You are on page 1of 167

आजच्या विश्वाचे आर्त

दीपक करंजीकर

शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर


आयुष्यात आलेल्या त्या हेतुशून्य,
निर्विष आणि निखळ आनंदक्षणांना ज्यामुळे आजच्या
विश्वाच्या आर्ततेला सामोरे जायची उमेद मिळत राहील.

मनोगत / तिसऱ्या आवृत्तीच्या निमत्तिाने

एकविसाव्या शतकातील पहिले दशक आता उलटून गेले आहे. सर्वभक्षक काळ
जसा झपाझप पुढे जातो आहे त्याबरोबर आपले जीवनमानही झपाट्याने बदलते
आहे. व्यक्ती-समष्टी संबंध, समाजाची व्यवस्था, व्यवहार आणि व्यवच्छेदक लक्षणे ही
एखाद्या वेगवान चित्रपटासारखी सरकत आहेत. या आंधळ्या गतीत बऱ्याच गोष्टी
कालबाह्य होत आहेत, महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक गोष्टींना काहीच महत्त्व उरलेले
नाही, तसेच आता असलेल्या काही गोष्टींशिवाय आपले चालणार नाही असेही झाले
आहे.
खरे तर हे त्या आदी अनंत अशा काळाचे काही विशिष्ट तुकडे आहेत ज्यावर
आपण जगत राहतो. अंतराळाच्या सारीपाटावर हे गाडे नगण्य असले तरी
आपल्यापुरते हेच विश्व आहे. जे सतत बदलते आहे. त्यामुळे ह्या रोज बदलणाऱ्या
विश्वाचे परिणाम अर्थातच आपल्या अस्तित्वावर, जगण्याच्या पद्धतीवर होणे
अपरिहार्य आहे. सध्याच्या विश्वाचे हे मानवनिर्मित प्रश्न कोणते आहेत, त्यांचे देश, धर्म,
भाषा, प्रांत, रंग, लिंग यांना पुरून उरणाऱ्या मानवी आयुष्यावर होणारे दूरगामी
परिणाम काय याचा मागोवा घेणारे हे प्रांजळ चिंतन.
साधारण सव्वाआठशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी विश्वाचे आर्त माझ्या मनी
प्रकाशले' असे म्हटले होते. ती प्रज्ञा, ते अनुभूतीचे समष्टी रूप आपल्याजवळ नसले
तरी आपण आपल्या पातळीवर या झपाट्याचा आणि त्याने निर्माण के लेल्या आपल्या
विश्वाच्या आर्ततेचा किमान दूरवरून वेध घेऊ शकतो. त्याची ही सोपी मांडणी.
- दीपक करंजीकर

प्रस्तावना

दीपक करंजीकर यांचा प्रस्तुत ग्रंथ हा आपल्या जिव्हाळ्याच्या आणि आपल्याला


भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या मांडणीचा, त्यांची उकल करण्याच्या प्रयत्नांचा फार महत्त्वाचा
ऐवज आहे.
आज आपल्या जगण्याने, त्यातील वेग आणि फरफट यांनी आपण इतके भांबावून
गेलेलो आहोत की या प्रश्नांचा विचार तर सोडाच, एकू ण विचार करण्याची इच्छाच
आपण हरवत चाललो आहोत, ती गमावून बसण्याच्या धोक्याच्या अगदी निकट आहोत.
खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (याला मराठीत अनेकांनी खाउजा असे
एकत्रितपणे म्हटले आहे. ते अन्वर्थकच आहे.) या गोष्टी विनाअट लादून घेणे १९९१ च्या
सुमाराला आपल्या देशाला अपरिहार्य झाले. सोबतीने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय
नाणेनिधी यांचे जाचक निबंध पाळणेसुद्धा. ती शासनाच्या कल्याणकारी असण्याच्या
रोलच्या अंताची सुरुवात. शासनाच्या पकडीतून बव्हंशी साऱ्या गोष्टी काढायच्या आणि
त्या खाजगी धंद्यांसाठी खुल्या करायच्या म्हटल्यावर शासन दुबळे होणारच आणि ते
बहुराष्ट्रीय कं पन्यांच्या तालावर नाचणार हे सरळच आहे. याला निगुंतवणुकीकरण असे
गोंडस नाव देण्यात आलेले आहे. असे नाव देणे हे सरकारच्या जबाबदारीची किती
प्रच्छन्न थट्टा करणारे आहे!तुम्ही फक्त पैश्याची गुंतवणूक नुसती काढत नाही आहात,
तुम्ही जबाबदारीतूनसुद्धा स्वतःला मोकळे करत आहात, आपले अधिकार खाजगी
कं पन्यांच्या हाती सुपूर्द करत आहात. या कं पन्या फक्त नफा, अनिबंध नफा एवढेच तत्त्व
जाणतात. त्यासाठी त्या कोणत्याही पातळीला जाऊ शकतात. ते सारे रस्ते त्यांच्यासाठी
खुले असणे या खुल्या बाजाराच्या आणि धश्चोट न्यायाच्या रचनेत वैध मानले जाते.
त्यामुळे दुनियेतले सारे गरीब देश आणि तिथली सरकारे यापुढे अशा कं पन्यांच्या तालावर
नाचत राहणार हे सरळच आहे. या कं पन्या बव्हंशी अतिश्रीमंत पाश्चात्य देशातल्या आणि
अमेरिके ची संयुक्त संस्थाने नामक देशातल्या आहेत.तिथल्या सरकारांवर या कं पन्यांचा
प्रभाव असतो. ती सरकारे या कं पन्यांना सोयीस्कर होईल अशा रीतीने निर्णय घेत
असतात. भारताचा अर्थमंत्री कोण असावा ही फक्त भारताच्या पंतप्रधानाने ठरवायची
बाब आता उरलेली नाहीय. वर्षभराआधीपर्यंत मनमोहनसिंग हे अमेरिकन सरकार आणि
प्रसार-माध्यमे यात एक विद्वान आणि आदरणीय नेते म्हणन ओळखले जात होते. सध्या
त्याच्या अगदी उलट टोकाची त्यांची ओळख तिकडे तयार झालेली दिसते. किरकोळ
विक्री क्षेत्रात धंदा करणाऱ्या महाकाय कं पन्यांना इथे शिरकाव करू देण्यात ते अपयशी
ठरले, म्हणून असे झाले काय हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. (मी माझ्या व्यक्तिगत
संगणकावर हे लिहिले आणि त्यानंतर अर्ध्या तासात दि. १२-९-२०१२ संध्या. ६-००
वाजता बातमी ऐकली की मनमोहनसिंग सरकारने आपल्या म्हणजे कें द्र सरकारच्या
पातळीवर किरकोळ विक्री क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस मान्यता दिली आहे. पुढचे निर्णय
त्या त्या राज्य सरकारांनी घ्यावेत असे जाहीर झाले आहे. देशांतर्गत विमान-वाहतुकीतही
विदेशी कं पन्यांना धंदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे सारे कसे होते आणि
त्यापाठी कोणत्या आणि कशा प्रकारच्या प्रेरणा कार्यरत असतात हे लक्षात यावे.
अमेरिका काय म्हणते याचे महत्व यावरून सहज लक्षात यावे. आता लगेच नव्हे, पण
सवडीने मनमोहनसिंग यांचा गौरवात्मव उल्लेख अमेरिका करीलच. किंवा ते त्या
वृत्तपत्राचे मत होते, आम्हाला डॉ. मनमोहनसिंग यांच्याबद्दल आदरच आहे असे सरकारी
पातळीवर नक्कीच सांगितले जाईल.)
अशा प्रकारे किंवा एकु णातच विचार करण्याचा ताप आपण घेऊ नये अशी एक
जीवन-प्रणाली प्रस्थापित करणे हा या कं पन्यांच्या कार्यपद्धतीतला एक पवित्रा असतो.
सत्य काय आहे ते ठरवणे आणि ते आपल्यापर्यंत पोहचवणे याचा भार उचलण्यासाठी
कं पन्या आणि बड्या देशातील सरकारे तत्पर असतात. ते सांगतात तेच खरे आहे या
प्रकारे आपल्या मनाची घडण व्हावी याची काळजीसुद्धा ते घेतात. आपण कशा प्रकारे
जगावे, कोणत्या रीतीने विचार करावा, किती करावा किंवा करू नये हेही ते ठरवतात. ही
एक वेगळी जीवनपद्धती एकदा आपण स्वीकारली/लादून घेतली की ती व्यक्ती म्हणून
आपल्या जगण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम करतेच.
पीडित, गरीब कष्टकरी यांच्याविषयीची कणव आणि आस्था आज आपल्या
मध्यमवर्गाने सांडून टाकली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या सगळ्या क्रयवस्तू.
आपले माणूस असणेच मुळात क्रयवस्तू. गरिबी, रोगराई या नष्ट करण्याच्या नव्हे तर
प्रचंड नफा कमावण्याच्या बाबी. देश, त्याचा भूगोल, इतिहास, तिथल्या माणसांच्या
गरजा असा सुटा विचार नाही करायचा. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या
देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम असणे कें व्हाही सोयीचे. रस्ते अधिक
चांगले असणे अत्यावश्यक. पण मग मोटारी तयार करणाऱ्या महाकाय कं पन्यांनी धंदा
कसा करायचा? तो त्यांना करता यावा याची जबाबदारी भारत सरकारनेच उचलली
पाहिजे ना!आज आपले सरकार ती सक्षमपणे उचलताना उगीच का दिसते? पेट्रोल,
डीझेल आपल्या देशात फारच कमी आहे. नो प्रॉब्लेम!ते काय आयातही करता येते.
सरकार ते करते . तिथेही कं पन्यांचे हित हाच मुद्दा असतो. तो व्यवस्थित सांभाळला
जातो. न सांभाळले तर सरकार डगमगते. तसे होऊन कसे चालेल? रस्ते चांगले हवेत.
महानगरे जोडणारे रस्ते खाजगी ठे के दार तयार करून देतात. त्याचा परतावा ते अव्वाच्या
सव्वाच नव्हे तर दीर्घकाळ कै क पटीने मलीद्यासारखा खात राहतात हा भाग वेगळा.
सत्ताधारी आणि विरोधक अशा सगळ्या राजकारणी लोकांना सांभाळूनच तर ते तसे
करतात. मग तक्रारीला जागा कु ठे राहिली?
दीपक करंजीकर यांनी आपल्या आस्थेच्या टप्प्यातून सटकलेले आणि वस्तुतः
आपल्या साठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे आणि यापेक्षा महत्त्वाचे आणखी किती तरी
प्रश्न जागतिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर किंवा तिच्या उजेडात मांडले आहेत. त्यांची
मांडणी अभ्यासपूर्ण तर आहेच. शिवाय काळजी, कळकळ, तळमळ आणि मानवी
प्रजातीविषयीची प्रगाढ आस्था तिच्यापाठी आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्यात एक
जोरकस, काही ठिकाणी संतापाचासुद्धा, स्वर आहे. ते अधिकृ त आकडेवारी देतात
आणि ठोस विधान करतात, नंतरच भाष्य करतात. एका बुद्धिमान, अस्वस्थ, अभ्यासू
आणि संवेदनाक्षम मनाचे हे आर्त आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचावे अशी तळमळ आणि
तगमग त्यात आहे. सगळ्या प्रकारच्या लालसा जिथे असाधारण असभ्य अमानुष
पातळीवर पोहोचल्या आहेत, अशा तथाकथित प्रगत(!) श्रीमंत देशांच्या दुनियेत
दीर्घकाळ राहून, तिथले जीवन डोळसपणे न्याहाळून आणि अभ्यासून त्यांनी आपली
मांडणी के लेली आहे.
लोकमत या दैनिकात सदर-लेखन करून त्याचा हा ग्रंथ त्यांनी सिद्ध के लेला आहे
हे आणखी विशेष. पेपरात सदर चालवून त्याचा ग्रंथ करायचा अशी रीत आपल्याकडे
पुष्कळच रूढ आहे. बहुदा अशा पुस्तकाला ग्रंथ म्हणून आकार येत नाही. कारण
त्यातील लेखांचा परस्परांशी संबंध पुष्कळदा मोठ्या मुश्किलीने जोडावा लागतो,
अनेकदा तसे करताही येत नाही. करंजीकर यांच्या या ग्रंथाचे तसे झालेले नाही. क्वचित
काही ठिकाणी काही मुद्दे आणि तपशील रिपीट झाले आहेत, पण त्या त्या ठिकाणच्या
विधानासाठी आवश्यक म्हणूनच ते आलेले आहेत.
मुख्य म्हणजे साऱ्या जगण्याचेच बाजारीकरण झालेल्या आजच्या दुनियेत माणूस
म्हणून आपण काय काय गमावत आहोत, काय गमावणार आहोत, पुढच्या पिढ्यांसाठी
आपण कोणता वारसा ठे वून जाणार आहोत आणि आजच्या वर्तमानातून भविष्यात
कोणत्या शक्यता उभ्या राहू शकतात , मानवी प्रजातीचे काय होऊ शकते याची ठोस
मांडणी त्यांनी इथे के लेली आहे. आजच्या आपल्या जगण्याच्या वास्तवाचे विविध
आयाम प्रकट करून जागतिकीकरणाचे संकु चितपण या तुलनेने जरा मोठ्या लेखात
आपले एकात्म भाष्य के ले आहे. हा ग्रंथ आहे. लेख-संग्रह नव्हे, असे जे मी म्हणतो ते
यामुळे - करंजीकर यांनी दिलेले आकडे वाचताना आपण खुपदा थक्क होतो. जगातला
अमली पदार्थांवरचा खर्च वार्षिक २० लाख कोटी रुपये तर त्याच्या फक्त १०%मध्ये
म्हणजे ५४ लाख कोटी रुपयात जगातल्या सर्व माणसांना शिक्षण, पिण्यायोग्य पाणी,
मलनिस्सारणाची सोय आरोग्य आणि पोषक आहार दरवर्षी पुरवता येईल. एक किलो
मांस (बीफ ) तयार करण्यासाठी ५४ किलो धान्य आणि सरासरी ९०,००० हजार लिटर
पाणी लागते. एक किलो चिकनसाठी ६ किलो धान्य आणि ५,००० लिटर पाणी लागते.
या तुलनेत १ किलो सोयाबीन साठी २,००० लि., तांदळासाठी १,९०० लि., गव्हासाठी
९०० लि., तर बटाट्यासाठी ५०० लि. पाणी लागते. जगात तयार होणाऱ्या अन्नापैकी
३०% अन्न वाया जाते. भारतीय माणूस वर्षाला सरासरी साडेतीन किलो मांस खातो तर
चिनी माणूस ५६ किलो, आणि अमेरिकन १०५ किलो. जगातल्या शस्त्र-अस्त्रांची
अर्थव्यवस्था १२० लाख कोटी इतक्या प्रचंड आकाराची आहे. युनोतल्या सुरक्षा
समितीचे कायम सदस्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रांस, ब्रिटन यांची जगातील शस्त्रांच्या
व्यापारावर पूर्ण मक्तेदारी आहे. जगातली औषधांची बाजारपेठ ५० लाख कोटी
रुपयांच्या वर पोहोचलेली आहे. ८०च्या दशकात इथिओपियात भीषण दुष्काळ
पडलेला असताना तो देश युरोपात हिरवे वाटाणे निर्यात करत होता. या प्रकारची
आकडेवारी आणि तपशील ग्रंथभर आहेत. ते सगळे इथे मांडणे शक्य नाही, त्याची
गरजही नाही. त्यासाठी हा ग्रंथ वाचणे अधिक योग्य आणि उपयुक्त. करंजीकर यांनी
के लेली काही विधाने आणि भाष्ये सुद्धा मासल्यादाखल दिली पाहिजेत. हे सगळे वाचत
असताना मी काहींच्या खाली खुणा करत पुढे जात होतो. नंतर मी तो नादच सोडला.
कारण पानेच्या पाने तशी येवू लागली. हे मी आधी उल्लेख के लेल्या जागतिकीकरणाचे
संकु चितपण या प्रकरणात अतोनात झाले.
काही विधाने/भाष्ये तरीही देतोच. नाका का.. म्हणजे जगाला जखमी
करण्यासाठी ७० लाख कोटी, ती जखम चिघळत ठे वण्यासाठी २० लाख कोटी आणि
त्यावर मलमपट्टीचा खर्च ५ लाख कोटी? हे विधान नुसतेच हास्यास्पद नाही; तर
लोकांना जगण्याची संधी नाकारणारे आहे. म्हणूनच अत्यंत विखारी आणि अमानवी
आहे. मा... एकाची व्याधी हेच दुसऱ्याचे विक्रीचे मुलतत्त्व असणे हे अनैतिक आहे.
अजिबात दुखण्याचा लवलेश नसताना के वळ भीतीपोटी ते निर्माण करून औषधे
विकणे म्हणजे तर अधिकच अधःपतन!
विकसनशील राष्ट्रांनी भ्रष्टाचाराला आळा घातला तरच त्यांना मदत के ली जाईलअशी
अट नेहमीच वर्ल्ड बँक , नाणेनिधी किंवा बड्या राष्ट्रांकडून घातली जाते. मात्र खरी
परिस्थिती अशी आहे की हेच देश काही युद्धखोर देशांना शस्त्रे विकताना भ्रष्ट्राचाराचा
बेमुर्वतखोरपणे अवलंब करतात. इतके च नाही तर तिथे हे विकणे शक्य व्हावे कोण मंत्री
अथवा अधिकारी नेमला जावा हेही पाहतात.
साऱ्या जगाचे यापुढे फक्त पाण्यावरून विभाजन अथवा एकत्रीकरण होत जाईल
अशी परिस्थिती येणार आहे.
आपण जे खातो ते कशाचा बळी देऊन आपल्यापर्यंत आले याचे एक भान असणे,
अन्नवंचिततेबाबत योग्य कृ तीने संवेदनशील असणे, लागेल तेवढेच शिजवावे, रोज ताजे
खावे, अन्न फे कू न देऊ नये, इतक्या साध्या वैयक्तिक गोष्टींनी आपण स्वतःच्या पातळीवर
अन्न-धान्य नासाडीला नक्कीच आळा घालू शकतो. मात्र सध्या जगाला दुर्धर साथींच्या
आजारांइतकाच किंबहुना त्याहून अधिक भयानक असा विळखा मोठ्या औषध
कं पन्यांच्या हव्यासाचा आणि दादागिरीचा पडलेला आहे. या सगळ्या कं पन्या रोगांशी
झगडण्याऐवजी त्या रोगाचे मार्के ट किती या धोरणाला प्राधान्य देतात.
.... एखाद्या देशात सारखे अनेक कायदे जन्माला यायला लागले तर समजावे तिथे
भ्रष्टाचाराची सॉलिड चलती आहे.
... भुके चे हव्यासात जसे अगदी सहजपणे रुपांतर होते तितक्याच नकळतपणे हा
हव्यास इतरांना त्यांच्या गरजा नाकारण्याच्या गुन्ह्यापर्यंत आपली वाटचाल करवतो.
मा... आत्मज्ञान आणि विज्ञान यांची अमूल्य अशी सांगड घालायचे काम जीवनमूल्ये
करतात. पण जेव्हा जीवनमूल्यांची यत्किंचितही कदर नसणारी, ती जोपासण्याची
जबाबदारी झटकणारी समाजव्यवस्था उभी राहते;तेव्हा मानवी आयुष्यासारख्या अमूल्य
गोष्टीचे एखाद्या विक्रीमूल्य असणाऱ्या वस्तूत रुपांतर होते.
... माणसाची तथाकथित प्रगती कशाचा बळी देऊन होते आहे याकडे दुर्लक्ष करणे
म्हणजे ज्याच्या आश्रयाने आपण राहात आहोत त्यालाच नष्ट करण्याचा मूर्खपणा आहे.
... अस्वस्थ करणारे मूलभूत सत्य असे की लोकशाही आणि मुक्त बाजार ही
परस्परपूरक तत्त्वे नाहीत. लोकशाही सरकारचे कर्तव्य हे मिळालेल्या जनादेशाचा वापर
करून समाजात तयार होणारी स्वयंघोषित सत्ताकें द्रे उध्वस्त करणे, मूठभर लोकांची
मक्तेदारी मोडीत काढणे असे आहे.
... ज्ञान आणि शहाणपण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहितीला ज्ञान समजणे हे
जितके अपरिपक्वतेचे लक्षण आहे, तितके च माहितीतून येणाऱ्या ज्ञानालाच शहाणपण
समजणे आपल्या विकासासाठी फार दुर्दैवी आहे.
करंजीकर यांनी आपल्या विक्राळ वास्तवाचा विराट चेहरा आपल्यासमोर फार
प्रभावीपणे उभा के ला आहे. त्यातून उपस्थित होऊ शकणारे प्रश्नही त्यांनी मांडले आहेत,
उत्तरांच्या दिशा सुचवल्या आहेत. एक प्रजाती म्हणून येणाऱ्या भविष्यात आपण त्या किती
गांभीर्याने घेऊ त्यावर आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य ठरणार आहे. एरव्ही शस्त्रास्त्रांची
विक्री करणाऱ्या विराट कं पन्या दहशतवादाला उत्तेजन मिळेल अशी भूमी तयार करत
राहतील, त्याचा बिमोड करण्यासाठी त्या त्या देशांना शस्त्रे पुरवतील, ते देश डोईजड
होताहेत असे बड्या देशांना वाटेल अशी परिस्थिती निर्माण करतील, किंवा तसा
बागुलबोवा त्यांना उभा करावा लागेल अशी भूमी तयार करतील. युद्धे होत राहणे ही
त्यांच्या मालाच्या खपाची गरज आहे, त्याला त्यांचा काय इलाज? या प्रकारात प्राचीन
संस्कृ ती उध्वस्त होतात, त्याला ते काय करणार? लाखोंनी माणसे मरतात, ते collateral
damage अनुषंगिक नुकसान, भले काही करताना ते सोसावेच लागते ना ! ४ अमेरिकन
माणसे मेली तर जगबुडी आणि युद्ध लादलेल्या देशातील निरपराध बालके , स्त्रिया
लाखांनी मेली तर ते collateral damage! लागावात
अन्न, औषधे, पाणी, खनिजे; सगळ्यांवर या दांडग्या देशांना ताबा हवा. त्यांच्या
कं पन्यांना ताबा हवा. कोणाला काय, कसे, किती, द्यायचे ते, ते ठरवतील. बाकीच्यांनी ते
निमुटपणे घ्यायचे. मृत्यू देऊ के ला तर तोही नाकारायचा अधिकार इतरांना नाही.
शहाणपण वगैरे भानगडींचा विचार कोणी करायचा नाही. जगण्यासाठी ते मुळी
आवश्यकच नाहीय. किंवा आवश्यक/अनावश्यक याचे निर्णय तेच घेतील. ज्ञान कशाला
म्हणायचे हे सुद्धा तेच सांगतील. जैविक संशोधनात गुंतवणूक असलेल्या बलाढ्य कं पन्या
आजच ते करताहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठांचा अभ्यासक्रम कसा असावा
इथपासून ते वैज्ञानिक सत्य म्हणून काय आणि कसे सांगावे याचा अंतिम अधिकार
कं पन्यांचा. आपल्याला हे आश्चर्यकारक वाटेल, पण हे वास्तव आहे. जगात जिथे जिथे
मौल्यवान खनिजे आहेत तिथे तिथे या राक्षसी कं पन्या ताबा घेणारच. कोलंबिया, होन्डुरास,
पेरू, बोलिव्हिया, आखाती देश, नायजेरिया व इतर आफ्रिकन देश या सारख्या अनेक
देशातील सोने, तांबे, खनिज तेले यांच्यावर यांचाच ताबा. हे सगळे देश त्यांनी अस्थिर,
युद्धमान आणि कं गाल करून टाकलेत त्यांनी.
आधी त्यांनी पथ्वीतन पिवळे सोने उपसले. मग काळे सोने म्हणजे खनिज तेल
आणि कोळसा इ. आता ते पांढरे सोने म्हणजे पाणी उपसत आहेत. या पृथ्वी नामक सुंदर
गृहाला त्यांनी कं गाल करून टाकले आहे. नैसर्गिक स्त्रोतांनी संपन्न असणाऱ्या देशातील
माणसांचे जगणे नरक-सदृष्य यातनांनी उध्वस्त करून टाकले आहे. (आखाती देशातील
काही थोडे अरब शेख त्यांच्या कृ पेने गडगंज आहेत. बाकी जनता कं गालच आहे. शेख
ठीक वागतील तोवर त्यांची संपत्ती यांच्याच तिजोऱ्यात सुरक्षित आहे. त्यांनी वेगळा विचार
के ला तर सद्दाम हुसेनचे, गद्दाफीचे काय झालेय हे त्यांच्या समोर आहे.) पृथ्वीच्या पोटात
पाणी साठण्यासाठी शेकडो वर्षे गेलीत. ते पाणी आता हे बेदिक्कत उपसत आहेत.
'नामुष्कीचे स्वगत' या माझ्या कादंबरीच्या सुरुवातीला मी एक निवेदन उधृत के ले
आहे. ते एका रेड इंडिअन माणसाने १८५१ साली गोऱ्या आक्रमकांना दिलेले आहे. सतीश
काळसेकर या माझ्या मित्राने त्याचा मराठी अनुवाद के लेला आहे. त्यातला एक अंश इथे
देण्याचा मोह मला आवरत नाही.
ही जमीन;जी त्याला आईसारखी आहे आणि हे आकाश;
जे त्याला पित्यासारखे आहे,
ते त्याला खरेदी करायच्या गोष्टी वाटतात.
त्या तुडवायच्या, विकायच्या वस्तू वाटतात.
शेळ्यामेंढ्यासारख्या वाटतात.
त्याची भूक सगळ्या पृथ्वीला गिळून टाके ल आणि त्यानंतर
मागे उरेल
वैराण वाळवंट.
विख्यात तत्वज्ञ युंग हा दक्षिण अमेरिके त फिरत असताना एक रेड इंडिअन इसम
सतत त्याच्या सोबत होता. त्यांच्यात उत्तम संवाद होत असे. एकदा हा रेड इंडिअन इसम
युंगला म्हणाला, या गोऱ्या अमेरिकन माणसांचे काही खरे नाही. त्यांना काही कळतच
नाही. मला त्यांची कीव येते. युंगला आश्चर्य वाटले. ज्या गोऱ्या अमेरिकनांनी आपली
ताकद, हिकमत, चलाखी यांचा जोरावर या इंडियन लोकांना पुरते नागवलेले आहे, त्यांची
याला कीव का वाटते? युंग म्हणाला, का बरे, तुला का असे वाटते? तो म्हणाला, हे लोक
फक्त डोक्याने विचार करतात. त्यामुळे त्यांची समज अपुरी राहते. आम्ही लोक हृदयाने
विचार करतो.
पृथ्वीवरल्या सगळ्या प्राचीन संस्कृ तीत हे हृदयाने विचार करणे होते. सजलेली
अवाढव्य भूक, अतोनात लालसा, बेमुर्वतखोर नासाडी यांच्या आदर्शाच्या आजच्या
जमान्यात ते अडगळीला गेले आहे. नफा आणि नागडा स्वार्थ यांच्या पोषणासाठी मानवी
मेंदूंची बुद्धिमत्ता वेठीला बांधली जात आहे. हृदयाने विचार करणे दुबळेपणाचे मानले
जात आहे. निसर्गात हस्तक्षेप के ल्याखेरीज मानवी जीवन प्राय: अशक्य आहे हे खरेच.
पण असा हस्तक्षेप कोमलपणे के ला जावा, निसर्गाला किमान हानी पोहोचेल असा तो
असावा असे गांधीजींचे म्हणणे होते. त्यातून निसर्गाला स्वत:ला सावरायची संधी मिळते.
आज विक्राळ कं पन्यांनी दुनियेचा ताबा घेऊन जो उपसा चालवला आहे तो अशा
विवेकाला न जुमानणारा आहे. निसर्गाचे जे रौद्र रूप अलीकडे आपल्याला
वारंवारअनुभवाला येते त्या पाठी हा धश्चोटपणाच आहे.
या साऱ्यात बळी जातात ती फक्त निरापराध माणसे. उद्या ही पृथ्वी माणसांच्या
जगण्यासाठी लायक उरली नाही तर त्यामुळे बड्यांचे काहीही बिघडणार नाही. ते तोवर
आणखी कु ठे तरी आपल्या निवासाचा बंदोबस्त करतील. आजच त्यांच्ने तसे प्रयत्न सुरु
झालेले आहेत. बाकी कं गालांना मृत्यू एवढाच पर्याय उपलब्ध. या पृथ्वीवरची आपण
सारी माणसे ही एक प्रजाती आहोत असा बंधुभावाचा विचार या बड्या शक्तींपासून
कोसो दूर गेलाय. काही शक्तिशाली माणसे हीच फक्त माणसे बाकी उरलेले फक्त
क्रयमूल्य असलेल्या वस्तू. ती माणसे, त्यांच्या भाषा , संस्कृ ती ह्या साऱ्यांना क्रयमूल्य
असेल तोवर जीवन. त्यांचा उपयोगच नसेल तर त्यांनी का जगावे? त्यांना तो अधिकारच
उरत नाही. रानाच्या कायद्यात जखमी किंवा म्हातारा झालेल्या श्वापदाला त्याचे सोयरे-
धायरे असलेली इतर श्वापदे मारून टाकतात. जो शिकार करू शकत नाही त्याला
खाण्यात फु कट हिस्सा नाही असा तो सरळ व्यवहार.
आपण माणसे आहोत, वेगळे आहोत, विचार करणारे आहोत. एक तीळ सात
जणांनी वाटून खावा अशी एक शिकवण आपल्यात पिढ्यान्पिढ्या रुजवली गेलेली आहे.
गुहेत राहणारा माणूस सुद्धा तिथून बाहेर पडताना काही अन तिथे ठे वत असे. नंतर कोणी
तिथे आला तर त्याला ते उपयोगी पडावे म्हणून. मानवी संस्कृ तीच्या त्या आदिम
काळापासून आपल्या प्रजातीने पुष्कळच प्रवास के लेला आहे. अनेक भरभराटीला
आलेल्या आणि अस्तंगत होताना सुद्धा आपल्या ज्ञान, विज्ञान, जाणतेपण यांचे संचित
जेत्यांना देणाऱ्या संस्कृ ती या भूतलावर नांदून गेलेल्या आहेत. नफा आणि असाधारण
हाव एवढी एकच गोष्ट जाणणाऱ्या या विराट बाजाराच्या दुनियेने बेदिक्कत सगळे गिळत
माणसांच्या जगण्यालाच बाजाराची अवकळा आणली आहे. जगभर एकाच प्रकारची
जीवनशैली, वैचारिक मूढता, सपाटीकरण, बाजाराला सोयीची अशी एकच भाषा
प्रस्थापित करत आपले सारे जगणे हेच एक मार्के ट करत आणले आहे. अनेक भाषा,
संस्कृ ती हे एक प्रजाती म्हणून आपले वैभव आहे. जगातल्या अनेक भाषा आणि संस्कृ ती
अस्तंगत होत जाण्याचा हा जमाना आहे. भाषा आणि संस्कृ ती जाते, तिच्या सोबत ज्ञान,
अनुभव, आकलन यांचे दीर्घ संचितही नाहीसे होते. असे होणे कोणत्याही काळात
परवडणारे नसते. आज तर ते अजिबातही तसे नाहीय.
त्या त्या देशातले सत्ताधारी ते ते देश चालवतात अशी आजवर आपली समजूत
होती. ते तितके से खरे नाहीय. बराक ओबामा अमेरिके चे अध्यक्ष झाले म्हणून त्या देशाचे
दुनियेचे आकलन बदलले किंवा धोरण बदलले असे झाले नाही. बड्या शस्त्रास्त्र कं पन्या,
मोटार उद्योग, तेल व इतर खनिजांच्या क्षेत्रातल्या कं पन्या आणि सगळ्यात महत्त्वाचे
म्हणजे सी. आय. ए ही गुप्तहेर-संस्था यांचा अमेरिकी धोरणावरील प्रभाव कशानेही
बदलत नाही. यांच्यापैकी कोणीही मानवी प्रजाती विषयी बंधुभाव, विश्व कल्याण , सत्य,
अहिंसा अशा गोष्टींची तमा बाळगणारे नाहीय. नफा, हकमत, ताकद अशाच गोष्टी ते
जाणतात. त्यासाठी क्रौर्याची कोणतीही पातळी गाठण्यात ते कसूर करत नाहीत.
माफिया, हुकु मशहा, लष्करशहा यांना हाताशी धरून कोणताही विध्वंस ते बेदिक्कत करू
शकतात. लोकशाहीचा जप करत ते लोकशाही मूल्यांची धडधडीत पायमल्ली करतात.
भीती आणि दहशत ही त्यांची अस्त्रे आहेत. मला तर असे वाटते कि जगातले हे प्रगत(!)
देश हेच आज सगळ्यात जास्त भेदरलेले आहेत. मला काय वाटते सोडा, ते भेदरलेले
आहेतच. आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. कारण ज्याला प्रगती म्हटले जाते ती मुळात
शोषण, पिळवणूक, लुबाडणूक यांच्यावरच आधारलेली असते. कोणाकडून तरी,
कोणत्या ना कोणत्या मार्गाने, काहीतरी ओरबाडल्याखेरीज कु णीही श्रीमंत होत नाही.
प्रगत देश ही ओरबाडणूक करतातच. असे सर्व प्रकारचे धन जपायचे तर त्यासाठी
संरक्षणाची यंत्रणा आवश्यक. सतत सावधगिरी आवश्यक. टेहेळणी आवश्यक. ते
लुटतात म्हणूनच ते भेदरलेले असतात. आणि भेकड माणसे सगळ्यात जास्त हिस्त्र
असतात. अहिसा हा निर्भय माणसाचा धर्म आहे असे गांधीजीनी उगीच म्हटलेले नाहीय.
खरे म्हणजे गांधीजींनी कोणतीच गोष्ट उगाचच सांगितलेली नाहीय. भारत हा
इतक्या इतक्या लाख स्वायत्त खेड्यांचा प्रजासत्ताक देश असावा/व्हावा असे त्यांनी
म्हटले होते. ते त्या वेळीही अनेकांना हास्यास्पद वाटले होते. आज तर त्यापासून आपण
फारच दूर गेलेलो आहोत. आपण आजही आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठे वल्या -
म्हणजे समाधानाने जगण्याइतक्या ठे वल्या-आपल्याला गरजेच्या गोष्टी आपल्या
आसपास मिळतील असे पाहिले किंवा त्यांचा वापर करून भागवले तर ही स्वायत्तता
शक्य आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ते तसे अधिक शक्य आहे.
एका घरावर पडणारा सूर्यप्रकाश त्या घराच्या उर्जेच्या सगळ्या गरजा भागवू
शकतो, आपण राहतो त्या प्रदेशातले अन्न आपल्यासाठी सगळ्यात जास्त हितकारी
असते. आपल्या भोवतालची हवा आणि पाणी आणि त्यांच्या सहयोगाने तयार झालेले
अन्न हे आपल्या शरीरास सोयीचे असणे हे स्वाभाविक आहे. भौगोलिक, प्रादेशिक
गरजांनुसार निवारा असावा. उंच, भव्य, पूर्ण बंदिस्त आणि आतले तापमान थंड ठे वत
उष्णता बाहेर फे कणारी टोलेजंग घरे आणि कार्यालये आपल्या काय कामाची? कच्च्या,
किंवा भाजलेल्या विटांची, हवा खेळती ठे वणारी साधी घरे आपल्यासाठी आरामदायक.
हवेचा किंवा पाण्याचा इंधन म्हणून वापर करून वाहने चालवणे नक्कीच शक्य आहे. हे
तंत्रज्ञान खनिज तेलाच्या वापरावर उभ्या असलेल्या जगड्व्याळ लॉबीचा विरोध मोडून
काढत नजीकच्या भविष्यात प्रत्यक्षात येईलच. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न
निर्माण करताना कोरोफिल नावाचे हरित-द्रव्य वापरतात. हे गूढ आणखी उकलले तर
अन्न कृ त्रिम रीत्या तयार करणे शक्य होईल.
माणसाला आनंदाने जगण्यासाठी जितके आणि जे लागते ते फार साधे आणि
कमी नासाडी करून मिळवणे शक्य आहे. विज्ञानाचा श्रेयस्कर वापर करून तसे करणे
शक्य देखील आहे. विज्ञानाची आजची प्रगती आणि उद्याची दिशा त्या दृष्टीने फार
आशादायक आहे. त्यासाठी जगण्याच्या धारणा मात्र बदलायला हव्यात. आज आपल्या
दुनियेवर त्यांचा पगडा आहे त्या तसे करणार नाहीत. पण दुनियेत ७०० कोटींवर माणसे
आहेत आणि कं पन्या मात्र २०-२५ किंवा त्याच्या आसपास. माणसांनी आपण एक
प्रजाती आहोत असा बंधुभावाचा विचार के ला तर ही दुनिया बदलणे शक्य आहे. मानवी
प्रजातीसकट बाकी प्राणी, वनस्पती अशी एकू ण व्यवस्था गुण्यागोविंदाने नांदणे शक्य
आहे. मानवी बुद्धिमतेने जो थरारक प्रवास आज के लेला आहे तिच्या फलितांचा
शहाणपणाने वापर के ला तर सर्वांनी सुखाने जगणे शक्य आहे.
दीपक करंजीकर यांनी दाखवलेले आजच्या दुनियेचे वास्तव म्हणूनच फार
गंभीरपणे घेण्याची गरज आहे. एक प्रजाती म्हणून आज ज्या टोकावर आपण भ्रमचित्त
होऊन उभे आहोत, तिथेच हे बंधुभावाचे भान आपल्यात जागे करणे ही आपली
सगळ्यात तातडीची गरज आहे. आपण समजतो तितके आपण दुबळे नाही आहोत. जे
नासाडी करत आहेत ते फार कमी लोक आहेत. आपण त्यांच्या भुके ला बळी जाण्याचे
टाळत, आपली भ्रमिष्टावस्था सांडत राहिलो तर ज्ञानेश्वरांचे पसायदान, जे जगातल्या
कोणत्याही भाषेतले सर्वश्रेष्ठ विश्वगीत असे आहे, ते प्रत्यक्षात आणून ही दुनिया सुंदर
करणे अजूनही शक्य आहे.
गावात या ग्रंथाने मला फार अस्वस्थ के लेय. मी एक बऱ्यापैकी निढावलेला वाचक
आहे, साठी उलटल्यामुळे आणि इतर काही भावनिक कारणांमुळे या दुनियेच्या
व्यवहारासंबंधी मला तितकी आस्था आणि ओढ वाटेनाशी झालेली आहे, असे मी
मनाशी म्हणत असतो. या लेखनाने मला व्यक्तिशः या दुनियेच्या आस्थेच्या व्यूहात
खेचून आणलेय अशी माझी भावना झाली आहे. त्या प्रामाणिक भावनेपोटी के लेला हा
प्रस्तावनेचा प्रपंच. तो मी करावा असे त्यांना वाटल्यामुळे मी जे आणि ज्या भूमिके ने
आजवर लिहिले त्याचा सन्मानच झाला अशी माझी नम्र भावना आहे. दीपक करंजीकर
यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे विचार, आकलन मराठी वाचकांसमोर
मांडता येण्यासाठी त्यांना भरपूर संधी मिळो म्हणून शुभेच्छा देतो. त्यांना अशी संधी
मिळण्यात एक भाषिक समाज म्हणून आपलेच भले आहे, हे आपल्या लक्षात येईल
अशी मला खात्री आहे.

- रंगनाथ पठारे

१. विकास विकत घ्या, विषमता मोफत

ज्यांना जगाची काळजी आहे अशा सगळ्या सुबुद्ध माणसांना कोणत्याही


समस्येला हात घालताना निर्माण होणारे एक कोडे मात्र सोडवता येत नाही. त्या
मध्यापाशी सगळे चिंतन/मंथन येऊन थांबते तो म्हणजे जगातील विषमता. हे जग
विकसित होत
असतानाही, म्हणजे शहाणे नव्हते तेव्हा आणि आता वैश्विक खेडे झाले आहे,
तरीसुद्धा ही विषमता काही के ल्या कमी होत नाही. - जगातील प्रगत, विकसित,
विकसनशील, लोकशाही, ठोकशाही अशी सर्व सरकारे या विषमतेपुढे हतबल का
होतात? हा असा काय वैश्विक प्रश्न आहे? मुळात ही विषमता आली कु ठून?
याची कारणे शोधत गेले की मग लक्षात येते ही बाब नैसर्गिक नाही तर
मानवनिर्मित आहे. या पृथ्वीतलावरील पाणी, खनिजे, तेल, काहीही असीमित नाही. या
अंतराळात आपण सर्व एका पृथ्वी नामक बेटावर राहतो. जिथे जे जे आहे, ते अंतराळात
अजून कु ठे आहे का ह्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. म्हणजे जे आपल्या या
ग्रहावर आहे ते आणि तेवढेच आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण
सगळ्यांनी मिळनच ते जबाबदारीने वापरायचे, पुरवायचे आहे. जरी या जगाचे भाग
झाले असले तरी, जरी या जगाचे 'देश' नावाचे काही तुकडे झाले असतील तरीही; जरी
आपले देश, धर्म, परंपरा, भाषा, रंग वेगवेगळे असले तरीही; एकाकडे आहे आणि
दुसऱ्याकडे नाही असे असले तरी ते सगळ्यांचे आहे असे समजून जबाबदारीने
वापरायचे आहे. हे तत्त्वज्ञान झाले.
वस्तुस्थिती काय आहे? तर हे देश नावाचे छोटे तुकडे कधी उरलेल्या जगापेक्षा मोठे
असल्यासारखे वागतात, स्वत:कडच्या भूभागावर असणाऱ्या संपदेचा अनिर्बध वापर
करतात. ती संपदा दुसऱ्या तुकडेवाल्याला अजिबात मिळू नये म्हणून झगडतात. थोडे
वेगळे मत मांडले की लगेच देशाभिमान, संस्कृ ती अशा नंतर उद्भवलेल्या गोष्टींची तलवार
उपसतात. खरे तर काही हुशार लोकांनी सुरुवातीपासून आपल्यातले काही अज्ञानी,
अडाणी आहेत असे बघून या साधनसंपत्तीवर डोळा ठे वूनच आपल्या भूभागांची आखणी
के ली आहे. वैज्ञानिक शोध आणि त्याला लागणारी साधनसंपत्ती यांचे संधान साधले
आहेच. या सगळ्यांमुळे धरतीच्या संपदेचे असमान वाटप झाले. मग त्यातून पुन्हा काही
सोयीचे मित्र आणि शत्रू तयार होतात. स्वत:ची बुद्धी, ताकद, समूहबळ, शिक्षण याचा
अपरिमित फायदा उठवत बऱ्याच लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करत वेगवेगळे
समूह तयार होतात.
इथेच विषमता नावाचा रोग जन्माला येतो. तो निसर्गाच्या असमान वाटपातून येतच
नाही मुळी, तो येतो आपला हव्यास, अमर्याद लालसा आणि टोकाच्या असंवेदनशीलतेतून!
जितकी माणसे हे हव्यास जोमाने जपत राहतील तितके विषमतेचे वणवे पसरत राहतील.
नैसर्गिक संपदा ज्यांच्याकडे आहे ते हवे तशी ती वापरतात. परिणामत: ज्यांच्याकडे नाही,
त्यांच्यासाठी ती अधिकच महाग होत जाते.
मागे एकदा युद्धखोर जॉर्ज बुश महाशय असे म्हणाले होते की 'भारतीय लोकांच्या
उत्पन्नात वाढ झाल्याने जगभर अन्न महाग होते आहे.' भारतीय लोक जे इतके दिवस
काहीबाही खात होते म्हणे त्यांच्याकडे अचानक मोप पैसा आल्याने ते चांगले सकस अन्न
खाऊ लागले आणि म्हणून जगभर अन्नाचे दुर्भिक्ष्य जाणवते आहे. खरेच असे झाले होते
का? नाही हो! हे गृहस्थ नेहमीसारखेच खोटे बोलत होते. झाले असे की आयात तेलावरची
अवलंबिता कमी करावी म्हणून दोन दशकांपूर्वी अमेरिके च्या सरकारने बायोडिझेलच्या
पर्यायाचा विचार के ला. बायोडिझेलनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जेट्रोपाची लागवड
करावी म्हणून अमेरिकन सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी मोठी सबसिडी जाहीर के ली.
अमेरिकन असला तरी सबसिडी कोणाला नकोय? बरं जगात शेतीमालावर सगळ्यात
जास्त सबसिडी कु ठे असेल तर ती अमेरिके त आहे. ही सबसिडी किती? तर डॉलर मागे ५२
सेंट्स. झाले! बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मका, गहू अशी उत्पादने सोडून आपल्या
शेतजमिनीत जेट्रोपाची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू के ली. धान्यासाठी शेतजमीन कमी
झाल्याने त्यांचा तुटवडा वाढला. कारण अमेरिका जगातला सगळ्यात मोठा गहू, मका
उत्पादक देश. जो धान्यपुरवठा जगाला अमेरिका करायची तो कमी झाला आणि ते महाग
झाले. आता हे संकट निसर्गाचे का मानवनिर्मित? तेलाचा हव्यास कोणाचा? उपाशी मरणार
कोण?
अफगाणिस्तानात माणसे कवडीमोलाने मरताहेत; पण तिथले अफू चे उत्पादन मात्र
गेल्या दहा वर्षांत प्रचंड वाढले आहे आणि त्याच्या जोरावर दहशतवादी कारवायादेखील.
जर अमेरिके ला खरेच त्या देशाला सुस्थितीत ठे वायचे असेल तर अफू च्या जमिनी तिथल्या
पुंड जमीनदारांकडून काढून त्यावर वेगळी पिके घ्यायची व्यवस्था करता येईल आणि
दहशतवादाला मिळणारा पैसाही आटेल. पण असे होत नाही कारण अमेरिके ला त्या
जमीनदारांना पोसण्यात वेगळाच रस आहे, जो त्या देशाच्या जगावर ताबा असण्याच्या
हव्यासाशी जोडला गेलाय.
बाजार (मार्के ट) आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींचे वस्तूत (commodity) रुपांतर
करणे हा अजून एक धोकादायक खेळ काही समृद्ध राष्ट्रांकडून सातत्याने खेळला
जातोय. त्याच्या नफ्यात ती राष्ट्र, त्यांची अर्थव्यवस्था पोसली जातेय. यासाठी प्रचंड
मोठ्या प्रमाणात जगातील साधनसंपदा वापरली जात असून हळूहळू जगात अनेकांच्या
नशिबी हलाखीचे जिणे येऊ पाहते आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर पाळीव
प्राण्यांसाठी लागणाऱ्या खाद्याचे मोठ्या उद्योगात रुपांतर झाले असून या उद्योगाची
उलाढाल आता फक्त युरोप आणि अमेरिके त १,००,००० कोटी रुपयांपर्यंत पोचली
आहे. याच्या तीन चतुर्थांश (६५,००० कोटी) रकमेत जगातील सर्व माणसांना किमान
पौष्टिक आहार दिला जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टींचे अमर्याद औद्योगिकीकरण होणे हे
अशासाठी धोकादायक आहे. एखाद्या आधुनिक कारखान्यात १०० ग्रॅम मांस तयार
करण्यासाठी जर ४०० लीटर पाणी, ५०० ग्रॅम धान्य, ५०० ग्रॅम सकस माती लागणार
असेल आणि त्या प्रक्रियेने जर १० किमी वाहन चालवल्यावर होणारे प्रदूषण होणार
असेल तर त्याची निर्मिती कारखान्यात करायची नाही, हेच त्याचे उत्तर आहे. असे मांस
आणि मांस उत्पादन हे धोकादायक आहे; कारण हे काही लोकांच्या चवीसाठी बऱ्याच
लोकांच्या तोंडचा घास हिसकावून घेते आहे.
पण मोठ्या प्रमाणावर मांस बनवून आपल्याला कॉरिशन म्हणून प्रचंड नफा
होतोय ना? मग झाले तर! ते फस्त करायची लोकांना सवय लावा. त्यांची भूक जागती
ठे वा. त्यासाठी जाहिरात आणि मार्के टिंगची इतर तंत्रे प्रभावीपणे वापरा. अमर्याद
उत्पादन करा. सारे जग त्यासाठी खड्च्यात गेले तरी चालेल. विषमता वाढली तर तो
साऱ्या जगाचा प्रश्न आहे. आमचा एकच हेतू, बाजारपेठ आणि त्यातून पैसा मिळवणे! हे
नुसतेच भंपक नाही तर सगळे जग विनाशाच्या कड्यावर आणून उभे करणारे आहे
आणि म्हणूनच ते कृ त्य माणुसकीच्या दृष्टीने गुन्हेगारीचे आहे. विषमतेची कारणे ही
आपल्या जीवनशैलीत आहेत हे किती लोकांना पटेल? कोणत्या गोष्टींना महत्त्व दिल्याने
कोणत्या गोष्टी दुष्प्राप्य झाल्या आहेत ते बघायला हवे. विकास करताना फक्त नफ्याच्या
हिशेबाकडे पाहत तो करून कसा चालेल? समाजाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय
एखादी कं पनी चालवण्यासारखे आहे? बऱ्याच वेळा सामाजिक अध्ययन करणारे विद्वान
(?) लोक विषमतेसाठी लोकसंख्येला जबाबदार धरतात. ते किती सोयीचे आणि
फॅ शनेबल आहे हे सोबत दिलेल्या तक्त्यातून स्पष्ट होईल.
जगभर उद्योगाचे स्वरूप आल्याने काही बाबींसाठी होणारा खर्च
खर्चाच्या बाबी खर्च होणारी रक्कम (कोटी रुपये)
सौंदर्य उत्पादने १,००,००० (अमेरिका, युरोप)
आईस्क्रीम ५५,००० (फक्त युरोपात)
पाळीव प्राण्यांचे खाद्य १,००,००० (युरोप, अमेरिका)
व्यवसाय मनोरंजन १,७५,००० (जपान)
सिगारेट २,५०,००० (युरोप)
मद्य ५,२५,००० (युरोप)
अमली पदार्थ २०,००,००० (जगभरात)
एकू ण रक्कम ३१,५५,०००

स्त्रोत:
या तुलनेत जगातील सर्वांसाठी खालील गोष्टींसाठी करावा लागणारा

अंदाजे खर्च (कोटी रुपये)

सर्वांना शिक्षण ३०,०००


सर्वांना पाणी आणि मलनिस्सारणाची सोय ४५,०००
स्त्रियांसाठी आरोग्य ६०,०००
सर्वांना आरोग्य आणि पोषक आहार ६५,०००
एकू ण रक्कम २,००,०००

स्त्रोत :
हे प्रमाण जवळपास १६ पट आहे. या असल्या प्रगतीपासून स्वत:ला वाचवणे हे
नुसते नैतिक नाही तर माणुसकीचेही आहे. जगाची बात कशाला करायची? एक साधे
उदाहरण आपल्या महाराष्ट्राचे पाहू या.
सेवा क्षेत्र आणि उद्योग यांचा राज्याच्या उत्पन्नातील हिस्सा सुमारे ८७% (देशात
सर्वांत अधिक) आहे; तर भारताच्या नियोजन मंडळाच्या एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र
दारिद्र्याच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या लोकसंख्येच्या
जवळपास ३८% लोक दारिद्र्याच्या खाईत जगत आहेत. उत्पन्न असूनही दारिद्र्याची
व्याप्ती इतकी चिंताजनक कशी? या देशात सगळ्यात जास्त आत्महत्यही महाराष्ट्रातच
होतात. समतोल उद्योगवाढीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे सत्ताधारी 'मराठी माणूस
नोकरीप्रिय आहे' असेच सोयीने गृहीत धरून त्याच्या नोकरीसाठी आंदोलने करणारे
प्रादेशिक पक्ष यांपैकी कोणीही गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही मूलभूत क्षेत्रात
उद्योग उभे के ले नाहीत. महाराष्ट्रातून देशात जाणारा कच्चा माल - चामडे, दूध,
तेलबिया, कोळसा, कापूस आणि सेवा क्षेत्र यातल्या कोणत्याही क्षेत्रांत असे उद्योग उभे
राहिले असते तर आपोआप हजारोंसाठी रोजगार निर्माण झाला असता. या
सगळ्यांमुळे आज साडेअकरा कोटींच्या महाराष्ट्रात जवळपास ७५-९० लाख लोक
बेरोजगार आहेत आणि त्यात दरवर्षी ४ ते ५ लाखांची भर पडते आहे. पण असे
सांगितले की महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशापेक्षा जास्त आहे याचे आकडे तोंडावर
फे कले जातात.
हे अत्यंत फसवे चित्र आहे. आज महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न हे ४७,०००
रुपये आहे; पण फक्त मुंबईचे दरडोई उत्पन्न १,२५,००० रुपये आहे. महाराष्ट्राची
लोकसंख्या साडेअकरा कोटी; तर मुंबईची लोकसंख्या २.१ कोटी आहे. म्हणजे
महाराष्ट्राच्या जवळपास १९ . आता मुंबई वगळून महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न काढा
म्हणजे या दिशाभुलीचा अंदाज येईल. राज्यात दर लाख लोकसंख्येमागे ७७,०९३
मोबाईल फोन्स आहेत; पण रुग्णवाहिका मात्र फक्त आठ आहेत.
थोडक्यात काय तर विकास आणि विषमता ही हातात हात घालूनच चालतात;
असे असेल तर त्याला विकास तरी कसे म्हणायचे?
२. शांततेचा खळबळजनक आलेख

शांतता ही बाब इतकी अस्वस्थ करणारी असू शकते? आज जेव्हा जगात मंदीच्या
लाटांनी सगळ्यांना हतबल करून सोडले आहे, तेव्हा जगातले शस्त्र-व्यापारी मात्र
आनंदून गेले आहेत; कारण हीच वेळ आहे त्यांच्या भरभराटीची, व्यवसायाच्या अपूर्व
संधीची. म्हणजे नोकऱ्यांच्या जगात अस्वस्थ शांतता आहे; तर शस्त्रांच्या जगात
व्यवसायाच्या हमीची शांतता आहे. अजून एक माहिती देऊ? या अराजक अथवा
हिंसेवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था किती आकाराची? तर २.४ ट्रिलियन डॉलर्स
इतकी! म्हणजे किती? तर १४४ लाख कोटी रुपये म्हणजे जगाच्या एकू ण ढोबळ
उत्पन्नाच्या ५%.
खोटे वाटते ना!
सोबत एक आकृ ती आहे. त्यात जगाच्या शांततेचा आलेख आहे. पाच वेगवेगळ्या
पद्धतींनी शांततेचा इंडिके टर त्यात दाखवला आहे. त्यातला . म्हणजे शांत देश आणि
म्हणजे अत्यंत अशांत देश. चित्र भयाण आहे. जगाच्या नकाशात अगदी टोकाला
असणारे दोन तुकडे सोडले तर सर्व जग थोड्याफार प्रमाणात अशांत आहे. आपला,
रशियाचा, मध्य पूर्वेचा आणि आफ्रिके तला पट्टा तर एकदम सकस प्रदेश. इथे खरे
शस्त्रांचे मजबूत मार्के ट. शस्त्र व्यापारी म्हणून या नकाशाकडे बघा. मग कळेल...!
आता या एकं दर विषयाकडे आकडेवारीतून म्हणजे थोडे वेगळ्या कोनातून पाहू
या. जगातल्या प्रमुख राष्ट्रांचे संरक्षणावर होणारे खर्च किती या दृष्टिकोनातून. पुढील
तक्ता
बघा.
प्रमुख राष्ट्रांचे संरक्षणावर होणारे खर्च (लाख कोटी रुपये)
देश संरक्षण खर्च शस्त्रव्यापार
संपूर्ण जग ७० ७०
अमेरिका २८ ८
चीन ३.५ १
इंग्लंड, फ्रान्स २.८ १.६
रशिया १.५ ३.४
हे फक्त युद्ध सामग्रीच्या उत्पादनाचे निव्वळ आकडे आहेत. इतर कोणत्याही संलग्न
खर्चाच्या बाबी यात नाहीत. आता याचे परिणाम जरा तपशिलाने आणि उदाहरणाने पाहू
या.
सुमारे ९ वर्षे चाललेल्या अमेरिके च्या इराक/अफगाणिस्तान युद्धाचा खर्च हा
जवळपास ६० लाख कोटी रुपये आहे. यात मनुष्यहानी (किमान १५ लाख मृत्यू),
प्रदूषण, मानसिक विकलांगता, नैसर्गिक साधनसंपत्तीचा (जी सर्वांसाठी आहे) नाश यांचा
समावेश नाही. समजा, आपण असे म्हटले की ही सर्व राष्ट्रे आणि त्यांच्याशी साटेलोटे
असणारे शस्त्रव्यापारी यांनी मिळून हे जग वेठीला धरले आहे आणि त्यांच्यावर सदोष
मनुष्यवधाचे गुन्हे दाखल के ले पाहिजेत तर काय चुकीचे आहे? काही काळापूर्वी
कोपनहेगनला जागतिक पर्यावरण परिषदेत अमेरिके च्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन
मोठ्या उदार अंत:करणाने म्हणाल्या होत्या, “अमेरिका पुढाकार घेऊन जगात ५
लाख कोटींचा एक पर्यावरण निधी उभा करेल.' हे विधान अतिशय क्रू र विनोदी आहे...
म्हणजे जगाला जखमी करण्यासाठी ७० लाख कोटी, ती जखम चिघळत ठे वण्यासाठी
२० लाख कोटी आणि त्यावर मलमपट्टीचा खर्च ५ लाख कोटी? हे विधान नुसतेच
हास्यास्पद नाही; तर लाखो लोकांना जगण्याची संधी नाकारणारे आहे. म्हणूनच अत्यंत
विखारी आणि अमानवी आहे.
आजकाल आपण हल्ल्याच्या बातम्यांना सरावलो आहोत. मध्यंतरी एका
सर्वेक्षणात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे
सबंध जगभरात दर दिवशी किमान ८२२ लोक फक्त छोट्या शस्त्रांना बळी पडत
असतात. यातले ८०% लोक हे सामान्य नागरिक आहेत.
आजमितीला पाश्चात्य राष्ट्रे १ डॉलर विकासावर खर्च करतात; तर १० डॉलर
शस्त्रांवर खर्च करतात.
जी८ या समूहांमधले सर्व देश हे जगातील शस्त्रांचे प्रमुख निर्यातदार आहेत.
युनोच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड
यांची जगातील शस्त्रांच्या व्यापारावर पूर्णपणे मक्तेदारी आहे.
जगात सध्या उपलब्ध असणाऱ्या अधिकृ त फायर आर्सचे प्रमाण दर सहा
माणसामागे एक इतके आहे. अनधिकृ त फायर आर्सची संख्या याच्या दुप्पट असल्याचा
एक भयावह अंदाज आहे.
जगात दरवर्षी बनणाऱ्या सर्व प्रकारच्या बंदुकीच्या गोळ्यांचे प्रमाण दर माणशी ४
गोळ्या इतके आहे.
सध्या जगात सुमारे ५० कोटी छोटी शस्त्रे वापरात आहेत. याचे प्रमाण लोकसंख्या
७ अब्ज धरली तर दर १४ माणसांमागे एक छोटे शस्त्र इतके प्रचंड येते. मागच्या दशकात
असे पाहण्यात आले की एके -४७ ही स्वयंचलित मशीनगन णका कोंबडीच्या बदल्यात
युगांडात विकली जात होती.
जग संरक्षणखर्चाच्या फक्त ४०% खर्च शेतीवर होतो तर १०% खर्च सर्व प्रकारच्या
मदतीवर (यात आपत्ती आल्या) होतो.
दरवर्षी साधारणपणे १५ लाख छोटी शस्त्रे चोरीला जातात अथवा गायब होतात
काळ्या बाजारातल्या शस्त्र विक्रीची उलाढाल २० ते ४० हजार कोटी रुपये इतकी
आहे.
जगातील साधारण ९८ देशातील ११३४ कं पन्या या शस्त्रांच्या उत्पादन, विक्री यात
सहभागी आहेत.
जगाचा एकू ण दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे यांच्यापैकी ६०टक्क्यांची मालकी ही
खाजगी उत्पादकांकडे आहे.
मित्रहो, जगभर चाललेल्या या अमानुष आणि अनिर्बध खेळाची थोडीतरी कल्पना
यावी म्हणून वरील तपशील दिला आहे. या तपशिलाने नेमके शांततेच्या बुरख्याआडून
जगात हिंसेचा व्यापार कोण करते आहे हे ध्यानात येईल. फार चर्चा न करता या अमानुष
खेळाने नेमका काय परिणाम घडवला आहे याची नजीकच्या काळातली दोन उदाहरणे
पाहू. त्यातले एक आपल्या शेजारच्या अंगणात घडते आहे.
इराण-इराक युद्धातील अमेरिके चा जानी दोस्त, सद्दामने अमेरिके कडून प्रचंड शस्त्र
खरेदी के ली. त्याबद्दल त्याला डेट्रोईटचा ऑनररी नागरिक हा किताब दिला गेला. ७०
जहाजे भरून अब्जावधी डॉलर्सची रासायनिक शस्त्रे इराकला विकली गेली. इराक
आखातातील बलवान राष्ट्र झाले. पुढे अमेरिके शी त्याचे तेलावरून आणि अरब
आखातातल्या मक्तेदारीवरून बिनसले. त्याच्या तपशिलात इथे जाण्याचे कारण नाही.
सद्दाम बिथरला. दरम्यान त्याची अमेरिके कडून शस्त्र खरेदी थांबली. त्याने तेलविक्रीचे
नवेच आयाम प्रस्थापित करण्याचे ठरवले. मग महासत्ता बिथरली. इराकवर युद्ध लादले
गेले. सद्दामचा अल-कायदाशी काही संबंध नसताना कु रापत काढत, युनोत खोटेनाटे
प्रमाण दावे करत इराकवर युद्ध लादले गेले (परत शस्त्र विक्रीचीच संधी). परिणती काय?
सद्दामच्या काळात नव्हता इतका हा देश आता अस्थिर झाला आहे. अमेरिके च्या
विरोधाचे युद्ध घराघरातून लढले गेल्याने अब्जावधी रुपयांची चोरटी शस्त्रविक्री तिथे
झाली आहे. ह्या सगळ्या बेहिशेबी शस्त्रांचा साठा अनेक कारणांनी उपयोगात आणला
जाईल आणि पुढची अनेक वर्षे तो देश अस्थिर होत जाईल. त्यात सामान्यजन भरडले
जातील. त्यातून एक दिवस बंड होईल आणि परत यादवीकडे जात हा देश मध्यपूर्वेतील
शस्त्र व्यापाराची एक मोठी बाजारपेठ तयार करेल अशा पद्धतीची ही व्यूहरचना असावी
अशी शंका येते.
दुसरे उदाहरण पाकिस्तान. आज अराजकाकडे वाटचाल करणारा आपला शेजारी.
९/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तान अमेरिके कडून शस्त्रे खरेदी करणारा सगळ्यात मोठा
देश आहे. तर मग हा देश मजबूत असायला हवा. पण प्रत्यक्षात हा देश आज एक रॉटन
कं ट्री आहे. तिथले सामान्य जीवन सडलेले आहे. राज्यकर्ते बंदुकीच्या जोरावर जिवंत
आहेत. आज पाकिस्तानात दररोज सुमारे ८,००० बालके जन्माला येतात त्यातील ६० ना
शिक्षण आणि किमान पोषणाची सोय नाही. या दिशाहीन देशात आज ४५% जनता
(म्हणजे सुमारे ११ कोटी लोक) भिकारी जीवन जगते आहे, तर ७ कोटी लोक पिण्याच्या
पाण्यापासून वंचित आहेत. ८ कोटी निरक्षर आहेत. पाकिस्तानात तुम्ही एकाच रस्त्यावर
काळाचा शंभर वर्षांचा प्रवास सर्रास बघू शकता. जिथे हे उकिरड्यावरचे जिणे जनता
जगत असते, त्याच अरुं द गल्ल्यांत जमीनदारांच्या, लष्करी माजुरड्या लोकांच्या आणि
अमली पदार्थाच्या तस्करांच्या पॉश बीएमडब्ल्यू, मर्सिडिस, पोर्शे अशा कोट्यवधी
रुपयांच्या अलिशान गाड्या ये-जा करत असतात. हे दृश्य नेहमीचे आहे. आज
भरकटलेल्या पाकिस्तानवर हुकमत गाजवणारी दोन सत्ताकें द्रे आहेत. एक त्यांचे
लष्कर आणि दुसरी आयएसआय ही गुप्तहेर संघटना. पाकिस्तानला मदत
करताना अमेरिके ची त्यांच्याशी सततची सलगी असते. पाकिस्तानच्या ६५ वर्षांच्या
इतिहासात तिथे इतकी वर्ष लष्करी शासन राहिले, याला तिथल्या राज्यकर्त्याशिवाय
अमेरिके चाही हातभार होताच. अयुबखान, झिया, मुशर्रफ यांच्यासारख्या हुकु मशाहांशी
असणारे अमेरिके चे संबंध आणि भुत्तो, बेनझीर, नवाझ शरीफ यांच्यासारख्या लोकशाही
मार्गाने निवडलेल्या नेत्यांशी असणारे संबंध यातला फरक काय सांगतो? याशिवाय
पाकिस्तानला झालेल्या अमाप शस्त्रविक्रीने भारतासाठी जे वाढून ठे वले आहे ते वेगळेच.
गेल्या २५ वर्षांत तीन युद्धे आणि अनेक प्रॉक्झी वॉर्स, पंजाबची शोकांतिका, अमाप
अतिरेकी कारवाया, सियाचीन, कारगीलमधली घुसखोरी, काश्मीरमधील अस्थिरता, १३
विविध बॉम्बस्फोट, मुंबईवरचा हल्ला असल्या घटनांची साखळी भारताला अनुभवावी
लागत आहे. या बेहिशेबी शस्त्रांच्या वापरासाठी पोसलेले जेहादी ग्रुप, लष्कर-ए-तोयबा,
हरकत-उल-अन्सार, हिजब-उल-मुझाहीदिन आणि या जोडीला चोरट्या शस्त्रांवर
चालणाऱ्या अमली दहशतवादाच्या संघटना (एकू ण व्यापार ५००० कोटी रुपये) यांच्या
रूपाने, शस्त्रव्यापारातील नफ्याच्या हव्यासाने गेल्या ६० वर्षांत जन्माला घातलेले हे
भयाण वास्तव आपल्या शेजारी आहे. ज्यांनी ही शस्त्रे विकली त्यांना नाही; तर
आपल्याला या दुर्दैवी आणि बकाल शेजाऱ्याशी सामना किंवा दोस्ती करायची आहे.
ज्यांनी यातून पैसे कमावले ते मात्र नव्या सावजाच्या शोधात निघून गेले आहेत.
३. दुखते तिथे विकते!

मानवाचे तीन मूलभूत गरजांसाठी जगणे असते. त्यासाठी धडपडणे, त्यासाठी


निसर्गाशी दोन हात करणे, दोस्ती करणे हे ओघाने येतेच. अन्न, वस्त्र, निवारा या
मूलभूत गरजा भागण्याबरोबरच, लोकांनी बुद्धीचा विकास करून ज्ञानाची लालसा
धरावी, एकमेकांशी माणुसकीच्या नात्याने बांधले जावे, सतत प्राणी पातळीवरील संघर्ष
न करता सृजनाचे गीत गावे यासाठी शिक्षण आणि प्रत्येकाला सुदृढ, सुखाचे दिवस
उपभोगता यावे यासाठी उत्तम आरोग्य हेसुद्धा मूलभूत गरजेत समाविष्ट के ले गेले.
कालांतराने मात्र का कु णास ठाऊक असे घडत गेले की शिक्षण, वस्त्र, अन्न अशा
मूलभूत गरजांच्या क्षेत्रात व्यापाराची बेहिशेबी गणिते शिरली. मग त्यातल्या मस्तवाल
माणसांनी त्याचे धंदा, नफा आणि अधिक नफा हे परवलीचे शब्द बनवले. त्या सर्व
क्षेत्रातील मूल्यांची माती होत गेली. शिक्षणाची नाळ पैशाशी बांधली गेली आणि या
मूल्यांचा बाजार व्हायला सुरुवात झाली. जगात 'सगळ्यांसाठी शिक्षण' हे फक्त युनोच्या
प्रचारकी साहित्यावर उरले आहे आणि जगातील विख्यात विद्यापीठे , ज्यांच्याकडे पैसा
नाही त्यांना अस्पृश्य मानत स्वत:च्याच घोडदौडीत मग्न आहेत. जिथून बुद्धी घडायची
तिथेच ती सडायला सुरुवात झाल्यावर मग शिक्षणाचे वेगळे काय होणार?
आरोग्याचे तर आणखीनच तीनतेरा. ती तर निव्वळ शारीरिक बाब. त्यामुळे आता
मानवाची दुखणी, वेदना यावर मानवतेने मात करण्याऐवजी जगातील
शस्त्राखालोखालची मोठी अशी औषधांची बाजारपेठ मानवांच्या व्याधींवर आपला
डोलारा मिरवत उभी राहिली आहे. मूलभूत अशा गरजांचा व्यापारासाठी प्रभावी उपयोग
करताना के वळ बाजारसूत्रे आणि त्यातून मिळणारा अमाप नफा या दोन नव्याच
मानसिक व्याधींनी एकं दरच माणसाच्या आरोग्याला एखाद्या कमोडिटीच्या पातळीवर तर
जगण्याला पशुवत पातळीवर आणून ठे वले आहे. हे क्लेश देणारे असले तरी आजचे
वास्तव चित्र आहे. माणसाचे आजारपण हे वापरता येते, त्यात व्यापाराच्या अनेकविध
संधी शोधता येतात आणि अंतिमतः आजारपण टिकू न राहावे याची चलाखीने तजवीजही
करता येते ही. विचारपद्धती आपल्याला फार झपाट्याने एका आर्थिक दहशतवादाची
गुलाम करते आहे. आज हे लिहीत असताना जगातील काही देश या विचाराचे गुलाम
होऊन, मानवी मूल्यांचे आजारपण आपल्या भाळी लेवून निर्विकारपणे उभे आहेत. आज
जगाची निव्वळ औषधांची बाजारपेठ ५० लाख कोटी रुपयांवर जाऊन पोचली आहे. ही
फक्त औषधांची विक्री झाली. यात वैद्यकीय व्यवसायातल्या डॉक्टर्स, पॅथलॅब, रुग्णालये
यांचा समावेश नाही.
हा निरतिशय गंभीर मुद्दा नीट समजून घेताना काही गोष्टींकडे थोड्या वेगळ्या
दृष्टिकोनातून पाहू या. आपल्याला हे माहीत नसेल तर याचा धक्का बसू शकतो. काही
विशेषज्ञ आजारपणाची व्याख्या ठरवताना रक्तातील साखरेची पातळी अथवा
ब्लडप्रेशरची सामान्य मर्यादा काही अंकांनी बदलतात आणि मग त्यावरची औषधे
बनवणाऱ्या कं पन्या अब्जावधी रुपये कमावतात असे प्रकार सुरू आहेत. जसे
रक्तदाबाची सामान्य पातळीची अथवा रक्तातल्या साखरेची पातळीची रेंज जरी फक्त ५
अंकांनी बदलली तरी अनेक लोक त्या रोगांच्या तडाख्यात येतात आणि मग गोळी घेणे
त्यांना अपरिहार्य होते. एक दिवस रक्तातील कोलस्टोरेलची नवीन आलेली मर्यादा, ते
कमी करण्यासाठी स्टॅटिन नावाच्या एका औषधाची गरज निर्माण करते. मग हे औषध
लाखो लोकांना आयुष्यभर घ्यावे लागते आणि ते बनवणारी कं पनी एकदम मालामाल
होते.
जगभर सर्वसाधारणपणे सरकारच्या नियंत्रणात असणाऱ्या काही दर्जेदार आणि
निर्विष आरोग्यसंस्था जागतिक पातळीवर रोगलक्षणांची नवीन मर्यादा ठरवतात. पण मग
लक्षात येते की त्यांच्या कोअग्रुपमध्ये के वळ एक संशोधन करणारी संस्था आहे आणि
इतर सगळ्या त्या औषधाची आर्थिक गणिते मांडणाऱ्या विविध औषधकं पन्या आहेत.
संशोधकांशिवायचे बाकी लोक त्या औषधाची उत्पादन यंत्रणा उभी करतानाच त्याचे
मार्के ट किती, कु ठे आणि कसे आहे, याचा अंदाज घेतात. त्यानुसार या औषधांची गरज
निर्माण करण्यासाठी एक महाकाय यंत्रणा राबवली जाते. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे
जाहिरात. म्हणजे बघा हं हे कसे घडत जाते....
रोज येतो तसेच एक दिवस आपण संध्याकाळी छान मुडमध्ये घरी येतो, छान
चहाचे घोट घेता-घेता टीव्हीवरचे कार्यक्रम, बातम्या पाहत असतो. मुळात आपण काही
पेशंट नसतोच; पण एक-दोन तास टीव्ही पाहण्यात जातात आणि त्या सगळ्या
औषधांच्या ढीगभर जाहिराती बघून आपल्याला उगीचच असे वाटू लागते की आपली
तब्येत हल्ली फारशी ठीक नाहीये. कारण त्या जाहिरातीतले निदान एखादे तरी लक्षण
आपल्याला लागू पडतेच. आपण शिकलेले आहोत त्यामुळे अडाणी माणसासारखे
याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे विचार मनाचा ताबा घेत असताना आपला
दिवस छान गेला, आपण आनंदात घरी आलो होतो, चहा घेतल्यावर आपल्याला किती
छान वाटले होते, हे आपण विसरलेलो असतो. एवढेच नाही तर या दरम्यान एका साध्या,
निरोगी आणि आनंदी माणसाचे रुपांतर एका शिणलेल्या माणसात होते आणि हळूहळू
तो माणूस वैद्यकीय सल्लाही न घेता आपोआप त्याच्या नकळत एखाद्या नसणाऱ्या
रोगाची शिकार होऊन जातो.
हे घडणे कदाचित आपल्याला हास्यास्पद वाटू शकते पण असे घडते आहे हे
नक्की. मुळात एकाची व्याधी हेच दुसऱ्याचे विक्रीचे मूलतत्त्व असणे हे अनैतिक आहे.
अजिबात दुखण्याचा लवलेश नसताना के वळ भीतीपोटी ते निर्माण करून औषधे विकणे
म्हणजे तर अधिकच अध:पतन!
कधीकधी एखादे नवे औषध बाजारात येतानाच जी जाहिरात के ली जाते, त्यामध्ये
'लाखो लोकांनी हे घेतले आहे. तुम्ही?' एवढे म्हटले तरी पुरते. सध्या औषधांची आकर्षक
जाहिरातसुद्धा अनेक लोकांना डॉक्टरांकडे जायला भाग पाडते. हे विळखे अधिक
पाशवी कसे होत जातात ते पाहा. औषध तयार करता करता आता हळूहळू
औषधकं पन्यांनीच आरोग्याच्या व्याख्या ठरवायला सुरुवात के ली आहे. त्यामुळे अनेक
असाध्य अथवा तुरळक प्रमाणात असणारे आजारही आता अगदी नेहमीचे करून
टाकण्यात आले आहेत. मग प्रश्न विचारण्यात येतो तुम्हाला अमुक होते का? तमुक
जाणवले आहे का? मग ताबडतोब तपासून घ्या कारण ही एखाद्या मोठ्या दुखण्याची
सुरुवात असू शकते. यातून निर्माण होणारा भीती हा विकार आहे जो एकट्याने सहन
होत नाही आणि मग हे भय एकदम वाऱ्यासारखे पसरते.
ह्या औषधकं पन्या सामाजिक जाणिवेचा आव आणत मग निरनिराळ्या शिबिरात
काही मोफत तपासण्या देऊ करतात. तुम्हाला वाटते की आपले पैसे वाचले. ते खरेही
असेल; पण या लोकांना त्यामुळे समाजातील एका विशिष्ट लोकांचा एक डाटाबेस
त्यामुळे तयार करता येतो. त्याचे वर्गीकरण करून मग जाहिरात के ली जाते. जाणीव
करून देण्याच्या नावाखाली मग औषधांचा एक ग्राहकवर्ग तयार होतो.
खरेतर आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधीतरी अस्वस्थ वाटत असतेच. कधी
राग येतो, कधी एकटे वाटते, कधी सभोवतालच्या परिस्थितीबद्दल चीडचीड होते. हे
सगळे आपल्या मनाचे विभ्रम असतात आणि ते असणे हे अगदी नॉर्मल आहे. त्यावर
उपाय असतो तो मनाला कु ठे तरी गुंतवण्याचा. औषधकं पन्या ह्या गोष्टी बरोबर हेरतात
आणि त्यांची एखाद्या रोगाच्या लक्षणाशी सांगड घालतात आणि इथेच मग एखाद्या
औषधाचे मोठे मार्के ट ठरते. मनाचे विभ्रम, त्याचा रोग आणि त्याच्या औषधाचे मार्के ट
यांची ही सांगड हा आरोग्यक्षेत्रातला सगळ्यात अमानुष असा मार्के टींगचा खेळ आहे.
आणि तो खेळताना कोणत्याही मार्गाचा विधिनिषेध न बाळगता, जगातील मोठमोठ्या
फार्मास्यूटीकल कं पन्यांनी प्रचंड पैसा कमावला आहे. ही सर्व एक प्रकारे वैध आणि
तार्किक पद्धतीने लोकांची आयुष्ये ओलीस ठे वण्याची कृ त्ये आहेत आणि मरणाच्या
खोट्या भीतीने गळाठलेली माणसे याची सतत शिकार होत आली आहेत.
तुम्हाला लक्षात येणार नाही पण पेशंटचे संपणारे आणि वाढलेले आयुष्य या
दोन्हीकडे हा व्यवसाय एक उत्तम संधी म्हणून पाहतो. औषधांचे मार्के ट वाढावे म्हणून
बऱ्याच वेळा औषधकं पन्या सतत नवीन रोग शोधून काढतात आणि जुन्याच औषधांनी ते
बरे करण्याचे बघतात.
असले कृ त्रिम मार्के ट तयार के ल्याची जगात अनेक उदाहरणे आहेत. प्रोॉक औषध
श्रेणीतील निराशा घालवणारी सर्व औषधे याचे उत्तम उदाहरण आहे. ही औषधे जेव्हा
आली तेव्हा ती फक्त मोठ्या निराशेच्या झटक्यांवर दिली जायची. हल्ली ती सर्रास तुमचा
मूड अथवा चिंतातूर अवस्थेसाठी दिली जातात. मग अस्वस्थ असण्याच्या निरनिराळ्या
स्थिती शोधल्या जातात; कारण त्यातून सरळपणे नफा येत असतो. निराशा
घालवण्याच्या औषधांचे मोठे मार्के ट म्हणजे लहान मुले. अगदी कॉमनसेन्सने बघितले
तर, आपल्या मुलांना एखाद्या क्रिके ट टीममध्ये निवड न झाल्याने अथवा शाळेतल्या
गाण्याच्या कार्यक्रमात न घेतल्याने निराशा येणे, एकटे वाटणे हे काही विपरीत नाही.
थोडेसे लाजाळू असणे, जाहीरपणे बोलायला संकोच वाटणे हे खरेतर किती साधे, किती
नॉर्मल आहे. पण त्याचे या कं पन्यांनी 'सोशल अँक्झायटी डीसऑर्डर' नावाच्या रोगात
रुपांतर करून तुमच्या नैसर्गिक भावनांना काही वावच ठे वलेला नाही.
परदेशात आणि दुर्दैवाने आता आपल्या देशातही (कु टुंबसंस्था मोडीत निघाल्याने)
एखादा रोग हा नीट समजून घेऊन त्याच्याशी प्रसंगी दोन हात करण्याचा नव्हे तर
घाईघाईने वैद्यकीय उपचार करण्याचा भाग आवश्यक झाला आहे. याचे कारण स्वत:च्या
मुलांना वेळ देण्यापेक्षा भरमसाठ किमतीची औषधे देणे आईबापांनाही सोयीचे आहे. या
वृत्तीचा फायदा घेणाऱ्या अनेक औषधकं पन्या आहेत. दुखणे ही शरीराची एक अवस्था
आहे आणि त्यावर मात करण्याच्या वृत्तीला घडवणे हे आज किती घरात घडते?
आईवडीलच मलांना गोळी/इंजेक्शन द्यायला आतर असतात. क्वचित एखाद्या
डॉक्टरकडे घेऊन जाताना 'माझी अनेक कामे आता खोळंबणार' असे बोलतात. मुलांना
याचा अर्थ कळत नाही असे समजू नका. तीसुद्धा बिचारी आईवडिलांना त्रास नको
म्हणून गुमान एखादी गोळी घेत तो रोग अंगावर काढत असतात.
मुले हल्ली सारखी फोन, एसएमएस, इंटरनेट यात व्यस्त असतात अशी लाडिक
आणि तद्दन बेजबाबदार तक्रार करणारे पालक आपण खरेच किती वेळ फक्त मुलांना
देतो, त्यांच्याशी किती विषयावर गप्पा मारतो याचा हिशेब करतील तर त्यांनाच अॅन्टी
डिप्रेशनची गोळी सुरू करावी लागेल. तुम्हाला ही मांडणी अविश्वसनीय वाटणे साहजिक
आहे; पण ज्या झपाट्याने आपल्या घराचे घरपण, कु टुंबाचे सहजीवन मोडीत निघते आहे
ते पाहता, आणि प्रगत राष्ट्रांत हे सर्व घडलेले आहे हे लक्षात घेता आपण सुपात आहोत
इतके च!
४. रिटेल एफडीआय, विकास-विनाशाचे अजब मिश्रण

सांप्रतकाळी देशात सर्वत्र रिटेलच्या मुद्द्यावर एक मोठा गोंधळ माजला आहे.


अर्थात 'गोंधळ' हासुद्धा सण असणाऱ्या देशात हे काही नवीन नाही. सर्व अर्थविद्वानांचे
वाद, बुद्धीवाद्यांची मते, आगंतुक सल्ले, देशप्रेमाच्या आरोळ्या, बिनबुडाच्या
सामोपचाराच्या घोषणा, घोटाळे, भ्रष्टाचार आणि रिटेल निर्णय यांची बेमालूम फसवी
सांगड इत्यादी बाबी बाजूला ठे वून सामान्य माणसाच्या शहाणपणाने या सगळ्याकडे पाहू
या.
हा देश १२५ कोटींचा आहे. याचा अर्थ इतक्या लोकांना जगण्यासाठीच्या अनेक
वस्तू लागणार. म्हणजे वेगळ्या अर्थाने ही इतकी मोठी बाजारपेठ आहे म्हणजे की तिची
क्रयशक्ती अमेरिके च्या चार पट, संपूर्ण युरोपच्या दीडपट आहे. अबब! हे अशासाठी
सांगितले की यामुळे या प्रश्नामागची एकं दर पार्श्वभूमी लक्षात यावी.
आता जगातील सर्व प्रगत राष्ट्रांत मल्टीब्रैड रिटेल अस्तित्वात आहे. आपल्या देशात
सिंगल बँड रिटेलमध्ये ५१% च्यावर गुंतवणूक परवानगी आहे. सिंगल बँड म्हणजे काय
तर एकच बँडच्या वस्तू विकणारे दुकान. उदाहरणार्थ, रिबॉक, आदिदास किंवा ज्वेलरी,
कपडे, हँडबॅग्स, अशा सर्व ज्यांना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणता येतील अशा वस्तूंसाठी
असणारी विक्रीची साखळी. मल्टीब्रैडमध्ये मात्र या वस्तू आणि इतर किराणा माल,
जीवनावश्यक वस्तूंना एकाच छताखाली विकायची परवानगी दिली जाते. एकदा या
दुकानात शिरले की, सर्व प्रकारचा किराणा, भुसारमाल, दूध, भाजीपाला, भांडी, कपडे,
मद्य, सिगारेट, काही औषधे, चैनीच्या वस्तू असे सगळे तुम्हाला मिळते. सरकारने अशी
दुकाने काढण्यासाठी ५१% परदेशी गुंतवणूक करायला परवानगी दिलीय. त्यामुळे मोठा
पैसा देशात येईल आणि तो पैसा देशाच्या इतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरता येईल अशी
सरकारची धारणा आहे. ही दुकाने मोठ्या शहरात ज्यांची लोकसंख्या १० लाखापेक्षा पुढे
आहे अशाच ठिकाणी काढता येतील आणि त्यामुळे शेतकरी ग्राहक, कारखानदार-ग्राहक
यांच्यामधले दलाल कमी होतील आणि शेतीमाल व इतर वस्तू स्वस्तात थेट ग्राहकाच्या
पदरात पडतील असे सरकारचे मत आहे.
हे म्हणजे आमचे शेतकरी संघटनेचे शरद जोशी म्हणतात तसेच नाही का? दलाल
नको शेतीमालाला उत्पादनाचा दर्जा द्या. हे तर जुनेच आहे. मग आता काहून रान उठले
आहे यावर? का बरं लोक बोंबा मारून राहिलेत? बरं लोक तर लोक ज्यांनी परदेशी
गुंतवणुकीचे धोरण राबवत राज्यकारभार के ला ते भाजपेयी पण एकदम उलट्या उड्या
मारून राहिलेत? असले प्रश्न सगळ्यांनाच गोंधळात टाकणारे आहेत. आपल्या
लोकशाहीचे काय आहे माहितीय का? आपल्याला एखादा प्रश्न लागतो आणि तो सतत
जिवंत लागतो. त्यावर इकडूनतिकडून उलटसुलट बोंबा मारता आल्या की मगच आपण
लोकशाहीवादी असल्याचा साक्षात्कार होतो. या रोगाचे काय करायचे? का खरेच काही
काळेबेरे आहे यात? ज्याने लोक नाडले जातील? शेतकरी देशोधडीला लागतील?
कारखानदार थंड पडतील? आपण ह्या सगळ्या बाबी मुळात जाऊन बघूयात. काही
तपशील थोडा आकडेवारीच्या स्वरूपात आहे
* भारताचे रिटेल मार्के ट हे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकू ण २०% इतके असून
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचे आहे.
* भारतीय अर्थव्यवस्थेत रिटेल मार्के टचा फार मोठा वाटा आहे. एकू ण १२
कोटींपेक्षा जास्त किराणा दुकानदार, छोटे भाजीवाले, कापड दुकानदार, पान
बिडीवाले, किरकोळ विक्रे ते यात मोडतात. हा आकडा फार मोठा आहे; आणि जर या
सगळ्यांसाठी मोठी साखळी असणारे विक्रे ते आले तर त्यांच्या व्यवसायावर फार मोठा
परिणाम होऊ शकतो.
* हा सगळा व्यवसाय अतिशय असंघटीत स्वरूपात आहे. म्हणजे दर २०
किलोमीटरला यात राबणाऱ्या लोकांचे वेतन आणि वेगवेगळ्या वस्तूंचे भाव बदलतात.
* भारताची फार मोठी अर्थव्यवस्था ही बहुतांशी रोख स्वरूपात चालते. ज्यामुळे
फार मोठ्या प्रमाणात रोख चलनाचे व्यवहार होतात. ज्याचा कोणताही मागमूस ठे वता
येणे कठीण आहे. म्हणजे यावरचा विक्रीकर वगैरे सरकारला मिळत नाही. कारण सगळे
व्यवहार हे पावतीशिवाय होतात.
* संघटीत असणाऱ्या (एकू ण व्यवहाराच्या ४%) रिटेल व्यवसायात फक्त सात
लाख लोक आहेत; तर असंघटीत रिटेल (९४%) मध्ये सुमारे पाच ते सात कोटी लोक
आहेत. इतका फरक जगात कोणत्याही देशात नाही. म्हणजे या सर्व पाच ते सात कोटी
लोकांना प्रॉव्हिडंट फं डसारख्या कोणत्याही रोजगाराच्या सवलती मिळत नाहीत.
* भारतात दरहजारी लोकांमागे विविध प्रकारची ११ दुकाने आहेत आणि जर हा
व्यवसाय सरकारने परदेशी गुंतवणुकीला मुक्त के ला तर यात सुमारे २ ते ३.५ हजार
कोटींचा व्यवसाय होऊ शकतो पण जो असंघटीत असल्याने किती होतो ते कळत नाही.
* उद्योगधंदे अथवा शेतीच्या व्यवसायापेक्षा या व्यवसायात जास्त मजुरांचे शोषण
होते. कारण याची व्याप्ती समजू शकत नाही.
इतक्या तपशिलानंतर तुम्हाला कळू शके ल की हे क्षेत्र असंघटीत राहणे कोणाच्या
फायद्याचे आहे? दलालांच्या आणि छोट्यामोठ्या व्यापारीवर्गाच्या हे असेच चालू राहणे
निश्चितच पथ्यावर पडणारे आहे. समाजाच्या एका वर्गाचे सततचे शोषण करणारा हा
अविरत चालत आलेला व्यवसाय आहे. म्हणून त्यात शिस्त आणून थोडी जरब बसणे
आवश्यक आहे.
ह्या सगळ्या प्रश्नांची अजूनही एक बाजू आहे आणि तिची मुळे आपल्या
समाजव्यवस्थेत आहेत. आपल्या व्यवहाराच्या परंपरेत आहे. गेली काही वर्षे रिलायन्स,
सुभिक्षा, बिर्लाचे मोअर म्हणा अथवा बिग बाजार अशा मोठ्या साखळ्या उभ्या राहिल्या.
पण आज काय परिस्थिती आहे? तर सामान्य लोक अजूनही कोपऱ्यावरच्या वाण्याकडून
सामान आणणे पसंत करतात; कारण तो जरी नाडत असला तरी सामान उधारीवर
द्यायला कधी नकार देत नाही. लोकांचा जर असल्या साखळी दुकानांवर विश्वास असता
तर ती बंद पडती ना. वास्तविक आयटी म्हणा किंवा इतर बिपीओजमुळे समृद्ध झालेला
नवश्रीमंत वर्ग जो प्रामुख्याने शहरात राहतो त्याशिवाय कोणीही असल्या दुकानात जात
नाही; मग 'बाय वन गेट वन फ्री'चे कितीही मोठे फलक लागले असूं देत. याला दोन
कारणे आहेत - पहिले म्हणजे आर्थिक, ज्यात मुळात देशातल्या ४० कोटी लोकांकडे
खरेदीक्षमताच नाही. आणि दुसरे म्हणजे, पारंपरिक (जे म्हणाल तर खरे नाही). ज्यात
दरिद्री म्हणजे प्रामाणिक आणि श्रीमंत म्हणजे फसविणारा असा एक आपल्या समाजात
खोलवर दडलेला समज आहे. जोपर्यंत समाजातील विषमता दूर होत नाही तोपर्यंत हा
समज जाणे शक्य नाही. आजही भारतात शेअरबाजारात पैसे गुंतवणारे अथवा त्यावर
अवलंबून असणारे ८% पेक्षा जास्त लोक नाहीत. म्हणजे एकू ण १११ कोटी जनतेला
शेअरबाजाराचा निर्देशांक २०,००० झाला काय किंवा १०,००० झाला काय काहीही
फरक पडत नाही. शेअरबाजाराच्या निर्देशांकावर देशाचे धोरण रेटणाऱ्या देशाच्या
अर्थतज्ञ धुरिणांनी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन याचा कधीतरी विचार करणे आता
अपरिहार्य आहे.
दुसरा एक मुद्दा असा, की आज आपल्या देशात नाशवंत माल (भाजीपाला, दूध,
मांस, अंडी व इतर जीवनावश्यक वस्तू) के वळ तो टिकवण्याची योग्य व्यवस्था नसल्याने
फे कू न द्यावा लागतो. तो शहरात पोचला पण जर विकला गेला नाही तर त्याची किंमत
शून्य होते. एका अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ३० ते ४० हजार कोटी रुपयांचे
(हा आकडा अतिशय तोकडा असण्याची शक्यता आहे) धान्य वाया जाते. यात
पिकवलेले धान्य, विक्री न झाल्याने सडणाऱ्या भाज्या, फळे, मांस, अंडी,
दूध हे सर्व आले. याला साठवण्याची अपुरी व्यवस्था, अप्रगत वितरणव्यवस्था
अशी अनेक कारणेही आहेत; पण सरकारी पातळीवरचे कोडगेपण, आयात-निर्यातीचे,
आंतरराष्ट्रीय नावाखाली चालणारे राजकारण, सरकारचे शेतीकडे व्यवसाय म्हणून
असणारे अक्षम्य दुर्लक्ष, धान्यदलालांचे राजकारणाशी असणारे साटेलोटे आणि एकू णच
देशाचा सर्वंकष, सर्वगामी विचार करण्याच्या कु वतीचा अभाव हे आहे. नवे रिटेल धोरण
ठरवताना असले इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याचा सर्वंकष विचार झाला असण्याची शक्यता
दुर्मीळ आहे. खरेतर सरकारला या सगळ्या पैशातून प्रगत राष्ट्रांत असणाऱ्या अशा
सगळ्या व्यवस्था उभ्या करणे शक्य झाले असते; पण सरकारचा स्वत:च्या
निर्णयक्षमतेवर जसा भरवसा नाही तसाच एखादे धोरण राबवण्याच्या क्षमतेवर पकड
अजिबातच नाही. तसे असते तर या धोरणास शेतकरी, मजूर आणि ग्राहकवर्ग यांनी
एकमुखाने पाठिंबा दिला असता.
आतापर्यंत कोणतेही धोरण राबवण्याच्या सरकारच्या वकु बाचा अनुभव जनतेला
नाही. रस्तेबांधणी, क्रीडासंकु ल उभारणी, साधी खाजगी वाहतूकव्यवस्थेला परवानगी
देताना त्यांच्यावर जनतेला नडणार नाही असे कठोर नियम लावण्याची साधी कु वत
नसणारे कोणत्या तोंडाने हा वकू ब सिद्ध करतील? याउपर व्यापाऱ्यांचा विरोध असलाच
तर तो स्पर्धेपरता आणि दलालीच्या साठमारीचा आहे. त्यात जनतेचा काही फायदा आहे
असे नाही. त्यामुळे रिटेल धोरणाला विरोध करताना जसे आपल्याला हे १२ कोटी लोक
रस्त्यावर येणार नाहीत हे पाहावे लागेल तसेच वरील बाबी सुरळीत होतील हेही पाहावे
लागेल. एखादे धोरण नेटाने राबवताना सरकारच कच खात असेल तर सामान्य लोकांना
विश्वास तरी कसा येणार? (राजकीय विरोध सोडा त्याचे महत्त्व फारच तात्पुरते आणि
बेगडी लोकप्रियतेचे आहे) आजपर्यंत सरकारने एकदाही हे धोरण कसे योग्य आहे हे
जनतेला विश्वासात घेऊन सांगितले नाही. उलट ते साटेलोटे सांभाळण्याच्या भानगडीत
व्यग्र आहे. हा अविश्वास हीच खरी अडचण आहे आणि ती सरकारने अथवा समाजातील
अर्थकारणाचे सुलभीकरण करणाऱ्या संस्थांनी सोडवायची गरज आहे. पण आपल्याकडे
दुर्दैवाने अशा काही वस्तुनिष्ठ धोरण राबवणाऱ्या संस्था नाहीत आणि म्हणून धोरण
चुकीचे नसताना त्यासाठी आवश्यक असणारी धारणा नसणे हेच सरकारचे फार मोठे
अपयश आहे.
पण एकीकडे सरकारी धोरणाच्या फायद्यापासून वंचित असणे तर दुसरीकडे
सुव्यवस्थेचे कोणतेही लाभ इतर राजकीय पक्षांनी जनतेपर्यंत न पोच देणे यात बिचारी
आपली जनता ससेहोलपट सोसते आहे. हे आपले संचित आहे आणि भविष्यही!
५. शुभ्र काही जीव घेणे

'जगातला पहिला साखर घातलेला गरम चहाचा कप पिणे ही एक ऐतिहासिक


घटना होती. कारण तिथूनच एका नवीन समाजव्यवस्थेचा पाया नव्या आर्थिक आणि
सामाजिक मांडणीवर रचला गेला. आपण हे नीट समजून घेतले पाहिजे कारण त्या
दिवशी जे घडले त्याने भविष्यात उत्पादक आणि ग्राहक यांच्या नात्याच्या, इतके च
कशाला पण माणसाच्या आणि निसर्गातल्या काही मूलभूत बदलाची एक भयसूचक घंटा
वाजवली.'
सिडने मित्झ (Sweetness and Power या लेखातून)
साखर ही एक तोंड गोड करणारी वस्तू आहे, साखरेच्या पाठोपाठ आणि आधी
फक्त आनंदाचे क्षण असतात, ती हातावर देणे हे शुभसूचक आहे, ‘साखरेचे खाणार
त्यालाच देव देणार' वगैरे हे सगळे उदात्तीकरण बाजूला ठे वून, जर मी तुम्हाला सांगितले
की ही सगळी वाक्ये म्हणजे सकारात्मक विचार करण्याचा अतिरेक आहे तर कसे
वाटेल? पण खरे सांगतो, साखरेचा शोध, तिचे उत्पादन आणि तिचा वापर यांच्या
प्रवासात, इतिहासात डोकावून पहिले तर वेगळे काहीही हाती लागणार नाही याची मला
खात्री आहे. जगभरात अनिवार्य असलेला साखर-उद्योग हा मानवी हक्क, गुलामगिरी,
पर्यावरणाची हानी, फस्त करण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टींना इतक्या वाईट पद्धतीने
जन्म देत आलाय की तुम्हाला या गोड पदार्थाचा कडवट धिक्कार करावासा वाटेल.
साधारण १००० वर्षांपूर्वी साखर ही तिच्या गोड गुणधर्माशिवाय काही वैद्यकीय
उपचार, पदार्थ टिकवणे यासाठी एक आवश्यक बाब म्हणून वापरली जायची. सतराव्या
शतकापर्यंत ती एक उच्चभ्रूसाठी असणारी चैनीची वस्तू होती. तिला जर मोठा ग्राहकवर्ग
तयार करायचा असेल तर ती सर्वसामान्यांच्या गरजेची बाब के ली पाहिजे हे स्पेनच्या
काही चाणाक्ष व्यापाऱ्यांच्या ध्यानात आले होते. त्याला चालना देण्यासाठी सर्वप्रथम
स्पेन आणि पोर्तुगालमध्येच होणारे उसाचे उत्पादन मग हळूहळू करेबियन बेटे, दक्षिण
अमेरिके त हलवण्यात आले. तिथे उसाचे मुबलक उत्पादन घेऊन ते नंतर लिस्बनला
पाठवले जायचे आणि तेथील साखर कारखान्यात साखर तयार व्हायची.
यातूनच अनेक पूरक व्यवसायांना जन्म मिळाला. ऊस लागवड, ऊसतोडणी,
त्याची वाहतूक, साखर उत्पादन, साठवण आणि घाऊक आणि किरकोळ मालाची
वाहतूक या सगळ्या उद्योगांना बरकत येऊ लागली. त्याचबरोबर या सर्व कामासाठी
मोठ्या प्रमाणात मजूर लागू लागले. साखर व्यवसायातल्या नफ्याची शक्यता जशी गडद
होत गेली तसे खर्च वाचवण्यासाठी नामी उपाय शोधले जाऊ लागले. मुख्य गरज होती
मजुरांची. मग स्पेनच्या मस्तवाल व्यापाऱ्यांनी सारे जगच आपल्या बापाच्या मालकीचे
असल्याच्या थाटात थेट आफ्रिके तून मजूर आणायला सुरुवात के ली. यांना कमी म्हटले
तरी मजुरी कशाला द्या, त्यापेक्षा ठे वा आपल्यासोबत पाळीव प्राण्यासारखे. मग जन्माला
आली ती मानवांची गुलामगिरी. एक लक्षात घ्या - अन्यायाच्या सर्व प्रथा युरोपियन
माणसांनीच सुरू के ल्या आहेत. मग गुलामांचा व्यापार सुरू झाला. सतराव्या शतकात
साखरेच्या हव्यासापोटी ऊसतोडणीला लागणारे मजूर वाढू लागले तसे बार्बाडोस,जमैका
इथे गुलामांचा मोठा व्यापार सुरू झाला. त्यांचे बाजारभाव, बोली ठरू लागली. जगातील
मागास देशातून जहाजे भरून मजूर तिथे उतरवले जाऊ लागले.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला या मजुरांची संख्या १० लाखांपर्यंत पोहोचली
होती. जगभर जशी साखरेची मागणी वाढू लागली तशी मग या व्यवसायात युरोपियन
पुढारलेल्या राष्ट्रांकडून आर्थिक गुंतवणूक वाढत गेली. आज जगाच्या साखर फस्त
करणाच्या हव्यासाकडे पाहिले तर असे लक्षात येते साखर हे पहिले असे उत्पादन होते
ज्याची जगभर गरज निर्माण करून त्याला एका अवाढव्य उद्योगाचे स्वरूप देण्यात
आले. ह्यात एका पिकापासून दुसरे उत्पादन तयार करून, ते अनेक पदार्थांत वापरण्याचा
आणि त्याची सवय लोकांना लावण्याच्या व्यापार-नीतीचा जसा भाग होता, तसाच त्या
निमित्ताने पुढे शतकभर चाललेल्या जगभरच्या माणसांना गुलाम बनवण्याच्या एका क्रू र
आणि अमानवी साम्राज्यशाहीचाही तो पाया होता.
मग युरोपात अठराव्या शतकात साखरेच्या व्यवसायाने पाव, मांस, दूध असल्या
पारंपरिक व्यवसायांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले. साखर उत्पादनाची नवनवीन
तंत्रे विकसित झाली, तसे उत्पादन वाढले. मागणी-पुरवठा न्यायाने साखरेच्या किमती
कमी होत गेल्या. एक दिवस त्या किमती कमी होत ती आता विशिष्ट उच्च वर्गाची चैनीची
वस्तू न राहता सामान्य लोकांची आवश्यक बाब बनत गेली. एकदा मागणी पुरवठ्याचे
गणित जमले, नफ्याची बेगमी झाली तशा अजून उत्पन्न मिळवायच्या नवीन क्लप्त्या
शोधण्यात आल्या. आर्थिक शिस्त आणायच्या नावाखाली या व्यापारासाठी मग करांची
मांडणी झाली. विविध करांच्या आकारणीचे दुर्दैवी खेळ सुरू झाले.
'ज्याचे हाती ससा तो पारधी' या न्यायाने ऊस उत्पादकांच्या मागे राजकीय शक्ती
उभ्या राहिल्या. राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांचा एक नवा पाया रचला गेला आणि
त्यासाठी सामाजिक संके तांचा, मानवी सहजीवनाच्या मूल्यांचा बळी द्यायला सुरुवात
झाली. मूठभर लोकांच्या आर्थिक लाभांसाठी संपूर्ण सामाजिक संरचना उद्ध्वस्त
करणारी ही मांडणी पुढे काही विद्वानांनी 'प्रगती', 'विकास' असल्या गोंडस मूल्यचौकटीत
बसवण्याचा प्रयत्न के ला आणि तो आजतागायत सुरूच आहे. सामान्य माणसांची तहान
भागवणाऱ्या, त्याला तरतरी देणाऱ्या चहा, कॉफी आणि इतर उत्तेजक पेयात जेव्हा
साखरेने शिरकाव के ला तेव्हाच ती अपरिहार्य ठरू लागली. एव्हाना साखर जगभरच्या
मध्यमवर्गाची स्टेटस सिम्बॉल झाली होती.
पूर्वी आपल्याकडे गुळाचा चहा घरोघर असायचा. उन्हातून आल्यागेल्याला गुळाचा
खडा द्यायची पद्धत होती. पुढे शहरी भागातल्या काही ठरावीक श्रीमंत आणि उच्च
मध्यमवर्गात साखरेचा चहा देण्यात येऊ लागला. शहरांच्या जीवनशैलीवर जेव्हा आपली
जगण्याची पत ठरण्याचे निकष निश्चित झाले (आपल्या आयुष्याची माती व्हायलाही
खरीतर तिथेच सुरुवात झालीय...असो) आणि मग साखरेच्या मागणीने एकदम झेप
घेतली. जशी साखरेची गरज वाढू लागली तसे ऊसाचे उत्पादनही. त्यासाठी जमिनी,
पाणी या नैसर्गिक स्त्रोतांचे मालकी हक्क महत्त्वाचे ठरले. साखरेचे कारखाने,
डीस्टीलरीज साखरेच्या मळीपासून रम नावाची दारू बनवू लागल्या. असे सगळे
एकमेकांना पूरक; पण पूर्णत: नवीन आणि नवीन ग्राहक निर्माण करणारे व्यवसाय
साखरेच्या आधारे बहरू लागले.
उसतोडणी, त्याची वाहतूक या सगळ्यांसाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या पण
अफाट वाढत गेली. यासाठी आफ्रिके तून धडधाकट, स्वस्त मजूर आयात करताना
गुलामीच्या एका मोठ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे गुलामांवर बंदी आली
तशी मग या व्यवसायात तंत्रज्ञानाची निकड वाढत गेली. विविध देशातल्या सरकारांनी
(विशेषतः अर्ध्या जगावर अधिपत्य गाजवणाऱ्या आणि पक्के व्यापारी असण्याचा
इंग्रजांनी) आयात-निर्यातीचे एक शोषण करणारे धोरण ठरवले. साखर आयात
करण्याच्या प्रयत्नांना बळकटी द्यायला सुरुवात के ली. इंग्रजांच्या ह्या दमनचक्राचे रूप
अत्यंत अमानवी होते. ऊस पिकायचा तिसऱ्या जगात. तेथील नैसर्गिक स्त्रोत (पाणी,
हवा) यासाठी फु कट वापरले गेले. तिथले स्वस्त शेतमजूर ढोर मेहनत करू लागले. या
सगळ्या नैसर्गिक संपत्ती, मानवी कष्टांचे मूल्य ठरवणारे म्हणजेच ऊसाचे साखरेत रुपांतर
करणारे कारखाने मात्र या वसाहतवाद्यांच्या मालकीचे होते. ते हीच तयार साखर प्रचंड
नफा कमावून त्याच गरीब देशांना बाजारभावाने विकत. कारण तिसऱ्या जगात त्याचे
तंत्रज्ञान नव्हते.
या असल्या प्रचंड नफ्याने वसाहतवाद्यांना मोठे आर्थिक पाठबळ मिळवून दिले
यात शंका नाही. साखरेचे उत्पादन ह्या गरीब देशात प्रचंड प्रमाणात निसर्गाची हानी करू
लागले. अनेक जंगलांची बेसुमार तोड झाली. तीन-तीन पिकांचे पाणी एकट्या ऊसाला
लागून बाकी पिकांकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागले; तरी पैसा असल्याने कोणीही ते
थांबवले नाही. साखर कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज भासू लागली.
त्यासाठी लाकू ड, खनिज तेल असल्या निसर्ग स्त्रोतांवर अधिकच ताण आला. साखर
कारखान्यातून निर्माण होणारे दूषित वायू, पाणी, मळी पर्यावरणाची नासाडी करू
लागले. अमर्याद नफा मग त्यासाठी पाण्याची नासाडी, पर्यावरणाची हानी, ते सगळे
आवश्यक ती राजकीय ताकद अशी ही दुष्ट साखळी बनत गेली. आपणही याचा विदारक
अनुभव घेत आहोतच.
साखरेच्या शोधाने अनेक नवीन उत्पादनांना जन्म दिला. कोकाकोला, चॉकलेट्स,
गोळ्या इत्यादी आजची सर्व प्रचंड खप असणारी उत्पादने बहरण्याच्या मागे फक्त एका
साखरेचा शोध आहे. मग चाणाक्ष कं पन्यांनी बरोबर मार्के ट हेरले. कोकाकोलाचा शोध
लागण्याआधी आपल्याला तहान लागत नव्हती असे थोडेच आहे? पण आज जगात दर
व्यक्तीमागे दरवर्षी किमान १२० लीटर इतक्या मोठ्या प्रमाणात कोला, सोडा अशी पेये
रिचवली जातात आणि जगाची लोकसंख्या बघता हे मार्के ट किती मोठे आहे याची
कल्पना करा. साखरेचा खप वाढला आणि त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामामुळे
पुन्हा वैद्यकीय व्यवसायाची भरभराट होत आहे. अनिवार्य गरज नसतानाही जगाच्या
माथी मारलेले आणि अनेक पूरक उद्योगांचे अवाढव्य विश्व उभे करणारे हे एकमेवाद्वितीय
असे प्रॉडक्ट आहे. सतराव्या शतकातला कणभर साखरेचा गोड प्रवास आता स्थानिक
आणि जागतिक व्यापारांच्या विविध वळणांवर नुसताच प्रबळ, अवाढव्य होत गेला असे
नाही; तर त्याने जन्म दिलेल्या, विधिनिषेध नसणाऱ्या कॉर्पोरेट लॉबीज, जगभरची
लाचार सत्ताकें द्रे, मस्तवाल आंतरराष्ट्रीय राजकारण आणि मातीमोल माणसे या
सगळ्यांना बरोबर घेत, तो अत्यंत विषारी, कडवट, कु टील आणि जटील होत गेलाय
हेसुद्धा तितके च खरे आहे.

६. प्रगती आणि विनाशाचे ब्ल्यू प्रिंट

जगाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत मानवाने के लेली प्रगती नि:संशय मोठी आहे.


सुरुवातीला मुठभरच माणसे होती, त्यातून आजची सात अब्ज माणसे घडली. थक्क
करणाराच प्रवास आहे हा! आदिमानवांच्या काळातील मानवी आयुष्य आणि आजचे
मानवी आयुष्य यात सतत विकसित होणाऱ्या बौद्धिक प्रगतीचा खूपच मोठा वाटा आहे.
प्राणीमात्र म्हणून न जगता, माणूस म्हणून आपले जगणे विशिष्ट हेतूंच्या, सखोल
जाणिवेच्या पातळीवर आले आहे आणि जाणिवेच्या तळाशी चांगल्या आणि नवनवीन
गोष्टींसाठी नेहमी अस्वस्थ राहत, सतत पुढे पुढे झेप घेण्याचा एक न आटणारा स्त्रोत
बनले आहे. त्यामुळेच आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो हेही खरे आहे.
अनेक वर्षांच्या प्रवासात, निसर्गावर विजय मिळवताना त्यातल्या आपत्तींची तीक्ष्ण
धार आपण बोथट करत आणली आहे. त्याच्या लहरीपणाचा आपल्याला त्रास होऊ नये
याची भक्कम यंत्रणा उभी के ली आहे हे कबूल करायलाच हवे. या सगळ्यांमुळे आज
मानवाचे जीवन पूर्वीइतके हवालदिल अथवा बेभरवशाचे राहिलेले नाही हेही खरेच. मात्र
हे सगळे करताना निसर्गाशी जोडलेल्या मानवाच्या सहजीवनाचे मूलभूत सूत्र आपण
कु ठे तरी विस्कटून टाकले आहे का? सृष्टीतील व्यक्ती आणि समष्टीच्या अनादी नात्याचा
पोत विरत चालला आहे काय? निसर्गाच्या आणि मानवी जीवनाच्या परस्परावलंबीत
जीवित-कारणांचा एके काळचा खळाळता झरा आता आटत चालला आहे का? खेदपूर्वक
हे नमूद के ले पाहिजे की या सगळ्या प्रश्नांचे उत्तर 'होय' असे येते. आपण सगळेच, या
निसर्गाचा भाग असल्याने, त्यावर अवलंबून असण्याच्या पर्यावरणाच्या बांधीलकीचा
आपल्या सुदृढ, समृद्ध आणि सुरक्षित आयुष्यासाठी मोठा उपयोग अंसतो. प्रचंड
विनाशकारी मात्र तात्पुरत्या अशा संकटांवर मात करताना मात्र आपण हे दुवे खिळखिळे
करत आणले आहेत. तात्पुरत्या संकटावर उपाय करताना त्याच्या आदिम रचनेची वीणच
कु ठे तरी उद्ध्वस्त होते आहे. दिवसागणिक अधिक अन्न, पाणी, ऊर्जा यांचा बेसुमार
उपसा करताना आपण आपल्या अस्तित्वाचे कारणं असणारी, जगण्याचे आश्वासन
जिवंत ठे वणारी निसर्ग-गात्रेच क्षीण करत आहोत. आजारी शरीरावर होणाऱ्या बेसुमार
प्रताविकाच्या तीव्र आणि आंधळ्या माऱ्यासारखेच आहे हे. निसर्गाची असीमीत क्षमता,
वातावरण, हवा, पाणी हे सतत शुद्ध राखण्याची अमर्याद व्यवस्था; कु ठे काय उगवावे
याचा स्तिमित करणारा जीवदायी समतोल; विविध भूभागातील, अगडबंब प्रस्तरातील
असणारी जैविक विविधता, दोन तृतीयांशपेक्षा जास्त क्षेत्र व्यापणारी आणि तरीही
स्वत:च्या मर्यादेचे सहसा उल्लंघन न करणाऱ्या अफाट सागराची जीवसृष्टीचा तोल
सांभाळणारी मग्नता, ठिकठिकाणी उगवणाऱ्या वनस्पतीतील दडलेल्या औषधांची
गुपिते, सृष्टीच्या सतत फिरण्याच्या व्रताशी नाते सांगणारे आणि ऋतुचक्राचे ताल
सांभाळणारे उत्साही वारे अशा या निसर्गचक्राचे मानवी जीवनप्रणालीशी घट्ट असे
जीवशास्त्रीय अतूट नाते आहे. त्यांचा कवडीचाही विचार न करता, फक्त भौतिक
विकासाचा जो अधाशी रेटा आपण फिरवत आणला आहे तो अमानुष आणि अविचारी
आहे. हेच करत सारे तथाकथित विकसित आणि प्रगत जग अशा एका प्रत्ययकारी आणि
परिणामकारक वळणावर सध्या येऊन ठाकले आहे. ते एक दिग्मूढ अवस्थेत आहे आणि
पुन:पुन्हा आपण के ले ते बरोबर का, याचा संयत विचार करते आहे. खरे तर या
वळणावरून जाताना आपण भारत म्हणन विकास आणि विनाश अशा दोन्ही वाटातील
एक निवडतो आहोत असा जरी आव आणत असलो तरी आणखी थोडे पुढे गेले तर या
दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात याचे आकलन आपल्याला आहे असे मात्र दिसत नाही.
...नुसतेच चिंतन करत बसण्यापेक्षा जर या टप्प्यावर जगाच्या एकं दर पर्यावरणाचे
ऑडिट के ले तर काय चित्र दिसते?

संदर्भ : John Cook, 10 Indicators of a Human Fingerprint on Climate


Change, Skeptical Science, July 30, 2010
संदर्भ : (NOAA) via: Climate Change: How do we know? NASA,
accessed October 27, 2009. ..
या अराजकाकडे बघण्याची अजून एक बाजू आहे ती अशी -
वस्तुनिष्ठपणे पाहिले तर आजच्या हवेतल्या एकू ण कार्बन डाय ऑक्साईड या
अत्यंत घातक वायपैकी ८०% वाय हा औद्योगिकीकरणाने प्रगत झालेल्या देशांनी
वातावरणात सोडला आहे. १९५० पासून अमेरिके ने आत्तापर्यंत २५० कोटी टन कार्बन
डाय ऑक्साईड वायू; तर चीनने ७५ कोटी टन आणि भारताने २० कोटी टन इतका हा
वायू वातावरणात उत्सर्जित के ला आहे.
ज्या देशात जगातले के वळ २०% म्हणजे १४० कोटी लोक राहतात ते देश
वातावरणात ६०% कार्बन डाय ऑक्साईड वायू उत्सर्जित करतात. वातावरण
सगळ्यांसाठी असेल तर ही विषारी द्रव्ये वायुयुद्धासारखे किंवा अमेरिके च्या भाषेत
एखाद्या वेपन्स ऑफ मास डीस्ट्रक्शनसारखेच नृशंस कृ त्य ठरतात.
अनिष्ट गोष्टींमुळे बदलणारे पर्यावरण हे एखाद्या मुष्टीयोद्ध्यासारखे असते; तर
येणारे हवामानातील बदल हे त्याचे ठोसे असतात. आता या ठोशातले मर्म जर कळून
घेतले नाही तर परिणाम भोगावेच लागतील.
विकासचित्राच्या तळाशी फक्त यातनांचेच दिवे लागले आहेत असे वाटावे इतकी
दारुण परिस्थिती गेल्या शतकात निर्माण झाली आहे. म्हणजे बघा, ज्या कालखंडात
विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या शोधांनी नवनव्या दिशा शोधल्या, मानवी आयुष्याला नवेनवे
आयाम दिले, ते भौतिक पातळीवर आनंदाच्या गावाला पोहोचवले; त्याच कालखंडात,
मानवी आयुष्याची माती होण्याची, ते विदारक तुटलेपणाच्या पातळीवर येण्याची प्रक्रिया
सुरू व्हावी हा काव्यगत न्याय म्हणावा का?
काही लोक या सगळ्या माहितीशी असहमती दर्शवताना म्हणतात की असे कसे
होईल? या पृथ्वीवर नेहमीच असे वातावरणाचे बदल घडत आले आहेत. होय, मान्य
आहे! पण एक तर ते इतके भयाण असल्याचे पुरावे नाहीत आणि दुसरे म्हणजे काही
तापमान बदल जसे शीतयुग, उष्णलहर घडले असतील तर ते निसर्गाच्या चक्राचा भाग
म्हणून; ते आपण घडवलेले नाहीत. आत्ता जर माणूस सगळ्यात प्रगत आहे असे मानले
तर सद्य:परिस्थितीमुळे होणारे बदल हे काही यापूर्वी घडत नव्हते. त्यामुळे याचे परिणाम
या पूर्वी कधीही दिसले नव्हते. तरीसुद्धा अशा लोकांना वस्तुनिष्ठ उत्तरे देताना एका
सर्वेकडे लक्ष वेधले पाहिजे.
सर्वांत प्रगत राष्ट्र आणि कार्बन डाय ऑक्साईडमध्ये आघाडीवर असणाऱ्या
अमेरिके तील हा सहें आहे.
म्हणजे के वळ हव्यासापोटी निसर्गसंपत्तीचा होणारा नाश, निसर्ग-मानव समतोलाचे
ढळलेले चक्क आणि प्रगत राष्ट्रांचे बेजबाबदार वर्तन या तिहेरी विळख्यात आज उरलेले"
जग सापडले आहे.
वेगवान आणि भरलेल्या शहरांच्या रस्त्यांवर, झगझगीत मॉल्सच्या सुळसुळीत
हालचालीत, चकचकीत कारखान्यांच्या वातानुकु लीत परिसरात राहणाऱ्या, 'उपभोग
घ्या, वापरा आणि फें का' या बेफिकीर विचारप्रणालीत जगणाऱ्या, बाजार निर्देशांकावर
आयुष्याच्या सुखाच्या व्याख्या ठरवणाऱ्या आजच्या आधुनिक, प्रगत टेकसॅव्ही लोकांना .
बहुधा नद्या, जंगले आणि पर्वतरांगांच्या मातीमोल होणाऱ्या अस्तित्वाची माहिती नसेल
आणि असली तरी त्याचा अदमास येणार नाही. त्यांच्या शहरातल्या लिलिप्टच्या,
स्वत:भोवती फिरणाऱ्या सुखी आयुष्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचे किमान
सामर्थ्य उरलेले नसेलही कदाचित; पण ज्या लोकांना या मानवजातीच्या भवितव्याचे
भान आहे, ज्यांना आयुष्याशी निसर्गाचा तोल साधणे मान्य आहे त्यांच्यासाठी संपूर्ण
निसर्ग-चक्राची एका जागतिक सर्वेक्षणात नोंदलेली हानी सांगणे अत्यंत आवश्यक वाटते
-
गेल्या ४० वर्षांत नदी, तळी यांतून होणारा पाण्याचा उपसा दुप्पट झाला आहे.
आपल्याला फक्त ४०% ते ५०% च ताजे पाणी उपलब्ध आहे. (ताजे म्हणजे
नदीचे, निसर्गात सतत वाहते असणारे) १९६० ते २००० या काळात मोठमोठ्या धरणांत
साठवलेले पाणी हे नद्यांच्या एकू ण पाण्यापेक्षा ६ पटीने जास्त होते. जगातील एकू ण
२४% जमीन ही काहीच ठरावीक पिकांच्या लागवडीखाली आली आहे (कारण तेच -
पैशाचा लोभ) ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जैविक विविधतेचा नाश झाला आहे. हे नुकसान
१८व्या आणि १९व्या शतकातल्या नुकसाणीच्या एकू ण बेरजेपेक्षाही जास्त आहे.
१९८० पासून जगातील एकू ण ३५% तिवरांची जंगले नष्ट झाली आहेत. 7
जगातील खनिज कोळशाची २०% संपत्ती कायमची नाश पावली आहे; तर अजून
२०% निरुपयोगी ठरली आहेत.
सध्या जगात मानवी जीवन इतर सर्व नैसर्गिक स्त्रोतांपेक्षा जास्त, नायट्रोजन
निर्माण करते; तर १९१३ साली शोधले गेलेले नायट्रोजन हे खत गेल्या २५ वर्षांत
आधीच्या एकू ण काळापेक्षाही जास्त प्रमाणात वापरले गेले. समुद्रात होणारा
नायट्रोजनचा विसर्ग हा मागील शतकापेक्षा दुप्पट झाला आहे.
जगातील शेतजमिनीत फॉस्फरसचे प्रमाण १९६०-१९९० या काळातील
प्रमाणापेक्षा तिपटीने वाढले आहे.
जगातील एक चतुर्थांश जलचर नष्ट झाले आहेत.
शेतीत वापरल्या जाणाऱ्या खतात किमान १०० अशी विषारी द्रव्ये आहेत ज्यामुळे
आपले आयुष्य कर्क रोगाने, जन्मत: असाध्य व्याधींनी ग्रासते.
प्रचंड प्रमाणात खते वापरूनही गेल्या ३० वर्षांत धान्याचे दरमाणशी उत्पादन एक
तृतीयांश झाले आहे. जगातील जलचर प्राण्यांची जैविक-साखळी जवळपास खंडित
होण्याच्या मार्गावर आहे.
विस्कटलेल्या निसर्गचक्राने सुमारे दोन अब्ज लोकांच्या आयुष्याची वासलात
लावली आहे.
आत्तापर्यंतच्या इतिहासात जगातील प्रदूषण प्रथमच एका धोक्याच्या वळणावर
येऊन उभे ठाकले आहे.
प्रचंड प्रमाणात प्रजाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे 'जीवो जीवस्य जीवनं' हा
मूलमंत्र खोटा ठरू पाहतो आहे.
हा सगळा धांडोळा अजून खूप मोठा आहे. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या
वाळवंटांचाही त्यात समावेश होतो. 'जग विकासाच्या या टप्प्यावर आहे' हे असे गोंडस
चित्र आहे असे जर कोणी म्हणते तर या अज्ञानाला काय म्हणावे? भारतात काय वेगळे
आहे? फक्त ७% लोक ज्यात गंतवणूक करतात अशा सेन्सेक्सच्या निर्देशांकावर आपण
आपला विकास ठरवतो आहोत. म्हणजे विनाशाचे ब्ल्यू प्रिंटच अनुसरायचे; तर मग
उगाच महासत्तेच्या गमजा कशाला मारा?

७. जीवो जीवस्य मरणं!!

आपण पिकवत असलेले धान्य आणि आपली लोकसंख्या यांचे प्रमाण व्यस्त
असल्याचा दावा सतत के ला जातो. एवढ्या लोकसंख्येला पुरणारे धान्य आहे कु ठे ? ते
पिकवणारी सकस जमीन आहे कु ठे ? त्यासाठी लागणारे पुरेसे शुद्ध पाणी आहे कु ठे ?
आज सात अब्जापर्यंत जाऊन पोचलेल्या जगाच्या लोकसंख्येला हे सगळे कसे पुरणार?
असे सगळे वरवर निरुत्तर करणारे आणि जणू उत्तरेच नसणारे प्रश्न विचारले जाऊ लागले
आहेत. विकासाच्या अंध आणि बेफाम वाटेवर स्वत:ची, स्वत:च्या मानवी जीवनपद्धतीची
वाट लावून घेणाऱ्या प्रगत राष्ट्रातील अनेक विद्वान असे प्रश्न विकसनशील देशांना
विचारत आहेत. एकीकडे एके क क्षेत्र परदेशी गुंतवणुकीला खुले होत असताना तर हे प्रश्न
जास्तच कु टील, हेतुपूर्ण आणि भीतीदायकही ठरू शकतात.
आपल्यासारख्या कृ षी संस्कृ तीशी हजारो वर्षे नाळ असणाऱ्या आणि हरित, श्वेत
अशा अनेक क्रांत्या स्वत:च्या जीवावर यशस्वी करणाऱ्या देशाला, हे प्रश्न काल परवाच्या
भुक्कड विद्वानांनी,त्यातही कार्पोरेट क्षेत्राकडून पोसले जाणाऱ्या मुखंडांनी विचारावे हे
नुसते संतापजनकचं नाही तर अनाठायीसुद्धा आहे. हे सगळे आठवायचे कारण सध्या
आपल्या देशात GM (Genetically Modified) फू डची चर्चा वेगात सुरू आहे. जणू
जमीन नासली आहे, वांझोटी झाली आहे, माणसे भुके ली आहेत आणि आता
तंत्रज्ञानाला काहीतरी हातपाय हलवल्याशिवाय काही खरे नाही म्हणून तेच आता अन्नही
पिकवतील. आपल्या सगळ्या भके लेपणाचे उत्तर अशा पद्धतीने विकसित के लेले अन्न
देऊ शकते असेही मोठ्या वकु बाने पटवले जात आहे. शास्त्रीय दृष्टिकोनाचे सतत गळे
काढणारे आता सरसावले आहेत.
वास्तविक दुनियेतली वाढत जाणारी भूक अथवा प्रचंड उपाशी जनता एकीकडे;
तर प्रचंड धान्य उत्पादन दुसरीकडे अशा एका विचित्र वळणावर जग आणि आपणही
सध्या आहोत. प्रचंड धान्यसाठा आहे आणि माणसे उपाशी आहेत ही परिस्थिती GM
फू डने बदलेल असा विचार करणे खुळचटपणाचे आहे. कारण माणसे उपाशी आहेत
याचा अर्थ त्यांच्याकडे हवे ते अथवा आवश्यक अन्न विकत घ्यायला पुरेसे पैसे नाहीत हा
आहे. आजही जगातील अनेक कु पोषणग्रस्त प्रदेश अथवा भुके ली माणसे तशी का
आहेत याचे खरे उत्तर दारिद्र्यात अथवा इतर कारणात सापडेल.
GM ने सगळे बदलेल, ते अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे रसायनांचा वापर कमी
होऊन जास्त उत्पादन घेता येईल असे अनेक दावे त्याचे समर्थक करत असतात. पण
जेनेटिकली मॉडिफाईड फू ड नेमके काय आहे? ते एक जैविक तंत्रज्ञान आहे - ज्यात
शास्त्रज्ञ एका जीवपेशीतील जीन्स काढून ते दुसऱ्या जीवपेशीत टाकू शकतात. यामुळे
होणाऱ्या जैविक प्रक्रियेत अनेक नवीन जीव तयार होतात. आता हे कृ त्रिम अन्नासंदर्भात
असल्याने विविध वनस्पतीबद्दलच हा विषय नीट लक्षात घेऊ या. नेहमी असे ठासून
सांगितले जाते की कोणतेही जेनेटिक मॉडीफिके शन हे (समस्त प्राणी आणि वनस्पतीत)
नैसर्गिकरीत्याच असणाऱ्या निपजप्रक्रियेसारखे आहे. पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही.
पारंपरिक उत्पादन किंवा निपज पद्धतीत (organism) निसर्गत:च काही ठोस
अडथळे असतात किंवा विशिष्टच मार्ग असतात असे आपण म्हणू. उदाहरणार्थ - कापूस
आणि उंदीर अशी एकमेकातून निपज होऊ शकत नाही. पण जेनेटिक मॉडीफिके शन
मात्र अशी पद्धती आहे ज्यामुळे हे जीन्स निसर्ग निपजपद्धतीच्या पलीकडे जाऊ
शकतात. अजून एक उदाहरण द्यायचे तर = समजा, जेनेटिक बदल करून एखाद्या
माशाचे जीन्स एखाद्या टोमॅटोमध्ये गेले तर कसे वाटेल? सगळ्या जीवप्रक्रियेत मग तो
विषाणू असो वा माणूस, अंतर्भूत अशा काही आज्ञावली असतात. ज्यायोगे त्या जीवाचे
प्रजनन, विकसन, वाढ आणि जिवंत राहणे हे ठरते. पेशीतल्या एक मोठ्या रेणूत हे सर्व
सामावलेले असते. हाच आपल्याला परिचित असलेला DNA. हा जो DNA असतो तो
अनेक सूक्ष्म भागात विभागला जातो. ज्यायोगे त्या जीवाच्या अस्तित्वाची आणि वाढीची
प्रक्रिया नियमित आणि नियंत्रित होत असते ते म्हणजे जीन्स. जेनेटिक मॉडीफिके शन या
पद्धतीत मात्र हा DNA तोडून तो एका निपजप्रक्रियेतून दुसऱ्या निपजप्रक्रियेत पाठविला
जातो. जेनेटिक इंजिनियर DNAचे वेगवेगळे तुकडे वापरून ज्यातून नवीन जीन्स तयार
करून ते पुढे वेगवेगळ्या हव्या त्या निपजपद्धतीला जन्म देतात, हे सगळे जैविक
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य आहे. त्याचा एक निश्चित असा उपयोगही आहे.
उदाहरणार्थ, विशिष्ट रोगांच्या विषाणूंची वाढ नियंत्रित करणे. फार तपशिलात न जाताही
इथे आपल्याला कळू शके ल की मुळात ही पद्धत निसर्गनियमाला धरून नाही. म्हणजे
सुरुवातीला पूर्ण अंदाज येणार नाही आणि झाल्यावर लगेचच लक्षात येणार नाहीत असे
काही अत्यंत दूरगामी परिणाम तिचे असू शकतात.
निरनिराळे जीन्स अशा पद्धतीने घुसवून तयार होणाऱ्या नवीन अन्नात प्रथिने वगैरे
अन्नघटकांचे प्रमाण, त्यांचे स्वरूप हे सगळेच वेगळेच आणि विपरीतही असू शकते.
त्याचे अनेक दुष्परिणाम ते सेवन करणाऱ्या मानवी आरोग्यावर होऊ शकतात. पुढे
जाऊन असेही म्हणता येईल की असे अनेक दुष्परिणाम जसे उद्भवतील तसे त्यांचे
स्वरूप लक्षात येईल; पण तोपर्यंत त्याच्या कारणमीमांसेची मूळ उद्भवाशी सांगड घालणे
कदाचित शक्यही होणार नाही. असो. अशा प्रकारे तयार होणाऱ्या धान्याला ‘फॉर्म क्रॉप'
असे संबोधले जाते. आजमितीला जगभर अशा प्रकारचे धान्य पिकवण्यासाठी हजारो
परवाने दिले गेले आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे अन्न जगातल्या प्रगत देशात आणि
विकसनशील देशात सध्या वेगवेगळ्या अन्नसाखळीच्या बँडेड दुकानात मोठ्या प्रमाणात
उपलब्धही झाले आहे.
जेनेटिक फू ड तयार होऊन आता जवळपास २० वर्षे होत आली आहेत आणि
नेमकी याच वेळी त्याच्या दुष्परिणामांची चर्चा सुरू झालीय. आता अनेक राष्ट्रे या
संदर्भात अधिकच सजग होऊ पाहताहेत. प्रगत राष्ट्रांच्या नेहमीच्या खाक्यानुसार स्वत:
यातून बाहेर पडून, आता हे सगळे संशोधन, त्याचा वापर आणि व्यापार, ही पिके
विकसनशील देशांकडे वळवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय. नुकतेच आपल्याकडे
बीटी जातीच्या वांग्याच्या लागवडीवरून उठलेले वादळ आठवत असेलच.
जागतिकीकरणाच्या असामान्य दबावात, सध्या भारत आपली प्रचंड बाजारपेठ आणि
तिची अधिकाधिक क्षेत्रे परदेशी गुंतवणूक आणि वापरप्रक्रियेला खुली करत आहेच.
आपल्या देशातील दारिद्र्य आणि उपासमार हासुद्धा या सगळ्या प्रचाराला सुसंगत
असाच मुद्दा असल्याने अशा प्रकारची जेनेटिकली मॉडीफाईड बियाणे आपल्या देशावर
लादली जाण्याची शक्यता आता बळावत चालली आहे. काय आहेत याचे दुष्परिणाम? हे
सगळे नेमके काय आहे ते नीट समजावून घेतले पाहिजे.
मुळात हे जेनेटिक फू डचे फॅ ड म्हणा अथवा निकड म्हणा आली ती विविध
बियाणांवरच्या रोगांना प्रतिबंध करणारे संशोधन करताना. वातावरणातून, पाण्यातून
लागणाऱ्या विविध किडींपासून पिकांचे संरक्षण व्हावे, त्यांची जोमाने, सकस वाढ व्हावी
म्हणून हा शोध अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा होता. तो प्रश्न जसा आटोक्यात आला
तसे संशोधन निघाले पुढे. पिकांचा नाश होऊ नये अशा वाटेवर सुरू झालेले हे संशोधन
पोचले थोड्या पैशात, थोड्या संसाधनात जास्त पिकावे; मजबूत नफा मिळावा या
फसव्या वाटेवर । मग पुढे जात रोगापेक्षा औषध भयंकर या न्यायाने हे असले संकरीत
अन्न एकदम स्वस्त पडू लागल्याने त्याचे उत्पादन एखाद्या कारखान्यात होणाऱ्या
उत्पादनासारखे अखंडित उत्पादनासारखे करावे, मग त्यातून अफाट नफा मिळवावा
अशी लालसा मोठमोठ्या बायो क्षेत्रातल्या कं पन्यांच्या मनात निर्माण झाली. नफ्याला
एकच भाषा कळते नफ्याची! निरोगी असण्याची अथवा नसण्याची कळत नाही!
उलटपक्षी पाहता एखादा रोग ही तर उत्तम नफ्याची हमी. मग काय परवाने वाटले गेले.
उत्पादन सुरू झाले. काही वर्षे उलटून गेली. ज्यांनी हे शोध लावले त्यांना पारितोषिके
मिळाली. सत्कार झाले. 'मानवाच्या इतिहासाच्या वाटेवरील लक्षणीय मुक्काम' वगैरे
ठोकळेबाज शब्दप्रयोग झाले. ल अशा पिकांचा वापर वाढू लागला तसे त्याच्या
धोक्याचीही चर्चा सुरू झाली. ह्या असल्या अन्नाचा मानवी आरोग्याला असणारा धोका,
उद्भवणाऱ्या निरनिराळ्या अॅलर्जिक अवस्था आणि त्यांना ह्या अन्नाच्या सेवनाने
मिळणारे उत्तेजन, यातल्या जीनची स्थिरता, त्यातून मिळणाऱ्या पोषकद्रव्यांचे प्रमाण
यासाठी मग चाचण्याही सुरू झाल्या. त्यांचे भयावह निकाल आले. इथे हे लक्षात
घ्यायला हवे की जेनेटिक इंजिनिअरींग नेहमीच निपजप्रक्रियेतून प्रथिने खाद्यपदार्थात
संक्रमित करत आलेले आहेत. ब्राझीलमध्ये एकदा काही विशिष्ट कडधान्यातील प्रथिने
सोयाबीनमध्ये संक्रमित के ली आणि त्याच्या सेवनाने अनेकजण दर्धर रोगाचे शिकार
झाले. नंतर खुप दिवसांनी संशोधनांती कळले की, ही माणसे त्या विशिष्ट कडधान्याला
अॅलर्जिक होती. आता समजा, एखाद्या मुलाला दुधातल्या प्रथिनांची अॅलर्जी आहे.
त्या दुधातले काही जीन्स जर जेनेटिकली बदललेल्या गाजरात संक्रमित के ले असतील,
तर त्या मुलाला, त्याच्या आईला, त्याच्या डॉक्टरला, हे सहजासहजी कधीच कळणार
नाही की कशामुळे त्याला त्रास होतो आहे. कारण त्याला तर दुधाची अॅलर्जी होती हे
माहीत आहे; पण तो तर आता गाजर खातोय.
दुसरीही एक गोष्ट लक्षात आली ती अशी की, असे GM फू ड खाल्ल्याने त्यात
असणारे जीन्स आपण एखाद्या रोगावर घेतलेल्या एखाद्या प्रतिजैविक औषधांच्या
परिणामाला बाधक ठरू शकतात. GM फू ड मधले हे जीन्स शरीरात असणाऱ्या एखाद्या
विषाणूतही प्रवेश करू शकतात. एक साधे उदाहरण पाहू, नुसती पाण्यावर मारलेली
जंतुनाशक DDT पावडर, माशांच्या पोटात सापडून लोकांना विषबाधा होत असल्याची
उदाहरणे आहेत. मग GM फू डमुळे तर त्या संपूर्ण पिकाची संरचनाच बदलते आहे आणि
त्यामुळे काय काय होते त्याची नीट माहिती नाही. त्याचा अंदाजही रोगाला बळी
पडल्याशिवाय येत नाही, तर हे भीषण नव्हे काय?
आपल्या जीवप्रक्रियेतून, चयापचयाच्या सतत चालणाऱ्या क्रियेतून अनेक विषारी
द्रव्ये तयार होत असतात आणि कोणतीही वनस्पती/शरीररचना हे सर्व बाहेर
टाकण्यासाठी सतत कार्यरत असते. म्हणजेच काय तर आपली संरक्षक यंत्रणा अशा
प्रकारची द्रव्ये तयार करतात ज्यामुळे या विषारी द्रव्यांचा आपल्या शरीरयंत्रणेवर फारसा
परिणाम ती द्रव्ये होऊ देत नाहीत. इथे मात्र असेही आढळून आले की, या नवीन GM
फू डमुळे अशी काही नवीन विषारी द्रव्ये तयार होतात, ज्यांचे काय करायचे हेच आपल्या
संरक्षकप्रक्रियेला कळत नाही. समजा, जेनेटिक पद्धतीने कॉफी तयार करताना त्यातील
कॅ फीनच काढून टाकले. (डीकॅ फीनेटेड कॉफीची फॅ शन आहेच की) कारण ते आरोग्याला
चांगले नाही. आता याच कॅ फिनमुळे कॉफीला बुरशी लागत नाही हेही खरेच आहे. मग
प्रश्न असा उभा राहतो की आता ह्या नवीन कॉफीच्या दाण्यांना बुरशी लागेल आणि मग
ती बुरशी परत अशी काही विषारी द्रव्ये तयार करील जी नॉर्मल पद्धतीने नष्ट करता
येणार नाहीत. म्हणजेच हे ऋच फू ड अशा काही नवीन विषारी द्रव्यांना सतत जन्म देत
राहील. अनेक पिकांत अशा प्रकारची विषारी द्रव्ये तयार होत राहिली, तर ती खाणारे
प्राणी, त्यांना खाणारी माणसे अशा सगळ्यांनाच हे मारक ठरेल.
GM फू डने जगाचे भुके लेपण नष्ट होईल हा असाच एक हास्यास्पद दावा आहे.
भारताचे उदाहरण पाहू. आपल्या देशात धान्याची कोठारे भरलेली आहेत आणि त्याच
वेळी काही कोटी माणसे उपाशी आहेत तर, काही कोटी लोकांना कु पोषणाचे बळी ठरावे
लागते. आता जर हे असलेले अतिरिक्त धान्य यांच्या तोंडापर्यंत पोचू शकत नाही तर
जेनेटिक फू डने असे काय वेगळे घडणार आहे? मग भारतात GM फू डची चर्चा कशाला
होते? याचे कारण सरकारवर आंतरराष्ट्रीय बायो-टेक्नो उद्योगाकडून येणारा प्रचंड दबाव.
कोणतेही शास्त्रीय सल्ले, प्रशासकीय मत, राजकीय इच्छाशक्ती पूर्ण बदलले जाऊ
शकते इतके पाशवी असे आर्थिक साम्राज्य या बहुराष्ट्रीय कं पन्यांकडे आहे.
दुसरे कारण म्हणजे गेल्या तीन दशकात भारतात शोधांच्या दुनियेत फारसे काही
विशेष न घडल्याने GM फू ड हे एखाद्या चलनी नाण्यासारखे या देशातल्या काही
शास्त्रज्ञांना कदाचित स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी वापरावेसे वाटते. त्यांच्याकरता हे
संशोधन त्यांच्या जगण्याची काळजी घेणारे ठरू शकते. पण आमचे काय हो? आत्ता या
क्षणाला भारतात कापूस, मोहरी, ऊस, तेलबिया, सोयाबीन, तांदूळ, वांगी, बटाटे, के ळी,
पपई आणि वैद्यकीय वनस्पतींवर हे संशोधन चालू आहे. याशिवाय मासे हे जलचरसुद्धा
ह्या संशोधनाला बळी पडले आहेत. मात्र याविषयी माहिती देणारे समाजहितैषी गट
अथवा त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे शहाणे आणि बहुसंख्येचे जनमत आपल्या
देशात अजून तयार झालेले नाही. अज्ञान हे सर्व हलाखीला कारणीभूत असते असे
म्हणतात, हे आपल्या बाबतीत खरेच किती खरे आहे नाही?
आपल्या देशात यापूर्वी बीटी कापसावर झालेले संशोधन काय दर्शवते? अतिशय
ढिसाळ आणि अशास्त्रीय पद्धतीने फक्त तीन वर्षे संशोधन चालले आणि पर्यावरण
खात्यांतर्गतच्या कमिटीने ते मान्य करून टाकले. हे असे उत्पादन भारतीय वातावरणात
चालणार नाही असे निष्कर्ष जरी यातून आले तरीही बीटी वांगी आणावी म्हणून परत
दबाव आलाच. या निमित्ताने हेही सांगितले पाहिजे की मुळात भारतातला जैविक
विविधतेचा कायदा २००३, अशा प्रकारच्या GM फू डला परवानगीच देत नाही. तरीही हे
सर्व धंदे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. ज्यांची या मातीशी नाळ नसावी अशी शंका यावी
अशा के वळ मूठभर लोकांनी या पद्धतीने आपली भारतीय जैविक विविधता विकायला
काढली आहे. आपले नियंत्रक मंडळ बहुराष्ट्रीय कं पन्यांकडून याच्या परदेशातल्या
दुष्परिणामांची सविस्तर यादी मागवते. पण त्यांची तपासण्याची प्रक्रिया काही राखली
जात नाही. म्हणजे परदेशात नेहमी अशा गोष्टींचे काही परिणाम मुद्दाम तपासले जातात.
असे बियाणे वाढवून, त्याचे सेवन करायला लावून, त्याच्या बाधेच्या, अॅलर्जीच्या,
विषाणूंच्या, प्रतिकाराच्या अशा सर्व शक्यता प्राणीमात्रांवर तपासल्या जातात. त्यामुळे
अशा गोष्टींची मान्यता तिथे किमान २५ वर्षे घेते; कारण तितका काळ या जीवचक्राचा,
त्याच्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी लागतोच. आपल्याकडे मात्र दोन
तीन वर्षांत गोष्टी निकालात काढल्या जातात. परिणामत: हे थोड्या स्वार्थासाठी देशाच्या
हजारो वर्षांच्या सष्टीचक्राशी बेजबाबदारपणे खेळणे आहे. सरकार प्रत्येक गोष्टीत काही
करेल या आशेवर जगणे आता चालायचे नाही. कारण आपलीही काही जबाबदारी
असते. सरकार येते आणि जाते आपण मात्र नागरिक म्हणून स्थिर आहोत याचा विचार
तरी करायला हवा.
थोडक्यात काय, वैज्ञानिक कोणत्याही निसर्गनिर्मित निपजाच्या प्रक्रियेत एखादे
बदल घडवून तिच्या जागी दुसरी कृ त्रिम पद्धती आणू पाहतात तेव्हा या पृथ्वीवरील
सगळ्या सृष्टीचक्राचा खोलवर विचार करणे अनिवार्य आहे. ते के वळ काही प्राण्यांवरील
प्रयोगांनी सिद्ध करणे घातक आहे. सृष्टीचक्र हे एकमेकांवर अवलंबून असणारे चक्र
असून त्याचे काही तोल, काही परस्परपूरक जटील प्रक्रिया आहेत. ज्यामुळे ह्या
सृष्टीचक्राचे अस्तित्व आहे तेच नष्ट करून अन्नाच्या दुर्भिक्ष्यावर उत्तर शोधायचे, की
सगळेच पूरक असणे नष्ट करून जीवनाची नवीच, परिणामी माहीत नसणारी, विपरीत
पद्धती जन्माला घालायची हे एकदा डोळसपणे ठरवावे लागेल. 'जीवो जीवस्य जीवनं' हा
के वळ मंत्र नाही तर ते जगणे अव्याहत सुरू असण्याचे चिरदायी आश्वासन आहे.
त्याच्यावरच घाला घालून कसे चालेल? जैवतंत्रज्ञानाची रोगमुक्तीसारखी निश्चित अशी
वरदाने आहेत. पण त्याची दिशा जर चुकली तर सर्वनाश अटळ आहे. त्यातून यात
कार्पोरेट क्षेत्र आल्याने फक्त नफा, उलाढाल बघितली जाईल आणि मग हे सगळे प्रश्न
आणि त्याचे परिणाम एकदम मुके , सुन्न होतील. म्हणून आत्ताच याविरुद्ध तन-मन धनाने
काम करणे योग्य!
८. वॉर आणि पीस अर्थात युद्ध आणि शांतता

'जगात बनलेल्या बंदुकीची प्रत्येक गोळी, पाण्यात अवतरणारी प्रत्येक युद्धनौका,


बनवलेले प्रत्येक संहारक क्षेपणास्त्र हे अंतिमत: या जगातील असहाय भुके ल्याच्या, अन्न-
वस्त्राच्या मूलभूत गरजेवरच डागलेले असते. सारे जग ह्या शस्त्रांपायी के वळ स्वत:चे
द्रव्यच नाही तर श्रमिकांचा घाम, संशोधकाची बुद्धिमत्ता आणि चिमुकल्या बालकांचे
भवितव्य ह्याचाही नाश करत आहे. युद्धापासून वाचण्याच्या मोठ्या नैतिक नावाखाली हा
सामान्य माणसालाच सुळावर लटकवण्याचा अमानुष खेळ आहे.'
- अमेरिके चे अध्यक्ष आयसेन होवर यांचे भाषण (१६ एप्रिल १९५३)

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अक्षम्य आणि असमर्थनीय जीवहानीमुळे उपरतीतून


काढलेले हे बहुधा पश्चातापदग्ध उद्गार आयसेन होवर यांच्यानंतर आलेल्या कोणत्याही
अमेरिके च्याच अध्यक्षानेही ध्यानात ठे वले नाहीत तर मग इतर राष्ट्रांचे काय?
जगाच्या भविष्यावर अनुचित आणि अनुत्तरीत असे भयाण प्रश्नचिन्ह उभे करणारा
हा शस्त्रव्यापार आता इतक्या बिकट अवस्थेला आला आहे की आहे त्यापुढे सर्व
सुशिक्षित, सुबुद्ध आणि सभ्य जग लाचार, हतबल आहे. स्वरक्षण, संरक्षण, आर्थिक
गरजांचे दबावतंत्र आणि शेवटी अटळ अशी युद्धखोरी अशी ही भयानक वाटचाल आहे.
माणसाचा जगण्याचा हक्क, त्याच्या मूलभूत गरजा, त्याची जगण्याची धडपड या
साऱ्यांकडे सतत दुर्लक्ष करत जगातल्या काही देशांचा निव्वळ शस्त्रखर्च हा आता त्यांच्या
विकासखर्चाच्या दुप्पट होऊ पाहतो आहे. आजमितीला जगातील विविध राष्ट्रांकडून
होणारी शस्त्रविक्री ही ७० बिलियन डॉलर्स (सुमारे ३.५ लाख कोटी रुपये) इतकी आहे.
याच्या ७५% विक्री ही फक्त विकसनशील देशांना (म्हणजे ज्या देशांनी आपल्या
लोकांच्या अन्न-वस्त्र निवाऱ्याच्या मूलभूत गरजाही भागवलेल्या नाहीत ते देश) होत
असते. यातली विसंगती अशी की जे देश युनोच्या सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत
म्हणजे ज्यांच्यावर जगाच्या रक्षणाची तथाकथित जबाबदारी आहे असे देशच आज
जगातील (अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड) प्रमुख शस्त्रविक्रे ते आहेत. त्यामुळे
त्यांच्या शांततेसाठी असणाऱ्या भूमिका ह्या तद्दन खोट्या आणि भंपक आहेत. हे म्हणजे
सिगारेट बनवणाऱ्या कं पनीने कर्क रोगाच्या संशोधनासाठी मदत करणे आणि या मदतीची
पुन्हा कोडगेपणाने जाहिरात करणे इतके क्रू र विनोदी आहे.
उद्योगातील भ्रष्टाचार आणि त्यातून निर्माण होणारी अवैध संपत्ती हे आणखीनच
निराळे प्रकरण आहे. हे कमी म्हणून की काय यातील बरीचशी विक्री ही ज्या देशात सतत
हकु मशहांची राजवट आहे अथवा जे देश सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली करत
असतात त्या देशांना होत असते. काही देशातील हुकु मशहांच्या राजवटी का संपत नाहीत
याचे उत्तर शोधण्याची ही एक ठाम जागा आहे का? पण हे मात्र खरे की हा भीषण
व्यापार चालू रहावा म्हणून की काय त्या देशात सतत तणाव, युद्धे आणि अस्मितेच्या
बुलंद आरोळ्या ठोकल्या जात असतात आणि त्या देशातली जनता मात्र ह्या अस्मितेच्या
नेत्यांच्या राजवटीत कवडीमोलाचे जिणे जगत असते.
एका अधिकृ त अहवालानुसार २०१३ साली जगाचा संरक्षणावरील खर्च हा १.९
ट्रीलीयन डॉलर्स (अंदाजे ११० लाख कोटी रुपये अथवा भारताच्या जीडीपीपेक्षा थोडा
जास्त) इतका होता. जर उद्योगधंदा म्हणून याकडे बघितले तर मात्र ही जगातील
सगळ्यात महाकाय, फायद्याची आणि चिरकाल टिकणारी इंडस्ट्री आहे हे मात्र नक्की.
जगात मंदी येवो, बेरोजगारी वाढो, जग अर्थव्यवस्थेच्या बिकट गुंत्यात हेलपाटत असो,
या उद्योगाला मात्र कदापी मरण नाही; हा आपला तेजीतच असतो. गमतीचा भाग म्हणजे
ज्या देशाच्या अध्यक्षाने वर नमूद के लेले मानवी जीवनाबद्दलच्या कळवळ्याचे साश्रूपूर्ण
भाषण ठोकले त्या एकट्या देशाचा या धंद्यातला वाटा वरील रकमेच्या ४०% आहे आता
बोला.
आता इतका पैसा ज्या उद्योगात अडकला आहे त्यासाठी नेहमी कमालीची क्रू र
आणि जीवघेणी स्पर्धा सुरू असणे हे क्रमप्राप्त आहे. अमेरिके सारख्या काही देशात तर
शस्त्रनिर्मिती करणाऱ्या खाजगी कं पन्या आहेत. आणि वॉल स्ट्रीटवर नित्यनेमाने त्यांचे
टेडिंग चालते. त्या त्यांच्या भागधारकांना उत्तम परताव्यासाठी कटिबद्ध आहेत. त्या
कं पन्यांचे शेअर युद्धकाळात तेजीत असतात. त्यामुळे असेही होते की त्यांच्या नफ्यासाठी
खूप वेळा हे जग वेठीला धरले गेले आहे. या सगळ्या शस्त्र-व्यापाराची व्यूहरचना
अतिशय वेगळ्या पातळीवर होत असते. कारण युद्धे हा जर व्यवसाय मानला (आणि
विश्वास ठे वा अगर ठे वू नका, जगातील काही देशांचा युद्धखोरी हा त्यांच्या अर्थव्यवस्थेला
बरकत आणणारा व्यवसाय आहे) तर मग व्यवसायाची सर्व गणिते आली. ठरवून
त्यासाठी एखाद्या देशाला लक्ष्य करणे, त्या देशाच्या अर्थकारणाचे घोडे त्याच्या शस्त्र
गरजेशी. जोडणे, गरज पडल्यास त्यासाठी आवश्यक असे वातावरण त्या देशाच्या
भौगोलिक सीमांवर तयार होईल असे पाहणे, त्या देशाच्या राष्ट्र प्रमुखांना वारंवार
आमंत्रणे/भेटी देणे, या गोष्टीला तयार नसणाऱ्या देशातील राष्ट्रप्रमुख बदलणे, त्यांना
पदच्युत करणे न जमल्यास त्यांच्या हत्या घडवून आणणे, शस्त्रे-खरेदीला तयार
असणाऱ्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक मदतीची वाट सुलभ करणे
अशा सर्व गोष्टी ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा भाग आहेत आणि त्या बिनदिक्कतपणे
चालू असतात. कारण या राष्ट्रांचे अर्थकारण फार मोठ्या प्रमाणावर या शस्त्रविक्रीवर
अवलंबून असते. मग त्यासाठी कारणे फार चलाखीने शोधली जातात. स्वाभिमान,
देशांच्या सीमांचे रक्षण ह्या भावनिक मुद्द्यांपासून ते छोट्या देशांना देशांतर्गत दहशतीचा,
अराजकाचा सामना करता यावा, स्वावलंबी होता यावे, स्वसंरक्षण करता यावे, अवैध
अमली पदार्थांची तस्करी रोखता यावी अशा अनेक गोंडस आणि तथाकथित प्रगतीच्या
कारणांचा यात समावेश आहे. अर्थात यामुळे इतक्या वर्षांत ना कोणाची कोणाला दहशत
कमी झाली, ना हे देश स्वावलंबी झाले, ना अमली पदार्थांची तस्करी थांबली.
काही अस्वस्थ देशांना आम्ही लष्करी मदत करतो. त्यामुळे अशा देशांशी आमचे
संबंध सुधारण्यास मदत होते. आणि त्याचा त्या देशावर दबाव राहून एकू णच जगाचा
धोका कमी होतो असे अजब युक्तिवादही शस्त्रविक्री आणि लष्करी हस्तक्षेप यासाठी
के ले गेले आहेत. आपला शेजारी पाकिस्तान गेली ६० वर्षे सतत अमेरिके ची मदत घेतोच
आहे आणि त्यामुळे तो अराजकाकडून समंजसपणाकडे प्रवास करू लागला आहे असे
म्हणण्याइतके च भंपक आहेत हे युक्तिवाद! या चक्रात सापडून आपण मात्र आपला
संरक्षण खर्च बेसुमार वाढवून ठे वला आहे. आपण गेली ६० वर्षे दरवर्षी के लेला सरासरी
लष्करी खर्च काढला आणि त्यातून आवश्यक असा खर्च वजा के ला तरी आपली राष्ट्र
उभारणीची फार मोठी रक्कम या गोष्टींसाठी बेहिशेबी खर्च के ली आहे आणि त्याच वेळी
अन्न, आरोग्य, शिक्षण, निवारा अशा देशवासियांच्या मूलभूत खर्चासाठी मात्र मोठमोठाली
कर्जे काढली आहेत असे लक्षात येते. इतके करून पाकिस्तानची आजची परिस्थिती
कशी भीषण आहे ते दिसतेच आहे. तुर्तास पाकिस्तानशी युद्ध करून त्याला संपवून
टाकावे यासाठी राष्ट्रप्रेमाच्या भावनिक आरोळ्या ठोकणाऱ्या लोकांनी, आपण कोणाला
नेमकी मदत करत आहोत याचा विचार के लेला बरा.
या विक्रीचा दुसरा अध्याय एकं दरीतच जगातील भ्रष्टाचाराशी जोडलेला आहे. जर
विकसनशील राष्ट्रांनी भ्रष्टाचाराला आळा घातला तरच त्यांना मदत के ली जाईल अशी
अट नेहमीच वर्ल्ड बँक, नाणेनिधी किंवा बड्या राष्ट्रांकडून घातली जाते. मात्र खरी
परिस्थिती अशी आहे की हेच देश काही युद्धखोर देशांना शस्त्रे विकताना भ्रष्टाचाराचा
बेमुर्वतखोरपणे अवलंब करतात. इतके च नाही तर तिथे हे विकणे शक्य व्हावे म्हणून
कोण मंत्री अथवा अधिकारी नेमला जावा हेही पाहतात. आजमितीला जर जगातील
माफियांची/तस्करांची यादी तयार के ली तर त्यात शस्त्र खरेदी-विक्री करणारे हे सर्वांत
जास्त प्रमाणात आहेत. असल्या एजंटांमुळेच आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या
राष्ट्रांमुळेच अनेक विकसनशील आणि तथाकथित महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशांना
दहशतवाद नावाच्या नव्या शत्रूशी झगडावे लागत आहे.
काही लोकांचा दहशतवाद हा एक खोटा आणि अंत नसलेला व्यवसाय झाला
आहे. जे धर्मासाठी जिहाद वगैरे बोलतात आणि आत्मघातकी पथके तयार करतात
त्यांच्याकडे हे एजंट माफिया मोठ्या आशेने पाहत असण्याची आणि त्यांना शोधून
काढण्यासाठी कष्ट करण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण इतका पैसा जर फक्त ही
शस्त्रे राजरोसपणे बाजारात विकू न मिळत असेल तर का उगाच दहशतवादी कृ त्ये करून
जीव गमवा? एका आकडेवारीनुसार विक्रीच्या साधारणपणे १५-२० इतके कमिशन या
व्यवहारावर दिले जाते. आपण १० जरी धरले आणि वर दिल्याप्रमाणे होणारा शस्त्रांचा
व्यापार लक्षात घेतला तर ही किती प्रचंड रक्कम होते? शिवाय या व्यवहारातील कमिशन
हे बऱ्याच वेळा त्या एजंट्सना हव्या त्या चलनात दिले जाते; कारण कमिशनचा हा सर्वच
व्यवहार छु पा असतो. जर इतका अवैध पैसा उघडपणे जगात निर्माण होत असेल तर
त्याचा उपयोग कशासाठी होणार? त्याचा विनियोग काय रुग्णालये, शाळा, कु पोषण,
आरोग्य, एड्स निर्मूलन मोहीम अशा गोष्टींकरता होणार? म्हणजे हा सर्व पैसा जगात
शांतता नांदण्यासाठी नक्कीच नाही; मग तो असलेली शांतता उद्ध्वस्त करण्यासाठी
आहे का? मग नेमके कोण ही अशांतता आपल्यावर लादते आहे? एकीकडे खाजगी
कं पन्यांनी आपल्या नफ्यासाठी कोणाचा तरी नाश करणारी शस्त्रे बनवायची, मग ती
विकण्यासाठी भ्रष्टाचारी यंत्रणा उभ्या करायच्या, या यंत्रणांनी विविध गरजू देश शोधायचे,
नसतील तर तशी वेळ आणायची, भ्रष्टाचाराने त्या देशातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणा
खिळखिळ्या करायच्या, अशा पोखरलेल्या देशांना किती भ्रष्टाचारी कोण,
दारिद्र्यरेषेखाली कोण वगैरे क्रमांक द्यायचे असा हा सगळा अमानुष खेळ आहे.
याची अजून एक बाजू बघण्यासाठी इथे आपल्याला माहीत असलेल्या एका
प्रकरणाकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघू. बोफोर्स प्रकरणात राजीव गांधींचे सरकार
कोसळले, जगावेगळे काहीतरी घडले अशा आवया उठवत त्यांना घरी पाठवले गेले. ही
त्यांना आणि काँग्रेसला शिक्षा झाली असेलही; पण त्यामुळे आपल्या देशाला त्यानंतर
वारंवार किती निवडणुकांना सामोरे जावे लागले आणि त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर,
विकासावर काय परिणाम झाला याचा विचार आपण करायला हवा.
या सगळ्याची अजून एक करुण बाजू आहे ती म्हणजे जगात शस्त्रांच्या अनिबंध
वापराने निरपराध माणसांच्या मारले जाण्याची. शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जी शस्त्रे सतत
राजमार्गाने अथवा तस्करीने विकत घेतली जातात त्यांचा उपयोग शेवटी कोणासाठी
होतो? ती काही शमीच्या झाडावर ठे वण्याकरता विकली जात नाहीत! ती अर्थातच छु प्या
अथवा जाहीर युद्धांसाठीच वापरली जातात. मध्यंतरी युनोने प्रसिद्ध के लेल्या एका
आकडेवारीनुसार जगातील सगळी छोटी (उदाहरणार्थ, पिस्तूल, गन, मशीन गन, सुरुं ग,
हातबॉम्ब, एके ४७, शोल्डर मिसाईल इत्यादी) आणि मोठी (सर्व प्रकारचे बॉम्ब,
दारुगोळा, रणगाडे, क्षेपणास्त्रे, युद्धनौका, लष्करी पाणबुड्या, फायटर विमाने इत्यादी)
शस्त्रे जमेस धरली तर त्यांच्या हेतुत: अथवा निर्हेतुक वापराने जगात दरवर्षी ३०-३५
लाख सामान्यजन मारले जातात. एक नुकतेच घडलेले उदाहरण पाहू या. अमेरिके च्या
अध्यक्षाच्या फालतू इगोमुळे, सूडापोटी अथवा त्या देशाच्या चुकीच्या धोरणामुळे म्हणा
हवे तर नुकत्याच झालेल्या इराक संघर्षात आत्तापर्यंत किमान पाच लाख सामान्य
नागरिक मारले गेले आहेत आणि अजूनही रोज जात आहेत. शिवाय अजून एक दु:खद
परिणाम म्हणजे या युद्धात टाकलेल्या शेकडो टन बॉम्बवर्षावाने निर्माण झालेल्या,
इराकवरील हवेतील प्रदूषणामुळे, पुढील १५ वर्षांत जन्माला येणाऱ्या इराकी मुलांची
फु फ्फु से जन्मत:च ३० निकामी असतील. तिथले निष्पाप जनजीवन प्रदूषणाच्या या
मानवनिर्मित तडाख्यातून सुरळीत व्हायला अजून किमान २० वर्षे लागतील. अशा
प्रकारचे वातावरणाची, निष्पाप जनजीवनाची हानी करणारे सर्व संघर्ष खरे तर मानव
संहाराच्या खटल्याचे विषय आहेत. म्हणजे मानवी हक्क आयोगाने जर का खरेच आपले
काम नि:पक्षपातीपणे बजावले तर अनेक मोठ्या राष्ट्रांचे प्रमुख हे अशा खटल्यांचे सहज
आरोपी होऊ शकतात. पण.
या भीषण पार्श्वभूमीवर आपल्याला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट इथे नमूद
करायला हवी. जगाच्या व्यासपीठावर अधिकृ तपणे ही बाब नोंदली गेली आहे आणि
तिचा उल्लेख के ल्याशिवाय अनेक राष्ट्रप्रमुखांना आपले भाषण पूर्ण करता आले नाही ती
म्हणजे - भारत हा जगातल्या काही अतिशय मोजक्या आणि मोठ्या देशांपैकी एक असा
देश आहे, ज्याने आजपर्यंत कधीही कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण के लेले नाही.
आयसेन होवरची हाक त्याच्या देशात नाही तरी कु ठे तरी हजारो मैलांवर ऐकली
गेली आहे असा याचा अर्थ नाही; तर शांतता फक्त ह्याच मातीचा गुण आहे.
बाकी इतरांवर बहुधा, शांतता फक्त युद्धातूनच जन्माला येते असेच संस्कार झाले
असावेत.
९. उदरभरण नोहे ...

'या जगात १९६० पासून, विकसित देशांनी जी आर्थिक विकासाची धोरणे रेटली -
ज्यात हरितक्रांती, मुक्त व्यापार करार, जागतिक व्यापार संघटना, आणि शेतीवरच्या
विकसित देशातील प्रचंड सबसिडी या सगळ्याचा अंतर्भाव आहे - त्या सगळ्या धोरणांनी
जागतिक अन्नप्रणालीचा नाश के ला आहे.'
- एरिक होल्ट गीमेनेझ ( आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि शेतीतज्ज्ञ)

वरवर पाहता हे विधान एखादे प्रचारकी थाटाचे वाटू शकते. पण प्रत्यक्षात तसे
नाहीये. आपण तपशिलात जाऊन विचार के ला तर जागतिक स्तरावरची आदर्श
अन्नप्रणाली उभी करण्याचा हा सगळाच खटाटोप नुसताच विमनस्क करणारा नाही; तर
साऱ्या जगाला सध्याच्या अपरिहार्य अवस्थेत ढकलणाराही आहे.
१९६०-९० या काळात जगभर हरितक्रांतीचे नारे देऊन ती घडवली गेली.
सुरुवातीला बऱ्याच देशांना त्यामुळे फायदा झाला. औद्योगिकीकरण नसणाऱ्या बऱ्याच
देशांमधला शेतीव्यवसाय आधुनिक झाला आणि दर एकरी उत्पन्न वाढले हे खरे आहे.
पण हेही खरेच की या काळात जगातील शेती उत्पादन वाढले एकू ण ११% नी आणि
उपासमारी फोफावली तब्बल १२% नी. कृ षी उत्पादन वाढूनसुद्धा, लोकांची क्रयशक्ती
मात्र दिवसेंदिवस घटतच गेल्याने त्यातून एकू ण साध्य काहीच झाले नाही. आज
जवळपास अर्ध्या शतकानंतर मागे वळून पाहताना मात्र या सगळ्या व्यवस्थेने
विकसनशील देशांसाठी उभ्या के लेल्या काही समस्या प्रकटपणे दिसतात, जाणवतात.
शेतीव्यवसायाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे बाजारीकरण झाल्याने के वळ एकाच
प्रकारचे प्रचंड पीक -ज्याला बाजारात भाव आहे/जे बाजाराला हवे आहे तेच-घेतले जाऊ
लागले. आधी असणारी कृ षी आणि जैविक विविधता मात्र संपत गेली. या त्वरित पैसे
देणाऱ्या पिकांनी पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने पाण्याची पातळी खोल गेली,
रासायनिक खतांच्या बेसुमार आणि बिनडोक वापराने मुळात कमी उपलब्ध असणारी
जमीन मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त झाली. तिची सकसता घटल्याने, ती अनुत्पादक
झाल्याने, तीत आणखी खतांचा मारा करत वारेमाप पिके घेतली गेली. परिणामी ती
संपूर्ण नापीक झाली.
जगात हरितक्रांतीआधी उत्पादन खूप नसेल, आजच्या भाषेत अविकसित असेल
पण त्यावेळच्या पारंपरिक शेतीव्यवस्थेत, प्रत्येकाच्या श्रमाची आणि पोटाची किमान
व्यवस्था वाहणारी जी एक साखळी होती, ती मात्र नष्ट झाली आहे. सध्या खते, बियाणे
यांच्या बहुराष्ट्रीय उत्पादक कं पन्या, अन्नव्यवस्थेचा बाजार करत, जागतिक अन्नबाजाराची
सूत्रे आपल्याच ताब्यात घेत, ती त्यातल्या अमर्याद नफ्यासाठी हलवणाऱ्या वितरण
आणि विक्री संस्था; त्यांना साथ देण्यासाठी सरसावलेल्या विकसित राष्ट्रांच्या तालावर
नाचणाऱ्या युनो, नाणेनिधी सारख्या तालेवार संस्था, आणि देशोदेशींच्या राज्यव्यवस्था
यांचे एक अनिष्ट वर्तुळ तयार झाले आहे. हे वर्तुळ जसजसे आपला परीघ वाढवत गेले,
तसतसे जगातले विकसनशील देश, त्यातील अनभिज्ञ लोक आपली अन्नसुरक्षा हळूहळू
पण निश्चितपणे गमावत गेले. विकसनशील देशातील ग्रामीण कृ षिप्रधान प्रदेशातील
ज्यांनी त्या देशातल्या अन्नव्यवस्थेची अनेक वर्षे धुरा वाहिली होती, एका अनागर
संस्कृ तीत आपल्या लोकांचे हित जपले होते ते हजारो गावकरी अन्नाच्या शोधात
शहरातील झोपडपट्ट्यात ढकलले गेले आणि त्यांच्या नशिबी जगण्याची समृद्धता
जाऊन एकदम बकालपण आले..
विकास होण्याआधी अनेक देश कर्जबाजारी झाले. जणू प्रगत राष्ट्रांचे सारे
विकासाचे मार्ग कर्जाच्या खाईतून गेले होते. पुढे १९८० च्या दशकात नाणेनिधी आणि
वर्ल्ड बँक यांनी या विकसनशील देशांना आपले परकीय कर्ज फे डण्यासाठी मदत
करायला मोठा गाजावाजा करत एक SAP (Structural Adjestment Programe)
आणला. ज्यात 'जास्त निर्यात आणि कमी खर्च धोरण या देशांच्या गळी उतरवले.
कालांतराने विकसनशील देशांवर अनेक बंधने लादण्यात आली. त्यात देशांचे चलनमूल्य
कमी करून निर्यात स्वस्त करणे, परदेशी भांडवल यावे यासाठी व्याजदर वाढवणे यावर
भर दिला गेला. त्यामुळे या देशांची निर्यात वाढून परदेशी चलनाचा साठा वाढला; पण
त्या देशातल्या शेतीवर अवलंबून असणारे, स्थानिक नागरिकांना परवडेल अशी विक्री
करता येणारे उत्पन्न मात्र घटले. त्यामुळे तिथल्या परस्परावलंबी अर्थव्यवस्थेला खीळ
बसली. देशोदेशी या कार्यक्रमाबद्दल असंतोष उफाळून येऊ लागला. मग जागतिक
व्यापार संघटना (WTO) १९९५ मध्ये स्थापन करण्यात आली. या संघटनेने या
सगळ्याचे नियमन करण्याच्या उदात्त (?) हेतूने वेगवेगळे करार करायला सुरवात के ली.
GATT.
GATS, TRIPS अशा अमेरिका आणि युरोपधार्जिण्या करारातून जगातल्या इतर
देशात नांदणाऱ्या सहमतीच्या, सहकाराच्या, एकमेकांना पूरक ठरणाऱ्या व्यापाराभोवती
आपले नियमांचे पाश आवळले. मग आयात कर कमी करणे, देशांतर्गत शेतकी आणि
इतर उत्पादने सबसिडीमुक्त करणे, देशी मालाला संरक्षण न देणे अशा प्रकारच्या
अटींमुळे अमेरिका-युरोपातून तिथल्या शेतकऱ्यांनी प्रचंड सबसिडी घेऊन मुबलक
पिकवलेले आणि त्यामुळे स्वस्त असणारे धान्य जगभरातून आयात व्हायला सुरुवात
झाली. पुन्हा त्याची किंमतही देशी धान्यापेक्षा कमी असल्याने, त्याचा परिणाम
देशोदेशीचा व्यापार उदीम कोसळण्यात होणार हे नक्की होते.
पुढे विकसित देशांची नजर पडली ती सार्वजनिक उद्योगांवर. सार्वजनिक उद्योगाची
कार्यक्षमता वाढवण्याऐवजी त्याचे खाजगीकरण करण्याचा दबाव टाकण्यात आला. वर्ल्ड
बँक अथवा नाणेनिधी विविध कर्जासाठी देशातल्या उद्योगांचे खाजगीकरण हा आवश्यक
निकष ठरवू लागली. परदेशी तंत्रज्ञान, गुंतवणूक पात्रता यावर ठरवली जाऊ लागली.
परदेशी गुंतवणुकीला अनेक देशांनी मुक्तद्वार दिल्याने देश म्हणून असणारे वेगळे
अस्तित्व संपत आले आणि साध्या गोष्टी ज्या त्या देशातल्या नागरिकांना हातातोंडाची
गाठ म्हणून का होईना पण उपलब्ध होत्या, त्यासाठी आता आंतरराष्ट्रीय बाजारावर
अवलंबून राहावे लागू लागले. देशी मालाला उठाव नाही, देशी औद्योगिक उत्पादने महाग
आहेत. त्याकरता स्वस्त भांडवल नाही या दुष्टचक्रात सापडलेले अनेक विकसित देश मग
या संस्थांपुढे, प्रगत राष्ट्रांपुढे नांगी टाकू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे त्या देशातल्या
लोकांचे उत्पादन घटले. देशातील भुके ली माणसे प्रमाणाबाहेर वाढली. हे थोड्याफार
प्रमाणात सर्वच विकासशील देशांना भोगावे लागले आणि लागत आहे. क हे सगळे
विस्ताराने सांगायचे कारण या सगळ्याचा सामान्य माणसांच्या अन्नसुरक्षेवर अतिशय
प्रतिकू ल आणि दीर्घकाळ टिकणारा असा परिणाम झाला आहे. बाजारसूत्रे कधीही
भावनिक गुंतवणुकीवर चालत नाहीत तर अस्सल नफ्यातोट्याच्या समीकरणावर
चालतात. गरज निर्माण करणे हेसुद्धा बाजाराचेच टिकण्याचे सूत्र आहे. त्यामुळे
जागतिक अन्नदुर्भीक्ष्याची आजची अवस्था ही बहुराष्ट्रीय कं पन्यांना एका विशिष्ट
प्रकारच्या उत्पादनांची, त्याच्या वितरणाची मक्तेदारी निर्माण करायला मदत करते. त्या
अनुषंगाने जागतिक अन्नप्रणालीत खते, बियाणे, धान्य यांच्या पणन व्यवस्थेच्या
सुसूत्रीकरणाच्या नावाखाली ग्राहकांची बेसुमार लूट करण्याची एक नवी यंत्रणाच निर्माण
झाली आहे. मुळात ज्यासाठी हे सगळे हवे होते ते भुके चे, अन्नसुरक्षेचे प्रश्न मार्गी
लागण्यापेक्षा एक वैश्विक आणि वेगळीच कृ षी-अन्न खाजगी उद्योगाची भरभराट होऊ
लागली आहे. हे सर्व सार्वजनिक पैशातून, देशांच्या आर्थिक धोरणाचे सुकाणू बदलत
आणि लोकांच्या अन्नाच्या मूलभूत हक्काशी खेळत सुरू आहे ही खेदाची बाब आहे.
म्हणजे मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कं पन्यांनी WTO या जागतिक व्यापारहित पाहणाऱ्या
संघटनेच्या माध्यमातून खरे तर साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग बिनदिक्कतपणे वापरून
भयानक नफे खोरी के ली आहे. गंमत अशी की हे सर्व विविध देशातील नागरिकांच्या
हिताविरुद्ध असूनही या बहुराष्ट्रीय जायंट्सनी असे अनेक करार त्या त्या देशातील
सरकारांच्या गळी उतरवले आहेत. बियाणांची Monsanto and Du Pont, खते उत्पादन
करणारी महाकाय कं पनी Potash Corp, Yara and Sinochem, यांच्या गेल्या काही
वर्षातल्या नफ्यात २०% ते ७४% इतकी वाढ झाली आहे.
याबरोबरच मोठाल्या सुपर मार्के ट साखळी कं पन्यानी (Tesco, Carrefour. wal-
Mart आणि Safeway या सगळ्यांनी) आपले उत्पन्न अनिबंध पद्धतीने वाढवीत
जगातल्या विकसनशील देशातल्या लोकांची अक्षरश: लूट के ली आहे. यातूनच जागतिक
बियाणे व्यापार वर्षाला २ लाख १० हजार कोटी तर खते व्यापार २ लाख ४० हजार
कोटी इतका बहरला आहे. आता यात जगाचे भुके लेपण, लोकांची अन्न गरज, त्यांची
क्रयशक्ती वाढणे याला अजिबात महत्त्व नसून फक्त आणि फक्त मार्के टची आणि
नफ्याची वाढ हे ध्येय आहे. खते, बियाणांचा खप आणि अन्नधान्याची निकड यांच्या
दुष्टचक्राची साखळी करत ह्या सगळ्या कं पन्यांनी एकत्र येत, विविध देशातील सरकारांना
अक्षरश: गुंडाळत, जगातील अन्न सुरक्षा ओलीस ठे वली आहे जागतिकीकरणाचे सेवा
क्षेत्रातले फायदे बघून, आपल्या इथले मुक्त बाजाराच्या विचारांनी पछाडल्याने असे म्हणू
शकतील की 'आपल्या देशाचे उदाहरण घ्या - इथे दलाल, व्यापारी शेतकऱ्यांना लुटत
आहेतच की! उलट विविध फू डसाखळीच्या कं पन्या आल्याने स्पर्धा वाढेल आणि
शेतकरी, ग्राहकाला फायदाच होईल.' दलाल शेतकऱ्यांना लुटत आहेत हे खरे; पण ते
निदान देशी असल्याने त्यांच्यावर सरकारची इच्छाशक्ती, जनतेचा रेटा वापरून अंकु श
ठे वता येतो, पण या बहुराष्ट्रीय कं पन्यांवर अंकु श अशक्य आहे. कारण त्या बहुराष्ट्रीय
असल्याने त्यांच्यावर दबाव टाकला तर संबंधित देशाच्या इतर अनेक हितांवर त्या टाच
आणू शकतात. अशा कं पन्या स्वत:च्या हितासाठी, प्रत्यक्ष देशाच्या हिताविरुद्ध आपल्या
सरकारवर दबाव आणत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात.
सारांश, विकासाचे मॉडेल आणण्याची घाई, जगातील गोंधळलेली कृ षी संस्कृ ती,
कु पोषण व सकस नसणारे अन्न खाल्ल्याने उभे राहणारे लोकांच्या आरोग्याचे प्रश्न,
जगातले कमी होत जाणारे शुद्ध पाणी हे प्रश्न भारताच्या नशिबात डोकावायला सुरुवात
झाली आहे. जगाचे भुके लेपण हे विकसित अन्नप्रणालीच्या झाडाला आलेले विषारी फळ
आहे. गेल्या पन्नास वर्षात या सगळ्यात जगाच्या काय वाट्याला आले? तर या प्रगत (?)
जगात सुमारे आजमितीला दर सातामागे एक म्हणजे सुमारे १ अब्ज माणसे भुके ली
आहेत. त्यातली अर्ध्याहून जास्त म्हणजे सुमारे ५८ कोटी माणसे ही फक्त आशिया-
पॅसिफिकमध्ये आणि त्यातील २०.६ कोटी लोक भारतात आहेत. म्हणजे भारतात दर
सहा माणसामागे एक भुके ला असून इतर जगापेक्षा इथले हे प्रमाण जास्त आहे.
'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' असे तत्त्वज्ञान जगाला देणाऱ्या भारतातच असे घडावे
हा काव्यगत न्याय. भारताने हे असले विकासाचे मॉडेल स्वीकारून कोणाचे उदरभरण
चालवले आहे देवाला माहीत!.... २० कोटी लोकांच्या भुके च्या टाहोकडे कानाडोळा
करत, भारत महासत्ता होण्याच्या गप्पांमध्ये सुखेनैव रमलेल्या विचारवंतांना हे सगळे
माहीत नसेलच असे म्हणता येणार नाही.

१०. पाणी रे पाणी

अगदी अनादी काळापासून माणसाने चांगली जमीन, शुद्ध पाणी, आणि पोटभर
अन्नाच्या शोधात स्थलांतर के ले. त्यात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींपैकी अन्न
जगण्यासाठी अधिक मूलभूत. अन्न अधिक आवश्यक. “पोटाला दोन घास' ते 'सात
पिढ्या बसून खातील', अशी दोन टोके अन्नाच्या बाबतीत दिसून येतात. काहींना पहिली
गोष्ट दुर्मीळ; तर काहींना दुसऱ्या गोष्टीचीच चिंता. काही पहिली गोष्ट आयुष्यभर मागत
फिरतात; तर काही दुसऱ्या बाबीला ध्येय वगैरे समजतात. काही लोक पहिल्यासाठी
स्वतःला सतत गहाण टाकतात; तर काही दुसऱ्या बाबतीत अनेकांना गुलाम बनवतात.
पहिली अत्यावश्यक गरज; तर दुसरी प्रतिष्ठेची बाब!
पण जगात अन्न आहे तरी किती? आणि कोणासाठी? जो विकत घेऊ शके ल
त्याच्यासाठी आहे हे झाले कोडगे व्यावहारिक उत्तर. विकत घेऊ शकतो, पण मिळतच
नाही असे घडले तर? या साऱ्या जगाला किती अन्न लागते? ते पुरेसे आहे? का मुळातच
ते कमी आहे? हे असे प्रश्न पडण्यापूर्वी आपण आधी अन्नाच्या स्त्रोताची वस्तुस्थिती
जाणून घेऊ. आपल्याला अन्नाच्या सततच्या पुरवठ्यासाठी कसदार जमीन, ताजे गोडे
पाणी ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. जगाची लोकसंख्या पुढच्या ५० वर्षांत ६५% ने
वाढेल असा एक वास्तवसदृश्य, भीतीदायक अंदाज आहे. त्याचबरोबर दरमाणशी
उत्पन्नही वाढेल, या दोन्ही गोष्टींचा परिणाम हा अन्नाची, पाण्याची गरज वाढण्यात
होणार. अर्थात नुसती लोकसंख्या वाढली म्हणून नाही तर जगण्याची पद्धत, खाण्याच्या
सवयी हे सर्वच बदलणार म्हणूनही. ह्या सगळ्यांमुळे जमीन आणि पाणी ह्या दोन
गोष्टींवर असह्य ताण येणार..
थोडे अजून खोलात जाऊन विचार के ला तर असे दिसते की जगाच्या एकू ण
क्षेत्रफळापैकी जमीन फक्त २९.२२% आहे; तर समुद्र आहे ७०.७८%. पण गंमत अशी
की बरोबर याच्या उलट म्हणजे जगाच्या गरजेपैकी ९८% अन्न हे जमिनीतून येते आणि
फक्त २% हे पाण्यातून. आजमितीला जगात एकू ण ४.५ अब्ज हेक्टर जमीन
लागवडीयोग्य आहे. दरवर्षी जमीन लागवडीयोग्य असण्याचे प्रमाणही भयावह पद्धतीने
घसरते आहे. या एकू ण जमिनीपैकी जवळपास एक तृतीयांश जमीन गेल्या वर्षात प्रचंड
प्रमाणात धूप झाल्याने नापीक झाली आहे. जमिनीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात
ठे वायला हवी ती म्हणजे साधारणपणे ५०० वर्षांत २५ मिमी चांगली जमीन निसर्गत:
तयार होत असते. जमिनीची होणारी धूप ही अनेक मानवनिर्मित कारणांमुळे आहे. गेल्या
शंभर वर्षांत मोठ्या प्रमाणात जंगल जमिनीचे शेतजमिनीत रुपांतर करावे लागले आहे.
म्हणजे एकीकडे जंगल जमीन नष्ट होते आहे; तर दुसरीकडे उपलब्ध शेतजमिनीचे प्रती
एकरी उत्पन्न रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे कमालीचे घटत आहे. याशिवाय
ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकांमुळे बदलणारे पावसाचे प्रमाण, पावसाचा लहरीपणा
यांमुळे होणारे उत्पादनाचे नुकसान वेगळेच. सध्या जगातील सरासरी
लागवडीयोग्यजमीन दर माणशी ०.२७ हेक्टर आहे. चीन मध्ये हे प्रमाण ०.०८ तर
भारतात ०.०५ इतके आहे. लागवडीयोग्य जमिनीची झपाट्याने घसरणारी टक्के वारी ही
अन्न दुर्भिक्ष्याशी आणि मानवी कु पोषणाशी सरळपणे निगडित असणार हे मान्य व्हायला
हरकत नाही. अर्थात त्या त्या देशातील अराजक, आर्थिक असुरक्षितता, आणि अन्नाचे
असमान वाटप ही मानवनिर्मित कारणे त्यात आणखीनच भर घालत असतात.
आपण बघितले की पृथ्वीतलावरचा ७०% भाग पाण्याने व्यापला आहे. त्यातही
ज्याला पिण्यायोग्य अथवा शुद्ध म्हणता येईल ते पाणी या सत्तर टक्कयांच्या फक्त ३%च
आहे. त्यापैकी २.१५% पाणी उत्तर आणि दक्षिण धृवावर जे ग्लेशियर्स आहेत त्यात आहे.
उरलेले ०.८५% पाणीसाठे म्हणजे जगातील सर्व सरोवरे, विहिरी, तळी, नद्या हे सर्व होय.
याशिवाय आपल्याला पावसाचे पाणीही मिळत असते. ते किती? तर जर १ इंच पाऊस
पडला तर सरासरी एका एकरात सुमारे १ लाख ३ हजार लिटर पाणी मिळते. (भारतात
चेरापुंजीला सरासरी १२०० इंच पाऊस पडतो. चेरापूंजीचे क्षेत्रफळाला एकरी १ लाख ३
हजार लिटर या आकड्याने गुणल्यास किती लिटर पाणी मिळेल याचा हिशेब करून
बघा. एवढ्या पाण्यात भारतात किमान काही हजारो वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष्य नसायला हवे;
पण वस्तुस्थिती तशी आहे का? असो तो वेगळा विषय आहे.) त्यामुळेच जगाची
पावसावर अनिवार्य भिस्त आहे. पाऊस नसला तर आपण जगलो असतो का? पाऊस
आहे म्हणूनच आपण पाण्यासाठी अजन युद्ध के लेली नाहीत.
आता कृ षी उत्पादनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच. कोणतेही पीक
आपल्या वाढीसोबत पाणी वाफे च्या स्वरूपात वातावरणात फे कत असते. याचे प्रमाण
विविध पिकांप्रमाणे साधारण प्रत्येक किलोमागे २०० ते १००० लिटर इतके असते. हे
पाणी उत्सर्जित करणे, पिकाची पाण्याची गरज, प्रकार, त्याच्या वाढीची स्थिती,
वातावरणातील उष्याचे प्रमाण, एकू ण तापमान यांच्यावर अवलंबून आहे. जसे उसाला
आणि भाताला, गहू आणि इतर धान्यापेक्षा खूपच जास्त पाणी लागते. एक हेक्टर
मक्याचे पीक साधारणपणे ५० लाख लिटर पाणी उत्सर्जित करते. म्हणजे त्या पिकाला
किमान ८० लाख लिटर पाणी लागते. अशा दृष्टीने या विषयाकडे पाहिले तर कृ षी
उत्पादन हे माणसांपेक्षा जास्त पाणी फस्त करते. अगदी आकडेवारीतच सांगायचे तर
जगातील एकू ण पिण्यायोग्य पाण्यापैकी ८७% पाणी हे शेतीसाठी वापरले जाते जे परत
मिळत नाही.
आता यात अजून एक गंमत आहे ती म्हणजे जमीन एखाद्या विशिष्ट देशाची आहे
पण पाण्याचे मात्र जरा विपरीत आहे. ते असे की जगातील पाण्याची उपलब्धता ही
पर्यावरणावर अवलंबून आहे आणि पर्यावरण मात्र या पृथ्वीतलाशी, पृथ्वीवरच्या
वातावरणाशी म्हणजेच देशांच्या सीमापार, सर्व जगाशी निगडित आहे. याचा अर्थ एकाच
देशाने फक्त स्वत:पुरती पर्यावरणाची पूर्ण वाट लावली असे शक्य नाही. याचा अजून
एक अर्थ म्हणजे कोणत्याही एका देशाने उन्मत्त होऊन आणि बेजबाबदारपणे वागून जर
वातावरणातील एकं दर घटक वायूंचे प्रमाण मर्यादित ठे वले नाही तर इतर देशांना
तापमान, उष्मा, पाऊस या सगळ्या बाबींसाठी त्याचे परिणाम भोगायला लागणारच.
म्हणजे जमीन त्या त्या देशाची असली तरी पाणी, शुद्ध हवा यासाठी मात्र सर्वजण
एकमेकांशी जोडले गेले आहेत.
पाण्याची शुद्धता हा एक गंभीर विषय आहे. आशियातील ९०% रोग हे प्रत्यक्षपणे
अशुद्ध पाण्याशी निगडित आहेत. जगातील अनेक रोगांची लक्षणे ही के वळ पाण्याशी
संबंधित असून दरवर्षी ६० लाख मृत्यूमागे फक्त पाण्यामुळे झालेल्या जंतूसंसर्गाचे
कारण असते.
मुळात माणसांसाठी कमी पाणी असल्याने आणि पाण्याचे नियोजन हा के वळ
चर्चेचा विषय झाल्याने पाण्यामुळे कालांतराने माणसात वितुष्ट येणार आहे. इतके च
कशाला पण साऱ्या जगाचे यापुढे फक्त पाण्यावरून विभाजन अथवा एकत्रीकरण होत
जाईल अशी परिस्थिती येणार आहे. विविध राष्ट्रांच्या भविष्यातील करारात आता नकळत
पाणी हा महत्त्वाचा घटक ठरेल. चीनमध्ये आत्ताच ३०० पेक्षा जास्त गावात पाण्यावरून
संघर्ष सुरू आहे. भारतात जनता सोशिक असली तरी हळूहळू पाण्याचा प्रश्न अतिशय
उग्र स्वरूप धारण करेल अशीच परिस्थिती आहे. दर २० वर्षांनी लोकांचे शहरी भागात
होणारे स्थलांतर हे दुप्पट होते आणि त्याचे काहीच आकलन अथवा नियोजन नसल्याने
पाणी, आणि शुद्ध हवा यांचे प्रश्न अधिकच बिकट होत जातात. जगात आणि विशेषत:
आपल्या भारतात, नव्यानेच निर्माण होणारी मोठाली नियोजनशून्य शहरे पाण्याची
नासाडी करून पाण्याचे प्रश्न भयाण अवस्थेला नेऊन ठे वत आहेत. जमीन, पाणी ह्या
आजपर्यंत गृहीत धरलेल्या गोष्टींचे रौद्र स्वरूप भविष्यात आपल्या अस्तित्वावरच
जीवघेणे प्रश्नचिन्ह उभे करू पाहत आहेत त्यांचा अंदाज आज तरी कोणालाही घ्यावा
वाटत नाही.
गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांवर संशोधन करून त्यांचे विविध प्रकार
जन्माला घालणाऱ्या संशोधन संस्था, त्यात विजिगिषु वृत्तीने आयुष्य वेचणारे शास्त्रज्ञ,
त्यांच्या जगाच्या कल्याणासाठी असणाऱ्या निष्ठा हे सारे मिळून नापीक झालेल्या
जमिनीत सुधारणा करून, पिकांची प्रतवारी, एकरी उत्पन्न एकवेळ वाढवू शकतील; पण
नवीन सकस माती ते तयार करू शकत नाहीत. शास्त्र, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी
जमिनीतले झरे, नद्यांमधील पाणी नाही वाढवू शकत. माणूस म्हणून, या निसर्गाचा एक
महत्त्वाचा भाग म्हणून हे शहाणपण आपल्याला का येत नाही, हा प्रश्न अस्वस्थ करणारा
आहेच; पण त्याहीपेक्षा आपल्याच अस्तित्वावर घाला घालण्याचे हे वेडेपण कु ठून येते,
ह्या प्रश्नाशी मानव दिग्मूढ झाला आहे असे म्हणावे लागेल.
११. कागदीबॉम्बचे संकट

'या पृथ्वीतलावर नेहमीच माणूस म्हणून विकसित होण्याचा प्रवास हा देशाच्या


ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या निरर्थक आकडेवारीपेक्षा वेगळा असतो. हा विकसित होण्याचा
इतिहास म्हणजे माणसाच्या स्वाभाविक विकासासाठी अनुकू ल वातावरणाची निर्मिती,
ज्यात माणसे स्वबळावर, स्वत:च्या मूलभूत आणि इतर गरजा भागवत संपन्न
आयुष्याकरता विकसित होऊ शकतात. माणसे हीच खरी संपत्ती आणि त्यांचा विकास
म्हणजे त्यांना हव्या त्या आयुष्यासाठी, त्यातील मूल्यांसाठी मुक्तपणे जगायला मिळणे
आणि हे कोणत्याही आर्थिक वाढीच्या व्याख्येपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.'
- मानव विकास अहवाल

यूनोच्या मानव विकास अहवालातील ही वाक्ये अत्यंत निरर्थक आणि भंपक


वाटावी असाच प्रवास आजच्या जगातील सर्व विकसित देशांचा आहे. ह्या विकसित
देशांनी जगातल्या विकसनशील देशांना नेहमीच तिसरे जग म्हणून संबोधले आहे. ज्या
देशांत मजबूत औद्योगिकीकरण झाले, लोकांना भौतिक सोयीसुविधा मिळाल्या ते देश
विकसित असे त्यांनीच ठरवून टाकले. म्हणजे या न्यायाने ज्या देशात नागरिकांना भौतिक
सोयीसुविधा नाहीत ते देश अविकसित? असे असेल तर ज्या देशाचे अर्थकारण मजबूत
आहे, समृद्धीच्या खुणा आहेत तरीही त्यातील हजारो माणसांना निव्वळ जगण्यासाठी
संघर्ष करावा लागतो, ती बेरोजगार, बेघर असतात, सरकारकडून मिळणाऱ्या अनियमित
मदतीवरच जीवन कं ठत असतात ते देश विकसित कसे म्हणावे?
म्हणजेच हे विकास नावाचे प्रकरण काय आहे ते नीट समजून घेतले पाहिजे.
मुळात विकास होणे म्हणजे काय? एखादा देश विकसित झालेला असतो म्हणजे
काय? अगदी मळात जाऊन पहिले तर यशस्वी विकास म्हणजे बरेच काही असायला
हवे. चांगले आनंदी जगण्याची परिस्थिती, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य अशा
मूलभूत गोष्टींची संपूर्ण तजवीज, मानवी मूल्यांची जपणूक, लोकांना स्वत:च्या
आवडीनिवडीचे असणारे मुक्तपण, लोकशाहीच्या माध्यमातून मिळणारे आचार, विचार
आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि त्यासाठीची मानसिकता तयार करणारे, कायम
ठे वणारे वातावरण. ह्या आदर्शवत वाटणाऱ्या व्याख्येच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर जगात
आत्ता काय परिस्थिती आहे? जगातील बहुसंख्य प्रदेश या विकासाच्या कोणत्या व्याख्येत
बसतात? या घडीला जगातील बहुतेक लोकांची आयुष्ये हुकु मशाह, लष्करशाह,
विकासाच्या नावाखाली स्वातंत्र्याची गळचेपी करणारे अर्थ-प्रशासक, विकासाच्या
नावाखाली लोकांना दीर्घ विनाशाच्या वाटेवर धाडणारा नफे खोरांचा समूह, अमाप संपत्ती
आणि पैशाच्या बळावर माजलेले माफिया, तस्कर, आणि मूठभर लोकशाही राष्ट्र आणि
त्यातले स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारणी यांनी वेठीस धरली आहेत.
जगातल्या ८०% लोकांच्या वाट्याला कोणाच्या तरी मिंधेपणात, कोणाच्या तरी
नादारीवर आयुष्य ढकलणे आले आहे. ह्या सगळ्या मानवजातीच्या विवशतेला आता
आलेल्या आंधळ्या आणि अविचारी अशा जागतिकीकरणाने अधिकच असहाय्य के ले
आहे. मी जागतिकीकरणाच्या विरोधात हे लिहितो आहे असे कोणी समजू नये. पण
जागतिकीकरण डोळसपणे के ले जात आहे असा दावा जर कोणी करीत असेल तर तो
खरा नाही. जागतिकीकरणाच्या नावाखाली जर हळूहळू मानवी जगण्याचे सर्वच आयाम,
सर्वच परिमाणे एका अर्थाने आंतरराष्ट्रीय हितसंबंधांचे होऊन बसणार असतील तर काय
कामाचे? विकसित नसणाऱ्या पण; विकासाच्या प्रगत राष्ट्रांनी भुरळ पडलेल्या रस्त्यांवर
चालणाऱ्या राष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट आहे. तिथल्या नागरिकांना देशाच्या
पद्धतीने जगण्याचे पुरेसे स्वातंत्र्य नाही, दुसऱ्या राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय
दहशतवादाबद्दल प्रत्युत्तर देण्याचे साधे सार्वभौमत्वसुद्धा, आर्थिक बाबी एकमेकांत प्रचंड
प्रमाणात गुंतल्याने ती राष्ट्र गमावत आहेत. तसे पहिले तर आंतरराष्ट्रीय राजकारण हे
नेहमीच गुंतागुंतीचे आणि बरेचसे मानवी हितापेक्षा हितसंबंधांच्या तीरावरून वाहणारे
असते. नागरिकांच्या आत्मसम्मानापेक्षा कोणाचे तरी हितसंबंधच सुपीक होत जातात
आणि निर्लेप जगण्याच्या हक्कावर गदा येते. आर्थिकदृष्ट्या ही राष्ट्र परावलंबी होत
कर्जाच्या खाईत लोटली जातात. या सगळ्याला हातभार लावणाऱ्या दोन तालेवार
आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. त्या म्हणजे नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक. जगातील लोकांच्या
हितासाठी जन्माला आल्याचा दावा करणाऱ्या ह्या संस्था कोणते हित पाहत आहेत याचे
वस्तुनिष्ठ हिशेब करायची वेळ आता आली आहे.
“आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेला आपला व्यवसाय पैसा मागणाऱ्या देशाला
काहीएक प्रश्न विचारू न देता करायचा आहे. त्यांच्या थिअरीप्रमाणे ही संस्था
लोकशाहीवादी संस्थांना मदत करते; पण प्रत्यक्षात मात्र ते कोणतीही लोकशाहीची पद्धत
पाळत नाहीत. ती फक्त स्वत:च्या फायद्याच्या धोरणांना राबवताना दिसते. अर्थात
त्यांच्या मते ते काहीही लादत नाहीत; तर ते मदत देण्यासाठी त्यांच्या काही अटींची
देवघेव करतात. पण ही देवघेव मात्र एकाच बाजूला झुकलेली असते. मुळात ते तुम्हाला
चर्चा करण्यासाठी वेळच देत नाहीत, तुम्ही ते म्हणतात ते निमूटपणे मान्य करावे आणि
तुम्ही त्याबद्दल कोणाशीही सल्लामसलत करू नये यावर त्यांचा कटाक्ष असतो."
- जोसेफ स्तीग्लीत्झ , नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ (या अतिशय कु शाग्र अर्थतज्ज्ञाला
वर्ल्ड बँक आणि नाणेनिधी बद्दल टीका के ल्याने त्यांच्या प्रमुख सल्लागार पदाचा
राजीनामा द्यावा लागला.)
आजमितीला जगातील बहुतेक विकसनशील राष्ट्र नाणेनिधी सारख्या आंतरराष्ट्रीय
संस्थांच्या धोरणांची बळी ठरली आहेत. त्यांनी आणलेले Structural Adjustment
Program अनेक देशांच्या दारिद्र्याला आणि कर्जबाजारीपणाला कारणीभूत आहेत.
IMF आणि वर्ल्ड बँके ने दारिद्र्यनिर्मूलनाचा कं ठशोष करूनही त्यांच्या मदतीवर
अवलंबून असलेल्या अनेक राष्ट्रातील दारिद्र्य हे कल्पनेबाहेर वाढले आहे. काही वर्षांपूर्वी
मुक्त व्यापाराच्या पुरस्कर्त्यांनी Neoliberalism असे एक गोंडस नाव देऊन सरकारचे
किमान हस्तक्षेप असणारा बाजार, सामाजिक योजनांवर किमान सार्वजनिक पैसा खर्च
करणारी एक प्रणाली विकसित के ली. तिच्या प्रभावाखाली Structural Adjustment
Program (SAP) सारख्या योजना आणण्यात आल्या. इतर सर्व स्वार्थी आणि विकसित
राष्ट्रांना सोयीच्या अनेक योजनांप्रमाणे यांचाही मुखवटा हा गरीब देशांचे कर्जनिर्मूलन
आणि त्यासाठीची नवीन अर्थव्यवस्था उभी करणे हाच होता. मात्र प्रत्यक्षात या
प्रोग्रॅमद्वारा विकसनशील देशांच्या आरोग्य, शिक्षण आणि विकास यांच्या खर्चावर बंधने
घालून तो पैसा कर्जाची परतफे ड, आर्थिक धोरणे बदलणे यासाठी वळवण्याचे बंधन
घालण्यात आले. म्हणजे त्या देशांना ह्या योजनेअंतर्गत मदत हवी असेल तर त्याने या
पद्धतीच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणे हे अनिवार्य होते. म्हणजेच सबसिडी कमी
करणे, परदेशी भांडवलासाठी अर्थव्यवस्था पूर्ण मुक्त करणे, सरकारचा हस्तक्षेप कमी
करणे, स्थानिक उद्योगांना संरक्षण कमी करून सरकारी संस्थांचे खाजगीकरण करणे,
त्या देशाचे चलनमूल्य कमी करून देशांतर्गत कर्जावरील व्याज वाढवणे, परदेशी भांडवल
आकर्षित करण्यासाठी अनेक बंधने व नियम शिथिल करणे असल्या जाचक शर्ती त्यात
होत्या.
ह्या सगळ्याने दारिद्र्याने खचलेल्या राष्ट्रांचे तर कं बरडेच मोडले. कच्चा माल
विकसनशील देशांकडून स्वस्त दरात आयात करून त्या बदल्यात त्यांना आपला पक्का
माल घ्यायची सक्ती के ली. म्हणजे तेच जे इंग्रजांनी वसाहतवादाच्या काळात जगातील
भारतासकट अनेक देशांबद्दल के ले ते यांनी सध्याच्या पुढारलेल्या जगात IMF आणि
वर्ल्ड बँके आड लपून के ले. जो देश कच्चा माल निर्यात करतो त्याला या निर्यातीपासून
मिळणारे उत्पन्न, गरज असलेला पक्का माल/प्रक्रिया के लेल्या वस्तू आयात करायला
पुरत नाही. म्हणजे समजा, एखाद्या देशाने जर लाकू ड निर्यात के ले आणि त्या देशात जर
लाकडावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसेल तर त्याला हे प्रक्रिया के लेले महाग लाकू ड
आयात करावे लागते. पण जो देश हे कच्चे लाकू ड आयात करतो तो मात्र त्यावरच्या
प्रक्रियेसाठी मजबूत पैसा कमवतो. हे किमतीचे जाणूनबुजून निर्माण के ले संघर्ष आहेत.
लोकांना पिळण्यासाठी आणि आपल्या मालाचे मार्के ट सुरक्षित ठे वण्याची ही नवीन
जगाची चाल आहे. किमतीच्या जाणूनबुजून निर्माण के लेल्या या संघर्षाने आता कच्च्या
मालाचे निर्यातदार देश गरीब आणि आयातदार देश श्रीमंत असे चित्र उभे के ले आहे.
वरकरणी पाहता निर्यातदार देशांना कॉफी, साखर, कापूस, लाकू ड अशा गोष्टींच्या
निर्यातीने परकीय चलन मिळते. पण हे किमतीचे संघर्ष असमान व्यापार व्यवस्था निर्माण
करतात. समजा, एखाद्या देशाने जर देशांतर्गत १०० रुपये एखाद्या वस्तूच्या उत्पादनात
गुंतवले तर त्या उत्पादनाच्या प्रक्रियेत, ते १०० रुपये, मजुरांना द्यावा लागणारा
मेहनताना, उत्पादनासाठी लागणारा इतर माल, कच्च्या आणि पक्क्या मालाची वाहतूक,
अशा अनेक बाबींवर खर्च होऊन हस्ते, परहस्ते हजारो/लाखो रुपयांची राष्ट्रीय संपत्ती
तयार होत असते. म्हणून आजमितीला जगातील ५० पेक्षा अधिक विकसनशील देश
त्यांच्या निर्यातीत विकसित राष्ट्रांची फार थोडी उत्पादने आयात करू शकतात. याउलट
२०% विकसित राष्ट्रांची ९०% निर्यातक्षमता मात्र पूर्णपणे या उत्पादनांवर अवलंबून
असते. मग निर्यातदार देश कफल्लक होत जातात. त्यांना कर्जे घ्यावी लागतात. ती
देताना त्या देशांवर नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक आपल्या प्रोग्रॅमद्वारे काही शर्ती लादतात.
युनिसेफच्या एका अहवालानुसार, १९८० च्या दशकात दरवर्षी एकट्या आफ्रिका
आणि लॅटीन अमेरिके त, ६ वर्षांखालील ५ लाख मुलांना आपले प्राण गमवावे लागले
होते. त्यांनी अशा प्रोग्रॅमप्रमाणे त्या देशांवर आरोग्य खर्च कमी करणे, स्वस्त अन्न योजना
बंद करणे, करातली वाढ हे सर्व लादल्याने आलेल्या कर्जबाजारीपणाचा तो अपरिहार्य
परिणाम होता.
अमेरिके तील ओकलाहोमा शहरात एका रासायनिक खतांच्या बॉम्बने शेकडो
मरतात, ९/११ चा लादेनचा पेट्रोल बॉम्ब ४००० लोकांना मारतो, मुंबईतील अतिरेकी
हल्ला शेकडो लोकांचे प्राण घेतो. मात्र इराकवरची कागदावरील आंतरराष्ट्रीय बंधने मात्र
१५ लाख लोकांचा बळी घेतात; तर मुक्त व्यापाराचे एखादे आंधळे धोरण एखाद्या
खंडातील लोकजीवनच उद्ध्वस्त करते. जगाच्या विकासाच्या सर्वांत प्रगत असे
मिरवणाऱ्या या टप्प्यावर प्रत्यक्ष बॉम्बपेक्षा, काही संस्थांच्या कागदाच्या बॉम्बने जास्त
हानी होते आहे आणि त्याला अतिरेकी हल्ला म्हणता येत नाही; तर विकासाचे ब्ल्यू प्रिंट
म्हणावे लागते.
१२. अन्नधान्य मदतीची आपत्ती

नोंद १ - सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा आयर्लंडच्या बंदरात ब्रिटनसाठी मक्याची


जहाजे भरली जात होती तेव्हाच आयर्लंडच्या कु प्रसिद्ध बटाट्याच्या दुष्काळात सुमारे १५
लाख लोक मृत्यूमुखी पडत होते. नंतर एका विद्द्वनाने परिसंवाद याची आठवण देत
म्हटले, त्याकाळात किती रानटी/अमानुष लोक होते जे आपल्याच देशात लोक भुके ने
मरत असताना देशातला मका निर्लज्जपणे निर्यात करण्यात गुंतले होते.'
नोंद २ १९४३ साली भारतात बंगालच्या दुष्काळात २० लाखांवर लोक मृत्युमुखी
पडले, त्यावर नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी लिहिले आहे. “बंगाल दुष्काळ' ही
निसर्गनिर्मित आपत्ती नव्हती; तर कष्टाने पिकवलेले धान्य ब्रिटिश सरकारने बेशरमपणे
इतरत्र वळवल्याचा तो एक क्रू र परिणाम होता.'
तुम्हाला जर असे वाटत असेल की, वरील उल्लेख हे अमानवी इतिहासाचे
कालखंड आहेत आणि आजच्या तथाकथित प्रगत जगात वरील दोन गोष्टीतला तो
अमानवी चेहरा लुप्त झाला आहे तर तुम्ही भाबड्या भ्रमात आहात. हे सगळे पुन्हा
वेगळ्या स्वरूपात सुरूच आहे. याउलट हरितक्रांतीसारख्या कृ षी व्यवसायातल्या अनेक
चळवळीनंतर वाढलेल्या उत्पादनाने, मागील ६० वर्षांत जगभर अन्नधान्य हे राजकीय
शस्त्र म्हणून आणि त्याची मदत हा व्यापाराचा कणा म्हणून बघण्याचा अश्लाघ्य धंदा
सुरूच आहे. कोणत्याही संस्कृ तीत अन्नधान्य मदतीला सद्भावनेचे, माणुसकीचे जे हळवे
कं गोरे आहेत त्याच्या आडून ह्याचा व्यवसाय करत राहणे आणि हवा तसा नफा कमवणे
हा काही देशांचा आणि बहुराष्ट्रीय कं पन्यांचा अजेंडा आहे. एखाद्या गोष्टीची मदत ही; ती
घेणाऱ्याला अधिकच दुबळे बनवते अशा सैद्धान्तिक दृष्टिकोनातून तुम्ही याकडे पहिले तर
मी काय मांडणी करतो आहे ती लक्षात येऊ लागेल. ही गोष्ट आता जवळपास सिद्ध
झाली आहे की त्सुनामी व तत्सम आपत्ती वगळता इतर कोणतीही अन्नधान्याची मदत ही
अंतिमत: घेणाऱ्याचा विनाशच करणारी असते. हे भाबड्या माणसांना पटणार नाही,
समजणारही नाही. त्यांच्यासाठी काही उदाहरणे देतो. ही उदाहरणे मुद्दामच सन २००१
जानेवारीतली देतो; कारण तेव्हा दहशतवाद हा मुद्दा आजच्या इतका ऐरणीवर नव्हता
आणि आजच्यासारखा प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा उपयोग प्रगत राष्ट्रांकडून के ला जात
नव्हता.
खालील घटना या २००१ पूर्वीच्या आहेत.
* थायलंडमधली ४३% जनता, दारिद्र्यरेषेखाली जगत होती आणि त्याच वेळी
थायलंडची कृ षी निर्यात ६५% पर्यंत वाढली आहे.
* बोलिव्हिया २००१ साली त्यांच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त
निर्यात करत असताना त्यांच्या ९५% ग्रामीण जनतेचे उत्पन्न दिवसाला १ डॉलर इतके
झाले आहे.
फिलीपाईन्समध्ये विशिष्ट प्रकारच्या फु लांसाठी लागवड वाढवण्यात आल्याने भात
आणि मका यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे आणि सुमारे साडेतीन लाख जीवांचे
आयुष्य धोक्यात आले आहे.
* १९७० साली असेच ब्राझीलमध्ये घडले होते जेव्हा त्यांनी जपान आणि इतर
युरोपियन देशांना सोयाबीनची बेसुमार निर्यात के ली. आणि त्याच वेळी ब्राझीलची दोन
तृतीयांश लोकसंख्या भुके ली झाली मग १९९० मध्ये ब्राझील जगातील तिसरा कृ षी
उत्पादनांचा निर्यातदार बनला. (त्याला अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर गौरवण्यात
आले) हे होत असताना ब्राझीलच्या जनतेला भात मिळणे मात्र दुर्मीळ झाले.
मागच्या काही वर्षात मेक्सिकोने २० लाख शेतकऱ्यांना बेरोजगार करून टाकले
आहे. कारण काय तर त्याने अमेरिके तून प्रचंड प्रमाणात अतिशय स्वस्त मका आयात
करणे सुरू के ले.
हैती या आफ्रिकन देशात नाणेनिधीने सक्तीने अमेरिके चा तांदूळ आयात करायला
लावला आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सबसिडी थांबवण्यात आल्या. १९८० ते १९९७ या
वर्षात हैतीची तांदूळ आयात शून्यापासून ३ लाख टनापर्यंत पोचली. हैतीचे शेतकरी शेती
सोडून इतर मजुरी करून भिकारी झाले. याच नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार हैतीतील ५
वर्षांखालील ५०% मुले कु पोषणाचे बळी आहेत. हे सगळे निगडीत आहे का?
आता अजून एक, ज्यांचा मुक्त व्यापाराचे पुरस्कर्ते म्हणून जगभर बोलबाला आहे
त्या अमेरिके त आणि युरोपियन राष्ट्रांतच शेतीउद्योग हा अतिशय संरक्षित आणि जपलेला
आहे हा विरोधाभास काय सांगतो? गरीब देशांवर अन्नधान्य मदत लादल्याने त्याचे
अतिशय विपरीत परिणाम स्थानिक शेतीवर, शेतकऱ्यांवर होतात. ते या स्वस्त अन्न
आयातीपुढे टिकू च शकत नाहीत. देशातला शेतीउद्योग विकसित होत नाही आणि ते
जास्तीत जास्त या परदेशी मदतीवर अवलंबून राहतात. मग एक दिवस हा परकीय
मदतीवर जगणारा देश कर्जबाजारी होऊन स्वत:च्या अस्तित्वाचेच सौदे करू लागतो. त्या
देशात भ्रष्ट आणि अविवेकी राजकीय वातावरण असेल तर मग ही प्रक्रिया अधिकच
वेगवान होत जाते. (नसतील तरी तसे वातावरण निर्मिती करणारे राजकीय लोक सत्तेवर
आणता येतात) त्याचवेळी मदत करणाऱ्या राष्ट्रांत मात्र शेती हजारो एकरांवर बहरत
असते. आधुनिक, पूर्ण यांत्रिक शेती करत उत्पादनाचे नवनवीन उच्चांक ते गाठत
असतात. या सगळ्यामुळे त्यांचे हे अन्न इतके स्वस्त असते की त्याच्याशी कोणत्याही
देशातील अन्नधान्याच्या किमती स्पर्धा करूच शकत नाहीत. त्यांच्या शेतकऱ्यांना
सबसिडीचे वाढते संरक्षण असते आणि तेथील राज्यकर्ते जगात अन्न मदतीचे मानवतेचे
मुखवटे घालून मिरवत असतात. मदत घेणाऱ्याची अर्थव्यवस्था मात्र डबघाईला येते,
त्यांचे अन्नधान्य महाग असते, परदेशातून आयात के लेल्या धान्याला शासकीय अथवा
गैरशासकीय यंत्रणा वितरणासाठी हातभार लावतात. देशी मालाची ती कदर करताना
सरकार दिसत नाही, उलट शेती करणे सोडा असे सल्ले ते देते. मग हळूहळू स्थानिक
लोकांना शेती करणे परवडत नाही. हे सर्व स्थानिक शेतीचा कणा मोडणाऱ्या योजनेचा
भाग असतो हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही.
आजही जर गरीब राष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुरेशी जमीन, यांत्रिक शेतीसाधने आणि
स्वस्त आयातीपासून संरक्षण दिले तर ती त्यांच्या देशाची अन्नाची गरज भागवून ते निर्यात
करण्याची क्षमता आणू शकतील हे (प्रगत राष्ट्रांसाठी भीतीदायक असणारे) वास्तव आहे.
या सर्व देशांत शेतीसाठी लागणारे मनुष्यबळ तर अतिशय मुबलक प्रमाणात आहे. आज
जर अमेरिके तल्या/युरोपातल्या सरकारने तिथल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी काढून घेतल्या
अथवा तिथल्या बाजारात ६०% अन्नधान्य जर परदेशातून आणले गेले तर तिथे भयानक
दंगली होतील. त्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणूनच बऱ्याच वेळा प्रगत
राष्ट्रांकडून अन्नधान्य मदतीच्या योजना आंतरराष्ट्रीय स्तरावर हेतुपूर्वक राबवल्या जातात
हे आता लक्षात आलेले आहे. या सगळ्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून जग जितके
जास्त अन्नधान्य पिकवते आहे तितके ते जास्त भुके ले राहते आहे असे विदीर्ण चित्र उभे
राहिले आहे. समीर पूर्वीचा वसाहतवाद आणि नंतर आलेला मक्तेदारीचा
भांडवलशाहीवाद हे याचे एक कारण आहे. खरे तर प्रत्येक देशात त्यांच्या हवामानाप्रमाणे
काही धान्य हे पोषक आहार असतेच जे त्या देशात मुबलक असते. त्या देशाची
शेतीव्यवस्था सुदृढ ठे वण्याचे कामही ते करत असते. पण फक्त आपल्याच देशात
मुबलक होणारे सोयाबीन, बीफ आणि इतर अपारंपरिक अन्नधान्य गरज नसताना
जगाच्या माथी पोषक आहार म्हणून मारण्याचा उद्योग काय दर्शवतो? हजारो लोकांना
त्यांच्या जमिनीवरून हुसकावून लावून त्याजागी आलेल्या आधुनिक शेती करणाऱ्या
बहुराष्ट्रीय कं पन्या ह्या फक्त त्यांच्या मातृदेशाचेच हित बघतात. स्थानिक लोकांची खरेदी
करण्याची ताकद खच्ची झाल्याने (त्याचीही कारणे मक्तेदारीच्या व्यापारातच) स्थानिक
व्यापार विकसित होत नाही. त्यामुळे देश भुके ने खंगलेला असतानाही गरीब देशातील
धान्यनिर्यातीचे खूळ वाढते आहे. ८० च्या दशकात इथिओपियात भीषण दुष्काळ
पडलेला असताना तो देश मात्र हिरवे वाटाणे युरोपात निर्यात करत होता हे भेदक वास्तव
इथे लक्षात घेतले पाहिजे.
या पद्धतीने सध्याच्या तिसऱ्या जगातील राष्ट्र ही स्वत:च्या गरजेपेक्षा विकसित
राष्ट्रांना लागणारी उत्पादने घेऊ लागले आहेत. यात त्या देशातील नैसर्गिक
साधनसंपत्तीचा काहीही लाभ स्थानिकांना होत नाही. जगात मजुरीचा दर विकसनशील
राष्ट्रांत सगळ्यात कमी आहे. याचा प्रभावी उपयोग कु टीलतेने प्रगत राष्ट्र करून घेताना
दिसतात. तुम्ही आमच्यासाठी काम के ल्यास तुमच्या देशापेक्षा जास्त पगार देऊ, अधिक
चांगल्या सुरक्षित, सुस्थितीत व्यवस्थेत ठे वू पण तुम्ही देश सोडला पाहिजे असा बौद्धिक
वर्गाचा ब्रेनड्रेन एकीकडे तर आमच्याकडून अन्नधान्याची मदत घ्या, तुमच्याकडे मजूर
स्वस्त असल्याने तुम्हाला लागते ते नाही तर आम्हाला लागते ते पिकवा आणि निर्यात
करा, मग देश उद्ध्वस्त होऊन तो आमच्याच मदतीवर अवलंबून राहो असा ग्रेनड्रेन
दुसरीकडे. असा हा सगळा मदतीचा मामला आहे. या सगळ्या अनैतिक व्यवहाराला
संघटीत आणि एका सत्रात ओवायला जागतिक व्यापार संघटना, नाणेनिधी अशा
संस्थांची फौज आहेच दिमतीला. अन्नधान्य निर्यात करणाऱ्या देशांना हे सर्व धंदे
फायद्याचे असतील, पण आयात करणारे मात्र यामुळे स्वत:ची धान्य पिकवण्याची क्षमता
गमावून बसल्याने ही त्यांच्यासाठी मानवनिर्मित आपत्ती आहे. आपल्या देशात शेतीला
मजबूत सबसिडी द्यायची जेणेकरून उत्पादन वाढते, मग ते खपवण्यासाठी अप्रगत
राष्ट्रांच्या सरकारांना वेठीला धरायचे आणि तेथील स्थानिक उत्पादन महाग ठरवायचे असे
धोरण विकसित देश ठे वतात. औद्योगिक माल खपवण्याच्या क्लृप्त्या जरा कठीण
असतील; पण अन्न मात्र मदतीच्या नावाने सहज खपवता येते. शिवाय त्याला माणुसकीचे
परिमाण आहे, जगात त्याने एक गुडविल तयार होते. त्यातून इतर व्यापारही वृद्धिंगत
होतात.
अन्नमदतीविरुद्ध स्थानिक लोक चिडत नाहीत; कारण ती मूलभूत गरज आहे.
आणि त्याआडून तुम्हाला निश्चितपणे अधिक भुके ले, अधिक गरीब करता येते आणि हे
मदतीचे भयाण चक्र मानवतेच्या नावाखाली अव्याहतपणे सुरू ठे वता येते.

१३. अनारोग्य धनसंपदा

मला तुम्हांला मानवी जगण्या-मरण्याच्या व्यवसायाची, त्यातील नफ्याची एक


भयाण गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट आफ्रिका खंडातील काही गरीब देश, जगावर
नियंत्रण ठे वू पहाणाऱ्या काही मूठभर देशांच्या बटिक संस्था आणि काही श्रीमंत होत
जाणाऱ्या विमा कं पन्या या सगळ्यांच्या एकत्र प्रवासाची आहे. या गोष्टीत तुम्हांला
आपले, हे आधुनिक जग कसे आहे, त्याने किती प्रगती साधली आहे, त्याचा पुढचा
प्रवास कोणत्या दिशेला होणार आहे, या सगळ्या रंजक गोष्टींचा वेधक आढावा घेता
येईल. जगण्याचे मूलभूत हक्क, उद्दिष्ट आणि त्याचा विपरीत प्रवास या सगळ्याचे एक
विदारक चित्रण या गोष्टीत आहे. सुरुवातीला तुम्हाला त्या वातावरणात नेण्यासाठी एक
माहिती देतो. जगातील साधारण २ कोटी लोक दरवर्षी आरोग्य सेवेला वंचित होऊन
बळी जातात. याचा अर्थ तुम्ही हा लेख वाचेपर्यंत जगातील सुमारे १२० लोक मरण
पावले असतील. त्यातील अर्धी संख्या ५ वर्षाखालील मुलांची आहे.
१९७८ साली जागतिक संघटनेने ऐतिहासिक आल्मा परिषदेत आरोग्य हा
जगातील नागरिकांचा मूलभूत हक्क असून सरकारांवर त्याची संपूर्ण जबाबदारी आहे
असे ठाम प्रतिपादन करणारा एक ठराव संमत के ला आणि सर्व देशांना सक्तीचा के ला.
दक्षिण आफ्रिके तील बहुतेक सरकारांनी त्याप्रमाणे ७० च्या दशकात बरीच मजल मारली.
त्यांनी देशात आरोग्य सेवेच्या सदढ व्यवस्था उभी करण्याचे आव्हान पेलायचे कसोशीने
प्रयत्न के ले. हे चालू असताना जगभर प्रगत राष्ट्रांनी तिथल्या बहुराष्ट्रीय कं पन्यांनी
आफ्रिके तल्या खनिज संपत्तीवर डोळा ठे वत विकासाचे ढोल पिटायला सुरुवात के ली.
प्रगत कु टील देशांनी आफ्रिकन सरकारांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात
बोलावण्याचा सपाटा लावला. त्यांच्या विकासासाठी मदतीला जागतिक बँक आणि
नाणेनिधी या प्रगत देशांच्या बटिक संस्था सरसावल्या. मग हे आफ्रिकन देश जागतिक
बँक आणि नाणेनिधीचे प्राधान्याचे ग्राहक बनले. त्यांना सढळ हाताने कर्जे मंजूर झाली.
गोष्टीत इथपर्यंत सर्व ठीक होते. मग हळूहळू त्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या बदल्यात
देशातील इतर खर्चाला कात्री लावण्याच्या अटी त्यांच्यावर लादण्यात आल्या. सामाजिक
योजनांवरचे आणि सार्वजनिक जनतेच्या हिताचे खर्च कमी करण्याच्या त्या अटी होत्या.
त्यात आरोग्य, शिक्षण, नागरी व्यवस्था जी सरकारच्या अखत्यारीत होती असे सर्व आले.
हे सरकारने करू नये, त्याचे खाजगीकरण करावे असे आदेश दिले गेले. अन्यथा कर्जावर
गदा येईल असेही बजावण्यात आले. विकासाच्या वाटेवर आंधळेपणाने चालणारे हे साधे
देश मुकपणे हे मान्य करत गेले. या दोन बेमर्वत संस्थांनी त्या देशांभेवती आपले पाश
आवळायला सुरुवात के ली आणि मग सगळे सामाजिक आणि सार्वजनिक खर्च थांबले.
एके क करत जनहिताच्या सर्व सरकारी व्यवस्था मोडून पडल्या. लोकांच्या हालाला
पारावर उरला नाही. या देशांना भंपक असा जो विकास हवा होता तो त्यांनी मूलभूत
आरोग्याच्या हक्कांच्या बदल्यात असा मिळवला. - आरोग्य आणि गरिबी यांचे अतूट नाते
असते. जागतिक बँक आणि नाणेनिधी आशा अनेक Structural Adjestment
Programs प्रोग्राम (SAP) मुळे जगातील अनेक देश भीके च्या उंबरठ्यावर उभे ठाकले
आहेत, हे सत्य आहे या संस्थांकडून मिळणारी मदत ही कालांतराने अत्यंत घातक अशी
गोष्ट बनते. जी अखेर तुम्हाला तुमच्या देशाच्या खोट्या हितासाठी अमानवी तडजोड
करायला भाग पाडते. त्यामुळे गरिबी वाढते. गरिबीने सरकारचे सर्व प्राधान्य हे भुके ला
जाते. इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते. आणि लोक रोगाने ग्रासले जातात. हेच आफ्रिका
खंडात घडले आणि आज ते सर्व विकसनशील देशांत घडते आहे. आफ्रिकन देश या
सापळ्यात इतके अडकले की ९० व्या दशकात त्या सरकारचे बहुतांशी उत्पन्न हे परदेशी
कर्जे फे डण्यात जात होते. आरोग्य, शिक्षण अशा मुलभूत गरजांसाठी सरकारांकडे पैसा
नव्हता. १९९७ सालच्या एका अहवालानुसार आफ्रिकन देश त्यांच्या देशाअंतर्गत
खर्चाच्या चार पट रक्कम परदेशात कर्जाच्या परताव्याच्या रुपाने पाठवत होते. या
दरम्यान तिथे अनके नागरिक कु पोषणाने मरत होते, एड्सचा शिरकाव झाला होता; पण
त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्या देशांकडे पैसा उरला नव्हता. त्या देशातले लोक
शेकड्याने एड्सच्या महामारीला बळी पडत आहेत. मात्र सरकार आपले उत्पन्न कर्जाचा
डोंगर कमी करण्यासाठी वळवते आहे असे अमानुष दृश्य जगाने पहिले आहे. या संस्था
आणि इतर प्रगत देश त्यावेळी वेगवेळ्या पषिदांतून आफ्रिके वरच्या एड्स संकटासाठी
टिपे गाळत होते. आरोग्य सेवेच्या खाजगीकरणाच्या बिनडोक धोरणामुळे नागरिकांना
बसलेला हा पहिला सणसणीत फटका होता.
जागतिकीकरणामुळे अमुकढमुक इतकी परदेशी गुंतवणूक आली, फलाणे-ढमके
रोजगार उपलब्ध झाले, देशाचा विकासदर वाढला याची आकडेवारी सतत तोंडावर
फे कणारे नादान पंडीत एक गोष्ट विसरतात की, या रेट्याने अनेक देशांच्या सामाजिक
चौकटीला अत्यंत विपरीत पद्धतीने उद्ध्वस्त के ले आहे. त्या सामाजिक चौकटीत
असणाऱ्या आरोग्यासारख्या मूलभूत हक्काला तर तिने नखच लावले आहे..
जागतिकीकरणाच्या नव्या वाटेवर चालताना वर्षानुवर्षे त्या देशात असणाऱ्या सामाजिक
सहजीवनाच्या पद्धती उखडल्या गेल्या आहेत आणि त्याऐवजी एक सामायिक
आंतरराष्ट्रीय पद्धती (जी अनेक देशांत निरुपयोगी ठरलीय) सगळ्यांवर लादली गेल्याने
लोकांच्या या मुलभूत हक्कावर, आणि शासनाच्या मुलभूत कर्तव्यावर टाच आली आहे.
आता आरोग्यव्यवस्था (हेल्थ के अर सिस्टीम) जगभर फोफावली आहे. सर्व देशातील
शासन प्रशासनास नागरीकांच्या आरोग्याची काळजी हा अहं मुद्दा असतो. गेल्या ५०
वर्षात यात अनेक बदल झाले आहेत. काही विद्वान म्हणतात, जगाने आरोग्याच्या
बाबतीत खूप प्रगती के ली आहे. एखाद्या देशात काही संकट आले तर सर्व जग इतर
राजकीय गोष्टी बाजूला ठे वून धावून जाते आणि जगाचे आरोग्य राखण्याला आता
त्यामुळे मानवतेचीही किनार लाभली आहे. जगभरातील विविध देशात आरोग्य सेवांची
पद्धत वेगळी आहे. त्याला त्या देशाचे राजकीय वातावरण, लोकसंख्या, सामाजिक
जीवनपद्धती अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही जगभरच्या नागरिकांसाठी आरोग्य
सेवांच्या सुसुत्रीकरणाचे काम पाहते. ह्या संस्थेच्या साठाव्या वर्धापन दिनी जो अहवाल
प्रकाशित करण्यात आला. त्यातील काही नोंदी थक्क करणाऱ्या आहेत. वेगवेगळ्या
मंचावरून मानवतेचे भाषण ठोकणारे प्रगत देश, के वळ प्रगत देश देशांच्या फायद्यांसाठी
जागतिकीकरणाच्या प्रवाहात नागवले जाणारे विकसनशील देश आणि अजूनही मूलभूत
आरोग्याच्या सेवेची आळख नसणारे तिसरे अविकसित देश त्यांचे वास्तव चित्र या
अहवालात आहे. आरोग्य सेवेची प्रगती सोडाच, पण प्राथमिक आरोग्य सेवेची काय
अवस्था जगभर आहे याचे एक चिंतीत करणारे रूप डोळ्यासमोर येते.
या अहवालात समोर आलेल्या काही विसंगती अशा आहेत :
* ज्या लोकांचे आरोग्य चांगले आहे ते आरोग्य सेवेचा कमाल फायदा घेतात आणि
ज्या लोकांच्या (गरीब) आरोग्याची समस्या आहे त्यांच्यापर्यंत ती पोचतच नाही.
* आरोग्यावर खर्च होणारा सरकारी पैसा हा श्रीमंत लोक फस्त करतात आणि
गरिबांना त्यापासून वंचित राहावे लागते.
* आरोग्यविमा हा प्रत्यक्ष गरजेच्या वेळी काहीच उपयोगी ठरत नाही; कारण तेव्हा
बरीच रक्कम स्वत:ची खर्च होते. आरोग्यविम्याचा हा भयानक सापळा जगभर दरवर्षी
दहा कोटी लोकांना गरिबीच्या खाईत ढकलतो.
आरोग्यविम्याच्या कं पन्यांचे रोगासंबंधी झालेले स्पेशलायझेशन आणि अत्यंत कमी
रोगांचे कव्हरेज यामुळे तर अनेक कु टुंबांना भयानक गोंधळाला आणि भीषण आर्थिक
अवस्थेला सामोरे जावे लागते.
* गरीब आणि अल्पसंख्य लोकांसाठी आरोग्यसेवा नेहमीच दुष्प्राप्य राहिलेली
आहे.
* आरोग्यसेवेच्या विकासाची कोणतीही मदत अत्यंत विष्कळीत स्वरूपात
लोकांपर्यन्त पोचते.
आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या कं पन्या जिथे लोकांना पाठवतात तिथल्या
आरोग्यसेवेची व्यवस्था अतिशय निष्काळजीपणे, अस्वच्छ पद्धतीने चालवली जाते.
त्यामुळे निष्कारण संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन अनेक लोकांना प्राणाला मुकावे
लागते. औषधांचा तुटपुंजा पुरवठा, गलथानपणा आणि आरोग्यसेवा देणाऱ्या अर्धशिक्षीत
लोकामुळे तर हे अधिकच वाईट होऊन बसले आहे.
दरवर्षी तिसऱ्या जगातील सुमारे ७० लाखांहून अधिक रुग्ण के वळ वैद्यकीय सेवा
परवडत नाही, औषधे स्वस्त आणि परिणामकारक नाहीत म्हणून प्राणास मुकतात.
* सध्याची आरोग्य व्यवस्था ही हळूहळू विमा उद्योगाच्या हातात जात असून
तिचेही बाजारीकरण झाले आहे.
आपले सरकार काय आणि WHO काय दरवर्षी आरोग्य सुधारल्याचे खोटे आणि
पोकळ दावे करण्यात गुंग असते. ५० वर्षापेक्षा आता परिस्थिती फार चांगली आहे असा
एक युक्तिवाद के ला जातो. त्यात तथ्य असेलही, पण तुलना ही नेहमी समकालीन
असते. कारण हे दावे जर खरे असते तर जगात आरोग्य उत्तम असते. त्यामुळे आपण या
सगळ्या भाबड्या नव्हे, तर बदमाश दाव्यांना बाजूला ठे वून साध्या जगाची आरोग्याची
काय परिस्थिती आहे हे पाहू या.
जगात सुमारे १३० कोटीहून अधिक लोक आरोग्यसेवेपासून वंचित आहेत.
* २००८ या एकाच वर्षात जगभरात ५ वर्षाखालील १,६५,००० मुले के वळ -
मूलभूत लसीकरणापासून वंचित असल्याने बळी पडली. ४० वर्षापासून उपलब्ध
असणाऱ्या या लसींची किंमत १० रुपयांपेक्षाही कमी आहे.
* कु पोषण आणि आरोग्य-सेवेची मदत नाही म्हणून जगात दरवर्षी सुमारे ९०
लाख मुले (५ वर्षे आणि कमी) मृत्युमुखी पडतात.
* जगात आज ३.३ कोटी लोक एड्सचे रुग्ण आहेत, दरवर्षी ३ लाख मरतात तर
२० लाख नव्या लोकांना लागण होते.
* जगात दरवर्षी क्षयरोगामुळे दाखल होणाऱ्या ९० लाख रुग्णांपैकी १६ लाख
लोक मृत्युमुखी पडतात.
एके काळी एकमेकांना मदत करण्याची भावना समाजात वाढीस लावणारी
आरोग्यसेवा आता कु ठल्या अवस्थेला येऊन पोहोचली आहे. हे कळण्यासाठी वरच्या
नोंदी परेशा आहेत.
बाजारव्यवस्थेची, व्यापाराची नफ्या-तोट्याची, विक्री-खरेदीची व्यवहारी सूत्रे
आरोग्यसेवेवर लादणाऱ्या धोरणाने आरोग्यसेवेचे सार्वजनिक जबाबदारीतून, सामाजिक
बांधीलकीतून एका खाजगी बेबंद आणि बेजबाबदार व्यवस्थेकडे हस्तांतरण के ले आहे.
यामुळे जे पैसे देऊ शकत नाहीत त्यांना या सेवेपासून वंचित के ले आहे. आरोग्यापेक्षा
विमा असणे हे जणू तुम्हाला नाव असण्याइतके अनिवार्य ठरू पाहत आहे. विम्यासाठी
एक ठराविक वय, कालावधी आणि रक्कम, एकाच शरीरातल्या विविध रोगांच्या
विम्यासाठी असणारी वेगवेगळी किंमत, त्यात बसणारी विशिष्ट सेवा, त्यासाठी सेवा
मिळण्याची ठरावीकच जागा आणि व्यवस्था, या रोगामुळे दुसरा रोग झाला तरी त्याचे
कव्हरेज नसणे, त्याची नियमावली, त्याचा कव्हरेजचे भयानक गणित, विमा कं पन्यांच्या
नियमावलीत विशिष्ट डॉक्टरांकडे जाण्याचीच सक्ती, औषध कं पन्यांचे, डॉक्टरांचे विमा
कं पन्यांशी असणारे साटेलोटे, त्यातून तयार होणारे नफ्याचे गणित, रोगांचे निदान, त्याची
गंभीरता त्याचा भविष्यातला आयुष्यावर होणारा परिणाम यापेक्षा काय कव्हर होते याची
घेण्यात येणारी काळजी आणि या सगळ्या गोष्टी ज्यासाठी करायच्या, त्यांसाठी
ज्याच्याकडून पैसे उकळायचे, त्याच नागरिकाचे वेठीला धरलेले आयुष्य अशी ही
अमानुष साखळी आहे. या साखळीमुळे मानवी आयुष्य हे एखाद्या कमोडिटीच्या
पातळीवर आणण्यात ही माणसे यशस्वी ठरली आहेत. या साखळीमुळे आपले आयुष्य
बरबाद होतात. त्यामुळे वेळीच या सगळ्या विषारी साखळीच्या घटकांवर खरे तर सदोष
मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला हवेत. या लोकांनी माणसाच्या आरोग्य' ह्या मूलभूत
हक्काचा विशेषाधिकार करून टाकला आहे.
हे सगळे विस्ताराने सांगायचे कारण आपल्या देशात तोच आरोग्यसेवेचा बिनडोक
आणि आत्मघातकी साचा राबवण्याचा अट्टहास धरला जातो आहे. विमा कं पन्यांकडे
आरोग्याची सूत्रे जाऊ लागली आहेत. इतर देशात हे अयशस्वी ठरले आहे याची जाण
आपण ठे वणार नसू तर एक दिवस या देशातल्या काही कोटी नागरिकांचे आरोग्य
मातीमोल झालेले असेल.
एकू णच वियाग्रासाठी हजारो रुपये तर गरीब रुग्णांसाठी दमडा अशी आपली
उद्याची आरोग्यसेवेची वाटचाल झाली तर नवल वाटू नये,

१४. संसर्गजन्य वैद्यक विश्व


गेल्या काही वर्षापासून कापोरेट क्षेत्राने आपले आयुष्य व्यापून टाकल्याचा अनुभव
घेत आहोत. तो जसा आपल्यातल्या काही लोकांच्या आयष्याला समद्धीची सोनेरी
किनार लावणारा आहे तसाच बऱ्याच जणांची आयुष्ये उद्ध्वस्त करणारा आहे. मुळात
हा विषय अगदी सोपा, सरळ आहे. एखादी कं पनी जन्माला येते. तिचे प्रथम ध्येय असते
ते मजबूत नफा कमवणे. काही श्रीमंत माणसे, गुंतवणूक संस्था आपला पैसा एखाद्या
व्यवसायात टाकतात तो गुंतवणुकीवर त्यातून अधिक परतावा मिळावा म्हणून. यात
व्यवसाय म्हणून काहीही वावगे नाही, अनैतिक नाही. एखाद्या मोठ्या कं पनीत अनेक
लोक त्या कं पनीचे भागधारक होऊन आपले पैसे गुंतवतात, कं पनी मोठी व्हावी, तिने
उत्तम व्यवसाय करून प्रचंड नफा कमवावा, त्यातला वाटा भागधारकांना मिळावा आणि
सर्वच जण सधन होत जावे असे हे अतिशय सोपे गणित. मात्र एखाद्या वळणावर हे
हिशेब असे जीवघेणे होतात की मग त्यामुळे काही गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा मिळून
ते अतिसंपन्न होतात; तर इतर बरीच माणसे साध्या अन्नाला मोताद होऊ लागतात. हेच ते
इच्छेची 'लालसा' झाल्याचे धोकादायक वळण. इथे मग कारिट क्षेत्राच्या लालसेचा असा
काही विळखा पडतो की अनेक माणसे काहीही करून पैसा कमवण्याच्या दुर्धर व्यसनाने
अक्षरश: भिके ला लागतात. गरज आणि लालसा यातला हा ठळक फरक आहे. जसे
मरताना बरोबर काहीही नेता येत नाही तरीही लोक आपले सतत पैसा गोळा करतात
तसे.
हळूहळू हे लोण देशांपर्यंत पोचते आणि मग अनेक देश सार्वभौम असूनही
कर्जाच्या विळख्यात ओढले जातात, कारण कार्पोरेट क्षेत्राने हळूहळू त्या देशांच्या
सत्ताधीशांना विकत घेतलेले असते. मग सुरू होते बनवाबनवी. मग सिगारेट विकू न प्रचंड
नफा मिळवणारी कं पनी त्यातल्या घातक द्रव्यांमुळे अनेकांना कर्क रोगाची शिकार
व्हायला भाग पडते आणि त्याचवेळी मानभावीपणे कर्क रोगाच्या संशोधनासाठी मोठी
रक्कम देऊ करते. इथे मग व्यवसायाचे मार्ग लालसेच्या वळणाने नरभक्षक होतात.
त्यावर नियंत्रण लागते. पण तोपर्यंत कोपर्पोरेट क्षेत्राने पैसे वाटून, आमिषे दाखवून
नियंत्रण करणारी सरकारे, नाणेनिधी, वर्ल्ड बँके सारख्या संस्था ताब्यात घेतलेल्या
असतात. अनेक वेळा मग जी तडजोड म्हणून सुचवली जाते ती हळूहळू गोष्टी ताब्यात
घेण्याचाच सभ्य प्रकार असतो. म्हणजे मेले तरी चालेल, फक्त गोळी घालू नका, विष द्या
म्हणजे लगेच विपरीत झाल्याचा बभ्रा टळेल. हळूहळू मेल्याने, कशाने ह्याची सुरुवात
झाली हे लोक विसरून जातील. हे खोटे वाटत असेल त्यांनी रवांडासारखे सुखवस्तू देश
नेमके कशाने मातीमोल झाले. हिरे-व्यापार करणाऱ्या कं पन्यांनी आफ्रिकन खंडात काय
हाहा:कार माजवला, तेल व्यापार करणारे अरब देशांना नेमके कसे रगडून घेत आहेत,
भारतातल्या युनियन कार्बाईडने भोपाळच्या लोकांची कत्तल के ली म्हणजे काय के ले, या
प्रश्नांचा खोलात जाऊन अभ्यास करावा. जागतिकीकरणाच्या लाटेत कं पन्या कशा
वरचढ झाल्या आहेत, विविध देशातले सामान्य लोकांच्या रक्षणाचे, जीवित सुरक्षेचे
कायदे त्यांनी कसे धाब्यावर बसवले आहेत, याचा धांडोळा एका पुस्तकाचा विषय ठरेल
इतके त्याचे स्वरूप व्यापक आणि भयावह आहे! फक्त आता आता हे लोण अन्न, वस्त्र,
निवारा, शिक्षण यापुरते मर्यादित राहिले नसून जीव जगवणाऱ्या औषधांच्याही क्षेत्रात
शिरले आहे. वैद्यकीय क्षेत्राला असणारी ही कार्पोरेट लालसेची लागण अमानुष आहे.
वैद्यकीय क्षेत्रात या जंतूंचा प्रादुर्भाव म्हणजे दुर्दैवच होय. मार
जगातल्या प्रगत देशातले अनेक डॉक्टर्स, संशोधक हे कधीच मोठमोठ्या कार्पोरेट
कं पन्यांसाठी काम करायला लागलेत. रुग्णांशी असणारे त्यांच्या विश्वासाचे नाते नाकारत
ते कं पन्यांशी जोडले गेले आहेत. तसे पाहता वैद्यकीय क्षेत्र हे रोज काहीतरी नवे घडणारे
क्षेत्र आहे. त्यामुळे स्वत:ला नवीन संशोधनाशी, औषधांच्या शोधांशी सतत अपडेटेड
ठे वायचे मोठे आव्हान डॉक्टर्सपुढे असते. विविध मेडिकल जर्नल्स, येणारे औषध
कं पन्यांचे प्रतिनिधी व सेमिनार्स, प्रख्यात विद्यापीठांशी असणारे स्व-शिक्षणाचे नाते
आणि समव्यावसायिक अथवा रुग्णालयांशी असणारे सततचे संबंध यातून हे आव्हान ते
पार पाडत असतात. आता हे माहितीचे स्त्रोत कसे बिघडले आहेत ते पाहू. मेडिकल
जर्नल्सचे वाढते खर्च, त्याप्रती असणारी निष्ठा ढळून विविध प्रकारच्या जाहिराती देऊन
मोठमोठ्या औषध कं पन्याच ही जर्नल्स चालवतात असे यापूर्वी लक्षात आले होते. आता
मात्र त्यापुढे पाऊल पडले आहे. खरे तर वैद्यकीय संशोधन हे नेहमी सरकारच्या अथवा
तटस्थ अशा संस्थेकडून नियंत्रित के ले जाते; कारण त्याचे निष्कर्ष हे एखाद्या कं पनीचे
दिवाळे काढू शकतात किंवा एखाद्या कं पनीला प्रचंड नफा मिळवून देऊ शकतात. आता
जगभरातल्या विविध सरकारांचे वर्ल्ड बक आणि नाणेनिधीच्या दूरदर्शित्वाने फक्त हात
झटकणे असे नवे धोरण प्रस्थापित झाल्याने बऱ्याच वेळा ते कानाडोळा करणे पसंत
करतात. मग निष्कर्ष ठरवून असले संशोधन पुरस्कृ त के ले जाते. के ले जाणारे विविध
सहें, अभ्यास कदाचित शुद्ध असतील पण त्याचे निष्कर्ष मात्र हेतूने प्रदूषित असतात.
औषध कं पन्यांचे प्रतिनिधी आता डॉक्टरांच्या प्रतिष्ठेची हमी घेणारे दलाल झाले आहेत.
औषधांच्या गुणवत्तेची परखड चर्चा होण्यापेक्षा अनेक डॉक्टरांच्या चैनीत जगण्याची
व्यवस्था हे प्रतिनिधी कमालीच्या तत्परतेने करतात, सेमिनारच्या निमित्ताने सहकु टुंब
जग-दर्शनाची, चैनीच्या वस्तूंची लालसा आणि कं पन्यांचा स्वार्थ कसे एकमेकांत बेमालूम
मिसळून गेले आहेत. जगभरातील विद्यापीठे च जिथे शिक्षण विकण्याचे दुकाने बनली
आहेत तिथे त्यातल्या लेक्चर्सची गुणवत्ता कशी पाहायची? त्यातल्या इनपुटचे महत्त्व कसे
मोजायचे? आजमितीला जगातील बहुतेक व्हिजिटिंग लेक्चरर्स हे फार्मा कं पन्यांचे
सल्लागार आहेत.
म्हणजे ज्यांनी औषधांचे गैरप्रकार उघडकीला आणायचे ते फार्मा कं पन्यांचे पगार
घेणार, जे रुग्णांशी निगडित त्यांनी दुकाने थाटली आहेत, ज्यांनी संशोधन करायचे ते
निष्कर्षाला बांधील असे सगळे चालले आहे. राहता राहिला रुग्ण. त्यांची संख्या या
सगळ्यांच्या कृ पेने वाढते आहे.
धंदा कसा फोफावला आहे बघा! औषधांच्या धंद्यात वाढ आहे ती दर दहा वर्षाला
तब्बल २५ पट. ३१ ऑक्टोबरला २०११ साली पृथ्वीतलावरची लोकसंख्या इतिहासात
सगळ्यात जास्त म्हणजे ७ अब्जावर पोचली आणि दर १० माणसांमागे १ माणूस हा
कसला तरी रुग्ण आहे. याला काय विकास म्हणायचे?

१५. खोट्याच्या आणि मोठ्याच्या हव्यासाची किंमत

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण खोट्या पैशाचा इतिहास खऱ्या पैशाइतकाच


जुना आहे. जेव्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपातले चलन वापरायला सुरुवात झाली
तेव्हाच त्याच्याशी हपापालेपण जोडले गेले आहे. तो माणसाच्या हव्यासाच्या मूलभूत
वृत्तीशी जोडलेला आहे. जेव्हा चलन म्हणून सोन्या-चांदीची नाणी होती तेव्हा त्यात इतर
स्वस्त धातू मिसळून खोटेपणा के ला जायचा. टांकसाळीच्या लोकांना हाताशी धरून हे
उद्योग चालत असत. कागदी चलन आल्यावर तर हे अधिकच सोपे झालेय. दुसऱ्या
महायुद्धात नाझींनी अमेरिकन डॉलर्स आणि ब्रिटिश पौंडांचे खोटे चलन आणले होते.
त्यामुळे ही गोष्ट आत्ताच आकाशातून पडली आहे, अथवा फक्त भारताशी संबंधित आहे
असे मात्र नाही. अगोदर अमेरिकन डॉलर्स नंतर बरकत आलेली युरो, यात मोठ्या
प्रमाणात या व्यवसायातील गुन्हेगारांचा वावर आहे. ह्या व्यवसायाचा डायरेक्ट संबंध हा
जगभरच्या चलनाशी असल्याने, यात जगभरचे मातब्बर माफिया, दहशतवादी, गुप्तहेर
संघटना आणि हुकू मशहा गुंतलेले आहेत. खूप गुंतागुंतीचे डिझाईन करूनसुद्धा, गेल्या
५० वर्षांत नोटाछपाईचे तंत्र खूप विकसित होऊनसुद्धा खोट्या नोटांची छपाई काही
थांबत नाही. पण खरे बघायला गेले तर गोम अशी आहे की तंत्रज्ञान हे नीती किंवा वापर
निरपेक्ष असते. तंत्रज्ञांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर ही एक दुधारी तलवार आहे. ती कोण
वापरेल यावर ते तंत्रज्ञान ताबा ठे वू शकत नाही.
अनेक आधुनिक तांत्रिक सुविधांचा प्रभावी उपयोग करून खोटे चलन तयार
करायचे आणि त्याला जाळ्यात पकडायला देशोदेशीच्या सरकारांनी नोटांचे कागद,
डिझाईन गुंतागुंतीचे करून नवनवीन सुरक्षांचे कवच चढवायचे हा आता अंत नसणारा
खेळ झालाय. अस्थिर देशांच्या मदतीने हे तंत्र इतक्या पढे गेलं आहे की याचे आता
पाकिस्तान, म्यानमार, पेरू, नेपाळसारख्या अस्थिर देशात एक घरोघरी चालू शकणाऱ्या
लघुउद्योगात याचे रूपांतर होण्याची चिन्हे आहेत. दुसरी गोची अशी की उपभोक्ता
अर्थप्रणालीत जितका जास्त पैसा चलनात फिरतो तितके अर्थकारण समृद्ध होते आणि
जगभर सध्या मुक्त, उपभोगावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेला महत्त्व येतेय. तुमचा देश
जसा प्रगती करतो तसे खोट्या नोटांचे नेटवर्क उभे राहू लागते. जे अमेरिके च्या बाबतीत
कोलंबियाने के ले तेच भारताच्या बाबतीत पाकिस्तानचे चालले आहे. पण अमेरिके ने
कोलंबियातील खोट्या चलनाचे नेटवर्क उद्ध्वस्त करताना जे काय के ले त्याच्या काही
टक्के कारवाई जरी आपण पाकिस्तानबद्दल करायला धजावलो तर अमेरिके ची भूमिका
काय असेल? अशा दुटप्पी भूमिका नेमक्या कशाला मदत करत आहेत? पैसा
मिळवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो हे खोट्या चलनाच्या बाबतीत त्वरेने खरे ठरू
शकते.
भारतातही सध्या या प्रश्नाने भयानक स्वरूप धारण के ले आहे. एका अंदाजानुसार
भारताच्या देशांतर्गत असणाऱ्या एकू ण अधिकृ त चलनाच्या ३०% इतके खोटे चलन
आहे. नुकतेच दिल्ली पोलिसांनी एकरकमी सव्वा दोन कोटी रुपयांच्या खोट्या नोटा
हस्तगत के ल्याचे भयानक वृत्त आले होते. ज्यांना पकडले गेले त्यांनी गुन्हा कबुल
करताना आपल्याला पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने मदत के ल्याचा जबाब नोंदवला
आहे. भारतीय गुप्तचर संघटनेचा असा दावा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला
खिळखिळी करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग म्हणून सुमारे १६०० कोटी रुपये
खोट्या चलनाच्या स्वरूपात भारतीय बाजारात ओतण्यात आले आहेत. साधारणपणे
१:२ या प्रमाणात म्हणजे एका खऱ्या नोटेला २ खोट्या नोटा अशा आकर्षक प्रमाणात
खोट्या नोटांचे हस्तांतरण के ले जाते. भारतात प्रवेश करणाऱ्या घुसखोराला मोठ्या
प्रमाणावर खोट्या नोटा नेणे हे सक्तीचे आहे. भारतात सीमेवरच्या राज्यातील मूलभूत
सुविधांकडे असणारे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष, सतत वाढणारी गरिबी, बेबंद फोफावणारी
नक्षलवादी चळवळ ह्या सगळ्या या व्यवहाराला बरकत आणणाऱ्या अत्यंत पूरक गोष्टी
ठरतात.
अभ्यासांती असे आढळले आहे की एक खोटी नोट छापायला साधारणपणे ३९
रुपये खर्च येतो. म्हणजे खोटी नोटच छापायची तर ती ५०, १०० रुपयांची कोण छापेल?
मग सगळा भर हा ५००, १००० च्या नोटांवर दिला जातो. त्यात आज भारतात १०००
आणि ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण हे १०, २०, ५०, १०० या किमतीच्या नोटांच्या
तुलनेत खूपच जास्त आहे. सोबतच्या चित्रावरून हे स्पष्ट होईल.
बिहारच्या उत्तरेला आणि नेपाळच्या तराई प्रदेशाला लागून जी आंतरराष्ट्रीय सीमा
आहे तिथे हा सगळा व्यवहार चालतो. ही अत्यंत घातक आणि पुरेशी सुरक्षा नसणारी
सीमा आहे. इथे अनेक लोक सायकलवरून बटाटे, भाजी, तांदूळ असे जीवनावश्यक
पदार्थ घेऊन सहज सीमा पार करतात. वस्ती अत्यंत गरीब. तराई प्रदेशातील मुख्य गाव
बीरगंज. हे या व्यापाराचे मुख्य कें द्र. मुळात नेपाळ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर देश.
त्यात माओवाद्यांनी त्या राष्ट्राला पोखरले आहे. त्यांना साथ देणारी पाकिस्तानची
'आयएसआय' ही घातकी गुप्तचर संघटना. माओवादी आणि या संघटनेचे समान ध्येय
भारताला अस्थिर करण्याचे आहे. याचा फायदा दाउदसारख्या राष्ट्रद्रोह्यांनी नाही घेतला
तरच नवल. तो स्वत: दुबईत बसून तिथून ५००, १००० रुपयांच्या नोटांची वितरण
व्यवस्था चालवतो. त्या नेपाळमार्गे भारतात येतात. या उद्योगाचे हैदराबाद भारतातील
मोठे वितरण कें द्र बनले आहे. या शिवाय नेपाळमार्गे येणाऱ्या सर्वच प्रवाशांकडून
भारतीय पोलिसांची एक हप्ते वसूल करण्याची वर्षानुवर्षांची व्यवस्था आहेच. त्यातून
अनेक नोटा घुसखोरी करतात. भारतीय गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार बऱ्याच
खोट्या नोटा पाकिस्तानात छापल्या जातात. तिथून त्या दुबईला हवाला रॅके टद्वारेही
पाठवल्या जातात. दुबईहून हैदराबादला येणाऱ्या विमानातील अनेक प्रवाशांद्वारा त्या
भारतात येतात. एक बाब लक्षात घेणे जरुरी आहे ती म्हणजे भारतीय रिझर्व बँक
ज्यावेळी नव्या डिझाइनच्या नोटा बाजारात आणते तेव्हा ताबडतोब तसेच बदल या
खोट्या नोटांत के ले जातात. एकू णच देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने याचा अर्थ फार गंभीर
आहे.
हा भारतीय गुप्तचर संथांच्या अहवालानुसार, आयएसआय अतिशय योजनाबद्ध
रीतीने हे सर्व काम करते आहे. आयएसआयने थायलंड आणि बांगला देशात अतिशय
अत्याधुनिक असे छापखाने यासाठी स्थापन के ले. नोटांवर असणारे ऑप्टिकल फायबर
मार्क्स (जे नोटेवर फक्त अल्ट्रा व्हायोलेट किरणांद्वारेच दिसू शकतात) आहेत ते
छापण्यातसुद्धा त्यांना यश येत असल्याचे आढळून आले आहे. पाकिस्तानच्या या
अंतर्गत युद्धाची व्याप्ती फार भयानक आहे. भारतातल्या दहशतवादी हल्ल्यासाठी
पाकिस्तानची गुप्तचर संस्था वर्षाला १८०० कोटी रुपयांची तरतूद करते. यातले बरेचसे
पैसे हे खोट्या चलनातून उभे के ले जातात. याचे ढळढळीत पुरावे आहेत. डिसेंबर २००५
ला बंगलोर IISC वर झालेल्या हल्ल्यासाठी खर्चलेल्या ५० लाखांपैकी, ३० लाख रुपये
हे खोट्या नोटांच्या स्वरूपात असल्याचे आढळले. २००७ च्या हैदराबाद हल्ल्यासाठीचे
पाच कोटी त्याआधी बरेच दिवस खोट्या चलनात जमा के ले जात होते. इतके च कशाला,
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना जे पैसे वाटले गेले त्यातही खोट्या नोटा
आढळल्या आणि याची ते कोणतीही तक्रार करू शकले नाहीत. यावरून हा रोग आता
कु ठवर भिनला आहे याची जाणीव अधिकच बोचरी आहे.
भारतात होणारे मोठ्या प्रमाणावरचे रोखीचे व्यवहार हे खोट्या चलनाच्या
उद्योगाला बळकटी देत असतात. सर्व व्यवहार बँके मार्फ तच करणे ही शिस्त आपल्याकडे
लागू शकत नाही. खरे तर सरकार इच्छा असेल तर अनेक बँकांना दूरस्थ गावी,
खेड्यापाड्यात शाखा उघडणे सक्तीचे करू शकते, पण रोखीचे व्यवहार रोखण्यासाठी
उपाय न करता, बँक व्यवस्था अत्यंत अपुरी असल्याची फालतू कारणे जेव्हा दिली
जातात, तेव्हा रोखीचे व्यवहार हे कोणाकोणाच्या फायद्याचे आहेत आणि ते बंद करायला
विरोध का होतो याचे सुस्पष्ट उत्तर कदाचित मिळू शकते.

कशी ओळखायची खोटी नोट?


१. सिल्वर ब्रोमाइडची जी एक रेघ असते ती अतिशय स्पष्ट असते; तर खोट्या
नोटेवर ती रेघ आणि RBI चा लोगो अस्पष्ट धूसर असतो.
२. अशोकस्तंभ, गांधींचे रेखाचित्र, नोटेचे मूल्य RBI लोगोचे वॉटरमार्क ठळक
असतात; मात्र हे सर्व खोट्या नोटेवर अतिशय धूसर असते.
३. अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशात पहिले असता संपूर्ण नोटेवर निळे ठिपके
दिसतात. खोट्या नोटेवर हे नसतेच.
४. नोट आडवी धरल्यास ५०० हा आकडा सुपर इम्पोज के लेला उजव्या
बाजूला दिसतो, खोटी नोट आडवी धरल्यास कोणताही आकडा दिसत नाही.
पूर्वीच्या काळी असणारा खोट्या पैशांचा हव्यास आता वैयक्तिक राहिलेला नाही;
तर एका आंतरराष्ट्रीय उद्योगाचा भाग झाला आहे. एखाद्या देशाची आर्थिक वाढ
रोखण्यासाठी तो एक महत्त्वाचे हत्यार झाला आहे. जगभरातील अनेक अस्वस्थ राष्टे या
उद्योगात गुंतलेली आहेत. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपच्या राष्ट्र-समूहांना याचा
अधूनमधून फटका बसत असतो. त्यांचे सातत्याने यावर उपाय सुरू असतात. अमेरिके त
दर दोन वर्षांनी ह्या नोटांचे डिझाईन बदलले जाते. युरोपात नोटांचे कागद आता
प्लास्टिकच्या कागदात बनवले जातात. मध्यंतरी भारताच्या सरकारी खात्यातील
भ्रष्टाचार, सिक्युरिटी प्रेसमधील काही हितसंबंधी, त्यांचे असणारे लागेबांधे या सगळ्यावर
उपाय म्हणून आपण सुमारे लाख कोटी रुपयांच्या नोटा तीन देशांकडून छापून घेतल्या
होत्या. त्यावर नंतर खूप गहजब झाला. कारणे काहीही असोत; आपण प्रशासन म्हणून
देश समर्थपणे चालवायला लायक ठरत नाही का, हा प्रश्न यामुळे उभा ठाकतो हे मात्र
नक्की. त्यामुळे खोट्या नोटांच्या उद्योगाचे कें द्र आपल्या अवतीभवती असणे हे
भारतासाठी भयावह आहे. सीमापार धोका आहेच, पण लोकांच्या हव्यासाशी निगडित
असणारा हा शेजाऱ्यांचा आर्थिक दहशतवाद आपल्याला अधिकच असुरक्षित करतो
आहे.

१६. तू खाये जा ...

खाणे हे जगण्याचे कारण, मर्म आणि मार्गही आहे. खाणे हा तशा अर्थाने एक
स्वतंत्र धर्म आहे. देश, रंग, वय, लिंग, धर्म, जात ह्या सगळ्यांच्या पार असलेला.
विनोदाच्या अंगाने पहिले तर त्याचा संबंध फक्त पोटाशीच नाही तर शिव्या, पैसे, वेळ,
डोके खाणे अशा सगळ्यांबरोबरच अपमान, दु:ख, राग गिळणे असा विविध अंगांचा
आहे. गंमत अशी की, देह सहा फु टी असो वा दीड फु टी काय खावे हे ठरवणारी जीभ
फक्त चार-सहा इंचाचीच असते आणि ती जगभर समान आहे हे जसे लक्षात न येणारे
सत्य आहे, तसेच आपण जे पिकवतो आणि खातो, ते आपल्या पृथ्वीवरील जैवसंपदेवर,
नैसर्गिक स्त्रोतांवर खूपच ताण आणणारे ठरू शकते हे खाण्यात रमून जाताना आपल्या
लक्षातसुद्धा येत नाही. आपले खाणे मिळावे म्हणून निसर्गाची ही नासाडी करतानाच,
आपण आयुष्यभर प्रमाणाबाहेर बकाबका खात असतोच; पण 'मला काय दोन वेळा
खायला मिळाले तरी पुरेल' असे भंपक डायलॉगही फे कत असतो. जगात खाण्यासाठीच
सगळे काही चालले आहे. धान्य पिकवणे आणि ते विकणे हाच गेल्या शेकडो वर्षातला
सगळ्यात मोठा उद्योग आहे. अन्न उद्योगाइतकी उलाढाल अजून कोणालाही कोणत्याही
तंत्र, माहिती, इंटरनेट अशा कोणत्याही युगातही गाठता आलेली नाही. कधीही न
संपणारी ही इंडस्ट्री आहे. सगळ्या जगाच्या अर्थसत्ता ज्याच्यापुढे मान तुकवून उभ्या
आहेत असा हा वैश्विक व्यापार आहे. कारण त्याचा थेट संबंध हा मानवाच्या अस्तित्वाशी
आहे. एकवेळ कपडे नसतील तर चालेल, निवारा नसला तरी कु ठे तरी, कशाच्या तरी
आडोशाने राहता येईल; पण अन्न नसेल तर जगणेच शक्य नाही. आपले अन्न हे इतके
महत्त्वाचे असल्यानेच काय खावे, किती खावे याचे समग्र भान आपल्याला असणे हे
अतिशय आवश्यक आहे. आपल्या खाण्याचा, चवीचा, त्याच्या सवयीचा, गरजेचा,
आवडीनिवडीचा खोलवर परिणाम प्रत्यक्षपणे निसर्गावर, पर्यावरणावर आणि
जीवसृष्टीच्या अस्तित्वावर होत असतो. हा तीन प्रकारे होतो : एकतर हे अन्न (प्रोसेस
फू ड) तयार होताना पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या दूषित वायूंचे प्रमाण प्रचंड वाढत
आहे. दुसरे आहे ते जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी निसर्गातील
परस्परावलंबी व्यवस्था मोडीत काढत आहे आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारे पाणी
अधिकच दुष्प्राप्य करत आहे. या तीनही बाबींवर येणारा असीमित ताण ही
पर्यावरणतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ यांच्यासाठी सध्या अतिशय चिंतेची
बाब बनलेली आहे. पुढील आकडेवारी ते अधिक स्पष्ट करेल :
* जगात २५% लोक हे कशीबशी गुजराण करत आहेत. ते भुके ले आणि
कु पोषितसुद्धा आहेत. एकीकडे हे वास्तव असताना दुसरीकडे जगात पिकणाऱ्या
धान्यापैकी ४०% धान्य हे फक्त पशुपालनासाठी वापरले जाते. अर्थात हे काही मुक्या
जनावरांवर प्रेम किंवा दया करण्यासाठी नाही; तर त्यांना खाद्य म्हणून पोसण्यासाठी
आहे. म्हणजे २५% लोकांना किमान पोट भरण्यासाठी पुरेसे धान्य नाही; मात्र मांसाहार
करणाऱ्यांची सोय पाहण्यासाठी मात्र मजबूत धान्य आहे. विषमता फक्त आर्थिकच
बाबींवरच असते असे कोण म्हणतो? खाण्यासाठी म्हणून जे 'प्राण्यांचे पिक घेतले जाते
त्याचे गणित नुसते स्तंभित करणारेच नाही; तर अस्वस्थ, अंतर्मुख करणारेसुद्धा आहे.
* एक किलो मांस (बीफ) तयार करण्यासाठी ५४ किलो धान्य फस्त होते आणि
सरासरी ९०,००० लिटर पाणी लागते. एक किलो चिकनसाठी ६ किलो धान्य तर ५०००
लिटर पाणी. याच तुलनेत एक किलो सोयाबीनचे पिक घेण्यासाठी २००० लिटर,
तांदळासाठी १९०० लीटर, गहू ९०० लिटर, आणि बटाट्यासाठी ५०० लिटर पाणी
लागते.
ज्या देशाच्या जीवनशैलीचे आपल्याला असीमित आकर्षण आहे आणि ज्यांच्या
पावलावर पाऊल टाकू न चालण्याची स्वप्ने आपल्या सर्व राजा, रंक, आबालवृद्धांना पडत
आहेत त्या अमेरिके तले याबाबत काय वास्तव आहे?
* एका सर्वेक्षणानुसार तिथल्या लोकांनी आपले मांसाहारी खाणे फक्त १०% नी
जरी कमी के ले तरी त्यामुळे वाचणाऱ्या धान्यात ६ कोटी माणसांचे पोषण होऊ शकते.
(अमेरिके ची लोकसंख्या ३० कोटी आहे). आज अमेरिके त उपलब्ध असणाऱ्या एकू ण
पाण्याच्या अर्धे पाणी फक्त मांस तयार (Meat Production) करण्यासाठी वापरले
जाते.
या सगळ्या हव्यासाचा पर्यावरणावर (जे देशापुरते मर्यादित नसून सर्व जगासाठी
आहे) होणारा परिणाम आणखीनच भयावह आहे. आज पर्यावरणासाठी घातक
असणाऱ्या वायूंच्या उत्सर्जनातला किमान ३०% वाटा हा या मांस उत्पादन करणाऱ्या
कारखान्यांचा आहे. म्हणजे रासायनिक कारखाने, रासायनिक कचरा, इतर प्रदूषण या
सगळ्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा एकू ण वाटा ७०% आणि या एकट्याचा ३०%. मला
इथे मांसाहारी आणि शाकाहारी असा भेद मांडायचा नाहीये. ते स्वातंत्र्य प्रत्येकाला असले
तरी त्यात किमान दुसऱ्यांचा विचार, समाजाचे भान असावे असा सुबुद्ध समाजाचा
संके त आहे. तुम्ही शाकाहारी असलात तरी डेअरी उत्पादनांचा प्रश्न आहेच. एक किलो
दूध अथवा दुग्धजन्य पदार्थांसाठी किमान १० किलो वनस्पती अथवा धान्य फस्त होते
आणि ४ कोटी किलो दुग्ध पदार्थाचे उत्पादन एखादी वनस्पती, एखादी जमात नष्ट
करण्याची सुरुवात असू शकते. जिभेचे लाड करताना ही आकडेवारी आपण लक्षात
घ्यायला हवी.
या संदर्भात अजून एक प्रश्न आहे तो अन्नाच्या नासाडीचा. युनोच्या एका
सर्वेक्षणानुसार सध्या जगात एकू ण तयार अन्नापैकी सुमारे ३०% अन्न हे वाया जाते.
विकसित देशांतले याचे कारण समृद्धी आणि प्रोसेस फू ड हे आहे. आरोग्यशास्त्र तसेच
स्वच्छतेच्या नावाखाली कचऱ्यात अन्न टाकल्याचे त्यांना काही वाटतही नाही. त्यांच्या
जीवनपद्धतीत तयार (प्रोसेस फू ड) अन्नाचे प्रमाण अधिक असल्याने तिथे पिकवलेले
धान्य, भाज्या वगैरे फारसे वाया जात नाही. मात्र हे प्रोसेस फू ड वापरताना त्याचा प्रवास
हा शीतकपाटे ते मायक्रोव्हेव असा होत होत सरळ कचऱ्याच्या डब्यात जातो
(आपल्याकडेही असे करणे फॅ शनेबल झाले आहेच). म्हणजे आपल्या भाषेत तिथे अन्न
वाया जाते पण धान्य फारसे वाया जात नाही. भारतात मात्र अन्नाची नासाडी तर आहेच;
पण धान्याचीही आहे. एका अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ३० ते ४० हजार कोटी
रुपयांचे (हा आकडा अतिशय तोकडा असण्याची शक्यता आहे) धान्य वाया जाते. यात
पिकवलेले धान्य, विक्री न झाल्याने सडणाऱ्या भाज्या, फळे, मांस, अंडी, दूध हे सर्व
आले. साठवण्याची अपुरी व्यवस्था, अप्रगत वितरण व्यवस्था हे तर आहेच; पण सरकारी
पातळीवरचे कोडगेपण, आयात-निर्यातीचे राजकारण, सरकारचे शेतीकडे व्यवसाय
म्हणून होणारे अक्षम्य दुर्लक्ष्य, धान्य दलालांचे राजकारणाशी असणारे साटेलोटे आणि
एकू णच देशाचा सर्वकष, सर्वगामी विचार करण्याच्या कु वतीचा अभाव अशी अनेक
कारणे यामागे आहेत. या शिवाय आज भारतात जो अतिश्रीमंत, नवश्रीमंत आणि
उदासीन मध्यमवर्ग यांच्या मिश्रणातून जे सामान्य जीवनमान तयार झाले आहे ते; गरीब,
दारिद्र्यरेषेखाली जगणारे, अन्नाला पारखे असणारे यांच्याबाबत किती जाणून आहेत, ते
शोधायची गरज नाही. वेगवेगळ्या पाट्यांतून वाया जाणाऱ्या अन्नाचा ओघ ते आपल्याला
सांगू शके ल. त्याकरता आकडेवारीचीही जरूर नाही. खरे तर या प्रश्नांची उत्तरे किती
सोपी आहेत? आपण जे खातो ते कशाचा बळी देऊन आपल्यापर्यंत आले आहे याचे एक
भान असणे, अन्नवंचिताबाबत योग्य कृ तीने संवेदनशील असणे, लागेल तेवढेच शिजवावे,
रोज ताजे खावे, अन्न फे कू न देऊ नये, इतक्या साध्या वैयक्तिक गोष्टींनी आपण स्वत:च्या
पातळीवर अन्नधान्य नासाडीला नक्कीच आळा घालू शकतो.
ह्या पार्श्वभूमीवर भारतात काय अवस्था आहे? भारतात हिंदू जैन धर्माचे प्राबल्य
आहे. गाय हा उपयुक्त पशु आहे. हे विधान मान्य नसणारे अनेक कोटी लोक आहेत. एक
भारतीय वर्षाला सरासरी साडेतीन किलो मांस खातो. हे प्रमाण चीनच्या १/१६ आणि
अमेरिके च्या १/३० इतके अल्प आहे. पण या माहितीत एक गोची अशी जी भुके ल्या
भारताच्या आणि अन्न फे कणाऱ्या भारताच्या लोकांची सरासरी आहे. त्यामुळे जो
नवश्रीमंत मध्यमवर्ग जो आता २० कोटींच्या आसपास जाऊन पोचला आहे. त्याचे मांस
खाण्याचे प्रमाण प्रचंड आहे. बाकी लोकांना ते खायला परवडत नाही एवढाच भाग आहे.
भारत आज दुग्ध उत्पादनात अमेरिके च्या खालोखाल आहे (३५ कोटी गाई म्हशी); तर
कोंबडीच्या उत्पादनात पाचवा आणि अंडी उत्पादनात जगात चौथा आहे.
हे सर्व बघितल्यावर, जगात धान्य उत्पादनावर असणारा प्राणिजन्य उद्योगाचा
प्रभाव, तयार होणाऱ्या धान्याची नासाडी, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक भुके ले
असताना फे कू न दिले जाणारे अन्न या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून 'खाणे' हा
उद्योग कु ठे येऊन पोचलाय ते चांगलेच लक्षात येते.
आपण काय खावे हा प्रश्न पर्यावरण, परस्परावलंबी जीवसृष्टी यांच्याशी इतका
निगडित आहे हे समजले तरी एक पाऊल त्या दिशेने पुढे पडले असे म्हणता येईल. नाही
तर के वळ खाण्यासाठी युद्धे होण्याचा अश्मयुगीन काळ संपला असे म्हणणे वेडेपणाचे
ठरायला फार वेळ लागणार नाही.

१७. माणसाचे पाशवी उद्योग!


आत्ताचे आणि पूर्वीचे आयुष्य, आपला वर्तमान आणि भूतकाळ, सध्याची
जीवनशैली आणि पूर्वीची जगण्याची पद्धत यातील बदल शोधत राहणे, त्यातील सुसंगत/
विसंगत धुंडाळत राहणे हा एक चिरंतन चिंतनाचा विषय आहे. हे जग सध्या अतिशय
प्रगत आहे, पुढारलेले आहे, पूर्वी फार वाईट परिस्थिती होती असे कोणी म्हणू लागले की,
मात्र माझ्या मनात एकदम घालमेल सुरू होते. विज्ञानाने जग जवळ आणले, काळाचे
अंतर कमी के ले, माहितीची उपलब्धता वाढवली यात काडीमात्र शंका नाही; पण माहिती
म्हणजेच ज्ञान हा भ्रम त्यामुळेच पसरला हेही खोटे नाही. आजचे दीर्घायुष्य, आरामदायी
जीवन, आणि गरजांची समृद्धी ही विज्ञानाच्याच वेगाने शक्य झाली हे निश्चित; पण
विज्ञान, तंत्रज्ञान आणि आत्मज्ञान यांची सांगड घालण्याच्या शक्यता धूसर होत चालल्या
आहेत हेही विदारक वास्तवच. तंत्रज्ञानाचा टोकाचा आणि शहाणपणाचा किमान वापर हे
या एकाच युगाचे देणे आहे.
काळाला वळसा घालून मागे जात काही उदाहरणे पाहू या. माणूस पृथ्वीतलावर
आला तेव्हा त्याचा वेग ताशी पाच मैल होता; कारण तेवढ्याच वेगाने तो धावू शकायचा.
घोडेस्वारी, चाकाचा शोध, वाफे चे इंजिन, यांच्या शोधाने तो ताशी १५० मैल झाला पण
त्यासाठी चार-पाच हजार वर्षे जावी लागली. मात्र फक्त गेल्या शंभर वर्षांत आकाशात
उडण्याच्या अफलातून शोधाने हाच वेग ताशी २००० मैलांपर्यंत जाऊन पोचला आहे.
आपण सध्या जे आणि ज्या पद्धतीचे अन्न खातो ते फक्त गेल्या पन्नास वर्षांत
बदलले आहे. गमतीचा भाग असा की, त्या आधीच्या १०,००० वर्षांत खाण्याचे प्रकार
(पदार्थ नाही) आणि पद्धती फारशी बदललेली नव्हती. गेल्या पन्नास वर्षांत मात्र अन्नाचे
प्रकारच नव्हे; तर ते उपलब्ध करण्याच्या पद्धती बदलल्या. इतके च नाही तर त्या
पद्धतीला सुसंगत अशाच सवयींचे लोण सर्वत्र पसरत गेले. सध्या जगात अनेक ठिकाणी
विशेषत: विकसित, प्रगत देशात (काही दिवसांनी प्रगती पथावरील राष्ट्रातही) जे अन्न
आरोग्याच्या, स्वच्छतेच्या नावाखाली पुरवले जाते ते एका मोठ्या अन्न उद्योगाचा भाग
म्हणून येते. उद्योग आला की मार्के ट आलेच, त्यात गुप्तता आली. एखाद्या वाहनाच्या
कारखान्यातील असेम्ब्ली लाईनसारख्या आता फू ड लाईन्स असतात. अन्न, मग ते
शाकाहारी असो वा मांसाहारी; त्याची उत्पादनप्रक्रियेची एक साखळी असते, त्यात मग
उत्पादनक्षमता, उत्पादनाचे दर ताशी प्रमाण, त्याचा खर्च, त्यातून येणारा नफा,
पुरवठ्याचे सततचे नियोजन, मागणी वाढवण्याचा अट्टहास, त्यातून तयार होणारी क्रू र
स्पर्धा, दर्जाशी तडजोड करून स्पर्धेत टिकण्याचे सर्व तंत्र आणि मंत्र, ग्राहकांच्या
आवडीनिवडी बदलायची कारस्थाने असे सर्वच आले. कारण अन्न हे एखाद्या यंत्रासारखे
अथवा त्याच्या सुट्या भागासारखे बनवले जाते. म्हणजे हा मूलभूत गरजेचा व्यापार
झाला.
हे अन्न मांसाहारी असेल तर ही अन्नप्रक्रिया वेगळीच हीन पातळी गाठते.
कमीतकमी जागेत जास्तीत जास्त गुरांची पैदास, मुका प्राणी उपजीविके चे साधन न
राहता त्याची उपयुक्तता ठरते. आता महत्त्वाची, त्या मुक्या जीवाचे त्याच्या वाढीपेक्षा
वजनाशी जोडलेले अमानुष नाते, त्यामुळे हार्मोन्सची इंजेक्शने देऊन वाढवलेले कृ त्रिम
वजन, त्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यान्नात, चाऱ्यात विज्ञानाच्या साहाय्याने विकसित
के लेले (मानवी जीवाला कदाचित घातक असणारे) त्यांची पुष्टता वाढवणारे रासायनिक
घटक, गुरांच्या पोसले जाण्याचे निसर्गाच्या चक्राशी तोडलेले नाते, त्याचा त्या जीवावर
होणारा परिणाम, त्याने त्या प्राण्याच्या स्वभावात होणारे बदल, जे शेवटी त्यांच्या
मांसाच्या गुणवत्तेवर सतत वाईट परिणाम करतात असे भीषण स्वरूप या व्यवसायाचे
झाले आहे.
दर दिवशी अमुक एक संख्या कत्तलीसाठी मिळायला हवी अशी गरज आणि
त्यासाठी उभी के लेली अत्यंत नेटकी वाहतूक व्यवस्था हे सर्व कार्यक्षमतेच्या साच्यातलेच
असते. हे सर्व कत्तलीसाठी आणलेले प्राणी, हायजीन असावेत म्हणन आणलेल्या
कं टेनरमधून थेट एका मोठ्या पट्ट्यावर (कन्वेयर) सोडले जातात. त्यावर उभे करून
त्यांना एका तापमाननियंत्रित असणाऱ्या बोगद्यातून निर्विकारपणे सरकवले जाते आणि
त्या अंधारात त्यांच्या मानेवर मोठ्या यांत्रिक करवती येऊन आदळतात. ही प्रक्रिया थेट
त्यांचे हवे तसे तुकडे करून मग ते पुढे वेगवेगळ्या ट्रेमध्ये जाऊन त्यावर मार्के टींग
(पॅके जिंग इत्यादी)ची पुढची प्रक्रिया सुरू होते.
आता या सगळ्या प्रवासात या जिवंत प्राण्यांशी वाईट वागणूक, गैरवर्तन, त्या
कारखान्यातील/वितरण व्यवस्थेतील अनेक कामगारांचे शोषण होत असतेच.
उत्पादनाच्या प्रक्रियेला असणारे कायद्याचे, गुप्ततेचे संरक्षित कवच या बाबी
आपल्यापर्यंत कधीही पोहोचू देत नाही. लिणार गए या विषयातील जागतिक तज्ज्ञांच्या
मते पूर्वी जगातील मोठे मांस उत्पादक २५% मार्के ट आपल्या ताब्यात ठे वून होते. आता
जगातील ८०% मार्के ट हे त्यांच्या हातात आहे. चिकनच्या व्यापाराचा, नवीन
उत्पादनपद्धतीचा भयानक परिणाम नुसता चिकनच्या प्रतीवर झालेला नाही; तर तो ते
विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेवरही झालेला आहे. आता त्यांच्या ताब्यातला
प्रत्येक जीव हा विक्रीसाठीच आहे. वेगळ्या शब्दांत असे म्हणू की, त्यांच्याजवळ विक्री
करण्यासाठी नसणारा पण निसर्गाच्या चक्रासाठी आवश्यक असा पाळलेला जीव
अतिशय कमी प्रमाणात आहे. ही कथा आहे प्रगत राष्ट्रांची! आणि आपण जर तंत्रज्ञान
आणि मांस उत्पादनात त्यांचा कित्ता गिरवणार असू तर आपल्याकडे हेच दृश्य बघायला
मिळण्याचा काळ फार दूर नाही.
जगातल्या विविध सुपरमार्के टच्या साखळ्या खाद्यपदार्थांचे जे वैविध्य
आपल्यासमोर ठे वतात ती निव्वळ धूळफे क असून, काही मूठभर कं पन्याच एकाच
प्रकारची प्राणिजन्य आणि वनस्पतीजन्य उत्पादने वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या माथी
मारत असतात. म्हणजे कच्चा माल एकच; पक्का माल मात्र वेगळा. अमेरिके चेच
उदाहरण घेऊ तिथे या आधी काही लाखांपेक्षा जास्त ठिकाणी छोट्या प्रमाणात प्राण्यांचे
मांस मिळायचे (जसे सध्या आपल्याकडे आहे. अनेक मटण मार्के टमधून स्थानिक
खाटिक मांसविक्री करत असतात) तिथे आता फक्त तेराच कत्तलखाने उरले आहेत.
जिथे प्रत्येकी दर तासाला सुमारे ६०० प्राण्यांची कत्तल होते. तुम्हाला हवे असेल तर तेच
मांस घ्यावे लागते. या मांसविक्रीचे मोठ्या उद्योगात रुपांतर झाल्याने मांसाचा दर्जा,
त्यांची किंमत हे सर्वकाही मोठ्या कं पन्यांच्या हातात गेले आहे. पुन्हा त्यांना प्रत्येक
गोष्टीत नफा कमवायचा असल्याने त्यांनी वेगवेगळे मांसाचे प्रकार विकायला सुरुवात
के ली. जसे, मांसवड्या, ग्राउंड बीफ इत्यादी. शिवाय शेकडो प्राण्यांचे मांस एकत्र करून
विकले जाते. म्हणजे परत ज्या चवीसाठी तुम्ही मांसभक्षण करता त्याचा आता काहीही
संबंध उरलेला नाही. हे सगळे उपद्व्याप खाण्याआधीचे. असले मांस खाल्ल्यावर
त्यापासून होणारे रोग हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. कारण तुम्ही नेमके कु ठले,
कोणाचे मांस खात आहात हेच माहीत नाही. जसा लठ्ठपणाचा (ओबेस) तुमच्या
उत्पन्नाशी थेट संबंध असतो असे म्हणतात; पण तुमचे उत्पन्न कमी असतानाही तुम्ही हे
असले कमी दर्जाचे मांस खाल्ल्याने हा लठ्ठपणा तुम्हाला सोडत नाही असेही आढळून
आले आहे. म्हणजे एका अर्थाने समाजवाद खाण्यापर्यंत पोचलाय!!
या खाण्याच्या नव्या धर्माने अथवा 'फू ड इंजिनिअरिंग नावाच्या एका भीषण
वास्तवाने एक नवीच उत्क्रांती जन्माला घातली आहे. यामुळे आलेल्या, प्रक्रिया के लेल्या
अन्नाने सगळ्या लोकांचे उदरभरण आता साखर, मीठ, आणि चरबी या तीन अनिष्ट
गोष्टींभोवती घोटाळू लागले आहे. गंमत अशी की, या तीनही गोष्टी आपली चव वाढवत
असल्या तरी त्या थेट स्वरूपात निसर्गात नाहीत. पण आपण प्रक्रिया के लेल्या अन्नामुळे
त्या तशा स्वरूपात निर्माण के ल्या आहेत. हा विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, नवनिर्माणाचा
विश्वामित्री चमत्कार असेलही, पण त्यातच आपल्या विनाशाची सुप्त बीजेही आहेत
आणि ह्याचे आत्मज्ञान होण्यापूर्वीच कदाचित आपण संपलेले असू. 'कु -हाडीचा दांडा
गोतास काळ' ही नुसती म्हण नाही तर ब्रह्मवाक्य आहे हे मात्र खरे.
१८. अभिमान की शरम?

अलीकडेच जगाची लोकसंख्या सात अब्जांवर जाऊन पोचली आहे. म्हणजे या


पूर्वी या पृथ्वीतलावर इतकी माणसे कधीही नव्हती. सध्याचा जन्मदर आहे दर हजारी १९
जन्म. म्हणजे जगात दर मिनिटाला साधारण २५२ मुले जन्म घेत आहेत आणि दर
सेकं दाला सरासरी ४ मुले. तुम्ही हे वाचेपर्यंत ४० मुले जन्माला आली असतील. आता या
गतीने लोकसंख्या वाढत असेल तर जगातल्या मृत्युदराचीही माहिती घ्यायला हवी.
जगात दर सेकं दाला सरासरी १.८ माणसे मरतात. म्हणजे मिनिटाला १०८, तासाला
६,३५० आणि दिवसाला १ लाख ५६ हजार ७१२. आणि वर्षाला ही संख्या ५.७२ कोटी
होते.
इतकी माणसे कशी मरतात? त्यामुळे आजच्या प्रगत, सुसंकृ त जगात विविध
रोगांपासून होणारे मृत्यू हा एक सतत चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. जागतिक
आरोग्य संघटनेच्या २०११ साली प्रकाशित झालेल्या एका अहवालातील आजाराने
मृत्युमुखी पडणाऱ्यांची माहिती अस्वस्थ करते. त्या अहवालातील काही बाबी पाहू या.
* हृदयरोग - ७३ लाख
* मेंदूशी संबंधित - ६२ लाख
* लागण होणारे रोग (उदाहरणार्थ, हिवताप, एड्स, क्षयरोग, हगवण इत्यादी)
१.४ कोटी
* रक्तदाब - १० लाख
* मधुमेह - १२ लाख
* कर्क रोग - ३० लाख
* एकू ण संख्या - ३ कोटी ११ लाख
युनिसेफच्या अहवालात २०१० मद्ये मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या (०-१४ वय)
जवळपास १.१ कोटी इतकी होती आणि त्यातही चार वर्षांपर्यंतच्या ७३ लाख मुलांचा
समावेश आहे. आता हे सर्व आकडे दुपटीजवळ पोचले असणार. त्सुनामीसारख्या
एखाद्या नैसर्गिक आपत्तीनेसुद्धा इतके मृत्यू एका वर्षांत झाल्याची अलीकडच्या
इतिहासात नोंद नाही.
या पार्श्वभूमीवर भारताच्या आकडेवारीकडे एक नजर टाकू यात.
* हृदयरोग - १३ लाख
* मेंदूशी संबंधित - ९ लाख
* रक्तदाब - ३ लाख
* मधुमेह - १.८ लाख
* कर्क रोग - ४.५ लाख
* लागण होणारे रोग - ३५ लाख
भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत एक षष्ठांश इतकी आहे; पण मृत्यू मात्र त्या
प्रमाणात नाहीत. जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. भारतात हेच प्रमाण
गेल्या वर्षात २ लाखांवर पोचले आहे.
तिला जीवनशैली, व्यसने, आहारसवयी, साथी आणि कु पोषण अशी याला अनेक
कारणे आहेत. सर्व देश (प्रगत/अप्रगत) आपापल्या पद्धतीने यावर उत्तरे शोधत आहेत,
WHO पण मदत करत असते. मात्र गेल्या काही वर्षांत असे लक्षात आलंय की ही संख्या
वाढण्यात मोठा वाटा हा मोठमोठ्या औषध उत्पादक कं पन्या, त्यांनी उभ्या के लेल्या
लॉबीज आणि त्यांच्या मिंधेपणात असणारी सरकारे यांचा आहे.
मुळात कोणतेही औषधनिर्माण असो मग ते एड्सवर, कर्क रोगावर अथवा इतर
कोणत्याही असाध्य रोगावर, जेव्हा त्यासाठी औषध संशोधनाची प्रक्रिया सुरू होते तेव्हा
लागणाऱ्या आर्थिक पाठबळाची, संशोधनयंत्रणेची मदत ही नेहमीच देशोदेशीची सरकारे
देत असतात. मात्र औषधाचे संशोधन यशस्वी होताच त्याचे हक्क सरकारच्या सर्व
निकषांना पात्र असणाऱ्या खाजगी कं पन्यांना त्या औषधाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन
करण्यासाठी अतिशय कमी किमतीत विकले जातात. सरकार त्याच्या विक्रीची
किंमतसुद्धा निश्चित करत असते. म्हणजे एका अर्थाने हे संशोधन लोकांच्या पैशातून
झालेले असते. त्यामुळे ते औषध कोणाला उपलब्ध करावे, किती प्रमाणात वगैरे हवे तसे
ठरवण्याचे हक्क या कं पन्यांना नसावेत. त्या कं पन्यांनी आवश्यक तो किमान नफा घेऊन
ते सगळ्यांना उपलब्ध करावे म्हणून त्यांचे फॉर्म्युले अल्पदरात दिले जातात. पण तसे
घडत नाही. या कं पन्यांनी काही लोकांचे आयुष्य वाचवताना गरीब देशातील अनेक
आयुष्ये वेठीस धरली आहेत. काही प्रभावशाली कं पन्यात- ज्यांचे एजंट्स नेहमी
अमेरिके न काँग्रेसभोवती घोटाळत असतात- औषधांचे पेटंट करून आपल्या देशांच्या
सरकारामार्फ त अथवा WHO मार्फ त, विकसनशील देशातील औषध कं पन्यांना या
औषधांच्या उत्पादनाची बंदी करण्यात आली. (पेटंटची माफियागिरी हा एक वेगळाच
विषय आहे तो पुन्हा के व्हा तरी) हे सर्व करूनही हव्यास संपत नाही म्हणून परत लोकांना
अत्यावश्यक औषधांच्या किमती जास्तीत जास्त असणे, आपल्या औषधांना फायदा
होईल अशा पद्धतीने पर्यावरणाचे नियम बदलण्यासाठी दबाव आणणे, किमतीच्या
घालमेलीत जुगार खेळत एखाद्या औषधांची मक्तेदारी स्वत:कडेच राहील हे पाहणे,
सततचा आणि चकीच्या जाहिरातींचा मारा करून औषधे विकणे, सामान्य माणसाच्या
आवाक्यातील स्वस्त औषध परवाने रद्द करण्याकरता निरनिराळ्या सरकारी संस्था,
डॉक्टर्स यांना लाच देणे आणि या बदल्यात आपली महागडी औषधे विक्रीचा सपाटा
लावणे. कु पोषणाची बाजारपेठ उभी राहील अशी व्यवस्था करणे. जास्त अथवा कमी
भूक लागण्याची अनावश्यक औषधे विकणे, साध्या आजारासाठीसुद्धा अनावश्यक अशा
प्रतिजैविक औषधांचा मारा करण्याची अवस्था वैद्यकीय व्यवासायात आणणे, विकसित
देशात न चालणारी औषधे विकसनशील देशात सर्रास विकणे, औषधांची माहिती आणि
सूचना या स्थानिक भाषेत न छापणे, विकसनशील देशांतील सरकारांवर दबाव आणून
त्यांना ही औषधे कमी किमतीत उपलब्ध करता येऊ नये यासाठी त्या देशांच्या औषध
धोरणात ढवळाढवळ करणे ह्या सर्व गोष्टी ह्या कं पन्यांच्या दीर्घकालीन विक्रीच्या अतिशय
महत्त्वाच्या धोरणाचा भाग आहे.
पूर्वीच्या एका सर्वेक्षणानुसार औषधांच्या ६२ जाहिराती या फसव्या आणि
दिशाभूल करणाऱ्या असल्याचे निदर्शनास आले होतेच. सध्या जगाला दुर्धर, साथींच्या
आजारांइतकाच किंबहुना त्याहून अधिक भयानक असा विळखा मोठ्या औषध
कं पन्यांच्या हव्यासाचा आणि दादागिरीचा पडलेला आहे. या सगळ्या कं पन्या रोगाशी
झगडण्याऐवजी त्या रोगाचे मार्के ट किती आहे या धोरणाला प्राधान्य देतात. दुर्दैव असे
की वैद्यकीय शास्त्र अतीप्रगत असताना आणि दुर्धर व्याधींवर उपायांची शक्यता
असताना या कं पन्या मात्र आपल्या वृद्धीचा झोत बेमुर्वतपणे फक्त कु ठून किती आणि
कसा फायदा होतो यावर कें द्रित ठे वतात. रोगांच्या नायनाटापेक्षा रोगाचे मार्के ट हे
अतिशय मोठे आमिष त्यांच्यासाठी आहे. अगदी बाजारशास्त्राच्या तत्त्वाप्रमाणे साथींचे
रोग हा जरी मोठ्या क्षमतेचा बाजार असला तरी तो गरीब देशात असल्याने उत्पन्न
होण्याची शक्यता कमीच. त्यापेक्षा वियाग्रासारख्या औषधाचे श्रीमंत देशातील मार्के ट
त्यांना परताव्याची खात्री देते.
जगात दर आठवड्याला लक्षावधी लोक के वळ दुर्लक्षामुळे, औषधांच्या ना
परवडणाऱ्या किमतीमुळे अथवा कमतरतेमुळे हकनाक रोगांना बळी पडतात. यात भरीस
भर म्हणून मोठमोठ्या कापेरिट कं पन्या आता आपली सगळी पुंजी ही रुग्णालये,
चिकित्सालये, वैद्यकीय विमा यांसारख्या पायाभूत गोष्टीत गुंतवायला लागल्या आहेत.
कारण हे सगळे एकमेकांना पूरक धंदे आहेत. वास्तविक समाजातील एकमेकांना पूरक
घटक आरोग्य (Health) आणि संपन्नता (Wealth) असले पाहिजे...पण आज या
सगळ्या औषध माफियागिरीचे, कार्पोरेट वृत्तीच्या नफे खोरीचे चित्र असे आहे की हे दोन्ही
घटक
एकमेकांविरुद्ध संघर्षाच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत आणि त्यात जगातील
लोकांचे आरोग्य नाहक बळी पडते आहे. जास्त पैसा की लोकांचे आरोग्य असा चकीचा
प्रश्न विचारला जाऊ लागला की 'जेवढे अनारोग्य जास्त तेवढा पैसा जास्त' असे भयंकर
उत्तर येणे साहजिक आहे. कारण जर सर्वच लोकांचे आरोग्य सुधारले तर मग या
व्यवसायाला क्षयाने ग्रासेल त्याचे काय? हा असा एक न सुटणारा पेच मग प्रसंगी
माणुसकी नाकारून का होईना सोडवावा लागला तरी चालेल पण तो निकालात
काढायला हवाच! यातून मग कोणत्या रोगांकडे जास्त लक्ष द्यायचे याचे धोरण ठरते.
हृदयविकार, रक्तदाब, कर्क रोग अशा रोगांना प्राधान्य देणे हे हिवताप, क्षय, कॉलरा या
साथीच्या रोगांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त फायद्याचे असे गणित मांडले जातेय, कारण या
रोगांवरचे उपचार महागडे आहेत. योगायोग म्हणा किंवा एरवी दुर्लभ असणारी योजकता
म्हणा, पण या रोगांना बळी पडणाऱ्या लोकांची संख्यापण वाढत जातेच आहे. गेल्या
काही वर्षांत अजून एक धोकादायक खेळी खेळली जातेय. रोगांची कारणे
सर्वसाधारणपणे जीवनपद्धतीशी. खाण्यापिण्याच्या सवयींशी निगडित असतात. त्यामळे
कशा जीवनशैलीचा प्रसार करावा हेसुद्धा याच कार्पोरेट कं पन्या ठरवत असतात.
थोडक्यात, हे साटेलोटे आता अशा एका पॅके जच्या स्वरूपात तयार आहे, जे तुम्हाला
जीवनशैलीपासून उपचारापर्यंत सगळेच पुरवते. अट एकच त्यासाठी तुमच्याकडे पैसा
असायला हवा. जगभर एकाच पद्धतीची साचेबद्ध जीवनशैली विकसित करण्यामागे
काहीतरी दीर्घकालीन डावपेचात्मक भाग नक्कीच आहे. मग ज्यांना ही जीवनशैली मान्य
नाही ते मागासलेले हे ठरवण्यात जगातील नि:पक्षपाती (?) माध्यमे आपला वाटा अगदी
धावून जाऊन उचलतात; कारण तेही याच कार्पोरेट संस्कृ तीचे अपत्य आहे.
कोणत्याही एकाच संस्कृ तीकडे जेव्हा या जगाची सूत्रे येतात मग ती धार्मिक असो
वा कापेरिट तेव्हा जगाचे सकाण चकीच्या दिशेने फिरवले गेलेले असते. या प्रकारची
हितसंबंधांची सरमिसळ सुरू झाली की मग, दुखणे आणि उपाय एकच असे विचित्र
साटेलोटे अपरिहार्य असते. ज्यांना हे मान्य नाही त्यांना मग या सगळ्या दुष्टचक्राचे
शोषित ठरवणे हेही न्यायाने आलेच. आरोग्यासारखे अत्यंत मूलभूत आणि मानवजातीचे
सुदृढ बीज टिकण्यासाठी अपरिहार्य असणारे क्षेत्रही आता औषधांच्या बेरकी आणि
मस्तवाल दलालांनी काबीज के ले आहे. अशावेळी नुसती बघ्याची भूमिका घेत, पुढच्या
पिढीसाठी वाढून ठे वत असलेल्या ह्या असल्या प्रगतीच्या वारशाचा आपण अभिमान
बाळगावा की शरम, हा प्रश्न बेचैन करणारा आणि वैयक्तिक नसणारा आहे.
१९. काळ्या अर्थसत्तेचे नितळ रूप

१. “या घराच्या व्यवहारात ब्लॅक ४० आणि व्हाईट ६० लागतील. चालेल?"


२. “पावती हवीय का? असेल तर कर भरावा लागेल? कर नको तर मग रोख
रक्कम द्या."
३. “तुम्ही असं करा, मला या कार्यक्रमाची ही रक्कम पाकिटात घालून रोख
द्या, चेक नको.”
४. "नाही सर, चेक नाही चालणार, रोख रक्कम द्या ना; हवे तर थोडे कमी द्या!"
वरील संवाद जर आपल्या ओळखीचे असतील, तर हे अगदीच नक्की की आपण
काळ्या पैशाला सरावलोय. यातल्या एका तरी संवादात आपला नकळतसुद्धा सहभाग
असेल तर आपणही ह्या काळ्या पैशाचे महत्त्वाचे निर्माते आहात.
कोणत्याही व्यवहारातील पैसा कोणत्याही हिशेबात नसेल, त्यावर
आवश्यक करभरणा नसेल, तो व्यवहारात असूनही बँके च्या खात्यात दिसत नसेल तर
तो निश्चित काळा पैसा होय. थोडक्यात, असा पैसा जो आपल्याशिवाय कोणालाही
माहीत नाही.
पैशाच्या उत्पन्नावरील नियम, बंधने म्हणजेच कर. त्यामुळे या करांचा इतिहास
जितका जुना आणि रोचक तितकाच काळ्या पैशांचाही. फार पूर्वी अनेक शतके ब्रिटनने
प्रत्यक्ष करपद्धती अंमलात आणली नाही, कारण लोकांनी स्वत:चे उत्पन्न असे उघड
करणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. जगातील उत्पन्नावरचा पहिला कर हा नेपोलियनच्या
काळात (युद्धासाठी आवश्यक अशी पैशाची गरज म्हणून) लावला गेल्याची नोंद आहे.
जगातल्या अनेक देशात काळा पैसा, त्याच्या निर्माणाची प्रक्रिया, त्यावरचे कायदे
याची चर्चा सतत सुरू असतेच. दुर्दैव इतके च की आपला देश यात जगात अग्रेसर आहे.
आपण ज्या प्रमाणात काळा पैसा निर्माण करतो तितका जगात तो कु ठे ही होत नाही.
आता हे सगळे कर चुकवण्यासाठीच होते असे नाही; तर खर्च करण्याच्या पद्धती अनेक
असल्याने तो निर्माण व्हायला मदत होते. कराबद्दल बोलायचे तर भारतातील करपद्धती
ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. ती सोपी नाही याचे कारणसुद्धा त्याचा फायदा घेणारे अनेक
आहेत हेच आहे. एका अर्थाने हेच कारण आणि हाच रोग अशा विचित्र परिस्थितीत
आपण सापडलो आहोत. संगणकक्षेत्रात असे म्हणतात की, ज्या कं पन्या व्हायरस नष्ट
करणारे प्रोग्राम तयार करतात त्याच अनेक व्हायरस निर्माण करत असतात. वेगळ्या
अर्थाने याला स्वयंचलीत व्यवसाय असेही म्हणता येईल. रोग आणि इलाज एकाच सूत्रात
बांधले की मग ते एकमेकांची काळजी घेतात. .
ज्यावेळी कमावलेल्या पैशावर करवसुली सुरू झाली, ती जास्तीत जास्त किचकट
होत गेली तेव्हाच त्यापासून वाचण्यासाठी काळ्या पैशाचा एक न संपणारा स्त्रोत निर्माण
झाला. मग वरच्या उदाहरणातील पावती न घेणे हे याचे छोटे; तर एखाद्या गैरव्यवहारात
मोठी दलाली घेणे हे मोठे उदाहरण. एखाद्या उच्चपदस्थाकडून लवकर काम करून
घ्यायचे तर त्याला लाच द्यावी लागते. गंमत बघा, म्हणजे जिथे अधिकार आहे तिथेच त्या
अधिकारांच्या पायमल्लीची व्यवस्थाही आहे...जिथे दंड आहे तिथे तो चुकवायची प्रक्रिया
आणि किंमतही आहे. रोख लाच, दलाली देणे, असे उत्पन्न न दाखवणे अशा अनेक
व्यवहारातून वर्षानुवर्षे काळा पैसा निर्माण होतोय. त्याला ना देश अपवाद आहे ना रंग,
लिंग, वय अथवा धर्म. हा एका अर्थाने माणसांचा, माणसांनी, एकमेकांचे हित सांभाळत
के लेला गैरव्यवहार आहे. कालांतराने काळ्या पैशाचा हा प्रवाह इतका सशक्त झालाय
की त्याचे आता एका स्वतंत्र अर्थव्यवस्थेत रुपांतर झाले आहे. आता तर आंतरराष्ट्रीय
बाजारात अनेक बहुराष्ट्रीय कं पन्या आपले काम व्हावे यासाठी रोख रक्कम देणे उत्तम
मानतात. यासाठी त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकात ठरावीक रक्कम बाजूला ठे वलेली
असते. इतके हे सुविहित आणि व्यवस्थापनाच्या चौकटीत उत्तमरीत्या चाललेय.
एखाद्या कं त्राटासाठी सत्ताधीशांना रोख रक्कम देणे, दर्लक्ष करण्यासाठी कर
अधिकाऱ्यांना पाकीट देणे, त्यातून पकडलेच तर भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला, पोलिसांना
रक्कम देणे, कोर्टात गेलो तर न्यायाधीशांना लाच देणे अशा अनेक पायऱ्या ओलांडत या
अर्थसत्तेने आपल्या जीवनाची अनेक क्षेत्रे बघता बघता पादाक्रांत के ली आहेत! अर्थात
काळ्या अर्थसत्तेचे स्वरूप काय याचे पत्ते कधीच उघड होत नसले तरी त्याबद्दल अंदाज
व्यक्त होऊ शकतात. हे अंदाज थक्क आणि निराश करणारे आहेत. खालील तक्त्यात
जगातील काही देशांतले काळ्या अर्थसत्तेचे प्रमाण दिसते. ह्या सगळ्यांची जर एकू ण
बेरीज के ली तर या पाशवी अर्थसत्तेचा अंदाज येईल. आपला भारत या तक्त्यात नाही,
पण भारताची काळी अर्थसत्ता ही अधिकृ त अर्थकारणाच्या बरोबरीने असल्याचे
सांगण्यात येते.

काळ्या अर्थसत्तेची व्याप्ती


ब्रिटन - राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७%
इटली - राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३०%
आफ्रिकन देश - राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६०%
जपान - राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६%
अमेरिका - राष्ट्रीय उत्पन्नाच्या ८%
रशिया - राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४५%
चीन - राष्ट्रीय उत्पन्नाच्या २०%

इतक्या मोठ्या प्रमाणवर जमा के लेला हा पैसा ठे वायचा कु ठे असा प्रश्न जेव्हा
यातून निर्माण झाला तेव्हा मग तशी व्यवस्था उभी के ली गेली. आज स्वित्झर्लंड स्वत:च्या
देशाचे नाव काळ्या पैशाच्या संदर्भात बदनाम होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करते
आहे. त्यांच्या देशातल्या बँके त जेव्हा हे पैसे जमा होत होते तेव्हा हे कु ठून येतायत ते
त्यांना काय माहीत नव्हते? हा निव्वळ भंपकपणा झाला. कोणत्याही बँके त आपण जर
पैसे भरणा करायला गेलो तर त्या बँके ने तुम्हाला किमान दोन प्रश्न विचारले पाहिजेत.
एक, हे पैसे कु ठून आले आणि यावर तुम्ही आवश्यक करभरणा के ला आहे का? स्वीस
बँक तुम्हाला हे प्रश्न विचारत नाही. तुमचा पैसा ती जमा करून घेते. अचानक एखादा
परदेशी माणूस येतो; लक्षावधी डॉलर्स आपल्या खात्यात जमा करतो आणि एखाद्या
नि:संग साधूप्रमाणे, देशातले बँके चे अधिकारी त्याबद्दल काही विचारत नाही हे कसे शक्य
आहे? याचा अर्थ या जाब न विचारल्या गेलेल्या पैशावरच ती अर्थसत्ता इतके दिवस
चालली आहे. या देशाच्या व्यवसायाचे मुख्य प्रॉडक्टच असला पैसा आहे. त्यामुळे हे
प्रॉडक्शन वाढवत, त्याबाबत गुप्तता बाळगत पैशाचा धंदा करणारा हा देश आहे का?
जगातले सगळे (बदमाश म्हणजे कोण तर हुकू मशाह, अनैतिक राजकारणी, माफिया
इत्यादी) एकमेकांशी संपर्कात येत असतातच. ते एकमेकांना असा पैसा ठे वायचे सुरक्षित
ठिकाण सांगत नसतील हे कशावरून? त्यामुळेच ह्या पैशात सातत्याने वाढ होत नसेल?
इतक्या गदारोळानंतर आताशा कु ठे या सभ्य स्विस सरकारला म्हणे जाग आली आणि
त्यांनी एक कायदा संमत के ला. ज्यायोगे त्यांनी अशी खाती सील करण्याचे ठरवले. मध्य
पूर्वेतील सध्याच्या अस्थिरतेमुळे आता तिथल्या पदच्युत हुकु मशाहांच्या खात्यावर कडक
नजर ठे वण्यात येते आहे. ही माणसे बदमाश होती हे काय या बँके ला माहीत नव्हते?
नाणेनिधीला माहीत नव्हते? ज्यांच्या इशाऱ्यावर ही सरकारे हलत डुलत होती त्या प्रगत
आणि मानवतावादी (?) राष्ट्रांना हे माहीत नव्हते? हा भाबडेपणा की बदमाशी? एका
अभ्यासगटाच्या अहवालानुसार स्विस बँके त एकू ण १८ ट्रिलियन डॉलर्स इतकी रक्कम
आहे (ही रक्कम अमेरिके च्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा (१४ ट्रिलियन डॉलर्स) जास्त आणि
भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या (१.४ ट्रिलियन डॉलर्स) १३ पट इतकी प्रचंड आहे. आज
अनके देश स्विस बँके कडे देशातील नागरिकांच्या खात्यांची माहिती मागताहेत. फ्रान्स
आणि जर्मनीने तर याबद्दल स्विस बँके विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात के सेस दाखल
के ल्या आहेत. भारत नेमके काय करतो आहे?

स्विस बँके तील पैसा : संदर्भ स्विस बँक अहवाल २००८


भारत - १८९१ बिलियन डॉलर्स रशिया - ६१० बिलियन डॉलर्स
चीन - २१३ बिलियन डॉलर्स ब्रिटन - २१० बिलियन डॉलर्स
युक्रे न - १४० बिलियन डॉलर्स
वरील तक्त्यात स्विस बँके ने जाहीर के लेला पैशाचा तपशील आहे. या तक्त्यात जो
देश आपल्या ६० कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न ३० रुपयेही नसताना, प्रगतीच्या भयानक
खोट्या आणि भंपक गप्पा झोडतो अशा भारताचा अग्रक्रमांक आहे. ज्या देशात रोज
एखादा तरी घोटाळा उघडकीस येतो ज्यात बरेचसे नादान राजकारणी, सरकारी
उच्चपदस्थ गुंतलेले असतात. ज्या देशातले फक्त ४५% गरीब अथवा मध्यमवर्गीय
लोकच मतदान करतात आणि उरलेले उच्च मध्यमवर्गीय आणि नवश्रीमंत संध्याकाळच्या
वेळी एखादे डिंक घेताना, आपल्या देशात वाईट लोक कसे निवडून येतात याची वांझोटी
आणि अत्यंत नादान अशी के वळ चर्चा करतात. कमालीच्या बेजाबदार आणि स्वार्थी
लोकांतले, दरवर्षी ८०,००० लोक स्वित्झर्लंडला जातात. इतके च नाही तर यातले किमान
२५,००० लोक असे आहेत की जे एकाच वर्षांत अनेकवेळा जातात. स्वीस बँके तल्या
पैशांची एवढी चर्चा होऊन ती माणसे, त्यांच्या जाण्याचे कारण शोधणे आपल्या
पोलिसांना आणि करखात्याच्या अधिकाऱ्यांना शक्य का होत नाही? ती कारणे शोधणे
इतके अवघड आहे का? आतापर्यंत किमान चार वेळा यावर संसदेत चर्चा होते आहे;
कधी दीर्घ तर कधी वाजवी. पण हे नसतेच गहाळ का चाल आहे? 'त्या लोकांना अजून
एखादी स्विस बँक शोधायला वेळ मिळावा म्हणून तर हे घोंगडे भिजत घातले नसेल?
साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा अवघड होत असतात तेव्हा ते प्रश्न सोडवायचेच.
असेच काही आपल्याला हवे आहे का? पा म्हणूनच एका विपरीत युक्तिवादाने असे
म्हणता येते, नुकत्याच झालेल्या जगभरच्या मंदीचा भारताला म्हणावा तसा फटका
बसला नाही; कारण भारताची काळी अर्थसत्ता मुख्य अर्थ सत्तेपेक्षा सामर्थ्यशाली आणि
विशाल आहे.
२०. नशिल्या व्यापाराचे भान

सारे जग आज जसे प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे तसेच नशिल्या


पदार्थांचा व्यापारही बहरत चालला आहे. इतर सर्व उत्पादकांप्रमाणे नशिल्या वस्तूंच्या
व्यापाऱ्यांनीसुद्धा आपले मार्के ट बॅडिंग चालवले आहेच. शेवटी हा एक व्यवसाय झाला
आहे आणि तो व्यवसायाच्याच निकषावर चालवला जातो. मोरोक्कन कीफ, नेपाली
गांजा, बोलीव्हीयन पावडर अशी लेबले असणाऱ्या काही उत्पादनांनी जगाचे क्षेत्र
व्यापायला सुरुवात के ली आहे. हवामानावर अवलंबून असणारी मादक द्रव्यांची काही
पिके मात्र आपले वर्चस्व टिकवून आहेतच. जगातली सर्व कोके न ही कोलंबिया, पेरू
आणि बोलीव्हीयातून येते. दोन तृतीयांश अफू ही अफगाणिस्तानातून येते; तर उरलेली
म्यानमार आणि मेक्सिकोतून येते. याला पूरक व्यवसाय म्हणून आता कृ त्रिम पदार्थांचे
मार्के ट विस्तारात चालले आहे. amphetamine, methamphetamine, ecstasy
यांसारखे जे कृ त्रिम नशिले पदार्थ आहेत हे त्यांची प्रक्रिया ठरलेली असल्याने आणि
हवामानाशी काहीही संबंध नसल्याने जगात कु ठे ही उत्पादित होतात. असे संशोधन या
व्यवसायाला आणखीनच बरकत आणील.
व्यवसायाचा मुख्य भार आता तरुणाईने काबीज के ला आहे. दर दहा १८ वर्षांच्या
मुलातले ३ आणि १४ वर्षांच्या वयोगटातले, दर आठमागे असे अत्यंत आशादायक
प्रमाण सर्वप्रथम अमेरिके ने पटकावले आहे. नुकत्याच एका अहवालात असे म्हटले आहे
की ecstasy नावाच्या कृ त्रिम नशिल्या पदार्थासाठी, इंडोनेशियाने युरोपचे अग्रस्थान
हिरावून घेतले असून तो दक्षिण पूर्व अशियातील या व्यवहाराचा मोठा हिस्सेदार आहे.
इतकी वर्षे खरे तर दक्षिण अमेरिका आणि आशियाने श्रीमंत राष्ट्रांना काही नैसर्गिक
नशिले पदार्थ पुरवले होते. पण आता जागतिकीकरणाच्या तडाख्यात बऱ्याच पदार्थांचे
औद्योगिकीकरण झाल्याने याही पदार्थांचा प्रगत राष्ट्रांतून प्रचंड प्रमाणात आणि अखंड
पुरवठा जगाला होत असून त्यांनी यात आघाडी मिळवली आहे. सध्या आपले जग प्रगती
करत कु ठपर्यंत येऊन पोचले आहे याचे विदारक आणि अंतर्मुख करणारे चित्र पाहणे
अपरिहार्य आहे.
जगातल्या अवैध धंद्यात सगळ्यात जास्त नफा मिळवणारा धंदा म्हणजे अमली
पदार्थांचा व्यापार होय. इतर धंदे करून दमलेले सगळे जागतिक व्यापारी नफ्याच्या बेधुंद
ओढीने शेवटी या धंद्याच्या आश्रयाला येतात. अमली पदार्थ म्हणजे हेरोईन, कोके न,
गांजा, चरस, अंफे टामाईन या वर्गवारीत मोडणारी उत्तेजक द्रव्ये. अफू , कोके न, गांजा
यांची लागवड होते तर अंफे टामाईन या वर्गवारीत मोडणारी उत्तेजक द्रव्ये (ATS) ही
प्रयोगशाळेत निर्माण होतात. म्हणजेच त्यांचे उत्पादन अधिकच गोपनीय पद्धतीने चालते.
खुद्द अमेरिके त या नशिल्या पदार्थांच्या अशा अनेक अवैध प्रयोगशाळा आढळन आल्या
आहेत. युनोच्या एका अहवालानुसार जगातील सुमारे २९ कोटी लोक नशिले आहेत; तर
आणखी ४ कोटी लोक या व्यवसायाशी निगडित आहेत. दरवर्षी ही संख्या साधारण एक
कोटींनी वाढते आहे. जगण्याचे वांधे असणारे गरीब आणि ज्यांना जगण्यासाठी नवीन
विषय शोधण्याचे वांधे असे सत्ताधीश, चंदेरी दुनियेतील प्रसिद्धीच्या सर्व मर्यादा पार
करून जाणारे तारे-तारका, आश्रयदाते राजकारणी, रक्षणकर्ते पोलीस पदकांच्या
लालसेने बेफाम झालेले खेळाडू अशा समाजघटकांचे यातील प्रमाण थक्क करणारे
आहे. इतकी विविधरंगी माणसे अडकवलेला हा एकमेव अवैध धंदा ठरेल. दरवर्षी सुमारे
अडीच लाख लोक अमली पदार्थांचे सेवन के ल्याने मृत्युमुखी पडतात आणि यात
वर्षागणिक वाढ होते आहे. व्यसन आणि व्याधींचे असणारे एक भयाण नातेही आहेच.
एड्सच्या एकू ण के सेसपैकी १७% रुग्ण म्हणजे दर सहातला एकजण नशिला रुग्ण आहे.
जगातल्या एकू ण हेरोईन उत्पादनापैकी ६०% अफगाणिस्तानातून येते. तिथे
सत्तांतरे होऊन, तिथले हुकु मशाह परागंदा होऊन, अमेरिकन लष्करी प्राबल्य असून,
प्रचंड बॉम्ब वर्षाव होऊन, तिथल्या उत्पादनात घट झालेली नाही एवढी एकाच गोष्ट या
व्यापाराचे महत्त्व अधोरेखित करते. असे असूनही या गोष्टीचा अमेरिके ने आपल्या
बहुचर्चित, बहुआयामी वॉर-ऑन-टेररशी संबंध लावलेला नाही. या धोरणाला काय
म्हणायचे हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे आपल्या शेजारच्या म्यानमारमधील अफू चे
उत्पादनही गेल्या दोन वर्षांत सुमारे २०% नी वाढले आहे.
या उत्पादनाबरोबरच या ड्रग-वाहतुकीतून मिळणारा नफा हा एक आणखी प्रचंड
व्यवसाय आहे. यात जे कमवले जाते, जी उलाढाल होते त्यापुढे जगातील सर्व दोन
नंबरच्या धंद्यातील (राजकारण धरून) उत्पन्न नगण्य आहे. चतुर इंटरपोल, देशोदेशींचे
कठोर पोलीस, मजबूत सीमा सुरक्षादल यांच्या नाकावर टिच्चून ही उलाढाल आता
अंदाजे ७०० बिलियन डॉलर्स (सुमारे ४०-४२ लाख कोटी रुपयांपर्यंत) पोचली आहे. या
उद्योगावर वारंवार घालण्यात आलेली बंदी तर याच्या फोफावण्याचा मूलमंत्र आहे.
थोडे मागे वळून पाहिले तर इतिहासात अमली पदार्थांवर पहिली बंदी चीनने
घातली ती मागच्या शतकात; त्यावेळी ब्रिटनचे चलाख व्यापारी जगभरातून गोळा
के लेल्या अफू ची विक्री चीनच्या बाजारपेठे त करत होते. त्यावेळी चीनमध्ये सुमारे २०
लाख लोक या नशेच्या आहारी गेले होते. त्यावेळी ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत
नसल्याने आणि ते व्यापाराचे पुरस्कर्ते, हितरक्षक असल्याने त्यांनी चीनला ही बंदी
ताबडतोब उठवायला लावली (म्हणजे हेच लोक या अवैध व्यवसायाचे पूर्वज ठरतात).
प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार असावी तसे याही बाबतीत घडले आहे.
सध्याच्या जागतिक मंदीत काही बँकांमध्ये ड्रगशी संबंधित पैसे असल्याने वैध व्यवहारांचे
फार मोठे आर्थिक नुकसान टळलेय. नशिल्या पदार्थांच्या व्यापारासारख्या बेकायदेशीर
व्यवसायात फक्त रोख पैसा आहे. त्या रोख पैशांचा ओघ इतका प्रचंड आणि खात्रीचा,
सातत्याचा होता की जगातल्या आर्थिक बाजारांना तो स्वीकारण्याशिवाय दुसरा काहीच
मार्ग नव्हता. आणि पैशाला नैतिक-अनैतिक भाषा नसल्यामुळे तो अनेक आर्थिक
संस्थांतून सढळ हस्ते आणि सन्मानाने स्वीकारला गेला. या खात्रीच्या भांडवलाने मोठ्या
प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पतपुरवठा झाला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्याच
अहवालानुसार फक्त २००७ ते २०१०. या तीन वर्षांत, युरोप आणि अमेरिकन बँकांत
आलेली. समारे एक टिलियन डॉलर्सपेक्षाही (समारे सहा लाख कोटी रुपये) जास्त
रक्कम या बेकायदेशीर व्यवहारातून आलेली होती. ती बहुतांशी नुकत्याच आलेल्या
बाजाराच्या मंदीत नष्ट झाली. त व्यापाऱ्यांना आयुष्याचा फटका बसला. इतके नुकसान
झाल्यावर या लोकांनी आता आपली दिशा बदलली असून आता या व्यवहारातून येणारे
सर्व पैसे हे शक्यतो रोखीच्या स्वरूपात अमेरिका, युरोपच्या बाहेरील देशांत म्हणजे
आशियात ठे वण्यात येत आहेत. आता योगायोग अथवा योजना म्हणा; पाकिस्तान,
अफगाणिस्तान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका असे भारताचे सर्व सख्खे शेजारी या अमली
पदार्थांच्या धंद्यात अतिशय खोलवर गुंतलेले आहेत. याला फक्त एकच सन्माननीय
अपवाद आहे तो म्हणजे भूतान. या इवल्याशा देशाने अमली पदार्थच नाही तर तंबाखूच्या
सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे. असे करणारा भूतान हा जगातील एकमेव आणि
पहिला देश आहे. तो खऱ्या अर्थाने विकसनशील आहे. मानवतावादाच्या आणि सारे जग
सुखी करण्याच्या नुसत्या भ्रामक घोषणा करणाऱ्या प्रगत राष्ट्रांना ही सणसणीत चपराक
आहे; त्याबद्दल साऱ्या जगाने मानले भूतानचे ऋण पाहिजे.
२००५ सालच्या एका चाचणीत, अमेरीके तील २४% विद्यार्थ्यांचा विक्री, खरेदी
अथवा वापर अशा प्रकारे अमली पदार्थांशी संबंध आहे असे लक्षात आल्यावर ते सरकार
हादरले. त्यावर्षी अमली पदार्थाविरुद्ध चालवलेल्या मोहिमेसाठी ७ बिलियन डॉलर्स खर्च
के ले गेले आणि सुमारे आठ-नऊ लाख लोकांना शिक्षा के ल्या. इतके सारे करूनही आज
अमेरिके च्या वय १२ ते १९ मधील सुमारे ८ लाखांवर मुले ही कोणत्या ना कोणत्या
अमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत.
भारतात काही फार वेगळी परिस्थिती नसावी, पण आपला प्रश्न गंभीर आणि
वेगळाच आहे. मुळात ज्या देशात किती बेकायदा लोक राहतात, येतात आणि जातात
हेच माहिती नाही तिथे अशा प्रकारची माहिती मिळणे दुरापास्त आहे. आपल्याकडे
बऱ्याच गोष्टी अतिशय छप्या आहेत. शिवाय त्याला राजकीय संरक्षण, पोलिसी
डोळेझाक असे बहुमोल कवच आहे. गेल्या काही वर्षांत उघडकीस येणाऱ्या रेव्ह-पार्टीज
मात्र याची झणझणीत साक्ष देतील. परंतु उघडकीस आले नाही म्हणून सगळे आलबेल
आहे असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. २००९ या वर्षी आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कं टोल
बोर्ड या संस्थेने भारत हा बेकायदेशीर अमली पदार्थांचे महत्त्वाचे ठिकाण असल्याचा
दावा के ला होता. कारण त्यावेळी भारतात ATS चे प्रचंड मोठे साठे सापडले होते.
बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान अशा सर्व प्रदेशांतल्या अवैध अमली पदार्थांच्या
वाहतुकीच्या महामार्गावर भारत अपरिहार्यपणे येतो आणि भारतातील कायदा-
सुव्यवस्थेची कमालीची अनागोंदी, शासकीय भ्रष्टाचार आणि नवश्रीमंत वर्गातील नशेची
निकड त्याला खतपाणी घालते असेही मत त्या संस्थेने नोंदवले आहे. भारतातली
ईशान्येकडची राज्ये या विळख्यात सापडली आहेत. चीनचे खतरनाक इरादे, नेपाळ-
म्यानमारचे घातक संगनमत, तुतीकोरीन ते श्रीलंका अशी एक नव्यानेच विकसित
झालेली अमली वाहतूक ह्या सर्व भारतासाठी अशुभ सूचक गोष्टी आहेत.
या जोडीला गेल्या वर्षात ईशान्य भारताकडे सरकारचे झालेले बेमुर्वत दुर्लक्ष आणि
तेथील नागरिकांप्रती असणारे त्रयस्थपण या सगळ्या बेजबाबदार कृ त्यांनी जन्माला
घातलेला हा तमाशा आहे. राष्ट्रासाठी आपण जागरूक नसणे काय विपरीत परिस्थितीला
जन्म देते आणि येणाऱ्या निष्पाप पिढ्यांसमोर काय वारसा ठे वला जात आहे याचा
विचार अस्वस्थ करणारा आहे.
'मेरा भारत महान' या घोषणेचे ईशान्येतील वास्तव असे दुर्दैवी आहे.

२१. भ्रष्टाचारचे सत्य

माणसाच्या अस्तित्वाइतकाच जुना आहे त्याचा आचार. विचार नंतर आला आणि
काहींच्या बाबतीत अथवा काही संदर्भात तो अजूनही यायचा आहे. त्यामुळे सदाचार
आणि भ्रष्टाचार हे निसर्गदत्तच आहेत. फरक इतकाच की एक प्रयासाने शक्य होतो; तर
दुसरा एकदा कळल्यावर सारखे प्रयास करायची गरज राहत नाही. तो चटकन अंगवळणी
पडतो, प्रयत्नांशिवाय प्राप्त होतो. आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात भ्रष्ट आहोत.
अगदी निर्लज्जपणे पैसे खात नसू पण विचाराने तरी भ्रष्टपणा करत असूच! त्यामुळे
भ्रष्टाचार हा इतका स्वत:शी निगडित आहे. अर्थातच हा वैयक्तिक आयुष्याचा भाग
झाला. परंतु आपल्या सार्वजनिक आयुष्यात भ्रष्टाचार आल्याने मोठी गोची झाली आहे.
जेव्हा एकाच्या भ्रष्ट आचरणामुळे इतरांचे आयुष्य मातीमोल होते, जगण्याचा हक्क
हिरावला जातो; तेव्हा मात्र हा दखलपात्र गुन्हा ठरतो. गंमत अशी की सध्या जगात सर्वत्र
अशी माणसे बोकाळली आहेत आणि त्यांना याचे काहीही न वाटण्याइतके सवयीचे झाले
आहे. मग मात्र त्याबद्दल समाजमन जागृत करावे लागते. समाज म्हणून जगताना
आचरणाच्या पद्धती ह्या इतरांवर अवलंबून असतात. समूह, देश यापेक्षा ज्यावेळी
हितसंबंधांची जपणूक, विशिष्ट हेतू महत्त्वाचे ठरतात तेव्हा भ्रष्ट व्यवस्थेचा पाया रचला
जातो. कारण मग ती जपणूक, साटेलोटे या प्रकारात मोडते आणि इतर नाडले जातात.
आत्तापर्यंत नीट अभ्यासले तर घडले असे आहे की ज्या वेळी जगातील महासत्ता
एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्या. मग ते कोल्ड वॉर असो, प्रोक्सी वॉर असो जगात त्या त्या
वेळी भ्रष्टाचाराची व्यवस्था जोमाने उभी राहिली आहे. पुढे जाऊन असेही म्हटले पाहिजे
की ती त्यांनी जन्माला घातली आहे. ज्यामुळे एक विधिनिषेध नसणारा, भ्रष्ट समाज
जन्माला येतो आहे. आज सारे जग भ्रष्टाचाराच्या अशा एका वळणावर येऊन ठे पले आहे
की आता त्यात काही बदल होईल अशी अशाच उरलेली नाही. काही प्रगत देशात,
भ्रष्टाचाराने सामान्य नागरिकांचे आयुष्य वेठीला धरले नसले तरी तिथेही शासनात आणि
कापरिट जगतात प्रचंड भ्रष्टाचार हा आहेच. उलट त्यांच्या भ्रष्टाचाराचे स्वरूप हे दृश्यमान
नसल्याने ते अधिकच गंभीर आहे. एका अर्थाने रशिया-अमेरिके च्या शीतयुद्धाच्या
काळातच आज जगभर पसरलेल्या बऱ्याच भ्रष्ट व्यवस्थेची पाळेमुळे सापडू शकतात.
अनेक हकमशहांचे निलाजरे समर्थन, आपल्याला न मानणाऱ्या लोकशाही व्यवस्था
अस्थिर करण्याचे परस्पर उद्योग, विरोधी तत्त्वांना हाताशी धरून साम-दाम-दंड-भेद अशा
सर्व मार्गाचा बेशरम अवलंब जगभर या महासत्तांनी के ला. शीतयुद्ध संपले तरी तिथून जे
काही अनिष्ट पायंडे पडले त्याचे परिणाम मात्र आजही सारे जग भोगते आहे.
दुसरा मुद्दा आहे तो बाजार व्यवस्थेची दिशा चुकल्याचा. आज प्रगत देशातील
कं पन्या विविध देशातील सत्ताधिशांना ज्या पद्धतीने विकत घेतात, त्यामुळे ही माणसे
के वळ आपल्या मालाच्या सुलभ निर्यातीसाठी, अनिर्बंध नफ्यासाठी त्या देशाच्या
व्यवस्थेला कायमस्वरूपी कीड लावतात. संरक्षणाच्या नावाखाली शस्त्रव्यापार,
विकासाच्या नावाखाली इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे यातून आज जगभर अनेक अनैतिक
उद्योग उभे राहत आहेत. तिसऱ्या जगाच्या देशातील खनिज संपत्ती (तांबे, जस्त,
अॅल्युमिनियम, सोने, हिरे, तेल) हस्तगत करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कं पन्या
तेथील सरकारे, अधिकारी यांना भ्रष्ट करताना नाणेनिधी, व्यापार संघटना यांचा जो वापर
करतात तो बघता, जागतिकीकरणाच्या या भ्रष्ट प्रवासात अनेक देश गहाण पडले आहेत
हेच जाणवते. अनेक देशात वेगवेगळ्या औषधांवर काही हेतूंनी घातलेली बंदी, तीच
औषधे काळ्या बाजारात उपलब्ध करून देणारी याच कं पन्यांची भ्रष्ट यंत्रणा असे हे
सगळे गुंतागुंतीचे व्यवहार आहेत.
आजमितीला जगात विविध बहुराष्ट्रीय कं पन्यांद्वारा होणारा भ्रष्टाचार हा एक
चिंतेचा विषय आहे. आता जगातील अनेक देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारात लाच
देणे हा एकच मार्ग उरला आहे असे वातावरण आहे. यामुळे जर त्या देशाच्या व्यवस्थेचे
धिंडवडे निघत असतील तरी नफा हा एकच उद्देश असणाऱ्या मिळवणाऱ्या कार्पोरेट
क्षेत्राला त्याचे काय? काही धूर्त लोकांनी तर हे इतके सोपे आणि सुलभ करून टाकले
आहेत की आपण थक्क होतो. एखादी एजन्सी नेमून सक्सेस फी अथवा प्रोसेस फी अशा
नावाखाली आज जगभर सर्रास लाच दिली/घेतली जाते. प्रगतीचा टेंभा मिरवणाऱ्या
आणि जगाला अक्कल शिकवणाऱ्या युरोपातील अनेक देशात लाच देणे ही एक
बिझिनेस पॅक्टिस मानली जाते. कारण त्याशिवाय त्यांना एखादे कं त्राट मिळूच शकत
नाही. एका अंदाजानुसार आज जगभर सुमारे ८ लाख ५० हजार कोटी रुपये (१
बिलियन = अंदाजे सहा हजार कोटी रुपये) इतकी लाचखोरीची उलाढाल आहे. इतक्या
पैशात जगातील गरिबी नष्ट होऊ शकते. अर्थात ही मोजली गेलेली रक्कम असू शकते;
भारतात जिथे बहुतेक आर्थिक व्यवहार हे अजूनही रोखीच्या स्वरूपात आहेत तिथे हे
मोजण्याचे कोणतेही परिमाण नाही. मात्र एखाद्या देशात सारखे अनेक कायदे जन्माला
यायला लागले की समजावे तिथे भ्रष्टाचाराची सॉलिड चलती आहे. पण कार्पोरेट
क्षेत्राच्या भ्रष्टाचारामुळे विकसनशील देशांसाठी काही मूलभूत आणि त्या देशांच्या
विकासावर दूरगामी परिणाम करणारे प्रश्न निर्माण होत आहेत.
* त्या देशातील कायदा सुव्यवस्था, विषमता यांना कमी लेखणे.
* त्या देशातील राजकीय यंत्रणा वेगळ्याच कारणांसाठी वापरली जाणे.
* त्या देशातील छोटे उद्योग नष्ट होणे.
* पैसा, गरिबी दूर करण्यासाठी खर्च होण्याऐवजी तो भलत्याच ठिकाणी
पोचणे.
* एखाद्या प्रकल्पाचा सामान्य माणसांना होणारा फायदा नाकारला जाणे.
* एखादा प्रकल्प गरज नसताना त्या देशावर लादला जाणे.
* देश, त्यातील नागरिक यांना फायदा होण्याचे काही संके त न पाळता
कं पनीचा फायदा हा एकमेव उद्देश बघितला जाणे. पाश्चिमात्य राष्ट्र, नाणेनिधी
आणि व्यापार संघटना यांनी भ्रष्टाचाराबद्दल वरकरणी कठोर बोलायचे आणि धोरणे मात्र
याला खतपाणी घालणारी राबवायची, असली भंपक व्यवस्था पोसली आहे. १९७७
साली जागतिक बँके ने आपल्या 'मार्गदर्शक तत्त्वात' (?) असे म्हटले होते, 'कोणताही
बदल ज्यात स्पर्धा वाढते, तो भ्रष्टाचाराला आळा घालतो म्हणून देशांनी धोरणे ठरवताना
आयातीवर कमी निबंध, खाजगी उद्योगांना सर्वंकष मुक्तता, आणि सरकारी उद्योगांचे
खाजगीकरण हे करणे सक्तीचे आहे.'
अजूनही बँके ने आपल्या या धोरणाचे यशापयश जोखून पाहिलेले नाही आणि
त्यात काहीही बदल के लेले नाहीत. आजही ते सतत मुक्त अर्थ व्यवस्थेचाच धोशा
लावताना दिसतात आणि त्याच वेळी आपले सारे जग मात्र भ्रष्टाचारात, पैशांच्या
घोटाळ्यात आकं ठ बुडाले आहे. अशा धोरणांमुळे बरेच देश आज भणंग झाले आहेत.
भारतातसुद्धा अशा अनेक बहुद्देशीय कं पन्यांच्या लॉबीजनी आपल्या राजधानीतील
सत्ता-सोपानाचे रस्ते वेढून टाकले आहेत. जगाचे आर्थिक भान असणारे पंतप्रधानसुद्धा
हे का थोपवू शकले नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. अशा मोठ्या पदावरच्या व्यक्तींना
हाताशी धरूनही अशा लॉबीज स्वत:चा कार्यभाग साधतात.
भविष्यात ओबामा अमेरिके च्या आर्थिक भवितव्यासाठी अधिक कर्जे मागत
असतील, आपल्या देशात संसद अधिवेशनात अजून काही कोटींचे घोटाळे उघडकीस
आले असतील, १२५ कोटींच्या जनतेचे कर्णधार अत्यंत सवयीचा एक मूक, भकास
चेहरा करून बसले असतील, सरकारातील अनेक मंत्र्यांना त्यांच्या प्रवक्त्यांना
गोबेल्सच्या अरेरावीने पछाडले असेल, एखाद्या वाहिनीवर भ्रष्टाचाराविरुद्ध असलेल्या
कार्यक्रमाबरोबरच TRP - जाहिरातींचे भ्रष्ट डील सुरू असेल, वर्तमानपत्रे चौथा स्तंभ
वगैरे बाष्कळ बडबड करत, सतत होणाऱ्या निवडणुकातल्या पेड न्यूजने आपले रकाने
आणि खिसे भरत असतील, विविध राजकीय पक्षांचे स्वयंघोषित स्वच्छ नेते आपला
शेंबूड लपवत, सरकारविरुद्धच्या रणनीतीत गुंतले असतील, राज्यातील विविध सरकारे
भ्रष्टाचार कु ठे ही कमी पडू नये म्हणून काही कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेत
असतील, देशातल्या सचिवालयाबाहेर लाच द्यायला पैसे नाही म्हणून काम होत नाही
आणि काम होत नाही म्हणून गावी जाता येत नाही अशा कफल्लक आणि लाचार
अवस्थेत अनेक माणसे रस्त्यावर, ऊन्हा-थंडीत, वादळ-पावसात झोपत जगण्याचे प्रश्न
सुटण्याची वाट बघत असतील,
तरीही अण्णा हजारे आतड्याने बोलतील, उपोषणाला बसतील,
तरीही अनेक भाबडी माणसे त्यात सामील होतील,
तरीही देशभर मेडिया त्याचा इव्हेंट करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेईल,
तरीही काही लाख मेणबत्त्या खपतील.
आपण एखाद्या समाजासाठीच्या समर्पित भावनेने करावा तसा, भ्रष्टाचारविरोधी
आंदोलनांचासुद्धा सण करून टाकला आहे. त्यामुळे त्या दिवसापुरते त्याचे महत्त्व. नंतर
कोणीही रोजच्या आयुष्यात वैयक्तिकरित्या भ्रष्टाचाराविरुद्ध झगडणार नाहीच. दरम्यान,
ह्या सगळ्या विरोधाभासात अजून एखादा घोटाळा घडत असेल.
भ्रष्टाचारी आणि आत्मसन्मान नसणारा भिकारी यात फरक नाही हे ह्या लोकांना
कधी कळेल?

२२. अर्धपोटी भारत, लठ्ठ इंडिया

आजच्या वेगवान जागतिकीकरणाच्या अनिवार्य टप्प्यांवर जग कसे असावे?


प्रामाणिक विचार के ला तर, देशोदेशींच्या सीमा पुसून गेल्याने, प्रत्येक देशाकडे जे जे
म्हणून चांगले आहे ते इतरांना देत, प्रत्येक समूहाचे जे प्रश्न ज्या समस्या आहेत त्यावर
इतर सगळ्यांनी उत्तरे शोधून हे जग मानवजात म्हणून अधिकच समान आणि समृद्ध
व्हायला हवे. सीमांचे भेद, देशांची अंतरे सगळी मिटून हे जग इतके जवळ आलेय की
आपण एकमेकांना मदत करून 'अवघे धरू सुपंथ' असेच वर्तन, व्यवहार असणे, तोच
सद्भाव अपेक्षित असणे बरोबरच आहे. नाहीतर कशासाठी हा अट्टहास? कशासाठी हे
सगळे जागतिकीकरण? जो तो आपल्या देशी बरा होता की! असल्या प्रश्नांनी मन घेरून
टाकावे, प्रसंगी उदास व्हावे इतपत आपले सध्याचे जग विरोधाभासांनी बहरते आहे.
सर्वच क्षेत्रात अशा विसंगतींचे रान माजले आहे.
सीमा पुसून जाण्याच्या या कालखंडात, देशांचे सीमांवरून चाललेले संघर्ष
अजिबात संपलेले नाहीत. तंत्रज्ञानाने पार आकाशाला गवसणी घातली आहे. त्याच वेळी
जगातील अनेक लोकांना जमिनीच्या एखाद्या तुकड्यावर हक्क सांगण्यासाठी
आयुष्यभर झिजावे लागत आहे. उच्च शिक्षणसाठी अब्जावधी रुपये खर्चुन अवाढव्य
इमारती उभ्या राहत आहेत. त्यात कोट्यवधी रुपये फे कू न काही शिक्षण घेत आहेत; तर
दुसरीकडे प्रचंड संख्येने लोक सामान्य दर्जाच्या आणि निकृ ष्ट अवस्थेतील प्राथमिक
शिक्षणालाही पारखे आहेत. जगभर पोटापलीकडे अन्न खाऊन आणि टाकू न माजलेले
लोक आहेत, तसेच अन्नासाठी वंचित होऊन मारायला आणि मरायला उठलेले लोकपण
आहेत. आजमितीला जगात एकू ण ५२% इतके लोक अर्धपोटी, कु पोषित आहेत मात्र
त्याच वेळी लठ्ठ माणसांच्या संख्येने किमान आरोग्यदायी वजनही नसणाऱ्या
लोकसंख्येला पार के ले आहे. आत्ता या क्षणी जगात ११० कोटी लोक हे लठ्ठ आहेत तर
त्यापेक्षा कमी लोकांचे सुदृढ जगण्यासाठी आवश्यक असणारे, किमान आरोग्यदायी
वजनही नाही. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाकडे झुकणाऱ्या माणसांची संख्या वेगाने
वाढली आहे. एकट्या अमेरिके चे उदाहरण बघायचे झाले तर त्या देशातले ५५% प्रौढ
लोक हे लठ्ठ आहेत. दर पाचामागे एक मुलगा हा लठ्ठ आहे आणि त्या देशाच्या हेल्थ-
के अर बजेटपेकी १२% इतकी प्रचंड रक्कम फक्त लठ्ठपणा ह्या एकाच विषयासाठी खर्च
पडते आहे. अमेरिके ची जीवनशैली प्रमाण मानून त्याप्रमाणे आपल्या सवयी विकसित
करणाऱ्यांनी आणि प्रगत झाल्याच्या आरोळ्या ठोकण्यात धन्यता मानणाऱ्यांनी निदान
आता तरी ह्याकडे लक्ष देणे भाग आहे.
जगात १९८० साली जितकी माणसे लठ्ठ होती त्यांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा जास्त
वाढ झाली आहे. गंमत अशी की लठ्ठपणा हा प्रश्न व त्याची कारणे, व्यक्तिगत आहेत.
त्याचे दुष्परिणाम परत तुमच्याशी आणि तुमच्यामुळे जन्माला येणाऱ्या तुमच्या नवीन
पिढीशीच संबंधित आहेत. तो तुमच्या आरोग्यावर अगदी प्रत्यक्षपणे परिणाम करतो.
लठ्ठपणा हा भूक या मूलभूत गरजेशी संबंधित नसून, खाणे ह्या क्रियेशी, तिच्या
अतिरेकाशी, काय खातो यावर लक्ष नसण्याशी आणि खाल्लेले व्यवस्थित पचेल यासाठी
काहीही प्रयत्न न करण्याशी या सगळ्याशी संबंधित आहे. म्हणजे थोडक्यात लठ्ठपणा ही
समस्या, तुमच्या खाण्यापिण्याच्या आणि जगण्याच्या शैलीशी जास्त निगडित आहे.
परदेशातही ज्याला जंक फू ड म्हणतात तसे पदार्थ खाणे सध्या आपल्याकडे वाढते आहे.
एवढेच नाही तर बर्गर, पिझ्झा, असले प्रमाणाबाहेर कॅ लरी असणारे, पोषणमूल्ये म्हणून
काहीही उपयोगी नसणारे पदार्थ खाणे आता प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.
या बरोबरीने लठ्ठपणा वाढीस लागायला आणखीही काही कारणे आहेत. मध्यंतरी
जगभर लठ्ठपणा का वाढीस लागलाय याची चाचपणी करण्यात आली. त्यावेळी समोर
आलेले निष्कर्ष आपल्या एकू णच आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारे
आणि खोलवर विचार करायला लावणारे आहेत.
जगात गेल्या काही दशकात आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून प्रोसेस अन्न
खाण्याची पद्धती रुढ झाली आहे. कामाचे बदलते स्वरूप, जगण्याला आलेला वेडा वेग,
अन्न बनवायला लागणारा वेळ, विभक्त होणारी कु टुंबे, स्वत: करून दुसऱ्याला खाऊ
घालण्यात नसणारा आनंद, इच्छाशक्ती हे सगळे बदलते जीवनशैलीचा अपरिहार्य भाग
बनले आहे. अन्न-उत्पादकांनी यावर लक्ष ठे वत आणि याचा बेरकीपणाने फायदा न
घेतला तरच नवल. या सर्व्हेत असे लक्षात आले की जगभरच्या अन्न-उत्पादकांनी प्रचंड
नफ्याच्या हव्यासापोटी निकृ ष्ट दर्जाचे अन्न लोकांच्या (अक्षरश:) गळी उतरवणे,
जगभरच्या अन्न उद्योगाचे एकसाचीपण, या उद्योगाचे झालेले अमर्याद बाजारीकरण
आणि त्याद्वारे रोज जगभरच्या बाजारात येणारे हजारो तयार अन्नप्रकार (प्रोसेस फू ड),
अन्नाचे नियंत्रित नसणारे उष्मांक (कॅ लरी) आणि घातलेले मूल्यांक (less nutrient),
विविध बहुराष्ट्रीय कं पन्यांनी सकस अन्न महाग आणि निकृ ष्ट अन्न स्वस्त अशी के वळ
नफ्यासाठी निर्माण के लेली वर्गवारी आणि त्याची उभारलेली प्रचंड पणन-व्यवस्था,
प्रसारमाध्यमातून खाद्यपदार्थांच्या खोट्या आणि आकर्षक जाहिरातींचा सातत्याने
होणारा मारा आणि त्याचा विकसनशील देशात होणारा खोटा प्रचार अशी अनेक
हादरवणारी कारणे लठ्ठपणा या रोगासाठी नोंदवण्यात आलेली आहेत. बर हे निष्कर्ष,
कोणा सोम्यागोम्याने शोधलेले नाहीत तर जगत्विख्यात ब्रिटिश मेडिकल जर्नल्सच्या
संशोधनाचा भाग म्हणून आलेले आहेत. यातले प्रत्येक कारण हे मानवनिर्मित आहे की
नाही? याशिवाय जगण्यातली विषमता, बेकारी, बेदरकार जीवनशैली अशी सामाजिक
कारणेही आहेत असेही नोंदवण्यात आलेले आहे.
एका नवीन शास्त्रीय पद्धतीनुसार आपल्या वजनाचे, के वळ वजन जास्त असणे
आणि लठ्ठ असणे असे दोन प्रकार के ले आहेत. या पद्धतीत आपल्या शरीराचा बॉडी मास
इंडेक्स ठरवला जातो. हा निर्देशांक जर १८ ते २४ मध्ये असेल तर तुमचं वजन सामान्य
आहे, जर तो २४ ते २९ या दरम्यान असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात आणि ३० च्या वर
जर हा निर्देशांक पोचला तर तुम्ही लठ्ठ असे त्याचे परिमाण आहे. बॉडी मास इंडेक्स
(BMI) म्हणजे व्यक्तीचे किलोमध्ये वजन भागिले त्याच्या उंचीचा (मीटर्समध्ये) वर्ग
(kg/m).
उदाहरणार्थ, वजन १०० किलो आणि उंची ६ फू ट तर
बॉडी मास इंडेक्स = १०० ३.२४ = ३० याचा अर्थ तुम्ही लठ्ठ आहात.
या सूत्रानुसार आपण कु ठल्या गटात मोडतो हे जो तो घरी बसून ठरवू शकतो.
लठ्ठपणाची एक चांगली बाब ही आहे की मी आधी लठ्ठ होतो पण आता नाही असे तुम्ही
निश्चितपणे म्हणू शकता. हृदयविकार अथवा मधुमेहाबद्दल तसे म्हणता येत नाही. पण
लठ्ठपणा हा मधुमेह आणि हृदयविकाराचे महत्त्वाचे कारण मात्र आहे. जो लठ्ठ आहे तो या
दोन्ही विकारांना वय वर्षे ४० नंतर निश्चित बळी पडतो असे अनुभवास आले आहे. जगात
आजमितीला एकू ण ७०० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे १६० कोटी लोक ओव्हरवेट
आहेत. तर ५५ कोटी लठ्ठ. यातील सुमारे ३० लाख लोक लठ्ठपणामुळे बळी जातात.
यातले ४४ मधुमेही, ४० हृदयविकारग्रस्त इतके च नाही तर ७-१० कर्क रोग रुग्ण हे
लठ्ठपणामुळे त्या त्या रोगांचे शिकार आहेत. पण आता सगळ्यात मोठी जी चिंता आहे ती
लहान मुलांच्या लठ्ठपणाची. विकसित राष्ट्रांत दर चार मुलांमागे एक मुलगा लठ्ठ आहे.
विकसनशील देशातील (भारतासारख्या) नागरी लोकसंख्येपैकी जी कु टुंबे सधन आणि
उच्च-मध्यमवर्गीय यात मोडतात, त्यांच्यात हेच प्रमाण दर सहा मुलामागे एक असे आहे.
संपन्न असण्याचा बाय-प्रॉडक्ट अथवा साईड-इफे क्ट हा रोग असावा हे किती दुर्दैवी!
या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारताचे वास्तव तर इतके अंतर्मुख करायला लावणारे
आहे की आपण जणू विकसनशील पण कु पोषित असा भारत आणि विकसित पण
लठ्ठपणाचा रोग जडलेला इंडिया अशा दोन देशात राहतो की काय अशीच परिस्थिती
आहे. आज भारतात सुमारे २४ कोटी लोकसंख्येला भुके कं गाल राहून रोजचे किमान
अन्नही खायला मिळत नाही. एकीकडे या लोकांपर्यंत त्यांच्या अन्नाचा हक्क देणाऱ्या
कोणत्याही सरकारी योजना पोचत नाहीत ही वस्तुस्थिती असताना आणि कु पोषणाने
दरवर्षी काही कोटी मुले मृत्युमुखी पडत असताना, दुसरीकडे शहरातील मुलांपैकी, १५
वर्षापर्यंतच्या वयोगटातील समारे २३% इतकी मले लठ्ठ आहेत. आजमितीला भारताच्या
१२१ कोटी लोकसंख्येपैकी किमान सहा कोटी लोकसंख्या ही लठ्ठ तर १४ कोटी
लोकसंख्या ओव्हरवेट आहे. यामुळे भारताचे आरोग्य दोन्ही बाजूने धोक्यात आले आहे.
हे सगळे आकडे एकत्र के ले तर एका अर्थाने या देशातील एकू ण ५४ कोटी लोकसंख्या
भुके च्या संबंधित दुखण्याने म्हणजे वंचित अथवा अतिसेवन या दोन्हींमुळे बाधित आहे.
एकीकडे सरकारी योजनांतील भ्रष्टाचार लोकांना अर्धपोटी, उपाशी ठे वतो आहे तर
त्याचवेळी, प्रोसेस फू डचे वाढलेले प्रमाण, सतत घराबाहेर खाण्याची सवय, परवडत
असूनही निकृ ष्ट अन्न खाण्यात असणारी प्रतिष्ठा या सगळ्यांमुळे, अनेक माणसे भरल्या
घरात आणि भरल्या पोटी रोगट आयुष्य जगत आहेत. आज भारत जगातला सगळ्यात
जास्त मधमेहींचा देश आहे. हे २०२० सालापर्यंत भारतातल्या मधमेहींची संख्या १०
कोटीच्या वर गेलेली असेल; तर हृदयरोगी १५ कोटींवर. लोकांचे आणि सरकारचे प्रचंड
मोठे उत्पन्न के वळ या रोगांच्या निवारणासाठी खर्ची पडेल. उरलेल्या सुदृढ लोकांना मात्र
त्यामुळे शिक्षण, पाणी, घरे अशा मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागेल. सरकारचे
सोडा पण समाज म्हणून आपण याचा आत्ताच वैयक्तिक पातळीवर तरी विचार करणे
अत्यंत गरजेचे आहे.

२३. गरज, हव्यास आणि उपभोग

प्रत्येक माणसाला जगायला काय काय लागते? अनेक तत्त्ववेत्त्यांनी, संतांनी,


समाजसुधारकांनी ह्या प्रश्नाचे तात्त्विक, अध्यात्मिक, व्यावहारिक उत्तरे देऊनही तो काही
वर्षानुवर्षे सुटलेला नाही. उलट हा साधा प्रश्न जास्तीत जास्त कू ट आणि क्रू र स्वरूप
धारण करत गेला. ज्यांनी कू ट प्रश्नांची उकल करायची, अध्यात्म शिकवायचे किंवा जे
असे बाबा, बापू, दादा, राव आणि नाना आहेत ते तर जास्तीत जास्त संपत्ती, मालमत्ता
गोळा करताना दिसतात. ज्यांनी स्वत: निर्लेप पद्धतीने जगत लोकांना आदर्श द्यायचे असे
सगळे भयंकर हव्यासाच्या आहारी गेलेले दिसतात. ज्यांच्या पायावर श्रद्धेने डोके ठे वत
सामान्य माणूस आपले सगळे मोह, हव्यास विसरून सुखी होऊ पाहतो; मोठ्या श्रद्धेने
या गुरूं चा शिकवणुकीचा विसर पडू नये म्हणून तो गुरूं चे पेन, स्टीकर्स, चेन, अंगठ्या
असे सगळे अंगावर बाळगतो, त्याच महापुरुषांचे अंगभर दागिने मिरवत सतत भोग चालू
असतात आणि त्यांच्या पेटीत, माजघरात, तळघरात संपत्तीची सतत मोजमाप चाललेली
असते.
हा सगळाच भंपकपणाचा आंधळा पसारा आहे आणि हा पूर्वापार चालत आला
आहे आहे. म्हणून तर ज्यावेळी लिओ टॉलस्टॉय माणसाला फक्त सहा फू टच जागा
लागते हे एका राजाच्या गोष्टीतून मांडत होता त्याचवेळी रशियात स्टॅलिन नावाचा क्रू र,
हावरट राज्यकर्ता त्याची गोष्ट जणू खोटी ठरवायलाच जन्माला येत होता! आपल्याकडे
गांधीजी हा फकीर जेव्हा अन्न, वस्त्र, निवाऱ्याची खरी किती गरज आहे याची जगून
प्रात्याक्षिके देत होता तेव्हा ह्या मांडणीला छेद देणारी एक स्वातंत्र्योत्तर पिढी त्याच्याच
नावाने आणि आश्रयाने मोठी होत होती!
माणसाला एखादी गोष्ट किती लागते हा सध्याच्या जगाचा प्रश्न आहे. करोडपती
असो किंवा भिकारी प्रत्येकाला अन्न तेवढेच लागते. म्हणजे तुमची भूक ही आर्थिक,
सामाजिक, राजकीय परिस्थितीसापेक्ष नाही तर शरीरसापेक्ष आहे. पण हे झाले निव्वळ
भुके बद्दल. भूक ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती शरीराच्या अवस्थेवरच अवलंबून आहे.
पण हव्यास ही एक वेगळीच गोची आहे. ती परिस्थिती, वय, रंग, आरोग्य, उंची, आणि
लिंगसापेक्ष नाही. मुळात ती या कशावरच अवलंबून नाही. भूक आणि त्यापाठोपाठ
येणारी गरज एकदा भागली की मग अनंतपणे सुरू असणारी गोष्ट म्हणजे हव्यास. या
हव्यासाने सगळ्या लोकांना खिंडीत गाठले आहे त्यावर तत्त्वज्ञान, उपदेश, शिस्त यांपैकी
कशाचीही मात्रा चालत नाही. तो शारीरिक गरज जरी भागवत असला तरी के वळ त्याचा
शरीराशीच संबंध नाही. गेल्या काही वर्षांत हव्यास ही एक मानसिक आजाराची अवस्था
झाला आहे. यावर जगातल्या सगळ्या समाजशास्त्रज्ञांचे, मानसोपचार तज्ज्ञांचे एकमत
झाले आहे. त्याला त्यांनी नाव दिले आहे 'afluenza'. खरे तर सध्याच्या
जागतिकीकरणाच्या या सगळ्या व्यापात के वळ हव्यासाने जगणारी एक नवीन जमातच
तयार झाली आहे, जी धर्म आणि राष्ट्रसापेक्ष नाही. त्यामुळे हा आता जगाच्या चिंतेचा
विषय झाला आहे. हा विषय नीट समजण्यासाठी एकदा या रोगाची व्याख्या नीट पाहू.
माणसाला जगण्यासाठी जे आवश्यक ती त्याची गरज. थोडक्यात, जी निकड भागली
नाही तर माणसाचे जगणे धोक्यात येऊ शकते. उदाहरणार्थ अन्न. अन्नाच्या बाबतीत भूक
ही शारीरिक संवेदना या गरजेला उद्युक्त करते. आता भूक भागली की ही गरज संपायला
हवी. पण तसे होत नाही. पुढे या गरजेचा विस्तार हा किमान भुके ला ओलांडून पुढे जाऊ
लागतो. हा झाला हव्यास. हव्यासाची प्रथम अवस्था ही भूक भागल्यानंतरची पुढची
पायरी असते. - जे अन्नाचे तेच इतर गोष्टींच्या हव्यासाचे. एखादी गोष्ट आपल्याला
मिळणार नसल्याची भावना, साधनसंपत्ती संपण्याची भीती, दुसऱ्याशी होणारी तुलना,
श्रेष्ठत्वाची लढाई, प्रतिष्ठेच्या कल्पना अशा अनेक मूळ भुके शी संबंधित नसणाऱ्या
गोष्टींनी मग हव्यासाचा विस्तार प्रचंड होत राहतो. पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तरतूद
करण्याच्या मूळ चांगल्या भावनेच्या अतीविस्ताराने हे सगळे भीषण होऊ लागले आहे.
म्हणजे आपल्याला आपण किती जगू याची कोणतीही शाश्वती नाही, किती श्वास
शिल्लक आहेत याचा अंदाज नाही, किती सुदृढ जगू याची खात्री नाही, पण आपण
पुढच्या पिढ्यांच्या जगण्याची बेगमी करण्याच्या तद्दन भंपक गोष्टी करतो. नुसत्या करतो
असे नाही तर त्यासाठी वेळ पडली तर बेशरमपणे जगण्याची सगळी प्रतिष्ठा, ताकद
पणाला लावतो. त्याचे निर्लज्ज प्रदर्शन करतो. आपल्याला जे हवे ते वेळ आली तर
दुसऱ्याला नाकारून, वंचित करून हवेच.
पुढे आपला हा हव्यास मग इतरांना त्यांच्या निव्वळ जगण्याची गरज सुद्धा भागवू
देत नाही इतक्या अमानुष पातळीवर जाऊन पोहोचतो. भुके चे हव्यासात जसे अगदी
सहजपणे रूपांतर होते तितक्याच नकळतपणे हा हव्यास इतराना त्यांच्या गरजा
नाकारण्याच्या गुन्ह्यापर्यंत आपली वाटचाल करवतो. मग यातून उपभोग घेण्याच्या
मूलभूत प्रवृत्तीमध्ये आणि गतीत वेगवान आणि प्रचंड बदल घडतात. या सगळ्या
आपल्या नकळत पण आपणच घडवत असलेल्या प्रक्रियेमुळेच, हव्यासाच्या भयानक
रेट्यात आता जगात consumer नावाची एरवी साधी पण या पार्श्वभूमीवर राक्षसी वाटावी
अशी प्रवृत्ती असणारी जमात जन्माला आली आहे. हे सगळे इतक्या पोटतिडीकीने
लिहायची दोन कारणे आहेत. एक तर आपल्या आधुनिक जीवनशैलीद्वारे consumer
नावाच्या भयानक रोगाने आपल्या समाजात प्रवेश के ला आहे. जगभरच्या उदंड भ्रमंतीत
मी अशी माणसे दिगाने पाहिली आहेत जी या अतिरेकी हव्यासाच्या न बऱ्या होणाऱ्या
रोगाने ग्रस्त आहेत. याची काही संख्यात्मक उदाहरणे पाहू या. अगदी ढोबळपणे पाहिले
तर चित्र असे आहे की, सध्या जगात २०% श्रीमंत लोक हे जगातली ७७% साधनसंपत्ती
उपभोगत आहेत; तर २% गरीब लोकांच्या वाट्याला फक्त १.५% इतके च
साधनसंपत्तीचे स्त्रोत उपलब्ध आहेत. - सोबतच्या दोन आकृ तीत हे जास्त स्पष्ट होईल.
जे उपभोग घेऊ शकतात त्यांना का अटकाव हा प्रश्न काहीजण विचारतील. या
जगातील साधनसंपत्ती ही सगळ्यांच्या मालकीची आहे. तिला आपल्या बाजूला वळवून
बाकी लोकांना वंचित करणे हा सामाजिक गुन्हा आहे. समजा, खूप पैसे आहेत म्हणून
जर कोणी एखाद्या नदीचे सगळे पाणी विकत घेऊ लागला तर ते कसे वाटेल?
यामुळे नैसर्गिक संपत्तीचा नाश होतो एवढेच नाही तर समाजात त्यामुळे विषमता
वाढीला लागते.
विषमतेची काही उदाहरणे पाहू.
* जगातील ४०% मांस, मासे इत्यादी पदार्थ २०% श्रीमंत माणसे फस्त करतात;
तर २०% गरिबांच्या वाट्याला ते फक्त ५% येते.
* जगातील ५८% ऊर्जा ही फक्त २०% श्रीमंत माणसांच्या उपभोगासाठी आहे;
तर २०% गरिबांसाठी. ती फक्त ४% इतकी अल्प आहे.
* एकं दर उपलब्ध टेलिफोन लाईन्सपैकी ७४% जगातील २०% माणसे वापरतात;
तर २०% गरिबांना १.१% इतकीच त्यांची उपलब्धता आहे.
* २०% श्रीमंतांना, जगात एकू ण उपलब्ध कागदापैकी ८४% कागद लागतो; तर
गरिबांच्या वाट्याला येतो फक्त १.१%.
* जगातील वाहनव्यवस्थेच्या सोयींपैकी ८४% क्षमता ही २०% श्रीमंतांसाठी
वापरली जाते; तर गरिबांकरिता हे प्रमाण १.२% इतके कमी आहे
वरील उदाहरणे ही मोजकी असली तरी विषयाचे भान येण्यासाठी ती परेशी
आहेत. या सगळ्या उपभोगीय विषमतेमुळे जगातील सुमारे दोन अब्ज लोकसंख्या
असुरक्षेची, तुटलेपणाची भावना घेऊन जगते आहे. जगाच्या व्यवस्थेचा विचार करणाऱ्या
सुबुद्ध माणसांसाठी हे फार मोठे आव्हान निर्माण होऊ पाहते आहे.
consumer हा एक आधुनिक जगाच्या रचनेत अतिशय महत्त्वाचा घटक झाला
आहे. त्याला डोळ्यापुढे ठे वून सगळ्या गोष्टी हल्ली ठरतात. अर्थात एखाद्या गोष्टीचा
उपभोग घेण्याची मनीषा असणे हे काही चकीचे, नवीन नाही. माणसाला जगण्यासाठी
निसर्गातील अनेक गोष्टी जसे पाणी, अन्न, नैसर्गिक साधनसंपत्ती याची गरज असतेच.
पण प्रश्न निसर्ग-मानव या साखळीचे हे जे अपरिहार्य चक्र आहे त्याचा नाही तर त्याच्या
वापराच्या अनैसर्गिक लालसेचा आहे. हे सगळे गरजांचे संके त तुडवून सुरू झालेल्या,
अंत नसणाऱ्या भीषण वाटचालीचा आहे. याची सुरुवात झाली तेव्हा हे सर्व नैसर्गिक
स्त्रोत प्रभावीपणे वापरून मानवी आयुष्य सोपे करण्याची एक उर्मी माणसात निर्माण
झाली. एकदा या गोष्टी प्रभावीपणे वापरल्या जाऊ शकतात हे समजल्यावर मग त्यावर
मालकी हक्क असण्याची गरज तयार होऊ लागली. मग ज्यांच्याकडे मालकी हक्क आहे
त्यांची ते स्त्रोत वापरण्याची पद्धत, उपभोगाची एक नवी जीवनपद्धती विकसित करू
लागली. इंधनाचे (पेटोलचे) उदाहरण घेऊ. खनिज तेल हा नैसर्गिक साधनस्त्रोत
वाहनांसाठी म्हणजेच हे जग गतिमान करण्यासाठी, आरामशीरपणे जगण्यासाठी,
प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्याची गरज अपरिहार्य बनली. मग
त्याचे साठे शोधणे, त्यावर मालकी हक्क प्रस्थापित कारणे हे ओघानेच आले.
ज्यांच्याकडे हा स्त्रोत होता, त्यांनी नवनवीन पद्धतीच्या वाहनांचे शोध लावले. ज्यांची
गरज कधीच नव्हती पण त्याचा हव्यास नावीन्याचा शोध या गोंडस नावाखाली धरण्यात
आला. पण हे सगळे आता अशा टप्प्यावर आले आहे की अमेरिके त सध्या तुमच्याकडे
वाहन असण्याशिवाय जगणेच अशक्य आहे. त्याही पुढे तिथे एकटाच माणूस मोठ्या
क्षमतेचे वाहन वापरतो. आपल्याकडे कारच्या इंजिनाची क्षमता साधारण ८०० सीसी ते
१५०० सीसी इतकी असते. अमेरिके त ती किमान २५०० सीसी ते कमाल ६०००
सीसीपर्यंत आहे. या हव्यासाने ताकदवान बनलेल्या अॅटोमोबाईल लॉबीने तिथे
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढू दिली नाही की रेल्वे मार्गाचाही विकास होऊ दिला
नाही. ह्या हव्यासाने कार असणे हा जगण्याचा एक लादलेला पण आवश्यक भाग
बनला. दुसरे, जगातल्या इंधनसाठ्याचे -जो जगातल्या सगळ्यांसाठी होता- मर्यादित
मालकी हक्क प्रस्थापित झाले. त्यापासून इतरांना वंचित ठे वण्याचे कारस्थान रचले गेले.
ज्यांच्याकडे हा इंधन साठा आहे/होता त्याने जगण्याचे काही दंडक प्रस्थापित के ले.
ज्यामुळे जगभर प्रत्येकाकडे कार असणे आवश्यक ठरते आहे. आपल्या देशाचे अर्थमंत्री
६२ कृ षिप्रधान देशात शेती उद्योगासाठी फारशी तरतूद न करता वाहन उद्योगासाठी मुक्त
सवलती जाहीर करतात तेव्हा ह्या हव्यासाचे एक हिडीस रूपच दृष्टीला पडते ना?
आज आपला भारत देश हा जगात सध्या महत्त्वाचा देश बनला आहे याचे एक फार
मोठे कारण आपल्या देशाची consume करण्याची, फस्त करण्याची, उपभोग घेण्याची
संख्या आणि क्षमता भविष्यकाळात प्रचंड वाढणार आहे हे आहे. आपल्या
लोकसंख्येतील झपाट्याने श्रीमंत होणाऱ्या मध्यमवर्गाची फार मोठी बाजारपेठ जगातील
मोठमोठ्या कं पन्यांना खुणावते आहे. अशी आमिषे निर्माण करण्याची शक्यता असणारे
फार कमी देश जगात आहेत. म्हणजे आपले खरेदीदार म्हणून असणारे सामर्थ्य, दरिद्री
म्हणून वंचित असणे हे सारे कोणाच्या तरी उद्याच्या भरभराटीला येणाऱ्या व्यवसायाचा
भाग आहे. तुम्ही भुके ले असणे हे आमच्या जगण्यासाठी आवश्यक आहे असा हा मुद्दा
आहे. हे सगळे या वळणावर आले याचे कारण हा consumerism याला Shopology
असेही म्हणता येईल. कारण तो नसता बाजाराचा विषय नाही तर माणसाच्या
मानसिकतेचा, वृत्तीचा एक रोग आहे. या रोगामुळे आपण नुसत्या वस्तू नाही तर
जगण्याची एक पद्धतच विकत घेतो. मग आपली उपभोग घेण्याची वृत्ती आपण कशा
प्रकारचे उपभोक्ते आहोत हे ठरवायला लागते. मग यातून Brand ची संकल्पना जन्माला
येते. हे वेगवेगळे Brands तुमची ओळख जन्माला घालतात. ते 'तुमचे वेगवेगळे भ्रम हेच
वास्तव आहे' असे पटवून देण्यात यशस्वी होतात. मग हळूहळू तुम्ही सतत काहीतरी
खरेदी करण्याच्या एका मानसिक रोगाचे शिकार होतात, मग वेळ असेल तेव्हा शॉपिंग
करणे ही एक आवश्यक बाब होते. दुसऱ्याकडे काय आहे यावर आपली गरज ठरवली
जाते. शिवाय BuyoneGet oneचे फलक आपल्याला खुणावत असतातच. मग सतत
काहीतरी खरेदी करणारे आणि विकू पाहणारे असे दोन वर्ग समाजात तयार होतात. या
वर्गाने जीवनमूल्यांचे बाजारमूल्य, भावनिक नात्यांचे बाजारभाव आणि जगण्याच्या
साध्यासोप्या जाणिवांचे Life style मध्ये रूपांतर के ले आहे. या वर्ग संघर्षात जगण्याची
सगळी पद्धतीच पार उलटीपालटी होऊन गेली आहे.
माणूस जंगलातला एकटेपणा सोडून समाजव्यवस्थेत आला त्याचा गाभाच मुळी
'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' असा होता. पण गेल्या काही वर्षांत
consumerism या नावाच्या वृत्तीने माणसाचे जगणे हे फक्त स्वत:पुरते आणि एक
टेपणाकडे प्रवास करू पाहते आहे. जगातली अनेक राष्ट्र, समाज आज याची शिकार
झाले आहेत. एका जळजळीत उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट करतो -
९/११ ला वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळले तेव्हा एक माझा अमेरिकन मित्र मला म्हणाला,
'आपण आता Disaster Management कं पन्यांचे शेअर खरेदी करू; कारण त्यांना
आता भाव येईल.' मी या वाक्याने खचलो होतो. समाजाच्या संकटातही स्वत:चेच हित
जपणाऱ्या एक नवीन जातीचा हा उदय आपल्याला माणूस म्हणून मात्र अस्ताकडे नेईल
याचे भय मला आजही अस्वस्थ करते आहे.

२४. आर्थिक भूगोलाची व्यूहरचना


जागतिकीकरण, मुक्त बाजार/व्यापार हे सध्याचे परवलीचे शब्द आहेत. म्हणजे या
जगात तुम्हाला स्थान हवे असेल तर तुम्ही या विचारसरणीचे पाठीराखेच असायला हवे.
आता हळूहळू जगाची पाठीराखे किंवा विरोधक अशी वाटणी होते की काय अशीच
परिस्थिती आहे. तुम्हाला यातलीच एक भूमिका स्वीकारली पाहिजे. देशोदेशीच्या
नैसर्गिक साधनसंपत्तीतल्या फरकामुळे व्यापाराला चालना मिळते. त्यामुळे
जागतिकीकरणाचा काळ म्हणजे ज्यात देशसंस्कृ तीची बंधने सैल होतील, जगण्याच्या
आणि जगवण्याच्या मूलभूत प्रेरणेसाठी माणसे एकमेकांच्या गरजेसाठी, साधनसंपत्तीची
देवघेव करून समंजसपणे प्रगती करतील असा हवा. पण घडते आहे ते नेमके उलटेच.
काही देश आणि त्यांच्या खांद्यावर बसून बहुराष्ट्रीय कं पन्यांनी जागतिकीकरणाच्या या
व्यापक हितेषु प्रवाहाला स्वत:च्या फायद्यासाठी एक घिसाडघाईचे, मतलबी वळण देऊन
टाकले आहे. त्या अनुषंगाने बाजाराच्या, सामाजिक व्यवहारांच्या, आणि लक्षात येणार
नाही अशा चलाखीने मानवी नातेसंबंधांच्याही सगळ्या पद्धतीची नव्याने मांडणी
करायची सुरुवात झाली आहे; जी फक्त काही नफे खोर माफियांसाठी आहे. त्यामुळे
मानवजातीच्या प्रवासात पूर्वी कधी नाही इतके , जगण्याचे एक समान सूत्र निर्माण होत
असतानाच कधीही नव्हते इतके अडथळेही उभे राहिले आहेत. या मूठभर पिपासू
लोकांनी जागतिकीकरण इतरांना नागवण्यासाठीच वापरून एकत्र येण्यावरच एक
दुश्चिन्ह उभे के ले आहे. ही मीमांसा अधोरेखित करणारा काही वास्तव तपशील बघा -
* उत्पन्न क्रमवारीत वॉल-मार्ट एक्सॉन मोबाईल या कं पन्या द. आफ्रिका.
इंडोनिशिया सोदी अरोबिया यांच्या आधी आहेत. एक्सोन-मोबाईल ही कं पनी युनायटेड
अरब एमिरातच्या, ब्रिटिश पेट्रोलियम मलेशियाच्या, तर टोयोटा सिंगापूर आणि
फिलीपिन्स या देशांच्या आधी येते.
* सन २००० साली जगातील सर्वांत मोठ्या १०० अर्थसत्तात ५१ बहुराष्ट्रीय
कं पन्या आहेत तर ४९ देश आहेत (ही तुलना कं पन्यांची विक्री व देशांचे ठोकळ राष्ट्रीय
उत्पन्न यात आहे) संदर्भ : वर्डबेड डेव्हलपमेंट रिपोर्ट २०००.
* सन २०१३ साली जगाचे-म्हणजे जगातल्या सर्व १९८ देशांचे मिळून एकू ण
उत्पन्न ८७ ट्रीलीयन डॉलर्स आहे, तर फॉर्च्न-५०० मासिकाने नोंदलेल्या काही जागतिक
कं पन्यांचे एकत्र उत्पन्न हे ३१ ट्रीलीयन डॉलर्स आहे. (एक ट्रीलीयन डॉलर्स म्हणजे अंदाजे
५० लाख कोटी रुपये. भारताचे २०१३ सालचे वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न या तुलनेत फक्त
१.८ ट्रिलियन डॉलर्स आहे.)
* जगातील पहिल्या २०० कं पन्यांची एकू ण वार्षिक उलाढाल, (पहिले १० देश
सोडून) उरलेल्या १८६ देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त आहे आणि उलाढालीचा हा
आकडा जगातील १.५ अब्ज लोकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या २० पट आहे.
* जगातील पहिल्या २०० कं पन्यांची उलाढाल ही एकू ण जगाच्या आर्थिक
उलाढालीच्या ३० इतकी प्रचंड आहे. पण या सर्व कं पन्यांनी मिळून जगातील एकू ण
कर्मचाऱ्यांच्या फक्त ०.७८% इतके च कर्मचारी नोकरीस ठे वले आहेत.
* या २०० कं पन्यांच्या उलाढालीची कें द्रे मुख्यत: जगातील विकसनशील देश
आहेत. या कं पन्यांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेवर जी पाशवी पकड बसवली आहे त्यामुळे हे
देश त्यांच्या दबावाखाली येऊन आपले व्यापार नियमनाचे कायदे परदेशी गुंतवणुकीसाठी
अधिकाधिक शिथिल करत आहेत.
तुम्हाला ही सगळी माहिती स्तंभित करेल, कदाचित आनंदितही करेल, क्वचित
अंतर्मुख करेल. क्वचित अशासाठी की, एखाद्या कॉर्पोरेशनची भरभराट हीच देशाची
भरभराट असे समजण्याची एक फॅ शन, एक विचार आपल्या देशात बळावत चालला
आहे. तेव्हा अंतर्मुख अथवा स्तंभित किंवा आनंदित होण्याआधी हा विषय नीट समजून
घ्या. एखादे महाकाय कॉर्पोरेशन/बहुराष्ट्रीय कं पनी आणि एखादा देश यात मूलभूत फरक
असा की देश हे एकाच भौगोलिक ठिकाणी म्हणजे स्थावर असतात; तर कं पन्यांना
भौगोलिक सीमा नसल्याने त्यांना जगभर कोठे ही असण्याची मुभा असते. वर दिलेला
तपशील बघता, तुमच्या हे लक्षात तर आले असेलच की मूठभर लोकांनी चालवलेल्या या
कं पन्या काही देशांपेक्षाही आर्थिक आकाराने मोठ्या आहेत. दुसरा मूलभूत फरकाचा
मुद्दा असा की देश हा काही के वळ व्यापारकें द्रीत, GDP च्या आकड्यांचा खेळ करणारा
नफ्या-तोट्याची अखंड गणिते मानणारा उद्योगसमूह नाही; तर तो एक मानवी
वाटचालीचा इतिहास, जगण्याची हमी जिवंत ठे वणाऱ्या संस्कृ तीचा एक टप्पा,
मानवाच्या विकसित होण्याचा शिलालेख आणि त्याचबरोबर काळाचे बोट धरून
चालणारा एक जिताजागता समुदाय असतो. त्या प्रचंड परिघात उलाढाल, फायदा या
शब्दांचे अर्थ अतिशय व्यापक असतात. त्याचे डॉलर्स/रुपये हे परिमाण नसते तर, त्याचे
चलन जीवनपद्धतीच्या कालखंडाचे असते.
माणसाचे जगणे एखादी क्लोनिंग प्रक्रिया नाही किंवा एखादी वस्तू नाही तर ज्यात
कालचे संदर्भ, आजचे सृजन, उद्याचे संक्रमण असणारी ती एक जीवनपद्धती आहे.
मुळात सृजनप्रक्रियेसाठी वस्तू लागतच नाहीत. उलट एखाद्या गोष्टीचे अमोलपण संपले
की तिचे वस्तुत रूपांतर होते. तिच्यावर वेगवेगळी किंमत डकवता येते. इथे मानवी
आयुष्याच्या वर्गवारी तयार होतात. शिक्षित, अडाणी, नागर, ग्रामीण, सरकारी, खाजगी,
कष्टकरी, बुद्धिमान वगैरे. माणूस म्हणून पाहायचे सोडून मग वर्गवारी म्हणून पहिले जाते,
त्यावर गरज ठरवली जाते. दरडोई उत्पन्नासारखे उत्पादित वस्तूंचे परिमाण त्याला लावले
जाते. त्यावर त्या देशाचे उपयुक्ततेचे निकष ठरतात. लिबिया, इजिप्त इथल्या संघर्षाचे
मूळ मानवी हक्कांच्या पायमल्लीत आहे. मात्र अमेरिका लिबियात प्रत्यक्ष लक्ष घालते,
पण इजिप्तमध्ये फक्त सल्ले देते याचे कारण तेलाचे एक उपयुक्तता मूल्य आहे. आणि
ते असले तरच तिथल्या माणसांचे आयुष्य हे महत्त्वाचे अन्यथा नाही. मग निरुपयोगी देश
एकटे पाडले जातात, त्यातली माणसे कवडीमोल असतात. इतके हे साधे सरळ गणित
आहे. गेल्या ५० वर्षांत ज्या अनेक देशांची धूळधाण उडाली आहे, त्यात स्वत:च्या
नादानपणाने संपलेले देश किती आणि काही प्रगत राष्ट्रांच्या नफ्या तोट्याच्या उलाढालीत
नामशेष अथवा निष्प्रभ झालेला देश किती याचे सिंहावलोकन आपण नेमके कु ठे चाललो
आहोत याचा एक वस्तुपाठ देऊ शके ल. प्रत्येक देशाची नीती वेगळी असू शकते,
नैतिकतेची व्याख्याही तो देश बदलू शकतो, पण मानवी वाटचालीचा मागोवा घेताना हे
असे सुटेसुटे करून बघता येत नाही.
एक गोष्ट नेहमी नैतिकतेच्या संदर्भात लक्षात ठे वायला हवी. तंत्रज्ञान, विज्ञान हे
नेहमी नीतिनिरपेक्ष असते. एखादी वस्तू उजाळायची, काजाळायची याचे कोणतेही भान
तंत्रज्ञानाला असत नाही, त्यासाठी लागते ते आत्मज्ञान. आत्मज्ञान आणि विज्ञान यांची
अमूल्य अशी सांगड घालायचे काम जीवनमूल्ये करतात. पण जेव्हा जीवनमूल्यांची
यत्किंचितही कदर नसणारी, ती जोपासण्याची जबाबदारी झटकणारी समाजव्यवस्था
उभी राहते; तेव्हा मग मानवी आयुष्यासारख्या अमूल्य गोष्टीचे एखाद्या विक्रीमूल्य
असणाऱ्या वस्तूत रूपांतर होते. मग ते विकत घेणे, विकणे, त्यातून नफा/व्यापार बघणे,
त्याला नाशवंत मालासारखे नष्ट करणे हे सहज शक्य असते. ते तसे होऊ नये म्हणून तर
समाज जीवनमूल्ये, सृजनशीलता असणाऱ्या संस्कृ तीला, ते जोपासणाऱ्या
जीवनपद्धतीला महत्त्व आहे. कोणतीही समाज-जीवनपद्धती ही तिचे भौगोलिक
वेगळेपण जपतच कालौघात विकसित होत असते. जीवनाचे एखाद्या वस्तूत, मानवी
जगण्याचे एखाद्या व्यापारी प्रक्रियेत रूपांतर करू पाहणारे मात्र हे सर्व नाकारतात.
म्हणून ते अशी समाजव्यवस्था आरामाच्या, सुखाच्या नावाखाली उभी करतात. जिथे एक
साचेबद्ध, एकसमान अशी जीवनपद्धती निर्माण के ली जाते. या पृथ्वीचा एक नवा
आर्थिक भूगोल निर्माण करू पाहतात. पण सगळ्यांच्या सुखाच्या व्याख्या एकच कशा
असतील? वेगळेपण हे पिढ्यानपिढ्या विकसित होणाऱ्या वाटचालीत असते. खरे तर
हीच विकासाची चिरकाल टिकणारी सगळ्यांना सामावून घेणारी प्रक्रिया आहे.
साचेबद्धपण नसणे, वैविध्य असणे हेच तर त्या प्रक्रियेचे बाह्य रूप आहे. त्या प्रक्रियेचे
मापदंड हे संस्कृ तीत असतात, विज्ञान/तंत्रज्ञानात नाही. जीवनपद्धतीचे वैविध्य नेहमी
माणसाच्या नैतिकतेचे परीघ, अस्तित्वाचे अनुभूतीचे परिमाणसुद्धा विकसित करत
असते. ते परस्परस्वातंत्र्याच्या उच्च आदराचे, आदानप्रदानाचे भान जागृत ठे वते. त्यात
प्रत्येकाला हवे तसे जगण्याचे एक आश्वासन देते. ते नफा-तोटा या पलीकडच्या मानवी
व्यवहारांचे पट उलगडते. म्हणून असे वैविध्य असणारे आता सरसावले आहेत. त्यांच्या
दृष्टीने माल आणि बाजार हीच जगण्याची रीत आहे. त्यांच्या काम करण्याच्या तथाकथित
कठोर व्यावसायिक (सामाजिक अर्थाने अत्यंत असंवेदनशील) दृष्टिकोनामुळे एखादे
समाजजीवन, संस्कृ ती उद्ध्वस्त होऊ शकते (जे झालेले आहे). मग असे जग, लोकशाही
वगैरे मुद्द्यांची कदर करणारे कसे असेल? त्यांचे निकष हे नफ्याचेच असतील ना? तुम्ही
एकतर उपयुक्त तरी असाल नाही तर ओझे तरी. तुमचे एक उपयुक्त मूल्य असेल किंवा
तुम्ही मूल्यहीन असाल. म्हणजे हे एक नवीन प्रकारचे शोषणच झाले; ही नवीन प्रकारची
गुलाम व्यवस्था जन्माला घालणारी समाज व्यवस्था झाली. हा एक नव्याच प्रकारचा
आर्थिक वसाहतवाद झाला.
त्यामुळे विकास, प्रगती, निर्देशांकाची उलाढाल असल्या नुसत्या बरबटलेल्या
शब्दांनी आपलीच पाठ थोपटून घेण्यापूर्वी ह्या आर्थिक भूगोलाच्या व्यूहरचनेकडे
डोळसपणे बघायला हवे. ही सगळी सूत्रे जिथून हलवली जातात त्याचा वेध घ्यायला
हवा.
तो वेधच आपल्याला आत्मसन्मानपूर्ण अशा वैयक्तिक आणि सामाजिक
आयुष्याकडे घेऊन जाईल.

२५. मुबलक दोन्ही! धान्य आणि भूकबळी

अवघ्या जगाची उत्तम प्रगती होऊन ते संपन्नतेकडे, आरोग्याकडे, आणि


सुखसोयींकडे निवांत प्रवास करत असताना मध्येच लक्षात येते की जगभर भूके लेपणही
वाढते आहे आणि मग चक्रावून जायला होते. ह्या गोष्टीकडे जसजसे आपण खोलवर
जाऊन पाहू लागतो तशी एक चमत्कारिक विसंगती सामोरी येते. आज या घडीला
जगातील धान्योत्पादन, धान्यसाठे आणि जगाचे भुके लेपण हे दोन्ही मानवी
इतिहासातील सर्वोच्च स्तरावर आहे. दोन्ही? एकाच वेळी हे कसे? खरेतर जगातल्या
प्रत्येक देशाकडे आपल्या लोकांना पोटभर खायला देता येईल इतकी जमीन, पाणी, अन्न
असे सर्व नैसर्गिक स्त्रोत आहेत. तरीही दर माणशी वाढणारे त्या त्या देशांचे अन्न उत्पादन
हे जास्त लोकांना भुके ले ठे वते असा विचित्र अनुभव येतो आहे. काही देशात तर त्यांच्या
अन्नपुरवठ्याची तूट भरून काढण्यासाठी दिली जाणारी परकीय मदत तर हा प्रश्न जास्त
बिकट करून ठे वते असेही लक्षात आले आहे.
नुसती आकडेवारीच बघायची झाली तरी जगाचे सध्याचे एकू ण अन्नउत्पादन,
जगातील प्रत्येकाला किमान ३५०० कॅ लरीजचा (कदाचित जास्तच) आहार देऊ शकते.
(जो लठ्ठपणा जन्माला घालणारा आणि रेलचेल म्हणावी असा आहे). ग्रीनपीस
इंटरनॅशनल या संस्थेने काढलेला एक निष्कर्ष असाही आहे की ज्या देशात अन्न
वाजवीपेक्षा अधिक आहे त्या देशात जास्त भुके ले लोक राहतात. युनोच्या अन्न आणि
कृ षी संघटनेच्या म्हणण्यानुसार, सारे जग जगातल्या प्रत्येक माणसाला पुरून उरेल
किंबहुना त्याच्या गरजेच्या दीडपट अन्न उत्पादन करते आहे आणि तरीही दर सात
माणसातला एक माणूस भुके ने मरतो आहे. अजून एक निष्कर्ष असा की अन्नाच्या
कमतरतेच्या कारणात अत्यल्प वाटा हा लोकसंख्येचा आहे. अन्नाची उपलब्धता आहे पण
ते विकत घेणे परवडत नाही असा मामला आहे. बाजाराच्या भाषेत मांडायचे झाले तर
जर तुमची अन्न विकत घ्यायची औकात नसेल तर ते कोणीही तुमच्यासाठी पिकवणार
नाही. मग जगात सध्या दीड अब्जांपेक्षा जास्त लोकांचे उत्पन्न जर ४० रुपयांपेक्षा कमी
असेल तर त्यांनी किमान पोटभर अन्नाची उठाठे व करण्यापेक्षा उपाशीपोटी मरून जाणे
हाच पर्याय आजच्या अन्नव्यवस्थेच्या भीषण प्रवासाने त्यांच्या समोर ठे वला आहे. गंमत
म्हणजे, ६०% लोकांचे सरासरी दैनिक उत्पन्न २० रुपयापेक्षा कमी असणारा आणि
सुमारे २१ कोटी लोक भुके ले असणारा आपला देश दरवर्षी ३४,८२५ कोटी रुपयांचे
अन्नधान्य निर्यात करतो; तर दुसरीकडे ब्रिकचा आपला साथीदार ब्राझील स्वत:चे ७
कोटी लोक भुके ले ठे वून ६५,००० कोटी रुपयांचे धान्य निर्यात करतो. स्वत:च्या
नागरिकांना उपाशी मारून इतर लोकांना पोसण्याचा हा काय गोरख धंदा आहे?
हे सगळे निष्कर्ष आपली प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी बदलणारे आहेत. हा
विरोधाभास आपल्याला नुसता अंतर्मुख करत नाही तर अस्वस्थ करून सोडतो. अन्न ही
मूलभूत गरजेऐवजी बाजारातील वस्तु (commodity) के ल्यानेच तर आपण या
वळणावर येऊन पोहोचलो नाही ना? मात्र आपला मानभावीपणा असा की, हे सगळे
पूर्णपणे मानवनिर्मित असूनही आपण निसर्गाला दोष देणे काही थांबवत नाही. मुळात
अन्नाची गरज ही व्यक्तीच्या हक्काऐवजी खरेदी करण्याच्या लायकीशी जोडली जाते.
तेव्हा उत्पन्न नसणाऱ्यांना अन्नापासून वंचित व्हावे लागणार हे ओघानेच आले.
लोकांचे उत्पन्न घटते, कारण त्यांच्या उत्पन्नाची साधने नष्ट होतात. कर्ज
फे डण्यासाठी, घरातल्या कु टुंबाच्या एखाद्या गरजेपोटी लोकांना आपली जमीन जे त्यांच्या
उत्पन्नाचे साधन असते ती गहाण ठे वावी लागते, प्रसंगी विकावी लागते. त्यातून
दलालीच्या आणि बेभरवशाच्या बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमती घसरतात;
तर दुसरीकडे त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या बाजारातल्या वस्तूंच्या किमती त्यांच्या
आवाक्याबाहेर जातात. हे सगळे बाजाराच्या सूत्रानुसार कोणीतरी घडवत असतेच.
अन्नाचे दुर्भिक्ष्य हे बऱ्याच लोकांसाठी आपत्ती असेलही पण काहींसाठी मात्र ती
योजलेली नफे खोरीची संधीच असते. माणसे जमीनजुमला विकायला काढतात तेव्हा तो
त्यांच्या जगण्याच्या नाईलाजाचा निकराचा प्रयत्न असतो. आणि प्रत्येक गोष्टीत फायदे
शोधणाऱ्या काही लोकांसाठी तीच योग्य वेळ असते; ह्यांचे सगळे स्थावर स्त्रोत हस्तगत
करायची! त्यामुळे मग कधी अशा संधी मुद्दाम निर्माण के ल्या जातात. कधी त्या परदेशी
गुंतवणूक, विकासाची दिशा, सेझ म्हणून येतात तर कधी देशाच्या आर्थिक वेगवान
वाढीचा अपरिहार्य टप्पा म्हणून. या लुटीपासून सामान्य लोकांचे रक्षण करणे हे शासनाचे
काम. पण जव्हा शासनसुद्धा या बाजारा व्यवस्थेचा दूत बनते तेव्हा मात्र त्या देशाच्या
पुढच्या पिढ्यांसाठी एक सापळा रचला जातो.
एकं दरीत, याचा निसर्ग अथवा लोकसंख्येशी काहीही संबंध नाही. हे सगळे
आठवायचे कारण, या दुष्टचक्रात आज जगातील अन्नव्यवस्था अडकली आहे. आज
जगातल्या अन्नव्यवस्थेच्या मुखंडांकडे लोकांसाठीचा सकस आहार, दीर्घकाळ आणि
भरपूर धान्य उत्पादन करण्याची जमिनीची क्षमता, पर्यावरण संतुलन (ज्याचा धान्य
उत्पादनाच्या संख्येशी नाही; तर गुणवत्तेशी निकटचा संबंध आहे) अशा कोणत्याही
गोष्टींशी आता निगडित असा विचार नाही. सबंध जागतिक अन्न उद्योगाचे, जो कै क वर्षे,
परस्परावलंबी, पर्यावरणपूरक होता; त्याचे आता कार्पोरेट उद्योगात रूपांतर झाले आहे.
खरे तर आजचे तंत्रज्ञान, संदेशवहन व्यवस्था, जागतिकीकरण याचा सकारात्मक उपयोग
करून जगातील लोकांना सुखी समृद्ध करता आले असते. पण झाले काय तर करंटेपण!
युनोच्या FAO (अन्न आणि शेती संघटना) एका ताज्या अहवालानुसार, जगात
अन्नधान्याचे भाव वाढण्यापूर्वी (२००७) कु पोषित लोकांची संख्या ८० कोटी होती. ती
एका वर्षात ९२ कोटी वर पोचली. २०१७ पर्यंत ही संख्या १.३ अब्ज होण्याची भीती हा
अहवाल व्यक्त करतो. या काळात अन्नधान्याच्या किमतीचा निर्देशांक २००५-०६ या
वर्षात १२%, २००७ मध्ये २५% तर २००८ साली ५०% नी वाढला. यानंतर गेल्या तीन
वर्षांत ह्या निर्देशांकात ८३% ची अतिशय चिंताजनक अशी वाढ झाली आहे. त्याचे दृश्य
परिणाम आपण पहिले तर गेल्या तीन वर्षात हैती, पाकिस्तान, बांगलादेश, मोझांबिक,
रवांडा, बोलिविया, मोरोक्को, मेक्सिको, सेनेगल, उझबेकिस्तान, नायजेरिया ह्या देशात
प्रचंड प्रमाणात लोक रस्त्यावर आले/दंगली झाल्या. मुद्दा नीट लक्षात येण्यासाठी आपण
रवांडाचे उदाहरण सविस्तरपणे पाहू.
रवांडा हा चिमुकला आणि मूळचा कृ षिप्रधान देश. या देशातील वाईल्ड लाईफ
प्रसिद्ध आहे. हत्ती, सिंह, चीपान्झीज, दुर्मीळ असे पर्वतीय गोरीलाज या देशातले. अवघी
८० लाख लोकसंख्या (आपल्या मुंबईच्या अर्धी) आणि ९७ लोक शेतीवर अवलंबून.
१९१४ साली तिथे एक अत्यंत घृणास्पद, मानवजातीला काळीमा फासणारा नरसंहार
घडला. त्यात सुमारे १० लाख लोक मारले गेले. काय मूलभूत कारणे होती याची?
जगाला सांगितलेली होती ती वांशिक झगड्याची; पण खरी कहाणी विदारक आहे. खरी
कारणे आर्थिक, वसाहतवादाच्या मतलबी दुष्टचक्राची, नाणेनिधीच्या अन्यायी धोरणाची
आणि एकं दरीतच वखवखलेल्या नफे खोर प्रगत राष्ट्रांच्या आफ्रिके बद्दलच्या क्रू र
दृष्टिकोनाचीही आहेत.
१९८६ च्या सुमारास याच दुष्टचक्राला, परदेशी कं पन्यांच्या हव्यासाला हा देश बळी
पडला आणि इतर सर्व कृ षी उत्पादने कमी करून कॉफीचेच प्रचंड पैसा देणारे उत्पादन
घेऊ लागला. १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मोठमोठ्या कं पन्यांच्या खेळीमुळे
कॉफीचे भाव कोसळेपर्यंत कॉफी तेलाच्या खालोखाल व्यापारी किमती वस्तू होती.
कॉफीच्या किमतीवर असणारे नियंत्रण अचानक काढून घेतले गेले. आणि रवांडातील
शेतकरी भिके ला लागले. कॉफीचे भाव इतके कोसळले की १९९२ पर्यंत तर ते
१९८६च्या तलनेत ७५% इतके कमी झाले. अगोदर रवांडाची आर्थिक प्रगती योग्य
मार्गावर आहे असे मूल्यमापन करणारे आंतरराष्ट्रीय निरीक्षक, अर्थतज्ज्ञ या कॉफी
क्रायसिसमध्ये एकदम दडून बसले. रवांडाची कॉफी निर्यात एकदम २०% वर आली. त्या
देशाची आर्थिक परिस्थिती खालावली. पाश्चिमात्य राष्ट्रांची देणी वाढल्याने नाणेनिधीने
१९९० साली रवांडाच्या सरकारवर, एक Structural Adjustment Program नावाचा
आर्थिक कार्यक्रम लादला. त्याद्वारे आर्थिक स्थिरता येणे अपेक्षित होते. पण झाले काय,
आधीच दुबळ्या झालेल्या रवांडाचे चलनमूल्य एकदम ४५% घसरले. मग आंतरराष्ट्रीय
दलाल सरसावले, आरोग्याच्या सोयींवर, शिक्षणावर दिल्या जाणाऱ्या सबसिडी काढून
घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढला. शेकडो मुले कु पोषणाची बळी ठरू लागली.
प्राथमिक आरोग्य कें द्रावर औषधांचा तुटवडा सुरू झाल्याने अचानक मलेरियाच्या के सेस
मध्ये २१% वाढ झाली. शेतकऱ्यांच्या सबसिडी काढून घ्यायला सुरुवात के ली,
शेतकऱ्यांच्या, छोट्या उद्योगांच्या कर्जावरचे व्याज वाढवले गेले, आयात वस्तूंवरील कर
अमर्याद कमी के ले गेले. कॉफीची हमीकिंमत कमी झाली. शेतकऱ्यांनी लाखांच्यावर
कॉफीची झाडे उपटून तिथे इतर पिके लावायला सुरुवात के ली, पण आयात कर अत्यल्प
के ल्याने ओतले गेलेले परदेशी धान्य इतके स्वस्त झाले की देशात पिकलेले धान्य कोणी
घेईना.
अतिशय समृद्ध जमिनीतील धान्य उत्पादन कमालीचे घटले, दारिद्र्यरेषेखालील
लोकांची संख्या ३१% नी वाढली. हे सगळे इतक्या झपाट्याने घडले की तिथली जनता
हवालदिल झाली. एके काळचा स्वावलंबी, कृ षिप्रधान, स्वयंपूर्ण देश जगाकडे अन्नासाठी
याचना करू लागला. भुके ल्या जनतेने मग उठाव के ला; त्याला अराजक, हिंसाचाराचे
स्वरूप आले. पूर्ण देशाचा ताबा तस्कर, माफिया आणि लष्कराकडे गेला. यात फ्रें चांना
आफ्रिके त पाय रोवायची संधी दिसल्याने त्यांनी रवांडा सरकारला, बंडखोरांना शस्त्रे
पुरवायला सुरुवात के ली. ऑक्टोबर १९९० ते ९२ च्या मध्यापर्यंत लष्कराची संख्या
५,००० पासून एकदम ४०,००० वर जाऊन पोचली. फ्रान्सच्या या उद्योगांना यश मिळू
नये म्हणून अमेरिके ने दुसऱ्या जमातीला मदत पुरवायला सुरुवात के ली. आफ्रिके वर
कोणी कब्जा करायचा या फ्रें च आणि अमेरिका देशांच्या चापलूस धोरणाने कै क लोकांना
आपले प्राण गमवावे लागले. अमेरिकन, फ्रान्स आणि बेल्जियम या देशांचे हात
रवांडाच्या अनेक निष्पाप नागरिकांच्या रक्ताने माखलेले आहेत. ज्या देशांनी/कं पन्यांनी
ह्या कॉफीचा मलिदा लाटला, त्यांनी तातडीने पोबारा के ला. एक वर्षानुवर्षे जपलेली
कृ षक संस्कृ ती मात्र लयाला गेली. त्यावेळेच्या संघर्षात फक्त ८० लाख लोकसंख्येच्या
या देशात किमान १० लाख लोक मारले गेले.
रवांडा ही नैसर्गिक आपत्तींची, वांशिक कत्तलींची करुण कहाणी नाहीतर हव्यास,
नफे खोरी, बाजारासाठी जास्त एकरी उत्पादन, माणसे, स्त्रोतांचे अमर्याद शोषण याची
रक्तरंजित दास्तान आहे. या कहाणीने, खरे तर, एकविसाव्या शतकाच्या टप्प्यावर या
कु पोषण, भुके लेपणाच्या भीषण मार्गावर निघालेल्या या जगाला अंतर्मुख करायला हवे
होते, पण तसे घडताना दिसले नाही. जगाचे सोडाच, पण निदान, आर्थिक महासत्तेच्या
गोंडस अफू च्या धुंदीत गुरफटलेल्या आपल्यासारख्या कृ षिप्रधान देशाला, त्याच्या
सरकारी धोरणांना, लोकांशी नाळ तुटलेल्या नोकरशाहीला आणि गाफील राज्यकर्त्यांना,
रवांडाच्या हासाची कारणे भानावर ठे वतील अशी आशा बाळगू या.
२६. अथां तो पर्यावरण जिज्ञासा

सध्या जगभर 'पर्यावरण' हा एका विषय फार चिंतेचा, चर्चेचा आणि चिंतनाचा
झालेला आहे. अमेरिके चे तत्कालीन उपाध्यक्ष अल-गोर यांनी या विषयावर एक
माहितीपट बनवला आणि तो घेऊन त्यांनी जगभराचा दौरा के ला. जनजागतीच्या या
कार्याचे त्यांना नोबेलही मिळाले. मुळात पर्यावरण हा विषय एखाद्या प्रकरणाचा नसून
एखाद्या प्रबंधाचा आहे; तरीही थोडा ऊहापोह इथे करणे आवश्यक आहे. याविषयाची
व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्याबद्दल अनेक प्रवाद, अपवाद आणि विवाद तयार
होतात. 'विकास का पर्यावरण' हा एक सगळ्यांच्या आवडीचा विषय आहेच. जगभर
पर्यावरणवादी आणि विकासवादी असे दोन गट झुंझायला उभे ठाकले आहेत. जणू काही
हे एकमेकांना पर्यायच आहेत. शिवाय राजकीय अथवा आर्थिक दबाव हा घटकही या
गोधळात भरच घालत असतो. हे सर्व मुद्दे बाजूला ठे वून पर्यावरण या विषयाचा समग्र
विचार करायला हवा.
सध्या इको-फ्रें डली व्यवस्थेचे युग आहे, क्योटो प्रोटोकालपासून ते कचऱ्याच्या
नियोजनापर्यंत, ध्वनी, पाणी, हवा यांचे प्रदूषण ते ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत सतत अनेक शब्द
आपल्या कानावर पडतात. आपण आपल्या रोजच्या धकाधकीत इतके बुडून गेलेलो
असतो की जणू हे काहीतरी दुसऱ्या जगाचे विषय आहेत आणि आपल्यावर याचा काही
परिणाम होणार नाही अशी एक भाबडी किंवा सोयीची समजूत काही लोकांची आहे. तर
ह्याचा नीट विचार न के ल्यास पृथ्वी नष्ट होणार असा भीतीचा फं डा पसरवणारे महाभाग
आहेत. मुळात पर्यावरण संतुलन म्हणजे आपण जगत असताना या सभोवतालच्या
जीवसृष्टीशी, निसर्गाशी जुळवून घेत, थोडक्यात समरस होऊन जगणे. म्हणजेच हा काही
अवघड विज्ञानाचा विषय नाही, किंवा भरमसाठ आकडेवारी फे कू न लोकांना गुंग करून
सोडण्याचा उद्योग नाही. साधेसोपे जगण्याचे मंत्र असणारी जीवनपद्धती हे याचे उत्तर
आहे. पर्यावरण दिन साजरे करून जाणीव वाढेल पण त्याचे पुढे काय? जाणवते पण
काही करत नाही असले वांझ मुद्दे काय कामाचे? पर्यावरण दिनानिमित्त दोन-चार भाषणे
ठोकली, पेपरात फोटो वगैरे छापून आले की आपण पर्यावरण सुधारण्यासाठी खूप काही
के ले असे भ्रम बाळगणारे तर पावलोपावली भेटतात. नाहीतरी हल्ली 'मदर्स डे','फादर्स
डे' असे फॅ ड आलेले आहे. म्हणजे तो एक दिवस आईबापांची आठवण ठे वायची! बाकी
दिवसांचे काय? पण तसे के ले की मग त्या निमित्ताने सेल लावणारे या भावनेशी जशी
प्रचंड आर्थिक उलाढाल जोडून देतात तसेच पर्यावरणाचे होत चालले आहे.
पर्यावरण दिनाचे बजेट डोळ्यासमोर ठे वून 'गो ग्रीन' वगैरे घोषणा देत ग्राहकाला
आपण पर्यावरण ठीक करण्यासाठी योगदान दिले असे वाटायला लावणारे के वढा तरी
धंदा यातून करतात. प्रश्न तिथेच राहतात आणि यांचे मात्र उखळ पांढरे होते. आपण
सगळे पेट्रोल, डीझेल वापरणे सोडून द्यायला तयार आहोत का जर त्यामुळे एखाद्या
आजारी माणसापर्यंत रुग्णवाहिका पोचणार नाही? आपण सगळे सिलिकॉनचे तंत्रज्ञान
सोडून देऊ का, जेणेकरून आपल्याला कॉम्प्युटर, इंटरनेट, सेलफोन हे काहीही वापरता
येणार नाही? रसायनशास्त्राचे दुष्परिणाम होतात म्हणून आपण वैद्यकीय चिकित्सा वगैरे
नाकारू का? पाणी, कोळशापासून तयार होणारी वीज फारच प्रदूषण करते म्हणून
आपण विजेशिवाय जगू का? जर हे होणार नसेल आणि आपल्याला यातूनच मार्ग
काढायचा असेल तर मग याविरुद्ध नसत्या आरोळ्या ठोकन काय होणार? मग
पर्यावरणाच्या नावाखाली या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींसाठी आपण नेमकी काय
भूमिका घेणार आहोत? एक गोष्ट आपल्याला विसरून चालत नाही की आपले सध्याचे
जीवन अशा विरोधाभासांनी बनले आहे. आपल्याकडे 'पर्यावरण का विकास' असा पर्याय
नाहीच आहे. पर्याय याच्या कु ठे तरी मध्ये उभा आहे. हा एक लंबक आहे; जो कोणत्याही
दिशेला जास्त झुकला तर त्रास अटळ आहे. रोजचे जगणे आपण जितके निसर्गाचा
सन्मान ठे वणारे करू, प्रदूषणाच्या बाबी नीट समजून त्यात आपली भर टाकणार नाही,
तितके हे सारे सोपे होईल. पुरोगामी असणे म्हणजेच स्वैराचारी असणे अशी समजूत
आपण करून घेतली आहे. त्याप्रमाणेच पर्यावरणावर सतत बोलत राहिले की, ते
आपोआप ठीक होते असा एक बदमाशीचा समज करून आपण जगत आहोत. या
साऱ्या प्रश्नाचे मूळ आपल्या रोजच्या जीवनपद्धतीतच आहे.
काही अत्यंत साध्यासाध्या गोष्टींनी आपण यात योगदान देऊ शकतो.
• आपण राहतो तिथल्या परिसरात शक्य तितकी झाडे लावणे एक
कडुनिंबाचा वृक्ष १० टनाच्या एअरकं डिशनइतका प्रभावी असतो.
• फ्लॅटमध्ये गच्चीवर कुं ड्या ठे वणे.
• घरतून बाहेर पडताना कापडी पिशवी सोबत ठे वणे, नामक
. कोणत्याही प्रकारच्या प्लस्टिक अथवा पॉलिथीन पिशव्या न वापरणे,
• घरात वावर असणाऱ्या खोल्यातच दिवा, पंखे सुरू ठे वणे.
• एक माणसासाठी एक कार न वापरता शक्यतो सार्वजनिक वाहतूक
व्यवस्था, सायकल अशा वाहनांचा उपयोग करणे.
• बँके ची, बिले भरण्याची ऑनलाईन सुविधा वापरणे. कागदाचा किमान
वापर.
• पाण्याचा वापर कटाक्षाने किमान करणे. आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या
अनेक गोष्टी यासाठी उपयोगी ठरू शकतात.
अगदी मुळात सांगायचे तर निसर्गाशी तारतम्य असणारी जीवनपद्धती स्वीकारणे.
हवा, पाणी हे सगळ्यांसाठी आहे. म्हणजेच एकमेकांसाठी आहे ना?

२७. जीव- वैविध्य आणि मानवाचे एकसाची जगणे

यांत्रिक शेती अथवा कृ षी क्षेत्राच्या सरसकट औद्योगिकीकरणाने काही दीर्घकाळ


चिंतीत करणारे प्रश्न उभे के ले आहेत. (इथे भारतात शेतीमालाला उद्योगाचा दर्जा द्यावा
या शेतकरी संघटनेच्या मागणीविरुद्ध लिहायचे नसून हा विषय वेगळा आणि जागतिक
आहे) शेतीच्या औद्योगिकीकरणाने जास्त प्रमाणात अन्नधान्य निर्माण झाले असेलही.
पण ते सर्व एकाच प्रकारचे असल्याने अन्नधान्याचे वैविध्य मात्र हरवून गेले. वेगवेगळ्या
प्रकारची छोट्या छोट्या प्रमाणातील पिके जाऊन एकाच प्रकारच्या प्रचंड संख्येने तयार
होणाऱ्या पिकांना निष्कारण महत्त्व दिले जाऊ लागले. ही प्रचंड संख्येने घेतल्या
जाणाऱ्या पिकांच्या साठ्याची, वितरणाची, बाजाराची एक मोठी गरज तयार होऊन
त्यासाठी जैविक इंधन, पाणी आणि सुपीक जमीन नासवणारी, रासायनिक खतांच्या
निर्मितीची एक मोठी साखळी उभी राहिली. त्यामुळे एकीकडे हरितक्रांतीमुळे झालेल्या
उत्पादनवाढीला ह्या सर्व गोष्टींनी नख लावलेच; पण त्याहीपेक्षा नैसर्गिक पीकपद्धतीला
आणि जीवनपद्धतीला हळूहळू नामशेष करत आणले आहे. अमेरिका, युरोपसारख्या
प्रगत आणि यांत्रिक शेती करणाऱ्या भागातून प्रचंड प्रमाणात आलेल्या दोन-तीन
प्रकारच्या अन्नधान्याच्या प्रकारांनी इतर धान्ये जी त्या त्या प्रदेशात पोषक आहार म्हणून
उपलब्ध होती त्यांचे उत्पादन नष्ट करून टाकले आहे. सगळे हीच पिके घेऊ लागल्याने
आणि यांत्रिक शेतीच्या पद्धतीने आपण आपलेच नाही तर इतर जीवांचे अन्नही नष्ट करत
आणले आहे. ज्यांचा औद्योगिक फायदा आहे अशाच पाईन, निलगिरी, साग आदी
वृक्षांची लागवड करून पैसा मिळवणे सोपे आहे, आणि आजच्या जमान्यात त्याचे
समर्थन करणारेही मिळतील. पण त्यामुळे जंगलातील विविधतेवर दरोडा घालत चांगली
जमीन, पाण्याचे स्त्रोत टिकवण्याच्या एका इकोसिस्टीमला धोका निर्माण करणे हे
गुन्हेगारीचे कृ त्य आहे. जगातली जंगले (सुमारे आठ-दहा दशलक्ष चौरस किमी) ही
तिथल्या आदिवासी जमातींनी वर्षानुवर्षे निसर्गाचा मान राखत जपली आहेत म्हणून
आज आपण महानगरात श्वास तरी घेऊ शकतो, हे औद्योगिकीकरणाचे ढोल पिटणाऱ्या
किती जणांच्या लक्षात आहे?
जीव-पर्यावरण सृष्टीच्या अर्थशास्त्रावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरण
ठरवताना शास्त्रज्ञांनी विविध उद्योगक्षेत्राचे जेनेटिक साधनांशी असणारे नाते
अर्थकारणाच्या परिभाषेत शोधून काढले ते अतिशय रोचक आहे.
खालील तक्ता पाहा.
जेनेटिक संसाधनावर अवलंबित मार्के ट क्षेत्रे
उद्योग क्षेत्र मार्के ट व्याप्ती (रुपयात) टिपणे
औषधे ३२ लाख कोटी २०-५०%
(२००६) सार्वजनिक क्षेत्र मार्के ट जेनेटिक
संसाधनातून
जैवतंत्रज्ञान ३,५०,००० कोटी (२००६) बरेचसे उत्पादन एन्झाइम्स
अथवा
मायक्रोऑर्यानिझम्स
पासून
कृ षी बियाणे १,५०,००० कोटी (२००६) सर्व जेनेटिक
संसाधनातून
वैयक्तिक ३१ लाख कोटी (२००६) बाजारात नैसर्गिक अशा लेबल
वापरासाठी, खाली विक्री होणारे सर्व पदार्थ
अन्न पेय वनस्पतीजन्य जेनेटिक संसाधनातून

जगातल्या एकू ण व्यापारापैकी सुमारे ४०% व्यापार हा जैवशास्त्रीय उत्पादनावर


अवलंबून आहे. सध्या जैविक वैविध्याच्या नामशेष होण्याचे एक मोठे आव्हान उभे आहे.
जैविक विविधता म्हणजे काय? तर या पृथ्वीतलावर जगणाऱ्या जीवांच्या वेगळेपणाचे
विश्व. वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्म जंतू, असे विविध जीव त्यांची परस्परावलंबी
जीवनप्रणाली, त्यांची एक पर्यावरणीय संतुलनाची व्यवस्था, निरनिराळे हवामान, अरण्ये,
जंगले, ओसाड प्रदेश, वाळवंटे, वाहणाऱ्या नद्या, दरीखोरी, पाण्यातील जीवन,
समुद्रतळाची अफाट जीवसृष्टी ह्या सगळ्याची सततच्या परिवर्तनाशी असणारी सांगड
म्हणजे जैववैविध्य होय. हे सर्व मिळून बहरणारे, नष्ट होत, पुन:पुन्हा जन्म घेणारे आपले
विश्व. या सगळ्या जिवंत परिघाचा आपल्या निर्माणाशी आणि अस्तित्वाशी असणारा
अतूट संबंध. मानवाची उत्क्रांती अथवा पुढे जाण्याची वाटचाल यातूनच घडत गेली आहे.
आपण मात्र आपल्या बुद्धीच्या घमेंडीने आणि मस्तवालपणे अलीकडच्या काही वर्षात
अमर्याद हव्यास, नैसर्गिक साधनांचा अमर्याद वापर, हावरटपणे सर्व स्वत:साठीच
ओरबाडण्याची वृत्ती, सर्व गोष्टीतून स्वत:चा फायदा बघण्याची टोकाची स्वयंकें द्रित
भावना असे सहजीवन नष्ट करणारे विविध गुण दाखवत या सगळ्यावर भयभीत करणारे
प्रश्नचिन्ह उभे के ले आहे.
असे असूनही काही विद्वान हे सगळे प्रश्न समजून घेण्याआधी प्रश्न उपस्थित
करतात की मुळात ही जैविक विविधता कशाला हवी आहे? जर या सर्व जमाती नष्टच
झाल्या तर काय होणार काय आहे? आपल्याच जगण्याचे प्रश्न इतके 'आ' वासून उभे
आहेत तर जीव-वैविध्य राखावे असे एवढे त्यात काय आहे? आपल्याकडे आधुनिक
तंत्रज्ञान आहे. आपण हवे तसे आयुष्य निर्माण करू शकतो. मग कशाला हवीये ही
मिरासदारी??
याला सोपे उत्तर असे आहे की, आपण इंटरनेट/मायक्रोचीप खाऊ शकत नाही.
आपला श्वास हा या वातावरणातून येतो; त्यातल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे जैव
वैविध्यामुळेच टिकू न आहे. अजून मूलभूतच बोलायचे तर, मुळात आपण कोण आहोत?
हे सगळे जीव या निसर्गात करोडो वर्षे राहत आहेत. हे कोण भुक्कड जे काही शेकडो
वर्षांपूर्वी नवे तंत्रज्ञान घेऊन आले आणि त्यांना नष्ट करू पाहत आहेत?
जैविक वैविध्य अशी एक पर्यावरण पद्धत निर्माण करते ज्यात प्रत्येक जीव हा एक
महत्त्वाचा घटक असतो आणि त्याच्या अस्तित्वावर बरंच काही अवलंबून असते.
आजमितीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कितीही ढोल आपण बडवले तरी जगाच्या एकू ण
अर्थकारणाच्या ४०% आणि सर्वसामान्य माणसांच्या ८०% गरजा ह्या जीवसृष्टीतूनच
भागवल्या जातात. त्या जीवसृष्टीचे वैविध्य जितके जास्त आणि समृद्ध, तितके च
वैद्यकीय संशोधनाच्या संधी, आर्थिक विकासाची उमेद आणि पर्यावरण रक्षणाच्या
शक्यताही जास्त असणे हे क्रमप्राप्त आहे. जगातल्या प्रत्येक संस्कृ तीची पाळेमुळे ही
जीवसृष्टीच्या वैविध्यातच आहेत. जैविक वैविध्य हे आपल्या सगळ्यांच्या आणि पर्यायाने
धरित्रीच्या आरोग्याचा एक प्रकट असा मापदंड आहे. जितके हे जीववैविध्य समृद्ध
तितकी आपल्या अस्तित्वाची हमी मोठी. ह्या सगळ्यावर परत पर्यावरण आणि हवामान
संतुलन हेसुद्धा अवलंबित असतात. आपल्या सुखसोयींसाठी आपण सगळ्या जीवांच्या
वाट्याला वाढून ठे वलेले प्रदूषण, अनेक घातक रासायनिक वायूंच्या उत्सर्जनामुळे
होणारा सततचा हवामान बदल हा जीवसृष्टीच्या नाशाकरता कारणीभूत आहेच; पण
त्याही पेक्षा जास्त तो 'जीवो जीवस्य जीवनं या इको सिस्टीमसाठीही हानिकारक आहे.
या धरतीवर जीवसृष्टी अस्तित्वात आल्यापासून साधारण पाच मोठे आणि अनेक छोटे
जीवसंहाराचे प्रसंग ओढवल्याची नोंद आहे. पृथ्वीवर माणसाच्या उदयाबरोबर तर जीव
संहाराच्या प्रकारात वाढच झाली आहे. पुढील आकडेवारी पुरेशी बोलकी आहे
* दर आठ पक्ष्यातील एक पक्षी, दर चारपैकी एक सस्तन प्राणी, शंकू च्या
आकाराची - फळे येणारे दर चारपैकी एक झाड, दर तीनातील एक उभयचर प्राणी,
आणि दर सातामागे सहा समुद्री कासवे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
* जगात होणाऱ्या विविध प्रकारच्या धान्यांपैकी जवळपास अर्ध्याहून अधिक
प्रकारची धान्ये ही नष्ट झाली आहेत.
* एकू ण जलचर जिवांपैकी सुमारे ७५% जलचर जीव हे माणसाच्या लालसेने
शोषित झाले आहेत; तर गेल्या पन्नास वर्षांत मोठ्या माशांच्या प्रजातींपैकी ९०% प्रजाती
नष्ट झाल्या आहेत.
* जर जगाचे सरासरी तापमान अजून ४ डिग्री सेल्सीने वाढले तर ७०% विविध
प्रजातींचे आयुष्य धोक्यात येईल अशी परिस्थिती आहे.
* दर सेकं दाला एका फु टबॉल मैदानाइतके अरण्य नष्ट होत असते.
* आजमितीला जगातील ३५ कोटी लोक पिण्याच्या पाण्याला वंचित आहेत.
प्रदूषण, जंगलतोड, नागरीकरण, नैसर्गिक स्त्रोतांचे अमर्याद शोषण या सगळ्या
गोष्टींमुळे आपण इथवर येऊन पोहोचलो आहोत. नष्ट होणे आणि परत निर्माण होणे हा
प्रकृ तीचा धर्म आहे. जेव्हा एखादी प्रजाती हळूहळू नष्ट होत असते तेव्हा पर्यावरणाशी
संतुलनाच्या अनेक यंत्रणाही कार्यान्वित होतात आणि हे नष्ट होणे निसर्ग नियमाचा
मूलभूत भाग बनते. पण जेव्हा हे नष्ट होणे एखाद्या संहाराचे रूप घेते तेव्हा मात्र
निसर्गाच्या संतुलनाच्या सर्व यंत्रणा कोसळतात. यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. ज्याची
व्याप्ती आपल्या अन्नसुरक्षेशीसुद्धा जोडली जाते. मुळात हव्यास, वेगळेपणानेच
ओळखल्या जाणाऱ्या निसर्गाचे साचेबद्ध अशा गोष्टीत झालेले रूपांतर, जगण्याचे
वेगळेपण नष्ट करून त्याला एखाद्या अतिसुलभ आकृ तिबंधात बसवण्याचे अट्टहास, सर्व
काही संपवून टाकण्याची आंधळी घाई यांनी जन्माला घातलेल्या जीवनपद्धतीत मग
दिशाहीन यांत्रिकी शेती, बेसुमार यांत्रिकी मासेमारी, राक्षसी नागरीकरण यांनी हाहाकार
माजवला नाही तरच नवल! आपल्याला आरामदायी, सर्व प्रकारचे चोचले पुरवणारे असे
सुखी जीवन हवे, त्यासाठी निसर्गाचे कितीही नुकसान झाले तरी चालेल असे चित्र सध्या
दिसते आहे. माणसाची तथाकथित प्रगती कशाचा बळी देऊन होते आहे याकडे दुर्लक्ष
करणे म्हणजे ज्याच्या आश्रयाने आपण राहात आहोत त्यालाच नष्ट करण्याचा मूर्खपणा
आहे हे कधी कळेल? एक पिकपद्धत, एक संस्कृ तीकरण, साचेबद्ध जीवनपद्धतीचा
अंगीकार हा आयुष्य सोपे करेलही कदाचित; पण ते टिकणारे मात्र करणार नाही हे
नक्की. स्वत:पुरतीच तात्पुरत्या सुलभतेची लालसा की सर्वांनी चिरकाल टिकण्याची
इच्छा यातली योग्य निवड करणे जर कठीण असेल तर संहार अटळ आहे. जिथून आलो
तेच नाकारायचे? ज्यामुळे टिकलो तेच गाडायला निघायचे? याला बुद्धी म्हणायची का
पाशवी मठ्ठपणा?

२८. पर्यावरण नावाचे बारमाही पीक

पर्यावरणाने एका जाणिवेपासून ते अर्थकारणाचे महत्त्वाचे व्यासपीठ बनण्यापर्यंत


अशी मोठी झेप घेतली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या नुसत्या इशाऱ्याने आता जगभर
राजकीय आणि आर्थिक पडघम वाजू लागतात. ध्रुवावर बर्फ वितळले, पावसाची वेळ
बदलली, समुद्र पातळी उंचावून जगातील अनेक महत्त्वाची शहरे आता पाण्याखाली
जाणार या बातम्यांना आता उपद्रव शक्ती बरोबरीने एक निश्चित अशी आर्थिक बाजू
निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने पाहता गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींचा एक
नवाच आर्थिक धर्म उदयाला आला आहे.
करोडो डॉलर्सच्या उलाढालीचा हा एक नवाच उद्योग आता जगाचे अर्थकारण
व्यापू पाहत आहे. याचा मुखवटा मानवतावादी अथवा माहीत नसणाऱ्या भविष्याच्या
चिंतेचा असल्याने सर्व लोक मग ते सर्वसामान्य असो वा कार्पोरेट एका सुरात ही चिंता
आळवायला लागतात. त्यात काही शहाण्यांनी ही गोष्ट सामाजिक बांधीलकी अथवा
देशाचे भवितव्य, मुलाबाळांचे भविष्य याच्याशी जोडल्याने तर हा विषय ऐरणीवर आला
आहे. क्योटो-प्रोटोकॉल हा सर्व प्रश्न सोडवेल, एकटा कार्बन डाय ऑक्साईडच
सगळ्याला जबाबदार आहे अशी आवई उठवली की झाले काम. काही प्रगत कॉम्प्युटर
मॉडेल्सच्या साहाय्याने एकदा का सर्वनाशाची काही काल्पनिक चित्रे तयार के ली की
झाले काम. अशी भूमिका घेऊन कसे चालेल? पण नाही. जर का यामुळे अनेक संस्थांना,
शास्त्रज्ञांना प्रचंड प्रमाणात अनुदाने मिळणार असतील, ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली
जर करोडो डॉलर्सच्या थैल्या मोकळ्या होणार असतील तर कोणाला नको आहे? आज
युरोपीय देश आणि अमेरिका यांचे शेकडो बिलियन डॉलर्सचे ग्लोबल वॉर्मिंगचे बजेट
आहे. मधून मधून अशी आवई उठत राहिली की त्या दिशेने काहीही काम न करता प्रचंड
रक्कम पदरात पडून घेता येते. म्हणजे थोड्याफार फरकाने हे एखाद्या खंडणी
बहाद्दरासारखे कृ त्य झाले. फरक इतकाच की खंडणी कोणीही आयुष्यात दोनदा देत
नाही. इथे मात्र अव्याहतपणे हा धंदा चालू ठे वता येतो.
राजकारण्यांना तर काय यामुळे बरकत येतेच. निवडणुकीकरता मुद्दा मिळतो,
पर्यावरण प्रदूषित करणारे आणि पर्यावरणाच्या नाशाबद्दल प्रामाणिकपणे लढा देणारे
दोघांनाही गुंडाळता येते. भाबडे चळवळवाले एखादा राजकीय पक्ष हे समजून घेतो
के वळ यामुळेच हर्षभरित होतात; तर प्रदूषण करणारे बेमुर्वतखोर किमतीचा अंदाज
आल्याने खुश होऊन थैल्या मोकळ्या करतात. मूळ मुद्दा तिथेच राहत असल्याने परत
पुढच्या निवडणुकीला नवीन आरोळ्या ठोकता येतात. - उद्योग क्षेत्रात तर काय नफा हाच
परवलीचा शब्द असल्याने त्यांची सगळी गणिते त्या भोवती फिरत असतात. कार्बन
उत्सर्जन कमी करण्यासाठी छोट्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या बनवण्याची
टूम निघते तेव्हा अशा गाड्या वजनाने कमी असणे गरजेचे असल्याने जास्तीत जास्त
प्लास्टिक वापरून बनवल्या जातात. मग नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकचे काय? त्याने
पर्यावरणाचा नाश होतो का फायदा? इंधन महाग के ले की त्याचा वापर कमी होऊन
आपोआप पर्यावारांचे रक्षण करता येते ही गोष्ट मान्य के ली जाते आणि जेव्हा त्याचे
प्रयत्न सुरू होतात, तेव्हा जगातील सगळ्या कार कं पन्यांच्या लॉबीज आपली माणसे
सत्ताकें द्रांपुढे कामाला लावतात आणि मग इतका मोठा दबाव गट तयार होतो की प्रगत
राष्ट्र ‘ओपेक' या तेल उत्पादक देशांच्या संघटनेला तेल उत्पादन वाढवण्यास भाग
पडतात. अमेरिके सारख्या समृद्ध देशात गेल्या ५० वर्षात (ज्या काळात तेलाने त्या देशाचे
अर्थकारण घडवले/बिघडवले आहे) या असल्या लॉबीजनी एकही ट्रेन सर्विस सुरू करू
दिलेली नाही. जेव्हा आपले अर्थमंत्री शेती मुख्य व्यवसाय असणाऱ्या या देशात कारवर
सबसिडी देण्याचे धोरण राबवतात तेव्हा ह्याच लॉबीजनी त्यांना घेरलेले असते. हे सर्व
एकीकडे; तर दुसरीकडे पर्यावरणवादी वातावरण बिघडत असण्याच्या असल्या
इशाऱ्यांमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातूनच करोडो डॉलर्स उभे करतात आणि मग सुरू होते एक
वेगळेच राजकारण. ज्यात सरकारचे वेगवेगळ्या संसाधनांवर नियंत्रण आणण्याचे धोरण
राबवण्यासाठी विकासाचा बळी दिला जातो. एकदा का सरकारने लक्ष घातले की मग
काम सोपे असते; कारण एक विरोधी पक्ष असतोच तो ताबडतोब हे मुद्दे उचलून धरतो
मग पर्यावरण बाजूला पडते आणि जनतेच्या कै वाराच्या नावाखाली सत्तेचे, विकासाला
खीळ घालणारे राजकारण सुरू होते. राजकीय पक्षांचे सत्तेचे आयुष्य आणि सामाजिक
भान अतिशय अल्प असल्याने आणि त्यांची एकू णच भूमिका अतिशय तात्कालिक,
सत्तेपुरती आणि बेजाबदारपणाची असल्याने यातून काहीही साधत नाही, ना विकास ना
पर्यावरण रक्षण.
कार्पोरेट क्षेत्रातली चढाओढ, त्यासाठी देण्यात येणारे काटशह हे इतक्या प्रमाणात
असतात की एखाद्या कं पनीच्या एखाद्या प्रकल्पाला विरोध करताना पर्यावरणवादी,
राजकारणी या सगळ्यांना वेठीला धरून आपले काम पार पडले जाते. जनमत
भावनिकदृष्ट्या पेटवणे सोपे असल्याने पर्यावरण हे कारण फारच मस्त आहे. वास्तविक
पाहता अक्कलशून्य राजकारणी आणि बेमुर्वतपणे नफ्याचे धोरण राबवणारे
कापेरिटमधील दलाल यांनी जे पुढच्या पिढ्यांसाठी वाढून ठे वले आहे ते एखाद्या
मनुष्यवधाच्या गुन्ह्याइतके च अमानुष आणि धोक्याचे आहे की त्यापुढे पर्यावरणातील
बदल हा फारच क्षुल्लक मुद्दा ठरावा. या लोकांनी ज्या पद्धतीने देशांच्या सीमा शिल्लक
ना ठे वता जगभर जी लूटमार चालवली आहे तिचा हिशेब मांडला पाहिजे. तोपर्यंत
पर्यावरण हे सगळ्यांना धंदा देणारे एक बारमाही पीक म्हणून नावाजले आहेच.
२९. माणसे - भरमसाठ आणि चिल्लर

माणसाला ज्यात आनंद आणि यश मिळते ती गोष्ट तो परत परत करेत राहतो
आणि मग दर ४० वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होत जाते. आपण सतत लोकसंख्येचा
गंभीरपणे विचार करतो पण हा गंभीरपणा आपण योग्य वेळी ठे वत नाही.
- समाज शास्त्रज्ञांच्या नोंदी

वरील विधाने ही विनोदी असली तरी त्यातला एक सत्य संदेश आहे जो


आपल्याला कळत नाही असा संशय यावा इतकी लोकसंख्या वाढते आहे. गती किती
म्हणजे जगात दर सेकं दाला सरासरी ४ मुले तर, मिनिटाला २५२ मुले जन्म घेत आहेत.
तुम्ही हे वाक्य वाचेपर्यंत १४ मुले जन्माला आली असतील.
नुकतीच आपल्या भारतात जनगणना पार पडली. आपली वाढ तर जगात
विलक्षण आहे. आपली लोकसंख्या १९३५ साली ३५ कोटी होती, दहा वर्षांपूर्वी १०२
कोटी होती आणि ती यावर्षी १२५ कोटीपर्यंत जाऊन पोचली आहे.
- म्हणजे गेल्या दहा वर्षात आपण २३ कोटींची भर घातली.
- म्हणजे दरवर्षी सरासरी २ कोटी माणसे या पवित्र देशात जन्माला येत होती.
- न्यूझीलंड नावाच्या देशाची लोकसंख्या साधारण ४३ लाख म्हणजे अर्ध्या
कोटीपेक्षा कमी. म्हणजे आपल्या मुंबईच्या एक पंचमांश.
- म्हणजे त्या मापाने आपण जवळपास दोनच्यावर न्यूझीलंड दरवर्षी इथे निर्माण
करतोय.
- 'राष्ट्र निर्माण म्हणजे काय रे भाऊ' असे आता कोणीही विचारू नये.
- आज जगसुद्धा सात अब्ज म्हणजे ७०० कोटीपर्यंत जाऊन पोचले आहे. म्हणजे
आपला वाटा त्याच्या २०% येतो.
- म्हणजे जगातील दर १० माणसामागे २ माणसे भारतीय आहेत.
आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे याचा अभिमान बाळगायचा की
काळजी हा ज्याचा त्याचा प्रश्न! असो. जगाची लोकसंख्या दरवर्षी १.३% ने वाढत
असताना आपण २१%, चीन १२%, पाकिस्तान ५%, नायजेरिया आणि बांगलादेश ४%
तर इंडोनेशिया ३% ने वाढतो आहे. एका अंदाजानुसार जगाची लोकसंख्या २०५० साली
आठ ते दहा अब्ज असण्याची शक्यता आहे. अर्थात लोकसंख्या कमीजास्त असणे अशा
दृष्टीने याकडे पाहता येत नाही. युरोपातल्या अनेक शहरांच्या लोकसंख्येची घनता ही
भारतापेक्षा अधिक आहे. जेव्हा लोकसंख्येमुळे विकास आणि मूलभूत गरजा यांवर
असह्य ताण येतो तेव्हा प्रश्न निर्माण होतो. विकास जेव्हा अतिरेकी पद्धतीने आणि
कोणताही विचार न करता होऊ लागतो आणि गरजांकडे सतत दुर्लक्ष के ले जाऊ लागते
तेव्हा मात्र लोकसंख्या हा विचारवंतांच्या चर्चेसाठी आवश्यक मुद्दा बनतो.
विकसनशील देशांना विकसित राष्ट्रांनी जे विकासाचे व्यर्थ व्यसन लावले आहे
त्याने त्या देशांचे शेअरबाजार उंचावत असतील; पण लोकांचे जगणे मात्र खालावले
आहे. जमिनी ओस पडल्या आहेत, कृ षी उत्पादनातील विविधता कमी होते आहे. शेतीचे
एखाद्या कोर्पोरेट व्यवसायात रूपांतर होऊन त्यावर जगणाऱ्या माणसांचा नाही तर एका
संस्कृ तीचाच नाश होऊ पाहत आहे. ग्रामीण जीवन सडत चालले आहे तर शहरे फगत
चालली आहेत; हे सुदृढपणाचे लक्षण नसून सूज आहे याचेही सामान्य ज्ञान आणि भान
या देशातल्या हुशार आणि जग पाहिलेल्या समाजकर्त्यांना उरलेले नाही. अकार्यक्षम
सरकारे, मंद प्रशासन आणि स्वत:च्याच पुढच्या पिढ्यांच्या बेगमीत गुरफटलेले राज्यकर्ते,
विस्कळीत राज्यकारभार, अडाणी जनता हे एकीकडे तर वाढणारी अमर्याद लोकसंख्या
दुसरीकडे असे विकसनशील राष्ट्राच्या विकासाचे भयाण वास्तव आहे. याचे खापर सतत
लोकसंख्येवर फोडणे हे सोयीचे असले तरी योग्य नाही.
लोकसंख्या भरमसाठ होण्याची कारणेही अनेक आहेत. त्यात सामाजिक
जाणिवेचा अभाव, अडाणी असणे, धर्माची थोतांडे, सरासरी आयुर्मानातील वाढ,
संपत्तीची हाव अशा अनेक गोष्टी येतात.
'प्रगती आणि वाढ' हेच मानवी आयुष्याचे गेली काही सहस्त्र वर्षे प्रवासध्येय आणि
भागधेय आहे. उत्क्रांती, नावीन्याचा शोध, पसरत राहणे, स्थलांतर, वर्चस्व स्थापित
करणे, वसाहत करणे, वेगाने झालेले औद्योगिकीकरण आणि अलीकडच्या काळात ज्या
जमिनीवर आपण राहतो तिचा नाश हे मानवाच्या वाटचालीचे सूत्र राहिले आहे. गेली
अनेक वर्षे जगाची लोकसंख्या हा आपल्या सगळ्यांचा चिंतेचा विषय राहिला आहे.
विशेषत: भारताच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल जगातील प्रगत देश आणि आपल्या
देशातील (अप्रगत) विद्वान सतत चिंता व्यक्त करत असतात. अर्थातच लोकसंख्येच्या
प्रश्नाचे आपण रोज बळी ठरत आहोतच. त्यात काही खोटे नाही. आपल्या जनगणनेने
खरोखर सगळ्याच माणसांची गणती के ली असेल का याची शंका घ्यायलासुद्धा आज
जागा आहे. मग किती माणसे सुटली असतील? मग ती इथे कशी राहत आहेत? त्यांच्या
नागरिकत्वाचे काय? असले अस्वस्थ करणारे प्रश्न क्षणभर बाजूला ठे वू. पण ती माणसे
जर इथल्या साधनसंपत्तीत वाटा सांगत असतील तर हे कोणाचे नुकसान आहे? त्यांच्या
अशा राहण्याकडे दुर्लक्ष करणे हे कोणाच्या तरी हिताचे आहे काय?
लोकसंख्येने माणसांपुढे जे अनेक प्रश्न उभे राहतात त्यात साधनसंपत्तीचे असमान
वाटप, शिक्षणाच्या, नोकरीच्या संधींपासून वंचित होणे, आर्थिक असमानता वाढणे,
कामाचे मोल न उरणे, जगण्याच्या मूलभूत हक्कांवर गदा येणे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न
अशा अनेक बाबी सामावलेल्या असतात. काही विद्वान एक सर्वांत महत्त्वाचे विधान
करतात ते म्हणजे लोकसंख्यावाढीने माणसाच्या जगण्याला प्रतिष्ठा उरत नाही.
थोड्याफार प्रमाणात आपणही असाच विचार करत असतो. मात्र हे नीट तपासून
पाहायला गेले तर मग खरोखरच माणसांची प्रतिष्ठा गमवायची कारणे लोकसंख्यावाढीत
आहेत की गरिबीत आहेत, असाही एक मुद्दा उपस्थित होतो. हे आर्थिक दैन्य त्यांच्यावर
कोणी लादले आहे? लोकसंख्येच्या भस्मासुराने का इतर काही कारणांनी? संपत्तीचे
असमान वाटप हा कारणाचा विषय का परिणामाचा? वसाहतवादाच्या काळापासून संपन्न
राष्ट्रांनी जे इतर राष्ट्रांना नागवले आहे त्यातच याचे मूळ कारण तर नाही?
२००-३०० वर्षांपूर्वीचा वसाहतवाद आणि आत्ताचा आर्थिक मुक्ततेचा, मुक्त
बाजारवाद यांनी जगण्याच्या या प्रतिष्ठेला कितपत नेस्तनाबूत के ले आहे? तेव्हाच्या
जुलमी आणि स्वार्थी साम्राज्यवाद्यांची जागा आता विस्तारवादी कं पन्यांनी तर घेतलेली
नाही? 'साम्राज्यावर सूर्य मावळत नाही' असले सत्तेचे घृणास्पद माज आणि कितीही
वाढली, मोठी झाली कं पनी तरी कमीच असे ध्येय असणारे नफ्याचे लोभ यांच्यात साम्य
आहे का? असेल तर यांनीच तर ही गरिबी नाही ना वाढवली? पूर्वी माणसांची गुलाम
म्हणून खरेदी/विक्री करणारे, त्यांच्या श्रमाने, त्यांच्याच देशातील संपत्तीची अमाप लूट
करणारे काही साम्राज्यवादी देश (शरमेची बाब ही की त्या जुलमाची इतकी खोलवर
सवय झाली आहे की आजही आम्ही त्या देशांच्या त्या वंशाच्या, राजघराण्याची स्मारके
आमच्या स्वतंत्र देशात बाळगून आहोत.) आणि जगातील देशांवर विकासाच्या भ्रामक
कल्पना लादून, त्या देशांचे अर्थकारण ताब्यात ठे वत अनेक माणसांना जगण्यासाठी
नालायक करणारे यात गुणात्मक फरक तो काय? एक सत्तेच्या मार्गाने पिळवणुक करत
होता आणि दुसरा आर्थिक मुखवट्याखाली माणसांचे जिणे कवडीमोल करतो आहे
इतके च. यांचा विचार असा की एकदा का असल्या देशातील आर्थिक धोरणे आपल्या
हातात ठे वली की मग तिथली सामान्य माणसे जगायला नालायकच. मग ते त्या सार्वभौम
देशाचे नागरिक असले तर आपले काय बिघडले? त्यांची सरकारे त्या माणसांच्या
अवस्थेला जबाबदार आहेत. त्या राष्ट्रांची लोकसंख्या त्याला जबाबदार आहे. पण त्या
देशातला मजूर स्वस्त राहण्यासाठी तिथे लोकसंख्या वाढली पाहिजे, तरच आपले नफे
वाढतील, त्या देशातला शेतकरी गरीब होत मेला पाहिजे तरच आपल्या शेतीमालाला
उठाव येईल, त्या देशातले वैविध्य नष्ट झालेच पाहिजे तरच आपली जीवनपद्धती आदर्श
ठरेल आणि मग ती विकता येईल, त्या देशातल्या बाजाराचे नैसर्गिक सामर्थ्य प्रचंड आहे.
म्हणजे तेवढा आपल्या उत्पादनांचा खपही प्रचंड. नफाच नफा. हा एका नव्या
वसाहतवादाचा बिगुल वाजतो आहे (आणि वर पाहता हा साम्राज्यशाहीचा नसल्याने तो
निपटून काढणेही अवघड आहे)
...लोकसंख्यावाढीने भरमसाठ माणसांचे संकट उभे के ले असेलही पण ती माणसे,
त्यांचे जगणे, चिल्लर व्हायला, त्यांच्या आयुष्याचा खुर्दा व्हायला काही वेगळीच कारणे
आहेत.

३०. धुके दाटलेले उदास, उदास


शरीर आणि मन यांच्या अनवट नात्यांचे खरे तर अनेक पदर अनुभवास येतात.
आयुष्यात गाठावयाच्या साध्याचा जे सतत ध्यास धरते, त्याचे चिंतन करते ते आपले मन
आणि जे या साध्यासाठी प्रभावी साधन म्हणून वापरले जाते ते शरीर असे सरळसोट
संबंध. आपले वयोपरत्वे थकणारे, शिणणारे शरीर अशक्य ते शक्य करू शकते ते के वळ
मनाच्या जोरावर. आतून एक ताकदीचा, इच्छांचा, प्रबळ वेगवान असा प्रवाह येतो आणि
शरीर त्याला साद देताना स्वत:ची संपूर्ण बाजी लावत चमत्कार घडवून आणते असे
अनेक थरारक अनुभव खेळाडू, कलाकार, गिर्यारोहक, वृद्ध राजकारणी अशा अनेकांना
सतत येत असतात. व्यावहारिक अर्थाने वृद्धत्वाचे थकलेले उंबरठे ओलांडूनसुद्धा,
स्वत:ची कार्यक्षमता टिकवणारी विविध क्षेत्रातील अनेक तळपती माणसे आपण पाहतो
ती शरीर-मनाच्या या अनवट तादात्म्यतेचे विलक्षण असे पुरावे आहेत. मात्र के व्हातरी,
कधीतरी कोणाच्या तरी संदर्भात ही तादात्म्यता भंग पावते, हे अनवट नाते कोलमडते
आणि मग त्यांचा प्रवास नैराश्याकडे सुरू होतो. ज्या शरीराने ऐकायचे, आतल्या प्रेरणांना
दृश्य स्वरूप द्यायचे ते शरीर उलटेच वागू लागते. ते स्वत:चे कमकु वत होणे मनावर लादू
पाहते. म्हणजे बाहेरून आत असा प्रवाह सुरू होतो. हे म्हणजे जे साधन आहे त्यानेच
साध्याच्या प्रेरणेचा ताबा घ्यायचा. त्यानेच प्रेरणा ठरवायच्या आणि सांगायचे की अमुक
शक्य नाही. गाडीने ठरवायचे आज मालकाने कु ठे च जायचे नाही...असेच नाही का? मग
काही करावेसे न वाटणे हेच वाटू देणे हा एक स्वभाव बनत जातो. इथे शरीर मनावर
परिणाम करत असते.
नैराश्य किंवा विषण्णता हा रोग नाहीतर आजमितीला जागतिक पातळीवर
असणारी दुरवस्था आहे. आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार नैराश्य ही चौथ्या
क्रमांकाची व्याधी आहे आणि २०२० पर्यंत ती दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकते. जगण्याचा
असणारा अनुत्साह, कोणत्याही गोष्टीत आनंद न घेण्याची अवस्था, स्वत:त रमणे,
आवडणारा एकटेपणा, औदासिन्य, विफलता या सगळ्या मानसिक अवस्था नैराश्याचे
प्रकार आहेत. जगभरात आज ३४ कोटी लोक नैराश्याने ग्रासलेले आयुष्य जगत आहेत.
विशेष म्हणजे दर ३ स्त्रियांतील एक स्त्री आणि दहा पुरुषांमागे एक पुरुष आज नैराश्याने
पीडित आहे. (अर्थात हे आकडे पूर्णत: खरे असतील असे नाही. कारण स्त्रिया नैराश्याने
ग्रासून डॉक्टरांकडे जातात मात्र पुरुष आपल्याला नैराश्याने ग्रासले आहे हे मान्य
करायला सहज तयार होत नाहीत!) एकट्या अमेरिके त नैराश्याने ग्रासलेल्या लोकांचे
प्रमाण २३% आहे, याचा एक अर्थ असा निघतो की के वळ भौतिक समृद्धी असणे,
जगण्याच्या सुखसोयी असणे म्हणजे नैराश्य नसणे असे काही नाही. ये मन का मामला
है! ते कोणत्याही कारणाने येऊ शकते. एखादी छळणारी भीती, जाणवणारी
असुरक्षितता, कोणत्या न कोणत्या कारणाने मनावर येणारा सततचा ताण, आणि काही
के सेसमध्ये स्वत:हून कमी के लेली शारीरिक हालचाल, होय. हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका
विस्तृत सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले होते की, सततची शारीरिक हालचाल ही नैराश्याला दूर
ठे वते. या सर्वेक्षणात असेही समोर आले की, मेंदूच्या सुदृढ आरोग्यासाठी शारीरिक
हालचाल असणे अतिशय आवश्यक आहे. याचा अर्थ असा होतो की, अतिशय कमी
शारीरिक हालचाल करणाऱ्या लोकांना नैराश्याने ग्रासलेले असू शकते. पण नैराश्य
म्हणजे के वळ दुःखी असणे नाही.
आता थोडे वेगळ्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहू. मनाला हतबल, हताश, उदास वाटणे
ही आयुष्याच्या चालू असणाऱ्या सततच्या संघर्षात येणारी एक स्वाभाविक अवस्था
आहे. याचे दृश्य स्वरूप वेगवेगळे असू शकते. जसे काही लोकांना नैराश्य आले की
आपण एखाद्या पोकळीत जगतो आहोत असे वाटते; तर काही नैराश्यग्रस्त लोक
चिडतात, आक्रमक किंवा अस्वस्थ होतात. काहीही करावेसे न वाटणे आणि कोणत्याही
कारणाशिवाय येणारा अनावश्यक संताप, सगळ्यांपासूनचे येणारे तुटलेपण हे सगळे
नैराश्याचे प्रकार आहेत. दृश्य लक्षणे काहीही असोत नैराश्य तुमच्या जगण्याच्या, एखादे
काम करण्याच्या, निवांत झोपण्याच्या, या जगात रमण्याच्या सगळ्या शक्यतांवर सतत
विरजण मात्र घालत असते.
दुसरा मुद्दा आहे तो मनाच्या या अवस्थेला काही औषधांनी दुरुस्त करण्याचा. इतर
कोणत्याही रोगाप्रमाणे सतत औषधे घेणे हा काही नैराश्यावरचा उपाय नाही. थोडे
वस्तुनिष्ठपणे बघायचे झाले तर नैराश्याचे दुष्परिणाम जे शरीरावर होत असतात त्यावर
औषधे असू शकतात. बहुतांशी वेळा (आणि याचा डॉक्टरांच्या रोगी बरा करण्याच्या
क्षमतेशी काहीही संबंध नाही) नैराश्याचे मूळ कारण के वळ औषधांनी दूर करणे अवघड
असते. नैराश्याचे मूळ कारण हे एका वैद्यकशास्त्राला अवघड अशा असणाऱ्या मनाच्या
कक्षेत जाते आणि आपल्या आधुनिक उपचारांचा सगळा भर हा शारीरिक असल्याने
अथवा थोडे पुढे जाऊन,आधुनिक वैद्यकशास्त्राला मन ही संकल्पनाच पूर्णत: मान्य
नसल्याने अशी औषधे हा एक अंधारात मारलेला बाण आहे. मूळ कारणावर दुसरे आणि
अतिशय महत्त्वाचे म्हणजे असल्या औषधांचे अत्यंत दूरगामी आणि दुर्धर असे
परिणामही आहेत. म्हणजे एखाद्या बाबा, बापू अथवा तथाकथित विभूतीला भेटल्याने
आपल्याला बरे वाटते असे समजणे जितके तर्क संगत आहे तितके च नैराश्यावर त्याच्या
मूळ कारणांवर औषधे घेतले की झाले असे समजणे तर्क संगत आहे. म्हणून नैराश्यावर
उपचार करताना औषधांपेक्षा रुग्णाला त्याच्या रोगाविषयी माहिती देणे, त्याची भीती
घालवणे, सतत त्याचे समुपदेशन करणे हे जास्त महत्त्वाचे असते. याला 'सायकोथेरेपी'
असे नाव आहे आणि त्यात औषधे नाहीत तर संवाद आहे. तरीही औषधे देणे आणि घेणे
हे फॅ शनेबल असल्याने डॉक्टर्स औषधे देतात, रुग्ण घेतात आणि मग या औषधांमुळे,
त्याच्या साईड इफे क्टने शरीर कमजोर होऊन अधिकच हालचाल करेनासे होते आणि
त्यामुळे परत नैराश्य वाढीला लागते.
आपल्या आधुनिक जीवनपद्धतीनेही नैराश्य वाढीला लागले असेल असेही म्हणता
येऊ शकते. कधीकधी तर सध्याच्या जगण्यातला वेग हा माणसासाठी मुळात योग्य आहे
का असाच एक मूलभूत प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. माणूस पूर्वी शांतपणे जगात
होता. त्यात सहजीवन होते. निसर्गाच्या सहवासात ऊन, पाऊस, थंडी, वारा सगळे
अंगावर घेत जगत होता. तो समूहात होता, त्याच्या जीवनपद्धतीत त्याने समूहात कसे
जगावे यासाठी काही निसर्गत: अशी एक व्यवस्था होती. आपल्याकडच्या सर्व सण-
समारंभांचे निसर्गाशी, त्याचे ऋतू बदलण्याच्या काळाशी असणारे नाते नेमके हेच सांगते.
रोज उठून चुकीचे जगायचे आणि मग सामाजिक समरसतेची व्याखाने ऐकायची यापेक्षा
समाज समरस करणाऱ्या जीवनपद्धतीत नुसते जगणे सोपे आणि चांगले ठरेल. सुख
वाटण्याची, दुःख सोसण्याची तजवीज रोजच्या जगण्यात असणे हे दु:खावर खूप सखोल
आणि उलटसुलट संशोधन करण्यापेक्षा सोपे नाही का? माणूस जसजसा प्रगत (?) होत
गेला, त्याचे आयुष्य वेगवान होत गेले तसे एकटे राहण्याची, स्वत:तच रमण्याची,
स्वत:च्या गरजेपायी इतरांची पत्रास न बाळगण्याची एक नवीनच व्याधी (?) मागे लागत
गेली. त्यातून मग वाटून घेण्याचे, शेअर करण्याचे प्रसंगही हळूहळू कमी होणार हे
क्रमप्राप्तच आहे. मग ज्यांच्याबरोबर जगायचे त्यांच्याशीच शेअर करण्यापेक्षा, के वळ
शेअर करण्यासाठी सध्या कॉन्सिलर नावाची एक नवी जमात अस्तित्वात आली.
पाश्चिमात्य समाज हा वैयक्तिक जगण्यावर भर असणारा आहे. (आपण मात्र अति
सामाजिक आहोत- घरातला सत्यनारायण, पूजा साऱ्या गल्लीला ऐकवण्याइतके - ही
देखील अक्षम्य चूकच). मनात साचणारे कल्लोळ सांगावे आणि ते कोणी तरी ऐकावे असे
आता परदेशातील समाजव्यवस्थेतच काही उरलेले नाही. माझा आनंद तो माझा आणि
माझे दुःख हेही माझेच असा प्रकार आहे. मनात दाटणारे सारे मळभ, त्यात येणारे
विषण्ण, उदास विचार मोकळे करण्याची सोय असावी अशा कु टुंब संस्था, सामाजिक
संस्था अशा मर्यादित रचनेचीसुद्धा पाश्चिमात्य लोकांना गरज वाटत नाही. त्यातले गुंतणे
हे शेवटी मन-शरीराच्या संतुलनाचे आयाम आहेत हे त्यांना पटू शकत नाही. कारण मी
एकटा माझ्यासाठी पुरेसा आहे असा बुद्धिमत्तेचा वसा त्यांनी आत्मसात के ला आहे.
एकटे राहणे ही जर बुद्धिमत्ता असेल तर स्वत:शी संवाद ठे वून समाजात नीट वावरता
येणे हे शहाणपण आहे इतके साधे सूत्र नवीन जीवनपद्धतीत नाकारले जात आहे. ही
गफलत हे गोंधळ, मानवाच्या बुद्धिमत्तेने त्याच्या उपजत शहाणपणाचा के लेला दारूण
पराभव आहे. हे आपणच ओढवून घेतलेले दुखणे आहे. काम णानुकत्याच एका
संशोधनात असे लक्षात आले की, नैराश्य कमी करण्यासाठी दिनक्रम सूर्याच्या
उदयास्ताच्या बरोबरीने ठे वणे, संघर्षात मनन करणे, शारीरिक हालचालीचे सातत्य राहील
अशी रोजची जीवनपद्धती असणे, लोकांशी संवाद साधण्याच्या अधिकाधिक संधी
निर्माण करणे आणि व्यवस्थित झोपणे अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे
प्रगती प्रगती म्हणत आपण पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी येऊन थांबणार आहोत.

३१. बाजार मूलतत्त्ववादाचा धोका

अर्थशास्त्राचा एक मूलभूत नियम असा आहे की ते मागणी आणि पुरवठा यांवर


चालते. म्हणजे त्यातल्या वस्तूची किंमत ही मागणीवर आणि उपलब्ध पुरवठ्यावर
अवलंबून आहे. हा आर्थिक सिद्धान्त मांडताना त्यामुळे नैतिकतेचा एक गृहीत मापदंड
असावा लागतो. कारण मागणी अणि पुरवठा या दोन्ही गोष्टी एखाद्या स्वारस्याला, हेतूला
बळी जाऊ शकतात. म्हणजे मागणी कृ त्रिमरीत्या वाढवता येते तसे पुरवठाही कमीजास्त
करता येतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा एका मार्गदर्शक सूत्रात, शिस्तीत
ठे वण्याची एक सततची जबाबदारी शासनयंत्रणेवर आहे. अर्थव्यवस्थेचे संचालन
करताना आवश्यक ते निकष प्रस्थापित करून ते पाळले जातील, मक्तेदारी होणार नाही
याकडे लक्ष ठे वणे हे सर्व त्यात आले.
गेल्या ३०-४० वर्षांपासून मात्र मूळ चौकट बदलणारे आर्थिक उदारवाद,
नवउदारमतवाद, मुक्त व्यापारवाद असे अनेक नवनवीन प्रवाह अर्थकारणात येत आहेत.
यातले काही एखाद्या समस्येवरचा उपाय म्हणून आले तर काही हेतुत: आणले गेले.
कोणत्याही गोष्टीत होणारा बदल ही एकच कायम गोष्ट आहे हे मान्य, बदल आत्मसात
के ल्याशिवाय या जगाचा प्रवास इथपर्यंत झाला नसता हेही कबूल. पण आत्ता उभा
ठाकलेला प्रश्न, बदलांना आत्मसात करण्याचा, वळण देण्याचा नाहीच तर अनैसर्गिक
बदल लादण्याचा आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे दोन्ही सोयीने अमर्याद
नफ्यासाठी, उलटसुलट पद्धतीने वापरण्याचा आहे. पुरवठादार महत्त्वाचा करून त्याच्या
सोयीने मागणीच बदलायची. एखाद्या गोष्टीची खप मागणी असेल तर परवठा अमकच
ठिकाणाहूनच कसा होईल हे पाहायचे आणि एखाद्या वस्तूची गरज नसताना तिची सवय
निर्माण करण्याची योजना बनवायची आणि मग ती आवश्यक नसणारी वस्तू अथवा
उत्पादन गळ्यात मारण्यासाठी निरनिराळे मार्ग वापरायचे. विकसनशील राष्ट्रांच्या
विकसित होण्याच्या नैसर्गिक इच्छांना एक कु टील स्वरूप देताना त्यांना आधी
गरजांची सवय लावायची आणि मग या गरजांना, शिस्त, सुसुत्रता आणायच्या नावाखाली
आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र यंत्रणा उभी करायची, नव्या शर्ती लागू करायच्या,
स्वत:चा फायदा करून देणाऱ्या धोरणांवर जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेत साम,
दाम, दंड, भेद वापरून एकमत घडवून आणायचे अणि मग ही विकसनशील राष्ट्र
फायद्याच्या एखाद्या करारात बांधून टाकायची. या राष्ट्रांच्या आर्थिक रसदीच्या,
व्यवहारांच्या नाड्या ताब्यात ठे वायाच्या हेतूने बऱ्याच सावकार संस्थापण निर्माण
करण्यात आल्या आहेत. विकसनशील राष्ट्रांच्या मूळच्या जीवनपद्धतीचा कणाच मोडून
काढायचा. विरोधाभास असा की बाजार मूलतत्त्ववादाची रचनाच कोणतेही नियंत्रण,
सार्वमत आणि लोकशाही न मानणारी आहे, आणि ह्या बाजार मूलतत्त्ववादाचे पुरस्कतें
देश मात्र जगात जगात सगळीकडे लोकशाही आणायच्या गमजा मारत, गरीब लोकांच्या
आयुष्याचा बाजार करत आहेत. ह्यांनी निर्माण के लेल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था ह्या
फक्त त्या देशात होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्याची सोय लावण्यासाठी वापरल्या गेल्या
आहेत. ज्या देशात आपण उत्पादन विकतो त्या देशांतर्गत ते उत्पादन महाग कसे होईल
हे पाहायचे. त्यासाठी आपल्या वैश्विक छत्रछायेचे पाश, हितसंबंधांचे बळ वापरायचे.
कोणत्याही प्रगत झालेल्या राष्ट्राला हे जाळे नाकारता आलेले नाहीये. कार
'अर्थस्य जगो दासः' असेच गेल्या पाच दशकातील जगाचे आर्थिक व्यवहार चालू
आहेत. या बाजार मूलतत्त्ववादाने जर कोणते अनैतिक काम के ले असेल, तर ते या
असल्या अनैसर्गिक बदलांना अधिष्ठान देण्याचे. आता तर त्याने अर्थव्यवस्थेच्या मूलभूत
चौकटीच उद्ध्वस्त होतात की काय अशी भीती आहे. मुळात बाजार मूलतत्त्ववाद म्हणजे
काय? तर 'बाजार संपूर्ण बंधनमुक्त करून होणाऱ्या आर्थिक/सामाजिक परिणामांची
जबाबदारी बाजारावरच टाकण्याच्या तत्त्वावरचा अंधविश्वास'. कोणताही 'मूलतत्त्ववाद'
(धार्मिक असो व अन्य) हा एखादा अंधविश्वास घेऊन येतोच, प्रश्न विचारण्याची, तपासून
पाहण्याची सोयच उरू नये म्हणून मूलतत्त्ववादासाठी नेहमीच एक फसव्या भाषेचे अणि
कडव्या समूहाचे अधिष्ठान लागते. एकाने सांगावे आणि इतरांनी ते प्रमाण मानावे अशी
माणसांच्या/देशांच्या वैविध्यतेचा, बुद्धिमत्तेचा, कु तूहलाचा अपमान करणारी व्यवस्था तो
जन्माला घालतो. मूलतत्त्ववाद हा फक्त धार्मिकच आहे, आर्थिक कसा असेल अशी
मांडणी हे भामटेपणाचेच लक्षण. सध्या अमेरिके सारखी विकसित राष्ट्र बाजार
मूलतत्त्ववाद की तात्त्विक अर्थकारण यातले काय निवडायचे ह्या विवंचनेत आहेत आणि
भारतात मात्र सरकारचे सर्व क्षेत्रातून हस्तक्षेप काढण्याच्या बेजबाबदार प्रक्रियेला वेग
देण्याचे घाटते आहे.
एकतर भारतात अगोदरच उत्तरदायित्व, जबाबदार असण्याच्या भावनेची सर्व
थरात वानवा, त्यात अधिकाधिक क्षेत्रे परदेशी गुंतवणुकीला खुली करताना, आपला देश
कोणाच्या दावणीला आपण बांधत आहोत? बाजार मूलतत्त्ववादाने, सर्व नियंत्रणे शिथिल
करून वेगाने विकास होईल या भ्रमाने आपल्याला इतके पछाडले असेल तर ही
धोक्याची घंटा वाजवायलाच हवी. अस्वस्थ करणारे मूलभूत सत्य असे, की लोकशाही
आणि मुक्त बाजार ही परस्परपूरक तत्त्वे नाहीत. लोकशाही सरकारचे कर्तव्य हे
मिळालेल्या जनादेशाचा वापर करून समाजात तयार होणारी स्वयंघोषित सत्ताकें द्रे
उद्ध्वस्त करणे, मूठभर लोकांची मक्तेदारी मोडीत काढणे असे आहे. जर अशा
लोकशाही सरकारांनी हे मान्य के ले (आणि ते करत आहेत) की मुक्त बाजाराला आव्हान
देऊ नये तर काय घडेल? भारतासारख्या देशात जिथे अजूनही ४०% नागरिकांना अन्न-
पाणी, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत हक्क नाहीत, राज्यकर्ते बेजबाबदार आहेत, अनेक
खाजगी कं पन्या भ्रष्ट पद्धतीनेच आपली कामे उरकतात तिथे तर या बाजार
मूलतत्त्ववादाने कधीही न भरून येणारे नुकसान होऊ शकते.
अमेरिके त विम्याचे प्राबल्य सर्व क्षेत्रांत याच भावनेतून वाढले. वैद्यकीय क्षेत्रात
लोकांना आरोग्यसुविधा मिळावी हाच हेतू होता, पण सगळे नियंत्रण काढून घेतल्याने
आज तिथे आजारी पडणेही भयप्रद शिक्षा झाली आहे. आजारपण आले की आर्थिक
ताणापेक्षा आवश्यक ते उपचार विम्याच्या नियमावलीत कसे बसतील, विम्यातून भरपाई
मिळेल, या विचारांनीच मानसिकदृष्ट्या ती माणसे अधिक खचतात. तिथले डॉक्टर्स
रुग्णांना एखादी चाचणी/शस्त्रक्रिया सुचवताना विमा कं पनीची परवानगी मागतात; जर
विमा कं पन्या आजारपणाचे निकष ठरवत असतील तर कोणाचे हक्क, आयुष्य
मातीमोल होते आहे? हे मरण आणि एखाद्या धार्मिक अतिरेकी संघटनेने तुम्ही कसे
जगावे/मरावे हे सांगणे यात गुणात्मक फरक तो काय? अमेरिके त एकू ण लोकसंख्येच्या
१७% (५ कोटी, त्यातील ८७ लाख लहान मुले) लोकांना आरोग्यविम्याचे छत्र नाही,
तिथल्या आरोग्यविम्याचा खर्च हा महागाईच्या वाढीपेक्षा पाच पटीने जास्त आहे, हे प्रगत
देशाचे लक्षण आहे? आजमितीला अमेरिका हे एकमेव विकसित राष्ट्र आहे जिथे आरोग्य
सेवा हा नागरिकत्वाचा मूलभूत हक्क नाही. एखाद्या चुकीच्या धोरणामुळे, लोकांच्या
आयुष्याशी अशा पद्धतीने खेळले जाणे हे मनुष्यवधाच्या गुन्ह्यासारखे आहे. हे तर
हुकु मशाहसुद्धा करत नसतील. मग हे धोरण राबवणारे कोण आहेत? या बाजार
मूलतत्त्ववादातील त्रुटी वारंवार दिसनही त्यावरचा विश्वास उडालेला नाही. इतके च नाही
तर बाजार मुक्त करणे हाच प्रगतीचा एकमेव आधार/कारण आहे हा अंधविश्वास वाढीला
लावण्याचे उद्योग सुरू आहेत, जगात सर्वत्र ज्या सब-प्राइम
घोटाळ्याने गोंधळ घातला आणि जगाचे ३५० लाख कोटी रुपयांचे (७.७ ट्रीलीयन
डॉलर्स) नुकसान के ले, जगाच्या एकू ण मार्के ट मूल्याच्या १५% इतका प्रचंड पैसा विरून
गेला, अमेरिके सकट अनेक देशांना मंदीच्या खाईत लोटले तो बऱ्याच प्रमाणात नियंत्रण
नाकारल्याचाच परिणाम होता ना?
इथे हे ध्यानात ठे वलेले बरे, जे घडते आहे, ते अर्थकारणाच्या तांत्रिक चुकांचा
परिणाम नसून काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी, लोकशाही सरकारांना बाजूला
फे कण्याचे धोरण स्वीकारतो आहोत त्याचा अपरिहार्य भाग आहे. जगाचे इतके आर्थिक
नुकसान तर ना महायुद्धे करू शकली ना एखादे धर्मवेडे समूह, या बाजार मूलतत्त्ववादाने
मात्र स्वातंत्र्य, लोकशाही, समता अशा माणुसकीच्या सर्व मूल्यांना उघडपणे हरताळ
फासत जगाला धोकादायक वळणावर आणून उभे के ले आहे.
३२. मुक्त व्यापाराचे पाश

१९७६ ला स्कॉटिश अर्थतज्ज्ञ अॅडम स्मिथने 'वेल्थ ऑफ नेशन्स' हे एक गाजलेले


पुस्तक लिहिले. त्यात उत्पादन आणि वाणिज्य बाबींमध्ये कोणतेही कर अथवा निबंध
नसावेत तसेच अर्थव्यापाराच्या क्षेत्रातून सरकारी यंत्रणांचा हस्तक्षेप पूर्णपणे
थांबल्याशिवाय देशाची संपत्ती वाढणे शक्य नाही असे नावीन्यपूर्ण, आग्रही मत मांडले.
या गृहस्थाला समारे सव्वा दोनशे वर्षानंतरही अनेकजण आजच्या मुक्त
व्यापारप्रणालीचा उद्गाता मानतात आणि त्याचा टिळा लावून विविध देशातले अर्थतज्ज्ञ
मठ चालवताना दिसतात. स्मिथच्या म्हणण्यानुसार आर्थिक बाबी ह्या सामाजिक,
राजकीय बाबींपासून वेगळ्या के ल्या पाहिजेत. त्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान मागरिट
थेंचर ह्यांनी एक NEO LIBERALISM नावाचे नवे धोरण आणले. याला पर्याय नाही
अशा प्रकारचे हे छएज म्हणजे नवीन असे मुक्त व्यापाराची पुढची मांडणी करणारे
धोरण. सर्व राष्ट्रांना सम प्रमाणात विकसित होण्यासाठी एक जागतिक मुक्त व्यापाराची
उत्कृ ष्ट व्यवस्था असा गवगवा करण्यात आला. आता ब्रिटिशांनी जगाच्या कल्याणाचा
विचार करणे हीच मुळात क्रू र थट्टा होती. मुळात मुक्तबाजार ही नैसर्गिक संकल्पनाच
नाही तर लादलेली बाब आहे म्हणून ती सगळ्यांच्या भल्यासाठी असूच शकत नाही.
असो. NEO LIBERALISM म्हणजे काय ते पाहू या.
* उद्योगांना सर्व सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे मग त्याची काहीही किंमत
(सामाजिक अस्थैर्य, विषमता) द्यावी लागली तरी त्यामागे ठामपणे उभे राहणे.
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि व्यापारासाठीच्या या धोरणात संघटीत कामगारांना थारा
नाही, वस्तूंच्या किमतीवरील नियंत्रण काढून माल, भांडवल, आणि सेवा यांना सर्वार्थाने
मुक्त करणे. 'अनियंत्रित बाजार हा आर्थिक वाढीसाठी आणि अंतिमत: सगळ्यांना
फायद्याचा आहे' या सिद्धान्ताच्या फसव्या प्रसाराचे दुष्परिणाम जग भोगतेय.
* सरकारच्या हस्तक्षेपाच्या नावाखाली सामाजिक सेवांसाठी (शिक्षण, आरोग्य)
लागणारा सार्वजनिक पैसा काढून घेणे. अर्थात सरकारी सबसिडी अथवा कर सवलतीला
चालू शकते. म्हणजे परत हे प्रगत देशातल्या शेतकऱ्यांच्याच फायद्याचे झाले.
* नफ्याच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टींवरील (ज्यात नोकरीहक्काचे संरक्षण सुद्धा
येते) सरकारचे नियंत्रण उठवणे.
* सरकारच्या मालकीचे सर्व उद्योग, व्यवसायांचे (ज्यात बँक, रेल्वे, शाळा,
रुग्णालये, वीज, रस्ते, आणि शुद्ध पाणी या व्यवस्था) खाजगीकरण करणे. विकसनशील
देशांना याचे फार भयानक परिणाम भोगायला प्रगत देशांनी भाग पाडले.
* सार्वजनिक संपत्ती ह्या संकल्पनेला विरोध, त्या ऐवजी वैयक्तिक मालमत्तेला
प्राधान्य.
मुळात मुक्त व्यापारव्यवस्था अंमलात आणायची तर विविध देशात रुळलेल्या
पारंपरिक सामाजिक व्यापारपद्धती नष्ट के ल्या पाहिजेत. हे सत्य आहे की पारंपरिक
पद्धतीत एक प्रकारचे शोषण होतेच. पण मग रोगावरचे औषध वेदनाशामक हवे ना! रोग
परवडला असे औषध काय कामाचे? आणि हे औषध देणाऱ्यांचा अनुभव हा जुलमी/
पाशवी वर्तणुकीचा आहे त्याचे काय? परत जगातील सगळ्यांना एकच औषध कसे
चालेल? प्रत्येकाच्या प्रकृ तीप्रमाणे, किमान दुष्परिणाम असणारे हवे. म्हणजेच उपाय हा
रोगाचा सर्वंकष विचार करून शोधला पाहिजे. पण तसे झाले नाही. या मुक्त व्यापाराने
एक अशी अर्थव्यवस्था जन्माला घातली जीत वस्तूंच्या किमती, मनुष्यबळ यात
बाजाराच्या आवश्यकतेनुसार करावे लागणारे बदल हे अपरिहार्यपणे आणि
समाजरचनेचा विचार न करता लादले गेले. IMF आणि वर्ल्ड बँके सारख्या संस्थांनी हे
धोरण क्रू रपणे राबवले. त्या अगोदरच्या देशोदेशींच्या अर्थव्यवस्थेत सामजिक
सौहार्दासाठीची काहीएक व्यवस्था होती. म्हणजे समाजहित डोळ्यासमोर ठे वून काही
बंधने अथवा व्यापार संबंध राहतील असे होते. ते सर्व या नव्या धोरणाने नाकारले. इथे
माझा जुने ते सोने असा सूर नाहीये. पण एखादी व्यवस्था निर्माण करताना जर समाजात
शिक्षण, आरोग्य, अर्थार्जन यात विषमता असेल तर त्यांचे काय करायचे हाही विचार
असायला हवा. इतिहास, राजकीय परिस्थिती आणि अर्थशास्त्र या तिन्ही गोष्टी तुम्ही
एखाद्या देशात वेगळ्या कराव्यात का, हा कळीचा मुद्दा आहे. खरे तर राजकारण,
अर्थशास्त्र आणि इतिहास हे वेगळे करता येत नाही. राजकीय व्यवस्था हा अर्थव्यवस्थेचा
आधार आहे. इतिहास (सत्य असेल तर) तुम्हाला त्या भूभागाच्या प्रवासाची कहाणी
सांगतो. दुर्दैव असे आहे की ह्या तीनही गोष्टी शाळेपासून वेगळ्या अशा पद्धतीनेच
शिकवल्या जातात की जोडणी नाकारण्याचीच प्रवृत्ती तयार व्हावी. पुरातन काळातील
व्हेनिस, जिनीवा, खैबर खिंडीतून होणारा व्यापार हा दोन्हीकडची जीवनपद्धती समृद्ध
करणारा होता. त्यात दोन्ही बाजूंचे हित पाहण्याचे स्वातंत्र्य होते. अशा स्वाभाविक
देवाणघेवाणीचे एकमेकांत विणलेले गोफ नाकारल्यानेच आपण सगळे एका फोल ठरत
चाललेल्या अशा साचेबद्द जीवनपद्धतीकडे ढकलले जात आहोत का? आता या
अनुषंगानेच आपले आर्थिक, शिक्षण, आरोग्याचे मापदंड आणि कृ षिजीवन, सामाजिक
जीवनाचे निकषही ठरवले जात आहेत. खरे तर सुधारणा म्हणजे सगळे जुने टाकू न नवे
अंगीकारणे असेच नसून, आहे त्यात काळानुसार योग्य ते बदल करणे आहे. 'वापरा
आणि फे कू न द्या' हे धोरण व्यापारासाठी हितकर आहे पण ते आनंदी तर सोडाच पण
निदान सुखी जगण्याचे तरी तंत्र आहे असे अद्याप जाणवलेले नाही.
NEO-LIBERALISMI ची मांडणी करताना ज्या चौकटी ठरवण्यात आल्या.
पण देशोदेशीतला व्यापार अधिक मुक्त आणि अधिक पारदर्शी करण्याच्या ह्या प्रथमदर्शी
प्रामाणिक हेतूची मांडणी मात्र कोणाला फायद्याची आहे हे कळावे म्हणून हा प्रपंच. मुक्त
व्यापार धोरणांचा अर्थ बंधनमुक्त नफा कमवणे असाच जाणवला आहे. या धोरणाने
त्याउपर नफा मिळत नसेल तिथे लोकांना जगण्याचे मूलभूत हक्कच नाकारले. जेव्हा
चिली या छोट्या देशांत जिथे उखअच्या मदतीने १९७३ साली तिथले लोकप्रिय अल्लेंडे
यांचे सरकार, जे या सुधारणांना विरोध करत होते ते उलथवण्यात आले तेव्हा हे
दाहकपणे जाणवले मेक्सिकोत लोकांचे वेतन ४०-५०% नी कमी झाले आणि राहणीमान
८०% नी वाढले. २०,००० वर छोटे उद्योगधंदे मोडीत निघाले. सरकारच्या मालकीच्या
सुमारे हजारांवर उद्योगांचे खाजगीकरण झाले. अमेरिके तसुद्धा या NEO
LIBERALISM मुळे अनेक सामाजिक कल्याणकारी योजना बंद पडल्या. तिथला
रिपब्लिकन पक्ष तर याचा मोठा चाहता आहे. आज दक्षिण अमेरिके तील मेक्सिको हा
सगळ्यात जास्त गुन्हेगारी असणारा देश आहे आणि अमेरिके ची आरोग्यसेवा ही सध्या
अतिशय बिकट अवस्थेत आहे. याचे मूळ या सुधारणांत (?) आहे.
हे सगळे आत्ता तीव्रपणे जाणवते आहे कारण आता भारत NEO-
LIBERALISMच्या धोकादायक वळणावर उभा आहे. देशाच्या विकासदरावर IMF,
वर्ल्ड बँक यांचे बारीक लक्ष आहे. अचानक जगभरचे राष्ट्रप्रमुख इथे येण्यासाठी
आसुसलेत, भारताला कर्जपुरवठा करण्याची जगभरच्या वित्तीय संस्थात चढाओढ आहे.
त्याचवेळी आपणही परदेशी गुंतवणुकीसाठी एके क क्षेत्रे मुक्त करत आहोत, देशांतर्गत
मालाच्या किमतीवरील ज्यात अन्नसुद्धा येते-नियंत्रणे काढली जात आहेत. शेतकरी
देशोधडीला लागलेत तर देशाचे एखाद्या मॉलमध्ये रूपांतर होतेय हे के वळ योगायोगानेच/
नशिबाने घडतंय असे मानणे एकतर भाबडेपणा तरी आहे किंवा बदमाशी तरी. महागाई
का वाढते/कमी होते याचे ना अर्थमंत्र्यांना आकलन आहे ना अर्थतज्ज्ञ म्हणवणाऱ्या
पंतप्रधानांना. ही सगळीच माणसे आता एखाद्या अज्ञात कळसूत्रावर नाचणारी बाहुली
झाली आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या काळातसुद्धा ५२% मनुष्यबळ ज्यात व्यस्त
आहे अशा शेतीशी त्यांना काही देणेघेणे नाही. परदेशातील दाखले आपल्या
अर्थव्यवस्थेला देऊन देशातील कृ षीसबसिडीवर गदा आणण्याच्या बाता मारणाऱ्यांना
परदेशातील शेतकऱ्यांच्या सबसिडी अजूनही सुरक्षित आहेत याचे स्मरण होत नाही. पण
या देशातील फक्त ७% लोक ज्या शेअरबाजारात गुंतवणूक करतात, त्याचा निर्देशांक
खालीवर होण्यावर देशाची प्रगती ठरवण्यासाठी ही माणसे आणि त्यांचे सल्लागार
आघाडीवर आहेत. कोणी अर्थमंत्री व्हावे यासाठी आता परदेशी दबाव आहेत. देश तरुण
होतो आहे आणि ही सगळी राजकारणी, धोरण ठरवणारी मंडळी ७० च्या पुढे पोहोचली
आहेत. काही दिवसांनी ही माणसे काळाच्या पडद्याआड जातील आणि मागे
राहिलेल्यांना या धोरणाचे भीषण परिणाम भोगावे लागतील. गेल्या ३०-४० वर्षांतल्या या
धोरणाच्या राबवणुकीनंतर आजच्या जगातल्या चित्राचे एकच उदाहरण बोलके आहे.
जगातील उद्योगात जास्तीतजास्त कार्यक्षमता येण्यासाठी, सार्वजनिक पैशाचा वापर
करून जे खाजगीकरण झालंय त्याने समाजातील फक्त ७% लोकांकडे जगातील एकू ण
५०.३% संपत्ती, तर ५०% लोकांकडे दरदिवशी उत्पन्न फक्त १०० रुपये ठे वण्याचे
बहुमोल (?) कार्य के ले आहे.
मुक्त व्यापाराची तथाकथित संजीवनी जगाला देणारे आणि त्यांचे चलाख
साथीदार मात्र थडग्यात चीरनिद्रा घेत आहेत.

३३. सावध, ऐका पुढल्या हाका!!

सध्याचे शतक मोठे मजेशीर आहे! 4G, 5G असले सेलफोन्स, Interactive, TV.
I-Pad अशा तरुणांच्या एके क मजेदार गोष्टींनी तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या पोतडीतून
बाहेर पडून बहार उडवून दिलीय. हे सगळे पाहिले तर येणाऱ्या तरुणाईच्या हातात काय
प्रचंड ताकद असेल याचा अदमाससुद्धा उत्तेजित करणारा आहे. दुसरीकडे मात्र या
सगळ्या वस्तूंचे मार्के ट असणारी जगातील एकू ण प्रजा वृद्ध होत चालली आहे. सर्वांत
जास्त अशी म्हातारी माणसे असणारे हे जगाच्या इतिहासातले पहिलेच शतक असेल
बहुधा. साधारण दोन वर्षांपूर्वी माद्रिदला माणसांच्या वयाचा वेध घेणारी एक जागतिक
परिषद भरली होती. त्यात अनके गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला. १९५० ते २०५० या
१०० वर्षांच्या कालावधीचा जगातील माणसांच्या वयाचा अभ्यास, तज्ज्ञांनी तीन
वयोगटात मांडला. एक गट वय १५ वर्षे पेक्षा कमी, दुसरा गट वय १५ ते ५९; तर तिसरा
गट ६० च्या वर वये असणारा. या मांडणीत सर्व गटांचे काळाच्या तीन टप्प्यात विभाजन
के ले गेले. इसवी सन १९५०, २०१० आणि २०५० असे तीन टप्पे ठरवण्यात आले.
सगळ्या गोळा के लेल्या माहितीची मांडणी के ली तसे लक्षात आले:
* १५ वर्षांखालील मुलांची संख्या जिचे प्रमाण १९५० साली शंभरात ३४ इतके
होते, ते २०१० ला २६ आणि त्याचा २०५० चा अंदाज शंभरात फक्त १९ असण्याचा
आहे.
* या शतकाच्या मध्यावर म्हणजे २०५० साली इतिहासात प्रथमच वृद्धांची संख्या
ही मुलांच्या संख्येला ओलांडेल. म्हणजे यावर्षी जगात शंभरपेकी २४ वृद्ध (६०%)
असतील तर मुले शंभरपैकी १९. त्यावेळच्या विकसित देशात हे प्रमाण तर दर शंभरी ३५
वृद्ध तर मुले फक्त १५ असतील. म्हणजे हे दुपटीहून जास्त होते.
* वय वर्षे १५ ते ५९ या वयोगटात मात्र २०१० ते २०५० या कालावधीत ६२% ते
५५% असाच बदल होईल.
ही आकडेवारी अतिशय तपशिलात्मक आहे, ती क्लिष्ट होत जाते आणि म्हणूनच
त्या सगळ्या छाननीत न जाता मला काही गोष्टींकडे लक्ष वेधायचे आहे. असे जाणवतेय
का की जग जसे प्रगत, विकसित होत गेले तसे
* वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण घटू लागलेय. त्यांना दीर्घायुष्याचे वरदान मिळतेय.
* विवाहसंस्था एकत्र राहण्यासाठी, प्रजजनासाठी कालबाह्य ठरली आहे.
वर्षामागन वर्षे माणसांचे प्रजनन प्रमाण कमी होत गेले आहे.
* आधुनिक जीवनशैलीने भूभागांचे सांस्कृ तिक वेगळेपण, स्थानिय वैशिष्ट्ये
गमावली असून सर्वत्र एकसाचेबद्ध जगण्याचा परिपाठ रुजतो आहे.
गेल्या शतकात वैद्यकीय क्षेत्रातील वैज्ञानिक शोध आणि जैविक तंत्रज्ञानाच्या
प्रगतीने तर अशी कमाल के लीय की प्रगत देशात माणसे जणू आजाराने मरायलाच तयार
नाहीत. लग्नसंस्थेचा आवाका कमी होत तो तात्पुरते नातेसंबंध, अथवा एकत्र राहणे अशा
स्वरूपात बदलला. जरी लग्ने के ली तरी पोरांची भानगड नको असा विचार रूढ झाला
आहे. त्यामुळे प्रजननदर कमी झालाय. म्हणजे बघा, जगातील मृत्यू आणि प्रजनन दोन्ही
एकाच वेळी घटणारे हे एकमेव शतक. त्यामुळे उद्याच्या जगातील तरुणांची संख्याच
इतकी कमी असेल की विचारता सोय नाही. 5 चीन आणि भारतातील कोणी विद्वान
म्हणतील की लोकसंख्या जितकी कमी तितके बरेच की. हे मान्य के ले तरी तरुण
लोकसंख्या कमी झाली, म्हणजे जग पूढे कसे जाणार हा प्रश्न उभा राहणारच.
कालांतराने जगात उरणार कोण तर जास्तीत जास्त वृद्ध. बर वृद्ध जसे जसे वार्धक्याकडे
झुकू लागतील तसे त्यांचे परावलंबित्व वाढणार. राष्ट्रांचे त्यांच्या आरोग्य सेवांवर खर्च
होणारे उत्पन्न दिवसेंदिवस वाढतच जाणार. आज ब्रिटन आणि अमेरिका या वाढलेल्या
खर्चाचे शिकार आहेतच. बरं वृद्ध लोकसंख्येच्या भौतिक गरजा मात्र कमीच. म्हणजे
निरनिराळ्या वस्तूंचा खप कमी, म्हणजे बाजारातील त्यांची मागणी कमी, त्यामुळे
उत्पादन पडून राहणार, मग उत्पादनावर अवलंबित उद्योग हळूहळू बुडणार. जिम 2
प्रजननाचा दर कमी म्हणजे मुलांची एकू ण संख्या कमी, त्यामुळे काय होईल याचे
उदाहरण बघू. ज्यांचे आजचे मार्के ट प्रचंड आहे ती खेळणी एकदम कमी होणार किंवा
खेळण्याच्या कं पन्यांना डोके वापरून वृद्धांची नवीन खेळणी काढावी लागणार, आता
मुले खेळणी का खेळतात तर त्यांना प्रत्येक गोष्टींचे कु तूहल असते आणि ते जगात
शिकण्याच्या वयात असतात. वृद्धांचे असे काहीच नाही. त्यातून या वृद्धांचे उत्पन्न कमी,
वर ते सरकारच्या मदतीवर जगणारे. बरं वृद्धत्व म्हणजे आयुष्याचा शेवटचा काल
असल्याने, एकटेपण असल्याने, त्यांना इतक्या वस्तू कोणासाठी, कशासाठी घ्यायच्या
असा रास्त प्रश्न पडणार. म्हणजे बाजारातल्या मालाला उठावच राहणार नाही.
वृद्धांना लागणारे अन्न मोजके च आणि साधे आणि पथ्याचे आणि अत्यंत कमी
असते. त्यात काही वेगळेपण नसते. ते वृद्ध असल्याने त्यांना जेवण बनवणे जमणार
नाही म्हणजे तयार अन्नाचाच खप जास्त. उद्या कदाचित जेवण्याऐवजी अन्नाची गोळी
वगैरे पण येईल बाजारात. तयार करण्याचे, बनवण्याचे खाद्यजिन्नस ही दुर्मीळ गोष्ट होत
जाणार, म्हणजे तो बाजारही झोपला. तयार अन्न जर प्रकृ तीला चांगले नसल्याने परत
औषधांचा खर्च जास्त वाढेल. म्हणजे दिनक्रम काय तर दोन गोळ्या जेवण म्हणून;
दोन गोळ्या त्याच्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी. बास! बाजार व्यवहार संपला. बाकी पडून
राहणे, कारण वृद्धांचा संशोधन, उत्पादन यांच्यासाठी काही उपयोग नाही, म्हणजे फारसे
उद्योग नाही. उत्पादन नाही,त्यामुळे उद्याच्या बाजाराचे स्वरूप ठरवणे, एखादी नवीन
गोष्ट लोकांच्या गळी उतरवणे असले काहीही नाही. अर्थव्यवस्थेला गती नाही, वृद्ध काही
शेअर बाजारात वगैरेत रोजच्या रोज गुंतवणूक करणार नाहीत. त्यांच्याकडे मुळात पैसाच
कमी, त्याचा विनियोग कमी, त्याचे फिरत राहणे कमी, परिणामी सगळ्या
चलनव्यवहाराची गती हळूहळू ठप्प होईल. माणसांचे, वस्तूंचे सगळेच उत्पादन कमीकमी
होत जाणारे आणि भोवतालचे जग मात्र प्रगत, आधुनिक आणि सोयींनी परिपूर्ण असा
सगळा घोळ. त्यातून स्त्री-पुरुष प्रमाणसुद्धा बदललेले. आजच जगात वृद्धांपैकी फक्त
६३% लोकच विवाहित आहेत. त्यातही वृद्ध असूनही एकट्या राहणाऱ्या बायका तर
५२% तर पुरुष २०% . आता हा परत लिंग-प्रमाण घोळ. त्याचा एक वेगळाच धोका.
म्हणजे पाहा ही वरची आकडेवारी कु ठे घेऊन जाते?
याची कारणे शोधू गेले की परत आपण तिथेच येऊन पोचतो! म्हणजे तीच
विकसित साचेबद्ध जीवनशैली, एकटे जगणे, वैयक्तिकता सर्वोच्च महत्त्वाची. संवादाचे
पूल नकोतच, फक्त स्वत:ला हवे तसे जगण्याचा अट्टहास, पण त्या जगण्याचे कारण
मात्र मरण येत नाही हे किंवा त्याचा भविष्यातला हेतू अज्ञात असतो. यामुळे झाले का हे?
हेतू आला की मरणसुद्धा हवे हवेसे असते हो! इथे तर जगण्याचाच हेतू नाही. विकसित
देशात वृद्ध संख्या वाढत असल्याने ही भीतीदायक साचेबद्धता आताच येऊ लागली
आहे. म्हणून जगण्यासाठी गुंतून रहावे, काहीतरी फॅ ड असावे ही गरज झाली आहे.
म्हणून तर समलिंगी जोडपी असे खूळ सुरू झाले नाही? कारण काहीतरी बदल हवा, तेच
तेच नाही जगायचे. त्याचा कं टाळा येतो. भारतातसुद्धा आहे हे लफडे आता. प्रमाण अल्प
आहे पण त्या गोष्टी प्रकाशात यायला सुरुवात झाली आहे.
तुम्हाला हे सगळे जरा अतिशयोक्तीचे वाटते ना? मग भारतातल्या महानगरात
जगणाऱ्या तरुण मुलामुलींच्या जीवनपद्धतीचा जरा कानोसा घ्या. आज अनेक तरुण
लग्न करण्यापेक्षा एकत्र राहण्यावर जास्त भरवसा ठे वतायेत. कारण काय तर म्हणे त्यांना
लग्नाअगोदर सगळेच नीट जाणन घ्यायचे आहे म्हणे. आता इतके जाणन
घेतल्यावर मग लग्नात काय उरते? एकू णच त्यांना लग्ने नकोशी आहेत, मुले तर
दूरची बात. या बरोबरीने भारतातल्या शहरातले घटस्फोटांचे प्रमाण गेल्या चार वर्षांत
३०० ने वाढले आहे. यातले ८० % घटस्फोट हे सेवाक्षेत्रातले आहेत. जागतिकीकरणात
आपण खरे तर सेवाक्षेत्रामळे परदेशातून काम आणले पण त्याबरोबर आले हे भलतेच.
खरेय म्हणा, Nothing is Free!
तर दोस्तहो तुमचे हे नवे जग मान्य. आता जुने जाणार, एकदम मान्य...तुम्ही स्वतंत्र
आहातच हो. तुमच्या वाटाही आधुनिक! पण या जगातले आणि जगभर, जे तुमच्या
आधी यामार्गाने गेले त्यांचे सध्या काय झाले आहे ते तरी पाहाल की नाही? का तुमचे
स्वयंभूपण आंधळेसुद्धा आहे? इत्यलम!
३४. प्रतिजैविके - प्रगती आणि हास

पृथ्वीवरच्या वातावरणात स्वस्थचित्त जगणे आणि इथल्या हवेच्या, पाण्याच्या


आणि एकं दर वातावरणाच्या कवचात स्वत:ला सुरक्षित ठे वणे हे आपले जगण्यासाठीचे
कर्तव्यच आहे. माणूस अनेक वर्षांपासून हे करत आला आहे. ज्या निसर्गाकडून एखादा
रोग होतो, ज्या निसर्गात आयुष्याच्या निरोगी असण्याचे प्रश्न उभे राहतात, त्याच निसर्गात
त्याचा उपाय, त्याचे उत्तर असते इतके साधे तत्त्व माणसाला खूप आधीच उमगले होते.
म्हणून या सृष्टीतलावरील निरनिराळ्या वनस्पतींचा अभ्यास हा तर त्याच्या जगण्याच्या
दुर्दम्य इच्छेचा अविष्कार आणि पुढे विकसित झालेल्या वर्षानुवर्षांच्या संशोधनाचा
पायाच. माणसाने इथल्या निसर्गाशी कधी जुळवून घेत, कधी त्याला बाजूला सारत, तर
कधी त्याच्याशी झुंज घेत आपले अस्तित्व बळकट करण्याचा प्रयत्न के ला आहेच, त्यात
अनेकदा यश आले काही वेळा अपयश. अनेकदा असेही झाले की जे मिळाले ते यश
असे मानून माणूस पुढे निर्वेधपणे चालता झाला आणि मग खूप उशिरा लक्षात आले की
अरे, ते यश नव्हतेच तर! ती मानलेल्या यशाची गृहिते होती. मग परत सगळे नव्याने सुरू
करणे आले. कोणत्याही अखंड शोधाच्या वाटेवर अर्थातच हे असे घडणे अगदी
साहजिक. त्यामुळे त्याची अजिबात खंत नसली पाहिजे. कारण ते तर विजिगिषु वृत्तीचा
पाय रोवत उभे राहण्याच्या जिद्दीशी नाते असणारे मूळ कारण, आपल्या जीवनप्रवासाचे
मूलभूत कर्मच. त्यामुळे खंत असलीच तर ती, निसर्गाचा समग्र अनुभव न घेता के वळ
त्याच्यावर विजय मिळवण्याच्या निष्फळ आकांक्षेने, अनेक मानवनिर्मित उपायांची
निर्मिती करण्याच्या घाईची: घाईघाईने निष्कर्ष काढून, ते जेमतेम सिद्ध होण्याची वाट न
पाहता, के वळ बेसुमार अर्थार्जनाच्या प्रबळ इच्छेने, सर्व मानवजातीवर चुकीचे निष्कर्ष
लादण्याची इच्छा असणे हे मात्र अक्षम्य!
हे सगळे मांडायचे कारण नुकताच भारत, पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये
आढळलेला NDM1 हा विषाणू. ह्या विषाणूने सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे.
याचे कारण आज उपलब्ध असणाऱ्या जवळपास सर्व प्रतिजैविकांचा त्यावर ढिम्म
परिणाम होत नाहीये. आता प्रतिजैविकांचे युग संपत आले काय, असाही एक प्रश्न
त्यामुळे जगभर अतिशय काळजीने विचारला जातो आहे. दुसरी चिंता ही आहे की आता
याचा प्रतिकार करण्याची शक्यता आहे असे एकही प्रतिजैविक संशोधनाच्या रडारवर
नाही. त्यामुळे हा जर पसरला तर हाहाकार उडण्याचीच दाट शक्यता आहे. आपण पुन्हा
एकदा प्रतिजैविक नसण्याच्या काळात ढकलले जाण्याची ही एक शक्यता यामुळे
निर्माण होते आहे. वारंवार प्रतिजैविके वापरून आपणच या विषाणूची प्रतिकारशक्ती
वाढवली आहे. त्यामुळे ते आता कोणत्याही औषधाला दाद देत नाहीत.
हा विषय जटील असला तरी आपण नीट समजून घ्यायला हवा. एखाद्या रोगाचा
विषाणू आपल्या शरीरात शिरला की शरीराची प्रतिकारशक्ती त्या घुसखोराचा ताबा घेते.
त्याच्यावर हल्ला चढवून आपले संरक्षण दल त्याला नामशेष करते. जेव्हा ही
प्रतिकारशक्ती अपुरी पडते, आपले संरक्षक दल हरते, तेव्हा मात्र आपण त्या रोगाला
बळी पडतो. मग हे विषाणू आपल्याच शरीरातील जीवनदाव्ये वापरत संख्येने मोप वाढू
लागतात; तेव्हा आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. मग आपल्या शरीराला
बाहेरून या विषाणूशी झगडण्यासाठी तातडीची जी मदत लागते, ती म्हणजे प्रतिजैविके
(Antibiotics) होय. या प्रवासातले पहिले प्रतिजैविक होते पेनिसिलीन. त्याच्या शोधाने
या क्षेत्रात क्रांती झाली आणि मग माणसाला एकदम जादूची कांडी सापडावी तसे झाले.
निरनिराळ्या औषध कं पन्यांना तर जणू एखादे अनाकलनीय मंत्र माहीत झाले आणि
अचानक अज्ञात खजिन्याचे दारच उघडले. यामुळे एकदम एका व्यवसायाला बरकत येऊ
लागली. जंतू शोधा, त्याचे प्रतिजैविक बनवा, भरपूर नफा कमवा. साध्यासाध्या
दुखण्यासाठी उगाच शरीराच्या संरक्षक दलावर अवलंबून राहू नका, प्रतिकारशक्तीला
वेळ देऊ नका. उपाय सापडत नसला की वापरा प्रतिजैविक.
डॉक्टरलोकांनाही बरेच झाले की! एखादे औषध लिहन दिले की काम झाले.
रोग्याचा अभ्यास करायला नको. त्याच्या शरीराचे खोलवर जाऊन लक्षणांचे दीर्घकालिन
निरीक्षण करायला नको, रोगाचे विश्लेषण करायला नको. एकतर रोगी घाबरट आणि
टेकलेला, डॉक्टर जबाबदारी न घेणारे. मग काय होणार? तुम्ही नीट लक्षात घेतले तर हे
पटेल की गेल्या काही वर्षांत आपण काय गमावले असेल तर ते स्वत:च्या शरीराच्या
प्रतिकारशक्तीवरचा खोल विश्वास...माणसाचा अगदी घाबरट असा प्राणी झालाय. त्याने
आपल्या शरीरावर विश्वास टाकणे सोडलेय. या बुळचट लोकांना साथ द्यायला बदललेली
जीवनशैली आहेच. लहान मुलांना त्रास नको, कमावत्या माणसांना आजारपण नको,
म्हाताऱ्यांना दगदग नको. कोणाला वेळ नाही, स्वत:कडे पाहायला वेळ नाही, मुलांकडे
बघायला सवड नाही. आईबापाकडे बघायला जमत नाही...चला, त्यापेक्षा जरा
घाईघाईनेच जगुयात. एक गोळी द्या, सुटलो.
सगळ्या घाईच्या उपाययोजनांमुळे माणसाच्या मूलभूत प्रतिकारशक्तीवर
अवलंबून जगण्यापेक्षा फक्त प्रतिजैविकांवर जगण्याची एक नवीनच पद्धत आलीये. मग
अगदी साध्या सर्दीपडशाला प्रचंड क्षमतेची प्रतिजैविके वापरण्याचे फॅ ड आले. भिंतीत
साधा खिळा ठोकायचा असेल तर मोठे डील मशीन आणून कसे चालेल? आधीच लोभी
माणसांनी रासायनिक खतांच्या अति-वापराने जमिनीची आणि धान्याच्या सकसतेची
बऱ्यापैकी वाट लावली असल्याने शरीराच्या क्षमतेचा बोऱ्या वाजलाच होताच. त्यात हे
उठसूट आजारी पडू लागलं की द्या एखाद्या शेतात रासायनिक खत फवारल्यासारखे
प्रतिजैविके ...मग शरीरात भयानक असे रासायनिक औषधांचे मोठमोठे डोस जाऊ
लागले. माणसे त्यावरच जगू लागली म्हणा ना! मग दरवर्षी नवनवीन रोग उपटू लागले.
नवीन व्हायरस. शरीराची प्रतिकारशक्ती संपत आल्याने त्याचा एक नवाच फायदा झाला
म्हणायचं! मग काय प्रतिजैविक बनवणाऱ्या कं पन्या अचानक देवदूतासारख्या भासू
लागल्या. त्या एकदम भरभराटीलाच आल्या. अनेक डॉक्टरही एक पॉवरबाज प्रतिजैविक
देऊन पैसा कमवू लागले. शरीरातले सगळे विषाणू आणि जगायला आवश्यक
जीवाणूसुद्धा मरू द्या ना...आज बघा आपण साधा ताप आला तरी शरीर त्याची काळजी
घेईल याबद्दल एकही दिवस कोणी त्या बिचाऱ्या शरीराला देत नाही. पाहा गंमत कशी?
जग पुढारले, प्रगत झाले, निरनिराळ्या शोधांनी भयमुक्त झाले पण माणूस मात्र भित्रा
झाला.
एकदा ही प्रतिजैविके घेतली की त्याचे काहीतरी विपरीत परिणाम होणार, मग
अजून काही औषधे घावी लागणार. एखादे प्रतिजैविक आणि त्याच्या साईड-इफे क्टने
आम्लपित्ताचा त्रास होऊ नये म्हणून अजून त्यावरची एक गोळी. पोटात अपचन होऊ नये
म्हणून अजून एक गोळी. असे जोडधंदेच निर्माण झाले आहेत. इतके सारे घेऊनही काही
तापाचे कारणच कळत नाही. अहो, असे काय करता राव! त्याचे नाव व्हायरल फिवर,
त्यावर औषध काय तर अजून मोठ्या क्षमतेच्या प्रतिजैविकांचा एक दीर्घ कोर्स, शिवाय
त्यामुळे लागणाऱ्या जास्त दुष्परिणामासाठी अजून एक तीन चतुर्थांश औषधे. असे एक
पॅके ज घेऊन आमचा मोरू एकदाचा कामावर जातो. थकत, शिकत, कण्हत काम करतो
आणि शरीर आणखी खचवून घेतो. तिसाव्या वर्षी त्याला ऊन, वारा, थंडी सहन होत
नाही. त्याची तब्येत कशी तोळामासा होते...वेलदोडा खाल्ला की सर्दी आणि लवंग
खाल्ली तर खोकला! थोडक्यात, निसर्गच सहन होत नाही, मग चाळीसाव्या वर्षी त्याचे
के स पिकतात, दात पडतात, पोटाला काही सहन होत नाही. मोरू भारतासारख्या देशात
असल्याने तर बिचारा साठाव्या वर्षी औषधांच्या खर्चानेच खचून मारून जातो. जर हा
प्रगत देशात असला तर तिथले मानवी मूल्यांची कदर वगैरे करणारे सरकार असल्याने
त्याला एखाद्या निर्जीव वनस्पतीसारखे जगत ठे वते आणि मृत्युदर घटला म्हणून आपली
पाठ थोपटून घेते. या दरम्यान प्रतिजैविके बनवणाऱ्या औषध कं पन्यांनी अनेक पट नफा
कमवलेला असतो. त्यांचे शेअर बाजारातले स्थान उंचावत जाते. इकडे मोरू शेवटच्या
घटका मोजत असतो तेव्हा मोरूचे जगभरचे तरुण मित्र या फार्मा कं पन्यांचे शेअर विकत
घेऊन एकदम गब्बर झालेले असतात.

३५. हवामान बदल - भ्रम आणि वास्तवमा

२०१० मध्ये जगाने जितक्या नैसर्गिक आपत्ती पहिल्या, सोसल्या तितक्या


अलीकडच्या काळात क्वचितच घडल्या असतील, रशियात आलेली उन्हाची प्रचंड मोठी
झळ, सुरुवातीला भारत आणि ऑस्टेलियात आलेले पावसाचे थैमान आणि भयानक पूर,
पाकिस्तानचे कं बरडे मोडणारा प्रचंड मोठा पूर, अमेरिके त आलेला भयानक पाऊस
आणि बर्फ वृष्टी तसेच तेथील नद्यांना आलेले पर, हैतीमधील भयावह भूकं प, युरोपातील
माउंट मेरापीतून उसळलेली सर्वनाशी राख, एकट्या चीनमधील जमीन खचणे, दुष्काळ,
धुळीची वादळे आणि पुराचे थैमान, दक्षिण अमेरिका खंडांत वादळे, चक्रीवादळे,
आवर्तीय वादळे, वावटळी या सगळ्यांनी हे वर्ष नुसते दणाणून सोडले होते. एका वर्षात
निसर्गाच्या रौद्ररूपाने इतका नाश होत असलेला पाहून मग शास्त्रज्ञ आणि पर्यावरणाचे
अभ्यासक अस्वस्थ झाले नसते तरच नवल. नेहमीसारखे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम,
एल-निनोचा बदलता प्रवाह अशी पारंपरिक कारणमीमांसा मांडत बसण्यापेक्षा यावेळी
प्रथमच सारासार विचार करण्यात आला. खरे तर एखादी नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते
तेव्हा तिच्या येण्याचे अनेक वर्षे निसर्गात घाटत असते. आपल्याला जसा अचानक ताप
येतो तसे निसर्गात काहीही घडत नाही (खरे तर आपलेही तसेच आहे). निसर्गात सगळ्या
गोष्टींचे एक चक्र असते. एखादे वर्ष, दशक, अगदी एखादे शतकसुद्धा याला एकं दर
निसर्गाच्या कालगणनेत फारसे महत्त्व नाही. निसर्गाची कालगणना मानवी आयुष्याच्या
मानाने विशाल आहे. तिथे एका आपत्तीचे मूळ धरायलाच काही शेकडो वर्षे जावी
लागतात. ती घडते तेव्हा अशा वेगाने घडते की आपल्याला वाटते हे किती पटकन झाले
आणि परत निसर्ग शांतही झाला. पण असे नसते. एखाद्या त्सुनामीची लाट दक्षिण
आशियात उसळते तेव्हा त्याला कारण असणारी समुद्राखालची पृथ्वीच्या कवचाची
हालचाल व्हायला अनेक वर्षांपूर्वी सुरुवात झालेली असते. अशीच एक प्लेट ज्यावर
आपला देश वसला आहे गेली काही शेकडो वर्षे निश्चितपणे उत्तरेकडे सरकते आहे आणि
हिमालयाची उंची दरवर्षी अडीच इंचाने वाढवते आहे.
अशा नैसर्गिक आपत्तींचे लगेच के वळ वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे
प्रमाण, प्रदूषण, इतर ग्रीन हाऊस गॅसेस या नेहमीच्या आणि ठरलेल्या गोष्टींशी संबंध
जोडल्याने काय होते, तर या कारणांचे एक उपयोगी मूल्य संपलेले असल्याने घडत
काहीच नाही? म्हणजे ही कारणे तात्कालिक असतीलही, पण के वळ त्याच्यावर संपूर्ण
दोष ठे वणे अशास्त्रीय आहे. ज्या भयानक उन्हाळ्याने रशियात १५,००० लोकांचा बळी
घेतला आणि १६ लक्ष हेक्टरवरचे जंगल नष्ट के ले, त्याचा अत्यल्प संबंध ग्रीन हाऊस
गॅसेसशी असल्याचे संशोधनांती लक्षात आले आहे. कारण या पृथ्वी नावाच्या ग्रहावर
असे अनेक प्रलय त्याच्या परिभ्रमणामुळे घडत असतात. हे अज्ञात विश्वातील खगोलीय
आणि या ग्रहावरचे निसर्गचक्र आहे, ज्याचे पूर्ण आकलन आपल्याला अद्याप झालेले
नाही. आपल्याला करता येतात ते नियमितपणे घडणाऱ्या काहीच गोष्टींचे ठोकताळे -
अर्थात त्यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही - पण ते फारच वरवरचे आहेत. ज्यांना या
सगळ्याचा सखोल असा अभ्यास करायचा नसतो, त्याच्या बदलाचे विविध संदर्भ, विविध
आकृ तिबंध, निसर्गाच्या चक्राकार गतीच्या अवस्था ह्याचा काहीही विचार करायचा नसतो
ते आपले सोपे उत्तर ठोकू न देतात आणि आपण भाबडे असणे ही आपलीही सोय
असल्याने आपण त्यावर विश्वास. ठे वून एका बिनडोक गदारोळात सामील होत आरोळ्या
ठोकू लागतो. एकतर ही कारणे कळली तरी हे सर्व जागतिक स्तरावरचे आहे. त्यामुळे
आपण एकट्याने याचे काय करू शकणार? दुसरे ह्या सर्व कारणांचे काय करायचे, याचा
वैयक्तिक अथवा प्रादेशिक पातळीवर काहीही आराखडा नाही, असला तरी ज्या
प्रश्नांमुळे हे सर्व घडते आहे त्या संबंधित लोकांना याचे काही पडलेले नाही (अमेरिके ने
अजूनही क्योटो करारावर सही के लेली नाही. इतके च नव्हे तर त्यांना या करारामुळे काही
साध्य होईल असा विश्वास नाही). जगातल्या विविध देशांचे सरकार म्हणून याचे यश हे
निरर्थक आकडेवारीचे लक्ष्य साध्य करण्याच्या घोळात अडकू न पडलेले, निरनिराळ्या
कं पन्या, या संबंधात घडणारे गुन्हे कसेतरी मॅनेज करण्यात गुंतलेल्या, जागतिक संघटना
हे घडवून आणण्यापेक्षा के वळ सल्ले देण्याच्या पातळीवर आलेल्या अशा सर्व गोष्टींमुळे
पर्यावरणबद्दल चर्चा कितीही झाल्या तरी त्याच्या संवर्धनाचे प्रयत्न परिणामकारक
ठरण्याऐवजी वांझोटे ठरतात.
अर्थात माणसाच्या असीमित लोकसंख्येने, आपण निसर्गाच्या सतत चालवलेल्या
अवहेलनेने काही गंभीर प्रश्न जरूर उपस्थित के ले आहेत, पण त्यामुळे तेवढेच एक
कारण त्याला आहे असे म्हणणे खरे मात्र नाही. जो विकास मानवाने निसर्गाच्या विरोधात
जाऊन के ला त्याच्या मुळाशी नेमके काय आहे हे तपासले तर मात्र याचे उत्तर मिळते.
निसर्गाशी फटकू न वागणे, त्याच्या ऋतुचक्राचा आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या
वातावरणाशी सुसंगत जीवनपद्धती न अंगीकारणे, जीवसृष्टीचे वैविध्य नष्ट करणे,
विकासाच्या नावाखाली उद्योगांचे के वळ नफा मिळावा म्हणून विस्तारीकरण, बेसुमार
जंगलतोड, जगण्याच्या सुखसोयींसाठी दिलेला नैसर्गिक परस्परांवर अवलंबित अशा
समतोलाचा बळी, गरजपेक्षा जास्त वाढलेले रासायनिक कारखान्यांचे महत्त्व, त्यातील
सांडपाण्याची, कचऱ्याची अव्यवस्थित विल्हेवाट त्यामुळे धोक्यात आलेले इतर जीवांचे
अस्तित्व, मूठभर कार्पोरेट कं पन्यांच्या आणि लोकांच्या आर्थिक हितसंबंधांचे सर्वच
देशांना पडणारे अमानुष पाश, जागतिक पर्यावरणाच्या बाबतीतही फक्त स्वत:पुरते
पाहण्याची विकसित देशांची बेमर्वत आणि आत्मघातकी वत्ती अशा अनेक मानवनिर्मित
गोष्टीच शेवटी आपल्या मुळाशी येतात.
विकासाच्या नावाखाली जगात काय चालले आहे याचा आढावा अस्वस्थ करणारा
आहे. आतापर्यंत सर्व विकसित देशांनी तिथल्या उद्योगांनी निर्माण के लेल्या प्रदूषित
कचऱ्यासाठी विकसनशील देशांचे डंपिंग ग्राउंडमध्ये रूपांतर के ले आहे. जागतिक
बँके च्या प्रमुख अर्थतज्ज्ञाने एका कार्यालयीन पत्रात तर असे म्हटले होते, 'जागतिक
बँके ने प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कमी विकसित देशांमध्ये पाठवण्याचे धोरण आखले
पाहिजे. आफ्रिके तील कमी लोकसंख्येचे देश हे अतिशय कमी प्रदूषित आहेत, तिथल्या
हवेची शुद्धता ही मेक्सिको अथवा लॉस एंजेलिसपेक्षा चांगली आहे. त्यामुळे ज्या देशात
नाहीतरी दर हजारी २०० मुले कु पोषणाने मरतात तिथे असल्या प्रदूषित उद्योगांना
पाठवणे हे औद्योगिक शहरे वाचवण्यासाठी आवश्यक आहे. हे कदाचित आर्थिकदृष्ट्या
तात्पुरते परवडणार नाही पण दूरचा विचार करता गरजेचे आहे. पण अशा परिस्थितीत
आपला देश असल्या उद्योगांपासून वाचवणे हे पर्यावरण संवर्धनाचे सर्वोकृ ष्ट कार्य ठरेल
यात शंका नाही!

३६. जागतिकीकरणाचे संकु चितपण

जागतिकीकरण हे सध्याचे नाव असले तरी फार पूर्वी वैश्विक जगणे होतेच.
माणसाच्या हितासाठी सगळ्यांचे मिळून असणारे एक जग होतेच. सगळ्या गोष्टी
माणसाच्या कल्याणासाठी असल्या पाहिजेत, त्याला सीमा नकोत, कोणत्याही मर्यादा
नकोत. सगळ्या जगाची एक ओळख असणे म्हणजे वैश्विकता. मुक्त जगात एकमेकांशी
हवे नको त्याची अदलाबदल, शेअरिंग करणे हे महत्त्वाचे. अशा कल्पना, मूल्ये, तत्त्वे, धर्म
आणि सिद्धान्त या सगळ्यांना युनिव्हर्सल म्हणता येईल. युनिव्हर्सल असणे हे
जागतिकीकरणापेक्षा जास्त जवळचे आहे. सगळे जग एक खेडे झाले आहे असे आपण
ठोकू न देतो पण त्याचा अर्थ काही कळत नाही. असे सरधोपट बोलण्याची एक नवीच
फॅ शन जन्माला आली आहे. संवाद, माहितीचे सगळ्यांपर्यंत क्षणार्धात पोचणारे
मायाजाल, त्यासाठी अस्तित्वात नसणाऱ्या सीमा आणि त्यामुळे वेगाने मिटत चाललेली
प्रादेशिक अथवा विशिष्ट नागरिकत्वाची ओळख ही जागतिकीकरणाची लक्षणे. जुन्या
काळात जेव्हा एखादी गोष्ट वैश्विक आहे असे लोक म्हणायचे, तेव्हा तंत्रज्ञान नसल्याने
त्याचा अर्थ कळायचा नाही. जागतिकीकरण खरे तर के वळ एक कृ ती आणि तालीम
आहे. ती काही साध्याची गोष्ट नाही. त्यात एक गोची आहे ती अशी की,
जागतिकीकरणामुळे अमुक एकच पद्धत जगभर पसरणे, जग एकसारखे असणे याला
महत्त्व आणले आहे. एकाच प्रकारची जीवनशैली, एकाच प्रकारचे राहणीमान, विचार
करण्याची पद्धत यालाच जागतिकीकरण असे संबोधले जाऊ लागले आहे.
थोडे इतिहासात डोकावले तर लक्षात येईल की पहिल्या महायुद्धानंतर जगाची
दक्षिण आणि उत्तर अशी विभागणी झाली होती. दुसऱ्या महायुद्धाने मात्र अमेरिका आणि
रशिया अशी द्विपक्षीय व्यवस्था निर्माण के ली. शीतयुद्धानंतर रशिया नावाची दुसरी ताकद
नष्ट झाली आणि अमेरिके च्या ताब्यात सारे जग आले.१९९१ मध्ये इराकने कवेतवर
आक्रमण के ले आणि अमेरिका जगाचा पोलीस असल्यासारखी त्या युद्धात उतरली. या
वेळी रशिया मात्र जगाच्या रंगमंचावर एखाद्या प्रेक्षकापुरता उरला होता. ३ जून १९९२ ला
युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेने एक शिखर परिषद आयोजित के ली. तिथे प्रथमच
असा एक आंतरराष्ट्रीय ठराव करण्यात आला, ज्यायोगे तंत्रज्ञान आणि निबंधांची एका
सांगड घालत एका नव्या जागतिकीकरणाच्या धोरणाची मुहूर्तमेढ रचली गेली. इथून मग
जागतिकीकरण हा जगात परवलीचा शब्द बनला.
काही लोकांना सुरुवातीला असे वाटू लागले की जागतिकीकरण ही एक आर्थिक
संज्ञा आहे जिचा अर्थ 'जगाच्या विकासासाठी आणि साहचर्यासाठी असणारी यंत्रणा'
असा आहे. कालानुरूप मात्र आर्थिक जागतिकीकरण हे जणू अस्तित्वात असणाऱ्या
भांडवलशाही मुक्त अर्थव्यवस्थेचेच विस्तृत स्वरूप आहे असे ठरवले गेले. त्याने मुक्त
अर्थकारण ज्यात बाजाराधिष्टीत अर्थव्यवस्था बळकट व्हावी, देशोदेशींचे बाजार
सगळ्यांना मुक्त व्हावेत आणि त्यासाठी सर्वत्र सगळ्यांचा संचार सुरू व्हावा असा एक
व्यापार हष्टिकोनाचा रंग दिला गेला. बाजाराचे अर्थकारण म्हणजे जागतिकीकरण असेही
बरेच विद्वान ठोकू न देऊ लागले. खरे तर जागतिकीकरण नीट विकसित के लेली,
एकमेकांवर अवलंबित अशी एकू ण जागतिक भांडवल, वस्तू आणि सेवा यांच्या
बाजाराचा समतोल साधणारी व्यवस्था हवी होती. पण जागतिक व्यापार संघटना आणि
नाणेनिधी यांचे व्यवस्थापन कामाला लावत काही लोकांनी आपल्याला अपेक्षित
असणारी जगाची नवी संरचना लिहायला सुरुवात के ली. देशात होणारा वस्तू आणि
शेतीमाल यांचे जगाच्या बाजारात सुसूत्रपणे वितरण व्हावे, विविध स्थानिक अडथळे दूर
करत त्यांचे लाभ, उत्पादक देशांना, त्यातल्या नागरिकांना मिळावे म्हणून काम
करण्याऐवजी विविध देशांच्या शेतीमाल आणि वस्तूंवर बंधने आणि हेतूपूर्ण हालचाली
करण्यासाठी या संस्थांचा वापर सुरू झाला.
जागतिकीकरणाच्या प्रवाहाला असे हेतूपूर्ण वळण लागले आणि मग या आर्थिक
जागतिकीकरणाच्या मांडणीत, देशांनी आणि त्यातल्या सार्वजनिक उद्योगांनी
खाजगीकरणाची वाट चालावी म्हणून देशांना सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचे
धोरण राबवून त्यांना रोजगार, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत नेतृत्व देत
पाणी, वीज, रस्ते अशा नागरिकांच्या सुविधांचे नियोजन खाजगी क्षेत्राला सुपूर्द के ले गेले.
मग इथेच जागतिकीकरणाच्या गोंडस नावाखाली, बहुराष्ट्रीय कं पन्या फोफावायला
लागल्या. १९७० मध्ये संख्येने के वळ १०० असणाऱ्या अशा कं पन्या सध्या जवळपास
५०,००० च्या वर आहेत. जागतिकीकरणाने देशोदेशींच्या सरकारांचा सहभाग कमी होत
गेला. बहुराष्ट्रीय कं पन्यानी जगाचा ८०% इतका प्रचंड व्यापार ताब्यात ठे वत जगाच्या
एकू ण रोजगारापैकी फक्त ७% रोजगार निर्माण के ला.
दुसरीकडे माहितीचे जागतिकीकरण हे दूरसंचार, माहितीच्या तंत्रज्ञानाच्या
विस्तारात झाले. संवादाच्या नवीन तांत्रिक प्रगतीने दूरदर्शन आणि इंटरनेट यातून
संपर्काचे प्रभावी जाळे निर्माण के ले. सगळी मानव जात एकाच खेड्यात राहते आहे,
जिथे एकमेकांचे सुखदुःख प्रत्यक्ष घडते तसे एकमेकांना सांगता येते आहे. त्याला सीमा,
भाषा, रंग, प्रांत यांचे अडसर नाहीत. सर्व प्रकारची माहिती, बातम्या आता सगळ्यांना
एकाच वेळी समजू शकतात. एक सततची, कोणतेही प्रयास न करता माहिती ओतली
जाऊ लागली. इथे पण एक गोची अशी झाली की काही लोकांनी तिलाच ज्ञान असे
समजण्याची पद्धती रूढ के ली आहे. किती सोपे आहे सारे नाही? उगाच पूर्वी लोक
व्यासंग वगैरे करायच्या भानगडीत पडायचे. 'शोधा, मिळवा आणि ठोकू न द्या' असे एक
नवेच ज्ञानाचे फाडफाड मार्ग खुले झाले. सारे जग आता एकभाषीय झाले आहे.
इंटरनेटवरची सुमारे ८८% माहिती ही इंग्लिशमध्ये असते, ९% जर्मनीत, तर २% फ्रें च
आणि उरलेल्या एका टक्कयात सारे जग आणि त्याच्या हजारो भाषा आहेत. कागदावर
अवलंबून असणारी मानवी देवाणघेवाणीची संस्कृ ती आता हळूहळू लयाला जाईल. पत्रे
लिहिणे बंद झालेच आहे.
सगळ्या क्षेत्रातील आर्थिक राजकीय, माहिती तंत्रज्ञान, शास्त्रे यांचे जागतिकीकरण
तुम्हाला अपरिहार्यपणे संस्कृ तीच्या जागतिकीकरणाकडे घेऊन जाते. सध्या जगात टीव्ही
चॅनेल्सच्या सुळसुळाटामुळे एकाच प्रकारची विचारपद्धती लादली जात आहे.
जागतिकीकरणाचे बरेच संदेश हे इंग्लिश भाषेत आहेत. मूल्ये, तत्त्वे हे सर्व आता टीव्ही
चॅनलद्वारा पसरवले जात असल्याने पारंपरिक ज्ञान, या पिढीकडून पुढच्या पिढीकडे
जाणारे शहाणपण दुर्मीळ होते आहे. अशा पद्धतीने जागतिकीकरण हे कधीच
अर्थकारणाच्यापुढे निघून जात; आता मानवी आयुष्यावरसुद्धा आपले नियंत्रण लादते
आहे असे लक्षात आले आहे. एखाद्या राष्ट्राची, समाजगटाची अंगभूत वैशिष्ट्ये यात नष्ट
होऊ लागली आहेत आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यातून एक
नवाच पंथ उदयाला येतो आहे जो माणूस म्हणून जीवनपद्धती म्हणून, माहिती म्हणून,
तंत्रज्ञान म्हणून, संस्कृ ती तत्त्वे, मूल्ये बुद्धिमत्ता असे सगळे एकाच पद्धतीचे घालत आहे
असे भयानक चित्र उभे राहू लागले. हे सगळे एकसाची असणारा माणूस तयार होत
आहे. लोकांना काय हवे यापेक्षा आंतरराष्ट्रीय समूह आता काय हवे- काय नको हे
सांगायला लागले आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध यावर ठरवले जाऊ लागले आहेत. मग युनो,
सुरक्षा परिषद यांना फक्त हा अजेंडा राबवण्याचे काम उरले. एकसाची धोरणाचे
बिनडोकपण त्यांनाही सोयीचे होते. हे सगळे बघितल्यावर असे का झाले याचा छळणारा
प्रश्न उरतोच. त्याची उत्तरे शोधताना वर नमूद के लेल्या परिस्थितीने काहीतरी विपरीत
जन्माला घालायला सुरुवात के लीय. त्याकडे तुमचे लक्ष मला वेधायचे आहे.
मी भारतात कायमचा आल्यापासून अनेक ठिकाणी जातोय आणि तिथल्या
मुलांशी बोलतो. मी त्यांना एक प्रश्न नेहमी विचारतो, तुम्हाला ज्या कल्पना सुचतात त्या
तुम्हाला आहे त्या मनाने मुक्त करतात की तुम्हाला इतरांना मदत करण्यासाठी, त्यांची
सेवा करण्यासाठी जखडून ठे वतात? एरवी आपल्या चुणचुणीतपणाने कोणत्याही
वक्त्यांना भंडावून सोडणारी ही माहितीच्या महाजालातील तयार मुले यावेळी मात्र
बहुतांशी निरुत्तर असतात. स्वत:च्या आयुष्याशी दोन हात करत, तडजोडी करत अथवा
त्याला बाजूला सारत जगणारी मोठी माणसे सोडाच; पण आजकाल मुलेसुद्धा इतक्या
लहान वयात काही प्रश्नांनी मूक होऊ लागली आहेत. हे फार भयानक लक्षण आहे. नेहमी
प्रगती प्रगती असे ढोल ऐक आले की मी अस्वस्थ होतो. वास्तविक माझे बऱ्यापैकी
आयुष्य प्रगत राष्ट्रांत गेलेले आहे; पण तरी माझ्या मनात अनेक शंकांची वादळे घोंघावू
लागतात. कसली प्रगती? कसले पुढारलेपण? माणसाच्या आजच्या हालअपेष्टांची सगळी
आकडेवारी दिली तर के वळ त्याचीच अनेक पुस्तके होतील. मला सगळ्यात छळणारी
मूलभूत शंका ही आहे की आपण एक असा समाज निर्माण करत आहोत का, जो
एखाद्या कृ त्रिम बुद्धीवर जगेल पण शहाणपणावर मात्र अजिबात जगणार नाही? उपजत
बुद्धिमत्ता आणि जगण्यातून आलेले शहाणपण शून्य किमतीचे ठरावे अशा एका जगाकडे
तर आपले प्रवास सुरू नाहीत? मुद्दा समजण्यासाठी थोडे विस्ताराने लिहितो.
१९४१ मध्ये पहिला संगणक अतिशय प्राथमिक अवस्थेत तयार करण्यात आला.
ही संगणक युगाची नांदी होती. जी कामे माणूस स्वत:च्या हाताने, डोक्याने करायचा त्या
कामासाठी प्रथमच एक यंत्र तयार करण्यात आले. ज्याला एखादी विशिष्ट आज्ञावली
(कमांड) म्हणजे काय करायचे याची यादी दिली की, तो ती सर्व कामे करेल अशी ही
प्रणाली. एखादा पूर्वआरेखित कार्यक्रम तयार करून त्यात घातला की तो संगणक त्याचे
उत्तम, चुकाविरहीत निकाल आपल्या हातात ठे वायचा. इंटरनेटचा शोध लागला आणि
मग या यंत्राच्या वेगात, क्षमतेत आणि व्यामिश्रपणात प्रचंड बदल झाले. हा बदल म्हणजे
काय तर माणसे करत असणारी कामे जी वेळखाऊ होती, चुका प्रवर्तक होती, सतत
करण्याचा कं टाळा आणणारी होती ती सर्व कामे अतिशय वेगाने, त्याच्या काही अंशी
व्यामिश्रतेसकट या यंत्राने आपल्या ताब्यात घेतल्याने माणसाचा त्या कामातला वेळ
आणि शारीरिक श्रम वाचू लागले. दुसरा फायदा म्हणजे जी कामे होत ती कोणी किती
वेळात के ली अशा सर्व नोंदी ठे वणे, त्यावरून आडाखे बांधणे, कार्यक्षमता मोजणे हे सर्व
शक्य झाले. ही यंत्रप्रणाली आळशी माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली.
आज तर याशिवाय काहीही शक्य नाही. अगदी महासत्ता बनायचे स्वप्न पाहणेसुद्धा! या
संगणकाने अजून एक गोष्ट के ली ती म्हणजे माणसाच्या कार्यक्षमतेचा पुरता पर्दाफाश
के ला. व्यक्तिसापेक्षता सगळ्या कामातून निघून जाऊ लागली. माणसाची अपरिहार्यताच
यामुळे कु चकामी होऊन बसली. माणूस चकित झाला; कारण एखाद्या शोधाने
माणसाच्या बुद्धीवर, शारीरिक क्षमतेवर इतके नेमके प्रश्नचिन्ह यापूर्वी कधीच उभे के ले
नव्हते.
हे सगळे घडले असले तरी एखादे बलस्थान हे काही काळानंतर आपोआप
मर्मस्थानाचे निदर्शक ठरू लागते. किंबहुना त्या बलस्थानाच्या विकासातच काही असे
मूलभूत प्रश्न उभे राहण्याच्या शक्यता असतात, असे घडलेय का? संगणक, त्याचा
विकास, वापर आणि त्यावरची अवलंबिता यांनी काही तारतम्याचे, सजगतेचे आणि
उपजत भानाचे प्रश्न उभे के लेत का? थोडे खोलात गेले तर असे लक्षात येते की याचे उत्तर
'होय' असे आहे आणि हा संघर्ष इतका वरवरचा नाही. तो माणसाच्या माणसाची उपजत
बुद्धिमता (native intelligence) आणि संगणकीय जीवनशैलीने जन्माला घातलेली
कृ त्रिम बुद्धिमत्ता (artificial or programmatic intelligence) यातला आहे. मग
लक्षात येते हे की हा संघर्ष आपले जगण्याचे परिमाण बदलू शकतो. मानवी समाजाला
एका अशा वळणावर आणून ठे वू शकतो जिथे मानवी आयुष्याचे, आपल्या व्यवहार,
नातेसंबंध यांचे एका बाजारू मालात रूपांतर होऊ शकते.
परदेशातल्या एका के स स्टडीचा माझा अनुभव फारच अंतर्मुख करून गेला. गोष्ट
मेक्सिकोतली आहे. मेक्सिकोत मक्याची शेते जवळपास २००-३०० एकर इतकी प्रचंड
असतात. मका पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून एका कं पनीने कणसे
खुडण्याचे एक संगणकावर चालणारे यंत्र तयार के ले होते. मक्याची कणसे त्या यंत्राच्या
इन्पुट बॉक्समध्ये आणून ठे वायची आणि त्या एका स्वयंचलित प्रोग्राममुळे ते यंत्र जेवढा
मका हातांनी खुडायला साधारण एक दिवस लागायचा ते काम एका तासात वगैरे पूर्ण
करायचे. त्याचे प्रात्यक्षिक दिले गेले, पण मेक्सिकन शेतकरी मंडळी काही ते वापरत
नव्हती. त्याबाबतच्या कारणांची चर्चा झाली तेव्हा तिथल्या एका अडाणी शेतकरी स्त्रीने
सांगितले, “आम्हाला हे यंत्र कसे वापरायचे ते समजते; पण समजा आम्ही हे यंत्र वापरले
तर हा सगळा मका खुडताना आम्ही सगळे जे एकत्र बसतो ज्या गप्पा, जे आपापसातील
माहिती देणे घेणे होते, जे एकमेकांच्या प्रश्नांचे, आनंद, दुःखाचे जे शेअरिंग होते त्याचे मग
आम्ही काय करायचे? भले आम्हाला वेळ लागत असेल जास्त, पण आम्हाला घाईत
जगून कु ठे जायचे आहे? आणि कशासाठी?" - संगणकीकृ त यांत्रिकी जीवनाच्या प्रगतीने
मानवी संवेदनांची होणारी ससेहोलपट आणि कृ त्रिम बुद्धिमत्तेने आपल्या शहाणपणाचा
घेतलेला ताबा यावर या इतके नेमके भाष्य असूच शकत नाही.
सुरुवात अगदी शाळेपासून करायला हवी. पूर्वी आपण पाढे पाठ करायचो. गणित
तोंडी करता यायचे हा त्याचा फायदा झाला. पण त्याने नुसतीच गणित या विषयाची
भीती घालवतानाच ते उच्चार, स्मरणशक्ती याचा आकडेमोडीसाठी मेंदूला ताण देत
त्याची कार्यक्षमता वाढवायचेही काम व्हायचे का? काहीही उत्तर शोधताना, सोडवताना
मेंदूला जी तार्किक मूलभूत विचार करण्याची जी सवय लागते त्यामुळे मेंदूत क्रिया आणि
प्रतिक्षिप्त क्रिया यांची एक साखळी तयार होते. बालपणी मेंदूविकासाची प्रक्रिया हीच
आहे. गणित आपण कॅ ल्क्युलेटरने सोडवतो तेव्हा ही प्रक्रिया बंद होते, कारण आपण
मेंदूला कोणताही ताण देत नाही. कोणी यावर म्हणेल माझा वेळ वाचला तर बिघडले
कु ठे ? प्रश्न वेळेचा नाहीये तर मेंदूत तार्किक विचार करण्याच्या अनेक शक्यतांची जी एक
साखळी तयार होते त्याच्या संदेश वहनाचा,त्यात दडलेल्या इंद्रियविकासाचा आहे. अशा
अनेक अप्रत्यक्ष गोष्टींनी आपल्या विचारांची जडणघडण होत असते. जर मुलगा सातव्या
वर्षापासून अशा जडणघडणीत गुंफला गेला नाही तर प्रक्रियेच्या विकासाची हमी कशी
देणार? अजून एक मुद्दा म्हणजे एखादी गोष्ट पाठ करून मग ती लक्षात ठे वणे आणि
एखादी गोष्ट कॅ ल्क्युलेटरसारख्या यंत्रामध्ये तयार असणे यात मूलभूत फरक आहे.
दुसरे उदाहरण प्रत्येक माणसाच्या अंगी उपजत असणाऱ्या सर्जनशीलतेचे पाहू या.
चित्रकार एखादे चित्र काढतो, तेव्हा त्याची काही प्रोग्रॅम करून ठे वलेली योजना असत
नाही. त्याची निर्मिती आणि सर्जनशीलता याचे एक व्यामिश्र रूप त्या चित्राबरोबर
आकार घेते. एखादा अभिनेता जेव्हा रंगमंचावर अविष्कार करतो तेव्हा त्या भूमिके चे
समज, आविष्कृ त होत जाताना सुचणारे विविध आयाम, तिथे उपस्थित असणाऱ्या
प्रेक्षकांशी होणारी सुप्त मनाच्या पातळीवरची देवाणघेवाण या सगळ्यांचा मिळून एक
समुच्चय परिणाम तिथे साधला जातो. त्या आविष्काराची अनुभूती नेहमीच बदलत
असते. हे फक्त उपजत बुद्धिमत्तेमुळेच शक्य आहे. याची आज्ञावली नाही तयार करता
येत. सगळ्यांनी रेसिपी बुकप्रमाणे तंतोतंत स्वयंपाक के ला तरी चवीत फरक का पडतो
याचे उत्तर काय देणार?
२००१ मध्ये युनोच्या एका अभ्यास गटाने नोंदवले की संगणक आणि इंटरनेटच्या
बिनडोक आणि अमर्याद वापराने जगातील सुमारे अर्ध्याहून अधिक भाषा नामशेष होत
आहेत. वरवर बघता हे अतिशयोक्त वाटेल पण उदाहरणच पाहूयात. संस्कृ त भाषेतील
'ओम्' या शब्दाचे उदाहरण घेऊ. 'ओम्'चा उच्चार दोन स्वर आणि एका अर्ध्या व्यंजनात
विभागाला गेलाय. अ, उ आणि म्. याशिवाय हा उच्चाराधिष्ठीत शब्द आहे. संगणकाची
भाषा इंग्लिश असल्याने त्याचे स्पेलिंग जच असे होते. म्हणजे जी मुले आता
संगणकाद्वारा संस्कृ त भाषा शिकू पाहतील त्यांना याचा उच्चार 'ओम्' असा साधा हुंकार
नसणारा, श्वासाच्या आरोह-अवरोहावर अवलंबून नसणारा असाच माहीत होईल. असे
सरू राहिले तर मात्र हळहळ उच्चाराधिष्ठीत.स्वराधिष्ठीत शब्द नष्ट होतील.
काही दिवसांनी उच्चार आणि संगणकीय भाषा यांचे त्रैराशिक मांडताच येणार
नाही. सगळे फक्त आद्याक्षरांमध्ये बसवल्यामुळे आपण ते उच्चारच गमावून बसू की
काय? मग भाषा आणि संस्कृ ती यांचे असणारे एक अतूट नाते विसविशीत होत जाईल.
त्याचबरोबर अनेक स्थानिक सांस्कृ तिक दुवेही, ज्यात मुलांची वाढ होतानाचे वातावरण,
त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी जगण्याची पद्धती यांचेही
पाश ढिले पडतील. उपजत बुद्धिमत्तेची जागा मग कृ त्रिम बुद्धिमत्ता घेईल. खूप माहिती
असेल पण त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता निघून जाईल. अभ्यास करून, प्रसंगी
वितंडवाद करून आपली मते तपासून पाहण्यापेक्षा रेडिमेड माहितीने ज्ञान समजल्याने,
कोणाची तरी मते आपली बनून जातील. आपण त्यासाठी भांडू, ग्लोबल व्हिलेजपेक्षा
ग्लोबल पाईलेज झाले असल्याने एखादी गोष्ट शोधून काढण्याचे मार्ग बंद होतील. हे
सगळे होईल असे मी म्हणतो आहे खरे; पण अलीकडेच काही तरुण मुलांशी बोलताना
माझ्या असे लक्षात आले आहे की महानगरातल्या तरुण मुलांचे इंटरनेटवरचे सर्किंग
इतके वाढले हे की मानवी संवेदना, निसर्गाचे आकलन आणि वाचन कमी झाले आहे.
नैसर्गिक मूल्यांची (व्हर्चुज) जागा कौशल्ये (स्किल्स) घेत आहेत. वाहणारी नदी असणे ही
समृद्धी आणि वाहत्या पाण्याला अडवून त्यावर धरण असणे ही संपत्ती. त्यामुळेच संपत्ती
काहीच ठिकाणी असू शकते, सर्वत्र नाही. आता संपत्तीची वाढ होत जाईल तशी समृद्धी
रोडावेल. नदीचे अस्तित्वच धरणाचे आश्वासन जिवंत ठे वते. नदी हा सोर्स आहे धरण
रिसोर्स. रिसोर्स सोर्सला घातक ठरून कसे चालेल? ते त्याच्याच अस्तित्वावरचे प्रश्नचिन्ह
नाही का ठरणार? हेच उदाहरण शहाणपण आणि बुद्धिमत्तेला लागू पडते. शहाणपण हे
अनुभवातून येते तसेच ते अंगभूत असते. जगताना आपण अनुभवांसाठी नेहमी सजग
असतो तेव्हाच त्या अनुभवांचे सार मनात रुजते, त्याचे एक विश्लेषण पूर्ण होते आणि
त्याप्रमाणे आपल्या शहाणपणाचीही नकळत जडणघडण होत जाते. मात्र त्यासाठी
चौफे र जगावे लागते. जीवनशैलीचे मोठे योगदान चौफे र जगण्यात आहे. तिची
व्यामिश्रता, वैविध्य जपण्यातच सगळे मर्म आहे. ती एकसाची होणार नाही याची
काळजी घ्यावी लागते. आहे, दिसतो त्यापेक्षा प्रत्यक्ष अवकाश मोठा आहे ही धारणा
मनात ठे वावी लागते. जगण्याचे विविध स्तर हवे असतील तर ते कदाचित जगणे सोपे
करून मिळणार नाहीत, अतिसुलभ जगण्याने फार फार तर आरामशीरपणा येईल पण
मग त्यामुळे जगण्याचा कस मात्र लागणार नाही. अतिसुलभ जगताना सारे सोपे होईल
पण मग आपल्याला शहाणपण येणार नाही हा फार नुकसानीचा सौदा आहे. म्हणून
ज्यांना शहाणपण हवे असेल त्यांना जगण्यात थोडे कष्ट पेरावे लागतील. ज्या वयात
आपला विकास होतो तिथे तर हे प्रकर्षाने करावे लागेल. कोणत्या वयात काय
सहजसाध्य करायचे आणि कोणाला थोडे झगडावे लागेल हे पहायचे याचे आपण निर्माण
के लेल संके त आपण स्वत: याबाबतीत किती सजग आहोत हे दाखवून देईल. मुलांना
सतत आराम मिळेल अशी जीवनशैली निर्माण करण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या शहाणपणाने
त्यांचे आयुष्य कसे समाधानी करता येईल याचे वस्तुपाठ देणे गरजेचे नाही का? ती
आपली जबाबदारी नाही का? आज बघितले तर सुख, चैन, समृद्धी याला समाधान
मानण्याची प्रवृत्ती बोकाळते आहे. त्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतील. शहाणपण
जन्माला घालणे सोपे कसे असेल?
हे सर्व विवेचन बघता हा संघर्ष या पुढच्या सगळ्या संघर्षात अतिशय टोकाचा नाही
तर निर्णायकीसुद्धा असण्याची दाट शक्यता आहे. माहिती, ज्ञान आणि शहाणपणा ह्या
वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि माहितीला ज्ञान समजणे हे जितके अपरिपक्वतेचे लक्षण
आहे, तितके च माहितीतून येणाऱ्या ज्ञानालाच शहाणपण समजणे आपल्या
विकासासाठी फार दुर्दैवी आहे. तथाकथित प्रगतीच्या व्याख्येत मानवी जीवनाचा प्रवास
हा उपजत प्रज्ञेकडून (Native Intelligence) शहाणपणा (Wisdom) कडे व्हायला
हवा; तो जर कृ त्रिम प्रक्षेकडे (Artificial Intelligence) होत असेल तर ते हिताचे नाही.
कारण कृ त्रिम प्रज्ञा ही मानवी जीवांच्या सर्जनशीलतेत काहीही योगदान देऊ शकत नाही.
इतके च नव्हे तर अडसर ठरण्याची शक्यताच नाही तर उदाहरणे आहेत. आज हे सर्व
मांडण्याचे कारण म्हणजे के वळ आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर काही शक्ती एका नव्या
जगाची रचना करू पाहत आहेत. त्या कोण आहेत आणि हे सर्व कशासाठी चालले
आहे? जगाला एकसाची करण्याच्या मुळाशी धार्मिक, राजकीय, लष्करी, सामाजिक,
वादिक, की आर्थिक अशा कोणत्या प्रेरणा आहेत? सारे जग असे एखाद्याला स्वत:च्या
पंखाखाली आणणे शक्य आहे का? खरे तर मानवी जीवनातील बदल हे नेहमीच
स्वागतार्ह असतात. पण बदलांनी मानवी मूलभूत प्रेरणा आणि संरचनेवर प्रभुत्व मिळवले
तर पुढे काय होईल याचा विचार कारणे हेच बुद्धिमत्ता आणि शहाणपण ह्यातले अंतर.
जाणिवेची परीक्षा नाही, ज्ञानाला गुण नाहीत अशी ही माहितीवर आधारित आणि तेही
निरुपयोगी, नियंत्रित माहितीवर आधारित शिक्षणपद्धती कोणाला हवा तसा समाज
निर्माण करत आहे? सारे जग असे सांगकामे व्हावे का? बुद्धिमत्ता टोकाची पण
शहाणपणरहित होणे हा काय प्रकार आहे? हे कोणते आक्रमण आहे? पं. आपल्या
जगण्याला दिलेले विविधतेचे आयाम, भौतिक सुखांचे पर्याय एकदा नीट तपासून
पाहायला हवेत. हे सत्य आहे का भ्रम याचा एकदा धांडोळा घ्यायला हवा. जगात
सगळीकडे स्वातंत्र्याचे भ्रम आहेत पण त्या देशांचा स्वत:च्या धोरणांवर ताबा नाही असे
जग काय कामाचे? आज जगात सर्वत्र ५०० टीव्ही चॅनेल्सचा पर्याय आहे. पण सर्व
चॅनेल्सवर येणारा संदेश मात्र एकच आहे. विविध प्रकारचे खाण्याचे पर्याय आहेत, पण
त्यातले ९०% एकाच प्रकारच्या धान्यापासून बनवले जात आहेत. म भारतासारख्या
देशात आज निवडणुकीला अनेक राजकीय पक्ष, अनेक विचारधारा उभ्या असतात असे
भासवले जाते पण कोणीही आले तरी आपल्या आयुष्यात काहीच फरक कसा पडत
नाही? आर्थिक स्वातंत्र्याचे तर अजूनच धिंडवडे आहेत. तुम्हाला गुंतवणुकीचे अनेक
पर्याय आहेत पण जेव्हा हे सगळे बुडते तेव्हा एकत्र कसे होते? तुम्ही स्वतंत्र विचार करत
नाही हे खरे आहे का? तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा ताबा कोणीतरी घेतला आहे
का? तुमच्या जगण्यावर कोणीतरी नियंत्रित कर लादत करते आहे का? मुख्य म्हणजे हे
तुमच्या स्वत:च्या नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी फायद्यासाठी आहे असा विचार करू
लागलो की काय वाटते? देश कोणताही असो,
तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीचा ताबा कोणाकडे आहे याचा नीट विचार करा. सगळ्या
जगात एकच कं झ्युमर ऑर्डर आहे का? आपण काय परिधान करतो? म्हणजे काय
घालावे? कसे जगावे? काय वापरावे कु ठे जावे? कसे राहावे? काय खावे-प्यावे? सुटी
म्हणजे काय? ती मजेत घालवणे म्हणजे काय? मुलांना विरंगुळा म्हणून काय करावेसे
वाटावे? पालकांना मुलांचे लाड म्हणजे काय करावेसे वाटावे? फादर्स डे, मदर्स डे,
फ्रें डशिप डे, ग्रँडपा डे, डॉक्टर डे हे सगळे काय आहे? उपभोगवादाचे हे प्रॉडक्ट आहे का?
हे सगळे कोण ठरवते आहे? त्याच्यामागे काय दडलेले आहे? यातून मिळणाऱ्या अमर्याद
उत्पन्नात कोणाचे फायदे आहेत? सगळ्यांच्या दुःख-सुखाच्या कल्पना एकच कशा
असतील? सगळ्या जगाचा हॅपी इंडेक्स एकच कसा असेल? आपल्या इतक्या छान
आणि विविधरंगी आयुष्याचे एखाद्या वस्तृत रुपांतर होणे कोणाच्या फायद्याचे आहे?
याचा खोलवर विचार करावाच लागेल, कारण आपण कु ठे आहोत यापेक्षा कु ठे जायचे
आहे यावर आयुष्य ठरते...
अनेकपक्षी करार, मुक्त व्यापार करार, वस्तू, उत्पादने, माणसांची एकसाची
जीवनपद्धती या सगळ्या गोष्टींचे जागतिकीकरण म्हणजे कोणत्या तरी हव्यासी
ऑक्टोपसचे अनेक पाय आहेत. ज्याला आपण विकास समजून त्यामागे खुळ्यासारखे
धावत आहोत तो आपल्या विनाशाचा एक छु पा अजेंडा आहे हे आपल्या लक्षात का येत
नाही? अर्थशास्त्राचे पुस्तकी विद्वान अर्थशास्त्रीय सिद्धान्तातून बाहेर पडताना दिसत
नाहीत. दरम्यान जागतिकीकरणाच्या संकु चित अंधाऱ्या खोलीत आपले आयुष्य
घुसमटून जात आहे. ते विस्तृत होण्याऐवजी आपल्या स्वत:पुरते जगायला शिकवत आहे.
माहितीचे मायाजाळ यालाच ज्ञान समजण्याची एक घातक सवय आपल्याला लावत
आहेत.
आपला प्रवास व्यक्ती ते समष्टी ते सृष्टी असा होण्याऐवजी व्यक्ती, व्यक्तिगत
आणि माझ्यापुरते असा होतो आहे का, याचा विचार करणे, त्यावर सतत चिंतन करणे
जरुरीचे आहे.
३७. हीच ती वेळ, हाच तो क्षण

माणसाच्या आयुष्यात वर्षे वगैरे गणना महत्त्वाची; पण सृष्टीच्या परिघात याला


फार महत्त्व नाही असे असले तरी २०११ ची पानगळ सुरू झाली आहे. आधी स्मरणात
आणि मग विस्मरणात जाणारे अजून एक वर्ष. या वर्षात घडलेल्या अनेक घटना
कालांतराने विस्मरणात जातील, आपण गमावलेली माणसे भिंतींवर जातील. पण या
घटनांनी आणि माणसांनी घडवलेल्या क्षणांचे पडसाद घेऊनच नवीन वर्षाची पहाट
उगवेल. सध्याच्या विश्वाचा वेग हा प्रचंड आहे. त्यामुळे काहीही आणि कोणीही
रेंगाळणार नाही. या सदरातन वर्षभर आपण अनेक विषयांना स्पर्श के ला. हो स्पर्शच:
कारण एके का विषयाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्यासाठी सदर अपुरे पडावे. पण
या वर्तमान विश्वातल्या आपणच जन्माला घातलेल्या आर्ततेचा परिचय करून देणे हा हेतू
होता आणि तो वाचकांचा सततचा आणि प्रचंड असा प्रतिसाद बघता सफळ झाला असे
म्हणावे लागेल. पुढे कधीतरी यातील प्रत्येक विषयावर सखोलपणे पुस्तकरूपात लिहावे
असेही मनात आहे...असो. माझ्या नाटकाच्या अनेक दौऱ्यात महाराष्ट्रात, इतके च नाही
तर परप्रांतातल्या ठिकाणीही अनेक लोकांनी या सदराचा उल्लेख के ला. तशा अर्थाने हे
'लोकमत'चेही यश आहे कारण 'लोकमत' इतका सर्वदूर पसरला आहे.
आपण ज्या विषयांच्या आवाक्यात शिरलो ते विषय समजावून घेतले, त्यांची
व्याप्ती येणाऱ्या वर्षांत अनेक पटींनी वाढणार आहे. आता हे सर्वच सगळ्यांच्या
हाताबाहेर चालले आहे. भारतातच काय पण जगातसुद्धा माणसाच्या सुखी
आयुष्याबद्दलचा बेदरकारपणा अगदी शिगोशिग भरला आहे. एकीकडे मोठमोठी
कापेरिशन्स आणि त्यासमोर हतबल असणारी सरकारे; तर दुसरीकडे ठरावीक देशांच्या
बोटावर खेळवल्या जाणाऱ्या गरीब देशांना जणू लुटणाऱ्या नाणेनिधी, वर्ल्ड बँक
यांसारख्या विविध संस्था यांच्या गुंतागुंतीच्या व्यवहारांनी जगाचे आर्थिक चित्र व्यापून
टाकले आहे. एक नवा आर्थिक भूगोल त्यातून जन्माला येतो आहे. या भूगोलात आता
हळूहळू नेत्यांचे महत्त्व कमी होत जाणार. सगळे एका आर्थिक सूत्रात घट्टपणे बांधले
जाणार. नीट बघितले तर ज्यांची जगावर पकड (चांगल्या अर्थाने) अथवा दरारा असेल
असे किती नेते या शतकाच्या पहिल्या दशकात जन्माला आले? मागील शतकाच्या
तुलनेत? संख्येने आणि गुणांनीही कमीच. हे धोकादायक आहे असे माझे म्हणणे नाही
पण ह्याचा एक अर्थ आहे तो म्हणजे माणसांच्या कर्तृत्वाचा परीघ आकुं चन पावतो आहे.
जग जवळ येते आहे आणि त्याच्यावर दबाव असणारी माणसे आकुं चित! गंमत आहे.
या घडीला युरोपसारख्या राष्ट्रसमूहाचे सगळे अस्तित्वच जणू फु टीरतेच्या काठावर
उभे आहे. त्यांना सावरणे, एकत्र ठे वणे हा एक नवाच अजेंडा या निमित्ताने जगाच्या
व्यापक आर्थिक धोरणात आला आहे. जागतिकीकरणाचे हे अजून एक भेसूर रुपडे.
म्हणजे त्याचे फायदे ओरबाडताना काही लोकांना फायदा होतो. त्याच वेळी काही
लोकांच्या नशिबी आर्थिक अनागोंदी येते. हे दोन्ही सूर एकच वेळी ऐकू येणे हा अजून
एक दिशाहीनतेचाच पुरावा नव्हे काय? सध्याच्या नवीन मतलबी अर्थव्यवस्थेत देशहिताचे
धोरण करताना तुम्ही एकतर लुटारूं च्या बाजूचे असतात किंवा लुटले तरी जातात.
दुर्दैवाने हे दोन्ही सध्या घडते आहे. एका अपरिहार्य जागतिक परिस्थितीत आपण देश
म्हणून ओढले जात आहोत आणि त्याच्यावर आपला ताबा नाही. परकीय आर्थिक
गुंतवणुकीच्या आणि मदतीच्या संकल्पना जगभर राबवणारे आणि त्याद्वारे फक्त
स्वत:च्या तुंबड्या भरणारे यांनी आज विकसनशील देशांपुढे काय वाढून ठे वले आहे?
आज ही राष्ट्रे घेतलेल्या प्रत्येक एक डॉलरच्या परकीय आर्थिक मदतीमागे कर्ज
फे डण्यासाठी सुमारे २५ डॉलर्सचा परतावा करत आहे. याचाच अर्थ या लुटारुं च्या
निरनिराळ्या आर्थिक कार्यक्रमांनी त्यांना भिके च्या दाराशी आणून ठे वले आहे.
गेल्या वर्षात पाश्चिमात्य आणि उत्तरेकडचे जग कोलमडत गेले आणि जगाच्या
आर्थिक प्रगतीचे सुकाणू इतिहासात प्रथमच आशियाकडे सरकले. ही अभूतपूर्व अशी
घटना आहे. जर आशियातील एक प्रमुख देश म्हणून आपण याचा फायदा घेऊ शकलो
नाही तर मात्र चीनच्या मागे आपली फरफट होण्याशिवाय गत्यंतर नाही. चीनचे
राजकारण इतके आक्रमक का झाले याचे उत्तर त्याच्या बुलंद आर्थिक रचनेत आहे.
बाकी देश दहशतवादाविरुद्धच्या काहीशा एकांगी आणि मर्यादित विचारांच्या लढ्यात
असताना चीनने स्वत:चे स्थान बळकट के ले यात शंका नाही.
जगाच्या लोकसंख्येने यावर्षी सात अब्जचा आकडा ओलांडला. याचा अर्थ मानव
म्हणून आपण विक्रमी टिकणारी आणि वाढणारी प्रजाती ठरलो. उत्क्रांतीच्या टप्प्यावर
आपण नष्ट झालो नाही. युनोच्या एका अहवालानुसार जास्त लोक जन्माला आले असा
याचा अर्थ नाही; तर माणसे दीर्घायुषी होत आहेत हेसुद्धा त्याचे एक प्रमुख कारण आहे.
याचा अर्थ वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे, थोडे अजून खोलात गेले तर असे लक्षात
येईल की जगभर वृद्ध माणसे वाढत असताना, आपला देश मात्र तरुण होत आहे. २०२०
साली आपल्या देशात अमेरिका आणि युरोपच्या एकू ण लोकसंख्येपेक्षा जास्त लोक हे
फक्त तरुण असतील. त्यांच्या आयुष्याला दिशा असेल, त्यांच्या ऊर्जेच्या विधायक
वापराची यंत्रणा उभी असेल तर ही एक प्रचंड देशहिताची बाब ठरेल. तसे झाले नाही तर
मात्र आपण जगातला सगळ्यात अस्थिर देश म्हणून गणले जाण्याचा धोका आहे.
'सरकार काही करेल' असले भ्रम आता ठे वता येणार नाहीत. तर हा पट लक्षात घेऊन ही
सुरुवात करावी लागेल. राजकीय अथवा आर्थिक पातळीवर मला धोरण म्हणून एक
अत्यंत बौद्धिक दिवाळखोरी दिसते आहे. ते काहीही असले तरी हेच आज पन्नाशीला
असलेल्या पिढीचे प्रमुख काम आहे आणि ते जर दुर्लक्षिले गेले तर आपण येणारी पिढी
या देशाशी बांधून ठे वू शकू असे मला वाटत नाही. जगातल्या ७ अब्जापैकी ५०,०००
लोक दर दिवशी भुके ने मरतात हे वर्षाला १.८ कोटी होतात. भुके लेपण हा कोणत्याही
रोगापेक्षा जास्त मोठा किलर आहे. आज १ अब्ज माणसे अन्नाला पारखी आहेत.
त्यातील ६५ कोटी लोक हे भारत, चीन, बांगला देश, पाकिस्तान, रिपब्लिक ऑफ कांगो,
इंडोनेशिया आणि इथिओपिया या ७ देशात आहेत. या सगळ्याचा विचार करता आपण
भारत देश म्हणून महासत्ता कसा काय असू शकतो? जगातील विकसनशील देशात
दरवर्षी ५० लाख मुले (५ वर्षांखालील) कु पोषणाने मरतात.
जगातील अत्यंत गरीब अशा ४८ देशांचा (GDP) एकत्र के ला तर तो जगातील
फक्त ३% अतिश्रीमंत लोकांच्या उत्पन्नाइतका आहे. जगातील सुमारे १३० कोटी
लोकांचे दर दिवशी उत्पन्न हे ६० रुपये प्रतिदिन आहे; तर २५७ कोटींचे १०० रुपये
प्रतिदिन आहे. मागच्या शतकाच्या चकलेल्या अथवा भरकटलेल्या धोरणांनी म्हणा
अथवा त्याच्या अकार्यक्षम राबवणुकीने म्हणा पण आपण या विषमतेचे दुर्दैवी साक्षीदार
आहोत. जगातील ११० कोटी लोक शुद्ध पाण्याला वंचित आहेत; तर २६० कोटी
लोकांसाठी सांडपाण्याच्या व्यवस्था नाहीत. जगातला लष्करी खर्च फक्त एका टक्क्याने
कमी के ला तर त्यातून जगातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळू शके ल.
वाचकहो, याचा अर्थ हा नाही की काही चांगल्या गोष्टी घडल्या नाहीत, पण आपला
विषय विश्वाच्या आर्ततेचा होता आणि त्याचाच आपण या वर्षभरात परिचय करून
घेतला. आणि वर्ष उलटताना एकदा त्याची संपूर्ण उजळणी नाही तरी आठवण ठे वणे
अपरिहार्य आहे. यामुळे आमच्या आयुष्याचाच अजेंडा बदलू शकतो, असे एका वाचकाने
माझ्याशी बोलताना एकदा म्हटले होते आणि त्याचेच स्मरण आत्ता माझ्या मनात आहे.
जगाच्या प्रतलावर अनेक उलथापालथ होत असताना आपण हे सगळे उमजून घेऊन
त्यातून हा देश घडवण्याची गरज आहे. आंदोलने, मोर्चे, बंद यांसारख्या निष्फळ गोष्टीतून
हे साध्य होईल असे वाटत नाही. हा सानाजाच्या शिक्षणाचा जागृतीचा भाग आहे आणि
त्यांत कोणाविरुद्ध अथवा कोणाच्या बाजूने असे काहीही नाही. सगळे आहे ते
सगळ्यांसाठी आहे. जे शिक्षित आहेत ज्यांनी या परिस्थितीचा अभ्यास के ला आहे त्यांची
जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. देश हा नेहमीच त्यातल्या काम करणाऱ्या लोकांतून
घडत असतो. सरकारी पातळीवर यातले काहीही घडत नाही आणि तशी अपेक्षा
वाजवीही नाही. यासोबत बदलत्या कळात राजकीय पक्षांनी भान ठे वून राजकीय
अजेंड्याला आता सामाजिक वळण देण्याची गरज आहे. जागतिकीकरणाने या
शतकातले पहिले दशक संपताना आपल्याला गुलामगिरी, सावधचित्त देशहित अथवा
अराजक अशा तिहेरी रस्त्यांच्या टोकाशी आणून ठे वले आहे. याची समज न ठे वता, रस्ता
निवडायचा चुकला तर; आपण सर्वजण अतिशय वेगाने अशा एका जागतिक आर्थिक
आवर्तात ओढले जाऊ आणि ते थोपवणे अशक्य होईल म्हणून हीच ती वेळ, हाच तो
क्षण!

◆ ◆ ◆

You might also like