You are on page 1of 17

ST.

JOHN THE BAPTIST HIGH SCHOOL

Std. : 9th
Subject : Marathi
Chapter : २. संतवाणी (पद्य)-(अ) भेटीलागी जीवा
(लेखन-कार्य) (Question & Answer)
Sr. No. : 02
Teacher Name : Mrs. Shivani S. Haldankar
(अ) भेटीलागी जीवा
संत तुकाराम
अभंगाचा आशय –

प्रस्तुत अभंग ‘सकलसंतगाथा’तील दुस-या खंडातील “श्री

तुकाराममहाराजांची

अभंगगाथा”, अभंग क्रमांक ११३६ मधून घेतला आहे.

प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची

ओढ समर्पक दृष्टान्तातून व्यक्त के ली आहे.

भावार्थ –

संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट
पाहत आहे. ll१ll
आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत
आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते त्याचप्रमाणे विठ्ठल
हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय
मनापासून वाट पाहत आहे. ll२ll
संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरपणाहून कोणीतरी मु-हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय
मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत
आहे. ll३ll
विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुके पोटी अतिशय
व्याकु ळतेने शोक करते...म्हणजे, रडत, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या
आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे. ll४ll
अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती
करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे
तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. ll५ll
पद्य विभाग = (१६)

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृ ती करा.

भेटी लागे जीवा लागलीसे आस|

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||१||
......
तुका म्हणे मज लागलीसे भूक|
धांवूनि श्रीमुख दांवी देवा ||५||
आकलन कृ ती –
कृ ती १. (१) योग्य अर्थ शोधा. (२)

(अ) आस लागणे म्हणजे – ध्यास लागणे

(१) ध्यास लागणे (२) उत्कं ठा वाढणे (३) घाई होणे (४) तहान लागणे

(आ) वाटु ली म्हणजे – वाट

(१) धाटुली (२) वाट (३) वळण (४) वाट पाहणे

आकलन कृ ती –
कृ ती २. (१) सहसंबंध लावा. (१)

जसे:. १. : चकोर
चंद्रमा

तसे:. १. दिवाळी : लेक

२. बाळ : आई
(२) आकृ तिबंध पूर्ण करा. (१)

कोण म्हणते ii) मज लागलीसे भूक कोणाला

संत तुकाराम श्री विठ्ठलाला

कृ ती ३.

प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (२)

 भेटीलागी - भेटीसाठी
 अति - खूप, पुष्कळ
 माऊली - आई
 मज - मला
कृ ती ४.
काव्यसौंदर्य. (२)

तुका म्हणे मज लागलीसे भूक|

धांवुनि श्रीमुख दांवी देवा||

या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा.

कृ ती ४.
काव्यसौंदर्य -
संतवाणीतील ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून संत तुकारामांनी वेगवेगळे दृष्टान्त देऊन आपली विठ्ठलाच्या
भेटीची ओढ व्यक्त के ली आहे.
भुके लेले बाळ जसे आईसाठी आक्रोश करते तसे, त्याची आई त्याची भूक शमवत असते. तसेच,
पांडु रंगाच्या दर्शनाची मला भूक लागली आहे. विठ्ठल ही माझी माऊली आहे. तेव्हा हे विठ्ठला, धावत ये व तुझे
श्रीमुख मला दाखव.
प्रस्तुत कवितेचे रसग्रहण करा. (८)

भेटी लागे जीवा लागलीसे आस|

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||१||
......

तुका म्हणे मज लागलीसे भूक|

धांवूनि श्रीमुख दांवी देवा ||५||
प्रस्तुत कवितेचे रसग्रहण करा.
 प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - संत तुकाराम (१)
 प्रस्तुत कवितेचा विषय - विठ्ठल दर्शनाची असीम ओढ (१)
 प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. – भुके लिवा बाळ अति शोक करी | (२)
वाट पाहे उरि माउलीची ||
भुके लेले बाळ काही खायला मिळावे म्हणून रडू न आईकडे व्याकु ळतेने शोक करते...म्हणजे, रडत, तळमळत असते व
आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे. तू
माझी माऊली (आई) आहे व मी तुझे बाळ आहे. विठ्ठल रुपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे.
 प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - (२)
संत तुकारामांना विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे. ती त्यांनी चकोर-चंद्रमा, लेक-माहेर , भुके लेले बाळ-आई या
दृष्टान्तातून व्यक्त के ली आहे. असे हे विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करणा-या या दृष्टान्तामुळे हा अभंग मला आवडला.
 प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - (२)
जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते. त्याविषयी, आपल्या मनात अतीव ओढ असेल, तर ती आपल्याला दर्शन देतेच.
भगवंताच्या भेटीला आतुरलेल्या मनाचे चित्र समर्पक दृष्टान्तातून संत तुकारामांनी व्यक्त के ले आहे.
 प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. (२)
१. जीवा - मनाला , प्राणाला
२. मुळा - निमित्ताने
३. भुके लिवा – भूक लागलेल्या
४. श्रीमुख - विठ्ठलाचा चेहरा.
भावार्थ –

संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट
पाहत आहे. ll१ll
आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत
आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते त्याचप्रमाणे विठ्ठल
हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय
मनापासून वाट पाहत आहे. ll२ll
संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरपणाहून कोणीतरी मु-हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय
मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत
आहे. ll३ll
विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुके पोटी अतिशय
व्याकु ळतेने शोक करते...म्हणजे, रडत, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या
आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे. ll४ll
अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती
करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे
तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. ll५ll
To be continued…

You might also like