You are on page 1of 3

मोहल्ला कमिटी म्हणजे काय?

आपल्या सगळ्यांनाच जाणीव आहे की आजघडीला ‘कम्यनिटी पोलिसिंग’च्या संकल्पनेला उजाळा दे ण्याची पर्वी ू नव्हती
इतकी जास्त गरज आहे . ‘कम्यनि ु टी पोलिसिंग’ म्हणजे एखाद्या वस्ती व समद ु ायातील लोकांनी पढु ाकार घेऊन
वस्तीतले वातावरण शांत राखणे, अफवांचा प्रसार रोखणे, द्वेष पसरवण्याच्या हे तन ू े केलेल्या प्रचाराला आळा घालणे. या
संकल्पनेला ‘मोहल्ला कमिटी’च्या माध्यमातन
ू प्रत्यक्ष रूप दे ता येत.े पण हे करायचे कसे?

मोहल्ला कमिटी म्हणजे एखाद्या वस्तीतल्या विविध समद ु ायातील लोकांनी मिळून केलेली समिती, ज्यामध्ये
महिलांचाही समावेश असतो आणि संबंधित पोलिस स्टे शनच्या हद्दीतील स्वयंसेवी संस्था, विविध व्यावसायिक यांचे
प्रतिनिधीही असतात. समितीचे सदस्य पोलिस व प्रशासनाच्या दै नंदिन संपर्कात राहून वस्तीत दं गे होण्याला प्रतिबंध
करतात. जेव्हा जेव्हा अफवा पसरवल्या जातात आणि तणाव वाढू लागतो, तेव्हा समिती सदस्य एकत्रितपणे पढ ु ाकार
घेऊन वेळेत कारवाई करण्यासाठी पोलिस व प्रशासनावर ‘नैतिक दबाब’ आणतात.

काही भागांमध्ये अशा समित्या कित्येक वर्षांपासनू कार्यरत राहिल्या आहे त. याची सरु
ु वात १९८४ मध्ये भिवंडीमध्ये झाली.
त्यावेळी भिवंडीच्या पोलिस उपायक्ु तपदी सरु े श खोपडे हे अधिकारी होते, ज्यांनी विविध समद ु ायातील नागरिक आणि
पोलिस यांच्यात संवाद वाढवन ू त्यांना जवळ आणण्यासाठी काम केले. यंत्रमागावर कापड तयार करण्यासाठी प्रसिद्ध
असलेल्या भिवंडी शहरात ७५ मोहल्ला समित्या तयार करण्यात आल्या, ज्यामध्ये प्रत्येकी साधारण ५० जण सदस्य होते.
त्यांनी हळूहळू कामाला सरु
ु वात केली आणि कम्यनि ु टी पोलिसिंग संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले. हा प्रयोग खप
ू च यशस्वी
झाला, मोहल्ला समित्यांचा प्रभाव पडला आणि १९९२-९३ मध्ये मंब ु ईत हिंसाचार पेटला होता, तरी त्याची झळ या भागाला
बसली नाही.

मंब
ु ईमध्ये मोहल्ला कमिटीच्या संकल्पनेवर बरीच चर्चा झाली, विचारांची दे वाणघेवाण झाली. लोकांना या प्रकारच्या
समित्यांचे महत्त्व उमगले आणि जनतेचे सहाय्य असल्याखेरीज आपल्याला काम करता येणार नाही हे निरीक्षक,
उपनिरिक्षक यांसह सर्व स्तरांवरील पोलिस यंत्रणेच्याही लक्षात आले.

मंबु ईच्या संवेदनशील भागांमध्ये २४ मोहल्ला समित्यांचे गठन झाले, त्यांनी जे काम केले त्यातन ू मंबु ई शहराच्या
इतिहासात नव्या गोष्टींची भर पडली. मंब ु ईचे माजी पोलिस आयक्ु त ज्यलि ु ओ रिबेरो, तत्कालिन पोलिस आयक् ु त सतिश
साहनी आणि सश ु ोभा बर्वे यांच्यासारखे ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते यांनी या समित्या तयार करण्यामध्ये पढ ु ाकार
घेतला. राजकीय नेत्यांचे नियंत्रण किंवा समाजकंटकांच्या कारवायांपेक्षाही नागरिकांनी पढ ु ाकार घेऊन केलेल्या गोष्टींवर
या समित्यांनी भर दिला. पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव असता कामा नये आणि कोणत्याही पक्षाही निगडित
नसलेल्या नागरिकांच्या समह ू ाचा दबाव पोलिसांवर असायला पाहिजे, अशी या समित्यांची भमि ू का राहिली. अशाच
प्रकारच्या उपाययोजना कराव्यात असे राष्ट्रीय पोलिस आयोगाने आधीपासन ू सचु वले आहे , पण या शिफारशींची
अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

पण तणावाच्या काळात या मोहल्ला कमिटीच्या सक्रीयतेमळ ु े वातावरण शांत राहिले, परिस्थिती चिघळली नाही, असे
अनेकदा दिसन ू आले आहे . बामियान बद्
ु धाची घटना (२००१), राजकीय नेत्यांच्या अटका, सिमीवरील बंदी, न्यय
ू ॉर्क व
नंतर दिल्ली मधील दहशतवादी हल्ले, अफगाणिस्तानवरील हल्ला या त्यातील काही ठळक घटना आहे त.

बॉम्बे मोहल्ला कमिटी ट्रस्टने या समित्या जिवित ठे वण्याचे महत्त्वपर्ण


ू काम केले आहे . येत्या काही आठवड्यात आम्ही या
समित्यांसोबत बातचीत करणार आहोत. या सक्रीय व स्वतंत्र समित्या चालवण्याचे काम सध्या ‘मोहल्ला कमिटी मव्ु हमें ट
ट्रस्ट’ (MCMT) करीत असन ू त्याचे कार्यकारी अध्यक्ष के एल प्रसाद हे माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी आहे त (ज्यलि
ु ओ
रिबेरो, माजी मंब
ु ई पोलिस आयक् ु त आणि पंजाब पोलिस महासंचालक हे अध्यक्ष आहे त आणि बाकीही सक्रीय सदस्य
आहे त). या समित्यांमध्ये नागरिकांनी महत्त्वाची भमि
ू का बजावली आहे .
या समित्यांचे काम कसे चालते?

मोहल्ला समित्या संबंधित पोलिस स्टे शन स्तरावर नियमितपणे काम करतात. लोकांचे दै नंदिन जीवन सध ु ारावे या
उद्दे शाने समितीच्या महिन्यातन ू दोन वेळा बैठका होतात. विविध उपक्रम सरूु होतात, जसे की लायब्ररी उभारणे आणि
फिल्म शो करणे, खाद्यपदार्थांचे सामद ु ायिक स्टॉल्स उभारणे, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करणे आणि अर्थातच, ईद आणि दिवाळीसारखे सण साजरे करणे इत्यादी. या समित्या
आंतर-धर्मिय प्रार्थनांचे आयोजन करतात, त्यांच्या कार्यातन ू शांतता आणि सौहार्दाच्या कल्पनांचा परु स्कार करतात, सर्व
समद ु ायांच्या विविध गटांमध्ये संवाद सेतनू उभारण्याचे काम करतात, महिलांच्या सक्रीयतेला पाठबळ दे तात, शांततेसाठी
क्रिकेट आणि अन्य खेळांचे सामने सर्व समद ु ायांना सहभागी करून आयोजित करतात, तसेच शाळा सट ु लेल्या मल ु ांसाठी
अभ्यास वर्ग भरवतात.

प्रामख्
ु याने, मोहल्ला समित्या पढ
ु ील मद्
ु द्यांवर भर दे ऊन काम करतात; (अ) परिसरातील पोलिसांच्या कामाशी संबंधित
तक्रारी; (ब) आरोग्य, पाण्याची उपलब्धता, पर्यावरण आणि कचरा विल्हे वाट यांसारख्या नागरी समस्या; (क) मल
ु े आणि
तरुणांसाठी शैक्षणिक सवि ु धा; (ड) एकत्रित सण साजरे करणे व यांसारखे जातीय सलोखा वाढवणारे उपक्रम. मात्र, या
समित्यांच्या नियमित कामकाजाचा एकसारखा असा पॅटर्न नाही आहे . प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी भिडतात व भावतात
आणि त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या आहे त.

काही उदाहरणे,

• माहिममध्ये दं गलींचा मल
ु ांवर होणारा परिणाम हा नागरिकांच्या चिंतच
े ा विषय होता.

• डीएन नगर येथे समितीच्या सदस्यांनी वस्तीतील नागरिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरासारख्या
उपक्रमांचे आयोजन केले.

• नागरिक आणि पोलिसांचे क्रिकेट सामने आयोजित केल्यामळ ु े या दोन्ही समद


ु ायांचे परस्परांतील तणाव कमी झाले
(क्रिकेट फॉर पीसमध्ये ३२ टीमनी भाग घेतला व हा उपक्रम आत दरवर्षी आयोजित होतो).

• काही वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारण्यात आल्या.

आत्ताच्या काळाला अनस ु रून आपल्याला लायब्ररी सरू ु करणे, चित्रपट दाखवणे, सांस्कृतिक उत्सव साजरे करणे,
अभ्यास/चर्चा गटांची सरु
ु वात करणे, तणाव दरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेणे, असे कार्यक्रम घेता येतील.
मर्ती
ू विटं बनाच्या अफवा पसरल्या तर त्याही याप्रकारे आटोक्यात आणले जाऊ शकते.

मोहल्ला समित्या सक्रिय असणे महत्त्वाचे आहे . नागरिकांच्या भल्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी भरीव काम व्हायचे
असेल तर सतर्क नागरिकांचा सहभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांची प्रामाणिक बांधिलकी असणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे .

दे खरे ख करण्याची गरज

तसेच, आपल्याला हे दे खील लक्षात ठे वले पाहिले की कालांतराने जेव्हा उच्च पोलिस अधिकाऱ्यांनी अवाजवी हस्तक्षेप केला
व राजकीय नेत्यांना आणले त्याचे प्रतिकूल परिणाम मोहल्ला समित्यांच्या कामावर झाले. लोकशाही दे शाचे आणि विविध
समदु ायांना सामावणाऱ्या प्रदे शाचे नागरिक या नात्याने आपल्याला जर जीवन समजन ू घ्यायचे असेल तर जमिनीला कान
लावनू ऐकणे, लोकांच्यात मिळूनमिसळून राहणे आणि विविध समद ु ायांना परस्परांचे ऐकून घेण्यासाठी प्रवत्त
ृ करणे
अत्यंत महत्त्वाचे आहे .
संवादासाठी सरु
ु वात केली पाहिजे आणि सर्वांना मान्य अशा मद्
ु द्यांवर संवाद केला पाहिजे.

आज, २०२२ मध्ये, मोहल्ला समित्या असण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे . विविध जनसमद
ु ायातील नागरिकांचा
सहभाग असणे, कामकाज पारदर्शक असणे, प्रभावी समन्वय राखणे या गोष्टी आव्हानात्मक असल्या तरी महत्त्वाच्या
आहे त.

आपण आज सामहि
ू कपणे अशा समित्या प्रत्यक्षात आणू शकतो का?

मोहल्ला समित्या तयार करण्यात पढ


ु ाकार घेणाऱ्यांचे काही अनभ
ु व

“जेव्हा रामलाल आणि अब्दल् ु ला [नावे प्रातिनिधीक] या सभांमध्ये एकत्र येऊन बसू लागले, तेव्हा दस ु ऱ्याच्या
समाजाबद्दल त्यांच्या मनात असलेले पर्व ू ग्रह कमी होऊ लागले. कालांतराने दोघांची मैत्री झाली. रामलालला समजले की
धर्मांध प्रचार करणारे सांगतात त्याप्रमाणे अब्दल् ु लाला पाच बायका अन ् आठ मल ु ं नाही आहे त. तर त्यालाही
माझ्यासारखीच एक पत्नी आणि तीन मल ु े आहे त. रामलालप्रमाणेच अब्दल्
ु लाही स्वतःचे घर, आपला मोहल्ला अन ् भिवंडी
कशी सध ु ारायची याचा विचार करायचा, त्याने कधीच पाकिस्तानचा विचार केला नाही. तसंच अब्दल् ु लालाही जाणवलं की
रामलालला भारतातन ू इस्लामचा नायनाट करायचा नाही आहे . त्याच्याही दै नंदिन चिंता नियमित पाणीपरु वठा, वीज
आणि दै नंदिन बिले भागवणे याच आहे त... अधिक महत्त्वाचे, मोहल्ल्यातील विविध जात, धर्म, समद ु ायांचा भाग असलेले
अनेकजण हे ड कॉन्स्टे बलचे मित्र झाले. ज्यामळ ु े स्थानिक पोलिसांमधील गुप्तचर यंत्रणा मजबत ू झाली. स्थानिक
परिसरात त्रास दे णारे , गडबड करणारे असे कोणी दं गेखोर असतील तर त्यांची माहिती समितीचे सदस्य मोहल्ला
कमिटीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या पोलिस प्रतिनिधीला नियमितपणे दे ऊ लागले.”

(मोहल्ला कमिटी चे प्रणेते सरु े श खोपडे (माजी IPS), पोलीस उपायक्


ु त (DCP), भिवंडी 1988 मध्ये आणि त्यानंतर
अतिरिक्त पोलीस आयक्ु त (2009 मध्ये उत्तर)

“संकटाच्या वा आणीबाणीच्या सर्वांच्या विश्वासाला पात्र असेल अशा कोणाही तटस्थ व्यक्तीला विविध पक्षांमध्ये संवाद
घडवण्यासाठी मध्यस्थाची भमि
ू का निभावता येऊ शकते. जोवर लोक परस्परांशी बोलताहे त, तोवर ते रस्त्यावर उतरून
हिंसाचार करणार नाहीत. तसंच या संवादामळ ु े नंतर इतर समस्यांचे निराकरण करायलाही मदत होऊ शकते.”

(सश
ु ोभा बर्वे, बॉम्बे मोहल्ला कमिटी ट्रस्ट, अनिल सिंग यांना सांगितले, टाइम्स ऑफ इंडिया, 31 मे 1996)

“ जर दोन्ही समद ु ायातील तरुण एकत्र येऊन खेळले, तर क्रिकेटसारखा खेळ दोन समद
ु ायांमधील संघर्षाचे कारण
होण्याऐवजी त्यांना जवळ आणायचे कारण बनू शकतो." (सश ु ोभा बर्वे)

You might also like