You are on page 1of 7

माझा मराठीचा बोल कौतुके

मराठीतले थोर संत कवी ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीच्या बोलांची स्तुती के ली. प्रत्यक्ष अमृताच्या गोडव्याशी पैज लावून जिंकण्याचं सामर्थ्य असलेल्या या भाषेचा
महिमा गायला. आणि मराठी जनांना भरतं आलं. मराठीची महती सांगताना आजही या ओळी हटकू न उधृत के ल्या जातात. मराठीची एक विद्यार्थिनी म्हणून मलाही
आपल्या स्व-भाषेचा सार्थ अभिमान होता आणि आहेही. पण या गोडव्याच्या हलव्याचे काटे मला तेव्हा टोचायला लागले जेव्हा मी परदेशी विद्यार्थ्यांना मराठी
(आणि कालांतराने हिंदी) ही परदेशी भाषा म्हणून शिकवायला सुरवात के ली.
पुण्यात तीन study aboard program चालतात. (तसेच भारतात वेगवेगळया ठिकाणी चालतात.) हे साधारणपणे चार ते सहा महिन्यांचे हे प्रोग्रॅम असतात.
यात मराठी किं वा हिंदी शिकणं हा प्रमुख हेतू नसतो. इतर अनेक विषयांपैकी तो एक विषय असतो. साधारणपणे चाळीस ते साठ तास भाषा शिकवायला मिळतात
आणि आजकाल पुष्कळवेळा देवनागरी लिपीपासून शिकवायला सुरुवात करावी लागते. म्हणजे शब्दशः श्रीगणेशा पासून ही परदेशी मुलं सुरुवात करतात आणि
अवघ्या चाळीस-पन्नास तासात संपूर्ण नवीन, परकी भाषा शिकतात. पहिल्या दोन-चार दिवसात जुजबी संभाषणही करू शकतात. म्हणजे पहिल्या दिवशी सुप्रभात.
मग दोन दिवसात माझं नाव, मला पाहिजे आणि मला आवडतं – या प्रकारची सोपी वाक्य. चाळीस ते पन्नास तासांनंतर शेवटच्या परीक्षेचा भाग म्हणून ते सुमारे दहा
ओळींचा निबंध लिहितात. वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ ओळखू लागतात आणि इंग्रजीतून मराठी किं वा हिंदीत तसेच मराठी-हिंदी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतरही
करू शकतात. रिक्क्षावाल्याशी जुजबी बोलतात. भारतात प्रवासाला जातात तेव्हा काही प्रमाणात हिंदी बोलतात. प्रोग्रॅम सेंटरमधल्या कर्मचारी वर्गाबरोबर मला चहा
दे, बिस्किट नको, मी येतो-येते अशी देवाणघेवाण करतात. आपलं नाव देवनागरीत लिहितात. देवनागरी पाटया वाचतात.

जेव्हा सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी परदेशी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवायला सुरुवात के ली तेव्हा पुण्यात रहायचे तर मराठी शिकणे गरजेचे होते. ही परदेशी मुलं
मराठी कु टुंबातून राहात असत. काही वर्षांपूर्वीपर्यंत मराठी कु टुंबातले आजी-आजोबा, लहान मुलं यांना इंग्रजी येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घरच्यांशी किं वा
बाहेर दुकानात छोटी-मोठी खरेदी करताना, रोज रिक्क्षानी ये-जा करताना मराठीचा आधार घ्यावाच लागायचा. पण गेल्या काही वर्षात इंग्रजीचा प्रसार वाढला आणि
आता मराठी कुं टुंबात मराठीत बोलण्याची गरज राहिली नाही. (उलट मराठी कु टुंबातली सूज्ञ मंडळी आपल्या घरातल्यांचं इंग्रजी सुधारण्यासाठी परदेशी मुलांना घरी
ठेवून घेतात आणि मग त्यांची मुलं पुढे मागे परदेशात जातात तेव्हा याचा उपयोग होतो.) तर गेल्या काही वर्षात भारताची आर्थिक परिस्थिती बदलली. जगाचा
भारताबरोबर व्यापार सुरू झाला. संगणक क्षेत्र विस्तारलं. या घडामोडींबरोबर बॉलिवूड सिनेमा वाढला. हिंदीचा परीघ वाढला आणि आज भारतात येणाऱ्या सुमारे
75 टक्के विद्यार्थ्यांना हिंदी शिकायची असते कारण ती अनेक आशियाई देशात बोलली जाणारी भाषा आहे. (अनेकांना बॉलिवूडमधे कामही करायचं असतं.)

या पार्श्वभूमीवरून मी परत माझ्या मूळ मुद्याकडे वळते. यांना आपली भाषा शिकवताना मनात काही आडाखे होते. भाषेबद्दलचे काही ठोकताळे होते. (आपल्या
भाषेइतकी सुंदर, सोपी भाषा नाही. असा (बालीश) विचारही होता.) इतके दिवसे इंग्रजीसारख्या परक्या भाषेमधे (आपलाल्या पुरेशी चांगली येत नाही म्हणूनही
की काय कोण जाणे) अनेक वैगुण्य सापडली होती. मुख्य म्हणजे या भाषेचं लिखाण आणि उच्चार यात एकवाक्यता नाही. (एकशब्दतः नाही म्हणणे जास्त योग्य
होईल का?) हिंदी चित्रपटांतून या भाषेच्या लिखाण आणि उच्चार यात जी तफावत आहे त्यातून विनोद निर्मिती के लेली आहे त्यामुळे मी याहून जास्त काय
सांगणार? पण तज्ज्ञ म्हणून काही उदाहरण द्यायचीच झाली तर u या स्वतंत्र वर्णाचा उच्चार उ असा होत असला तरी जेव्हा हा वर्ण शब्दात वापरला जातो तेव्हा
मात्र अनेक ठिकाणी याचा उच्चार a या वर्णाच्या उच्चाराप्रमाणे अ असा होतो. उदाहरणार्थ – but,
cup याशब्दांमधे u चा उच्चार अ होतो. मात्र a जेव्हा
शब्दात वापरला जातो तेव्हा कधी त्याचा उच्चार अ होतो. बघा and. तर कधी a चा उच्चार आ होतो. म्हणून बघा – art. (वैविध्यपूर्ण चारचाकी
गाड्यांच्या मॉडेलचे उच्चार अनेकदा विचित्र असतात.) तर psychology या शब्दात p चा उच्चार करतच नाहीत. अशी अनेक उदारहणे सहज देता
येतील कारण पाचवी पासून या शब्दांनी फार त्रास दिलेला असतो आणि spelling test मधले गुण गेलेले असतात.

या पार्श्वभूमीवर मराठी आणि हिंदीचे उच्चार हे लिखाणाप्रमाणे असतात, नियमबद्ध असतात आणि म्हणून ते सोपे असतात यावर माझा (इतर अनेक मराठी आणि
हिंदी भाषकांप्रमाणेच) ठाम विश्वास होता. तो इतका ठासून ठाम होता की अमेरीका, जर्मन आणि काही आशियाई देशातून नव्याने आलेल्या आणि पहिल्यांदाच ही
भाषा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना यातली तफावत सापडेल हे माझ्या गावीच नव्हतं. त्यामुळे (आणि अर्थात मी मराठीची जाणकार शिक्षक म्हणून नियुक्त झालेली
असल्यामुळे, माझ्याकडे माझ्या भाषेतली उच्च पदवी असल्यामुळेही) सुरुवाती-सुरुवातीला मी त्यांचं लिखाण चुकीचं ठरवून मोकळी होण्याची चूक के लीच. पण
त्यांचा लिखाणातूनच मला आपल्या भाषेचे लिखाण आणि उच्चार यातली विसंगती प्रकर्षाने लक्षात येत गेली. कित्येकदा विद्यार्थी कपाट हा शब्द कपाट् असा
लिहितात कारण आपण नियम सांगतो की जेव्हा एखाद्या शब्दात अन्त्य वर्ण कोणताच स्वर नसतो तो शब्द आपण पाय मोडू न लिहितो. आपण कु ठे कपाट या
शब्दातल्या शेवटच्या अचा उच्चार करतो? मग तो कपाट् असा लिहिणं हे वर सांगितलेल्या नियमानुसार बरोबरच नाही का? असे इतर अनेक शब्द सहज सापडतील
ज्यात शेवटच्या अ चा आपण पूर्ण उच्चार करत नाही. उदा. सुगम् संगीत्, अधिक् , कार्यक्रम् – असे कितीतरी.....

अनेकदा श्रुतलेखनामध्ये ( या मराठी शब्दाचा अर्थ Dictation असा आहे.) हे आज्ञाधारक विद्यार्थी, करताना हा शब्द कर्ताना असा लिहितात. कारण आपण
करताना यातल्या र् नंतरचा अ पूर्ण उच्चारत नाही. हा र् चा उच्चार ’कर्ता’ या शब्दासारखा करतो तर तसाच लिहायला काय हरकत आहे? याचप्रकारे आम्सुल
(आमसुल), मान्गुट (मानगुट) , मिन्टं (मिनिट) असं लिहिणं हे उच्चाराला धरून होणार नाही का? असे प्रश्न परदेशी मुलं विचारतात. मराठी आणि हिंदी या
प्रादेशिक भाषांमधे सुलभीकरणाची प्रक्रिया म्हणजे वापरासाठी भाषा सोपी करण्याची क्रिया अनेक वर्ष चालू आहे. उच्चारातले बदल हा त्याचाच एक प्रकार आहे.
त्यामुळे शब्दांचे उच्चार काळाच्या ओघात आता संस्कृ तप्रमाणे स्पष्ट के ले जात नाहीत. पण लिखाणात मात्र ती स्पष्टता आपण राखून आहोत. आणि हा विरोधाभास
आपल्या लक्षात सुद्धा येत नाही.

मराठीतला लई हा खूप या अर्थानी येणारा बोली शब्द नेमका कसा लिहायचा लई का लै? अनेकदा नव्याने भाषा ऐकणाऱ्याला लय हा शब्दही लई असाच ऐकू येतो
आणि मग ऐकल्याप्रमाणे तो लिहिला जातो. (ग्रामीण मराठीत लई या खूप या अर्थाने येणाऱ्या शब्दासाठी आजही लय हाच शब्द वापरला जातो.) नवीन भाषा
शिकणाऱ्याला हे उच्चारातले फरक समजणे अवघड असते. कारण या उच्चारांतला फरक फारच निसटता आहे. त्यामुळे नवखा माणूस लई, लै आणि लय हे तीनही
शब्द कोणत्याही एकाप्रकारे लिहितो. तेच मऊ या शब्दाचं. हो शब्द मऊ लिहियचा का मौ? मौज शब्द कसा लिहायचा मऊज ? जर मराठीत उच्चाराप्रमाणे लेखन
होत असेल तर मग मऊज असा शब्द लिहिला तर चुकीचा ठरू नये. (परदेशी मुले जेव्हा मराठी आणि हिंदी ऐकू न त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या
प्रकारची गल्लत सहजपणे करतात.) थोडक्यात मुद्दा मांडायचा तर ज्या शब्दांमधे अ+ उ किं वा ऊ (= औ) तसेच अ+इ किं वा ई (=ऐ) असा स्वरांचा क्रम येतो
तिथे हमखास गोंधळ होतो. (तो होणे स्वाभाविकही आहे कारण हे स्वर संधी आहेत. प्रश्न फक्त योग्य लेखनाचा आहे.)

तेच श आणि ष चं. या अक्षरांमधल्या उच्चारातला संस्कृ तमधे असलेला बदल आता जवळ जवळ नाहीसा झाला आहे. आपण फक्त आपल्या मुलांना लहानपणी
लिहायला शिकवताना पोटफोड्या ष आणि शेंडीवाला श असं सांगतो. पण षटकोन चा उच्चार खरंतर आपण शटकोन असाच करतो. पण लिखाण मात्र त्याप्रमाणे
के लं तर चुकीचं समजलं जातं. मराठी भाषकांना वर्षानुवर्षाच्या सवयीनंतर मूळ शब्दात कु ठे ष आहे हे माहीत असतं आणि म्हणून त्याचा उच्चार श के ला तरी
(म्हणजे वर्ष चा उच्चार वर्श – मनात म्हणून बघा हे खरं आहे की नाही ते.) आपण तिथे ष लिहितो. शतक याशब्दात मुळात ष नाही हे माहीत असल्यामुळे षतक
असा कधीच लिहित नाही. पण नव्याने भाषा (का भाशा?) शिकणाऱ्याला हे कसं काय समजणार? आपण उच्चारात न बाळगलेला फरक त्यांनी लिखाणात गमावला
तर मात्र आपण त्यांना चूक देणार, हा न्याय बरोबर आहे का? प्रश्न शब्दाचा उच्चार आपण प्रश्ण असा करत असतो. म्हटलं का म्हणलं ही गल्लत असतेच.

आजकाल आपण मराठीची मुळाक्षरं शिकवताना ञ् आणि ङ् हे अनुनासिक (नासिके तून म्हणजेच नाकातून उच्चारण के ले जाणारे वर्ण = nasals) वर्ण शिकवतच
नाही कारण ते भाषेत फारच कमी वेळा वापरले जातात. अनेकदा तर ते अनुस्वाराच्या स्वरूपातच लिहिले जातात. उदाहरणच घ्यायचं तर हा शब्द बघा – वांग.
याचा उच्चार परत नीट, सावकाश करून बघा. हा उच्चार वाङ्ग असा आहे. पण तो आपण तसा लिहीत नाही. तर चंचल शब्दात अनुस्वाराचा उच्चार ञ् आहे म्हणजेच
चञ्चल असा उच्चार आपण करत असतो. उच्चारात अनिवार्य असलेले हे सानुनासिक वर्ण आपण लिखाणातून हद्दपार के ले आहेत. पण हे फक्त क आणि च वर्गातल्या
अनुनासिकांबद्दलच खरं आहे. कारण ट वर्गातील अनुनासिक ण, त वर्गातील अनुनासिक न आणि प वर्गातील अनुनासिक म यांचं स्वतंत्र स्थान अजून अबाधित
आहे. कारण ते अनेक शब्दांमधे स्वतंत्ररित्या येतात. जिथे ते शब्दाच्या सुरुवातीला येतात तिथे तर त्याद्दलचा अनुस्वार लिहिणार कु ठे (बघा या शब्दातही
सुरुवातीला आलेला म अनुस्वारासारखा लिहिता येणारच नाही.) एक गंमतशीर उदाहरण बघू . मुंबई या शब्दाता दोन म आहेत. त्यातला पहिला म या प्रकारे
लिहिला आणि दुसरा अनुस्वार रूपात. परदेशी विद्यार्थ्यांना यातला फरक समजण फार अवघड जातं. कदाचित आपली मुलंदेखील यातला नेमका फरक आणि
त्यासाठीचा नियम सांगू शकणार नाहीत. आपण के वळ सरावाने हा शब्द या प्रकारे लिहितो एवढंच. आपल्या मुलांना हल्ली वाङ्मय हा शब्द वाचता येत नाही. ते
त्याचा उच्चार वाड्मय असा करतात. म्हणजे एकीकडे सातासमुद्रापार येणारी अमेरिकन आणि इतर परदेशी मुलं प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार आणि योग्य लेखन
समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्या भाषेतली पुढची पिढी त्यातल्या बारकाव्यांबद्दल, नेमके पणाबद्दल बेफिकीर असते. एकीकडे इंग्रजीतील spelling
बद्दल काटेकोरपणा बाळगण्याची धडपड असते तर स्वतःच्या भाषेतील काटेकोरपणाबद्दल हलगर्जी. इंग्रजी spelling चुकलं तर मुलं हसतात पण मराठी
spelling चुकली तर त्याबद्दल कोणालाच काही विशेष वाटत नाही.
एकदा एका परदेशी विद्यार्थ्यानी मला आश्चर्यचकित के लं. त्यानी मला विचारलं की ज्ञ चा उच्चार द्न्य असा आहे तर तो तसाच का लिहायचा नाही ? किं वा क्ष चा
उच्चार क् + ष असा आहे तर मग तसं लिहायला काय हरकत आहे. तेच श्र बद्दलही म्हणता येतं. श्र लिहिताना आपण ग्र प्रमाणे श ला र का जोडत नाही?
म्हणजेच ग्र सारखा आपण का लिहित नाही? या तीनच जोडाक्षरांना वेगळी चिन्हे का? लिपीच्या इतिहासात याला नक्कीच काही कारण असणार पण आज मात्र ती
आपल्याला माहित नाहीत आणि आता त्यांच्या विशेष लेखनाची आवश्यकताही राहिलेली नाही. पण भाषेचा विचार करताना आपण लिपीचा तेवढा विचार करत
नाही. एखाद्या परदेशी मुलानी हे सुचवावं आणि आपल्याला याची गंधवार्ताही असू नये हा काय प्रकारचा विरोधाभास म्हणायचा ? भाषेच्या बाबतीत असे प्रश्न
आपल्या मुलांनाही पडतात का ? आणि पालक, शिक्षक अशा प्रश्नांना काही उत्तर देणार नाहीत किं वा असे प्रश्न विचारले तर वेड्यात काढतील अशा समजूतीने ती
गप्प रहातात ? पण हेच प्रश्न एखाद्या परदेशी पाहुण्यानी विचारले की मग त्यांना महत्त्व प्राप्त होतं आणि त्याची दखल घेतली जाते असं तर आपल्याकडू न होत नाही
ना ? (या कल्पनेचीच मला जास्त भीती वाटली.)

लेखन आणि उच्चारातल्या तफावतीचा आणखी एक खास नमुना म्हणजे च, छ, ज, झ या वर्णांचे दोन उच्चार. चमचा आणि चेला या दोन शब्दातल्या च च्या
उच्चारातला फरक लक्षात घेऊ या. तो अनुक्रमे च आणि (काहीसा) च्य असा आहे. तेच बाकीच्या तीन वर्णांबाबतही. आपल्या बोलण्यात हा फरक जाणवला की
परदेशी विद्यार्थी सजगपणे कोणता उच्चार योग्य आहे हे आवर्जून विचारतात. किं वा च ज्यात आहे असा शब्द आला की उच्चाराची खात्री करून घेतात. (फार कौतुक
वाटतं मग या मुलांचं.) या पुढचा ओघानी येणारा प्रश्न म्हणजे याबाबतीतला नियम काय ? कधी च उच्चार करायचा आणि कधी च्य. एक शिक्षक म्हणून मी त्यांना
उर्दू किं वा फारसी भाषेतून जे शब्द मराठी किं वा हिंदीनी स्वीकारले आहेत त्यांचा उच्चार आणि मूळ संस्कृ तमधून मराठी, हिंदी भाषेत आलेल्या शब्दातील उच्चारचा
असा तो फरक आहे असं एका linguist च्या तोऱ्यात त्यांना माहिती देते. पण मुळात ज्याला हा फरकच ओळखता येणार नाही, शब्द कोणत्या परंपरेतून आला
आहे हे ज्याला माहिती असण्याचं कारण नाही त्याला या ज्ञानपूर्ण माहितीचा काय उपयोग ? आपल्याला भाषेच्या भाषकांना तरी प्रत्येक शब्दाची परंपरा, इतिहास
माहीत असतो का ? आपल्याला के वळ ऐकू न ऐकू न त्या शब्दांच्या उच्चारातला भेद समजलेला असतो. परदेशी मुलांना त्यासाठी काही सोपे आडाखे, सोपे ठोकताळे
देता येतील का हे शोधायला हवं.

मराठी (आणि हिंदी) ऱ्हस्व इ , उ आणि दीर्घ ई, ऊ हे स्वर शिकवताना तर पंचाईतच होते. त्यातल्या ऱ्हस्व आणि दीर्घाच्या कल्पना परदेशी मुलांना स्पष्ट करून
सांगताना तारांबळ उडते. अनेकवेळा तसा उच्चार करूनही तो फरक मुलांच्या पुरेसा लक्षात येत नाही. आणि खरी गंमत तर त्या पुढेच असते. जेव्हा बाराखडी
शिकवून आपण व्यंजनांबरोबर ऱ्रऱ्हस्व आणि दीर्घ स्वरांची सांगड घालतो तेव्हा प्रकरण आणखीनच अवघड होतं. आजकाल आपल्या बोलण्यातून ह्या ऱ्हस्व –
दीर्घाचा फरकही लुप्त होत आहे. एकवेळ स्वरांच्या उच्चारातला म्हणजे ई आणि इ हा फरक दाखवता येईल. पण शब्दात तो फरक राहिलेला नाही तर दाखवणार
कसा ? मीरा आणि मित या शब्दांमधल्या ऱ्हस्व मि आणि दीर्घ मी च्या उच्चारात फरक होतो का ? जर आपण रोजच्या बोलण्यात त्यात फरक करत नसू तर मग
के वळ वर्गात कु त्रिमपणे तसा फरक करूनही फारसा उपयोग होत नाही कारण मुलांना वर्गाबाहरच्या भाषेला सामोरं जायचं असतं.

शब्दांतील विशिष्ट वर्णावर दिलेल्या आघातामुळे अनेकदा तेच वर्ण असणाऱ्या शब्दाचा अर्थ बदलतो उदाहरणार्थ तो पुण्याचा आहे आणि पुण्याच्या जोरावर तो
इथवर आलाय. या दोन्ही वाक्यात पुण्याचा याचा उच्चार वेगवगळा होतो. पुणे हे शहर या अर्थी असताना आपण पु या अक्षरावर जोर देत नाही पण पुण्य या शब्दाचं
हे रूप असताना आपण पु या अक्षरावर वेगळा जोर देतो. हा फरक आपल्याला लेखनात मात्र दाखवता येत नाही. संस्कृ त भाषेतून जशाच्या तशा घेतलेल्या
जोडाक्षरयुक्त शब्दातही उच्चारात आघात देण्याचा प्रघात असतो. उदा. अकस्मात यातील क या वर्णावर आघात आहे. मराठीतील पुन्हा पुन्हा या शब्दाचे दोन
उच्चार के ले जातात. काहीजण यातल्या न् वर आघात देऊन याचा उच्चार करतात. ज्याच्या भाषा अंगवळणी पडली आहे त्याला ऐकू न ऐकू न हे आघात माहीत
असतात मात्र भाषा फारशी न ऐकलेल्याला हे समजू शकत नाही आणि लिखित भाषेच्या वाचनात चूक होते.

स्वतःच्याच भाषेकडे मी परके पणाने (परकी समजून नव्हे तर परकीय भाषा ज्या सजगतेने पहातो त्याप्रमाणे) पहायला सुरुवात के ली. आणि अनेक प्रश्न निर्माण
झाले. अनेक फरक, अनेक तफावती, विरोधाभास लक्षात आले. भाषेचे वेगळेच पैलू झळकू न गेले. एक नवी दृष्टी प्राप्त झाली म्हणाना. आजकाल मी वेगवेगळया
दृष्टिकोनातून भाषा तपासून पाहते आणि भाषेचं एक अनोळखी रूप समोर येतं आपलीच जुनी, रेशमी साडी नव्या सुनेला दाखवावी त्याप्रमाणे. बघू या या रेशमी,
भरजरी साडीच्या किती सोनकाड्या झगमगतात ते.

- - - - - - - - - - - -- - - - - - - -
सांस्कृ तिक फरक
आपण नेहमी असे म्हणतो की भाषेचा संस्कृ तीशी निकटचा संबंध असतो. प्रत्येक भाषेतला शब्दसंग्रह त्या त्या भाषिक भागातल्या संस्कृ तीशी म्हणजेच सण, व्रते,
खाण्यापिण्याच्या, कपडे घालण्याच्या सवयी, देवपूजेच्या पद्धती यावर अवलंबून असतो. एवढंच काय त्या त्या समाजात माणसे एकमेकांशी कसे संबंध राखून
असतात, एकमेकांना कशी वागवतात हे सुद्धा भाषा वापरायच्या प्रकारावरून समजते. परदेशी मुलांना भाषा शिकवताना याचा अनुभव पदोपदी येत असतो. मुलांना
काही शब्द शिकवताना त्याची काळजी घ्यायला लागते तर काही वेळा त्यांच्या प्रश्नांना तोंड देताना फार सजग रहावे लागते.

नेहमीचे उदाहरण घ्यायचे तर मराठीत आपण वयाने, हुद्याने, कामाने, अनुभवाने मोठ्या व्यक्तीला आदर देतो. तो आदर भाषेतून दाखवायची पद्धत म्हणजे
आदरार्थी बहुवचन वापरणे. ती आदरयुक्त व्यक्ती एकच असली तरी आपण त्याला बहुवचनाचे प्रत्यय लावतो. उदा. मैत्रिण म्हणाली तर आजोबा म्हणाले. ए आई
आणि अहो बाबा. या वाक्यांमधले म्हणाले हे क्रियापदाचे बहुवचनी रूप किं वा अहो हे बहुवचनी संबोधन आदर दर्शवण्यासाठी आहे. हा नियम आपण व्यवहारात
कसा वापरतो बघा. काका –बाबा- आजोबा मामा – म्हणाले, तर काकू - आई- आजी- मामी म्हणाली. म्हणजे समस्त पुरुष वर्गासाठी आदरार्थी बहुवचन तर
स्त्री वर्गासाठी एकवचन. अशा प्रकारची वाक्ये वर्गात वाचनात आली तर परदेशी विद्यार्थी सहज विचारतो म्हणजे काकू - आई- आजी- मामी यांना तुम्ही आदर
दाखवत नाही का? किं वा त्या आदरास पात्र नाहीत का? यात अमेरिकन समतेच्या मोकळेपणाचा वास असतो. क्षणभर आपल्यालाही वाटते की खरंच आपल्या
समाजात परंपरेने स्त्रियांना आदराचे स्थान दिलेले नाही का ? आणि आपण गोंधळतो. (पाश्चिमात्य परदेशी माणसासमोर गोंधळणे अजून संपत नाही.)
सुरूवातीला मलाही या प्रश्नाचे नेमके उत्तर माहीत नव्हते. पण हा प्रश्न विचारला गेल्यावर माझे विचारचक्र चालू झाले. आपण कोणाकोणासाठी आदरार्थी बहुवचन
वापरतो आणि कोणासाठी नाही याचा विचार सुरू झाला.

मग लक्षात आले की काही घरांमधे मामाला पण ए मामा म्हणतात. आपली प्रेमाची लाडकी मावशी ए मावशी असते पण घरात काम करायला येणाऱ्या मावशी मात्र
अहो मावशी असतात. दुकानदार, रिक्षावाले काका हे काही नात्यागोत्याचे काका नाहीत पण ते सुद्धा अहो काका असतात. म्हणजे आपण मराठीत बहुवचन के वळ
आदर दाखवण्यासाठी वापरतो असे नाही तर संबंधातला दुरावा, वेगळेपण दाखवण्याचाही तो एक मार्ग आहे. जिथे थोडा परके पणा आणि अंतर राखून संबंध आहेत
अशा सगळयांसाठी अहो किं वा बहुवचनी संबोधन आणि क्रियापदाची रूपे आपण वापरतो. याच न्यायाने आजी, आई, मामी या अहो नसतात. काही नातीच इतकी
आपलेपणाची, जवळकीची, जिव्हाळयाची असतात की शब्दातून येणारा परके पणा त्याला अजिबात नको असतो. हे ज्या दिवशी मला उमगले त्या दिवशी फार
आनंद झाला आणि परदेशी विद्यार्थ्यांना अभिमानाने सांगू लागले की स्त्री वर्गाला बहुवचनाची गरजच नसते कारण त्या आपल्या अगदी जवळच्या असतात. म्हणजेच
मराठीत बहुवचन के वळ आदरार्थी वापरत नसून ते परके पणा, तटस्थता, लांबच्या संबंधांचेही निदर्शक असते.

आता या पार्श्वभूमीवर आणखी एक गंमतशीर बारकावा आपल्याला बदलत्या काळाप्रमाणे बघावा लागतो. बघा हं पूर्वी अहो असलेला बाबा आता नवीन जमान्यात
आपल्या जुन्या रागीट, तटस्थ भूमिके ची कात टाकू न मुलांसाठी आपलासा बाबा होऊ लागल्यापासून तो सुद्धा ए बाबा झाला आहे. (पण परंपरागत विचारसरणीमुळे
आजोबा मात्र अजून अहोच राहिले आहेत. काय माहित आजचे बाबा आजोबा होतील तेव्हा आजोबा पण ए असेल.) काका, मामा पण अनेक घरात प्रेमापोटी ए
झाले आहेत. त्याहून आणखी एक बदल गंमतशीर जास्तच गंमतशीर आहे. आता आई ए आई असते आणि अहो आई पण. बदलत्या काळात सासूबाईंच्या आई
झाल्या आहेत. मात्र त्या नात्यातले दूरावलेपण पूर्ण मिटलेले नाही. त्यामुळे आपल्या स्वतःच्या आईशी साधर्म्य जरी त्यांनी नाव बदलून स्वीकारले असले तरी
आईशी असलेले हितगूज, काळजी, माया, पोटातून येणारा आपलेपणा अजून या नात्यात शिरला नाहीये. म्हणूनच आई ए असली तरी सासूबाई मात्र अहो आई
आहेत. भाषेतली ही मजा परदेशी मुलांना समजून सांगताना नकळत आपल्या समाजाची नसही सापडत जाते – मला आणि त्यांनाही.

याच संदर्भातले आणखी एक मजेशीर उदाहरण द्यायचे तर बाई या शब्दाबद्दल द्यावे लागेल. आपण शाळेतल्या शिक्षिकांना बाई म्हणतो आणि अनेकदा घरी काम
करायला येतात त्यांनाही बाईच म्हणतो. या दोघींना आपण अहो बाई असेच म्हणतो. म्हणजे यांच्यासाठी बहुवचनाचाच प्रयोग करतो. अनेक वेळा परदेशी मुले
यामुळे गोंधळतात. यात शिक्षिकांना अहो बाई हे आदराने म्हटले जाते तर कामवाल्या काकूं ना संबंधातल्या परके पणामुळे. ही गंमत कळाली नाही तर मात्र पंचाईत
झालीच म्हणून समजा.
मराठीत आदराची ही गंमत इथेच संपते पण हिंदीत मात्र ती आणखी गुंतागुंतीची होते. हिंदीत आदरासाठी जी कोणकोणाला लावायचे? हे कळायला मुलांना खूप
वेळ लागतो. हिंदी भाषेमधे भाषकांमधे असलेली तहजीब जोवर समजत नाही तोवर ते पूर्णपणे लक्षात येत नाही. तसेच हिंदीत तू या द्वितीय पुरुषी एकवचनी
सर्वनामासाठी तू, तुम आणि आप अशी तीन तीन सर्वनामे वापरली जातात. यातले कोणते सर्वनाम कोणत्या निकट जीवलगांसाठी, कोणते थोड्या जवळच्या
लोकांसाठी आणि कोणते लांबच्यांसाठी हे समजता समजता मुलांचा दोन महिन्यांचा कोर्स संपून जातो. आणि तरीही अनेकदा शंका शिल्लक राहतात. हिंदी
समाजातला आदर वाटण्याचा आणि व्यक्त करण्याचा भाव समजत नाही तोवर के वळ नियम सांगून किं वा आडाखे सांगून व्यवहारातले बारकावे समजत नाहीत.
अर्थात असा फरक असतो वर्गात हे बोलणे झालेले असेल तर मुले जेव्हा सहलीसाठी उत्तर भारतातल्या पर्यटन जागांना भेट देतात तेव्हा ऐकू न ती आदब समजून
घेतात. आणि विशेष म्हणजे ती आदब आपल्या बोलण्यात यावी यासाठी आग्रहीसुद्धा असतात.

नात्यातल्या गंमतीबरोबर आणखी एक गंमत आहे ती शुभेच्छादर्शक शब्दांची. ज्यांना इंग्रजीत Greetings असे म्हणतात. इंग्रजीत असे अनेक शुभेच्छादर्शक
वाक्प्रचार अगदी रोजच्या व्यवहारात सतत आणि सहजपणे वापरले जातात. उदाहरणार्थ Good Morning, Good day, Happy birthday आणि
असे अनेक. भारतातले मराठी किं वा हिंदीचे तास सुरू झाले की लगेच मुलांचा ठरलेला प्रश्न असतो की Good Morning कसे म्हणायचे. मग आम्ही त्यांना
सुप्रभात हा शब्द सांगतो. लगेच दुसऱ्या दिवशीपासून न चुकता प्रत्येक विद्यार्थी सुप्रभात म्हणायला लागतो. मग यथावकाश कोणाचा तरी वाढदिवस आला की
Happy birthday साठी विचारणा होते. मग असे करत करत सर्वच इंग्रजी शुभेच्छांसाठी मराठी किं वा हिंदीत काय म्हणतात हा विषय चर्चेला येतो. तेव्हा मग
सांगायला लागते की भारतीय समाजात रोज उठता बसता शुभेच्छा देण्याचा प्रघात नाही. हे ऐकल्यावरही त्यांच्या भुवया वर होतात. मग मी म्हणते शुभेच्छा के वळ
शब्दांपुरत्या असून चालणार नाहीत तर त्या तुमच्या देहबोलीत, वागण्यात वेळप्रसंगी मदत करण्यातून जाणवायला पाहिजेत यावर आमचा भर असतो आणि त्यामुळे
आम्ही सारख्या शुभेच्छा देत नाही. आणि आता पाश्चिमात्य प्रभावामुळे त्या वापरल्या तरी इंग्रजीतूनच वापरतो त्यासाठी पर्यायी मराठी किं वा हिंदी शब्द सर्रास
वापरले जात नाहीत. मराठी कु टुंबात आपण उठल्यावर घरातल्या प्रत्येकाला सुप्रभात म्हणत नाही. शुभेच्छाकार्डावर वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा असे लिहित
असलो तरी प्रत्यक्षात हे वाक्य सरसकट म्हणत नाही. Good afternoon, Good night साठी शुभ दुपार किं वा शुभरात्री नक्कीच म्हणत नाही. तसेच
Good day साठी तुमचा दिवस सुखाचा जावो हे वाक्य जर कोणी तुम्हाला म्हटले तर तुम्हाला अगदी परके आणि विचित्रच वाटेल. तेच Thank you बद्दलही
खरे आहे. त्यासाठी पर्यायी धन्यवाद हा शब्द आपल्याकडे असला तरी उठसुठ आपण प्रत्येकाला धन्यवाद म्हणत नाही. Please चं सुद्धा तसेच नाही का?
मराठी किं वा हिंदीत आपल्याला Please म्हणता येत नाही किं वा म्हणायची गरज वाटत नाही.

Get well soon यासाठी देखील नेमके शब्द कु ठे आहेत आपल्याकडे? लवकर बरे होण्यासाठी इच्छा व्यक्त करायची ती देवाच्या पायाशी ही आपली धारणा
त्यामुळे सहसा आजारी व्यक्तीलाच आपण बरा हो रे बाबा लवकर असे प्रत्यक्षात फारच क्वचित म्हणतो. किं वा म्हटले तर शुभेच्छाकार्डातूनच. Happy
Anniversary चीही गत तीच. अशा शुभेच्छा देण्याचा आपल्याकडे पायंडा नसल्यामुळे आपल्याकडे त्यासाठी स्वतंत्र शब्दच नाहीत. आणि आपल्याकडे
सोमवार ते शुक्रवार म्हणजे मान मोडू न काम करण्याचे दिवस तर शनिवार – रविवार हे फक्त कु टुंबाबरोबर किं वा मित्रमैत्रिणींबरोबर मजा करण्याचे दिवस अशी
संकल्पना नसल्यामुळे Happy weekend , or enjoy weekend यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत. या संकल्पना आपल्याकडे आल्या असल्या तरी
आपल्याशा होऊन अजून रुजल्या नाहीत हेच खरे.

वर्गातली भेट वारंवार होऊ लागली आणि एकप्रकारची मैत्री व्हायला लागली की कधीकधी धीट विद्यार्थी थोडे पुस्तकाबाहेरचे मराठी शिकायला उत्सुक असतात. मग
एखाद दुसरा विचारतो. I love you यासाठी तुम्ही काय म्हणता? मी म्हणते काहीच नाही. (किं वा खरंतर तर I love you च म्हणतो.) कारण अगदी याच
अर्थाचा वाक्प्रचार मराठी आणि हिंदीत नाहीच. पण जर अगदी म्हणायचेच झाले तर माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणणे शक्य आहे. पण या मराठी वाक्याचा
व्याकरणिकदृष्टीने अर्थ के ला तर तो होतो I have love upon you. आणि हिंदीतल्या मुझे तुमसे प्यार है चा शब्दशः अर्थ होतो I do love with
you. (असा अर्थ करून एखादा विद्यार्थी हसतो सुद्धा.) म्हणजेच अगदी इंग्रजीच्या तोडीला तोड प्रेमाची भाषा किं वा प्रेमाची मान्यता आपल्या भाषेत देता येत
नाही. कारण परंपरेनुसार असे प्रेम करण्याची आणि त्याचा उच्चार करण्याची पद्धतच या समाजात नव्हती. प्रेमापेक्षा आपलेपणा, माया, जिव्हाळा याचीच मक्ते दारी
जास्त. तीसुद्धा पुन्हा कृ तीतून दाखवण्याची पद्धत. पोटातून ओठापर्यंत आणायच्या गोष्टी तशा मर्यादित आणि कदाचित फक्त व्यावहारिक. त्यामुळे अशा प्रकारे व्यक्त
होण्यासाठीचे वाक्प्रचार आपल्या भाषेत नाहीत आणि आधुनिक गरजांप्रमाणे ते आणले तरी ते तसे मूळ धरत नाहीत.

आजकाल आणखी एक नेहमी विचारला प्रश्न आहे गरम या शब्दाबद्दल. गरम या विशेषणाचा अर्थ वर्गात सांगितला जातो hot by temperature and not
by taste. चवीसाठी मराठीत तिखट हा शब्द आहे. पण इंग्रजीत हवामान आणि चव या दोन्हीसाठी hot हा एकच शब्द वापरला जातो. मग ओघाने येणारा प्रश्न
असतो She is so hot हे कसे म्हणायचे. मला सांगावे लागते की मराठीत आणि हिंदीतही ही शब्दरचना किं वा अभिव्यक्ती शक्य नाही. कारण मुलींकडे
पाहण्याचा हा आपला पारंपारिक दृष्टिकोण नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगते hot आणि sexy हे शब्द आमच्या कोशात नाहीत कारण ते आमच्या जीवनपद्धतीत
नाहीत. (हे सांगताना आपण स्त्रीवर्गाला आदरार्थी बहुवचन वापरत नसल्याचा सल नक्कीच निघून जातो.)

- एखाद्या भाषेच्या शब्दकोशात म्हणजे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांमधे कोणते शब्द असतात आणि त्याचा वापर कसा के ला जातो हे किती
बोलके आहे. त्यातून त्या समाजाच्या धारणा, विचार, दृष्टिकोण समजत असते. कारण तो भाषेचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणूनच तर परदेशी
मुलांना पूर्ण परदेशी भाषा म्हणून मराठी किं वा हिंदी शिकवत असतानासुद्धा संस्कृ तीचा, समाजमनाचा आरसा दिसत राहतोच. त्याचे प्रतिबिंब अगदी
त्यांच्या कमी कालावधीच्या प्राथमिक शिक्षणात देखील पडतेच. हीच तर भाषेची, भाषाशिक्षणाची खरी खुमारी आहे. आपल्याकडे जेव्हा इतक्या भाषा
कशाला शिकायच्या हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपला समाज, आपली माणसे, आपली विचारसरणी मुलांना समजण्यासाठी, तो वारसा त्यांनी पुढे
नेण्यासाठी असे नाही का म्हणता येणार ?

- - - - - - - - - - -- - - - - - - -
लिपी –

आपल्याच भाषेतला शब्द दुसऱ्या लिपीत लिहिला तर काय होईल ? तर तो शब्द अनोळखी वाटतो. परदेशी मुलं जेव्हा मराठी किं वा हिंदी भाषा आणि त्यासाठी
देवनागरी लिपी शिकतात तेव्हा असंच होतं. इंग्रजी भाषेतला शब्द देवनागरीत लिहिला तर त्यांच्या तो लक्षात येत नाही. उदा. हे टेबल आहे. हे वाक्य लिहिलं
की मुलं हमखास विचारतात त्या दुसऱ्या शब्दाचा अर्थ काय ? एकतर अनेक इंग्रजी शब्दांचे आपण करत असलेले (भारतीय) उच्चार हे त्यांच्या इंग्रजी उच्चारांपेक्षा
वेगळे असतात आणि आपण अनेकदा जसा उच्चार करतो तसं आपल्या लिपीत लिहितो. Ticket हा शब्द इंग्रजी आहे. जो मराठीत तिकीट आणि हिंदीत टिकीट
असा लिहिला जातो. कारण त्या त्या भाषेत त्याचा उच्चार काहीसा त्याप्रमाणे के ला जातो. आता Bank ह्या इंग्रजी शब्दाचा उच्चार आणि त्याप्रमाणे लेखन करायचं
तर बॅंक असं करायचं का बैंक असं. यातला कोणताच शब्द त्यांना त्यांच्या भाषेतला वाटत नाही.

नवीन भाषा आणि नवीन लिपी शिकली की माणूस सहजपणे आपलं नाव त्या लिपीत लिहून बघतो. तो एक नवीन लिपीचा सराव करण्याचा प्रकार असतो. पण
प्रत्यक्षात आपलं नाव आणि आपल्या अतिशय परिचयाचे सगळेच शब्द आपल्याला आपल्या नेहमीच्या लिपितून पहायची सवय असते. लिपीचं आणि शब्दांचं एक
निकट सानिध्य असतं. ते तोडलं की आपल्याला चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. आपलं नाव आपण कन्नड किं वा तमिळ भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीत
पाहिलं तर ते आपलंच नाव आहे हे आपल्याला ती लिपी वाचता येत असली तरी कळायला वेळ लागतो. तसंच काहीसं परदेशी विद्यार्थी मराठी किं वा हिंदी भाषा
आणि त्यासाठी ओघानी देवनागरी लिपी शिकतात तेव्हा होतं. आजकाल आपण आपल्या भाषेत इतके इंग्रजी शब्द वापरत असतो की आपल्याला त्याची जाणीवच
नसते. एकदा एका नवीन परदेशी विद्यार्थ्याला मी मराठी शिकवत होते त्यावेळी आम्ही त्याच्या घरातल्या किचनमध्ये (स्वयंपाकखोलीत) बसलो होतो. त्यामुळे
तिथल्या वस्तू हाताने दाखवत मी वाक्य तयार करत होते. हा फ्रिज आहे. हा गॅस आहे. हा मिक्सर आहे. हा पॅन आहे. हा बाऊल आहे. (याचा इंग्रजी उच्चार खरेतर
बोल आणि बॉल याच्या मधला आहे.) थोड्या वेळाने तो म्हणाला यात मराठी कु ठे आहे? हा आणि आहे हे मराठी शब्द सोडले तर बाकी सगळं इंग्रजीच होतं. यावर
मी निरुत्तर झाले.

परदेशी मुलांना व्यावहारिक भाषा शिकवताना अशी वाक्य टाळता येत नाहीत किं वा जे मराठी शब्द आपण व्यवहारात आता वापरत नाही ते शिकवून उपयोगही होत
नाही. उदारहणच द्यायचं तर मराठीतला चित्रपट हा शब्द घेऊया. त्याचा अर्थ आपल्या सगळयांना परिचयाचा आहे. पण व्यवहारात चला आपण चित्रपटाला जाऊ
असं आपण म्हणत नाही म्हणू वर्गात चला पिक्चर बघूया असंच वाक्य सांगावं लागतं. हे वाक्य जर त्यांना फळयावर लिहून दिलं तर त्यांना पिक्चर हा शब्द किं वा
त्यासाठीचे दूसरे शब्द सिनेमा, मूव्ही देवनागरीत लिहिले की बिलकू ल वाचता येत नाहीत. किं बहुना हा इंग्रजी शब्द असेल हेच त्यांच्या लक्षात येत नाही. किं वा
सध्या शहरातल्या अनेक दुकानांच्या , उपहारगृहांच्या पाट्या देवनागरीत असतात पण शब्द मात्र इंग्रजी असतात. त्यामुळे परदेशी मुलांना त्या वाचता येत नाहीत
किं वा वाचून समजत नाहीत. कॅ फे , मार्के ट, जनरल स्टोअर्स, लाउंज असे अनेक शब्द दुसऱ्या भाषेच्या लिपीत पाहिले की परके , अनोळखी वाटतात.

म्हणूनच आज संगणकाच्या आणि मोबाईलच्या जमान्यात आपण एसेमेस (sms ) करताना किं वा मेल करताना मराठी भाषेतला मजकू र रोमन लिपीत लिहितो तेव्हा
तो लिहायला आणि वाचायला दोन्हीला खूप जास्त वेळ लागतो. कित्येकदा उच्चार चुकीचे के ले जातात आणि मूळ मजकू र काय आहे ते समजण्यात आपली सुद्धा
गल्लत होते. तंत्रज्ञानाच्या अपरिहार्यतेमुळे आपण हळूहळू या प्रकाराला सरावच चाललो असलो तरी मुळात देवनागरीत लिहिलेला मजकू र वाचताना ज्या पटकन तो
समजतो आणि वाचल्याचा आनंद मिळतो तो आनंद रोमन मधे लिहिलेल्या मजकू रातून मिळत नाही. हे म्हणजे भारतीय माणसाला काटाचमच्यांनी जेवून आणि भांड
तोंडाला न लावता पाणी प्यायलं तर पोट भरतं पण मन भरत नाही. त्यासाठी हातानी वरणभात खाल्ला आणि पाण्याचं भांड तोडांला लावून पाणी प्यायलं की पोट
आणि मन दोन्ही भरतं तसंच झालं की.
अक्षरांचं आणि आपलं एक नातं असतं. आपण आपल्या भाषेतील ते शब्द लहानपणापासून जसे पाहतो तसे पाहायची इतकी सवय झालेली असते की दुसऱ्या
लिपीत तेच शब्द लिहिले तरी ते अपरिचित वाटतात. त्यातलं आपलेपण हरवतं.

व्याकरणातील विसंगतींचा विचार

या मुलांना मराठी आणि हिंदीचं व्याकरण शिकवताना देखील अनेक प्रश्न (प्रश्ण) उपस्थित होतात.

मराठीत आणि हिंदीतही आपण काही ठराविकच क्रियापदांसाठी अप्रत्यक्ष कर्ता (indirect subject) वापरतो. हे जरा सविस्तर सांगायला हवे.
सामान्यपणे कोणत्याही वाक्याची रचना होत असताना क्रियापदाचं रूप हे त्यातल्या कर्त्याच्या पुरुष, लिंग आणि वचनाप्रमाणे निश्चित होते. उदा. मी खातो, तू
खातोस, तुम्ही खाता.... इ. या सर्व वाक्यात क्रियापदाचं रूप कधी बदलतं तर जेव्हा कर्ता बदलतो तेव्हा. मी या प्रथम पुरुषी कर्त्यावरून तो तू असा द्वितीय
पुरुषी झाला की क्रियापदही द्वितीय पुरुषी रूप धारण करते. म्हणजे कर्ता प्रत्यक्षपणे (directly) क्रियापदाच्या रूपावर परिणाम करत असतो. (कारण
क्रिया घडण्यात कर्त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो.) पण ही काही वाक्ये पहा. मला चहा पाहिजे. तुला चहा पाहिजे. मला गाणं आवडतं. तुम्हाला गाणं आवडतं.
मला जपानी येतं, त्यांना जपानी येतं. या वाक्यांमधे कर्ता बदलला की क्रियापदाचे रूप त्यानुसार बदलत नाही. तर काही ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्माप्रमाणे
बदलते. मला गाणं आवडतं, मला चहा आवडतो. गाणं या नपुंसकलिंगी कर्माऐवजी चहा हे पुंलिंगी कर्म वापरले की क्रियापदाचे रूप बदलते. हवं, पाहिजे,
आवडणे, येणे,

You might also like