You are on page 1of 3

अ॒ सु॒ र्या॒ नाम॑ ते लो॒का अ॒ न्धेन॒ तम॒ सावृ॑ ताः ।

तास्ते प्रेत्या॒भिग॑ च्छन्ति॒ ये के चा॑त्म॒ हनो॒ जनाः॑ ॥३॥

जो कोणी आपल्या आत्म्याचा घात करतो, ते लोक येथून प्रयाण के ल्यावर अशा जागी पोहोचतात

जेस्थान सुर्यरहित आहे आणि घोर अं धकाराने झाकू न गेले आहे. असा याचा अर्थ.

आत्महनः म्हणजे आत्म्याचा नाश करणारा अथवा आत्मघातकी असा आहे. सुरवातीला मला

वाटले की आत्मा हे अविनाशी तत्व आहे मग त्याचे हनन कसे होईल? पण जर आत्म्यालाच, त्या

आत्मतत्वाला जर लोक विसरले , त्याला जाणून नाही घेतलं तर तो आत्मघातच म्हणावा लागेल

ना. असे लोक मरणानं तर अश्या असूर्य, अं धःकाराने भरलेल्या लोकात पोहोचतात. आपण सूर्य

रहित, उजेडरहित जगाची कल्पनाही करू शकत नाही. सूर्य या जगाला ऊर्जा प्रदान करतो. मागच्या

दोन श्लोका नुसार, हे सर्व जग ईश तत्वाने व्यापले आहे, जे आत आहे तेच बाहेरही आहे असे

जाणत, जगाचा त्यागाने उपभोग घेत, विहित कर्मे करत जगण्याची इच्छा करायची, याने

कर्मबं धनापासून सुटका होते. पण याचा ज्यांना विसर पडतो ते आत्मघातकी ठरतात व घोर,

अं धकारमय जगतात जाऊन पोहोचतात.

हे विश्वव्यापक तत्व कसे आहे ते पुढे सांगितले आहे.

अने॑ ज॒ देकं॒ मन॑ सो॒ जवी॑यो॒ नैन॑ द्दे॒ वा आ॑ प्नुव॒ न्पूर्व॒ मर्श॑ त् ।

तद्धाव॑ तो॒ऽन्यानत्ये॑ ति॒ तिष्ठ॒ त्तस्मि॑ न्न॒ पो मा॑त॒ रिश्वा॑ दधाति ॥४॥

ते आत्मतत्व आपल्या स्वरूपाहून जराही विचलित न होणारे, एक आहे तसेच मनाच्या पेक्षा

तीव्र गतिमान आहे. याला इं द्रिये गाठू शकत नाहीत किंवा प्राप्त करू शकत नाहीत कारण ते त्या

सगळ्यांच्या आधी पोहोचले आहे. ते स्थिर असूनसुद्धा इतर सर्व गतिमान गोष्टीच्या पुढे जाते. मन

कल्पनेने जिथे जिथे जाऊ शकते तिथे तिथे आधीपासूनच ते आहे म्हणून मनापेक्षा गतिमान आहे.

असे कोणतेही स्थान नाही जेथे त्याचे अस्तित्व नाही, देवच जिथे जाऊ शकतील तेही आधीपासूनच

त्याने व्यापले आहे. सर्व प्राणांना जीव प्रदान करणारा वायू म्हणजे प्राणवायू इतर द्रव्यांना धारण

करून जग निर्मिती करतो.


सर्वशक्तिमान अचल त्याचबरोबर मनोवेगापेक्षाही गतिमान ! त्याग करून भोग घेणे , आत्मघात

आणि आता हा तिसरा विरोधाभास अचल आणि गतिमान. आता पुढे

तदे॑ जति॒ तन्नै॑ जति॒ तद्दू॒ रे तद्व॑ न्ति॒ के ।


तद॒ न्तर॑ स्य॒ सर्व॑ स्य॒ तदु॒ सर्व॑ स्यास्य बाह्य॒ तः ॥५॥

हे जे काही आहे ते एका वेळी स्थिर भासते पण त्याच वेळी हे सतत हलणारे आहे असे भासते.
एकाचे वेळी आपल्यापासून दूर व जवळही आहे. आत बाहेर सर्वत्र याचे अस्तित्व भरून आहे. असे
म्हणतात कि इलेक्ट्रॉन अणू च्या कें द्राभोवती सतत वेगाने भ्रमण करत असतो, पण त्यामुळे च
अणूचे स्थिर अस्तित्व आहे. थक्क करणारा साधर्म्य!

यस्तु सर्वा॑णि भू॒ तान्या॒त्मन्ने॒ वानु॒ पश्य॑ ति ।


स॒ र्व॒ भू॒ तेषु॑ चा॒त्मानं॒ ततो॒ न वि जु॑ गुप्सते ॥६॥

जो नेहमी स्वतः मध्ये सर्व भूतमात्रांना पाहतो आणि सर्व भूतमात्रांमध्ये स्वतःला पाहतो, तो
कशाचीही घृणा करत नाही. कु णाचाही तिरस्कार करत नाही. म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्माण्डी. मीच
सगळीकडे भरून आहे किंवा सगळे च माझ्यात आहेत तर मग कु णाचा राग अथवा तिरस्कार कसा
होणार? यावरूनच कदाचित सं दीप खरेंनी लिहिले असेल : ‘एक मी सारसार बघणारा, माझ्यात सारे
साऱ्यात मी पाहणारा ‘

यस्मि॒ न्त्सर्वा॑णि भू॒ तान्या॒त्मैवाभू॑ द्विजान॒ तः ।


तत्र॒ को मोहः॒ कः शोक॑ एक॒ त्वम॑ नु॒ पश्य॑ तः ॥७॥

जेंव्हा, जिथे विशेष प्रकारे जाणणाऱ्याचा आत्माच (वरच्या श्लोक ६ मध्ये सांगितल्या प्रमाणे) सर्व
भूतमात्रे झाला, तेंव्हा त्या सर्वत्र सतत एकत्व पाहणाऱ्याला कु ठला मोह? कु ठला शोक?

स पर्य॑ गाच्छु॒ क्रम॑ का॒यम॑ व्र॒ णम॑ स्नावि॒ रशु॒ द्धमपा॑पविद्धम् ।


क॒ विर्म॑ नी॒षी प॑ रि॒ भूः स्व॑ यं॒ भूर्या॑थातथ्य॒ तोऽर्था॒न्व्य॑ द धाच्छाश्व॒ तीभ्यः॒ समा॑भ्यः ॥८॥
ज्याची अशी लोभ, मोह, शोकरहीत समाधानी ऐक्यभावना दृढ असते तो महात्मा परमेश्वर रूप

होतो. तो परमेश्वर कसा आहे? तो सर्वसाक्षी, स्वयं भू, सर्व वैभव सं पन्न, अविनाशी शरीर असलेला,

तेजोमय, सर्वज्ञ, ज्ञानस्वरूप व प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना योग्य त्या स्थितीत ठे वणारा असा आहे.

अ॒ न्धं तमः॒ प्र वि॑ शन्ति॒ येऽवि॑ द्यामु॒ पास॑ ते ।

ततो॒ भूय॑ इव॒ ते तमो॒ य उ॑ वि॒ द्याया॑ र॒ ताः ॥९॥

अज्ञानी लोक तर ईश्वराच्या अप्राप्तिरूप अं धारात, जेथे काही दिसत नाही त्या अं धकारात पडतात -
हे अविद्येने घडते, पण विद्याभ्यास करणारे व त्यातच सर्वस्वी बुडू न राहिलेले अर्थात ज्ञानी,
विद्यावं तही पुन्हा, जाणूनबूजून अं धारातच शिरतात.
अज्ञानी लोक तर तम गाठतातच पण ज्ञानी लोक सुद्धा अं धःकारात जातात. ते कसे? जर
ज्ञानी किंवा विद्यावं तांनी मिळालेल्या ज्ञानाचा गर्व के ला व त्या अस्तित्वाला सार्वभौमत्वाला
विसरले, विहित कर्मे नाही के ली, तर ते पुन्हा अं धारातच जातात. ज्ञान व ज्ञाता असे द्वैत आले तर
तेही अज्ञान मूलकच आहे. मला वाटते कि पुनःपुन्हा हे ‘तेन त्यक्तेन भुं जिता ‘ याचेच हे पडसाद
आहेत.

क्रमशः

You might also like