You are on page 1of 9

मराठा विद्या प्रसारक समाज

के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. एम. कॉम. भाग- २ या पदवी


परीक्षेसाठी सादर केले ला
प्रकल्प अहवाल
"स्टे ट बँक ऑफ इंडिया च्या आर्थिक कामगिरीचा अभ्यास"
सादरकर्ता
निकुंभ मनोज रविंद्र
एम.कॉम. भाग - २
रोल नं - २५

मार्गदर्शक
प्रा. सोपान. एस. दे शमुख
वाणिज्य विभाग
शैक्षणिक वर्ष
२०२१-२२

1
१ प्रस्तावना ३

२ समस्येचे विधान ४

३ अभ्यासाचे महत्व ५

४ अभ्यासाचे उद्दे श ५

५ अभ्यासाचे गृहीतके ५

६ साहित्याचा आढावा ६

७ अभ्यासाच्या मर्यादा ७

८ अभ्यासाची व्याप्ती ७

९ संशोधन पद्धती ७

१० निष्कर्ष ८

११ संदर्भसूची ९

अनुक्रमणिका

2
१) प्रस्तावना
वित्तीय कामगिरी म्हणजे मालमत्ता, दायित्व, खर्च, महसूल आणि नफा यांसारख्या श्रेणीमध्ये कंपनीच्या
स्थितीचे मूल्यांकन होय. हे व्यवसायाच्या सूत्रांद्वारे मोजले जाते जे वापरकर्त्यांना त्या कंपनीच्या तपशीलाची
अचूक पद्धतीने मोजमाप करण्यास सहाय्य करतात.

कंपनीमध्ये होणारा नफा, कंपनीचे नुकसान, कंपनीचा चढ उतार हा वित्तीय कामगिरी च्या माध्यमातून
माहित करता येते.
वित्तीय कामगिरी ही कंपनीचे उत्पन्न वाढवण्यासाठी व्यवसायाच्या प्राथमिक पद्धतीपासून आपल्या
मालमत्तेचा किती प्रभाविपणे वापर करते हे मोजण्याची प्रक्रिया आहे.

वित्तीय कामगिरी विशिष्ट कालावधीमध्ये संस्थेच्या आर्थिक आरोग्याचे दे खील मोजमाप करते . संस्थेची
आर्थिक कामगिरी, बँकेची आर्थिक ताकद व कमकुवतपणा यांच्याशी अचूकपणे संबंध प्रस्तापित करते. ही
प्रक्रिया बँकेच्या दीर्घकालीन आणि अल्पमुदतीची वाढ समजून घेण्यासाठी वापरली जाते.
अंतर्गत वापरकर्त्यांसाठी संबंधित कंपनीची स्थिती निश्चित करण्यासाठी आर्थिक कामगिरीची तपासणी
केली जाते. तसेच बहिर्गत वापरकर्त्यांसाठी संभाव्य गुंतवणुकीची संधी निर्धारित करण्यासाठी व कंपनी
त्यासाठी योग्य आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी वित्तीय कामगिरीचे विश्लेषण केले जाते.

भारतीय स्टे ट बँक


भारतीय स्टे ट बँक ही भारतीय बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा प्रदान करणारी
वैधनिक संस्था आहे. या बँकेचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. भारतीय स्टे ट बँक ही जगातील ४३ वी
सर्वात मोठी बँक आहे आणि २०२० च्या फोर्च्यून् ग्लोबल ५०० च्या जगातील सर्वात मोठया कंपन्यांच्या
यादीत २२१ व्या क्रमांकावर असलेली एकमेव भारतीय बँक आहे.

ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. ज्याचा मालमत्ता बाजारातील हिस्सा २३ टक्के
आणि आणि एकूण कर्ज आणि ठे व बाजारातील २५ टक्के हिस्सा आहे. जवळपास २५००००
कर्मचाऱ्यांसह हे भारतातील ५ वे सर्वात मोठे नियोक्ते आहे.

3
भारतीय स्टे ट बँकेचा इतिहास
कलकत्ताच्या 'बँक ऑफ कलकत्ता' ची स्थापना २ जुन १८०६ रोजी झाली. तिला तीन वर्षांनी सनद
मिळाली. त्यानंतर २ जानेवारी १८०९ रोजी बँक ऑफ बंगाल असे नामकरण करण्यात आले . ही एक
प्रकारची बँक होती जी 'ब्रिटिश भारत आणि बंगाल सरकार' द्वारे सामान्य स्टॉकवर व्यवस्थापित केली गेली.
पुढे बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास स्थापन झाली.

२८ जानेवारी १९२१ रोजी तीन बँका ( बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास ) एकत्र
आल्या आणि इम्पिरियल 'बँक ऑफ इंडिया' बनले. या बँकेचे कामकाज शहरांपुरते मर्यादित होते. पहिल्या
पंचवार्षिक योजनेची पायाभरणी १९४१ मध्ये समुदायाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात
आली. ग्रामीण विकास लक्षात घेऊन एका बँकेची कल्पना केली गेली जी गोवोगावी फिरून लोकांपर्यंत सेवा
पोहोचवेल. परिणामी १ जुलै १९४४ ला भारतीय स्टे ट बँकेची निर्मिती झाली.

भारतीय बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी


१७७० मध्ये भारतात बँक ऑफ हिंदुस्थान ही पहिली बँक स्थापन झाली. ही बँक अलक्सांडर अँड कंपनीने
कलकत्ताला स्थापन केलेली होती. मात्र ही बँक १८३२ मध्ये बंद पडली.
आधुनिक बँकेचे जनक म्हणून ओळखले जाणारे अलेक्सांडर हॅमिल्टन यांच्या अथक प्रयत्नाने अमेरिकेत
प्रथम मद्यवर्ती बँकेची स्थापना केली गेली. भारतातील सर्वात जुनी व्यवसायिक बँक भारतीय स्टे ट बँक ची
उत्पत्ती ही १८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता म्हणून झाली.

भारतातील मद्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाणारी रिझर्व्ह बँक ची स्थापना १९३५ मध्ये झाली. या बँकेचे
मुंबई मध्ये आहे. दे शातील सर्व बँकेवर नियंत्रण ठे वून चलन विषयक धोरण ठरविण्याचे व अर्थव्यवस्थेतील
आर्थिक समतोल सुरळीत ठे वण्याचे काम रिझर्व्ह बँक करते.

२) समस्येचे विधान
रिझर्व बँक ऑफ इंडिया ही बँकिंगच्या सेवांवर नियंत्रण ठे वण्याचे काम करते. बँकेच्या कामगिरीचे विश्लेषण
करण्यासाठी, बँकेचे धोके ओळखण्यासाठी एका विशिष्ट दृष्टिकोनाची आवश्यकता असते. हा अभ्यास
खालील प्रश्नांदवारे मार्गदर्शन करित असतो.

१. बँकेची कामगिरी ही पुढील ५ ते ६ वर्षात कशी दिसते ?

२. बँकेची कार्यक्षमता आणि गुणोत्तर ची स्थिती काय होती ?

4
३) अभ्यासाचे महत्व
१. बँकेच्या आर्थिक ताकद आणि कमकुवतपणा तसेच योग्यतेचा अभ्यास करणे.

२. बँकेच्या चालू स्थितीचे आर्थिक विश्लेषण करणे.

३. बँकेच्या मालमत्तेचे तसेच दायित्वाचे विश्लेषण करणे.

४. गुणोत्तराचे विश्लेषण करणे.

४) अभ्यासाचे उद्दे श
१. बँकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे.

२. बँकेच्या मालमत्ता मध्ये होणाऱ्या बदलाचा अभ्यास करणे.

३. बँकेच्या दे यत्ता/जबाबदारी मध्ये होणाऱ्या बदलाचा अभ्यास करणे.

४. बँकेतील गुणोत्तराचा अभ्यास करणे.

५. बँकेच्या मागील ५ वर्षांच्या वित्तीय कामगिरीचा अभ्यास करणे.

५) अभ्यासाचे गृहीतके

संशोधनामध्ये गृहीतकांची मांडणी करणे अत्यंत महत्वाचे कार्य मानले जाते.


विशिष्ट घटकांच्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त चलनामध्ये असलेल्या संबंधाबाबत संशोधक हा ठराविक
अनुमान लावून एक विधान तयार करतो त्या विधानास गृहीतके असे म्हणतात. या गृहीतकांच्या मार्फ त
संशोधक माहिती आणि तथ्य संकलित करित असतो. याचा अर्थ असा होतो की प्रारंभी किंवा प्राथमिक
स्वरूपाची माहिती प्राप्त करण्यासाठी गृहीतले महत्वाची ठरतात. या संभाव्य विधानाची माहिती गोळा
करण्यासाठी संशोधक काही पद्धतींचा वापर करतो आणि निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी संशोधक त्या दिशेने
अभ्यास करतो.

१. बँकेच्या आर्थिक कामगिरीमध्ये बदल झालेला आहे.

२. बँकेच्या मालमत्तेत वाढ/घट झालेली आहे.

३. बँकेच्या मालमत्तेत/दे यता मध्ये वाढ/घट झालेली आहे.

४. बँकेच्या गुणोत्तर मध्ये बदल झालेला आहे.

५. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे.

5
६. बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली आहे.

६) साहित्याचा आढावा
१. मिश्रा (२०१५) यांनी ९ वर्षांच्या कालावधीतील खाजगी भारतीय बँकेच्या आर्थिक माहितीचे विश्लेषण
केले. एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक या तीन खाजगी बँकांनी इतर सर्व खाजगी
बँकेच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. नफ्याच्या बाबतीत इतर खाजगी बँका अपेक्षेपेक्षा कमी
पडल्या होत्या.

२. कुमार आणि कुमार (२०१६) यांनी २०११ ते २०१६ पर्यंतच्या चार सार्वजनिक बँकांच्या उत्पादनाचा
अभ्यास जातो आणि त्यांची तुलना केली आहे. त्यांनी विविध गुणोत्तर चा वापर करून स्टे ट बँकेची तुलना
इतर सार्वजनिक बँकेशी केली बँक स्टे ट बँक त्या बँकेपेक्षा सर्वश्रेष्ठ असल्याचा निकष काढला.

३. रम्या एस, नर्मदा ऐनकेबी, लेखा एस, नंदीता बघ्याम वीआर आणि किर्थना ए (२०१७) कॅमेल
दृष्टिकोन वापरून स्टे ट बँक ऑफ इंडिया च्या आर्थिक कामगिरीचे विश्लेषण करणे. हा संशोधन २०१२ ते
२०१६ या कालावधीतील आर्थिक कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी आहे. स्टे ट बँक चे कार्यप्रदर्शन व
मूल्यमापन कॅमेल्स रेटिंग प्रणाली वर आधारित होते, जे बँकांसाठी तसेच बँकेशी व्यवहार करणाऱ्यांसाठी,
कमकुवतपणा ओळखण्यासाठी आणि सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी उपयुक्त आहे.

४. शुभलक्ष्मी, एस. ग्रहलक्ष्मी आणि एम. मणीकंदम (२०१८) स्टे ट बँक ऑफ इंडिया ही बँक मालमत्ता,
ठे वी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी व्यवसायिक बँक आहे. स्टे ट बँक ही बहुतांश
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी प्राधान्य असलेली बँक आहे. भारतीय पैशांच्या बाजारामध्ये या बँकेने
एक विशिष्ट स्थान व्यापलेले आहे. बँकेत मिळणाऱ्या सेवांमुळे लोकांचे या बँकेवर प्रचंड विश्वास आहे.
बँकांचा मुख्य उद्दे श हा नफ्यामध्ये वाढ घडवून आणणे हा असतो. यासाठी बँका त्यांच्या आर्थिक
कामगिरीचे विश्लेषण करतात. बँकाचे कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी महत्वाचे तंत्र म्हणजे गुणोत्तर
विश्लेषण होय. गुणोत्तर विश्लेषण हे बँकेत होणारी चढ उतार याचे विश्लेषण करते.

५. पटे ल भावेशकुमार के (२०२०) बँकेच्या आर्थिक कामगिरीचा अभ्यास करणे, हा अभ्यास द्वितीयक
माहिती वर आधारित आहे ही माहिती स्टे ट बँकेचा वार्षिक अहवाल, पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके, कागदपत्रे,

6
वेबसाइट् स इत्यादी मार्गातून मिळवलेली आहे. हा भारतातील बँकिंग प्रणालीचा महत्वाचा भाग आहे.
मालमत्ता, ठे वी आणि कर्मचारी या बाबतीत ही बँक भारतातील सर्वात मोठी व्यवसायिक बँक आहे.

७) अभ्यासाच्या मर्यादा
१. हा अभ्यासात केवळ भारतीय स्टे ट बँकेचा संदर्भ घेतलेला आहे.

२. हा अभ्यास बँकेच्या मागील केवळ ५ वर्षाच्या कामगिरीवर केलेला आहे.

३. अभ्यासासाठी माहिती ही दुय्यम स्रोत चा वापर करून घेतल्या मुळे माहिती ही अचूक असेल याच्याबद्दल
शंका आहे.

८) अभ्यासाची व्याप्ती
कंपनीच्या वित्तीय अहवालाची भूमिका म्हणजे कंपनीची कामगिरी, कंपनीची आर्थिक स्थिती आणि आर्थिक
स्थितीत होणारे बदल जे आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे या संबंधित माहिती प्रदान करणे होय.

याचा उद्दे श हा आर्थिक निर्णय घेण्याच्या उद्दे शाने बँकेच्या भूतकाळातील, वर्तमानकाळातील, तसेच
भविष्यकाळातील कामगिरीचे व आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे होय.

९) संशोधन पद्धती
प्राथमिक माहिती

संशोधनामध्ये संशोधक जेव्हा स्वतःची माहिती स्वतः मिळवत असतो तेव्हा त्यास प्राथमिक माहिती असे
म्हणतात. संशोधक जेव्हा स्वतः संशोधन क्षेत्रातील माहिती आणि समस्येसंदर्भात माहिती प्राप्त करतो तेव्हा
त्यास प्राथमिक माहिती असे म्हणतात.

या अभ्यासासाठी प्राथमिक माहितीचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये स्टे ट बँक ऑफ इंडियाच्या
ग्राहकांकडू न व बँकेच्या मॅनेजर कडू न प्रश्नावली द्वारे बँकेच्या कामगिरी बाबत माहिती गोळा करून घेतली
आहे.

द्वितीयक माहिती

द्वितीयक माहिती ही अशी माहिती असते की संशोधनकरता प्रत्यक्षात स्वतः माहिती गोळा करत नाही, अशा
माहितीला द्वितीयक माहिती असे म्हणतात. द्वितीयक माहिती ही कोणीतरी गोळा केलेली असते आणि इतर
लोकांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून दे ण्यात येते. त्या माहितीला द्वितीयक माहिती असे म्हणतात.

7
या अभ्यासासाठी द्वितीयक माहितीला अधिक प्राधान्य दे ण्यात आलेले आहे. द्वितीयक माहितीचा वापर
करून इंटरनेट च्या माध्यमातून बँकेच्या कामगिरीचे अहवाल प्राप्त करून घेतले आहेत.

१०) निष्कर्ष
दे शाच्या आर्थिक विकासासाठी बँकिंग क्षेत्र ते अतिशय महत्वाचे आहे. स्टे ट बँक ही भारतातील एक
अग्रगण्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. स्टे ट बँकेची बाजारात असलेली स्थिती ही चांगली आहे.
आर्थिक विश्लेषणाचा वापर हा बँकेची स्थिती शोधण्यासाठी तसेच बँकेचे दै नंदिन कामकाज नियंत्रित
ठे वण्यासाठी केला जातो. हा अभ्यास बँकेच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आला आहे.

वरील अभ्यासावरून किंवा बँकेची आर्थिक कामगिरी वरून लक्षात येते की बँकेची २०२१-२२ मध्ये वाढ
झाली आहे.

8
११) संदर्भसूची
१. सुबलक्ष्मी १ , एस. ग्रहलक्ष्मी अँड एम. मणिकंदन (२०१८). “ फायनान्शियल रेशो अँनालिसिस ऑफ
एसबीआय [२००९-१६]”, आयसीटीएसीटी जर्नल ओन मॅनेजमेंट स्टडीस, , वॉल्यूम: ०४, इशू: ०१
आयएसएसएन: २३९५-१६१४ (ओनलाइन), फेब्रुवरी २०१८,
डीओआय:१०.२१९१७/आयजीअएमाएस.२०१८.००९५

२. Mishra, D. B. (2015) फायनान्शियल परफोर्मनस ऑफ् न्यू प्राईव्हेट सेक्टर बँक इन इंडिया: अन
इंडेप्थ स्टडी. रिसर्च जर्नल ऑफ फायनान्स अँड अकाउंटिंग, १०

३. कुमार, एन., & कुमार, एन. (२०१६). ए कंपरेटिव फायनान्शिअल परफॉर्मन्स अँनालिसिस ऑफ
सिले क्टड पब्लिक सेक्टर बँक इन इंडिया. ३(२), ५.

४. रम्या एस, नर्मदा एनकेबी, ले खा एस, नंधिथा बाग्यम वीआर अँड कीर्थाना ए (२०१७). अँनालिसिस
ऑफ फायनान्सिअल परफॉर्मॅन्स ऑफ एसबीआय, इंटरनेशनल ऑफ अप्लाईड रिसर्च २०१७; ३(२): ४४-
४५२ .आयएसएसएन ऑनलाईन; २३९४-५८६९.

वेबसाईट
१. https://inmarathi.net/state-bank-of-india-information-in-marathi/

२. https://marathisky.com/sbi-bank-information-in-marathi/

निकुंभ मनोज रविंद्र दे शमुख सोपान सुरेश


संशोधक विद्यार्थी मार्गदर्शक

You might also like