You are on page 1of 4

१६.

मुक्या प्राण्यांची कै फियत

- ज्योती वैद्य - शेटे

शब्दार्थ :
1. कै फियत- तक्रार
2. कासावीस होणे- व्याकू ळ होणे
3. डोळे पाणावणे- दु:ख होणे, रडू येणे
4. पोटशूळ उठणे- पोट दुखणे
5. जलचर- पाण्यात राहणारे प्राणी
6. डोळे उघडणे- जागरूक होणे, सावधान होणे
7. सगेसोयरे- नातेवाईक
8. ऱ्हास- नष्ट
9. दूषण देणे- दोष देणे
10. स्मरण- आठवण
11. वनचरे- वनात राहणारे प्राणी
-------------------------------------------------------------------------------
---------
प्र. १. तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.
तक्रार वनचर
(१) मोबाइलच्या आवाजाची भीती चिमणी
(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी गाय
(३) विषारी पाण्याने तगमग मासोळी
(४) वारूळ, शेत नष्ट नाग

प्रश्न २. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा :


( १ ) या पाठात कोणाकोणांत संवाद झाला आहे ?
उत्तर : या पाठात चिमणी , गाय , मासोळी , नागोबा , सर्व प्राणी व माणूस यांच्यामध्ये संवाद झाला आहे .

( २ ) चिमणीला कोणता त्रास होतो ?

उत्तर : चिमणीला मोबाइलचा आवाज सहन होत नाही . मोबाइलच्या आवाजाने तिचे नाजूक मन कासावीस
होते.

( ३ ) गाईचे डोळे का पाणावले ?

उत्तर : गाईला चाऱ्याऐवजी प्लास्टिकचा ढीग दिसतो . घासाबरोबर प्लास्टिक तिच्या पोटात जाऊन पोट दुखते
; म्हणून तिचे डोळे पाणावले .

( ४ ) मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे ?

उत्तर : मासोळी ज्या तलावात राहते , त्याचे पाणी घाणेरडे व विषारी झाले आहे , हे पाहून तिच्या जिवाची
तगमग होते . प्रदूषित पाणी तिला प्यावेसे वाटत नाही .

( ५ ) नागोबाची तक्रार कोणती आहे ?

उत्तर : माणसाने नागोबाला राहायला वारूळ ठेवले नाही , शेत ठेवले नाही . त्याला पकडू न लाह्या खायला
देतात. माणसांच्या या अंधश्रद्धेचा नागोबाला कं टाळा आला आहे. माणसाने जागरूक होऊन पाहावे , अशी
त्याची तक्रार आहे .

---------------------------------------------------------------------------------------
----------
प्र. ४. कोण ते सांगा (वनचर, भूचर, जलचर, उभयचर)
(१) पाण्यात राहणारे- जलचर
(२) जमिनीवर राहणारे- भूचर

(३) जंगलात राहणारे- वनचर

(४) जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे- उभयचर

---------------------------------------------------------------------------------------
----------
प्र. ५. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.
(१) किनारा- काठ
(३) जल- पाणी
(५) मासा- मासोळी
(२) शेवट- ऱ्हास
(४) आठवण- स्मरण
(६) नातेवाईक – सगेसोयरे
---------------------------------------------------------------------------------------
----------

कठीण शब्द
ऱ्हास ऱ्हास ऱ्हास
स्मरण स्मरण स्मरण
प्लॅस्टिक प्लॅस्टिक प्लॅस्टिक
अंधश्रद्धा अंधश्रद्धा अंधश्रद्धा
जागृत जागृत जागृत
---------------------------------------------------------------------------------------
----------

You might also like