You are on page 1of 2

मानसिक आजार समजून घेणे ही आधुनिक मानवी

आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.


मुलांसोबत काम करताना अनेकदा असे दिसून येते
की त्यांच्या पालकांना मानसिक आजार ही
संकल्पना माहीतच नसते आणि आपल्या मुलाला
काही मानसिक आजार आहे हे स्वीकारण्यास
त्यांना खूप त्रास होतो. आजार या शब्दाकडे आपण
कलंक म्हणून न पाहणे आपल्या सर्वांनाच
समजायला हवे. मी असे पाहिले आहे की अनेकदा
डॉक्टर लोक देखील मानसिक आजाराबद्दल
कलंक मानतात. याचे साहजिक कारण देखील
आहे. भारतीय समाजात एमबीबीएस चे शिक्षण
देताना सायकियात्ट्री या विद्याशाखेबद्दल फारच
मोजके शिकवले जाते.

प्रत्यक्ष मानसोपचार तज्ञ एमबीबीएसच्या


विद्यार्थ्यांना शिकवण्यास असतील तर त्या मुलांना
मानसिक आजारांची ओळख, त्याचा समाजावर
होणारा परिणाम, मानसिक आजारावरील कलंक
निर्मूलनाचा भाग इत्यादि अनेक बाबी चांगल्या
पद्धतीने समजतील. अन्यथा विद्यार्थ्यांना शारीरिक
आजारांबद्दल जितके एक्सपोजर मिळते तितके
मानसिक आजारांबद्दल आढळत नाही. हे आपण
समाज म्हणून बदलणे आवश्यक आहे.

You might also like