You are on page 1of 15

|| श्रीमद् भागवत महापुराण ||

माहात्म्य - अध्याय ४ था

गोकणण-उपाख्यान प्रारं भ

सूत म्हणाले - त्यावेळी आपल्या भक्ांच्या चित्तातील अलौचकक भक्तक् पाहून भक्वत्सल

श्रीभगवान आपले स्थान सोडून तेथे आले. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून चदसत होती,
पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांिे अंग श्यामवणाणिे होते, त्यांनी पीतांबर धारण केला होता,

कमरे भोवती मेखला शोभत होती. ते चिभंगी मुद्रेमुळे सुंदर चदसत होते. वक्षः स्थळावर

कौस्तुभमणी िमकत होता, संपूणण शरीरावर हररिंदनािा लेप लावला होता. त्यांनी जणू
कोट्यवधी कामदे वांिे सौ ंदयण धारण केले होते. ते म्हणजे परमानंदािी िैतन्यमय मूस होते.

असे मनोहर मुरलीधर, आपल्या भक्ांच्या चनमणळ हृदयात प्रचवष्ट झाले होते. वैकंु ठात
वास्तव्य करणारे उद्धवादी भक् गुप्तरूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते. तेव्हा

जयघोष होऊ लागला. भक्तक्रसािा अद् भु


्‌ त प्रवाह वाहू लागला. गुलाल, बुक्का, फुलांिा

वषाणव आचण शंखनादही होऊ लागला. त्या सभेत बसलेल्या लोकांिी आपला दे ह, घरदार
आचण अंतः करणािीही जाणीव नाहीशी झाली ते असे तन्मय झालेले पाहून नारदमुनी

म्हणाले - (१-७)

मुचनगण हो ! सप्ताह श्रवणािा, एक अलौचकक मचहमा मी पाहात आहे. येथे आलेल्यांत मूखण,
धूतण आचण पशु-पक्षीही असून ते सवणि अत्यंत चनष्पाप झाले आहेत. म्हणून या कचलयुगात

चित्तशुद्धीसाठी, मृत्युलोकातील पापसंिय नाहीसा करणारे भागवतकथेच्या बरोबरीिे दु सरे


कोणतेही पचवि साधन नाही. मुचनवर, आपण मोठे कृपाळू आहात. लोकांच्या कल्याणासाठी

आपण चविारपूवणक एक वेगळा असा मागण शोधून काढला आहे. या कथारूप सप्ताहयज्ञाने

कोणकोण पचवि होतात हे आपण मला सांगावे. (८-१०)

सनकाचदक म्हणाले - जे लोक नेहमी पापकमे करतात आचण नेहमी दु रािरणात तत्पर

असतात, वाममागाणने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी आचण कामातुर
असतात, असे सवणजण या कचलयुगात सप्ताहयज्ञाने पचवि होतात. सत्यापासून परावृत्त

झालेले, माता-चपत्यांिी चनंदा करणारे , कामनांनी ग्रस्त झाले ले, आश्रमधमाांिे पालन न
करणारे , दांचभक, दु सर्‌यांिा मत्सर करणारे आचण दु सर्‌यांना पीडा दे णारे , हे सवण कचलयुगात

सप्ताहयज्ञाने पचवि होतात. मद्यपान, ब्राह्मणहत्या, सुवणण-िोरी, गुरुस्त्रीगमन आचण


चवश्वासघात ही पाि महापापे करणारे , कपट व ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, चपशाच्ांप्रमाणे

चनदण य, बाह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आचण व्यचभिारी, हे सवण कचलयुगात सप्ताहयज्ञाने
पचवि होतात. जे धूतण हट्टाने नेहमी मन, वाणी आचण शरीराने पापकमण करीत असतात,

दु सर्‌याच्या धनाने पुष्ट होतात, तसेि मचलन मन आचण दु ष्टवासनांनी युक् आहेत, ते सुद्धा

कचलयुगात सप्ताहयज्ञाने पचवि होतात. (११-१४)

आता आम्ही तुम्हांला या संबंधी एक प्रािीन इचतहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सवण

पापे नष्ट होतात. पूवी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सवण वणाांिे
लोक, आपापल्या धमाणिे आिरण, सत्यवतणन आचण सत्कमे यां त तत्पर असत. त्या नगरात

सवण वेदांिा जाणकार आचण श्रौत-स्मातण कमाांत चनपु ण असा आत्मदे व नावािा एक ब्राह्मण

राहात होता. तो जणू दु सरा सूयणि होता. तो धनवान असून पौरोचहत्य करीत असे. त्यािी
पत््‌नी धुंधुली कुलीन घराण्यातील आचण सुंदर असू न नेहमी आपलेि म्हणणे खरे करणारी

होती. लोकांिी चनंदा करण्यात चतला आनंद चमळत असे. ती स्वभावाने क्रूर होती. नेहमी

काहीबाही बडबड करीत असे. गृहकृत्यात चनपु ण, कंजूष तसेि भांडखोरही होती. याप्रकारे
ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते. त्यांच्याजवळ धन आचण
भोगचवलासािी सामग्री भरपूर होती. परं तु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते. अखेर त्यांनी
संतानप्राप्तीसाठी गररबांना गायी, जमीन-जुमला, धन, सुवणण, वस्त्रे इत्याचद दान करण्यास

आरं भ केला. अशा रीतीने दान-धमाणत त्याने आपली अधी संपत्ती खिण केली, तरीसुद्धा त्यांना

पुि चकंवा कन्या झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण अचतशय चिंतातुर झाला. (१५-२२)

तो दु ः खी ब्राह्मण एक चदवस घरातून बाहेर पडला आचण वनात चनघून गेला. माध्याह्नकाळी

त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला. संतान नसल्याने दु ः खी असलेला
तो पाणी चपऊन तेथेि बसला. थोड्याि वेळात तेथे एक संन्यासी आला. संन्यासी पाणी

प्याल्यािे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या िरणांना नमस्कार करून दीघण

सुस्कारे टाकीत उभा राचहला. (२३-२५)


संन्याशाने चविारले - हे ब्राह्मणा, तू का रडतोस ? कशामुळे तू अचतशय चिंताग्रस्त आहेस ?

तू ताबडतोब तुझ्या दु ः खािे कारण मला सांग. (२६)

ब्राह्मण म्हणाला - यचतमहाराज, मी माझ्या पूवणजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या

दु ः खािे कसे वणणन करू ? माझे चपतर मी जे तपणणासाठी पाणी दे तो ते स्वतः च्या चिंतायुक्
सुस्कार्‌यांनी गरम होते. तेि ते चपतात. दे वता आचण ब्राह्मण मी चदलेल्या दानािा प्रसन्न चित्ताने

स्वीकार करीत नाहीत. संतान नसल्यामुळे मी इतका दु ः खी झालो आहे की, मला सवण

सुनेसुने वाटत आहे. मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे. संतानहीन जीवनािा
चधक्कार असो. संतानहीन धनािा, संतानहीन कुळािा चधक्कार असो. मी ज्या गाईिे पालन

करतो, तीही वांझ होते. जे झाड लावतो, त्यालाही कधी फुले-फळे येत नाहीत. मी माझ्या
घरात जे फळ आणतो, ते लवकरि सडून जाते. मी असा अभागी आचण संतानहीन असल्याने

माझ्या ह्या जीवनात काय अथण आहे ? असे म्हणून तो ब्राह्मण संन्याशाजवळ ओक्साबोक्शी

रडू लागला. तेव्हा त्या संन्याशाच्या हृदयात ब्राह्मणाचवषयी मोठीि करुणा उत्पन्न झाली. ते
संन्यासी योगचनष्ठ होते. ब्राह्मणािी ललाटरे षा पाहून त्यांनी सवण जाणले आचण चवस्तारपूवणक

त्याला म्हणाले. (२७-३३)

संनासी म्हणाले - हे ब्राह्मणा, संतानप्राप्तीिा मोह सोडून दे . कमणगती मोठी प्रबळ आहे.
चववेकािा आश्रय कर आचण संसारािी वासना सोडून दे . हे चवप्रवरा, ऐक. मी तुझे प्रारब्ध
जाणले आहे. यापुढील सात जन्मात तुला संतानप्राप्तीिा मुळीि योग नाही. पूवी राजा सगर
आचण अङ् ्‌ग यांना मु लांमुळे दु ः ख भोगावे लागले आहे. हे ब्राह्मणा, तू आता संसारािी आशा

सोड. संन्यासाति सवण प्रकारिे सुख आहे. (३४-३६)

ब्राह्मण म्हणाला - चववेकाने माझे काय समाधान होणार ? आपल्या सामर्थ्ाणने का होईना,
आपण मला पुि द्या. नाहीतर शोकाकुल मी आपल्यासमोरि प्राणत्याग करतो. ज्यामध्ये पुि,

पत््‌नी इत्यादी सुख नाही, असा संन्यास सवणथैव नीरस आहे. लोकािारात पुि-पौिांनी
भरलेला गृहस्थाश्रमि श्रेष्ठ आहे. (३७-३८)
ब्राह्मणािा असा हट्ट पाहून तो तपोचनष्ठ संन्यासी म्हणाला, चवधात्यािा लेख पुसून

टाकण्याच्या हट्टानेि राजा चििकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले. एखाद्यािे प्रयत््‌न दै व जसे
उलथून पाडते, त्याप्रमाणे तु लासुद्धा पुिापासून सुख चमळणार नाही. तू मोठ्या हट्टाने

माझ्याकडे यािकाप्रमाणे उभा आहेस. या पररक्तस्थतीत मी तुला काय सांगू ? (३९-४०)

ब्राह्मणािा हट्ट पाहून त्याला एक फळ दे ऊन संन्यासी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत््‌नीस

खावयास दे . त्यायोगे चतला एक पुि होईल. तुझ्या पत््‌नीने एक वषणभर सत्य, पाचवत्र्य, दया,

दान यांिे पालन करून चदवसातून एकवेळ एक प्रकारिे अन्न खाण्यािा चनयम पाळला
पाचहजे. त्यायोगे पुि सुस्वभावी चनपजेल. (४१-४२)

असे म्हणून ते योचगराज चनघून गेले आचण ब्राह्मण आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या
पत््‌नीस चदले आचण तो दु सरीकडे चनघू न गेला. त्यािी पत््‌नी कपटी स्वभावािी होती.

रडतरडत ती आपल्या सखीस म्हणाली, सखी, मला तर मोठी काळजी लागून राचहली आहे.

मी हे फळ खाणार नाही. फळ खाल्ल्याने गभण राहील, त्यामुळे पोट मोठे होईल. मग मला
खाता-चपता येणार नाही आचण मी अशक् होईन. अशा क्तस्थतीत मला घरिे कामकाज कसे

करता येईल ? आचण दै ववशात जर गावात िोरांिी धाड पडली, तर गरोदर मी कशी पळू न

जाऊ शकेन ? तसेि जर शुकदे वाप्रमाणे गभण पोटाति अचधक काळ राचहला, तर त्याला
बाहेर कसे काढता येईल ? प्रसूतीच्या वेळेस गभण आडवा आला तर कदाचित प्राणही गमवावे
लागतील. चशवाय, प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात. मी अशी नाजूक, हे सवण कसे सहन
करू शकेन ? मी जर अशक् झाले, तर माझी नणंद येऊन घरातील सवण सामान घेऊन

जाईल. चशवाय, सत्य, पाचवत्र्य इत्याचद चनयमांिे पालन करणेही अवघड आहे. जी स्त्री

मुलाला जन्म दे ते, चतला त्यािे लालन-पालन करण्यािे अचतशय कष्ट पडतात. मला तर वाटते
की वांझ चकंवा चवधवा स्त्रीि सुखी आहे. (४३-४९)

मनात असे अने क कुतकण आल्याने चतने ते फळ खाल्ले नाही. पतीने जेव्हा चविारले,्‌’फळ
खाल्ले का ?’्‌तेव्हा चतने उत्तर चदले ,’होय, खाल्ले.’्‌एक चदवस चतिी बहीण सहज चतच्याकडे

आली असता चतने बचहणीला सवण वृत्तांत सांगून म्हटले, "माझ्या मनात याचवषयी मोठीि
काळजी लागून राचहली आहे. याि चिंतेने मी चदवसेंचदवस अशक् होत िालले आहे. हे

भचगनी, मी काय करू ?"

बहीण म्हणाली, "मी गभणवती आहे. प्रसूत झाल्यानंतर ते मूल तुला दे ईन. तोपयांत तू गभणवतीिे

सोंग करून गुप्तपणे घरात सु खाने राहा. तू माझ्या पतीला काही धन चदलेस, तर तो तुला
माझे मूल दे ईल. आपण अशी युक्ी करू की, सवण लोक म्हणतील की, चहिे बालक सहा

मचहन्यांिे होऊन मरून गेले. मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकािे लालन-पालन

करीन. तू आता या फळािी परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल." ब्राह्मणाने
स्त्रीस्वभावानुसार बचहणीने सांचगतले तसे तसे केले. (५०-५५)

यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुि झाल्यावर त्याच्या वचडलांनी गुपिूप तो मुलगा धुंधुलीला
आणून चदला. आचण चतने पतीला सांचगतले की, मला सुखरूपपणे पुि झाला. अशा प्रकारे

आत्मदे वाला पुि झाल्यािे ऐकून सवाांना आनंद झाला. ब्राह्मणाने त्या मु लाला जातकमण

संस्कार करून ब्राह्मणांना दाने चदली आचण त्याच्या घरासमोर मंगल वाद्ये वाजू लागली.
तसेि मंगल कृत्ये होऊ लागली. धुंधुली आपल्या पतीला म्हणाली, "माझ्या स्तनातून दू ध ये त

नाही. तर गाय वगैरे प्राण्यांच्या दु धाने या बालकािे पालन-पोषण मी कसे करू ? माझ्या

बचहणीला नुकतेि बाळ झाले होते, ते गेले. चतला बोलावून आपल्या घरी ठे वून घ्या. म्हणजे
ती तुमच्या बाळािे पालन-पोषण करील." तेव्हा पुिािे रक्षण होण्यासाठी आत्मदे वाने तसेि
केले. माता धुंधुलीने त्या बालकािे नाव धुंधुकारी असे ठे वले. (५६-६१)

त्यानंतर तीन मचहने झाल्यावर त्या गायीलाही (मनुष्याकृती) मुलगा झाला. तो सवाांगसुंदर,

चदव्य, चनमणळ तसेि त्यािी कांती सोन्यासारखी होती. त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद

झाला आचण त्याने स्वतः त्यािे सवण संस्कार केले. हे वृत्त ऐकून इतर लोकांना मोठे आश्चयण
वाटले आचण ते त्या बालकाला पाहण्यासाठी आले. ते म्हणू लागले, "पहा, पहा ! आत्मदे वािे

भाग्य कसे उदयाला आले ! हे केवढे आश्चयण आहे की गाईलासुद्धा दे वासारखा मुलगा झाला."
दै वयोगाने हे रहस्य कोणालाही समजले नाही. त्या बलकाने त्यािे नाव ’गोकणण’ ठे वले.

(६२-६५)
काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदापणण केले. त्यातील गोकणण मोठा पंचडत

आचण ज्ञानी झाला, परं तु धुंधुकारी मोठा दु ष्ट झाला. स्नान, वगैरे तो करीति नव्हता, अभक्ष्यही
भक्षण करीत होता. क्रोधाच्या आहारी गेला होता. वाईट वस्तूंिा तो संग्रह करीत असे.

प्रेताच्या हाताने स्पशण केलेले अन्नही तो खात असे. िोरी करणे, सवाांिा द्वे ष करणे, दु सर्‌यांच्या
घरांना आगी लावणे हा त्यािा स्वभाव होता. लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडे वर

घेई आचण त्यांना चवचहरीत टाकून दे त असे. हत्या करणे, हातात शस्त्र घेऊन आं धळे , दीन-

दु ः खी यांना िास दे णे हे त्यािे काम असे. िांडाळांचवषयी त्याला चवशेष प्रेम होते. हातात फास
घेऊन, कुत्र्यांना बरोबर घेऊन तो चशकार करण्यासाठी भटकत असे. वेश्यांच्या जाळ्यात

अडकून त्याने आपल्या वचडलांिी सवण संपत्ती उधळू न टाकली. एक चदवस माता-चपत्यांना
बडवून घरातील सवण भांडीकंु डी तो घेऊन गे ला. (६६-७०)

अशा प्रकारे सवण संपत्ती नष्ट झालेली पाहून तो चबिारा बाप ओक्शाबोक्शी रडत म्हणाला -

"वांझपणा परवडला, पण कुपुि हा अत्यंत दु ः ख दे णारा ठरतो. आता मी कोठे राहू ? कोठे
जाऊ ? माझे हे दु ः ख कोण नाहीसे करील ? माझ्यावर तर मोठे संकट आले आहे. या

दु ः खामुळेि मी आता जीव दे तो." त्यािवेळी ज्ञानी गोकणण चतथे आला आचण त्याने चपत्याला

वैराग्यािा उपदे श करीत समजावण्यािा प्रयत््‌न केला. गोकणण म्हणाला, हा संसार असार
आहे. हा अत्यंत दु ः खरूप आचण मोहात पाडणारा आहे. कोणािा पुि ? कोणािे धन ?
आसक्ी असलेला मनुष्य रािंचदवस दु ः खाने जळत राहतो. इं द्र आचण िक्रवती राजा यांनाही
काही सुख चमळत नाही. केवळ चवरक्, एकांतात जीवन कंठणारे मुनीि सुखी असतात.

’हा माझा पुि आहे’ या अज्ञानािा त्याग करा. मोहामुळे नरकप्राप्ती होते. हे शरीर तर

नाहीसे होणारि आहे. म्हणून सवणसंगत्याग करून वनामध्ये चनघू न जा. (७१-७६)

गोकणाणिे म्हणणे ऐकून आत्मदे व वनात जाण्यासाठी तयार झाला; आचण त्याला म्हणू लागला

- पुिा, वनात राहून मी काय करावे, ते मला तू सचवस्तर सांग मी खरोखर मूखण आहे,
पूवणकमाणने मोहपाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधार्‌या चवचहरीत
पडून राचहलो आहे. हे दयाळू , यातून माझा उद्धार कर. (७७-७८)
गोकणण म्हणाला - हे शरीर, हाडे , मांस आचण रक्ािे कोठार आहे. शरीर म्हणजे ’मी’ असे

म्हणणे सोडून द्या आचण स्त्री-पुिांना सुद्धा ’आपले’ मानू नका. हा संसार क्षणभंगुर आहे

असे नेहमी मानून केवळ वैराग्यरसात आनंद मानून भगवंतांिी भक्ी करा. नेहमी धमाणिा

आश्रय करून राहा. सवण लौचकक व्यवहारािा त्याग करा, साधु-संतांिी सेवा करा,

भोगलालसेला जवळही येऊ दे ऊ नका, दु सर्‌यांच्या गुण-दोषांिा चविार करणे तत्काळ


सोडून द्या आचण भगवत्सेवा व भगवंतांच्या कथांिा चनत्य आनंद लुटा. (७९-८०)

याप्रमाणे पुिाच्या उपदे शाने आत्मदे वाने घर सोडले आचण तो वनात चनघू न गे ला. त्यािे साठ
वषाांिे वय झाले होते, तरी बुद्धी क्तस्थर होती. रािंचदवस भगवंतांिी पूजा-अिाण आचण

चनयचमतपणे भागवताच्या दशम स्कंधांिे वािन करून त्याने भगवान श्रीकृष्ांिी प्राप्ती

करून घेतली. (८१)

अध्याय िौथा समाप्त

You might also like