You are on page 1of 3

College code :10-03

Story Telling Group A ( Marathi )

भीमा%ा

सकाळी दहाची िमटींग, पण भीमाक्का आज पहाटे चारला उठली होती. .आं घोळ
आटोपून ितने मनोभावे पूजा केली. कुत्र्याला भाकरी टाकली, मांजराला दूध घातलं. दाराला
कुलुप घालून (आिण ते तीनदा ओढू न) ती लगबगीने एस.टी.च्या थांब्यावर आली.
नुकतं कुठे िभनिभनायला लागलं होतं. हळुहळु उजाडलं. माणसं जमा व्हायली लागली.
सकाळी सातला येणारी एसटी अचूक साडेसातला आली. मजल दरमजल करीत जणू वाटेतल्या
प्रत्येक झाडाची िवचारपूस करीत एसटी एखाद्या रमणीसारखी सावकाश चालली होती.
इतका वेळ काढु न सुद्धा एसटी बरोबर नऊला पोचली. मुलाखत दहाची होती, म्हणुन
भीमाक्का बाजारात गेली. पान सुपारी तंबाखु, मनासारखं पोलक्याचं कापड एवढं घेतलं.
हाटेलात एका कोप-यात बसुन ितची आवडती गुळ्याची गरम गरम भजी आिण चहा घेतला
आिण मग िवचारत िवचारत पावणेदहाला हािपसात पोचली. हािपसात बघते तर बरीच माणसं
येऊन बसली होती. केस, साडी ठाकठीक करुन ती पण आपले नाव पुकारण्याची वाट बघत
बसली.
ितचं नाव पुकारताच लगबगीनं ती उठली आिण सगळ्यांसमोर जाऊन उभी रािहली.
ितला बघुन सगळे जण अवाक झाले. ितला ओळखणारे नाटेकर सर पण थक्क झाले. भीमाक्का
राणा भीमदेवीच्या थाटात उभी होती.
नऊवारी लफ्फेदार लुगडं ती नेसली होती. गळ्यात ठु शी आिण चंद्रहार होता. हातात
बांगड्या, पाटल्या, अंगठ्या चमकत होत्या. कानात मोत्याची कुडी होती, कानाभोवती वेल
होती.
नाटेकर सरांनी ितला कसंबसं ‘बसा’ म्हटलं. मग ितचं नाव आिण काही जुजबी प्रश्न
िवचारलं. काही कागदपत्रं मािगतली. ती देऊन ती समाधानाने बाहेर पडली. एकची गाडी
पकडु न दोन वाजता घरी पोचली.
एका छोट्याशा घरात भीमाक्का एकटीच रहात होती. ितचं लग्न झालं होतं, पण
लग्नानंतर मिहनाभरात िवधवा होऊन ती कायमची माहेरी आली होती.दोन भाऊ आपल्या
कुटु ंबाबरोबर मुंबईत रमले होते. आपल्या िवधवा एकाकी बिहणीचं त्यांना फारसं देणंघेणं
नव्हतं. आइविडल गेल्यावर भीमाक्का अगदीच एकटी पडली. वाडीतल्या लोकांची पडेल ती
कामं करुन, एक मांजर आिण कुत्रा पाळुन ती आला िदवस घालिवत होती.
शासनानं संजय गांधी िनराधार योजना आणली आिण नाटेकर सरांची त्या किमटीवर
नेमणूक झाली. शेट्ये वाडीतील सगळ्यांनी भीमाक्काला त्या योजनेचा लाभ देण्याची िवनंती
त्यांना केली. नाटेकर सरांना सगळी पिरिस्थती मािहत होतीच. त्यांनी ितला आवश्यक ती
कागदपत्रं घेऊन िमटींग िदवशी कुडाळला यायला सांिगतलं होतं.
मुलाखत देऊन चांगले दोन मिहनं उलटले. पण काहीच िनरोप िमळाला नाही, म्हणुन
समक्षच काय ते िवचारावे म्हणुन संध्याकाळी सहाच्या सुमारास ती नाटेकर सरांच्या घरी गेली.
सर नुकतेच घरी आले होते. त्यांच्याबरोबर बाईंनी भीमाक्कालासुद्धा चहा िदला आिण
गप्पागोष्टी सुरु झाल्या.
‘मास्तरांनु, आता मुलाखतीक दोन म्हयने उलाटले म्हणान म्हटला चौकशी करुया.
आजून कायच समजाक नाय. पुढे जाला काय?’
‘अगे भीमाक्का, ते िदसा मुलाखतीक तू एवढे दागदािगने घालून कशाक ईलस? माझो
बारसो होतो काय लगीन होता? िनराधार लोकांका पेन्शन िमळाक होयी म्हणान सरकारान ही
योजना आणली आिण बाये तू राजाची राणी कशी नटान थटान ईलस. कपाळावर हात मारुन्
घेवची वेळ इली माज्यावर....’ मास्तर वैतागत म्हणाले.
त्यांचा वैताग बघुन बाईंना आिण भीमाक्काला दोघांनाही हसु आलं....‘अहो, पण माझा
म्हणणा जरा आयकून घेवा. एकोिणसाव्या वषीर् माझा लगीन झाला आिण िवसाव्या वषीर् ऐन
उमेदीत मी कायमचा माहेरी इलय. तेवापासुन आतापयत
र्ं मी कशे िदवस काढले माझे माकाच
म्हायती.माणसाक एकलेपणा लय िभववता कुत्रो आिण मांजुर बाळगून िमया जीव रमवतय ता
मरांदेत ता सदीचाच आसा दुखणा
तर ते िदसा मी तालुक्याक जातलंय म्हटल्यावर सगळी जणां म्हणाक लगली अशी
गळ्यान हातान उघडी जाव नुको. मगे सावतीणीन काकणा िदल्यान. गोवेकारणीन आं गठी
घातल्यान. जरीचा लुगडा जैतापकरणीचा. तुमच्या बायलेन फोये हार िदलो. कोणी कुडी िदली,
कोणी माळ िदली. मगे माका पण तेंचा मन मोडु चा जीवावर ईला.’ बोलता बोलता
भीमाक्काचा गळा भरुन आला.
‘अगे, पण िनराधार योजनेत ह्या कसा चलतला?’ नाटेकर मास्तर समजुतीत म्हणाले.
‘मास्तरांनु, तुमचा सगळा बरोबर.... माका लग्नात घातलली एक डवली आिण कुडी
पण िगिलटाची होती. माझा कपाळ िवसाव्या वषीर् फुटला.तेवर आजतगत माझ्या आं गाक
एकय खरो दािगनो लागाक नाय हुतो! माका पण सगळा एक टायम घालीनसा िदसला.बायल
माणसाची हौस ओ... आिण काय? पण घराकडे येतानाच बाये सगळे दािगने देवन िरकाम्या
हातीनच घराकडे इलय माका कोणाचो फुकटचो सुतळीचो तोडो पण नुको..!
माझी चुकी झाली.ˆहया कबुल पण मास्तरांनु, एकवेळ पेणसल नाय गावली तरी
चलात... आतासारकेच पेजेवर िदवस काढीन. पण बाये मन माझा भरला. फुडचा फुडे. जेणा
चोच िदली, तो चारो पण िदतलो.
ह्या भरल्या जगात माजा पण कोणतरी आसा इतक्या माका पुरे.....’
असं म्हणुन भीमाक्कानं पदरानं डोळे पुसले. बाईंनी पण दाराआडु न अश्रुंना वाट करुन
िदली. मास्तर गप्पच झाले.
भीमाक्काच्या अंगावर गळ्यातला काळा दोरा आिण काचेच्या बांगड्या याखेरीज
कसलाच दािगना नव्हता......
०००००

You might also like