You are on page 1of 1

धीरज ड्रीम्स काॅम्प्लेक्स आणि आम नागरीक, 

भांडुप स्टे शन (पश्चिम)


भांडुप, मंब
ु ई-४०००७८.
दिनांक २०मार्च २०२३.

प्रति,
मा. मख्
ु य मंत्री, महाराष्ट्र राज्य, 
श्रीमान एकनाथजी शिदं े साहे ब, 
मंत्रालय भवन, 
मुंबई  ४०००२३.

विषय: फेरीवाल्यांच्या त्रासापासून सुटका करण्याबाबत.


महोदय,
भांडुप स्टे शन पश्चिम ते एल.बी.एस. मार्ग मुलुंड, विक्रोळी कडे जाणारे दोन्ही बाजुचे रस्ते हे भाजीवाले,फळविक्रेते, फेरीवाले, पाणी पूरी, भेळपुरी
यांच्या गाड्या व फुटकळ व्यापारी  यांनी व्यापलेले आहे त. गर्दीच्या वेळी बेस्ट, रिक्षा व अन्य वाहने यांच्या भाऊगर्दीत भाजीवाल्या विक्रेत्यांची
अडचण, यातून मार्ग काढत चालणे हे प्रवाशांसाठी एक दिव्यच असते. त्यातच मेट्रो च्या कामामुळे वाहनांची कोंडी आणि त्यामधे सामान्य
पादचाऱ्यांची छळवणक
ू होत आहे .कितीकदा भाजीच्या गाड्याच्या कोपर्‍यावर आमच्यापैकी कित्येक महिलांचे कपडे अडकून फाटत आहे त.
स्टे शन रोडवरील कोंडी लक्षांत घेऊन भाजीवाल्यांसाठी पदपथालगत गाळे बांधून दे ण्यात आलेले आहे त. हे गाळे त्या भाजीवाल्यांनी कापड विक्रेते
आणि अन्य व्यापारी  यांना भाड्याने दिलेले आहे त व आपण पुन्हा रस्त्यावर भाजी  विक्री सुरू ठे वलेली  आहे . या व्यापाऱ्यांना  महापालिकेने
स्वतंत्र इमारतींमध्ये गाळे दिलेले आहे त. तरिही हे   फेरीवाले/भाजीवाले रस्यावरच आहे त. कारण या व्यापाऱ्यांना स्थानिक राजकीय आश्रयस्थान
मिळालेले असावे.
आम्ही  भांडुप मधील  रहिवाशांकडून महापालिका प्रशासन, भांडुप पोलीस  व अन्य  शासकीय यंत्रणेतील व्यवस्थेत अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला 
आहे .परं तु याबाबत आजतागायत कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.  ही  समस्या  फक्त  भांडुप मधील  आहे   असे नव्हे . शहरातील
सर्वच ठिकाणी हे च चित्र  दिसत आहे . पादचारी  खिजगणतीत नसल्याप्रमाणे  व्यवहार केले जात आहे त. जिथे जिथे रस्त्यावर वाहनांची कोंडी आहे
तिथे बाईक पदपथावर चालवल्या जातात. अनावश्यक हाॅर्नचा कर्क श्श आवाज,  त्यामुळेच पादचायांना पदपथावर चालणे दे खील अशक्यप्राय होत
आहे . काही ठिकाणी चारचाकी वाहनेही पदपथावर उभी केलेली  असतात.  एस वार्ड भांडुप यांच्या कार्यालयाशेजारी असे दृश्य कित्येक वेळा दिसते.
यामुळेच जेष्ठ नागरिक प्रचंड मानसिक तणाव  सहन करत आहे त. 
हे सगळे च त्रास सहन करत सर्वसामान्य नागरिक जगत आहे त. या साऱ्या बाबत आम्ही वेळोवेळी महानगर पालिका व अन्य शासकीय यंत्रणा
यांना पत्र व्यवहाराद्वारे दाद मागितलेली आहे . परं तु  या व्यवस्थेबाबत कोणतीही यंत्रणा गंभीर पणे विचार करत नाही.  पोलीस स्टे शन मधे  तक्रार
ही स्विकारली  जात नाही. त्यामळ
ु े च आता सामान्य  नागरिकांना कोणी वाली आहे का, असे नैराष्य आलेले आहे .
आणि म्हणूनच सर्व  प्रयत्न करून  थकल्यावर   आता शेवटचा पर्याय म्हणून  आपणांस  कळकळीची विनंती  करीत आहोत. आपण  व्यक्तिगत
लक्ष घालून  नागरिकांच्या न्याय हक्काचे रक्षण करण्याच्या उद्देशाने सर्व पदपथ फेरीवाले मुक्त करण्याची मोहीम सुरू करावी. आपल्या
सकारात्मक धोरणी  वत्ृ तीमुळेच आपणांस  ही विनंती  करण्यात येत आहे .
ु े जाऊन खूप मोठे जन आंदोलन किंवा जनहित
आमची  खात्री  आहे की  आपण या समस्येबाबत निश्चित कार्यवाही कराल आणि ही समस्या पढ
पाहण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत पडणार नाही  याची दखल घ्याल.
आपले नम्र,

You might also like