You are on page 1of 8

कापुस खत व्यवस्थापन

कोरडवाहु कापस
ु लागवडीसाठी रासायनिक खतांची मात्रा - (प्रमाण किलो
प्रती एकर)

कोरडवाहु कापुस पिकांस रासायनिक खते दे तांना, स्फुरद व पालाश खतांची अर्धी मात्रा
लागवडीच्या वेळेस द्यावी. रोप उगवणीनंतर कापुस पिकांस नत्र यक्ु त खतांची अर्धी
मात्रा द्यावी. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा दिल्याने रोपांस नत्र वापरणे शक्य
होते, लागवडीच्या वेळेस नत्र युक्त खते दिल्याने, रोप उगवुन येई पर्यंत त्यातील बरचेसे
नत्र वाया जाते, ज्यामुळे त्याचा पिकांस फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश
युक्त खतांची तसेच नत्र युक्त खतांची राहीलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर ३० ते ४०
दिवसांत जमिनीत एकत्र करुन टाकावी. खालिल तक्यात कोरडवाहु वाणांसाठी दे ण्याची
रासायनिक खतांची मात्रा विभागन
ु दिलेली आहे .

लागवडीनंत नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशिय कॅल्शियम सल्फर झिंक फेरस मँगनिज
र दिवस म सल्फेट नायट्रे ट सल्फे सल्फेट सल्फेट

५-१० दिवस २० २५ २० ०० ०० ०० ०० ०० ००

३०-३५ ३० २५ ५० १० १० १ १० १० २
दिवस

एकुण ५० ५० ७० १० १० १ १० १० २
बागायती कापस
ु पिकासाठी आदर्श खत व्यवस्थापन -(प्रमाण किलो प्रती
एकर)

लागवडीनंत नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशिय कॅल्शियम सल्फर झिंक फेरस मँगनिज
र दिवस म सल्फेट नायट्रे ट सल्फे सल्फेट सल्फेट

५-१० दिवस २० २५ २५ ०० ०० ०० ०० ०० ००

३०-३५ २० २५ २५ १० १० १ १० १० २
दिवस

६०-६५ २० ०० २५ १० ०० ०० ०० ०० ००
दिवस

९० - ९५ २० ०० २५ १० ०० ०० १० ५ ००
दिवस

एकुण ८० ५० १०० ३० १० १ २० १५ २

फवारणीतुन कोणती खते दे णार

कापुस पिकांत फुलपाती लागण्यापासुन तर बोंड पक्व होईपर्यंत पालाश अन्नद्रव्याची


गरज जास्त असते. हे अन्नद्रव्य कापुस पिकांस फवारणीद्वारे कापुस पिकाच्या बोंड
पक्वतेच्या काळात दे णे जास्त फायदे शिर ठरते. पालाश युक्त खतांचा योग्य प्रमाणात
परु वठा झाल्यास कापस
ु पिकाच्या बोंडांचे वजन वाढते, धाग्याची जाडी वाढते, तसेच
कापस
ु पिकाची पाने लाल पडण्याचे प्रमाण कमी हाते . खालिल प्रमाणे कोरडवाहु तसेच
बागायती कापस
ु वाणांस फवारणीतन
ु खते द्यावीत.
पिकाच्या वाढीची अवस्था फवारणीच्या खतांचा प्रकार प्रमाण प्रती लिटर पाणी

लागवडीनंतर १५ -२० दिवस 19-19-19 2.5 -3 ग्रॅम

सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम

चिलेटेड झिंक १ ग्रॅम

वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी कॅल्शियम नायट्रे ट 4-5 ग्रॅम

२० टक्के बोरॉन 1 ग्रॅम

चिलेटेड झिंक १ ग्रॅम

फुलोरा अवस्थेत 00-52-34 4-5 ग्रॅम

मायक्रोन्युट्रीएंटस ् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम

बोंड धारणा 00-52-34 4-5 ग्रॅम

बोरॉन 1 ग्रॅम

मॅग्नेशियम सल्फेट 2 ग्रॅम

बोंड पोसत असतांना 00-00-50 4-5 ग्रॅम

मॅग्नेशियम सल्फेट 4-5 ग्रॅम

कापस
ु पिकांतील संजिवकांचा वापर
कापुस पिकांत ६- बी.ए., क्लोरमॅक्वेट क्लोराईड या दोन संजिवकांचा वापर करणे
फायदे शिर ठरते.

क्लोरमॅक्वेट क्लोराईड (लिहोसिन वै. नावांनी उपलब्ध)

हे एक वाढ रोधक आहे . याच्या वापरानंतर कापस


ु पिकाची वाढ काही काळापरु ता
थांबवली जाते, ज्यामुळे कापुस पिकांतील सायटोकायनिन ची निर्मिती वाढीस लागुन,
फुलधारणा जास्त प्रमाणात होते.

६- बी.ए. – (अरो वै. नावांनी उपलब्ध)

हे एक सायटोकायनिन असन
ु , याच्या वापराने पिकाची वाढ तर थांबतेच मात्र त्यासोबत
फुलांची निर्मीती दे खिल वाढते, तसेच धागा लांब आणि जाड होण्यास दे खिल मदत
मिळते. ६ –बी.ए. चा वापर हा १० पीपीएम (१ ग्रॅम ६ –बी.ए. १०० मिली सॉलव्हं ट मध्ये
विरघळवुन हे द्रावण १०० लिटर पाण्यातुन फवारणे) या प्रमाणात फुल धारणा होण्याच्या
३ ते ७ दिवस आधी करावा. हा काळ कापुस पिकाच्या लागवडीनंतर १५ ते २०
दिवसांनी असतो.

कापस
ु पिकांत वापरता येणारी किटक नाशके आणि बरु शीनाशके

किटकनाशक कोणत्या किडीच्या शेतात फवारणीनंतर काढणी पुर्व


क्रियाशिल घटक नियंत्रणासाठी किती तास जास्त प्रभाव कालावधी
उपयुक्त ठरे ल. धोकेदायक ठरतो

बायफेनाझेट कोळी १२ तास ६० दिवस

सायपरमेथ्रीन अळी, लष्करी अळी, १२ तास १४ दिवस


थ्रिप्स

असिटामॅप्रिड पांढरीमाशी, मावा, १२ तास २८ दिवस


तुडतड
ु े
बॅसिलस थ्यरु ें जेंसिस अळी ४ तास ० दिवस

थायमेथॉक्झाम पांढरी माशी, मावा, १२ तास -


(क्रुझर) (बीज प्रक्रिया) थ्रिप्स

ब्युप्रोफेनझिन पांढरी माशी १२ तास २१ दिवस

डायमेथोएट (रोगार) मावा, तुडतड


ु े ४८ तास १४ दिवस

प्रोफेनोफॉस मावा, लष्करी अळी, २-३ दिवस १४ दिवस


अळी, पांढरी माशी

इमिडाक्लोप्रिड (बीज मावा, थ्रिप्स - -


प्रक्रिया)

इमिडाक्लोप्रिड मावा १२ तास १४ दिवस


(फवारणीतुन)

डायकोफॉल कोळी १२ तास ३० दिवस

क्लोरोपायरीफॉस मावा, पांढरी माशी २४ तास १४ दिवस

मॅलेथिऑन नाकतोडे १२ तास ० दिवस

ऑक्झिडिमॅटोन मावा २-३ दिवस १४ दिवस


मिथाईल

असिफेट थ्रिप्स, मावा, २४ तास २१ दिवस


पांढरीमाशी, अळी
इन्डॉक्झाकार्ब अळी १२ तास १४ दिवस

स्पिनोसॅड अळी ४ तास २८ दिवस

लॅ म्डा साह्लोथ्रिन अळी, थ्रिप्स २४ तास २१ दिवस

अबामेक्टिन कोळी १२ तास २० दिवस

कापस
ु पिकातील पर्न
ु बहार (फरदड) व्यवस्थापन
कापुस पिकांत फरदड चांगली येण्यासाठी खालिल प्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
तसेच कापुस पिकांस वर फवारणीसाठी जी खते शिफारस केली आहे त त्यांची फवारणी
घ्यावी.

पहिल्या न स्फुर पाला मॅग्नेशिय कॅल्शिय सल्फ झिंक फेरस मँगनि


वेचणीनंत त्र द श म सल्फेट म र सल्फे सल्फे ज
र दिवस नायट्रे ट ट ट सल्फेट

५-१० १० २५ २० ०० ०० ०० ०० ०० ००
दिवस

३०-३५ २० ०० २० १० १० १ १० ०० ००
दिवस

एकुण ३० ०० ४० १० १० १ १० ०० ००

कापुस पिकातील पिक फेरपालट

कापुस पिकांत येणा-या विविध रोग व सुत्रकृमींच्या प्रादर्भा


ु वापासुन पिकाचे संरक्षण
करित असतांना पिकाची फेरपालट करणे दे खिल फायदे शिर ठरते. कापुस पिकातील पिक
फेरपालट करतांना त्यापासुन कोणत्या पिकापासुन काय फायदा मिळे ल ते खालिल
तक्त्यात दर्शविले आहे . खालिल तत्क्यात कापुस पिकावर हल्ला करणारे सुत्रकृमी आणि
मुळांना होणारे रोग यांच्या विरुद्ध पिक फेर पालट केल्याने कापुस पिकांस काय फायदा
होईल ते दिलेले आहे .

फेरपालट साठी सुत्रकृमी व्हर्टिसिलियम रायझोक्टोनिया फ्युजॅरियम


पिक विल्ट आणि पिथियम विल्ट
तण
ृ धान्य आणि समाधानकारक समाधानकारक समाधानकारक काही
उन्हाळ्यात शेत प्रमाणात
मोकळे ठे वणे परिणाम

हिवाळ्यातील काही प्रमाणात काही प्रमाणात काही प्रमाणात काही


तण
ृ धान्य परिणाम परिणाम परिणाम प्रमाणात
परिणाम

चवळी लागवड समाधानकारक समाधानकारक अल्प प्रमाणात काही


परिणाम प्रमाणात
परिणाम

मका समाधानकारक समाधामकारक समाधानकारक काही


प्रमाणात
परिणाम

ज्वारी समाधानकारक समाधानकारक समाधामकारक काही


प्रमाणात
परिणाम

कांदा - लसण
ु अल्प प्रमाणात समाधानकारक अल्प प्रमाणात काही
परिणाम परिणाम प्रमाणात
परिणाम

You might also like