You are on page 1of 11

चलो के दारनाथ , बद्रीनाथ , गंगोत्री , यमुनोत्री चारधाम यात्रा २०२२ ................

२०१५ साली अमरनाथ यात्रा झाल्यानंतर पुढील यात्रेचे नियोजन सुरु झाले . आता के दारनाथ , बद्रीनाथ ला जायचे मनात होते . परंतु कामाच्या व्यापामुळे व कौटुंबिक
करणा मुळे जाणे शक्य होत नव्हते . २०१८ साली सर्व यात्रेचे बुकिं ग के ले होते परंतु काही कारणामुळे ते कॅ न्सिल करावे लागले होते . त्यामुळे डिसेंबर २०२१ ला आमचे
मित्र विनोद एनगनदुल ( अण्णा ) यांनी सहज विचारले येणार का के दारनाथला मे महिन्यात ?

विनोद अण्णाने असे विचारल्यावर जणू दैवी संके त मिळाला आणि आता आपल्याला भोलेनाथच बोलावत आहे असे मनात आल्याने लगेच जाण्यास होकार
दिला. ऑफिस मधील सहकारी मित्र विनय राम, अनिल कु टे, नाना वाडीतके , हरी बढे आणि मी असा आमचा ग्रुप ठरला . तीन वर्ष कोरोनामुळे सर्व ठप्प झाले होते व
हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत होते. या तीन वर्षात कु ठेच देवदर्शन झाले नाही . एकामागून एक कोरोनाच्या लाटा येत होत्या व जात होत्या. परंतु नुकतीच कोरोनाची
तिसरी लाट ओसरण्यास सुरवात झाली होती व चौथ्या लाटेचे अंदाज मे-जून व्यक्त के ले जात होते . मनात धाकधूक होत होती की परत चौथी लाट आली व सर्व बंद झाले
तर पुन्हा दुसऱ्यांदा यात्रेचे जाणे राहून जाईल. तरी सुद्धा देवावर भरवसा ठेऊन १ जानेवारीला चार महिने अगोदर १ मे साठी जाणाऱ्या ट्रेन चे बुकिं ग के ले . जशी जशी
जाण्याची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी मनातील धाकधूक वाढत चालली , एकीकडे टीव्हीवर दिल्ली , मुंबई या महानगरात कोरोना परत वाढत असल्याच्या बातम्या
येऊ लागल्या तर दुसरीकडे के दारनाथ बद्रीनाथ धामचे कपाट ( दरवाजा) उघडण्याची तारीख जाहीर होऊ लागली . मग ठरवले जसे भोलेनाथ च्या मनात असेल तसे होईल
. अखेर प्रस्थान करण्याचा दिवस उजाडला १ मे ला रात्री ९:३० ला झेलम एक्सप्रेस ने श्रीरामपूर हून दिल्ली साठी रवाना झालो . दुसऱ्या दिवशी रात्री पोहोचल्यावर लगेच
हरिद्वार साठी बसने निघून पहाटे ५ ला निश्चित ठिकाणी पोहोचलो .

हरिद्वार दर्शन ......................

सकाळी रूमवर पोहोचून फ्रे श होऊन प्रथम गंगास्नान करायचे ठरवले . मग कपडे घेऊन ७ वाजता बिर्ला घाटावर आलो , साडेतीन मुहूर्तापैकी एक असा अक्षय
तृतीया व गंगा स्नान हा दुर्लभ योग साधण्यासाठी गंगा मैया च्या पाण्यात हात घातला तर मैया च्या थंडगार स्पर्शाने अंगावर काटा आला. कारण आम्ही ४०-४५ डिग्री
वातावरणातून आलो होतो व गंगा मैया चा हिमालयातील वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचा प्रवाह होता. आयुष्यातील पहिले गंगास्नान या कल्पनेने भारावून गेलो आणि गंगा
मैयात डु बकी मारून हर हर गंगे , गंगा मैया कि जय चा जयघोष के ला . खरोखर आईच्या मायेने डोक्यावरून हात फिरल्याची अनुभूती आली आणि टचकन डोळ्यात पाणी
आले . मनसोक्त डु बकी मारत आईच्या कु शीत शिरण्याचा आनंद घेतला . सर्व आटोपून घाटावरील महादेवाचे दर्शन घेऊन परत रूमवर आलो . दोन दिवस गाडीत झोप न
झाल्याने नाश्ता करून थोडा आराम के ला व हरिद्वार दर्शन करायला निघालो .

हरिद्वार मध्ये पाहण्यासाठी बरीच ठिकाणे आहे हरी कि पौडी , भारत माता मंदिर , सप्तऋषी आश्रम , पतंजली योग पीठ, राम मंदिर , काच मंदिर , मनसा देवी
व चंडी देवी या ठिकाणी १००० पायऱ्या असून येथे रोप वे ने जाण्याची सुद्धा सोय आहे , आम्ही रोप वे ने जायचे ठरवले . आयुष्यात प्रथमच रोप वे चा अनुभव घेत होतो.
या ठिकाणी जाण्यासाठी बरीच गर्दी होती , येथे कोरोना विसरून सर्व जण दर्शनासाठी आतुर झालेले दिसले. सर्व ठिकाण पाहून परत हरिद्वार मध्ये येता येता संध्याकाळ
झाली. आता वेध लागले होते गंगा आरतीचे , बरोबर साडे सहाला परत घाटावर आलो तर आरतीची तयारी चालू होती . चांगली जागा हेरून आम्ही स्थानापन्न झालो.
६:४५ ला आरती सुरु झाली त्यावेळचे भक्तीपूर्ण वातावरणाचे वर्णन करणे अशक्य आसेच आहे. आरती व प्रसाद घेऊन निघालो . आता दिवसभराची पायपीट ने पोटात
भुके ने कावळे ओरडायला लागले होते , मग सर्वजणांनी हरिद्वार मधील चाटचा आनंद घ्यायचा ठरवला , मनसोक्त कचोरी आणि पाणीपुरी खाल्लावर सर्वजण मलाई कु ल्फी
खाण्यासाठी अमूल कु ल्फी सेंटरमध्ये गेलो . वीस रुपयांमध्ये अवीट चवीची ड्रायफु ट असलेली वीतभर लांबीची कु ल्फी खाताना परत बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात .
रूमवर येऊन निद्रादेवीच्या अधीन झालो .

यमुनोत्री रवाना व दर्शन ..............

दिनांक ०४/०५/२०२२ रोजी सकाळी ५ ला उठू न प्रातविधी व स्नानसंध्या उरकू न रूम सोडली , टपरीवर चहा व क्रीम रोल चा आस्वाद घेऊन चारधाम
साठी घेऊन जाणाऱ्या गाडीची वाट पाहत बसलो. आम्ही सर्व ग्रुप हा २४ जणांचा असल्याने विनोद अण्णाने एक मिनी बस के ली होती. १० लेडीज व १४ जेन्ट्स यात
बऱ्याच जोडी-जोडी ने होते. तर काही हे ६० -७० वय असलेले वयस्कर होते. पण या लोकांचा उत्साह हा आम्हा तरुणांना लाजवेल असाच होता . तत पूर्वी अण्णाने
उत्तराखंड सरकारच्या वेबसाईट वर सर्वांचे online रजिस्ट्रेशन के ले. पुरोहितांकडू न विधिवत गाडीची पूजा झाल्यानंतर बम बम भोले , बद्री विशाल भगवान कि जय ,
के दारनाथ भगवान कि जय असा जयघोष करत रवाना झालो .

हरिद्वार वरून निघताना चालू झालेल्या प्रवासात सुरवातीला चार पदरी रोड होते त्यामुळे चांगले वाटत होते, परंतु जसे जसे डोंगरावर चढाईला सुरवात झाली नरेंद्रनगर
सोडल्यावर एके री रस्ता चालू झाला. एकावेळी एकच गाडी जाऊ शके ल असा रस्ता होता. समोरून गाडी आली तर आपली गाडी मागेच एका बाजूला दाबून समोरील
गाडीला जागा देणे व कु ठेही घाई न करता एकामागून एक सर्व गाडीवाले चाललेले पाहून आश्चर्य वाटले. ड्रायव्हरला विचारले तर त्याने सांगितले कि अशी ड्रायव्हिंग के ली
तरच सर्व वाहतूक सुरळीत चालते. अग्रखाल, चम्बा असे करत करत रात्री बारकोट ला मुक्कामाला गेलो. येथून यमुनोत्री ४५ की मी होते . दिवसभराचा प्रवासाचा शीण
आलेला होता. रूमवर समान टाकू न जेवणाची ऑर्डर देण्यासाठी गेलो , तर येथे सगळीकडे फक्त बटाटयाची भाजी (आलू मटार , आलू बेंगण, आलू आचार)भेटते . इथून पुढे
१०-१२ दिवस हाच आपला आहार आहे हि मनाची समजूत घालून घेतली. थंड हवेच्या साथीने जेवण करून सकाळी ४ ला उठण्यासाठी झोपी गेलो.

[Type here]
पहाटे ३ लाच अण्णाने सर्वाना उठवून दिले. यमुनोत्री ला गरम पाण्याचे कुं ड असल्याने कु णीही रूमवर अंघोळी के ल्या नाही. प्रातविधी उरकू न सर्वजण
गाडीजवळ येता येता ४:३० झाले, तोपर्यंत चहा बिस्कीट चा नाश्ता करून घेतला. सगळे गाडीत बसल्यावर यमुना मैया की जय च्या जयघोषात आमचा प्रवास सुरु झाला तो
यामुनोत्रीसाठी. जानकी चट्टी पर्यंत गाडीने गेल्यावर येथून पुढे ६ किमी हे अंतर पायी किं वा घोडयावर जावे लागते. वयस्करांसाठी डोलीची पण व्यवस्था आहे. आम्ही तरुणांनी
चालत जाण्याचा निर्णय घेतला. चढताना आधार म्हणून लाकडी काठी लहान मुले विकत होते त्यांच्याकडू न 20 रुपयांना एक अशी सर्वांनी काठी घेतली . सुरवातीला आपण
सहज चढू न जाऊ असे वाटले होते पण जसे जसे वर जात होतो तशी तशी चढाई ६० अंश च्या कोनात चालू झाली . वळणा वळणा ने चढत एका मागून एक असे डोंगर पार
करताना पायात गोळे चढायला लागले , हृदयाचे ठोके तर इतके जलद झाले कि आता हृदय फाटते की काय अशी वेळ आली. परंतु काही झाले तरी आपल्याला वरती जाऊन
दर्शन घ्यायचे आहे या एकाच ध्यासाने थांबत थांबत वरती जात राहिलो ,यमुना नदीच्या सानिध्याने चढाई सुरु होती. निसर्गाचा एक वेगळाच अनुभव येत होता , लगेचच राम
चे फोटोसेशन चालू झाले. सुरवातीला एकत्र असलेले सर्व जण हळू हळू पांगू लागले, जो तो ज्याच्या त्याच्या क्षमतेने हळू हळू वर येत होता . काही जण घोडयावर आले .
२५१७ मीटर वरून चढत आम्ही ३१५४ मीटर पर्यंत एकदाचे आलो , दुरूनच यमुना मैया च्या लाल आणि पिवळा असलेला मंदिराचा कळस दिसला आणि त्या ओढीने
अक्षरशः पळत सुटलो . सकाळी ७ ला सुरुवात करून आम्ही ११ ला वरती पोहोचलो होतो . मंदिराजवळ पोहोचलो तर पाहतो काय एकीकडे यमुना मैया चा थंडगार प्रवाह
आणि लगेचच सूर्यकुं ड येथे गरम पाण्याचे स्रोत असलेले कुं ड . या ठिकाणी स्नान के ले असता सर्व पापामधून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे . गरम पाण्याच्या स्पर्शाने
चढाईचा सगळा थकवा कु ठल्या कु ठे पळाला . बाकीचा गुप मागून येईपर्यत मनसोक गरम पाण्याने अंग शेकू न घेतले. सगळे आल्यावर सर्वांचे स्नान उरकू न यमुना मैयाच्या
दर्शनाला गेलो. यमुना हि सूर्यदेवाची मुलगी असून यामदेवाची बहिण आहे असे मानण्यात येते . निळ्या रंगातील अतिशय सुबक मूर्ती पाहून मन अतिशय प्रसन्न झाले. दोन्ही
हात जोडू न चरणी मस्तक टेकू न मैयाच्या चरणी लीन झालो. दर्शन घेऊन बाहेर आलो तर एका गुहेत पुजारी गरम पाण्याच्या झऱ्यात भाविकांचा तांदुळ घेऊन पाण्यात ठेवत
होते १० ते १५ मिनिटात तांदुळ शिजवून तयार होत होता. मग आम्ही सुद्धा तांदुळ देऊन आलेला भात प्रसाद म्हणून घेतला. देवदर्शन आटोपल्यावर पोटातील ओरडणाऱ्या
कावळ्यांची आठवण झाली , सकाळ पासून पोटात काहीच नव्हते मग मस्तपैकी आलू पराठा , राजमा भात वर ताव मारला. मंदिराबाहेर फोटो काढू न थोडावेळ आजूबाजूच्या
निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही परतीच्या उतरणीला लागलो. चढाई जशी कठीण तशीच उतरणे सुद्धा अवघड , कारण समोरून वर येणारे भाविक, त्यांना घेऊन येणारे
घोडेवाले व पालखीवाले तसेच उतरणारे घोडेवाले , पालखीवाले व पायी जाणारे यांनी सगळा रस्ता भरून गेला होता त्यातून वाट काढत काढत सर्वांचे मार्गक्रमण सुरूच होते
त्यात काही जण पुढे निघाले तर काही मागेच राहिले. मग मी एकटाच उतरायला सुरवात के ली. तितक्यात वातावरणात बदल होऊन काळे ढग जमा झाले व पावसाला सुरवात
झाली. थोडावेळ शेडखाली थांबून मग पावसातच पुन्हा चालायला सुरवात के ली. काही वेळात पाऊस वंद झाला मग चालण्याचा वेग वाढवला. खाली उतरून आलो तर
सगळीकडे एकसारख्या गाड्या पाहून आपली गाडी कु ठे हे आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. सकाळी काठ्या घ्यायच्या नादात गाडी जवळील ओळखीची खुण पाहण्यात
आली नाही , मोबाईल सुद्धा चार्जिंग नसल्याने कु णाशीच संपर्क होऊ शकत नव्हता मग एका हॉटेल मालकाकडू न फोन घेऊन राम ला फोन के ला त्याने सांगितले कि लाल
रंगाचा मोबाईल चा टावर आहे तिथे ये , त्यानुसार मग टावर कडे पाहत एकदाचा गाडीजवळ पोहोचलो तर समजले कि अजून बरीच मंडळी मागेच आहे. सर्वजण येता येता
संध्याकाळ चे ५ वाजले . परत यमुना मैया कि जय चा जयघोष करून खाली वाकू न या भूमीची माती मस्तकी लावली व परत एकदा नमस्कार करून पहिले धाम करून परत
बारकोटसाठी रवाना झालो. रूमवर येता येता रात्रीचे ९ वाजले, जेवण करून निद्रादेवीच्या अधीन झालो ते सकाळी गंगोत्री साठी रवाना होण्यासाठी .

गंगोत्री धाम रवाना व दर्शन ...................

बारकोट वरून पुन्हा एकदा पहाटे ५ ला स्नान वगैरे आवरून निघालो , वळणा वळणाच्या रस्त्यांनी सुरवात झाली . दुपारपर्यंत डोंगर उतरून १०० कीमी
उत्तरकाशी ला आलो येथे जिल्हा मुख्यालय असून भागीरथी नदीच्या काठावर भगवान विश्वनाथाचे अतिशय सुंदर मंदिर आहे , येथील सृष्टी सौंदर्य लाजवाब आहे, एकीकडे
पर्वतामधून येणाऱ्या नद्या तर दुसरीकडे पर्वतावर असलेले घनदाट जंगल. भगवान महादेवाचे दर्शन घेऊन पुढे १०० कीमी असलेल्या गंगोत्री साठी रवाना होता होता ५
वाजले. हे ठिकाण ऋषिके श वरून १४८ कीमी उत्तरेला आहे. येथून परत पहाड चढायला सुरवात झाली. तशी २० ते २५ कीमी एवढाच गाडीचा वेग होता. रस्ता निमुळता व
चढायचा असल्याने ड्रायवरची कसोटी लागत होती . पुढे सायंकाळी ८ वाजता भाटवारी ला रूम पाहिली , येथील वातावरण अतिशय थंड असे होते , तापमान चेक के ले तर
रात्री २ ते ३ डिग्री तापमान दर्शवले. जेवण झाल्यावर अंगात थंडी भरली ती दोन दोन स्वेटर घालून पण जाईना , दोन जाड दुलया घेऊन झोपलो तर परत पहाटे ४ लाच
अण्णा उठवायला आला. पुढे गंगनानी येथे गरम पाण्याचे कुं ड असल्याने सर्वजण स्नान न करताच गाडीत बसले. सकाळी ७ ला गंगनानी ला एकीकडे थंडी व येथे गरम पाणी
, पुन्हा एकदा निसर्गाच्या चामात्कारापुढे नतमस्तक झालो. गरम पाण्यात उतरल्यावर मनाचा आणि शरीराचा थकवा कु ठल्या कु ठे पाळला . येथील भगवान शंकराचे दर्शन
घेऊन गंगोत्री साठी परत गाडीत बसलो. साधारणता ९ वाजता आम्ही सर्वजण गंगोत्री येथे पोहोचलो . येथील मंदिर हे मुख्य रस्त्यापासून १ किमी खाली उतरून भागीरथी
नदी काठी आहे. समुदसपाटी पासून ३०४२ मी. उंचीवर हे ठिकाण असून मुख्य मंदिर हे गोरखा राजा अमर सिंह यांनी १८ व्या शतकात बांधल्याचे सांगतात तर जयपूरच्या
राजा माधो सिंह द्वितीय यांनी २० व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करून आत्ताचे सफे द ग्रेनाईड दगडात बनवले आहे .

मान्यता आहे कि श्री रामचंद्र चे पूर्वज रघुकु ल चे चक्रवर्ती राजा भगीरथाने याच ठिकाणी भगवान शंकराची कठीण तपशर्या करून गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली
व आपल्या पूर्वजांचा उद्धार के ला , त्यामुळे गंगेला येथे भागीरथी असेही म्हणतात. या ठिकाणी शिवलिंगाच्या स्वरुपात एक नैसर्गिक टेकडी हि भागीरथी नदीमध्ये स्थित
आहे. हे एक अत्यंत मनोहर एवम आकर्षक दृश्य आहे. हे पाहिल्यावर आपल्याला दैवी शक्ती चा अनुभव येतो. पुराणातील कथेनुसार याच ठिकाणी भगवान शिव हे आपल्या
जटा सोडू न बसले होते व त्यांनी माता गंगा ला आपल्या वेटोळ्या जटेत लपेटू न घेतले. थंडीच्या सुरवातीला जेव्हा गंगेचा प्रवाह फार खाली जातो तेव्हा या पवित्र शिवलिंगाचे

[Type here]
दर्शन होते. या ठिकाणी ज्या दगडावर बसून भगीरथाने तप के ले त्या ठिकाणी मंदिर बांधले आहे. गंगा माई मध्ये हातपाय धुऊन मुख्य सफे द मंदिरात दर्शनासाठी गेलो असता
आत गंगा माई ची अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे. शतशः नमन करून नमामि गंगे चा जयघोष करून बाहेर आलो. थोडा वेळ गंगा माई च्या घाटावर बसून राहिलो. येथील
वातावरणात मिळणारी मनाची शांती कितीही मेडीटेशनचे कोर्स करूनही मिळत नाही. या शांतीचा अनुभव घेऊन मातेच्या प्रवाहाकडे एकटक पाहत राहिलो.

येथून गोमुख हे १९ किमी ३८९२ मी उंचीवर चढू न जावे लागते. तेथे गंगोत्री सरोवर व गंगा नदीचा उगम आहे. २५ किमी लांब , 4 किमी रुं द व ४० मीटर उंच
असे गोमुख हे परिपूर्ण माप आहे . या सरोवरात भागीरथी नदी एका छोट्या गुफे मधून प्रवेश करते. असे म्हणतात कि या थंडगार पाण्यात स्नान के ल्याने माणसाचे सर्व पाप
धुतले जातात. आमच्या बरोबर वयस्कर मंडळी असल्याने आम्ही गोमुख ला जाण्याचे रद्द के ले परतीच्या प्रवासाला लागलो. ........

परतताना मुखबा गाव लागले येखे शीत काळात ६ महिने गंगोत्री चे मंदिर बंद झाल्यावर मातेची मूर्ती खाली या गावात आणतात. येथे मातेची पूजा अर्चा चालते.
वसंताच्या आगमनाला परत उत्सव मूर्ती गंगोत्रीला नेली जाते. या ठिकाणी जवळच मार्कं डेयपुरी म्हणून ठिकाण आहे जिथे मार्कं डेय ऋषींनी तप के ले व भगवान विष्णूंनी त्यांना
सृष्टीच्या विनाशाचे दर्शन घडवले. येथून आम्ही हर्शील ला मुक्कामासाठी परतलो. सकाळी पुन्हा लवकर उठू न गंगनानी ला गरम पाण्याच्या कुं डात स्नान के ले व उत्तरकाशी ला
रवाना झालो.

के दारनाथ ...........
गंगोत्री करून आम्ही उत्तरकाशी ला रवाना झालो. दुपारी १२ वाजता येथे आल्यावर वातावरणातील बदल जाणवला. येथे कडक ऊन पडलेले होते. अंगातून
घामाच्या धारा वाहत होत्या, ऋषिके श वरून १२५ कीमी असलेले हे एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. भगवान विश्वनाथाचे दर्शन घेऊन आम्ही के दारनाथ कडे प्रयाण के ले. धरसू
, छाम, चंबा, असे करत दुपारी टिहरी गाढवाल मध्ये प्रवेश के ला. येथून परत एकदा डोंगराची चढाई सुरु झाली. फक्त वर वर चढत होतो. गाडीचा वेग अत्यंत हळू असा
झाला होता. रस्त्यात दुपारचे चहापाणी आटोपून परत रस्त्याला लागलो. संध्याकाळी घनसाली ला मुक्कामासाठी आलो. येथे चांगल्या हॉटेलमध्ये आण्णाने आमची सोय के ली
होती. मस्त नदीकाठी हॉटेलचे एक दार उघडत होते , नदीच्या पाण्याच्या खळखळ आवाजाच्या साथीने हॉटेलच्या गच्चीवर जेवणाची सोय के ली होती. रोजरोज ते आलूची
भाजी खाऊन कं टाळा आला होता , मग त्याला वेगळी भाजी आहे का हे विचारल्यावर त्याने पनीर आहे असे म्हणून मस्त भाजी बनवली , भरपेट जेऊन मग निद्रादेवीच्या
अधीन झालो ते परत पहाटे 4 ला उठण्यासाठी. ...

लवकर निघून ठेला, तिलवाडा येथे चहापाण्याला थांबलो , येथून के दारनाथ ६० किमी दर्शवत होते , आता काय २-२.३० तासात आपण पोहोचतो असाच
सगळ्यांचा ग्रह झाला, पण पुढे काय वाढू न ठेवले हे कोणालाच माहित न्हवते. येथून डोंगर अजूनच उंच उंच होत गेले व जागेवर उंच वळण , समोरून येणाऱ्या मोठ्या गाड्या
, रस्ता खचल्याने एके री वाहतूक त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागली , एकाच जागेवर अर्धा – एक तास उभे राहण्याची वेळ येऊ लागली . अगस्तमुनी, चान्द्र्पुरी,
उखीमठ, गुप्तकाशी,फाटा , सिरसी असे करत कसे तरी रामपूर मध्ये येऊन ठेपलो तर तेथे सर्वत्र ट्राफिक जाम झालेली होती, पार्किं ग ची व्यवस्था खाली खड्ड्यातील
सोनप्रयाग बस थांब्यावर होती. आण्णा रूमची चौकशी करण्यासाठी गेला. आम्ही पाय मोकळे करावे म्हणून खाली उतरलो तर समोरच भंडारा चालू होता, ते सर्वाना
अगत्याने बोलावत होते, आम्ही पण भोलेचा प्रसाद म्हणून तिकडे गेलो तर मस्त गरम गरम इडली सांबर आणि भात असा बेत होता. ताट घेऊन लाईन मध्ये उभे राहिलो तर
परत वातावरण बदलून पावसाला सुरवात झाली. मग तिथेच हातात ताट घेऊन प्रसाद घ्यायला सुरवात के ली . सकाळपासून पोटात काहीच नसल्याने कडकडू न भूक लागली
होती. २-२ करता करता कधी १० इडल्या खाल्या कळलेच नाही . शेवटी भोलेनाथलाच भक्तांच्या भुके ची काळजी . जेवण झाल्यावर जी अंगात थंडी भरली ती काही के ल्या
जाईना , तीतक्यात आण्णा आला, कु ठेच रूम शिल्लक नसल्याचे सांगू लागला. येथून रुद्रप्रयाग ५ कीमी राहिले होते पण पोलीस यात्रेकरूना पुढे जाऊ देत न्हवते कारण
गौरीकुं ड पासून पुढे पायी जाणाऱ्या रस्त्यावर फारच गर्दी झाली होती. खालून वर जाणारे व वरून खाली येणारे एका निमुळत्या डोंगराच्या काठावर थांबले होते, कोणीच पुढे
सरके ना . त्यामुळे खालून रामपूर व रुद्रप्रयाग वरून नवीन यात्रेकरूना पुढे जाऊ दिले जात नव्हते.

दोन वर्ष कोरोना मुळे सर्वच ठप्प झाले होते, सर्व यात्रा बंद होत्या. त्यात यात्रा चालू झाल्यावारचा पहिलाच सोमवार यामुळे भारत भारातून आलेले यात्रेकरू व
आजूबाजूच्या परिसरातून आलेले लोकल भाविक यांनी एकाच गर्दी के ली होती. स्थानिक दुकानदारांकडे व वरती दर्शन घेऊन आलेल्या भाविकांशी चर्चा के ल्यावर समजले की
वरती भाविकांचा लोंढाच्या लोंढा धडकत आहे. वरती १५ ते २० हजार भाविकांची राहण्याची सोय होऊ शकते परंतु त्याच्या चार पट भाविक अगोदरच वरती पोहोचले होते.
त्यामुळे राहण्याचे व खाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले होते. प्रशासनाचे सर्व अंदाज मोडीत काढत मुंग्यांच्या रांगेसारखे भाविक के दारनाथ कडे येत होते. गर्दीला आवर
घालणे प्रशासनाच्या हाताबाहेर चालले होते. त्यामुळे पोलीस भाविकांना पुढे सोडत न्हवते त्यामुळे भाविक व पोलीस यांच्यात बाचाबाची सुरु होती. आमच्या बरोबर वयोवृद्ध व
लेडीज यांची संख्या जास्त असल्याने आण्णाने सर्वाना एकत्र बोलावून सर्व परिस्थितीची कल्पना दिली व काय करायचे ते विचारले ? सर्वांनी विचार के ला कि आता वरती
जाऊ देत नाही, कधी सोडतील माहित नाही, जरी वरती गेलो तरी वरील वातावरणात प्रचंड थंडी व पाऊस , जर राहण्याची सोय नाही झाली तर हाल होण्यापेक्षा येथून परत
निघून हेलिकॉप्टर चे तिकीट मिळते का ते पाहूया. असे ठरवून परत निघाले तर परत जायला सुद्धा रस्ता नाही इतकी ट्राफिक झाली. कसेतरी त्यातून वाट काढत काढत
फाटा येथे आलो. येथे हेलिकॉप्टर चे बुकिं गची चौकशी के ली तर , सर्व बुकिं ग फु ल असल्याचे कळले . परंतु कदाचित उद्या एके री बाजूने फक्त जाण्यासाठी जागा होऊ शकते
असे सांगितले गेले . त्या आशेवर मग तेथील एका हॉटेलात मुक्काक करून सकाळी ६ वाजता पुन्हा लाईनला उभे राहिलो. मनात कु ठेतरी आशा होती कि आपल्याला तिकीट

[Type here]
मिळेल. एका बाजूने हेलिकॉप्टर ने जाऊन खाली उतरताना पायी उतरण्याची सर्वांची तयारी होती. मनातल्या मनात भोलेनाथाचा धावा सुरु होता, की हे भोलेनाथ तुझ्या
दर्शनासाठी इतके लांब प्रवास करून आलो , आता आम्हाला विना दर्शनाचे परत पाठवू नको, ३ ते ४ तास वाट पाहिल्यावर तेथील कर्मचारी आले व सांगितले कि आजचे
सर्व बुकिं ग फु ल झाले असून उद्या जय काही तिकीट रद्द झाले तरच तुम्हाला तिकीट भेटतील , म्हणजे उद्यासुद्धा रामभरोसेच असेल. मग फार वेळ न दवडता के दारनाथ चे
दर्शनाविनाच परतायचे ठरवले. सर्वच जण मनातून खट्टू झाले, पण इलाज न्हवता म्हणून मग तेथूनच दोन्ही हात जोडू न के दारनाथ चे दर्शन घेतले व मनात म्हणालो भोलेनाथा
लवकरच पुन्हा तुझ्या दर्शनाला येईल ............ तिथून मग बद्री धाम साठी रवाना झालो.

उखीमठ - शीत काळात सहा महिने के दारनाथ धामचे कपाट बंद होतात व अक्षय तृतीया ला परत उघडतात , या काळात भोलेनाथ हे उखीमठ येथे
विराजमान असत्तात. बद्रीनाथ कडे जाताना रस्त्यातच हा मठ असल्याने दुधाची तहान ताकावर या म्हणीप्रमाणे मग येथील मंदिरात दर्शनाला गेलो. के दारनाथ मंदिराची
प्रतीकु ती असलेले हे मंदिर अतिशय प्राचीन असे आहे. येथे सहा महिने के दारनाथा ची पूजा के ली जाते. येथे बाणासुर ची कन्या उषा व श्रीकु ष्णाचे पौत्र अनिरुद्ध यांचा विवाह
झाला होता ती जागा आहे. तसेच एक देवीचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे पंचके दार चे दर्शन येथे घडते. सर्व पाहता पाहता कु णीतरी सांगितले कि वरती मठाधिपती यांची गादी
आहे. तेथे दर्शनासाठी गेलो असता तेथे गादीवर एक अत्यंत तेजपुंज असे साधू दृष्टीस आले. दर्शन घेऊन फोटो काढू का असे विचारल्यावर शुद्ध मराठीत त्यांनी होकार दिला.
मराठी भाषेत त्यांनी आमची विचारपूस के ली , कु ठू न आलात मग आम्ही विचारले कि आपणाला मराठी कशी माहित तर त्यांनी सांगितले कि ते महाराज २० वर्ष नांदेडला
एका मठात होते. ते मुळचे महाराष्टीयन आहेत. आडनाव मालुंजकर , त्यांनी मग संगमनेर कडील बर्याच गावांची नवे सांगितले . मग दर्शन घेऊन प्रसादरुपी लाडू घेऊन
समाधानी मनाने गाडीकडे निघालो.

बद्रीनाथ धाम रवाना व दर्शन ..................

उखीमठ वरून निघून पुढे परत उंच उंच डोंगर चढाई ला सुरवात झाली. डोंगराला कोरून कडे कडेने रस्ता तयार के ला होता. डोंगरावर उंचच उंच देवदारच्या
झाडांची दाटी होती. येथून ३०-४० कीमी वार चोपता म्हणून उंचावरील थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. तेथे काही वेळ थांबून मग सर्वांचे फोटोसेशन चालू झाले. किती फोटो
काढू आणि किती नको असे झाले होते. निसर्गाच्या अद्भुतरम्य अशा वातावरणाचा आनंद आम्ही घेत होतो. येथून जवळ पंचके दार पैकी एक तुंगनाथ भगवान हे मंदिर आहे.
परंतु ५ कीमी पायी चढाई असल्याने ते रद्द करून थोडीशी पोटपूजा करून मग पुढील प्रवासाला रवाना झालो .....

चोपता वरून गोपेश्वर मार्गे चामोली या जिल्ह्याच्या ठिकाणी आले. याठिकाणी पेट्रोल पंप व इतर सोयीसुविधा उपलब्ध आहे. येथून पिपलकोटी , पाखी
गुलाबकोटी, हेलंग वरून जोशी मठ या ठिकाणी मुक्कामाला आलो. या ठिकाणी शीत कालात भगवान बद्रीनाथ यांचा निवास असतो. येथील नृसिंह सुंदर व प्राचीन मंदिर व
शंकराचार्य यांची गुफा आहे. येथे आठव्या शतकात आदी शंकराचार्य यांना ज्ञान प्राप्त झाले व त्यांनी देशात तिन्ही टोकांना मठ स्थापन करण्यापूर्वी येथे मठ स्थापन के ला.
याठिकाणी यात्रेकरूं ची राहण्याची बरीच सोय किफायतशीर दारात आहे. येथून बद्री धाम ४५ कीमी राहिले होते. त्यामुळे सकाळी जरा निवांत उठू न सकाळी ७ ला
पुढील प्रवासाला रवाना झालो. रस्त्याने परत एकदा वाहतुकीचा खोळंबा चालू झाला. अलकनंदा नदीच्या काठा काठाने प्रवास चालू होता. येथील डोंगर हे ठिसूळ
मातीचे असल्याने काही ठिकाणी माती रोडवर येऊ नये म्हणून बोगदे तयार के लेले आहे. लवकरच आम्ही बद्रीनाथ धाम ला विना अडचण येता पोहोचलो होतो. येथे
बऱ्याच धर्मशाळा व हॉटेल निवासासाठी उपलब्ध होते. येथील काशी मठ या धर्मशाळा मध्ये रूम मिळाली. पण रूम पाहता हि धर्मशाळा आहे कि हॉटेल आहे असाच
प्रश्न पडत होता.

बद्रीनाथ हे ३१३३ मी उंचीवर डोंगराच्या चारही बाजूने वेढलेले अलकनंदा नदीच्या तीरावर वसलेले आहे. बद्रीनाथ मंदिरात भगवान श्री विष्णू यांची
शाळीग्राम दगडातील मूर्ती आहे. जी आदी शंकराचार्यांनी त्यांना झालेल्या दिव्य प्रचीतीमुळे नारद कुं डातून काढू न ८ व्या शतकात याची स्थापना के ली आहे. अतिशय
मनोहर व नयनरम्य आशी हि मूर्ती आहे . येथील पूजेचा मान हा दक्षिणात्य लोकांना आहे ज्यांना रावळ असे संबोधले जाते. हिंदू मान्यतेनुसार चार धाम मधील हे
सर्वात पवित्र असे धाम आहे ज्याच्या नुसत्या मनातील स्मरणाने मानवाचे सर्व पाप नाहीसे होतात व स्वर्गाची प्राप्ती होते. मान्यता आहे कि कु ल हत्येपासून मुक्ती
साठी पांडवानी याच ठिकाणी तपशर्या के ली होती व येथूनच स्वर्गारोहण के ले होते. असे हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे, हे भारतातील काही व्यस्त असलेल्या तीर्थक्षेत्र
यापैकी एक आहे. या मंदिराला बद्री-विशाल या नावाने संबोधले जाते. येथे निसर्गाची मुक्तहस्ताने के लेली उधळण पाहून मन प्रसन्न होते.

लवकर आवरून सर्वजण बद्रिनाथाच्या दर्शनाला निघालो.मंदिराकडे जाण्यासाठी काही अंतर हे खाली उतरून जावे लागते. या ठिकाणी अलकनंदा
नदीवर पूल पार करून मंदिराकडे जावे लागते. मंदिराजवळच सूर्यकुं ड नावाचे गरम पाण्याचे कुं ड आहे. अशी मान्यता आहे.कि या ठिकाणी भगवान सूर्यदेवाने भक्ष-
अभक्ष पापापासून मुक्ती मिळावी यासाठी ताप के ले होते त्याचे प्रतिक हे गरम पाण्याचे कुं ड येथे अस्तित्वात आहे. वर्षभर येथील पाणी हे ५५ अंश इतके गरम असते
तर बाहेरील तापमान हे सरासरी १७ डिग्री असते हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे. या ठिकाणी स्नान के ल्याने शरीराचे सर्व चार्मरोग निवारण होते असे सांगितले
जाते. असे मानले जाते कि या पाण्यात हात घातला असता पाणी अतिशय गरम लागते पण पाण्यात उतरले कि तापमान हे शरीराशी जुळून घेते. थंड वातावरणात
गरम गरम पाण्याने शेक घेतल्यावर मनाला मिळणारा आनंद हा अवर्णनीय असा आहे. स्नान करून दर्शन रांगेकडे आलो तर हि मोठी रांग आमची वाट पाहत होती.
तास-दीड तास रांगेत उभे राहिल्यावर एकदाचे मंदिराच्या समोर आलो. नजर वर करून मंदिर नजरेत साठवण्याचा प्रयत्न करून पहिला पण व्यर्थ . लाकडी कोरीव
काम के लेले हे मंदिर १६ व्या शतकातील गढवाल राजा ने बांधलेले आहे. मुख्य गर्भगृह हे शंखाच्या आकाराचे असून १५ फु ट लांबी असलेले दगडी बांधकाम असलेले
आहे. मुख्य मूर्ती बरोबर गरुड , श्री नारद , माता लक्ष्मी , धनाची देवता कु बेर आणि नर नारायण यांच्या मुर्त्या आहे. मुख्य मूर्ती हि भगवान विष्णू यांची १ फु ट उंच

[Type here]
शाळीग्राम दगडातील आहे. जिच्या एका हातात शंख व एका हातात चक्र असलेले आहे व दोन हात हे योगमुद्रेत ( पद्मासनात ) त्यांच्या मांडीवर स्थिर झालेले आहे.
अतिशय मनोहर मूर्तीकडे एकटक पाहत बसावे असेच वाटते. दर्शन करून बाहेर आल्यावर हनुमानाचे व देवी चे मंदिर आहे. अलकनंदा नदी काठी पिंडदानाचा विधी
होतो, येथे के लेले पूजा हि आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवेन देतो . देवदर्शन व फोटोसेशन झाल्यावर पोटातील कावळ्यांची आठवण झाली. थोडी पेटपूजा आटोपून
रूमवर आराम करण्यासाठी आलो, पण थंडीने सर्व बेड व पांघरून, दुलई गार पडले होते, तीन तीन स्वेटर घालून सुद्धा थंडी कमी होण्याचे नाव घेत न्हवती ,
मोबाईल मध्ये तापमान चेक के ले ५-६ डीग्री दाखवले व रात्री २ डिग्री दर्शवत होते. ते पाहून भीतीनेच काटा उभा राहीला. थंडीमुळे झोपपण येईना मग संध्याकाळी
परत मंदिरात आरतीला ज्यायचे ठरवले तसेच येताना जेवण करून यायचे ठरले. आमच्यातील एक जण दुपारीच थंडी व गारव्यामुळे आजारी पडला होता त्याला पण
दवाखान्यात नेणे जरुरी होते. त्यामुळे परत एकदा रुमच्या बाहेर पडणे गरजेचे होते, संध्याकाळी मंदिराकडे गेलो तर लांबूनच मंदिरावरील के लेली विद्युत रोषनाईने
डोळ्यांचे पारणे फे डले ,सर्व मंदिर हे सोनोरी रंगात न्हावून निघाले होते. पिवळ्याधमक सोनेरी रंगाने जणू सुवर्ण मंदिर असल्याचा भास होत होता. उशीर झाल्याने
आरती होऊन गेली होती. मग मंदिर परिसरात फोटोसेशन करून परत येताना मिश्रा रेस्टॉरंट मध्ये भरपेट जेवण के ले व फे रफटका करण्यासाठी निघालो, फिरता
फिरता सहज एके ठिकाणी लक्ष गेले, संत श्री तनपुरे महाराज मठ व आत मध्ये विठ्ठल रुख्मिणी ची मूर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा
होता. इतके लांब महाराष्ट्रापासून २००० कीमी लांब आपले दोन्ही दैवत पाहून आपोआपच आम्ही तिकडे आकर्षित झालो. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन राजांचा
जयघोष के ला तर ते ऐकू न तेथील म्यानेजर आले, इकडील तिकडील चौकशी झाल्यावर आम्ही सांगितले कि आम्ही संगमनेर हून आलो आहे तर त्यांनी सांगितले कि
तेपण संगमनेरच्या कोल्हेवाडी गावचे रहिवासी आहे व या यात्रेच्या सहा महिन्याच्या काळात ते येथील व्यवस्था पाहण्यासाठी येथे असतात. थोडीफार खरेदी
आटोपून रूमवर येऊन निद्रादेवीच्या अधीन झालो. उद्या येथून ५ कीमी असलेल्या माना या गावाला भेट द्यायची असल्याने सकाळी निवांत उठलो तरी चालणार
होते. ......

माना, व्यासगुफा, गणेश गुफा, भीम शीला व हिंदुस्थान कि आखरी दुकान .............
सकाळी ८ ला आम्ही बद्रीनाथ हून ५ कीमी उंच असलेल्या माना या भारतातील शेवटच्या गावाला भेट द्यायला निघालो. पांडवानी बद्रीनाथ येथे कु ळहत्येच्या पापातून

मुक्ती मिळवण्यासाठी तपशर्या करून ते माना येथून स्वर्गारोहानाला गेले असे सांगतात . तसेच याच ठिकाणी महर्षी व्यासांनी महाभारत सांगितले व भगवान गणेशाने ते

लिहून घेतले. स्वर्गारोहानाला जाताना पांडवाना अलकनंदा नदी पार करण्यासाठी भीमाने एक भीमकाय शिळा ठेऊन पूल तयार के ला होता ती शिळा अद्यापही तेथे

अस्तित्वात आहे. या ठिकाणी जाण्यासाठी डोंगरावर बरीच चढाई करावी लावते. या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्टाची मान उंच झाली कारण येथे अलकनंदा व

सरस्वती नदीच्या संगमावर श्री विश्वनाथ कराड यांच्या आईने अतिशय सुंदर असे संगमरवरी दगडात माता सरस्वतीचे मंदिर बांधले आहे. येथे दर्शनी भागात

गणेशाची आकर्षित मूर्ती असून आत माता सरस्वती , विठ्ठल रुख्मिणी तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या मुर्त्या आहे. येथेच भारतीय हद्दीतील शेवटचे दुकान आहे. येथून

पुढे तिबेटची सीमा चालू होते. भारत कि आखरी चाय कि दुकान असा बोर्ड नजरेस पडतो. येथेच फोटो काढण्यासाठी उंचवट्यावर भारताचे झेंडे लावले होते, तेथे

मनसोक्त फोटोसेशन करून चहा नाश्ता करून पुढे निघालो. येथून गणेश गुफा येथून १ कीमी वर आहे. याच ठिकाणी व्यास मुनीच्या विनंतीवरून महाभारत गणेशाने

लिहले. एका निमुळत्या गुफे मध्ये गणेश व भगवान शंकराची पिंड आहे. पुढे काही अंतर चढू न गेल्यावर व्यास गुफा लागते. याच ठिकाणी महाभारताची निर्मिती झाली

आहे. येथील गुफे त व्यासांची जुनी व नवीन शाळीग्राम दगडातील मूर्ती आहे. या गुफे चे वैशिष्ठ असे कि ग्रंथाची पाने जशी एकावर एक ठेवली जाते तसा या गुफे वरील

डोंगराचा आकार झाला आहे जणू एक एक पान ठेऊन ग्रंथ तयार असल्याचा भास होतो. निसर्गाचा चमत्कार म्हणा किं वा महाभारताचा पुरावा म्हणा पण आश्चर्यच

आहे. ....

परतीचा प्रवास ............


माना गावावरून मग आम्ही परत ऋषिके श कडे प्रयाण के ले. आता जाताना सगळा रस्ता हा फक्त उतरणीचा होता. एकवेळ चढाई ला गाडी चालवणे सोपे
असते, परंतु उतरताना गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. पण आमच्या गाडीचे दोन्ही ड्रायवर हे अतिशय चांगले व शांतप्रीय असे होते , कु ठेही घाई
गडबड नाही, कु ठेही ओव्हरटेक चा प्रयत्न नाही , छोट्या गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी बऱ्याच वेळा आम्ही थांबून राहायचो. हनुमानचट्टी पासून एक रस्ता शिखांचे
गुरुद्वारा हेमकुं ड साहिब ला जातो. गोविंदघाट पासून पायी यात्रा करून येथे पोहचता येते. सात डोंगरांनी वेढलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ४६३२ मी उंचीवर

[Type here]
आहे. असे म्हणतात कि येथे पहिले एक मंदिर होते जे राम बंधू लक्षमण याने बांधले होते, या ठिकाणी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी पूजा व तप के ले होते तेव्हा
पासून हे गुरुद्वारा म्हणून पूजले जाते. येथे असलेल्या विशाल सरोवरात पडणारे डोंगरांचे प्रतिबिब अत्यंत मनोहारी व रोमांचपूर्ण असे असते. वर्षातील ७ महिने येथे
बर्फ असल्याने मंदिर भाविकांसाठी बंद असते. येथूनच अत्यंत मनोहारी अशी फु लों की घाटी आहे. असे म्हणतात कि येथे जगातील सर्व प्रकारची फु ले पहावयास
भेटतात. सध्या येथील यात्रा बंद असल्याने आम्ही पुढे निघालो. पांडु के श्वर, जोशी मठ वरून हेलंग, गुलाबकोटी करत पुन्हा चामोलीला आलो. गाडीत डीझेल भरून
पुढे निघालो येथून पुढे वातावरणातील बदल जाणवायला लागला. अतिशय गरम हवेचे झोत लागू लागले. एकदम थंड वातावरणातून आम्ही गरम वातावरणात आलो
होतो . नंदप्रयाग ला अलकनंदा व नंदाकिनी या नद्यांचा संगम होतो पुढे कर्णप्रयागला अलकनंदा व पिंडार नदीचा संगम होतो. तर रुद्रप्रयाग ला बद्रीनाथ वरून
येणारी अलकनंदा व के दारनाथ वरून येणारी मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम होतो. संगमावर अतिधन सुंदर मंदिर आहे व अंघोळीसाठी घाट बांधलेले आहे. येथे
दोन्ही नद्यांचा प्रवाह वेगवेगळा पुढे जाऊन एकत्र होतो हे दृश्य अतिशय नयनरम्य असे होते. फोटोसेशन करता करता संध्याकाळ झाली असल्याने येथून पुढे
कल्यासौड येथील एका धर्मशाळेत मुक्कामासाठी आलो. येथील रूम पाहता कोणी म्हणणार नाही हि धर्मशाळा आहे, हॉटेलपेक्षा चांगल्या व स्वच्छ रूम भेटल्या.
शेजारील हॉटेल मध्ये जेवण करून सकाळी लवकर उठण्यासाठी झोपी गेलो .

सकाळी लवकर उठू न प्रातविधी व अंघोळ आटोपून गाडीत येता येता ६ वाजले. निघून अर्धा कीमी आलो तर ड्रायवरने सांगितले कि येथे एक देवीचे
जागृत देवस्थान आहे. मग आम्ही सर्वजण गाडीतून उतरून मंदिराकडे जाऊ लागलो. हे मंदिर साधारणता अर्धा-एक कीमी खाली उतरून अलकनंदा नदीत एका
गुफे त आहे. मंदिराला दक्षिणात्य पद्धतीचे सुंदर नक्षीकाम के लेले प्रवेशद्वार रोडवर बांधलेले आहे. हळूहळू सर्वजण खाली उतरून मंदिरात आलो. मंदिर हे नदीच्या
मध्यावर होते, मंदिरात जाण्यासाठी नदीवर लोखंडी पूल व छत के लेले होते. देवीची मुखवटा असलेली मूर्ती अतिशय भव्य व मनोहर होती जणू माहूरच्या देवीची
आठवण देत होतो. येथील अक्ख्यायीका सांगतात कि पुढे श्रीनगर येथे असलेले धरण येथे होणार होते परंतु देवीच्या कोपामुळे येथील काम काही के ल्या पूर्णत्वास
जात नव्हते मग धरणाची जागा बदलून पुढे ते बांधण्यात आले. बाजूलाच नवीन मंदिराचे काम चालू होते, तिथे नदीवर एक झुलता पूल होता तेथे सर्वांनी निवांत फोटो
काढू न घेतले. परत वार चढताना दम लागत होता . एकदाचे सर्व आल्यावर पुढील प्रवासाला सुरवात झाली. येताना जे. पी. पावर चा ६५० मेगावॉट चा वीजनिर्मिती
प्रकल्प लागतो. अलकनंदा नदीच्या नैसर्गिक प्रवाहापासून वीजनिर्मिती के ली जाते.

येथून पुढे कीर्तिनगर मार्गे आम्ही देवप्रयाग ला आलो, येथे गंगोत्री वरून येणारी भागीरथी (गंगा) व अलकनंदा या दोन मोठ्या नद्यांचा संगम होतो.
ऋषिके श हून ७० कीमी असलेले हे ठिकाण हिंदू धर्मियांचे एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. राजा भगीरथाने तप करून गंगा मातेला पृथ्वीवर येण्यासाठी तयार के ले तेव्हा
तिच्यासोबत ३३ कोटी देव देवता पृथ्वीवर आल्या त्यांनी देवप्रयाग ला आपला मुक्काम बनवला . गढवाली मान्यतानुसार गंगा नदीला सासू व अलकनंदा नदीला सून
मानतात. एकीकडे गंगेचा नितळ हिरवट प्रवाह व दुसरीकडे अलकनंदेचा मातकट प्रवाह . अतिशय मनोहारी दृश्य असते. संगमावर रघुनाथ जी चे दक्षिणात्य पद्धतीचे
सुंदर मंदिर आहे. मान्यतेनुसार देवशर्मा नावाच्या तपस्वीनी कडक तप येथे के ले होते, त्यांच्या नावावरून देवप्रयाग हे नाव पडले. प्रयाग म्हणजे संगम . रामायण
काळातील बरीच ठिकाणे येथे आहे. लंका विजयानंतर प्रभू राम परत येताना एका धोबी ने माता सीतेच्या पवित्र्यावर संशय घेतला, तेव्हा रामाने सीतेचा त्याग करायचे
ठरवले आणि लक्ष्मण ला सिताजी ला वनात सोडू न येण्यास सांगितले. तेव्हा लक्ष्मणजी माता सीतेला उत्तराखंड देवभुमीत सोडू न गेले. जेथे लक्ष्मण जी ने सीता ला
विदा के ले ( निरोप दिला) ते स्थान देवप्रयाग पासून 4 कीमी पुढे बद्रीनाथ रोडला आहे. तेव्हा पासून या गावाचे नाव सीता विदा पडले आहे . जेथे सीतेने
निवासासाठी आपली कु टी बनवली त्याला आता सीता कु टी असे नाव पडले. काही वर्ष राज्य के ल्यानंतर भगवान राम हे ब्राम्हहत्येच्या पापक्षलनासाठी सीता व
लक्ष्मण यांच्यासह भागीरथी व अलकनंदा च्या संगमावर तपशर्या करायला आले होते. याचा उल्लेख के दारखंड मध्ये मिळतो. देवप्रयाग च्या या तीर्थासारखे न कोणते
तीर्थ झाले न होणार अशी मान्यता आहे. ..

ऋषिके श दर्शन व गंगा नदीत रिव्हर राफ्टींग ...............

देवप्रयागहून निघाल्यावर ब्यासी , शिवपुरी मार्गे दुपारी २ वाजता ऋषिके श ला पोहोचलो . येताना रस्त्यात गंगा नदीचा प्रवाह पसरट व थोडा शांत होत असलेला
दिसत होता. बऱ्याच ठिकाणी काही लोक नदीत होडीतून प्रवास करताना दिसत होते., डोक्याला हेल्मेट व अंगात लाईफ ज्याके ट घातलेले नाविक नदीच्या
प्रवाहाबरोबर होडीतून प्रवास करत होते. डीस्कव्हारी टीव्ही वर अशा प्रकारची होडीची सैर पाहिली होती. River Rifting & Adventure असे बोर्ड
जागोजागी दिसत होते त्यामुळे मनातील उत्सुकता वाढत होती कि हा नेमका काय प्रकार आहे, कु ठला थरार आहे. गाडी ऋषिके शला वाहनतळावर लावल्यावर
एकजण विचारायला आला कि रिव्हर राफ्टींग करणार का ? , सहज म्हणून पैसे विचारले तर त्याने सांगितले कि १२ कीमी वरून यायला १००० रुपये तर १६
कीमी वरून यायला १५०० रुपये . सर्वाना विचारले कि कोण कोण येणार रिव्हर राफ्टींग ला तर सगळी तरुण मंडळी तयार झालीच , पण आमचे कु टे साहेब व
गोरख पावबाके पण उत्साहाने सर्वांच्या अगोदर तयार . मग घासाघीस करून कसेतरी ८०० रुपयांवर ठरले. मग अण्णाला सांगितले कि तू बाकीच्या मंडळींना
ऋषिके श दर्शन करून गाडी घेऊन हरिद्वारला निघून जा . आम्ही रिव्हर राफ्टींग करून मग ऋषिके श दर्शन व गंगा आरती करून रात्री बसने हरिद्वारला येऊ .

मग त्या एजंट ने एक गाडी बोलावून आम्हाला गंगेच्या एका घाटावर उतरवले. गाडीवाल्याकडे चौकशी के ली तर सांगितले कि त्याची बोट काही लोक
राफ्टींग करून येत आहे , आत्ता येईल असे सांगून त्याने एक तास वाट पाहायला लावली, अखेर एकदाची त्याची बोट आली. ती बोट त्याने व बोटीवरील दोघांनी
गाडीच्या टपावर चढवली व आम्हाला गाडीत बसवून शिवपुरी येथे घेऊन गेला. तिथे गेल्यावर आमच्याकडू न फॉर्म भरून घेतला कि राफ्टींग करताना काही अपघात
झाला तर त्याला बोट वाले जबाबदार नाहीत. परत पर मानसी २० रुपये घेऊन त्याने सर्वांना हेल्मेट व लाईफ ज्याके ट घालायला दिले. मस्त गंमत वाटत होती.
कोणाला ज्याके ट बसत न्हवते तर कोणाला हेल्मेट घालता येत न्हवते. सर्व तयारी झाल्यावर सगळ्यांना एक एक वल्हे ( बोट चालवण्यासाठीचे पेडल ) दिले व अर्धा
किमी खाली नदी पात्राकडे जाण्यास सांगितले. सगळे एकदम जोशात खाली उतरू लागले. खाली उतरताना बाकीचे बोटवाले त्यांच्या बोट खांद्यावर उचलून खाली
आणत होते. उतरायला निमुळती पायवाट होती, त्यातूनच बोट खांद्यावर घेऊन आले तर जमिनीवर झोपावेच लागत होते, तेव्हाच बोट उचलणारे आपल्यावरून बोट
घेऊन नदीकडे जात होते. खाली आल्यावर सर्वांना एका जागी जमा करून बोट मास्टर ने राफ्टींग मधील धोके व अडचणी सांगितल्या . जसे कि गंगा नदीमध्ये काही

[Type here]
ठिकाणी लाटा उसळतात , तर काही ठिकाणी दगड धोंडे असल्याने बोट त्यावर आदळून बोट पलटी होऊ शकते. गंगा नदीची खोली हि येथे ६० फु ट आहे हे
ऐकल्यावर तर सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. पण परत अशा अडचणी आल्यावर काय करायचे हे पण त्याने सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे बोट चालवली व
दिलेल्या सूचनांचे पालन के ले तर एक अविस्मरणीय आनंद तुम्हाला मिळेल असे सांगितले. बोट चालवायला एक क्यापटन हवा असतो, जो बोटेला दिशा देईल व
बाकीचे सगळे बोटेच्या कडावर बसून प्याडल मारून बोट पुढे नेतील. लगेच आमचे कु टे साहेब म्हणाले कि मी बोटेच्या मध्यावर बसून बोट चालवणार आहे. त्यांना
वाटले कि आपण मस्त मध्ये बसून राहू पण त्यांना काय माहित कि पुढे बसल्यावर काय होते ते ? सगळ्यांच्या शारीरिक रचनेनुसार व वजनानुसार बोटेवरील वजन
समान करून सगळ्यांना बोटेवर चढवले.

गंगा मैया कि जय असा जयघोष करून बोट नदीत उतरवली. डीस्कव्हारी टीव्ही वर पाहिलेल्या थरारक प्रवास आता सगळेजण अनुभवणार होतो.
तेवढ्यात बोट मास्टर ने संपूर्ण प्रवासाचे व्हीडीओ शुटींग करायचे का असा प्रस्ताव मांडला व त्यासाठी १५०० रुपये लागतील असे सांगितले, आयुष्यातील एक
रोमांचकारी क्षण हे क्यामेऱ्यात कै द व्हावे असे वाटले, म्हणून थोडी घासाघीस करून मग १२०० ला ठरवून शुटींग ला सुरवात के ली. सुरवातीला संथ असलेला
प्रवाह खाली ओबडधोबड जागेमुळे अचानक वेगवान झाला , लगेच मास्टर ने फास्ट फास्ट अशी आरोळी देऊन जोरात वल्हे मारायला सांगितले. मग आम्ही सर्वजण
जोरजोरात वल्हे मारू लागलो, त्यामुळे बोट अजूनच जोरात प्रवाहात पुढे जाऊ लागली. अचानक एक मोठी लाट आली व बोटीवर आदळली , लाटेचा मारा पुढे
बसलेल्या कु टे साहेबांना व पुढील दोन्ही वल्हे मारणार्यांना जोरात बसला, सगळे पाणी बोटेत आले. सगळे नखशिकांत ओले झाले.नशीब सगळ्यांचे मोबाईल व
पाकीट एका वाटर प्रुफ ब्यागेत ठेवले होते. बूट, सॉक्स ओले झाले. लाटेमुळे बोट २ ते ३ फु ट वर उचलली गेली होती, त्यातून सावरेपर्यंत दुसरी लाट आली,पण
पहिल्या लाटेचा अनुभवाने आम्ही परत जोरात वल्हे मारून बोट काढू न घेतली. एक वेळ अशी आली कि आता बोट उलटणार पण आमचे वाहक कु टे साहेबांनी
बोटेला योग्यवेळी दिशा दाखवून बोट सरळ के ली. दुसऱ्या लाटेने अजूनच कपडे ओले के ले. पुढे प्रवाह थोडा शांत झाल्यावर अजून एक थरार वाट पाहत होता. त्याने
दोरी पाण्यात टाकली आणि आम्हाला सांगितले कि आता एक एक जण पाण्यात उतरा . ६० फु ट खोल नदीत उतरायचे या कल्पनेने अंगावर काटा आला, पण त्याने
सांगितले कि अंगातल्या लाईफ ज्याके टमुळे तुम्ही पाण्यात बुडणार नाही . म्हणून मग आम्हीपण डेअरींग करून पाण्यात हळूच उतरलो तर काय खरोखरच आम्ही
पाण्यावर तरंगत होतो. मग काय मनातील भीती कु ठल्याकु ठे पळाली . मग सगळेच मनसोक्त पाण्यात पोहोत होतो. इकडे शुटींग चालूच होती, त्याने मग आम्हाला
घोषणा दयायला सांगितल्या मग काय आम्ही महाराष्ट्रीयन मराठी भाषेत जय भवानी जय शिवाजी , गणपती बाप्पा मोरया , भारत माताकी जय , वंदे मातरम् च्या
जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले, बाकीच्या बोटेवरील सगळे शांत होते पण आमचा आवाज सगळीकडे घुमत होता, सगळे कौतुकाने आमच्याकडे पाहत होते.
तितक्यात पावसाला सुरवात झाली, नदीत पोहताना वरून पावसाचा मारा चालू होता, बऱ्याच वेळाने परत बोटेवर चढलो. परत एक खडकाळ भाग आल्याने परत
एकदा लाटेचा सामना करावा लागला. मागील अनुभवावरून सगळे एका लईत वल्हे चालवत होतो, जणू काही एखादे कसलेले नाविकच होडी चालवतात. पुढे त्याने
एका एका जनाला नदीत सूर मारायला सांगितले व त्याचे शुटींग के ले. आम्ही प्रवरेच्या तीरावरील पोहोणारे , आम्हाला घाटाच्या उंचावरून नदीत सूर मारण्याची
सवय त्यामुळे सगळेच एकाचढी एक असा सूर मारत होते व नदीत पोहोत होते. जसे जसे ऋषिके श जवळ येत होते तसे तसे नदीवरील सुंदर घाट व मंदिरे दृष्टीस पडत
होते. तितक्यात समोर लक्ष्मण झुला व दूरवर राम झुला दृष्टीस पडला . हळूहळू बोट झुल्याखालून जाऊ लागली , इतका प्रचंड पूल तोही तारेचा हलता असा प्रथमच पाहत
होतो. पुढे त्रंबके श्वरा चे १३ मजली मंदिर लागले. नदीकाठी लाल रंगाचे आकर्षक असे उंच मंदिर अतिशय सुंदर दिसत होते . हळूहळू उतरायचे ठिकाण जवळ येत होते, पण मनात
अतिशय आनंदी वाटत होते कि आपण एक रोमांचकारी अनुभवाचे भागीदार झाले. स्वच्छ ऊन पडल्याने अंगावरील कपडे सुद्धा वाळले.

ऋषिके श दर्शन व गंगा आरती ..................

रिव्हर राफ्टींग ला साधारणता दीड ते दोन तास गेले असतील, मग आम्ही ऋषिके श दर्शन ला निघालो, नदीच्या या काठावरून त्या काठावर ज्याण्यासाठी बोटीची सुविधा होती, १०
रुपये प्रत्येकी भाडे देऊन बोटीत बसलो तर वरुण राजाचे आगमन झाले. बोटीतून पलीकडे जाऊन पावसापासून वाचण्यासाठी जाई पर्यंत परत एकदा ओलेचिंब झालो. पाऊस वाढू न
अचानक गारा पडायला सुरवात झाली. पावसात मग रस्त्यावरील गारा गोळा करून मनसोक्त खाल्ल्या . एक क्षण पाऊस कमी झाला असे वाटल्याने सगळे काठावरील महादेवाच्या
मंदिरात जाऊ लागलो तर परत धुमधडाक्यात पावसाला सुरवात झाली. मग ठरवले कि असेही कपडे ओले झाले आहेच मग आता असेच पावसात पुढे निघू. मग आम्ही
लक्ष्मण झुला पाहण्यासाठी निघालो, सहज चौकशी के ली तर समजले कि लक्ष्मण झुला येथून दोन किमी अंतरावर आहे व आता दुरुस्तीसाठी तो बंद आहे. तेथे कोणालाच जाऊ
दिले जात नाही. मग आम्ही जवळच असलेल्या राम झुल्यावर गेलो, राम झुला सुद्धा लक्ष्मण झुल्याप्रमाणे २३० मीटर लांब लोखंडी तारांचा बनवलेला आहे. याची रचना
१९८६मध्ये के ली आहे. येथून तुम्ही फक्त पायी किं वा सायकलवरून जाऊ शकतात. येथे फोटो काढू न मग सगळे ऋषिके श मधील प्रसिद्ध चोटीवाले बाबाच्या हॉटेलात गेलो. येथे
हॉटेलच्या सुरवातीलाच एक दक्षिणात्य मेकअप के लेली व्यक्ती उंचावर बसलेली होती, जी जवळ लटकवलेली घंटा वाजवून लोकांचे लक्ष आपणाकडे वेधून घेत होती. टक्कल के लेली व
एक शेंडी असलेली हे चोटीवाले बाबा हीच या हॉटेल ची ओळख व मानचिन्ह आहे. त्याचप्रमाणे येथे मिळणारे उत्तरभारतीय जेवण म्हणजे अतिशय रुचकर व वर्षानुवर्षे सांभाळलेली
एकच चव हे येथील वैशिष्ठ आहे. हॉटेल अतिशय भव्य व टापटीप असे होते कि जणू आपण एखाद्या ५ स्टार हॉटेलात आलो कि काय . २५० रुपयांची थाळी हि येथील प्रसिद्ध आहे,
थंड वातावरणामुळे आम्ही फक्त चहाचाच आस्वाद घ्यायचे ठरवले. तिथून निघाल्यावर थोडीफार खरेदी करून वेळेअभावी इतर ठिकाणे न पाहता त्रिवेणी घाटावर गंगा आरती साठी
निघालो.

रिक्षा करून ५:३० वाजता त्रिवेणी घाटावर आलो, ऋषिके श स्थित एक पवित्र घाट, त्रिवेणी घाट त्याच्या आरती सोहळ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या सकारात्मक
आणि उत्कर्ष सुगंधासाठी ओळखला जाणारा हा ऋषिके शमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घाट आहे. त्रिवेणी हा शब्द दोन शब्दांच्या संयोगाचा परिणाम आहे: "त्रि" म्हणजे तीन
आणि "वेणी" म्हणजे संगम. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्या जिथे मिळतात तिथे घाट आहे. संपूर्ण हिंदू पौराणिक कथांमध्ये तसेच रामायण आणि महाभारत महाकाव्यांमध्ये
त्रिवेणी घाटाचा उल्लेख आढळतो . येथील वातावरण पाहून मन एकदम प्रसन्न झाले. भव्य अशी गुलाबी दगडातील आखीव रेखीव कमान व त्यावर कु रुक्षेत्रावरील श्रीकु ष्ण व अर्जुनाचा
रथावरील संवाद असे अतिशय सुंदर व कलात्मक दगडातील कोरीव शिल्प , सभोवताली स्पीकरवर चाललेली गंगा मैयाचे भजन , सर्वांची चाललेली आरतीची तयारी ,येथील
स्वच्छता हे पाहून आम्ही सर्व भारावून गेलो. पुढे खाली आरतीच्या ठिकाणी आल्यावर गंगा मैयाच्या काठावर बांधलेला भव्य व सुंदर घाट , आरती करण्यासाठीचे चबुतरे , सर्व

[Type here]
घाटाला पत्र्याच्या शेड चे आवरण , बसण्यासाठी अंथरलेली बसकर( चटई) , सर्व आरती करणारे ब्राम्हण एका पोशाखात वावरत होते. आम्ही मग एक मोक्याची जागा हेरून
सर्वजण स्थानापन्न झालो. तेथे पुजाऱ्याकडे देणगी देऊन आरतीचे बुकिं ग करता येत होते माईक वर आजच्या आरतीच्या मानकर्यांची नावे पुकारत होते, ते ते सर्व आपल्या कु टुंबीयान
समवेत आरतीचा संकल्प सोडण्यासाठी पुढे हजर होते. साधारणता एक ते दीड फु टाचे वर निमुळती होत जाणारी आरतीचे तबक व त्यात असलेली तुपातील वात व कापूर यांची
व्यवस्था नवीन असलेले शिकाऊ ब्राम्हण विद्यार्थी पाहत होते. याठिकाणी गंगा मैया दोन प्रवाहात विभाजीत झालेली दिसली. घाटाजवळ नदीचा प्रवाह शांत होता व पलीकडे अवखळ
अशा आईचे दर्शन होत होते. जसजशी आरतीची वेळ जवळ येऊ लागली तसा मैयाच्या भजन करणार्यांचा उत्साह वाजत जाऊन भजन अत्युच सीमेवर जाऊन एक भक्तिपूर्ण
वातावरणाची निर्मिती झाली.

क्षितिजावर सूर्य मावळून एक लालसर छटा पूर्ण आसमंतात भरून गेली , शंख नाद झाला व भावपूर्ण वातावरणात आरतीला सुरवात झाली. वीस ते पंचवीस ब्राम्हण
एकाच वेळी एका लयीत व विशीष्ट तालात सुरात गंगा मैयाची आरती करतानाचे ते दृश्य अवर्णनीय असेच आहे. अजून पण नुसत्या आठवणीने अंगावर रोमांच उभे राहतात. सर्वजण
भक्तिभावाने मैयाला आळवत होते , मैयाचे गुणगान गात होते. अंधारात चमकणारे ते आरतीचे तबक व हजारोंच्या साक्षीने होणारी ती आरती हा एक अलौकिक व स्वर्गीय अनुभव
आहे. तितक्यात कोणीतरी एका छोट्या ताम्हनात लहानसा दिवा आणून प्रत्येकाला आरतीचा लाभ दिला. कर्पूर आरती व मंत्र पुष्पांजली झाल्यावर गंगा मैया कि जय चा जयघोष
झाला. सर्वजण लगबगीने आरती घेण्यासाठी झेपावले. मैयाचा तो उबदार स्पर्श जणू आईच गालावरून मायेने हात फिरवते आहे असा भास झाला. तितक्यात परत भजनाला सुरवात
झाली व सर्वजण भजनाच्या तालावर तल्लीन होऊन नाचायला लागलो. त्यात काही सहकार्यांची ताटातूट झाली काही जण चप्पल घेण्यासाठी पुढे गेले व आम्ही आपले तल्लीन होऊन
नाचतच होतो, बराच वेळ झाल्यावर घड्याळात पहिले तर आठ वाजत होते. लवकर पुढे निघून एका टमटमवाल्या बरोबर घासाघीस करून भाडे ठरवून आम्ही हरिद्वारला रवाना
झालो. खरेदी करायची राहून गेली , वाटले हरिद्वारला गेल्यावर रात्रभर मस्त खरेदी करूया.

हरिद्वार मध्ये अण्णाने यावेळेस दुसरीकडे रूम घेतली होती. त्या हॉटेलचा पत्ता अण्णाने पाठवला पण तो शोधता शोधता नाकी नऊ आले. एकदाची रूम सापडली पण
जेथे रूम घेतली होती त्या धर्मशाळेचा नियम होता कि रात्री १० वाजता इमारतीचे दरवाजे बंद होईल . ऋषिके शहून येता येता आम्हाला साडेनऊ वाजले होते त्यामुळे घाईघाईने
जेवनासाठी जवळच्या हॉटेल मध्ये गेलो. जेवण करून येताना फक्त प्रसादाच्या काही पुड्या घेतल्या तेवढीच आमची चारधाम ची खरेदी झाली. आता उद्या आम्हाला दिल्ली साठी
सकाळी रवाना व्हायचे असल्याने एकदा सर्व सामान आवरा सावर करायला घेतली तर लक्षात आले कि, माना गावात घेतलेले थंडीच्या टोप्या तिथेच विसरल्या. आता काहीच हळहळ
करून उपयोग नव्हता . आल्यावर आण्णाने सांगितले कि आपल्या गाडीवाल्याला सर्वांकडू न ३०००/- बक्षीस दिले आहे. सकाळी लवकर उठू न आवरून ६ वाजता आम्ही हरिद्वार
बस डेपोला आलो. व तेथून ७ वाजता दिल्ली साठी रवाना झालो.

दिल्ली दर्शन ( अक्षरधाम मंदिर ) - .................

सकाळी ७ वाजता हरिद्वार हून निघून दुपारी १२:३० ला आम्ही दिल्ली ला आलो. सकाळी निघताना थंडगार हवेमुळे गाडीत मस्त डु लकी लागली, पण जसेजसे दिल्ली जवळ येताना
सूर्य डोक्यावर येताना तापमानात वाढ होऊ लागली. दिल्लीला आल्यावर मोबाईल मध्ये तापमान पहिले तर डोळ्यांवर विश्वास होत नव्हता , तिथे तापमान ४७-४८ डिग्री दाखवत
होते, कु ठे बद्रीनाथ चे २ डिग्री आणि तीन दिवसाच्या अंतराने कु ठे दिल्लीचे ४८ डिग्री. अक्षरशः अंगातून घामाच्या धाराच चालू होत्या. आण्णा हॉटेलात रूम शोधण्यासाठी गेला होता,
परंतु इकडे आम्हाला रेल्वे स्टेशन सामोरील रस्त्यावर थांबने सुद्धा शक्य होत नव्हते. एकदाचा आण्णा आला व त्याने सांगितले कि जवळच रूम आहे, मग आम्ही दोन्ही हातात
सुटके स व पाठीवर स्याक अशी आमची वरात त्या उन्हात एकामागे एक अशी निघाली. त्या अंग भाजणाऱ्या उन्हातून जाताना थकवा जाणवत होता व घामाने पूर्ण अंघोळच झाली
होती. एकदाचे रूमवर पोहोचून सगळे समान रुममध्ये टाकू न दिले व मस्त गार पाण्याने अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आलो तर परत दमट वातावरणाने सगळे अंग घामाने ओले
झाले. पंखा पूर्ण फास्ट करून मग थोडा आराम करून जेवनासाठी बाहेर पडलो.

आम्ही ५-६ जण एकत्र असल्याने काही अंतरावर असलेल्या एका चिंचोळ्या बोळीत काही हॉटेल होती व एका हॉटेलात जाऊन मस्त चमचमीत भाज्यांची ओर्डर दिली ,
बऱ्याच दिवसानंतर आम्ही असे जेवण पाहत व खात होतो त्यामुळे भरपेट ताव मारला. तिकडे गोरख पावबाके व काही अजून काही जण चुकू न दुसऱ्या गल्लीतील एका हॉटेलात गेले
तिथे आत जाताना जेवणाच्या थाळीचा एक भाव सांगीलता व नंतर लुबाडू न अव्वाच्या सव्वा पैसे घेतले, त्यांच्या बरोबर महिला मंडळ असल्याने त्यांनी पण फार वाद न करता पैसे
देऊन टाकले. असा दिल्लीचा एक कटू अनुभव आला. रूमवर आल्यावर अण्णा ने सांगितले कि लगेच रिक्षा येणार आहे, आपण आता अक्षरधाम मंदिर पाहायला जात आहोत. भर
दुपारी या गरम वातावरणात बाहेर पडायचे जीवावर आले होते पण पुन्हा कधी येणार म्हणून मग सगळे निघाले.

रूम पासून साधारणता अर्धा तास अंतरावर अक्षरधाम हे स्वामी नारायण संप्रदायाचे अतिशय सुंदर , आखीव रेखीव , मनमोहक , भव्य असे लाल दगडात बनवलेले
मंदिर दुरूनच नजरेस पडले . १०० एकर परिसरात विस्तार असलेले या मंदिराची विश्वातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असा गिनीज बुक मध्ये २६ डिसेंबर २००७ ला नोंद आहे. हे
मंदिर गुलाबी , सफे द संगमरवर व बलुआ दगडाच्या मिश्रणातून बनवले आहे. ११००० कारागिरांनी पाच वर्ष मेहनत करून हे भव्य मंदिर उभारले आहे. विस्तिर्ण पार्किं ग ची
व्यवस्था, समान ठेवायला वेगळी व्यवस्था , मोबाईल ठेवायला ९ ते १० खिडक्या असलेले दोन्ही बाजूने व्यवस्था असेलेली इमारत आहे. तिथे बरीच गर्दी होती, एका प्लास्टिकच्या
पसरट त्रे मध्ये सर्वांचे मोबाईल बंद करून दिले व त्याने एक टोकन दिले व देणार्याचा फोटो काढू न घेतला . पुढे सुरक्षा रक्षकाने सर्वांची कसून तपासणी के ली, मोबाईल व इतर धारधार
वस्तू बाहेरच काढू न टाकण्यास सांगितले. तसेच लोकांची गुटखा व तंबाखू सुद्धा काढू न घेतली. आत गेल्यावर तेथील स्वच्छता पाहून मान प्रसन्न झाले. जागोजागी पिण्याच्या
पाण्याची व स्वच्छतागृहाची सोय के लेली आहे. पायऱ्या चढू न आत प्रवेश के ला असता भव्य दिव्य असे मंदिर नजरेस पडते. सभोवती विस्तिर्ण हिरवळीचा बगीचा व त्यात एका बाजूला
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुष व दुसरीकडे भारतातील निडर व बलशाली समस्त महिला वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान महिला यांचे पुतळे उभारलेले आहे. बाजूला
चप्पल ठेवण्याची सोय के लेली आहे.

[Type here]
तिथून १० ते १५ पायऱ्या चढू न मुख्य मंदिरात प्रवेश करते झालो,तर डोळे दिपवून टाकणारे नक्षीकाम व काचेचे झुंबर लावलेले होते , त्यातून सोडलेला प्रकाश एक
वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देऊन जात होता. खांबावर व वर छतावर श्री स्वामी नाराणय यांच्या जीवनातील प्रसंग अतिशय मोहक पद्धतीने कोरलेले होते. २३४
नक्षीदार खांबांवर हे मंदिर उभारलेले आहे. २० शिखर असलेल्या या मंदिरात २०००० मुर्त्या आहे. मध्यभागी गाभाऱ्यात श्री अक्षरपुरुषोत्तम स्वामी नाराणय भगवान यांची अतिशय
सुंदर व देखणी मूर्ती आहे. तेजस्वी चेहरा व पाणीदार डोळे पाहून आपोआप आपण नतमस्तक होतो. मंदिरात ठिकठिकाणी स्वामी भगवान यांच्या जीवनपट हा चित्र स्वरुपात दर्शवले
आहे. खांबावरील व छतावरील नक्षीकाम पाहताना एक जाणवते कि एक नक्षी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी परत के लेली नाही , सर्व नक्षीकाम हे एक आश्चर्यच आहे. हे नक्षीकाम पाहताना
कधी वेळ निघून जातो हे देखील समजत नाही. येथून बाहेर आल्यावर मंदिराच्या पायथाच्या भोवती ७०० गज शिल्प कोरलेले आहे .

मंदिराची वैशिष्टे व आकर्षण .................

1) मुख्य मंदिर – गुलाबी व संगमरवरी दगडापासून बनवलेले हे मंदिर यात स्टील , लोखंड व कॉक्रीट चा वापर के लेले नाही. हे मंदिर म्हणजे हिंदू संस्कृ तीचे एक आधुनिक
तीर्थ आहे. अक्षरधाम हा शब्द अक्षर म्हणजे अनंत व धाम म्हणजे निवास म्हणजे परमात्म्याचा शाश्वत निवास. येथील ११ फु ट सोन्याची मूर्ती हे मंदिराचे वैशिष्ट ..
2) हॉल ऑफ वैल्यू (सहजानंद प्रदर्शन) - ऑडियो- एनिमेट्रॉनिक्स शो च्या द्वारे ज्ञान व सजीव जीवनाचा खरा अर्थ जसे कि अहिंसा, शाकाहार ,
नैतिकता आणि सामंजस्य आदी चा आभ्यासाचा संदेश दिला जातो.
3) विशाल फिल्म स्क्रीन (नीलकं ठ यात्रा) – एका भव्य चित्रपटगृहात मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला जातो. एका लहान मुलापासून ( नीलकं ठ ) ते
स्वामी नारायण होण्याचा प्रवास यात दाखवतात.
4) बोट राइड (संस्कृ त विहार) – अक्षरधाम मंदिरात आहे आणि नावेची सवारी के ली नाही तर तुम्ही एका चांगल्या अनुभवला मुकाल. बारा मिनिटाची हि
नौकायन भारतीय इतिहासाचे १०००० वर्षाचे दर्शन आपल्याला घडवते. आपल्याला यात वैदिक जीवनापासून ते तक्षशीला पर्यंत आणि प्राचीन शोधांचा
काळ असा सर्वांचा एक खूप छान अनुभव करून देते.
5) म्यूजिकल फाउंटेन्स (यग्नपुरूष कुं ड) – संध्याकाळी ७ ला असलेला पाण्याच्या कारंजावर होणारा लाईट चा हा एक परमोच्च बिंदू आहे. हा एक निराळा
अनुभव आहे. पाण्यावर पडणारे प्रकाश किरण व म्यूझीकच्या तालावर उसळणारे कारंजे पाहताना मन थक्क होते.
6) अभिषेक मंडप – येथे नीलकं ठ वर्णी भगवान च्या मूर्तीला जलाभिषेक के ला जातो ज्यात भजन व प्रार्थना के ली जाते. सर्वांना येथे अभिषेक करण्याची
परवानगी असते.
7) गार्डन ऑफ इंडिया (भारत उपवन) – भारतातील प्रसिद्ध व युगपुरुष व महिला यांच्या पितळाच्या मुर्त्यानी हा बगीचा सजवला आहे. योगिहृदय कमळ
एक विशेष कमळ आहे जे शुभ भावनांचे प्रतिक आहे.

सर्व पाहून निघता निघता संध्याकाळी ६.३० झाले. बाहेर आल्यावर आपलेआपले मोबाईल घेण्यासाठी गेलो तर टोकन दिल्यावर त्याने सांगितले कि ज्या व्यक्तीने
फोन ठेवले होते तीच व्यक्ती परत समान घेऊ शकते , टोकन माझे होते पण फोटो अन्नाचा होता, तेथील व्यक्ती बरोबर बराच वाद घालून सुद्धा त्याने काही आमचे
मोबाईल दिले नाही अखेर आण्णा आल्यावरच आम्हाला मोबाईल मिळाले. येथून बाहेर पडताच आम्ही ठरवले कि दिल्लीला आलो आणि काहीच खरेदी के ली नाही तर
घरी कु ठल्या तोंडाने जाणार म्हणून मग आम्ही चांदणी चौकात खरेदी साठी जायचे ठरवले.

चांदणी चौक व सीस गंज साहिब गुरुद्वारा –

मी येथून मागे दोनदा दिल्लीची वारी के ली असल्याने अक्षरधाम पासून चांदणी चौक कसे जायचे हे माहित होते. म्हणून आम्ही मग मेट्रो रेल्वेने जायचे ठरवले.
जवळच मेट्रोचे स्टेशन असल्याने सर्वजण पायीच रवाना झाले. तिथे गेल्यावर लाल लाईन, पिवळी लाईन, निळी लाईन व हिरवी लाईन असे चार रेल्वे लाईन होत्या .
प्रवेशद्वारावरच सर्व लाईनचे नकाशे व स्टेशनची नावे लावलेली होती, तिकीट काढू न आत प्रवेश करण्यासाठी स्वयंचलित असे छोटे प्रवेशद्वार होते तेथे आपण
काढलेले तिकिटाचे टोकन ठेऊन दार उघडत होते व काही सेकं दात परत बंद होत होते , आम्हाला हे सगळेच नवीन असल्याने काही जणांची तारांबळ उडाली ,
टोकन ठेऊन दार तर उघडले पण ते काही लवकर दाराच्या पलीकडे आले नाही व दार परत बंद झाले, मग तेथील सुरक्षारक्षकाची मदतीने ते पलीकडे आले.
यथावकाश मेट्रो आली, बाहेरच्या अंग भाजणाऱ्या वातावरणातून आम्ही थंडगार अशा मेट्रोत प्रवेश के ला. बहुतेकांचा हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. लवकरच एक एक
स्टेशन पार करत गाडी पुढील स्टेशन चांदणी चौक अशी घोषणा झाली व आम्ही लगबगीने स्टेशनवर उतरलो. सायंकाळचे ७ वाजून गेले होते त्यामुळे त्यांनी गर्दी
असलेले गेट बंद करून आम्हाला दुसऱ्याच बाजूने बाहेर काढले , नवीन एरिया पाहून मी सुद्धा अचंभित झालो, मग कु णालातरी विचारावे तर सर्वजण आपल्या
आपल्या घाईत निघाले होते, म्हणून मग एका चहाच्या दुकानात चहा घेतला व त्याला विचारले कि येथील मार्के ट कु ठे आहे , त्याने सांगितले कि आता मार्के ट बंद
झाले असेल. त्या इतक्या गरम वातावरणात मग तो चहा अजूनच गरम लागत होता. तरी सुद्धा एक चक्कर करावी म्हणून त्याने सांगितलेल्या रस्त्याने आम्ही चालू
लागलो व ५ मिनिटातच मेन चौकात आलो, तेथे काही दुकाने उघडी होती ते पाहून जीवात जीव आला. मग एक एक करत दुकानात चक्कर टाकू न काही घेण्यासारखे
आहे का ते पाहू लागलो. हळूहळू दुकाने बंद होऊ लागली मग एका दुकानात काही ड्रेस मटेरीअल पाहण्यासाठी बसलो , एका पेक्षा एक सुंदर असे ड्रेस पाहून हा घेऊ
का तो असे होऊ लागले, मग एक एक करता करता बरीच खरेदी झाली. मग बरीच घासाघीस करून अखेर सौदा जमला . कपडे असलेली पिशवी घेऊन मग आम्ही
चाट गल्ली चा पत्ता विचारू लागलो तर समजले कि अशी कु ठलीही गल्ली नाही, मग असेच फिरत फिरत आम्ही लाल किल्ला समोर पाहून चालू लागलो, पोटात भुके चा
डोंब उसळला होता. एका ठिकाणी एका इमारतीला बरीच लाईटिंग के लेली दिसली, सहज म्हणून पहिले तर सीस गंज साहिब गुरुद्वाराच्या दारात आम्ही आलो.
म्हणतात ना देवालाच भक्तांच्या भुके ची काळजी.

सीस गंज साहिब हे दिल्लीतील चांदणी चौकातील एक प्रसिद्ध व भव्य असे गुरुद्वारा आहे. जे कि ११ नोव्हेंबर १६७५ मध्ये बादशहा औरंगजेब ने
शिखांचे नऊवे गुरु तेग बहादुर यांनी इस्लाम कबुल न के ल्याने त्यांची हत्या के ली होती, त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ १७८३ मध्ये बघेल सिंह याने हे गुरुद्वारा बनवले होते.
या गुरुद्वारात सगळ्या जाती धर्माचे , लिंगाचे , सर्वांचे स्वागत होते. या ठिकाणी ज्या झाडाखाली गुरु तेग बहादुर यांना ठेवले होते ते झाड अद्यापही संरक्षित के लेले

[Type here]
आहे, तसेच काही विहिरी पण आहे ज्या ठिकाणी गुरु स्नान करायचे ते ठिकाणही संरक्षित असून येथील पाणी भक्त तीर्थ म्हणून प्राशन करतात. येथे वर्षभर लोकांची
यात्रा चालूच असते. भक्तिभावाने चप्पल उचलण्यापासून ते भटारखान्यात उष्टे पात्र साफ करण्याचे सर्व कामे हे लोक करत असतात, मग कोणी मोठा नाही कि कोणी
छोटा नाही. आम्ही हात पाय धुऊन डोक्याला रुमाल गुंडाळून आत दर्शनासाठी गेलो असता आत त्यांच्या गुरुवाणी चे भजन चालू होते, मधोमध एका मंडपात गुरूं ची
समाधी होती व अवतीभवती सोन्याने मढवलेले खांब व छत होते. त्यावर पडणारा तो पिवळाधमक प्रकाश सर्व वातावरण हे सुवर्णमय करत होता. नतमस्तक होऊन
थोडा वेळ तिथेच बसलो असता भजन ऐकताना मन तल्लीन होऊन गेले. तिथे फोटो काढण्यास मनाई नव्हती मग सर्व फोटो काढू न मग आम्ही लंगर चा आस्वाद
घेण्यासाठी गेलो. येथील एक पद्धत फार आवडली कि ते अगत्याने बोलावून सर्वांना जेवनासाठी बसवत होते. पात्रात अन्न वाढताना पात्राला स्पर्श होणार नाही असे
वरूनच वाढत होते, चपाती सुद्धा दोन्ही हाताची ओंजळ करून घ्यावी लागते. मस्त राजमा ची भाजी व चपाती बरोबर लोणचे आणि गोड तांदळाची गावठी तुपातील
खीर असा मेनू होता. कडकडू न भूक लागल्याने भरपेट जेवलो व देवाचे आभार मानले, कि कु ठे आम्ही चाट गल्लीत जाऊन चाट खाणार होते अन कु ठे हे प्रसाद रुपी
भोजन.....

मग बाहेर आल्यावर सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिला तर बाहेर परत चहाचा आग्रह होत होता तो न मोडता आल्याने जेवल्यावर परत चहाचा आनंद घेतला.
आता गोड जेवल्याने दिवसभराच्या दगदगीने शरीर थकल्यासारखे वाटायला लागले. मग लगेचच रिक्षा करून पहाडगंज दिल्ली रेल्वे स्टेशन ला निघालो कारण तेथूनच
आमची रूम जवळ होती. पण रिक्षाचालकाने रिक्षा वेगळ्याच मार्गाने रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूने अत्यंत गलिच्छ वस्तीतून घातली मग मनात नकळत भीतीची एक
लके र आली कि आपण या अनोळखी दिल्लीत माहित नसलेल्या मुस्लीम भागात आलो काही बरेवाईट तर नाही ना घडणार , कारण दुपारीच काहींना दिल्लीच्या
भामटेपणाचा अनुभव आला होता. इतरांच्या चेहऱ्यावरील भाव शांत दिसत होते पण मला नवीन भागात आल्याने मनावर भीतीचा ताण आला होता, परंतु देवकृ पेने
असे काहीच घडले नाही , पुढे रेल्वे स्टेशन जवळील ट्रांसपोर्ट चा भाग लागल्यावर जीवात जीव आला कि आता लोक दिसू लागले आहे. मोठ्या मोठ्या मालाच्या
गाठीच गाठी रस्त्यावर पडलेल्या दिसत होत्या. बहुतेक हा मालधक्का असावा . शेवटी एकदाचे आम्ही सर्व रेल्वे स्टेशनच्या मेन गेट समोर उतरलो आणि सुटके चा
निश्वास टाकला.

सहज रोडवरून फिरत असताना एक दोन खेळणी ची दुकाने उघडी दिसली , मुलांना काहीच घेतले नसल्याने दुकानात चक्कर टाकली , तिथे रिमोटवर
चालणाऱ्या लहान मोठ्या बऱ्याच गाड्या होत्या. एक दोन पसंत पडल्यावर घासाघीस सुरु झाली, ८०० रु वरून शेवटी ५२५ रु वर ठरले, मग दोन तीन गाड्या
घेतल्या व लवकरच रूम वार आलो. सकाळी परतीची रेल्वे हि ११ वाजता होती त्यामुळे आल्यावर गप्पागोष्टी करत निवांतपणे झोपून गेलो.

परतीचा प्रवास आणि मनातील हुरहूर ...........

आज आमच्या या यात्रेतील परतीचा दिवस होता. दिल्ली हून आम्ही ११ च्या ट्रेन ने श्रीरामपूरसाठी परतीच्या मार्गाला लागणार होतो. एकीकडे घराची लागलेली ओढ
आणि एकीकडे मागील १२- १३ दिवसांच्या सहवासात जुळलेले हे स्नेहबंध, आपुलकी आणि सर्वांनी घेतलेली एकमेकांची काळजी याने सर्वांशीच जे एक अनामिक
नाते जुळलेले होते त्यामुळे आता सर्वांपासून दूर जावे लागणार याची मनात वाटणारी हुरहूर अशा द्विधा अवस्थेत सकाळ उजाडली . ट्रेनमध्ये खाण्याचे हाल होत
असल्याने सर्वांनी दिल्लीतच नाश्ता उरकू न काही बरोबर पार्सल घेऊन १० वाजता सर्व समान घेऊन रेल्वेस्टेशनवर आले. आम्ही आमच्या जेवणाची सोय करताना
विनूने जवळील भाजी बाजारात जाऊन मस्त टोम्याटो , कांदा, लिंबू, मिरची , काकडी असा बाजारच करून आणला, तोवर मी दोन ब्रेडचे पुडे व टोम्याटो क्याचप
व इतर साहित्य घेतले. वातावरण अतिशय उष्ण होते, मोबाईल मध्ये सहज तापमान चेक के ले तर ४९ डिग्री दाखवले. गाडी येता येता ११ वाजून गेले , तोपर्यंत
पाण्याच्या २ ,३ बाटल्या संपवल्या तरी सुद्धा तहान जात नव्हती . शेवटी एकदाची गाडी येणार असल्याची उदघोषणा झाली व जीवात जीव आला , गाडी यथावकाश
स्टेशनात आल्यावर सर्वांच्या ब्यागा व इतर सर्व समान गाडीत टाकले. बुकिं ग करताना सर्वांना एकाच बोगीत सीट मिळाले नव्हते पण आम्ही ५ जण आणि विनोद
अण्णा व त्याचे घरचे आम्ही एकाच ठिकाणी आलो होतो, काही जण आमच्याच बोगीत सुरवातीला होते तर काही एक बोगी सोडू न लगेचच होते. गाडी रवाना
होईस्तोवर अक्षरशः घामाने आंघोळ झाली होतीं यथावकाश गाडी हल्ली आणि वार्याची हलकीच झुळूक आली तेव्हा इतके समाधान वाटले . हळूहळू गाडीने दिल्ली
सोडली व वेगाने पुढील वाटचाल सुरु झाली. आता इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी व यात्रेतील धमाल आठवणी यात २ तास कसे निघून गेले कळलेच नाही. इकडे
पोटातील कावळ्यांनी काव काव करायला सुरवात के ली. मग आमचे चीफ शेफ श्री विनय राम यांनी जबाबदारी स्वीकारून मस्त व्हेजिटेबल स्यांडविच आणि भेळ
असा मेनू आखला. आम्ही घरून येताना विविध फराळाचे पदार्थ सर्वांनी करून आणले होते. त्यातील शंकरपाळे व चिवडा बराच शिल्लक होता. त्या चिवड्याची मस्त
भेळ करायचे ठरवले. मग काय कु णी कांदा कापायला घेतला तर कु णी चिवडा एका मोठ्या पिशवीत काढू न त्यावर लिंबू व मीठ मसाला टाकला. तोपर्यंत विनूने ब्रेड चे
काही स्लाईस घेऊन त्यावर टोम्याटो क्याचप व हिरव्या मिरचीचा ठेचा व लसून ठेचा टाकू न वरतून काकडी, कांदा, टोम्याटो टाकू न एका एकाला मस्त रुचकर व्हेज
स्यांडविच बनवून दिले. त्याने ते इतके मन लावून व प्रेमाने के ले की त्यामुळे त्याची चव इतकी अप्रतिम झाली कि अदयाप पर्यंत ती चव जिभेवर रेंगाळत आहे.
चिवड्यात कांदा काकडी लिंबू टाकू न मस्त भेळ बनवली. मग सगळ्यांनी त्यावर मनसोक्त ताव मारला व तुप्तीचा ढेकर देऊन आरामात प्रवास सुरु ठेवला .

मग आमचे ग्रुपचे बाकीचे मेंबर कु ठे आहेत ते पाहण्यासाठी रेल्वेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एक चक्कर मारून आलो. सगळे जण दुपारच्या
उन्हामुळे आराम करत होते. मग सगळ्यांना भेटू न त्यांना आम्ही के लेली भेळ टेस्ट करण्यासाठी देऊन परत आमच्या स्थानावर आलो . आमच्या ग्रुप मध्ये अमरनाथ
हा सगळ्यात झोपाळू , कु ठे थोडा वेळ भेटला कि हा लगेच डु लकी घ्यायला लागायचा, येथे तर काय वेळच वेळ होता मग हा एकदा जेऊन जो वर जाऊन झोपला ते
डायरेक्ट संघ्याकाळीच खाली आला. विनूने पण मस्त झोप काढली , बाकी आम्ही बसलो गप्पागोष्टी करत. संगमनेर वरून येताना मी जलजिऱ्याचे १५-२० छोटे
पाकीट आणले होते, आमच्याकडे लिंबू होता , चाट मसाला होता मग काय थोड्या थोड्या वेळाने १-२ गार पाण्याच्या बाटल्या घेऊन त्यात लिंबू व जलजीरा टाकू न
मस्त मसाला सोडा बनवला. त्यावेळी तो फाईव्ह स्टार होटल पेक्षाही मस्त लागत होता. संध्याकाळी परत एकदा मग चिवडा काढू न मस्त भेळीचा बेत झाला.

[Type here]
मग परत एकदा सगळ्याची भेट घेण्यासाठी सगळ्या डब्यात चक्कर टाकू न आलो. मागील १२-१३ दिवस सगळे वेगवेळ्या गावाचे , वेगवेगळ्या वयाचे,
वेगवेगळ्या स्वभावाचे असे आम्ही २४ जण एकत्र होतो , पण असे कु ठेच जाणवले नाही कि आपण आपल्या घरापासून दूर आहे. कारण हे सगळेच आमचे कु टुंब झाले
होते. सगळे जण आपल्याबरोबर दुसऱ्यांची पण काळजी घेत होते. फिरताना कु णी मागे राहिले तर त्यांना सोवत घेऊन चालत होते. आमच्या या यात्रेत हर एक
वयोगटाचे यात्रेकरू होते . बाले आज्जी , सुजाता आज्जी तसेच शेलार काका , दासरी काका-काकू हे जणू आमचे आजी आजोबा बनून आमच्याकडे लक्ष देत होते ,
मुनापल्ली काका-काकू , तसेच दुस्सा काका-काकू हे आई वडिलांप्रमाणे होते तर विनोद अण्णा हा मोठ्या भावाप्रमाणे आमच्या सोवत होता. तसेच श्रीनाथ , अमरनाथ
व वैशू हि आमच्या लहान बहिण भावांची जागा भरून काढत होते. त्यामुळे जणू आपण आपल्याच घरीच असल्याप्रमाणे सगळे एकमेकांची काळजी घेत होतो. मग ते
सकाळी सगळ्यांना झोपेतून उठवण्यापासून , सगळ्यांच्या ब्यागा गाडीवर चढवणे प परत रात्री खाली उतरवणे , सगळ्यांची रूम मधील व्यवस्था पाहणे, कु णाला
काही हवे नको ते पाहणे, आजारी पडलेतर जवळील गोळ्या औषध देणे , अशी सगळे कामे आम्ही तरुण मंडळींनी आमच्या खांद्यावर घेतली होती. सगळे जण
एकमेकांना धरून सांभाळून घेऊन व बरोबर घेऊन इथवर आलो होतो. त्यामुळे सगळ्यांना भेटताना गहिवरून येत होते. एक एक करत सगळ्यांना भेटू न परत
आमच्या बोगीत आलो . दुपारचे जेवणच उशिरा व भरपेट झाल्याने व दिवसभर असलेल्या उन्हाने पाणी व जलजीरा पिऊन पोट गच्च झाले होते, त्यामुळे थोडेफार
चटक पटक खाऊन झोपलो.

सकाळी गाडी महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेशली आणि आपल्या गावाकडील जाणीव होऊ लागली. गाडी जेव्हा भुसावळ स्टेशन ला थांबली तेव्हा मस्त
वडापाव व के ळी यांच्यावर ताव मारला. बऱ्याच दिवसानंतर वडापाव व भजे यांचा वास नाकात दरवळत होता. आपला एरिया आल्याची हि एक खुण होती. मनमाड
ला पहिल्यांदा मुनापाल्ली काका-काकू उतरणार होते, येथून ते मुंबई ला जाणार होते. स्टेशनवर ते उतरल्यावर आम्ही सगळे परत एकदा त्यांना भेटायला गेलो, त्यांनी
सांगितले कि छान ट्रीप झाली. जाताना त्यांच्यापण डोळ्यात पाणी आले होते. कारण सर्वजण हे एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले होते.

[Type here]

You might also like