पहिली अमरनाथ यात्रा २०१४

You might also like

You are on page 1of 5

|| जय बाबा बर्फानी ||

जानेवारीच्या प्रारंभी आमच्या कार्यालयातील श्री बाबा थेटे यांचा अमरनाथ यात्रा व वैष्णोदेवी दर्शन यात्रा/ काश्मीर दर्शन
याचा मेल आला. दि २ जुलै २०१४ ते १७ जूलै २०१४ या दरम्यान आयोजित के लेली हि यात्रा रु. ७५००/- मध्ये ( सर्व
खर्च समावेशक ) अशी जाहिरात या मेल मध्ये होती. मालपाणी हाउस या आमच्या कार्यालयातील बऱ्याच लोकांनी हि यात्रा
या अगोदर बाबा थेटे यांच्या बरोबर के ली होती. या यात्रेचे वर्णन व अनुभव आम्ही या सर्वांकडू न बऱ्याच वेळा ऐकलेले होते.
बाबा थेटे यांनी बऱ्याचवेळा हि यात्रा के लेली होती, त्यांच्याशी कायम होणाऱ्या चर्चेमधून व इतरांकडू न यात्रेदरम्यान असलेले
निसर्ग सौंदर्य व भक्तिमय असे सर्व वातावरण , बाबा बर्फानिंच्या दर्शनाने मिळणारे अतुच्य समाधान व खरोखरच शिव
शंकरांचे अस्तित्व यापुढे नतमस्तक होण्याची संधी या बद्दल भरभरून ऐकले होते , या सगळ्यामुळे या यात्रेचा आयुष्यात
एकदा तरी आपण सुद्धा अनुभव घ्यावा अशी एक अमोलिक इच्छा मनातून निर्माण झाली. व या यात्रेकडे जणू मी आपोआपच
ओढला जाऊ लागलो.
माझ्या ऑफिस मध्ये याबाबत मी, विनय राम व श्री कु टे साहेब अशीच चर्चा करत असताना अजून काहीजण या
चर्चेत सहभागी झाले, व चर्चा वाढत जाऊन अखेर आपण पण एकदा तरी हि यात्रा करून आपणपण थोडेसे पुण्य पदरात
पडू न जणू अमरच होणार या इच्छेने अमरनाथ यात्रा करावी असे ठरले जणू भगवान शंकरांची च अशी इच्छा असावी कि
आमची यात्रा घडू न यावी. कारण हि जाहिरातच आमच्या अमरनाथ यात्रेची नांदी ठरली. तर मग चलो अमरनाथ
.............
या अगोदर मी कधीही महाराष्ट्रा बाहेर कु ठेही कधीही गेलो न्हवतो व कधीही कु ठलेही काही कारण घडले न्हवते कि
मी महाराष्ट्र सोडू न इतर राज्यात काही कार्यालयीन कामासाठी सुद्धा गेलेलो न्हवतो. आता एकदमच डायरेक्ट जम्मू काश्मीर
, अमरनाथ, पहलगाम , श्रीनगर , वैष्णोदेवी व ते सुद्धा पर्यटन व देवदर्शन यासाठी .... हि कल्पनाच माझ्यासाठी रोमांच
आणणारी होती. कारण आमच्या त्यावेळच्या आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती मुळे दूरवरची सहल व फिरायला जाणे म्हणजे
फारच दूरची गोष्ट होती. मालपाणी उद्योग समूहात Dispatch विभागात मी कामाला असल्याने आतापर्यंत कं पनीच्या
मालवाहतूक गाडी मध्ये मी महाराष्ट्रातील अनेक देवस्थानाचे दर्शन झाले होते. पण महाराष्ट्राबाहेर मी कधीच पाय ठेवला
न्हवता . त्यात काश्मीर हे आम्ही तेव्हा फक्त चित्रपटातच पहिले होते. त्यामुळे हि ट्रीप म्हणजे एक सुवर्णसंधीच दिसत होती.

भ्रमनिरास व पुन्हा गगनभरारी


आम्ही तिघे जण मी विनय राम व कु टे साहेब असे या ट्रीपसाठी तयार झालो , मग आम्हाला श्री राजू गाडेकर हे
चौथे सहकारी मिळाले . असाच एकदा मी आमच्या मित्रमंडळीं मध्ये सहज चर्चा करताना अजून एक मित्र पप्पू के दारी हा पण
आमच्या बरोबर येण्यास तयार झाला. असे आम्ही पाच जण अमरनाथ यात्रेला जाण्यास तयार झालो. मग मी सर्वांचे आधार
कार्ड गोळा करून बाबा थेटे यांच्याकडे आलो असता त्यांनी काही कारणाने आपली ट्रीप हि कॅ न्सल झाल्याचे सांगितले. हे
ऐकू न जणू आता माझे स्वप्नच भंग झाले, जणू कोणी तापलेले शीशे आपल्या कानात ओतत आहे असेच वाटत होते.
अतिशय निराश झालो. आपल्या नशिबात अमरनाथ यात्रा नाहीच असे वाटू लागले. मनात रंगवलेले मी काश्मीरचे चित्र जणू
कोणीतरी पुसून टाकत आहे असेच झाले. आता सगळ्यांना हि बातमी कशी काय सांगायची याचाच विचार करत होतो,
कारण सर्वांनी आपापल्या घरी या यात्रेची माहिती दिली होती, अमरनाथ यात्रा हि एक अतिशय कठीण अशी यात्रा आहे कि
जी पहलगाम मार्गे २२-२५ किमी पायी किं वा घोड्यावरून अनेक डोंगर पार करून करावी लागते. उंचावर अतिशय विरळ
ऑक्सिजन असल्याने बऱ्याच लोकांना त्रास होतो. कधीकधी जीवावर सुद्धा बेतू शकते . आमच्या मध्ये कु टे साहेब व
गाडेकर हे थोडे वयस्कर असल्यामुळे त्यांच्या घरून तयार होत न्हवते . काश्मीर मधील असलेले दहशतवादी वातावरण
यामुळे सर्वांच्या घरच्यांचे म्हणणे होते कि जायलाच पाहिजे का इतक्या कठीण यात्रेला, देव काय इथे भेटणार नाही का ? या
त्यांच्या सगळ्या प्रश्नांना आम्ही पुरून उरल्याने एकदाचे सगळे जाण्यासाठी तयार झाले होते. आता इतकी सर्वांची
मानसिकता तयार झाल्यावर ट्रिपच कॅ न्सल म्हणजे दुधात विरजण पडल्यासारखे झाले. बाबा थेटे म्हणाले आता जरी नाही
गेलो तरी आपण पुढील वर्षी नक्की अमरनाथ यात्रेला जाऊ.
खाली मान घालून मी निराश मनाने ऑफिस ला आलो तर सगळे काय झाले अश्या नजरेने मला
विचारात होते, मी सर्वाना घडलेली सर्व घटना सांगितली. सर्वांनाच धक्का बसला , आता पुढे काय करायचे हेच कळत न्हवते
. जणू भगवान शंकरच आपली परीक्षा पाहत आहे असेच वाटू लागले, कारण मनात कु ठेतरी अजूनही आशा जिवंत होती कि
आपल्याला अमरनाथ बाबा बोलावणारच आहे. पण परिस्थिती वेगळेच दर्शवत होती. मग एकदा पेपर मध्ये अमरनाथ यात्रेचा
एक लेख वाचनात आला, त्यात त्या लेखकाने एकट्याने के लेली हि यात्रा व त्यात त्याला आलेले अनुभव सांगितले होते, ते
वाचून मग परत मनाने उभारी घेतली का जर एकटा माणूस हि यात्रा कु णाच्याही मदती शिवाय करू शकतो तर आपण पाच
पांडव आहे, आपल्यालाही हे शक्य होऊ शकते.
सर्वांशी मग सल्लामसलत करून आपण आपल्या हिमतीवर व कु णाच्याही सोबतीशिवाय या यात्रेला जायचे
असे ठरले. मुळातच माझा असेलेला जिज्ञासू स्वभाव व एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याची दुष्टी याने मग अमरनाथ
यात्रे विषयी ची माहिती मिळवणे सुरु के ली. परत एकदा बाबा थेटे यांच्याकडे जाऊन यात्रेची सर्व माहिती घेतली व एका
वहीत ती प्रत्येक दिवसाच्या दिनक्रमानुसार नोंद के ली. त्याचप्रमाणे आमचे अजून एक सहकारी श्री विनोद अण्णा एनगन्दुल
यांनी पण अशीच अमरनाथ यात्रा बऱ्याचवेळा के लेली असल्याने त्याच्याकडू न बऱ्याच टिप्स मिळाल्या व त्यांच्याकडे
असलेली मागील वर्षी के लेले यात्रेचे नियोजन व यात्रेदरम्यान घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची यादी मिळाली.
या यात्रेसाठी प्रथम आवश्यक असतो तो श्री अमरनाथ शाईन बोर्डाचा यात्रेचा परवाना . यासाठी तुमच्याकडे
रहिवाशी पुरावा व ओळखीचा पुरावा गरजेचा असतो कारण या यात्रेदरम्यान सर्व यात्रेकरूं चा २ लाखाचा विमा उतरवला
जातो. तसेच प्रत्येकाची शारीरीक तपासणी हि मान्यताप्राप्त नेमून दिलेल्या दवाखान्यात करणे गरजेचे असते कारण हि यात्रा
आपल्या शरीराची व मनाची परीक्षा पाहणारी यात्रा आहे. निसर्गाच्या लहरी वातावरण व ऊन वारा पाऊस यांचा सामना
करावा लागतो, वरवर चढाई व विरळ होत जाणारा ऑक्सिजन त्यामुळे हृदयावर येणारा ताण सहन करता यावा यासाठी हि
तपासणी असते. ईसीजी व रक्त तपासणी तसेच छातीचा X-rey काढू न डॉक्टर कडू न तपासून सर्व ठीक असल्याचा शेरा
घ्यावा लागतो. मग यात्रेचा परवानगीसाठीचा एक फॉर्म भरून ठराविक रक्कमेसह तो फॉर्म जम्मू-काश्मीर बँके त जमा करावा
लागतो. अशी माहिती मिळाली. तसेच रेल्वेचे तिकीट बुकिं ग पण चार महिने अगोदरच करावे लागते. राहण्याची व्यवस्था पण
करावी आपणच करावी लागते, अशी सर्व माहिती विविध मार्गाने गोळा के ली.
नवीन प्रदेश , अनोळखी माणसे व माहित नसलेले ठिकाणे, यात्रेसाठी लागणारा १५ दिवसाचा वेळ, प्रथमच सर्वांचे
महाराष्ट्राबाहेर जाणे, या सर्व समस्या डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा आपण या यात्रेचे नियोजन करत आहोत या
विचारांची डोक्यात गर्दी होत होती , एक मन म्हणत होते कि नको जाऊ , बघू पुढील वर्षी पण दुसरीकडे असाही एक विचार
मनात येत होता कि काय हरकत आहे जायला , इतकी भक्तमंडळी लाखोंच्या संख्येने जातात त्यांची काळजी घ्यायला
भोलेनाथ समर्थ असतो. पंढरीच्या वारीत जसे वारकरी तहानभूक हरपून होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता पांडु रंगाच्या
दर्शनाला जातात त्यांची काळजी ती विठू माऊली घेते तसेच या यात्रेत भोलेनाथच आपल्याबरोबर असेल हा मनात विश्वास
होता.
मग पुन्हा नव्या उमेदीने आम्ही सर्व यात्रेच्या तयारीला सुरवात के ली. प्रथमतः घुलेवाडीच्या सरकारी
हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व तपासणी के ली, बाहेरून X-ray काढू न आणला, या हॉस्पिटल मध्ये आमची HIV टेस्ट सुद्धा
के ली, तसेच काही हृदयाचा त्रास आहे का ते तपासले. मग प्रमुख मेडिकल ऑफिसर ने एकदाचा आम्हाला सर्व व्यवस्थित
असून आम्ही या कठीण यात्रेसाठी फिट आणि ओके असल्याचा सही शिक्का यात्रेच्या फॉर्मवर मारून दिला व आम्ही जणू
एखादी लढाई जिंकू न आल्याच्या अविर्भावात हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. आता पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा फॉर्म
जम्मू काश्मीर बँक किं वा पंजाब न्याशनल बँक मध्ये जमा करून तिथून आपल्या यात्रेची पहलगाम किं वा बालटाल मधून
सुरवात करायची तारीख मिळवायची , कारण नगर व नाशिक जिल्हा मधून यात्रेला जाण्याऱ्या यात्रेकरून साठी फक्त नाशिक
मधेच फॉर्म भरायच्या दोन्ही बँक होत्या. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी असते असे समजले. कारण अमरनाथ यात्रेला जाणार्यांची
संख्या मोठी असते व प्रत्येक बँके ला एका दिवसासाठी ठराविक कोठा हा यात्रेकरूं ची नोंद करण्यासाठी दिला होता. त्यापेक्षा
जास्त फॉर्म ते एका दिवसाला जमा करून घेत नाहीत अशी माहिती मिळाल्यावर परत सर्वांची एक बैठक घेऊन लवकरात
लवकर सर्वांनी नाशिक येथे जाऊन फॉर्म जमा करावे असे ठरले, कारण बँके त सर्वांचे समोर बसून फोटो कडू न रजिस्ट्रेशन
करावे लागते.
यात्रा कालावधी हा १५ दिवसाचा असल्याने पहिल्यांदा ऑफिसमधून रजेसाठी परवानगी घेणे गरजेचे होते,
वरिष्ठांना याविषयी सांगितल्यावर श्री हासे साहेब म्हणाले एकदम मी कु टे साहेब व विनय राम सगळेच जाणार मग इकडे
ऑफिस चे कामकाज कसे चालणार कारण आमच्या सर्वांकडे ऑफिसमधील महत्त्वाची जबाबदारी होती , त्यामुळे वरिष्ठ
एकदम सर्वाना रजा देण्यास तयार नव्हते, कु टे साहेब व राम यांच्यामधून कोणीतरी एकजण जाऊ शकतो असे हासे साहेबांनी
सांगितले, यामुळे परत एकदा आमच्या यात्रेवर संकटाचे ढग जमा होऊ लागले, कारण पाचमधून एक जरी गळाला तरी
बाकीच्यांची मानसिकता डगमगायला लागायची . शेवटी विनय राम म्हणाला कि यावर्षी कु टे साहेबाना घेऊन जा पुढील वर्षी
आपण परत जाऊया. त्या संध्याकाळी आम्ही सर्वजण यात्रेची चर्चा करत असताना आमच्या कारखान्यातील नमकीन
विभागातील श्रीहरी फु लसुंदर हा काही कामानिमित्त आला असता त्याने आमची चर्चा ऐकली , त्यावर तो म्हणाला कि
माझीसुद्धा या यात्रेला जायची इच्छा आहे , जर शक्य झालेतर मलाही तुमच्या बरोबरीने यायला आवडेल . देव जेव्हा एक
दरवाजा बंद करतो तेव्हा दुसरा दरवाजा हळूच उघडतो याचा प्रत्यय आला. कारण विनय राम न येण्याने जी पोकळी तयार
झाली होती ती भोलेनाथने लगेच त्याच दिवशी श्रीहरीच्या रूपाने भरून काढली. मग त्याला यात्रेचा फॉर्म देऊन सर्व मेडिकल
तपासणी करून सही शिक्का घेऊन उद्याच्या उद्या तयार व्हायला लावले. कारण नाशिक येथे जाऊन लवकरात लवकर फॉर्म
जमा करून सोयीची तारीख मिळणे आवश्यक होते.
एकदाचे सर्वांचे फॉर्म तयार होऊन एकदा चेक के ले, सर्वांचे आधारकार्ड झेरॉक्स लाऊन सर्व जण नाशिक पंचवटी
येथे सकाळीच लवकर PNB बँके त आलो. अजून बँके चे कामकाज सुरु व्हायचे होते तरी सुद्धा येथे यात्रेकरूं ची फॉर्म जमा
करायला गर्दी झाली होती. आम्हाला ५ जुलै २०१४ चे पहलगाम येथून सुरवात करायची होती , परंतु येथे सांगितले गेले कि
५ ते १० तारखेचे बुकिं ग संपलेले आहे. परत एकदा मनात शंके ची पाल चुकचुकली कि आपली यात्रा होते कि नाही. पण
जिथे विश्वास आहे तिथे मार्ग पण आहे. सहज आठवले कि माझा मित्र श्री सचिन कांबळे याचा मेहुणा हा नाशिकला नुकताच
जम्मू काश्मीर बँके त कामाला लागला होता. मग त्या पाहुण्यांना फोन करून त्याच्याकडू न तिथल्या बँके त किती तारखेचे
बुकिं ग उपलब्ध आहे याची विचारणा के ली, तर ते म्हणाले तुम्ही या आपण सर्व करून घेऊ. जणू त्यांच्यारुपात भगवान
भोलेनाथ च आम्हाला बोलावत आहे कि तू फक्त ये मी सर्व बघून घेतो. यथावकाश मग आम्ही त्या बँके त घेलो, तिथे
ठराविक रक्कम भरून पावती फॉर्म ला जोडली व सर्वजण रांगेत उभे राहिलो. आमचा नंबर आल्यावर त्यांनी विचारले कि
किती तारखेचे व कु ठू न बुकिं ग हवी. मी सांगितले कि ६ तारखेचे पहलगाम मार्गे आम्ही यात्रा करणार आहे. त्याने कॉम्पुटर व
चेक करून आम्हाला ती तारीख देण्यास सहमती दर्शवली. सर्वांचे एक एक करून online फोटो काढू न एकदाचा आमच्या
फॉर्मवर सही शिक्का मारून आम्हाला परवाना दिला गेला. बँके मधून बाहेर येताच आम्ही जय भोले चा गजर करून जणू सांगत
होतो कि आता आम्ही बाबा बर्फानी महाराज ला भेटण्यासाठी येत आहोत.
एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आता पुढील डोंगर सर करायचा म्हणजे रेल्वेचे बुकिं ग . परत एकदा बाबा थेटे
यांच्याकडे जाऊन पुन्हा यात्रेची आखणी तारखेनुसार एका कागदावर के ली. किती तारखेला निघायचे , किती तारखेला
पहलगाम वरून यात्रेला सुरवात करून कधी पर्यत खाली यायचे. वैष्णोदेवी दर्शन कधी करायचे. याचे नियोजन करून घेतले
.
अमरनाथ यात्रा हि पहलगाम मार्गे २५ ते २८ किमी पायी अनेक डोंगर पायी करून होते, त्यामुळे
शरीराचा पूर्ण कस लागतो म्हणून मग रोज ऑफिस ते खांडगाव असे पायी चालण्याचा सराव चालू के ला. कधी कधी खांडगाव
च्या कपालेश्वर डोंगरावर चढाई चा सराव पूर्ण २ महिने के ला. कायम ऑफिसमध्ये खुर्चीवर बसूनच काम असल्याने
सुरवातीला बराच त्रास झाला, नंतर नंतर मात्र सरावाने बराच त्रास कमी झाला, डोंगर चढण्याच्या सरावाने एक आत्मविश्वास
आला कि आता आपण हळूहळू का होईना पण यात्रा पूर्ण करून शकतो. मार्च महिन्यात २ तारखेला बाबा थेटे कडे जाऊन
रेल्वेचे बेलापूर ते जम्मू जाण्याचे तिकिटे कन्फर्म करून घेतले, तसेच बाकीचे जम्मू ते अमृतसर , अमृतसर ते दिल्ली व आग्रा
ते बेलापूर अशी परत येण्याचे रेल्वेचे कन्फर्म तिकीट काढू न घेतले. जम्मूमधील वैष्णोदेवी संस्थानचे असलेले वैष्णोधाम व
कटरा येथील रूमचे बुकिं ग के ले.

|| प्रवासाची खरेदी व तयारी ||


आता सर्व बुकिं ग झाल्यावर मात्र आपण नक्कीच अमरनाथ यात्रेला जाणार अशी आशा निर्माण झाली.
पायी चालण्यचा सराव चालूच होता. यात्रा हि काश्मीर मध्ये १५००० फु ट उंचावरील असल्याने व १५ दिवसाच्या हिशोबाने
मग एक एक खरेदीला सुरवात झाली. खायचे सुक्के पदार्थ, टी शर्ट- नाईट प्यांट, ४ जोड बनियन अंडरवेअर व गरम कपडे,
यांची यादी करून घेतली व ती ती खरेदी झाल्यावर त्याच्यासमोर टिक मार्क करत गेलो. मग असेच एकदा मी व पप्पू के दारी
चर्चा करत असताना तो म्हणाला कि मला मोबाईल चे काही स्पेअरपार्ट आणायला मुबई ला जायचे आहे, आपण टी शर्ट,
रेनकोट व ब्याग या मुंबईवरून कमी भावात खरेदी करूया. त्यानुसार मी व पप्पू के दारी मुंबईला निघालो तर बाकीचे सहकारी
म्हणाले कि आम्हाला सुद्धा तुम्ही जे काही खरेदी कराल ते आमच्यासाठीपण आणा. यथावकाश मी व पप्पू मी महिन्यात
मुंबईला मालपाणी च्या मालवाहतूक गाडीतून भर मे महिन्याच्या उन्हात गेलो. बऱ्याच दिवसानंतर मी मुंबई ला आलो होतो,
या दमट वातावरणात अक्षरशः जीवाची लाहीलाही होत होती, रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळीच मनिष मार्के ट या
मोबाईल च्या मार्के टमध्ये गेलो. तेथील खरेदी आवरल्यावर मग आम्ही चकला इथून रेनकोट खरेदी के ले, वेगवेगळ्या प्रकारचे
व अनेक व्हरायटी मधील रेनकोट पाहून खरेच इतक्या प्रकारचे रेनकोट असतात हे पाहून मन हरखून गेले. मग मी पायघोळ
असलेला रेनकोट व प्यांट व शर्ट या प्रकारातला एक असे दोन रेनकोट प्रत्येकाला घेतले. हे रेनकोट चे होलसेल मार्के ट
असल्याने आम्हाला ते अगदीच नगण्य किमतीत (एकाच्या भावात दोन) भेटले. पण या एकू ण बारा रेनकोट चे वजन अवजड
झाले, तितक्यात अवकाळी पावसाची जोरदार सर आली. मग या नवीन घेतलेल्या रेनकोट चे उद्घाटन लगेच तिथेच करून
टाकले. मुंबईचा पाऊस म्हणजे एकप्रकारचा जणू लपंडावच, कारण जितक्या जोरात सर आली तितक्याच वेगाने ती लगेच
उघडू न गेली. मग आम्ही प्रवासी ब्यागा घेण्यासाठी मशीद बंदर व CST रेल्वे स्टेशन परिसरात आलो, तर येथे जणू ब्यागांची
जत्राच भरलेली होती. सकाळची वेळ असल्याने जो तो आपली बोहनी करायच्या प्रयत्नात होता, आम्हाला एकदम ७-८
ब्यागा घ्यायच्या असल्याने जो तो आम्हाला आपल्याकडे बोलावत होता, बरेच फिरल्यावर मग आम्ही एकाजनाकडे खाली
चाके असलेली ब्याग पसंत के ली, बरीच घासाघीस के ल्यावर ७०० ची ब्याग प्रत्येकी २५० रुपयांना ठरवून खरेदी के ल्या.
मग सर्व ब्यागा व रेनकोट दोन ब्यागांमध्ये टाकू न पुढील खरेदीला निघालो. फु टपाथवर अनेक ठिकाणी ती शर्ट व नाईट प्यांट
चे ढीगचे ढीग दिसत होते, सगळेजण गिऱ्हाईक शोधत होते, दोन तीन ठिकाणी पाहून काही फु ल बाहीचे १२५ ते १५०
रुपयात तर काही हाप बाहीचे १००-१२५ रुपयात, प्रत्येकी ४ जोड वेगवेगळ्या रंगाचे व डिजाइनचे ती शर्ट व प्रत्येकी २
नाईट प्यांट अशी खरेदी झाली. पण यामुळे मात्र दोघांच्या हातात दोन दोन ब्यागा भरून कपडे व रेनकोट चे जड असे वजन
झाले. मात्र मनासारखी खरेदी अगदीच स्वस्तात झाल्याने आनंदी मनाने मुंबईच्या त्या अतिशय गरम वातावरणातून नाशिक
ला जाण्यासाठी CST रेल्वे स्टेशनवर आलो, रात्री ९:३० च्या विदर्भ एक्सप्रेसने नाशिक रोड रेल्वे प्रवास व तेथून नाशिक
रोड ते संगमनेर हा प्रवास बस मधून गर्दीमुळे उभे राहून करत एकदाचे संगमनेरला आलो. दुसऱ्यादिवशी ऑफिस ला सगळी
खरेदी आणल्यावर इतर सगळे सहकारी ती खरेदी पाहूनच आश्चर्य चकित झाले कि एवढे समान तुम्ही कसे काय आणले.
मग सगळ्यांनी आपल्या मापाचे व आपल्या आवडीचे टी शर्ट घालून पाहून , आपले आपले समान निवडू न घेतले. शेवटी मग
जे शिल्लक राहिले ते घेऊन तीच खरेदी आमच्या नशिबी आहे हे मानून घेतले. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व हसू
पाहून आपल्या कष्टाचे चीज झाले असे वाटले. कारण दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधण्याच्या सवयीनेच मनाला
काहीच वाटले नाही. ब्यागांची किं मत ऐकू न तर कु णालाच विश्वास वाटेना कि इतकी स्वस्त हि ब्याग असेल .
मी व कु टे साहेब हे दररोज न चुकता ऑफिस ते खांडगाव असे ४ ते ५ किमी चालण्याचा सराव करत होतो. कधी
कधी डोंगर चढायचा सराव करत होतो. जसा जसा यात्रेला रवाना व्हायचा दिवस जवळ येऊ लागला रोज बरोबर
घ्यावयाच्या सामानाची यादी रोज दोनदा दोनदा चेक करून काही राहिले तर नाही ना याची खात्री करत होतो, तरी सुद्धा
रोज काहीना काही घ्यायचे विसरलेले असायचे. नवे कापडी बूट घेऊन त्या बुटाने चालण्याचा सराव करत होतो. मधे मधे
सर्वाना एकत्र जमवून काय काय तयारी झाली याची उजळणी करत होतो.

You might also like