You are on page 1of 11

समकालीन भारतीय समाजातील

शिक्षणाची ध्येये
* समकालीन भारतीय समाजातील शिक्षणाची ध्येये:-

 भारतीय राज्यघटनेने निश्चित के लेली शिक्षणाची ध्येये:-


 भारतीय राज्यघटनेने शिक्षण विषयक ध्येचे निश्चित करण्यासाठी काही समित्या आणि
आयोगांची स्थापना के ली. विशेषतः कोठारी आयोगाच्या माध्यमातून शिक्षण विषयक
ध्येयोची निश्चिती करण्यात आली. बालवाडीपासून उच्च शिक्षणा- पर्यंतच्या सर्व स्तरोचा
सर्वांगाने विचार करण्यात आला व शिक्षण विषयक राष्ट्रीय ध्येये निश्चित करण्यात आली.
ही ध्येचे पुढील मुद्द्‌यांच्या आधारे स्पष्ट करता येतील:-
१] उत्पादनक्षमतेत वाढ :
शिक्षणाच्या माध्यमातूनउत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणणे हे ध्येय भारतीय
राज्यघटनेने निश्चित के ले आहे. राष्ट्राची उत्पादन क्षमता वाढवायची असेल,
तर त्यासाठी व्यक्तींच्या उत्पादन क्षमतेत वाढ घडवून आणायची असेल तर
सर्वप्रथम त्या व्यक्तीला शिक्षणाचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक
आहे, असे राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले आहे.

२] विज्ञान शिक्षणाला प्राधान्य :-


विज्ञान शिक्षणाला प्राधान्य देण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे.
संशोधन हत्ती ही विज्ञान प्रयोगाच्या प्रात्यक्षिकांतूनच वाढते व थासाठी शालेय
अभ्यास क्रमातील प्रयोग विद्यार्थी वर्गाने स्वतः करावेत, यासाठी विद्यार्थ्यांना
प्रेरणा दयावीव आवश्यक साधने उपलब्ध करून दयावीत. अशा कृ ती मधूनच
संशोधनाची आवड निर्माण होईल व ही आवड त्यांच्या भावी आयुष्यातील शिदोरी
असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
३) कार्यानुभवाला महत्त्व :-
भारतीय राज्यघटनेत शिक्षणविषयक ध्येयात कार्यानुभवाला महत्त्व देण्यात अबिले
आहे. कार्यानुभवासारख्या विषयसून उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होते.
कार्यानुभवात समाजाला उपयुक्त अशा वस्तूंचेच उत्पादन करणे, ज्या कामातून काही
उत्पन्न मिळेल अशाच वस्तूंचे उत्पादन करून घेणे; कृ तीतून शिक्षणाला प्राधान्य
देणे, विक्रि करून अर्थिक
बाजूची ओळख करून दिली तर विद्यार्थ्याला कामाची आवड निर्माण होईल, श्रमाला प्रतिष्ठा
मिळेल, विद्यार्थी क्रियाशील राहील व भावी आयुष्यात विद्यार्थी स्वतःचा चरितार्थ चालविण्यास
सक्षम बनेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला असून राज्यघटनेत या ध्येयाच समावेश आहे.

सारांश रुपाने असे म्हणता येईल की भारतीय राज्यास्नेत शिक्षण हे क्षेत्र राष्ट्र उभारणीचे क्षेत्र आहे व
त्याला पुरेसे संरक्षण दिले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षण
दिले पाहिजे, शिक्षण व्यवसायाभिमुख असणे गरजेचे आहे यावर भारतीय राज्यघटनेने भर दिलेला
आहे.
• २१ व्या शतकातील शिक्षणाची ध्येथे:-

२१ व्या शतकात शिक्षण व्यवस्थेत विविध आव्हानांना तोंड दयावे लागणार


आहे. त्यात राष्ट्रामध्ये पर्यावरणाच्या ढासळत्या समतोलातून वाढणारे तापमान,
युवकांमधील वाढती बेरोजगारी, कै शल्य देणान्या शिक्षणाचा अभाव, अनारोग्य,
वाढता ताण-तणाव, लोकसंख्येचा प्रस्फोट अशा विविध आव्हानांना समर्थपणे
तोंड देण्यासाठी आधुनिक काळातील शैक्षणिक ध्येयात मूलगामी बदल
करण्यात आलेले आहेत. २१व्या शतकातील शैक्षणिक ध्येये पुढील मुद्‌यांच्या
आधारे स्पष्ट करता
१] मूल्याधिष्ठित शिक्षण :-
शिक्षणाची ध्येचे साध्य करायची असतील तर मानवी मूल्ये विसरून चाखणार
नाहीत. समकालीन २१ व्या शतकातील शिक्षणात मानूनी संवेदनशीलता
निर्माण करण्यासाठी विविध मूल्यांचे संस्कार शिक्षण- प‌द्धतीतून करणे या
ध्येयाला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. मानवाधिष्ठित मूल्यांचे संस्कार
वि‌द्यार्थ्यांवर बालवयापासून विव्यास सुरवात के ली तर विवेकानंदांना अपेक्षित
चारित्र्यवान मानवाची निर्मिती शिक्षणातून करणे शक्य होईल.
२] विविधांगी अभ्यासक्रम निर्मिती:-
२१व्या शतकात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शालेय स्तरापासून विद्यापीठा
पर्यंत अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख, लवचीक, अदयावत व व्यावसायिक असावा.
अभ्यासक्रम
उद्‌योजक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, शिक्षक, पालक व विद्यार्थी यासर्व घटकांचा समावेश
करुन होव्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. उत्कृ ष्ट असा अभ्यासक्रम
तयार करण्यात आपण यशस्वी ठरलो तर २१व्या शतकातील अपेक्षित अशा सक्षम
भागरिकांची निर्मिती करता येईल.
३] विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग :-
भारताचा विविध क्षेतामध्ये विकास उपयुक्त
असा शास्त्रीय दृष्टिकोन व विज्ञान आणि तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असा आशावाद
व्यक्त करण्यात आलेला असून शिक्षण क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग
करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. लोकोना शिक्षणाचा लाभ व्हावा
यासाठी एज्युसेंट हा बहुउद्देशीय उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आहे. तसेच
अत्याधुनिक साधनांचा उपयोग करण्यात येत असून ई-लर्निंग, आभासी वर्ग अशा
माध्यमातून शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
वरील मुद्यांचा विचार करता आपन असे म्हणू शकतो की, २१व्या शतकात
सामाजिक, सांस्कृ तिक, आर्थिक, राजकिय संदर्भ पूर्णपणे बदललेले असून आधुनिक
काळातील ध्येये देखील बदललेली अहित.
Thank you!

You might also like