You are on page 1of 1

ग्रहांचे कार्येश भाव

1. ग्रह स्वतःज्या भावात असेल तो भाव


2. ग्रहाच्या स्वराशी लग्न कंु डलीत ज्या भावात असतील ते भाव
3. ग्रहाचा नक्षत्रस्वामी ज्या भावात असेल तो भाव
4. ग्रहाच्या नक्षत्रस्वामीच्या स्वराशी ज्या भावात असतील ते भाव
5. ग्रहाची दृष्टी ज्या भावांवर असेल ते भाव
6. राहु-केतु ज्या राशीत असतील, त्या राशीचा स्वामी ज्या भावांचा कार्येश असेल त्या सर्व
भावांचे राहु-केतु दे खील कार्येश होतील.
7. जे ग्रह राहु किंवा केतुच्या नक्षत्रात असतील, ते ग्रह राहु-केतु ज्या-ज्या भावांचे कार्येश
होतील, त्या सर्व भावांचे कार्येश होतात.
8. जे ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात असतात ते ग्रह त्यांच्या उपनक्षत्र स्वामीप्रमाणे फळे दे तात.
म्हणजेच त्यांचा उपनक्षत्र स्वामी हा त्यांचा नक्षत्रस्वामी आहे असे समजून त्या ग्रहांचे
कार्येशत्व काढावे.

कार्येश भावांचे बलाबल

1. ग्रहाचा नक्षत्रस्वामी ज्या भावात आहे तो भाव बलवान


2. ग्रहाचा नक्षत्रस्वामी ज्या भावाचा स्वामी आहे , त्या भावात कुणी ग्रह नसेल तर तो भाव
बलवान
3. ग्रहाच्या नक्षत्रात ग्रह नसतील तर, ग्रह ज्या भावात आहे तो भाव बलवान
4. ग्रहाच्या नक्षत्रात ग्रह नसतील तर, ग्रह ज्या भावाचा स्वामी आहे त्या भावात कुणी ग्रह
नसेल तर तो भाव बलवान
5. ग्रह स्वनक्षत्रात असेल आणि जरी ग्रहाच्या नक्षत्रात ग्रह असले तरी ग्रह ज्या भावात आहे
तो भाव बलवान
6. ग्रह स्वनक्षत्रात असेल आणि जरी ग्रहाच्या नक्षत्रात ग्रह असले तरी ग्रह ज्या भावाचा
स्वामी आहे त्या भावात कुणी ग्रह नसेल तर तो भाब बलवान
7. ग्रहाच्या नक्षत्रात ग्रह नसतील किंवा ग्रह स्वनक्षत्रात असेल तर ग्रह ज्या भावाचा सब आहे
तो भाव बलवान.
8. राहु-केतु या छाया ग्रहांनाही वरील नियमानस ु ार बलवान कार्येशत्व लाभत. शिवाय त्यांना
त्यांच्या राशीस्वामीला मिळणाऱ्या कार्येशत्वाची अधिक जोड मिळते.

रुलिंग प्लँ नेट्स

1. प्रश्नस्थळी, प्रश्नवेळी जे लग्न उगवत असेल त्या लग्नाचा स्वामीग्रह


2. प्रश्नवेळेस चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या राशीचा स्वामी ग्रह
3. प्रश्नवेळेस चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामीग्रह
4. प्रश्नदिवशी जो वर असेल त्या वरचा स्वामीग्रह
5. प्रश्नस्थळी, प्रश्नवेळी जे लग्न उगवत असेल त्या लग्नाचा नक्षत्र स्वामी

You might also like