You are on page 1of 3

शब्दयोग - पुष्प ३३

सं स्कृत "हु" ( जुहोतत ) म्हणजे अपपण करणे, बहाल करणे.

हुत म्हणजे अपपण केले ला. नुकतीच होळी होऊन गेली. ती हुताशनी म्हणजे तिले ला घास अग्नीद्वारे घेणारी.

आज हे आठवायचं कारण म्हणजे हुतात्मा हा शब्द. अपपण केले ला, हुत केले ला आत्मा म्हणजे हुतात्मा.

हा शब्द मराठी भाषेला स्वातं त्र्यवीर सावरकरांची िेणगी आहे. त्ांच्या िेशाला वातहले ल्या जीवनपुष्पासारखीच.

अठराशे सत्तावन्नच्या बं डानं तर पं चवीस वषाांनी त्ांचा जन्म. ते वयात येईपयांत नेमस्त(मवाळ) आणण जहाल असे िोन पं थ आधीच्या
तपढीने पाडले होते. न्यायमूती रानडे, आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले हे नेमस्त तर लो. तिळक हे जहाल पं थाचे अध्वयूप. हे िोन उघड
गि. यापेक्षा ततसरा छु पा गि क्ांततकारकांचा. णमळे ल ते हत्ार आणण जमतील ती माणसे घेऊन लढणारा. यशाची आशा नाही,
अपयशाची तिकीर नाही, आणण कीतीची अपेक्षा नाही. या मं डळींसाठी सावरकरांनी हुत्मात्मा शब्द योजला, हे तवशेष आहे. मं तिराच्या
पायात गाडले ल्या िगडांची कोणाला वातापही नसते. असे िगड आनन्दाने होणारी ही क्ांततकारक मं डळी. पण पायातल्या िगडांचीसुद्धा
मं तिराला गरज असते. ती गरज सावरकरांसारख्या मं डळींनी भरून काढली हे त्ांचं ऋण.

मृत्ूला हसत सामोरे जाणाऱ्या अशा आत्मसमपपणाला उिात्ततेचा स्पशप नकळतच होतो. सावरकरांचं हे महत्व की या समपपणाला त्ांनी
एक तात्वत्वक अणधष्ठान णमळवून तिलं . हे याआधी झालं नव्हतं . सावरकरांचं आणण समाजाचं भाग्य असं की हौतात्म्याच्या वािे वर
तनघाले ले सावरकर अंिमानातूनही परत आले . त्ानं तर बरीच वषे स्थानबद्ध होऊन मोकळे झाले . तेव्हा पन्नाशीतसुद्धा त्ांच्या हृियातला
अंगार धगधगीतच होता. पण त्ांच्या तवचारांचा आवाका क्ांतीपुरताच थांबून रातहला नाही. समाजाचे अत्वस्तत्व, त्ाची प्रगती, भाषेची
शुद्धता, जाततभेि तनमूपलन,समतेचा पुरस्कार, आंधळ्या धमपश्रद्धेवर आघात, यं त्रयुगाचं स्वागत असे अनेक उन्मेष त्ांना णमळाले .

तसं त्ांचं जीवन वािळी आणण वािग्रस्त. अंिमानच्या आधीचं आयुष्य वािळी. तर राजकारण प्रवेशानं तरचं समकालीन नेत्ांबरोबर
झाले ल्या सं घषापमुळे वािग्रस्त. स्वातं त्र्य चळवळ ऐन भरात असताना सावरकरांना मात्र परकी सरकारशी िोन हात करायचं सोडू न
िुिैवाने, गांधीजींच्या तवरुद्ध उभं राहायला लागलं . गांधी तकंवा सावरकर - कोणाची भूणमका स्वीकारावी हा ज्याच्या त्ाच्या रुचीचा
आणण प्रकृतीचा प्रश्न आहे. िोघांचंही काम आणण श्रेय वािातीत आहे. ते या मतभेिाने यत्वकंणचतही कमी होत नाही.

सावरकर राजकारणात यायच्या आधी कााँग्रेसची साठ वषाांची तपश्चयाप णसद्ध होती. ती खऱ्या अथापनं प्रातततनणधक सं स्था होती. मुत्विम
लीगचा ततला तवरोध होता आणण या तवरोधाला तितिशांचा छु पा पातठंबा होता. कााँग्रेसचं नेतृत्व गांधी करत होते. "सत् आणण अतहंसा"
ही स्वराज्यापेक्षाही मोठी आणण केवळ आध्यात्वत्मक मागापनेच हाती लागू शकतील अशी तत्त्वं त्ांनी आपल्या जीवनाचा आधार म्हणून
स्वीकारली होती. त्ा तत्वांना बाध न येईल अशा बेतानेच ते आपली चळवळ चालवत होते. एकीकडे सवपसमावेशक कााँग्रेस आणण
िुसरीकडे मुत्विम लीग अशा त्वस्थतीत तहंिू समाजाला वाली कोण? ह्या प्रश्नाला तसं उत्तर नव्हतं . तहंिू समाजाची रचना. लोकांचं
औिासीन्य. जातीभेिाच्या णभंती. प्रांत आणण भाषांचे भेि. ही सगळी खूप जुनी गुं तागुं त. या ततसऱ्या पं थाचं नेतृत्व सावरकरांनाच
घ्यावं लागलं .

िरक एवढाच की क्ांततकारकांचा पं थ तितिशांच्या तवरोधात लढला. तर तहंिू एकीकरणाचा पं थ स्वकीयांशी. केवळ िेश स्वतं त्र झाला
म्हणजे भूमी स्वतं त्र झाली असं नव्हे, आपल्या समाजावर इतरही काही आक्मणे होत आहेत हे सावरकरांना जाणवलं . आपल्या
उज्ज्वल सं स्कृतीचा वारसा जपण्यासाठी तहंिू समाज जर ताठपणे उभा राहणार नसेल, तर केवळ आपल्या जणमनीच्या तुकड्यातून
इंग्रज तनघून जाण्याला काहीही अथप नाही, असं समजून त्ांनी तहंिज
ु नजागृतीचं णशंग िुंकलं . तसा गांधीजी आणण सावरकर िोघांचाही
आिशप श्रीराम. गांधीजींचा राम सत्वचनी आणण प्रजातहततत्पर. सावरकरांचा राम रावण-वध आणण असुरांचं तनिापलन करणारा. हे
िोघांच्या तवचारातलं अंतर कधीच भरून येऊ शकलं नाही.
िेशाचं , तहंिू समाजाचं रक्षण कसं होईल ही सावरकरांची णचंता. आपली सेना समथप हवी हा त्ांचा आग्रह. गं मत अशी की "सैन्यात
णशरा" या त्ांच्या आवाहनाला प्रततसाि िेऊन िुसऱ्या महायुद्धात तितिश सैन्यात भरती झाले लं कोणीही पुढे सुभाषबाबूं च्या मितीला
गेलं नाही. इतपतच काय ती त्ा आग्रहाची िलश्रुती.

गांधीजी आणण सावरकरांच्या जनमानसातील प्रततमा िार वेगळ्या घडत गेल्या. सावरकर राजकारणात आले ते गांधीयुगात. तुलना
ही होणारच. गांधीजींची प्रततमा ही राजकारणाच्या धकाधकीत पडले ला एक सं त अशी. तहंिू मनाला सं तत्वाचा एक मोह आहे आणण
गांधीजींच्या अमाप लोकतप्रयतेचे रहस्य त्ातच आहे. या आतवष्कारामुळे गांधीजींना जगात मान्यता णमळाली. सं तांच्या मानाने वीराला
णमळणारी मान्यता तशी मयापतितच असते. पण गांधीजींचं आवाहन केवळ भारतातील नव्हे तर परिेशातील श्रेष्ठ तवचारवं तांपयांत कसं
पोचतं याचा शोध घ्यावा असं मात्र सावरकरांच्या मनात कधी आलं नाही. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या, त्वियांच्या हातात
गांधीजींनी तिले लं अतहंसेचं प्रभावी हत्ार का आणण कसं काम करतं याचा शोध कधी घ्यावासा त्ांना काही वािला नाही. मतभेि
असला तरी िुसरं मत समजून घेता येतं. नेहरू पक्के आधुतनक आणण तवज्ञानवािी. गांधीजींचं अध्यात्म त्ांना मोह घालू शकत नसे.
पण त्ांच्या प्रभावी नेतृत्वाबद्दल त्ांना आिर होता.

सावरकरांचं मात्र तसं नव्हतं . तिव्य आणण िाहक, आक्मक आणण आवेशपूणप, पौरुष आणण पराक्माच्या मागापने आलं तरच काय ते
त्ांना भावलं . िू रवर नजर ठे वून शांतपणे चालणारी काम त्ांच्या गणतीत नव्हती. प्रकाश एकिा काय तो कडकडणाऱ्या तवजेचाच !
तनरांजनं काय, तेवतात आपली ! ती कोण तहशेबात घेतो?

हरेक श्रेष्ठ व्यक्तीच्या आकलनाला शेविी मयापिा पडतातच, त्ा अशा! िुिपम्य आत्मतवश्वास सं किाच्या काळात शोभतो. पण
आत्मतवश्वास आणण अहंकार यातली सीमारे षा िार सूक्ष्म असते. अहंकार एकसारखा तिसत रातहला तर अनुयायी हळू हळू िू र जातात.
तेजाने भारली गेलेली मने कायम भारले ली राहत नाहीत. ते भारले पण ओसरल्यानं तर माणसे बांधून ठे वण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी
लागतात. त्ासाठी त्ांची सुख-िुुः खं समजणारं एक अंतुः करण असावं लागतं . "वज्राितप कठोराणण, मृिूतन कुसुमाितप" पैकी
सावरकर वज्रापेक्षा कठोर होतेच. पण िुलांपेक्षा मृिू नक्कीच नाही. पेिले ली काही मनं एकत्र आणणं वेगळं आणण हजारो सामान्य
माणसांना एका सूत्रात बांधणं वेगळं . या प्रकारचा लोकसं ग्रह सावरकरांना काही करता आला नाही. त्ा बाबतीत तिळक आणण गांधीच
यशस्वी ठरले .

सावरकर ज्वलज्जहाल िेशभक्त होते, पण माणसा-माणसामध्ये जो एक णजव्हाळा असतो आणण हवा, तसा त्ांच्याकडे होता का ही
मोठीच शं का आहे. जवळच्या माणसांशी त्ांचं वागणं पाहता तसं नक्कीच वाित नाही. मोठे भाऊ बाबाराव यांना सांगलीत िैन्यावस्थेत
घालवायला लागले ले तिवस. सतीप्रमाणे कष्ट काढले ल्या पत्नीला तिले ली तुसडी वागणूक. ततच्या शेविच्या क्षणी पतीच्या साध्या
िशपनाची इच्छासुद्धा पूणप होऊ न िेणारा हा लोकोत्तर पुरुष सुसंस्कृतपणाच्या कसोिीवर तसा अपुरा आणण अभागीच. ज्या ज्या व्यक्ती
त्ांच्याकडे आकृष्ट झाल्या, त्ा त्ा बहुतेक साऱ्या एक िोन वषापत त्ांच्यापासून िू र तनघून गेल्या. ज्याच्या बाबतीत असे अनुभव
सतत येत राहतात त्ाला लोकसं ग्रह कसा साधता येईल? हा तवचार करून मन तवषण्ण होतं .

आपण नेते आहोत म्हणून जबाबिारीने वागणं वेगळं . आणण आपण नेते म्हणून आपले अनुयायी मात्र सगळे खालच्या पातळीवरचे
अशी भूणमका ठे वणं वेगळं . "माझा कान काय तो एक छत्रपती णशवाजी महाराजच धरू शकतात" असं वाक्य त्ांच्या नावावर सांतगतलं
जातं . कधीतरी जाहीर सभेत हे बोलणं वेगळं आणण रोजच्या व्यवहारात घरीिारी सगळीकडे तसं वागणं वेगळं . साधं प्रेम वागण्यात
नसेल तर िीन-िुबळ्यांतवषयी कणव कुठू न येणार? आणण खरंच, अशा प्रकारचा एकही प्रसं ग सावरकरांच्या चररत्रात शोधून सापडणार
नाही.

ते होते सेनानी, रणझं जार. गांधीजींची करुणा, व्यापकता, अध्यात्म तसं सावरकरांच्या तठकाणी तिसत नाही. अध्यात्म म्हणजे काय
ते उत्सुकतेने जाणून घेणं, आणण रोजच्या जीवनात त्ाचा अंगीकार करणे यात खूप िरक असतो. सावरकर तसे अध्यात्माच्या
अंगीकारापासून िू रच रातहले . त्ांना भारताचा प्रखर अणभमान असला तरी या िेशाच्या आध्यात्वत्मक सं स्कृतीचा स्पशप त्ांच्या
वैय्यत्वक्तक जीवनाला झाले ला कुठं तिसत नाही.
गांधीजींच्या राजकारणातील ममप ते पुरेसं ओळखू शकले नाहीत. तरी पण काही मतभेि बाजूला ठे वून कााँग्रेसच्या स्वातं त्र्यलढ्याला
पातठंबा द्यायला काय हरकत होती? तसं केलं असतं तर तकमान तहंिुमहासभेला स्वातं त्र्यलढ्यात सहभागी झाल्याचं श्रेय णमळालं
ु वाि म्हणजे कााँग्रेसतवरोध हे जे समीकरण रूढ झाले ते तसं झालं नसतं .
असते. तहंित्व

खरं सांगायचं तर राजकारण हे अध्यात्मशील लोकांचं कायपक्षेत्र नव्हे. आपला आणण परका हा िरक जाणणं , वेळ आणण प्रसं ग यावर
बारीक लक्ष ठे वणं . ते करताना कोणतीही उिात्त तत्त्वं आड येऊ न िेणं-- हे सगळं जो जाणतो, जगात सुष्ट आहेत तसेच िुष्टही आहेत
हे ओळखतो तोच राजकारणातील प्रश्न यशस्वीपणे हाताळू शकतो. तसं पाहता सावरकर आणण गांधीजी, िोघांनाही यश लाभलं नाही.
आणण िोघं ही हे ओळखून होते. त्ाकररता व्यणथत होते. गांधीजी णजनांना भेिायला गेले. अगिी रवींद्रनाथ ठाकूरांना सुद्धा भेिायला
गेले. पण सावरकरांना काही भेिायला आले नाहीत. आणण गांधीजींचा प्रभाव एवढा मोठा होता की त्ांनी सावरकरांकडे िुलपक्ष केलं
म्हणून पूणप समाजानेही सावरकरांकडे िुलपक्ष केलं .

अखेर सावरकरांचा पराभव ते ज्या समाजासाठी झगडत होते त्ानेच केला. ते क्ांततकारक असताना एकिे होते तसेच राजकीय
व्यासपीठावरसुद्धा एकिे च रातहले . ते तहंिू समाजासाठी झगडत होते. पण तुिीर िुिीर, िाररद्र्याने तपचले ल्या, जातीभेिाने ग्रासले ल्या,
शतकानुशतकांच्या पराभवाचं ओझं डोक्यावर घेऊन लिपित उभा असले ल्या तहंिू समाजाला त्ाचा गं धिेखील नव्हता. असा समाज
जागा करणं , त्ाच्या ठायी अत्वितेचं भान उत्पन्न करणं हे सोपं काम नव्हतं . ही अत्विता कोणत्ा प्रकारची असावी याबद्दलही वाि
होता. अशा वेळी त्ांचा एकाकी आवाज घुमला.

त्ांच्या तवचारात कुठे ही भोंगळपणा नाही. रोकडं भान ठे वून मांडले ले तवचार आहेत. सद्गणांचा अततरेक हा अत्वस्तत्वाला घातक असतो
अशी वारंवार बजावणी आहे. आपला समाज ताठपणे उभा राहावा या एकाच आकांक्षेने झपािले ला हा समथप पुरुष एकशेचाळीस
वषाांपूवी जन्माला आला. णजवं तपणी काही त्ांच्या डोईवर यशाचा मुकुि चढला नाही. पण भतवष्य मात्र श्रेय पिरी नक्की िाकील.

तेही काही गैर नाही. जो हुतात्मा असतो त्ाला णजवं तपणी काही यश लाभत नाही. सावरकर कसे बरं अपवाि ठरतील?

तव. रा. करंिीकर यांच्या सावरकरावरील िीघप ले खाचा मुक्त-सं क्षेप. मूळ ले ख अत्ं त वाचनीय, पन्नास पानी आहे. आपणापयांत
पोचण्यासाठी तीन पानांत तेराशे शब्दात बसवला आहे.

सं क्षेपकार - रवींद्र गोडसे भ्रमणध्वनी 7411001562 ravigodase@gmail.com

You might also like