You are on page 1of 17

!! श्री गुरुदे व दत्त !!

नमस्कार मं डळी. आज मी तुम्हाला गाणगापू र ये थील माझ्या


वास्तव्यातील दत्त महाराजां च्या एका अनुभवाचे वणण न करणार आहे .
मला खात्री आहे कक तुम्हा सवाण ना पण महाराजां चे असे च अनुभव
असतील. चला तर मग....

२००८ साली जु लै मकहन्यामध्ये गु रु पौकणण मा उत्सवाचे कदवशी


महाराजां ची कृपा होऊन मला सद् गुरू महाराजां चा अनुग्रह झाले ला
होता. माझे सद् गुरू महाराज हे परळी ये थील वे ताळ मं कदरामध्ये
वास्तव्यास आहे त. सद् गुरू महाराज प्रत्यक्ष सोबत असल्याने व
रोजचेच मं कदरात जाणे ये णे असल्याने सद् गुरुंच्या सहवासात दत्त
गुरू ं च्या प्रे रक कथा, लीला, स्वानुभव हे सतत कानावर पडत
असत. सद् गुरू महाराज स्वतः गाणगापू र ये थे साधना व तपश्चयाण
करण्यासाठी चोवीस वर्षे वास्तव्यात होते. त्यामु ळे गाणगापू र या दत्त
क्षे त्राकवर्षयी वे गळे आकर्षण ण व प्रे म होते.

ते सन २०१६ चे वर्षण होते. जुलैचा मकहना होता. मी


अं बाजोगाईला एका सहकारी बँ केमध्ये नौकरीला होतो. त्याच
बँकेमध्ये माझ्यासोबत काम करणारा माझा एक कमत्र होता. आम्ही
सहज बोलता बोलता कवर्षय कनघाला कक चला गाणगापू रला जाऊया.
आकण गु रुचररत्र या ग्रंथाचे पारायण करूया. गाणगापू र ग्रामी
औदुं बर तळवटी गु रुचररत्र ग्रंथाचे पारायण केल्याने अने कां ना कसे
कवकवध फायदे होऊन प्रपं च व परमाथण सु खाचा झाला होता हे
सद् गुरू महाराजां शी गप्पा मारताना वे गवे गळ्या लोकां च्या बाबतीत
आलेले अनुभव ऐकून माकहत झालेले होते. त्यामु ळे आपणही
गुरुचररत्र या ग्रंथाचे पारायण गाणगापू र ग्रामी करून प्रपं च सु खाचा
करूया असा कवचार माझ्याही मनामध्ये रुंजी घालत होता. त्या
वे ळेपयं त गाणगापू र या तीथण क्षे त्राकवर्षयी केवळ ऐकूनच माकहती
होती. म्हणजे एक दोन वे ळा गाणगापू र क्षे त्री दशणन घे ण्यासाठी
प्रवास घडला होता. पण पारायण करण्यासाठी आकण वास्तव्यासाठी
जाण्याची कह पकहलीच वे ळ होती. एखाद्या दत्त क्षे त्री जायचे तर
प्लॅ कनंग करून वगै रे जाणे कधी यशस्वी झाले नाही. पण अचानक
मनात आले आकण उठून कनघालो कक ती यात्रा यशस्वी होते असा
माझा अनुभव आहे . त्या अनुभवास प्रमाण मानू न कमत्रासोबत फार
काळ चचाण न करता गाणगापू रला जायचे ठरवू न दु सऱ्या कदवशी
सं ध्याकाळी बँक आटोपू न गाणगापू रला जायचे ठरवले.
अं बाजोगाईहुन सोलापू रला जाण्यासाठी सं ध्याकाळी ७ वाजेच्या
सु मारास बस कमळाली. सोलापू रला पोचून पु ढे अक्कलकोटला
जाण्यासाठी साधारण मध्यरात्र झाली होती. अक्कलकोट बस
स्थानकावर चौकशी केली असता गाणगापू रला जाणारी शे वटची बस
पाच कमकनटां पूवी कनघून गे ली असा कनरोप कंटर ोलरने कदल्यावर स्वामी
महाराजां च्या चरणी आसरा घे ण्याकशवाय पयाण य नव्हता. बँ केमध्ये
जरी नौकरी असली तरी सहकारी बँक असल्याने पगार जेमतेम
होता आकण त्यात बँक जॉईन करून अवघे पाच सहा मकहनेच झाले
होते. त्यामु ळे लॉज वगै रे करून राहण्याची आकथण क कुवत नव्हती.
आकण मध्यरात्र झाले ली असल्यामु ळे जेवण उपलब्ध होईल कक नाही
याबाबत साशंकता होती. म्हणू न स्वामी महाराजां ना जवळ करणे
योग्य असा कवचार करून स्वामी समथां च्या मठाकडे प्रस्थान केले.
मध्यरात्र झालेली होती त्यामु ळे मं कदराकडे जाणारा रस्ता कोणाला
कवचारावा या प्रश्नावर आम्ही दोघे आपसात चचाण करतच होतो.
परं तु दु सऱ्या कदवशी मु स्लिम समाजाचा काही तरी सण असल्याने
मु स्लिम तरुण मं डळी रस्त्यावर कायण रत होती. त्यामु ळे मठाकडे
जाण्यासाठी रस्ता कोणाला कवचारावा ह्या प्रश्नाचे उत्तर स्वामी
महाराजां नी आधीच दे ऊन ठे वले होते.
रात्री एक कदड वाजेच्या सु मारास आम्ही दोघेही स्वामी
समथाण च्या मं कदरात पोचलो. अकतशय शां त कचत्ताने स्वामी महाराजां चे
दशणन घे तले.त्यावे ळी दोन वाजत आले होते. मी योगेशला म्हणालो
-
"मला काही झोप ये त नाहीये . तु ला झोप ये त असे ल तर तू अं ग
टाकून पड. मी इथे च बसतो."
योगेश म्हणाला," हो मला खू प झोप ये त आहे . ४ वाजता काकड
आरती होईल. तोपयं त मी झोपतो." असे म्हणू न योगेशने कतथे च
जकमनीवर अं ग टाकले. पाच कमकनट झाले असतील नसतील
एवढ्यात सु रक्षा रक्षक कतथे आले. ते आम्हाला म्हणाले-
"माउली राग मानू नका पण तुम्हाला झोपायचे असे ल तर
भक्तकनवासात जा. इथे झोपायला परवानगी नाही."
तसा योगेश उठून बसला. मी सु रक्षा रक्षकाला भक्त कनवासाचा
मागण कवचारला. सु रक्षारक्षकाने भक्तकनवासाच्या कदशे ने बोटाने खू ण
करून मागण सां कगतला. आम्ही दोघेही उठलो आकण भक्तकनवासाच्या
कदशे ने चालायला लागलो. वाटे त चालता चालता स्वामींचे प्रसादालय
कदसले. पोटात भु केचे कावळे ओरडतच होते. पण रात्र एवढी
झाले ली होती कक प्रसाद कमळे ल अशी आशा नव्हती. पण
स्वामींच्या दरबारात असल्यावर अशक्य काय आहे ? म्हणतात ना
"अशक्य कह शक्य करतील स्वामी". आम्हाला कतथे घु टमळलेले
कुणीतरी पकहले आकण आम्हाला हाक मारली-
"या माउली प्रसाद घ्या. हा पण फक्त वरण आकण भात कशल्लक
राकहलाय बर कां !".
प्रसाद कमळे ल कक नाही याबाबत मनात शंका कुशंकां चं वादळ
उठले लं असताना ती हाक कानी पडली. प्रसादालयाच्या बाहे रच
स्वामी समथां ची मोठी मू ती आहे . त्या मू तीकडे नकळत लक्ष गे ले
आकण स्वामींच्या प्रे मळ, वात्सल्यपू णण दृकिक्षे पाने मन गकहवरून
आले. स्वामी जगाची माउली आहे . सवण कवश्वाला जी अन्न पु रवते
कतच्याच दारामध्ये कतची दोन लेकरे ती उपाशी कशी ठे वे ल? या
कवचाराने मन गकहवरून आले.
आम्ही दोघेही प्रसादालयात गेलो. आकण खरं च आश्चयण म्हणजे
केवळ दोन व्यक्तींना पु रेल इतकेच अन्न कतथे कशल्लक होते. आकण
सवण से वेकयां नी भां डी धु वून ठे वली होती. मु दपाकघराची सवण
आवराआवर झाले ली होती. प्रसाद घे ऊन आम्ही भक्तकनवासाच्या
कदशे ने कनघालो. नेहमीप्रमाणे च भक्तकनवास भक्तां च्या मां कदयाळीने
गच्चं भरलेले असल्याने कतथं थां बण्याची सोय होऊ शकली नाही.
पण आता जवळ जवळ तीन वाजत आले होते म्हणू न आम्ही
बाहे रच गप्पा मारत बसलो. इकडच्या कतकडच्या गप्पा मारून
झाल्या. ५ - ५.३० च्या दरम्यान काकड आरती करून आम्ही
पु ढील प्रवासाला कनघालो.
अक्कलकोट वरून गाणगापू र ला जाण्यासाठी साधारण १ -
१.१५ तासाचा कालावधी लागतो. आम्ही गाणगापू र ये थे सकाळी ७
- ७.३० वाजता पोचलो. आम्ही गाणगापू रला पोचल्यावर थे ट
सं गमावरच गेलो. कतथे नदीवर अं घोळ वगैरे करून महाराजां चे
दशणन घे तले. हॉटे लमध्ये चहा वगै रे प्यालो. या प्रवासात योगे श
आकण माझ्यामध्ये दत्त महाराज, गु रुचररत्र ग्रंथ पठण, पारायण
से वा, त्याचे फळ, दत्त क्षे त्रां बद्दल चचाण , दत्त क्षे त्रां चे माहात्म्य अशा
सवण गोिी ंवर चचाण चालू होती. अं बाजोगाई ये थून कनघतानाच
गाणगापू र ग्रामी पारायण से वा करायची हे ठरवले होते. आकण
त्यानुसार योगे शने गुरुचररत्राचा ग्रंथ सोबत घेतला होता. मी मात्र
ग्रंथ सोबत घ्यायचा कवसरलो होतो. मग आम्ही एका दु कानातून ग्रंथ
खरे दी केला.
पारायण करण्यासाठी औदुं बराखालीच सगळे बसतात. तसे
आम्ही दोघेही औदुं बराखाली जागा शोधत होतो. औदुं बराखाली
प्रशस्त प्रां गण होते. त्या प्रां गणामध्ये एकावर एक कवटा रचून त्यावर
कडप्पा फरशी बसवू न ग्रंथ ठे वण्यासाठी आसनव्यवस्था बनवले ली
होती. परं तु नदीच्या बाजू ने असले ली जागा थोडीशी उतरती
असल्याने कतथे कोणी बसले नव्हते. नदी काठच्या कवरुद्ध कदशे ने
औदुं बराच्या पाठीमागे समतल जागा होती म्हणू न कतकडे आसन
व्यवस्था पू णण भरले ली होती. पण त्यामु ळे एक गोि चां गली झाली
होती ती अशी कक औदुं बराखाली असले ल्या गणपती व महादे वाच्या
कपं डीच्या अगदी समोर असलेल्या आसनावर मला जागा कमळाली
होती आकण माझ्या शेजारीच उजव्याबाजू ला योगेशला सु द्धा जागा
कमळाली होती. आम्ही स्थान कनकश्चती करून पू जा मां डून पोथी
वाचन सु रु केले. गुरुचररत्र या ग्रंथाचे पारायण करताना अकतशय
कडक कनयमावलीचे पालन करणे अपे कक्षत असते जेणेकरून
अपे कक्षत फळ त्वररत कमळते.
त्यापै कीच पकहला कनयम म्हणजे जे वणावर सं यम ठे वू न राहणे .
मग कोणी एकभु क्त राहतात तर कोणी फलाहार घे तात. कोणी
स्लखचडीचा नैवेद्य महाराजां ना अपण ण करून तोच प्रसाद ग्रहण
करतात आकण त्यावरच पारायण वाचनकाळात गुजराण करतात.
आम्ही सं गमस्थानी असताना जेवणाचा प्रश्नच नव्हता. कतथे माधु करी
मागून जेवता ये ते हे माकहत होते पण माधु करी मागण्यासाठी
गावामध्ये जावे लागते आकण आम्ही सं गमावरच राहणार असल्याने
माधु करी मागण्याचा कवचार बाद ठरला होता.
दु सरा मागण होता हॉटे लमध्ये जेवण्याचा. पण सद् गुरू
महाराजां च्या मागण दशण नानुसार घरी ककंवा वे ताळ मं कदरात पारायण
करताना केवळ तां दळाच्या स्लखचडीचा नैवेद्य महाराजां ना अपण ण
करून तोच प्रसाद भक्षण करून पारायण से वा केले ली असल्याने
दत्त महाराजां ची राजधानी असलेल्या गाणगापू रक्षे त्री ये ऊन पारायण
से वा करताना हॉटे लमधले जेवण जेवायचे हे काही मनाला पटत
नव्हते. म्हणू न शे वटी सद् गुरू ं ना स्मरून एक कनणण य घ्यायचे
ठरवले. सं गमावर दु पारी बारा वाजताची आरती झाल्यानं तर जो
स्लखचडीचा प्रसाद वाटतात तोच प्रसाद भक्षण करून कनवण हण
करण्याचे दोघां चेही पक्के झाले. पकहल्या कदवशी पारायण वाचनसे वा
झाल्यावर दु पारच्या आरतीनंतर कमळणार स्लखचडीचा प्रसाद घे तला
आकण पोटभर खाल्ला. स्लखचडीचा प्रसाद से वन करून गावातील
मं कदरामध्ये जाऊन आलो. महाराजां चे डोळा भरून दशणन घेतले.
मोक्ष सु खाला लाजवे ल असे अनुपम सौख्य महाराजां च्या शां त
मु द्रेमध्ये अनुभवास ये ते.
पु ढे एक गम्मत आहे . प्रसाद घेताना एक अट आहे . कतथे
प्रसादाच्या रां गेमध्ये उभे राकहल्यावर एकदा जेवढा प्रसाद कमळतो
तेवढाच प्रसाद खायचा आकण शां त बसायचे कह पद्धत आहे .
पकहल्या कदवशी कमळाले ला प्रसाद बघू न मनात अं दाज बां धला-
"एवढ्या प्रसादावर आपला कदवस कनभावू शकतो. अगदीच काही
कमी स्लखचडी दे त नाहीत प्रसादामध्ये. एक कदवस तर पार पडला
आता फक्त दोन कदवसच राकहले."
पकहल्या कदवशी सं ध्याकाळी सं गमावरील मं कदरामध्ये आरती
झाली. मी आकण योगे श आम्ही दोघेही आरतीला उपस्लस्थत राकहलो.
अनंतकोटी ब्रह्माण्डाच्या नायकाने गाणगापू र ग्रामी सं गम क्षे त्री
वास्तव्य करून भारत दे शावर व समस्त जनजातीवर अनं त उपकार
केले ले आहे त. त्यां चे दशण न, पू जन, आरती, प्रसाद हे सगळे
कमळणे हे अनं त जन्ां च्या पु ण्याचे फळच म्हणावे लागेल. आरती
करताना एक कवशेर्ष बाब अशी होती कक जेव्हा नृ कसं ह सरस्वती
स्वामी महाराजां ची पालखी मं कदरामध्ये फेरी मारायची तेव्हा
महाराजां चा दं ड, छत्र, चामर ई. साकहत्य से वेकरी हातामध्ये घे ऊन
चालायचे. पण महाराजां चा फोटो ककंवा प्रकतमा असे काही
नसायचे. मं कदरातील बाह्यगाभाऱ्यामध्ये तीन फेऱ्या मारून मग नृ कसं ह
सरस्वती स्वामी महाराजां ची आरती व्हायची. जेव्हा फेरी
मारण्यासाठी सवण साकहत्य घेऊन से वेकरी बाहे र पडायचे तेव्हा ते
सव्य प्रदकक्षणा करायचे. म्हणजे मं कदरातील मू तीच्या उजव्या हाताच्या
बाजू ने सु रवात करायचे आकण मं कदराच्या पाठीमागू न ये ऊन
डाव्याबाजू ने पु ढे यायचे. जेव्हा फेरी मं कदराच्या डाव्याबाजूने पु ढे
आली तेव्हा अचानक सगळे भक्त नमस्कार करायला लागले. कोणी
हात जोडत होते तर कोणी सािां ग दं डवत घालत होते. कोणी
गुडघ्यावर बसू न नमस्कार करत होते. एक ऐंशी पं च्याऐंशी वर्षां चे
म्हातारे साधू सु द्धा त्या नमस्कार करण्यात अग्रेसर होते. सवण जण
नमस्कार करत असताना आपण तटस्थ उभे राहणे योग्य कदसत
नाही असा कवचार मनामध्ये करून मी सु द्धा महाराजां च्या दं डाच्या
कदशे ने नमस्कार केला. परं तु मनात कवचार आला कक पालखी ककंवा
मू ती ककंवा फोटो काहीसु द्धा नसताना सवण भक्त मं डळी कोणाला
नमस्कार करत आहे त ? पण त्या कवचाराला मागे टाकत कवजेच्या
गतीने एक सणसणीत कळ पोटातू न डोक्यात गेली. पोटात भु केने
आग पडली होती. आतड्ां ना पीळ पडत होता. जीव कासावीस
झाला होता.
महाराजां च्या मनात काही वे गळे च होते . प्रपं च सु खाची
लालसा मनामध्ये घे ऊन पारायण से वा करायची तर मग परीक्षा कह
द्यायलाच हवी नाही का?
भु केने डोके दु खायला लागले होते. पण आता हातात काहीच
पयाण य नव्हता. उपवासाचे खायला सु द्धा काही कमळे ल अशी अशा
नव्हती. शे वटी एका दु कानावरून शें गदाणे कवकत घे तले. थोडीशी
केळी कवकत घे तली व ती खाल्ली. काही काळ बरे वाटले आकण
रात्री झोप लागली.

दिवस िु सरा - सकाळी उठून आस्लिक आवरून पोथी वाचनास


सु रवात केली. पोथी वाचन सु रु असताना कोणी समोर केळी
आणू न ठे वायचे तर कोणी खडीसाखर ठे वायचे. कुणी पे ढे तर कुणी
आणखी काही ठे वायचे. एका व्यक्तीने तर धोतर टोपीचा आहे र
आणला होता. माझे पारायण वाचन सु रूच होते. ती व्यक्ती
म्हणाली -
" मला तुम्हाला धोतर टोपीचा आहे र करायची इच्छा आहे . मी तो
आहे र करू का?"
त्या व्यक्तीने माझे पारायण सु रु असताना जर परस्पर माझ्या
सं मतीकशवाय आहे र केला असता तर मला ते कदाकपही आवडले
नसते. पण त्या व्यक्तीने रीत-भात, कशिाचार पाळत रीतसर माझी
सं मती माकगतल्याने मी क्षणभर मनात कवचार केला - " गाणगापू र
क्षे त्र हे नृकसं ह सरस्वती स्वामी महाराजां ची राजधानी आहे . या
राजधानीमध्ये महाराजां च्या इच्छे कशवाय पानही हलणार नाही. मग कह
व्यक्ती जर मला आहे र करायचा असे म्हणत असे ल तर ती सु द्धा
महाराजां चीच इच्छा असे ल." असा कवचार मनामध्ये करून मी
होकार दे ण्यास तयार झालो. पण त्यापू वी मी माझ्या मनामध्ये
डोकावू न बघण्यास कवसरलो नव्हतो. कारण पारायण चालू असताना
त्यामध्ये बाधा आणण्यासाठी अने क प्रकारचे व्यत्यय ये ऊ शकतात हे
सद् गुरू महाराजां च्या बोलण्यामधू न बरे चदा ऐकले होते. माझ्या
मनामध्ये मला त्या आहे राकवर्षयी अकजबात मोह जाणवला नाही.
आकण म्हणू नच मी पारायण वाचत असताना बोटानेच त्यां ना आहे र
बाजू ला ठे वण्यास सां कगतले. कारण मला तो आहे र घायचा नसला
तरीही त्या व्यक्तीकडून तो आहे र स्वीकारून माझे त्या कदवशीचे
वाचन सं पवू न मी तो आहे र कतथे च दु सऱ्या कोणाला तरी दे णार
होतो. त्यामु ळे आहे र करणाऱ्या व्यक्तीचे ही मन राखल्या गे ले होते
व माझ्याही परायणात बाधा आली नाही. असो.
दु सऱ्या कदवशीचे पारायण वाचू न सं पेपयं त ११ - ११.३०
वाजत आले होते. सं गमावरची महाराजां ची आरती होऊन प्रसाद
कमळण्याची मी वाट बघू लागलो होतो. कारण भु केने पोटात आग
पडली होती. आमल कपत्ताचा त्रास होण्यास सु रवात झाली होती.
पण खरी गम्मत तर पु ढे ये णार होती. महाराजां ची काय इच्छा
होती ते त्यां नाच ठाऊक होते.
आरती होऊन स्लखचडीचा प्रसाद वाटप होण्यास सु रवात
झाली. आकण एका बदामाच्या पानावर स्लखचडीचा एक चमचा
वाढप्याने वाढला. दोिी हातां च्या तळव्यां ना एकत्र सां धून ओंजळ
केली असता जेवढे क्षे त्रफळ सामावू शकेल तेवढाच आकार त्या
बदामाच्या पानाचा होता. मी थोडा घु टमळलो. अजू न स्लखचडी
कमळण्याची अपे क्षा होती. पण ती कमळणार नव्हतीच. स्वतःशीच
चडफडलो. आधीच पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यात
केवळ घासभर स्लखचडीच वाट्याला आली होती. कसाबसा स्वतःला
सावरत आकण चटके बसत असलेल्या गरम स्लखचडीचे पान दोिी
हातानी तोलत मी माझ्या आसन व्यवस्थे जवळ ये ऊन बसलो. मनात
कवचार केला-
"आज महाराजां नी परीक्षा घायचे ठरवले ले कदसत आहे . मघाशी
जेव्हा आहे र करणारा कवचारत होता तेव्हा इथे महाराजां च्या
इच्छे कशवाय पानही हालत नाही असा कवचार तूच केला होतास ना?
मग घे आता ही घासभर स्लखचडी आकण हीच महाराजां ची इच्छा
आहे असे समज."
पण खरी परीक्षा तर पु ढे होती. मी स्लखचडी घे ऊन आसन
व्यवस्थे जवळ ये ऊन बसलो आकण शेजारी बघतो तर काय योगे शचे
पोथी वाचन अजूनही सु रूच होते. तो गुरुचररत्र हा ग्रंथ पकहल्यां दाच
वाचत असल्याने त्याला दु सऱ्या कदवशीचे वाचन पू णण करण्यास खू प
जास्त वे ळ लागत होता. माझ्या मनात कवचार आला- "ह्याचे
वाचन तर अजू न पू णण झाले नाही. याचे वाचन पू णण होईपयं त
स्लखचडीचा प्रसाद राहणार नाही." हा कवचार करत असतानाच
दु सऱ्या एका कवचाराने माझ्या अं गावर काटा आला. "मला
कमळालेल्या प्रसादातू न याच्यासाठी जर मी प्रसाद ठे वला तर माझ्या
वाट्याला ककती प्रसाद ये ईल. आकण तेवढ्याने माझी भू क भागेल
का?" आकण मी योगे शचा काडीभर कवचार न करता कमळालेला
सं पूणण प्रसाद एकट्याने खाऊन घेतला. आज मला जाणीव होते कक
मी महाराजां च्या परीक्षे त अपयशी ठरलो. जगामध्ये सगळ्यात वाईट
गोि कोणती असे ल तर ती पोटाची भू क आहे याची मला कतथे
पकहल्यां दा जाणीव झाली होती. आकण म्हणू नच अन्न हे परब्रह्म आहे
याचीही जाणीव तेव्हाच झाली. त्याकदवशी योगेशला पारायण वाचून
सं पवण्यास दु पारचे चार वाजले. सकाळी ७ वाजता वाचायला
बसले ला योगे श दु पारी चार वाजता वाचन सं पवू न उठला तेव्हा तो
उपाशीच होता. मला माझ्या स्वाथीपणाची लाज वाटली. मी
स्वतःच्या स्वाथीपणाकडे कानाडोळा करू पाहत होतो पण अजू न
परीक्षा सं पली नव्हती.
दु पारी उपवास घडल्याने व पारायण वाचनासाठी करावी
लागणारी बै ठक यामु ळे शरीर अशक्त झाले व दु सऱ्या कदवशी
दु पारी ५ वाजेच्या सु मारास मला थं डी वाजू न आली. व थोडा
तापही जाणवत होता. सं ध्याकाळ झाली तसा नदीच्या कदशेने तोंड
करून उभा राकहलो. नृ कसं ह सरस्वती स्वामींचे स्मरण केले व
प्राथण ना करू लागलो - "स्वामी! स्वामी! थं डी वाजतेय, ताप आहे
अं गामध्ये. उद्या पारायण वाचनासाठी बसवे ल कक नाही अशी शं का
ये तेय. स्वामी कृपा करून पारायण से वा पू णण करून घ्या." अशी
प्राथण ना करत असतानाच एक कवकचत्र अनु भव आला. ते सत्य होते
कक भास होता माकहत नाही. पण माझ्या आजूबाजू ने वाहणारे थं ड
वारे एकदम थां बले व थोडीशी गरम कोमट वाऱ्याची झुळूक माझ्या
शरीराला सु खावू न गे ली. मी अं तबाण ह्य नखकशखां त शहारलो. माझ्या
प्राथण नेच्या फलस्वरूप म्हणू न स्वामी महाराजां नी कह करुणामय लीला
दाखवू न ते भक्तां च्या कनत्य सोबत असल्याबाबतचा दाखल कदला
असे ल का असा कवचार मनात डोकावू न गे ला.
नदीवरून वाहणारे गार वारे रात्रीची झोप पू णण होऊ दे त
नव्हते. या सवण वातावरणाची सवय नसल्याने तब्ये तीवर कवपरीत
पररणाम होणे स्वाभाकवक होते. पण महाराजां वर श्रद्धा होती.
कनतां त श्रद्धा होती. आकण मनात धरले ला सं कल्प पू णण व्हावा ही
इच्छा असल्याने सवण काही सहन करण्याची तयारी होती. तरी थोडा
वै द्यकीय ज्ञानाचा आधार घ्यावा या हे तूने एका और्षध कवक्रेत्याला
तब्ये तीची अवस्था सां गून और्षध / गोळी दे ण्यास कवनं ती केली.
त्याने दोन कदवस पु रतील एवढी और्षधी कवकत कदली. और्षधी
घेतल्यावर दु सऱ्या कदवशीच्या रात्री झोप लागणारच होती. पण ---

और्षधी घे तल्यावर थोडे बरे वाटू लागल्याने मी आकण योगेश गप्पा


मारत बसलो होतो. जवळपास रात्री ११ - ११/३० ची वे ळ झाली
असे ल. साधारण एक १८ - १९ वर्षां चा तरुण आकण त्याच्याबरोबर
दु सरा वीसएक वर्षां चा तरुण असे दोघेजन माझ्या आकण योगे शच्या
बाजू ला आले. कतथल्या औदुं बराच्या प्रां गणामध्ये केवळ आम्हीच जागे
होतो म्हणू न आकण आमच्या शे जारी थोडीशी मोकळी जागा होती
म्हणू न कक काय तो आमच्या जवळ आला होता. त्याने आम्हाला
आमच्या सोबत बसण्यासाठी परवानगी कवचारली. त्यां नी आमच्या
जवळ बसण्यास आमची काहीच हरकत नव्हती. आम्ही गप्पा मारत
बसलो होतो कतथे अजू न दोन लोक जु ळले होते. गप्पां ना सु रवात
झाली तशी १८ - १९ वर्षे वय असलेला तरुण म्हणाला - "माझं
नाव ---. आकण हा माझा मे व्हणा. माझ्या बायकोचा भाऊ."
मीही उत्तरादाखल काही बोललो असे ल. पण त्या मु लाच्या
व्यस्लक्तमत्वाने मी अकतशय प्रभाकवत झालो होतो. त्याचे व्यस्लक्तमत्व
अकतशय प्रभावी व सुं दर होते. त्याचा चेहरा अत्यं त ते जस्वी होता.
डोळे थोडे घारोळे होते. अकतशय कवलक्षण तेज त्या डोळ्यां मध्ये
सामावलेले होते. चेहरा प्रसन्न व हसरा होता. बोलता बोलता त्याने
सां कगतले होते कक तो है द्राबादहुन दशणनासाठी आला होता. है द्राबाद
ते गाणगापू र हे अं तर साधारण ५ तासां चे आहे . पण दु चाकीवरून
प्रवास करून आल्याचे कुठलेही कचि त्याच्या चये वर कदसत नव्हते.
ककंवा थकवा ही जाणवत नव्हता. त्याच्या सोबत असले ला त्याचा
मे व्हणा थोडासा काळासावळा होता. "त्याच्या"पे क्षा मे व्हण्याची उं ची
थोडी जास्त होती. मे व्हणा थोडासा अबोल होता. पण ‘तो’ मात्र
चां गलाच बडबड्ा होता. तो आमच्याशी गप्पा मारण्यात अकतशय
गुंतून गे ला. त्याच्याशी बोलताना सारखा भास होत होता कक याचे
आपले पू वणजन्ीचे काही ऋणानु बंध असतील का? हा ककती प्रे मळ
बोलतो. ककती प्रसन्नते ने वागतो. रात्रीच्या १२ वाजता सु द्धा याच्या
चेहऱ्यावर कनद्रे चे अकधराज्य नाही. याने एखादी जां भई सु द्धा कदलेली
नाही.
तो मात्र बोलतच होता - " माझे गाव है द्राबाद आहे . माझ्या
वकडलां ना माझ्या लहानपणीच दे वाज्ञा झाली. माझे भरण-पोर्षण
माझ्या आजोबानी केले. माझ्या आजोबां चे माझ्यावर खू प प्रे म आहे .
माझे वडील दर मकहन्याला गाणगापू रला दशणनाला यायचे. वारी
करायचे. माझे वडील पोस्ट खात्यामध्ये कामाला होते. मी आता
त्यां च्या जागी कामाला लागलो आहे . ते जशी वारी करायचे तशीच
वारी करायचा प्रयत्न मी सु द्धा करतो." तो भरभरून बोलत होता.
मी त्याला म्हणालो - " वा. एकंदर सगळे छान आहे तर. लग्न
झाले आहे . नौकरीसु द्धा आहे ."
"हो. सगळी महाराजां ची कृपा आहे ." - तो.
"त्याने" बोलता बोलता जो कवर्षय छे डला त्या कवर्षयाकडे बघता
त्याचा गुरुचररत्राचा अकतशय गहन अभ्यास असल्याचे मला जाणवले.
ककंवा तो या सवण गोिी ंशी खू प जवळू न सं बंकधत असावा असे मला
वाटले. तो म्हणाला - "गाणगापू र ये थे अितीथण आहे त. मी पहाटे
तीन वाजता उठून ह्या अितीथां चे स्नान करण्यास जाणार आहे .
एक तीथाण चे स्नान करायचे. अं गावरचे कपडे ओले च ठे वायचे. तसे च
पु ढे दु सऱ्या तीथाण वर जायचे. कतथे स्नान करायचे. असे करत करत
अितीथां चे स्नान करायचे आकण मग गावातील मं कदरामध्ये दत्त
महाराजां चे दशण न घ्यायचे." तो सां गत होता. त्याने मला कवचारले -
"तुम्ही पहाटे माझ्या सॊबत अितीथण स्नानाला याला का?"
मी जरा आढे वे ढे घे तले. तब्ये तीचे कारण सां कगतले. नाही म्हणालो.
तो म्हणाला - "ठीक आहे . काही हरकत नाही. पु िा कधी तरी
या. फक्त एक मदत कराल का?"
मी म्हणालो - "बोला काय करायची आहे मदत?"
तो म्हणाला - "मला कफरायची सवय आहे . वातावरणाचाही मला
त्रास वाटत नाही. पण हा माझा मे व्हणा आहे ना त्याला या
सगळ्या गोिीच ं ी सवय नाही. तु मच्याकडे जे अं थरून आकण
पां घरून आहे त्यापै की थोडे याला द्याल का? म्हणजे तो थोडा वे ळ
झोपू शकेल. थकला आहे कबचारा".
त्याच्याकडे किज ठे वण्यासाठी वापरतात ते मोठे खपट होते. त्या
खपटाच्या कदशेने खु णावत तो पु ढे म्हणाला- "माझ्याकडे खपट
आहे . मी आता थोडा वे ळ ध्यान करे न. मला झोप आलीच तर
मी झोपे न त्या खपटावर."
मी थोडासा कवचारात पडलो. आधीच तब्ये त बरी नसल्याने थं डी
वाजत होती. आकण त्यात हा सज्जन मनुष्य झोपण्यासाठी माझ्याकडे
अं थरून मागत होता.
स्वाथीपणा हा माणसाचा जन्जात गुण आहे का? ककंवा
प्रत्ये क मनुष्य जन्ाला ये तानाच स्वाथीपणाची चादर अं गावर ओढू न
ये तो? का फक्त मीच या जगात स्वाथीपणाने वागत होतो? मला
प्रश्न पडत होते. पण कवचार करत बसायला वे ळ कुठे होता. समोर
"तो" बसला होता. माझ्याकडे बघून मं दपणे हसत होता. त्या
हसण्याने माझ्या मनाची चलकबचल झाली. मी त्याच्या मे व्हण्याला
अं थरून द्यायला तयार झालो. त्याचा मे व्हणा कदलेल्या अं थरुणावर
अगदी काहीही पां घरून न घे ता झोपी गेला. एव्हाना मी आकण
योगेशसु द्धा झोपे च्या तयारीला लागलो. "तो" मात्र खपटाच्या
आसनावर ध्यानाला बसला होता.

दिवस दतसरा - कतसऱ्या कदवशी सकाळी आम्ही लवकर उठून सवण


आस्लिक उरकले. आज दु पारी गावातील मं कदरात आरतीला जायचे
असे ठरवले होते. कारण आल्यापासू न गावातील मं कदरामध्ये आरती
घेण्याचा योगच आला नव्हता. कतसऱ्या कदवसाचे पारायण वाचून पू णण
झाले. मी आकण योगे श दोघेही गावातील मं कदरात आरतीसाठी
गेलो. आरती झाली. स्लखचडीचा प्रसाद गावातील मं कदरातच घ्यायचा
असे ठरवले होते. त्यामु ळे मं कदरातच प्रसाद घे तला. आज स्लखचडी
ककती कमळाली याकडे लक्ष गेले नाही. कारण मनाने ठरवले होते
कक जे कमळे ल, जेवढे कमळे ल तेवढे खायचे आकण दत्तस्मरण
करायचे. त्यामु ळे प्रसादामध्ये जी स्लखचडी कमळाली होती ती खाऊन
तृप्तता अनुभवत होतो. पाणी कपण्यासाठी म्हणू न नळावर गेलो तर
रात्रीचे महाशय कतथे भे टले. रात्रीप्रमाणे च कनखळ हास्य चेहऱ्यावर
फुलवत माझ्याकडे बकघतले. मी सु द्धा हसू न प्रकतसाद कदला. पाणी
प्यालो.
आज पारायण सं पवू न आम्ही परत कनघालो. परतीच्या
प्रवासात मी योगे शला सां कगतले कक स्लखचडी खाल्ल्यानंतर पाणी
कपण्यासाठी गे लो तेव्हा कालचा "तो" मनुष्य परत भे टला होता.
योगेश म्हणाला - " अच्छा. तो श्रीपाद कल्याणकर का?"
योगेशचा प्रश्न ऐकून मला लक्षात आले कक काल त्याने त्याची
माकहती सां गताना त्याचे नाव सां कगतले होते. पण त्याच्या
लोभसवाण्या कदसण्याने त्याच्या बोलण्याकडे माझे लक्ष गेले नव्हते.
आकण त्याचे नाव ऐकायचे मी कवसरलो होतो. मी योगे शला
म्हणालो- " त्याचे नाव 'श्रीपाद कल्याणकर' असे आहे का? अरे
वा. बरे झाले. गुरुचररत्र पारायण करता करता श्रीपाद भे टून
गेले." मी हे वाक्य बोललो आकण मला जाणवले कक माझ्या
अं तमण नात कवकचत्र काही तरी होतंय...... त्याचा .... श्रीपादाचा
चेहरा डोळ्यां समोर तरळू न गे ला. माझ्या नेत्रां तून बाष्पधारा वाहू
लागल्या... मनात कालवाकालव झाली. गाडी वे गाने पु ढे जात
होती. मन मात्र कततक्याच वे गाने सं गमावरील आसन व्यवस्थे जवळ
जाऊन श्रीपादाला शोधत होते. इथे च तर बसला होता तो.
माझ्यासमोर.... माझ्याजवळ…. डोळ्याच्या अश्रू धारा थां बत
नव्हत्या. श्रीपादाचे बोलणे एकसारखे कानात रुंजी घालत होते. तो
म्हणाला होता- " मी अितीथण स्नान करणार आहे . तुम्ही याल का
माझ्या सोबत? प्रत्यक्ष परमे श्वराने अितीथण स्नान करण्यासाठी
कवचारले आकण मी कमनकशबी. तब्ये तीचे कारण सां कगतले. झोपू न
राकहलो. त्रै लोक्याचा अकधपती स्वतः अितीथण स्नानाचा कवधी
सां गतोय, साक्षात पाप धु वून दे तो म्हणतोय आकण आम्ही झोपलोय
कनवां त." त्या कवचाराने तर आणखीनच कासावीस झालो. कुठे शोधू
तुला श्रीपादा? या कवचाराने है राण झालो.
त्याने झोपण्यासाठी अं थरून माकगतले. चराचर कवश्वाला जो
धनधान्याने भरून टाकतो त्याच्यासाठी एक अं थरून उपलब्ध करणे
अवघड होते का? पण त्याला माझ्याकडून से वा घ्यायची होती.
त्याकदवशी सं ध्याकाळी महाराजां ना प्राथण ना करताना मीच म्हणालो
होतो ना कक स्वामी मला कुशीत घ्या. स्वामी आले. श्रीपादाचे रूप
घेऊन आले. पण मला नाही कळले. अभागी मी. पकहल्या कदवशी
सं ध्याकाळी सं गमावरील दे वळात आरतीच्या वे ळी फेरी मारताना सवण
लोक एका कदशेने नमस्कार करत असल्याचा उल्लेख मी वर
केले ला आहे . पण माझ्या मनात पडले ल्या प्रश्नच उत्तर श्रीपादाने
कदले होते. मला समजले नाही. मीच ओळखू शकलो नाही.
दु सऱ्या कदवशी रात्री जेव्हा आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा श्रीपादाने
स्वतः सां कगतले होते. औदुं बराखालील प्रां गणामध्ये असले ल्या ८० -
८५ वर्षे वयाच्या वृ द्ध सं न्याश्याकडे बोट दाखवत तो म्हणाला होता
- " ते जे वृ द्ध सं न्याशी कदसत आहे त त्यां ना जन्जात दृिी नाही.
ते जन्जात आं धळे आहे त. आकण त्यां चे सं पूणण आयु ष्य इथे च
सं गमावरच से वा करण्यात व्यतीत झाले आहे ."
त्यावर मी म्हणालो होतो - " अरे वा. नशीबवान आहे त तर ते."
त्यावर श्रीपाद म्हणाला होता - " खरे च नशीबवान आहे त ते. का
म्हणू न कवचारा?"
मी म्हणालो - "का बु वा?".
त्यावर त्याने जे उत्तर कदले होते ते आठवू न मला भोवळ ये ते कक
काय असे मला वाटू लागले. कारण त्याने जे उत्तर कदले होते ते
अकतशय अकवश्वसनीय होते. पण आता पयं त त्याने सां कगतलेल्या
गोिीव ं र कवश्वास ठे वावाच लागला होता. त्यामु ळे या गोिीवर तर
कवश्वास ठे वावाच लागणार होता. कारण माझ्या मनातली शंका
ओळखू न मी न कवचारता श्रीपादाने त्याचे उत्तर कदले होते. श्रीपाद
सां गत होता- " ते सं न्याशी जन्जात अं ध आहे त. पण त्यां ना
कदव्यदृिी आहे . सं ध्याकाळच्या आरतीच्या वे ळी मं कदराच्या बाह्य
गाभाऱ्यात फेरी मारताना तुम्ही पाकहले असे ल. त्या फेरीच्या वे ळी
सवाण त आधी हे सं न्यासी महाराजां च्या पाय पडतात. कारण त्यां ना
महाराज कदसतात. आकण त्या सं न्याशाचे अनुकरण करून सगळे
महाराजां ना नमस्कार करतात." श्रीपादाने कदलेले हे उत्तर मला
आठवले आकण मी चक्रावलो. महाराजां ना दं ड, छत्र, चामर हे
सगळे साकहत्य असताना महाराजां चा फोटो ककंवा प्रकतमा का नाही
याचे उत्तर स्वतः स्वामींनी श्रीपादाच्या रूपाने मला कदले होते.

दु पारी मी योगे शला स्लखचडी न दे ता स्वतः सगळी स्लखचडी


सं पवली होती. हो ती माझ्याच वाट्याची स्लखचडी होती. पण माणू स
म्हणू न हे माझे कतणव्य होते कक मी थोडी स्लखचडी योगेशसाठी
कशल्लक ठे वायला हवी होती. दु पारच्या माझ्या अमानवी कृतयाची
जाणीव करून दे ण्यासाठीच कक काय श्रीपादाने माज्याकडे
अं थरुणाची मागणी केली होती. आकण ती सु द्धा सोबत आलेल्या
त्याच्या मे व्हण्यासाठी. स्वतः खपटाच्या कपट्यावर बसले. जो एका
क्षणामध्ये सु दाम्याला नगरीचे राज्य प्रदान करू शकतो तो अनंत
कोटी ब्रह्माण्डाचा धनी माझ्याकडे अं थरून मागत होता आकण मी
मात्र स्वतःच्या स्वाथाण ने गां जून स्वतःपु रता कवचार करत होतो. जणू
त्याला मला हे च कशकवायचे होते कक आपल्या सोबत असले ल्या
आपल्या कमत्राची, नाते वाईकां ची आप्ते िाची काळजी आपणच
घ्यायला हवी. श्रीपादाचा चेहरा मला पु िा पु िा आठवत होता.
डोळ्यां समोर कदसत होता. मनाच्या आत खोलवर कबंबवू न गे ला
होता. आकण मन मात्र फक्त एकच धावा करत होते......
श्रीपादा श्रीवल्लभ स्वामी राया तु झ्या ह्या लेकराला क्षमा कर.
कत्रवार, शतवार, वारं वार तु झा चरणकमलां वर प्राण जाईपयं त हे
शीर आपटू न एकच मागणे मागतो ------

काही मला से वनही न झाले !


तथाकप तेणे मज उद्धररले !!
आता तरी अकपण न प्राण त्याला!
कवसरू कसा मी गुरुपादु काला!!

महाराजां ना मला लाजवायचे नव्हते. त्यां ना मला कशक्षासु द्धा करायची


नव्हती.
करुणाकत्रपदीमध्ये म्हटले आहे ना -
तव पदरी असता त्राता!
आडमागी पाऊल पडता!!
सां भाळू न मागण वरता!
आकणता न दु जा त्राता !!
नीज कवरुधा आणु नी कचत्त
तू पकतत पावन दत्त!
वळे आता आम्हा वरता!
करुणाघन तू गु रुनाथा!!

त्यां ना मला कशकवायचे होते. सन्ागाण वर आणायचे होते. सं भाळू न आणायचे


होते. परमाथाण त स्वाथण हा सगळ्यात मोठा अडथळा आहे . आकण त्याग हे
पु रुर्षाचे सवाण त मौल्यवान आभू र्षण आहे . हे आभू र्षण प्रत्ये क व्यक्ती कमरवू
शकेल असे नाही. पण त्यासाठी प्रत्ये काने प्रयत्नपू वणक अभ्यास करायला
हवा.

!!श्री गुरुदे व दत्त!!

You might also like