You are on page 1of 8

माणगाव परिषद आणि समाजिक परिणाम आणि फलश्रुती

डॉ. जगन कराडे

प्रत्स्तावना –

कोल्हापूर संस्थानातील “माणगाव”, येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी  अखिल महाराष्ट्र अस्पश्ृ य
वर्गाची परिषद झाली. त्यापरिषदे चे अध्यक्ष डॉ. बाबासाहे ब आंबेडकर होते तर, प्रमुख पाहुणे राजर्षी
शाहू महाराज होते. वयाच्या ऐन तिशीत या परिषदे चे अध्यक्ष असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पढ ु ील
व्यापक कार्याचा ही परिषद अनेक अर्थानी प्रारं भबिंद ू ठरली. डॉ. बाबासाहे बांच्या समाजिक
आयुष्याची सुरुवातच खर्या अर्थाने माणगाव परिषदे तून झाली.

माणगाव  मधील अस्पश्ृ य (दलित) समाजात एकी होती. या लोकांना समाजात होत असलेली
शिवाशीव, जातिभेद मान्य नव्हता म्हणून जातिभेद ही व्यवस्था  मोडून काढण्यासाठी, एकीने
लढण्यासाठी माणगाव परिषदे चे नियोजन केले होते. यामध्ये थोरले नाना मास्तर, नागोजी
यल्लाप्पा कांबळे , गणू मसू सनदी, कृष्णा तुकाराम कांबळे , कृष्णाजी दे वू, यमालिंगू, दत्तू सिंध,
कासीम मास्तर इ. लोक एकत्र येऊन कार्य करत होते. त्या काळी समाजमंदिरात सार्वजनिक
वाचनालय होते. थोरले नाना मास्तर वर्तमानपत्रांचे वाचन करून दाखवायचे. माणगावच्या दलित
समाजामध्ये आदरयुक्त व्यक्तिमत्त्व असलेले नाना मास्तर शिक्षक होते. वर्तमानपत्रांतील
बातम्यांतून त्यांना भीमराव रामजी आंबेडकर नावाचा तरुण खूप शिकला आहे , ही  बातमी
समजली. तसेच निंगप्पा ऐवाळे (कोल्हापूर मिस क्लार्क बोर्डिंगचा सुपरिटें डेंट) यांनी माणगावला भेट
दे ऊन डॉ. आंबेडकर यांच्या विषयी अधिक माहिती दिली. त्यानंतर माणगावमधील अस्पश्ृ य
समाजामध्ये डॉ. आंबेडकर यांना माणगावमध्ये आणण्याविषयी चर्चा सुरू झाली. समाजातील
पुढार्‍यांचे एकमत झाल्यावर गावकामगार पाटील आप्पासाहे ब पाटील यांच्या वाड्यावर जाऊन डॉ.
आंबेडकर यांना माणगावमध्ये आणण्याविषयी शाहू महाराज यांना सुचवावे, अशी चर्चा झाली. 

आप्पासाहे ब पाटील हे पुरोगामी विचारांचे होते. त्यांना अस्पश्ृ य समाजाबद्दल जिव्हाळा होता. त्यांनी
शाहू महाराज यांची भेट घेतली आणि परिषदे बद्दल गोष्ट कानावर घातली. त्यावर महाराज ‘मी
मुंबईला जाईन व डॉ. आंबेडकरांना आमंत्रित करे न’ असे सांगितले. मुंबईमधील डबक  चाळीतील डॉ.
आंबेडकर यांच्या घरी जाऊन ते भेटले . आणि माणगावास येण्यास आमंत्रित केले. 21, 22 मार्च
1920 ही तारीख पक्की केली. 

डॉ. भीमराव आंबेडकर माणगावमध्ये येणार, असे कळताच माणगावचे लोक आनंदी झाले. सगळा
अस्पश्ृ य समाज परिषदे चा दिवस सणासारखा साजरा करायचा म्हणन
ू तयारीला लागला. महार
समाजाचे प्रमुख म्हणून थोरले नाना मास्तर, नागोजी यल्लप्पा कांबळे आणि समाजामध्ये
परिषदे ची तयारी करण्यासाठी कमिटी निर्माण केली. समाजामध्ये  पाच गल्ल्या होत्या. 1) मधली
आळी, 2) हाडकर्‍यांची गल्ली, 3) हिणकर्‍यांची गल्ली, 4) वरची गल्ली, 5) खालची गल्ली. यामधन

लोक निवडले गेले.  आप्पासाहे ब पाटलांची खप
ू मदत झाली. परिषदे ला येणार्‍या लोकांसाठी जेवण
करण्यासाठी हवा तेवढा भाजीपाला दिला. समाजमंदिरजवळ मंडप उभारण्यात आला होता. मंडप
आप्पासाहे ब पाटील कुडचीचा पाहुण्याचा होता. रूपा दे वन
ू े कलात्मक दृष्टीतन
ू दे खणा संद
ु र मंडप
उभारला होता. थोरले नाना मास्तर यांनी स्वागतगीत रचली होती. गीतांना चाल कासीम मास्तर
यांनी दिली होती. चंदाताई व चंद्राताई यांनी स्वागतगीत गायले होते. स्वागत बँड व्हनुरकाचा
ठरवण्यात आला होता. तो बँडसाठी 10 रुपये घ्यायचा; पण डॉ. आंबेडकर येणार म्हटल्यावर
स्वखुशीने आला होता. 1

२१ व २२ मार्च १९२० रोजी ‘माणगाव’ येथे अस्पश्ृ यांची परिषद घेतली. तर, नागपूरला
राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय परिषदही घेतली. बाबासाहे बांच्या पुढील
जीवनातील दै दिप्यमान सामाजिक, राजकीय, वैचारिक, संघटनात्मक वाटचालीत ‘माणगाव’ परिषदे चे
महत्व मोठे आहे . त्या परिषदे चे शताब्दीवर्ष सुरू झाले आहे . म्हणूनच त्याचे औचित्य साधून त्या
परिषदे तील डॉ. आंबेडकर व लोकराजा शाहू यांचे विचार समजून घेण्याची गरज आहे . कारण त्या
विचारांचा समकालीन संदर्भही मोठा आहे . २१ मार्च रोजी ही परिषद सुरू झाली तो पाडव्याच्या
दिवस होता की जवळजवळ पाच हजारांवर लोक त्यात सहभागी झाले होते . या सभेला लोकांनी
जाऊ नये म्हणूनही पद्धतशीर प्रयत्न केले गेले होते . पण, तरीही हजारो लोक जमले. संध्याकाळी
पाच वाजता परिषद सुरू झाली. स्वागताध्यक्ष दादासाहे ब इनामदार यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.
त्यातून परिषदे चा हे तू स्पष्ट केला आणि इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपला उद्धार आपणच
केला पाहिजे असे सूतोवाचही केले.

डॉ.बाबासाहे ब आंबेडकरांचे भाषण -

या परिषदे च्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबासाहे ब आंबेडकर यांनी बहिष्कृत समाजाला
एक नवी दिशा दिली, अशा पद्धतीची ही पहिलीच परिषद असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले ,
‘आपल्या उन्नतीबाबतची कळकळ आणि बहिष्कृत वर्गात सुरू असलेली विचारक्रांती ही अपूर्व
आहे . अपल्यावर ओढवलेली दरु वस्था ईश्वरी लिलेचा परिपाक नसून, तो इतरांच्या दष्ु कृत्यांचा
परिणाम आहे . जन्मसिद्ध योग्ययोग्यता आणि जन्मसिद्ध पवित्रअपवित्रता या दोन तत्वांनुरूप हिंद ू
लोकांची विभागणी केली तर, त्याचे तीन वर्ग होतात. (१) जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला

1
निलेश पोतदार, माणगाव परिषदे ची शताब्दी, दै निक पढ
ु ारी, २१ मार्च २०१९.
आपण ब्राह्मणवर्ग असे म्हणतो. (२) ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राहमणापेक्षा कमी
दर्जाची आहे असा ब्राह्मणेतर वर्ग आणि (३)  जो जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र आहे असा
बहिष्कृत वर्ग होय.’ या भाषणात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले की, या त्रिस्तरीय विभागणीने
गण
ु हीन ब्राह्मणांचेही कल्याण झाले. ब्राह्मणेतरांना विद्या व संपत्ती मिळवण्याचे मार्ग मोकळे
आहे त. पण, आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यता व अपवित्रता यामळ
ु े
फारच शोचनीय झाली आहे . व्यापार, नोकरी आणि शेती हे धनसंच याचे मार्गच त्यांना मोकळे
नाहीत. आपल्या वर्गाकडे नैसर्गिक गण
ु ांची अजिबात कमतरता नाही. पण, परिस्थिती अनक
ु ू ल नाही.
म्हणूनच आपले राजकीय सामर्थ्य वाढविले पाहिजे. ‘सत्यमेव जयते’हे तत्व पोकळ आहे .सत्याचा
जय व्हायचा असेल तर आपण आपली चळवळ बळकट केली पाहिजे 2. याच परिषदे त
डॉ.बाबासाहे बांनी महार वात्न्दारांची हालाखीच्या परिस्थितीची कारण मीमांसा मांडिली आहे . ते
म्हणतात महार वात्न्दाराना पद वगैरे अगदी गलीचकामे करावी लागत असल्यामुळे त्यांच्या
वात्न्दारीव्र कमीपणाची छटा उमटली आहे ., वतनी जमिनी पिढ्यानपिढ्या विभागून जात
असल्यामुळे जमिनीचे बारीक बारीक तुकडे झालेले आहे त कि दरे क महार वात्न्दारास पुरशी पैदास
होत नसल्यामुळे त्यांची त्यांची अगदी कंगाल स्थितीझाली आहे . त्यामुळे म्हारांनी आपली वतने
सोडून गलीच कामे करणे बंध करावे असा संदेश दिला.3

राजर्षी शाहू महाराज यांचे भाषण -

या परिषदे चे प्रमख
ु पाहुणे राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ.आंबेडकरांचा ‘पंडित’ आणि
‘विद्वानांचे भष
ू ण ‘असा गौरवपर्ण
ू उल्लेख करून अस्पश्ृ याना ‘आपल्या जातीचा पढ ु ारी करा’असे
आवाहनही केले. तसेच त्यांनी आपल्या करवीर संस्थानात अस्पश्ृ यांवर अन्याय करणारी हजेरीची
पद्धत का नष्ट केली हे ही सांगितले. तसेच वेठबिगारी पद्धतीही नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त
केला. अस्पश्ृ य वर्गाकरता आपण केलेले प्रयत्न बाबरु ाव यादव यांनी पस्ति
ु केद्वारे नोंदवन

ठे वल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.माणगाव परिषदे तील भाषणात  राजर्षी शाहू महाराज
म्हणतात, ‘आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी
निवडत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हे तूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी
अयोग्य पुढारी नेमून दे ऊन अज्ञानी लोकांना फसवतात. आता तुम्ही डॉ. आंबेडकर यांना आपला
पुढारी निवडलेत  ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत.इतकेच नव्हे तर अशी एक वेळ

2
प्रसाद कुलकर्णी, माणगाव परिषद : बाबासाहे बांच्या कार्याचा प्रारं भबिंद,ू बिगल
ु , २१ मार्च २०१९

3
Dr. Babashaeb Ambedkar writing and speeches, Vol-18. Government of Maharashtra Mumbai 2002 pg.5
येईल कि ते सर्व हिंदस्
ु थानचे पुढारी होतील. अस्पश
4
ृ ांना माणसाप्रमाणे वागविल्या शिवाय
राजकारण करताच येणार नाही.’

माणगाव परिषदे तील ठराव

या परिषदे च्या अखेरच्या सत्रात महायुद्ध विषयक भूमिका,राजर्षिनी अस्पश्ृ य समाजाच्या


उन्नतीचे कार्य केल्यामुळे त्यांचा वाढदिवस सणासारखा साजरा करणे, बहिष्कृतांच्या साठी
झटणाऱ्या संस्थांनिकांचे आभार, अस्पश्ृ य समाजाला नागरिक म्हणून मानवीहक्क समतेच्या
तत्वावर मिळावेत,प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे, स्पश्ृ य-अस्पश्ृ य यांच्या शाळा एकत्र
असाव्यात, मेलेल्या जनावरांचे मांस न खाणे,ही परिषद भरविण्यात महत्वाचे सहकार्य करणाऱ्या
आप्पा दादगौडा पाटील यांचे आभार अशा स्वरूपाचे पंधरा ठराव मंजूर करण्यात आले.

या माणगाव परिषदे त झालेल्या एकूण 15 ठराव घेण्यात आले. त्यातील काही महत्त्वाचे असे-
सर्वसाधारण मानवी हक्कांस दरु ावलेले बहिष्कृत लोक हे हिंदी साम्राज्याचे घटक आहे त व इतर हिंदी
लोकांप्रमाणे त्यांना खालील मानवी हक्क आहे त.
1- सार्वजनिक रस्ते, विहीरी, तलाव, शाळा, धर्मशाळा, तसेच लायसेन्सखाली असलेल्या
करमणुकीच्या जागा, भोजनगह
ृ े , वाहने इत्यादी सार्वजनिक सोयींची उपभोग घेण्याचा त्यांना
हक्क आहे .
2- गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क आहे .
 वरील हक्क उपभोगताना जेव्हा म्हणून अडचण पडेल, तेव्हा ती दरू करण्यास सरकारने कायद्याने मदत
करावी, असे परिषदे चे मत आहे .
 o   प्राथमिक शिक्षण मुलामल
ु ींना भेद न करिता जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर सक्तीचे व
मोफत करण्यात यावे.
 o बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरुरीचे आहे , त्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही.
म्हणन
ू त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास शाळा मास्तर, डेप्यट
ु ी असिस्टं ट, डेप्यट
ु ी एज्यक
ु े शनल
इन्स्पेक्टर त्यांचे हितेच्छु असले पाहिजेत.
 o   खालसांतील ज्याप्रमाणे मस
ु लमानांना व म्है सरू संस्थानातील ब्राह्मणेतरांना व बहिष्कृत वर्गाच्या
विद्यार्थ्यांना मध्यम व वरिष्ठ शिक्षणार्थ मब
ु लक शिष्यवत्ृ त्या दिल्या जात आहे त, त्याच प्रमाणे
बहिष्कृत वर्गांतील विद्यार्थ्यांना ब्रिटीश हद्दीत तशाच शिष्यवत्ृ त्या मिळाव्या, अशी या परिषदे ची
आग्रहाची विनंती आहे .
 o  सर्वत्र स्पश्ृ य व अस्पश्ृ यांच्या शाळा एकत्र असाव्यात, असे या परिषदे चे मत आहे .

4
खैरमोडे चां.भ.भीमराव रामजी आंबेडकर, खंड १, प.ृ ४६
 o   महारकी वतनदारांची स्थिती अगदी हलाखीची आहे . म्हणून महारकी वतनाची जमीन अगदी थोड्या
महारांना मोठ्या प्रमाणावर वाटून दे ऊन ज्या महारांना अशा विभागणीमळ
ु े वतनी जमिनीस मक
ु ावे
लागेल, त्यांना शक्य तेथे पड जममिनी रयताव्याने दे ऊन त्यांची सोय लावण्यात यावी. हल्ली असलेली
वतनी जमीन ज्या महार कुळांस दे ण्यात येईल, त्यांच्याकडून आपल्या मल
ु ामल
ु ींस साक्षर करून आपल्या
दर्जाप्रमाणे राहण्याची अट लिहून घेण्यात यावी.
 o मेलेल्या जनावराचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गन्
ु हा आहे , असे कायद्याने मानले
जावे.
 o  तलाठ्याच्या जाग्यांवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात.
 o     बहिष्कृतांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या बहिष्कृतेतर संस्थांचे अगर व्यक्तींकडून या वर्गाच्या
हितसंचयासाठी जे उपाय सुचविले जातात, ते बहिष्कृत वर्गास सर्वस्वी मान्य होतात, असे सरकारने समजू
नये.
 o  भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधी त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या
स्वतंत्र मतदार संघातून निवडून घेण्यात यावेत.

माणगाव परिषदे चा समकालीन समाजिक परिस्थितीवर झालेला परिणाम –

शाहूमहाराज यांच्या निधनंतर १९२२ नंतर राजाराम महाराजानिसध् ु दा आपल्या करवीर


संस्थानात दलितांच्या सामाजिक बदलाबाबत शाहू महाराजांचेच धोरण पढ
ु े सरुु ठे वले . एवढे च नव्हे
तर याबाबत शाहूंच्या पढ
ु े जाऊन १९२२ मध्ये दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत परिषद, करवीर इलाखा
सोमवंशीय परिषद १९३३ , क्ल्हापरू हरिजन परिषद १९३६, गडहिंग्लज पेटा बहिष्कृत परिषद १९३८,
कोल्हापूर संस्थान दलित प्रजापरिषद १९३९ घेऊन मानगाव परिषदे च्या विचारांचा आणि कृतीचा
वारसा अविर्ह्त चालू ठे ल्याचे दिसून येते . पुढे कोल्हापूर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
डॉ.बाबासाहे बांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते तयार होऊन लागले परिणामी कोल्हापूर
स्नास्थांतील दलित समाजाची आणि दलितेतर समाजातील सद्भावेमुळे अनेक सामाजिक आणि
आर्थिक परिणाम झालेलं दिसून येतात.

सामाजिक व आर्थिक परिस्थिती –

कोल्हापूर संस्थानातील दलित समाजाच्या समस्या मोठ्याप्रमाणात सुटल्या होत्या.


असश्ृ य्ता नष्ट करणारे कायदे , सक्तीचे शिक्षण, आंतर जातीय विवाह कायदा यामळ
ु े दलितांच्या
विकासाच्या वाटा आधीच उघ्द्लेलेया होत्या माणगाव परिषदे च्या निमिताने दलित समाज
एकवटला गेला होता आणि आपला नेता कोण आहे आणी आपण कुणाला आपल नेता मानल
पाहिजे हे आता स्पष्ट झाले होते . त्यामुळे दलित व द्लीतर समाज शाहू आणि शाहू नंतर
राजाराम महाराज यांच्या परु ोगामी आणि दलित उधाराच्या दिशे वाटचाल करताना दिसत होता.
परिणामी दलित समाजात शिक्षण घेण्या संदर्भात अनेक दलित समाज शिक्षणाच्या प्रवाहात
आला. परिणामी नोकर्यांमध्ये मध्ये दलित समाजाचा टक्का वाढलेला आपणास दिसतो. आजच्या
मिठीचा विचार केला तर कोल्हापरू शहर अथवा ग्र्मैन भ्गातील दलित समाज चान्घ्ले व उच्च
स्तराचे जीवन जगताना दिसत आहे . एका सर्वेत हे निष्पन झाले आहे कि ९४.८ % दलित
समाजाने स्वत:ची घरे बांधलेली आहे त. घरातील सख
ु सोई सवि
ु धाच्या बाबतीत दलित समाज
सजग आहे . कोल्हापूर जिल्हा निसर्गसंपत्तीने भारलेला जिल्हा आहे आणि शेतीव्यवसाय बरोबर
जोडधंदा मोठ्या प्रमाणात केला जाती. व्यावसाय आणि नोकरीच्या संदर्भात चित्र पूर्णतः बदलेले
दिसते पूर्वी नोकर्यांमध्ये दलितांचे प्रमाण फारच अल्प . समाज आज नोकरीमध्ये ठळक पणे
दिसून येतो. मत
ृ मांस खाणे दलित समाजाने सोडलेले आपणास दिसून येते.

महार वतन खालसा –

माणगाव परिषदे पासून डॉ.बाबासाहे ब आंबेडकरांनी वतनदारी पद्धतीचे अवलोकन करण्यास


सुरुवात केली. शाहुमहाराजानी महार वतन खालसा करण्या संदर्भात अतिशय महत्वाची भमि
ू का
माणगाव परिषदे नंतर आमलात आणिली होती त्या अन्वये १४ मी १९२० आल त्यांनी आदे श
काढून महार वतनदार मक्
ु त करण्यासाठी उपपाय योजना म्हणन
ू सनदी नोकर भरती सरु
ु केली .
5

माणगाव परिषदे नंतर महार वतन खालसा करण्याच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आणि
सरु
ु वात झाली. त्याचे महार समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणमध्ये मोलाचे
बद्दल झालेले दिसन
ू येतात.

शाहू जयंती बहुजनांचा सन-

आजही शाहू महाराजांची जयति कोल्हापुरातच नव्हे तर सर्व जगभरात दलित वंचित समाज
मोठ्या उत्सहात साजरा करत आहे . शाहू महाराजांच्या वरील साहित्य लिखाण आणि त्याच्या
फोटोला आजही आदराने वंचित समाज आपल्या घरात स्थान दे त आहे . याचे मल
ु हे माणगाव
परिषदे त आहे .

अशे अनेक बदल समाजात झालेले आढळून येतात. आज शंभर वर्षानंतर सामाजिक
परिस्थितीत थोडाफार फरक झाला असला तरी माणगाव परिषदे तील डॉ.आंबेडकर व राजर्षी शाहू

5
Dr.Jayshingrao Pawar , RAJARSHI SHAHU CHATRAPATI: PATRAVYAVAHAR ANI KAYADE- Adhesh 16
यांच्या भाषणातील गाभाघटक आपणास विचारात घ्यावाच लागेल.एकीकडे धर्मावर आधारित
राष्ट्रनिर्मितीचे पद्धतशीर प्रयत्न सरू
ु आहे त.दस
ु रीकडे परधर्मद्वेष वाढविला जात आहे . जगण्याच्या
मल
ू भत
ू प्रश्नांपेक्षा सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ढोल बडविले जात आहे त. अस्पश्ृ य समाजातील
पढ
ु ाऱ्यांना धर्मांध पक्ष लालच
ू दाखवीत आहे त. तसेच काही भणंग पढ
ु ारीही आपली सोय झाली
म्हणजे आम समाजाची सोय झाली अशी सोयीची समीकरणे मांडत आहे त.(माणगाव परिषदे त
राजर्षिनी ‘अप्पलपोटे ’ज्यांना म्हटले ती हीच मंडळी). या सर्व पार्श्वभम
ू ीवर ‘माणगाव’परिषदे ला
केवळ शताब्दी साजरी करायची एक घटना म्हणन
ू नव्हे तर, समकालीन संदर्भात आपले अस्तित्व
तपासून पाहायला लावणारी घटना म्हणून पाहिले पाहिजे.

डॉ. बाबासाहे बांनी या परिषदे नंतर डी.एस्सी,बॅरिस्टर या पदव्या मिळवल्या.’ बहिष्कृत


हितकरिणी’ संस्था काढली. महाडचा सत्याग्रह केला. मनस्
ु मत
ृ ी जाळली. काळाराम मंदिर सत्याग्रह
केला. व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजरु मंत्री झाले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. बौद्ध धम्म स्वीकारला हा सारा इतिहास आपण जाणतो. पण, या
साऱ्या दै दिप्यमान वाटचालीचा प्रारं भबिंद ू म्हणन
ू ‘माणगाव ‘परिषदे चे महत्व निश्चितच फार मोठे
आहे . ही परिषद बाबासाहे बांचे नेतत्ृ व, कर्तृत्व आणि दलितोद्धाराचे कार्य याचा पाया होती. म्हणन
ू ही
तिच्या शताब्दीचे महत्व मोठे आहे . माणगाव परिषदे नंतर डॉ.बाबासाहे ब आंबेडकरांच्या सार्वजनिक
कार्याला सुरुवात झाली असे बाबासाहे बांनी इ.सं. १९४० साली कोल्हापूर येथे आयोजित दलित प्रजा
परिषदे च्या समारं भात सांगितले होते.6

समारोप

माणगाव परिषद हि डॉ.बाबासाहे ब आंबेडकरांच्या नव्हे तर संपून बहुजन, वंचित ,दलित समाजाच्या
उध्दाराची नांदी होती. माणगाव परिषदे मुळे अनेक बहुजन , वंचित आणि दलित समाजाच्या
विकासावर दरु ागामी समाजिक, राजकीय , आर्थिक सांस्कृतिक परिणाम झालेले दिसून येतात.

6
जयसिंगराव पवार (संप), राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, प.ृ ९७
संदर्भ -

1. निलेश पोतदार, माणगाव परिषदे ची शताब्दी, दै निक पुढारी, २१ मार्च २०१९.


2. प्रसाद कुलकर्णी, माणगाव परिषद : बाबासाहे बांच्या कार्याचा प्रारं भबिंद,ू बिगुल, २१ मार्च
२०१९
3. Dr. Babashaeb Ambedkar writing and speeches, Vol-18. Government of Maharashtra
Mumbai 2002 pg.5
4. खैरमोडे चां.भ.भीमराव रामजी आंबेडकर, खंड १, प.ृ ४६
5. Dr.Jayshingrao Pawar , RAJARSHI SHAHU CHATRAPATI: PATRAVYAVAHAR ANI KAYADE-
Adhesh 16
6. जयसिंगराव पवार (संप), राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, प.ृ ९७

You might also like