You are on page 1of 2

ं ार-

अहक
साख्ं यांच्या सृष्ट्यत्ु पत्तीमधील एक अत्यंत महत्त्वाचे तत्त्व. प्रकृ तीत त्रिगणु ांची उलथापालथ होऊन सत्त्वगणु वरचढ
झाला की बद्ध ु ी किंवा महत् हे तत्त्व निर्माण होते. बद्ध ु ीनंतर उत्पन्न होणारे तत्त्व म्हणजे अहक ं ार. अध्यवसाय
म्हणजेच निश्चय करण्याचे कार्य बद्ध ु ीकडे असते. हा बद्ध ु ीने के लेला निश्चय ही वृत्ती आहे. ही वृत्ती ‘अहम’् शी
संबद्ध झाल्याशिवाय व्यक्त होऊच शकत नाही. म्हणनू बद्ध ु ीच्या अध्यवसायानंतरच अहक ं ार हे तत्त्व येते.
लोकमान्य टिळकांच्या मते, एकीभतू प्रकृ तीला भिन्नत्व आणण्यासाठी अहक ं ार हा प्रयोजक आहे.
सांख्यकारिके त म्हटल्याप्रमाणे-
‘अभिमानोऽहङ्कारस्तस्माद् द्विविधः प्रवर्तते सर्गः |
एकादशश्च गणस्तन्मात्रः पञ्चकस्यैव ||’
‘सात्विक एकादशकः प्रवर्तते वैकृतादहङ्कारात् |
भतू ादेस्तन्मात्रः स तामसस्तैजसादभु यम् ||’ (सा.ं का. २४ व २५)
-अहकं ार अर्थात अभिमान. दोन प्रकारचा सर्ग यापासनू प्रवर्तित होतो-
१. अकरा इद्रि ं याचं ा (मन, पाच ज्ञानेंद्रिये- चक्ष,ु जिह्वा, रसना, श्रोत्र आणि नेत्र, पाच कर्मेंद्रिये- वाक्, पाणि, पाद,
पायु आणि उपस्थ)
२. पचं तन्मात्राचं ा (शब्द, स्पर्श, रूप, रस, गधं ).
वस्ततु ः अहक ं ार हा एकच असतो परंतु; सत्त्वगणु ाची मात्रा अधिक असल्यास तो अकरा इद्रि ं यांनी यक्त
ु असणारा
सात्त्विक गण प्रवर्तित करतो. उलटपक्षी तामस गण असणाऱ्या पंच तन्मात्रांचे प्रवर्तन तमोगणु ाची मात्रा वाढल्यावर
होते. अतएव अहक ं ाराच्या सात्त्विक (वैकृत) व तामस (भतू ादि) अशा द्विविध प्रकारांतनू सोळा तत्त्वांनी यक्त ु
असा गण (अनक्र ु मे अकरा इद्रिं ये व पाच तन्मात्रा) प्रवर्तित होतो. तैजस अहक ं ार (रजोगणु ) हा चल असल्याने तो
सर्वत्र कारणीभतू होतो, किंबहुना, याच्याशिवाय ही निर्मिती संभवतच नाही.

संदर्भग्रंथ-
अ ) मळ ू ग्रंथ-
1) Jha, Ganganath, Trans., Vachaspatimisra’s Comentary on the Sankhya-karika, Pune,
1965.
2) Henry Thomas Colebrooke also the Gauḍapāda-bhāṣya or commentary of original
comment by Horace Hagman Wilson, , Sāṅkhya Kārikā or Sāṅkhya-Yoga, Mumbai, 1887
3) माधवाचार्य; सपं ा. र.प.ं कंगले, सर्वदर्शनसग्रं ह, मबंु ई, १९८५
ब) सदं र्भग्रथं -
4) Larson, Gerald James, Classical Sankhya, An Interpretation of its History and
Meaning, Delhi, 2005.
5) टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद‌भ् गवद‌ग् ीतारहस्य, पणु े, १९७४.
6) दीक्षित, श्रीनिवास हरि, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापरू ,२०१४.
7) कुमठे कर, उदय, साख्ं यदर्शन, पणु े, २००७
क) कोश-
8) Apte, Vaman Shivaram, The student’s Sanskrit-English Dictionary, Delhi, 2011

-मनीष राजन वाळवेकर

You might also like