You are on page 1of 340

फॅन्ड्री - एक अ भजात सनेमा

-:: मतेश ताके :: -


मनोगत
नागराज मंजुळे यांच्या २०१४ साली प्रद शर्श्वत झालेल्या या मराठी सनेमाने
इ तहास घडवला. राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावर या सनेमाचे खूप कौतुक
झाले. हा माझा सगळ्यात आवडता सनेमा आहे .

मी एक सनेमाचा वद्याथर्णी आहे . वद्या यार्श्वच्या नजरे तून काही


नरीक्षण- ढोबळ आ ण सूक्ष्म (macro & micro) येथे मांडत आहे .
आता हे माझे आकलन आहे , चुकीचे वाटले तर दुरुस्त करा. माझे
ज्ञान/समज वाढे ल. या सनेमातील मला वशेष जाणवलेली एक एक फ्रेम
क्रमशः घेतली आहे आ ण त्या फ्रेमशी संबं धत प्रसंगाचे माझे आकलन मी
मांडले आहे .
मी हा अभ्यास का करतोय?
मला सने दग्दशर्श्वक व्हायचे आहे . त्यासाठी मी नागराज यांच्या सनेमांचा
त्या दृष्टीकोनातून अभ्यास करतो आहे . त्यांची दग्दशर्श्वनाची शैली
समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे . इंिग्लशमध्ये डको डंग म्हणतात
तसे करतो आहे .

पुढे मी जी मांडणी केली आहे , हे परीक्षण नसून व लेषण आहे . एक एक


फ्रेम घेऊन मी त्या फ्रेममधील प्रत्येक गोष्टीला का? वचारून त्या ‘का’चे
उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे . सापडलेली काही उत्तरे इथे सादर
करीत आहे .
#फँड्रीअभ्यास - 1
नायकाच्या आगमनाची फ्रेम

1. नायकाचे डावीकडे - नकारात्मक बाजूकडे तोंड आहे .

2. कमी नोजरूम आहे म्हणजे अडकलेला !


#फँड्रीअभ्यास - 2
नायकाला हवा असलेला पक्षी झाडावर आहे आ ण नायक झाडाच्या
मुळाजवळ !

रूपक छान आहे - बरे च अथर्श्व नघू शकतात !

मला यात नायकाचे ध्येय आ ण नायक यातील अंतर दसते आहे !


#फँड्रीअभ्यास - 3
फल्ममध्ये सुरवातीपासून, सारखे सारखे बाभळीचे झाड येत राहते आ ण
नायकाच्या काटे री जीवनाची आठवण करून दे त राहते !
#फँड्रीअभ्यास - 4
1. वडील डावीकडे (नकारात्मक बाजू ) आ ण आई उजवीकडे (सकारात्मक
बाजू) आहे !

2. आई व डलांशी बोलताना जब्याच्या चेहऱ्यावर आईच्या बाजूला प्रकाश


आ ण व डलांच्या बाजूला अंधार आहे !

3. तो फ्रेमच्या डाव्या बाजूला म्हणजे नकारात्मक बाजूला आहे .


#फँड्रीअभ्यास - 5
आखून दलेल्या चौकटीतच प्रत्येकाने जगायचे आहे ! असा अथर्श्व
दग्दशर्श्वकाला इथे अ भप्रेत असेल का ?

या फ्रेम मध्ये काम्पोिजशन आ ण ग्रामर पहा -

नायक महत्वाचा आहे त्यामुळे तो सगळ्यात पुढे आ ण सवार्श्वत मोठा


दसेल अशा ठकाणी उभा केलाय. कॅमेरा अँगल पण त्याला पूरक आहे .

नायक मागे कोपऱ्यात दाखवला असता तर ?


#फँड्रीअभ्यास - 6
प्रत्येक छोट्या छोट्या पात्रांचे व्यिक्तमत्व आपल्यापयर्यंत ठसठशीतपणे
पोहचेल असे संवाद, भाषा, कपडे, वातावरण, प्रसंग आ ण मुख्य म्हणजे
डायलॉग म्हणतानाचा बझनेस (कृ ती/हालचाल), दग्दशर्श्वकाने पात्रांना
दलेला आहे .

येथे पराजीची आई बोलता बोलता शेळीचे दूध काढायला सुरवात करते !


त्याला पूरक असे सभोवतालचे वातावरण आहे !

यातून तच्या प रिस्थतीचा एकंदर अंदाज लगेच येतो !


#फँड्रीअभ्यास - 7
1. या सनेमातील रऍक्शन शॉट्स खूपच सुंदर आहे त.

या प्रसंगात नायक पराजीच्या आईला घरात जाऊ दे तो, तोपयर्यंत त्याचे


डोळे तला फॉलो करतात. ती घरात गेल्यावरच तो पराजी बरोबर त्याचे
गु पत बोलतो.

2. जब्याच्या मागे ठे वलेल्या पाटा वरवंटाची पण नोंद घ्या !


#फँड्रीअभ्यास - 8
1. घराच्या बाहे र जे चत्र/मुत्यार्श्व लावलेल्या आहे त. त्या पण, खूप काही
सांगून जातात.

या दृष्यात घराच्या दारावर बुध्द आ ण आंबेडकर यांच्या तस बरी आहे त.

नायकाच्या डोक्यावर नळा झेंडा लटकतो आहे . आटर्श्व डरे क्शन !

2. दारात बकऱ्या, घरात मांजर या गोष्टी पण काही सांगतात. काय आहे


बरे ते ?
#फँड्रीअभ्यास - 9
1. या प्रसंगात कुलकणर्णी काकू धान्य नवडताना दाखवलेल्या आहे त
आ ण त्याच वेळी जब्याचा उल्लेख कैकाड्याचं पोरगं असा करतात.

या ठकाणी त्यांना हाच बझनेस का दला आहे ? जब्याचा असा उल्लेख


करणे आ ण धान्य नवडणे यातील नाते लक्षात घ्या !

2. तसेच त्यांच्या दाराशेजारी गणपतीचे चत्र आहे याची पण नोंद घ्या !


#फँड्रीअभ्यास - 10
येथे कम्पाउण्ड मध्ये प्रवेश नसलेला जब्या त्याच्या वगर्श्व मत्राचा उल्लेख
वेदांत असा करतो तर घरात प्रवेश असलेला दुसरा मत्र त्याचा उल्लेख
वेदया असा करतो.
#फँड्रीअभ्यास - 11
येथे व डलांना कुठलाही डायलॉग नाही फक्त त्यांची नजर बोलते !
#फँड्रीअभ्यास - 12
जब्या कंपाउं डच्या बाहे र आ ण कुलकणर्णी कंपाउं डच्या आत ! दोघांमध्ये
कंु पण आहे !
#फँड्रीअभ्यास - 13
जब्याच्या घरात घरातील पुरुषमंडळी ‘वर’ खाटे वर झोपतात तर म हला
आ ण मुले ‘खाली’ ज मनीवर झोपतात.
#फँड्रीअभ्यास - 14
जब्या आईवर ओरडतो हा प्रसंग - ग्रामर

जब्या फ्रेम मध्ये मोठा आ ण वरच्या पातळीला आहे तर आई छोटी आ ण


खालच्या पातळीला आहे .
#फँड्रीअभ्यास - 15
दुकान मालकाचे नाव चंके वर साठे दाखवले आहे , पण लगेच पुढच्या फ्रेम
मध्ये अण्णाभाऊ साठे दाखवले आहे त ! म्हणजे हे साठे इतर साठे नाहीत,
अण्णाभाऊ वाले साठे आहे त !
#फँड्रीअभ्यास - 16
1. चंक्याच्या दुकानात दे वदे वतांच्या फोटोवरील फळीवर काही ट्रॉफीज
ठे वलेल्या आहे त. त्यात चंक्या वषयक खूप शक्यता पेरलेल्या आहे त !

2. भंतीवर त्याचा बायकोसह फोटो आहे . (नंतर सनेमात उल्लेख येतो -


चंक्याची बायको खूप सुंदर होती !)

आटर्श्व डरे क्टरचे कौतुक !


#फँड्रीअभ्यास - 17
कती बारीक बारीक गोष्टींचा वचार केलाय त्याचा हा नमुना ! साधा
रस्त्याने जाणारा इसम, पण त्याचे कपडे, त्याला दलेली मश्रीने दात
घासायची कृ ती, प्रात वर्श्वधीसाठी त्याचे घराबाहे र जाणे - अस्सल ग्रामीण
वातावरण, खरीखुरी सकाळ !
#फँड्रीअभ्यास - 18
चंक्याच्या दुकाना बाहे रील भंतीवरील लखाण -

‘हवा फ्री असली तरी भरायचे पैसे घेतले जातील !’

चंक्या अव लया आहे हे वशद करणारे आटर्श्व डरे क्शन !


#फँड्रीअभ्यास - 19
इथे पण जब्याचा रऍक्शन शॉट लाजवाब आहे . जब्या ना यकेकडे पाहत
असतो, तची आई तथे घराबाहे र येत,े तो लगेच नजर झुकवतो. यातून
भीती छान व्यक्त झाली आहे .
#फँड्रीअभ्यास - 20
चंक्याच्या दुकानातील कॅरम बोडर्श्व वरील एका कोपऱ्यावर बारीक अक्षरात
दुकानाचे नाव आ शकी ल हलेले आहे . हे फक्त काही सेकंद दसते.
डटे लंगसाठी कष्ट करणाऱ्या आटर्श्व डरे क्टरचे कौतुक !
#फँड्रीअभ्यास - 21
'राणी घेताना माझा हात थर थरायला लागतो!' हा डायलॉग जब्याच्या लव
गुरूच्या तोंडी आहे आ ण तथेच ना यकेकडे पाहताना जब्याच्या मनात
थर थर चालू आहे .
#फँड्रीअभ्यास - 22
पाटलाचे पोर मोटरसायकलवर शाळे त जाते तर जब्या पायी पायी ! आहे रे
वरुध्द नाही रे !!
#फँड्रीअभ्यास - 23
इथे दुकानाच्या ओट्याच्या खाली दुधाच्या दोन कटल्या का ठे वलेल्या
असतील ?

कॅरम खेळायला आलेल्या पैकी कुणीतरी गावात डेअरी मध्ये दूध


घालायला आला आ ण आता इथेच बसला आहे . डटे लंग !
#फँड्रीअभ्यास - 24
वगार्श्वतील एका वद्या यार्श्वचे नाव - वेदांत रामकृ ष्ण कुलकणर्णी

जब्याचे नाव - जांबुवंत कचरू माने

जब्याचे नाव जांबुवंत आहे हे इथे प हल्यांदा कळते आ ण पूणर्श्व फल्म


मध्ये याचा अजून फक्त एकदाच उल्लेख होतो !

1. नाव आडनाव पण वगर्श्ववाचक असतात !

2. वगार्श्वत कुलकणर्णी पुढे बसतो तर माने मागे !


#फँड्रीअभ्यास - 25
पूणर्श्व झालेल्या गृहपाठाची वही जब्या जमा करतो. या छोट्या कृ तीतून
जब्याचे पात्र हे शक्षणवेडे आहे हे दाखवलेले आहे . दोन तीन दवस शाळे त
येऊ शकला नाही, रात्री जागून चमणीच्या उजेडात त्याने गृहपाठ पूणर्श्व
केला, हे हा प्रसंग सांगतो.

मागे भंतीवर पवळ्या काडर्श्वशीटवर जे वद्या यार्यंचे मं त्रमंडळ आहे , त्यात


जब्या पऱ्याला स्थान नाही .
#फँड्रीअभ्यास - 26
स्था नक राजकारण्यांची मुले वगार्श्वत मुजोरी करतात आ ण शक्षक
त्याच्या वरोधात कडक भू मका घेऊ शकत नाहीत. कारण त्यांचे पालक
शाळाचालक कं वा शाळाचालकाशी संबं धत असतात.
#फँड्रीअभ्यास - 27
फळ्यावर सवार्श्वत वरती सु वचार ल हलेला आहे - नाही नमर्श्वळ मन काय
करील साबण !

हा सवार्यंसाठी टोमणा आहे - वद्याथर्णी, शक्षक (जे नंतर डु क्कर शवल्यावर


हसतात) आ ण प्रेक्षक !
#फँड्रीअभ्यास - 28
शक्षक चोखोबांचा अभंग शकवत असतात - रूप, रं ग महत्वाचे नसतात,
गुण महत्वाचे असतात ... ऊस डोंगा पर रस नोहे डोंगा ! काय भुललासी
वर लया रं गा !

त्याच वेळी जब्या ना यकेकडे पण पाहतो ... येथे जब्या, पाटलाचा मुलगा
आ ण ना यका एकाच फ्रेममध्ये आहे त. येथे रॅक फोक संगचा छान
उपयोग केला आहे .

(पाटलाचा मुलगा उं च असूनही, खास या शॉटसाठी त्याला पुढे बसवले


आहे , याची नोंद घ्या !)
#फँड्रीअभ्यास - 29
जब्याची अडाणी आई शाळे त येते तेव्हा शक्षक चोखोबांचा अभंग शकवत
असतात - रूप, रं ग महत्वाचे नसतात, गुण महत्वाचे असतात ... ऊस
डोंगा पर रस नोहे डोंगा ! काय भुललासी वर लया रं गा !

जब्याला आईची लाज वाटते त्याच वेळी तो ना यकेकडे पण पाहतो ...

फ्रेममध्ये आई डावीकडे (नकारात्मक बाजू) आहे तर ना यका उजवीकडे


(सकारात्मक बाजू) ...
#फँड्रीअभ्यास - 30
1. जब्याची अडाणी आई शाळे च्या वगार्श्वत त्याला पाहायला येत.े दोघांमध्ये
मजबूत भंत आहे . ती ‘बाहे र’ तर तो ‘आत’ आहे .

2. आई गजांच्या पलीकडे आहे आ ण मागे सरस्वती दे वी आहे !

3. तेथे दोघांची चुकामुक होत राहते, प्रत्यक्ष सनेमात जीवन जगताना


होते तशी !
#फँड्रीअभ्यास - 31
शाळे च्या दरवाज्यावर मतदान केंद्र असे ल हलेले आहे . डटे लंगसाठी
कष्ट करणाऱ्या आटर्श्व डरे क्टरचे कौतुक !
#फँड्रीअभ्यास - 32
ग्रामीण भागात फावल्या वेळात डोक्यातील उवा काढणे हा एक कायर्श्वक्रम
असतो. अशा अस्सल ग्रामीण गोष्टी या सनेमात कलाकारांना बझनेस
(हालचाल/ कृ ती) दलेल्या आहे त ज्यामुळे सनेमा कुठे च नकली वाटतं
नाही !
#फँड्रीअभ्यास - 33
1. आय पी एल च्या क्रकेट मॅचला जाऊन मोठे पणा सध्द करण्याचे
लोण ग्रामीत भागात पण पोहचले आहे . तसेच मोठ्या शहरांमधून
मा लश केंद्राच्या नावाखाली जे वे या व्यवसाय चालतात. त्या वषयी
ग्रामीण जनतेला उत्सुकता आहे . हे सलूनमधील संवादातून लेखकाने
पोहचवले आहे .
2. तसेच समोर उभ्या असलेल्या बुलेट मोटारसायकल वर शवाजी
महाराज आ ण त्यांच्याशी संबं धत मजकूर आहे याची पण नोंद घ्या -
आटर्श्व डरे क्शन !
#फँड्रीअभ्यास - 34
इथे एका मुलीला डु क्कर शवल्यामुळे ना यका तला अस्पृ य ठरवते.
नय मत डु क्कराला शवणाऱ्या कुटु ं बातील जब्या हे पाहतोय - म्हणजे
ना यकेच्या दृष्टीने तो अस्पृ य आहे . आ ण पा वर्श्वभूमीला डॉ. आंबेडकर
यांचे चत्र आहे ज्यांनी आयुष्यभर अस्पृ यतेची पीडा सहन केलेली आहे .
#फँड्रीअभ्यास - 35
1. डु क्कर शवलं , सांगायला मुली अध्यापक कक्षात येतात तेव्हा शक्षक
अंधारात बसलेले असतात. अंधार = अज्ञान. ते सवर्श्व शक्षक या
प्रकाराला हसतात.
2. मागे तुकाराम महाराजांचे चत्र आहे .
#फँड्रीअभ्यास - 36
डु क्कर (एक जनावर) शवलं म्हणून ना यकेची मैत्रीण घरी येऊन अंघोळ
करते, गोमूत्र (एका जनावराचे मूत्र) अंगावर शंपडू न घेत.े त्याच वेळी
ना यका एका काळ्याच शेळीला (एक जनावर) कुरवाळत असते.
#फँड्रीअभ्यास - 37
गरज नसताना ना यका पण आंनदाने आ ण साित्वक भावनेने एका
जनावराचे मूत्र अंगावर शंपडू न घेते आ ण प वत्र होते.
#फँड्रीअभ्यास - 38
वरच्या पातळीवर चमणीला शवायला गेलेल्या मुलांना आज्जीबाई खाली
(खालच्या पातळीवर) बोलावतात आ ण सांगतात चमणीला शवू नका
ती बामणीन असते तला शवले तर इतर चमण्या आपल्यात घेत नाही.
टोचून टोचून मारतात !
म्हातारी माणसे परं परा पक्की करताना !
आपल्यातील शवा शव आपण पशू पक्षांवर पण लादली आहे .
आधीच्या डु क्कर शवण्याचा प्रसंगानंतर लगेचच हा प्रसंग घेतलेला आहे .
हा क्रम पण महत्वाचा आहे .
#फँड्रीअभ्यास - 38
डु क्कर शवल्यावर त्या मुलीला इतरांनी आपल्या कळपात घेतले नाही.

जब्या जर चमणीला (ना यकेला) शवला तर इतर चमण्या( तचे


जातवाले) तला आपल्या कळपात (जातीत) घेणार तर नाहीतच पण
टोच्या मारून मारून मारतील (ऑनर क लंग) असा अथर्श्व या प्रसंगाचा
आहे .
#फँड्रीअभ्यास - 39
कचरू नेहमी हात जोडू न, हाताची घडी घालून, आदबीने उभा राहतो.

त्याने सवर्श्व गोष्टींचा स्वीकार केलेला आहे , सवर्श्व त्याला मान्य आहे . हे च
यातून दसते.

कचरू म्हणजे केरकचरा हे लक्षात घ्या ! ग्रामीण भागात असे पण नाव


असते !
#फँड्रीअभ्यास - 40
नातू अपारं प रक गोष्ट (सवणर्श्व मुलीवर प्रेम) करण्याचा वचार करतोय,
तर आजोबा पारं प रक, जुनाट गोष्ट वणतोय. परं परा पक्की करतोय.
त्यामुळे आजोबाला नातवाचे बोलणे कळत नाही !

या प्रसंगात, चमणी जाळल्यावर राखच होणार हे कटू वास्तव ऐकल्यावर


जब्याचा चेहरा उतारतो आ ण भ वष्याची हंट पण प्रेक्षकांना मळते !
#फँड्रीअभ्यास - 41
भांडणाऱ्या लेकींचे भांडण सोडवायला ना यकेची आई घराबाहे र येते तर
तच्या हातात स्वयंपाकाचं साधन - झारा आहे . म्हणजे स्वयंपाक करता
करता ती बाहे र आली आहे . डटे लंग !

दारावरील गणपतीच्या चत्राची पण नोंद घ्या - आटर्श्व डरे क्शन !


#फँड्रीअभ्यास - 42
जब्याच्या मागे 'लव के चक्करमे' असे स्टॉप रबर आहे !
#फँड्रीअभ्यास - 43
जब्या ना यकेकडे पाहत असतो तेव्हा त्याचा लवगुरु चंक्या दुकानातील
एकाला वचारतो मो हनी वद्या पुस्तक वाचून झाले का?

म्हणजे जब्या पण त्या वद्येचा प्रयोग करू पाहतोय. हे सू चत केले आहे !

तसेच यातून चंक्याचे कॅरॅक्टर खूप मजबुतीने उभे राहते.


#फँड्रीअभ्यास - 44
चंक्याच्या दुकानाच्या दर पत्रकाच्या शेवटी 'हु कुमावरून' असे ल हलेले
आहे .

यावरून असा अथर्श्व मी काढला आहे की चंक्याचे दुकान म्हणजे त्याचे


साम्राज्य आहे , तो स्वयंघो षत सम्राट आहे ! आ ण तथे त्याचा हु कूम
चालतो !
#फँड्रीअभ्यास - 45
नायक पाटलाच्या नजरे ला नजर दे ऊन खड्ड्यातील डु कराचे पल्लू
काढायला नकार दे तो. याचा पाटलाला खूप त्रास होतो.
#फँड्रीअभ्यास - 46
एक म्हातारी कचरूला शव्या दे त,े त्याक्षणी कचरू डोक्यावरील टोपी
काढू न हातात घेतो आ ण ‘रस्ता बदलून’ पटकन तेथून नघून जातो.
डोक्यातील टोपी काढणे = अपमान
#फँड्रीअभ्यास - 47
पळू न पळू न थकलेल्या कचरूचा शटर्श्व मागून घामाने ओला चंब झालेला
आहे . डटे लंग !
#फँड्रीअभ्यास - 48
कचरूच्या मुलाच्या वयाचा इसम त्याचा एकेरी उल्लेख कचऱ्या असा
करतो, यातून कचरूच्या सामािजक स्थानावर दग्दशर्श्वकाने भाष्य केलेले
आहे !
#फँड्रीअभ्यास - 49
उच्चवणर्णीय लो अँगल ने दाखवले आहे त ते भयकारी दसतात, तर द लत
हाय अँगलने उच्च व णर्श्वयांच्या पायाच्या पातळीवर दाखवले आहे , ते छोटे
दसतात.
#फँड्रीअभ्यास - 50
'आला का कुत्री मारून ?,' हे जब्याला कोण वचारते? तर डु क्कर मारून
आलेले त्याचे वडील !

1. भा षक गंमत

2. वरोधाभास
#फँड्रीअभ्यास - 51
इथे नवरदे व व इतर पाहु णे जीप मध्ये येतात. ज्याच्याकडे नवरदे वाचे
कुटु ं ब काम करते अशा मालकाची ही जीप असावी. ग्रामीण भागात अशा
प्रसंगी मालक लोकं मदत करत असतात. जीपही जुनी आहे , त्यात
खचाखच भरून पाहु णे आलेत.

जीपवर ‘महाराष्ट्र’ असे ल हलेले आहे , ग्रामीण भागात ‘महाराष्ट्र शासन’


असे ल हलेल्या गाड्यांचा दबदबा असतो. त्या आकषर्श्वणातून अनेक लोक
गाडीवर ‘महाराष्ट्र’ असे ल हतात.
#फँड्रीअभ्यास - 52
नवरदे वाला आपली लेक पसंद पडू दे - म्हणून दे वाला साकडे घालणारी
आई !

दे व पण पहा कोणकोणते आहे त ते ! अशा घरांमधून तरुपती बालाजी


कधीच सापडणार नाही !
#फँड्रीअभ्यास - 53
कैकाडी असून हे लोकं मराठीत का बोलतात ? असा तकर्श्वशुद्ध प्र न
कुणाला पडला तर काय? लेखकाने याचे पण उत्तर सनेमात दे ऊन ठे वले
आहे .

जब्याच्या ब हणीला जेव्हा पाहु णे पाहायला येतात तेव्हा कचरू सांगतो


की, 'कैकाडी बोलण्याची मुलांना लाज वाटते. त्यामुळे त्यांच्याबरोबर
मराठीतच बोलावे लागते.'

घरातील मोठे अधून मधून आपापसात कैकाडीत बोलताना पण दाखवलेले


आहे त.
#फँड्रीअभ्यास - 54
सनेमात समोर एक घटना घडताना दाखवतात पण बॅकग्राऊंडला
आसपासचा अस्पष्ट आवाज येत राहतो आ ण तो पण प्रेक्षकांना
महत्वपूणर्श्व मा हती (ऑ डयो इन्फॉमर्श्वशन) दे त असतो.

जब्याच्या ब हणीला पाहु णे पाहायला आलेले असतात. त्यासाठी घरात


तचे आवरण्याचे/ नटण्याचे काम चालेले असते. बाहे र अंगणात जब्याचे
वडील पाहु ण्यांबरोबर अंगणात बसून गप्पा मारत असतात. या गप्पांचा-
जब्याच्या व डलांचा - अस्पष्ट आवाज येत असतो आ ण त्यातून
प्रेक्षकांना कळते की कैकाड्याचे एकच घर गावात आहे . ते डु करं पाळत
नाहीत, मात्र गावात डु करं आहे . इ.
#फँड्रीअभ्यास - 54
एवढा गुढघा दुखत असताना नेमकं यानांचं का डु क्कर धरायला सांगतात
याचाही या संवादातून उलगडा होतो !
#फँड्रीअभ्यास - 55
समोर जब्याच्या ब हणीचे लग्न ठरत आहे पण तो त्यातून अ लप्त आहे .
घरच्या लोकांना तो कमी लेखतो आहे , त्यांची त्याला लाज वाटते आहे
(त्याचे वडील तथे तसा उल्लेख ही करतात). त्यामुळे तो समोरच्या
कोंडाळ्या बाहे र, मागे अ लप्त बसला आहे . त्याला स्वतःला उच्च
व णर्श्वयांचा भाग व्हायचे आहे . हे त्याच्या ऊंच ठकाणी बसण्यावरून सू चत
होते.
#फँड्रीअभ्यास - 56
या सनेमातील काही काही रऍक्शन शॉट लाजवाब आहे त. त्यापैकीच हा
एक !

बाहे र अंगणात धाकट्या ब हणीचे लग्न जमते आहे . नवऱ्याने टाकून


दलेली ( कं वा वधवा झालेली ) मोठी बहीण घरात बसलेली आहे . तेव्हाचा
तचा हा रऍक्शन शॉट !

तच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहे त ! काय वचार चालले


असतील तच्या डोक्यात ?
#फँड्रीअभ्यास - 57
पाहु ण्यांना चहा द्यायला घरातील तमाम भांडी वापरली आहे त.

भांड्याची कमतरता = ग रबी. आटर्श्व डायरे क्टरचे कौतुक करायला हवे.


#फँड्रीअभ्यास - 58
समोर जब्याच्या ब हणीचे लग्न ठरत आहे , पण ते त्याच्या भाव व वाचा
भाग नाही. तो त्यातून अ लप्त आहे . त्यामुळे तो तेथे थोडा वेळ बाजूला
बसून तऱ्हाइतपणे बघत राहतो आ ण शेवटी उठू न मस्त आळस दे ऊन,
तेथून नघून जातो.
#फँड्रीअभ्यास - 59
जाती व्यवस्थेने तयार झालेल्या खोल अंधाऱ्या व हरीत नाकातोंडात
पाणी जाऊन गटांगळ्या खाणारा जब्या !
#फँड्रीअभ्यास - 60
गोष्ट छोटी आहे पण मामर्णीक आहे . मत्र शव्या दे तो तर जब्या त्याला
रागावतो, का? कारण जब्याला ज्या वगार्श्वचा भाग व्हायचे आहे , तो वगर्श्व
सभ्य समजला जातो, तेथे जायचे असेल तर शवराळपणाचा त्याग
करायला हवा, असे या प्रसांगावरून दसते !
#फँड्रीअभ्यास - 61
मुलीचे लग्न जमल्यावर कुठलीही आई आनंदनू जाईल पण सुपारी
फोडताना जब्याच्या आईला (नानी) आनंद झालेला दाखवला नाही. याचे
कारण पुढच्या सनमध्ये कळते.

दुसऱ्या दवशी बांधकामावर मजुरी करताना ती आपल्या नवऱ्याला


(कचरूला) म्हणते, ‘नवरदे वाला मुलगी आवडली होती तुम्ही उगीच हुं डा
कबूल केला ! फुकटात लग्न झालं असतं !’

त्यावर तो तला नरुत्तर करतो !


#फँड्रीअभ्यास - 61
हा संवाद होत असताना कचरू फावड्याने समें ट काँक्रीट मक्स करत
असतो, नानीने आणलेल्या रकाम्या टोकरीत काँक्रीट भरतो आ ण तला
ते ओझे (त्याने घेतलेला नणर्श्वय) उचलायला सांगतो, तच्यावर ओरडतो.

ती बचारी कण्हत कंु थत, नवऱ्याने भरलेली जड टोकरी उचलते आ ण


जाते (नवऱ्याचा नणर्श्वय नमूटपणे मान्य करते.)
#फँड्रीअभ्यास - 62
गावकऱ्यांच्या जत्रेच्या वगर्श्वणीच्या म टंगमध्ये एक संवाद - "शेख साहे ब
मागच्यावेळी तुमच्या गल्लीतून अिजबात वगर्श्वणी आली नव्हती बरं का !"

यात नेमके 'शेख' हे च आडनाव का नवडले? दुसरे का नाही नवडले? हे


लक्षात घेण्यासारखे आहे !
#फँड्रीअभ्यास - 63
गाव कारभारात दरवाज्याच्या बाहे र पायताणां शेजारी कचरूची ‘जागा’
आहे .
#फँड्रीअभ्यास - 64
जत्रा म टंगला मोजून दोन म हला आहे त. बहु तक
े त्या ग्रामपंचायत
सदस्य असाव्यात - पुरुषसत्ताक राजकीय व्यवस्था
#फँड्रीअभ्यास - 65
इथे दग्दशर्श्वकाने प्रत्येकाला आपापल्या व्यिक्तमत्वानुसार काम दलेले
आहे . जब्या शक्यतो तुम्हाला पुस्तक वाचतानाच सापडेल ! हु शार
दग्दशर्श्वक अशा छोट छोट्या गोष्टींमधूनच पात्र एस्टॅ िब्लश करत असतात.

डाव्या बाजूला लटकवलेल्या डबड्याची नोंद घ्या ! डटे लंग !


#फँड्रीअभ्यास - 66
चढाचा रस्ता ते चढत आहे त म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवास चढाचा-
अवघड, कष्टदायक आहे .

पेप्सीच्या बॉक्सवर ल हलेले आहे मेहता पेप्सी कोला !

म्हणजे पेप्सीचा कारखाना ‘मेहता’ यांचा आहे !


#फँड्रीअभ्यास - 67
हॅन्डपंपवर ल हलेले आहे पाणी पण्यास योग्य नाही. ते पाणी जब्या पतो
आहे . सामान्य जनतेसाठी अयोग्य असलेल्या गोष्टी यांना चालतात -
चालवून घ्याव्या लागतात !
#फँड्रीअभ्यास - 68
यातील आजोबा फोरग्राउं डला टोपीने वारा घेत आहे त आ ण मागे पऱ्या
पेप्सी वकत आहे .

- म्हं जे आपण हे मान्य करतो, खरोखरच उन्हाळा आहे बरं का ! (त्यांच्या


जीवनात पण !)
#फँड्रीअभ्यास - 69
प्रच लत उच्चवणर्णीय सौंदयार्श्वच्या मापदं डानुसार आपले नाक सुंदर नाही
याची जाणीव होऊन, ते तसे व्हावे म्हणून प्रयत्न करणारा जब्या !
#फँड्रीअभ्यास - 70
या दृ यात जब्याच्या आईची साडी घेण्याची पद्धत, भावमुद्रा आ ण
दे हबोली (बॉडी लँ ग्वेज) पा हल्यावर याला अ भनय म्हणणे अन्याय ठरे ल.
सदर अ भनेत्री सनेमात ‘नानी’ हे पात्र शब्दशः जगली आहे .

खरे तर सवर्श्वच अ भनेते आपापली पात्र जगली आहे त. एकदम नैस गर्श्वक
वाटते. नागराजजी सवर्श्वच सनेमांमध्ये आपल्या अ भनेत्यांकडू न इतके
अफलातून काम कसे करवून घेतात हा माझ्या औत्सुक्याचा वषय आहे !
#फँड्रीअभ्यास - 71
कचरू काम मागत असतो तेव्हा त्याच्या मागून दोन पाण्याचे रकामे ड्रम
घेऊन जाणारी माणसे दसत आहे त. रकामे ड्रम = कामाची कमतरता =
पैशाची कमतरता = मुलीच्या लग्नात अडचण

संपूणर्श्व सनेमाभर पाण्याचे संदभर्श्व येत राहतात.


#फँड्रीअभ्यास - 72
सवणर्श्व मालक वरच्या पातळीवर तर कचरूची जागा खाली !
#फँड्रीअभ्यास - 73
कचरू केलेल्या कामाचे पैसे घेऊन जात आहे . मालकाची पत्नी चहाचा
एकच कप आपल्या पतीसाठी घेऊन येत आहे . याचा अथर्श्व कचरू एक कप
चहाच्या लायकीचा पण नाही.
#फँड्रीअभ्यास - 74
शालेय मुलांना लेझीमच्या नादी लावून दले आहे आ ण श क्षका मागे
नवांत गप्पा मारत आहे त. खूपच स्वाभा वक दाखवले आहे . हा
चत्रकमर्णीच्या सूक्ष्म सामािजक नरीक्षणाचा प रपाक आहे .
#फँड्रीअभ्यास - 75
इथे मात्र जब्या वरच्या पातळीवर आहे . हीच एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे
त्याला शाळे त मान सन्मान मळतो.
#फँड्रीअभ्यास - 76
कचरू सरपंचाकडे पैसे मागायला येतो तो प्रसंग -

1.सरपंचाच्या घरात शवाजी महाराजांचा फोटो म्हणजे सरपंच मराठा


आहे .

2. सरपंच पायाचे नखं काढतोय - नखा एवढे द लतांचे अिस्तत्व आहे !

3. कचरुलाला करकोळ पैसे दे तो - नखा एवढे ! नख काढावे इतक्या


सहजतेने !

4. खांबाला टे कून बसलेल्या माणसाची चप्पल कचरूच्या दशेने आहे !


#फँड्रीअभ्यास - 77
या दृ यात बॅकग्राउं डला छोट्या मुलाचा एकदम बारीक आवाज येत राहतो
आ ण शेवटी ते मूल या फ्रेम मध्ये एकदम कोपऱ्यात दसते ! साउं ड
डझाईन करताना कती सूक्ष्म पातळीवर जाऊन वचार केलेला आहे . हे
लक्षात येत.े
#फँड्रीअभ्यास - 78
प्रेम वषयक चचार्श्व करत असताना दोन्ही मत्रांच्या मध्ये छोटे हरवे झाड
दसते आहे . हरवळ = प्रेम
#फँड्रीअभ्यास - 79
पऱ्याचा हसरा चेहरा अचानक भीतीदायक बनतो आ ण मग हळू च
फ्रेममध्ये भीतीचे कारण - पाटलाचा मुलगा येतो. थेट पाटलाच्या मुलाला
दाखवले असते तर हा प्रसंग सपक वाटला असता, यामुळे रं गत वाढली.
#फँड्रीअभ्यास - 80
पाटलाचा मुलगा गोरा, उं च ( कदा चत नापास झाल्यामुळे या वगार्श्वत
रा हला असेल. त्यामुळे सवार्श्वत 'उं च' !) असून जेव्हा तो जब्या आ ण
पऱ्याला हाकलतो. तेव्हा तो उं चीवर आहे तर जब्या पऱ्या खालच्या
पातळीवर आहे त. प्रत्यक्ष शारी रक हंसा करत नाही, पण हात उगारतो,
काळ्या म्हणतो आ ण हाकलून दे तो. भयंकर मान सक हंसा !
#फँड्रीअभ्यास - 81
प्रयत्न करूनही सायकल स्टँ डवर लावता येत नाही, शेवटी झाडाच्या
आधाराने उभी करावी लागते. कतीही प्रयत्न केला तरी केवळ स्वतःच्या
जीवावर उभे राहता येणार नाही, जीवनात आधार घ्यावाच लागेल.
#फँड्रीअभ्यास - 82
अघोरी वदयेची साधना करणारा चंक्या. त्याचे व्यिक्तमत्व वशद
करणारे दृ य !
#फँड्रीअभ्यास - 83
'आपल्याकडे बंदक
ू पा हजे होती', हातात गलूल/गलोल (पक्षी मारण्याचे
जुनाट साधन) असलेला नायक म्हणतो. मागासलेल्या समाजाला
आधु नक होण्याची गरज वाटते आहे . असे तर दग्दशर्श्वकाला सुचवायचे
नाही ना !
#फँड्रीअभ्यास - 84
1. फोर ग्राऊंडला काटे आहे त म्हणजे या मुलांचे काटे री जीवन ! आ ण
वाकडी वाट !!

2. इथे खूप छोटे छोटे दाखवलेत, कडे मुंग्यांसारखे ! तसेच जीवन


जगताहे त !
#फँड्रीअभ्यास - 85
टन ऐज मध्ये मुलामुलींच्या जोड्यां वषयी, ते कुठे कुठे आ ण कसे कसे
भेटतात, याच्या खूप अफवा त्यांच्यात असतात. इथे होणारी चचार्श्व तशीच
आहे .
#फँड्रीअभ्यास - 86
कचरू रात्री घरी आल्यावर घरातील सवर्श्व झोपलेले आहे त. झोळीत वर नातू
पण झोपलेला दाखवला आहे . डटे लंग !
#फँड्रीअभ्यास - 87
कचरू दारू का पऊन आला ते या दृष्यात कळते ! मुलीच्या लग्नासाठी
पैसे गोळा होत नसल्याने त्याने आपले नैरा य, दुःख ग्लासात बुडवले
आहे .

(सबटायटल मुळे संवाद कळतो)


#फँड्रीअभ्यास - 88
इथे सायकल टे कवून ठे वायची होती, म्हणून त्यासाठी आधीच्या दृ यात
पा वर्श्वभूमी तयार केली. सायकलचा स्टॅ न्ड लागत नाही हे दाखवलेले आहे .
त्यामुळे जब्याने इथे सायकल टे कवून का ठे वली? हा प्र न प्रेक्षकांना पडत
नाही.
#फँड्रीअभ्यास - 89
शो भवंत पक्षी आ ण मासे वक्रीच्या दुकानासमोर ग्राहकाची कोऱ्या नंबर
प्लेटची महागडी मोटरसायकल उभी आहे . तेथे साध्या सायकलवाला
जब्या जातो. अप्राप्य गोष्ट मळवण्याचा प्रयत्न करतोय.
#फँड्रीअभ्यास - 90
रं गीत गोष्ट वकणारा, जब्याच्या काळ्या मागणीला उडवून लावतो .
#फँड्रीअभ्यास - 91
मोठ्या वाहनाने (उच्चवणर्णीय) छोटी सायकल (द लत) चरडली !
स्वप्नांचा चुराडा झाला !
#फँड्रीअभ्यास - 92
जब्या रडतोय आ ण मागे पंजऱ्यात पक्षी फडफड करताहे त.
#फँड्रीअभ्यास - 93
सायकलच्या चेन गाडर्श्ववर ‘आ शकी सायकल’ ल हलेले आहे . सहजासहजी
लक्षात येत नाही. आटर्श्व डरे क्शन डटे लंग !
#फँड्रीअभ्यास - 94
सनेमाभर इतर वेळी पऱ्या खालच्या आ ण जब्या वरच्या पातळीवर
असतो, या रडण्याच्या प्रसंगात मात्र जब्या खालच्या पातळीवर आहे !
#फँड्रीअभ्यास - 95
आपल्या मोडक्या स्वप्नांची ओझी आपणच वाहायची असतात !
#फँड्रीअभ्यास - 96
कचरू हुं ड्याचे पैसे कसे जमा करायचे या कात्रीत सापडलेला आहे ,
त्यासाठी काम पाहत फरतो आहे , फोरग्राउं डला कटर आहे !
#फँड्रीअभ्यास - 97
कचरूच्या घरी तर सायकल नाही, मग तो सायकल वर फरताना कसा
दसतो? असा ता कर्श्वक प्र न कुणाला पडला तर? या प्र नाचे उत्तर इथे
दलेले आहे . कचरू चंक्याकडू न सायकल नेत असतो.
#फँड्रीअभ्यास - 98
जब्या बाजारात डाले, टोपले, झाप ( वणलेल्या टोकाऱ्या) वकत असतो.
तेथे ना यका येते तेव्हा तो एका मोठ्या डाल्या (झाप) खाली लपतो. या
प्रसंगाचे ए ड टंग लाजवाब आहे .
#फँड्रीअभ्यास - 99
उन्हाळा - पाण्याची कमतरता म्हणून आई आ ण मुली पाणी वाहताहे त.
संपूणर्श्व सनेमाभर पाण्याचे संदभर्श्व येत राहतात.

येणाऱ्या पाहु ण्यांसाठी, पावसाळ्यासाठी घर शेकारले जात आहे .


#फँड्रीअभ्यास - 100
जब्या आ ण पऱ्या दोघांच्याही शटर्श्व वर चौकट आहे . ते, काळा पक्षी न
मळण्याच्या चौकटीत अडकलेले आहे त.
#फँड्रीअभ्यास - 101
सनेमाभर जब्या एक टी शटर्श्व वापरतो. त्यावर ल हलेले आहे - क्रां तवीर
लहु जी वस्ताद ग्रुप - यातून दोन चार गोष्टी लक्षात येतात

१. महापुरुष आम्ही जातीपातीत वाटू न घेतलेले आहे त.

२. थेट जातीची लेबल न लावता आम्ही आमची जात महापुरुषांच्या


नावाने मरवतो.

३. जातीय अिस्मतेचा ओघळ पार खालपयर्यंत गेला आहे .

४. त्यांच्यात पण क्रां तवीर, वस्ताद होते आ ण आहे त - त्यापैकी एक


#फँड्रीअभ्यास - 102
व डलांच्या हाती जब्याने ल हलेले प्रेमपत्र सापडते, पण ते न वाचताच
वडील त्याला परत दे तात.

मग आपल्या लक्षात येत,े कचरूला ल हता वाचताच येत नाही - काला


अक्षर भैस बराबर
#फँड्रीअभ्यास - 103
अडाणी वडील जेव्हा जब्याचे प्रेमपत्र पाहतात, तेव्हा समोर काळा कंदील
फोरग्राउं डला दाखवला आहे . म्हणजे त्याचे वडील अडाणी आहे त.
#फँड्रीअभ्यास - 104
जब्या तांब्यात कोळसा टाकून शटर्श्व ला इस्त्री करतो. ना यकेने आपल्याकडे
पाहावे म्हणून, साधनाची कमतरता असताना, क थत मोठ्यांची बरोबरी
करण्याचा अट्टाहास !
#फँड्रीअभ्यास - 105
कचरू दे वळात दाखवलाच नाही. बाहे रच दाखवला आहे . एकदा दे वळाच्या
दारातून त्याला कामा न मत्त परत पाठवले जाते तर दुसऱ्या एका दृ यात
पालखी नघते तेव्हा लगेचच तो दे वळाबाहे र दे वळाच्या दारातच
पालखीच्या पाया पडताना दाखवला आहे .
#फँड्रीअभ्यास - 106
रस्त्यावर, वेशीवर यात्रेदरम्यान पाटील आ ण सरपंच यांचे फोटो असलेले
बॅनर ओझरते दसतात. डटे लंगचे कौतुक करायला हवे.
#फँड्रीअभ्यास - 107
गरीब फुगे वक्याचा एक फुगा दादा पाटील इथे टाचणीने फोडतो या
दृ यातून दग्दशर्श्वकाने ‘पाटलाचा मुलगा आ ण त्याचा गॉडफादर सॅडीस्ट,
वध्वंसक आहे ’, हे सां गतले आहे .
#फँड्रीअभ्यास - 108
यात्रेत पाटलाचा मुलगा आ ण त्याचा गॉडफादर जवळू न गेले तरी जब्या,
पऱ्या कोमेजतात - दहशत ! सूक्ष्म हालचालीतून दाखवले आहे .
#फँड्रीअभ्यास - 109
या दृ यात, जब्याचा आवाज बॅकग्राऊंडला आहे , त्यात तो त्याचे चठ्ठीत
ल हलेले प्रेम व्यक्त करतोय आ ण ना यकेच्या आसपास साबणाचे फुगे
आहे त. ती पण साबणाचे फुगे उडवत आहे . त्याचे प्रेम = लगेच हवेत
वरून जाणारे साबणाचे फुगे
#फँड्रीअभ्यास - 110
जब्याला टी शटर्श्व आ ण जीन्स पॅण्ट हवी होती. ज्यासाठी तो सनेमाभर
कष्ट करून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो - ते त्याला
मळालेले नाही. मात्र पाटलाच्या मुलाच्या अंगात नवीन टी शटर्श्व आ ण
जीन्सची पॅण्ट आहे .

एवढे च नाही तर यात्रे न मत्त पऱ्याला पण नवीन टी शटर्श्व मळालेला आहे .


#फँड्रीअभ्यास - 111
जब्या कपडे घ्यायला गेल्यावर दुकानातील हे दृ य - दुकानदार ग्राहक
आ ण कपड्याच्या गराड्यात आहे . दुकानाच्या एका कोपऱ्यात एक
आजोबा राखणदार म्हणून बसलेले आहे त. पऱ्या दुकानाबाहे रच काचेतून
बघतोय. डटे लंग सुंदर !
#फँड्रीअभ्यास - 112
जब्या कपडे घ्यायला गेल्यावर दुकानदार त्यांना फक्त दोनच शटर्श्व
दाखवतो - ल मटे ड चॉईस. त्यातील एक शटर्श्व , ते दुकानाच्या दारातच
उभ्याने खरे दी करतात.
#फँड्रीअभ्यास - 113
चंक्या जादूटोणा, साधना, मंत्रतंत्र, साधू, भगत यांच्या नादी लागलेला
आहे . इथे पण तो एका बुवा बरोबर दाखवलेला आहे . आता इथे बुवाच का
दाखवला? दुसरा कुणी का नाही दाखवला?

अ या छोट्या छोट्या गोष्टींनी कुठलेही पात्र ठसठशीत होत असते.


#फँड्रीअभ्यास - 114
खाली खांबाजवळ बसलेली व्यक्ती पहा ! तचा चेहरा सुजलेला आहे , तो
अट्टल दारुड्या आहे .

यानंतर पुढच्या फ्रेममध्ये दारूचे दुकान दाखवले आहे . म्हणजे दारूचे


दुकान दाखवण्याआधी सूक्ष्म इशारा ( हंट) दला आहे , दजर्जेदार सनेमा
असा असतो. असा सनेमा एकदा पाहू न संपूणर्श्व कळत नाही, त्यात सूक्ष्म
सूक्ष्म गोष्टी असतात.
#फँड्रीअभ्यास - 115
वाद्ये वाजवणारे नळ्या कपड्यात तर पालखी वाहणारे भगव्या कपड्यात
आहे त !
#फँड्रीअभ्यास - 116
जब्या, पऱ्या मुख्य प्रवाहात शरण्याचा प्रयत्न करताहे त आ ण त्यांना
परत परत बाहे र ढकलले जात आहे .
#फँड्रीअभ्यास - 117
इथे चंक्या नाचतो आहे आ ण जब्याची मोठी बहीण त्याच्याकडे कौतुकाने
पाहत आहे . यात काही शक्यता पेरलेल्या आहे त.
#फँड्रीअभ्यास - 118
काही वेळापूवर्णी दुसऱ्याच्या डोक्यावर असलेला जब्या आता स्वतःच्या
डोक्यावर दवा घेऊन उभा आहे ( दव्या खाली अंधार ! ) आ ण त्याच्या
समोर त्याला चडवत, पाटलाचा मुलगा आ ण त्याचा गॉडफादर नाचत
आहे त. तेही ना यके समोर !

शारी रक हंसेपेक्षा अशी मान सक हंसा खूप वेदनादायक आहे , आ ण ही


वेदना जब्याच्या डोळ्यातून अश्रू रूपाने व्यक्त होते आहे .
#फँड्रीअभ्यास - 119
लोकेशनला पण स्वतःचे प्रखर व्यिक्तमत्व असते ! ही अंघोळीची जागा
खूपच ट पकल आहे ! लोकेशन हं टरचे आ ण आटर्श्व डरे क्टरचे कौतुक !
छाया चत्रणाची फ्रेम म्हणून पण मस्त आहे !
#फँड्रीअभ्यास - 120
यात्रेत डु क्कर शवल्यामुळे पाटील घरी येऊन रात्रीची अंघोळ करतो आ ण
डु क्कर पकडण्यासाठी कचरूला बोलावून घेतो. पाटील वरच्या पातळीवर
तर कचरू खालील पातळीवर, पाटलाच्या पायाशी आहे .
#फँड्रीअभ्यास - 121
संपूणर्श्व सनेमात रखरखीत पवळी झाडी - वाळलेले गवत दाखवले आहे .
फक्त याच दृ यात हरवी झाडे आ ण हरवळ आहे .

नवा टी शटर्श्व , नवी जीन्स पॅण्ट आ ण ना यका त्याला फक्त स्वप्नातच


मळते !

आ ण या दृ यातील हा अंगावरचा ड्रेस पण त्याने पूवर्णी पा हलेल्या वैन


हु सैन च्या महागड्या शो रूम मधलाच आहे !
#फँड्रीअभ्यास - 122
हाताला में दी लावल्यावर दुसऱ्या दवशी ती न धुता त्यावर खोबरे ल तेल
लावले की ती अ धक रं गते असे मानतात. अशा छोट छोट्या ग्रामीण
धारणा यात असल्याने हा सनेमा या मातीतला ठरतो.
#फँड्रीअभ्यास - 123
वेशीबाहे रची माणसे वेशीच्या आत जात आहे त ! म्हणजे ही वेशीबाहे रील
माणसे आहे त हे अधोरे खत होते !
#फँड्रीअभ्यास - 124
इथे कॅमेऱ्याचा असा अँगल आहे की जणू आता हे सारे कुटु ं ब आखाड्यात
कुस्तीसाठी उतरते आहे .
#फँड्रीअभ्यास - 125
डु क्कर पकडायला आल्यावर सगळ्या कुटु ं बीयांचा चेहरा कॅमेऱ्याकडे आहे .
मात्र जब्या वरुध्द दशेला चेहरा करून बसलेला आहे .
#फँड्रीअभ्यास - 126
शाळे चे गेट उघडते त्याच क्षणी जब्या डु क्कर पकडण्यासाठी मैदानात
प्रवेश करतो ! टाय मंग लाजवाब !

तसेच

1. शाळे चे नाव व शष्ट वगार्श्वचे वचर्श्वस्व सांगणारे आहे .

2. लांडगे हे आडनाव पण वचारपूवक


र्श्व नवडलेले आहे .
#फँड्रीअभ्यास - 127
संपूणर्श्व सनेमात कचरू हाय अँगलने कं वा आय लेव्हलला दाखवला आहे .
मात्र यादृ यात आपल्या कुटु ं बयांना आदे श दे ताना लो अँगलने दाखवला
आहे . इथे तो इन्चाजर्श्व आहे .
#फँड्रीअभ्यास - 128
जब्या व डलांच्या मागे जात नाही, ‘वेगळ्या’ दशेने जातो !
#फँड्रीअभ्यास - 129
जब्या ‘वरच्या पातळीला’ आ ण व डलांपासून ‘दूर’ उभा आहे .
#फँड्रीअभ्यास - 130
नायक फ्रेमच्या एका बाजूला आहे आ ण नोजरुम कमी आहे ! कचाट्यात
सापडलेला ! अडकलेला !
#फँड्रीअभ्यास - 131
या दृ यात डावीकडील दरवाज्याआड जब्या लपून बसलेला आहे आ ण
कचरूच्या चपलेत काटा घुसतो. तो खाली बसून तो काटा काढतो. जब्याचे
लपणे म्हणजे कचरूच्या मागर्श्वक्रमणात काटा घुसणे.
#फँड्रीअभ्यास - 132
नायक चौकटीत अडकला (फ्रेम इन अ फ्रेम) आहे , खालच्या स्तरावर आहे
तर त्याचे वडील वरच्या स्तरावर आहे !

या दृ यात जब्या सवार्श्वत खालच्या पातळीवर आहे आ ण त्याच्या पळू न


जाण्याच्या/ लपण्याच्या सवर्श्व वाटा कुटु ं बीयांनी अडवल्या आहे त.
#फँड्रीअभ्यास - 133
फ्रेम इन अ फ्रेम - जात व्यस्थेच्या चौकटीत अडकलेला कचरू, त्यामुळेच
त्याच्यावर हातात हे फासे घ्यायची वेळ आली.
#फँड्रीअभ्यास - 134
जवळील शाळे त राष्ट्रगीत चालू झाल्यावर सवर्श्व स्तब्ध उभे राहतात.
डु क्कर जवळ असूनही पकडता येत नाही.....

वलक्षण आहे हा प्रसंग ! फक्त पडद्यावर अनुभवण्याचा हा भाग आहे . या


दृ याने सनेमाला खूप उं चीवर नेऊन ठे वले आहे .
#फँड्रीअभ्यास - 135
या दृ यात खूप खालच्या पातळीवर असूनही जब्याची आई खल्ली
उडवणाऱ्याला जशास तसे उत्तर दे ण्याचा प्रयत्न करते. तचा कमरे वरील
हात आ ण खल्ली उडवणाऱ्या गावकऱ्याचा कमरे वरील हात खूप काही
सांगून जातात. दोघांचा आकार पण लक्षात घेण्यासारखा आहे .
#फँड्रीअभ्यास - 136
1. वठलेल्या वृक्षावरून कॅमेरा खाली येतो तेथे नवऱ्याने सोडू न दलेली
मुलगी आहे (वठलेला वृक्ष = नवऱ्याने सोडू न दलेली मुलगी). झाडावरील
कावळा पण लक्षात घ्या.

2. बॅकग्राऊंडला शाळाबाह्य मुले या वषयी रे डओवर बातमी चालू आहे


आ ण शाळे च्या बाहे र हे नाट्य घडते आहे !
#फँड्रीअभ्यास - 137
जब्याची बहीण पळू न पळू न दमली आहे आ ण फोरग्राउं डला पाणी उकळले
आहे .
#फँड्रीअभ्यास - 138
डु करांच्या मागे पळू न पळू न दमल्यामुळे पाणी पणारी जब्याची बहीण
आ ण त्याच वेळी ही पळापळ बघून दमलेले गावकरी पाणी पताना
दाखवलेले आहे त.
बराच वेळापासून दमछाक चालू आहे !
#फँड्रीअभ्यास - 139
सोशल मी डयाचा गैरवापर.

या पकडापकडीचा िव्हडीओ फेसबुकवर टाकणारा गावकरी.

िव्हडीओ व्हायरल झाला की आयुष्यभर पडीताला त्रास.

या लोकांच्या दृष्टीने ही एक मनोरं जनात्मक आयपीएल मॅचचं आहे .


#फँड्रीअभ्यास - 140
जब्या डु कराची नाकेबंदी करतोय पण व्यवस्थेने त्याची नाकेबंदी केलेली
आहे .
#फँड्रीअभ्यास - 141
डु क्कर पकडत असताना शाळा सुटते. या दृ यात शाळे च्या फळ्यावर
बातम्या या मथळ्याखाली प हली बातमी आहे - असंघ टतांचा लढा चालू
राहील….

खेळाडू ला कोटीचे बक्षीस आ ण इथे पण एक खेळ चालू आहे .

आटर्श्व डरे क्टरचे कौतुक !


#फँड्रीअभ्यास - 142
जब्या आ ण कुटु ं बाची खल्ली उडवण्यात पाटलाने कुलकणर्णीला पण
सामील करून घेतले आहे .
#फँड्रीअभ्यास - 143
पुजाऱ्याचा संस्कारी मुलगा इथे अ लील बोलतो.
#फँड्रीअभ्यास - 144
तकडे डु क्कर कपारीत लपले आहे तर इकडे जब्या एका बोळीत (ट्रॅ पड)
#फँड्रीअभ्यास - 145
ड्रेस डझायनरचे कौतुक - कचरूची अंडरवेअर साधी पट्ट्यापट्ट्यांची
आहे !
#फँड्रीअभ्यास - 146
झाडाच्या एका बाजूला नायकाची मजा पाहणारे आहे त तर दुसऱ्या बाजूला
नायकचा मत्र दुःखी आहे ! त्यांच्या पातळीत पण फरक आहे !
#फँड्रीअभ्यास - 147
नायकाची मजा पाहणारे मागे वरच्या पातळीवर आहे त, नायक खालच्या
पातळीवर आहे ! त्याला सगळ्यांनी मागून घेरलेले आहे !
#फँड्रीअभ्यास - 148
या ठकाणी एक गावकरी जब्याच्या ब हणीचा उल्लेख पी. टी. उषा असा
करतो ! यात खूप शक्यता लपलेल्या आहे त - ती गावातील एक चांगली
धावपटू होती, लवकर लग्न झाले आ ण ....
#फँड्रीअभ्यास - 149
डु क्कर पकडण्याच्या प्रसंगी एका बघ्या उच्चवणर्णीय गावकऱ्याचे घड्याळ
बंद पडलेले आहे . म्हणजे काळ थांबलेला आहे . प्रगती झालेलीच नाही.

हे या सनेमातील उच्चतम दृ य आहे .


#फँड्रीअभ्यास - 150
नायकाला त्याच्या घरच्या सगळ्यांनी घेरलेले आहे ! तो त्यांच्या
सगळ्यांच्या पायाशी आहे !
#फँड्रीअभ्यास - 151
जातीव्यवस्था नष्ट व्हावी म्हणून झगडणाऱ्या महापुरुषांच्या समोरून
जातीव्यवस्थेचे बंधक जाताना !
#फँड्रीअभ्यास - 152
पाटलाच्या मुलाला ढकलल्यावर तो म्हणतो ‘ शवलं असतं की !’

इथे अस्पृ यतेचा संदभर्श्व आहे !


#फँड्रीअभ्यास - 153
जब्या दगड मारत आहे आ ण त्याची मोठी बहीण त्याला परावृत्त करत
आहे कारण तला याच्या पुढच्या प रणामांची चंता असावी. त्याच वेळी
त्याचा छोटा मत्र पऱ्या त्याला प्रोत्साहन दे तो आहे , बहु तक
े त्याला
प रणामाची जाणीव नाही.
#फँड्रीअभ्यास - 154
जातीव्यवस्थेचा बळी थेट कॅमेऱ्याकडे म्हणजे प्रेक्षकांकडे म्हणजेच
आपल्याला दगड मारतो आहे .
#फँड्रीअभ्यास - 155
सवार्श्वत शेवटी जब्याने मारलेला दगड कॅमेऱ्याकडे येत येत मोठा मोठा होतो
आ ण सगळा पडदा व्यापून टाकणारा अंधार पसरतो ..... नरव शांतता ...

काळाकुळकुळीत अंधार ..... भयंकर शांत अंधार !

आपल्या मनातील अंधाराला गडद करणारा अंधार ...

शेवटची शांतता अंगावर येणारी आहे . ती असह्य होते ....

आपली आपल्याला लाज वाटायला लावते ....नागराज मंजुळे टच !


डस्क्लेमर
1. या सनेमात मला जे अथर्श्व सापडले आहे त, अगदी तेच आ ण तसेच
दग्दशर्श्वकाला अ भप्रेत आहे त, असा माझा दावा नाही.
2. या सनेमाबाबत मी जी नरीक्षणे नोंदवली आहे त, जे अथर्श्व मला
सापडले आहे त - हे च अं तम सत्य आहे , असाही माझा दावा नाही.
3. मी माझा अभ्यास, नरीक्षण, आकलन, ज्ञान, बुद्धी, समज,
वैचा रकता, मान सकता, जगण्याचे संदभर्श्व/ पा वर्श्वभूमी आ ण वकुबा
प्रमाणे मांडणी केली आहे , जी चुकीची पण असू शकते. योग्य वाटे ल
तेवढे घ्या, बाकीचे सोडू न द्या.
फॅन्ड्री - एक अ भजात सनेमा

-:: मतेश ताके :: -

- :: श्रीरामपूर, िज. अहमदनगर :: 9890601116 ::-

You might also like