You are on page 1of 14

लळा विदेशातील

घरांचा...
डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी

परदेशांतील वास्तव्यात के वळ तथे ील माणस ंच


लळा-जिव्हाळा लावतात, अस ं नाही, तर तथे ील
घरंही हाच अनु भव देतात. घरांवर, घरांमधील
वस्तूंवर प् रेम करणारं स ंव ेदनशील मन अस ेल तर
घरंही माणसासारखीच हृदयात घर करून राहतात.

भविष्य, पत्रिका, हस्तरे षा या कशावरच


कधी विश्वास नव्हता. तरी कॉले जातल्या एका
अतिउत्साही, नवशिक्या हस्तरे षावाल्या मित्रानं
सांगितलं होतं, ‘खूप भटकशील!’ त्यानं हे सांगितलं
तेव्हा नोकरीनिमित्त पुणे-मुंबई अपडाउन करत होते.
जरा वैतागून आणि चेष्टेनं म्हणाले होते, ‘म्हणजे
असं अपडाउन??’ तर गंभीरपणे म्हणाला, ‘तो
तर करशीलच, पण खूप दूरचाही करशील.’ म्हटलं
बघू. नियमित दैनंदिन प्रवासाची सुरुवात झालीच
होती अपडाउनमुळे. मग लग्नानंतर सासर एका
गावाला, नवरा आणखी वेगळ्या शहरात आणि
माहे र पुण्यात. ही त्रिस्थळी यात्रा भरपूर, अगदी
एसटी महामंडळाचं देणं लागत असावी, इतकी
केली. दहा वर्षं असा तोच ‘अ’पासून ‘ब’पर्यंत,
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 290
त्याच त्याच ठिकाणी आणि त्याच त्या पद्धतीनं
प्रवास केला तेव्हा त्या ह. रे . वाल्या मित्राला शिव्या
घातल्या अनेकदा. आणि मग ध्यानीमनी नसताना
अचानक ९६ साली सातासमुद्रापार टोरांटो. कारण
नवरा. तो कायम जगाच्या या टोकापासून त्या
टोकापर्यंत कुठे तरी असे. त्याच्यामुळे जवळजवळ
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परदेशात सुट्ट्या
घालवल्या. नवरा असे त्या त्या ठिकाणी. आयुष्यात
बॅगा भरणे, एवढं एकच काम असावं, इतक्या वेळा
त्या भरल्या आणि रिकाम्या केल्या. ह. रे . मित्राचं
ते भविष्यकथन ‘खूप वेळा बॅगा भरशील, खूप वेळा
घरं बदलशील,’ असं मी बदलू न घेतलं . पण मजा
आलीच.
वेगवेगळ्या देशांत किमान पाच-सहा वेळा
घरं थाटली आणि आवरली. नवरा बहु धा आधीच
पोचले ला असे. आम्ही तिथे पोचल्यावर काय
बघायचं, काय काय आणि कुठे खायचं वगैरेंचा
विचार करून ठे वी. रजा प्लॅन करून ठे वी. मग
दर आठवडी सुट्टीला आजूबाजूचा प्रदेश घालायचा
पायाखालू न. कोणताही नवा प्रदेश पायांनी फिरला,
स्थानिक बस-रे ल्वेने केला की वेगळाच दिसतो.
तसा पाहायचा. त्यामुळे फार प्रसिद्ध नसले ली, पण
फिशिंग करता येईल अशी, त्या त्या ऋतूंची फळं
स्वतः जाऊन तोडता किंवा गोळा करता येतील,
अशी आडबाजूची- कंट्रीसाइड म्हणता येईल अशी
- ठिकाणं आलीच आमच्या टप्प्यात. ‘नायगरा’
आणि ‘थाउजंड आयलं ड’ इतकीच तिथेही रमले मी.
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 291
कुठे स्वयंपाकघर टिचकं, तर कुठे आणखी
काही; कुठे अगदी भारी कुकिंग रें ज, तर कुठे
आपल्यासारखी गॅसची शेगडी. पाइपचा गॅस.
कुठे अगदी वॉल टु वॉल कार्पेट तर कुठे लाकडी
तक्त्याची जमीन. नर्तकीसारखी हलकी पावलं
टाकत चालायचं. ‘जपून टाक पाउले नाही तर
ओरडतील शेजारी...’ असं म्हणत. या विदेशी
घरांनी बरं च काही शिकवलं . मुख्य म्हणजे unlearn
करायला शिकवलं . किती अंगवळणी पडले ल्या
असतात क्षुल्लक गोष्टीसुद्धा. अलीकडे प्रचलित
झाले लं learn to unlearn मी जगले . स्वयंपाकाच्या
अत्यंत innovative तऱ्हा शिकले मी. कागदी
खोक्यातलं दूध आणि टी बॅग्ज, पिवळ्या मोहरीची
फोडणी, इथून नेलेल्या कढीपत्त्याच्या सुक्या पानांचा
अगदी कंजूष वापर, कणिक म्हणून मिळणाऱ्या
वाटे ल त्या पिठाच्या पोळ्या, काहीही केलं आहे .
कारण तेव्हा अगदी सहज आपलं वाणसामान
तिकडे मिळत नसे. अलीकडे परत तिकडे गेले
तेव्हा अगदी विड्याची पानं आणि तयार पानही
मिळालं सहज. पैसे जपून वापरायचे असत.
त्यामुळे इथून जाताना झारे आणि निर्लेपच्या
कढयादेखील नेल्या आहे त. प्रेशर कुकरही नेला
आहे . त्यामुळे गाशा गुंडाळू न निघताना ओळखीच्या
भारतीय कुटु ं बांना इथून सोसासोसानं नेलेली भांडी,
कढया देऊन टाकायच्या. निघायचे वेध लागले की
वाणसामान संपवायचं, अगदीच उरे ल आणि वाया
जाईल वाटणारं मैत्रिणींना वाटू न टाकायचं. शेवटचे
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 292
चार-पाच दिवस कोणाकोणाकडे निरोपाची जेवणं
जेवायची, मैत्रिणींना मिठ्या मारून भरपूर रडारड
करायची, सतराशे साठ वेळा सामानाचे पेटारे
उचकायचे, नि पुन्हा भरायचे. कुठे रोज पाऊस तर
कुठे उणे ३० तापमान. कुठे ड्राय आणि वेट... असे
दोनच ऋतू. कुठे वाहनाचं सुख, तर कुठे भरपूर
पायपीट!
या सगळ्या भटकंतीमध्ये सुखाची घरं ठरली
ती कॅनडा, सिंगापूर आणि कोस्टारिकामधली.
कॅनडातलं घर होतं लहानसं. पण परदेशातलं
पहिलं म्हणून त्याचं अप्रूप. अगदी नुकतंच गुगलनं
दाखवलं ते. अव्हेन्यू रोडवर अजून तसंच उभं
आहे . जवळच असले ल्या बागेसह. काही विशेष
बदल दिसला नाही. नवऱ्याच्या कंपनीनं सगळा
मांड मांडून दिला होता. म्हणून गेल्या गेल्या जीव
सुखावला. तिथे मुक्कामही बराच झाला. मुलाला
शाळे त घातलं आणि त्याच शाळे त पालक-
स्वयंसेवक म्हणून कामही करता आलं . शाळे चं
त्रैमासिक निघे, त्याच्या संपादकीय मंडळात. याच
घरात राहत असताना एरिना माझी मैत्रीण झाली.
शेजारच्या इमारतीत राहत असे. १९९० नंतरच्या
घडामोडींनंतर रशियामधून बरीच कुटु ं बं स्थलांतरित
झाली, त्यातलं तिचं. तिचा मुलगा दिमित्री आमच्या
मुलाच्या वर्गात आणि नंतर त्याचा अगदी जवळचा
मित्र. रोज शाळे त सोडायला आणि आणायला
जाताना भेट होत होत मैत्री झाली. ती इंग्लिश
शिकायला आणि बोलायला मिळे ल म्हणून सतत
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 293
धडपडे . तिचा नवरा प्राध्यापक होता, पण टोरांटोत
त्याला काम मिळत नव्हतं. सायकलवरून रोज तो
बाहे र पडे आणि ग्रंथालयात जाऊन बसे. अबोल
होता. त्यामुळे त्याच्याशी हसण्याची देवघेव तेवढी
होई. बेकार नवऱ्याची आणि आपल्या भवितव्याची
काळजी करणारी स्त्री होती ती. तिला दिलासा
देणं, ‘मिळे ल त्याला नोकरी’ असं म्हणत राहणं
आणि इंग्रजीकडे लक्ष वेधून जरा विषयांतर करणं,
हा आमच्या रोजच्या बोलण्याचा पॅटर्न. त्यामुळे
मामला जरा एकतर्फीच राहिला. घनिष्ट मैत्रीला
फारसा न रुचणारा. याच घरात असताना एकदा
शेजारच्या स्थानिक बाईनं रात्री दार वाजवून
रडतरडत, ‘माझा मित्र दारू पिऊन मला मारहाण
करतोय, प्लीज, पोलिसांना बोलवा,’ अशी अजिजी
केली होती. तिची मांजरं सुद्धा तिच्याबरोबर रडत
होती. दारू पिऊन बायांना मारझोड करणारे नवरे
असे कुठे ही भेटतात... याच घरात असताना
आमच्या मजल्यावरचा एक लहान मुलगा घराच्या
बाथरूममध्ये लॉक झाला होता. बाहे रून त्याची
आई आणि जरासा मोठा भाऊ आणि आतून
तो... आरडाओरडा... रडारड. मग फायर ब्रिगेड
येऊन त्याची सुटका. हे खरं म्हणजे कुठे ही घडणारे
प्रसंग. पण ते ‘तिथे’ही घडले . माणूस इथून तिथून
सारखाच... हे ठसलं याच घरात. म्हणजे काही
गोष्टी कशा आपल्याला समजल्या आहे त असं
वाटत असतं. पण त्या खऱ्या समजतात तेव्हा
अगदी लखलखाट होतो नं, तसं समजलं . कातडीचा
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 294
रं ग तेवढा वेगळा... रक्त लालच.
रस्त्यावर ओला कचरा आणि सुका कचरा
टाकण्याच्या वेगळ्या कचराकुंड्या प्रथम पहिल्या
३५ वर्षांपूर्वी. त्यातही काचा, टिन वेगळं आणि
कागद वगैरे वेगळं . नादुरुस्त फ्रीज आणि जरा
कापड उसवले ले सोफे लोक बिनदिक्कत रस्त्यावर
कचराकुंडीशी आणून ठे वत. कपडे भरले ल्या
मोठ्या थैल्या ठे वले ल्या असत. यूज अँड थ्रो.
भांडवलशाहीमधून आले ल्या या चैनदारीचं पहिलं
डोळे उघडणारं दर्शनही इथेच घडलं आणि त्याच
वेळी पब्लिक लायब्ररीतून २५ पुस्तकं घेऊन तो
श्रीमंत गठ्ठा मिरवत येण्याची चैनही प्रथम तिथंच
केली. बाकी आपण कुठे ही नवं पाहतो, नवं
चाखतो, नवे अनुभव घेतो. केल्याने देशांतर...
नेहमी सगळ्यांना येणारे अनुभव आले च. कमालीची
स्वच्छता, स्वयंशिस्त, नागरिकत्वाचं जागतं भान.
आपण आणि ते... हे द्वंद्व असतंच मनतळाशी.
त्यामुळे मनातल्या मनात सतत तुलनाही केली.
काहीही खरे दी करताना डॉलर आणि रुपये असे
गुणाकार आणि भागाकार केले . यथासांग. नेहमी.
टोरांटोमधला पानगळीचा रं गोत्सव अजून आहे
मनात. नोव्हें बरमध्ये तापमान उतरायला लागलं
आणि पहिला स्नोफॉल झाला. थर्माकोलचे बारीक
तुकडे हलके हलके तरं गत यायला लागल्यावर
वेड्यासारखे खाली येऊन आम्ही ‘गाऱ्या गाऱ्या
भिंगोऱ्या’ करणाऱ्या मुलांच्या वयाचे होऊन गेलेलो
आठवतं. कोणी बघत असेल का, कोण हसेल का,
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 295
वगैरे काही मनाजवळ फिरकूही न देता धमाल
केली त्या पहिल्या स्नोफॉलमध्ये. पण दिवसेंदिवस
हवेतला बोचरे पणा वाढत गेला आणि तापमान उणे
२० झाल्यावर मात्र नाताळच्या सुट्टीसाठी मायदेशी
येण्याचे वेध लागले . तेव्हा तो निर्णय झाला! तिथेच
ठरवलं की मुलाचं शिक्षण आणि आपलं आवडतं
काम धडपणे करायचं असेल, तर पुण्यातलं घर
हे च हे डक्वार्टर राहील. वर्षातून एकदा नवरा येईल
भारतात आणि सुट्ट्यांना आम्ही जाऊ तिकडे . ९७
साली अवघड होतं, हे ठरवणं. विशेषतः दोन्ही
घरच्या लोकांना हे विचित्र वाटलं होतं. पण तेच
निर्णय योग्य ठरले , असं आता वाटतंय. परत
उन्हाळी सुट्टीला गेलो तेव्हा मुलाला शाळे तल्या
मित्रांना भेटायची इतकी तहान लागली की वेडा
परत शाळे त जायचं म्हणाला. डिसेंबरमध्ये शाळे तून
काढू न भारतात आले लो, आता परत एप्रिलमध्ये
घेतील का शाळे त...? घराजवळच पब्लिक
स्कू ल होतं. पासपोर्ट-व्हिसा बघून लगेच प्रवेश
झाला. आम्हाला दोनच महिन्यांसाठी प्रवेश हवा,
हे ही तिथे सांगून टाकल्याचं आठवतं. गंड आणि
पापभिरूपणा! पण मिळाला प्रवेश. मात्र मधल्या
चार-सहा महिन्यात एरिनाचं कुटु ं ब तिथून आणखी
कुठे गेलं होतं. कोण जाणे तिच्या नवऱ्याला नोकरी
मिळाली की नाही. माझी पहिली परदेशी मैत्रीण
आणि मुलाचा पहिला परदेशी मित्र पुन्हा कधीच
भेटले नाहीत. आमच्या आठवणीत आणि फोटोत
मात्र ते आहे त अजून.
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 296
सिंगापूरमधलं घर अशा वस्तीत होतं, की जिना
उतरलं की दक्षिण भारतीय जोडप्याचं छोटं सं फूड
आउटले ट. रोजचा नाश्ता तिथेच. आणि प्रेमानं.
भारतातल्या त्यांच्या मोठ्या कुटु ं बातल्या हकीकती
ऐकत. खरोखर एकदाही स्वयंपाक केला नाही त्या
घरात. रोज भटकायला जायचं, येताना जेवूनखाऊन
यायचं. मुलगा लहान होता. त्याच्याशी दुपारभर
खेळायचं, ५००० तुकड्यांचं एक जिगसॉ पझल मांडून
ठे वलं होतं जेवणाच्या टे बलावर. कंटाळा येईपर्यंत
ते लावत बसायचं. टीव्हीवर हिं दी आणि इंग्रजी
सिनेमे बघायचे. भाचा तेव्हा तिथे सिनेमटॅ ोग्राफीचा
कोर्स करत होता. कधी तरी त्याच्या इन्स्टिट्यूटच्या
जवळ ठरवून भेटायचं. रोज संध्याकाळी कुठल्या
‘सबवे स्टेशन’ला भेटायचं ते ठरवून नवरा कामाला
जायचा. कामावरून येताना मी आणि मुलगा तिथे
त्याला भेटायचो. मग आसपास भटकंती. रात्रीचं
जेवण आणि पेंगुळले ल्या मुलाला बरे चदा खांद्यावर
घालू न घरी. मोबाइल फोन अजून यायचे होते.
तरी सगळं बिनचूक पार पडे . सिंगापूरमध्ये टुरिस्ट
गाइड म्हणून नेमतील, इतकं ते पायाखालू न घातलं
तेव्हा. वेगळे च दिवस होते ते. घरमालक आपल्या
cpwd सारख्या सरकारी संस्थेत होता मोठ्या
हुद्द्यावर. ते वर्ष ‘क्लीन अँड ग्रीन सिंगापूर’चा नारा
घेऊन आलं होतं. सिंगापूरमधला कचरा विशिष्ट
तापमानाला भाजून त्याचे मोठमोठे ब्लॉक्स तयार
करून दक्षिण समुद्रात भराव घालू न नवी जमीन -
रे क्लमेशन- तयार करण्याच्या प्रकल्पावर तो काम
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 297
करत होता. त्याचं कुटु ं ब त्यानं सिडनीला पाठवून
दिलं होतं आणि सरकारी नियमानुसार त्याचा चालू
प्रोजेक्ट संपला, की तोही निवृत्ती घेऊन कायमचा
तिकडे जायचा होता. जाताना त्याची जागा विकत
घेण्यात आम्हाला रस आहे का, विचारलं त्यानं.
अहाहा! एकविसाव्या मजल्यावरची त्याची ती
जागा इतकी अप्रतिम होती! तो स्वतः मले शियन
मुस्लिम होता. उच्च अभिरुची असले ला. खानदानी.
त्याच्या अभिजात रुचीने ते घर सजवले लं होतं. का
कोण जाणे, पण फार खूश होता आमच्यावर. एक
दिवस खास परवानगी काढू न तो त्याचा प्रकल्प
दाखवायला घेऊन गेला आम्हाला. सगळं फिरून
नीट समजावलं . साहे बाचे पाहुणे म्हणून आम्हीही
मिरवून घेतलं . हे मात्र अगदी आपल्याकडे असतं
तसं. कॅनडात कधी साहे ब वगैरे नाही. पण इथे ही
श्रेणीव्यवस्था अगदी लक्षात यावी इतकी. मेट्रोत
बसलं की कुटु ं बं दिसत. अगदी आजी-आजोबासुद्धा
असत. एरवी कोणत्याही देशात अशी कुटु ं बं नाही
दिसली. एकाने जाऊन जागा पकडणे आणि हातवारे
करत आपल्या माणसांना तिथं बसायला बोलावणे, हे
अगदी टिपिकल भारतीय वाटणारं वैशिष्ट्यही तिथे
दिसलं . सार्वजनिक ठिकाणी मोठ्यानं बोलणं हे ही.
रोज दुपारचा पाऊस. स्वच्छ रस्ते. विषुववृत्तीय
फुलं आणि फळं यांची रे लचेल. आयुष्यात कधी न
खाल्लेले बरे च पदार्थ मी इथे खायला लागले . पण
सोलू न ठे वले ले बेडूक नि बदक नि कासव बघू
शकले , तरी ते मात्र नाही कधी चाखलं .
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 298
तिसरा आवडता मुक्काम एकदम दुसऱ्या
टोकाला कोस्टारिकात. कोस्टारिका म्हणजे रिच
कोस्ट! समृद्ध नि स्फटिकस्वच्छ समुद्रकिनारे
असले ला चिमुकला देश. तिथलं घर तर मस्त
अंगण असले लं. तळमजल्यावर. पण मुख्य म्हणजे
तिथे घरकामाला ‘जुरी’ होती; आठवड्यातून एकदा
तासिका तत्त्वावर येत असे. पहिल्याच दिवशी तिनं
एक मोठी यादी सांगितली - साफसफाईसाठी तिला
हातमोज्यांपासून काय काय लागेल ते. घरात येताना
स्वतःचे स्लीपर्स आणून आणि अत्यंत नेटकेपणे
आणि प्रामाणिकपणे काम करून जिंकूनच घेतलं
तिनं.
तिथं काही तरी ले खनाचं काम घेऊन गेले
होते, तर कुतूहलानं ती बघत असे. आणि फार
आदर वाटे तिला त्या कामाचा. माझं नाव तुझ्या
भाषेत लिहू न दाखव, म्हणाली. गावठी स्पॅनिशमध्ये
ती आणि मोडक्यातोडक्या स्पॅनिशमध्ये मी अशी
आमची धमाल संभाषणं चालत. ऐकायला कोणी
नसे, हातवारे बघायला कोणी नसे. त्यामुळे
तिच्याशी गप्पा हा अनेकदा ध्वनींचा संवाद असे.
मनात जिव्हाळा होता, म्हणून त्याला ‘संवाद’
म्हणतेय!
कोणत्याही ठिकाणी अगदी पर्यटक म्हणून
गेले असले , तरी मला त्या त्या ठिकाणची भाजी
मंडई किंवा स्थानिक बाजार म्हणू, बघायला फार
आवडतं. भारतात ले ह नि मनाली ते गोवा सगळे
बाजार मी बघितले आहे त. नुकतेच भूतानमध्येही
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 299
पाहिले . स्थानिक माणसं जिथे जातात आणि
रोजच्या गरजेच्या वस्तू जिथून घेतात, त्या जागा
बघायला फार आवडतात मला. स्पेनमधली
आठवण आहे . मुक्काम थोडा आणि सोंगं फार
होती. बार्सिलोनामध्ये म्युझियम्स आणि ऑलिम्पिक
स्टेडियम बघायचंच होतं तरी वेळात वेळ काढू न
मार्के ट बघायला गेलो. कोणी कोणी स्पॅनिश केशर
आणायला सांगितलं होतं. म्हणून भरपूर केशर
घेण्याचं निमित्त. आपल्या फुले मंडईसारखं एका
छताखाली जरा उं चशा ओट्यांवर लहानलहान दुकानं
होती. दाटीवाटीत बसले ली. दुकानात विक्रे त्यांत
स्त्रियांची संख्या अगदी डोळ्यात भरावी अशी.
ती सिंगापुरातही दिसते. भाजीपासून छत्र्यांपर्यंत
सगळं एका छताखाली. तर केशराची चौकशी
करत होते. आपल्याकडे जशा एक ग्रॅम किंवा अर्धा
ग्रॅम केशराच्या डब्या मिळतात, तशाच डब्या त्या
विक्रे त्या बाईनं पुढ्यात ठे वल्या. म्हटलं , ‘मला जरा
मोठी हवी. आणि खूप हव्यात...’ तशी ती हाताने
चिमूट दाखवत म्हणाली, ‘हा पदार्थ अगदी इतकुसा
घालतात.’ मनात म्हटलं , ‘कप्पाळ... ते माहितीय
गं... पण आता काय डझनभर घेऊ की काय...’
मग घेतल्या त्याच एकेक ग्रॅमच्या डब्या. काही
विशेष वेगळा नव्हता त्यांचा रं ग नि वास. पऽऽऽऽण
स्पॅनिश केशर!
कोस्टारिकात तर आपल्या मार्के ट
यार्डासारखा होलसेल बाजार आमच्या घरापासून
चालत जाण्याच्या अंतरावर. आपल्यासारखाच
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 300
आरडओरडा, भांडणांचा जोरदार आवाज. तिथे
सगळी पिकं-भाज्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवले ल्या.
इतकी रसरशीत कलिं गडं आणि अननस जगात कुठे
नसतील. ‘आंबट नाही ना निघणार?’ विचारलं की
लगेच आपल्या समोर अननस कापून भलीमोठी
फोड हातावर ठे वणार. वाटलं , शेतकरी सगळीकडे च
दिलदार. आणि इथे शेतकरीच आपला माल थेट
विकतात. कॉटे ज चीज, दुधाचे पदार्थ, गावरान
अंडी, आणि हो बर्फाचा अफलातून गोळा... वाट्टे ल
ते तिथे विकत मिळत होतं. त्वचेचा रं ग आणि
भाषा सोडली तर अगदी आपल्या मंडईची सुधारित
आवृत्ती. तसाच विशिष्ट वास, तसेच कष्टकरी
चेहरे . आणि तोच मोकळे ढाकळे पणा.
आयुष्यातल्या सुरुवातीच्या २५ वर्षांपेक्षा ही
नंतरची २५ वर्षं म्हणजे स्वत:मधल्या आश्चर्यकारक
बदलांची वर्षं आहे त. अनेक सांस्कृतिक धक्के
बसले ली वर्षं. मोकळं करणारी वर्षं. बरे च ग्रह-
पूर्वग्रह दूर फेकून देणारी वर्षं. मनावरची जुनाट
ओझी झुगारून देणारी वर्षं. इकडे आलं की पुन्हा
कुकर आणि फोडण्या. पोळ्या आणि डबे. पण ते
करताना पुन्हा म्हणून ती फेकले ली ओझी डोक्यावर
घेतली नाही. म्हणून ही वर्षं अधिक अर्थपूर्ण
वाटतात. या प्रकारच्या जगण्याची कल्पनाही कधी
केली नव्हती.
त्या हस्तरे षावाल्या मित्रानं सांगितलं होतं ते
खरं च खरं झालं , म्हणून एका प्रवासातून येताना
त्याला आठवणीनं काही घेऊन आले , ते द्यायला
Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 301
गेले आणि विचारलं , ‘आता चंद्रावर किंवा
मंगळावर वगैरे सफरीचे किंवा वस्तीचे योग
असतील तर सांग रे बाबा.’
rrr

Ñï>r lwVr - {S>{OQ>b {Xdmir A§H$ 2021 & 302

You might also like