You are on page 1of 2

श्री

भाडेकरार पत्र

आम्ही नंबरः एक श्री. गजानन गंगाराम सव्वाशेरी, वयवर्षे: 65, राहणार: 21/ए 1, वझे गल्ली, मा-वडगांव, बेळगांव, (हे
मिळकतीचे मालक) आणि

नंबर: दोन सौ. लक्ष्मी मारुती सपारे, वयवर्षेः 49, राहणारः नेगिनहाळ, संपगांव, जिः बेळगांव, आधार: 8208 8701 0529,
(हे भाडेकरु)

आम्ही लिहून दिले घेतले भाडेकरार पत्र ऐसाजे;


तालुकाः बेळगांव पैकी महानगर पालिका बेळगांवचे हद्दीतील वडगांव, वझे गल्ली येथील घर नं. 21/ए 1, या मिळकतीचे संपूर्ण
मालक आम्हां पैकी नं. 1 यांनी असून, सदर मिळकती पैकी 10' *10' चे 2 आर सि सि फस्ट फ्लोर व 10' *10' चे 2 पत्राचे इमारत
(बाथरुम आणि संडास सहीत) रहिवासी ब्लाक मिळकत आम्हां पैकी नं. एक मालक हे आम्हांपैकी नं. दोन यांना 'भाडेकरु' या नात्याने
वापरण्यास तारीखः 01/01/2024 पासून 11 महिन्यापर्यंत या खालील अटीव शरत्तीवर दिले आहेत.

1. सदर मिळकतीचे दर महा भाडे रक्कमः 2,400/- दोन हजार तीनशेहे रुपये प्रमाणे ठरविले आहे, त्याप्रमाणे भाडेकरूं नी मालकांना
दर महा भाडै रक्कम न चुकता इंग्लिश महिन्याचे 5 तारखेपर्यंत देत जाण्याचे आहे.

2. सदर मिळकतीचे सेक्युरिटीसाठी मालकांना भाडेकरूं नी ठेव डिपॉझीट दाखल रक्कम; 8,000/- आठ हजार रुपये दिले ते
मालकांना पोचले आहेत, निराळी पावतीची आवश्यकता नाही.

3. सदर मिळकत भाडेकरूं नी स्वतःसाठी वापरण्याचे आहे, दुसरे कोणासही पोट भाड्याने आदी देण्याचे नाही, सदर मिळकत
भाडेकरूं नी योग्य रितीने वापरीत जाण्याचे आहे. सदर मिळकतीचे किरकोळ रिपेरी खर्च भाडेकरूं नी परभारे करण्याचे आहे.

4. सदर मिळकतीत भाडेकरु व त्यांचे कु टुंब राहण्याचेआहे, भाडेकरु शेजारी पाजारींना कोणत्याही प्रकारचे त्रास देऊ नयेत. घर
स्वच्छ ठेवण्याचे आहे.

5. सदर मिळकतीचे विज पुरवठा बिल भाडेकरूं नी भरण्याचे आहे, व इमारतीचे घर पट्टी मालकांनी भरण्याचे आहे.

6. सदर मुदत संपताच, सदर मिळकत भाडेकरूं नी विना तक्रार खाली करुन, मिळकत आताच्या योग्य स्थितीत मालकांना परत
देण्याचे आहे, त्यावेळी मालकांनी भाडेकरूं ना डिपॉझीट रक्कम बिन व्याजाने परत देण्याचे आहे व हे करार रद्द करण्याचे आहे.

7. सदर मुदतीपूर्व सदर भाडे पत्र रद्द करण्याचे झाल्यास, त्याबाबत मालकांना भाडेकरूं नी 2 महिने आगाऊ कळविण्याचे आहे.

8. सदर मिळकतीत भाडेकरूं नी काही तोडमोड, फे रफार आदी करण्याचे नाही, इमारतीचे नुकसान करण्याचे नाही. तसे काही
के ल्यास, त्याची योग्य दुरुस्ती व रिपेरी भाडेकरूं नी आपल्या खर्चाने करुन देण्याचे आहे, जर तसे करुन न दिल्यास, तो खर्च डिपॉझीट
रक्कमेतून वजा करण्यास मालकांना हक्क राहील.

9. सदर मिळकत जरुर त्यावेळी पाहण्यास मालकांना हक्क आहे.

10. सतत 2 महिने भाडे रक्कम भाडेकरूं नी मालकांना न दिल्यास, सदर भाडे पत्र रद्द करावयाचे हक्क मालकांना आहे.

यातील सर्व अटी, शरत्त आम्हांस व आमचे कायदेशीर वारसदारांना बंधनकारक आहेत. म्हणून आम्ही आमचे संतोषाने लिहून दिले
घेतले भाडेकरार पत्र सही व तारीखः 05/01/2023

मालक भाडेकरु

साक्ष: 1 2

3 4

You might also like