You are on page 1of 5

किस्सा क् रमांक ६८

१९७१ च्या बां गला दे श यु द्धाच्या माझ्या आठवणी

त्या काळात माझी ने मणूक भारत-पाकिस्तान सीमे वरील जामनगर, सौराष्ट् र ये थे हवाई
दलाच्या फायटर बे सवर वरिष्ठ लॉजिस्टिक्स अधिकारी म्हणून झाली होती.
मार्च , १९७१ पासूनच वातावरण तं ग होऊ लागलं होतं , लढाईचे वारे वाहू लागले होते .
ती आता अगदी कधीही होऊ शकेल असं च सर्वांना वाटू लागलं होतं . पूर्व
पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे खूपच कमी सै न्यबळ असल्याने यु द्धाला खरं तोंड फुटणार
होतं ते काश्मीर, पं जाब, राजस्थान पासून ते सौराष्ट् रापर्यं त असं पश्चिम सीमे वरच
फुटणार होतं . पश्चिम सीमे वर दोन्ही सै न्यांची पायदळे आणि हवाई दले यां च्यात
अटीतटीची लढाई होणार असाच रं ग दिसत होता.
जून, १९७१ मध्ये मला दिल्लीतील हवाई दलाच्या मु ख्यालयात परदे शातील
ने मणु कीच्या मु लाखतीसाठी बोलावण्यात आलं आणि माझी लं डनला जाण्यासाठी निवड
झाली. स्क्वाड्रन लीडर मूर्ती यांची निवड पॅ रिससाठी झाली तर स्क्वाड्रन लीडर इया
यांची निवड मॉस्कोसाठी झाली.
माझे बे स कमांडर एअर कमोडोर पीटर विल्सन यांनी मला फोन करून म्हटलं , ’’
कर्नल- साहे ब, (ते मला प्रेमाने कर्नल अशीच हाक मारत) तु म्हाला या टप्प्यावर मी
लं डनला पाठवू शकत नाही. मी हवाई दलाच्या मु ख्यालयाला सां गतोय की होऊ
घातले लं यु द्ध सं पेपर्यं त तु मची नवीन ने मणूक रोखून धरली जावी. चाले ल ना तु म्हाला?’’
‘’ होय सर . इथं राहन ू आपल्या कारवायांसाठी आवश्यक तो लॉजिस्टिकल पाठिं बा
द्यायला मला नक्कीच आवडे ल.’’ त्यानं तर स्क्वाड्रन लीडर मूर्ती आणि इया हे परदे शी
जाण्यासाठी ऑगस्ट, १९७१ मध्ये रवाना झाले कारण त्यांची आधीची ने मणूक
सीमे वरील फायटर बे सवर नव्हती.
आमच्या जामनगर, भूज आणि बिकाने र तळां वरील लढाऊ विमाने पाकिस्तानी
लक्ष्यां वर हल्ले करत करत होती. मी आणि माझ्या हाताखालचे लोक या तिन्ही
तळां वरील स्पे अर पार्ट्स, इं धन, शस्त्रास्त्रे, शिधा इत्यादी गरजा भागवण्याचे काम
करत होतो.
तत्कालीन सं रक्षण मं तर् ी बाबू जगजीवनराम यांनी आमच्या हवाई तळाला भे ट दिली.
ते व्हा त्यांनी सां गितलं की तु म्ही पाकिस्तानी भागात तीव्र हल्ले करा आणि तिथली
लष्करी आणि औद्योगिक ठिकाणे उद्ध्वस्त करा.’ त्याप्रमाणे कृती करण्यात आली,
त्यामु ळे कराची बं दरावरील ते लाचे कारखाने , रे ल्वे यार्ड, पूल, रस्ते , विमानां च्या
धावपट् ट्या आणि कारखान्यां वर सातत्याने बॉबहल्ले ं झाल्यामु ळे त्यांना मोठीच हानी
सोसावी लागली.
आपल्या पायदळाला पाठिं बा दे ण्यासाठी आम्ही बर्‍याच हवाई कारवायाही केल्या.
आपल्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानचे कित्ये क रणगाडे उद्ध्वस्त केले .
त्याच बरोबर ‘बॉबर ं सॉर्टीज’ जातीची लढाऊ विमाने अन्य तळावरून ये ऊन
पाकिस्तानवर हल्ल्यासाठी जात होती तीही आमच्याच जामनगर तळावर आधी
उड्डाण करत होती. तिथून परत ये तानाही त्यातली काही विमानं आमच्या इथे थांबन ू
मग मूळ ठिकाणी परतत होती.
आमच्या तळावरील एकुण १४ लढाऊ वै मानिकांना वीरचक् र मिळालं तर माझ्या आणि
अन्य काही लोकां च्या नावाची शिफारस ‘ अति विशिष्ट से वा पदकासाठी करण्यात
आली.
डिसें बर, १९७१ मध्ये लढाई सं पली. मी माझ्या कुटु ं बासह एप्रिल, १९७२ मध्ये
लं डनला गे लो .ने हमीच्या ३ वर्षां च्या ने मणु कीऐवजी एकुण ५ वर्षे मला तिथे राहायला
सां गण्यात आलं कारण परराष्ट् र मं तर् ालयाला माझं काम आवडलं होतं .
यावरून दिसून ये तं की कर्तव्यनिष्ठे चे फळ ने हमीच मिळते मग ती कर्तव्यनिष्ठा शांतता
काळातली असो अथवा यु द्धकाळातली असो.

ता.क.-माझा हा अनु भव आणि १९६५ च्या लढाईचा अनु भव यांचा मला माझी इं गर् जी
कादं बरी ‘ब्ल्यू स्काय कॉलिं ग- अ लव्ह स्टोरी ऑफ एअर फोर्स फायटर पायलट ‘
लिहिताना झाला. ही कादं बरी ऍमे झॉनवर उपलब्ध आहे .
00000000000000000000000000000000000000000000000000000000000

किस्सा क् र. ६९

अर्थशास्त्र----- कशाशी खातात हे ?


कदाचित पृ थ्वीवर जन्म झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मानवाला वे गवे गळ्या
गोष्टींबद्दल आणि भोवतालच्या परिस्थितीबद्दल प्रचं ड कुतु हल वाटू लागलं असलं
पाहिजे . तसं च ‘हे काय आणि ते काय’ असा चौकसपणाही त्याच्यात भरपूर आले ला
असला पाहिजे . त्यामु ळेच तर अगणित भौतिक आणि सामाजिक शास्त्रांचा उदय
झाला. काळ गे ला तसतसे या शास्त्रांनी बरीच तत्वे , कायदे आणि नियम शोधून काढले
आणि काही तयारही केले . ही सर्व शास्त्रे आज नव्या पिढ्यांना शाळा-कॉले जांत
शिकवली जातात. तसे च आधीच्या माहितीला चु कीची ठरवणारे नवनवे शोधही लागत
असतात मग त्यातून निघाले ले निष्कर्ष नव्या माहितीची जागा घे तात. ही नवीन
माहिती आत्मसात् करून स्वतःचं ज्ञान अद्ययावत करण्याची प्रक्रिया अव्याहत
चालूच असते .
आपण या शास्त्रांचा अभ्यास केला नसला आणि त्यांचे नियम आपल्याला माहिती
नसले तर याचा अर्थ असा नव्हे की ते आपल्याला लागू होणारच नाहीत. माहिती असोत
वा नसोत ते नियम आपल्याला लागू होत असतातच. उदाहरणार्थ, गु रुत्वाकर्षणाच्या
नियमाबद्दल काहीच माहिती नसलं तरी हे अज्ञान गु रुत्वाकर्षणाच्या नियमापासून काही
कुणाचं सं रक्षण करत नाही. त्यामु ळे तु म्ही अगदी चां गल्या हे तनू े च वीस मजली
इमारतीवरून खाली उडी मारली तर काही हवे त तरं गणार नाही. सरळ खालीच जाल
आणि जमिनीवर जाऊन कपाळमोक्ष करून घ्याल.
परं तु माझ्या मनात ये तं की सर्वसामान्य माणसं ज्या शास्त्राच्या अज्ञानामु ळे रोजच्या
रोज त्रास सहन करतात आणि ‘आपल्या जीवनावर एवढे दुष्परिणाम करणारं हे शास्त्र
आहे तरी कुठलं ?’ ते देखील त्यांना कळत नाही असं एक शास्त्र आहे . त्या शास्त्राचं
नाव आहे अर्थशास्त्र.
कुठल्याही विशिष्ट वे ळेस मानवी गरजा पाहिल्या तर त्या अक्षरशः अमर्याद असतात.
त्या अमर्याद गरजा भागवण्यासाठीच्या साधनांची मात्र सदै व कमतरताच असते . मग
ही अपु री साधनं आणि अमर्याद गरजा यांची सां गड घालण्यासाठी जी मूलभूत तत्वे
आणि नै सर्गिक यं तर् णा काम करू लागतात त्यांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र असं
मला वाटतं .
आपण ग्रीस, रोम अथवा भारत ये थील पु रातनकालीन अर्थविचार बाजूला ठे वला तर
ऍडम स्मिथ (१७२३-१७९०) याच्या आगमनानं तरच अर्थशास्त्र हे खरोखरचं शास्त्र
बनलं असं म्हणावं लागे ल. ‘वे ल्थ ऑफ द ने शन्स’ या त्याच्या पु स्तकाने अर्थसिद्धांताची
मु हुर्तमे ढ रोवली. त्याचं म्हणणं असं होतं की प्रत्ये क व्यक्ती स्वार्थाने प्रेरित असते
आणि स्वार्थ साधण्यासाठीच काम करते , त्यामु ळे सं पत्तीची निर्मिती होते आणि
समाजाचे कल्याणही साधले जाते . थिअरी ऑफ ऍबसोल्यु ट ऍडव्हांटेज म्हणजे च
विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करण्यातील ‘निखालस लाभ’ या त्याच्या सिद्धांताच्या
आधारावर दे शादे शातला व्यापार घडून ये तो असे त्याचे म्हणणे होते . याच सिद्धांतात
डे व्हिड रिकार्डोने सु धारणा करून’ तु लनात्मक लाभ’ (थिअरी ऑफ कंपॅ रॅ टिव्ह
ऍडव्हांटेज) हा सिद्धांत प्रचलित केला.
त्यानं तर जवळजवळ १०० वर्षांनी कार्ल मार्क्स यानं साम्यवादी सिद्धांताची मांडणी केली.
सर्व मूल्ये (व्हॅ ल्यू) आणि सं पत्ती (वे ल्थ) ही केवळ कामगारच निर्माण करत असतात,
अगदी भांडवल आणि उत्पादनातील घटकही (फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन) कामगारांमुळेच
निर्माण होतात. भांडवलशाहीतले भांडवलदार कामगारांना फक्त जगण्यापु रते च वे तन
दे ऊन त्यांचा न्याय्य वाटा हिरावून घे तात. त्यामु ळे उत्पादनाच्या घटकां वर सरकारचीच
मालकी असली पाहिजे आणि सर्व वस्तूंच्या आणि से वां च्या उत्पादनाचे नियोजन आणि
नियं तर् ण केंद्रवर्ती सत्ते च्या हाती असलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं . तथापि, मानवी
इतिहासातील हा महान प्रयोग सोव्हिएत रशियामध्ये कॉम्रेड ले निन यांनी प्रत्यक्षात
आणला ते व्हा तो केवळ ६० वर्षेच टिकला आणि अत्यं त आपत्तीकारकच ठरला कारण
केवळ पावाच्या एका लोफसाठी आणि पौंडभर मटणासाठी लोकांना रां गा लावाव्या लागू
लागल्या. असा प्रकार तर पाश्चात्य बाजारकेंद्री अर्थव्यवस्थांत अगदी १९३०च्या
महामं दीच्या काळातही अनु भवास आला नव्हता.
माल वाटतं की ही बाजारव्यवस्थे ची निवडसु द्धा सं बंधित लोकांचा स्वभाव आणि मूळ
प्रवृ त्ती यावर अवलं बन ू असते . स्कॅंडिने व्हियन लोकांना भांडवलशाही घटकांसह
सरकारनियं त्रित अर्थव्यवस्था आवडते परं तु साहसी अमे रिकनांना मात्र तशी
अर्थव्यवस्था मु ळीच आवडणार नाही. म्हणूनच तर मागच्या अमे रिकन अध्यक्षीय
निवडणु कीत बर्नी सॅ ं डर्सना ती कल्पना अमे रिकनां च्या गळी उतरवता आली नाही. त्याच
धर्तीवर आपण विचारू शकतो की साम्यवाद्यांना गु जरातमध्ये कधीतरी सत्ता मिळे ल
का? शक्यच नाही. पण ते केरळात सत्ता मिळवू शकतात, कधीकधी पश्चिम
बं गालमध्ये ही मिळवू शकतात. मला वाटतं की लोक जे वढे म्हणून भावनाप्रधान आणि
अतार्कि क असतात ते वढं त्यांना भावनिक स्तरावर ब्लॅ कमे ल करून साम्यवाद्याना सत्ता
हस्तगत करता ये ते. भाजपला केरळातील सत्ता खरं च हवी असे ल तर माझा श्रीयु त
शहांना असाच सल्ला राहील की त्यांनी तिथं हिं दुत्वाची माळ जपणं थांबवावं आणि
केरळी लोकांना शिकवावं की साम्यवादी सत्ते मुळेच ते आर्थिकदृष्ट्या किती मागास
आहे त आणि त्यांची सत्ता असे ल तर पु ढील कित्ये क दशकं तसे च राहातील.
स्वातं त्र्याला ७० वर्षे झाल्यानं तरही आपले ४५ टक्के बं धुभगिनी दारिद्र्य रे षे च्या
खालीच राहात आहे त. आपल्या पहिल्या पं तप्रधानांचं सोव्हिएत रशियाच्या केंद्रवर्ती
अर्थव्यवस्थे वरील प्रेम हे या अपराधामागचं मु ख्य कारण होतं . १९९१ साली
बाजारकेंद्री अर्थव्यवस्था हळू हळू लपतछपत दे शात लागू झाली, त्यानं तरच कुठे
परिस्थिती रुळावर आली. आताही ज्यांची मु ळं अर्थशास्त्रात पक्की रुजले ली आहे त,
असे पं तप्रधान आपल्याला हवे आहे त. सर्व भारतीयांना दारिद्र्यरे षे च्या वर आणून
याच जन्मात चां गली जीवनशै ली द्यायची असे ल तर अं मलबजावणीची मजबूत
इच्छाशक्ती आणि राजकीय कौशल्यं त्यां च्याकडे आहे त. श्रीयु त मोदींना ही जाद ू
करायला जमे ल का? माझ्या शु भेच्छा आहे त त्यांना.
अर्थशास्त्रात लिहिले ल्या गोष्टींचा सर्वसामान्य माणसावर रोजच्या रोज परिणाम होत
असतो. पण तो कसा होत असतो हे मात्र त्याला माहिती नसतं . तज्ञांनी दिले लं
स्पष्टीकरण त्याच्या डोक्यावरून जातं . आर्थिक धोरण, मु क्त बाजारव्यवस्थे नुसार ठरणार्‍
या किंमती, रोजगार, बजे ट आणि त्यातील तूट, एकाधिकारशाही, करव्यवस्था,
महागाई, कमी कमी होणार्‍या परताव्याचा नियम (डिमिनिशिं ग मार्जिनल रिटर्न्स),
सं धियु क्त खर्चाचा (ऑपोर्च्युनिटी कॉस्टचा) सिद्धांत, दोन अर्थव्यवस्थांत सौदे बाजी
(आर्बिट् रेज) कशी होते आणि त्यातून लाभ कसा मिळतो? ते जीमं दीचे व्यापारी चक् र,
जागतिकीकरण इत्यादी सर्वांचा आपल्यावर परिणाम होतो आणि तो परिणाम
आपल्याला निमूटपणे स्वीकारावाच लागतो.
मी १९५८ साली अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) ची पदवी मिळवली. परं तु एमए
करण्यासाठी प्रवे श घे ऊ शकलो नाही कारण नोकरीला अग्रक् रम दे णं भाग होतं .
त्यामु ळे लं डनला १९७२-१९७७ अशी पाच वर्षं होतो ते व्हा सु पर् सिद्ध लं डन स्कुल ऑफ
इकॉनॉमिक्स ये थे गे लो. आल्डविच, सें ट् रल लं डन ये थील माझ्या कचे रीच्या ते अगदी
जवळ होतं . मी सं ध्याकाळी ऑफिस सु टल्यावर तिथं जाऊन अर्धवे ळ मास्टर्सचा कोर्स
करू शकतो का अशी चौकशी मला करायची होती. परं तु त्यां च्याकडे असा काही
अर्धवे ळचा अभ्यासक् रमच नव्हता.
परं तु मला अशी माहिती कळली की लं डन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स सर्वसामान्य
लोकांसाठी केवळ दहा दिवसांचा दोन तासांचा एक अभ्यासक् रम घे ते, त्या योगे त्यांना
या ‘गब्बर सिं ग’ शास्त्रातील किमान प्राथमिक गोष्टी तरी समजतात.
खरोखरच, आपल्याही विद्यापीठांनी आता सर्वसामान्य जनते साठी असे छोटे खानी
अभ्यासक् रम तयार करण्याची वे ळ अगदी ये ऊनच ठे पली आहे , असं म्हणायला हरकत
नाही.
00000000000000000000000000000000000000000000000000000000000
किस्सा ७०
गुलाबाच्या फुलाचं जीवन-
१९८० सालचा ऑक्टोबर महिना होता तो. मी दिल्ली कॅंटोनमें ट भागातील लष्करी
रुग्णालयात दाखल झालो होतो. तीन वर्षांपूर्वी
् च मला हृदयविकार आहे असं कळलं होतं
ते व्हा निरीक्षण आणि उपचारांसाठी मला बंगलोरमधील एअर फोर्स कमांड रूग्णालयात
दाखल केलं होतं.
दिल्लीतल्या रुग्णालयात मी जवळजवळ १० दिवस राहिलो. दहाव्या दिवशी मला
सोडताना माझे कागद बनवण्यात आले . त्यात वै द्यकीय आणि प्रशासकीय अशा
सगळ्याच कागदांचा समावे श होता. सगळे सोपस्कार झाल्यावर मी रूग्णालयातून
बाहे र पडत होतो ते वढ्यात एक नर्स धावत धावत माझ्याकडे ये ऊन म्हणाली की ‘परत
या जरा, काहीतरी काम राहिलं आहे , ते वढं पूर्ण करून जा.’ म्हणून मी तिथल्या वै द्यकीय
अधिकार्‍याकडे विचारायला गे लो ते व्हा तो मला म्हणाला की ‘’सर, आपण ग्रुप कॅप्टन
तने जा यांना भे टावं .’’ पण ते तर रूग्णालयातील मानसोपचारतज्ञ होते . आता
मानसोपचारतज्ञांना भे टायला मला का पाठवत असतील असं आश्चर्य मला वाटू लागलं .
मला तर ‘तसल्या’ समस्या काहीच नव्हत्या.
त्यां च्या कचे रीत शिरल्या शिरल्या ग्रुप कॅप्टन तने जा मला खु र्चीवर बसायला सां गन ू
म्हणाले ,’’ विं ग कमांडर गु णे , कसलं ही टे न्शन घे ऊ नका. तु मच्या काहीही
मानसशास्त्रीय समस्या नाहीत परं तु चाळिशी ओलांडले ल्या सर्वां शीच आम्ही या
विषयावर बोलतो. म्हणूनच केवळ तु म्हाला मला भे टायला सां गितलं आहे . आपण
माणसे जीवनाच्या वे गवे गळ्या टप्प्यातून जात असतो. एखाद्या गु लाबफुलाचं आयु ष्य
असावं ना, तसं च असतं हे . . म्हणजे सु रुवातीला उमलण्याची अवस्था, मग पूर्ण
फुलले ली अवस्था आणि त्यानं तर कोमे जण्याची अवस्था. जीवनाच्या ज्या टप्प्यात
आपण आहोत , त्या टप्प्याशी सु संगत असं आपलं मन आणि शरीर हवं . केवळ
त्यानं तरच आपण आपल्याला मिळाले ल्या जीवनाचा जास्तीत जास्त उपयोग करू
शकतो. म्हणूनच तु मच्या जीवनात जी अवस्था सु रू झाली आहे तिला सच्चे पणाने
सामोरं जा आणि स्वतःला तिच्याशी जु ळवून घ्या. जो टप्पा तु म्ही आधीच ओलांडला
आहे त्याच्याकडे मागे वळू न पाहू नका अथवा ज्या पु ढल्या टप्प्यात तु म्ही नं तर प्रवे श
करणार आहात, त्याच्याकडे ही पाहू नका. तथापि, या सर्व पु ढल्या टप्प्यांतन ू जाण्याची
मनाची तयारी मात्र करून ठे वा. कुणीही हे टप्पे टाळू शकत नाही. ते निसर्गाने च ठरवून
ठे वले आहे त. जीवनाचे चक् र आहे ते . त्यामु ळे त्यांचा आनं द घ्या.
हे ऐकलं ते व्हा मी ४३ वर्षांचा होतो आणि आज ८३ वर्षांचा आहे .
आणि हो, डॉ. तने जांनी थोडक्यात सां गितले ली माहिती मला खूपच मोलाची ठरली
आहे .
00000000000000000000000000000000000000000000000000000000000

You might also like