You are on page 1of 19

// सुस्वागतम् //

गेनबा सोपानराव मोझे अध्यापक महाविदयालय


वडमुखवाडी, पुणे - ४१२१०५

विदयार्थी शिक्षकाचे नांव : देशमुख अश्विनी विशाल‍

पेपर १०२ - समकालीन भारतीय शिक्षण लिंगभाव आणि समाज

बी. एड. प्रथम वर्ष २०२१ – २२

मार्गदर्शकाचे नांव : प्रा. तडस.एम.जी


लिंगभाव व शालेय शिक्षण

लिंगभेदाचे शालेय स्तरावरील परिणाम

लिंगभाव समानतेच्या तरतुदी

लिंग भाव विकासात शिक्षणाची भूमिका


शाळेतील लिंगभाव संबंधीचे मुद्दे :-

ज्याप्रमाणे समाजात काही अंशी लिंगभाव दर्शविला जातो. त्याचप्रमाणे शाळेतही लिंगभाव परिस्थिती दिसून येते. आणि हा लिंगभेद मुले
आणि मुलींच्या उपस्थितीवरून स्पष्ट होतो.

समाजाचा शिक्षणाचा बघण्याचा दृष्टीकोण हा मागासलेला असतो. मुलींना शाळेत पाठवले जात नाही.

शाळेतील मुलामलींचे उपस्थितीचे प्रमाण, यातही मुलींचे प्रमाण जास्त की मुलांचे प्रमाण जास्त, खेळाच्या काही प्रकारामध्ये मुलींना सहभागी
होता येत नाही आणि शाळेत जाण्यासाठी मुलींना अनुकू ल असे वातावरण या सर्व समस्यामुळे शाळेतही लिंगभाव दिसून येतो.
शाळेय नावनोंदणी संदर्भात लिंगभाव प्रवृत्ती :

परंपरागत आणि जुन्या विचारसरणीचे पालक मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीन असतात. याचा परिणाम शालेय नावनोंदणीवर होतो.

अनेक पालकाची माध्यमिक सह शिक्षणाला नापसंती असते. स्वतंत्र मुलींच्या शाळेचे प्रमाण कमी असते.

आईला घरकामात मदत करणे. लहान भावंडाचा सांभाळ करणे. या कारणामुळे मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लश के ले जाते.

काही प्रमाणात पालकांची आर्थिक कु वत नसते. आशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण महत्वाचे मानले जात नाही याचा परिणाम शालेय
नावनोंदणीवर होतो.
गळती आणि घरची जबाबदारी :

प्राथमिक शाळेत दाखल झाल्यानंतर विदयार्थी कायमस्वरूपी साक्षरता प्राप्त करण्यापूर्वीच शाळा सोडतो त्याला गळती असे म्हणतात.
हे प्रमाणे मुलींच्या संदर्भात जास्त दिसून येते. याची काही सामाजिक तर काही आर्थिक कारणेही असू शकतात

सामाजिक कारणांमध्ये समाजात असणारे अज्ञान, अंधश्रध्दा, रूढी, प्रियता, पारंपरिक विचार, सहशिक्षणास असणारा विरोध यांचा
समावेश होतो.

आर्थिक कारणांमध्ये काही पालकांना आपलया मिळणाऱ्या उत्पन्नातून शिक्षणावरील खर्च करणे शक्य हेात नाही. त्यामुळे अनेक
कु टुंबाना आपल्या व्यवसायामध्ये मुलांचे सहकार्य हवे असते. यामुळे मुलांना शाळा सोडावी लागते व घरची जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूने
शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण वाढते.
सामाजिक दृष्टिकोन :

व्यक्तीमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे शाळेचे महत्वाचे कार्य आहे. या दृष्टिकोनातून समाजातील लोकांच्या विचारात
परिवर्तन होत असते. परंतु काही प्रदेशात शिक्षणविषयक दृष्टिकोन मागासलेला असतो. पुरुषप्रधान संस्कृ तीमुळे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन
दुय्यम दिसतो.

मुळात स्त्री-पुरूष लिंगभेद न करता प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून वागविण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे: परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती
तशी नाही. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून लिंगभेद दिसून येतो. त्यासाठी शाळेमध्ये लिंगभेदरहित शिक्षण देणे महत्वाचे आहे.
लैगिक शोषण :

कोणत्याही प्रकारच्या असंमत लैंगिक छळास लैंगिक शोषण अशी संज्ञा दिली जाते यामध्ये अश्लील विनोद करणे,
दिसण्यावरून, पोषाखावरून भाष्य करणे, काम करताना दृविअर्थी भाषा वापरणे, मनावर विचित्र ताण येईल असे
वागणे, असे सर्वच लैगिक शोषणामध्ये मोडतात.

लैंगिक शोषण हे एकप्रकारे हिंसेच दुसरे रूप आहे असे मानले जाते. समाजात काही विभागात लैंगिक शोषणाचे
प्रकार दिसून येतात. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काही प्रमाणात हे शोषण दिसून येते. या प्रकारच्या लैंगिक शोषणामुळेही
शाळेमध्ये मुलींचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.
लिंग भाव समानतेसाठीच्या तरतुदी :

घटनात्मक तरतुदी :-
भारतीय घटनेमध्ये स्त्री-पुरूष समानतेच्या अनुषंगाने स्त्रीयांची होणारी पिळवणूक, शोषण थांबविण्याचे
अनेक तरतुदी के ल्या आहे. त्याचबरोबर सर्वाना समानतेचा हक्क मिळावी याविषयी काही तरतुदी करण्यात
आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :
कायदयापुढील समानता : -

भारतीय संविधानाने सर्व कायदयातील समानता मान्य के लेली आहे. कायदयाद्वारे विहित के लेल्या
कार्यपध्दतिखेरीज कु ठल्याही व्यक्तीचे जीवित अगर वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेत येत नाही. अप्राध्यान सुद्धा दोष
सिद्धिबाबत संरक्षण देण्यात आलेले आहे. लोकांना समाजात समानतेची वागणूक देणे हे घटनात्मक तरतुदीमध्ये महत्वाचे
मानले जाते. ज्या स्त्रींयाना व पुरूषांना समता आणि समान संधीचे तत्व माहीत नाही आणि ज्यांना कौंटुबिक अगर आर्थिक
क्षेत्रात समानतेची वागणूक कधीच मिळणार नाही. त्याना प्रथम सवलती उपलब्ध करून देऊन त्यांच्यात पुरूषाच्या
बरोबरीने वागण्याची क्षमता निर्माण करणे. हे घटनात्मक तरतुदीमध्ये महत्वाचे मानले गेले.
स्त्रीयांसाठी विशेष तरतुदी :-

स्वातंत्र्यपूर्व काळात सतिबंदीचा कायदा, हिंदूविधवा कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, समती वयाचा
कायदा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा असे कायदे करण्यात आले. स्त्रीची प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून इंडियन पिनल
कोड आदी कायदयातही तरतुदी करण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतर विवाहनोंदणी, हुंडाप्रतिबंध, घटस्फोट, पोटकी,
दत्तक व पालकत्व,वारसा, गर्भपातसंबंधीचे कायदेही यात करण्यात आले या सर्व कायदयामागची भूमिका स्त्रीचे नागरिक
व व्यक्ति म्हणून स्वातंत्र्य हे मूल्य समाजाने मान्य करावे अशीच होती. तिचे व्यक्तिमत्व समाजात मान्य करण्यासाठी,
प्रस्थापित करण्यासाठी या कायदयान्वये काही विशेष तरतुदी करण्यात आल्या.
कायदे नागरी कायदा :

भारतीय राज्यघटनेतील कलम १४ प्रमाणे, सर्व नागरिक कायदयासमोर समान आहेत. शासन
संस्थेला कोणत्याही नागरीकास कायदयातील समानता व कायदयाचे समान संरक्षण नाकारता येत नाही
अर्थात देशातील स्त्री-पुरूष भेदभाव न करता सर्वाना समान नागरिकत्वाचा अधिकार मिळाला पाहिजे.
संयुक्त राष्टसंघाच्या एका
महिला कल्याणासाठी काही विशेष कायदे : -

१९६१ च्या कायदयान्वये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला या कायदयान्वये हुंडा मागणे आणि हुंडा देण गुन्हे आहेत.

२) महिला संरक्षण कायदा, कौटुंबिक छळ प्रतिबंधक कायदा आखण्यात आला हा कायदा स्त्रीला कौटुंबिक, सामाजि,
आर्थिक व शारीरिक संरक्षण देतो.

३) भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करण्याऱ्याना शिक्षण देण्याची तरतुद आहे.

४) बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम


(शरद ॲक्ट) १९८७ मध्ये सुधारणा झाल्या आहेत.
५ ) कौंटुबिक न्यायालय कायदा, छेडछाड कारण, मुलांवर हक्क, समान वेतन कायदा लैंगिक गुन्हे विरोधात कायदा, हिंदू
विवाह कायदा अशाप्रकारचे अनेक कायदे महिला कल्याणासाठी आखण्यात आले.

सामाजिक आणि सांस्कृ तिक हक्क :-

भारताच्या कोणत्याही प्रदेशात व भागात राहणाऱ्या नागरिकाला जर स्वत:ची विशिष्ट भाषा, लिपी व संस्कृ ती असेल
तर ती अबाधित राखण्याचा त्याचा हक्क राहील असे भारतीय संविधानामध्ये स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार कोणत्याही
प्रदेशातील व्यक्ति ही कोणत्याही समाजात, संस्कृ तीत (सन, उत्सव, धार्मिक कार्य) यात सहभागी होऊ शकते. स्त्री-
पुरूष संहतेविषयीची के लेली तरतुद स्पष्ट होते.
लिंगभाव विकासात शिक्षणाची भूमिका : -

१ ) लैगिक असमानतेचे आव्हान स्वीकारणे :

विकसनशील देशात लैंगिक असमानतेचे प्रमाण जास्त असते. विशेषत: ग्रामीण भागात लोकवस्तीमध्ये जेथे आर्थिक विषमता
असते तेथे लैंगिक अस्मानतेचे प्रमाण जास्त असते. ही प्रमाण कमी करणे ही शिक्षण क्षेत्राकडे एक आव्हान आहे असे मानले जाते. ही
आव्हान स्वीकारण्यात शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका आहे. समाजातील ही लैंगिक असमानता कमी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात विविध
कार्यक्रम, उपाययोजना, सवलती राबविल्या जातात.
२) लैंगिक साम्यतेचे दृढीकरण करणे :-

शिक्षण क्षेत्रात स्त्री-पुरूष समानता ही मूल्य विदयार्थ्यांमध्ये रूजविले जाते. यावरून शिक्षणयाद्वारे समाजात
लैंगिक साम्यतेचे दृढीकरण के ले जाते. लैंगिक साम्यतेचे दृढीकरण करणे ही शिक्षण महत्वपूर्ण मानले जाते. ग्रामीण,
मागासलेल्या भागात आजही समाजात मुलगा-मुलगी असा भेदभाव के ला जातो. मुलीला नेहमी दुय्यम स्थान दिले
जाते. याचा परिणाम त्या मुलीच्या शिक्षणावर, व्यवसायावर, मानसिकतेवर होतो व त्यांची प्रगती खुंटते. परिणामी
स्त्रीयांचे समाजात दुय्यम राहते. हा भेद दूर करण्यासाठी शिक्षण संस्थाद्वारे लिंगभेद दूर करून लैंगिक साम्यतेचे
दृष्टीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. समाजात स्त्रीयांचे, मुलींचे महत्व पटवून दिले जाते.
मुलगा-मुलगी दोघांनाही समान अधिकार देण्यासाठी विशेष सवलती प्राप्त करून दिल्या जातात.
३) संवेदनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षण पद्ध्तीत
बदल करणे :-

समाजात असणारा लिंग भेद दूर करून व्यक्तींच्या विचारात संवेदनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षण पदधतीत बदल
करून लिंग भाव विषयक नवा दृष्टिकोण मांडला जातो. समाजातील मुलांचे महत्व पटवून देण्यासाठी वेगवेगळी व्याख्याने,
कार्यक्रम, प्रसारमाध्यमांद्वारे नवा दृष्टिकोन मांडला जातो.

शिक्षणाची महत्वूपर्ण भूमिका ही सर्वच क्षेत्रात असते: परंतु समाजात काही नकारात्मक दष्टिकोन, विचारसरणी असतात.
हा दृष्टिकोन बदलण्यासाठी शिक्षणाची आवश्कता असते. समाजातील लिंगभावविषयक नकारात्मक दृष्टिकोन मोडू न काढू न
समाजात स्त्री-पुरूष समानता, मानवी हक्क ही भावना वाढीस लावण्यासाठी शिक्षणाची भूमिका असते.
// धन्यवाद //

You might also like