You are on page 1of 5

शरीराचे तालबद्ध काल -चक् र

Submitted by दीपा जोशी on 24 March, 2017 - 13:07

परवा एका प्रसिद्ध आयु र्वेदिक तज्ज्ञाचा कार्यक् रम टी. व्ही. वर लागला होता. त्यातले त्यांचे
एक वाक्य मला फार महत्वाचे वाटले . त्यांनी सां गितले , ‘दिनचर्या सु धारली की, अहोराञ
आरोग्याच्या समस्या काढता पाय घे ऊ लागतात.’ म्हणजे , दिनचर्या वे ळेवर पाळू लागलो की
शरीर पण शहाण्यासारखं वागू लागतं !
दिनचर्या म्हणजे काय ? तर रोज सकाळी उठण्यापासून झोपे पर्यं त कोणत्या वे ळी काय करायचं
याचे नियम. हे नियम आपले पूर्वज बऱ्याच काटे कोरपणे पाळत असत. त्यामागे अनु भवाअं ती
आले ले शहाणपण आणि आयु र्वे दाचे ज्ञान होते .
अमु क वे ळेला अमु क का करावं - याचं कारण आहे - आपल्या शरीराची असणारी ‘जै विक
तालबद्धता’; अथवा शरीरामध्ये असणारे नै सर्गिक घड्याळ. फक्त आपल्याच शरीरात नाही,
तर प्राणी, पक्षी, वनस्पती यां च्यामध्ये ही हा जै विक ताल असतोच. दिवसाच्या २४ तासात
मु ख्यत्वे सूर्यप्रकाश आणि अं धार यांना प्रतिसादात्मक म्हणून शारीरिक आणि मानसिक
बदल घडतात. दर २४ तासांनी पु नरावृ त्ती होणाऱ्या या घटना शरीरातल्या नलिकाविरहित
ग्रंथींमार्फ त स्त्र्वणाऱ्या हॉर्मोन्स मु ळे नियं त्रित होतात, आणि त्यामु ळे आपले शरीरयं तर् कसं
रोजच्यारोज आपसूकच सु रळीत चालतं ! म्हणजे - सकाळी आपोआप जाग ये ते, भु केच्या
वे ळेला भूक लागते , रात्री दमले ल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून आपोआप झोप
लागते .
शरीरात दिवसाच्या २४ तासात ठराविक वे ळेला नियमितपणे घडणाऱ्या अशा घटनां च्या
कालचक् राला ‘सरकॅडीअन सायकल’ असे म्हणतात. या जै विक तालाचा अभ्यास करणारे एक
शास्त्र आहे . ‘क् रोनोबायोलॉजि ’ असे त्याचे नाव.
रोज, साप्ताहिक, मासिक, वार्षिक, आणि ऋतूपर् माणे शरीरात घडणाऱ्या नै सर्गिक घटनांचे
एक चक् र असते . दिवसातल्या, आठवड्यातल्या, महिन्यातल्या, वर्षातल्या किंवा एखाद्या
ऋतूमधल्या ठराविक काळात शरीरात ठराविकच घडामोडी होतात; त्याप्रमाणे शरीरात
ठराविक बदल घडतात- असे हे शास्त्र सां गते .
सूर्याप्रकाशा वर आधारले ले एक अदृश्य घड्याळ खरोखरीच आपल्या शरीरात असते . में दच्ू या
तळाशी असणाऱ्या ‘हायपोथॅ लॅ मस’ भागात ‘सु पर् ा- कायसमॅ टिक- केंद्र’ नामक, जवळपास
20,000 चे ता पे शींचा एक समूह असतो. हे च आपल्या शरीरातले अदृश्य घड्याळ! सूर्य
उगवल्यावर निर्माण होणार प्रकाश, आणि मावळल्यावर होणारा अं धार यांची नोंद
डोळ्यांमधल्या प्रकाश- सं वेदक असणाऱ्या खास ’गॅ न्गलिओन’ पे शी घे तात. ही माहिती थे ट
प्रक्षे पित होते ती या ‘सु परा - कायसमॅ टिक‘ केंद्राकडे . मग या केंद्रातल्या पे शी आले ल्या
सगळ्या माहितीचं विश्ले षण करतात, चे तातं तं म ू ार्फ त योग्य तो सं देश ‘पिनिअल’ ग्रंथींकडे
पोहोचवतात. या ग्रंथींच काम असतं मे लॅटोनीन हॉर्मोन निर्माण करणे . हे मे लॅटोनीन म्हणजे
झोपे चं हॉर्मोन.
में दच्ू या मध्यभागी, असणारी वाटाण्याच्या आकाराची ही ग्रंथी दिवसभर सु प्तावस्थे त असते .
दिवस मावळू न अं धार पडू लागतो,रात्र होत जाते , तसतशी ‘सु परा - कायसमॅ टिक‘ केंद्राकडू न
आले ल्या सं देशामु ळे ही ग्रंथी सक्रिय होऊ लागते . तिच्याकडू न मे लॅटोनीनची निर्मिती सु रु
होते . साधारणतः रात्री नऊच्या सु मारास मे लॅटोनीन ची निर्मिती होऊ लागते . मध्यरात्री ती
सर्वोच्च बिं दप ू र्यं त जाते , आणि दिवस उजाडे पर्यं त हळू हळू कमी होत जाते . में द ू मधील
मे लॅटोनीन ची पातळी तिव्रते ने वाढू लागते तस - तसं आपली कार्यक्षमता कमी होते . त्याची
पातळी वाढत जाईल, तस तसा में द ू कडू न सं देश ये तो, ‘आता काम थांबव आणि झोपी जा’.
मग आपल्याला सु स्तावल्यासारखं , झोपाळल्यासारखं होऊ लागतं , शरीराचं तापमान कमी
होऊ लागतं .आपल्याला झोप ये ऊ लागते . अशा वे ळीच अं थरुणावर पडलं , तर रात्री कशी
गाढ झोप लागते . दिवसभर झाले ली शरीराची झीज भरून ये ऊ लागते . उजाडू लागतं , तसे
मे लॅटोनिनची पातळी कमी होते . त्याच वे ळी परत ’कॉर्टिसॉल’ या दुसऱ्या हॉर्मोनची रक्तातली
पातळी वाढू लागते . डोळ्यावरची झोप उतरवून दिवसभरातल्या हालचालीसाठी जागृ त
अवस्था आणण्याचे काम या ‘कॉर्टिसॉल’चे . आता में दच ू ा सं देश ये तो,‘ चला, उठा आणि
कामाला लागा!’ आणि मग हळू हळू जाग ये ते, भरपूर विश्रांती घे ऊन ताजातवाना झाले ला
में द ू आणि सगळी गात्रं उत्साहाने नवीन दिवसाचं स्वागत करतात!
सं ध्याकाळनं तर अं धार पडू लागला की परत कॉर्टिसॉलची पातळी कमी होऊ लागते आणि
मे लॅटोनीनची पातळी वाढू लागते . रात्री कॉर्टिसॉलची पातळी एकदम कमी झाले ली आणि
मे लॅटोनीन ची वाढले ली असते . दिवसामागून राञ आणि रात्रीमागून दिवस ये ताना झोप
आणि जागृ तीसाठी असे हे घड्याळ प्राणी-मात्रांना बहाल करून निसर्गाने मोठीच कृपा
केली आहे ! या घड्याळाचं खरं महत्व कुणी जाणलं असे ल तर, ज्यांना झोपे च्या गोळ्यां शिवाय
सु खाची झोप लागत नाही त्यांनी!
बाहे रचे तापमान, प्रकाश यां च्या प्रमाणे हे घड्याळ शरीरातल्या घडामोडींचे योग्य
नियं तर् णदे खील साधते . ‘जे ट -लॅ ग’ मु ळे तात्पु रतं झोपे चं खोबरं वगै रे होतं , मरगळल्यासारखं
होतं , दिवस अनावर झोप ये ते, पचन बिघडतं …. कारण शरीराचं घड्याळ बिघडतं , जै वीक ताल
थोडा ’बे ताल’ होतो. पण नं तर, त्या ठिकाणच्या दिवस-रात्रीच्या चकराप्रमाणे शरीराचा
जै विक ताल परत पूर्ववत होतो.
राञ होते तसं आणखी एका हॉर्मोनचं काम सु रु होतं . ‘ग्रोथ हॉर्मोन’ अथवा वाढीसाठी लागणारं
हे हॉर्मोन . आपण गाढ झोपे त असताना- प्रथिनांची निर्मिती, स्निग्ध पदार्थांचं ज्वलन,
मु लांमध्ये हाडांचा आणि स्नायूंचा विकास -अशी महत्वाची कामे हे हॉर्मोन गु पचूप करून
टाकतं . रात्री अवे ळी झोपणार्यांमध्ये लठ् ठपणाचे एक कारण, बिघडले लं ( कि बिघडवले लं?)
जै विक घड्याळ हे ही असू शकतं . कारण उशिरा झोपल्याने शरीरातलं मे टॅबॉलिझम -म्हणजे
चयापचय बिघडू न जातं , शरीरातल्या स्निग्ध पदार्थांचं ज्वलन पूर्ण होत नाही.
पूर्वी माणसं सं ध्याकाळीच जे वन ू घे त असत, आणि गडद अं धार पडताना झोपी जात असत.
तसच सकाळी उजाडायच्या वे ळी उठू न दिनक् रम सु रु करत असत. ही जीवनशै ली शरीराच्या
जै विक तालाशी आणि हॉर्मोन निर्मितीच्या कालचक् राशी अगदी सु संगत होती!
शरीराच्या नै सर्गिक घटनाचक् राची जाणीव ठे ऊन त्याप्रमाणे वागणे हे आपल्याला वाटतं
त्यापे क्षा खूप जास्त महत्वाचं आहे . त्यामु ळे फक्त झोप चां गली झाल्यानं एकंदरीत आरोग्य
चां गलं राहतं एवढं च त्याचं महत्व नाही, तर शरीराच्या खूप साऱ्या महत्वाच्या कामकाजाशी
जै विक तालाचा सं बंध असतो. नै सर्गिक कालचक् र बिघडलं , की हृदयाचे आरोग्य, मनाचे
आरोग्य, कमकुवत प्रतिकारशक्ती, पचनाच्या समस्या अश्या अने क समस्या डोकं वर काढू
लागतात.
पचन सं स्थे च्या आरोग्यावर जै विक घड्याळाचा मोठा प्रभाव असतो. रात्री निर्माण होणारे
मे लॅटोनीन हे भूक लागणे , पोट भरल्याची भावना, आतड्यांची हालचाल वगै रेंशी सं बधीत
असते . तसे च, गॅ स्ट् रीन, घ्रेलिन, से रोटोनिन या हॉर्मोन्सची आणि पाचक रस तयार करणारे
एं झाईम्स यांची निर्मिती जै विक घड्याळाने नियं त्रित होते . म्हणूनच रात्रीच्या शिफ्टमध्ये
काम करणाऱ्यांमध्ये जै विक ताल बिघडल्याने , ऍसिडिटी, अल्सर, ‘इरीटिबल -बॉवे ल -
सिं ड्रोम‘ असे पचनसं स्थे चे विकार आढळतात.
झोपे चं नै सर्गिक जै विक चक् र बिघडल्यास, स्त्रियांमध्ये प्रजनन सं स्थे चं काम दे खील बिघडतं
. रात्रीच्या गडद अं धारात झोप घे ताना तयार होणारं मे लॅटोनीन हे हॉर्मोन, मु ली वयात
ये ण्याच्या प्रक्रिये वर नियं तर् ण ठे वतं , ओव्हरीजचे कार्य नियं तर् णात ठे वतं , आणि
प्रजननासं बंधीचे हॉर्मोन्स वे ळेवर निर्माण करतं असं आता सिद्ध झालं आहे .
सं ध्याकाळच्या आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मु ली आणि बायकांना रात्रीच्या
वे ळी दिव्याच्या प्रखर प्रकाशामध्ये काम करावं लागतं . त्यामु ळे, नै सर्गिक अं धारा अभावी
मे लॅटोनीन निर्मिती दबली जाते . अशा स्त्रियांना बऱ्याचदा पाळी अनियमितपणे ये ते. कधी
लवकर ये ते तर कधी बऱ्याच उशिरा. शिवाय पाळीच्या वे दना, खूप जास्त रक्तस्त्राव, किंवा
अत्यल्प रक्तस्त्राव, अशा तक् रारी निर्माण होतात. जनन सं स्थे च्या हॉर्मोन्स च्या निर्मिती
मध्ये बदल होतो. अशा शिफ्टमध्ये काम करणाऱ्या बायकांना गर्भ-धारणा झाल्यास, पूर्ण
दिवस भरण्या-आधी प्रसूती होण्याचा, आणि कमी वजनाची मु लं होण्याचाही धोका असतो.
अजून एक महत्वाची बाब गे ल्या दशकात समोर आली आहे . ती म्हणजे शिफ्टमध्ये काम
करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्क रोगाचं वाढतं प्रमाण. मे लॅटोनीनची कमतरता हे च
कारण पु न्हा इथं ही पु ढे ये तंय.
दिवसाच्या २४ तासांचं या नै सर्गिक कालचक् राशी इतरही अवयवांचं, सं स्थांचं कार्य सं बंधित
असतं . त्यामु ळे त्या सं स्थां शी सं बंधित व्याधीदे खील दिवसाच्या ठराविक वे ळेल उफ़ाळतात
असं दिसतं . ‘ऍलर्जिक ऱ्हायनायटिस’ मध्ये शिं का ये णे, नाक गळणे अथवा चोंदले ले असणे
अशी लक्षणे ने मकी सकाळीच जास्त करून दिसतात. तर कित्ये क पे शंटना दम्याचा अटॅ क
पहाटे ये ण्याचे प्रसं ग दिवसातल्या उत्तर वे ळांपेक्षा १०० पट जास्त असतात. सकाळी जाग
आल्यानं तर पहिल्या काही तासातला रक्तदाब हा दिवसातल्या इतर कोणत्याही वे ळी
असणाऱ्या दाबापे क्षा सगळ्यात जास्त असतो. छातीत दुखणे , अं जायना, इ सी जी मध्ये
आढळणाऱ्या विकृती, हृदयविकाराचे झटके या घटना सामान्यतः सकाळी जाग
आल्यानं तरच्या पहिल्या काही तासातच होतात असं आढळलं आहे .
आयु र्वे दात सु द्धा नै सर्गिक कालचक् राची कल्पना महत्वाची मानली आहे . पहाटे २ ते ६ आणि
दुपारी २ ते ६ ही वे ळ ‘वात- दोष‘ अधिक्याची मानली आहे . ‘वात’ हालचाल, उत्सर्जन,
उत्साह , मनाचे आणि में दच ू े कार्य यां च्याशी निगडित असतो. म्हणून या कालावधीत
उठल्यास मल -मु ञ विसर्जन चां गले होते . पहाटे चार च्या दरम्यानची वे ळ (ब्रम्ह-मु हर्त
ू )
ध्यान, जप, अध्यात्मिक साधना यां च्यासाठी उत्तम मानली आहे . यावे ळी निसर्ग तरलं , शांत
असतो, मनाची एकाग्रताही चां गली होते , शरीर हलके असते . यावे ळी शरीर- मनाला
मिळणाऱ्या ऊर्जे चा फायदा पु ढे दिवसभर मिळतो. म्हणून सकाळी सहाच्या आधी उठले
पाहिजे . नं तरची सकाळी ६ ते १० ची वे ळ ‘कफ’ अधिक्याची असल्याने जितके उशीरा उठू
तितके जड सु स्त आणि आळसावले ले वाटत राहते . या सकाळच्या कफाच्या वे ळेत घ्यायचा
सकाळचा नाश्ता हलका असावा. सं ध्याकाळी ६ ते रात्री १० ची वे ळ परत ‘कफा’ची मानली
आहे . सं ध्याकाळी किंवा रात्री लवकर आणि हलके जे वण घे णे हितकारक मानले आहे . कारण
शरीर यं तर् णा, चयापचय मं द होऊ लागले ले असते . सकाळी १० ते दुपारी २ ची वे ळ ‘पित्त’
अधिक्याची असते . पित्ताचे कार्य पचन, चयापचय. म्हणून ही वे ळ ‘जठराग्नी’ची. दुपारी भर
१२ वाजता कशी कडकडू न भूक लागले ली असते . सगळे पाचक रस उत्पन्न झाले ले असतात.
यावे ळी पचनशक्ती उत्तम असल्याने जड जे वणही चां गले पचते . रात्री १० ते २ ही वे ळ
दे खील पित्ताची असते . पण या वे ळेत पचनाचं कार्य होत नाही, शरीराअं तर्गत ‘सफाई’चं काम
चालू असतं . आधु निक सं शोधनाप्रमाणे , यकृतात सगळ्यात जास्त पित्त निर्मिती सकाळी ९
वाजता आणि सगळ्यात कमी पित्त निर्मिती रात्री ९ वाजता होते , कारण, अन्नावर पित्ताची
प्रक्रिया करण्याची गरज दिवसाचं असते . रात्री ९ नं तर पित्त निर्मिती बं द होऊन
चयापचयाला आवश्यक अशा इत्तर रसायनांची निर्मिती, तसे च विषारी घटकांची सफाई, सु रु
होते . पहाटे ३ वाजता यकृत हे काम बं द करते , आणि परत पित्त निर्मितीचं कार्य सु रु करते .
दुपारी ३ पर्यं त व्यवस्थित पित्त निर्मिती झाल्यावर, हे काम बं द होऊन, परत रसायन
निर्मितीची दुसरी शिफ्ट चालू होते . अगदी, एखाद्या रसायनां च्या कारखान्याचं ‘शिफ्ट- वर्क ‘
असतं तसं , अहोरात्र यकृताच्या कारखान्याचे काम चालू असतं . किती आश्चर्य कारक आहे ना
हे !
तर असं हे शरीराचं तालबद्ध कालचक् र! आता वै ज्ञनिकच म्हणत आहे त की, आरोग्य चां गलं
राहावं असं वाटत असे ल तर, हे जै विक घड्याळ बिघडू द्यायचं नाही. त्यासाठी एकच करायचं .
ते म्हणजे , सं ध्याकाळीच - किंवा रात्री लवकर-जे वायचं , रात्री अं धार झाले ला असे ल ते व्हा
सरळ अं थरुणात शिरायचं , आणि गु डू प झोपी जायचं . बाहे र उजाडतं , ते व्हा मस्तपै की उठायचं
(आळोखे -पिळोखे दे त म्हणा हवं तर!) आणि दिवसभरातल्या जे वणा -खाण्याच्या वे ळा
चु कवायच्या नाहीत. झोपायच्या कमीतकमी एक तास आधी प्रखर प्रकाश म्हणजे टी. व्हि,
सं गणक, मोबाईल इत्यादी गोष्टी पूर्णपणे टाळायच्या. हल्लीच्या ‘आधु निक यु गात’ हे जरी
अवघड वाटलं , तरी अशक्य नाही. सु रवातीला अगदी काटे कोरपणे जमलं नाही, तरी आपली
दिनचर्या प्रयत्नपूर्वक तशी बनवायची. आणि शक्य ते वढी पाळायची. कारण आरोग्य
बिघडल्यानं तर जे भोगावं लागतं , ते शरीराच्या नै सर्गिक तालाशी सु संगत अशी आपली
दिनचर्या ठे वण्याच्या कष्टांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतं !
सन्दर्भ
http://natural-fertility-info.com/melatonin-circadian-rhythm.html
https://www.nigms.nih.gov/education/pages/Factsheet_CircadianRhythms.asp
x
http://journal.frontiersin.org/article/10.3389/fendo.2013.00195/full
https://www.hindawi.com/journals/ije/2010/813764/
http://www.hepatitiscentral.com/news/working_with_yo/

You might also like