You are on page 1of 3

विठ्ठलाचे अभंग

चला नाचत पंढरीला जाऊ, पांडुरं गाचे दर्शन घेऊ

चाद्रभागेतीरी जमले वारकरी, तेथे बसून अभंग गाऊ

जाऊ गोपाळपुरी जनी संसार करी, जनाबाईचा संसार पाहूया

तक
ु ा म्हणे दे वा भक्तीवीण सेवा, पांडुरं गाला हार बक्
ु का व्हावय
ू ा

गरुड खांबापाशी दर्शनाची दाटी, एकमेकाशी आलिंगन दे वय


ू ा

अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक

जाईन गे माये तया पंढरपरु ा भेटेन माहे रा आपलि


ु या

घे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे

हात लावूनी नशिबाला या रडतोस काही ठायी ठायी

या संसारापायी या नाशिबापायी ....... ध ृ

तू म्हणशील पैसा अडका तो इथेच राहील सडका


मेल्यावरती तुझ्याबरोबर मातीचा एक मडका घे घे .........
तू म्हणशील बायका पोरं ही तुझ्यामागचे चोर मेल्यावरती जाळतील तुला
गावाच्या बाहेर घे घे घे ......

तू म्हणशील गाडी बंगला तो इथेच राहील चांगले।


दहाव्याच्या दिवशी फोटोला तुझ्या हारच होते टांगले . घे घे घे .......
तक
ु ड्या म्हणे घोडे हत्ती यांची क्षणात होईल माती
रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती घे घे घे .......

पांडु रंगा sssss ...पांडु रंगाsss , मी पतंग तुझ्या हाती धागा


पंचतत्वाचा कागद के ला , निसर्गाचा धागा त्याला. पांडु रंगा ...
चारी वेदांचा सुटला वारा , साही शास्त्रांचा आधार त्याला
तुका म्हणे झालो पतंग , धागा आवर पांडु रंगा

जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा


देवा सांगो सुख दुख देव निवारील भूख
घालू देवासीच भार देव सुखाचा सागर
राहो जवळी देवापाशी आता जडोनि पायाशी
तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लडिवाळे.

चला पंढरीशी जाऊ रखुमादेवीवरा पाहू


डोळे निवतील कान मना तेथे समाधान
संता महंता होतील भेटी आनंदे नाचो वाळवंटी
ते तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भांडार
जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक.

जय गोविंद जय गोपाल के शव माधव दीनदयाळ अच्युत के शव श्रीधर माधव गोविंद गोपाल हरे .

जय जय नंद यशोदा दुलाल गिरिवरधारी गोपाल गोपाल गोपाल .............


सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया
गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ
विठो माउलिये हाची वर देई संचारोनि राही ह्रदयी माझ्या
तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे .

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया


तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान
मकर कुं डल तळपती श्रवणी कं ठी कौस्तुभ मणी विराजीत
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने .

कसा मला टाकू न गेला राम टाकू न गेला राम


रामाविण जीव व्याकु ळ होतो सुचत नाही काम
रामविण मज चैन पडेना नाही जीवासी आराम
एका जनार्दनी पाहुनी डोळा स्वरूप तुझे घनश्याम

गोकु ळीच्या सुखा अंतपार नाही लेखा


बालकृ ष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी
गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे
तुका म्हणे छंदे येणे वेधी ले गोविंदे.

You might also like