You are on page 1of 19

अभंग तिसरा

मृत्युलोकीं आम्हा आवडती परी । नाही एका हरिनामेंविण ।।१।।


विटले हे चित्त प्रपंचापासनि
ू । वमन ते मनी बैसलेंसे ।।२।।
सोने रूपे आम्हा मृत्तिके समान । माणिक पाषाण खडे जैसे ।।३।।
तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हा पुढे ।।४।।
भूमिका:- या अभंगातील तुकाराम महाराजांचे उद्गार कोणत्या भूमिके वरचे असावेत याची कल्पना येण्याकरिता
भूमिके चा विचार सांगतो. या अभंगाच्या चारी कडव्याचा विचार के ला तर अभंगाची भूमिका कळून येईल. या सगळ्या
अभंगातून तुकाराम महाराज के वळ वैराग्य सांगतात. वैराग्याच्या भूमिके वरचे महाराजांचे हे उद्गार आहेत. वैराग्याचे
जिहासा, जिज्ञासा असे निरनिराळे प्रकार आहेत. दोषदृष्टीने उत्पन्न झालेल्या क्षणिक वैराग्याच्या भूमिके वरचे उद्गार
नाहीत. ते वैराग्य टिकत नाही. ज्यांच्या संबध
ं ाने दोष दृष्टि उत्पन्न झाली, पण पुढे त्याच्या संबंधाने गुणदृष्टी उत्पन्न झाली
तर ते वैराग्य संपते.
स्त्रीचे प्रसूतकाळी पोट दुखू लागले, म्हणजे वेदना होऊ लागल्या त्यावेळी ती म्हणते- "निजता आला मोहो । वीता मेला
गोहो ।।५।। तु. ३०३८" मग संपले का? नाही दुसऱ्या प्रसूतीची तयारी. यालाच जिहासा वैराग्य म्हणतात. जे विचाराने
अथवा ईशप्रसादाने वैराग्य उत्पन्न होते त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात हे खरे वैराग्य आहे . " उठिलेनि वैराग्य जेणे ।
हा त्रिवर्ग ऐसा सांडणे । जैसे वमुनिया सुणें । आताचि गेले ।।ज्ञा. १५। २५६" साधकाच्या अंतकरणात वैराग्याने डोके
बाहेर काढल्याबरोबर तिन्ही लोकातले ऐश्वर्य कुत्र्याच्या ताज्या वांतीप्रमाणे वाटले पाहिजे . सुकलेली वांती नव्हे; ज्या
वांतितुन वाफा निघतात. अशी वांती कोणाला घ्यावी वाटे ल काय ? वांतीची गोष्ट सोडा, पण दूर कुत्रे ओकू लागले,
ओकले नाही, असे ऐकल्याबरोबर अंगावर शहारे उभे राहतात.
असले कडकडीत वैराग्य साधकाच्या मनात कें व्हा उत्पन्न होते? एक प्रपंचाच्या मिथ्यापणाच्या विचाराने किंवा
ईशकृपेने.
आता विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनाने वरी ।।ज्ञा. १५।३७
जे विषे रांधिली रससोये । जै जेवणारा ठाऊवी होये । तै तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ।।ज्ञा. १५।३८
असे वैराग्य कें व्हा उत्पन्न होते? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांताने सांगतात- जेवणाऱ्याला विषयुक्त अन्नाचे ज्ञान झाल्यानंतर
जसा त्या अन्नाचा त्याग करून तो निघून जातो, त्याप्रमाणे . "तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जै अनित्यता । तै वैराग्य
दवडिता । पाठी लागे ।।ज्ञा. १५।३९" त्याप्रमाणे सत्संगतीने प्रपंचाच्या अनित्यत्वाचे ज्ञान झाल्यानंतर वैराग्य उत्पन्न
होते. दुसरे ईशप्रसादाने. परंतु ईश्वर प्रसाद कें व्हा करतो? "तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा । पूजा के ली
होय अपारा । तोषालागीं ।।ज्ञा. १८। ९१७" साधक ज्या वर्णात, आश्रमात असेल त्या वर्णाश्रमाला जे विहित कर्म
सांगितले असेल, त्या स्वकर्मरूपी फुलांची पूजा के ली असता, ती पूजा त्या सर्वात्मक ईश्वराच्या अपार संतोषला
कारणीभूत होते. म्हणौनि तिये पुजे । रिझलेनि आत्मराजे । वैराग्यसिद्धी देइजे । पसाय तया ।।ज्ञा. १८। ९१८ असे
ईशप्रसादाने उत्पन्न झालेले वैराग्य असते.
जिये वैराग्यदशे । ईश्वराचेनि वेधवशे । हे सर्वही नावडे जैसे । वांत होय । ज्ञा. १८।९१९अशा ईश्वरप्रासादाने वैराग्याच्या
भूमिके वर येऊनच, महाराज म्हणतात की:
मत्ृ युलोकीं आम्हा आवडती परी । नाही एका हरिनामेविण ।।१।। महाराज म्हणतात या अखिल मत्ृ युलोकामधे आम्हाला
भवतं ाच्या नामावाचून कोणताही प्रकार आवडत नाही. आवडत असेल तर-भगवतं ाचे नाम. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची
जोडी । रामकृष्ण आवडी सर्वकाळ ।।२।।
अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात म्हटले आहे की - विटले हे चित्त प्रपच
ं ापासनि
ू । वमन ते मनी बैसलेंसे ।।२।। प्रपच
ं ापासनू
माझे चित्त इतके विटले की, हा ससं ार माझ्या मनाला वांतीसारखा वाटू लागला. नको हा सस ं ार अशी किळस आली.
"सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आता कोण भाव निवडू एक ।।१।।तु. २२९५"
सस
ं ाराची मज न साहेंचि वार्ता । आणिक म्हणता माझे कोणी ।।२।।तु. २९९५
भोजन समयी ओकाचा आठव । ठाकोनिया जीव कष्ट करी ।।३।।तु. ३१३०
भोजन करीत असलेल्या मनष्ु यासमोर वांतीची कथा सांगू लागला तर जेवणाऱ्याला ऐकावीशी वाटणार नाही. "सोने
रूपे आम्हा मृत्तिके समान । माणिक पाषाण खडे जैसे ।।३।। वांतीसारखा प्रपच ं मनात बसला; स्त्री, द्रव्य, गायी, म्हशी,
घर, दार, पुत्र, द्रव्य या सर्वांचा अंतर्भाव सस
ं ारात होतो. सस
ं ारात जीवाला मोहून टाकणारे , पागल करणारे हजारो पदार्थ
आहेत, पण त्यातल्यात्यात स्त्री व धन हे दोन मोठे आहेत.
स्त्रिया धन हे बा खोटे । नागवले मोठ मोठे ।।१।।
म्हणोनि सांडा दोन्ही । सुख पावाल निदानी ।।२।।
सर्व दुःखाशी कारण । हीच दोन्हीच प्रमाण ।।३।। तु. ४३११
सगळा प्रपंच अनित्य, सुखरूप आहे. पण त्या प्रपंचात हे दोन विषय मुख्य. लोकांमध्ये द्रव्याचा किती लोभ?
पैशाकरिता नाही नाही ते खोटेनाटे काम करतात.
द्रव्य जीवाहुनी आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनी हीन ।।३।।
पैशापुढे मनुष्य आई, बाप, देवधर्म कंपाची पर्वा करीत नाही. पैसा हाताचा सुटता सुटत नाही. द्रव्य अती अनर्थमूलक-
द्रव्याचीया मागे कळिकाळाचा लाग । म्हणोनिया संग खोटा त्याचा ।।तु. ३४३२ मनातुन पैसे द्यावयाचा नसला तर
आणा-शपथा घालून मोकळा होतो. पदोपदी खोटे बोलतो. त्या द्रव्याचा किती मोह? जिवापेक्षा अधिक प्रिय -तर
आहे. पैशाकरिता जीवही देतात. नामसप्ताहात मंडळी वर्गणीला निघतात. एकाध्याकडे ती पुढारी मंडळी येऊन बसली व
यादी पुढे ठे वली. त्याची ऐपत ५० किंवा १०० रुपये देण्याची असते, तरी तो यादीत १ किंवा २ रुपये आकडा घालतो.
पुढारी म्हणतो, ' शेटजी एक रुपया देणे शोभते का?' शेटजी म्हणतो तुम्हाला काय होय? उचलली जीभ लावली
टाळ्याला. तुम्ही द्या ना ! पैसे हातचा सुटत नाही. ससं ारी माणसाची तर गोष्ट सोडा; पण सर्वसंगपरित्यागी परमार्थी
म्हणवणारे त्यानांही द्रव्याचा लोभ सुटत नाही. " नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया । भस्म दडं छाया तरुवराची ।।१४।।
तु. ३५६ साधक परमार्थाला लागला म्हणजे तीन खड्डे ओलांडावे लागतात. बायका, पैका आणि प्रतिष्ठा.
एक मूर्ख त्यागी रानामध्ये अंगाला राख लावनू , दोन्ही हात वर करून झाडाखाली बसला होता. त्याठिकाणाहून एक
शहर जवळ होते. तेथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे कुटुंब वारले. मुले लहान होती. त्याच्याजवळ पाच हजार रुपये होते.
तो नेहमी रानात त्याच्या दर्शनाला जात होता. त्या दांभिकाला त्याच्या जवळ आपले डबोले ठे वले तर सुरक्षित राहील
म्हणून हा ब्राह्मण त्या वैराग्याकडे गेला. त्या वैराग्याने विचारले- "किधर आये. " ब्राह्मण म्हणाला गावात
ज्याच्याजवळ ठे वावे तोच गडप करील म्हणून आपल्याजवळ ठे वण्यास आलो. "भले रख जाव " साधू म्हणाला.
ब्राह्मण म्हणाला, कोठे ठे वू ? " कही भी रख जाव, हम तो छुते नही " ब्राह्मणाने ते जमिनीत पुरले. ब्राह्मण गेल्यानंतर
वैराग्याच्या तोंडाला पाणी सटु ले. ठे वलेल्या द्रव्याजवळ गेला, जागा उकरली व दुसरीकडे परू ु न ठे वले . ब्राह्मण कशी
यात्रेहून परत आल्यानतं र बैराग्याकडे गेला. बैरागी म्हणाला - कब आये ? ब्राह्मण म्हणाला चार दिवस झाले. रक्कम
घेण्याकरिता आलो. अच्छा ले जाव, हमको क्या करनेका है? हमतो छुते नही. ब्राह्मणाने ठे वल्या जागी उकरण्यास
सरुु वात के ली; पण द्रव्य भेटेना तेंव्हा तो म्हणाला, महाराज, या ठिकाणी डबोले नाही. बैरागी म्हणाला हमको क्या
पछु ते? निकल जाव । हमको मालमू नही । हम तो छुते नही । ब्राह्मण रडत चालला. त्याला एका बाईने विचारले,
भटजीबवु ा का रडता? सर्व घडलेला वत्त ृ ांत बाईजवळ सांगितला. बाई म्हणाली दुपारी बारा वाजता त्या बैराग्याकडे या
! रक्कम परत मिळे ल असे मी काही करते . त्याबाईने आपल्या मल ु ीला असे काही सांगितले की मी त्या बैराग्याकडे
जाते. तू एक वाजता ' बाई भाई आया ' असे म्हणत ये. बाईने एक मोठे गाठोडे घेतले व त्या बैराग्याकडे गेली. बैराग्याने
गाठोडे पहिले व बाईला विचारले. " कायके लिये आयी ? " बाई म्हणाली माझा भाऊ देशांतराला गेला, त्याच्या
भेटीला जावयाचे आहे. सोने, नाणे मिळून रक्कम दहा हजाराची आहे. तुमच्याजवळ ठे वावी म्हणून आले. तितक्यात
ठरल्याप्रमाणे ब्राह्मण आला बाईने शिकवल्याप्रमाणे बैराग्याला ब्राह्मण म्हणू लागला, महाराज येथेच मी डबोले ठे वले
होते ना ! बैराग्याने विचार के ला की पाच हजार दिले नाहीत तर बाई दहा हजार ठे वणार नाही. बैरागी म्हणाला- अरे
मुरख राखता कहा है और देखता कहा है ? अरे यहा नही उधर देख । त्यानेच तेथे ठे वले होते . बाईचे नस ु ते चिंध्यांचे
गाठोडे होते. ब्राह्मणाला ठे वा मिळाला. बाई खड्डा खोदत होती इतक्यात तिची मुलगी ठरलेल्या वेळात आली व
म्हणाली, " बाई भाई आया " बाई म्हणाली महाराज मी आता जाते , आता डबोले ठे वण्याची गरज नाही. ते मी घेऊन
जाते. तिघे हसायला, नाचायला, रडायला लागले मार्गाने जाणारा एक सभ्य गृहस्थ त्याने हे दृश्य पाहिले , ब्राह्मणाला
विचारले. "क्यों हासते नाचते हो ! " तो ब्राह्मण म्हणाला "मेरा गठडा पाया " नंतर बाईला विचारले, तू क्यों हांसती,
नाचती हो ? बाई म्हणाली "भाई आया आया " नंतर बैराग्याला विचारले, तुम क्यों रोते गुरुराया? " बहोत देखकर
थोडा भी गंवाया दस हजार भी गये और पाच हजार भी गया, अब रोना नही तो क्यां हसना?
सर्वसंगपरित्यागी, लंगोटी घातलेला, अंगाला राख फासून झाडाखाली बसलेला, त्यालाही द्रव्याचा मोह सुटला नाही.
पण तुकाराम महाराज म्हणतात-
" सोनेरुपे आम्हा मृत्तिके समान । माणिक पाषाण खडे जैसे ।।३।। पंढरपुरात, जळोजी मळोजी दोन्ही भाऊ वैराग्यसंपन्न
होते. एका राजाने गावात अन्न व द्रव्य वाटले . हे दोघे गेले नाहीत. राजाने चौकशी के ली, कोण राहिले म्हणून ! तेंव्हा
जळोजी, मळोजी आले नाहीत व येणार नाहीत असे कळले . ते झोपेत असतांना राजा त्यांच्या घरी द्रव्य ठे ऊन गेला.
सकाळी उठल्यावर मोहरांकडे पाहून जळोजी मळोजीला म्हणाला, कोण येथे घाण करून गेला? त्यांनी त्या मोहरा विष्ठा
समजून उकिरड्यावर टाकल्या. हे खरे वैराग्य.
अलीकडे साधू काहीतरी निमित्त करून पैसा मिळवितात. या काठीला, या गायीला पैसे मिळाला करून खिसा
भरायचा. " या नाम सप्ताहाला" " या यज्ञाला" असा परमार्थाच्या नावाने पैसे मिळवतात, निदान परमार्थाचा पैसा तरी
परमार्थाला लावावा.
देखे सोनीयाचे निखळ । मेरू येसने ढिसाळ । आणि मातीयेचे डीखळ । सरिसेंचि मानी ।। ज्ञा.६-९२
पाहता पृथ्वीचे मोल थोडे । ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे । देखे दगडाचेनि पाडे । निचाडू ऐसा ।।ज्ञा.६-९३
कोणी शंका करील की, नुसते सांगण्यापुरते वैराग्य असेल, पण "आले कि घे" असे नाही. तुकाराम महाराजांचे वागणे
थोडे जास्तच. काही कीर्तनकार कीर्तनाला उभे राहिले म्हणजे वैराग्य असे बनबनावनू सांगतात. की श्रोत्यांच्या
अंतकरणात क्षणभर वैराग्य उत्पन्न होते पण बोलल्याप्रमाणे त्यांचे आत नसते . दुष्ट वासना असते. " शाला गडवे धातू
द्रव्य इच्छा चित्ती । नैश्वर्य बोलती मुखे ।।४।। तु. २९१८" एक गुरुजी आपल्या शिष्याकडे आले. शिष्याची शालजोडी
बघितली व ती मिळावी म्हणून ध्यानस्थ बसून ' शालजोडी शालजोडी ' म्हणू लागले. शिष्याला समजले की, गुरुजी
आपली शालजोडी उपटायला पाहतात. शिष्यही बसनू ' घोडी घोडी ' म्हणू लागला. गुरुजींच्या लक्षात आले की-
शिष्य दोनशे रुप्याच्या शालजोडीच्या मोबदल्यात आपली पांचशे रुपयाची घोडी उपटायला पाहतो. गुरुजीने मंत्र
बदलला " तुझी तुला माझी मला. " ' जैसी बोलती निरोपणी । तैसी न करिती करणी ।।४।। करुनि अद्वैत व्युत्पती । ते
ज्ञान विकू देशांतरा जाती ।।तु.२८२१
मूर्ख ज्ञात्याते उपहासिती । तरी वांच्छिती सन्मानू ।। भा. ११।५२४
सांगे आन करी आन । तेथे कै चे ब्रह्मज्ञान । जेथ वसे धनमान । तेथे आत्मज्ञान असेना ।।भा. ११।५३१ आमचे महाराज
असे नव्हते, ते तावनू सल ु ाखून निघाले होते. शिवाजी महाराजांनी तक ु ाराम महाराजांना आपल्या घरी आणण्याकरिता
पालखी, छत्री लवाजमा पाठवला. महाराज ध्यान करीत बसले होते. या सर्व लवाजम्यासह तुकाराम महाराजांपढु े
सेनापती जाऊन उभा राहिला. महाराजांनी ते पाहिले. ते परमात्म्याला म्हणाले, त्याच्याकरता का मी डोंगरावर आलो?
जे नको तेच का पुरवितोस? " नावडे जे चित्ता । तेचि होसी पुरविता ।।तु.६३८" आम्हाला कोणी नुसते घोडे पाठवले
की, अमक्या अमक्या पाटलाने घोडे पाठवले म्हणून सांगत सुटतो. "तरी का वोळगणे । राजद्वारी होती सुने ।।१।।
तु.२८७१ " शिवाजी महाराजांनी आपल्याला पालखी पाठवली, असे सेनापतीने म्हटल्यानंतर तुकाराम महाराज
म्हणाले, तुमचे महाराज आम्हाला कळले . बेल देऊन आवळा काढणारे . " तुम्ही कळले ते उदार । साटी परिसाची गार ।।
तु. ६३९ " आमचे अमूल्य पुण्य उपटायचे , बदल्यात हे द्रव्य द्यायचे . संसारी लोक साधल ू ा घरी नेतात ते साधूचे पुण्य
उपटण्याकरिता. तुकाराम महाराजांनी त्याचा अंगीकार के ला नाही. " अप्राप्त विषये योगी । बहुत देखील वैरागी । परी
प्राप्त स्वर्गांगना भोगी । धन्य विरागी पुरुरवा ।।भा. २६।२८३" इद्रि
ं यांचे समोर विषय आल्यानंतर त्यावर लाथ मारणे
कठीण. महाराज शेवटच्या चरणात स्त्रीसंबंधाने वैराग्य व्यक्त करतात.
" तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हा पुढे ।।४।। " हेही मोठे कठीण आहे. कसा का कोणी विरक्त
असेना, सुंदर स्त्री डोळ्यांनी पहिली की, त्याचे वैराग्य आटोपले. " जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी । जव सुंदर वनिता
दृष्टी पडली नाही ।।३।। तु. ३२३८" तुका म्हणे काम नाही एक मुख । जिरविता सुख होत पोटी ।।४।।तु. ३५८२
कामाला आठ मुखे आहेत. "स्मरणं कीर्तनं के ली. प्रेक्षणं गुह्य भाषणं | सक
ं ल्पोs ध्यवसायश्च क्रिया निष्पत्तिरेव च ||"
स्त्रीला पाहूनच वैराग्य विरघळायला लागते.
एका गावात महादेवाच्या मंदिरात वैराग्याचा मेळावा आला होता. त्यांच्या जटा दाढी लांब लांब वाढलेल्या होत्या. त्या
गावातील एका सावकाराच्या मुलीचा शिवदर्शनाचा नियम होता. ती एकटी दर्शनाला आलेली पाहून साधू जागा झाला
व तिला आडवा झाला. त्या दांडगेश्वराला पाहून तिने " लज्जा रक्षण कर " म्हणून मनात प्रभूचा धावा के ला. यांच्या
तावडीतून कसे सुटावे? त्या मुलीला महादेवाने बुद्धी दिली. ती म्हणाली महाराज काय इच्छा आहे ? आपल्या या जटा
आणि दाढी आहेत वाढलेल्या या सर्व साफ करा मग मी आपल्या सेवेत हजर आहे . तिने आपले भलतेच नाव, भलतेच
घर नंबर, भलताच वाडा सांगितला . त्या वैराग्याला न्हाव्याचा ध्यास लागला. न्हावी म्हणाला सर्व साफ करायचे?
त्याने सर्व साफ के ले. पोषाख के ला. गावात फिरला. घर काही सापडले नाही. अती दीन होऊन आखाड्यात येऊन
बसला. दुसरे बैरागी म्हणाले-सिंहस्थ नही, गंगा नही, क्यों साफ किया? काय के लिये जटा उतारा? बैरागी म्हणाला,
क्या करूं आशा रे के श नाशा । महाराजांनीच असे म्हणावे. " तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हा पुढे
।।४।। " अप्सरांना लाजवणाऱ्या अशा सुंदर सुंदर स्त्रिया त्यांना अस्वलीसारख्या दिसतात. अस्वलीत भाळण्यासारखे
काय आहे? ती नखे काय? के श काय ? नाचायला लागली तर पाहूनच ओकारी येते. याही बाबतीत आमचे महाराज
तावनू सल ु ाखून निघालेले. देहूमध्ये कोणी एक दुष्ट बाई होती. तिचे महाराजांवर मन गेले. महाराज भंडाऱ्या डोंगरावर
बसले होते. ती दुष्ट बुद्धीने भंडाऱ्यावर महाराज ध्यान करीत बसले असता गेली. महाराजांचे ध्यान उत्थान व्हावे म्हणून
तिने आपले पाय आपटले . महाराजांनी डोळे उघडून पाहिले. बाई एकटी. ती म्हणाली, मला बाई म्हणू नका. मी एक
वर्षांपासनू आपल्या करता झरु ते आहे. मी दासी-बद्ध
ु ीने आली आहे. असे पाहिल्याबरोबर महाराज म्हणाले -
" पराविया नारी रखुमाई समान । हे गेले नेमून ठायीचेचि ।।१।।
जाई वो तू माते न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हो ।।२।।
न साहवे मज तुझे हे पतन । नको हे वचन दुष्ट वदो ।।३ ।। तु. ६५१"
ती बाई म्हणाली मी कुणाला सांगणार नाही. फारच लागटपणा करायला लागल्यावर महाराज रागावले . ते म्हणाले
परुु षच पाहिजे तर मीच का आहे? तुझ्या चालीचे इतर रगड आहेत. " तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे
झाले ।।४।। ६५१।। तिला हुसकून दिले म्हणून महाराजांनीच म्हणावे-
तक
ु ा म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचिया परी आम्हा पढु े ।।४।।
व्याख्यान
अभंगाच्या प्रथम कडव्याचा थोडक्यात विचार सांगावयाचा तो असा-सपं ूर्ण मृत्युलोकाकडे तुकाराम महाराजांनी
विचाराने पाहिले, तेंव्हा त्यांना या मृत्युलोकात प्रेम ठे वण्यासारखे एक हरिनामाविण काहीच दिसनू आले नाही. आपण
या मृत्युलोकाकडे बारकाईने पाहात नाही. तुकाराम महाराजांनी ज्या दृष्टीने या मृत्युलोकाकडे पाहिले. त्यादृष्टीने आपण
पाहिले तर प्रेम ठे वण्यासारखे तुम्हासही काहीच दिसणार नाही. तुकाराम महाराजांच्या या उक्तीवर कदाचित कोणी
असा आक्षेप घेईल की तुकाराम महाराज जर या चालू शतकात असते तर त्यांनी असे म्हटले नसते . चालू शतकात
सुखाची जेवढी साधने उपलब्ध आहे त, तेवढी त्यांच्या वेळेला नव्हती. तुकाराम महाराजांना निजधामास जाऊन तीनशे
वर्षे जवळ जवळ होऊन गेली. तीनशे वर्षाची गोष्ट सोडा, पण आमचे लहानपणी जे होते, ते आज राहिले नाही. जणूकाय
नवीनच जग उत्पन्न झाले. नाटके , सिनेमा त्यावेळेला कुठे होती? पंजाब मेल, दक्खन कि रानी कें व्हा होती? ट्राम मोटर
बसेस कें व्हा होत्या? विमाने होती पण वरून खाली येणारी होती. " प्रयाणकाळी देवे विमान पाठविले " वर जाणारी
विमाने नव्हती. कुठे एवढ्या सुखसोयी होत्या? जैसे निद्रे चे सुख न मोडे । आणि मागू तरी बहुसाल सांडे । तैसे सोकासना
सांगडे । सोहपे होय ।।ज्ञा. ५।८
खाणे पिणे तरी एवढे नव्हते. राघवदास, गुलाबजांब. खाण्याचे पक्वान्नाची सुधारणा पेशवे सरकार पासून. कपड्यात
तरी आता किती फॅ शन निघाल्या आहेत. प्रस्तुत जेवढी सुखाची साधने उपलब्ध आहेत, तेवढी त्यांच्या वेळेला नव्हती.
म्हणून त्यांनी शतकात म्हटले असेल, " मृत्युलोकीं आम्हा आवडती परी । नाही एका हरिनामेंविण ।।१।। तुकाराम
महाराजांच्या वेळेला हि साधने नव्हती म्हणून त्यांनी तसे म्हटले नाही. आमचे महाराज चालू शतकात असते, तरी त्यांनी
असेच म्हटले असते. मोटारीत, डेक्कन क्वीनमध्ये, विमानात बसले असते तरी त्यांनी असेच म्हटले असते. तुकाराम
महाराजांनी म्हटल्याप्रमाणे प्रेम ठे वण्यासारखे या मृत्युलोकात काही नाही. जेवढी सुख साधने उपलब्ध आहेत,
तेवढ्यांच्या आत काय आहे, हे तुम्हाला दिसत नाही. त्यांना दिसले म्हणून त्यांनी म्हटले , "मृत्युलोकीं आम्हा "
जीवाला जे स्वभावतः नको आहे, असेच या मृत्युलोकात भरलेले आहे. जीवाला स्वभावतः तरी काय नको? दुःख हे
जीवाला स्वभावतः नको. खोटे असून ते विषयाकडे धावतात. " ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवने घडे ।
सांगे पूय पंकीचे किडे । काय चिळसे घेती ।।ज्ञा. ५।१२१ " येर्हवी खोटे आणि दुःख स्वभावतःच कोणाला नको आहे .
" मजलागी दुःख व्हावे । ऐसे कोणी भावीना जीवे । न वांच्छिता दुःख पावे । येणे न सभ ं वे स्वतंत्रता ।।भा. १०।१४६"
पाच वर्षाचे पोर असले आणि सुखदुखापैकी काय पाहिजे विचारले , तर सुख पाहिजे असेच म्हणेल. या मृत्युलोकात
खोटे आणि दुःखच भरलेले आहे . विषय जेवढे आहेत, त्या विषयांच्या आत काय आहे ? अनित्यत्व व दुःखरूपत्व आहे
आणि ते तर कोणालाही नको आहे ! प्रपच ं किती अनित्य व दुःखरूप आहे, हे सांगावे? भगवतं ांनी गीतेच्या पध
ं राव्या
अध्यायात पहिल्या दोन श्लोकात प्रपच
ं ाचा अध्यारोप के ला आहे.
ऊर्ध्वमल
ू मध:शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् । छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ।।१।।
अधश्चोर्ध्वं प्रसतृ ास्तस्य शाखा गुणप्रवद्ध
ृ ा विषयप्रवाला: । अधश्च मूलान्यनस
ु तं तानि कर्मानबु न्धीनि मनष्ु यलोके ।।२।।
निष्प्रपच
ं वस्तवू र प्रपच ं ाचा आरोप करणे यास अध्यारोप म्हणतात. " वस्तुंनि अवस्तु आरोप: अध्यारोप:। " भगवतं ांती
वक्ष
ृ ाचे रूपाने सस ं ाराचा मांड मांडला. याप्रमाणे अध्यारोप करून तिसऱ्या श्लोकात खंडण के ले. अध्यारोप जो
करावयाचा तो निषेधांकरिता. लग्नात दारूची चक्रे, झाडे करणारा तो अशा हेतूनेच करतो की त्यांना जाळायचे आहे .
कल्पना करा दारूचा हत्ती के ला तर तो ठे वण्याकरता नाही. तसा अध्यारोप, अपवादाकरिताच करावयाचा अवाढव्य
प्रतिपादन करून भगवतं ांनी श्लोकात
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सप्रं तिष्ठा । अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असगं शस्त्रेण दृढेन छित्वा ।।३।।
भगवतं ानं ी अर्जुनाला अवाढव्य स्वरूप सांगितले. पण पुढे म्हणतात- " अगा पै पडं ु कुमरा । येता स्वरूपाचिया घरा ।
करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ।। ज्ञा. १५।४६"
आत्मस्वरुपाकडे येतांना अडथळा कोण करतो ? " तो हा जगडंबरू । नोहे येथ संसारु । हा जाणे महातरू । थांबला असे
।।ज्ञा. १५।४७" या प्रपंचरुपी शाखा स्वर्ग, सत्यलोकापर्यंत गेल्या आहेत. "परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी । जे
एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ? ॥१५। २१०।।" एवढे झाड उपटून टाकील असे साधन तरी काय आहे ? "कें
ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वी ं असे ॥ २११ ॥" सत्कर्माच्या आचरणाने
सत्य लोकांपर्यंत फांद्या वाढत गेल्या आहेत याचे आहे निर्विकल्प मूळ. "हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या
डाळीं । माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥२१२॥" मनुष्ययोनीला धरून हा खाली स्थावर लोह लोश्टापर्यंत
विस्ताराला पावला आहे. "ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । तरी झणीं हा हळुवटु । धरिसी
भावो ॥२१३॥ " तरी अर्जुन, तू क्षुद्र कल्पना घेशील आणि धाबे दणाणून बसशील. "परी हा उन्मूळावया दोषें । येथ
सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे? ।।२१४॥" याचा निरास करण्याला सायास कशाला?
कारण तो मुळातच नाही. एका मुलाने रडू नये म्हणून आईने बागुलबवु ाची भीती दाखवली. खोलीकडे बोट करून, पहा
तो के वढा बागुलबुवा. के व्हढे तोंड, त्याचे के व्हढे नाक, भले अवाढव्य वर्णन के ले. गप्प बसतो का घालू त्याचे झोळीत?
पुष्कळ मुले आहेत त्याचे झोळीत. अंधारामुळे मुलाला खरे वाटते. तशा स्वरूपाचा तो आहे का? जर खरा तशा
स्वरूपाचा असता तर या बाईला नाही का पेढ्यासारखे गट्ट के ले असते? पण ते अज्ञान मूल गप्प बसते. त्या मुलाला
असे वाटते की आई बाहेर गेली म्हणजे मला हा बागुलबवु ा खाईल; म्हणून याला घालव बाहेर असे म्हणते. आई काठी
घेऊन आपटते व म्हणते, गेला बागुलबवु ा के वळ कल्पना मात्र.
अत्यंत अभावाचे चार दृष्टांत :- बागुल, खपुष्प, वंध्यापुत्र, सशशंगृ
विवर्तवादाचे चार दृष्टांत :- रज्जुसर्प, शुक्तिरजत, मृगजळ, स्वप्न.
अन्वयावरचे चार दृष्टांत :- सवु र्ण अलंकार, जलतरंग, मत्ति
ृ काघट, तंतुपट
संसार नाहीच, हेच मुख्य दाखवावयाचे आहे "गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें
। खपुष्प कीं ?॥२१५॥ "
तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा । मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी? ।। २१६ ॥
भगवतं ांनी ससं ाराचा अत्यंत अभाव दाखविला. पण अर्जुनाने भगवतं ाला विचारले की आपल्या बोलण्यात
एकनिष्ठपणा दिसत नाही. मागच्या दोन श्लोकात या सस ं ाराचे खूप अवाढव्य वर्णन के ले ते काय? आम्हीं सांगितली जे
परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥ २१७ ॥ हे खरे तू का समजतोस? वांझेची लेकुरे याला
कोण खरे म्हणेल? एक मुलगा बावळट होता. तो आपल्या स्नेह्याला म्हणाला, एक गोष्ट सांग. तो म्हणाला तू हुं म्हणत
जा. बरे आहे. सांग. एक होती वांझ. हुं पढु े तिला झाला मुलगा. तो हुं म्हणाला. त्याला मल ु गी के ली हनमु तं रायाची,
सशाच्या शंगृ ाचा मंडप तयार के ला, बिन मुंडक्याची माणसे बसली जेवायला , कासवीचे तूप घेतले वाढायला, असा
तो अपर्वू लग्नसमारंभ के वळ वाचविलास मात्र आहे. "काय कीजती चेइलेपणीं । स्वप्नींचीं तिये बोलणीं । तैशी जाण
ते काहाणी । दुबळीचि ते ॥२१८॥ " स्वप्नात राज्य मिळाले. पण जागे झाल्यावर काही आहे का? आनदं गेला. आम्ही
दोन श्लोकातून प्रपचं ाचे स्वरूप सांगितले, तसे जर खरे असेल तर कोणाची अशी शक्ती आहे की त्याने झाड उपटून
टाकले असते? पण आजपर्यंत शेकडो बहादूरांनी ते के ले.
तेणे आपुलेनि पुरुषार्थे जिंकिला सस
ं ार । के ला मद मत्सर देशधडी ।।८।। नामदेव ९२०
एकी के ली हातोफळी । ठाया बळी पावले ।।१।। तु. १८१४ संसाराच्या हातावर हात मारून, समोरासमोर नाहीतर शत्रूचे
सैन्य निजलेले असतांना हल्ला, विमानातून बॉम्बगोळा, त्यात पुरुषार्थ नाही. महाराज संसारावर अति चिडले. आणि
देवाला म्हणतात,
म्हणोनि रुसलो संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजसी अंतर रे दातारा । याचि दावेदारा निमित्त ।। तु. ७३०
येणे मज भोगविल्या खाणी । नसता छंद लाविला मनी । माजलो मी माझे भ्रमणी । झाली वोडणी विटंबना ।।तु . ७३०
देवा, तुझ्यात आणि माझ्यात छत्तिसाचा आकडा कोणी आणला असेल तर या संसाराने . "पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु
योगज्ञाना वळघले । पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ॥२७७॥ " पुन्हा येणार नाही अशा प्रतिज्ञेने साधक निघाले .
संसाराचे गिऱ्हाईक चालले पाहून त्याला वाईट वाटते . पण याने सत्यलोकापर्यंत जेवढा म्हणून संसार आहे तेवढा
अनित्य व दुःखरूप अशा रूपाने जाणला. " ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे चित्त झणी जडो देशी ।।३।। तुका
म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्म धर्म नाशिवंत ।।४।। तु. १०७०" "संसाराचिया पाया पुढा । पळती वितराग
होडा । ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागा ।।ज्ञा. १५।२७८।।"
संसाराची हद्द सत्यलोकापर्यंत. " म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें । तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ॥२०३॥
" ही हद्द संपली. मग स्वरूपाची हद्द. तेथे झाडा द्यावा लागतो. ज्याप्रमाणे शिकारी कुत्री सशाच्या मागे लागतात,
सशाची व कुत्र्यांची धरपकड, त्यात ससा जीव तोडून पळत असतो. कुत्रेही शिकारी असल्याने जोराने पाठलाग करतात.
तशात ससे बिळात गेले, कुत्रे धापा टाकीत मागे येतेसे वाटते . तसेच सत्यलोकापर्यंत संसार मागे असतो. गिऱ्हाईक
चाललेले पाहून संसाररूपी व्यापाऱ्याला बरे वाटत नाही. वासनाशून्य होणे म्हणजे पुढे जाणे आहे. " अहंतादिभावां
आपुलियां । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥२७९॥ " " देव तीही बळे धरिला सायासें ।
करुनिया नास उपाधीचा ।।तु. ३८२९ असे शूर धीर महात्मे होऊन गेले. " परमार्थासी कोण त्यजी संसार । सांगा पा
साचार नाव त्याचे ।।२।। जन्मता संसार त्यजियेला शुके । तोचि निष्कलक ं तुका म्हणे ।। तु. २८३८"
एर्‍हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें ॥११-१७३॥ त्यांनी
विषयाला जिंकले मग जन्माला आले.
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विख्याता । तिया फळीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं ॥२०५॥
प्रपंचामाजी असते सुख । तरी का त्यजिते सनकादिक । द्वैत तितुके के वळ दुःख । परम सुख अद्वैती ।।भा. १०।२४७।।
राज्य टाकुनी गेले थोडे । ते काय वेडे म्हणावे ।। भर्तृहरीने राज्य टाकिले । तेणे श्रीगोरक्षाते पसि
ु ले । राज्य टाकुनी मुंडीत
झाले । कित्येक गेले भूपती ।। मग गोरक्षनाथ बोलती । नव्याणव कोटी भूपती । इतरांची नाही गणती । योगाप्रती
निघाले ।।आनदं लहरी ९४-९६
याप्रमाणे शेकडो महात्म्यांनी सस ं ाराला जिंकले. भगवतं ानं ी या ससं ाररूपी वक्ष
ृ ाचे जसे वर्णन के ले तसाच जर सत्य
असता- तरी कोणाचेनि सतं ानें । निपजती तया उन्मूळणें । काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥१५-२२०॥ कुणालाही
ससं ाराचा निरास अथवा बाध करता आला नसता. एका मल ु ाने आईला विचारले " आई आकाश एवढे उंच कसे ?"
ती म्हणाली- " बाळ पर्वी ू आकाश फार खुजट होते. इतके की आगं ण झाडतांना माझ्या पाठीला लागले घासायला.
मग मला आला राग .मी खराट्याचा फटकारा मारला की आकाश भरु कन वर उडून गेले." म्हणौनि पैं धनज ं या । आम्हीं
वानिलें रूप तें माया । कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें ॥१५-२२१॥ एक मनष्ु य रजोगुणी होता. हुजुरांना मेजवानी
करावी अशी त्याला इच्छा झाली. "जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥
१७-१८६॥" त्याने व्यवस्था कशी करावी म्हणून मित्राला विचारले. तो होता खुशमस्करी. यादीत फक्त तूप राहिले. तूप
कुणीकडचे? सांगली की मिरजेचे? का नागोबाचे वाडीचे ? की खानदेशचे ? त्यांनी गंमत के ली. अरे गाई म्हशीचे तूप तर
भटाला घालतो. राजाला आणि गाईचे तूप? मग भटाची व राजाची एकच किंमत. कासवीचे तूप आणा. पण
कासवीला स्तनच नाहीत; मग दूध कोठून असणार? " कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाही भेटी अंग संगे ।। तु.
३५५८" अगा मुख मेळेंविण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥१३-१४०॥ " मूळ अज्ञानचि तंव लटिकें
। मा तयाचें कार्य हें के तुकें । म्हणौनि संसाररुख सत्यकें । वावोचि गा ॥१५-२२३॥" संसार वृक्षाचे कारण जर खोटे तर
कार्य कुठून खरे असणार? " आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे । वातीं पाहतां जैसें । अंधारें कां ॥१४-७२॥
"खोट्या कर्णाचे कार्य खोटे च असणार. उदा. एकाने मुलांकरिता गाय घेतली स्वप्नात. ती गाय व्याली. तिला झाला
गोऱ्हा. दूध काढले; वड्या तयार के ल्या. मित्र आला व उठला. गाय स्वप्नातली तर वासरू कुठून खरे असणार?
म्हणौनि संसाररूख सत्य कै । वावोची गा ।। याचे अनित्यत्व किती सांगू ! भागवतात चार प्रकारे सांगितले- (१) श्रुति
(२) प्रत्यक्ष (३) ऐतिह (४) अनुमान
(१) श्रुती सांगते- " एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन् " एक अद्वैत ब्रह्म पाही । दुसरे आणिक काही नाही । प्रपंच
मिथ्या वस्तूचे ठायी । हे प्रमाण पाही वेदवाक्य ।।भा. १९। १९७" ब्रह्म सत्यं जगन मिथ्या | जीवो ब्रह्मैव नापर: ||
(2) प्रत्यक्ष:- प्रत्यक्ष देखिजे आपण । देहादिकांचे नश्वरपण । हे दुसरे परम प्रमाण । क्षणिकत्व जाण प्रपंचा ।। भा. १९।
१९८
संसाराचा मिथ्यापणा, देहादिकांचा नश्वरपणा आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. आपले पणजोबा, आजोबा, वडील
गेलेत.
आज मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही वेडा झाला ।।५।। ज्ञा. अ. ९४
पित्या देखता पुत्र मरे । पुत्रा देखता पिता झरु े । काळे काळ अवघेचि सरे । कोणीही नरु े क्रियेसी ।।भा. २८।२८५
महाप्रळयानंतर कोणी कोणाचे श्राद्ध करावे, असा काळ येणार आहे .
(३) ऐतिह :- मार्क ण्डेयो आणि भृशुंडी । इही प्रपंचाची राखोंडी । देखीली गा रोकडी । वेळा कोटि कोटि कल्पांती ।।भा.
१९।१९१ कितीवेळा राख राखोंडी झालेली पहिली?
(४) अनुमान :- शास्त्र प्रसिद्ध अनुमान । मिथ्या प्रपंचाचे भान । दिसे मृगजळा समान । वस्तुतः जाण असेना ।।भा. १९।
२०१
चार प्रमाणांनी प्रपच
ं ाचा मिथ्यापणा सांगितला. तसाच महात्म्यांच्या अनभ
ु वही आहे. " लटिका व्यवहार सर्व हा ससं ार
। वाया येरझार हरिविण ।।" " लटिका तो प्रपच ं एक हरी साच । हरिविण आहाच सर्व इद्रि
ं ये ।।१।। तु ३५९० " फलकट
तो ससं ार । येथे सार भगवतं ।।तु २४९० " " तुका म्हणे तोचि खरा । येर वाउगा पसारा ।। तु १८४७" " जे जे देखणे
सकळ । ते हे स्वप्नीचे मगृ जळ । म्हणोनि चित्तीं चरणकमळ । रखुमादेवीवर विठ्ठलाचे ।।४।। ज्ञा. अ. १७६
लावण्य मान्यता विद्यावतं । सखे स्वजन पत्रु कलत्र । विषयभोग वयसा व्यर्थ } देहासहित मरणांती ।।३।। ज्ञा. अभंग १७६
तारुण्यात पहिले तर खूष, म्हातारपणात तोंडाचे होते बोळके ; के शाच्या होतात आबं ाड्या म्हाताऱ्याकडे पाहवत नाही.
मान्यता कुठपर्यंत? द्रव्य आहे, लावण्या आहे तोपर्यंत. " खे तक ु ा सबही चलणार । एक रामबिन नही वोसार।। तक ु ाराम
४४३" " हे विषय तरी कै से । रोहिणीचे जळ जैसे । कां स्वप्नीचा आभासे । भद्रजाति ।।ज्ञा.२।१२१ देखे अनित्य तयापरी
। म्हणऊनि तू अव्हेरी । हा सर्वथा सगं ु न धरी । धनर्धु रा ।। ज्ञ. २। १२२" पण आपण स्वप्न पाहतो. तसेच मृगजळ
डोळ्यांनी पाहतो. स्वप्नात मृगजळ पाहिले. अगोदर स्वप्न खोटे ; त्यात खोटे मृगजळ पाहिले . खोट्यातले खोटे .
जीवाला स्वभावतः खोटे नको आहे , आणि मृत्युलोक म्हणजे सर्व आहे खोटा. असेना खोटे ! पण सुखदायी तरी आहे
काय ? तर नाही. प्रपंच अनित्य आहे तसाच आहे दुःखदायी. के वळ संसार अनित्य म्हणूनच तो आम्हाला दुःखदायी
झालेला आहे. असे समजू नका. असे जर म्हणावे तर प्राप्त पुरुष तुमच्या आमच्या प्रमाणे संसारात असतात. पण त्यांना
कोठे दुःखरूप आहे? जो संसार तुम्हाला आम्हाला दुःखरूप प्रतितीला येतो तो त्यांना सुखरूप प्रतीतीला येतो. "
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक।।१।।ज्ञा. अ. ३२४ जो संसार दुःखरूप म्ह्णनू ओरड चाललेली
आहे, त्या संसारासंबधी ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. आपल्यापुरता सुखरूप करीन म्हणत नाही. संसार मात्रांचा
म्हणतात. ते जिकडे पाहतील तिकडे त्यांना सुखच सुख. आम्ही जिकडे पाहावे तिकडे दुःखच दुःख. मी अशी शंका
के ली होती की प्रपंच अनित्य म्हणून दुःखरूप असे नव्हे . तर त्यांनी अनित्यत्व अनभु वले असनू त्यांना दुःखदायी होत
नाही. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की एकच संसार आम्हाला दुःखदायी व त्यांना सुखदायी का? त्याचे उत्तर, " हे असो
स्वातीचे उदक । शुक्ती मोती व्याळी विख । तैसा सज्ञान्यांसी मी सुख । दुःख तो अज्ञान्यांसी ।।ज्ञा. १५।४२०" तेंव्हा
अनित्य संसार म्हणून दुःखरूप झाला असे नव्हे , तर एकच कारण - पडिली ही रूढी जगा परिचार । चालविती व्यवहार
सत्य म्हणून ।। तुकाराम २७१२"
संसार अनित्य म्हणून दुःखरूप नव्हे तर संसार अनित्य असनू , दुःखरूप असनू त्याच्या विषयी सत्यबुद्धी आणि सुखबुद्धी
झाली. ससं ाराचा खोटेपणा डोळ्यांनी पाहतो. तरी सत्यबुद्धी जात नाही. प्राप्त पुरुषांना म्हणजे माहात्म्यांना सस
ं ार
दुःखरूप वाटत नाही. प्रपंच जसा अनित्य तसा त्यांनी जाणलेला, अनभ ु वलेला असतो.
अर्जुन तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हे विज्ञान । तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान । हेही जाण ।।ज्ञा. ७।६ मिथ्या प्रपंचाच्या ठिकाणी
सत्यबुद्धी झाली म्हणून दुःखरूप वाटू लागला. आता याच दृष्टीने प्रपंचाची दुःखरूपता सांगणार आहे . दोरीवर
भासलेला सर्प मिथ्या. कल्पनेने भासलेला आहे म्हणून खोटा. मिथ्या सर्पाच्या ठिकाणी पाहणाऱ्याच्या ठिकाणी
सत्यबुद्धी म्हणून- " जी किरडू तरी कापडाचे । परी लहरी येत होतिया साचे । ऐसे वाया मरतया जीवाचे । श्रेय तुवां घेतले
।।ज्ञा. ११।५४"
सर्प कापडाचा मग लहरी खऱ्या का येऊ लागल्या ? सत्यबुद्धी म्हणून. आमची प्रपंचाविषयी सत्यबुद्धी म्हणून
दुःखदायी झाला. " सुख नाही कोठे आलिया संसारी । वाया हावभरी होऊ नका ।। दुःख बांदवडी आहे हा संसार ।
सुखाचा विचार नाही कोठे ।। तू. ३६५५
या सस
ं ारात सुखाचा विचार सुद्धा नाही. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा । चित्ती शीण त्याचा वाहू नये ।।तु. २५०७
सस
ं ार दुःखमूळ चहूकडे इगं ळ । विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ । कामक्रोध लोभशूनि पाठी लागली ओढाळ ।
कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ।।३।। ज्ञा.अ.७४५
सस
ं ार सांगु गा भवदुःखाचे मूळ । जनवाद अंथरूण माजी के ले इगं ळ । इद्रि
ं ये वज्रघाते तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें
काय करू दुर्भर हे चांडाळ ।। ४।। तु. ३५४
अविद्या हि प्रत्यक्ष दुःखाला कारण नसनू अविद्या कार्य प्रपच
ं दुःखाला कारण आहे . सस
ं ारात एक प्रकारची का दुःखे
आहेत? चहूकडे इगं ळ आहेत, विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस तळमळ ही दुःखेच.
आणिक दुःखे सांगो मी किती । सकळ सस
ं ाराची स्थिती । न साहे पाषाण फुटती । भय काप चित्ती भरलासे ।। तु. ७०४
दुःखे हजारो प्रकारची आहेत. निर्जीव दगडापढु े सस
ं ाराची दुःखे सांगायला लागलो तर तो दुभंग होईल. मग तुम्ही
दगडापेक्षा कठीण म्हणायला हरकत आहे काय? भोगणे सहन होत नाही, असे नाही म्हटले; ऐकणे सहन होत नाही. ती
सगळी दुःखे तुम्ही आम्ही पदोपदी भोगतो. पण मौज अशी आहे की अनादी कालापासून भोगून भोगून सवयीने पचनी
पडलेली दुःखे ही दुःखासारखी वाटतच नाहीत. सवयीचा परिणाम आहे.
दुःख शोकाच्या घाई । मारिलियाची सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिलें माया ।।ज्ञा. ७।१०७
सवयीने पचनी पडले म्हणून दुःख हे दुःख वाटतच नाही. तुम्ही हजारो प्रकारची दुःखे सांगता आणि आम्हाला तर दिसत
नाही; तर नमुन्यादाखल चार दोन प्रकारची दुःखे सांगतो.
(१) उदाहरणार्थ तरुण पुरुष संसाराला लागला. त्याची धर्मपत्नी लावण्या गुण कुलवती । आणि पतिव्रता ।। अशी
पतीसेवा करणारी.
पतिसेवेत इतकी तत्पर की थुंका पुढे आली तर ओजं ळ पुढे करणारी. कर्मधर्मसंयोगाने कॉलऱ्याच्या साथीत पत्नी मेली.
तो पेढे वाटील काय? नाही हे दुर्दैव म्हणतात. उघडा पडला समजूत घालतात. तो रडत असतो. काय झाले रडायला? तू
का म्हातारा झाला? का खुंटीवरचा कावळा आहेस? तरणा ताठा आहेस. गौर वर्णाचा आहेस, पुष्कळ पैसा आहे ,
बायको म्हणजे का न मिळणारा पदार्थ आहे? शिर सलामत तो पगड्या पचास! अरे इचे बारावे झाले की तेराव्याला
मोहतीर ठोकलाच! तो म्हणतो बायको मिळे ल, जमीन जुमला आहे म्हणून हुंड्यासकट मिळे ल. पण अशी का
मिळायला गेली? नाहीतरी घाल तीच लोणचं आणि बैस चघळत. हे काय दुःखच?
(२) एक वयोवृद्ध मनुष्य, त्याचे तारुण्य गेल्यावर नवस-सायासाने उतारवयात एकच मुलगा झाला. " वयसेचीये शेवटी
" मुलगा मोठा बुद्धिवान. एका खांबावर द्वारका म्हणण्यासारखे . पुढे होण्याची आशा राहिली नाही. अशा स्थितीत त्या
मुलाची हृदयक्रिया बंद पडून एकाएकी मुलगा मेला. म्हातारा हंबरडा फोडून रडतो. शेजारी प्रेताची तयारी करतात.
शिंकाळी कोणी धरावी? बापाने धरली पाहिजे. बाबा, असं कसं के लं? लोक म्हणतात काय उपयोग? शिंकाळी घ्या !
कशी धरू? खाली वाक आणि अशी घे . " पित्यादेखता पुत्र मरे । पुत्रा देखता पिता झुरे ।। भा. २८।२८५ हे सर्व
दुःखच.
(३) कल्पना करा, एखाद्याच्या घराला आग लागली. बॉम्ब मारून सर्व गाव जागा के ला. ते घर धनधान्यांनी भरलेले,
रोखे पुडके , कागद कीर्द, खतावणी जमाखर्च मुदतीत आलेले हुकूमनामे बजवावयाचे होते . पण तुफान वारा
सुटल्यामुळे निकाल लागला. हे काय दुःखच.
(४) शरीराला रोग झाला, पायाला नारू झाला व तो काढतांना तुटला. मग काय त्या वेदना ! अशा स्थितीत त्याला
कोणी विचारले, तर हसून देवाची दया आहे आणि असेच जन्मभर असावे असे वाटते का? हे दुःखच.
आणिक रोगांची नावे सांगो किती । अखंड असती जडोनिया ।।३।। तु. ६६ अशी हजारो दुःखे आहेत, म्हणून महाराज
म्हणतात " सस
ं ार दुःखमूळ चहूकडे इगं ळ । विश्रातं ी नाही कोठे रात्रंदिवस तळमळ । काम क्रोध लपभ शूनी पाठी
लागली ओढाळ । कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ ।।३।। ज्ञा. ७४५
इगं ळ म्हणजे निखारे -ते कोणते ? " सस ं ार सांगु गा भव दुःखाचे मूळ । जनवाद अंथरूण माजी के ले इगं ळ । इद्रि
ं ये
वज्रघाते तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करू दुर्भर हे चांडाळ ।।४।। तु. ३५४
काम क्रोध सख
ु का देतात ! जनवाद -लोक अपवाद काय ? ऐसा हा लौकिक कदा का राखवेना ।पतित पावना देवराया
।।तु. ३३४९
लोक का चांगले आहेत ? कोणी कोणाला चांगले म्हणत असला तर दुसरा त्याच व्यक्तीची निदं ा करतो. कुठपर्यंत
लौकिक सांभाळाल ?
सस
ं ार करिता म्हणता हा दोषी । टाकिता आळशी पोटपोसा ।।तु. ३३४९
कवडी कवडी माया जोडी । पैसा नो घी, घीनो पैसा ।। त्यात एकदा परमार्थाला लागला तर " ओ हो " " आले हे " "
आयद गबू पैसा ढबू " " आयजीच्या जीवावर बायजी उदार " " न करवे धंदा । आयता तोंडी पडे लोंदा ।।तु. ३७६०
आयता तोंडी लोंदा पडतो मग कशाला धंदा करतील ?
आचार करिता म्हणता हा पसारा । न करिता नरा निंदिताती ।।तु. ३३४९ देवाची पूजा, गीतेचे पारायण, तुळशीला पाणी
वगैरे असा आचार संपन्न असला. त्याला उगाच करून करून भागले आणि परमार्थाला लागले म्हणतात. बाबाचे
देवघर म्हणजे कासाराचे दुकानच. बरे देवपूजा नाही के ली तर " आचारभ्रष्टी सदा कष्टी " म्हणतात.
संत संग करिता म्हणती हा उपदेशी ।येरा अभाग्यासी ज्ञान नाही ।।
धन नाही त्यासी ठायींच करंटा । समर्थांसी ताठा करिताती ।।
बहू बोलो जाता म्हणती हा वाचाळ । न बोलता सकळ गर्वी ।
भेटीसी नवजाता म्हणती हा निष्ठुर । येत जाता घर बुडविले ।।
लग्न करू जाता म्हणता हा मातला । न करिता झाला नपुसक
ं ।। नाही लग्न के ले त्याला नपुसक म्हणतात.
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचे मूळ पोरवडा ।।तु. ३३४९
निपत्रि
ु काला ' चांडाळ आहे ' म्हणतात . का पोर कुठे आहे ? आणि होईल कुठून ? दहा-पाच मुले असली एखाद्याला
तर अरे, काय लेंढार, काय पाप के ले? असा हा लौकिक- लोक जैसा ओक धरिता धरवेना । अभक्त जिरेना संतसंग ।।
तुका म्हणे आता ऐका वचन । त्यजूनिया जन भक्ती करा ।। तु. ३३४९
इद्रि
ं ये वज्रघाते- जिव्हा रसाकडे ओढी । तृषा प्राशनालागीं तोडी । शिश्नासी रतिसुखाची गोडी । ते चरफडी रमावया ।।
भा. ९।३१५
या विषयावाचुनी काही । आणिक सर्वथा रम्य नाही । ऐसा स्वभावोचि पाही । इद्रि
ं यांचा ।। ज्ञा. २ ।१२०
त्वचा पाहे मृदूपण । उदर वांछी पूर्ण अन्न । श्रवण मागती गायन । मधरु ध्वनी आलाप ।।भा. ९।३१६
घ्राण उड्डयत परिमळा । रूप पाहावया वोढी डोळा । ह्स्त वांच्छिती खेळा । नाना लीळा स्वभावे ।।भा. ९।३१७
पाय वांच्छिती गती । ऐशी इद्रि
ं ये ओढा ओढिती । जेवी ऐका गेहपती । बद्धता सवती तोडिती ।।भा. ९।३१८
अशी प्रपच
ं ात हजारो दुःखे आहेत.
प्रपच
ं ामाजी असते सख
ु । तरी का त्यजिते सनकादिक । द्वैत तितक
ु े के वळ दुःख । परम सख
ु अद्वैती ।।भा. १०।२४७
प्रपच
ं ी जरी सख
ु जोडे । तरी का सेविती गिरीकडे । राज्य टाकुनी गेले थोडे । ते काय वेडे म्हणावे ।। भा. आन. ९४
तरि का नेणते होते मागे ऋषी । तीही या जनासी दुरावले ।।११२१
कंदमुळे पाला धातूच्या पोषणा । खाती वासरांना तरी के ला ।। ११२१
त्यांनी का त्याग के ला ? ते का नामर्द होते ? सस
ं ाराचे अनित्यत्व व दुःखरूपत्व सांगण्यात मत्ृ युलोकाचेच अनित्यत्व व
दुःखरूपता सांगितली. पर्यायाने आणि आड पडद्याने कशाला? मग आता साक्षात मत्ृ युलोकातले भगवत उक्तीने
अनित्यत्व व दुःखरूपत्व सांगतो.
किं पनु र्ब्राह्मणा: पण्ु या भक्ता राजर्षयस्तथा ।अनित्यमसख
ु ंलोकमिमं प्राप्य भजस्व माम् ।।३३।।
अर्जुना ज्या मृत्युलोकात तू जन्माला आला आहेस तो कसा आहे . तर "अनित्यं " तसाच "असुखं " म्हणजे दुःख.
मृत्युलोकाची अनित्यतता मृत्युलोकापुरतीच नाही. एकदम सत्य लोकापर्यंत जाऊन थडकली.
जेथींचीये अनित्यतेची थोरी । करिता ब्रह्मयाचे आयुष्यवेरी । कै से होणे अवधारी । निपटुनिया ।। ज्ञा. ९।५०६
सष्टि
ृ कर्ता ब्रह्मदेव त्याच्या आयुष्यापर्यंत जाऊन भिडली. मृत्युलोकात असतांना-
का शतएक जन्मा । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करि तोचि ब्रह्मा । आनु नोहे ।।ज्ञा. १५।३१
आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ।।१६।।
कै से थोरिवेचे मान पाहे पा । तो सष्टि
ृ बीजाचा साटोपा । परि पुनरावृत्ती चिया मापा । शीग जाहला ।।ज्ञा. ८।१६६
के वढा थोर ब्रह्मदेव की जो सष्टि
ृ बीजाचा कठोर, पण अनित्यतेची के वढी थोरी की - त्यालाही पुनर्जन्म चुकला नाही.
का लागोनी डोळा उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे । तें नेणतया तरंगु आवडे । नीत्यु ऐसा ।। ज्ञा. १५।१३४
तुम्हा आम्हाला कुठे मिळते ? कालचाच बक
ं ट स्वामी वाटतो. कालचा नवा आला. कालचा-आज तर फार चिरंजीव
झाला. पण कीर्तनाला आरंभ करणारा बंकट नाही. नित्य वाटतो का ? तर होण्याजाण्याचा वेग अति म्हणून नजर राहत
नाही. म्हणून भ्रमाने वाटतो.
पै भिंगोरी निधीये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतू होय ।।ज्ञा. १५।१३६
ती फिरत असनू स्थिर वाटते !
हे बहु असो झडती । आंधारे भोवंडिता कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ।।१५।१३७
तैसीच ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्ष्णाप्रती । म्हणौनि ययाते म्हणती । अशवत्थु हा ।।१५।११४ याला अश्वथ
म्हणण्याचे काय प्रयोजन? न श्व: तिष्ठतीति अश्वथ: ।। उद्यापावेतो जो राहू शकत नाही, क्षणभंगुर, क्षणिक या दृष्टीने
अश्वथ म्हटले आहे . पिंपळ या दृष्टीने अश्वथ न म्हणता क्षणिक या अर्थाने म्हटले आहे . आता यात काय दुःख ? ज्ञानेश्वर
महाराज सांगतात-
बाप दुःखाचे के णे सुटले । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकीचिये शेवटिलें । येणे जाहले हाटवेळे ।। ज्ञा. ९।४९६
या मत्ृ युलोकात माल सर्व दुःखाचा, गिऱ्हाईक सर्व सख
ु ाची. कशी घेण देव जमणार ? मिरच्यांच्या बाजारात पेढे कसे
मिळणार ? घाण सर्व तेथे , या मत्ृ युलोकात जिकडे तिकडे दुःखच, सख
ु नाहीच. मग सख
ु मिळले कुठून ?
आता सख
ु ेसी जीविता । कै ची ग्राहिकी कीजेल पडं ु सतु ा । काय राखोंडी फुंकिता । दीप लागे ।। ज्ञा. ९।४९७
मत्ृ युलोकात सख ु ाची साधने म्हणून जे जे विषय आहेत ते सगळे दुःखदायक; परमात्मा दृष्टांताने सांगतात. एक मनष्ु य
व्यवहारशून्य. त्यांनी मरू नये , अमर व्हावे या इच्छे ने बचनाग आणला ; सोमल, अफू, कन्हेरीच्या मुळ्या, पारा, मोरचूत
सगळे विष वाटून रस काढला व अमतृ नाव देऊन अमर होण्याकरिता प्याला तर अमर होईल का ? अमर होण्याऐवजी
मरणार.
आगा विषयाचे कांदे वाटुनी । जो रस घेईजे पिळुनि । तया नाम अमतृ ठे उनी । जैसे अमर होणे ।।ज्ञा. ९।४९८
विषाचे अमतृ ठे ऊनिया नाम । करितो अधम ब्रह्महत्या ।।५।। तु. ३१५८
तेंवि विषयांचे जे सुख । ते के वळ परमदुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेविता न सरे ।।९।४९९
बायका, पैका, मुले या प्रत्येक विषयाच्या आरंभी , मध्ये आणि शेवटी दुःखच.
एरव्ही विषयी काई सुख आहे । हे बोलणे चि सारिखे नोहे । तरी विद्युतस्फुरणे का न पाहे । जगामाजी ।।ज्ञान. ५।११३
आरंभी अर्जुनाचे, मध्ये रक्षणाचे , शेवटी गेल्याचे . सुखाने काय मिळते ? काहीच मिळत नाही. बायको सुखाने का मिळते
! गरिबाला मिळत नाही. " का रिणावरी विवाहो । विस्तारिला ।।ज्ञाने. १८।७९५
लक्ष्मी घरात आणायची म्हणून घर गेले, जमीन गेली, सर्व गेले. मग आता लक्ष्मी म्हणावी कि अवदसा म्हणावी ?
लग्नाचे कर्ज फेडता फेडता नाकी नव येते. पाच दिवस लग्नात मोठे सुख सोहळे . घराला लागूनच मांडव पण मंडपात
कड्यावर बसून येतात. मोठा का असेना. घोड्यावर नाहीतर पडद्याच्या गाडीवर. पुढे वाजंत्री. नंतर घोड्यावर बसून
मिरवणूक पुढे दोन-चारशे माणसे, न्हावी चवरी फिरवितो काय वाटत असेल ! लग्न झाल्यानंतर सर्व निसटते.
स्त्री हाती धरिता देख । वाढे प्रपंचाचे थोर दुःख । गृह पाहिजे आवश्यक । भोगार्थ देख स्त्रियेच्या ।।भाग. ९।३०३
देवळात राहण्याची सोय आहे का आता ! बायकोला घेऊन धर्मशाळे त का चालेल ! घर पाहिजे. सर्व लागते. त्याला
एक दोन का चार पोरे झाली. मग ते म्हणतात, स्वामी तुमचे बरे, जेथे पडले मुसळ तेथे क्षेम कुशल. आमचे पाहिले का ?
चीर पीर . बायको मेली तेंव्हा दुःख. पैसा हा सुखाने का मिळतो ? घाम गाळावा लागतो.
रातीदिवस निजनिकट । मरणासी घेता झटे । कवडीची प्राप्ती न भेटे । प्राणांत कष्टे द्रव्य जोडे ।।भाग. ३।२४५ सुखाने
मिळत नाही. म्हणजेच दुःख. हंगामाच्या दिवसात तीन चार वाजेपर्यंत तुकडा मिळत नाही.
पष्ु कळ पैसा मिळाला. सुखाचा ढेकर देऊन बसला का ? पुष्कळ पैसेवाला सुखी नसतो. त्याच्या दृष्टीने गरीब सुखी
असतो. दार उघडे टाकून डुर्रर्र घोरत पडतात. चोर येऊन काय नेतील? आवजाव घर तुम्हारा. ज्यांच्याजवळ पैसा त्यांना
सुखाची झोप नाही. खाटेवरि पडता । व्यापी चिंता तळमळ ।। तुका. ३०६४
फिर्यादी दाखल करायच्या. हुकूमनामा बजावणीला पाठवायचा. त्यात दुष्काळ पडलेला. पैसावसूलीची चिंता. आत
पैसा गेलातर त्याची धाकधूक चाललेली. अशात मध्यरात्रीला चार पाच चोर आले. आले ते एक बसला उरावर, दुसरा
हातात सुरा घेऊन उभा ; तिसऱ्याने किल्ल्या सोडून घेतल्या. तिजोरी गच्चं भरलेली. ते चोर दागदागिने , सोनेनाणे,
नोटांची पुडकी बाहेर काढतात, हा डोळ्यांनी पाहत असतो. गुदगुल्या होत असतील का ? चिडीचूप. नही तो देखा सरु ा.
सकाळी पेढे वाटे ल का ?
तेवी विषयांचे जे सख ु । ते के वळ परमदुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेविता न सरे ।। ज्ञाने . ९। ४९९ करावे काय या
मुर्खांना. विषयांचे सेवन के ल्यावाचून यांचे भागतच नाही. मत्ृ युलोकातले एक एक काय सांगू ?
का शीश खांडुनी आपल
ु े । पायींचा खती बांधिले । तैसे मत्ृ युलोकीचे भले । आहे आघवे ।।ज्ञाने. ९।५००
पायाचे बेंड बरे होईना. एकाने रामबाण औषध सांगितले. दुःखच राहणार नाही. तो म्हणाला, तरवार आहे काय ? तरवार
पाजळून घेतली. घराची कडी लावनू तरवारीने डोके कापा व बेंडावर बांधा. हा बरा होण्याचा उपाय का मरणाचा उपाय
?
म्हणोनि मत्ृ युलोकीं सख
ु ाची कहाणी । ऐकीजेल कवणाचिये श्रवणी । कै सी सख
ु निद्रा अंथरूणी । इगं ळाच्या ।।ज्ञाने . ९।
५०१
खैराच्या लाकडाचा प्रखर निखारा त्याचे अंथरून घालनू निजला तर झोप येईल का ? का होरपळून निघेल ?
ढेकणांचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊ पाहे ।।२८०२
जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागी । दुःख लेउनी सुखाची आगं ी । सळीत जगाते ।।ज्ञाने. ९।५०२
चंद्राला आंगरखा शिवण्याचे काम एका शिंप्याला दिले . माप घेतल्यानंतर उशीर करण्याची सोया नाही, का ? चंद्राला
क्षयवृद्धी म्हणून. सुख-दुःख ही दोन्ही मायेची मुले. दुःखाने आईकडे तक्रार के ली की सर्व जग सुखाच्या पाठीमागे
धावते. मला कोणी विचारत नाही. आईने सुखाला आपले आंगडे दुःखाला देण्याला सांगितले. दुःखाने सुखाचे आंगडे
घालनू सर्व जगाला छळायला लागले. असायचे दुःख पण सुखाचा नुसता भास.
जेथ मंगळाचा अंकुरी । सवेंचि अमंगळाची पडे पारी । मृत्यू उदराचा परिवरि । गर्भु गिवसी ।।ज्ञाने. ९।५०३
मंगळ हे नव्हे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपार ।।३।। तुका. ३६५३
एका धनिकाला मुलगा झाला, बारशाचा थाट, चौघडा वगैरे वाजंत्री, पेढे, बासुंदी भोजनाचा समारंभ. मोठा गाजावाजा.
तेराव्या दिवशी मुलगा मेला मग त्यावेळेला बाहेरची वाजंत्री नको. ऐसी लोकींची जिये नांदणुक । तेथ जन्मले आथि जे
लोक । तयांचिये निश्चितीचे कौतुक । दिसत असे ।।ज्ञाने. ९।५०७
वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य । न करिती विचार का हिताचा ।।तुका. २७११ जन्माला येऊन काही के ले नाही. दुसरे
असे की या मृत्युलोकातले व्यवहार तरी सरळ आहेत काय ? एरव्ही करेयांचा ठामी चांग । ते तयासी कै चे नीट अंग ।।
ज्ञाने. १६।२९३ उंटाकडे पहा. तोंड, मान, पाय, पाठ तरी सरळ आहे काय ? पाठ म्हणजे 'पीराची मदार ' त्याचे मुतणे तरी
सरळ आहे काय ? " पै दृष्टादृष्टीचिये लोडी । लागी भांडवल न सुटे कवडी । जेथ सर्वस्व हानि तेथ कोडी । वेंचिती गा ।।
ज्ञाने. ९।५०८
पैसे खर्चून जेथे कल्याण आहे अशा सत्कर्माला पैसे देणार नाही. जेथे पैशाचा खर्च व्यर्थ अशा कामाला कोट खर्च.
उदा. मुलाचे लग्नाला पाच हजार रुपये खर्च. कर्ज झालेलं तरी चालेल; गाढवाने शेत खाल्ले. पाप ना पुण्य. धर्माची
बाब, कळ्यांची बाब तेथे कवडा देणार नाही. म्हणतो-दिवस कसे आहेत ते ! माहित नाही का ? नाटक सिनेमाकडे कसा
खर्च करतो. जो बहुवे विषयविलासे गुंफे । तो म्हणती उवाये पडिला सापे । जो अभिलाषभारे दडपे । तयाते सज्ञान
म्हणती ।।ज्ञाने. ९।५०९ दुसऱ्याचे धन उपटणारा हा शहाणा. आहारे शहाणा !
जयाचे आयुष्ये धाकुटे होय । बळप्रज्ञा जिरोनी जाय । तयाचे नमस्कारिता पाय । वडिल म्हणुनि ।।ज्ञाने . ९।५१० चोथा
झाला त्याला वडील म्हणतात. बुद्धिमान पोराला धाकटे म्हणतात. वास्तविक म्हाताऱ्याची दहाच वर्षे राहिलीत.
पोराची पन्नास वर्षे राहिलीत. सर्व उलटच आहे.
जव जव बाळ बळिया वाढे । तव तव नाचती कोडे । आयुष्य निमाले आतुलियेकडे । ते ग्लानीचि नाही ।।ज्ञाने . ९।५११
आयुष्य कमी झाले हे कळत नाही. प्रत्येक वर्षाला वाढ दिवस करतात. वास्तविक खुंट दिवस करायला पाहिजे . पन्नास
वर्षे सपं नू एक्कान्नवे लागले म्हणून वाढ दिवस. वास्तविक रडायला पाहिजे पन्नास वर्षे कमी झाली म्हणून.
"जन्मलिया दिवस दिवसे । हो लागे काळाचियाचि ऐसे । की वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ।।ज्ञाने. ९।५१२"
अगा मर हा बोलू न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असते जात न गणिती । गहिस
ं पणे ।।ज्ञाने. ९।५१३
अहा कटकटा हे वोखटे । मत्ृ युलोकीचे हे उफराटे । एथ अर्जुना जरी अवचटे । जन्मलासी तू ।।ज्ञाने. ९।५१५
बोलणे तरी सरळ आहे काय ?
एखादा अनवाणी का चालला त्याला म्हणतात- पायामध्ये जोडा घाल. अंगात अंगरखा घाल. घरात जाते असते, ते
कुठे जाणार ! त्याला जाते म्हणतात. दोन मित्र बरोबर चालले. पैकी एक म्हणाला ' मी लघवी करून येतो. ' तो म्हणतो
बाटली कुठे आहे. टाकतो म्हणावे तर घेतो म्हणतात. असो. या मृत्युलोकात प्रेम ठे वण्यासारखे काही नाही. म्हणून,
तरी झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।।ज्ञाने. ९।५१६
या मृत्युलोकात नित्य सुख असते तर तेथे घे म्हटले असते . " इये भक्तीचीये वाटे लाग " मग माझ्या स्वरूपी प्राप्त
होशील. भगवद उक्तीवरून मृत्युलोक अनित्य, दुःखरूप कळून आले असेल. ही जी भगवतं ाची उक्ती तुकाराम
महाराजांच्या पुढे चित्रासारखी रेखाटली होती, या रहस्याला चांगल्याप्रकारे जंत होते. म्हणून ते म्हणतात, "मृयुलोकी
आम्हा आवडती परी । नाही एका हरिनामें विण ।।१।। या मृत्युलोकात विचाराने पाहिले तेंव्हा त्यांना असे दिसून आले
की या मृत्युलोकात प्रेम ठे वण्यासारखे काही नाही. प्रेम ठे वण्यासारखे असेल तर एक हरिनाम. " नाही एका हरिनामे
विण " एका हरीच्या नामावाचून संपूर्ण मृत्युलोकात दुसरा प्रकार आवडत नाही. प्रपंच मात्र जशा स्वरूपाचा आहे, तशे
त्याच्या स्वरूपाला सत्संगतीने, सतशास्त्राचे अध्ययन करून जाणले . या सस ं ाराचा मिथ्यपणा अपरोक्ष अनुभवाला
आला. म्हणून ते म्हणतात, "मृत्युलोकीं आम्हा आवडती परी । नाही एका हरिनामे विण ।।" एरव्ही समाजाकडे पाहिले
तर काय दिसून येते ? पुष्कळसे लोक विषयावर प्रेम करतांना दिसून येतात. नुसते कोरडे प्रेम करीत नाहीत तर
विषयांकरिता मरतात.
आव्हांटलिया आस्था बुद्धि । विषयसुखाची परमावधि । जीव तैसा उपाधि । आवडे लोका ।।ज्ञाने. ४। २१
स्त्रीपत्रु ादिकी राहिला आदर । विषयी पडिभर अतिशय ।।१५४४ विषय पुष्कळांना आवडणारे आहेत. विरक्त व महात्मा
सोडून कोणाचेही प्रेम हरिनामावर दिसून येत नाही. " भजन नावडे श्रवण । धावे विषय अवलोकून ।।३।।१७८२"
विषय ओढी भुलले जीव । आता यांची कोण करील किंव । नुपजे नारायणी भाव । पावोनि ठाव नरदेह ।।१।। तुका.
७०१
घरावर, गाई, म्हशी, गोडे, मुले, पैसा, बायकोवर किती प्रेम असते ?
ठे ला बेडूक कुंडी । मशक गुंतला शेम्बूडी । ढोरु सबुडबुडी । रुतला पंकी ।।ज्ञाने. १३।७८३
तैसे घरींहूनि निघणे । नाही जीविते मरणे । जया साप होऊनि असणे । भाटी तिये ।।ज्ञाने. १३।७८४
मग घर हे झोपडे का असेना, काही माणसे घरकोंबडी.
महापुरुषाचे चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहार जात । जयापरी ।।ज्ञाने. १३।७८९
तैसा स्त्रीदेही जो जीवे । पडोनिया सर्वभावे । कोण मी काय करावे । काही नेणे ।।ज्ञाने . १३।७९०
हानी लाज न देखे । परापवादु नाइके । जायची इद्रि
ं ये एकमुखें । स्त्रिया के ली ।।ज्ञाने. १३।७९१
चित्त आराधी स्त्रियेचे । स्त्रियेचेनि छंदे नाचे । माकड गारुडीयाचे । जैसे होय ।।ज्ञाने. १३।७९२
हे प्रेम सख्या आईवर, बापावर, भावावर नसते. बायको आली की - हा मोरासारखा थयथया नाचतो. " अग माझे
बायले आणि तुला सर्व वाहिले " बायको म्हणजे तुळजापरू ची भवानी आणि हा मोऱ्या. मुलावं र किती प्रेम ? "
लोभियाचे मन जैसे । जीव जावो परी नमु से । ठे विला ठावे ।। ज्ञाने. १३।२०२"
याप्रमाणे मत्ृ युलोकात निरनिराळ्या विषयावर प्रेम करणारे आहेत. " ऐसा कोणी नाही हे जया नावडे । कन्या पत्रु घोडे
दारा धन ।।ज्ञाने. १३।७०२
या पृथ्वीतलावर विरक्त सोडून कोण आहे की ज्याला हे आवडत नाही ? कन्या, पत्रु , दारा, धन आणि घोडे यासाठी ते
मरतात.
जीवु तैसा उपाधी । आवडे लोका ।।ज्ञा. ४२१ लोक किती प्रेम करतात- " आणि विषयाची गोडी । जो जितू मेला न
सांडी । स्वर्गीही खावया जोडी । येथौनिचि ।।१३।७०२"
जो अखंड भोगा जचे । जया व्यसन कामक्रियेचे । मूख देखोनि विरक्ताचे । सचैल करी ।।ज्ञाने. १३।७०३
पष्ु कळसे विषय आहेत आणि लोक त्यांच्यावर प्रेम करतात; परंतु आमचे महाराज म्हणतात-" मृत्युलोकीं आम्हा
आवडती परी । नाही एका हरिनामेंविण ।।१।।
लोकांच्या चालीच्या विरुद्ध प्रतिपादन करतात असे दिसेल; पण नाही. विषय तुकाराम महाराजांना का आवडत नाहीत
व आम्हाला का आवडतात? ज्या दृष्टीने तुकाराम महाराजांनी त्याकडे पाहिले तर तुम्हीही असेच म्हणाल, "मृत्युलोकीं
आम्हा आवडती परी ।" त्यादृष्टीने तुम्ही आम्ही पाहात नाहीत. तुम्ही म्हणाल, तुकाराम महाराज ज्या दृष्टीने पाहतात
त्याच डोळ्यांनी आम्ही पाहातो. तुकाराम महाराज सगळ्या प्रपंचमात्राकडे कोणत्या दृष्टीने पाहात होते?
" हे विरक्तांचीये दिठी । जै न्याहाळिजे किरीटी । तै पांडुरोगाचीये पुष्टी । सारिखे दिसे ।।ज्ञाने. ५।११९
अविचारी दृष्टीने विषयांकडे पाहू नका ! विरक्त पुरुषास - ब्रह्म लोकांपर्यंत असलेल्या विषयांविषयी वैराग्य उत्पन्न
झालेले असते.
ब्रह्मादि स्थावरांतेषु वैराग्य विषयेष्वनु । यथैव काकविष्ठाया तद्वि निर्मलम् ।। अशा विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर तुम्हाला
ते विषय कसे दिसतील ?
तै पांडुरोगाचिये पुष्टी । सारिखे दिसे ।।
पांडुरोगे आंग सुटले । ते तयाचि नवे खुंटले ।। ज्ञाने. १३।७४६
क्षयी मनुष्य वठत वठत जातो. मांस कुणीकडे जाते याचा पत्ताच नाही. पंडुरोग याच्याउलट जसजसे मरण जवळ येईल
तसतसे शरीर फुगत जाते. एकाच्या मुलाला पंडुरोग झाला होता. रोज उपाय करून बरा होईना. " हा गा रोगु कायी
रोगिया । १८।१२९७"
स्नेही घरी आला. मुलगा लहानपणी पाहिला होता. त्याला ओळखता आले नाही. तो विचारू लागला, हा मुलगा
कोणाचा ? अहो, तुम्ही या मुलाला कडेवर घेऊन खेळवले . तो म्हणाला, मुलाने बरेच अंग धरले; पूर्वी पतंगी काटकुळा
होता. मुलाचा बाप म्हणाला, अहो, अंग धरले नाही; तर सोडायची वेळ आली आहे. तुकाराम महाराजांनी विषयासक्त
लोकांच्या दृष्टीने विषयांकडे पाहिले नाही. तर विरक्ताच्या दृष्टीने विषयांकडे पहिले.
विटले हे चित्त प्रपच
ं ापासनि
ू । वमन ते मनी बैसलेसे ।।२।।
सोने रूपे आम्हा मत्ति
ृ के समान । माणिक पाषाण खडे जैसे ।।३।।
तक
ु ा म्हणे दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हा पढु े ।।४।।
पहिले कडवे सोडून तीन कडव्यातून तक ु ाराम महाराज कडकडीत वैराग्य व्यक्त करतात. तात्पर्य, तुकाराम महाराजांनी
अखिल मत्ृ युलोकाकडे विरक्ताच्या दृष्टीने पाहिले. मत्ृ युलोकाचे अनित्यत्व व दुःखरूपत्व त्यांना दिसनू आले. म्हणून
एका हरिनामावाचून दुसरे काही नाही. आवडत असेल तर एक हरिचे नाम. महाराजांचे नामावर किती प्रेम होते ! माझी
मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ।। तक ु ा. ४०१६
महाराजांना भगवतं ाचे नाम फार आवडत होते . नामाच्या ठिकाणी आवडण्यासारखे आय आहे ? नाम तरी
मृत्युलोकातले ना ! जसे अन्य पदार्थ तसे नाम. मग त्याच्यावर प्रेम करण्यासारखे काय? नाम जरी मृत्युलोकातले आहे,
तरी पण-
अवघाचि आकार ग्रासियेला काळे । एकचि निराळे हरिचे नाम ।। तुका. ३९२५
मृत्युलोकात इतर पदार्थाप्रमाणे अनित्य व दुःखरूप नाही तर हरिचे नाम नित्य व सुखरूप आहे.
काळे खादला हा अवघा आकार । उत्पत्ती संहार घडामोडी ।।१।। तुका. ३४९३
न्याहाळी पा के वढा । पसरलासे चवडा । जो करुनिया माजिवडा । आकार गजु ।। ज्ञाने. १३। ६४
या सगळ्या मृत्युलोकाला नाश आहे. पण हरिनामाला नाश नाही.
अंडज जारज स्वेदज उद्भिज वाटे । हरिनाम नाटे ते बरवें ।।ज्ञाने. अभंग १४९ या चार खाणींना नाश आहे . पण
भगवननामाला नाश नाही.
जे नाटे ते नाम चित्ती । रखुमादेवीपति श्रीविठ्ठलाचे ।। ज्ञाने. १४९
शरीर आटे संपत्ति आटे । हरिनाम नाटे ते बरवे ।। ज्ञाने. १४९
प्रत्यक्ष देखिजे आपण । देहादिकांचे नश्वरपण । हे दुसरे परम प्रमाण । क्षणिकत्व जाण प्रपंचा ।। भाग. १९।१९८
नाशिवंत देह नासेल हा जाण । का रे उच्चारा ना वाचे नाम ।। १।।
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।। तुका. ३६५२
या धनाचा न धरी विश्वास । जैशी तरुवर छाया । यातायाती न चुके तरी हे भोगसील काह्या । या हरिनामेविण तुझे जन्म
जाती वाया । या लागी वैकुंठनाथाच्या तू चित्तीं पारे पाया ।।१२।।ज्ञाने .अभंग १८९
आपल्या आयुष्यापर्यंत धन संपत्ती राहील असा विश्वास धरू नको. हि संपत्ती म्हणजे माध्यानाची छाया आहे . एक वेळ
श्रीमंती व एकवेळ आबं ाबाईचा जोगवा ( भीक मागण्याची पाळी ) तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ।।४।।३२५१
प्रारब्ध का पालथे पडले की -
नातरी उदासीने दैवें । संचकाची वैभवें । जेथींची तेथ स्वभावे । विलया जाती ।। ज्ञाने . ११।४१२ कुणीकडे जातात पत्ता
लागत नाही. आपण जमिनीत पुरून ठे वलेले असते. पण ते चळते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
बापरखुमादेविवराचे नाम नाटे । युगे गेली परि उभा विटे ।।४।। ज्ञाने. १४९
तात्पर्य सस
ं ारमात्राला जसा नाश आहे , तसा नामाला नाश नाही. म्हणजेच ते नित्य अविनाश आहे. सत्य साच खरे । नाम
विठोबाचे बरे ।।१।।तुका. २५३४
भगवतं ाचे नाम सत्य आहे . असे त्रिवार सांगतात. त्रिवार सांगण्यात, नामाचे नित्यत्व निश्चित करतात नाम जसे नित्य
आहे तसेच ते स्वरूपाने सख
ु रूप आहे.
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सख
ु येथे नाम आहे ।।१।।तुका. ३८७७ हरिचे नाम नित्य आणि सख
ु रूप आहे. यावर
शंका अशी येते ससं ाराला नाश का असावा व हरीच्या नामाला नाश का नसावा ?
समाधान :- प्रपच
ं ाचा आश्रय कोण?
नाही अज्ञानावाचुनि मूळ । ययाचे असिलेपण टवाळ । ऐसे झाड सिनसाळ । देखिले जेणे ।।ज्ञाने. १५।१४०
प्रपच
ं मात्राला आश्रय आहे अज्ञान आणि ते अज्ञान ब्रह्मज्ञानाने नाशाला पावते म्हणून प्रपच
ं ाला नाश आहे . आश्रयाचा
नाश तोच आश्रयीचा नाश.
पडोनिया गेली भिंती । चित्रांची के वळ होय माती । की पाहलिया राती । आध
ं ारे उरे ।।ज्ञाने. १८।२६३
चित्रांना भिंत आश्रय व चित्र आश्रयी. प्रपंचाला आश्रय आहे अज्ञान. ते नाशाला पावले म्हणजे प्रपंचाचा नाश होतो.
हरिनामाला नाश का नाही? तर हरिनामाला आश्रय आहे हरिच. तो स्वरूपाने कसा आहे :-
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला । का गा हा दाखविला जगदाकार ।।२।।तुका. १६०१
अथवा " ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रहमैव नापर ।।" परमात्म्याला नाश का नाही तर उत्पत्ती नाही म्हणून.
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूय: ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।गीता २ ।२०।।
नामाचा आश्रय आहे सत्य आणि प्रपंचाचा आश्रय आहे अविद्या, अनित्य म्हणून प्रपंच अनित्य.
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा । या नामा नामी आश्रयो तैसा । अभेदु असे ।।ज्ञाने. १७।४०३
देखे आकाशा आणि अवकासा । भेदू नाही जैसा ।। ज्ञाने. ५।३० नामाचा व नामीचा अभेद आहे.
नामा म्हणे नाम ओक
ं ाराचे मूळ । ब्रह्म ते के वळ विटे वरी ।। ४।। नाम. ६७०
म्हणून, महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् । यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय: ।।२५।।
नामजपयज्ञ तो परम । बांधू न शके स्नानादि कर्म । नामे पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थे ।।ज्ञाने . १०।२३३ अभेद
म्हणून तो जसा सत्य तसेच नामही सत्य. अर्थातच परमात्मा जसा सुखरूप तसे नामही सुखरूप. " सर्व सुखाचे आगर ।
बाप रखुमादेविवर ।।४।।
देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख येथे नाम आहे ।।१।। तुका. ३८७७ नाम सत्य व सुखरूप आहे, म्हणून महाराज
म्हणतात- मृत्युलोकात नामावाचून दुसरा कोणताही प्रकार आवडत नाही. आम्ही नामाचे धारक । नेणो प्रकार आणिक
। सर्व भावे एक । विट्ठलची प्रमाण ।।तुका. ८०७
नाही एका हरिनामें विण ।।१।। या उक्तीवर आणखी एक शंका व समाधान सांगतो. नाम सत्य असेल सुखरूप असेल
पण त्याच्यावर प्रेम का म्हणून करावयाचे ? आम्ही नामावर प्रेम के ले तर उपयोग तरी काय? नामाची आवडी तोचि
जाणा देव । न धरी संदेह काही मनी ।।१।।तुका. २५५५
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ।।१।।
जेथे कीर्तन हे नामघोष । करिती निर्लज्ज हरिचे दास । सकळ वोथबं ले रस । तुटती पाश भवबध
ं ाचे ।।तुका. ७२०
असे समजनू नाम घेतले तर- ब्रह्मभतू काया होतसे कीर्तनी । भाग्य तरी ऋणी देव ऐसा ।।२।।
गोविदं गोविदं । मना लागलिया छंद ।।१ ।। तक
ु ा. ६६२
मग गोविदं ते काया । भेद नाही देवा तया ।।२।।
तक
ु ा म्हणे आळी । जीवे नरु ेचि वेगळी ।।४।।
कीटकासी भ्रमरत्व जोडे । हे तीव्रध्याने, न घडते घडे । विचारितां, दोन्ही मुढे । जड जडे वेधिलें ।।भाग. ९।२४३
भगवत ध्यान नव्हे तैसे । ध्याता भगवदरूपचि असे । ध्याने भ्रममात्र नासे । अनायासे तद्रूप ।। भाग. ९।२४४
विजातीयांची एकरूपता होते, मग सजातीयांची का होणार नाही? नामावर प्रेम ठे वल्याने काय होते? नामसारखा नित्य
व सुखरूप होतो. याचे रहस्य, नाम स्मरण करणारा ब्रह्मरूप होतो. नामस्मरणाने भ्रांतीचा नाश होऊन तो सुखरूप अशा
आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. " भगवद ध्यान नव्हे तैसे ।" ध्याता हा मूळचा भागवद्रूपच आहे. ध्यानाने फक्त भ्रम निवत्त

होतो. म्हणून महाराज म्हणतात, " नाही एका हरिनाम विण " ज्ञानेश्वर महाराजही असेच म्हणतात- गोड तुझे नाम विठो
आवडले मज । दुजे उच्चारितां मना वाटतसे लाज ।।२।। ज्ञाने. अभंग १५१
जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे ।।तुका. २०७२
मात्र रडतराऊ घोड्यावर बसल्याप्रमाणे अथवा मारून मुटकून मुसलमान होणे तसे नको. मोठ्या प्रेमाने, आवडीने त्या
परम कृपाळू भगवतं ाचे नाव घ्यावे. सदाचरणाने राहून भजन करावे. ते कसे करावे ?
( जय विठ्ठल जय जय विठ्ठल )

You might also like