You are on page 1of 15

बँकिं गचा परिचय

(AN INTRODUCTION TO
BANKING)

व्याख्या, अर्थ, कार्ये, वैशिष्टये आणि सुदृढ बँकिं गची तत्वे


(Definition, Meaning, Functions, Features and Principles of
Sound Banking)

PROFESSOR DR. N.L.CHAVHAN


DHANAJI NANA MAHAVIDYALAYA, FAIZPUR, DIST.
JALGAON
KBCNMU, JALGAON
बँके ची कार्यानुसार व्याख्या
(FUNCTIONAL DEFINITIONS OF BANK)
प्रा. गिलबर्ट : यांच्या मतानुसार, “बँका हा एक असा दुवा आहे की जो कर्ज घेणारा आणि कर्ज देणारा यांना जोडतो. बँके त काही लोक ठेवी जमा करतात आणि काही लोक
बँके कडू न कर्जे घेतात. या अर्थाने विचार के ल्यास बँक हा भांडवल अथवा पैशाचा व्यवसाय आहे.”

प्रा. किनले : यांच्या मतानुसार, “बँक ही एक अशी संस्था आहे की, जी गरजू लोकांना पैसा कर्ज म्हणून देते आणि ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे त्यांच्याकडू न ठेव म्हणून
जमा करते.”

प्रा. पॅगेट : यांच्या मतानुसार, “जी व्यक्ती किं वा संस्था खात्यावर ठेवी स्वीकारून स्वतःवर काढलेली आदेश पत्रे स्विकारते व त्यांचे पैसे देते, त्याचप्रमाणे खातेदारांनी दिलेली
साधे व रेखांकीत धनादेश आणि हा व्यवसाय करून नफा मिळविणे हा तिचा मुख्य उद्देश असतो अशा व्यक्ती किं वा संस्थेला बँक असे म्हणतात.”

वैधानिक व्याख्या (Legal Definitions)


भारतीय बँकींग कायदा 1949 नुसार, “कर्ज देण्याकरीता किं वा भांडवल म्हणून गुंतवणूक करण्याकरीता लोकांकडू न मागताक्षणी किं वा अन्य तऱ्हेने परत
करावयाच्या अटीवर किं वा चेक, मांड ड्राफ्ट, पे आँर्डर काढु न परत करावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणारी संस्था म्हणजे बँक होय.”
बँक व्यवसाय करणाऱ्या संस्थेच्या रूपात व्याख्या (INSTITUTIONAL
DEFINITION)

 प्रा. व्हाईट : यांच्या मतानुसार, “बँक हे एक कर्जाची निर्मिती करणारे आणि विनिमय सुविधा प्रदान करणारे यंत्र आहे.

 प्रा. क्राऊथर : “बँके चे कार्य इतर लोकांकडू न ठेव घेवून बदल्यात आपले कर्ज देऊन पैशाची निर्मिती करण्याचे आहे.

 प्रा. फिं डले शिरास : “बँक अशी व्यक्ती किं वा संस्थेला किं वा कं पनीला म्हटले जाते की, जिच्याकडे एखादे व्यापारी स्थान असेल, जेथे पैसा किं वा चलन ठेव म्हणून

स्वीकारून कर्जाची निर्मिती करण्याचे कार्य के ले जात असेल, चेक, पे आँर्डर यांच्याद्वारे ठेवी परत के ल्या जात असतील. तसेच शेअर्स, डिबेंचर्स, बचत पत्रे, मौल्यवान

धातू यांच्या आधारावर कर्जे देण्याचे कार्य करते. प्रतिज्ञा पत्र विक्री करण्यासाठी स्वीकारण्याचे कार्य करते.”
वरील सर्व गटातील व्याख्यांचे विश्लेषण करता बँक या संज्ञेचा अर्थ पुढीलप्रमाणे स्पष्ट होतो.

1) वरील सर्व व्याख्यांमधून एक सामाईक बाब स्पष्ट होते आणि ती म्हणजे बँक या संस्थेकडू न दोन प्रमुख कार्ये पार पाडली जातात. एक – लोकांकडू न

मागताक्षणी परत करण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारणे आणि दोन – ठेव रूपाने जमा झालेला पैसा भांडवल म्हणून कर्ज रूपाने वितरित करणे.

2) बँक ही संस्था ठेवी ठेवणारे धनको आणि कर्ज घेणारे ऋणको या दोहोंना जोडण्याचे मध्यस्त म्हणून कार्य करतात.

3) बँक ही संस्था आपल्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी आदेश पत्र, चेक (धनादेश) या साधनांचा वापर करतात. कर्जे देण्यासाठी चेक, डिमांड

ड्राफ्ट (मागणी रोखा) या साधनांचा वापर करतात.


वरील व्याख्यांमधून बँक या संज्ञेचा एवढाच संकु चित अर्थ बोध होतो. प्रत्यक्ष व्यवहारात बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्जे देणे या प्रमुख कार्याबरोबरच कर्ज
देण्याच्या माध्यमातून पतनिर्मिती करणे, चेक, डिमांड ड्राँफ्ट, व्यापारी हुंड्या इत्यादींची वटवणूक करणे, बँक ग्राहकांना उपयुक्त सेवा प्रदान करण्याचे
कार्यही करतात. या सर्व कार्याचा विचार करून बँक या संज्ञेची पुढील प्रमाणे योग्य व्याख्या (Proper Definition) करता येईल.

“बँक ही अशी एक संस्था आहे, की जी पैसा या द्रव्य साधनात आपला व्यवसाय करते, हे एक असे प्रतिष्ठान आहे की ज्यात संपत्तीचे (पैसा)
संग्रहण, संरक्षण आणि निर्गमन होते आणि कर्ज व वटवणूकीची सुविधा प्रदान के ली जाते. तसेच पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याची
व्यवस्था करते.”

वरील व्याख्या शब्दीकदृष्ट्या बरीच विस्तृत आहे. अशाप्रकारे जी कर्जे देणे घेण्याच्या व्यवहारातून आर्थिक व्यवहारांना प्रवाही रूप प्रदान करते. कर्जे
देणे-घेणे या व्यवहाराबरोबरच बँक ग्राहकांना इतर सुविधा पुरवून व्याज, शुल्क या माध्यमातून उत्पन्न प्राप्त करते.
आधुनिक बँकांची कार्ये
(FUNCTIONS OF MODERN BANKS)
A) प्राथमिक कार्ये (Primary Functions) : ठेवी स्विकारणे आणि कर्जे देणे ही परंपरागत कार्ये.

1) ठेवी स्विकारणे (To accepts deposits)

मागताक्षणी परत करण्याच्या अटीवर ठेवी स्विकारल्या जातात.


ठेवीचे प्रकार (Types of Deposits)

* चालू ठेवी (Current Deposits) * बचत ठेवी (Saving Deposits)

* मुदत ठेवी (Time Deposits) * आवर्त ठेवी (Recurring Deposits)

2) कर्जे देणे (To Advaning Loans)

ठेव रूपाने जमा झालेला पैसा गरजूंना कर्ज रूपाने देण्याचे कार्य, कर्ज आणि ठेव यावरील व्याज दरातील अंतर बँके चा नफा ठऱविते.
कर्जाचे प्रकार (Types of Loans)

* मुदत कर्ज (Term Loan) * रोख कर्ज (Cash Credit)


* अधिकर्ष सवलत (Overdraft Facility) * व्यापारीहुंड्या वटवणूक (Discounting of Commercial Bills)
बँकांची गौण /दुय्यम कार्ये
(SECONDARY FUNCTIONS OF BANK)

1) बँकांचे एक एजन्सी / प्रतिनिधी म्हणून कार्ये


(Agency or Representative functions)

 चेक, व्यापारी हुंड्या व इतर प्रपत्राचे संग्रहण व वटवणूक

 खातेदाराचे येणे वसुल करणे.

 खातेदाराचे देणी अदा करणे.

 खातेदारासाठी रोखे बाजारातून रोख्याची खरेदी विक्री करणे.

 पैशाचे हस्तांतरण करणे.

 भांडवल उभारणीस मदत करणे.


2) सर्वसामान्य उपयुक्त कार्ये (General Useful Functions)

 सुरक्षित खण व्यवस्था (Safe Lockers)

 प्रवासी धनादेश देणे.

 विदेशी चलन खरेदी-विक्री

 उपभोग्य कर्ज वाटप

 ई-बँकींग सेवा पुरविणे.


बँकांची वैशिष्ट्ये
(FEATURES OF BANKING)
 पैशाचे व्यवहार

 मध्यस्थ म्हणून भूमिका

 नफा निर्माण करणारी संस्था

 स्वतःची ओळख

 पैसे काढणे व जमा करण्याची सुविधा

 शाखा विस्तार

 कार्यक्षमता वाढ

 बँक ही एक कं पनी किं वा बँकींग सेवा पुरविणारी व्यक्ती असू शकते.


सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता
(MEANING AND ESSENTIALS OF SOUND BANKING)

 बँके चे उद्देश

1) नफा कमावणे

2) भागधारकांना लाभांश देवुन खुष ठेवणे.

3) कर्मचाऱ्यांना समाधानी ठेवणे.

यासाठी ठेव रूपाने जमा झालेला निधी योग्य प्रकारे गुंतवणूक करणे व त्यातून रोखता, सुरक्षितता व लाभप्रदता तत्वाचे पालन करणे.

प्रा. क्राउथर : यशस्वी किं वा सृदृढ बँके चे रहस्य मालमत्तेचे अशाप्रकारे वितरण करणे की त्यातून प्रत्येक दावा (Claim) पूर्ण करण्यासाठी हातात रोख निधी असावा

आणि याबरोबरच आपली देयता देण्यासाठी पर्याप्त उत्पन्न व शेअर धारकांसाठी लाभ कमावता येईल असे कार्य करणे.
आवश्यकता (ESSENTIALS)

रोखता, सुरक्षितता व लाभप्रदता या तत्वाबरोबरच काही आवश्यकतांचा विचार करावा लागतो.

 रोखता : सुदृढ बँके ची पाहिली आवश्यकता ठेवीदारांच्या ठेवी मागताक्षणी परत करता याव्यात म्हणून एकू ण ठेवीचा काही भाग जवळ बाळगावा. रोखता प्रमाण CRR मध्यवर्ती बँक ठरवते.

 सुरक्षितता : दुसरी आवश्यकता कमी जोखीम मध्ये गुंतवणूक अल्पकालीन कर्जे द्यावीत.

 स्थैर्य : बँके ने विवेकपूर्ण कार्य करावे. अनावश्यक पतविस्तार / संकोच करू नये. तेजीत पतविस्तार के ला तर भाववाढ किं वा मंदीत पत संकोच के ला तर भावघट होते. आपल्या या धोरणातून

भाववाढ / भावघट होणार नाही याची काळजी ध्यावी.

 लवचिकता : कर्ज धोरणात लवचिकता असावी. यासाठी मध्यवर्ती बँक सूचना पालन करावे.

 लाभप्रदता : सृदृढ बँके त लाभ कमावण्याची क्षमता असावी. कर, व्याज, पगार, लाभांश ही देणी देण्यासाठी व शाखा खर्च भागविण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळवावे.

 राखीव निधीचे व्यवस्थापन : ठेवी परत करता येतील. इतका निधी जवळ असावा तो जास्तही नसावा व कमीही नसावा.

 विस्तार : संपूर्ण देशात शाखा विस्तार, व्यवसाय विस्तार.


बँकींगची तत्वे
(PRINCIPLES OF SOUND BANKING)
तीन तत्वाचे पालन :

1) रोखता (Liquidity)

1) रोख राखीव निधी जवळ बाळगावा किं वा मध्यवर्ती बँके कडे जमा करावा.

2) अल्पसुचनेद्वारे परत मिळणारे कर्जे द्यावेत. 3)अल्पकालीन कर्जे द्यावेत.

4) व्यापारीदृष्ट्या, सरकारी रोखे यात गुंतवणूकीला प्राधान्य. 5) शिल्लक निधी कमी जोखीम असणाऱ्या उद्योगांना कर्जे.

2) सुरक्षितता (Safety)

1) बँक व्यवसायात जोखीम व अनिश्चितता असते. 2) व्याजदर कमी जास्त होणे. 3) कर्ज व व्याज परतफे ड.

याचा विचार करून योग्य सुरक्षित गुंतवणूक : 1) मध्यकालीन कर्जे 2) उत्पादक कर्जे 3) पुरेसे तारण

4) कर्ज विविधता व थोडे थोडे कर्जे 5) सट्टेबाजीला कर्ज देवू नये.


3) लाभप्रदता (Profitability)

नफा प्राप्त करणे हा मुळ हेतू या मागील उद्देश : 1) ठेवी वरील व्याज देणे 2) कर्मचारी पगार व भत्ते 3) जागेचे भाडे 4) बँक कार्याचा खर्च (कपाटे, फर्निचर,

स्टेशनरी, काम्प्युटर, फिं क्श्चर, 5) भागधारकांना लाभांश इत्यादी देणी देणे. रोखता व सुरक्षिततेचा विचार करून गुंतवणूक धोरण आखावे.

4) विविधता

गुंतवणूक सूची करतांना विविधीकरण सिद्धाकाचे पालन : 1) सुरक्षित कर्जे 2) सरकारी कर्ज रोखे 3) खाजगी कर्ज रोखे, शेअर्स डिबेंचर्स. सर्व अंडी एकाच

टोपलीत ठेवले तर फु टण्याची शक्यता असते ते सुरक्षित राहावे म्हणून वेगवेगळ्या टोपलीत ठेवले जातात. तोच नियम बँकांनी पाळावा. विविध कारणांसाठी थोडे-

थोडे कर्जे द्यावेत.

5) स्थैर्य (Stability)

अतिरिक्त निधी अशा रोख्यांमध्ये गुंतवावा की ज्यांच्या किं मतीत उच्च स्थैर्य आहे. शेअर्स पेक्षा सरकारी कर्जरोखे, खाजगी कं पन्यांचे डिबेंचर्स मध्ये गुंतवणूक करावी.
रोखता व लाभप्रदतेत परस्पर विरोधी
(CONFLICT BETWEEN LIQUIDITY AND PROFITABILITY)

 रोखता व लाभप्रदता परस्पर विरोधीतत्त्व

 रोखता प्राधान्य तर लाभप्रदता कमी.

 लाभप्रदता प्राधान्य तर दीर्घकालीन गुंतवणूक पण रोखता धरते.

 रोखता व लाभप्रदता परस्पर समन्वय (Reconciliation between Liquidity and Profitability)

1) रोख राखीव निधी जवळ बाळगावा. अडचणीत प्रथम याचा वापर – ही पहिली संरक्षक भिंत.

2) शिल्लक निधी, दुय्यम बँकांना मदत, मध्यवर्ती बँके कडे जमा यावर अल्प व्याज मिळते – ही दुय्यम फळी.

3) नाणेबाजारातील Call Money Market मध्ये गुंतवणूक – अल्पसूचनेद्वारे 7 दिवसात परत. व्यापारी हुंड्या, बाजारातील दलाल, वटणावळ गृहे यात कर्ज रूपाने गुंतवणूक.

4) रोखता व लाभप्रदतेसाठी – कोषागार हुंडी व व्यापारी हुंड्या तारणावर (90, 180, 364 दिवस) कर्जे. एकू ण निधीच्या 6% पर्यंत गुंतवणूक करावी.

5) उद्योग व्यवसायाला मध्यम व दीर्घ मुदती कर्जे – 40% ते 55% पर्यंत गुंतवणूक.

6) कर्ज रोखे, शेअर्स, डिबेंचर्स यात 50% पर्यंत.


THANK YOU!!!

You might also like