You are on page 1of 3

मा.श्री.

नामदे वराव ढाके

पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना कोणत्याही समस्येवर मात करायची असेल तर सर्वप्रथम समोर येतं ते
एक आश्वासक नाव म्हणजे माननीय श्री नामदे वराव ढाके. सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेले,
जनसामान्यांशी सहजसल
ु भ नातं जपणारे नामदे वराव जमिनीशी नाळ टिकवन
ू आहे त.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन कौशल्याच्या जोरावर 1993 साली चिंचवड येथील टाटा मोटर्स
कंपनीत त्यांनी नोकरीस रुजू होत त्यांनी चिंचवडला आपली कर्मभम
ू ी मानलं. कामगार यनि
ु यनच्या
माध्यमातून पुढाकार घेत अनेकांना न्याय हक्क मिळवून दिला.

शालेय जीवनापासूनच सामाजिक काम करण्याची आवड असल्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात संधी मिळाली. संघटनात्मक कार्य करताना भारतीय जनता पक्षाच्या
पिंपरी चिंचवड शहर - जिल्हा सरचिटणीस पदाची धुरा उत्तम रित्या सांभाळली. जनतेसोबत असलेल्या
सुसंवादाच्या जोरावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधून संपूर्ण
पॅनल निवडून आणण्याचा पराक्रम त्यांनी केला.

नगरसेवक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या प्रभागातील आणि त्यासह पिंपरी चिंचवड शहरातील
नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. समस्या घेवन
ू आलेली व्यक्ती समस्यांचे निराकरण
झाल्याशिवाय परत जाणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. त्यांच्या कामाची वेगवान पद्धत पाहता
पक्षश्रेष्ठींनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सभागह
ृ नेते पदाची जबाबदारी ढाके यांच्यावर सोपवली.

कोरोना संकटाच्या काळात माणसांचे जीव वाचवण्यासाठी अनेक यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत होत्या
तर काही ठिकाणी औषधांचा काळ्याबाजार! अशा कठीण काळात खऱ्या अर्थाने दे वदत
ू ासारखे अडचणीला
उभे राहणारे थोडेच. नामदे वराव ढाके यांनी कोरोना रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, ऑक्सिजन परु वठा
सरु ळीत व्हावा, यासाठी शासनाकडे वारं वार पाठपरु ावा केला. लॉकडाऊन काळात शहरात अडकलेल्या
नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रवासी पास उपलब्ध करून दे त त्यांना घराकडे जाण्याचा मार्ग
सुकर केला. सामाजिक भान राखत, परजिल्ह्यातील लोकांना गावी जाण्यासाठी स्वखर्चाने बसेस उपलब्ध
करून दिल्या. या गंभीर काळात दररोज हजार - आठशे लोकांसाठी जेवणाचे डबे परु वले. कोरोना काळात
बेरोजगार झालेल्या अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. जनकल्याणासाठी कायम कार्यतत्पर अशा
स्वभावामुळे नागरिकांना नामदे वराव जवळचे वाटतात.

त्यांच्या या कामगिरीबाबत दे श आणि राज्य पातळीवरील नेत्यांनीही त्यांचे कौतुक केले. पुणे महानगर
विकास प्राधिकरणाच्या कार्यकारिणीत सभासद पदासाठी पक्षाकडून त्यांना संधी दे ण्यात आली.
२०१७ पासून आजवरच्या आपल्या कारकिर्दीत श्री नामदे वराव ढाके यांनी विकास कामांचा आलेख उं चावतच
नेला..

विधवांना महापालिकेकडून दहा हजारांची मदत केली जात होती. ढाके यांच्या प्रयत्नांमुळे आता ही मदत
वाढवन
ू २५ हजार करण्यात आली आहे .

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना १०० टक्के शास्ती कर माफी, पाचशे स्क्वेअरफुट पर्यंतच्या
घरांना मिळकत कर माफीचा ठराव करून शासनाकडे पाठिवला.

वाल्हे करवाडी परिसरात सवर्सामान्य मल


ु ांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी सम
ु ारे १२ कोटी रुपयांचा
निधी मंजूर झाला असून महापालिकेची मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांची शाळा उभारली जात
आहे .

प्रभागातील उद्यानांचे सुशोभीकरण केले. प्रभागात व्यायामाच्या अद्ययावत सोयी सुविधा असलेले
सुशोभित उद्यान आणि क्रीडाप्रेमींसाठी दर्जेदार मैदान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे .

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अठरा कोटींचा निधी खर्च करून बिपीन रावत अंडरपासची निर्मिती
केली. त्यामुळे बिजलीनगरकडून आकुर्डी कडे जाणारा रस्ता आता सिग्नल फ्री झाला आहे . तसेच या
भागातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे सम
ु ारे १४ कोटी रुपये खर्चून काँक्रीटीकरण केले आहे . बिजलीनगर आणि
वाल्हे कर वाडीत एक किलोमीटर लांबीचा सिमें टचा रस्ता तयार केला. तसेच अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण
आणि ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण केले.

भोसरीतून येणारा प्राधिकरणाचा स्पाईन रस्ता वाल्हे कर वाडीतील चिंचवडे चौकातून पुढे पवना नदीवरून
पूलाद्वारे डांगेचौकात नेण्यासाठी ढाके यांचा पाठपुरावा सुरू आहे . चिंचवडेनगर ते डी वाय पाटील कॉलेज हा
२४ मीटर रूंदीचा रस्ता शासनाकडून ५७ A नुसार करून घेण्याचे नियोजन आहे .

पक्षनेता म्हणन
ू निवड झाल्यानंतर नामदे वराव ढाके यांनी विकासकामांचा धडाका लावला. स्वच्छतेचा इंदोर
पॅटर्न प्रभागात राबवित कचराकंु डी मुक्त वॉर्ड ही संकल्पना त्यांनी सत्यात उतरिवली.

आपल्या प्रभागातील अधिकाधिक तरुण शासकीय सेवांमध्ये रूजू व्हावेत यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी
करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका तसेच कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र
निर्माण करण्याचा ढाके यांचा मानस आहे .

प्रभागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दे ण्यासाठी कटिबद्ध असून महानगरपालिकेचे
अधिक क्षमतेचे रुग्णालय उभारण्यासाठी श्री ढाके प्रयत्नशील आहे त.
प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे . परिसरात सुसज्ज
भाजी मंडई तसेच हॉकर्स झोन ची निर्मितीही करण्यात येणार आहे .

आपल्या प्रभागाच्याच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारा आपला
जनहितदक्ष नेता माननीय नगरसेवक श्री नामदे वराव ढाके यांचं कार्य येणाऱ्या काळात उल्लेखनीय ठरे ल
यात शंका नाही.

You might also like