You are on page 1of 3

त्वचा (Skin)

पर्यायी संज्ञा- त्वक् , स्पर्शनेंद्रिय

परिचय - त्वचा ही पंचज्ञानेंद्रियांपैकी एक असून तिचे ठिकाणी वायु महाभूताचे अधिक्य असते व वायु महाभूताचा विषय जो स्पर्श, त्या
स्पर्शाचे ज्ञान त्वचेमुळे होते. त्वचा ही सर्व शरीराम आच्छादित करते व आतील धातूंचे संरक्षण करते. त्वचा हा मांसधातुचा उपधातु
होय.

मांसात् वसा त्वचा षट् च ! ... सुश्रुताचार्य

उत्पत्ती-तस्य खलु एवं प्रवृत्तस्य शुक्रशोणितस्याभिपच्यमानस्य क्षीरस्येव संतानिकाः सप्त त्वचो भवन्ति !... सु. शा. ४/३

दूध तापविले असता त्याचा पाक होताना जशी वरच्या बाजूस साथ जमते (निर्माण होते) तसेच भूतात्माधिष्ठीत शुक्रशोणित
संयोगापासून बनलेल्या गर्भाच्या शरीरात धातुचा पाक होत असताना त्यावर सायरूपी त्वचा निर्माण होते. मांसधातुपासून त्याच्या
उपधातु स्वरूपात त्वचेची निर्मिती होते

कार्ये-

१) स्पर्शज्ञान

२) शरीरोष्माचे नियमन

३) स्वेदमल निष्कासन

४) शरीराचे आच्छादन व आघातापासून रक्षण

५) शोषण - शरीराला आवश्यक ते ग्रहण करणे

६) त्वचा हे भ्राजक पित्ताचे स्थान असल्यामुळे ती शरीरास रंगछटा देते.

अधिष्ठानम् - भ्राजकं पित्तम्। त्वचः भ्राजनात् भ्रजकमिति । ...अ.हृ.सू.१२

जाडी- चरकाचार्यांचे मते शरीराच्या सर्व भागावरील त्वचेची जाडी एकसारखीच असते. मुळे मध्यकर्णाचे सुश्रुताचार्याचे मते त्वचेच्या
सातही स्तरांची एकत्र मिळून जाडी सुमारे ३॥ ब्रीही असते.

प्रकार- त्वचेचा स्तरांनाच प्रकार असेही म्हणतात. त्वचेचे सात स्तर असतात असे सुश्रुताचार्यांचे मत आहे. मात्र चरकाचार्यांनी त्वचेचे
सहाच स्तर सांगितले आहेत. पण आधुनिक क चेतनीवर (Facवद्वानांनी त्वचेचे परीक्षण करून सहाच स्तर सांगितले आहेत.

(अ) सुश्रुताचार्यांचे मते-सात स्तर

१) अवभासिनी २) लोहिता ३) श्वेता ४) ताम्रा ५) वेदिनी ६) रोहिणी ७) मांसधरा

(ब) चरकाचार्यांचे मते-सहा स्तर

१) उदकधरा २) असृगधरा ३) सिध्मकिलास संभवाधिष्ठाना ४) दद्रुकु ष्ठसंभवाधिष्ठाना ५) अलजी विद्रधि संभवाधिष्ठाना ६)


च्याप्यधिष्ठायारुषि जायन्ते पर्वसु कृ ष्णरक्तानि स्थूल मूलानि दुश्चिकित्स्यतमानि ।
संख्येच्या दृष्टीने चरकाचार्यांचे मत ग्राह्य धरणे उचित ठरेल. सुश्रुताचार्यांनी मांसघरा नावाचा जो सातवा स्तर वर्णन के ला आहे, तो
त्वचेच्या बाहेरचा असावा असे वाटते कारण -

१)त्याच्या नांवानुसार तो स्तर मांसमय म्हणजेच पेशीमय (Muscular) वाटतो.

२)मांसधरा त्वचेची जाडी खूपच जास्त सांगितली आहे (२ ब्रीही) एवढी मोठी जाडी त्वचेच्या कोणत्याही स्तराची असू शकत नाही.

३) या स्तरामध्ये ज्या रोगांचे अधिष्ठान सांगितलेले आहे ते रोग आयुर्वेदामध्ये मांसजन्य सांगितलेले आहेत तसेच ते मांसल स्तराशी
घनिष्ठ संबंध ठेवतात. तात्पर्य - मांसधरा स्तर त्वचेच्या बाहेरचा असून एका विशिष्ट उद्देशाने (उदर वेधनाच्या दृष्टीने) त्याचा समावेश
सुश्रुताचार्यांनी त्वचेच्या स्तरांमध्ये के लेला आहे.

सुश्रुताचार्यांनी या संदर्भात अधिक स्पष्ट वर्णन के ले आहे.

१) अवभासिनी

तासां प्रथमाऽवभासिनी नाम, या सर्व वर्णानवभासयति पञ्चविधां च छायां सा व्रीहेरष्टादशभागप्रमाणा, सिध्मपद्मकण्टकाधिष्ठाना ।


...शा.४/३

वैशिष्ट्य-बाहेरील बाजूचा) स्तर होय.

जाडी-१/१८ ब्रीही, मात्र हस्ततल व पादतल या ठिकाणी जास्त असते.

कार्य-सर्व शरीर वर्णास प्रकट करतो. शरीराच्या पाच प्रकारच्या छाया (रंगछटा) या स्तरातच प्रदर्शित होतात.

आधुनिक मते- हा स्तर अधिच्छदीय कोशांच्या (Epithelial Cells) अनेक स्तरांपासून बनलेला असून त्यास कठिण स्तर
(Horny Layer) असे म्हणतात. यालाच Epithelial Layer किंवा Stratum Corneum असेही म्हणतात.

You might also like