You are on page 1of 2

सर्वांना माझा विन्म्र नमस्कार, MMMF, MMCCT & MSU ची प्रतिनिधी म्हणून, मी Trishnee Ramma,

L’Esperance Q.Militaire पासून, गणेश चतुर्थीच्या निमिताने आज मी आरती व झाकडी, यावर बोलणार आहे .

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|


नुरवी; पुरवी प्रेम, कृ पा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कं ठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

श्री समर्थ रामदास यांनी रचलेली ही प्रसिद्ध आरती, एक मराठी भक्तीपरंपरागत गाणे आहे जी बाप्पच्या
ताकदाचा जयजयकार करते. सुख, प्रेम, व कृ पा देणारे सुखदायक आणि दु:ख व अडथळे दूर करणारे विघ्नहर्ता,
यांना नमस्कार करण्यासाठी मुख्त: गणेश चतुर्थीच्या वेळी ही आरती आम्ही गातो.

गणेश चतुर्थीच्या उपवासात, नागपंचमीपासून, जवळजवळ प्रत्येक मराठी घरांमध्ये व मंदिरात, दररोज बाप्पाची
आरती के ली जाते. आम्ही बाप्पाच्या आगमानापर्यंत नवीन आरती गाण्यांसह अधिक भक्ती, समर्पण आणि प्रेम
दाखवतो.

त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले
आहे. ‘दर्शनमात्रे’ च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’ च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही
जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘आम्हाला
अधिक आवश्यक आहे’ म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रू पक्षातल्या किं वा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी
परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार?

पण इथे मला थोडा वेगळा अर्थ लावावयास वाटते. मनोकामना, या शब्दाचे विघटन करावे वाटते. मन पूर्ण
करतो (म्हणजे या देहीचे त्या देही घातले, किं वा माझे मन तुझे झाले, एकरूपता, किं वा ध्यानात गण-ईश, असा
अर्थ लावूयात) नि कामना ही. इथे तो ईश आहे, गुणाधीश जो ईश सर्व गुणांचा आहे, म्हणून विघटनात्मक,
विनाशात्मक, कामना तो कसा पूर्ण करणार. विद्या-अधिपती म्हणतो, मग तो फक्त सकारात्मक वृत्तीचे
जोपासना करेन, सत्याची बाजू घेईन, मित्र-शत्रू हे शब्द आपल्यासाठी, तो तर फक्त भक्तालाच जाणतो.

तसेच, जल्लोषाने लाडक्या देव बाप्पाला जास्त प्रसन्न करण्यासाठी, आम्ही आमची पारंपारिक झाकडी नृत्य
कशी विसरणार?

झाकडी नृत्याचा उगम नेमका के व्हा झाला, कोणत्या काळात झाला याबद्दल खात्रीशीररित्या सांगता येणार
नाही.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक
गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर के ला ही बाब कु णी नाकारणार नाही. सर्व जणांची मिरवणूक
करण्यासाठी वा सर्वांना एकत्र आणण्यासाठी, आमचे पुर्वज मनोरंजनासाठी एकत्र जमायचे आणि झांज,
ढोलकी, ताषा, चिमता, घुंगरू या वाद्यांच्या साथीवर आणि आकर्षक वेशभूषा: धोती, पगडी, नववारी काशती
यांबरोबर अशी बाप्पाची गाणी म्हणायचे, नृत्य करायचे.

त्यामुळे काही वर्षांपूर्वी मॉरिशसमधील झाकडी खूप उं चावत असल्याचे दिसून येते. खासकरून नवनवीन गाणी,
नवा भाव असलेले तरुण गणेश चतुर्थी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
महिन्यापूर्वीपासून तालीम सुरू होत आहे. बाप्पाचे स्वागत करण्यासाठी दररोज लहान मुले, तरुण, प्रौढ आणि
म्हातारे एकत्र येत आहेत. विसर्जन होईपर्यंत ते पूर्ण उत्साहाने व जल्लोषाने गातात व नाचतात.

0.54 न विसरता, झाकडी स्पर्धा घडतो, महाझाकडी वेगवेगळ्या मंदिराद्वारे आयोजित के ल्या जातात.
आम्हाला आमची मराठी संस्कृ ती आणि परंपरा खूपच आवडतात. आम्ही आमच्या पूर्वजांना मन:पूर्वक अभारी
आहोत. तसेच, यावर्षी पहिल्याच वेळी सर्व झाकडी गटांना एकत्र आणण्यासाठी झाकडी महोत्सवाचे आयोजन
करण्यात आले आहे. तर, गणेश चतुर्थीसाठी दुसरे काय चांगले असू शकते?

तर गणेश भक्तांना, मला अपेक्षा आहे की तुम्हाला ;’आरती व झाकडी’ वर जास्त महिती मिळाली. नमस्कार आणि धन्यवाद.

You might also like