You are on page 1of 3

सौ मनीषा भास्कर अभ्यंकर.

रामजानकी बंगला,
भोकरे कॉलनी, चंदनवाडी,
मिरज. ४१६४१०
फो. नं. ०२३३ - २२११४९७.
मो. ९४२२०९४२४५

*ज्ञानेश्वरीतील सुभाषिते*
*१) कीर्ती*

*जाणितेन तवचि जियावे । जंव अपकीर्ती अंगा न पावे ।*


*आणि सांग पां के वि निगावे । एथोनिया ॥ज्ञा. २-२०२॥*

*अर्थ -* अपकीर्ती जोपर्यंत अंगाला शिवली नाही तोपर्यंतच शहाण्याने जगावे. आता सांग बरे येथून परत कसे फिरावे ?

महाभरतीय युद्धात प्रत्यक्ष समरांगणात ज्यावेळी अर्जुनाने शत्रुपक्षात आपल्या भाऊबंदांना पाहिले त्यावेळी त्याचे मन करुणेने विरघळले.
आपण आपल्याच भाऊबंदांचा वध करून पापाचा धनी होणार या आशंके ने त्याला हे युद्ध करावे असे वाटेना. त्यापेक्षा संन्यास घेऊन भैक्ष्यकर्म
स्वीकारावे असे त्याच्या मनाने घेतले.

शेवटी त्याचा हा मोह नाहीसा करण्यासाठी श्रीकृ ष्ण पुढे सरसावले. युक्तीच्या चार गोष्टी सांगून त्याला पुन्हा युद्धास उभे रहाण्यास बळ
द्यावे असा त्यांचा हेतू होता. त्यावेळी ज्ञानदेव श्रीकृ ष्णाच्या मुखातून वरील ओवी वदवतात.

ज्ञानेश्वरीच्या ९००० ओव्यामधे अशी अनेक सुभाषिते आली आहेत. प्रतिपाद्य विषय अनुपम शैलीने सादर करून श्रोत्यांच्या मनावर
बिंबवण्यात ज्ञानेश्वरांचे सामर्थ्य अलौकिक आहे.

या जगात जन्म घेतल्यावर मृत्युपर्यंत तर सर्वांनाच जगावे लागते. माणसाची सारी धडपड ही जीवनात सुख मिळवण्यासाठीच असते.
पण इच्छित गोष्ट प्राप्त करतांना सारासार विचार हा करावाच लागतो. अर्जुनानेही त्याच्या कु वतीप्रमाणे सारासार विचार करूनच भैक्ष्यकर्म
स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. कारण भाऊबंदांचा वध करावा असे नीतीशास्त्र सांगत नाही. भाउबंदांचा वध करून, गुरुजनांना मारून भोग
भोगणे व पापाचा धनी होणे हे अर्जुनाच्या नीतीत बसणारे नव्हते. आपणच आपल्या कु ळाचा नाश करणे योग्य नाही असे त्याला वाटत होते. त्यामुळे
तो युद्ध करण्यास उत्सुक नव्हता.

परंतु वाटाघाटीचे सर्व प्रयत्न फसल्यानंतरच नाइलाजाने हा युद्धाचा निर्णय घेतलेला होता. आणि आता ‘सीदन्ति मम गात्राणि’ असे
म्हणून युद्धातून पराङ्मुख होणे योग्य नव्हते. दुसर्याचा वध करू नये ही सामान्यनीती झाली. पण अर्जुन क्षत्रिय होता. आणि युद्ध करणे हे तर
क्षत्रियाचे कर्तव्यच आहे. दुष्टांचे निर्दालन, सज्जनांचे प्रतिपालन व समाजाचे संरक्षण करून आदर्श राज्यव्यवस्था उभी करणे हे क्षत्रियाचे कामच
आहे. आणि आता क्षणिक मोहाच्या आहारी जाऊन युद्धापासून पराङ्मुख होणे व कर्मसंन्यासाची भाषा बोलणे हे अर्जुनासारख्या वीराला
शोभण्यासारखे नव्हते. आता जर युद्धातून अर्जुन पराङ्मुख झाला असता तर लोक जगाच्या अंतापर्यंत ‘अर्जुन घाबरून युद्धातून पळून गेला’ असेच
बोलले असते. भित्र्या अर्जुनाचीच प्रतिमा लोकांच्या मनात दृढपणे ठसली असती.

*लोक सायासे करूनि बहुतें । कां वेचिती आपुली जीविते ।*


*परी वाढविती कीर्तीते । धनुर्धरा ॥ज्ञा. २-२०९॥*

लोक अनेक कष्ट करतात, प्रसंगी आपले प्राण पण खर्ची घालतात पण आपली कीर्ती वाढवतात. अपकीर्तीचा डाग आपल्या अंगाला लागू देत
नाहीत. एक संस्कृ त सुभाषितकार म्हणतो -

*अकृ त्वा हेलया पादमुच्चैर्मूर्धसु विद्विषाम् ।*


*कथंकारमनालम्बा कीर्तिर्द्यामधिरोहति ॥*

*अर्थ -* शत्रूंच्या उन्नत मस्तकांवर सहजगत्या पाय दिल्याशिवाय निराधार अशी कीर्ती स्वर्गापर्यंत कशी पोचेल ? जणु काही स्वर्गापर्यंत

पोहोचण्यासाठी कीर्ती शत्रूच्या मस्तकांचा जिना करते. असे असता अर्जुनाचे हे आताचे वागणे म्हणजे त्याच्या असलेल्या कीर्तीचा नाश होण्यासारखेच
नव्हते काय ? ‘दिगंतीचे भूपती । भाट होऊनि वाखाणिती’ अशी अर्जुनाची गगनाप्रमाणे अनंत कीर्ती पण आताच्या अविचाराने क्षणात धुळीला
मिळाली असती.
*वपुर्याति श्रियो यान्ति यान्ति सर्वेऽपि बान्धवा: ।*
*कथासारे हि संसारे कीर्तिरेव स्थिरा भवेत् ॥*

*अर्थ -* देह जातो, वैभव जाते, सर्व बांधव सुद्धा जातात (मृत्यु पावतात). क्षणभंगुर अशा या जगात कीर्तीच फक्त स्थिर असते. असे एका

सुभाषितात म्हटले आहे.

श्रीसमर्थ म्हणतात -

*अपकीर्ती ते सांडावी । सत्कीर्ती ते वाढवावी ।*


*विवेके दृढ धरावी । वाट सत्याची ॥२-४-४१॥*
*कीर्ती करून नाही मेले । ते उगेचि आले आणि गेले ।*
*शहाणे होऊनि भुलले । काय सांगावे ॥१२-८-२७॥*

या जगात जन्म घ्यायचा ते सत्कीर्ती वाढवण्यासाठी. पण अर्जुनाच्या या वागण्याने त्याची असलेली कीर्ती सुद्धा नष्ट झाली असती.
‘बांधवांची कणव येऊन अर्जुनाने युद्धातून माघार घेतली’ असे कोणीही म्हटले नसते. उलट कौरवांचे अफाट सैन्य पाहून पराजयाच्या भीतीने अर्जुन
युद्धातून पळाला असेच सर्व म्हणाले असते. व पळूनही अर्जुन जाणार तरी कु ठे होता ? कौरवांनी त्याला गाठू न ठारच मारलेच असते.

ज्ञानदेवांनी येथे क्षणिक मोह अपकीर्तीला कारणीभूत होतो असे सांगून विवेकाचेही महत्व स्पष्ट के ले आहे. एखादे कृ त्य करतांना ते मला
आवडते का या विचारापेक्षा ते धर्म्य आहे काय याचा विचार करावा व ते कृ त्य धर्म्य असेल तर आपल्याला कितीही त्रास झाला तरी ते कार्य करावे.
कर्माची निवड इंद्रियजन्य सुखावर अवलंबून ठेवायची नसते. कौरवांच्या कु ळाचा नाशापेक्षा कौरव जिवंत राहिले असते तर या पृथ्वीवर नरक निर्माण
झाला असता याचा विचार अर्जुनाने करणे आवश्यक होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच श्रीकृ ष्णांनी अर्जुनाला समजावतांना कीर्तीच्या मुद्द्यावर भर
दिला होता. शेवटी युक्तीच्या चार गोष्टी सांगूनही जेव्हा अर्जुनाचा मोह दूर झाला नाही तेव्हा त्यांना त्याला १८ अध्यायाची गीता सांगावी लागली.

लेखन सौ. मनीषा अभ्यंकर

You might also like