You are on page 1of 3

पंतप्रधान नरें द्र मोदी...

शुन्यातून शिखरापर्यंत...!

नऊ वर्षापर्वी
ु पहिल्यांदा संसदे त प्रवेश करताना संसदे च्या पायरीवर नम्रपणे डोके टे कवणारे नरें द्र् मोदी
जगाने पाहिले होते. संसदिय पर्ं परे चा अशा प्रकारे बहुमान वाढविणारे मोदी आजही त्याच भावनेने
कार्यरत आहे त. आता आपण स्थिरावलो, आशी त्यांची समजूत झालेली नाही. आजही ते तेवढ्याच
जोमाने आणि प्रामाणिकपणे काम करीत असतात. कोणताही अंहकार नाही की क्ं टाळा नाही. दे शातील
जनतेचे आपण सेवक आहोत ही प्रामाणिक भावना त्यांनी जोपासून कृतीत आणलेली आहे . मी मोदी
यांच्यावर प्रखर टिका करणारे विरोधक,विचारवंत, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही मोदी
यांच्या या गण
ु ाचे कामाच्या पद्धतीचे गण
ु गान गातात.

कोणत्याही सत्ताधारी नेत्याचे मुल्यमापन करण्यासाठी ९ वर्षाचा कालावधी कमी आहे की पुरेसा आहे
यावर चर्चा होऊ शकते. मात्र, स्वातंत्र्याच्या सहा दशकानंतर पहिलांदाच पुर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या
मोदी सरकार पुढे अनेक आव्हाने होती. एवढ्या वर्षात प्रशासनाला एक सवय लागलेली असते . त्या
सवयीच्या बाहे र पडून काम करणे, आपण जनतेला उत्तरदायी आहोत या जाणीवेने प्रयत्न करणे;
थोडक्यात प्रशासकीय पातळीवर असे बदल घडवून सर्वांना सक्रीय करणे मोठे कठीण काम असते . मात्र,
त्याविषयी कोणतीही सबब न सांगता पंतप्रधान मोदी यांनी केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर
आपल्या सहकारी मंत्र्यामध्येही हीच भावना निर्माण केली. त्यामळ
ु े च गेल्या ९ वर्षात या सरकारवत
कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. एकिकडे असे प्रयोग आणि प्रयत्न सुरु असतानाच
जनतेच्या मनात “हे आपले सरकार आहे ”, अशी भावना निर्माण करणे आणि त्या कसोटीवर खरे उतरणे
या आघाडीवर पंतप्रधान मोदी यशस्वी झाले आहे त. म्हणन
ू च दे शातच नव्हे तर जगभरात मोदी
लोकप्रियतेचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे त.

अगदी पहिल्या दिवसापासुनच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कामाचे सूत्र आणि प्राधान्यक्रम ठरविले
होते. दे शातील सामान्य माणस
ु हा त्यांच्या कार्याचा, योजनांचा केंद्रबिंद ू राहिलेला आहे . त्याचवेळी
समाजातील इतर् घटकांवर अन्याय होणार नाही, याची नेहमीच त्यांनी काळजी घेतलेली आहे . संकटाच्या
काळात ८० कोटी जनतेला गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातुन अन्न सुरक्षा दे णे असो की
मध्यमवर्गीयांचे जीवनमान उं चावणे असो, अशा सर्व पातळीवर पंतप्रधान मोदी कमालीचे यशस्वी झाले
आहे त. पंतप्रधान मोदी नेहमीच एखादी योजना जाहीर करुन “आता आपले काम संपले” अशा भ्रमात
राहत नाहीत. त्या योजना किती यशस्वी होत आहे त, त्याचा लाभ संबंधित घटकांना मिळत आहे की
नाही यावर लक्ष ठे वून असतात.

याचे एक उदाहरण म्हणजे स्वच्छ भापत अभियान. स्वच्छ भारत अभियान सुरु केल्यानंतर पंतप्रधान
मोदी यांनी हे अभियान केवळ सरकारी पातळीवर ठे वले नाही तर ही एक जनचळवळ त्यांनी निर्माण
केली. त्यामुळेच मुंबईचा अफरोज शहा जेव्हा वर्सोवा बिच स्वच्छ करण्याच्या कामाला लागला तेव्हा
‘मन की बात’मधून मोदी यांनी त्याच्या कामाची दखल घेतली. दे शाच्या अनेक विभागात असे काम
करणारे युवक मोदी यांच्या आस्थेचा विषय आहे त. सामान्यांची अशी दखल घेण्याची आणि दे शभर सुरु
असलेल्या अशा प्रयोगाची मोदी यांनी.नेहमीच दखल घेतली आहे . स्वतंत्र भारतात अशा पध्दतीने इतर
कोणत्याही पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने काम केलेले नाही.

बेटी बचाओ - बेटी पढाओ, पंतप्रधान आवास योजना, जलजीवन योजनेतन


ू २० कोटी घरात पोहोचलेले
पिण्याचे पाणी, उज्वला योजनेतन
ू आठ कोटी महिलांची चुलीच्या धुरातुन झालेली सुटका, कोट्यवधी
घरांना मिळालेली वीज, अशा किती योजना सांगता येतील. सामान्यांना मिळणारे मोफत उपचार, जनधन,
अटल पेन्शन या योजनेद्वारे महिला, बालक, तरुण ,शेतकरी, आदिवासी, दलित, कष्टकरी आणि उपेक्षित
वर्गाला स्थैर्य दे ण्याचा प्रामाणिकरण प्रयत्न मोदी यांनी केला आहे .

भारतासारख्या दे शात वेगवेगळ्या प्रदे शात विविध प्रश्न आहे त. त्याचे स्वरुप जटील आहे . काश्मीर
काश्मीरमधील जनतेचे प्रश्न आहे त तेच इशान्य भारताचे नाहीत. त्यामळ
ु े च मोदी यांनी हे आव्हान
स्वीकारुन त्यावर उपाययोजना केरण्याचा प्रयत्न केला इशान्य भारतातील जनतेच्या मनात दे शाविषयी
दे शाभिमानाची भावना निर्माण करण्यात मोदी यांना यश आले आहे . अशा गोष्टींचे महत्व कशात
मोजता येत नाही. पण दे शाच्या भविष्यावर दरू गमी परिणाम करणारे हे काम आहे . आज कधी नव्हे ते
या प्रदे शात शांतता नांदत आहे . हे च कार्य अधिक कार्यक्षमतेने पुढे सुरु ठे वण्यासाठी पंतप्रधान मोदी
यांनी प्रत्येक महिन्याला आपल्या एका मंत्र्याला ईशान्य भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला त्याचे
सकारात्मक परिणाम आता दिसत आहे त.

योजनांचे यश तात्काळ दिसत नाही पण पंतप्रधान मोदी यांनी आढावा घेण्याच्या आपल्या सवयीनुसार
प्रत्येक योजनेचा जनतेला फायदा होईल याची काळजी घेतली आहे . दे श पातळीवर असे यश संपादन
करत असताना त्यांनी दे शाची मान जगभरात कशी उं चावेल यासाठी खास लक्ष दिले. आधीच्या
सरकारच्या काळात काय स्थिती होती यावर काही टिकाटिपणी केली नाही, तरी हे मान्य करावेच
लागेल की मोदी सध्याच्या काळात जगातील एक प्रमुख नेते आहे त. जगभरातील अनेक दे शाचे नेते,
राष्ट्र प्रमुख यांना पंतप्रधान मोदी काय भूमिका घेतात याची उत्सुकता असते. आज जागतिक पातळीवर
अनेक समस्या असताना जग आपल्या पंतप्रधानांकडे वेगळ्या आशेने पाहते, हे अनेकदा जागतिक
व्यासपीठावर सिद्ध झाले आहे . आज अनेक दे शांना आपल्या सोबत मैत्री करण्याची इच्छा आहे . कधी
काळी संयुक्त राष्ट्र संघात आपल्या भूमिकेवर शेजारी राष्ट्र जोरदार टिका करुन आपल्याला वेगळे
पाडण्याचा प्रयत्न करत असे. आजही त्या राष्ट्राचा असाच प्रयत्न असतो आज फरक एवढाच आहे की
बेंबीच्या दे ढापासुन ते ओरडले तरी जग मोदींच्या मागे ठामपणे ऊभे राहत आहे . स्वतंत्र भारतात हा
फरक किवा बदल प्रथमच घडत आहे .
इथे योजनांची जंत्री दे ण्याचा मोह मी मुद्दाम टाळत आहे . योजनांचे यशापयश हे काही पंतप्रधानपदी
असलेल्या व्यक्तीच्या मुल्यमापनाचे प्रमुख घटक नसावेत. पंतप्रधान दे शाचे नेतत्ृ व करत असतानाच
जागतिक पातळीवर, जागतिक व्यासपीठावर दे शासाठी कार्य करीत असतात. याबाबतीत मोदी यांनी
इतिहास घडविला आहे हे त्यांच्या टिकाकारांनाही मान्य करावे लागेल.

पंतप्रधान मोदी यांना तसे काही राजकिय वारसा नाही. अगदी शुन्यातून ते आलेले आहे त. आज
शन्
ु यातन
ू ते शिखरापर्यत पोहोचले आहे त आणि मोदी यांचे शिखरापर्यंत पोहोचणे म्हणजे त्यांचे ते
एकट्याचे हे यश नाही तर हा दे शाचाही बहुमान आहे .

--- चौकटीचा मजकूर ---

भारतीयत्वाचा अभिमान

पंतप्रधान नरें द्र मोदी भारतीय संस्कृतीविषयीचा अभिमान कोणताही न्यन


ू गंड न बाळगता प्रदर्शित करत
असतात. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असो किं वा वाराणसी,
उज्जैन आणि केदारनाथ कॉरिडॉरची उभारणी असो. त्याचप्रमाणे जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा दे णारे
कलम ३७० आणि ३५ अ रद्द करून त्यांनी “एक भारत – श्रेष्ठ भारत”विषयी कटिबद्ध असल्याचेही सिद्ध
केले आहे .

- विनोद तावडे
- भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस

You might also like