You are on page 1of 56

यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम

कृ ती संशोधन अहवाल
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घसई या शाळेतील इयत्ता ८ वी च्या
विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकचल समीकरण या घटकांतीक
उकल काढताना येणाऱ्या समस्यांचा शोध होणे व
त्यावर उपाययोजनांची परिणामकारता
अभ्यासणे

संशोधक:- सौ पितळे माधुरी हेमंत


PRN NO -

मार्गदर्शक
श्री. डॉ. नितीन गाढे

अभ्यासकें द्र
गुरुकृ पा कॉलेज ऑफ एज्युके शन
कल्याण (प)
कोड क्र. ३५२२९
२०२१-२०२२
I

अध्ययनार्थीचे निवेदन

मी असे प्रतिज्ञापूर्वक जाहीर करते की, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घसई या शाळेतील इयत्ता ८ वीच्या
विद्यार्थ्यांना गणित विषयातील एकचल समीकरण या घटकावरीक उदाहरणे सोडविताना येणाऱ्या समस्या शोध घेणे व
त्यावर के लेल्या उपाययोजनाची परिणामकारता अभ्यासणे या विषयार कृ तिसंशोधन अहवाव लिहिलेलला आहे. या अहवाला
मध्ये दिलेली माहिती मी स्वतः के लेली कृ ती वाचन, मनन चर्चा आणि प्रत्यक्ष भेटीतून संकलित के लेली आहे. वापरलेल्या
संदर्भ स्त्रोतांचा आलेले योग्य निर्देश या अहवालात करण्यात आला आहे.

स्थळ :
दिनांक :

संशोधक
(सौ. माधुरी हेमेत पितळे)
कायम नोंदणी क्रमांक

II

मार्गदर्शक तज्ञांचे प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, सौ. माधुरी हेमंत पितळे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
शिक्षणशाश्त्र विद्याशाखेतील शालेय व्यवस्थापन पदविका, शिक्षणक्रमांतर्गत गणित विषयाची एकचल समीकरण या
घटकातीक उदाहरणे सोडविताना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजनांची परिणामकारतेचा अभ्यास या विषयावरी
प्रकल्प अहवाल माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण के लला आहे.

सदर प्रकल्प अहवाल माझ्या मार्गदर्शना खाली पूर्ण के लेला असून सदर प्रकल्प अवाहाला मध्ये आवश्यक ती
माहिती संकलित के लेली आहे.सदर प्रकल्प अहवालाचा आशय तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण आहे प्रकल्प अहवाल तयार करताना
सर्व संदर्भस्त्रोतांचा योग्य निर्देश या प्रकल्प अहवालात करण्यात आलेला आहे.

स्थळ :
दिनांक:

मार्गदर्शक तज्ञांची स्वाक्षरी

डॉ. श्री नितीन गाडे

III

भाषिक संपादन प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते की, सौ. माधुरी हेमंत पितळे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक,
शिक्षणशात्र विद्याशाखेतील शालेय व्यवस्थापन पदविका सा शिक्षणक्रमांतर्गत इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील
एकचल समीकरण या घटकावरील उदाहरणे सोडविताना येणाऱ्या समस्या शोध घेणे या विषयावरील प्रकल्प अहवाल तयार
के ले असून सदर प्रकल्प अहवालाचे भाषिक संपादन बं मुद्रित शोधन माझ्याकडू न करून घेण्यात आले आहे.

स्थळ:

दिनांक:

भाषा संपादकाची स्वाक्षरी

IV
ऋणनिर्देश

कोणत्याही कार्यासाठी इतरांच्या सहकार्याची गरज असते त्यामुळे कार्य पूर्ण होण्यास मदत होते. संशोधनाची
कार्यासाठी मदतीची व मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता होती ती मदत वेळोवेळी मिळाली. त्यामुळेच संशोधक सदर
कृ तीसंशोधन वेळेत व उत्तम प्रकारे पूर्ण कर शकली.

प्रस्तुत संशोधनासाठी संशोधिके ला अनेक व्यक्तीनी सहकार्य के ले त्याबद्दल संशोधिका त्यांचे आभार व्यक्त करणे
त्यांचे कर्तव्य समजते संशोधीके ला सर्वप्रथम ज्यांचे मार्गदर्शक ज्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन के ले. असे महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॉ सौ विदुलता कोल्हे, श्री. डाँ. मितीन गाढे, सौ अंजली किरर्किं दे, सौ अर्चना भोपळे यांनी वेळेवेळी के लेल्या
सहकार्या बदल व मार्गदर्शना बद्दल त्यांचेही आभार मानणे गरजेचे आहे त्यांचे मनःपूर्वक आभार !

तसेच कृ ती संशोधनाची माहिती करण्यासाठी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय घसई शाळेचे शिक्षक वृंद
यांनी जे मोलचे सहकार्य के ले त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे कृ ती संशोधन करताना ज्या ग्रंथाची मदत झाली त्यां सर्व
ग्रंथकर्त्यांचा साठी सतत प्रेरणा देणारे माझे सहकारी या सर्वांचे मी सदैव ऋणी राहिल.

संशोधक

सौ. माधुरी हेमेत पितळे

अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांचे प्रमाणपत्र

दि. / / रोजी अंतर्गत व बहिस्थ परीषक यांनी सौ माधुरी हेमंत पितळे यांची संयुक्त मौखिक परीक्षा घेण्यात
आली. त्यांच्या कृ ती संशोधन शालेय व्यवस्थापन पद्‌वीसाठी शिफारस के ले आहे.

अंतर्गत परीक्षक बहिस्य परीक्षक


नाव : नाव:
सही : सही:

VI
अनुक्रमणिका

प्रकरण 1. क्र तपशील पृष्ठ क्रमांक


१ शीर्षक I
२ अध्यानाचे निवेदन II
३ मार्गदर्शक तत्त्वांचे प्रमाण III
४ भाषिक संपादनाचे प्रमाण IV
५ ऋणनिर्देश V
६ सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र VI
७ अनुक्रमणिका
प्रकरण १ ले संशोधन विषयाची ओळख १
१.१ प्रस्तावना २
१.२ संशोधनाची गरज ३
१.३ संशोधनाचा विषय ३-४
१.४ संशोधनाची उद्दिष्टे ४
१.५ संशोधनाचे परिकल्पना ४
१.६ संकल्पनात्मक व्याख्या ५
१.७ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा ५-६
१.८ संशोधनाचे महत्व ६-७
प्रकरण २ रे संबंधित साहित्याचा व संशोधनाचे ८
समीकरण
२.१ प्रस्तावना ९-१०
२.२ संशोधनाच्या सिंहवलोकांचे महत्त्व १०
२.३ संबंधित साहित्याचा आढावा ११
२.४ प्रस्तुत संशोधनाचा एक १२

प्रकरण ३ रे संशोधनाचे कार्य १३


३.१ प्रस्तावना १४
३.२ संशोधनाचा अर्थ १४-१५
३.३ संशोधनाचा प्रकार १६-१७
३.४ संशोधनाची पद्धत १७-२१
३.५ न्यादर्श २१-२२
३.६ माहिती संकलनाची साधने २३
३.७ माहिती विश्लेषणाचे संख्या शास्त्रीय तंत्रे २४
३.८ संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही २५ -२९

प्रकरण४ थे माहितीचे पृश्यकरण व अर्थ निर्वंचन ३०


४.१ प्रस्तावना ३१
४.२ परिकल्पना १ चे विश्लेषण ३२ -३३
४.३ परिकल्पना २ चे विश्लेषण ३४-३५
४.४ परिकल्पना ३ चे विश्लेषण ३६-३८
४.५ निष्कर्ष व चर्चा ३८

प्रकरण ५ वे निष्कर्ष व शिफारसी ३९


५.१ प्रस्तावना ४०
५.२ संशोधनाचा विषय ४१
५.३ संशोधनाचे उद्दिष्टे ४१
५.४ संशोधनाची परिकल्पना ४२
५.५ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा ४२-४३
५.६ संशोधन अभ्यासाचे महत्व ४३
५.७ संशोधनाच्या पद्धती ४४
५.८ न्यादर्श ४४
५.९ प्रस्तुत संशोधनात वापरलेले साधन ४५
५.१० माहिती विश्लेषण करण्याची ४५
संख्याशास्त्रीय तंत्रे
५.११ संशोधनाचा निष्कर्ष ४६
५.१२ शिफारसी ४६
५.१३ पुढील संशोधनासाठी विषय ४७

प्रकरण ६ वे विमर्शी चिंतन ४८


६.१ प्रस्तावना ४९-५२
६.२ परिशिष्टे अ,ब, क, ड, १,२,३, ५३-६२
६.३ संदर्भ सूची ६३

प्रकरण १ ले :
संशोधन विषयाची ओळख
1
प्रकरण १ ले
संशोधन विषयाची ओळख
१.१ प्रस्तावना
शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाला कृ तिसंशोधन हा विषय आहे त्या अंतर्गत संशोधनाला कृ ती संशोधन

प्रकल्प करावयाचा आहे या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे वर्गावर अध्यापन करताना काही अडचणी समस्या येतात त्या

कशा सोडवल्या पाहिजे याची पूर्वतयारी म्हणजे कृ ती संशोधन होय शिक्षक वर्गात अध्यापन करतात परंतु त्यात विविध

अडचणी येतात मग ती अध्यापनाची असो किवा अध्यनंतर अस जर ही समस्या इतर शिक्षकांचीही असेल तर ते त्यांनी

के लेले प्रयत्न पडताळून पाहू शकता . तसेच इतरांनी के लेले प्रयोगाचे निष्कर्ष वापरून स्वतः करून पाहू शकतात परंतु या

दोन्ही मार्गानी जर आपल्या समस्या सुटत नसेल तर सर्वात उत्तम मार्ग म्हणजे कृ तीसंशोधन होय, अध्यापनात येणाऱ्या

समस्या अडचणी शास्त्रशुद्ध पद्धतीने सोडवणे हे कृ तीसंशोधनले महत्वाचे उद्दिष्ट होय.

विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटतो. गणित या विषयाची विध्यार्थ्यान मध्ये गोडी निर्माण करण्यासाठी

एकचल समीकरणे सोडविताना येणाऱ्या अडचणी ही समस्या निवडली आहे.

2
१.२ संशोधनाची गरज

1. विद्यार्थाना गणित विषय कठीण वाटतो


2. संकल्पना नसल्यामुळे विषयाची भिती वाटते
3. चल व अंक यांची सांगड घालता येत नाही
4. चल ही संकल्पना लक्षात येत नाही
5. विषयाची भिती वाटते,
6. चल, चिन्ह व संख्या याची सांगड घालता येत नाही
7. संकल्पना लक्षात न आल्यामुळे विद्यार्थ्याला शिकण्यात रस वाटत नाही म्हणून सराव होत नाही परिणामी
विद्यार्थी नापास होता

१.३ संशोधनाचा विषय

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयातील
एकचल समीकरणे या घटकावरील उदाहरणे सोडविताना येणारी समस्या शोध घेणे व त्यावर के लेल्या उपाययोजनांचा
परिणाम कारकता अभ्यास करणे.

समस्येचे महत्व :
1. इयत्ता सातवी बैजिक राशी व त्यावरील क्रिया.
2. इयत्ता आठवी एकचल समीकरणे .
3. इयत्ता नववी बँके चे व्यवहार.
4. इयत्ता दहावी वर्तुळ त्रिकोणमिती. 3

कृ ती संशोधन समस्या ठरविणे / कृ ती संशोधन समस्या निश्चित


1. एकचल समीकरणे सोडू शकत नाही .
2. विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाची भीती आहे.
3. गणित विषयाच्या संकल्पना स्पष्ट नसल्यामुळे विद्यार्थी उदाहरणे सोडविताना
4. गणितांच्या चिन्हाचा वापर कु ठे व कसा करायचा याबाबत अडचणी येतात.
5. सरावाचा अभाव.

१.४ संशोधनाची उद्दिष्टे

1. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धसई या शाळेतील किती विद्यार्थ्यांना एकचल समीकरणच सोडवा
येतात याचा शोध घेणे
2. एकचलसमीकरणे या घटकावरील अध्यन करताना विद्यार्थ्याला येणाऱ्या समस्यांचा शोध घेणे
3. एकचल समीकरणे सोडविताना विविध उपक्रम निर्मिती करणे
4. राबिवलेल्या उपक्रमांची परिणामकारकता अभ्यासणे

१.५ संशोधनाची परिकल्पना

1. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याना एकचल समीकरणे या घटक पूर्व चाचणी व उत्तर चाचणी तील शैक्षणिक
संपादनात लक्षणीय फरक पडत नाही.
2. इयत्ता आठवी च्या मुलांच्या व मुलींच्या पूर्वचाचणी उत्तर चाचणी यातील फरक फरक पडत नाही.
4

१.६ संकल्पनात्मक व्याख्या


1. गणित गणन क्रिया शिकविणारे शाळा शास्त्र.
2. एकचल समीकरणे या समीकरणात एकाच चलाचा वापर करण्यात येतो त्यास एकचल समीकरण म्हणतात.
3. गणित भाषेत बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या व उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान
आहेत हे दाखवितो या समानतेला समीकरण असे म्हणतात
4. समीकरण सोडविणे समीकरणातील चलाची किं मत काढणे

१.७ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा


अ) संशोधनाची व्याप्ती
शैक्षणिक जीवनात सर्व विषयांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे प्रत्येक विषयाचे आकलन होणे महत्त्वाचे आहे परंतु

गणिताविषयी भविष्यातील व्यापाराच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे या विषयाचे सखोल ज्ञान असावे मूलभूत

संकल्पना विद्यार्थ्यांना आर्थिक स्पष्ट करावी असे संशोधकांना वाटते

संशोधकांनी हाती घेतलेले समस्या विद्यार्थ्यांचे अध्ययनाला हानीकारक नाहीत परंतु पुढील शैक्षणिक किं वा दैनंदिन

जीवनाला मारकही आहे परंतु शाळेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे ही समस्या फक्त इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित

नसून सर्व इयत्तामध्ये समस्या भेडसावत आहे.

ब) संशोधनाच्या मर्यादा

1. धसई मध्ये दोन माध्यमिक शाळा आहेत परंतु प्रस्तुत जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुरते मर्यादित
आहेत.
2. हे संशोधन या शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पुरतेच मर्यादित आहे.
3. हे संशोधन या शाळेतील इयत्ता आठवीचा गणित विषयातील एकचल समीकरणे या घटकापुरतेच मर्यादित आहे.

१.८ संशोधनाचे महत्त्व

मानवी जीवन सर्व सुख सोयीना समृद्ध असे गणिताचा भक्कम पायावर उभे आहे आधुनिक युगात गणिताशिवाय

पर्याय नाही दैनंदिन जीवनात त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समावेश प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये गणिताचे स्थान दैनंदिन जीवनात

अनन्यसाधारण आहे असा व्यवहार नाही जिथे गणित नाही दैनंदिन गृहकार्य चा वेळापत्रक आकडे पाहिले की लक्षात येते की

प्रत्यक्ष काम आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे करतो घड्याळ नसते तर निसर्गाचा उपयोग के ला जातो उदाहरणार्थ

उठण्यासाठी कोंबड्याचे आरवणे पक्षांचा किलबिलाट शेतात काम करणारे शेतकरी काम के व्हा सुरू करावे व के व्हा संपवावे हे

घड्याळ न जाणारेही असतात व त्यात सुखी असतात.

6
आधुनिक युगात माणूस सतत घड्याळाच्या काट्यांवर फिरत असतो त्याच्या दिवसाची सुरुवात ते रात्री झोपेपर्यंत

तो गणिताच्या संपर्कात असतो. अगदी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो

उदाहरणार्थ – दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला विक्रे ता, यांना व्यवहारात गणिताची मदत घ्यावी लागते त्यांचे

गणित उत्तम असणे आवश्यक आहे तर तरच ते जीवनात यशस्वी होऊ शकतात त्यांच्या कामात यश मिळवू शकतात

गणिताचा अभ्यास के लेल्या व्यक्तींमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास तर्क शुद्ध विचार करण्याची क्षमता एकाग्रता, विधायक

कल्पना विचाराचा स्वतंत्रपणा इत्यादी गुणांचा परिपोष झालेला असतो गणिताचा अभ्यास व्यक्तीचे सुंदर असे व्यक्तिमत्त्व

विकसित होते म्हणूनच मानवी जीवनात गणिताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

प्रकरण दुसरे :

संबंधित साहित्याचे व संशोधनाचे समीक्षण


8

प्रकरण दुसरे

संबंधित साहित्याचे व संशोधनाचे समीक्षण

२.१ प्रस्तावना :

संशोधकांनी निवडलेल्या समस्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना एकचल समीकरण सोडू न आलेल्या समस्या व
त्यावरील उपाय योजना करणे व उपय्योज्नाचे परिणाम करता अभासणे.

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेतील इयत्ता आठवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे निरीक्षण के ले
निरीक्षणा अंतर्गत संशोधकाचा असे लक्षात आले की गणित विषय शिकवताना मूलभूत संकल्पना स्पष्ट नसल्यामुळे बर्‍याच
चुका होतात म्हणून संशोधकांना या चुका कशा प्रकारे कमी करता येतील व त्यावर कोणते उपाय शोधावे याचा विचार के ला
व त्यानुसार उपक्रम राबवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न के ला.

संशोधकाने कार्यपद्धतशीर व सफल होण्यास संशोधकाला त्याच्या विषयाबद्दल अद्यावत माहिती असणे आवश्यक
असते संशोधन करण्यापूर्वी संशोधकाने संबंधित संशोधन साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे संबंधित साहित्य
म्हणजे आपल्या संशोधन समस्या असे संबंधी माहिती संशोधन समस्येच्या संदर्भात जात आहे असे अहवाल कागदपत्रे
ज्ञानकोष पुस्तके संशोधन निबंध मासिकातील लेख प्रबंध शिक्षण संबंधी प्रकाशने व इतर प्रकाशित साहित्य इत्यादी साहित्य
म्हणजे संशोधनासंबंधी साहित्य होय

संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेणे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी संशोधक समस्या निवडतो संशोधनासाठी
विविध साधन सामग्री वापरतो व संकलित माहितीचे स्पष्टीकरण करून नवीन ज्ञान प्राप्त करतो.

कोणते संशोधन हे पूर्वीच्या अभ्यासावर तयार होते त्यासाठी अभ्यासाचा पाया

बनवला. संशोधनासाठी योग्य व अस्थित्वात असलेली माहिती कृ ती व कल्पना त्यामुळे मिळते .संशोधकाला
संशोधनासाठी वाचन अभ्यास व कल्पना करण्यासाठी महत्त्वाचे ठरते या समस्येचे निराकरण करण्यासाठी योग्य पुरावा म्हणून
आधार सामग्री चे संग्रहण सर्वात महत्त्वाचे कार्य असते संबंधीत संशोधन आढावा घेतलामुळे आपल्या संशोधनासाठी फायदे
होतात .

२.२ संशोधकाने सिंहवलोकाचे महत्व –

पूर्वी झालेल्या संशोधनाची माहिती करून घेतल्याने त्याची पुनरावृत्ती टळते संशोधन विषया संबंधी निवडला

आणि निवडलेल्या विषयासंबंधी संशोधन पद्धती संशोधनाबाबत माहिती मिळते या विषयासंबंधी सिद्धांत व गृहित कृ त्यांची

मांडण्याची वेळ निश्चित कल्पना येते आधार सामग्री व निष्कर्ष या विषयी तुलनात्मक माहिती मिळते. समर्पक सांख्यिक तंत्र

व त्याचा उपयोग आणि निर्वाचन करण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त होते.

संदर्भ साहित्याचा अभ्यास करून स्वतःची द्यानवृत्ती वाढवता येते संबंधित लोकांनी सिंहवलोकाचे संशोधन

कार्यात सर्व स्तरांमध्ये मार्गदर्शक व उपयुक्त ठरते म्हणून विविध पुस्तके नियतकालिके इंटरनेट या माध्यमांद्वारे संबंधित

साहित्यिकाचं सिंहावलोकन के ले आहे.

10
2.3 संबंधित साहित्य आढावा

पाटील स्वाती (शिक्षण संक्रमण नोवेंबर 2011) यांनी आपल्या समाज विकासासाठी शिक्षकाची भूमिका या
लेखात असे म्हटले आहे की

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये मुलांना प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नापास करू नये अशी स्पष्ट शिफारस
के ली आहे शैक्षणिक धोरण निश्चित करण्यापूर्वी तंत्रज्ञांच्या मदतीने मसुदा तयार करून ठिकाणी चर्चा सभा आयोजित करून
त्या शिफारशी जनसामान्यापर्यंत पोहोचविल्या गेल्या आठवी पर्यंत मुलांना नापास न करण्याच्या धोरणामुळे आज बहुतेक
ठिकाणी पालक-विद्यार्थी निश्चित झालेले दिसतात सर्व मुलांना मारू नये त्यांना शिक्षा करु नये या नियमान्वये आज विद्यार्थी
बेजबाबदार व बेफिकीर झालेले दिसतात आम्ही कसेही वागलो तरी चालू शकते असे त्यांना वाटू लागले आहे पालक तर
भांबावले आहेतच या धोरणामुळे मुलाच्या बेजबाबदारपणे बदलल्याने ते मोठ्यांचा, शिक्षकांना अनादरकरताना दिसतात
आपण चुकलो आहोत असे त्यांना वाटत नाही हि वृत्ती पुढे समाजाला घातक आहे

अशीच वृत्ती समाजात पसरत आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासाला आपण कमी पडत
आहोत त्यामुळे बेशीश्तीचा प्रश्न पुढे आला आहे त्यासाठी शिक्षकाने आणि भावनिक विकासास अधिक महत्त्व द्यावे .
वेळोवेळी मुलांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे

काही शिक्षकांनी के लेले संशोधन व त्याची उद्दिष्टे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत -

11

२.४ प्रस्तुत संशोधनाचे वेगळेपण

संशोधकाने गणित विषयाच्या संबंधित संशोधनाचा आढावा घेतला उपलब्ध झालेल्या संशोधनाचा आढावा
घेतल्यावर असे आढळून आले की, गणित विषया संदर्भात प्राथमिक इयत्ते मधील विध्यार्थ्यांवर जास्त संशोधन झालेले
आहे. संशोधन एका विशिष्ट गणितामधील क्रियांवर झालेले आहे असे दिसते..

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धसई येथे आठवी च्या गणित विषयावरील एकचल समीकरणे सोडविताना
येणाऱ्या समस्या हे संशोधकाच्या संशोधनाचे वेगळेपण आहे. दैनंदिन जीवनात व्यवहार करताना सुद्धा विद्यार्थ्यांना गणिताने
ज्ञान असणे आवश्यक आहे संशोधनाचे कार्य पूर्वीच्या संशोधकपेक्षा पूर्णतः आहे.
या संशोधनात पूर्व चाचणी व उत्तरन्चाचणी घेऊन परीक्षा तंत्राचा बापर के ला आहे. सांखिकीय तंत्राचा वापर करून
प्रत्याभरण चाचणीचे विश्लेषण के ले हे माझ्या संशोधनाचे वेगळेपण आहे.

12

प्रकरण 3 रे
संशोधनाची कार्यवाही

13
प्रकरण 3 रे
संशोधनाची कार्यवाही
३.१ प्रस्तावना -

संशोधन कार्य पद्धती – शिक्षकाला अध्यापनात विविध समस्या जाणवतात त्या समस्या सोडविण्यासाठी त्यावर

उपाय योजना करावी लागते म्हणजे समस्या संबंधित सखोल विचार करून के लेले उपाय म्हणजे संशोधन होय, माझी

समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कृ ती करून शैक्षणिक अनुभूती देऊन प्रायोगिक पद्धतीने शैक्षणिक समस्येचे निराकरण

करावयाचे होते

संशोधनाची कार्यपद्धती ठरविताना अनेक बाबींचा विचार करून कार्यपद्धती निश्चित करावी लागते संशोधनाची

उद्दिष्टे त्या विषयाची माहितीतंत्रा त्यांची जुळवाजुळव करून त्यातून समस्या निवारणार्थ ने कार्य करावे लागते त्यासाठी

नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब करून संशोधन के ले जाते

३.२ संशोधनाचा अर्थ -

शैक्षणिक संशोधनाची व्याख्या :-मौली(१९५८) यांच्या मते शैक्षणिक प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी

आवश्यक असलेली तथ्ये संबंध यांचा शोध घेण्यासाठी हाती घ्यावयाच्या कृ तीची मांडणी म्हणजे शैक्षणिक संशोधन होय.

14

Reasearch (संशोधन) ही संज्ञाफ्रें च शब्दावरून आलेली आहे Reasearch हा मूळ शब्द Orehire या

शब्दापासून तयार झालेला आहे

Research - re + search

Re-Search - म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे

म्हणजेच शोधाची पुनरावृत्ती करणे किं वा पुन्हा पुन्हा शोध घेत राहणे यालाच संशोधन असे म्हणतात.
रोबोर्ट एम डब्ल्यू ड्रायव्हर्स त्यांच्या मते संशोधन म्हणजे अशी कृ ती जी शैक्षणिक परिस्थिती मधील वर्तन शास्त्राचा

प्रगतीच्या दिशेने गतिमान झालेली असते अतिशय प्रभावी पद्धतीने आपले ध्येय प्राप्त करण्यास शिक्षकास मदत करणे व ज्ञान

प्राप्त करून देणे हे या शास्त्राचे अंतिम ध्येय असे संशोधन हे वैज्ञानिक छानबीन असून ती एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया

आहे सर्वप्रथम समस्या निवडू न त्याचे महत्त्व जाणून त्याची व्याप्ती व मर्यादा ठरविली जातात त्यानंतर माहितीचे वर्गीकरण व

विश्लेषण संखाकीय पद्धतीने के ले जाते व निष्कर्ष काढले जाते.

15

३.३ संशोधनाचे प्रकार

संशोधनासाठी उद्दिष्टे तंत्रे, साधने, क्षेत्र, हेतू आणि कार्यपद्धती व त्यामधून येणारे निष्कर्ष या वरून संशोधनाचे
तीन प्रकारात वर्गीकरण के ले जाते

शैक्षणिक संशोधन –

1. मूलभूत संशोधन
2. उपयोजीत संशोधन
3. कृ तिसंशोधन संशोधन.
 मूलभूत संशोधन –

मूलभूत संशोधनाचा हेतू नवीन ज्ञानाची निर्मिती करणे या संशोधनाचे निष्कर्ष हे सर्व सामान्य असतात. या

ज्ञानाचा उपयोग दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी लगेच होतो तसे नाही पण एखाद्या प्रश्नाच्या मुळा कडे ते संशोधन

नक्कीच जात असते यालाच मूलभूत संशोधन म्हणतात.

 उपयोजीत संशोधन
या संशोधनाचा हेतू वर्तमान काळाचे असमाधानकारक परिस्थिती बदलायचा असतो या संशोधनात

मिळालेले निष्कर्ष दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरतात सामान्य प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते .

16

 कृ तिसंशोधन संशोधन

विशिष्ट अपेक्षांनी मर्यादित असणाऱ्या उपयोजित संशोधनाचा प्रकार म्हणजे कृ ती संशोधन हे संशोधन

करणारी व्यक्ती शेक्षणिक कार्यक्रमात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यातही संशोधन करते. ही व्यक्ती शिक्षक व

प्रशासक असू शकते संशोधनाचा हेतू आपल्या समस्या शास्त्रीय पद्धतीने सोडण्याचा असतात कोणता विषय व

त्याची उद्दिष्टे निश्चित के ल्यानंतर उदिष्टांच्या पूर्ततेसाठी कोणती संशोधन पद्धती वापरावी हे ठरवले जाते.

३.४ संशोधनाच्या पद्धती

ऐतिहासिक पद्धती

संशोधनाच्या पद्धती वर्णनात्मक पद्धत

प्रायोगिक पद्धती

17
 एतिहासिक संशोधन पद्धती -
हि संशोधन पद्धती भूतकाळात घडू न गेलेल्या घटनांच्या संदर्भात वापरले जाते त्या संशोधनात भूतकालीन घटनांचे

यथार्थ ज्ञान व विश्लेषण करण्याची वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब के ले जाते वर्तमान स्थिती यथार्थ दर्शन होण्यासाठी

ऐतिहासिक साधनांची गरज असते.

 सर्वेक्षण / वर्णनात्मक पद्धतीने -

ऐतिहासिक संशोधनात जसा भूतकाळावर भर असतो तर वर्णनात्मक पद्धती वर्तमानावर भर असतो शैक्षणिक

संशोधन या पद्धतीचा विशेष प्रमाणात उपयोग करून घेण्यात आला आहे

 प्रायोगिक संशोधन पद्धती -

या पद्धतीमध्ये संशोधकांचे लक्ष भविष्य काळाकडे असते इतर सर्व शैक्षणिक संशोधन प्रमाणे प्रायोगिक पद्धतीचे ही

मूलभूत प्रयोजन म्हणजे प्रचलित विशिष्ट शैक्षणिक परिस्थिती बदल असमाधान व ती समस्या संशोधना द्वारे दूर करण्याचा

प्रयत्न करणे हे असते.

व्याख्या – जॉन डब्लू बेस्ट – १९८२

काळजीपूर्वक नियंत्रक परिस्थितीत काय होईल आणि काय घडेल असे वर्णन आणि विश्लेषण करणे म्हणजे

प्रायोगिक संशोधन होय. 18

प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या

 समस्या निर्धारण - समस्या ठरवणे व मांडणे


 संबंधित साहित्याचा आढावा घेते.
 परिकल्पना निश्चित करणे
 अभिकल्प निश्चित करणे
 कार्यवाही
 माहितीचे पृथाकरण
 अहवाल लेखन.

 संशोधन अभिकल्प -

प्रायोगिक सन्शोधन पद्धती प्रत्यक्ष राबविण्यापूर्वी ची एक पद्धतशीर योजना बनवावी लागते समाविष्ठ होणारे गट

त्यांच्या निवडीची पद्धत इत्यादी तपशीला चा विचार करून प्रयोगाचा आराखडा बनवावा लागतो त्यालाच प्रायोगिक

अभिकल्प असे म्हणतात.

एखाद्या अभियंत्याला इमारतीचा आराखडा तयार करावा लागतो त्यानुसार संशोधकाला प्रायोगिक अभिकल्पाची

निश्चिती करावी लागते

प्रायोगिक अभिकल्प विविध प्रकारचे असतात अभिकाल्पाचे स्वरूप समस्या संकलित माहिती उपलब्ध सोयी

इत्यादी बाबींवरून ठरते सामान्यत: प्रायोगिक अभिकाल्पाचे दोन गटात विभाजन करता येते.

19

अभिकाल्पाचे प्रकार

कार्यात्मक अभिकल्प घटनात्मक अभिकल्प

1. एकलगट अभिकल्प
2. समान गट
3. आवर्तन गट
4. बटू गट

प्रस्तुत संशोधन संशोधीके ने प्रयोगाचा सातत्याने विचार करताना कार्यात्मक अभिव्यक्तीनी एकल गट अभिकल्प निवडल
आहे .
एकलगट अभिकल्प -

एकल गट अभिकल्प या प्रकल्पामध्ये एकच गटावर प्रयोग के ला जातो नावाप्रमाणे प्रयोगिक उपचारापूर्वी पूर्व चाचणी

घेतली जाते नंतर प्रयोग उपचार व शेवटी उत्तर तपासणी घेतली जाते आकृ तीप्रमाणे हा अभिकल्प पुढीलप्रमाणे दाखविता

येईल.

 पूर्व चाचणी

 उपचार मात्रा

 उत्तर चाचणी

 माहितीचे अर्थनिर्वचन 20

पूर्व चाचणी मधून विद्यार्थ्यांना प्रारंभिक संपादनाचे मापन के ले प्रायोगिक उपचार देऊन शेवटी उत्तर चाचणी ने

अंतिम संपादन मापन के ले जाते संपादन मध्ये झालेला बदल संख्या शास्त्रीयदृष्ट्या सार्थ असेल तर प्रायोगिक उपचार झाला

असा निष्कर्ष काढला जातो

३.५ न्यादार्ष

शैक्षणिक संशोधनात नमुना निवड महत्त्वाचे स्थान आहे संशोधनाची समस्या अलीकडे जटिल स्वरूपाची झाली

आहे मूलभूत दृष्टिकोनातून नमुना निवडील स्थान देण्यात आले नमुना याचा अर्थ मोठ्या गटातून प्रातिनिधिक स्वरूपाचा

काढलेला लहान गट होय.

न्यादार्ष निवडीच्या पद्धती

अ-

 संभाव्यतेवर आधारित पद्धती


 सुगम यादृच्छिक पद्धती

 नियमबद्ध नमुना निवड

 वर्गीकरण नमुना निवड

 बहुस्तरीय यादृच्छिक निवड

 गुच्छ नमुना निवड

21

ब- असंभाव्य तेवर आधारित नमुना निवड पद्धती

 प्रसंगिक नमुना निवड

 निर्विष्टांश नमुना निवड

 संप्रयोजक नमुना निवड

माहिती मिळवण्यासाठी व्यक्ती आणि संस्थेकडे धाव घ्यावी लागते त्यांना प्रतिसादक असे म्हणतात त्यांच्यामध्ये

काही विहित गुणधर्म पूर्वीपासूनच सामावलेल्या दिसतात त्यांचे विशिष्ट गट पडलेले असतात प्रस्तुत संशोधकाचा संशोधके ने

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई येथील मराठी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता आठवी चा विद्यार्थी जनसंख्या

निवडले आहे जन्संखेतून सप्रयोजक म्हुणुन निवड के ली आहे त्यासाठी संशोधीके ने कें द्र धसई येथील जनता विद्यालय व

कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता आठवीचा १५ विद्यार्थ्यां ची निवड न्यादार्ष म्हणून के ले प्रस्तुत संशोधनात असंभाव्यता

नमुना निवड पद्धती वापरली.


22

३.६ माहिती संकलनाची साधने

1. प्रश्नावली
2. मुलाखत
3. पदनिश्चयन श्रेणी
4. चाचणी
5. निरीक्षण
6. समाज मिती
7. भेटी
8. चर्चा
9. पडताळा सूची

संशोधन प्रक्रिया करत असताना संशोधकाला विविध हे शोधण्याच्या साधनांची गरज असते संशोधनाच्या

साधनांद्वारे संशोधक विविध प्रकारच्या माहितीचे संकलन विविध साधने दर्शवितो .

वरील साधनानपैकी संशोधकाचे प्रस्तुत संशोधनामध्ये संपादन कसोटी या साधनांचा वापर के ला आहे कारण

चाचणीद्वारे आज अधिक विश्वसनीय माहिती गोळा करता येते.

23

३.७ माहिती विश्लेषणाचे संख्या शास्त्रीय तंत्रे –

उपलब्ध माहिती तथ्य ज्या प्राप्तकांच्या स्वरूपात असतात तेव्हा या प्रकारचे विश्लेषण करता येते या

विश्लेषणासाठी विविध संख्या शास्त्रीय तंत्राचा वापर करता येतो ही तंत्रे दोन गटात विभागले आहेत.
प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने वर्णनात्मक सांखीकीचे वापर के लेले वर्णनात्मक संखीकी मधील माध्यमान व

आलेख या तंत्राचा वापर के ला.

मध्यमान - मध्यमान म्हणजे गणिती सरासरी होय हे कें द्रीय प्रवृत्ती चे सर्वात विश्विसानीय परिणाम आहे त्याचा उपयोग

शोन्शिधीके ने माहितीचे विश्लेषण करण्यासाठी के ला.

आलेख - गुणांकावलीतील गुणांचे वितरण एका दृष्टीक्षेपात समजण्यासाठी वारंवारता विभाजन कोष्टकावरून आलेख

काढले जातात.

24

३.८ संशोधनाची प्रत्यक्ष कारवाई

प्रस्तुत शासनाच्या कार्यवाहीसाठी संशोधकाने इयत्ता आठवीच्या वर्गातील १५ विद्यार्थ्यांची त्यांची निवड के ली

त्यांची चाचणी घेऊन ती सोडवून घेतली व मिळालेल्या माहितीचे संख्यात्मक विश्लेषण के ले व आवश्यक तिथे

विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सर्वप्रथम पूर्व निरीक्षणावरून समस्या निश्चित के ल्या त्यानंतर त्यावर विविध उपाय के ले व उत्तर चाचणी वरून

प्रयोगाची यशस्वी तपासणी के ली.

एकचल समीकरणे बरोबर सोडविण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम


१) उपक्रमांची नावे - एकचल समीकरणे सोडविण्यासाठी मार्गदर्शन

उपक्रमाचा हेतू

एकचल समीकरणे सोडवण्यासाठी पद्धत समजून देणे

25

कार्यवाही -

जादा तासिका घेणे एक तासिका प्रतिदिन याप्रमाणे आठवडाभर मार्गदर्शन के ले यासाठी सहकारी गणित शिक्षका ची

मदत घेतली समीकरण सोडविणे म्हणजे त्याची उकल काढणे होय समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान क्रिया के ले तर

मिळणारे समीकरण सत्य असते या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणे तयार करून दिलेले समीकरण

सोडवतो.

समीकरणाचा दोन्ही बाजू वर करण्याच्या क्रिया

 दोन्ही बाजूंमध्ये सामान संख्या मिळवणे

 दोन्ही बाजूंमध्ये समाज संख्या वजा करणे

 दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे

 दोन्ही बाजूंना शुन्यतर समान संख्येने भागणे.

फलनिष्पत्ती
i. विद्यार्थी समीकरणे सोडविताना अभ्यासपूर्वक सोडवू लागले.
ii. एकचल समीकरणे सोडविण्याची संबंधी आपापसात चर्चा करू लागले
iii. एकचल समीकरणे सोडविण्यास अचूक उत्तरे काढण्यास वाढ होवू लागली .
iv. विद्यार्थी समीकरणे आत्मविश्वासाने बरोबर सोडवू लागले.

26

२ ) उपक्रमाचे नाव :- पर्यवेक्षक सराव

उपक्रमाचा हेतू

एकचल समीकरणे सोडविताना होणाऱ्या चुकांचा शोध घेवून व्यक्तीक मार्गदर्शन घेणे.

कार्यवाही – ऑफ तासाला हि योजन आखली या तासिके ला विद्यार्थांचे पर्यवेक्षण करून त्यांना समीकरणे सोडविण्यास

दिली ज्याठिकाणी विद्यार्थी चुकत होते तिथे योग्य मार्गदर्शन के ले.

फलनिष्पत्ती -

i. विद्यार्थी समीकरणे सोडवीत असतना चुकण चे निरीक्षण करून त्यांना तिथेच मार्गदर्शन झाल्याने चुका कमी

झाल्या.

ii. एकचल समीकरणे सोडविण्य चे कौशल्य विकसित झाले

iii. एकचल समीकरणे सोडवन्यासाठी विद्यार्थी आपसात चर्चा करू लागले.

iv. विद्यार्थी एकचल सामिकार्नेव सोडवू लागले.


27

३ ) उपक्रमाचे नाव :- स्वाध्याय

उपक्रमाचा हेतू – एकचल समीकरणे सोडविण्याचा अधिक सराव .

कार्यवाही

घरच्या अभ्यासासाठी काही समीकरणे सोडविण्यास दिले पालकांना दाखवण्यास सांगितले त्याचा चांगला परिणाम

दिसून आला आहे आम्हाला समीकरणाची उकल काढणे चालला च्या दिशेने किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत वा

नाही हे ठरविणे एकचल समीकरणे सोडविणे.

फलनिष्पत्ती

i. विद्यार्थ्यांच्या एकचल समीकरणे सोडविण्याचा अधिक सराव झाला

ii. एकचल समीकरणे सोडविण्याची संबंधी आपापसात चर्चा करू लागले

iii. एकचल समीकरणे सोडविण्याची विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ झाली

iv. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे एकचल समीकरणे सोडवू लागले.

28

४ ) उपक्रमाचे नाव :- समीकरणाच्या दोन्ही बाजून वर गणिती क्रिया करण्याचा सराव करणे.

कार्यवाही – एकचल समीकरणे सोडविताना समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर क्रिया उदाहरणात -

i. दोन्ही बाजूंमध्ये संख्या मिळवणे


ii. दोन्ही बाजून समान संख्या वजा करणे

iii. दोन्ही बाजूंवर समान संख्या ने गुणणे

iv. दोन्ही बाजूंना शून्येतर समान संख्येने भागणे या सर्व क्रियांचा सराव करून एकचल समीकरणे विद्यार्थ्यांना

सोडविण्यास सांगितले.

फलनिष्पत्ती

i. एकचल समीकरणे सोडविताना समीकरणाचा दोन्ही बाजूस करण्याचा क्रियेचा वापर करू लागले

ii. एकचल समीकरणे सोडविण्याचा कौशल्यात वाढ झाली

iii. विद्यार्थी एकचल समीकरणे सोडवू लागले

29

प्रकरण चौथे

माहितीचे पृथक्करण व अर्थनिर्वचन


30

प्रकरण चौथे

माहितीचे पृथक्करण व अर्थनिर्वचन

४.१ प्रस्तावना –

प्रस्तुत प्रकरणात संशोधन के ले माहितीचे संकलन विश्लेषण व अर्थनिर्वचन के ले आहे या संशोधनाकरिता

संशोधकाने प्राप्त के लेल्या माहितीच्या सादरीकरणास मांडणी म्हणतात याचा अर्थ लावण्यासाठी आलेख किं वा वारंवारता

सारणी या संख्याशास्त्रीय तंत्राचा अवलंब के ला जातो.

पडताळा सूची निरीक्षण या प्रकारे मिळवलेली माहिती गुणात्मक स्वरूपाची असते या गुणात्मक माहितीचा नेमका

सारांश काढू न पटकन आकलन होईल अशा स्वरुपात मांडणी करावी लागते

यासाठी संशोधकाने के लेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी मध्यमान व आलेख या साधनांचा वापर के ला आहे व

शेवटी अर्थनिर्वचन के ले आहे .


31

४.२ परीकाल्पना १ चे विश्लेषण

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई येथील इयत्ता आठवीच्या १५ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली

पूर्व चाचणी व उत्तर चाचणी प्राप्त माहितीची सरासरी संख्याशास्त्रीय तंत्र वापरून विश्लेषण करण्यात आले सदर माहिती

कोष्टक क्रमांक ४.१ मध्ये दर्शवले आहे

कोष्टक क्रमांक ४.१

पूर्व चाचणी व उत्तर चाचणी शैक्षणिक संपादनाची तुलना

पूर्व चाचणी उत्तर चाचणी

एकु ण विद्यार्थी एकू ण गुणांचे मध्य एकु ण विद्यार्थी एकू ण गुणांचे मध्य

संख्या गुण संख्या गुण

N २० M N 20 M

१५ ११२ ७.४७ 15 १८२ १२.१३

32

अर्थनिर्वचन

कोष्टक क्रमांक ४.१ नुसार इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकचल समीकरणे या घटकावर पूर्वचाचणी उत्तर

चाचणी आयोजित करण्यात आली पूर्व चाचणीचे शैक्षणिक संपादन ७.४७ आले तर उत्तर चाचणीच्या शैक्षणिक संपादन

१२.१३ आले.
निष्कर्ष -

यावरून असे सांगता येईल उत्तर चाचणी चे मध्यमान पूर्वचाचणी च्या माध्यमाने पेक्षा जास्त आहे याचाच अर्थ

विद्यार्थ्यांसाठी एकचल समीकरणे या वरील उदाहरणावर आयोजित उपक्रमाचा विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यासाठी उपयुक्त

ठरला.

पूर्व चाचणी उत्तर चाचणी तील शैक्षणिक संपादनाचा याची तुलना दर्शविणारा आलेख

14

12

10

0
पूर्वचाचणी उत्तरचाचणी

33

४.३ परिकल्पना २ चे विश्लेषण

इयत्ता आठवीच्या मुलांची एकचल समीकरणे या घटकावरील उदाहरणे यावर आधारित पूर्वचाचणी उत्तर चाचणी

घेतली असता शैक्षणिक संपादनात लक्षणीय फरक पडत नाही.

या परीकल्पनेचे विश्लेषण करण्यासाठी प्राप्त माहितीचे सरासरी हे संख्याशास्त्रीय तंत्र वापरून विश्लेषण करण्यात

आले.

कोष्टक क्रमांक ४.२

पूर्वचाचणी उत्तर चाचणी तील शैक्षणिक संपादनाची तुलना


पूर्वचाचणी उत्तर चाचणी

एकु ण विद्यार्थी एकू ण गुण गुणांचे मध्य एकु ण विद्यार्थी एकू ण गुण गुणांचे मध्य

संख्या संख्या

०८ ५५ ६.८७ ०८ ९० ११.२५

मध्य M = ∑X मध्य M = ∑X
N N
= ५५ = ९०


= ६.८७ = ११.२५

34

अर्थनिर्वचन

कोष्टक क्रमांक ४.२ नुसार पूर्वचाचणी तीन मुलांच्या शैक्षणिक संपादनाची सरासरी ६.८ सात होती उपक्रम
राबविला नंतर उत्तर चाचणी तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संपादनाची सरासरी ११.२५ होती म्हणजेच पूर्वचाचणी शैक्षणिक
संपादन आपेक्षा उत्तर चाचणी शैक्षणिक संपादनात फरक पडतो.

निष्कर्ष –

यावरून असे म्हणता येईल की एकचल समीकरणे या घटकावर आयोजित के लेले उपक्रम गुणांसाठी उपयुक्त
ठरतात विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादन वाढविण्यासाठी उपक्रम असतात.

आलेख क्रमांक 4.2

पूर्व चाचणी उत्तर चाचणी तील शैक्षणिक संपादनाची तुला दाखविणारा आलेख.(मुलगे)
12

10

0
पूर्वचाचणी उत्तर चाचणी

35

४.४ परिकल्पना 3 चे विश्लेषण

इयत्ता आठवीच्या मुलींची एकचल समीकरणे यातील उदाहरणावर आधारित पूर्वचाचणी उत्तर चाचणी तील

शैक्षणिक संपादनातील फरक पडतो.

या परिकल्पनेचे विश्लेषण करण्यासाठी प्राप्त माहितीची सरासरी संख्याशास्त्रीय तंत्र वापरून विश्लेषण करण्यात

आले.

कोष्टक क्रमांक 4.3

पूर्वचाचणी उत्तर चाचणी तील शैक्षणिक संपादनाची तुलना (मुली)

पूर्व चाचणी उत्तर चाचणी

एकु ण विद्यार्थी एकू ण गुणांचे मध्य एकु ण विद्यार्थी एकू ण गुणांचे मध्य

संख्या संख्या
गुण गुण

०७ ५७ ८.१४ ०७ ९२ १३.१४

36

अर्थनिर्वचन –

कोष्टक क्रमांक ४.३ नुसार पूर्वचाचणीतील मुलींची शैक्षणिक संपादनाची सरासरी ८.१४ होती.

उपक्रम राबविला नंतर उत्तर चाचणी तील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादनाची सरासरी १३.१४ होती.

म्हणजेच पूर्वचाचणी शैक्षणिक संपादनापेक्षा उत्तर चाचणी शैक्षणिक संपादनात फरक पडतो.

निष्कर्ष -

यावरून असे म्हणता येईल कि उत्तर चाचणी चे मध्य पूर्व चाचणी च्या मध्यपेक्षा जास्त आहे म्हणजे संशोधकाने

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकचल समीकरणे या घटकावरील आयोजित उपक्रमांचा विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यासाठी

उपयुक्त ठरला.

37

आलेख क्रमांक ४.४


पूर्व चाचणी व उत्तर चाचणी तील शैक्षणिक संपादनाच्या मध्यामानाची तुलना दाखविणारा आलेख (मुली)

14

12

10

0
पूर्वचाचणी उत्तर चाचणी

४.५ निष्कर्ष व चर्चा

पूर्वचाचणी नंतर कार्यान्वित उपायानंतर घेतलेल्या उत्तर चाचणीच्या संपादनातून तुलनेत वाढ झाली. गणित

विषयातील एकचल समीकरणे सोडविण्यासाठी राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एकचल समीकरणे सोडविण्याच्या

कौशल्यात वाढ झाली.

प्रस्तुत प्रकरणात संशोधकाने संशोधनासाठी माहितीचे संकलन करून तिच्यावर विविध संख्याकीय प्रक्रिया के ल्या

आहेत यामध्ये माध्यमाचा वापर तसेच माहितीचे सहज आकलन होण्यासाठी आलेखाचा वापर के ला आहे.

38
प्रकरण पाचवे

निष्कर्ष व शिफारशी

39

प्रकरण पाचवे

निष्कर्ष व शिफारशी

प्रस्तावना

पूर्वी मानव निसर्गातून शिक्षण घेत होता निसर्ग तील अनेक घटक त्याला एक वेगवेगळ्या गोष्टी शिकवत होत्या

उदाहरणार्थ सूर्याचा उगवण्या व मावळ्यातून त्याला दिवस रात्र याचे नान होत होते अवकाशातील ग्रह ग्रहतारे त्यांच्या दिशा

पर्यावरणात होणाऱ्या बदलांचे ज्ञान करून देत होते खुणा व पक्ष्यांच्या आवाजाने त्यांना मोसमातील बदल कळत होता असे
सर्व तो निसर्गातून शिकत होता जशीजशी मानवाची प्रगती झाली विकास झाला त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुं दावल्या तो

व्यवहार करू लागला त्याच व्यवहारासाठी सर्वत्र मान्य असे गणिताच्या गरज भासू लागली त्यातूनच गाणं त्याचा उगम झाला.

गणित के व्हा अभ्यास यापुरते मर्यादित नाही तर दैनंदिन जीवनातील गणिताला अनन्यसाधारण महत्त्व आहे

म्हणूनच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गणिताची गोडी वाटावी आनंदाने या विषयाकडे विद्यार्थ्यांनी पहावे यासाठी

संशोधनासाठी या विषयाची निवड के ली संशोधना अंती राबविलेल्या उपक्रमातून असे निदर्शनास आले की उपक्रम राबवून

विद्यार्थ्यांमध्ये के लेल्या अध्यानाचे आकलन अधिक स्पष्ट होते ते आवडीने उपक्रमात सहभागी होतात मूळ संकल्पना स्पष्ट

के ल्यास विद्यार्थ्यांमध्ये अधिक परिणामकारक अध्ययन होऊ शके ल.

40

५.२ संशोधनाचा विषय

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना एक चल समीकरणे सोडविताना येणाऱ्या अडचणी चा शोध घेऊन त्यावर उपाय

योजनांची परिणामकारकता अभ्यासणे .

५.३ संशोधनाची उद्दिष्टे

i. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच या शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना एकचल

समीकरणे उदाहरणे सोडवून शकतात याचा शोध घेणे

ii. एकचल समीकरणे हा घटक अध्ययन करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा शोध घेणे

iii. एकच समीकरणांच्या घटकातील उदाहरणांचे सोडविण्यासाठी विविध उपक्रम निर्मिती करणे

iv. राबविलेल्या उपक्रमांची परिणाम कारता अभ्यासणे


41

५.४ संशोधनाची परिकल्पना

i. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना एकचल समीकरणे या घटकावरील आधारित पूर्वचाचणी उत्तर चाचणी तील

शैक्षणिक संपादनात लक्षणीय फरक पडत नाही

ii. इयत्ता आठवीचा मुला व मुलींच्या पूर्वचाचणी उत्तर चाचणी तील शैक्षणिक संपादनात लक्षणीय फरक पडत नाही

५.५ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा

कोणत्याही मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट करावी असे संशोधकांना वाटते इयत्ता आठवी तील

विद्यार्थ्यांना पुरता मर्यादित नसून सर्वच इयत्तांमध्ये ही समस्या भेडसावत आहे

परंतु मर्यादित कालावधीत हे संशोधन पूर्ण करावयाचे असल्याने हे संशोधन करण्यासाठी पुढील प्रमाणे मर्यादा

आहेत

42

संशोधनाच्या मर्यादा

i. हे संशोधन जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसही या शाळे पुरतेच मर्यादित आहे
ii. शाळेतील इयत्ता आठवीच्या गणित विषयातील एकचल समीकरणे घटका पुरतेच मर्यादित आहे

५.६ संशोधन अभ्यासाचे महत्त्व

i. विद्यार्थ्यांना त्यांच्या गणिताचा पाया पक्का करता येतो

ii. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादन वाढविण्यासाठी उपयुक्त

iii. विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी करता येते

iv. आपला शाळेतील व इतर शाळेतील शिक्षकांना संदर्भ म्हणून उपयुक्त

v. इतर शिक्षकांना शिकवताना मदत होईल

vi. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यास मदत होईल

43

५.७ संशोधनाची पद्धती

प्रस्तुत संशोधन या प्रायोगिक पद्धतीवर आधारित आहे त्यामुळे समस्या लवकर व कमीत कमी वेळेत सोडविता

येईल संशोधकाला नियोजित वेळेत व चांगल्या प्रकारे सोडविता येईल

म्हणून संशोधकाने जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच या शाळेतील इयत्ता आठवीच्या वर्गातील

विद्यार्थी गणित विषयाचे एकचल समीकरणे घटकातील उदाहरणे सोडविताना येणाऱ्या अडचणी प्रायोगिक पद्धतीने

सोडविण्याचा मनपूर्वक प्रयत्न संशोधकांनी के ला व त्याप्रमाणे कार्यवाही के ली.

५.८ न्यादर्ष
जनसंख्याचे प्रतिनिधित्व करणारा छोटा नमुना गट म्हणून निवडला या नमुन्यास न्यादर्श असे म्हणतात.

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसही या शाळेतील इयत्ता आठवीच्या वर्गातील १५ विद्यार्थ्यांवर

उपक्रमाची अंमलबजावणी करून कृ ती संशोधन करण्यात आले म्हणून १५ विद्यार्थी हा संशोधनाचा न्यादर्श आहे.

44

५.९ प्रस्तुत संशोधनात वापरलेली साधने

प्रस्तुत संशोधनात प्रश्नावली निरीक्षण व पूर्वचाचणी उत्तर चाचणी या संसाधनांचा वापर के लेला आहे

५.१० माहितीचे विश्लेषण करण्याची संख्याशास्त्रीय तंत्रे

प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने खालील सांख्यिकीय तंत्राचा वापर के ला आहे

1. सरासरी

2. मध्य M = ∑ X
N
M = मध्य ,

∑X = गटातील एकू ण गुणांक

M = गटातील विद्यार्थ्यांची संख्या

3. आलेख (स्तंभालेख)

4. टक्के वारी
45

५.११ संशोधनाचे निष्कर्ष

i. पूर्व चाचणी उत्तर चाचणी गुणातील फरकामुळे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. की विद्यार्थ्यांमध्ये पूर्वचाचणी

नंतर के लेला अध्यापन यामुळे प्रगती दिसून येते व त्यांच्या गुणांमध्ये फरक पडतो.

ii. विद्यार्थी एकचल समीकरणे यातील उदाहरणे अचूकपणे सोडवितात.

५.१२ शिफारशी शिक्षकांसाठी

शिक्षकानी प्रत्येक वर्गात शिकवताना काही महत्त्वाच्या गोष्टी आमलात आणल्या पाहिजे त्या पुढीलप्रमाणे.

i. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून तो विषय विद्यार्थ्यांचा पातळी पर्यंत

नेऊन शिकवले तर विद्यार्थ्यांचे आकलन चांगले होते.

ii. आठवड्यातील तासिका मध्ये एक तास काही शिकवलेल्या भागावर चाचणी घ्यावी.

iii. विद्यार्थ्यांची गरज व बौद्धिक पातळी ओळखून अध्यापन करावे.

iv. अध्यापन करताना शैक्षणिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करावा.

v. गणित विषयात कच्चा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जादा वेळ देऊन स्वतंत्र वर्ग घ्यावा

vi. संबंधित विषयाचा उद्बोधन वर्गास तसेच विविध कार्यशाळेत शिक्षकांनी सहभागी व्हावे.

46

५.१३ पुढील संशोधनासाठी विषय

i. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना गणितातील सूत्रे वापरताना येणाऱ्या अडचणींचा. अभ्यास व त्यावरील

उपाययोजनांचा परिणाम कारकतेचा संप्रेषणात्मक अभ्यास.


ii. कार्यालयीन कामकाज जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उपाय सुचवणे व त्यांचे परिणाम अभ्यासणे.

iii. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीतील सह्भाग वाढवण्यासाठी येणाऱ्या समस्या व त्यांचे उपाय योजनांचा अभ्यास

करणे.

iv. विद्यार्थ्यांचे बेशिस्त वर्तन व त्यातून उद्भवणार्‍या समस्या व त्यावरील उपाय योजना करणे.

47

प्रकरण सहावे

विमर्षी चिंतन
48

६.१ प्रस्तावना :

एखादया कार्यामध्ये अथवा परीक्षांमध्ये अपयश आले तर ते का • आले आणि त्याला जबाबदार कोण ? पुढच्या

वेळी पुन्हा अशा परिस्थितीला सामोरे कसे जावे आणि यश कसे प्राप्त करावे यासाठी एकांतात किं वा समूहासोबत के लेला

वार्तालाप म्हणजे चिंतन,

चिंतन प्रत्येक व्यक्तीने करावयास हवे. आपण के लेल्या कामाचे चांगले व वाईट परिणाम पडताळून पाहिले पाहिजे.

यासाठी के लेल्या प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करून ते काम का के ले के लेल्या कामाचे उद्दिष्ट साध्य झाले का ? याची

चाचपणी के ल्यास कामाची यशस्विता लक्षात येते.

संशोधकाने इ. ८ वीच्या विद्यार्थ्यासाठी गणित विषयातील एकचल समीकरणे शाब्दिक उदाहरण या घटकावर

संशोधन के ले. संशोधन झाल्यानंतर त्यासाठी के लेल्या प्रत्येक उपक्रमावर चिंतन के ल्यास असे संशोधकांच्या लक्षात आले

की पूर्वी के लेले अध्यापन व उपक्रम राबवून के लेल्या साध्यापणामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक अध्ययन क्षमतेत लक्षणीय फरक

पडतो. असे उपक्रम राबवून अनेक विषयाचे अध्यापन करता येऊ शकते. त्यामुळे विद्याथ्र्यांची अध्ययनाकडे बघण्याची दृष्टी
आपण बदलू शकतो. त्यांना अध्यापन क्रियेत समाविष्ट करू शकतो. आवडीचे व न आवडते विषय याची संकल्पना बदलू

शकतो. 49

प्राथमिक अवस्थेत जर असे उपक्रम राबवून विद्यार्थ्याच्या संकल्पना स्पष्ट के ल्या तर विद्यार्थ्यांची अध्ययन

प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.

गणित हा विषय के वळ अभ्यासापुरता मर्यादित नाही. तर दैनंदिन जीवनात अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत स्त्री

असो वा पुरुष, बालक असो व वृद्ध, शहर असो वा गाव या प्रत्येकालाच गणितातील मूळ क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार,

भागाकार या गोष्टी येणे अत्यावश्यक असते. गणित हा विषय जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या विषयाकडे

लहानपणापासून गांभीर्याने पाहिले पाहिजे. यातील सर्व क्रिया मोजमाप, भौमितिक रचना, भौमितिक वस्तू हाताळणे त्याचा

योग्य वापर हा अचूक करता आला पाहिजे. गणित या विषयाचे दोन भाग पडतात.

1) अंकगणित

(२) भूमिती

अंकगणितात आकडेमोड करावी लागते तर भूमितीत भौमितीक साहित्याच्या वापराने भौमितिक रचना, त्रिकोण,

चौकोन, आयत, षटकोण, बहुभुजाकृ ती आकृ ती इत्यादी अनेक आकार व त्यांचे क्षेत्रफळ, पृष्ठफळ. घनफळ यांचा अभ्यास

करावा लागतो .

50

गणित हा विषय पाठांतराचा नसून तो अधिक सरावाचा विषय आहे. अनेक वेळा सराव करून गणितातील पढ़ती

पक्क्या करता येतात. यासाठी आई-वडील, शिक्षक, मुख्याध्यापक इत्यादी सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. के वळ

शाळेत शिक्षकांनी लक्ष देऊन चालणार नाही तर घरीदेखील विद्याथ्र्यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सराव के ला
पाहिजे. शाळेत गणित विषयाला पोषक असे उपक्रम राबविता येतील. गणिती खेळ, कोड़े, गणितीय स्पर्धा, प्रश्नमंजूषा

प्रदर्शन असे अनेक उपक्रम शाळेत सुरु करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्यात

गणित विषयाची आवड निर्माण होईल. या विषयाची भीती मनातून निघून जाईल

शाळा ही मुलांचे दुसरे घरच असते. घरानंतर अधिक काळ शाळेत घालवत असतात. त्यामुळे मुलांना शाळेत येणे

आवडले पाहिजे. शाळेतील वातावरण मुलांच्या आवडीचे असले पाहिजे. जेणेकरून ते मन मोकळे बागडू शकतील.

शिक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारू शकतील. काही मनात शंका असल्यास ते विचारू शकतील. शिक्षक व विद्यार्थी

यांच्यातील दरी कमी असेल तरच शाळेच्या समाजाचा देशाचा विकास होईल.

विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी के ल्यास गणित विषयाची भीती जाईल. माहिती तंत्रज्ञान विषयाला

अधिक चालना देऊन शालेय शिक्षणात त्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. विद्यार्थ्याच्या संस्कारक्षम वयात भक्कम

पाया तयार होत असतो.

51

त्यामुळे या संदर्भातील साक्षरता वाढली पाहिजे. आपली शाळा स्मार्ट स्कू ल म्हणून ओळखली जावी यासाठी

जाणीवपूर्वक प्रयत्न के ले पाहिजेत. पारंपारिक वर्ग पद्धती व त्यानुसार मिळणारे परंपरागत चाकोरीबद्ध शिक्षण या पार्श्वभूमीवर

संगणकाद्वारे शिक्षणदेणे व त्याद्वारे या प्रक्रियेत मिळणारे फलित याकडे अधिक लक्ष कें द्रीत करणे गरजेचे आहे.

नवीन अधिक सोप्या पद्धतीने गणित शिकवण्यासाठी U.S. Mas वैदिक गणित यानुसार गणिताचे ज्ञान

मुलांपर्यंत पोहोचविले पाहिजे.

शेवटी गणित हा विषय आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो लहान वयापासूनच

अधिक सखोल कळला पाहिजे. त्यांची भीती मनातून निघाली पाहिजे. यासाठी शिक्षक पालक यांनी एकत्रित येऊन काम

करणे आवश्यक आहे.


52

परिशिष्ट अ

पूर्वचाचणी

इयत्ता आठवी एकू ण गुण : २०

प्रश्न क्र. १) दिलेल्या समीकरणात चला ची किं मत काढणे ८

x
1) x+4=9 3) 3 =4

2) x-4=3 4) 4x=24

प्रश्न क्र. 2) प्रत्येक समीकरना नंतर चलासाठी दिलेल्या ६ किमतीचा

समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा

1) x-4=3 x=-1,7

2) 2a+4=0 a=2,1

प्रश्न क्र. 3) खालील समीकरणे सोडवा कोणतेही दोन ६


1) 2m+7=9 3) 3x+12=2x-4

2) 17p-2=49 4) 9x-4=6x+29

53

परिशिष्ट ब

उत्तरचाचणी

इयत्ता आठवी

प्रश्न क्र. १) दिलेल्या या समीकरणात चलाची किं मत काढणे ८

x
1) x+5=10 3) 2 =3

2) x-7=3 4) 5x=25

प्रश्न क्र. २) प्रत्येक समीकरणात दिलेल्या किमती ६

त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा

1) x-2=4 x=-6,1

2) 3a+6=0 a=2,-2

प्रश्न क्र. 3 ) खालील समीकरणे सोडवा ६

1) 3m+1=10 3) 3a+12=2a-4
2) 16p-2=46 4) 9x-4=32

54

परिशिष्ट क
अ.क्र विद्यार्थ्यांची नावे पूर्व चाचणी उत्तर चाचणी गुण
गुण
१ भोईर दिशा मधुकर ०९ १४
२ कै सी गायत्री दिलीपसिंग ०७ १२
३ मेंगाळ कल्पना बाळू १० १२
४ मेंगाळ करिष्मा भीमा ०६ १२
५ शिद गीता बुधाजी ०६ १२
६ शिद मयुरी बबन ०७ १५
७ उघडे मानसी कृ ष्णा १२ १५
८ बंगाराम मनोज नामदेव १० १२
९ दरवडा रवींद्र धनाजी ०८ १२
१० दरवडा भावेश अण्णा ०७ ११
११ मेंगाळ प्रविण सखाराम ०५ १०
१२ मेंगाळ ओमकार एकनाथ ०० १०
१३ निरगुडा संदीप दत्तू ०८ ११
१४ पारधी ओमकार भाऊ ०८ १२
१५ शिद दादाजी विठ्ठल ०९ १२
११२ १८२

55

परिशिष्ट क्रमांक ड

पाठ नियोजन १

विषय - गणित
घटक - एकचल समीकरणे

उपघटक - समीकरणाची उकल काढणे

वेळ - ३० मिनिटे

शिक्षकाचे नाव - सौ माधुरी एमपीत्री

शाळेचे नाव - जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई

उद्दिष्टे १. एकचल समीकरणाची उकल काढणे

2. समीकरण सोडविने.

समीकरणाच्या दोन्ही बाजूवर करण्याच्या क्रिया

1) दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळविणे.

56

ब ) दोन्ही बाजूमध्ये समान संख्या वजा करणे

क) दोन्ही बाजूना समान संखेने गुणने.

ड) दोन्ही बाजूस शून्येतर समान संखेने भागणे.

x+4= 9 x-2 =7

x+4-4=9-4 x-2+2=7+2

x=5 x=9
 प्रत्यक्ष कृ ती

विद्यार्थ्यांचे गट करून घेणे

गटानुसार बैठक व्यवस्था करणे

समीकरणाची उकल काढणे

 शिक्षकाची भूमिका

विद्यार्थ्याकडू न एकचल समीकरणाची उकल काढू न घेणे

उकल काढण्याचा सराव करून घेणे

57

 विद्यार्थी कृ ती

पूर्व ज्ञानाचा वापर करून समीकरणाची उकल काढतो समीकरणे सोडू न जरा ची किं मत काढतो

 समारोप

शिक्षकांनी शिकवल्या प्रमाणे समीकरणे सोडवितात

वेळेचे नियोजन

पूर्वसूचना - ५ मिनिटे

प्रत्यस कृ ती - १० मिनिटे
विद्यार्थी कृ ती - १० मिनिटे

समारोप - ५ मिनिटे

58

परिशिष्ट क्रमांक ड

पाठ नियोजन 2

विषय - गणित

घटक - एकचल समीकरणे

उपघटक - समीकरणाची उकल काढणे

वेळ - ३० मिनिटे

शिक्षकाचे नाव - सौ माधुरी हेमंत पितळे

शाळेचे नाव - जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई

उद्दिष्टे

1. समीकरणाची उकल काढणे.

2. समीकरणे सोडवणे दिलेल्या किमती उकली आहेत का ते ठरविणे.

प्रथम कृ ती :

 विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांचे गट के ले.


 गटानुसार बैठक व्यवस्था.

 समीकरणाची उकल समजणे.

 साधे समीकरण सोडवणे.

59

शिक्षकांची भूमिका :

1. एकचल समीकरणे सोडू न देणे .

2. उकल कशी काढायची ते सांगणे.

विद्यार्थी कृ ती

1. समीकरणाच्या दोन्ही बाजुस योग्य ती गणितीक्रिया करून समीकरण सोडविणे.

2. समीकरणाची उकल कशी काढावी ते सांगणे.

समारोप - समीकरणे विद्यार्थ्यास सोडण्यास सांगितले.

वेळेचे नियोजन

पूर्वसूचना ०५ मिनिटे

प्रत्यक्ष कृ ती १० मिनिटे

विद्यार्थी कृ ती १० मिनिटे

समारोप ०५ मिनिटे
एकू ण ३० मिनिटे

60

परिशिष्ट क्रमांक ड

पाठ नियोजन ३

विषय - गणित

घटक - एकचल समीकरणे

उपघटक - समीकरणाची उकल काढणे

वेळ - ३० मिनिटे

शिक्षकाचे नाव - सौ माधुरी हेमंत पितळे

शाळेचे नाव - जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई

उद्दिष्टे

1) एकचल समीकरणे सोडवणे


2) समीकरणाची उकल काढणे.

प्रथम कृ ती

1) विद्यार्थ्यांना समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर करणाऱ्या गणिती क्रियांचा सराव करणे.


2) समीकरणातील चला ची किं मत काढणे.

विद्यार्थी कृ ती

१)चलनाच्या संबंधी उदाहरणे सांगितल्याप्रमाणे सोडविने.

२) विद्यार्थी चलाची उकल अचूक काढतात. 61


शिक्षकाची भूमिका

1) विद्यार्थ्यांकडू न एकचल समीकरणे सोडविली


2) चलाची माहिती दिली

समारोप : शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी एकचल समीकरणे सोडवली

वेळेचे नियोजन

पूर्वसूचना ०५ मिनिटे

प्रत्यक्ष कृ ती १० मिनिटे

विद्यार्थी कृ ती १० मिनिटे

समारोप ०५ मिनिटे

एकू ण ३० मिनिटे

62

संदर्भसूची

i. आगलावे प्रदीप २००० संशोधन पद्धती शास्त्र व तंत्र नागपूर विद्या प्रकाशन.
ii. आळंदकर ज.जा १९६८ शिक्षणाचे अध्यापनाचे शास्त्र पुणे प्रथमावृत्ती ठोकळा प्रकाशन.
iii. कऱ्हाडे बी.एम २००० शास्त्रीय संशोधन पद्धती नागपूर पिंपळापुरे अँड कं पनी पब्लिश.
iv. करंदीकर अहिरे १९८७ कृ ती संशोधन फडके प्रकाशन.
v. कायंदे पाटील २००८ संशोधन पद्धती नाशिक चैतन्य पब्लिके शन.
vi. पंडित बन्सी बिहारी १९१७ शिक्षणातील संशोधन पुणे नूतन प्रकाशन.
vii. चव्हाण मोहन सिंग सुंदरसिंग २०१४ इयत्ता आठवी गणित पाठ्यपुस्तक पुणे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
मंडळ.
viii. पाटील व.भा १९९९ संशोधन पद्धती नागपुर मंगेश प्रकाशन.
ix. महाले व. द.कर्डिले २००३ संशोधनात सांखिकि तंत्राचे उपयोग नाशिक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.
x. इयत्ता आठवीच्या शिकवणाऱ्या शिक्षकांचे कृ तिसंशोधन विषयक प्रशिक्षण २००५ पुणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद.
xi. विजया वाड २००६ आपली मुलं यात हित गुप्त पालकांशी पुणे मनोविकास प्रकाशन.
xii. सागर पवार २०१७.
xiii. बालस्नेही शिक्षण शिक्षक हस्तपुस्तिका ऑक्टोबर १२ पुणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.
xiv. दिशा नव पराक्रमाची मार्च ०५ पुणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.
63

You might also like