You are on page 1of 11

||| नर्मदे हर ! नर्मदे हर !

नर्मदे हर हर हर |||
लेखक – योगेश काळे

प्रकरण १

एकदा संगमनेर मध्ये शंकर महाराज यांची पालखी आली होती , तेव्हा दर्शनाला गेलो असता असेच सहज उत्सुकता म्हणून
त्यांची महती / माहिती नेट वर पाहत असताना dattmaharaj.com/narmada_parikrama या साईट वर
नर्मदा परिक्रमा हि tab दिसली , नुकतेच श्री पोपट भाऊ खेमनर हे नर्मदा परिक्रमा करून आल्याने व ई साहित्य या साईट
वर नर्मदा परिक्रमा हे पुस्तक वाचले असल्याने अजून काही माहिती मिळतेय का हे पाहण्यासाठी सर्च के ले असता
उत्तरवाहिनी एक दिवसाची नर्मदा परिक्रमा स्वरूप व महत्व वाचनात आहे.

नर्मदा परिक्रमा म्हणजे सर्वात कठीण व खडतर परिक्रमा आहे. ज्यांना हि परिक्रमा करायची फार इच्छा आहे परंतु प्राकृ तिक
वा संसारिक अडचणीमुळे हि परिक्रमा करता येत नाही , त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हा उत्तम पर्याय आहे.
एखादी नदी ज्यावेळेस उत्तरवाहिनी होते त्यावेळेस ती फार पवित्र मानली गेली आहे. असेच नर्मदा मैया तिलकवाडा ते
रामपुरा या क्षेत्रात फक्त चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी होते. त्यामुळे या परिसराला फार पवित्र मानतात. नर्मदापुराण व स्कं द
पुराण मध्ये उल्लेख के ल्याप्रमाणे जो कोणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला संपूर्ण नर्मदा परीक्रमेचे
फळ प्राप्त होईल असा नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात. असे
वाचनात आले. चैत्र महिना येण्यासाठी बराच अवधी असल्याने मेल मध्ये हि माहिती सेव करून ठेवली .
एकदा कु टे साहेब आले असता त्यांना हि माहिती दाखवली असता ते लगेच जाण्यासाठी तयार झाले. परंतु
अजूनही ५ ते ६ महिने बाकी असल्याने हि गोष्ट माझ्या विस्मरणात गेली. परंतु कु टे साहेबांनी मात्र हे लक्षात ठेवून अधून
मधून कायम मला टोचत राहिले कि आपल्याला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला जायचे आहे. मी पण हो म्हणून त्यांची गोष्ट
टाळत होतो , परंतु आम्हाला सर्वांना नर्मदा मैयानेच बोलवले असल्याने तिने या गोष्टीचा विसर आम्हाला पडू न दिला नाही.
२ वर्षांपूर्वी आम्ही गुजरात दौरा करून आलेले असल्याने हा परिसर आम्हाला काही नवीन नव्हता.
फ़े ब्रुवरि २०२३ महिन्यात परत एकदा कु टे साहेबांनी उचल खाल्ली व माझ्या मागे टुमणे लावले कि आपल्याला
परिक्रमा करायची आहे. मग मात्र मी पण ठरवले कि आमची परिक्रमा बहुदा नर्मदा मैया हि करूनच घेणार .................
प्रकरण २
फे ब्रुवारी मध्ये मग गुगल वर सर्चिंग सुरु झाले तिलकवाडा कु ठे आहे रामपुरा कु ठे आहे, प्रवासाची जाण्या येण्याची काय सोय
आहे , राहण्याची/ जेवणाची काय सोय आहे हॉटेल आहे का ? मग गुगल म्याप वर सर्च करीत असताना तिलकवाडा
येथील फोटो पाहत असताना एका दुकानाची पाटी दिसली त्यावर मोबाईल नंबर असल्याचे लक्षात आले. त्यावर फोन करून
सहज चौकशी करावी म्हणून कु टे साहेबांना सांगितले , त्यांनी लगेच फोन लावला तर समोरील व्यक्तीला उत्तरवाहिनी नर्मदा
परिक्रमा बद्दल माहिती विचारण्यास सुरवात के ली कि परिक्रमा कधी चालू होते , किती दिवस चालते, कु ठू न कु ठपर्यंत
परिक्रमा करावी लागते, अशी माहिती विचारल्यावर समोरील व्यक्तीने ( अजय बारिया ) अतिशय चांगल्याप्रकारे सर्व माहिती
दिली. परिक्रमा पहाटे ३ वा ४ वाजता चालू करावी लागते त्यामुळे मग राहण्याची काय सोय आहे हे विचारले असता त्याने
मीच तुमची सर्व सोय करतो असे सांगितले, कधी येणार आहे हे सांगा असे विचारल्यावर आम्हाला वाटले कि हा एखादा
एजंट असेल , आपल्याला फसवेल म्हणून मग लगेच आम्ही काहीच सांगितले नाही , मानवी मन हे फारच चंचल असते ,
तसेच कायम नकारात्मक विचारांचे धनी असते. नर्मदा परिक्रमा हे पुस्तक वाचत असताना बऱ्याच ठिकाणी वाचले होते कि
नर्मदा मैया हि आपली काळजी घेण्यासाठी कायम आपल्या समोर उभी असते पण आपण तिला ओळखू शकत नाही. या
वेळेस पण तसेच होते, मैया म्हणत होती कि तुम्ही फक्त माझाकडे या मी तुमची सर्व व्यवस्था करून तुमची परिक्रमा
निर्विघ्नपणे पार पडेल . जणू अजय च्या माध्यमातून मैया आम्हाला सांगत होती कि सर्व माझ्यावर सोडू न तुम्ही या .
मग अजयने सांगितले कि सर्व राहण्याची व जेवणाची व्यवस्था हि मोफत आहे . तिलकवाडा मधील हनुमान मंदिरात सगळी
सोय होईल , मग लगेच कु टे साहेबांनी सांगून टाकले कि आम्ही चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीला परिक्रमेला येणार
आहे. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा बद्दल you tube वर सर्च व्हिडीओ पहिले असता त्यांत सांगितले होते कि
तिलकवाडा मधील वासुदेव कु टीर मध्ये परिक्रमा प्रारंभ संकल्प पूजा करावी लागते त्यामुळे माझ्या मनात आपण वासुदेव
कु टीर मधेच मुक्कामाला जावे असे होते कारण हनुमान मंदिर मधून आम्ही पहाटे कधी परिक्रमा प्रारंभ पूजा करायला येणार
होतो त्यामुळे मी वासुदेव कु टीरलाच मुक्कामाला जाण्यासाठी आग्रही होतो. पण मग मनात आले कि हि परिक्रमा फक्त एकच
महिना असते शिवाय चैत्र पोर्णिमा म्हणजे परिक्रमेला या दिवशी भरपूर गर्दी असणार मग आपल्याला राहण्याची काय सोय
भेटणार म्हणून मग आम्ही अजय ने सुचवलेले हनुमान मंदिर मध्ये येण्यास तयार झालो, कारण आमची रहाणे व खाणे
दोन्हीही सोय या मोफत होणार होत्या. मन खट्टू झाले कि आपल्याला पूजेशिवाय परिक्रमा करावी लागणार बहुदा. परंतु
मैयालाच काळजी असते ती कशी हे तुम्हाला पुढे अनुभवायला येईल .
परिक्रमेचा दिवस तर ठरला ६ एप्रिल २०२३ , कारण चैत्र महिना तर 22 मार्च लाच सुरवात होत होता पण मार्च
एंड असल्याने एप्रिल महिन्यातील तारीख पाहिली तर ६ तारखेला चैत्र पोर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती चा दिवस होता , हा
मुहूर्त म्हणजे दुग्धशर्क रा योगच होता म्हणून हा दिवस ठरवला . मग सोबत येणारे सहकारी शोधणे चालू के ले . मागील वर्षी
के दारनाथ/ बद्रीनाथ यात्रा झाली असल्याने मी , कु टे साहेब, राम विनय , नाना वडीतके हे चार तर कधीही यात्रेसाठी तयार
असतो , दिपक वर्पे , प्रदीप शेलार व गोरख पावबाके यांना विचारले तर ते हि लगेच तयार झाले, सर्वांना मग नर्मदा परीक्रमेचे
you tube वरील व्हिडीओ पाठवले ते पाहून तर सर्वांना आपण कधी परिक्रमेला जातो असे वाटू लागले हि नर्मदा
मैयाचाच चमत्कार होता. ७ जण असल्याने मग गाडीचा शोध सुरु झाला भाड्याची गाडी करावी असे ठरले कारण प्रदीप कडे
असलेल्या गाडीत फक्त ५ जण च जाऊ शकणार होतो , मग फोनाफोनी झाली शोधाशोध झाली पण म्हणतात ना काखेत
कळसा अन गावाला वळसा . कारण आमचे सहकारी सचिन मिसाळ यांच्या भावाचीच गाडी प्रवासी वाहतुकीसाठी ते देत होते
हे त्याने सांगितल्यावर गाडी या दिवशी उपलब्ध आहे का हे पाहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने सांगितले कि गाडी
आहे त्याच बरोबर गाडी भाडे पण एकतर १३रु प्रती कीमी किं वा १३०० रु रोज (डीझेल व ड्रायव्हर वगळता). आमच्या
कडे राम प्रदीप व नाना हे तीन तीन ड्रायव्हर होते त्यामुळे आम्ही १३०० /- तू रोज या भाड्यावर आग्रही होतो पण कु टे
साहेब हे त्यासाठी तयार नव्हते , त्यांचे म्हणणे होते कि आपण गाडी मालकाचा ड्रायव्हर घेऊ कारण आपण नवीन प्रदेशात
जाणार तेथे आपले कोणीच ओळखीचे नसणार मग आपण कु णाच्या भरवशावर गाडी तिलकवाडा येथे ठेऊन परीक्रमेसाठी
जाणार , मग बरेच मत मतांतर झाल्यावर गाडी हि नर्मदा मैयाच्या भरवशावर ठेऊन जाण्याचे ठरले.
तसेच तिलकवाडा हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच असलेल्या पुतळा या के वडिया या
ठिकाणापासून जवळ असल्याने जाताना या ठिकाणी भेट देऊन मग कु बेर भंडारी येथे दर्शन करून मग परिक्रमेला जाण्याचे
ठरले. पण मैया कधी कधी आपली कशी परीक्षा घेते याचा अनुभव आम्हाला येणार होता , ते कसा हे पुढील भागात
पाहू.......

|| प्रकरण ३ ||

तारीख ठरली , सहकारी ठरले, गाडी ठरली , खरेदी झाली , परंतु आम्हाला परिक्रमेला बोलावताना मैया आमची परीक्षा पण
घेत होती कि हे सर्व किती समर्पक भावाने येत आहे. कारण मार्च एंड झाला व १ एप्रिल ला भारत सरकार ने तंबाखूजन्य
पादार्थावरील सेस मध्ये बदल के ला पूर्वी पोत्यावर असलेला सेस हा MRP म्हणजे विक्री किमतीवर आकारायचे ठरवले. या
बदलामुळे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला चालू होणारे आमचे गाय छाप चे बिलिंग हे २ तारीख झाली तरी चालू होईना ,
सेस मधील बदल हा आमच्या SAP सोफ्टवेअर मध्ये करण्यासाठी वेळ लागत होता. एक एक दिवस पुढे जात होता ३ , ४
तारीख गेली. मी नर्मदा परिक्रमा या आमच्या whats app ग्रुप वर सर्वांना निरोप दिला कि ५ तारखेचे आपले प्रयाण हे
आपण १ दिवस पुढे ढकलत आहोत. मी रोज मालपाणी हाउस ला रात्री ११-१२ पर्यत थांबून बिलिंग सुरु व्हावे म्हणून
प्रयत्न करत होतो, मैयाला विनवनी करत होतो कि तूच आम्हाला परिक्रमेला घेऊन जाणार आहेस . ५ तारखेला रात्री १०
वाजता एकदाचे आमचे बिलिंग सुरु करण्यात आम्ही सफल झालो. पहाटे ५ वाजेपर्यंत माझ्या बिलिंग टीम ने माल भरलेल्या
सर्व गाड्यांचे बील बनवले. आता आपण परिक्रमेला जाण्यासाठी हरकत नसावी असे वाटू न सकाळी १० वाजता
ऑफिसमध्ये आलो तर साहेबांनी सांगितले कि आपल्याला अजून इतर डेपोचे बिलिंग चालू करायचे आहे. हे ऐकल्यावर
माझेतर हात पायच गळाले , कारण महाराष्ट्रातील बिलिंग आम्ही किती प्रयत्नामधून चालू के ले होते हे आमचे आम्हालाच
ठाऊक होते. बील ई वे बील आणि मन्युअलि भरायचे ई invoice हे सगळे कर्नाटकातील डेपोला शिकवायचे हे एक मोठे
दिव्य होते. आपण जर यांना घाईघाईने शिकवून परिक्रमेला गेलो तर काही अडचण आली तर हे आपल्याला तिथे फोन
करून करून परेशान करतील व आपली परीक्रमेवरील लक्ष हे विचलित होईल , त्यामुळे परिक्रमा हि आपण एक आठवडा
पुढे ढकलावी असे वाटत होते, परंतु कु टे साहेबांचे म्हणणे होते कि आपण निघून जाऊ पुढे काय होईल ते पाहू , परंतु माझे
मन असे करायला तयार होत नव्हते. कारण मला हि परिक्रमा पूर्ण निश्चिंत मनाने व समर्पक भावाने करायची होती. मी
घाईघाईने जाण्यास तयार नव्हतो . त्यामुळे सर्वाचा नाईलाज झाला व सर्वांनी सांगितले कि तुझे काम पूर्ण आटोपल्यावरच
आपण जायचे . मंगळवार दि
मैयाच्या मनात बहुदा हेच होते कि तुम्ही आपले काम संपवून व मोकळ्या मनाने व वेळ काढू न या , कु ठलाही पण
परंतु न ठेवता निस्वार्थपणे माझ्याकडे या . कारण पौर्णिमेला झालेली गर्दीचे फोटो पाहिल्यावर मनाला हायसे वाटले कि
मैयालाच आपली काळजी असावी कि माझ्या या भक्तांना आल्यावर काहीही अडचण वा गैरसोय होऊ नये. जरी आमचा
हनुमान जयंतीचा मुहूर्त टाळला असला तरी आपण मैयाच्या भेटीला जाणार तोच सुमुहूर्त असे समजून जायचे असेच ठरले.
कारण जोपर्यंत मैया आपणाला बोलावणार नाही तो पर्यंत आपण काही परिक्रमेला जाता येणार नाही हे नक्की असते.
यथावकाश सगळे अडसर दूर झाले व एक आठवडयाच्या नंतर एकदाचे आपण सगळे मंगळवारी परिक्रमेला जाणार असा
म्यासेज whats app वर टाकला तर बऱ्याच जणांनी नक्की आहे का हि विचारणा के ली कारण कि दोनदा अगदी शेवटच्या
क्षणाला जाणे रद्द झाले होते, एकदा तर कु टे साहेब व दिपक वर्पे हे घरून कपडे व रात्रीचा डबा घेऊन आले व जाणेच रद्द
झाले होते. नशिबाने पुढील आठवडयात सुद्धा आम्ही ठरवलेली गाडी हि आमच्यासाठी उपलब्ध होती, म्हणजे आता
आम्हाला मैयानेच आपल्याला बोलावलेले असल्याचे निश्चित झाले होते.
मंगळवार दि ११/०४/२०२३ रोजी दिवसभर ड्युटी करून आम्ही ( मी , कु टे साहेब. राम विनय, प्रदीप शेलार,
दिपक वर्पे, गोरख पावबाके , नाना वाडीतके ) सगळे सायंकाळी ७ वाजता शिवशक्ती येथून क्रे टा गाडीने निघालो.
नेहमीप्रमाणे संपूर्ण ट्रिपचा खर्चाचा हिशोब हा माझ्याकडे ठेवला होता. अकोले नाका येथून 4 बॉक्स पाणी प्रथमतः गाडीत
घेतले कारण 4 दिवस असा आमचा प्रवास होणार होता. तीर्थयात्रेला जाताना प्रथमतः देवाचे दर्शन घ्यावे म्हणून नारळ
घेऊन संगमनेर बायपास ला असलेल्या विठ्ठल मंदिरात गेलो , बऱ्याचदा येथून जाताना हे मंदिर दिसत होते पण कधी आत
जाऊन दर्शनाचा योग आला न्हवता , मंदिरात काळ्या पाषाणातील विठ्ठल रुख्मिणी ची अतिशय मनोहारी मूर्ती होती. तसेच
इतर संत यांच्या पण मुर्त्या होत्या. त्याचबरोबर हनुमानाची भव्य मूर्ती व महादेवाची एक मोठी पिंड होती. श्री दत्तात्रयांची
प्रतिमा होती. त्यामुळे प्रत्येकाची श्रद्धास्थाने, सगळे देव हे एकाच ठिकाणी भेटले व सगळ्यांना प्रफु ल्लीत झाल्याचे जाणवले.
नर्मदा मैया की जय असा जयघोष करून आम्ही रवाना झालो.
मजल दरमजल करत नाशिक पार करून पुढे निघालो, सगळ्यांच्या पोटात भुके ने कावळे ओरडायला लागले होते.
सगळ्यांनी सोवत रात्रीचा जेवणाचा डबा आणला होता. एखादया ढाब्यावर थांबावे म्हणून रोडला हॉटेल पाहत होतो. रात्री
९:३० ला दिन्डोरीजवळ एका गावातील रोडवरील एक मंदिर दिसले जेथे लाईट व पार्किं ग ची व्यवस्था होती, बसण्यासाठी
पेव्हीग ब्लॉक टाकलेले होते त्यामुळे जेवणासाठी याच ठिकाणी थांबावे असा आग्रह झाला. गाडीतून उतरून सगळे फ्रे श
झाले, दर्शन घ्यावे म्हणून सहज मंदिराच्या पायऱ्या चढू न गेलो तर समोर हनुमानाची मूर्ती दिसली. मंदिर रात्रीमुळे बंद होते
म्हणून बाहेरून दर्शन घेतले. म्हणजे अजून सुद्धा मारुतीराया आम्हला साथ दयायला आमच्या बरोबर होता. असे का हे
आम्हाला पुढे अनुभवला येणार होते.
सगळे गोल करून जेवनासाठी बसले , पेपर वर सगळ्यांचे डबे उघडले तर आज जणू पंचपक्वान्नाचे जेवण होणार
असेच जाणवले. कारण सगळ्यांच्या डब्यात असलेले पदार्थ हे एकाहून सरस होते. बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, भरलेले
वांगे , हर प्रकारच्या चटण्या ( शेंगदाणा/खोबरे/खुरासणी) व वेगवेगळे लोणचे व लसणाचा ठेचा , चपाती, गोड पुऱ्या,दशमी
असा थाट होता. गप्पागोष्टी करताना, एकमेकांना आग्रह करून करून नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवण झाले. बोलबोल करता
सगळे डबे फस्त झाले. खरकटे व पेपर एकत्र करून साफसफाई करून थोडा आराम के ला, कारण येथून पुढे बराच मोठा
पल्ला आम्हाला एका रात्रीत गाठायचा होता. मग फार वेळ न करता नर्मदा मैयाचा जयघोष करत पुढील प्रवासाला रवाना
झालो.
पुढे वणी पार करून गाडी महाराष्ट्र राज्य सोडू न गुजरात राज्यात प्रवेश करती झाली. गाडी चालवायला विनय राम
होता मी पुढे बसलो होते त्याच्यासोवत , मागे सगळे पोटात भर पडल्याने पेंगायला लागले होते. टोल नाका पार करून
सापुतारा घाटाच्या सुरवातीला आलो. वेडीवाकडी वळणे न तीव्र उतार याने सगळ्यांची झोपच उडाली. ३० ते ३५ किमीचा
हा घाट अतिशय तीव्र वळणे असलेला व एके री रस्ता असलेला होता. बऱ्याचदा रामला गाडी हळू चालव असे बजावावे
लागायचे . कारण मीच पुढे त्याच्या शेजारी असल्याने माझा जीव हा गळ्याजवळ यायचा. समोरून जर एखादा मोठा ट्रक
आला तर त्याच्या लाईट च्या प्रकाशात काही वेळ दिपून जायला व्हायचे तसेच रस्ता छोटा असल्याने काही ठिकाणी थांबून
त्यांना जाण्यासाठी जागा करून द्यावी लागत होती. बर्याच ठिकाणी चढावर काही ओव्हरलोड ट्रक्स हे नादुरुस्त झाल्याने
तसेच रस्त्यात उभे होते. घाट चढताना त्या गाड्यांचा अक्षरशः कस लागत होते. एकवेळ घाट चढणे सोपे असते पण घाट
उतरताना फार काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. मजल दरमजल करत आम्ही एकदाचे घाट उतरून एका ढाब्यावर चहा
घेण्यासाठी रात्री १ ला थांबलो. रात्र असल्याने घाटातील निसर्ग सौंदर्य हे काही आम्हाला न्याहाळता आले नाही म्हणून
परतीचा प्रवास हा आपण सकाळच्या वेळेस करू असे ठरले. येथे कु टे साहेबांना चहा बरोबर क्रिमरोल व बिस्किट खाण्याची
लहर आली. भरपेट जेवल्यानंतर परत हे म्हणजे पोटावर अन्याय के ल्यासारखेच होते, पण पाटलांचा आग्रह मोडता आला
नाही. वेळ फार झाल्याने व अजून २०० ते २५० कीमी प्रवास बाकी असल्याने आम्ही बैठक आटोपती घेऊन निघालो.
आता प्रदीप गाडी चालवायला बसला. गुजरात चे रस्ते हे खरोखरच अतिशय छान व चागल्या स्थितीत होते त्यामुळे पुढील
प्रवास जलद चालू झाला.
व्यारा गाव सोडल्यावर एका पेट्रोल पंपावर फ्रे श होण्यासाठी रात्री २:३० ते ३ वा थांबलो. गाडीत मी प्रदीप व राम
असे तिघेच जण जागे होतो. प्रदीपने तोंडावर पाणी मारून आलेली मरगळ झटकली व पुढील प्रवासाला सुरवात झाली.
तिघेजण गप्पागोष्टी करत चाललो होतो, अचानक राम ओरडला कि रस्त्यावर एक बाई आपल्या गाडीला हात करत होती तू
का नाही थांबलास ? आम्ही दोघेजण म्हणालो कि कु ठे कोण बाई आहे, आम्हाला तर काहीच नाही दिसले. तो सांगू लागला
कि रस्त्याच्या कडेला एक गुलाबी साडीतील बाई के स मोकळे सोडू न आपल्याला लिफ्ट मागत होती. तुम्ही पहिले नाही का
ते. गाडी फारच स्पीडने जात असल्याने मागे वळून सुद्धा काहीच दिसले नाही. आम्ही दोघे कु णीच बाई नव्हती यावर तर राम
ती बाई होतीच यावर ठाम होता. कारण राम सोडता कु णालाच ती दिसली नव्हती. हा रस्ता आम्हासाठी नवीनच होता
,तसेच काही जागा या कधी कधी खराब असतात , मनातल्या मनात घाबरलो होतो कि आपण तर परिक्रमेला निघालो आणि
हे कु ठले विघ्न समोर आले. पण आमच्या बरोबर हनुमानजी होते. कारण ते संगमनेर पासून कु ठल्याना कु ठल्या रुपात ते
आम्हाला सांगत होते कि मी तुमच्या साथीला आहे. भूतपिशाच्य निकट नाही आवे महावीर जब नाम सुनाबे. हेच जणू सांगत
होते. तसेच नर्मदा मैया सुद्धा आपल्या लेकराची काळजी घेत असते , तुम्हाला माझ्याकडे सुखरूप आणायची जबाबदारीपण
माझीच आहे. हे पण आम्हाला जाणवत होते. असो पण त्याही प्रसंगातून आम्ही सहीसलामत पार पडलो. आजही हा प्रसंग
आठवताना अंगावर रोमांच उभे राहतात. पुढे आता आम्ही गरुडेश्वर ला मुक्कामाला जाणार होतो. ............
क्रमशः

|| प्रकरण ४ ||
गुजरात मधील पहिला मुक्काम श्री क्षेत्र गरुडेश्वर
परीक्रमेची तयारी करताना हातात असलेला एक एक दिवस व असलेला दिवसभराचा वेळ व मुक्काम याचे आम्ही बारीक
नियोजन के ले होते. प्रवासाचे आंतर हे रातभर प्रवास करून पहाटे पहाटे गरुडेश्वर ला मुक्कामाला जायचे ठरले , कारण
नर्मदा परिक्रमा हे पुस्तक वाचताना गरुडेश्वर येथे परिक्रमावासी हे आपला बिछायत लावतात ( मुक्काम करतात ) हे वाचनात
आले होते, येथे श्री दत्तात्रयांचे व टेंभे स्वामींचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी परीक्रमावासिंसाठी संस्थानने प्रशस्त
ईमारती बांधल्या आहे त्यामुळे आपली मुक्काकाची चांगली सोय होईल . तसेच हे ठिकाण नर्मदा मैयाच्या किनारी वसलेले
आहे. त्यामुळे सकाळीच दिवसाची सुरवात मैयाच्या दर्शनाने व स्नानाने होईल या उद्देशाने इथेच थांबावे असे ठरले होते,
गुगल map लावून मार्गक्रमण चालू होते, गरुडेश्वर ला पोहचायला पहाटे ५ वाजले. map नुसार गरुडेश्वर धर्मशाळा
शोधताना थोडी गडबड झाली मग पायीच संस्थानच्या कार्यालयात आलो तर ते बंद होते, बाहेर चौकशी के ली असता
कार्यालय हे ९ नंतर उघडेल असे समजले शिवाय या वेळेस पहाटे मुक्कामास असलेले परिक्रमावासी हे नर्मदा स्नान करून
पुढील परीक्रमेसाठी रवाना होताना दिसले. कु टे साहेबांनी आसपास कु ठे हॉटेलात सोय होते का हे पाहण्यास गेलो ते
मालकाने एक दोन तासांचे दोन रूमचे भाडे ४००० /- सांगितले, आम्ही लगेच माघारी निघालो, मग परत येताना
आजूबाजूला असलेल्या मंदिरात काही जागा भेटते का हे पाहत परत आलो, मात्र येताना एका मंदिरातील सभागृहात मोकळी
जागा असलेली दिसती. संस्थान कार्यालयाच्या इमारतीत प्रातविधी ची सोय चांगली होती, तेथेच सर्व कर्म उरकू न थोडा वेळ
अंग टाकावे म्हणून एक मंदिरातील समोरील भागात आलो. तिथे अगोदरच दोन व्यक्ती झोपलेले होते , म्हणून उपलब्ध
जागेत सर्वजण अंग चोरून पाठ टेकवली . झोप तर येत न्हवती पहाट होत होती आजूबाजूला वर्दळ चालू झाली होती,
तितक्यात एक पुजारी मंदिर खुले करायला आले, त्यांनी मंदिराचे दार उघडले तर आतमध्ये नर्मदा मैयाचे च मंदिर होते,
म्हणजेच मैया अजूनही आमच्या साथीने वाटचाल करत होती. अंगातील आळस झटकल्यावर समोर झोपलेली व्यक्ती सुद्धा
जागी झाली , सहज चौकशी करता समजले कि हे बाबा आता चौथी मोठी नर्मदा परिक्रमा करत होते. एका परिक्रमेला त्यांना
३ ते ४ वर्ष लागत होते त्याप्रमाणे मागील १० ते १२ वर्षापासून ते मैयाच्या सानिध्यात होते, त्यांच्याकडे असलेले
सामानाकडे सहज नजर टाकली तर फक्त एका पिशवीत २-३ पांढरे कपडे, अंथरूण पांघरूण आणि एक ताट-वाटी इतके च
समान होते, त्यांच्याशी सहज संवाद साधला असता त्यांनी सांगितलेले जीवनाचे सत्य हे खरोखरच त्यांचे सन्यस्त जीवन
आमच्यासमोर खुले करत होते. मैया प्रती त्यांची भक्ती व विश्वास हाच दिसत होता . नर्मदे हर करून मग आम्ही सर्व मैया
कडे स्नानासाठी निघालो, रम्य सकाळ, गरुडेश्वर मंदिरात लावलेले भक्तिगीते यांनी वातावरणात एक वेगळाच भाव तयार
झाला होता. मंदिरापासून १०० ते १५० पायऱ्या खाली उतरून मैयाच्या पात्राकडे जावे लागते, येथे एक मोठी साधारणतः
१०० फु ट सिमेंटची भिंत घालून मैयाचा प्रवाह अडवला गेला होता, त्या भिंतीवरून वा बाजूने पाणी नदी पात्रात पडत होते.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने बरेच पात्र हे कोरडे होते व पाणी हे बंधाऱ्याच्या पायथ्याच्या होते, पात्रात मोठाले दगडगोटे होते
हे अतिशय गुळगुळीत व निसरडे होते, एकमेकांना सांभाळत आधार देत आम्ही एकदाचे मैया जवळ पोहोचलो. मैयाच्या
पाण्यात बरेच मासे उड्या मारत होते. पाण्यातील दगडावर शेवाळ आलेले होते त्यामुळे दगड हे अतिशय निसरडे होते,
फारच काळजीपूर्वक पाण्यात उतरावे लागणार होते. मैया ची पहिलीच भेट याने अंगावर रोमांच येत होते, नर्मदे हर म्हणत
मैयाच्या कु शीत शिरलो. पाणी अंगावर पडताना जणू मैयाच आपल्या डोक्यावरून हात फिरवत आहे असाच अनुभव होत
होता. बऱ्याच दिवसांनी सूर्योदयापूर्वी जागे झाल्याने मैयाच्या पात्रातून सूर्यनारायणाला अर्घ्य देण्याचा योग आला. पाण्यात
असणारे मासे हे ठिकठिकाणी चावा घेत होते, त्यातून चांगले अक्युपंचर होत होते. पाण्यातून बाहेर यावे वाटत न्हवते परंतु
पुढील कार्यक्रमपत्रिका निश्चित होती त्यामुळे वेळेचे बंधन होते, मग सर्वांनी आटोपते घेतले, बाजूला एक भगिनी अंघोळ
करून मैयाची पूजा करून माश्यांना काहीतरी खायला टाकू न मैयाला एक मोठ्या हंडयात घेऊन सराईतपणे मोठाले
दगडधोंडे तुडवत निघून सुद्धा गेली आम्ही मात्र या दगडांवर पाय कु ठे ठेवायचा हेच शोधत होतो, नदीतून सहज वरती
गरुडेश्वर मंदिराकडे नजर गेली , डोळ्यांचे पारणे फे डतील अशाप्रकारे याठिकाणी घाटाची रचना के लेली दिसली . १०० एक
फु ट खालून वरती ज्याण्यासाठी नागमोडी वळणे असलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या एकमेकान विरुद्ध दिशेने एकमेकांत
जोडलेल्या दिसल्या. आखीव रेखीव असे हे दगडी बांधकाम होते. खाली उतरताना अगदी आरामात आलो होतो पण वरती
जाताना चांगलीच दमछाक होत होती.
एकदाचे वरती आलो व मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. मंदिर हे अतिशय सुंदर आहे. मंदिरात भगवान दत्तात्रय व
स्वामी वासुदेवनंद सरस्वती यांची मूर्ती आहे. मुर्त्या या अतिशय रेखीव व संगमरवरी आहेत. तसेच गरुडेश्वर महादेव हे
मंदिर आहे. स्वामी वासुदेवनंद सरस्वती यांना भगवान दत्तात्रयांचा अवतार मानतात. दत्तांची भारतभरात जी ठिकाणे आहेत
त्यापैकी हे एक आहे. असे म्हणतात कि भगवान दत्तात्रय हे याठिकाणी नर्मदेत स्नानासाठी येतात यामुळेच नर्मदा काठी
भगवान दत्तात्रयाच्या पादुकांचे पूजन के ले जाते. याठिकाण चे आरती झाल्यानंतर जे पाणी सर्वांच्या अंगावर शीपडले जाते
त्या पाण्याच्या स्पर्शाने चर्मरोग नाहीसे होतात असा भक्तांना अनुभव आहे. या मंदिरात जर सलग ७ आठवडे गुळ व शेंगदाणे
यांचा प्रसाद चढवला तर भगवान दत्तात्रय हे प्रसन्न होतात तसेच बेरोजगारांना रोजगार प्राप्त होतो अशी मान्यता आहे. स्वामी
वसुदेवनंद सरस्वती यांनी या ठिकाणाला आपले निवासस्थान बनवले होते. या ठिकाणी ते दत्तात्रयाची पूजा करत व त्यांना
गुळ व शेंगदाणे यांचा प्रसाद अर्पण करत मग हीच परंपरा पुढे रूढ झाली. गरुडेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग हे २०००
वर्ष जुने असून अशी मान्यता आहे कि याची स्थापना हि गरुडाने के ली आहे. दत्त संप्रदायातील हे एक महत्त्वाचे ठिकाण
मानले जाते.
सकाळीच प्रसन्न मनाने आम्ही मंदिरात प्रवेश के ला, आल्हाददायक भक्तिभावक पणे दर्शन घेतले. दत्तांच्या
मूर्तीवरील तेज पाहून खरोखर धन्य झाल्याची अनुभूती आली. मंदिरात आतील बाजूने गुरुचरीत्रातील एक एक अध्याय हे
चित्र रुपात कोरलेले आहे. मंदिर हे जुन्या बांधणीतील आहे पण अजून सुस्थितीत आहे. फारशी भक्तांची वर्दळ नसल्याने
थोडा वेळ मंदिरात मन एकाग्र करून बसलो असता फारच शांतता लाभली. पुढे गरुडेश्वर महादेवाचे दर्शन करून मग बाहेर
आलो. आता पोटातील कावळेपण जागे झाले होते. आमच्याकडे रात्रीच्या चटणी चपाती शिल्लक होती. ती फे कू न देण्यापेक्षा
सकाळी खाऊ यासाठी ठेवली होती. मग एका चहाच्या दुकानात जाऊन चहाची ओर्डर दिली, चहा तयार होईपर्यंत मग या
नाश्त्यावर सर्वांनी ताव मारला व चहा घेऊन मग आम्ही पुढील प्रवासाला तयार झालो.

प्रकरण - ५
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ( स्टॅच्यू ऑफ युनिटी )

परिक्रमा यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम ठरवताना सहज गुगल वर सर्च करत होतो तर तिलक वाडा येथे जाण्याचा मार्ग हा
राजपिपला वरून जातो मग येथून जगातील सर्वात उंच असा पुतळा हा आपल्या भारतात गुजरातमधील के वडिया येथे
सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे हे जाणवले. गरुडेश्वर हून १२ ते १५ कीमी अंतर पार करून के वडिया येथे जाता येते,
मग सकाळी लवकर जाऊन पुतळा पाहून पुढे नीलकं ठ महादेव येथे जाण्याचे ठरले होते. मात्र गरुडेश्वर हून निघायला थोडा
उशीर झाला. त्यापूर्वी संगमनेर हून निघाल्यावर गाडीमधुनच राम ने online पुतळा पाहण्याचे तिकीट बुक करून ठेवले
होते. येथे वेगवेगळे तिकीट दर असतात.
1. प्रवेश व फक्त पुतळा पायथ्या पर्यंत जाऊन पुतळा पाहणे व खाली असलेले वस्तू संग्रहालय पाहणे – १५०/- रु.
2. पुतळ्याच्या छातीपर्यंत लिफ्टने जाऊन ग्यालेरीमधून सभोवताली चे दृश्य न्याहाळणे व उंचीचा अनुभव घेणे . –
३८०/-रु
3. प्रवेश व लिफ्ट ने वरती जाणे तसेच रात्रीचा लाईट लेजर शो.( सगळीकडे एक्सप्रेस प्रवेश ) – १०३०/- रु.
इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाण आहे त्यांचे तिकीट वेगळे आहे.
आम्ही फक्त ३८०/- चे तिकीट काढले होते. गरुडेश्वर हून येऊन गाडी पार्किं ग करून प्रवेशद्वारा वर तिकीट स्कॅ न करून
आत येता येता १०:३० झाले. येथे आल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि येथील स्वच्छता , येथे ठिकठिकाणी
स्वच्छताकर्मी साफसफाई करत होते. पार्कि ग पासून पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी मोफत बस ची सोय होती. या गाड्यादेखील
इलेक्ट्रॉनिक होत्या कि जेणे कमीतकमी प्रदूषण होईल . सकाळी सकाळी पुतळा पाहणार्यांची फार गर्दी नसल्याने बस लगेच
निघाली. रस्त्याच्या मधोमध जागेत हिरवळ लावून आकर्षक लाईट चे विविध आकारातील खांब लावलेले होते कि जी रात्री
अतिशय नयनरम्य दिसत असतील . पार्किं ग पासून नर्मदा नदी काठाकाठाने साधारणता ५ कीमी अंतरावर हा पुतळा एक
मोठ्या चबुतऱ्यावर उभारलेला आहे. बस जशी जशी तिच्या गंतव्य ठिकाणावर पोहोचू लागली बसच्या खिडकीतून हा भव्य
पुतळा नजरेस पडायला सुरवात झाली.
भारतातील पहिले उपपंतप्रधान भारत रत्न तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना
स्टॅच्यू ऑफ युनिटी समर्पित आहे. ही जगातील सर्वात उंच मूर्ति आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना "भारताचा आयर्न मॅन"
म्हणूनही ओळखले जाते. ते स्वातंत्र्यसेनानी, वरिष्ठ नेते आणि भारतीय गणराज्य संस्थापक संस्थापकांपैकी एक होते.
भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा नदी वर असलेल्या साधू बेटावर हे स्मारक आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू
ऑफ युनिटीचं 31 ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. जगातील सर्वात मोठा पुतळा
राष्ट्राला समर्पित करण्यात आला. तब्बल 182 मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही तितकाच भव्य दिव्य
करण्यात आला.
या पुतळ्यासंबंधी काही रोचक गोष्टी आज जाणून घेऊयात
स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी सुमारे 1 लाख 69 हजार गावातील शेतकऱ्यांनी 135 मेट्रिक टन लोखंड दान के ले आहे. त्याचा
वापर करुन भव्य पुतळा उभारण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर इतकी आहे.
1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी या प्रतिमेचे डिझाईन तयार के ले आहे. त्यांनी 50 हून अधिक
स्मारकांची निर्मिती के ली आहे. राम सुतार हे मूळचे महाराष्ट्रातील धुळ्याचे आहेत.
चीनमधील स्प्रिंग टेंपल येथील बुद्धाची प्रतिमा तयार करण्यासाठी तब्बल 11 वर्ष लागली होती. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी
उभारण्यासाठी के वळ 33 महिन्यांचा कालावधी लागला आहे.
6.5 रेक्टर स्के लचा भूकं पातही स्टॅच्यू ऑफ युनिटी न डगमगता उभी राहू शकते. ताशी 180 किलोमीटरपर्यंत वाऱ्यांचा
वेग झेलू शकते.
नर्मदा नदीपासून 3.5 किलोमीटर दूर असलेल्या सरदार सरोवरावर स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आलं आहे.
पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 153 मीटर उंचीपर्यंत जाता येणार आहे. तर, स्टॅच्यू ऑफ युनिटी 12 किमी लांबीवरुन
नजरेस पडते.
एकाच वेळी 200 पर्यटक प्रतिमेच्या पायथ्याशी असलेल्या संग्रालयात जाऊ शकतात.
स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करण्यासाठी जवळपास 3 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये 18 हजार 500 टन स्टीलचा वापर करुन भव्य प्रतिमा तयार करण्यात आली आहे. 1 लाख 80
हजार टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये दोन लिफ्ट आहेत, ज्याद्वारे सरदार पटेलांच्या छातीपर्यंत पोहोचता येतं. तिथे गॅलरी आहे, तिथून
सरदार सरोवराचं विहंगम दृश्य पाहता येतं. सरदार सरोवरापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना पूल आणि बोटीची व्यवस्था
के ली जाणार आहे.
बस थांबा हून समोरच दिसणारा हा भव्य पुतळा म्हणजे एक आश्चर्यच आहे. इथून पुतळ्याचा पायथा हा २ कीमी आहे जेथे
पायी जावे लागते. ठिकठिकाणी सुरक्षा चेकिं ग के ल्यानंतर तुम्ही फक्त पाण्याची बाटली आत घेऊन जाऊ शकता. मोबाईल
घेऊन ज्यास परवानगी आहे. आत मध्ये गेल्यावर आत ठिकठिकाणी झाडी लावलेली आहे व उन्हापासून बचावासाठी शेड
उभारल्या आहे. तसेच जाण्यासाठी सरकते जिने सुद्धा आहे. आपण जसजसे पुतळ्याच्या पायथ्याकडे जातो तशी तशी
पुतळ्याची भव्यता जाणवण्यास सुरवात होते. शेवटी पायथ्यापासून वर पाहण्यासाठी आपल्याला आपली मन व पाठ पूर्णपणे
मागे घेऊन वर पाहावे लागते. यात डोक्यावरील टोपी निश्चितच खाली पडते. खरोखरच डोळ्यांचे पारणे फे डणारे हे दृश्य
आहे.
तीन मजली चबुतरा व त्यावर असलेला हा भव्य पुतळा पाहण्यासाठी कमीत कमी २ ते ३ तास लागतात. पहिल्या
मजल्यावर असलेल्या संग्रहालयात सरदार वल्लभभाई पटेल यांचा अर्धाकृ ती १० फु टी पुतळा आहे. तसेच एक मिनी थेटर
आहे त्यात हिंदी व इंग्रजी भाषेत सरदार सरोवर धरण व पुतळा चे बांधकाम याची ध्वनिचित्रफीत दाखवली जाते. तसेच
पुतळा तयार करतानाची चित्र प्रदर्शन एक दालन आहे. हे सर्व बघून आम्ही पुतळ्याच्या आत असलेल्या लिफ्ट मधून
पुतळ्याच्या छातीपर्यंत जाऊन ग्यालेरीमधून परिसराला न्याहाळणे साठी रांगेत उभे राहिलो. यथावकाश आम्ही लिफ्ट मध्ये
प्रवेश करते झालो. आत सरदार वल्लभभाई पटेल पुतळा – १८२ मी. , चीन मधील भगवान बुद्ध पुतळा – १२८ मी
अमेरिके तील स्टॅच्यू ऑफ ऑफ लिबर्टी – 93 मी अशी तुलना असलेली चित्र लावलेले होते. हे पाहून आमचे मन
अभिमानाने फु लले. वरती गेल्यावर आत मध्ये आतमधून चारीबाजूने ग्रील/ जाळी असलेली ग्यालेरी आहे. यातून आपणाला
समोर नर्मदेचे विशाल पात्र व समोर असलेले सरदार सरोवर हे धरण त्याची भव्य भिंत व त्यामागे पसरलेला अथांग जलाशय
याचे दर्शन होते. तर विरुद्ध बाजूने वाहत जाणारी नर्मदा मैया असा नयनरम्य देखावा दिसतो. किती आणि काय काय
डोळ्यात साठवावे असे झाले होते. तसेच आतील बाजूने डोकावले असता आत खोलवर असलेले पुतळ्याला आधार म्हणून
लावलेले अवजड असे लोखंडी गल्डर एकात एक गुंतवून मजबूत असे स्टकचर उभे के लेले दिसले. ते पाहून खरोखरच या
इंजिनिअर टेक्नॉलॉजी ला सलाम करावा वाटला. हा उभा पुतळा आहे त्यामुळे त्याचं डिजाइन बनवणं हे आव्हानात्मक होतं.
रुं दी आणि उंची प्रमाणबद्ध बनवण्यासाठी इंजिनिअर लोकांना डिजाइनवर खूप काम करावं लागलं. प्रकल्पासाठी 22,500

मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात येईल असा अंदाज होता. सिमेंटबरोबरच 18,500 मेट्रिक टनाच्या लोखंडी सळ्या वापरण्यात

येतील असाही अंदाज होता. जर सामान्य प्रकारचं सिमेंट वापरलं तर त्यामुळे लोखंड गंजण्याची शक्यता होती म्हणून M65 या

ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आलं. त्यामुळे लोखंड गंजत नाही. या पुतळ्याचं काम 2013 मध्ये सुरू झालं होतं आणि पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी या पुतळ्याचं अनावरण होणार आहे.. लार्सन अँड टुब्रो या कं पनीला या

पुतळ्याचा कं त्राट देण्यात आला होता .

सगळे दृश्य डोळ्यात व मोबाईल फोन मध्ये साठवल्यानंतर आम्ही परत खाली येण्यासाठी लिफ्टच्या रांगेत लागलो.

खलून एक मजला वर चढू न आम्ही पुतळ्याच्या पायापाशी आलो. येथून पुतळ्याची भव्यता अजून जास्त भासत होती. कारण

पुतळ्याच्या पायाच्या अंगठ्याची उंची सुध्या आमच्या उंचीच्या दुप्पट तिप्पट होती, पूर्ण पाऊल हे वीस तीस फु ट लांब व दहा-
बारा फु ट उंच होते. पुतळ्याच्या पायाला चक्कर मारायचा म्हणजे १०० एक फु ट चालत जावे लागते. हि सगळी भव्यता अनुभवून

आम्ही खाली आलो, उन्हाळा असल्याने वातावरणात फारच उष्णता होती. त्याच उन्हात मग आम्ही सरदार सरोवर धरण

पाहायला निघालो. तिथे जाण्यासाठी पुन्हा मोफत बसची सोय होती. बसमधून निघाल्यावर जाताना लागलेली ज्युरासिक पार्क ,

फ्लॉवर गार्डन, भुलभुलैय्या , सायकलिंग हे सर्व दिसले, परंतु आम्हाला फार वेळ नसल्याने पुढे के व्हातरी कु टुंबासोबत पुन्हा येऊ

असे म्हणून पुढे निघालो. धरणाच्या भिंती खाली बगीचा करून तसेच लोखंडी ग्रील लाऊन पाहण्याची व्यवस्था के ली होती.

उन्हाचा तडाखा फारच असल्याने लवकर आम्ही परत निघालो. पुन्हा बसने आम्ही पार्किं ग ला आलो. प्रसाधनगृहात फ्रे श

होऊन तोंडावर गार पाण्याचा शिपके मारल्यावर थोडे थंड वाटले. आता येथून पुढील ठिकाण हे नीलकं ठ महादेव/ स्वामी

नारायण मंदिर हे होते तिकडे आम्ही रवाना झालो .

क्रमशः................

|| प्रकरण ६ ||

नीलकं ठ महादेव/ स्वामी नारायण मंदिर व कु बेर भंडारी दर्शन -

सकाळपासून सरदार सरोवर पुतळा पाहून दुपारपर्यंत आम्ही पोईचा येथील नीलकं ठ महादेव व स्वामी नाराणय मंदिर
पाहण्यासाठी निघालो. परीक्रमेचे नियोजन करताना कु बेर भंडारी ला जाण्याचा मार्ग शोधात असताना सहज गुगल maps
वर स्वामी नारायण मंदिर चा परिसर व सजावट दिसली , अधिक माहिती शोधली असता येथे एक अतिशय सुंदर मंदिराचे
फोटो सापडले. मग तिलकवाडा कडे जाताना नीलकं ठ महादेव व कु बेर भंडारी करून रात्री मुक्कामाला तिलकवाडा ला जायचे
ठरले. एक अतुच्य परीकृ ती आमची वाट पाहत होती.
राजपिपला येथून एक छोटा रस्ता पोईचा ला पोहोचत होता, या मार्गावर इतके मोठे मंदिर असेल याची अजूनही
खात्री नव्हती , पण एकदाचे आम्ही तिकडे पोहोचलो असता एक भली मोठी कमान आमच्या स्वागताला सज्ज होती. आत
सुरक्षेच्या तपासण्या पार करून भव्य अशा पार्किं गची सोय होती, समोरच अतिशय सुंदर अशी गजान्तलक्ष्मी चे कमान आहे.
बारीकबारीक कोरीवकाम करून ती आकर्षक अशा रंगसंगतीत दोन्ही बाजूने हत्तीच्या सोंडेवर गजान्तलक्ष्मी स्वार आहे.
आतमध्ये प्रवेश करताना एकाबाजूला खाद्यपदार्थ चे विविध दालन होते. समोरच कु पन घेण्याची सोय व दरपत्र होते.
आईसक्रिम पासून ते साउथ इंडियन, चायनीज पदार्थ तसेच गुजराथी थाळी पासून ते पंजाबी जेवणाची सर्व सोय येथे माफक
दरात के लेली होती. सकाळपासून काहीच खाल्ले नसल्याने पहिले आम्ही तिकडेच वळलो . ४ पंजाबी व ३ गुजराथी थाळीची
कु पन घेऊन भटारखान्याच्या रांगेत उभे राहिलो . जेवणाची चव हि अतिशय उत्तम होती, गुजराथी जेवणात कढी भात,
फु लके व डांगर ची भाजी होती, तर पंजाबी जेवणात पनीर व छोले ची भाजी रोटी भात असा मेनू होता. सोबतच मसाला
ताक हि होतेच. अजूनही त्या जेवणाची नुसती आठवण आली तरी तोंडाला पाणी येते. भरपेट जेवणावर आडवा हात
मारल्यावर आता थोडी सुस्ती यायला लागली, कारण वातावरण हे फारच गरम होते. मग सर्वांनी आईसक्रिम खायचे ठरवले,
परंतु प्रथेप्रमाणे कु टे साहेबांना वेगळाच प्रयोग करायचा होता, त्यांनी मसाला सोडा घेतला व नंतर त्यावर पायनापल ज्युस
घेतला, मात्र इतरांनी ड्रायफु टची आईसक्रिम घेतली ती फक्त वीस रुपयात.

You might also like