You are on page 1of 37

पंचविधकषाय कल्पना

BY,
DR.MEGHA S.DOIJODE
(PG SCHOLAR,RSBK DEPARTMENT)

GUIDED BY,
DR.JYOTI B.GAVALI
(READER,RSBK DEPARTMENT)
पंचविधकषाय कल्पना
परिचय-
व्याधि नाशनार्थ रुग्ण शरीरावर प्रयुक्त करण्याकरिता निर्देशित औषधी द्रव्यांना पाच
पद्धतीच्या संस्कार प्रक्रीयांद्वारे विशिष्ट भेषज स्वरूप प्राप्त करून दिले जाते.
औषधीद्रव्यांच्या अशा ५ प्रकारच्या विशिष्ट मुलभूत स्वरूपांना पंचविधकषाय कल्पना
म्हणतात.
कषायाणां यथोक्त द्रव्याणां कल्पनुपयोगार्थं संस्कारणं कषायकल्पनम् |
-च.सू.४/३ चक्रपाणीटीका
क्वाथ
कल्क हिम

फांट
स्वरस

पंचविध कषाय कल्पना


कषाय परिभाषा
के शरीरे स्यति यंत्रणामिति कषाय |
क - काय- शरीर
षा - षोऽन्त कर्मणि– नाश करणे.
य- यंत्रणा,नियंत्रण
व्याधिग्रस्त शरीरामधील विकारकर भाव नष्ट करून दोष दुष्यांची साम्यावस्था
निर्माण करणारी औषधी यंत्रणा म्हणजे कषाय.
कषाय परिभाषा
कषाय = कष्+आय
कष् हिंसायाम

 मूळ द्रव्यांची हिंसा करून त्याचे स्वरूप नष्ट करून त्यास सेवन योग्य बनवत असल्याने.

कं ठस्य कषणात् प्रायो रोगांनां वापि कर्षणात् |


कषायशब्द: प्राधान्यात् सर्वयोगेषु कल्प्यते ||
(काश्यप संहिता खिल-३/२९)
- सेवांनानंतर ज्याची प्राय: अरुचीकर चव जाणवते, जे व्याधीचे
कर्षण करतात ते कषाय.
- कषाय – औषधी योगांकरिता.
कषाय परिभाषा
द्रव्यात् उदधृत्य सारभाग कषाय: | - (अ.ह्र.क. ६/७)
 औषधी द्रव्यांमधील प्रधान पूर्वक निष्कासीत वेगळा करण्यात येणारा सारभाग- कषाय
कल्पना
कल्पनमुपयोगार्थं प्रकल्पनं संस्करणमिति यावत् |
- च.सू.४/७
 औषधी द्रव्याच्या व्याधि चिकित्सार्थ रुग्ण शरीरावर उपयोग करण्याकरिता ज्या प्रक्रियेच्या
योगाने त्यांना सुयोग्य औषध स्वरूप प्राप्त करून दिले जाते अशा संस्कारात्मक प्रक्रिया –
कल्पना.
 पंचविध कषाय कल्पना = मौलिक कल्पना
कषाययोनय: पञ्चरसा लवणवर्जीता: |
(अ.हृ. कल्प-६/८)
 ५ कषाय योनि- मधुरकषाय
अम्लकषाय
कटु कषाय
तिक्तकषाय
कषायकषाय
 लवण रसाची कु ठलीही कल्पना करता येत नाही.
 वनस्पतीज द्रव्यांमध्ये लवण रस प्रधानरस स्वरुपात आढळत नाही,अनुरस स्वरुपात
असतो.
पंचविधकषाय कल्पना
 तेषां यथापूर्वं बलाधिक्यम् |
- (च.सू.४/८)
स्वरस
कल्क
क्वाथ
हिम
फांट
पंच-षड् -सप्तविध कल्पना
चरक अ.सं.क. अ.ह्र.क. सुश्रुत काश्यप
स्वरस निर्यास रस क्षीर चूर्ण
कल्क कल्क कल्क रस शीतकषायक
(हिम)
श्रृत निर्यूह श्रृत कल्क स्वरस
शीत शीत शीत श्रृत अभिषव
(आसव)
फाण्ट फाण्ट फाण्ट शीत फाण्ट
फाण्ट कल्क
क्वाथ
स्वरस
(EXPRESSED JUICE)
स्व+रस= स्वरस
आर्द्र व ताज्या औषधी वनस्पती मधील अंगभूत द्रव स्वरूपातील रस म्हणजे स्वरस होय.
कु टू न.वाटू न,पिळून
 पर्याय- रसभेद, अङ्गराग, विलेपन, निर्यास, सुरभि,
लोहित, रागवस्तु, क्रोधादि.
स्वरस
(EXPRESSED JUICE)

अहतात् तत्क्षणाकृ ष्टात् द्रव्यात् क्षुण्णात् समुद्धरेत् |


वस्त्रनिष्पीडितो य: स रस: स्वरस: उच्यते ||
(शा.स.म.ख.१-२ )

वीर्यवान, परिपुष्ट, शीतत्व- अग्नि, कृ मिकीटकादिंची बाधा न झालेले औषधी द्रव्य


नुकतेच तोडू न आणून,उखळ,मुसळांद्वारे सुसूक्ष्म कु टू न वाटू न घ्यावे. औषधी
द्रव्याचा मृदु,श्लक्ष्ण सूक्ष्मकल्क वस्त्रामध्ये ठेऊन पिळून घेतल्यानंतर जो रस
प्राप्त होतो तो स्वरस होय.
सो रस: स्वरस: प्रोक्तः | -च.सू.४
स्वरस: इति सद्यो रस: | -शा.स.म.ख.१/१
यंत्र निष्पिडितात द्रव्यात् रस: स्वरस: उच्यते | -च.सू.४/४

 औषधी द्रव्यांचा स्व अंगभूत रस म्हणजे स्वरस होय.


 नुकत्याच तोडू न आणलेल्या द्रव्याचा रस – स्वरस
 द्रव्याच्या यंत्राद्वारे काढलेल्या रसालाही स्वरस म्हणतात.

 स्वरस – सर्वाधिक गुरु,बलवान कल्पना म्हणून पंचविध कशी कल्पनेत प्रथम वर्णन.
स्वरस निर्माण पद्धती - ३
१) सामान्य पद्धती
२) बाष्पस्वेदन पद्धती
३) पुटपाक पद्धती

१) सामान्य पद्धती –


 ज्या दिवशी औषधी वनस्पती द्रव्य तोडू न आणले असेल त्याच दिवशी ते जलाद्वारे प्रक्षालित
करून, अतिशय सूक्ष्म वाटू न कु टू न वस्त्राद्वारे पिळून स्वरस काढावा.
 उदा-गुडू ची स्वरस+शर्क रा=वातजज्वर,रक्तप्रदर नाशक
तुलसीपत्र स्वरस+मध=श्वास,कास,प्रतिश्याय
२) बाष्प पद्धती –
- वर्णन- आ.यादवजी त्रिकमजी
 या पद्धतीद्वारे स्वरसनिर्माण करताना औषधी द्रव्यांच्या पत्रादींचे बाष्पाद्वारे किं चित स्वेदन करून
प्राप्त के ला जातो.
 विधी-
 मोठ्या पसरट पात्रात १/४ जल घ्यावे. या पात्राच्या मुखावर एक सुती,पातळ, स्वच्छ वस्त्र
बांधावे.
 या वस्त्रावर स्वरस निर्माणाचे औषधी द्रव्य पसरवून ठेवावे.
 यावर दुसरे एक पात्र / पिधान ठेवावे. या स्वेदन यंत्राला अग्निसंस्कार करावा.
 पत्रांचे स्वेदन झाले असता पत्र काढू न घ्यावीत.(पत्रांचा वर्ण बदलतो,ती मृदु होतात.)
 ती उष्ण असतानाच खल्व यंत्रात कु टू न-वाटू न-पिळून स्वरस प्राप्त करावा.
 उदा-१)वासापत्र स्वरस+मध-कफज विकार,रक्तपित्तहर
२)जम्बुपत्र स्वरस+मध-अतिसारघ्न.
३) पुटपाक पद्धती-
- कु टज,वासा,श्योनाक,बिल्वपत्र,दाडिम स्वरसपद्धतीने स्वरस काढला असता तो अत्यल्प मात्रेत निघतो.
 विपुल प्रमाणात स्वरस प्राप्त करण्यासाठी ह्या पद्धतीचा उपयोग.
*पुट- बंदिस्त करणे.
*पाक – पाचन करणे.

 यासाठी औषधीद्रव्यांच्या पत्रांना जलाद्वारे स्वच्छ प्रक्षालित करून घ्यावे-खल्वयंत्रात त्याचा कल्क
करून घ्यावा.हाताने गोळा तयार करून वट,जंबू,पिंपळ यापैकी कोणत्याही एका वृक्षाच्या पत्रांचे वेष्टन
करून त्यावर दोरा गुंडाळावा.
 त्यानंतर गोधूम/माष चुर्ण- लगद्याचा १ इंच/१ अंगुल जाडीचा लेप त्या गोलावर लावावा.
 नंतर आर्द्र मृत्तीके चा लेप लावावा.हा लेप किं चित सुकला असता उपलांच्या अग्नित पाचन कराव
े.लेपाच्या मृत्तीके चा वर्ण अंगाराप्रमाणे लाल झाल्यांनतर पुटाचे सुयोग्य पाचन झाले असे जाणून
त्यावरील मृत्तिका-गोधूम-सूत्र पत्रवेष्टन दूर करावे.
 आतील औषधी द्रव्यांचा कल्क वस्त्रात ठेऊन पिळून घ्यावा.
 उदा-बिल्वपत्र स्वरस+त्रिकटू =कामला, अर्श,त्रिदोषजशोथ नाशक
चूर्णापासून स्वरस
चरक-
द्रव्याचे चुर्ण- १ आढक (२५६ तोळे )
जल- १ आढक (२५६ तोळे )
- १ अहोरात्र ठेवावे,नंतर हाताने कु स्करून गाळून घ्यावे.
शारंगधर-
• १) द्रव्याचे चुर्ण- १ आढक (२५६ तोळे )
जल- २ आढक (५१२ तोळे )
• २) द्रव्याचे चुर्ण – १ भाग
जल- ८ पट
-मंदाग्नीवर पाचन – १/४ th शिल्लक ठेवावे. –स्वरासाभावी याचा वापर.
मात्रा-१/२ पल -२ तोळे – २४ml
१ पल- ४ तोळे – ४८ml -अनुकल्प द्वारा निर्मित

प्रक्षेप मात्रा-
मधु श्वेता गुडं क्षारान् जीरकं लवणं तथा |
घृतं तैलं च चुर्णादीन् कोलमात्रं रसे क्षिपेत् ||
(शा.म. १/६)
स्वरसाचे उपयोग-
 विविध व्याधि चिकीत्सेकारिता
 रसद्रव्यांच्या शोधन-मारणार्थ
 विविध संयुक्त औषधी कल्पांचे निर्माणार्थ
 स्नेह्मुर्च्छना व सिद्धस्नेहकल्पांच्या निर्माणार्थ
 आसवअरिष्ट कल्पांच्या निर्माणार्थ उपयुक्त
 व्रणधावन, नस्य, अवगाह,लेप,परिषेक,बस्ती इ. कर्मार्थ
कल्क
(BRUISED COARSELY POWDERED DRUGS OR PASTE)
पाटा,वरवंटा,दगड,शिला-पाषाण,दंत,खल्व यंत्रात औषधी द्रव्ये कु टू न वाटू न त्याची
सुसुक्ष्म लगदा तयार करणे म्हणजे कल्क.
पंचविध कषाय कल्पनेमधील दुसरी कल्पना.
स्वरासापेक्षा लघु,कल्कापेक्षा गुरु
आर्द्र आणि शुष्क अशा दोन्ही स्वरूपातील औषधी द्रव्य कल्क निर्माणार्थ वापरले
जातात.कल्कात औषधी द्रव्याचा सार व काष्ठ अंश दोन्ही स्थित असतात.
कल्क
(BRUISED COARSELY POWDERED DRUGS OR PASTE)
य: पिण्डो रसपिष्टानां कल्क: स परिकीर्तित: |
(च.सू. ४)

द्रव्यमार्द्रं शिलापिष्टं शुष्कं वा सजलं भवेत् |


(शा.सं.म. ५/१)
आर्द्र स्वरूपातील द्रव्य उपलब्ध नसेल तर औषधी द्रव्याच्या सूक्ष्म
वस्त्रगाळ चुर्णामध्ये ते चुर्ण पुर्णपणे ओलसर होईपर्यत त्यामध्ये
जल घालावे.खल्वयन्त्राद्वारे वाटू न त्याला मृदु, श्लक्ष्ण व सुसुक्ष्म
स्वरूप द्यावे हाच कल्क होय.
- इंदू,हेमाद्री- दन्ताद्वारे चर्वण करून त्याचे सूक्ष्मीकरण करणे म्हणजे कल्क.
पर्याय- प्रक्षेप, आवाप (शा.सं.म. ५/१)

प्रक्षेप- विविध द्रव स्वरूपी कल्पांसह कल्काची योजना के ली जाते.


आवाप-कल्काचा उपयोग जेंव्हा सिद्धतैल,सिद्धघृत,
स्नेहमूर्च्छना,अवलेह,गुटिका,संधानादी कल्प निर्मानार्थ
करण्यात येतो.

मात्रा- तत् मानं कर्ष सम्मितम् | (शा.सं.म. ५/१)


१ कर्ष- १ तोळा
प्रक्षेप मात्रा-
मधु, घृत, तैल- द्विगुण
सिता, गुड- सम
इतर द्रव- चतुर्गुण
उपयोग-
निंब कल्क- व्रण,कु ष्ठ,कृ मिघ्न
रसोन कल्क- वातविकार, विषमज्वर नाशक
अपामार्ग कल्क- रक्तातिसारनाशक
महानिंब कल्क- गृध्रसीहर
शुण्ठी कल्क- आमवात,विषमज्वरहर
कल्क अंतर्गत चुर्ण कल्पना
अत्यंत शुष्क चूर्ण- disintegrator machine मध्ये बारीक –सूक्ष्म वस्त्राने चाळून घ्यावीत.
प्रक्षेप मात्रा-
गुड-समभाग
शर्क रा,घृत- द्विगुण
इतर द्रव- चतुर्गूण
अनुपान- वातव्याधि -३ पलद्रवानुपान
पित्तव्याधी- २ पलद्रवानुपान
कफव्याधी- १ पलद्रवानुपान
मात्रा- तन्मात्रा कोलसम्मितम | (शा.सं.म. ६/१)

प्रक्षेप मात्रा-
गुड- समभाग
सिता, मधु, घृत- द्विगुण
इतर द्रव- चतुर्गुण
हिंग- अनुत्क्ले दकर मात्रेत

अनुपान मात्रा-
वात- ३ पल द्रवानुपान
पित्त- २ पल द्रवानुपान
कफ- १ पल द्रवानुपान
चूर्णात भावना द्रव्य-
द्रवेण यावता सम्यक् चूर्णं सर्वं प्लुतं भवेत् |

चूर्ण निर्मितीतील आधुनिक यंत्रे-


१) Chattu Machine
२) Disintigrator Machine
३) Pulverizator Machine
४) Grinding Machine

उदा; सितोपलादि चूर्ण, तालीसादी चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, लवणभास्कर चूर्ण


क्वाथ (श्रृत)
DECOCTION
पर्याय- श्रृत, कषाय, निर्यूह

पानीयं षोडशगुणं क्षुण्णे द्रव्यपले क्षिपेत् |


मृत्पात्रे क्वाथयेद् ग्राह्यमष्टमांशावशेषितम् ||
तज्जलं पाययेद्धीमान् कोष्णं मृद्वग्निसाधितम् |
( शा.सं.म.२/१ )
मृदु द्रव्य – ४ पट
मध्यम द्रव्य – ८ पट
कठीण द्रव्य – १६ पट
परंतु मृदु द्रव्य,-
४ तोळ्यापेक्षा कमी – १६ पट
५ ते १६ तोळे – ८ पट
१६ तोळ्यापेक्षा जास्त – ४ पट

क्वाथ मात्रा – मध्यमा मात्रा पलमाना प्रकीर्तिता |


(द्रव्यगुण विज्ञान उत्तरार्ध प्रथम )

उपयोग – अवगाहन, परिषेचन, आश्चोतन, व्रणप्रक्षालन,


घृत-तैलपाक, आसवअरिष्ट, अवलेह-रसक्रिया
निर्माणार्थ.
क्वाथात प्रक्षेप प्रमाण-
सिता- दोषानुसार – वात- चतुर्थांश
पित्त- अष्टमांश
कफ- षोडशांश

मधु- दोषानुसार – वात- षोडशांश


पित्त- अष्टमांश
कफ- चतुर्थांश

जीरक,गुग्गुळ,क्षार,लवण,शिलाजतु,हिंग,त्रिकटू – १ शाण
क्षीर,घृत,गुड,तैल,गोमूत्र- १ तोळा

उदा; पुनर्नवाष्टक क्वाथ, महारास्नादि क्वाथ


हिम (शीत)
COLD INFUSION
क्षुण्णं द्रव्यपलं सम्यकषड्भिर्नीरपलैः प्लुतम् |
निशोषितं हिम: स स्यात्तथा शीतकषायक: ||
(शा.सं.म. ४/१)
मात्रा- १ पल
शारंगधरानुसार- तन्मानं फाण्टवत्ज्ञेयं...|
अर्थात- २ पल

प्रक्षेप मात्रा- सितामधुगुडादींस्तु क्वाथवत् प्रक्षिपेद्भिषक |


(द्रव्यगुणविज्ञान-श्री यादावजी)

उदा; धान्यक हिम, सारिवादी हिम


फाण्ट
क्षुण्णे द्रव्यपले सम्यग्जलमुष्णं विनिक्षिपेत् |
मृत्पात्रे कु डवोन्मानं ततस्तु स्रावयेत्पटात् ||
तस्य चूर्णद्रवः फाण्टस्तन्मानं द्विपलोन्मितम् |
सितामधुगुडादींश्च क्वाथवत्तत्र निक्षिपेत् ||
(शा.म. ३/२)

पर्याय- चूर्णद्रव

प्रक्षेप द्रव्य- सिता, मधु, गुडादि – क्वाथवत


द्रव्य प्रमाण- मृदु वीर्य- ४ तोळे
मध्य वीर्य- २ तोळे
तीक्ष्ण वीर्य- १ तोळे

मात्रा- ४-८ तोळे

उदा; पञ्चकोल फाण्ट, सुदर्शन फाण्ट


मौलिक कल्पना
द्रव्य आर्द्र- स्वरस,क्वाथ
वीर्याचा विचार के ला असता-
वीर्य- पार्थीवांश + - चुर्ण
पार्थीवांश,जलीयांश – कल्क
जलीयांश – स्वरस,क्वाथ
कटू ,सुगंधित द्रव्य- चुर्ण,हिम फांट
वीर्य तेजस,वायव्य अंशात्मक- चुर्ण,हिम फांट
तीक्ष्ण,उष्ण,दाहक-क्षीरपाक
निष्कर्ष
आयुर्वेद- त्रिसूत्रांवर आधारित- हेतु, लिंग, औषध
पैकी औषध अत्यंत महत्वाचे
कारण,
“स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च |”
या द्वि प्रयोजनपूर्तीकारिता औषधांचा मोठा वाटा
ही औषधे शरीर सात्म्यकर बनवण्यासाठी पंचविध कषाय कल्पनांचे अनन्यसाधारण महत्व
“संस्कारो हि गुणान्तराधानाम् |”
पंचविध कषाय कल्पना-
-संस्कार- गुणवृद्धी, कर्मवृद्धी, वीर्यवृद्धी, कालवृद्धी, सात्म्यवृद्धी

You might also like