने
पांढरा करण्याचा प्रयत्न करतील, याची पूर्ण कल्पना असताना दे खील त्या
पळवाटा आधीच बुजविण्याचा किंवा त्या वाटांवर आधीच पहारा बसविण्याचे
अत्यावश्यक पाऊल सरकारने उचलले नाही. त्यामळ
ु े वाकड्या वळणाने पण
निश्चितपणाने त्यातील बहुतक
े सर्व पांढरा होतो आहे , असे दिसते.
उदाहरणार्थ, नोटांबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर तात्काळ आणि त्यानंतर
कित्येक दिवस दे शातील सराफी पेढ्यांनी “गरीब आणि सामान्य जनांच्या सोयी”

ु ानात किंवा अन्य


साठी अहोरात्र आपली सोने आणि दागिने विक्रीची सेवा दक
ठिकाणी सुरूच ठे वली होती. सोन्याचा भाव या “अहोरात्र” चालणाऱ्या बाजारात
६०,०००रूपये १० ग्रॅम पर्यंत गेल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. खरे दी,
स्टॉक्स, ऑर्डर्स, आणि हातातील रोख यांच्या हिशेबातील मागील तारखांची
“कलाकुसर” ह्या मंडळींनी काही चार्टर्ड अकाउं टं ट्सच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली
उत्तमपणाने केली असणार यात शंकाच नाही. नोटाबंदीच्या निर्णयाची गुप्तता
भंग होऊ न दे ता, या पेढ्यांच्या सर्व हिशेबांची सातत्याने एक आठवडा आधी
तपासणी करून त्याच्या नोंदी बंद करून घेणे आवश्यक होते. नोटाबंदीची गुप्तता
पाळूनदे खील एका बाजस
ू नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून त्याच वेळी तात्काळ
आयकर खात्याचे कर्मचारी “अहोरात्र” सेवेतील “गरीबां”च्या स्वागतासाठी उभे
करता आले असते. पण ती संधी घालविली. नोटाबंदी केल्याने ज्यांची “गैरसोय”
झाली, त्याची परु े शी “सोय” करण्याची काळजी सरकारने घेतली, असाच त्याचा
अर्थ आहे .

सरकारला सोन्याच्या या व्यापाऱ्यांची किती काळजी आहे याचा हा पुरावा पहा.


करचुकवेगिरी किंवा भ्रष्टाचाराचा पैसा गुंतविण्याचे इतके महत्वाचे माध्यम
असणाऱ्या सराफउद्योगाला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यात आणण्याची
घोषणा २३ ऑगस्ट २०१३ रोजी करणाऱ्या नरें द्र मोदी सरकारने, सराफांनी जरा
डोळे वटारताच, त्यांना त्यातून सूट दे ण्याची घोषणा केली, इतका हा संबध
ं स्पष्ट
आहे .

कोणास असे वाटे ल की हा एक कल्पनाविस्तार आहे . पण नोटाबंदीच्या


निर्णयानंतरच्या सहा महिन्यात म्हणजे १ जानेवारी २०१७ ते ३० जन
ू २०१७ या
काळात दे शातील सोन्याची आणि चांदीची आयात मागील म्हणजे २०१६ या
संपूर्ण वर्षापेक्षाही जास्त झाली. म्हणजेच नोटांबंदीनंतर पहिल्या सहा महिन्यांत
दे शात दप्ु पट प्रमाणात सोन्या-चांदीची आयात झाली, हा काय योगायोग
समाजायचा? शिवाय ही अधिकृतपणाने होणारी आयात आहे . त्यामळ
ु े त्याचे
खरे दीदार, वितरक यांची पूर्ण माहिती सरकारकडे त्यावेळी त्याक्षणीदे खील होती.
सरकारने ही आयात का थांबविली नाही? तसेच ज्यांनी हे सोने हे विकत घेतले,
त्यांच्या चौकशा केल्या काय? त्यातून काय निष्पन्न झाले? याचा जबाब
सरकारला द्यावाच लागेल. एलबीटी कर रद्द करणे असो की, मनी लॉन्डरिंग
कायद्यातून सूट दे णे असो किंवा ५०,०००रूपयांवरील खऱे दीसाठी पॅन कार्ड
क्रमांकाची सक्ती रद्द करणे असो,प्रत्येक वेळी, सराफांना हवा तोच प्रत्येक निर्णय
घेणारे सरकार आणि त्यांचा पक्ष हे करणे अशक्यच आहे .

वर्ष आयात सोने (वजनात) आयात सोने(मूल्यात ) चांदी

२०१६ (संपूर्ण वर्ष) ५१० टन २३ अब्ज डॉलर्स ३,५४६ टन

२०१७ (१जानेवारी ते ३० जन
ू ) ५२१ टन २२ अब्ज डॉलर्स ३०५० टन

नोट एटीएमच्या आकारात बसत नाही याचा शोध, नोटांची बंडले घेऊन
एटीएममध्ये गेल्यानंतरच रिझर्व बँकेला लागला. इतका गचाळ कारभार झाला.
याचे कारण हे सरकार केवळ मोदींचेच आहे . संघाच्या काही विशिष्ट
आदे शांपलिकडे कोणाचे काहीही ऐकायचे नाही. या तत्त्वावरच ते उभे असल्याने,
या विषयात अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँक हे देखील जनतेइतकेच असहाय्य
असल्याचे दिसत होते. हा प्रकार जगातल्या कोणत्याच दे शात सहन केला गेला
नसता.

बँकेत आलेल्या पैशावरील कारवाई

नोटाबंदीनंतर ४ महिन्यात म्हणजे ३१ मार्च २०१७ पर्यंत चलनबाद नोटा बँकेत


भरावयाच्या होत्या. कोणत्याही बँकेत, कोणत्याही रोखपालाकडे, कोणत्याही जमा
रक्कमेचा नोटांसहित हिशेब कोणत्याही क्षणी त्यांच्याकडे तयारच असतो. तो तसा
नसेल तर त्याच्याकडे कोणीही व्यक्ति एक पैसादे खील जमा करणार नाही. ती
त्याची किमान अटच आहे . अशी जमा रक्कम किती याची माहिती प्रत्येक दिवशी
किंवा फार तर प्रत्येक आठवड्याला दे शपातळीला जमा करणे हे आजच्या काळात
अशक्य आहे , असे म्हणणे म्हणजे रिझर्व्ह बँकेची व्यवस्था आणि अर्थखात्याची
दिवाळखोरीच जाहीर करण्यासारखे आहे . पण प्रत्यक्षात तेच घडताना दिसले नाही
काय ? अत्यंत शरम वाटण्यासारखी ही बाब आहे की, किती नोटा जमा झाल्या
याची आकडेवारी ३१ मार्चनंतर सहा महीने रिझर्व्ह बँक किंवा सरकार दे ऊ शकत
नव्हते. अखेर जेंव्हा रिझर्व्ह बँकेला त्याचा वार्षिक अहवाल सादर करणे भाग
पडले, तें व्हा ही जमा रक्कम किती याचा आकडा दे शाला समजला.

याचा अर्थ काय समजायचा? एक तर सरकारचे अर्थ खाते आणि रिझर्व्ह बँकेत
नव्याने अराजक सुरू झाले आहे , असे म्हणावे लागेल. किंवा सरकारला काही तरी
लपवायचे होते आणि आहे , असे तरी म्हणावे लागेल. ज्याच्यासाठी लोकांनी इतका
त्रास सहन केला, ५० दिवसांत सर्व चित्र बदलण्याच्या वल्गना ज्या पंतप्रधानांनी
केल्या, त्या पंतप्रधानांनी बँकेत ५००-१०००च्या नोटांतील किती रोख जमा झाली,
ही रोखपालाच्या पातळीची अत्यंत सामान्य माहिती दे शापासून लपवित होते. हे
दे शाच्या भवितव्यासाठी अत्यंत भीतीदायक आहे .

काळ्या पैशाचे गौडबंगाल

काळा पैसा हा शब्दप्रयोग चुकीचा असून, खऱे तर काळे उत्पन्न म्हणजेच कर


बुडविलेले उत्पन्न असा शब्दप्रयोग केला पाहिजे. उत्पन्न ही प्रवाही संकल्पना
आहे . तर नोटा ही एक साठ्याची संकल्पना आहे . काळे उत्पन्न प्राप्त करताना
किंवा खर्च करताना केवळ नोटांचाच वापर केला जाईल असे नाही. त्यामळ
ु े
नोटांवरील कारवाई ही काळ्या उत्पन्नावरील कारवाईचा एक छोटा हिस्सा असू
शकते, हे खऱे . पण त्याच्या स्वाभाविक अशा मर्यादा आहे त. त्यामळ
ु े च रद्द केलेल्या
९९ टक्के नोटा बँकांत भरताना काळे उत्पन्न धारण करणाऱ्यांना अडचण आलेली
दिसत नाही.

करचुकवेगिरी आणि त्यातून निर्माण होणारे काळे उत्पन्न ही दे शासमोरची


अत्यंत गंभीर समस्या आहे , यात शंकाच नाही. खास करून परदे शात वळविल्या
जाणाऱ्या काळ्या उत्पन्नामळ
ु े तर दे शाची आर्थिक सुरक्षाच धोक्यात येते.
आजपर्यंतच्या काँग्रेस सरकारांपासून भाजपा सरकारपर्यंत सर्वांनी त्यावर
कोणतीही उपाययोजना केली नाही, हे वास्तव आहे . त्यामळ
ु े त्याविरोधात अखेर
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर अत्यंत कडक शब्दात समज दे ऊन उपाय
करण्याचे आदे श दिले. त्या आदे शाचा भाग म्हणून मोदी सरकारने एक विशेष
तपास समिती साडेतीन वर्षांपूर्वी नेमली. पण त्याची फलश्रुती काय हे अद्याप
कोणालाच कळलेले नाही.

बँक खात्यामध्ये भरलेल्या नोटांची हिशेब तपासणी

आता हा पैसा कोणत्याप्रकारे कसा बँकांमध्ये भरला गेला याची काही आकडेवारी
पाहू. ही आकडेवारी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्वतः संसदे मध्ये त्यांच्या
अर्थसंकल्पावरील भाषणात दिलेली होती.

८ नोव्हें पर १६ नंतर बँक खात्यात भरलेली ५००-१००० नोटांच्या रूपातील रोख


रक्कम बँक खात्यांची संख्या त्यातील एकूण रक्कम सरासरी प्रति
खाते रक्कम

२ लाख ते ८० लाख रूपये १ कोटी ९ लाख ५.७० लाख कोटी रूपये ५


लाख ३ हजार रूपये

८० लाखाहून जास्त रूपये १४ लाख ८० हजार ४.८९ लाख कोटी रूपये ३ कोटी
३१ लाख रूपये

ही आकडेवारी निश्चितच या मंडळींकडे प्रचंड काळे उत्पन्न नोटांच्या रूपात


असल्याचा पुरावा आहे . कारण या दोन्हींची बेरीज ११.५९ लाख कोटी इतकी येते.
एकूण रद्द केलेल्या नोटांच्या रक्कम १५ लाख ५० हजार कोटी आहे . म्हणजेच
ह्या नोटांपक
ै ी सुमारे दोन तत
ृ ीयांशांपेक्षा जास्त रक्कम प्रतिखात्यावर २
लाखापेक्षा जास्त अशा प्रकारे भरली गेलेली आहे . इतकी प्रचंड आहे . आता
बँकांमध्य़े नोटा भरल्या गेल्या म्हणजे त्या उत्पन्नाची रं गसफेदी आपोआपच
झाली, असे समजता येणार नाही, हे खरे . पण तरीही तसे करताना त्याच्या
मालकांचा थऱकाप उडाला असे ही आकडेवारी पाहून दिसते. कारण त्यांनी आपण
भरलेल्या रक्कमेचे स्पष्टीकरण करण्यासाठी आवश्यक ती खोट्या हिशेबांची
निर्मिती दे शातील करबड
ु व्यांचे मुख्य मित्र असणाऱ्या सर्व चार्टर्ड अकाउं टं ट्स च्या
मार्गदर्शनाखाली, (खऱे तर भागीदारीत) केलेली असणार आहे .

आता प्रश्न असा आहे की सरकारने या खात्यांची तपासणी करण्यासाठी कोणती


यंत्रणा राबविलेली आहे . तर सम
ु ारे १८ लाख खात्यांना फक्त पत्रे पाठविली आहे त.
त्यापैकी फक्त सुमारे ३ लाख खात्यांची काही अधिक चौकशी करण्यात येणार
आहे . लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की, पण या खात्यांची तपासणी
करण्यासाठी आयकर खात्याकडे कोणतीही यंत्रणा असल्याचे दिसत नाही. कारण
सध्या आयकर खात्याकडे मान्य केलेल्या जागांपैकी १५ हजार जागा रिक्त
आहे त, याचा विचार करता, त्याबाबत काही विशेष मोहीम सरकार राबवेल आणि
आयकर खाते सक्षम करे ल, ही अपेक्षा फोल ठरली आहे .

एटीएममधून आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी लागलेल्या रांगा (सोशल


मिडीयावरून साभार)

नोटबंदीच्या काळात दे शभरात ठिकठीकाणी एटीएममधून आणि बँकेतून पैसे


काढण्यासाठी लागलेल्या रांगा (सोशल मिडीयावरून साभार)

पन्
ु हा रोखीच्या व्यवहाराकडेच वाटचाल

नोटाबंदीच्या परिणामी अर्थव्यवस्थेला रोखीकडून बँक व्यवस्थेकडे न्यायचे उद्दिष्ट


सरकारने या नोटाबंदीला नंतर जोडले. रोखीच्या व्यवस्थेपेक्षा बँकिंग माध्यमातून
अर्थव्यवस्था चालण्यास उत्तेजन दे णे यात गैर काहीच नाही. त्याचा परु स्कार
सर्वांनीच करावा. पण त्यासाठी सरकारने पेटीएम सारख्या या क्षेत्रातील परदे शी
संस्थाना फायदा कसा मिळे ल याची पूर्ण काळजी घेतली असे दिसते. भीम ऍपचे
प्रसारण नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी केले गेले. त्याचा
किंवा पेटीएमप्रमाणे सेवा दे णाऱ्या सरकारी मालकीच्या आणि अधिक विश्वासार्ह
संस्थेची निर्मिती काही महिने आधी करण्यास कोणतीही अडचण नव्हती.
रोखीपासून मुक्तीचा प्रचार-प्रसार एक वर्षभर आधी करून नंतर नोटाबंदी
करण्याचा निर्णय सरकारने न घेण्यामागे या परदे शी संस्थांचा हितसंबंध
जपण्याव्यतिरिक्त कोणता उद्देश होता हे मला तरी कळलेले नाही.

शिवाय जानेवारी-फेब्रव
ु ारी मध्ये रोख नसल्याने लोक या साधनांचा वापर करत
होते. पण या मार्गाने व्यवहार करण्यात जादा पैसे द्यावे लागत आहे त. ग्राहक
आणि विक्रेता या दोघांनाही लुटण्याचे काम या पेमेंट कंपन्या-क्रेडिट कार्ड कंपन्या
करत असल्याचे दिसल्यावर, शिवाय त्यातील असुरक्षितता अनुभवल्यावर, लोक
पन्
ु हा एकदा रोखीकडेच वळले आहे त. पन्
ु हा एकदा थोड्या फार फरकाने पर्वी
ू च्याच
प्रमाणात रोखीत व्यवहार सुरू झालेले आहे त.

भीषण आर्थिक परिणाम

लेखाच्या सुरुवातीस म्हणल्याप्रमाणे इतका सर्व त्रास सहन केल्यानंतर लोकांच्या


पदरात जे पडले ते म्हणजे रांगा, केवळ नोटांच्या अभावी शेतकऱ्यांच्या पिकाचे
मातीमोल झालेले भाव आणि संसार, बाजारातील मागणीला आणि व्यवहाराला
अचानक लागलेल्या ब्रेक मुळे असंघटित मजरू ांवर,छोट्या दक
ु ानदार, फेरीवाले
यांच्यावर कोसळलेली बेकारीची–उपासमारीची असह्य कुऱ्हाड, सर्व सहकारी बँकांची-
त्यांच्या शेतकरी ग्रामीण खातेदारांची झालेली भीषण दै ना यापेक्षा काहीही नाही.
८६% रोख काढून घेण्यापर्वी
ू (गुप्ततेचा भंग न करतादे खील) १०० रूपयांच्या
नोटांचा साठा करून ठे वता आला असता. सहकारी बँकांबद्दल शंका असतील, तर
निदान त्यांच्यातील चांगल्या वाईटात फरक करून निदान ६०% बँकांची कोंडी
थांबविता आली असती.

पण अत्यंत संवेदनशून्य आणि निर्नायकी रीतीने केवळ एका व्यक्तिच्या लहरी


खातर ही सर्व नोटाबंदी राबविण्यात आली. २०००च्या नोटांची निर्मिती हा तर
विनोदाचाच विषय बनला. कारण ही नोट एटीएमच्या आकारात बसत नाही, याचा
शोध या नोटांची बंडले घेऊन एटीएममध्ये गेल्यानंतरच रिझर्व बँकेला लागला.
इतका गचाळ कारभार झाला. याचे कारण हे सरकार मोदींचे आणि मोदींचेच आहे .
त्यांना मिळणाऱ्या संघाच्या काही विशिष्ट आदे शांपलिकडे कोणाचे काहीही
ऐकायचे नाही. या तत्त्वावरच ते उभे असल्याने या विषयात अर्थमंत्री आणि
रिझर्व्ह बँक हे देखील जनतेइतकेच असहाय्य असल्याचे दिसत होते.

हा प्रकार जगातल्या कोणत्याच दे शात सहन केला गेला नसता. परं तु केवळ
काळ्या उत्पन्नाविरोधात आणि बनावट नोटांविरोधात काही परिणामकारक
कारवाई होईल, या भाबड्या आशेने, एखाद्या पेशंटप्रमाणे दे शातील जनतेने सरकार
आणि पंतप्रधानांवर विश्वास ठे वला. पण हातात अखेर फक्त भोपळा मिळाला, ही
आहे या नोटाबंदीची फलश्रत
ु ी!

नोटाबंदी : एक फसवाफसवी – भाग १

अजित अभ्यंकर 's Author avatar अजित अभ्यंकर

फसवलेल्या रुग्णाची जी संतप्त अवस्था होईल, तीच आज भारतीय जनतेची


नोटाबंदीनंतरच्या काळात झालेली आहे . वंचना आणि फसवणक
ू झाल्याचा संताप
सर्वत्र दिसतो आहे . कारण काळ्या उत्पन्नाच्या व्याधीचे काय करायचे, ही चिंता
कायम आहे च. पण वर या अनावश्यक आर्थिक सामाजिक जखमांचा,वेदनांचा,
तात्कालिक अपंगत्वाचा त्रास त्यांच्या पदरात आला आहे .

नोटाबंदी नंतर ९८.६% जन्


ु या नोटा जमा - रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण
नोटाबंदी नंतर ९८.६ टक्के जुन्या नोटा जमा झाल्या आहे त, याचे स्पष्टीकरण
रिझर्व्ह बँकेने दिले आहे . ८ नोव्हें बर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १०००
रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर नेमके किती जन्
ु या नोटा
सरकार दरबारी जमा झाल्या या प्रश्नाचे उत्तर भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहे .

बाजारपेठेत उपलब्ध ६३२.६ कोटी हजारच्या नोटांपैकी ८.९ कोटी रुपयांच्या नोटा
अद्याप परत आलेल्या नसल्याचा निर्वाळा रिझर्व्ह बॅंकेतर्फे दिला गेला आहे .

३१ मार्च २०१६ दरम्यान १ हजार ५७० कोटी एवढ्या ५०० च्या जुन्या नोटा
चलनात होत्या. त्यानंतर ५८८.२ कोटी रुपयांच्या ५०० च्या नव्या आणि जुन्या
नोटा चलनात असल्याचे रिझर्व्ह बॅंकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे .

नोटाबंदी नंतर ५०० आणि २ हजारच्या नवीन नोटा रिझर्व्ह बँकेद्वारे चलनात
आणल्या गेल्या आहे त. आत्तापर्यंत एकूण चलनाच्या ५०% एवढ्या २ हजारच्या
नोटा चलनात आहे त.

नोटाबंदी आणि GST...मोदींच्या चक


ु ीच्या निर्णयामुळे दे शात आर्थिक मंदी', माजी
पंतप्रधानांची टीका

सरकारच्या चौफेर गैरव्यावस्थापनामळ


ु े दे शात आर्थिक मंदी आली आहे , अशी
टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे .

सरकारच्या चौफेर गैरव्यावस्थापनामळ


ु े दे शात आर्थिक मंदी आली आहे , अशी
टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे .

सरकारच्या चौफेर गैरव्यावस्थापनामळ


ु े दे शात आर्थिक मंदी आली आहे , अशी
टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे .
नवी दिल्ली, 1 सप्टें बर : पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं अर्थव्यवस्थेचं चौफेर
गैरव्यावस्थापन केल्यानं दे शात आर्थिक मंदी आली आहे , अशी टीका माजी
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे . 'अर्थव्यवस्थेची आजची स्थिती
अत्यंत चिंताजनक आहे , जीडीपी वाढीचा दर 5 टक्के आहे , याचा अर्थ आपण
मंदीच्या फेऱ्यात अडकलो आहोत,' असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे .

'मोदी सरकारने द्वेषाचं राजकारण सोडून भारतीय अर्थव्यवस्थेला मानवनिर्मित


संकटातन
ू बाहे र काढावं. यासाठी आर्थिक विषयाचं ज्ञान असलेल्या लोकांशी संपर्क
करायला हवा,' असा सल्ला अर्थतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग
यांनी सरकारला दिला आहे .

कशामळ
ु े ढासळली भारतीय अर्थव्यवस्था?

नोटाबंदीचा निर्णय आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील घोळ यामळ


ु े हे
मानवनिर्मित संकट उभ राहिल्याचं डॉ. सिंग यांनी म्हटलं आहे . 'दे शातील तरुण
वर्ग, शेतकरी, मजरू , व्यावसायिक आणि गरिबांना चांगल्या सोई-सवि
ु धा मिळायला
हव्यात. मी सरकारला विनंती करतो की, द्वेषाचं राजकारण सोडा आणि
अर्थव्यवस्थेला या मानवनिर्मित संकटातून बाहे र काढा,' असं आवाहन मनमोहन
सिंग यांना सरकारला केलं आहे .

नीती आयोगानेही केले होतं भाष्य


भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली नीती आयोगाचे उपाध्यक्ष
राजीव कुमार यांनी दिली आहे . गेल्या 70 वर्षात सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती
सर्वात वाईट झाली आहे . नोटाबंदी आणि जीएसटीमळ
ु े अर्थव्यवस्थेची स्थिती
वाईट झाल्याचं आता नीती आयोगाने मान्य केल्याने केंद्रातील नरें द्र मोदी
सरकारला चागंलाच धक्का बसला आहे .

'खाजगी कंपन्यांना विश्वासात घ्यायला हवं. पूर्ण वित्तीय प्रणालीसाठी सध्याचा


काळ जोखमीचा आहे . याआधी 35 टक्के रोकड उपलब्ध होती. पण आता तीही
उपलब्ध नाही. या सर्व कारणांमळ
ु े अर्थव्यवस्था अत्यंत ढासळली आहे ,' अशी
कबुली नीती आयोगाच्या राजीव कुमार यांनी दिली आहे .

दे शात आर्थिक मंदी येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे .
भारताची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे . गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी 10
लाख लोकांचा रोजगार गेला, अशी आकडेवारी आहे .

दे शातल्या तरुणांना बेरोजगारीची चिंता भेडसावत आहे . दे शभरात 7 कोटी 80 लाख


व्यक्ती बेरोजगार आहे त. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असन

भारताची अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे . दच
ु ाकी वाहनांची विक्री 17 टक्क्याने
तर चारचाकी वाहनांची विक्री 23 टक्याने घटली आहे . बांधकाम क्षेत्रातही मंदी
आहे . 30 मोठ्या शहरांत सुमारे साडेचार लाख घरं पडून आहे त. अतिश्रीमंताच्या
उत्पन्नावरचा प्राप्तिकर अधिभार वाढवल्यामळ
ु े विदे शी गंत
ु वणक
ू दारांनीही शेअर
बाजारातून गुंतवणूक काढली आहे . यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेला उभारी
दे ण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे .

नोटाबंदी आणि जनतेचा आनंदोत्सव

आनंद करं दीकर , पण


ु े, महाराष्ट्र
बायोटे क्नॉलॉजीमध्ये पदवीधर असलेली स्कॉलर कन्या मला सहजपणे आणि
कौतुकाने म्हणाली, ‘मोदींनी आख्या दे शाला वेठीला धरले वा, काय हिंमत आहे !’
भारतीय जनता तिचे हाल झाले म्हणन
ू आनंदोत्सव साजरा का करते आहे ? ही
काय भानगड आहे ? या प्रश्नाने मला फार अस्वस्थ केले. मी संशोधन सुरू केले
आणि जे लक्षात आले, ते धक्कादायक वाटले.

नोटाबंदीमुळे किती काळा पैसा नष्ट झाला, किती खोटा पैसा नष्ट झाला,
अतिरे क्यांना मिळणारा पैसा किती बंद झाला- याबद्दल मोदीसमर्थक आणि
मोदीविरोधक यांच्यात नक्कीच मतभेद आहे त. पण भारतातल्या जनतेला निदान
पन्नास दिवस तरी हाल भोगावे लागले, याबद्दल कोणाचेच दम
ु त नाही- अगदी
मोदींचे स्वतःचेसुद्धा दम
ु त नाही. या काळात गरिबांचे रोजगार बुडाले, किराणा
घ्यायला पैसे नाहीत म्हणन
ू उपासमार झाली, अंगणवाडीत मल
ु ांना खायला
मिळाले नाही, बियाणे घ्यायला पैसे नाहीत म्हणून पेरणी करता आली नाही,
बँकांच्या रांगेत उभे असताना जीव गेले, इत्यादी-इत्यादी. पण भारतातल्या जनतेने
हे हाल निमूटपणे सहन केले. हाल निमूटपणे सहन केले इतकेच नाही, तर आपण
किती हाल सोसले याची रसभरीत वर्णने इतरांना सांगितली. मी अशी जी वर्णने
ऐकली, त्यामध्ये मला द:ु ख नाही तर आनंद जाणवला, अभिमान जाणवला.
मोदींनी आपल्याला दे शासाठी कष्ट भोगण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणून
मोदींबद्दल कृतज्ञतेची भावना जाणवली. या हाल भोगण्यात आनंद मानणाऱ्यांना
काळा पैसा काय असतो, तो कोठून येतो, कुठे जातो याबद्दल विशेष काहीच माहीत
नव्हते. आपले हाल झाले, याबद्दल आनंद होता. वानगीदाखल : विठ्ठल सुरवसेचच

उदाहरण घ्या. तो माझ्या गाडीचा सारथी आहे . आम्ही खूप वेळ एकत्र असतो,
त्यामुळे आमच्यात बरा संवाद आहे . एका रस्त्यावरच्या मारामारी आधीच इजा
झालेल्या त्याच्या पायाला परत मार बसला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. त्याच्या
पायावर नोटाबंदीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील फार मोठ्या खासगी,
धर्मादाय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. सात दिवसांनंतर हॉस्पिटल सोडायच्या
वेळी अंदाजे १५,००० रुपये बिल येणार होते. विठ्ठलकडे, त्याच्या नातेवाइकांकडे
एवढे पैसे १००च्या नोटांमध्ये रोख नव्हते. माझ्याकडे असलेली, वापरता येणारी
रोकड ५,००० पेक्षा कमी होती आणि मला बाहे र गावी जायचे होते. मग मी माझे
एक क्रेडिट कार्ड विश्वासाने विठ्ठलकडे ठे वले, एक चेकही दे ऊन ठे वला. प्रत्यक्ष पैसे
भरण्याची वेळ आली, तेव्हा हॉस्पिटलने स्वाईप मशीन चालत नाही म्हणून
क्रेडिटकार्ड घ्यायला नकार दिला. नोटाबंदीमुळे काम खूप वाढले म्हणून सात
दिवस झाले होते तरी माझा स्थानिक चेक विठ्ठलच्या खात्यात जमा झाला
नव्हता. विठ्ठल हॉस्पिटलमध्ये कैदी झाला. मी पुण्याला परत आल्यावर विठ्ठलची
सुटका झाली! आणि मग मला नंतर जे पहायला मिळाले, ते पूर्णत: अनपेक्षित
होते. मोदींवर आणि नोटाबंदीवर विठ्ठल चिडला असणार, अशी माझी अपेक्षा होती.
बरे , तो मोदींचा पाठीराखा नव्हता, तर मनसेवाला. पण हॉस्पिटलमधन
ू बाहे र
आल्यावर तो त्याला झालेल्या त्रासाच्या हकिगती मला मोठ्या आनंदाने सांगत
होता आणि शेवटी म्हणाला, मोदींनी लय भारी काम केलंय.’ हा काय प्रकार आहे ,
मला काही कळे ना. मग मला पाच-सहा लोकांकडून असेच अनुभव आणि निष्कर्ष
ऐकायला मिळाले. अगदी अलीकडे माझ्या समाजवादी मित्र-मैत्रिणीची २१ वर्षे
वयाची बायोटे क्नॉलॉजीमध्ये पदवीधर असलेली स्कॉलर कन्या मला सहजपणे
आणि कौतुकाने म्हणाली, ‘मोदींनी आख्या दे शाला वेठीला धरले- वा, काय हिंमत
आहे !’ भारतीय जनता तिचे हाल झाले म्हणून आनंदोत्सव साजरा का करते
आहे ? ही काय भानगड आहे ? या प्रश्नाने मला फार अस्वस्थ केले. मी संशोधन
सुरू केले आणि जे लक्षात आले, ते धक्कादायक वाटले.

स्वपीडन आणि परपीडन : आज भारतातील जनता सामहि


ू क स्वपीडनाच्या
विकृतीने जर्जर झाली आहे का? स्वपीडन (मासोकिझम, masochism)1 हा एक
मानसिक आजार आहे , की मानसिक विकृती आहे ? की स्वपीडन अल्प प्रमाणातील
लोकांमध्ये, असलेला वेगळे पणा आहे ? की स्वपीडन बहुसंख्य लोकांमध्ये छुपा’
असलेला स्वभाव आहे ? याबद्दल तज्ज्ञांमध्ये अनेक मते आहे त. स्वत:ला वेदना
करून घ्यायच्या आणि त्यात आनंद मानायचा, हे स्वपीडन करणारी व्यक्ती
करते, असे वैद्यकीय मानसशास्त्रात सांगितले आहे . स्वपीडनातील वेदना या
शारीरिक असतात तशाच मानसिकही असू शकतात. स्वपीडन करणारी व्यक्ती
स्त्री असू शकते तशीच पुरुषही असू शकते, परपीडन (सॅडिझम sadism) हाही
मानसिक आजार किंवा मानसिक विकृती आहे . परपीडन आजाराने जर्जर व्यक्ती
दस
ु ऱ्याला वेदना-क्लेश दे ऊन आनंद मिळवते. स्वपीडन जर्जर व्यक्ती आणि
परपीडन विकृती असलेली व्यक्ती यांचे एकमेकांशी चांगले जळ
ु ते. ते एकमेकांच्या
गरजा पुऱ्या करतात आणि सुख भोगतात. स्वपीडनाची गरज असणारी व्यक्ती
सामान्यत: मानसिक उपचारांसाठी जात नाही. स्वपीडनाची गरज असणारी व्यक्ती
आपली गरज पुरी करू शकेल, असा परपीडक सहकारी शोधते. स्वपीडक आणि
परपीडक ज्या वेदना किंवा क्लेश अनभ
ु वतात, ते मख्
ु यत: लैंगिक व्यवहाराशी
संबंधित असतात.

पुरुषाने स्त्रीला दे लेल्या शारीरिक वेदना हे या संबंधांचे अधिक आढळून येणारे


रूप आहे . समाजात स्वपीडक आणि परपीडक व्यक्ती किती असतात याचा अंदाज
करता येणे कठीण आहे , कारण अशा व्यक्ती आपल्यातील विकृती जाहीर करत
नाहीत. ते मानसोपचारासाठी क्वचितच डॉक्टरकडे जातात. अर्थात बायकोला
नवऱ्याने मारहाण करणे, क्लेश दे णे हे फक्त पुरुषातील परपीडन विकृती आणि
स्त्रीतील स्वपीडन विकृती यांच्यातूनच होते असे नाही. पुरुषवंशक, पुरुषसत्ताक,
परु
ु षप्रधान समाजातील मर्दानगीच्या संस्कृतीतन
ू आणि योनिशचि
ु तेच्या
व्यवहारातूनही स्त्रीला शारीरिक-मानसिक यातना दिल्या जातात. त्यामुळे
स्त्रियांवर होणाऱ्या एकूण अत्याचारा’वरूनही समाजातील स्वपीडन आणि परपीडन
विकृती किती लोकांना आहे याचा अंदाज करता येत नाही. अमेरिकेत याबाबत
ज्या सामाजिक पाहण्या गेल्या तीस वर्षांत झाल्या आहे त, त्यात अमेरिकेच्या
एकूण लोकसंख्येतील स्वपीडक आणि परपीडक यांच्या प्रमाणांचे अंदाज १०% ते
८५% इतके कमालीचे वेगवेगळे सांगण्यात आले आहे त. पण या दोनही
विकृतींबद्दल वैद्यकीय मानसशास्त्रात ज्या मोठ्या प्रमाणावर लिखाण झाले आहे ,
त्यावरून या विकृती समाजात नगण्य प्रमाणात आहे त असे वाटत नाही. स्वपीडन
आणि परपीडन यांना इंग्रजीत अलीकडे एकत्रितपणे BDSM (Bondage,
Dominance, Sadism, Masochism यातील आद्याक्षरे ) म्हणतात. मी माहिती
आंतरजालात गुगलद्वारे BDSM चा शोध घेतला. या विषयावरची माहिती दे णारी
३२ कोटी ६० लाख संकेतस्थळे उपलब्ध असल्याचे गग
ु लने मला एक सेकंदाहून
कमी वेळेत सांगितले. ही संख्या किती कमी- जास्त आहे याचा अंदाज येण्यासाठी
मी काही इतर शब्दांचा शोध घेतला. या शब्दांबद्दल माहिती असणाऱ्या
संकेतस्थळांची संख्या अशी आहे : feminism : ५ कोटी ७६ लाख, democracy: २३
कोटी ३० लाख, BDSM : ३२ कोटी ६० लाख, marriage: ५६ कोटी ६० लाख.

सामाजिक आजार : ज्या विकृती एकेका माणसामध्ये संभवू शकतात, त्यांपैकी


काही विकृती समाजात सामूहिक पातळीवरही संभवू शकतात. माणसामधल्या
हिंसक प्रवत्ृ तीबद्दल हे फार खरे आहे . रस्त्यावर एखाद्या खिसेकापच
ू ी धुलाई सुरू
असली; तर ‘जाता-जाता हात साफ’ करून घेणारे मध्यमवयीन, मध्यमवर्गीय
‘सभ्य’ परु
ु ष आपल्याला नेहमीच दिसतात. धार्मिक दं गा उसळला की, त्यात नेहमी
शांत असणारे पुरुषच नाहीत तर स्त्रियाही सामील होतात. ‘त्यांच्या’ बायकांवर
बलात्कार करायला या स्त्रिया ‘आपल्या’ पुरुषांना प्रोत्साहन दे तात! स्वपीडन
तसेच परपीडन हे हिंसेचच
े एक रूप आहे . विशिष्ट परिस्थित संपूर्ण समाज,
समाजाचा फार मोठा गट पीडनाच्या विकृतीने जर्जर होऊ शकतो.

जनतेमध्ये ही जी स्वपीडनाची वत्ृ ती निर्माण होऊ शकते, तिला मानसशास्त्रात


Mass Masochism म्हणजे ‘सामुदायिक स्वपीडन’ असा शब्द वापरण्यात येतो.
मानसशास्त्राच्या शब्दकोशात Mass Masochism म्हणजे ‘सामद
ु ायिक स्वपीडन’
याचा पुढील अर्थ दे ण्यात आला आहे : सामहि
ू क त्याग, आहुती व इतर क्लेश होऊ
दे णे आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करणे. विशेषत: अशी कृती एका भुरळ
पाडणाऱ्या हुकूमशहाच्या संदर्भात करून त्याला आपले अधिकार आणि आवाज
सुपूर्त करणे... इतिहासात सामुदायिक स्वपीडन साजरे करणारे काही समाज, काही
संस्कृती होऊन गेल्या आहे त.

ऐतिहासिक उदाहरणे : माणसांमध्ये सत्तेला शरण जाण्याची प्रवत्ृ ती असते, हा


वाईट व द:ु खद धोका रशियातील क्रांतीचे नेते आणि थोर मार्क्सवादी विचारवंत
लेनिन यांना जाणवला होता. १९०५च्या रशियातील सैनिकांच्या बंडाबद्दल ते
लिहितात- शेतकऱ्यांबद्दल सैनिकांना अपार सहानभ
ु त
ू ी होती. जमिनीचा उल्लेख
केला तरी सैनिकांचे डोळे भरून यायचे. सैनिकांनी स्थानिक लष्करी सत्ता अनेक
वेळा ताब्यात घेतली, पण त्या सत्तेचा ठरवून वापर त्यांनी कधीच केला नाही.
अत्याचारी अधिकाऱ्याची हत्या केल्यावर ते भांबावून जायचे. इतर अत्याचारी
अधिकाऱ्यांना सोडून द्यायचे. सत्ताधाऱ्यांना बिनशर्त शरण जायचे, स्वत: गोळ्या
खायचे. अत्याचारी सत्ताधाऱ्यांचे जोखड गुमानपणे मानेवर घ्यायचे.2

लेनिनना सैनिकांमधील या स्वपीडन व्यवहाराबद्दल द:ु ख होते. त्यातून त्यांना


बाहे र काढायचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यानंतर काहीच वर्षांत शेजारच्या
जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलरने जनतेतील या स्वपीडन प्रवत्ृ तीचा कमालीचा
फायदा उठवण्याचे ठरवले. हिटलर त्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात लिहितो- जे
शक्तिशाली आणि अविचल आहे त, तेच नेते सर्वसामान्य जनतेच्या मनावर कब्जा
करू शकतात. जनता स्त्रीसारखी आहे . स्त्रीचे अंतर्मन हे कार्यकारण विचारांनी
ठरत नाही; तिचे अंतर्मन हे धूसर भावनिक गरजांनी ठरते. तिला कोणाचा तरी
आधार हवा असतो. कोणा कमजोरावर सत्ता गाजवण्यापेक्षा शक्तिशाली पुरुषाला
शरण जाणेच स्त्री पसंत करते. जनतेचेही तसेच आहे . जनतेला ठोस निर्णय घेऊन
तो राबवणारा शक्तिशाली नेता हवा असतो. त्यातच त्यांना आधार वाटतो.
जनतेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नको असते. त्याबद्दल त्यांना लाज वाटत
नाही. त्यांना वैचारिक कोंडी झाल्याचे द:ु ख होत नाही. एक माणूस म्हणून
असलेल्या त्यांच्या हक्कांची पायमल्ली त्यांना हवीशी वाटते. क्रूर सत्ताधाऱ्यांनी
त्यांची केलेली ससेहोलपटच त्यांना हवीशी वाटते.3

जिच्यावर राज्य करायचे, ती जनता स्त्री आहे . राज्यकर्ते परु


ु ष आहे त. जनतेला-
म्हणजे स्त्रीला पुरुष राज्यकर्त्यांकडून दमन हवेच असते, असा विचार भारतात
रुजवण्याचा प्रयत्न इंग्रज राज्यकर्त्यांनीही केला. पुष्पा भावे लिहितात-
वसाहतवादाच्या काळात राज्यकर्ते आणि प्रजा दोन्ही बाजूंना पौरुषप्रतिमांचा
तल
ु नात्मक वापरही झाला. यात जीत आणि जेते यांच्यामधील नात्याला ‘पौरुष-
स्त्रैण’ हे स्वरूप दे ण्यात आले. विजय हा नेहमी पुरुषी यामळ
ु े पाश्चात्त्य जगातून
आलेले जेते पुरुष, तर आशियाई जीत हे स्त्रैण- अशी विधाने झाली. भारतात
इंग्रजांनी स्वत:ला पुरुष मानून बंगाली पुरुष ‘बायकी’ आहे त, असे विधानही केले.4

विचारवंतांचे विचार : जर्मनीतील नाझींच्या उदयानंतर युरोपमधील अनेक


विचारवंतांनी जनतेवर फॅसिझम कसा लादला गेला, जनतेने फॅसिझम का
स्वीकारला- याबद्दल अभ्यास करून विचार मांडले आहे त. त्यामधे विल्हे ल्म रिच,
सर्जे चाखोटिन, एरिक फॉर्म या तीन प्रमख
ु विचारवंतांनी जनतेतील स्वपीडन
प्रवत्ृ ती आणि नेत्याची परपीडन वत्ृ ती यांच्या परस्परपूरक व्यवहारातून फॅसिझम
राष्ट्रावर कब्जा करतो, हे आग्रहाने व स्पष्टपणे मांडले आहे .

विल्हे ल्म रिच हे त्यांच्या ‘मास सायकॉलॉजी ऑफ फॅसिझम’ या पुस्तकात


सांगतात- लैंगिक दडपणक
ू आणि लैंगिक भीती यांच्यामधन
ू हुकूमशाही रचनांची
पायाभरणी होते. आर्थिक पिळवणक
ू झालेल्या माणसाची मानसिकता लैंगिक
दडपणुकीतून अशा तऱ्हे ने बदलली जाते की त्याच्या भावना, विचार व कृती
स्वत:च्या भौतिक हितसंबंधांच्या विरोधात काम करू लागतात.5
सर्जे चेखोटिन या शास्त्रज्ञांनी नाझींविरुद्ध प्रचाराची मोठी आघाडी उघडली होती.
चेखोटिन लिहितात- व्यक्ती व्यक्तींनी वेगवेगळे जगण्याच्या या युगात व्यक्ती
या हुकूमशहांच्या हातातील साधने बनतात. ही माणसे घाबरलेली असतात.
मानसशास्त्राची उपजत जाण असलेले, कोठलेही नीती-नियम न पाळणारे
हुकूमशहा त्यांच्या बाहुल्या बनवतात. यालाच मी एक प्रकारचा मानसिक
बलात्कार म्हणतो.6

एरिक फ्रॉम लिहितात- माणसांना स्वातंत्र्याची जशी स्वाभाविक गरज असते,


तशीच दस
ु ऱ्याच्या अधीन होण्याचीही स्वाभाविक गरज असते का? असे जर
नसेल, तर आज घडीला फॅसिझमचे जे आकर्षण लोकांना वाटते ते का, याचा
उलगडा कसा होणार? फॅसिझम लोक का स्वीकारतात हे समजायचे असेल, तर
आपल्याला मानसशास्त्राचा आधार घ्यावाच लागेल. कारण माणसातल्या ज्या
राक्षसी प्रवत्ृ ती इतिहासजमा झाल्यात असे आपल्याला वाटत होते, त्या परत
आल्या आहे त.7

या अभ्यासातन
ू मला नोटाबंदीमळ
ु े झालेले हाल-छळ यातन
ू जनतेला आनंदोत्सव
साजरा का करावासा वाटला, हे काहीसे कळले. पण मला आता नवाच प्रश्न जास्त
भेडसावतो आहे . जनतेला आपण परपीडक हुकूमशहाच्या हातातील बाहुल्या,
स्वपीडनात आनंद मानणाऱ्या बाहुल्या झाल्या आहोत- हे केव्हा आणि कसे
कळे ल?

नोटबंदी : परिणाम मोजण्याची घाई कशाला?

4 वर्षांपूर्वी
नोटबंदी : परिणाम मोजण्याची घाई कशाला?|ओपिनिअन,Opinion - Divya
Marathi

‘मि शन मोड’ ही मोदी सरकारची कार्यपद्धती…. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया,


डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत इ. योजनांच्या माध्यमातून त्यांनी ही कार्यपद्धती
राबवण्याचा प्रयत्नही केला आहे . विविध योजनांचे एकत्रीकरण, भव्यता, आकर्षक
नामकरण, घोषणामूल्य, योजनांबद्दल प्रसिद्धी आणि दृश्य नेतत्ृ व याद्वारे आपले
वेगळे पण दाखवन
ू दे ण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. या सर्व योजना सकारात्मक व
विकासाभिमुख असल्याने यशस्वी झाल्यास कौतुक व न झाल्यास एक स्तुत्य
उपक्रम या प्रकारात मोडतात.

पण धक्कातंत्रावर आधारित नोटबंदी आणि सन २०१० पासन


ू लागू होणार, लागू
होणार असा जीएसटी हे या सरकारचे धाडसी निर्णय म्हणावे लागतील. कारण या
निर्णयांची अंमलबजावणी खडतर होती. याचा परिणाम सर्वसामान्यांवर लगेच
होणार होता. काही प्रबळ घटकांवर याचा प्रतिकूल परिणाम होणार असल्यामुळे
अडथळे अपेक्षित होते आणि लप
ू होल्स राहिल्यास काही धोक्यांचीही शक्यता
होती. या संवेदनशीलतेमळ
ु े व अंमलबजावणीतील अपेक्षित व अनपेक्षित कच्च्या
दव्ु यांमुळे मोदींच्या सुमारे ३ वर्षांच्या शासनकाळात विरोधी पक्ष, विरोधक व
अभ्यासकांना “परु स्कार वापसी’नंतर प्रथमच सरकारवर जाेरदार टीका करण्याची
संधी मिळाली.

>सामान्य नागरिकाला काय वाटते?

मोठ्या नोटा, भ्रष्टाचार व काळा पैसा यांचे फार जवळचे नाते आहे , असे
मानणाऱ्या सर्वसामान्य भारतीयाला नोटबंदीचा निर्णय भावला. रांगेत उभा राहीन,
त्रास सहन करीन; पण भ्रष्टाचार संपायला हवा या आशावादातन
ू बहुसंख्य
नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पुढील अनेक आठवडे बँकेसमोरील रांगा,
बंद असलेले एटीएम, दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर मिळालेले

दोन-पाच हजार रुपये, दक


ु ानदारांचा क्रेडिट कार्ड घेण्यास नकार अथवा २% मागणे,
नोटबंदीनंतरची अंमलबजावणी सुरळीत व्हावी म्हणून नियमांमध्ये अनेक वेळा
केलेले बदल, बँकेच्या रांगेत झालेले मत्ृ यू व यातील सर्व कच्चे दव
ु े ओळखून
विरोधकांनी केलेली टीका यामुळे निर्णय भावलेल्या सामान्य नागरिकाची चिडचिड
व द्विधा मनःस्थितीही झाली. एक महिन्यानंतरही बँकेच्या रांगेचा त्रास, पैसे
मिळण्याची अडचण, नोटांचा आकार बदलला म्हणून एटीएमचा पार्ट बदलायला
लागणारा दीर्घकाळ, काळा पैसा इतरांच्या माध्यमातून बँकेत जमा होतो आहे
अशा बातम्या आणि मुख्य म्हणजे काळ्या पैशाच्या दे वाण-घेवाण व संचयावर
उपाय म्हणन
ू मोठ्या नोटांवर बंदी या पार्श्वभम
ू ीवर २००० रुपयांची नोट चलनात
आणणे या सर्वांमुळे या शासनाचा सेन्सिटिव्ह व काॅन्फिडेन्शियल या नावाखाली
गह
ृ पाठ तर कमी नाही ना पडला हे अर्थशास्त्र न समजणाऱ्या व समजून
घेण्याची इच्छाही नसणाऱ्या सामान्य नागरिकाला वाटले, हे नक्की.

>पहिल्या वर्षातील आकडे काय सांगतात?

नोटबंदीला ६ महिने पूर्ण झाल्यावर विविध अहवाल, लोकसभा व राज्यसभेतील


प्रश्न याद्वारे येणारी अाकडेवारी माध्यमांद्वारे प्रसारित होऊ लागली आणि या
धाडसी निर्णयाने काय साध्य केले व काय साध्य होणार आहे , एवढ्यावरच प्रश्न
मर्यादित न राहता हा निर्णय चक
ु ला का, येथवर प्रश्न विचारले जाऊ लागले. काही
मूलभूत निर्देशांकांची आकडेवारी या शंकांना प्रबळ करते. उदा.

१) नोटबंदीपर्वी
ू रु. ५०० व रु. १००० च्या १५.४४ लाख कोटी नोटा चलनात होत्या.
त्यापैकी रु. १५.२८ लाख कोटी नोटा या बँकांत परत आल्या. म्हणजे केवळ १%
नोटा परत आल्या नाहीत. याचा अर्थ केवळ १% काळा पैसा भारतात आहे काय?
२) परत न आलेल्या नोटांची किंमत ही १६००० कोटी रुपये आहे व नवीन नोटा
छापण्यासाठीचा खर्च २१००० कोटी रुपये झाला, तेव्हा १% काळा पैसा
संपवण्यासाठी ५००० कोटी रुपयांचा खर्च योग्य आहे का?

३) खोट्या नोटांच्या माध्यमातून दहशतवाद हा भारताला एक मोठा धोका आहे व


नोटबंदीद्वारा ऑगस्ट २०१७ पर्यंत ४४.४७ कोटी रुपयांच्या खोट्या नोटा
सापडल्या, यातून आपण आपले उद्दिष्ट खरे च साध्य केले का?

४) क्रेडिट कार्ड वापरताना लागणारे २% कमिशन म्हणजे ५०० रुपयांचे ५० वेळा


व्यवहार केले की ५०० रुपयांचे कमिशन क्रेडिट कार्ड कंपनीला मिळते. पण ५००
रुपयांची नोट ५० वेळा व्यवहारात वापरल्यास कोणालाच कमिशन द्यावे लागत
नाही. मग ऑनलाइन व्यवहार करून ग्राहक अथवा विक्रेत्याचे २% चे नुकसान
करून परदे शी क्रेडिट कार्ड कंपनीच्या फायद्यासाठी का करावा?

५) खरे वातावरण तापले ते जीडीपी कमी झाल्याचे दिसून आले म्हणून. ऑक्टोबर
ते डिसेंबर-१६ या तिमाहीत जीडीपीचा दर हा ७.०% होता, जो दर पुढील दोन
तिमाहीत ६.१% व ५.७% असा कमी होत गेला व डॉ. मनमोहन सिंगांचे वक्तव्य
खरे होताना दिसले. मग प्रश्न उभा राहिला की, जे डॉ. मनमोहन सिंगांना दिसते ते
मोदींना दिसत नाही का?

>काहीसे सखोल विश्लेषण :

प्रथमदर्शनी व अभ्यासानंतरही हे निर्देशांक हे च दर्शवतील की नोटबंदीच्या


निर्णयप्रक्रियेत व अंमलबजावणी प्रकियेत नक्कीच त्रट
ु ी आहे त. यातून काही
अतिमहत्त्वाचे प्रश्न उभे राहतात आणि ते म्हणजे नोटबंदी या निर्णयाची
उपयोगिता व सीमा ही एक वर्षाचीच आहे का? केवळ वरील निर्देशांकांवरून
ं टँ क असलेला राजकीय
नोटबंदीची परिणामकता ठरवावी का? आणि सक्षम थिक
पक्ष

>कमकुवत-भावनात्मक अथवा केवळ प्रसिद्धिभिमख


ु निर्णय घेईल का?

नोटबंदीवर निर्णय हा दीर्घकालीन तसेच सर्वांगीण परिणाम करणारा आहे . त्यामुळे


मर्यादित निर्देशांवरून मत बनवणे व निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. यासाठी
काही अधिक निर्देशांकांचा कल नोटबंदीपर्वी
ू , नोटबंदीच्या काळात व त्यानंतरच्या
काळात कसा होता हे बघणे गरजेचे आहे . उदा.

१) भारताचा जीडीपी दर नोटबंदीनंतर नक्कीच कमी होत गेला (७% वरून ५.७%
वर घसरला) पण ही घसरण नोटबंदीपर्वी
ू पासून सुरू झाली होती. कारण जाने. १६
मध्ये हा दर ९.२% होता तर तो ऑक्टोबर-१६ पर्वी
ू ७.५% पर्यंत खाली आला. याचा
अर्थ नोटबंदीव्यतिरिक्त जीडीपीवर प्रभाव टाकणारा मोठा घटक अर्थव्यवस्थेत
सध्या अस्तित्वात आहे .

२) जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार जगाचा जीडीपी दर सन २०१० नंतर ४.३%


पासून वेगाने घसरू लागला व सध्या हा दर २.५% च्या आसपास आहे . गेल्या ५
वर्षांत हा दर २०१२ मध्ये सर्वात कमी होता व भारताचाही जीडीपी दर याच
काळात गेल्या ५ वर्षांतील नीचांकावर होता. म्हणजेच घसरणारा जीडीपी हा
जागतिक अर्थव्यवस्थेचा एक परिपाक आहे व त्यात नोटबंदीमुळे काहीसा
अतिरिक्त परिणाम झाला.

३) घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेमळ
ु े औद्योगिक गंत
ु वणक
ु ीचा दर नोटबंदीपर्वी
ू ९
महिन्यांपासून कमी-कमी होत गेला. नोटबंदीच्या काळात तो नीचांकी होता हे
नक्की. पण जानेवारी १७ पासून तो गेले ९ महिने सातत्याने वाढत आहे . हा
औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगला कल आहे .

४) एप्रिल ते ऑक्टोबर-१६ दरम्यान डाॅलरचा भाव ६७ रुपयांच्या आसपास स्थिर


होता. नोटबंदीच्या काळात तो ६८ रुपये पार करून गेला. पण लगेच तो ६४
रुपयांपर्यंत खाली आला. याचाच अर्थ नोटबंदीनंतर रुपया सक्षम होऊन भारताची
परकीय चलनाची गंगाजळी नोटबंदीच्या काळात थोडी खाली घसरली. पण
त्यानंतर वाढीचा वेग मात्र सक्षम झाला व गेल्या ९ महिन्यांत ही वाढ सुमारे
१२% ची आहे . हे चांगले लक्षण आहे .

५) शेअर निर्देशांक जानेवारी १६ पासून वाढत आहे . तो नोटबंदीच्या धक्क्याने २


महिने खाली गेला. पण त्यानंतरच्या ९ महिन्यांत त्याची वाढ सुमारे २६% ने
झाली.

६) भारतात कार विक्री विकासाचा दर्शक

मानली जाते. नोटबंदीचा नोव्हें बर महिना सोडल्यास कार विक्रीचा आलेख हा


वाढताच

राहिलेला आहे .

७) भारत हा उच्च कर्ज व्याजदरासाठी प्रसिद्ध आहे . सन २०१५ च्या सम


ु ारास हे
दर सरासरी १०.५% होते. त्यानंतर ते कमी होत गेले. सध्या ही सरासरी ९.५% अशी
आहे . ही सरासरी नोटबंदी, त्याचा उद्देश व बँकेत जमा झालेली रोकड याच्याशी
सुसंगत नाही आणि म्हणूनच कर्ज घेण्याच्या वाढीचा दर हा सुमारे १०% होता. तो
४% पर्यंत खाली आला व बँकेत भरपरू पैसा असतानाही अजन
ू ही ८%च्या वर
जात नाही हे चांगले लक्षण नाही.

८) महागाईचा दर हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे . कांद्याच्या भावामुळे


सरकार बदलणाऱ्या या दे शात नोटबंदीच्या काळात या महागाई दराचे काय झाले
हे बघणे कुतह
ू लाचे असणार आहे . ऑक्टोबर १६ मध्ये ४.२ असलेला हा दर
जानेवारी १७ मध्ये ३.२ पर्यंत खाली आला व नंतर काहीसा वाढून जन
ू १७ मध्ये
तो १.५ पर्यंत वेगाने खाली आला. याचे श्रेय नोटबंदीला नाही दिले तरी त्याचा
उलट परिणाम नक्कीच झालेला नाही.

>काय घडले व काळात काय घडायला हवे?


एका वर्षाच्या कालावधीत काय घडले व त्याहीपेक्षा ये णाऱ्या काळात काय
घडायला हवे याचा परामर्श भारताच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे . उदा. :

१. सम
ु ारे एक टक्का काळा पैसा संपला; पण उर्वरित काळा पैसा विविध मार्ग
शोधत बँकेत पोहोचला. सरकारी दाव्याप्रमाणे १८ लाख बँक खाती व २००
व्यक्तींचा समूह सरकारच्या रडारवर आहे . यावर खरे च कारवाई होणार का? किती
वेळात होणार? त्यातून इतरांवर जरब बसणार का? हे बघणे गरजेचे आहे .

२. परत आलेल्या नोटांमधन


ू आतापर्यंत सम
ु ारे ४३ कोटी रुपयांच्या खोट्या नोटा
सापडल्या. गेल्या ३ वर्षांची आकडेवारी साधारण एवढाच आकडा दरवर्षी सापडतो
हे दर्शवते. नोटबंदीपश्चात व २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर यावर
आपण कसा निर्बंध आणणार आहोत हे महत्त्वाचे.

३. एक टक्का काळा पैसा सापडला, १८ लाख खात्यांवर नजर आहे ; पण


यापलीकडे जाऊन वस्तुरूपी असलेल्या काळ्या पैशाचे काय? त्यासाठी काय
योजना?

४. यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार ५६% वाढले; पण क्रेडिट कार्ड


कमिशनवर काहीच हालचाल झाली नाही. यात काय बदल होणार?

५. बचत खात्यात जाणाऱ्या पैशाचा मार्ग बदलून बाजारातील फंडमधील पैसा ५४%
नी वाढला. त्यातून उद्योगांना सहज पैसा मिळे ल. पण याचबरोबर कर्जही स्वस्त
होणार का? की बँका हात बांधूनच बसणार?

६. प्रत्यक्ष करात १४% तर अप्रत्यक्ष करात २२% वाढ झाली. याचे किती श्रेय
नोटबंदीला द्यायला हवे? पण श्रेयवादात न जाता संशयित खात्यातून किती कर
मिळणार व करदाते किती वाढणार हे महत्त्वाचे.

नोटाबंदीची पाच वर्षे:मोदी सरकारला नोटाबंदीचा सल्ला दे णारे अनिल बोकील 5


वर्षांनंतर काय म्हणतात? भ्रष्टाचार कमी झाला का? हे तू साध्य झाला का?
आशीष राय 5 महिन्यांपूर्वी

मोदी सरकारला नोटाबंदीचा सल्ला दे णारे अनिल बोकील 5 वर्षांनंतर काय


म्हणतात? भ्रष्टाचार कमी झाला का? हे तू साध्य झाला का?|महाराष्ट्र

अनिल बोकील हे तेच व्यक्ती आहे त ज्यांनी केंद्र सरकारला नोटाबंदीची कल्पना
दिली होती. ते व्यवसायाने अभियंता असून काही काळ मुंबईत संरक्षण सेवेशी
संबंधित होते.

अनिल बोकील यांच्याशी झालेल्या संवादातील खास भाग...

8 नोव्हें बर 2016 च्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या
नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी तीन वर्षांपूर्वी पुण्यातील अर्थक्रांती
प्रतिष्ठानचे अनिल बोकील यांनी भाजप नेत्यांसमोर नोटाबंदीचा प्रस्ताव ठे वला
होता. मोदी त्यावेळी गज
ु रातचे मख्
ु यमंत्री होते. बोकील यांना मोदींना भेटण्यासाठी
केवळ 9 मिनिटे दे ण्यात आली होती, मात्र नोटाबंदीचा प्रस्ताव ऐकल्यानंतर नरें द्र
मोदींनी त्यात रस दाखवला आणि पूर्ण 2 तास चर्चा केली होती. नोटाबंदीला पाच
वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिव्य मराठीने अनिल बोकील यांच्याशी खास
चर्चा केली आणि नोटाबंदीच्या प्रभावावर त्यांचे मत जाणन
ू घेतले.

अनिल बोकील यांच्याशी झालेल्या संवादातील खास भाग...

प्रश्‍न : नोटाबंदीचा सरकारचा निर्णय पाच वर्षांनंतर कितपत प्रभावी ठरला आहे ?

उत्तर: डिजिटल अर्थव्यवस्थेचे आज जगभरात वर्चस्व आहे . यामळ


ु े भारत आज
प्रगती करत आहे आणि सध्या त्याची स्थिती पूर्वीपेक्षा खप
ू च चांगली आहे . भारत
एक डिजिटल अर्थव्यवस्था असल्याने परदे शातून मोठ्या प्रमाणात एफडीआय येत
आहे . याशिवाय भारताकडे दस
ु रा मार्ग नव्हता.
प्रश्नः नोटाबंदी जाहीर झाली तेव्हा केंद्र सरकारने काळ्या पैशाला आळा बसेल
आणि भ्रष्टाचार कमी होईल असे सांगितले होते. हा उद्देश खरोखरच पूर्ण झाला
आहे असे तम्
ु हाला वाटते का?

उत्तर: चलनी नोटांचे प्रमाण कमी झाल्याने आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या


आगमनाने व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढली आहे . लोकांना ट्रॅ क करणे सोपे झाले
आहे . नोटाबंदीनंतर दे शातील सावकारी ठप्प झाली आणि व्याजदर कमी झाले.
व्हाइट मनीच्या अधिक सर्कु लेशनमळ
ु े आज बँकांकडून अत्यंत कमी व्याजदरात
कर्जे उपलब्ध आहे त. यापूर्वी चलनी नोटांमुळे व्यवहार ट्रॅ क करणे अवघड होते.

फक्त महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर डिजिटायझेशनमुळे येथे रोज छापे पडत


आहे त आणि बेनामी मालमत्ता जप्त होत आहे त. भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा स्रोत
चलनी नोटा होता, ज्याला डिजिटायझेशनद्वारे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला
आहे आणि मला वाटते की तो प्रयत्न मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे .

प्रश्नः नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधान म्हणाले होते की, फेक करन्सीचा ट्रें ड कमी
होईल. मागील आर्थिक वर्षाच्या तल
ु नेत यावर्षी 31 टक्के अधिक 500 च्या बनावट
पकडण्यात आल्या आहे त.

उत्तरः नोटाबंदीपर्वी
ू 86 टक्के मोठ्या नोटा (500 आणि 1000 रुपयांच्या) चलनात
होत्या. सध्या 18 टक्के म्हणजे 28 लाख कोटी रुपयांच्या 2 हजाराच्या नोटा
चलनात आहे त. मोठ्या नोटांचे चलन कमी झाले आहे आणि त्यामळ
ु े फेक
करन्सीला आळा बसला आहे . सध्या 500 च्या 50 ते 55 टक्के नोटा चलनात
आहे त. 200 च्या नोटा सुमारे 14-15 टक्के आहे त. नोटबंदीनंतर मोठ्या नोटांची
गरज नसल्याचे सिद्ध झाले. छोट्या नोटांचे चलन जसजसे वाढे ल तसतसे फेक
करन्सीचे प्रमाण कमी होईल.
प्रश्न: नोटाबंदीच्या काळात दहशतवाद किंवा नक्षलवाद संपेल, असेही म्हटले गेले
होते. सरकार खरं च यात यशस्वी झाले असे वाटते का?

उत्तरः डिजिटलायझेशनने दहशतवाद आणि नक्षलवादावर मोठ्या प्रमाणात आळा


बसला आहे . यापूर्वी यामध्ये सहजरित्या निधी मिळत होता, मात्र आता त्यावर
जवळपास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे . काश्मीरचा जो मुद्दा आहे , तो एका
दे शाने पुरस्कृत केलेला दहशतवाद आहे . याला आपण दहशतवाद नये, तर त्याला
प्रॉक्सी वॉर म्हटले तर ते अधिक योग्य ठरे ल. डिजिटलायझेशनमळ
ु े दहशतवाद,
नक्षलवाद, खंडणी यासारख्या घटना कमी झाल्या आहे त. खंडणी मागायची असेल
तर ती शेल कंपनीमार्फ त करावी लागते आणि तीही ट्रॅ क करण्यायोग्य असते
आणि कधी कधी असे लोक पकडले जातात.

प्रश्‍न: नोटाबंदीचा शेतकरी, व्यापारी किंवा सामान्य लोकांना कोणता विशेष फायदा
झाला?

उत्तर: यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेचा विस्तार झाला आहे . जर कोविड-19 दोन


वर्षांसाठी काढून टाकले, तर भारताने यानंतर स्थिर प्रगती केली आहे . सध्या,
कोविड-19 नंतर भारताने ज्या प्रकारे जीडीपी वाढीचा वेग पकडला आहे
त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे डिजिटायझेशन हे च आहे . आपल्या दे शात
80% गरीब लोक आहे त ज्यांचे सरकार पोट भरते. सरकारने 100 कोटी लोकांचे
लसीकरण केले आहे , यामागे आपली मजबत
ू अर्थव्यवस्था हे सर्वात मोठे कारण
आहे . शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹2000 पोहोचत आहे त, जर ते रोख स्वरूपात
द्यायचे असते तर कदाचित त्यातील 1% दे खील त्यांच्या खात्यात पोहोचले
नसते.
प्रश्‍न: नोटाबंदीची अंमलबजावणी तुम्हाला हवी तशी झाली होती का? जुन्या
मोठ्या नोटांवर बंदी घालण्यासाठी सरकारपेक्षा चांगली योजना तुमच्याकडे होती
का?

उत्तर : सरकारने आमचा पाच कलमी प्रस्ताव स्वीकारला नाही. कदाचित


सरकारला निवडणक
ु ीपर्वी
ू दिलेली आश्वासने पाळायची होती. आम्ही कररहित रोख
अर्थव्यवस्थेबद्दल बोललो होतो. आमचा प्रस्ताव GPS सिग्नलसारखा होता. आम्ही
त्यांना (सरकारला) योग्य मार्ग दाखवला. जेव्हा तम्
ु ही चक
ु ीच्या मार्गावर जाता
तेव्हा जीपीएस तुम्हाला दस
ु रा मार्ग दाखवते तसे आम्ही काही काम केले. आम्ही
पाच वर्षांपर्वी
ू नोटाबंदीचे फायदा आणि तोट्याचे सर्व मुद्दे सार्वजनिक डोमेनमध्ये
ठे वले होते. 500 आणि 1000 च्या नोटा एका झटक्यात काढून टाका असे आम्ही
कधीच म्हटले नाही. जर फक्त 1000 च्या नोटा काढल्या असत्या तर 35% ची
तफावत राहिली असती. नवीन 500 च्या नोटांचा साठा वाढवला असता तर 2000
च्या नोटा चलनात आणाव्या लागल्या नसत्या.

प्रश्न : केंद्र सरकारला काय प्रस्ताव दिला होता?

अभियंते आणि चार्टर्ड अकाउं टं ट्सच्या या संघटनेने आपल्या प्रस्तावात आयात


शुल्क वगळता 56 प्रकारचे कर मागे घेण्यात यावेत, असे म्हटले होते. 1000, 500
आणि 100 रुपयांच्या मोठ्या नोटा चलनातून बाद कराव्यात. दे शातील 78%
लोकसंख्या रोज फक्त 20 रुपये खर्च करते. मग त्यांना 1000 रुपयांची नोट का
हवी? सर्व मोठे व्यवहार चेक, डीडी आणि फक्त बँकेद्वारे ऑनलाइन केले
पाहिजेत. रोख व्यवहारांसाठी मर्यादा निश्चित करावी. त्यांच्यावर कोणताही कर
लावू नये.

प्रश्न : राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांनाही प्रेझेंटेशन दे ण्यात आले होते?
बोकील सांगतात की, राहुल गांधींनी फक्त 2-3 सेकंद दिले होते, पण नंतर
त्यांच्याशी 3-4 मिनिटे चांगली चर्चा झाली. मग त्यांनी त्यांच्या तज्ज्ञाचा नंबर
दिला होता. त्यांनी अर्थमंत्र्यांशी बोलन
ू संपर्ण
ू योजना सांगितली होती. त्यांनाही ही
योजना आवडली, पण प्रत्येक सरकार गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते.
त्यांची विचारसरणी वेगळी आहे . जेव्हा आम्ही आमचे संशोधन केंद्र सरकारला
सांगितले तेव्हा त्यांनाही ते आवडले आणि त्यांनी लगेचच त्यावर काम सुरू केले.

कोण आहे त अनिल बोकील?

महाराष्ट्रातील लातूर येथे जन्मलेले 53 वर्षीय बोकील हे 'अर्थक्रांती प्रतिष्ठान'चे


संस्थापक आहे त. तो मुळात मेकॅनिकल इंजिनिअर आहे त. नंतर त्यांनी
अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि पीएचडी मिळवली. इंजिनिअरिंगसोबतच अनिल
काही काळ मंब
ु ईत संरक्षण सेवेशी निगडीत होते. नंतर मेकॅनिकल
इंजिनिअरिंगमध्ये स्वतःचे काहीतरी करण्याचा विचार करुन ते औरं गाबादला
परतले आणि इंडस्ट्रीअल टूल्स आणि पार्ट्सचा कारखाना काढला. ते दर्मि
ु ळ
प्रकारचे भाग बनत होते.

ते जे अर्थक्रांती प्रतिष्ठान चालवतात, ती पुण्यातील एक आर्थिक सल्लागार संस्था


आहे . यामध्ये चार्टर्ड अकाउं टं ट आणि इंजिनिअर्सचा समावेश आहे . अर्थक्रांती
प्रस्तावाचे पेटंट संस्थेने घेतले आहे .

नोटबंदी चे आर्थिक परिणाम

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातड


ु े

बहुबष्ृ टी अनावष्ृ टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे .


त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे
ही ओला दष्ु काळ - सुका दष्ु काळ हीच असावीत.

त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे
वांधे होतील असा विचार करत असतील.

मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार
महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर
आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार
करत असणार.

आठ नोव्हें बर २०१६ ला चलनबंदीच्या स्वरूपात अस्मानी नाहीपण जी सुलतानी


दे शावर कोसळली त्याचा वैयक्तिक आयष्ु यावर, कौटूंबिक कार्यप्रसंगांवर काय
परिणाम होतोय याविषयी प्रचंड उहापोह मायबोली आणि इतरत्रही झालेलाच आहे .

परं तु या चलनबंदीचा एकंदर उद्योगधंद्यांवर, कुशल /अर्धकुशल कामगारांवर,


शेतीवर, शेतीआधारित व्यवसायांवर आणि परकीय गुंतवणक
ू ीवरही काय परिणाम
झाला हे पाहिले पाहिजे.

आपल्यापैकी कुणाचे स्वतंत्र उद्योगधंदे असतील, कुणी शेअर बाजारात गुंतवणून


करत असेल, कुणी परकीय गुंतवणूकीच्या क्षेत्रात असेल, कुणी इतरांच्या
उद्योगधंद्यात सहाय्यक म्हणून काम करत असेल किंवा कुणी नुसतंच या
सगळ्या उलाढालींवर लक्ष ठे वन
ू पढ
ु च्या मार्के ट इकॉनॉमीचा अंदाज घेत असेल.
तर अशा लोकांनी आपापली मते, निरीक्षणे इथे मांडावीत म्हणून हा धागा.
भारतीय/अभारतीय अर्थपंडितांची मते सुद्धा मांडता येतील.

You might also like