You are on page 1of 5

शेतकरी उत्पादक कं पन्यांच्या संचालक आणि

भागधारकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण

M
शेतीच्या प्रवाहात महिलांचा समावेश
• सभोवताली आपण पाहतो की काही कामे स्त्रियांची म्हणून गणली जातात तर काही कामे पुरूषांची म्हणून गणली जातात. रोजचा स्वयंपाक करणे,
घरातल्या सर्वांचे कपडे धुणे, घराची स्वच्छता ठेवणे, भांडी घासणे वगैरे कामे घरातल्या स्त्रियांची जबाबदारी असते. पुरूषाने बाहेर काम करून पैसे
कमवून आणावेत आणि सर्व महत्त्वाचे निर्णय घ्यावेत असाही एक समज आहे. याला बरेच अपवाद आपण पाहतो. स्त्रिया सरकारी कार्यालयात आहेत,
त्या बँके त आहेत आणि त्या शेतातही काम करतात. म्हणजे अनेक स्त्रिया घराबाहेरचे काम करून पैसे कमावतात. स्वयंपाक करणे हे स्त्रियांचे काम
मानले जाते, पण अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम पुरूष करताना दिसतात. याचा साधासरळ अर्थ असा की स्त्री-पुरूषांच्या कामाची वाटणी, त्यांनी
काय करावे आणि काय करू नये यासंबंधीचे समाजनियम हे निसर्गाने बनवलेले नसून समाजाने बनवलेले आहेत. समाजाने स्त्री-पुरूषविषयक
बनविलेल्या धारणांना लिंगभाव (जेंडर) असे म्हटले जाते.

• मग स्त्रिया आणि पुरूषांमध्ये काहीच फरक नाही का? तसा तर कोणत्याही दोन माणसांमध्ये फरक असतो. दोन स्त्रिया एकसारख्या नसतात आणि
वडील-मुलगाही एकमेकांपेक्षा वेगळे असतात. स्त्री-पुरूषांमधला फरक मुख्यत्वे प्रजनन संस्थेतला आहे. पण त्या आधारे के ले जाणारे बाकी सारे भेद
मात्र समाजाने बनवलेले आहेत.

• स्त्रिया आणि पुरूषांमधल्या जीवशास्त्रीय फरकाला लिगंभेद म्हणतात. तर स्त्रियांनी अमुक पद्धतीने वागावे (उदा. घरातले कामकाज करावे) आणि
तमुक पद्धतीने वागू नये (उदा. मोठ्या आवाजात बोलू नये), पुरूषांनी असे वागावे (उदा. पत्नीपेक्षा जास्त कमवावे) आणि तसे वागू नये (उदा. रडू
नये) अशा समाजाने लादलेल्या ज्या अपेक्षा असतात तो आहे लिगंभाव. चांगली स्त्री आणि चांगला पुरूष या समाजाने तयार के लेल्या चौकटीत आपण
के वळ इतर स्त्री-पुरूषांना जोखतो असे नाही, तर आपण स्वत:चेही मूल्यमापन त्याच चौकटीतून करतो. कोणी ही पारंपरिक चौकट मोडू न बाहेर
पडण्याचा प्रयत्न के ल्यास आप्तस्वकीयांकडू न आणि समाजाकडू न त्या व्यक्तीला नावे ठेवली जातात, काहीवेळी त्रासही दिला जातो. आपल्या
इतरांकडू नच्या आणि स्वत:कडू नच्या अपेक्षा, स्वप्न, अपराधी भावना हे सारे समाजाच्या स्त्री -पुरूष विषयक धारणांनी प्रभावित असते.
लिंगभाव विश्लेषण

• शेतकरी स्त्रिया आणि शेतकरी पुरूष यांना शेती करताना कोणत्या अडचणी येतात
आणि त्यांना कोणत्या संधी आहेत हे समजून घेणे.
• स्त्रिया आणि पुरूष शेतकरी या दोघांनाही फायद्चे ठरतील असे कृ षि कार्यक्रम
आखण्यासाठी माहिती मिळते.
• कृ षि कार्यक्रमांत स्त्रियांचा सहभाग वाढविण्यात काय अडचणी आहेत आणि त्यावर
काय उपाययोजना करता येईल यासंबंधी माहिती मिळते.
• शेतकरी स्त्रियांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी खास प्रयत्नांचे नियोजन
करता येणे शक्य होते.
• कृ षि कार्यक्रमातून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी
योजना आखता येते.
महिलांना शेती व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे विशेष धोरण

• विविध पिकांच्या उत्पादनांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. परंतु त्याची औपचारिक नोंद घेतली जात नाही.
• कृ षिमूल्यसाखळीच्या काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग नगण्य आहे.
• विविध कृ षिविषयक संसाधनांपर्यंत उदा. बी-बियाणे, खते, औषधे, शेती अवजारे, विस्तार सेवा, बँके चे कर्ज, बाजारपेठ इ. बाबतीत
महिलांची पोच अत्यल्प आहे.
• सामाजिक मूल्यांकन अभ्यासामध्ये के वळ ९ टक्के महिलांच्या नावावर शेती असल्याचे आढळून आले. महिलांच्या नावावर शेती
नसल्यामुळे बँके चे कर्ज, शासकीय योजना, गोदाम तारण पावती इत्यादी लाभापासून त्या वंचित राहात असल्याचे निदर्शनास आले.
ह्याचा परिणाम म्हणून त्यांचा कृ षि मूल्यसाखळीअंतर्गत उत्पादनाच्या पुढील टप्प्यांमध्ये सहभाग नगण्य दिसून आला.
• कृ षिविषयक मूल्यसाखळीच्या विविध टप्प्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग नगण्य आहे. कृ षि विषयक काढणीपश्चात
व्यवस्थापन व विपणन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने पुरूषांचे वर्चस्व असून समूहक, घाऊक विक्रे ते, अधिकृ त विक्रे ते, किरकोळ विक्रे ते,
निर्यातदार इत्यादी भूमिकांमध्ये महिलांचा सहभाग अत्यल्प आहे.
• शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये भागधारक व संचालकपदी महिलांचा सहभाग २० टक्के पर्यंत मर्यादित आहे.
• बाजार माहिती सेवांपर्यंत महिलांची पोच मर्यादित आहे.
• कृ षि उत्पादनांमध्ये महिलांचे प्रमुख योगदान असूनसुद्धा समान कामाकरता पुरूषांच्या तुलनेत कमी रोजगार दिला जातो.
• प्रभाग संघ व लोकसंचिलत साधन कें द्र यांचा कृ षि आघारित उत्पादन, एकत्रीकरण, काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन याबाबत
महिलांचा अनुभव मर्यादित आहे.

You might also like