You are on page 1of 35

भगवद गीता

अध्याय ९
राजविद्या राजगृह्ययोग
(परमगोपनीय ज्ञान)
श्रीभगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥१॥

श्रीभगवान म्हणाले: हे अर्जुना! तू माझा कधीच मत्सर


करीत नसल्याने, मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि
त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू
भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील.
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥२॥

सर्व गोपनीय ज्ञानांत अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व


ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते
अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची
परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास
अत्यंत सुखकारक आहे.
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥३॥

हे परंतप अर्जुना! ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही


त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक
जगतामध्ये जन्म-मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन
होते.
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥४॥

मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे.


सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी
नाही.
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥५॥

तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे


हे योग ऐश्वर्य पाहा! जरी सर्व जीवांचा पालनपोषणकर्ता
आणि सर्वव्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा
अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे.
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥६॥

ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव


आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी
माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृ तिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥७॥

हे कौतेया! कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती


माझ्या प्रकृ तीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या
आरंभी, माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो.
प्रकृ तिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृ त्स्नमवशं प्रकृ तेर्वशात् ॥८॥

संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या


इच्छेनेच ती पुनः पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच
शेवटी तिचा प्रलय होतो.
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥९॥

हे धनंजया! ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत.


तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त
असतो.
मयाध्यक्षेण प्रकृ तिः सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥१०॥

हे कोंतेया! माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही


भौतिक प्रकृ ती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व
चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच
या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥११॥

जेव्हा मी मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा


मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व
वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते
जाणत नाहीत.
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृ तिं मोहिनीं श्रिताः॥१२॥

याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि


नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित
अवस्थेमध्ये, त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे
आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते.
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृ तिमाश्रिताः ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥१३॥

हे पार्थ! मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृ तीच्या


आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त
झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण
आणि अविनाशी, पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून जाणतात.
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते॥१४॥

हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, दृढनिश्चयाने


प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य
माझी उपासना करतात.
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्॥१५॥

इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंतांची


एकमेवाद्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट
विश्वरूपात उपासना करतात.
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्॥१६॥

परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजांना अर्पण


करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे.
तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे.
पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च॥१७॥

मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह


आहे. मी ज्ञेय, शुद्धिकर्ता आणि ॐकार आहे. तसेच,
ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे.
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्॥१८॥

मीच ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास,


आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती
आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि
अविनाशी बीजही मीच आहे.
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन॥१९॥

हे अर्जुना! मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो


आणि पाडवितोही, मी  अमृततत्त्व आहे आणि मूर्तिमंत
मृत्यूही मीच आहे. सत्(चेतन) आणि असत्(जड
पदार्थ) दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत.
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक-
मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥२०॥

वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे


स्वर्गलोकाची प्राप्ती करीत पुण्यलोकामध्ये जन्म घेतात
आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग
उपभोगतात.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते ॥२१॥
याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग
घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्युलोकात
परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे (सिद्धांताचे)
पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात, त्यांना पुनः
पुन्हा के वळ जन्म-मृत्यूच्या चक्रात पडावे लागते.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥२२॥

परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य


स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या
गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे
मी रक्षण करतो.
येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्॥२३॥

हे कोंतेया! जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे


त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन
करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने
के लेली असते.
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते॥२४॥

सर्व यज्ञांचा मीच के वळ भोक्ता आणि स्वामी आहे.


म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्त्वतः जाणत नाहीत
त्यांचे पतन होते.
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्॥२५॥

जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म


प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात, ते पितरांकडे
जातात, जे भूतांची उपासना करतात, त्यांना
भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा
करतात ते माझी प्राप्ती करतात.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः॥२६॥

जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान,


फू ल, फळ अथवा पाणी अर्पण के ले तर मी त्याचा
स्वीकार करतो.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कु रुष्व मदर्पणम्॥२७॥

हे कौंतेया! तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे


हवन करतोस किं वा दान देतोस आणि तू जे तप
करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि॥२८॥

याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ


फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यासयोगाने युक्त
होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर के ल्याने तू मुक्त
होऊन मलाच प्राप्त होशील.
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्॥२९॥

मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही


करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो
कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र
आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा
मित्र आहे.
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः॥३०॥

जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये


जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे,
कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित
झालेला असतो.
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति॥३१॥

तो लवकरच धर्मात्मा (सदाचारी) होतो आणि त्याला


शाश्वत शांती प्राप्त होते, हे कोंतेय! निर्भय हो आणि
घोषणा कर की, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्॥३२॥

हे पार्था! जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच


कु ळातील, स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम
गती प्राप्त करू शकतात.
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्॥३३॥

तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षीबद्दल काय


सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये
आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कु रु।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः॥३४॥

आपले मन, सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर,


माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन
कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच
मला प्राप्त होशील.

You might also like