You are on page 1of 7

युधिष्ठर को पूर्ण आभास था,

कि कलयुग में क्या होगा ?


पूरा अवश्य पढें।
अच्छा लगेगा।

पाण्डवों का अज्ञातवाश समाप्त होने में कु छ समय शेष रह गया था।

पाँचो पाण्डव एवं द्रोपदी जंगल मे छू पने का स्थान


ढूंढ रहे थे।

उधर शनिदेव की आकाश मंडल से पाण्डवों पर नजर पड़ी शनिदेव के मन विचार आया कि इन 5 में
बुद्धिमान कौन है परीक्षा ली जाय।

शनिदेव ने एक माया का महल बनाया कई योजन दूरी में उस महल के चार कोने थे, पूरब, पश्चिम,
उतर, दक्षिण।

अचानक भीम की नजर महल पर पड़ी


और वो आकर्षित हो गया ,

भीम, यधिष्ठिर से बोला- भैया मुझे महल देखना है भाई ने कहा जाओ ।

भीम महल के द्वार पर पहुंचा वहाँ शनिदेव दरबान के रूप में खड़े थे,

भीम बोला- मुझे महल देखना है!

शनिदेव ने कहा- महल की कु छ शर्त है ।

1- शर्त महल में चार कोने हैं आप एक ही कोना देख सकते हैं।
2-शर्त महल में जो देखोगे उसकी सार सहित व्याख्या करोगे।
3-शर्त अगर व्याख्या नहीं कर सके तो कै द कर लिए जाओगे।

भीम ने कहा- मैं स्वीकार करता हूँ ऐसा ही होगा ।

और वह महल के पूर्व छोर की ओर गया ।

वहां जाकर उसने अद्भूत पशु पक्षी और फू लों एवं फलों से लदे वृक्षों का नजारा देखा,

आगे जाकर देखता है कि तीन कुं ए है अगल-बगल में छोटे कुं ए और बीच में एक बडा कु आ।

बीच वाला बड़े कुं ए में पानी का उफान आता है और दोनों छोटे खाली कु ओं को पानी से भर देता है।
फिर कु छ देर बाद दोनों छोटे कु ओं में उफान आता है तो खाली पड़े बड़े कुं ए का पानी आधा रह जाता
है इस क्रिया को भीम कई बार देखता है पर समझ नहीं पाता और लौटकर दरबान के पास आता है।
दरबान - क्या देखा आपने ?

भीम- महाशय मैंने पेड़ पौधे पशु पक्षी देखा वो मैंने पहले कभी नहीं देखा था जो अजीब थे। एक बात
समझ में नहीं आई छोटे कुं ए पानी से भर जाते हैं बड़ा क्यों नहीं भर पाता ये समझ में नहीं आया।

दरबान बोला आप शर्त के अनुसार बंदी हो गये हैं और बंदी घर में बैठा दिया।

अर्जुन आया बोला- मुझे महल देखना है, दरबान ने शर्त बता दी और अर्जुन पश्चिम वाले छोर की तरफ
चला गया।

आगे जाकर अर्जुन क्या देखता है। एक खेत में दो फसल उग रही थी एक तरफ बाजरे की फसल दूसरी
तरफ मक्का की फसल ।

बाजरे के पौधे से मक्का निकल रही तथा


मक्का के पौधे से बाजरी निकल रही । अजीब लगा कु छ समझ नहीं आया वापिस द्वार पर आ गया।

दरबान ने पूछा क्या देखा,

अर्जुन बोला महाशय सब कु छ देखा पर बाजरा और मक्का की बात समझ में नहीं आई।

शनिदेव ने कहा शर्त के अनुसार आप बंदी हैं ।

नकु ल आया बोला


मुझे महल देखना है ।

फिर वह उत्तर दिशा की और गया वहाँ उसने देखा कि बहुत सारी सफे द गायें जब उनको भूख लगती
है तो अपनी छोटी बछियों का दूध पीती है उसे कु छ समझ नहीं आया द्वार पर आया ।

शनिदेव ने पूछा क्या देखा ?

नकु ल बोला महाशय गाय बछियों का दूध पीती है यह समझ नहीं आया तब उसे भी बंदी बना लिया।

सहदेव आया बोला मुझे महल देखना है और वह दक्षिण दिशा की और गया अंतिम कोना देखने के
लिए क्या देखता है वहां पर एक सोने की बड़ी शिला एक चांदी के सिक्के पर टिकी हुई डगमग डोले पर
गिरे नहीं छू ने पर भी वैसे ही रहती है समझ नहीं आया वह वापिस द्वार पर आ गया और बोला सोने
की शिला की बात समझ में नहीं आई तब वह भी बंदी हो गया।

चारों भाई बहुत देर से नहीं आये तब युधिष्ठिर को चिंता हुई वह भी द्रोपदी सहित महल में गये।

भाइयों के लिए पूछा तब दरबान ने बताया वो शर्त अनुसार बंदी है।


युधिष्ठिर बोला भीम तुमने क्या देखा ?

भीम ने कुं ऐ के बारे में बताया

तब युधिष्ठिर ने कहा- यह कलियुग में होने वाला है एक बाप दो बेटों का पेट तो भर देगा परन्तु दो
बेटे मिलकर एक बाप का पेट नहीं भर पायेंगे।

भीम को छोड़ दिया।

अर्जुन से पुछा तुमने क्या देखा ??

उसने फसल के
बारे में बताया

युधिष्ठिर ने कहा- यह भी कलियुग में होने वाला है।


वंश परिवर्तन अर्थात ब्राह्मण के घर शूद्र की लड़की और शूद्र के घर बनिए की लड़की ब्याही जायेंगी।

अर्जुन भी छू ट गया।

नकु ल से पूछा तुमने क्या देखा तब उसने गाय का वृतान्त बताया ।

तब युधिष्ठिर ने कहा- कलियुग में माताऐं अपनी बेटियों के घर में पलेंगी बेटी का दाना खायेंगी और
बेटे सेवा नहीं करेंगे ।

तब नकु ल भी छू ट गया।

सहदेव से पूछा तुमने क्या देखा, उसने सोने की शिला का वृतांत बताया,

तब युधिष्ठिर बोले- कलियुग में पाप धर्म को दबाता रहेगा परन्तु धर्म फिर भी जिंदा रहेगा खत्म नहीं
होगा।। आज के कलयुग में यह
सारी बातें सच
साबित हो रही है ।।

मुझे अच्छा लगा आपके समक्ष रखा है मैं आशा करता हूँ कि आप इसे और भी लोगों तक पहुचायेंगे

संस्कृ त भाषेतील दोन अतिप्राचीन महाकाव्यांपैकी एक महाकाव्य कृ ष्णद्वैपायन व्यासांचे महाभारत हे


होय दुसरे महाकाव्य म्हणजे वाल्मीकी मुनींचे रामायण होय. भारत हा शब्द पाणिनीच्या व्याकरणात
(अष्टाध्यायी ४-२-५६) भरत या नावाच्या मानववंशाचा संग्राम या अर्थी सिद्ध के ला आहे. या अर्थी सिद्ध
के लेल्या भारत या शब्दाला ‘महान्’ हे विशेषण पाणिनीने (६−२−३८) लावून महाभारत हा शब्द सिद्ध के ला
आहे. भरत लोकांचे महायुद्ध असा याचा अर्थ होतो. म्हणून या महायुद्धाच्या कथेला भारत किं वा महाभारत
हे नाव दिले. प्रतिपाद्य विषयाचे नाव प्रतिपादक ग्रंथाला दिले जाते. उदा., कालिदासाचे रघुवंश हे
महाकाव्य.

हे भरत लोक कोण होते ? भरत या मानववंशाचे नाव ऋग्वेदा मध्ये अनेक ठिकाणी येते. त्याच
मावनवंशाच्या भारतजन असा उल्लेख ऋग्वेदात आला आहे. भरत या संज्ञेचे अनेक प्राचीन सम्राट
पुराणांमध्ये निर्दिष्ट के लेले आढळतात. त्यांपैकी दुष्यंत-शकुं तला यांचा पुत्र भरत हा सम्राट होऊन त्याच्या
वंशालाही भरत ही संज्ञा होती. त्याच्याच वंशातील कौरव-पांडव हे होत. त्यांच्या युद्धाची कथा म्हणजे
भारत किं वा महाभारत होय. दुष्यंतपुत्र भरताच्या कु लात जन्मलेल्या कु रू राजाचे हस्तिनापूर येथील वंशज
म्हणजे कौरव आणि पांडव होत. या वीरांची जन्मापासून अखेरपर्यंतची महाभारत ही कथा वीरगाथाच
होय. ही वीरगाथा संबंध महाभारताचा गाभा होय.

या ग्रंथाला जय, भारत आणि महाभारत अशा तीन संज्ञा दिलेल्या ग्रंथातच आढळतात. या ग्रंथाच्या प्रारंभी
जो मंगलाचरणाचा श्लोक आहे त्यातच या ग्रंथाचे जय हे नाव आले आहे.

नारायणं नमस्कृ त्य नरं चैव नरोत्तमम् ।


देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ।।

‘नारायण आणि त्याचप्रमाणे नरोत्तम नर यांना तसेच देवी सरस्वतीला नमस्कार करून त्यानंतर जय
ग्रंथाचे पठन करावे’.

प्रारंभीच निर्दिष्ट के ल्याप्रमाणे पाणिनीच्या सूत्रांवरून असे लक्षात येते की, महाभारत हे नाव प्रथमपासूनच
प्राप्त झालेले असावे भारत ह्या ग्रंथाचा बराच विस्तार कालांतराने झाल्यानंतर महाभारत हे नाव प्राप्त
झाले नसावे कारण महान हे विशेषण भारतसंग्रामाचे विशेषण आहे आणि तो संग्राम महासर्वसंहारक
होता, ही गोष्ठ लक्षात घेऊन विकल्पाने भारत किं वा महाभारत असे त्या संग्रामाला प्रथमपासूनच म्हणत
असावेत. परंतु यासंबंधी निश्चित असे काहीच सांगता येत नाही कारण वारंवार भर पडत गेली त्यामुळे
ग्रंथाची श्लोकसंख्या वाढली. ग्रंथाचा भार मोठा झाला म्हणून त्याला महाभारत म्हणतात असे
आदिपर्वातच म्हटले आहे. आश्वलायन गृह्यसूत्रातील ऋषितर्पणात चार व्यासशिष्य यांचा निर्देश
आल्यानंतर (भारत महाभारताचार्यः) भारताचार्य व महाभारताचार्य असे वेगवेगळे निर्देश येतात.
महाभारताचे क्रमाने तीन संस्कार झाले, याची नोंद महाभारतातच आहे. कृ ष्णद्वैपायनांनी शिष्य वैशंपायन
यांना हा इतिहास पढविला वैशंपायन ऋषींनी पांडवांचा उत्तराधिकारी राजा परिक्षित याचा पुत्र जनमेजय
याला त्याने आरंभिलेल्या सर्पसत्राच्या वेळी ही भारतकथा सांगितली त्यावेळी सूत लोमहर्षण याचा पुत्र
उग्रश्रवा हा उपस्थित होता. राजांच्या, ऋषींच्या, देवासुर, राक्षस, यक्षादिकांच्या व त्यांच्या वंशांच्या कथा,
वीरकथा, इतर धार्मिक आणि ऐहिक घटनांच्या कथा, विश्वोत्पत्ती व विश्वरचना यांची वर्णने वा पुराणे
रचण्याचा व सांगण्याचा व्यवसाय वंशपरंपरेने करीत असलेल्या जमातीला किं वा अशा एका संकर जातीला
‘सूत’ ही संज्ञा होती. भृगुकु लोत्पन्न शौनक ऋषींनी नैमिषारण्यात आरंभिलेल्या द्वादश वार्षिक सत्राच्या
समारंभात उपस्थित असलेल्या ऋषींच्या विनंतीवरून महाभारत त्या सत्रात उग्रश्रव्याने सांगितले. तात्पर्य,
एकं दर तिघांचे संस्कार होऊन हा ग्रंथ वाढत गेला. या ग्रंथातच पहिल्या अध्यायात म्हटले आहे की,
मनूच्या निर्देशापासून भारत ग्रंथ सुरू होतो, असे काही म्हणतात. आस्तिक ऋषीची कथा असलेल्या
उपपर्वापासून (भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थाप्रत आदिपर्व अध्याय−४−५३) हा ग्रंथ सुरू होतो असे
कित्येकांचे मत आहे. उपरिचर राजाच्या कथेपासून (आदिपर्व अध्याय ५७) ग्रंथ सुरू होतो असे कित्येक
मानतात. आस्तिक उपपर्वाच्या अखेरीस (आदिपर्व अध्याय ५३) शौनक ऋषी सूत उग्रश्रवा याला म्हणतात
की, कृ ष्णद्वैपायनांनी सांगितलेले महाभारत आख्यान मी ऐकू इच्छितो. तेव्हा सूत त्याला सांगतो की, हे
मोठे आख्यान महाभारत पहिल्यापासून आता तुला सांगतो. त्यानंतर आदिवंशावतरण हे उपपर्व येते. त्या
उपपर्वातील पहिल्या छोट्याशा दोन अध्यायांत (अ. ५४–श्लोक-२४ अ ५५−श्लोक− ४३) महाभारत हे
आख्यान वैशंपायनांनी जनमेजयाला संक्षेपाने (समासेन) सांगितले. तेव्हा जनमेजय म्हणतो, हे आख्यान
मला विस्ताराने सांगा मला एवढ्यात समाधान नाही. जनमेजयाला वैशंपायनांनी महाभारत आख्यान प्रथम
अगदी संक्षेपाने सांगितले आणि मग पुन्हा तेच आख्यान विस्ताराने सांगण्यास सुरूवात के ली. तेव्हा
वैशंपायन प्रस्तावनेत म्हणतात–हे महाभारत –आख्यान शत सहस्त्र श्लोकांचे म्हणजे लक्ष श्लोकांचे,
सत्यवतीचा पुत्र व्यास याने सांगितले आहे हा जय नावाचा इतिहास आहे हे अर्थशास्त्र, धर्मशास्त्र आणि
मोक्षशास्त्र आहे याला महाभारत म्हणतात. याचे कारण भरतवंशीय लोकांचा महान जन्म म्हणजे त्यांचे
महान जीवन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्यांविषयी ह्यात जे सांगितले आहे तेच अन्यत्र
सांगितलेले असते. जे येथे सांगितले नाही ते कोठे ही मिळायचे नाही (आदिपर्व अध्याय ५६). या ठिकाणी
हा महाभारत ग्रंथ लक्ष श्लोकात्मक आहे असे म्हटले परंतु आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायात (श्लोक−६१)
म्हटले आहे की, २४ सहस्त्र श्लोकांची ही भारतसंहिता, उपाख्याने वगळून, कृ ष्णद्वैपायन व्यासांनी तयार
के ली. तेवढ्याला भारत असे विद्वान लोक म्हणतात. कौरव-पांडवांच्या पूर्वजांची कथा धरून कौरव−
पांडवांच्या प्रारंभापासून अखेरपर्यंतच्या जीवनाच्या कथेचा गाभा आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत
सापडतो. परंतु आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्वापर्यंत अनेक आख्याने व उपाख्याने मधूनमधून भरण्यात
आली आहेत. त्यांतील काही मूळ कथेशी जुळणारी आहेत काही जुळवून घेतली आहेत काही आडवळणी व
विसंगत आहेत. पहिले दोन अध्याय वगळून आदिपर्वाच्या प्रारंभी, भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन संस्थेने
प्रसिद्ध के लेल्या चिकित्सक आवृत्तीच्या अनुसाराने, पहिल्या ५३ अध्यायांमध्ये कौरव- पांडवांच्या कथेशी
संबंध नसलेल्या निराळ्याच कथा भरलेल्या आहेत.

ययाती व देवयानी यांची कथा अखेरीस वैराग्यकाव्य बनले आहे. मुळात प्रथम तसे नसेल. नल-दमयंती
आख्यान हे स्वतंत्र महाकाव्य जागतिक वाङ्मयात प्रतिष्ठा पावलेले आहे ते या ग्रंथात मागाहून
सामाविष्ट के लेले दिसते. सावित्री−सत्यवान यांची भव्योदात्त कथा अशीच मागाहून अन्तर्भूत के लेली
दिसते. कद्रू आणि विनता यांचे आख्यान, एक विशाल असे निसर्गसृष्टीचे रूपक आहे कद्रू म्हणजे पृथ्वी,
तिचे पुत्र सर्प विनता म्हणजे नभोमंडल, कढईसारखे बाक असलेले नभोमंडलाचा पुत्र गरूड आकाशात
भराऱ्या मारणारा. नाग व गरूड यांची कथा, भृगुवंशाची व विशेषतः च्यवन व सुकन्या यांची कथा, मनू
आणि मासा यांची कथा, भार्गव परशुराम कथा, रामकथा, कार्तवीर्यार्जुन कथा, वसिष्ठ-विश्वामित्र कथा अशी
पुष्कळ आख्याने-उपाख्याने काही जुळणारी, काही जुळवून घेतलेली व काही तशीच या ग्रंथात भरली
आहेत. म्हणून भारतीय साहित्याचा इतिहास लिहिणारे जर्मन पंडित विंटरनिट्‌झ महाभारताला अनेक
ग्रंथांचा संग्रह म्हणून निर्दिष्ट करतात. काही आख्याने आणि उपाख्याने मूळ गाभ्याशी अधिक जुळणारी
अशी दिसतात. उदा., वनपर्वातील अजगर होऊन पडलेला राजा नहुष आणि युधिष्ठिर यांचा संवाद किं वा
यक्षयुद्धिष्ठिर संवाद, भीष्मपर्वातील भगवद्‌गीता मूळ कथानकाशी, तिचा सारांश लक्षात घेता सुसंगत
दिसते परंतु दोन्ही बाजूंची सैन्ये एकमेकांशी भिडली असता. शस्त्रसंपात प्रवृत्त झाला असताना इतकी
दीर्घकाळ तत्त्वचर्चा चाललेली विसंगत वाटते.
परंतु या महाभारताख्यानाच्या संदर्भात प्राचीन भारतीय संस्कृ तीचा वैचारिक परमोत्कर्ष म्हणजे
भगवद्‌गीता होय, असे म्हणता येते. विश्वसाहित्यातील तिचे उच्चच स्थान निर्विवादपणे आज मान्य झाले
आहे. विश्वव्यापी विनाशाच्या अपरिहार्य परिणतीच्या दर्शनाने मानवी मन गलितधैर्य बनता कामा नये
तटस्थ, अलिप्त, शांत, तत्त्वदर्शी प्रज्ञेच्या सामर्थाने प्रपंचात मानवाने टिकले पाहिले, असा संदेश गीता देते.
मानवी जीवनाचा अर्थ अनंत व अगाध विश्वाच्या म्हणजे विश्वरूपदर्शनाच्या संदर्भात लक्षात घेऊन
गीतेने हा संदेश दिला आहे. महाभारतसंग्रामाचा तो ध्वनितार्थ आहे. वासुदेव कृ ष्ण हा पुरूषोत्तम, प्रत्यक्ष
विष्णूच भगवद्गीतेचा उपदेष्टा आहे. मूलतः महाभारत हा वासुदेव भक्तिसंप्रदायातला ग्रंथ आहे परंतु
त्यात अर्जुनाला पाशुपत अस्त्र देणारा पशुपती शिवही मधूनमधून प्रकट होतो देवीही एखाद्या वेळी
झळकते. हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांना मान्य असा हा ग्रंथ आहे. मुख्यतः हे महाकाव्य आहे. या
महाकाव्यामध्ये धीरोदात्त पुरूष आणि महनीय महिला यांचे जीवन हे कें द्रस्थानी आहे. अद्‌भूत
कथानकांच्या स्वरूपात दडलेल्या अतिप्राचीन इतिहास त्यांत सूचित के ला आहे. राजनीती, धर्मशास्त्र आणि
तत्त्वज्ञान त्याचप्रमाणे तीर्थकथांच्या संदर्भांतील धार्मिक कर्मकांड यांचाही ऊहापोह यात के लेला आहे.
कमीत कमी दोन सहस्त्र वर्षे मान्य झालेला हा ग्रंथ आहे.

हा भारत संग्राम के व्हा घडू न आला याच्याबद्दल निर्विवाद निर्णय करण्याइतपत पुरावा अजून मिळालेला
नाही. हल्ली रूढ असलेल्या हिंदूंच्या पौराणीक युगगणनेच्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे कलियुगाच्या प्रारंभी
भारत संग्राम घडू न आला, असे चिंतामण विनायक वैद्य इत्यादी विद्वानांचे मत आहे कलियुग हे इ. स.
पूर्व ३१०१ या वर्षी लागले म्हणून तोच भारत−युद्धाचा काळ ते ठरवितात. काही अन्य संशोधक आपापल्या
कल्पनेप्रमाणे इ. स. पू. बाराव्या शतकापासून नवव्या शतकाच्या कालावधीत निरनिराळ्या कालविभागांत
भारतीय युद्ध झाले. असे मानतात. नागपूरचे डॉ. के . ल. दप्तरी हे महाभारतातील युद्धकाल निर्णय या
निबंधात इ. स. पू. ११९७ (शकपूर्व १२७५.३) हे साल भारतीय युद्धाचा काल ठरवतात. इ. स. पू. पाचवे शतक
हा साधारणपणे पाणिनीचा काळ धरतात. पाणिनीच्या वेळी महाभारत ही संज्ञा रूढ झाली होती. सध्याचे
लक्ष श्लोकात्मक महाभारत इ. स. च्या पहिल्या शतकात बहुतेक असावे असे त्या वेळच्या एका ग्रीक
प्रवाशाच्या नोंदीवरून मानता येते. हा लक्ष श्लोकात्मक ग्रंथ गुप्तकाली म्हणजे इ. स. पाचव्या शतकात
उपलब्ध होता, याबद्दल मात्र शंका राहत नाही.

महाभारताच्या अनेक पाठावृत्त्या हिंदुस्थानच्या निरनिराळ्या लिपींमध्ये भिन्नभिन्न प्रदेशांत मान्यता


पावलेल्या आढळतात. त्यांच्यामध्ये मजकू र पुढचा मागे व मागचा पुढे झालेला दिसतो. अनेक अध्याय वा
श्लोक कमीजास्त आहेत. सु. १२ हजार श्लोकसंख्यांचा फरक आढळतो. उदा., कुं भकोणम प्रत. मजकु राची
विसंगती अनेक ठिकाणी दिसते. उदा., जतुगृहदाह उपपर्व. त्या सगळ्या पाठावृत्त्या तपासून कोणती
पाठीवृत्ती सगळ्यांत प्राचीन असावी, हे निश्चित करून व चिकित्सक पाठावृत्ती संपादून प्रकाशित
करण्याकरिता पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्यामंदिराने डॉ. व्ही. एस्. सुकथनकर यांच्या नेतृत्वाखाली
संपादन कार्यालय स्थापित के ले. चिकित्सक आवृत्ती संपादून सु. ४० वर्षांत निर्माण के ली. जुन्यातली जुनी
चिकित्सक पाठावृत्ती आता वाचकांच्या हाती पडली आहे. या संपादकांनी आज ज्या अनेक पाठावृत्त्या
उपलब्ध आहेत, त्यांचे विभाजन उत्तर भारतीय पाठावृत्त्या व दक्षिण भारतीय पाठावृत्त्या अशा दोन
वर्गांत के ले. उत्तर भारतीय पाठावृत्त्या शारदा (काश्मीरी), नेपाळी, मैथिली, बंगाली व देवनागरी या पाच
लिप्यांमध्ये आणि दक्षिण भारतीय पाठावृत्त्या तेलुगू, ग्रंथ, मलयाळम् आणि देवनागरी लिपींमध्ये उपलब्ध
आहेत. त्या सगळ्या तपासून ही चिकित्सक पाठावृत्ती प्रकाशित के ली आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या सर्व पाठावृत्त्यांमधील महाभारताची एकं दर १८ पर्वे आहेत. पर्व म्हणजे विभाग.
हरिवंश हे खिल, १९ वे पर्व. प्रत्येक पर्वात अनेक उपपर्वे, उपपर्वे अध्यायांमध्ये आणि अध्याय श्लोकांमध्ये
अशी रचना आहे. क्वचित काही अध्याय हे गद्यरूप आहेत. सामान्यतः सर्व १८ पर्वांची शीर्षके लक्षात
घेतली, तर ती सर्व शीर्षके क्रमाने विकास पावणाऱ्या कथेची विषयदर्शक शीर्षके आहेत, ही गोष्ठ
वाचकांच्या ध्यानात भरते. (१) आदिपर्व, (२) सभापर्व, (३) वनपर्व, (४) विराटपर्व, (५) उद्योग पर्व, (६) भीष्म
पर्व, (७) द्रोण पर्व, (८) कर्ण पर्व, (९) शल्य पर्व, (१०) सौप्तिक पर्व, (११) स्त्री पर्व, (१२) शांती पर्व, (१३)
अनुशासन पर्व, (१४) आश्वमेधिक पर्व, (१५) आश्रमवासिक पर्व, (१६) मौसल पर्व, (१७) महाप्रस्थानिक पर्व,
(१८) स्वर्गारोहण पर्व. हरिवंश हे पर्व खिल म्हणजे परिशिष्ट किं वा मागून जोडलेले एकोणिसावे पर्व होय.
प्रत्यक्ष महाभारतात कृ ष्णकथा नाही. ती कथा विस्ताराने हरिवंशात सांगितली आहे.

महाभारताची रचना किं वा महाभारताची निरनिराळ्या वेळी झालेली संस्करणे म्हणजे व्यासांची रचना,
त्यावरील वैशंपायनांचा संस्कार आणि त्यानंतर सूत उग्रश्रव्याने के लेला संस्कार एवढ्यावरच महाभारताची
संस्करणे थांबली नाहीत. भृगुकु लातील ऋषींनीही महाभारतावर नंतर के लेला संस्कार स्पष्ट दिसतो. या
गोष्टीकडे व्ही. एस्. सुकथनकर यांनी चिकित्सकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भृगुकु लातील सर्वांत प्रख्यात
पुरूष म्हणजे परशुराम किं वा भार्गवराम होय. याच्या अनेक कथा या ग्रंथात गोवल्या आहेत.
आदिपर्वातल्या पौलोम व पौष्य या उपपर्वातील अधिकांश भाग भृगुवंशीयांच्या कथांनी भरलेला आहे.
वस्तुतः भार्गवरामाच्या कथा किं वा रुरू आणि च्यवनऋषीची कथा वगळली असती, तरी या भारत कथेत
अपूर्णता दिसली नसती. भरतवंशाची कथा सुरू होण्याच्या अगोदरच भार्गव वंशाची कथा सुरू होते. हे
एकापरी विसंगत व विचित्र दिसते.

You might also like