You are on page 1of 11

बी. जी. पी. एस.

महिला अध्यापक महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर

घटक : इतिहास अध्यापनात येणाऱ्या अडचणी व समस्या

विषयः इतिहास

वैशाली सुनील सोनवणे


रोल नं :- 87
इतिहास अध्यापनात येणाऱ्या अडचणी व समस्या::

प्रस्तावना::
अभ्यासक्रमात इतिहास विषयाचा समावेश काही निश्चित उद्दिष्टे डोळ्यासमोर ठे वन ू च करण्यात आला आहे .
इतिहास शिक्षणातन ू मल्ू य संस्कार व्हावे ही अपेक्षा आहे . राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ च्या दहा गाभाभत

घटकांची पर्तू ता देखील इतिहास अध्यापनातन ू व्हावी ही अपेक्षा आहे . इतिहासाच्या अध्यापनातन ू नैतिक
विकास व्हावा, राष्ट्रीय व सामान आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण व्हावे ही अपेक्षा आहे . परं तु इतिहासाची व्याप्ती
फार मोठी असल्यामुळे इतिहास शिकवताना काही अडचणी येतात काही समस्या येतात या खालील प्रमाणे;-
इतिहासाचे लेखन
काल संकल्पनाची समस्या
घटनेची निवड
योग्य अभिवत्त ृ ीचा अभाव
विद्यार्थ्यांना अपुरी माहिती मिळते
इतिहासातल्या सणावळ्या
घटनेचा अर्थ न काढता येणे
ऐतिहासिक वातावरण निर्माण न करणे
१) इतिहासाचे लेखन ::इतिहासाच्या लेखनात काही घटना, व्यक्ती, प्रसंग यांचा समावेश असतो. अभ्यासक्रमात नक्की
केलेल्या कालखंडाचे लिखाण इतिहास लेखकाला करायचे असते. इतिहासाचे लेखन करताना लेखक आपल्याला रूचेल,
आवडे ल अशा कल्पनांची भर घालन ू इतिहास पुन्हा लिहीत असतात. अशा इतिहास लेखनात वस्तुनिष्ठता कमीच राहते तर
व्यक्तिनिष्ठता भरपरू .इतिहासात ऐतिहासिक घटनांपेक्षा घटनांचा परिणाम जास्त महत्त्वाचा असतो. ऐतिहासिक घटनांचा
परिणाम आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक दृष्टीने होत असतो. पण इतिहास लेखक हा विचारही करत नाही,
घटनांवरच जास्त जोर लेखक देतात. तसेच घटनांचे स्थळ, काळ यांना जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा
मुद्दा दुर्ल क्षित राहतो.
२) काल संकल्पनाची समस्या::
इतिहास अध्यापनात दुसरी समस्या म्हणजे काल संकल्पना. इतिहासामध्ये कालाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यात
अडचणी येतात. कालाची व्याप्ती खपू मोठी असल्यामुळे कालाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.इ.स.पर्वू
(B.C.) व इ.स. ही संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजत नाही. एखादी घटना किती आधी व किंवा नंतर घडली याचा
निश्चित दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे . महाभारत व रामायण ही महाकाव्य इसवी सन पर्वू 300 ते 3000 च्या काळात
रचली गेली आहे असे विधान जर केले तर हा कालावधी एकूण किती वर्षाचा आहे हे च विद्यार्थ्यांना समजणार नाही.
कालाची संकल्पना स्पष्ट होणार नाही.
३) घटनेची निवड::
काळ अमर्याद असल्यामुळे कोणत्या काळाची घटना निवडायची हे ही कठीण काम आहे . कोणत्या घटनेला किती व
कितपत महत्त्व द्यायचे हाही एक प्रश्न असतो. वर्तमान काळात घडत असलेल्या घटना महत्त्वाच्या असतात पण
इतिहासात नुसत्या वर्तमान काळाचा विचार करून चालत नाही किंवा तो तसा करायचा का हाही प्रश्न आहे कारण
भतू काळाकडे पर्ण ू पणे दुर्ल क्ष ही करून चालत नाही कारण भत ू काळ हाच वर्तमान काळाची पष्ठ
ृ भमू ी असतो तर कधी
वर्तमान काळ हा भत ू काळावर प्रकाश टाकतो. भत ू काळ ते वर्तमान काळ हा कालखंड कितीही वर्षाचा असू शकतो
विद्यार्थ्यांसमोर हा कालखंड उभा करणे हे फार कठीण काम असते.

४) योग्य अभिवत्त ृ ीचा अभाव ::


ऐतिहासिक घटनाबाबत योग्य अभिवत्त ृ ी असत नाही ऐतिहासिक घटना, प्रसंग विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभा करणे
हे महत्त्वाचे असते प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेचा पुरावा मिळे ल आधार मिळे लच असे नाही इतिहास त्यामुळे काल्पनिक
वाटतो त्यातल्या त्यात हजारो वर्षापर्वी ू चा इतिहास तर अगदी अरे बियन नाईट्स प्रमाणे वाटण्याचीशक्यता जास्त
असते.
५) विद्यार्थ्यांना अपरु ी माहिती मिळते ::
ऐतिहासिक घटना हजारो वर्षापासन ू तर आत्तापर्यंत विखुरल्या असल्यामुळे प्रत्येक घटनेची माहिती यथासांग
मिळे लच असे नाही, ही यापर्वी ू माहिती अध्ययनाला मारक ठरे लच पण विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आकर्षितही करत
नाही.

६) इतिहासातल्या सणावळ्या ::
इतिहासाच्या अनंतकाळात अनंत घटना व त्यांचे वर्ष असतात. इतिहासातील सनावळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत
नाहीत .तसेच शिक्षकालाही हे लक्षात ठे वणे कठीण असते.
७) घटनेचा अर्थ न काढता येण:े :
इतिहासातील घटनाही वेगवेगळे आयाम घेऊन येते अमेरिकेचे इराक विषय धोरण कालचे व आजचे यात खपू फरक
आहे . पण हा फरक राजकीय, आर्थिक दृष्टिकोनातन
ू समजावन ू घेणे हे विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहे रचे काम आहे त .

८) ऐतिहासिक वातावरण निर्माण न करणे::


इतिहास शिक्षकाला नेहमी वर्गात ऐतिहासिक वातावरण निर्माण करणे शक्य नसते. कारण ऐतिहासिक वातावरण
निर्माण करण्यासाठी लागणारे पुरावे साहित्य मिळे लच असे नाही.अशा प्रकारे इतिहासात अध्यापनात वरील
प्रकारच्या अडचणी व समस्या असतात.

You might also like